Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिसाच्या मुलाची ‘दृश्यम‍्’ स्टाइलने हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुलीच्या आत्महत्येचा सूड उगवण्यासाठीच सांगलीच्या बाप-लेकांनी शिरोळच्या पोलिसपुत्राचा ‘दृष्यम’ सिनेमा स्टाइलने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दृष्यम’ हा हिंदी सिनेमा पाहून कोणताही पुरावा मागे राहू नये, या पद्धतीने शाहरुख बोजगर याचा खून करण्यात आला. चित्रपट पाहून चित्रपटाला साजेशा या थरारनाट्याचा निपाणी व कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावला.

याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वडील रवींद्र जीवन नगरकर, मुलगा रोहित व सुमित रवींद्र नगरकर व नातेवाईक आकाश जफान मंच्छर (सर्वजण रा. कुपवाड, सांगली) या चौघांना ताब्यात घेतले आहे. निपाणी सीपीआय किशोर भरणी व ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत या सूडनाट्याचा उलगडा केला.

सांगलीतील बांधकाम व्यावसायिक रवींद्र जीवन नगरकर यांना प्रिया, रोहित व सुमित ही तीन अपत्ये. २००७ मध्ये प्रियाचा पुण्यातील एका युवकाशी विवाह झाला होता. दोन वर्षांत प्रियाला एक मुलगी झाली. मात्र, पतीशी न पटल्याने ती २००९ मध्ये सांगली येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. २०१४ - १५ मध्ये प्रियाने सांगलीतील पतंगराव कदम भारती विद्यापीठ येथे बीएससी पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला. बीएससीच्या तिसऱ्या वर्षामध्ये शाहरुख शब्बीर बोजगर याने प्रवेश घेतल्यानंतर त्याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच प्रिया आणि शाहरुख यांचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांमध्ये अनेकवेळा अनैतिक संबंधही घडून आले. दोघांच्या या प्रेमप्रकरणाची कुणकुण प्र‌ियाच्या भावांना लागल्यानंतर प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र प्रिया व शाहरुख यांच्यातील संबंध कायम राहिले. अखेर भावांनी शाहरुखला गाठून धमकीही दिली. त्यावेळी प्रियाचे लग्न झाले असून तिला एक मुलगी असल्याचे सांगितले. प्रियाने लग्न आणि मुलाची बातमी लपवून ठेवल्याने लग्नाबद्दल कळताच त्याला धक्का बसला. प्रिया आणि शाहरुख लग्न करण्याचा विचारात असताना ही माहिती कळल्याने शाहरुख आणि प्रियामध्ये वाद सुरू झाला. शाहरुखने प्रियाला लग्नासाठी नकार दिल्याने नैराश्यातूनच प्रियाने २८ डिसेंबर, २०१६ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शाहरुखमुळेच तिने आत्महत्या केली, असा समज करून घेऊन वडील रवींद्र, रोहित व सुमित पेटून उठले. लहान सुमितच या थरारनाट्याचा मास्टरमाईंड बनला. शाहरुख हा एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. व्यायामाची सवय असणारा पिळदार शरीरयष्टीचा आणि चपळ आहे. त्यामुळे शाहरुखचा गेम असा सहजासहजी करता येणार नाही. याचा विचार करून बाप लेकांनी चार महिने थंड डोक्याने प्लॅन करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून या सर्वांनी ‘दृष्यम’ सिनेमाची अक्षरश: पारायणे केली. खून कसा करावा, पुरावे कसे मिटवावेत याचा बारकाईने विचार केला. सुमितचाच दूरचा नातेवाईक आकाश याला या कटामध्ये सामील करून घेण्यात आले.

शाहरुखवर ‘हनी ट्रॅप’

आकाश याची एका दूरच्या मैत्रिणीची मदत घेण्यात आली. या मैत्र‌िणीच्या सहाय्याने मुंबईतल्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या मात्र दिसायला सुंदर तरुणीची मदत घेण्यात आली. त्या तरुणींने शाहरुखला आपल्या जाळ्यात ओढायचे आणि बाप लेकांच्या हवाली करायचे असे डील ठरले. यासाठी ५० हजार रुपयेही त्या तरुणीला देण्यात आले. चोर बाजारातून एक मोबाइल आणि दुसऱ्याच्याच नावावर असलेले सीमकार्ड त्या तरुणीला देण्यात आले. शाहरुखचा मोबाइल नंबरही तिला देण्यात आला. शाहरुख तो अलगदच त्या तरुणीच्या जाळ्यात सापडला. त्या तरुणीनेच शाहरुखशी मोबाइलवरुन चॅटिंग सुरू केले. त्याला शाहरुखही प्रतिसाद देत गेला. त्या तरुणीने आपण शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याचे खोटेच शाहरुखला सांगितले होते. त्या तरुणीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी शाहरुख उतावीळ झाला होता. अखेर ११ जुलै रोजी त्या तरुणीने शाहरुखला सकाळी शिवाजी विद्यापीठात भेटायला येण्यास सांगितले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात एमएसस्सीला प्रवेश घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शाहरुख शिरोळ येथील घरातून बाहेर पडला. दुपारी १२ च्या सुमारास एका भाड्याने घेतलेल्या गाडीतून ती तरुणी विद्यापीठात आली. या गाडीचा चालक होता आकाश. प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे सरनोबतवाडी येथे एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. त्या बंगल्यात आपण राहत असून घरी कोणीच नाहीत असे सांगून त्या तरुणीने शाहरुखला आपल्या कार पाठोपाठ येण्यास सांगितले. त्या कारच्या पाठोपाठ शाहरुख आपली दुचाकी घेऊन गेला. त्या बंगल्यात तरुणी आणि शाहरुख यांनी प्रवेश केला. त्यावेली बंगल्यात आधीच नगरकर पितापुत्र दबा धरून बसले होते. आकाशही त्या बंगल्यात आला. त्यांनी शाहरुखला पकडून एका खुर्चीला बांधले. ठरल्याप्रमाणे कामाचा व पैशांचा व्यवहार पुर्ण झाल्याने ती तरुणी त्याच वेळी तेथून निघून गेली.

अपघाताचा बनाव

दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत चौघांनी शाहरुखला जबरदस्तीने दारू पाजून बेदम मारहाण केली. त्यानंतर आडी मल्लय्या ते हणबरवाडी या निर्जन रस्त्यावर नेऊन पुन्हा मारहाण केली. शाहरुखची दुचाकी रोहितने घेतली. स्कार्पिओमध्ये सुमित शाहरुखला घेऊन बसला. रात्री साडेनऊच्या सुमारास महामार्गावरील टोल नाका चुकवून कोगनोळी मार्गे सुमितने शाहरुखला ‘पुन्हा असे कोणत्याही मुलीबरोबर करू नकोस. तुझ्या गाडीने तू परत जा’ असे सांगितले. दारुची धुंदी आणि दिवसभराच्या मारहाणीमुळे थकलेल्या शाहरुखने आपल्या दुचाकीवर बसताच वेगाने धूम ठोकली. मात्र, पुन्हा त्याला गाठून स्कॉर्पिओने शाहरुखच्या दुचाकीला धडक दिली. धडकेच्या आवाजाने त्या रस्त्यावरील फार्महाऊसमधील काहीजण धावत आले. यावेळी दुचाकी पडलेली होती तर शाहरुख तळमळत होता. यावेळी अपघातात कोणीतरी तरुण पडल्याचे सांगत आकाश, सुमित व रोहितने शाहरुखला रुग्णालयात नेतो, असे सांगून स्कॉर्पिओमध्ये घेतले. दुचाकी तिथेच सोडून एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी थांबून स्कॉर्पिओतून शाहरुखला बाहेर काढले. रस्त्यावर त्याला टाकून त्याच्या अंगावर तीनवेळा स्कॉर्पिओ गाडी घातली व पलायन केले. त्यानंतर तरुणीला दिलेला मोबाइल, शाहरुखचे दोन मोबाइल आणि हेल्मेट रात्री ११ च्या सुमारास पंचगंगा नदीमध्ये टाकले. तेथेच चौघांनी दुसरे कपडे घालून खुनात वापरलेले कपडेही नदीत टाकले. रात्री १२ च्या सुमारास रवींद्र यांनी आपल्या मुलांसह घरातील महिलांना घेऊन तुळजापूर गाठले. प्लॅनप्रमाणे सर्वकाही पार पडल्याने रवींद्रसह इतर मारेकरी निवांत राहिले. दरम्यान निपाणी पोलिसातील सीपीआय स्कॉड असोदे आणि जंबगी सांगलीत तळ ठोकून होते. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून घरी येत असताना रवींद्र, रोहित आणि आकाश शहरात मधेच उतरले. तर सुमित महिलांसोबत घरी आला. यावेळी असोदे व जंबगी यांनी सुमितला ताब्यात घेतले. सांगली व इचलकरंजी पोलिसात कळवून सुमितला निपाणी पोलिस स्टेशनमध्ये आणले. यानंतर इचलकरंजी व शहापूर पोलिसांनी रवींद्र, रोहित आणि आकाश यांना पकडून निपाणी पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर या चौघांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्याचा प्लॅनही सांगितला. या कारवाईत सहाय्यक फौजदार कोतवाल, राजू दिवटे, संतोष बडोदे, खडकलाटचे पीएसआय बसवनगौडा पाटील यांनीही सहभाग घेतला.

दृष्यम पाहून केले कृत्य

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांचा दृष्यम चित्रपट चांगलाच गाजला होता. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्याच मुलाच्या खुनाच्या प्रकरणातून आरोपी सहीसलामत सुटतो. हाच धागा वापरुन शाहरुखचा खून करण्यात आला. मात्र, सिनेमा आणि प्रत्यक्ष आयुष्यात फरक असतो हे न कळल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

प्रियाच्या आत्महत्येची नोंद नाही

प्रियाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे नगरकर पि‌तापुत्रांनी सांगितले. घरच्यांनी तातडीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणाची कोणतीच नोंद स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आलेली नाही. असेही पुढे आले आहे.

इतक्या लवकर तपास कसा केला?

चार महिने या खुनाची आम्ही तयारी करत होतो. कोणताही पुरावा मागे राहू नये, याची काळजी घेतली होती. तरीही इतक्या लवकर या खुनाचा तुम्ही तपास कसा केला? असा सवाल आरोपींनीच निपाणी पोलिसांना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ज्योत्स्ना शिंदे यांची अखेर बदली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक तक्रारींप्रकरणी चर्चेत आलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या बदलीचा आदेश अखेर शनिवारी आला. त्यांच्या जागी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाचे सहसचिव किरण लोहार यांची नियुक्ती झाली आहे. शिंदे यांची पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने बदल्यांचा आदेश शनिवारी जाहीर केला. आतापर्यंत राज्यातील २५ माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये तीन विनंती बदल्या झाल्या आहेत.

प्रशासनाने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंदे यांना गेले चार महिने सक्तीच्या रजेवर पाठ‍विले होते. शिंदे यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आला. यामध्ये वैयक्तिक मान्यता, जाहिरात न देता पदे भरणे, परस्पर मान्यता, अनुशेष डावलून मान्यता दिल्याचा आरोप झाला होता. त्यांच्याविरोधात दोनशेहून अधिक गंभीर तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची इन कॅमेरा चौकशी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते.

शिंदे यांच्या चौकशीत गंभीर बाबी पुढे आल्या होत्या. त्यांनी समाधानकारक खुलासाही दिलेला नव्हता. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्यावर कारवाई होणार, अशी चर्चा होती. कारवाई टाळण्यासाठी राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू होता. शिक्षण विभागाने शनिवारी राज्यातील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये शिंदे यांची बदली पुणे येथे करण्यात आली.

राज्य सरकार करणार कारवाई

शिंदे यांच्या विरोधात आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याच्या आरोप ठेवला होता. मूळ तक्रारीसह ३८ मुद्द्यांची चौकशी करून शिंदे यांना दोषी ठरविले होते. चौकशी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी सीईओ खेमनार यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी कारवाईची शिफारस शिक्षण आयुक्तांच्याकडे केली. आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या विरोधात झालेल्या तक्रारी आणि कारवाईचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

हजर करूनच बदली

शिंदे सध्या सक्तीच्या रजेवर आहेत. पुणे येथील पदभार स्वीकारण्यासाठी त्यांना एक दिवस माध्यमिक शिक्षण कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी सीईओ खेमनार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्यावर सुरू असलेल्या आरोपाची चौकशी सुरू राहणार आहे. त्या हजर झाल्यानंतर बदलीच्या ठिकाणचा आदेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोरांना दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या आवारात मुलींची छेडछाड काढणाऱ्या ५० हून अधिक टवाळखोरांना निर्भया पथकाने शनिवारी कारवाई केली. या कारवाईने कॉलेज कॅम्पस परिसरातून रोडरोमिओंनी काढता पाय घेतला. पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे स्वागत होत असून, कारवाईत सातत्या राहावे, अशी मागणी होत आहे.

माध्यमिक शाळा सुरू होऊन महिन्याचा कालावधी लोटला असून, महाविद्यालये सुरू झाली आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या आवारात टवाळखोरांचा वावर वाढला होता. मुलींची छेडछाड करणे, वेगाने दुचाकी चालवणे, मुलींचा व महिलांचा पाठलाग करण्याच्या गंभीर घटना घडू लागल्याने पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या सूचनेनुसार शनिवारी जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी पोलिसांनी शाळा व महाविद्यालयांच्या आवारात कारवाई केली. जुना राजवाडा पोलिसांनी गोखले कॉलेज, न्यू कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूलच्या परिसरातील रस्त्यांवर कारवाई केली. टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाने शनिवारी अकराच्या सुमारास नागाळा पार्क येथील विवेकानंद कॉलेजसमोरील रस्त्यावर रोडरोमिओंवर कारवाई केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे टवाळखोरांनी या परिसरातून काढता पाय घेतला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी शहाजी कॉलेज रस्त्यावर, तर राजारामपुरी पोलिसांनी शिवाजी विद्यापीठ रोड, राजाराम कॉलेज रोड, सायबर कॉलेज रोड, कमला कॉलेज रोडवर गस्त घालून कारवाई केली.

जुना राजवाडा पोलिसांनी विशाल तानाजी कदम (वय १८, रा. माळी गल्ली, रविवार पेठे), रोहित वसंत महाडिक (१८, माळी गल्ली, रविवार पेठ), मयूर मधुकर पाटील (१९, पाचगाव, ता. करवीर), प्रथमेश सुधीर पाटील (१८), विवेक विकास गाडगीळ (१९), मयूर प्रवीण पाटील (२३, रा. भवानी पेठ, पुणे), प्रशांत राजेंद्र कांबळे (२२, नवीन नाना पेठ, पुणे) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. कॉलेजच्या परिसरात आरडाओरड करणे, मुलींना टोमणे मारल्याप्रकरणी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच १३ वाहनचालकांकडून २६०० रुपये दंड वसूल केला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी शहाजी कॉलेज रस्त्यावर कारवाई करत ऋतुराज मारुती सूर्यवंशी (रा. कसबा बावडा), सुशांत दिलीप शिर्के (२१, उचगाव, ता. करवीर), कुणाल राजेश यादव (२१, साईनाथ कॉलनी, लाइन बाजार), सहवीज हिंदुराव जावेकर (२०, रा. पन्हाळा), अनिकेत अजित लाड (१९, आझाद चौक), रणजित आबासाहेब साळोखे (२१, कसबा बावडा), आदिनाथ गोविंद माने (२१, रा. पन्हाळा) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सोमवारीही निर्भया पथकाची कारवाई होणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना आता १० हजार मानधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगर विकास विभागाने मानधन वाढीसंदर्भातील आदेश महापालिकांना कळविला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांना सध्या दरमहा ७५०० रुपये मानधन मिळत होते. त्यामध्ये वाढ करत मानधनाची रक्कम १० हजार रुपये केली आहे. प्रशासनाकडून महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय जाहीर करून अंमलबजावणी होईल.

नगरसेवकांना सध्या मासिक मानधन ७५०० रुपये दिले जाते. परिवहन, स्थायी आणि शिक्षण समिती सभेसाठी १०० रुपये भत्ता​ दिला जातो. या व्यतिरिक्त पदाधिकाऱ्यांना वाहन व मोबाइल सुविधा दिली जाते. प्रभाग समिती सभापतींना वाहन भत्ता म्हणून दरमहा १५ हजार रुपये मिळतात. दरम्यान, महापालिकेकडून नगरसेवकांना दरमहा मिळणारे मानधन अत्यल्प असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. प्रभागांचा विस्तार मोठा असल्याने नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक, विविध कारणांसाठी होणारा पत्रव्यवहार यावर दरमहा हजारो रुपये खर्च होत असल्याचे नगरसेवक सांगतात.

राज्य सरकारने यापूर्वी २००८ व २०१० मध्ये मानधन निश्चित केले होते. नगरसेवकांना दूरध्वनी, पत्रव्यवहार व लेखनसामग्रीसाठी मासिक मानधन देण्याची तरतूद आहे. दरम्यान, महापालिका नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन होता. महापालिकांच्या वर्गवारीनुसार नगरसेवकांना द्यावयाच्या मानधनाची रक्कम निश्चित केली जाते. नगर विकास विभागाच्या आदेशाने सात वर्षांनंतर नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेच्या फंडातून या रकमेचे नियोजन होते.



वर्गीकरणनिहाय महापालिकांचे मासिक मानधन

अ प्लस ः २५ हजार रु.

अ वर्ग ः २० हजार रु.

ब वर्ग ः १५ हजार रु.

क व ड वर्ग ः १० हजार रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियोजन मंडळासाठी नऊ ऑगस्टला मतदान

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा नियोजन मंडळाच्या ४० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीसाठी मतदारांची यादी यापूर्वीच निश्चित झाली असून, त्यावर हरकतींची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. निवडणुकीची प्रक्रिया १८ जुलैपासून सुरू होणार असून, आवश्यकता भासल्यास ९ ऑगस्टला मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी येत्या १८ जुलैला निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. २१ जुलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर २४ जुलैला छाननी प्रक्रिया होणार आहे. वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी २५ जुलैला प्रसिद्ध होईल. छाननीत बाद ठरलेल्या उमेदवारी अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची संधी आहे. त्यासाठी २७ जुलैला सायंकाळी पावणे सहापर्यंत दाद मागता येईल. या अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून २९ जुलैला अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. त्यानंतरच वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी ३१ जुलैला जाहीर होईल. त्यानंतर १ ऑगस्ट दुपारी तीनपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. त्यानंतर आवश्यकता भासल्यास ९ ऑगस्टला मतमोजणीची प्रक्रिया होऊन त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे. रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका यांची नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नियोजन मंडळाची निवडणूक होते. यासाठी मतदानही सभागृहातील सदस्यांमधूनच होते. कोल्हापूर जिल्ह्यात मंडळाच्या ४० जागा आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे. यातही महिला राखीव, अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव जागा असणार आहेत. मंडळाची २०१३ मध्ये झालेली निवडणूक बिनविरोध झाली होती.

निवडणुकीसाठीच्या जागा...



महापालिका



नगरपालिका सभागृहे

२९

ग्रामीण निर्वाचन (जिल्हा परिषद)

४०

एकूण

मतदान असे...

६७

जिल्हा परिषद सदस्य

२१७

नगरपालिका सदस्य

७९

महापालिका सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चलनातून रद्द झालेल्या हजार व पाचशे रूपये मूल्यांच्या एक कोटींच्या नोटा बदलायला आलेल्या दोघांना शिरोली एमआयडी पोलिसांनी अटक केली. किशोर आत्माराम गांधी (वय ४५, रा. परळ, मुंबई) व कमलेश नंदलाल दुबानी (३९, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. पुणे बेंगळुरू महामार्गावर सांगली फाटा येथे शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. नोटांसह या दोघांना पोलिसांनी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे.

यासंबंधीची माहिती करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी दिली. मुंबईतील एक व्यक्ती जुन्या नोटा बदलण्यासाठी सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार कांबळे यांनी सापळा रचला. साडेदहा वाजता त्यांनी सापळा रचून गांधी व कमलेश दुबानी यांना ताब्यात घेतले. किशोर गांधी याच्याकडे ९९ लाख ९५ हजार ५०० रुपयांच्या एक हजार व पाचशेच्या नोटा आढळल्या. दोघांना शिरोली एमआयडीसी पोलिस नेण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत किशोर गांधीची परळ येथे मोबाइलची एजन्सी असून एक कोटीच्या बदल्यात २५ लाख रुपये देण्याची ऑफर कमलेश दुबानीने दिली होती, अशी माहिती पुढे आली आहे. चौकशीनंतर पोलिसांनी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती दिली. त्यानंतर प्राप्तिकर अधिकारी विजय नेतके, प्रकाश चौगुले शनिवारी पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या ताब्यात जुन्या नोटा देण्यात आल्या. हजाराच्या शंभर नोटा असलेली २२ बंडल तर तर ९७ सुट्ट्या नोटा मिळाल्या. तर पाचशेची १०० रुपये असलेले १५३ बंडल ९७ सुट्या नोटा मिळाल्या आहेत. अधिकारी नेतके यांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईतील हेडकॉन्स्टेबल वसंत पिंगळे, मच्छिंद्र पटेकर, अविनाश पवार, रसाळ, जंगम सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षिकेची ३९ हजारांची 'ऑनलाइन' फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने शिक्षिकेला फोन करून तिच्या बचत खात्यावरून ऑनलाइन ३९ हजार रुपये लंपास करण्यात आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी ः संबंधित महिला मंगळवार पेठेतील एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असून, त्यांचे जिल्हा बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत बचत खाते आहे. त्यांचे एटीएम कार्ड बंद पडल्याने त्यांनी आठवड्यापूर्वी एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी बँकेत अर्ज केला होता. आठवड्यानंतर बँकेतून फोन आल्यावर कार्ड सुरू होईल असे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कार्ड सुरू करण्यासाठी बँकेतून फोन येणार असल्याने त्या वाट पाहत होत्या. शनिवारी सकाळी त्या शाळेत गेल्यावर ७ वाजून ५४ मिनिटांनी एका व्यक्तीचा एटीएम कार्ड सुरू करण्यासंदर्भात मोबाइलवर कॉल आला. आपल्याला बँकेतूनच फोन आला असावा, असे समजून त्यांनी माहिती दिली. हिंदीत बोलणाऱ्या व्यक्तीने एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी त्यांच्या कार्ड नंबरची विचारणा केली. तसेच त्यांचा पासवर्डही मागून घेतला. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) ची माहिती घेतली. संबंधित शिक्षिकेने माहिती दिल्यावर तिच्या खात्यातून तीन हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर शिक्षिकेला पुन्हा संबंधित व्यक्तीचा कॉल आला. शिक्षिकेने माझ्या मोबाइलवर बँक खात्यातून तीन हजार रुपये कमी झाल्याचे सांगितल्यावर संबंधित व्यक्तीने ती रक्कम पुन्हा बचत खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले. शिक्षिकेला आठवेळा कॉल करून ओटीपी क्रमांक घेतले आणि खात्यावरून ३९ हजार रुपये काढले. खात्यावर केवळ १५५ रुपये शिल्लक राहिल्याचे शिक्षिकेच्या लक्षात आल्यानंतर तिने आलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संबंधितांना मोबाइल उचलला नाही.

शिक्षिकेने लक्ष्मीपुरीतील जिल्हा बँकेत धाव घेऊन तक्रार केली. बँकेचे स्टेटमेंट काढले असता आठवेळा मुंबई, नोएडा, गुडगाव येथून खरेदीसाठी रक्कम काढल्याचे निदर्शनास आले. शिक्षिकेने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी नापासांची उद्यापासून फेरपरीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा मंगळवारी (ता.१८) पासून सुरू होणार आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणीसुधार योजनेनुसार परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसता येईल.

मंडळातर्फे पूर्वी इयत्ता दहावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेतली जात होती. परिणामी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, ही परीक्षा घेण्यात येणार आहे. बोर्डाच्या वेबसाइटवर असलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अन्य कारणांमुळे तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार नाही, त्यांच्यासाठी २९ जुलैला

‘आउट ऑफ टर्न’ परीक्षा घेण्यात येणार आहे.

‘परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www/mahasscboard.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी यावे.

अन्य कोणतेही वेळापत्रक ग्राह्य धरू नये,’ असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचे असून, त्याची माहितीही या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियांत्रिकीची अंतिम यादी २१ ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अभियांत्रिकी प्रथमवर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेतील विकल्प भरण्याच्या शेवटच्या फेरीला १६ जुलैपासून सुरुवात झाली. १९ जुलैपर्यंत ही फेरी सुरू राहणार असून २१ जुलैला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे, तर २४ जुलैअखेर प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. तिसऱ्या फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठी सरकारी व अनुदानित संस्थांमध्ये चौथी फेरी होणार आहे. याबाबत ३१ जुलैपर्यंत माहिती जाहीर करण्यात येणार असून, एक ऑगस्टअखेर या फेरीसाठी विकल्प करण्याची अंतिम मुदत आहे.

पाच जूनपासून अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आजपर्यंत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे असलेल्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अद्यापही खासगी संस्थांमधील जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांचा तपशील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीअखेर आपले कॉलेज पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे. १९ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने विकल्प सादर करण्याची अंतिम मुदत आहे, तर २१ जुलै रोजी तिसरी यादी प्रसिद्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट ऑफ’ आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीचा ‘कट ऑफ’ सोमवारी (ता.१७) जाहीर होणार आहे. दुपारी तीन वाजता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मंगळवार (दि. १८) पासून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होणार आहे. प्रवेशप्रक्रिया समितीकडून सध्या निवड यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे.

यावर्षी समितीकडे १२ हजार ३५९ प्रवेश अर्ज जमा झाले आहेत. त्यात सर्वाधिक ६२६८ अर्ज विज्ञान शाखेचे आहेत. त्यापाठोपाठ कला (मराठी) १,८६५, इंग्रजी ३९, वाणिज्य (मराठी) २,७४८ इंग्रजी १,४३९ असे अर्ज आहेत. या अर्जांची पडताळणी ‘ओएमआर’च्या माध्यमातून संगणकाद्वारे केली जात आहे. या निवड यादीची प्रसिद्धी सोमवारी होईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया मंगळवार ते शुक्रवार (दि. २१) पर्यंत पूर्ण करावयाची आहे. यानंतर रिक्त जागांवर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी २२ ते २४ जुलै या कालावधीत

प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अकरावीच्या वर्गांचा प्रारंभ २९ जुलैला होणार आहे.

प्रवेशाची आकडेवारी दृष्टिक्षेपात

शहरातील ३३ महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता : १३ हजार ५००महाविद्यालयांतील अकरावीच्या तुकड्यांची संख्या : १३१केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून विक्री अर्ज : १४ हजार २९९केंद्रीय समितीकडे जमा झालेले अर्ज : १२ हजार ३५९शहरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या : ७ हजार ८१७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोहळा जाणिवांचा... कृतज्ञतेचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘आई... मला जगू दे... गर्भातल्या जगात मारण्यापेक्षा मला माणसांच्या विश्वात येऊ दे’ अशी हाक घालणाऱ्या चिमुकलीचे भावविश्व उलगडणारे नृत्य सादर करणाऱ्या अंध मुली, पर्यावरणाचा समतोल ढासळू पाहत असलेल्या वृक्षतोडीच्या प्रवृत्तीवर प्रहार करणारे नेत्रहीन कलाकार.., गाण्याचे बोल ऐकू न शकणारे तरीही केवळ हावभावावरून ठेका धरणारे मूक व कर्णबधीर... कलाकारांच्या कलेला अस्सल पावती देणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर रविवारी सकाळी रंगला तो जाणिवा आणि कृतज्ञतेचा वेगळाच सोहळा.

चाकाच्या खुर्चीवर बसून ​गिरक्या घेणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरच्या हास्याच्या छटा समोरच्या रसिकाच्या चेहऱ्यावर उमटले. अपंगमती रोहितने झिंग झिंग ​झिंगाट गाण्यावर सूर लावले आणि सभागृहातील टाळ्याच या गाण्यासाठी ताल बनल्या. निमित्त होतं मनोरुग्ण आणि निराधार रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेतलेल्या सावली केअर सेंटरच्या १३व्या वर्धापनदिनाचे.

नाशिक येथील ३० नेत्रहिन मुलामुलींनी सादर केलेल्या रोप मल्लखांब प्रात्यक्षिकांनी श्वास रोखायला लावले. केवळ स्पर्शज्ञान आणि संवेदनांच्या आधारे या नेत्रहिन मुलांनी सांभाळलेला समतोल टाळ्यांचा मानकरी ठरला. तसेच सावली संचलित कोहम या संस्थेतील मुलांसह शिक्षकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मनोरंजनासह अंतर्मुखही केले.

‘हम को मन की शक्ती देना’ या गाण्यावर कोहम संस्थेच्या मूक व कर्णबधीर मुलांनी सादर केलेल्या नृत्याने वातावरण सकारात्मक केले. अपंगमती मुलांच्या भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या. तर सृष्टीने ‘तेरे हजारो रुप’ हे गाणं सादर केले. तर नवीन याने ‘पापा कहते है’ या गाण्याने टाळ्या मिळवल्या. रुपालीने ‘दहलीजपे दिल को’ या गाण्यावर सूर धरले. तर कर्णबधीर रोहितने ‘झिंगाट’ गाण्यावर उपस्थितांना डोलायला लावले.

ना​शिक येथील नॅब संस्थेतील १४ अंध मुलींनी ‘पर्यावरण संवर्धन’ ​आणि ‘लेक वाचवा’ या दोन विषयांवर आधारीत नृत्य सादर केले. डोळ्यासमोर अंधार असतानाही केवळ एकमेकींच्या स्पर्शाचा अंदाज घेत या मुलींनी सादर केलेल्या नृत्यातील सफाईदारपणाने रसिकांना अचंबित केले.

सोनाली नवांगुळ यांनी निवेदन केले. यावेळी सावली केअर सेंटरच्या वाडीपीर येथील नियोजित इमारतीला जागा देणारे श्रीपाल बनछोडे, अरूण नरके, सुरेश शिपूरकर आदी उपस्थित होते. किशोर देशपांडे यांनी ‘सावली’च्या गेल्या १३ वर्षांच्या प्रवासातील आढावा घेतला. मल्लखांब सुवर्णपदक विजेती तेजल तापकिरे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुक्मिणीनगरात फ्लॅट फोडून २७ तोळे दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रुक्मिणीनगर येथील रामधाम अपार्टमेंटमधील हॉटेल व्यावसायिकाचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी २७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये लंपास केले. रविवारी भरदिवसा चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत समित त्यागराज शेट्टी (वय २१) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, हॉटेल व्यावसायिक त्यागराज शेट्टी यांचा रूक्मिणीनगरातील लक्ष्मीनगर परिसरात रामधाम अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. त्यागराज, सुनीता आणि त्यांचा मुलगा समीत हे तिघेच फ्लॅटमध्ये राहतात. त्यागराज आणि त्यांची पत्नी सुनीता या केरळ येथे दोन दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेले असल्याने मुलगा समीत एकटाच फ्लॅटमध्ये होता. शेट्टी हे पंचगंगा, स्वप्नगिरी, साईदर्शन या तीन हॉटेल्सचे व्यवस्थापन सांभाळतात. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास समीत फ्लॅटमधून हॉटेलमध्ये जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या घरी काम करणाऱ्या संगीता या फ्लॅटमधील झाडलोट करून सव्वाअकरा वाजता फ्लॅटला कुलूप घालून घरी गेल्या.

समीत हे हॉटेलवरून दुपारी साडेतीन वाजता फ्लॅटवर आले असता त्यांना दरवाजाची कडी-कोयंडा तोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दाराच्या सेफ्टीलॉकमध्ये स्वतःकडील चावी वापरून उघडण्याचा प्रयत्न केला असता चावी लॉकमध्ये अडकली. फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा संशय आल्यावर त्यांनी हॉटेलचे व्यवस्थापक रामचंद्र पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांना बोलावले. चोरटा आतमध्ये अडकल्याचा संशय त्यांना आला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना चोरीची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही फ्लॅटचे लॉक उघडले नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. धडका मारुन दरवाजा तोडण्यात आला.

चोरट्याने मुख्य हॉल, समीत व त्यागराज यांच्या बेडरुममधील कपाटे, ड्रॉवर उघडल्याचे निदर्शनास आले. त्यागराज यांच्या बेडरुममधील कपाटातील साहित्य विस्कटले होते. दागिन्यांचे मोकळे बॉक्स आढळले. समीत यांनी आई-वडिलांशी मोबाइलवर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. चोरट्यांनी नऊ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, नऊ तोळ्यांच्या अंगठ्या, तीन तोळ्याचे कडे, दोन तोळ्याचे ब्रेसलेट व चार तोळ्यांची चेन असे आठ लाख रुपये किंमतीचे दागिने, रोख दोन लाख रुपये चोरुन नेले. घटनास्थळी शहर पोलिस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रविण चौगुले यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.

सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकाचा अभाव

रामधाम अपार्टमेंट वास्तव्य करणारे व्यापारी, उद्योजक असताना सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली नाही. फक्त तळघरात वॉचमनची खोली आहे. सीसीटीव्हीही बसविण्यात आलेले नाहीत. सीसीटीव्ही असते तर तपासास मदत झाली असती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पती पत्नीचीवादातून आत्महत्या

$
0
0

कुडित्रे



प्रवासात असतानाच पती-पत्नीतील वाद विकोपाला गेल्याने दोघांनीही कुंभी नदीत उडी घेऊन जीव दिला. श्रीकांत धोंडीराम कांबळे (वय ३८) व त्यांची पत्नी लता ( वय-३४, रा. पणुत्रे, ता.पन्हाळा ) असे दुर्देवी दाम्पत्याचे नाव आहे. त्यांची मुलगी उत्कर्षा (वय ५) हिला परखंदळेच्या युवकांनी प्रसंगावधानाने वाचवले. ही घटना रविवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास गोठे - परखंदळे पुलावर घडली. दरम्यान, नदीतील पाण्यात बेपत्ता झालेल्या या दाम्पत्याचा व्हाईट आर्मी, पोलिस व परिसरातील ग्रामस्थांनी शोध घेतला. पण ते न सापडल्याने अंधार पडल्यानंतर शोधमोहिम थांबवण्यात आली.

याबाबत अधिक माहती अशी, लता व श्रीकांत धोंडीराम कांबळे हे दाम्पत्य आपली पाच वर्षाची कन्या उत्कर्षासह पणुत्रे (ता. पन्हाळा) गावातून कळे (ता. पन्हाळा ) येथे धार्मिक कार्यक्रमासाठी मोटारसायकलवरुन जात होते. प्रवासात त्यांच्यात वाद सुरु असल्याचे रस्त्यावरील काहींनी पाहिले होते. दरम्यान, गोठे-परखंदळे पुलाजवळ आले असताना त्यांचा वाद विकोपाला गेला.गगनबावडा परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कुंभी नदीचे पाणी पात्राबाहेरील शेतातून वाहत आहे. येथील नदीपात्राकडे पुढेपुढे जाताना दोघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात सापडले .वेगवान प्रवाहात ते एकमेकांना मिठी मारलेल्या स्थितीत वाहत जाताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसले.

दरम्यान , परखंदळेतील अभिजीत कांबळे व अमित कांबळे हे दोघे मित्राच्या नव्या गाडीची टेस्ट घेण्यासाठी गोठेकडे चालले होते. त्यांना हे दाम्पत्य नदीपात्रात केवळ हात वर केलेल्या स्थितीत दिसले. त्याचवेळी गोठेकडील बाजूच्या नदीपात्रात लहान मुलीच्या आक्रंदनाचा आवाज ऐकून दोघेही तिकडे धावले. लहान मुलगी बुडत असल्याचे पाहून अभिजीतने प्रसंगावधान राखत नदीपात्रात उडी घेतली. नशीब बलवत्तर असल्याने मुलगी उत्कर्षाचे प्राण वाचले.

या घटनेची माहिती मिळताच कळेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई व पीएसआय आभिजीत गुरव हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. व्हाईट आर्मी , पोलिस पाटील, पोलिस मित्र यांच्यासह गोठे पूल ते कळे सावर्डे पूल या पाच किलोमीटरच्या नदीपात्रात शोध घेण्यात आला. तथापि ते आढळून आले नाहीत. अंधार पडल्यानंतर थांबवण्यात आलेली शोधमोहिम सोमवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेची पाणी पातळी वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी २४ तासांत अडीच फुटांनी वाढली. काल २१ फूट असलेली पाणीपातळी रविवारी २३.८ फुटांवर गेली. जिल्ह्यातील १३ बंधारे अजूनही पाण्याखालीच आहेत. शहरात मात्र पावसाने आज हुलकावणी दिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला. पंचगंगेची पाणी पाहण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली.

शनिवारी सायंकाळी पंचगंगा नदीची पाणीपातळी २० फूट ११ इंच होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पातळी २२ फुटांपर्यंत झाली. रविवारी सायंकाळपर्यंत धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीपातळी २३ फूट ८ इंटांवर गेली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फुटांवर आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी पंचगंगा घाट आणि शिवाजी पूलावर गर्दी केली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. गगनबावडा तालुक्यात ५२ मिलिमिटर आणि आजरा तालुक्यात ४१.५० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. दोन तालुके वगळता जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. बारा तालुक्यात पावसाची सरासरी २६९.४२ मिलिमीटर नोंद झाली. जांबरे आणि कोदे लघुपाटबंधारा १०० टक्के भरला. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगवती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे आणि कासारी नदीवरील यवलून हा बंधारा पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे.


नांदणीत दोघांचा बुडून मृत्यू

नांदणी (ता. शिरोळ) येथे विहिरीत बुडालेल्या यश रवींद्र हातगिणे (वय १७, रा. नांदणी) या तरूणाचा मृतदेह काढण्यासाठी गेलेला पाणबुड्या प्रदीप शिवाजी जुटाळ (वय २७. रा. टाकवडे) यांचाही दम भरल्याने दुर्देवी मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेती विकासासाठी संस्थांचाही पुढाकार हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शेतीची प्रगती झाल्याशिवाय देशाच्या विकासदरात वाढ होणार नाही. सध्या शेतीचा विकासदर नऊ टक्के असून, त्यावर ७० टक्के लोकांची उपजीविका चालते, तर उर्वरित ३० टक्के उत्पादन घेतले जाते. असे व्यस्त प्रमाण असल्यास शेतकरी सुखी होणार नाही. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी उत्पादनात वाढ करण्याची आवश्यकता आहे. उत्पादनवाढीसाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र सामाजिक संस्थांकडूनही प्रयत्न होणे आवश्यक आहे,’ असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या शाहू मॉडेल पायलट प्रोजेक्टची माहिती व ‘आजची शेती समस्या व निराकरण’ या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते. रेसिडन्सी क्लब येथे कार्यक्रम झाला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘शेंडूर (ता. कागल) येथे दीडशे एकरांवर अॅटोमायझेन, सोलर ठिंबक सिंचन योजना कार्यान्वित होणार आहे. सोलरवर कार्यान्वित होणारी राज्यातील ही पहिली योजना आहे. त्यामुळे पाणी बचतीबरोबर उत्पादनातही वाढ होणार आहे. जिल्ह्यात असे २५ ग्रुप तयार झाल्यास सुमारे २५०० एकर क्षेत्राला उपयोग होईल. उपलब्ध जमिनीतून उत्पादनवाढीसाठी अद्ययावत तंत्रज्ञान निर्माण झाल्यास उत्पादन काढण्यास शेतकरी सक्षम आहे. भविष्यात शेतीतील सर्व निविष्ठापासून इथेलॉन निर्मिती करण्यात येणार असल्याने भविष्यात शेतातील सर्व कचऱ्याला मोल प्राप्त होईल.’

जैन इरिगेशनचे राज्य विपणन प्रमुख अभय जैन, अॅटोमायझेशन प्रमुख अभिजीत जोशी व के. बी. पाटील, प्रा. टोपकर यांनी उपसासिंचनाचे ठिबक सिंचनमध्ये रुपातंर, करार शेती, सेंद्रिय शेती व उत्पादन वाढीचे स्लाइड शोद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे सीईओ कुणाल खेमणार, काडसिद्धेश्वर महाराज, गोकुळचे संचालक बाबा देसाई, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, जैन इरिगेशनचे उद्धव पाटील यांच्यासह निवडक प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचा पवारांना टोला

‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना पालकमंत्री इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये येणाचे अवताण देत आहेत’, या माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला, ‘लोक येतात त्याला आम्ही काय करु?’ असा टोला पालकमंत्री पाटील यांनी लगावला. ‘राजकारण विकासाला पोषक असावे. भाजप विकासाचे राजकारण करत असल्याने पक्षात येण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत’ असेही त्यांनी सांगितले.

मास्तोळी पुन्हा पालकमंत्र्यांच्या रडारवर

पालकमंत्री कार्यक्रमात बोलण्यास उभे राहिल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी मोबाइलद्वारे फोटो काढत होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी ‘आम्ही फोटासाठी काम करत नसून फोटा काढण्याचे बंद करा’ असे म्हणत त्यांना फटकारले. त्यानंतर जैन इरिगेशनचे तज्ज्ञ शेतीविषयक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितलेल्या शेतीतील नवनव्या कल्पना ऐकून उपस्थितांसह पालकमंत्रीही अचंबित झाले होते. चर्चासत्रानंतर पुन्हा पालकमंत्री पाटील बोलण्यास उभे राहिले. ‘जिल्हा कृषी विभाग काय करतो ? मी कृषी मंत्री नसल्याने तुम्ही मला रिपोर्टिंग करीत नाही का? मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तुम्ही अनेक बैठकांना येत नाही. आता कृषी विभागाची दर महिन्याला आढावा बैठक घेणार आहे. त्याप्रमाणे तयारी करून येत चला’ असे सांगत पालकमंत्र्यांनी मास्तोळी यांना पुन्हा फटकारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्लॉवर फेस्ट‌िव्हल सप्टेंबरमध्ये

$
0
0

म. टा. पतिनिधी, कोल्हापूर

‘कलरफूल इज वंडरफूल’ या संकल्पनेवर आधारित गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प (केएफएफ) यांच्या संयुक्त विद्ममाने कोल्हापूर फ्लॉवर फेस्ट‌िव्हल आयो​जन करण्यात आले आहे. कोल्हापुरच्या पर्यटना चालना देण्यासाठी हा उत्सव १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत कसबा बावडा येथील पोलिस उद्यानात होणार आहे. केएफएफचे सुजय पित्रे आणि डॉ. धनश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

१५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता वृक्ष दिंडीचे आयोजन केले आहे. स्पर्धा, स्टॉल, कार्यशाळा व मनोरंजन अशी प्रदर्शनास विभागणी केली जाणार आहे. शून्य कचरा मेळावा, बोन्साय कार्यशाळा, पुष्प रचना, बॉटल गार्डन या विषयावर कार्यशाळा होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. गुलाब रचना, पुष्परचना, कॅक्टस सक्युलंट क्रोटान, बोन्साय, ट्रे लॅन्डस्केप, फुलांची रांगोळी, चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये कोल्हापुरातील निसर्गप्रेमी, विद्यार्थी, कलाकार, वास्तु विशारद, नागरिक सहभागी होऊ शकतात. नाव नोंदणीसाठी www.kolhapurflowerfestival.com ही वेबसाइट कार्यान्वित करण्यात आली आहे.

उद्यान स्पर्धा संस्था व सार्वजनिक अशा दोन गटामध्ये तीन एकरापासून अर्धा एकरापेक्षा कमी अशा चार गटात होणार आहे. पुष्प प्रदर्शनामध्ये १८ गटांमधून गुलाब, डेलीया, गॅडिओला, कर्दळ, अॅस्टर, निशीगंध, इतर फुले पुष्परचना, कुंड्यातील कॅक्टस्, सक्युलंट, क्रोटॉन इत्यादी तर बोन्साय, ट्रे लॅन्डस्केप, फुलांची रांगोळी, हँगिग बास्केट, मुक्त रचना या प्रकारात स्पर्धा होती. स्पर्धेत भाग घेण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असून स्पर्धकाला ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन नोंदणी करण्यात येईल. इच्छुकांनी गार्डन्स क्लब, बसवराज अपार्टमेंट, नववी गल्ली राजारामपुरी अथवा केएसबीपी ऑफिस राजेंद्रनगर येथे संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीचा संभ्रम कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर


जीएसटी भवनातून करप्रणाली राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असले तरी बाजारपेठेत उत्पादक, व्यापारी, विक्रेत आणि ग्राहकांत संभ्रमावस्था आहे. केंद्र सरकारने १ जुलैपासून वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटीची) अंमलबजावणी सुरू केली. मात्र किचकट नियम, नियमांतील अस्पष्टता, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मर्यांदा याचा परिणाम बाजारपेठेवर दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी जीएसटीचा कोड मिळालेला नसल्याने व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार विस्कळित झाले आहेत.

जीएसटी लागू केल्यानंतरही व्यापारी वर्गात मोठा संभ्रम आहे. मालाचा स्टॉक करावा की नाही? जुन्या मालाचा स्टॉक कधीपर्यंत संपवायचा, नवा माल स्वस्त मिळेल की नाही असे अनेक प्रश्न पडल्याने बाजारातील व्यवहार थंडावले आहेत. जीएसटीमुळे ग्राहक खरेदीसाठी फारसे उत्सुक नाहीत. केवळ गरजेच्या वस्तूंचीच खरेदी-विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. सोने, चांदी बाजारपेठ, मोबाइल, प्लास्टिकच्या वस्तू, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कापड, रेडिमेड कपडे, खाद्यपदार्थ, ऑटोमोबाइल यांवर विशेष परिणाम झाला आहे. ‘जीएसटी’ कोडशिवाय व्यवहार करताना उत्पादकांसह वितरक, वाहतूकदार, विक्रेते आणि ग्राहकही धास्तावले आहेत. त्यामुळे अंमलबजावणीच्या सोळा दिवसानंतरही बाजारपेठेत संभ्रमावस्था कायम आहे.

उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक या तिन्ही घटकांत प्रबोधन नसल्याने अनेक व्यवहार थंडावले आहेत. शहरातील बाजारपेठेत जून महिन्याच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी जीएसटीची कोडचा आग्रह आहे. मात्र, अजूनही काही व्यापाऱ्यांनी जीएसटीची नोंदणी केलेली नाही. काहींनी ऐच्छिक क्रमांक घेण्याची पसंती दर्शविली आहे. मात्र कायमस्वरूपी जीएसटी क्रमांक असल्याशिवाय पुरवठादारांनी माल देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काही व्यापारी धास्तावले आहेत.

बाजारपेठेत मालाची आवक थंडावल्याचे दिसून आले आहे. कायदा लागू होताच बाजारात टंचाई निर्माण होऊन मंदीची लाट येईल की काय, अशी भीती व्यापाऱ्यांसह उद्योजकांनाही वाटत आहे. नेमका जीएसटी कसा राहील, कोणत्या वस्तूंचा साठा केला तर किती जीएसटी लागेल, याचा परिपूर्ण अभ्यास उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडून सुरू आहे. खरेदी केलेल्या मालाचे पुढे काहीही झाले तरी त्यावरचा करभरणा करावाच लागणार असल्याच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी नवी खरेदी थांबवली आहे.

एक जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर विविध वस्तूंवर लागू असलेला जीएसटी वस्तूंवर कसा लावायचा, रेकॉर्ड कसे ठेवायचे, पहिल्या रिटर्नवेळी भरावी लागणाऱ्या कागदपत्रांची आणि जमा-खर्चाची उजळणी बाजारपेठेत सुरू झाली आहे. २०१६ चा जुन्या स्टॉक संदर्भातील परिपूर्ण माहिती जीएसटी कार्यालयाने दिली नसल्याने व्यापारी आणि करदात्यांत संभ्रमावस्था आहे. बाजारपेठेत जीएसटीच्या टक्केवारीवरून वस्तू विक्रीचा घोळ कायम आहे. केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा कराचा समावेश करून काही वस्तूंची किंमतीत वाढ झाली आहे. त्याचे इनपुट क्रेडिटची माहिती काही व्यापाऱ्यांना नसल्याने बाजारपेठेत संभ्रमावस्था आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. जीएसटीपूर्वी काही वस्तूंवर भरघोस सूट दिली होती. मात्र १८ आणि २२ टक्के जीएसटी लागू असलेल्या वस्तूची मागणी मंदावली आहे. जीएसटी करमुक्त असलेल्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल आहे.

ब्रँडेड वस्तूंपेक्षा रजिस्टर नसलेल्या स्थानिक ब्रँडच्या खरेदीकडे अधिक कल आहे. वस्तू आणि मशिनरी उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपन्यानी मात्र जीएसटी नुसार दर लागू केले आहेत. त्याची माहिती डिलर्सना दिली आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी वाहन खरेदी करून भरघोस सूट मिळविण्याची ऑफर चारचाकी उत्पादक कंपन्यांनी दिली होती. त्यानुसार काही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. प्रत्यक्षात जीएसटी लागू झाल्यानंतर इनव्हॉइस कसा करायचा, असा प्रश्न कंपनी मालकांना पडला आहे. तर जीएसटीपूर्वी असलेली सूट देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे कंपनीचे डिलर्स आणि ग्राहक यांच्यात वादाचे चित्र आहे. २०१६ मधील स्टॉक क्लिअरन्स संदर्भात मार्गदर्शन नसल्याने व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत.

वस्त्रनगरी चिंताग्रस्त

वस्त्रनगरी इचलकरंजीत कापड, सूत खरेदी-विक्री थंडावली आहे. बाजारपेठेत सध्या कापड सौदे बंद आहेत. सूत आणि बिमे मिळत नसल्याने कारखान्यांनी विश्रांती घेतली आहे. त्याचा फटका कापड उत्पादनावर झाला आहे. कापडाला मागणी नसल्याने दररोज सुमारे ६० कोटी रुपयांचा कापड साठा शिल्लक पडत आहे. अजूनही जीएसटीसंदर्भात परिपूर्ण माहिती नसल्याने कारखानदार, व्यापारी, अडत व्यापारी सावधानता बाळगत आहे. अनेकांनी चार्टंड अकांऊंटटचा सल्ला घेतला आहे. अनेक ट्रेडिंग कंपनी चालक खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना जीएसटीचे कारण सांगून बिमे तसेच सूत देण्याचे थांबविले आहे. जीएसटीचा दुसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही कारखानदारांनी जीएसटी पोर्टलला भेटही दिलेली नाही. वीस लाखांच्या पुढे उलाढाल असूनही जीएसटी क्रमांक काढलेला नाही. इचलकरंजीतील कापड दिल्ली, अहमदाबाद आणि सूरतसह देशभरात आदी ठिकाणी निर्यात केले जाते. या ठिकाणी बाजारपेठ बंद असल्या कापड खरेदी-विक्री थंडावली आहे. त्याचा फटका कापड उत्पादकांना बसला आहे. कापडला मागणी नसल्याने कोट्यावधी रूपयांचा कापड पडून असल्याचे चित्र इचलकरंजी बाजारपेठेत आहे.


बाटलीबंद पाण्याच्या दराचीही मनमानी

आयएओ मानांकन नसतानाही काही उत्पादकांकडून बाटलीबंद पाणी व्यवसाय सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाविभागाकडून या उत्पादकांना अभय दिले जात असल्याची चर्चा प्रामाणिक उत्पादकांत आहे. कार्पोरेट कंपनी, लग्नसराई, धार्मिक कार्यक्रमासाठी या पाण्याची मोठी मागणी आहे. जिल्ह्यात बाटलीबंद उत्पादन करणारे अधिकत दहा ते बारा उत्पादक आहेत. मात्र आयएसओ मानांकन नसलेल्या उत्पादकांकडून बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय जोरात सुरू केला आहे. ‘जीएसटी’ अंमलबजावणीचा फटका काही प्रमाणात बाटलीबंद पाणी व्यवसायलाही बसला. जीएसटी करप्रणाली समजली नसल्याने काहींनी चार ते पाच दिवस उत्पादकांनी प्रकल्प बंद ठेवले होते. बाटलीबंद पाण्यावरील कर २६ वरून १८ टक्के झाल्याने या पाण्याच्या किमती सात ते आठ टक्क्याने कमी झाल्या. मात्र अद्याप दर कमी केले गेलेले नाहीत. अनधिकृत प्रकल्पांनी मात्र मनमानी पद्धतीने विक्री दरावर भरघोस सवलत दिली आहे.


बांधकामाच्या साहित्याची टंचाई

बांधकाम साहित्यावर १२.५ टक्के उत्पादन शुल्क आणि ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. आता त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाणार असल्याने करप्रणालीत फारसा बदल झालेला नाही. व्यावसायिकांनी जीएसटी कोड घेतल्याने या क्षेत्रातील व्यवहार सुरळितपणे सुरू आहे. मात्र जिल्ह्यात वाळूचा उपसा नसल्याने वाळूची मोठी टंचाई जाणवत आहे. वाळूचा ट्रकची किंमत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. सिमेंट पोत्यामागे दोन ते चार रुपये स्वस्त झाले आहे. सळीचा दर दररोज बदलत आहे. मात्र जीएसटीच्या धास्तीमुळे ग्राहकांचा घर खरेदीकडे कल कमी आहे.


सराफ बाजारातही कमी गर्दी

सोने, चांदी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी कमी आहे. जीएसटीमुळे कर दोन टक्के वाढला आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा सुमारे ४०० ते ६०० रुपये वाढला आहे. त्यासह कलाकसुरीचे दागिन्यावरही मजुरी आकारली जात आहे. त्याचा फटकाही ग्राहकांना बसत आहे. गुजरीत अजूनही काही ठिकाणी कच्च्या पावतीवर व्यवहार सुरू आहेत. मागविलेल्या मालाच्या बिलातील त्रुटी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुवर्ण पेढ्यांमधील व्यवहारांवर परिणाम झाला आहे.

मालवाहतूक थंडावली

माल वाहतुकीसाठी जीएसटी कोड सक्तीचा केला आहे. त्याचा फटका ट्रान्स्पोर्ट व्यवसायाला बसला आहे. कोल्हापुरातून दररोज सुमारे पाच हजार टनांहून अधिक प्रमाणात मालवाहतूक केली जाते. बेळगाव, कोकण, गोवा आदी ठिकाणी मालाची निर्यात केली जाते. ही मालवाहतूक घटल्याचे जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष घोगळे यांनी सांगितले. सुमारे पन्नासहून अधिक ट्रक बाजारपेठेत मालाच्या प्रतीक्षेत आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जीएसटी कोडशिवाय वाहतूक न करण्याचे निर्बंध केंद्र सरकारने घातले आहेत. शहरातील काही उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक, विक्रेत्यांकडे जीएसटी कोड नसल्याने मालवाहतूक थंडावली आहे. जीएसटीचा परिणाम ट्रान्स्पोर्टवर झाला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.


उद्योग क्षेत्रालाही फटका

उद्योगाला दोन टक्के जादा कर लागू झाला आहे. त्याचा फटका उद्योग व्यवसायाला बसला आहे. विद्युतीकरण, बांधकाम साहित्य व्यापाऱ्यांनी मालाची आयात थांबविली आहे. उद्योजकांनी सुटे भाग, कच्चा माल खरेदी करणार नसल्याचे ठरवल्याची स्थिती आहे. जीएसटी नेमका कोणत्या वस्तूंवर लावायचा, उत्पादित केलेल्या वस्तूंवर आकारण्यात येणार कराची परिपूर्ण माहिती नसल्याने उद्योग क्षेत्रातही नाराजीचा सूर आहे. उद्योगात १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू केला आहे. जुन्या दरात २ टक्के वाढले असल्याने उत्पादनही काही प्रमाणात थंडावले असल्याचे स्मॅकचे माजी अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी सांगितले.


जीएसटीची परिपूर्ण माहिती नाही. त्यामुळे सारे सुरळीत व्हायला अद्याप काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांतही संभ्रमावस्था आहे. काही ठिकाणी कर सल्लागारांनाही करप्रणालाची पूर्ण माहिती नसल्याने जिल्ह्यातील व्यापारी धास्तावला आहे.

संदीप वीर, व्यापारी


कापड उत्पादक, विक्रेतेही संभ्रमावस्थेत आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात कापड व्यवसायात ग्राहकांची फारशी गर्दी नाही. येत्या महिन्याभरात बदल घडू शकेल.

संपत पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कापड व्यापारी संघ


वस्तूंच्या वर्गवारीनुसार ५, १२, १८, २३ टक्के जीएसटी आहे. वस्तूंचे नावानुसार त्याची किंमतीचे फिडिंग सॉफ्टवेअरमध्ये केले जात आहे. किती टक्के कर लागणार आहे, याची माहिती संकेतस्थळासह, ऑनलाइन यंत्रणेत दिली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही. ही एक सोपी आणि सुटसुटीत प्रणाली आहे.

सचिन जोशी, जीएसटी, सहआयुक्त


जीएसटी करप्रणाली अजूनही व्यापारी आणि उत्पादकांना पूर्णपणे कळालेली नाही. त्यासाठी पहिल्या टप्प्यात करसल्लागारांची मदत घेतली जात आहे. सर्वच ठिकाणी अजूनही काही कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत. टॅलीनुसार काही ठिकाणी हिशोब ठेवला जात आहे. एमआरपीनुसार वस्तूंची विक्री सुरू असली तरी परताव्यासंदर्भात घोळ कायम आहे.

ललित गांधी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदणीत विहीरीत बुडूनपाणबुड्यासह दोघांचा मृत्यू

$
0
0

,जयसिंगपूर

नांदणी (ता.शिरोळ) येथे विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडाल्याने मृत्यू झाला. यानंतर बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी आलेल्या पाणबुड्यावरही काळाने घाला घातला. रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सुयश रविंद्र हातगिणे (वय १५, रा.नांदणी), संतोष उर्फ प्रदीप शिवाजी झुटाळ (वय ४०, रा.टाकवडे) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत शिरोळ पोलिसांतून तसेच घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुयश हा नांदणी येथील धरणगुत्ती रस्त्यावरील देस्कत मळ्यातील आर.एस.पाटील यांच्या विहीरीत मित्रासमवेत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पोहत असताना सुयश पाण्यात बुडाला. दरम्यान, या घटनेचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही तरूणांनी विहीरीत सुयशचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.

दरम्यान, यानंतर टाकवडे (ता.शिरोळ) येथील संतोष उर्फ प्रदीप शिवाजी झुटाळ या पाणबुड्यास सुयशचा शोध घेण्यासाठी बोलाविण्यात आले. संतोष दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विहीरीत उतरला. दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर संतोष पुन्हा सुयशचा शोध घेण्यासाठी पाण्यात बुडाला आणि सुयशचा मृतदेह घेवून वर आला. याच दरम्यान संतोषचा श्वास गुदमरल्याने तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरू होते. या घटनेची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंचा जीवनपट होणार चित्रबद्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी, प्रसंग आणि घटना चित्ररूपात बद्ध होणार आहेत. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे विद्यार्थी आठवणींचे पुस्तक तयार करणार आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुस्तकाच्या एक हजार प्रती छापल्या जाणार आहेत.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या करून मानवतावादी, पुरोगामी विचार दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, हा पुरोगामी विचार आणि नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे अनुभव ऑल इंडिया स्टुडंटन्स फेडरेशनचे कार्यकर्ते एकत्रित करीत आहेत. सामाजिक चळवळ, आंदोलन, मोर्चा, शालेय विद्यार्थी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि अडचणी सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यासाठी केलेली आंदोलने चित्रबद्ध रूपात एकत्रित केली जाणार आहे. पानसरे आणि युवा पिढी असा दृष्टिकोन ठेवून एआयएसएफच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी आठवणी, फोटो, पत्रे, अनुभव यांचे एकत्रीकरण सुरू केले आहे. सुमारे १२० पानांचे पुस्तक आहे. पुस्तकासाठी येणारा खर्चही एआयएसएफचे कार्यकर्ते करणार आहेत.

नव्या पिढीला या पुस्तकाच्या रूपाने पुरोगामित्वाचा दस्ताऐवज उपलब्ध होऊ शकेल, असा मानस कार्यकर्त्यांचा आहे. यापूर्वी पानसरेंसंदर्भात प्रकाशित झालेल्या पुस्तकांत वैयक्तिक अनुभव आहेत. समाजातील अनेक व्यक्तींसोबत पानसरेंचा संपर्क आला. काही दुर्मिळ छायाचित्रेही अनेकांकडे उपलब्ध आहेत. चकाही दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना वाचकांना उपलब्ध होणार आहे. कॉ. पानसरे यांच्यासोबत केलेल्या कामाची आठवण, त्यांच्या कार्यापासून घेतलेली प्रेरणा, कार्यकर्ता, फेरीवाले, कामगार यांच्यासमवेत असलेले पानसरे, सामाजिक चळवळीसह तज्ज्ञांच्या अनुभवांचे एकत्रीकरण केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॅपटॉपसाठी जि.प. माजी सदस्यांच्या मालमत्तेवर बोजा

$
0
0

कोल्हापूर ः कार्यालयीन कामकाज गतिमान करण्यासाठी ‌तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, सभापतींना सन २०१२मध्ये लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र कार्यकाळ संपला तरी ५८ जणांनी अद्याप लॅपटॉप जमा केलेले नाहीत. त्यांना वारंवार सांगूनही संबंधितांनी लॅपटॉप जमा केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने कडक भूमिका घेत लॅपटॉप जमा न करणाऱ्या सदस्यांच्या मालमत्तेवरच बोजा चढवण्याचा इशारा दिला आहे.

६९ सदस्य, १२ पंचायत समिती सभापतींना लॅपटॉप देण्यात आले. त्यासाठी ३२ लाख १९ हजारांची तरतूद केली. लॅपटॉप दिल्यानंतर सदस्यांनी त्याचा वापर गतिमान प्रशासनासाठी किती केला हा संशोधनाचा विषय आहे. तरीही नियमानुसार ते प्रशासनाकडे परत करणे आवश्यक होते.

पंचायत समिती सभापतींचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो. काही ठिकाणी सव्वा वर्षातही सभापती बदलले. जिल्हा परिषद सदस्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. नवे सभागृह येऊन चार महिने झाले तरी अजूनही संबं‌धितांनी लॅपटॉप जमा केलेले नाहीत. ते तातडीने जमा करून घेण्याचे आदेश वित्त विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. तरीही ते जमा न केल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर ३९ हजार ७४२ रूपयांचा बोजा नोंद करण्यात येणार आहे.


सर्वाधिक सदस्य शिरोळचे

लॅपटॉप जमा न केलेल्यांची तालुकानिहाय नावे ः आजरा – संजिवनी गुरव, उदयसिंह देसाई. भुदरगड – राहुल बजरंग देसाई, रूपाली पाटील. चंदगड – सुजाता पाटील, राजेंद्र परीट, महेश नरसिंहराव पाटील, तात्यासाहेब देसाई. गडहिंग्लज – शिवप्रसाद तेली, जयकुमार मुन्नोळी, अप्पी पाटील, मीनाताई जाधव. गगनबावडा – मेघाराणी जाधव, प्रिया वरेकर. हातकणंगले – मंदा घाटगे, स्मिता आवळे, ‌देवानंद कांबळे, सुमन मिणचेकर, किरण कांबळे, आनंदी कांबळे. कागल – प्रभावती पाटील, स्वाती ढवण, बाजीराव पाटील. करवीर – संभाजी पाटील, मंगल वळकुंजे, बाळासाहेब माळी, मनीषा वास्कर, एकनाथ पाटील, शशिकला रोटे, शांताबाई कांबळे, चंद्रकला घाटगे. पन्हाळा – भाग्यश्री पाटील, प्रकाश पाटील, संगिता पाटील, मानसिंग पाटील, सुजाता पाटील, दीपा पाटील. राधानगरी – आनंदराव पाटील, भाग्यश्री गायकवाड. शाहूवाडी – योगीराज गायकवाड. शिरोळ – सावकर मादनाईक, सुनंदा दानोळे, इंद्रायणी माने- पाटील, विकास कांबळे, सीमा पाटील, दादासाहेब सांगावे.


११ सभापती

सभपती असे – विष्णूपंत केसरकर (आजरा), यशवंत नांदेकर (भुदरगड), ज्योती पाटील – पवार (चंदगड), इकबाल काझी (गडहिंग्लज), सविता कोटेकर (गगनबावडा), शुभांगी पाटील (हातकणंगले), सुवर्णा गुरव (करवीर), संजय चावरेकर (पन्हाळा), प्रभापती पोतदार (शाहूवाडी), गायत्रीदेवी सूर्यवंशी (राधानगरी), युनूस पटेल (शिरोळ).

…………………

लॅपटॉप जमा करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वित्त विभागाकडून नोटीस बजावली आहे. लॅपटॉप चांगल्या स्थितीत जमा न केल्यास पैसे वसूल केले जातील. पैसे न भरल्यास नियमानुसार संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा नोंद केला जाईल.

डॉ. कुणाल खेमनार, सीईओ, जि.प.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images