Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आंबेडकरांचे स्मारक उभारावे

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुनी शाहुपूरी येथील पोलिस ठाण्याच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी सोमवारी शाहू-भीम मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणांनी दसरा चौक व शाहूपुरीचा परिसर दणाणून सोडला.

माणगाव येथे झालेल्या अस्पृश्य परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी २० मार्च १९२० रोजी दोन दिवस शाहूपुरीतील तत्कालीन विश्रामगृहात वास्तव्य केले होते. त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधावे. तसेच या इमारतीचा कोल्हापूर हेरिटेजमध्ये समावेश करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र ही इमारत बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केली आहे. त्याबाबत प्रतिकात्मक आंदोलन करत याच जागी स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली. प्रथम दसरा चौक येथे आंदोलकांनी मानवी साखळी करुन घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आंदोलकांनी शाहूपुरी येथील जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या जागेवर साखळी आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (गवई), लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन सेना असे आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. शहाजी कांबळे यांनी केले.

यावेळी उत्तम कांबळे, विश्वास देशमुख, सखाराम कामत, विद्याधर कांबळे, विलास भामटेकर, दिलीप कांबळे, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निसर्गाची शाळा लुप्त होऊ देऊ नका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्रथम झाडे जगवा, पक्षी आपोआपच सुखावतील, निसर्ग हा सोबती म्हणून मानल्यास त्याचे नुकसान करण्याची मानसिकता नष्ट होईल, पक्षीसाक्षर समाज निर्मितीचा ध्यास, ग्रीन​ सिटी आहेत कुठे?, ढासळणाऱ्या पर्यावरणाला आपणच वाचवायचे आहे, पर्यावरण केवळ शाळेतील शिक्षणाचा विषय नव्हे त्याबाबतची आत्मीयता वाढीस लागणारे शिक्षण हवे, प्रदूषण रोखण्याचे सर्व अधिकार आपल्याच हातात आहेत, अशी मते प्राथमिकपासून इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शेतकऱ्यांपासून विविध व्यावसायिकांनी दिलखुलासपणे मांडली आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने ‘पक्षी वाचवा’ उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या व्यासपीठाला भरभरुन प्रतिसाद देत सर्वांनीच आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी मते निबंधांतून व्यक्त केली.

छोटा परंतु, निसर्गाची साखळी अखंडीत सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेला घटक म्हणजे पक्षी. आधुनिक व भौतिक सुखांच्यामागे धावणाऱ्या या जगात हा घटक कसपटासमान गणला जात आहे. मात्र संवेदनशील नवी पिढी पक्ष्यांबाबत सजग आहे. त्याची प्रचिती धान्य, पाण्याची भांडी, घरटी देण्याबरोबरच ठिकठिकाणी पक्ष्यांची सोय करण्यासाठी दाखवलेल्या आत्मीयतेतून आली. यातून नव्या पिढीचा हुरुप दिसून आला. या पिढीला पक्ष्यांविषयी कळवळा असल्यानेच हा हुरुप, उत्साह होता हे स्पष्टच आहे. त्यामुळे पक्ष्यांविषयी काय वाटते हे जाणून घेण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धा म्हणून संबोधले असले तरी पक्ष्यांबाबतच्या भावना, मते समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. साऱ्यांच्या जगण्याशी संबंधित असलेला संवेदनशील विषय असल्याने त्याच संवेदनशीलतेने प्रतिसादही मिळाला. अगदी प्राथमिक ​शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते शेतामध्ये थेट पक्ष्यांशी संबंध येणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सारेजण उपक्रमात सहभागी झाले.

‘पक्षी वाचवा’ ची साद दिली असल्याने साहजिकच पक्ष्यांच्या अन्न व पाण्यासाठी काय करता येतील, याच्या नवनव्या संकल्पना मांडण्यात आल्या. शिवाय त्यापुढे जाऊन पक्षी हा मनुष्याप्रमाणेच निसर्गातील एक घटक असल्याचे समजून सांगण्यासाठी प्रबोधनाची गरजही व्यक्त केली. पर्यावरण संतूलन राखण्यासाठी सारेच घटक महत्त्वाचे असल्याने मधमाशीसुद्धा वाचली पाहिजे असे सर्वव्यापी मतही भावणारे होते. मानवाने स्वतःसाठी अलिशान घरे, विविध सुविधा करुन घेण्याचा सपाटा चालवला आहे. पण, ज्या निसर्गात राहतो, त्यातील एक घटक असलेल्या पक्ष्यांची घरटी उद्‍ध्वस्त करण्याचा रानटीपणा चालवल्याचे भयाण वास्तवही मांडण्यात नव्या पिढीने हात आखडता घेतलेला नाही. निसर्गाची शाळा लुप्त होत चालली असून ग्रीन सिटीसारख्या संकल्पना केवळ दिखाव्यासाठी मांडल्या जात आहेत. अजूनही वृक्षतोड थांबवता आलेली नाही. हे सारे प्रकार पक्ष्यांचे अस्तित्व केवळ चित्रातच राहण्याचे संकेत देत आहेत.

शेतीमध्ये वापरण्यात येणारी रासानियक खते, तणनाशक पक्ष्यांच्या जीवितास धोका बनत असल्याने शेतकरी राजालाही वेळीच सजग होण्याचा विचार दिला आहे. ‘पक्षी वाचवा’सारखी मोहीम हाती घ्यावी लागते. याचे मूळ मानवनिर्मित असून, त्यासाठी चिंतन करण्याची गरज असल्याचे सांगत खरोखरच भावी पिढी निसर्गाबाबत साऱ्यांना जागरुक करण्यासाठी सरसावली असल्याचे दिसून येत आहे.

जिथे हिरवळ तिथेच आनंद

निसर्गाच्या जवळ जाण्याच्या अट्टाहासामुळे जमीन विक्री, वाढते रिसोर्ट कल्चर, त्यातून वाढणारे प्रदूषण हे सारे पर्यावरण ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. जगा आणि जगू द्या या मूलमंत्राचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. जैवविविधता ही नैसर्गिक आभूषण असताना वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या ​अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जिथे हिरवळ तिथेच आनंद हे वाक्य साऱ्यांनी मनात बिंबवण्याची आवश्यकता मांडली आहे. काही गृहिणींनी घराशेजारी येणाऱ्या पक्ष्यांसाठी केलेले उपाय मांडून जखमी पक्ष्यांसाठी काम करण्याची तळमळ मांडली आहे. छोटी रोपे देऊन वाढदिवस साजरा करा, त्या रोपांची झाडे बनून तिथे पक्षी आनंद घेतील, असा आनंद वाढदिवसानिमित्त लुटण्याचा प्रेमळ सल्लाही विचार करण्यासारखा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकाने त्वरित बंद करा

$
0
0

म टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा प्रशासनाला आज, सोमवारी चार विविध संघटनांनी वेगवेगळ्या विषयांवर निवेदने दिली. यात अवैध दारू दुकाने बंद करण्यासंदर्भात दोन संघटनांनी मागणी केली आहे. भारिप-बहुजन महासंघाच्या महिला आघाडीने गोकुळ शिरगाव व परिसरातील अवैध दारू दुकानांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर श्री आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाने जैन मंदिराच्या आवारात सुरू असलेले वाइन शॉप बंद करण्याची मागणी केली आहे.

भारिप-बहुजन महासंघाच्या पत्रकात म्हटले आहे की, गोकुळ शिरगाव आणि परिसरात चार ते पाच ठिकाणी हातभट्टीची दारू विकली जाते. रस्त्यालगतच ही दुकाने असल्याने महामार्गावरील अपघातांना ती कारणीभूत ठरत आहेत. परिसरातील अनेक कुटुंबे उद्‍ध्वस्त झाली आहेत.

निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास रास्ता रोको, निदर्शने, उपोषण यांसारखे आंदोलनाचे मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना महासंघाच्या जिल्हा सचिव प्रिया कांबळे, हिराबाई कांबळे, शोभा कुरणे, सुनीता कांबळे, सरसाबाई कांबळे, जया कांबळे, सुनीता कांबळे आदी उपस्थित होत्या.

श्री आशापूरण पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपुजक संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, हॉकी स्टेडियम समोरील आशापुरण फ्लोअर्स अॅन्ड व्हिलाज् या रहिवासी इमारत आणि मंदिर परिसरात ६ मेपासून दारू दुकान सुरू झाले आहे. या दुकानामुळे परिसरातील महिलांना त्रास होत आहे. अशा वातावरणात धार्मिक विधी करणे अशक्य असून, या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. निवेदनावर मनीष शहा, कुंदन मुथा, हिराचंद ओसवाल, प्रकाश ओसवाल, राशी राठोड, भरत गांधी यांच्या सह्या आहेत.

अन्याय निवारण कृती समिती

दिवसभरात निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळांत मायक्रो फायनान्स अन्याय निवारण कृती समितीचाही समावेश होता. त्यांनी या कंपन्यांवर कारवाईसाठी या कंपन्यांच्या विनातारण कर्ज वाटपाबाबत चौकशी करण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीसमोर म्हणणे मांडण्यासाठी समितीचा कोल्हापूर दौरा त्वरित नियोजित करावा, अशी मागणी केली आहे.

धमकीचा निषेध

पुण्यातील भाकपच्या (मार्क्सवादी) कार्यालयात स्फोटके आणि धमकीचे पत्र पाठविल्याच्या घटनेचा पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा कमिटीने निषेध केला आहे. अजित अभ्यंकर यांच्या नावे हे पार्सल पाठिवण्यात आले असून, संबंधिताला त्वरित ताब्यात घ्यावे, अशी मागणी जिल्हा कमिटीने केली आहे. या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आज, सोमवारी देण्यात आले. पक्षाचे नेते चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी आबासाहेब चौगुले, राजू लाटकर, लक्ष्मण वायदंडे, विवेक गोडसे, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रमनगरात मुलाकडून बापाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विक्रमनगर येथे रविवारी मध्यरात्री चाकूचे सपासप वार करून मुलाने वडिलांचा खून केला. घरी उशिरा येत असल्याचा जाब विचारल्याने नशेत असलेल्या मुलाने त्यांच्यावर वार केले. शाहू कॉलनी परिसरात ही घटना घडली. पीरसाब महमंद मुल्ला (वय ५५) असे दुर्दैवी पित्याचे नाव असून संशयित रफिक पीरसाब मुल्ला (वय ३०) या तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

पीरसाब मुलगी, मुलगा रफ‌िक, त्याची पत्नी, दोन मुलांसह विक्रमनगरातील शाहू कॉलनीत राहतात. पीरसाब आणि रफ‌िक दोघेही सेंट्र‌िंग कामगार आहेत. रफिक दररोज रात्री उशिरा घरी येत असल्याने पीरसाब त्याला कायम जाब विचारत असत. त्याचा राग रफिकच्या मनात होता. रविवारी रात्री साडेअकरा वाजता सेंट्र‌िंग कामावरून तो घरी आला. यावेळी घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा बंद असलेला पाहून रफिकने दारावर लाथा मारण्यास सुरुवात केली. पीरसाब यांनी दरवाजा उघडून ‘इतका वेळ कोठे होतास ?’अशी विचारणा केला वर रफिकने ‘तू मला कोण विचारणार, तुला जिवंत ठेवत नाही’ असे म्हणून स्वतःजवळचा चाकू काढला. चाकूने त्याने वडिलांच्या मान, छाती, पोट व कमरेत सपासप वार केला. त्यामुळे पीरसाब रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यावेळी घरातील महिला ओरडू लागल्या. रफिकसोबत काम करणाऱ्या शब्बीर वाटंगीने रफिकला बाहेर काढले. यावेळी गल्लीतील नागरिकही जमा झाले. त्याचा मित्र राजू पाटील याने रफीकच्या हातातील चाकू काढून घेतला. त्यानंतर रफीक पळून गेला.

त्यानंतर तातडीने मुल्ला यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांनी रफिकचा शोध घेतला असता तो विक्रमनगर येथील तिसऱ्या गल्लीत तो लपून बसल्याची माहिती पेलिसांना मिळाली त्यानंतर त्याला ताब्यात घेतले.

रफिक मद्य व गांजांच्या आहारी

रविवारी रात्री रफीक मद्यपान करून घरी आला होता. वडिलांशी वाद झाल्यानंतर तो वार करून पळून गेला. त्यांनी पीरसाब यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तो घरी आला. त्याने घरातील साहित्याची नासधूस केली. रफिक याल गांजाचे व्यसन असल्याचेही समजते. पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत गांजांची धुंदीत तो कोठडीत झोपून होता.

रफीक रेकॉर्डवरील गुन्हेगार

विक्रमनगर येथे गुंडांच्या दोन टोळ्या असून ​रफिक निरंगे टोळीचा सदस्य होता. निरंगे टोळीचा गतवर्षी लखन कांबळे टोळीबरोबर वाद झाला होता. दोन्ही टोळीतील सदस्यांवर खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी हे गुन्हे दाखल झाले होते. लखन कांबळे व संजय निरंगे हे दोघांना जामीन मिळाला नसल्याने ते कारागृहात आहेत. तर रफीक, बबलू माने, शरद पाटील हे जामिनावर सुटले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंत्राटी कामगारांचा सरकारला अल्टिमेटम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कंत्राटी वीज कामागरांना वीज कंपन्यांच्या सेवेत कायम करून घ्यावे, त्यांचे थकीत वेतन द्यावे या आणि इतर मागण्यांसाठी सोमवारी वीज कंपन्यांच्या कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले. वीज वितरण कंपनीच्या नागाळा पार्क येथील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मागण्यांसंदर्भातील निवेदन कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. येत्या १५ मे पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या, २२ मेपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आजवर केलेल्या आंदोलनांची दखल सरकारने घेतलेली नाही. कंत्राटी कामगार कायम कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. मेंटेनन्सच्या कामांत प्रसंगी जोखीम स्वीकारतात. अनेक कामगार जवळपास १० ते १२ वर्षे काम करत आहेत. कधी वेतन मिळते, तर कधी मिळत नाही. समान वेतनाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशालाही सरकारने धुडकावून लावले आहे. सर्व कामगार आयटीआय अप्रेंटीस पास आहेत. त्यांना १०-१२ वर्षांचा अनुभव आहे, तर ते कंपनीला का चालत नाही? आमचा विचार करून कंपनीने रोजंदारीचा प्रश्न मिटवावा.

आता कंत्राटी कामगारांनी शेवटी लढाई करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व विभागीय कार्यालयांबाहेर धरणे आंदोलन झाले. येत्या १५ मेपर्यंत निर्णय न दिल्यास २२ पासून राज्यातील सर्व कंत्राटी कामगार बेमुदत आंदोलन सुरू करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी कॉम्रेड कृष्णात तांबेकर, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा सचिव अमर लोहार, मिलिंद कुडतकर, अनिल लांडगे, मधुकर माळी, रमेश थोरात, राजू जोशीलकर, भगवान खाडे, एकनाथ जाधव, विजय कांबळे, प्रेमसागर देसाई, आदी उपस्थित होते.

एक वर्ष पगारच नाही

गारगोटी आणि मुरगूड विभागातील जवळपास ४० कामागारांना मे २०१६ पासून वेतन मिळालेले नाही. तर, जिल्ह्यतातील इतर विभागातील कामगरांना डिसेंबरपासून वेतन मिळालेले नाही. या संदर्भात कंत्राटदाराकडे चौकशी केली, तर कंपनीकडूनच पैसे मिळाले नसल्याचे ते सांगतात. मुळात कंपनीने वर्क ऑर्डर देण्यासही विलंब केला, त्यानंतर आता वेतनाचीही स्थिती. सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून घेईल, या अपेक्षेने नोकरी सोडताही येत नाही आणि काम करायचे, तर पगारही मिळत नाही, अशी कामगारांची दुहेरी कोंडी झाली आहे. यातील अनेकांची लग्ने झाली आहेत. घरात मुले, आई-वडील आहेत. घर चालवायचे कसे, असा मोठा प्रश्न या कामगारांपुढे आहे. ‘उधारी मागून मागून इतके बदनाम झालो आहोत, की आता आम्हा महावितरणच्या कंत्राटी कामगारांना कोणी उधारीही देत नाही,’ अशी व्यथा एका कामगाराने मंडली. पंजाब, गुजरात, तमीळनाडू, दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये कंत्राटी कामगारांना कायम करून घेण्यात आले आहे, महाराष्ट्रतच हे का होत नाही, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोळ्यांची वाढली जळजळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडक उन्हाळा आणि त्यातच जोरदार वाऱ्यासह येणारा वादळी पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे डोळे येण्याचा आजार, त्यातून डोळ्यांची जळजळ असा त्रास वाढला आहे. उन्हामुळे डोळे कोरडे पडतात, तर काहीजणांना वातावरणातील बदलाची अॅलर्जी असल्यामुळे डोळे येण्याबरोबरच डोळे रखरखणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा तक्रारींचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिवसभर ऊन आणि संध्याकाळच्या वेळेस धूळ आणि वादळी वाऱ्यासह वळीव पाऊस असे वातावरण आहे. त्यामुळे सध्या लोकांमध्ये डोळे येण्याबरोबर डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, सतत पाणी येणे अशा तक्रारी असून उन्हामुळे डोळ्यातील पाणी कमी होऊन डोळे कोरडे होतात. त्यामुळे डोळे येण्याचा आजार वाढण्याची जास्त शक्यता असल्याचे डॉक्टर सांगतात. डोळे आल्यास अचानक डोळ्यांची जळजळ, पापण्या चिकटणे, प्रकाश सहन न होणे, डोळे दुखणे, पाणी येणे, घाण येणे अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात. वातावरणाबरोबर रासायनिक पदार्थ, धूळ, प्रखर प्रकाशकिरण यामुळेही डोळे येण्याची शक्यता असते. १४ ते ४० वयापर्यंतच्या लोकांमध्ये या संसर्गजन्य आजाराचा धोका जास्त असतो.

सध्या लेन्स लावण्याची फॅशनही आहे. मात्र एकमेकांची कॉन्टॅक्ट लेन्स किंवा सोल्यूशन्स वापरणेही टाळले पाहिजे. याचबरोबर तरुण- तरुणी लॅपटॉप, मोबाइल, कम्प्युटरचा वापर जास्त प्रमाणात करतात. त्याचा परिणामही डोळ्यावर होत असल्याचे जाणवत आहे. दैनंदिन आयुष्यात कधी दुर्लक्षामुळे तर कधी चुकीच्या सवयींमुळे डोळ्यांना इजा पोहचून विकार जडतात. बदलत्या वातावरणामुळे अॅलर्जीचे प्रमाणही दिसून येते. डोळ्याबाबत काही लक्षणे जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला तातडीने घेणे आवश्यक आहे.

.................

डोळ्याच्या विकाराची लक्षणे

डोळे चुरचुरणे, लाल होणे, पाणी येणे, ताण वाटणे, कमी दिसणे आदी लक्षणे दिसल्यास रग्णांनी तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांकडून तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

..................

उपाययोजना व दक्षता

उन्हात बाहेर पडताना गॉगल वापरावा

डोळे आल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे

डोळे रखरखत असल्यास चेहरा थंड पाण्याने धुवावा

डोळे लाल होणे, पाणी येणे अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

आयटोन, गुलाब पाणी डोळ्यांत घालणे, खालच्या पापणीच्या आत आयलायनर, काजळ लावणे टाळा

कम्प्युटरवर काम असेल तर दर तासाने काही मिनिटे विश्रांती घ्या

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉईड्स घेऊ नये किंवा स्वतःहून कुठलीही औषधे घेऊ नका.


बदलत्या वातावरणामुळे डोळ्यांच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे जाणवत आहे. उन्हात डोळे कोरडे पडतात. काहींना हवाबदलाची अॅलर्जी असते. ही लक्षणे वेळीच ओळखून काळजी घेतल्यास संसर्गजन्य आजारापासून दूर राहता येते.

डॉ. सतीश शितोळे, नेत्ररोग तज्ज्ञ, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त’चे ३० कोटी गाळात

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर: सरकारने जलयुक्त शिवार अभियानातर्गंत पहिल्या वर्षी जिल्ह्यातील ६९ गावांत जलसंधारणाच्या विविध कामांवर तब्बल ३० कोटी, ३८ रुपये खर्च केले. एक वर्षानंतर त्याची फलनिष्पत्ती पाहता हा निधी गाळात गेल्याचीच चर्चा गावांत सुरू आहे. ज्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे, त्या तुलनेत त्याचे परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे इतका मोठा निधी कुठे मुरला याचीच चर्चा सुरू आहे. तरीही सरकारी यंत्रणा मात्र कामे चांगली झाली असून ‘जलयुक्त’मुळे शेतीचे उत्पादन वाढत असल्याचा दावा केला आहे.

भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर पाणी समस्या निवारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानची घोषणा केली. २०१५ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील अभियान आहे. पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीने गावांची निवड केली. समितीचे सचिव जिल्हाधिकारी, जिल्हा‌ कृषी अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली सरकारच्या नऊ विभागच्या यंत्रणांनी कामे केली. त्याला लोकसहभागाची जोड दिली.

या अभियानातील गाव‌ निवडीच्या निकषाचा सोयीस्करपणे वापर केला. परिणामी अभियान राबवण्याची गरज असलेली टंचाईग्रस्त गावे वंचित राहिली. मोठ्या संख्येने पाणीदार गावांची निवड केली. जलसंधारणाची कामे करणाऱ्या यंत्रणा नऊ असल्याने त्याचा दर्जा राहिला नाही. पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी माथा ते पायथा अशा उपाययोजना करण्याला अनेक ठिकाणी बगल दिली. स्थानिक पातळीवर आयत्यावेळी कामाची ठिकाणे ‌बदलेली. त्यामुळे वाचलेल्या पैशावर यंत्रणेने डल्ला मारला. पारदर्शकपणे काम होण्यासाठी जीपीआरएस यंत्रणेचाही वापर केला. त्यातूनही चोरवाटा शोधण्यात आल्या आहेत. (क्रमशः)



शाहूवाडीतील गावे अधिक

‘जलयुक्त’मधून कामे झालेल्या गावांची नावे तालुकानिहाय अशी :

करवीर: भुयेवाडी, सांगवडे, कणेरीवाडी. कागल : सावर्डे खुर्द, अर्जुनवाडा-नद्याळ, बोळावी. राधानगरी : ऐनी, आपटाळ, पिरळ, राधानगरी, तळगाव, पिंपळवाडी. गगनबावडा : बावेली. , शाहुवाडी : सोनवडे, परखंदळे, शित्तूर तर्फे मलकापूर, पणुंद्रे, कोदे, पिशवी, चाळणवाडी, मनोली, कोतोली, तुरूकवाड, कोळगाव, टेकोली. पन्हाळा : मानवाड, चाफेवाडी, करंजफेण, पिंपळे तर्फे ठाणे, देवठाणे, निवडे, पोहाळवाडी, काजळवडे, वाशी, देवाळे, पिंपळे, सातवे. हातकणंगले: मिचणे, सावर्डे, कुंभोज, नागांव, कासारवाडी. ‌शिरोळ: तमदलगे. गडहिंग्लज: कडलगे, लिंगणूर तर्फे नेसरी, महागाव, अर्जुनवाडी, कानडेवाडी, कुमरी, नूल, हेब्बाळ कसबा नूल. आजरा: खानापूर, भादवण, लाकुडवाडी. भुदरगड- आदमापूर, आकुर्डे, भाटीवडे, मोरेवाडी, कूर, टिक्केवाडी, फये. चंदगड: आमरोळी, मुगळी, सोनारवाडी, सातवणे, आलबादेवी, दाटे, माणगाव, नागवे, तेऊरवाडी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाला सर्वांगीन अभ्यासाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या उर्जेला कृतीशील कार्यक्रमांद्वारे विधायकतेकडे नेले पाहिजे. आजवर मराठा समाजाला ग‌ृहित धरून राजकारण केले गेले. त्यामुळे क्रांतीमोर्चांनंतर मराठा समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे. मोर्चांच्या माध्यमातून इतिहास घडला, हा इतिहास मांडण्याची आवश्यकता आहे. मराठ्यांनी आजवर इतिहास घडविला पण त्याचे लिखाण झाले नाही, ही कसर ‘मराठा क्रांती मोर्चा: एक अन्वयार्थ’ च्या माध्यमातून भरून निघाली आहे. हा एक ऐतिहासिक दस्ताऐवज असून त्यांची महती ५० वर्षांनंतर समोर येईल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले.

संपत देसाई व सुनील कोंडूसकर लिखित ‘मराठा क्रांती मोर्चा: एक अन्वयार्थ’ या विशेषांकांच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. भारत पाटणकर होते. शाहू स्मारक सभागृहात डॉ. पवार व साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. पवार म्हणाले, ‘ मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्ती या दोन प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आले. आरक्षण हा न्यायालयीन प्रश्न असल्याने लाखोंचे मोर्चे काढून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी व्यापक विचारांची आवश्यकता आहे. मराठा समाजाचा समाजिक, आर्थिक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. मोर्चामुळे प्रथमच मराठा स्त्रिया मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या. त्यांचा समाज कार्यातील टक्का वाढवण्यासाठी कृतीशील कार्यक्रम घेऊन रुढी, परंपराचा त्याग करणे गरजेचे आहे. मराठा समाजाला नेहमी गृहित धरण्यात आले, पण या समाजासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता राज्यकर्त्यांना वाटली नाही. म्हणून गरीबांचे राज्य येत नसून गरीबांच्या नावाने राज्य केले जाते. गरीबांचे राज्य यावे, अशी अपेक्षा असले, तर यापुढे कृषीमालाला हमीभाव मिळण्यासाठी नव्याने लढा उभारण्याची आवश्यकता आहे.’

डॉ. गवस म्हणाले, ‘मोर्चेकरांनी मागण्यांना वाचा फोडून आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. आता विचारवंत व संशोधकांनी याची वस्तूनिष्ठ मागणी करुन आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. सत्य समजून परिस्थितीचे अवलोकन करताना सहानूभुती दाखवण्याऐवजी चळवळीतील कार्यकर्त्यांना जातीयवादी ठरवले जात आहे. हे दुर्दैव असले, तरी घरातील स्त्रियांना मुक्ती दिल्यास जातिअंताचा लढा पुढे जाईल.’

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, ‘आरक्षणाचे सामाजिक आणि आर्थिक निकष मानले, तर ब्रिट‌िशकाळापासून मराठा-कुणबी शोष‌ित जात समजली आहे. त्यामुळे ते आरक्षणास पात्र आहेत. मात्र समाज समृद्ध होण्यासाठी जात‌िअंत झाला पाहिजे. जातीव्यवस्था मराठ्यांबरोबरच इतर जातींनाही हानीकारक आहे.’

यावेळी डॉ. प्रकाश पवार, हुमायून मुरसल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, गुलाबराव घोरपडे, अॅड. कृष्णा पाटील आदी उपस्थित होते. स्वागत सुनील कोंडूसकर यांनी केले. प्रास्ताविक संपत देसाई यांनी तर, सुधीर नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार कृष्णा सावंत यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थेट पाइपलाइन आराखड्याची होणार छाननी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेमध्ये ढोबळ कामाच्या बिलाच्या माध्यमातून समोर आलेल्या घोटाळ्यानंतर भविष्यात या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिका योजनेतील कामनिहाय खर्च निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच पुर्ण प्रकल्प आराखडयाची छाननी करण्यात येणार आहे. याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती देणार आहेत. तसेच येत्या आठवडाभरात योजनेला मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.

ठिकपुर्ली येथे साकव पद्धतीच्या बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलाचा खर्च २० लाख रुपये असताना अडीच कोटी रुपयांचा खर्च दाखवून त्यातील ६० टक्के बिल अदा करण्यात आली आहे. ढोबळ कामाच्या खर्चावरून योजनेत ६० कोटी रुपयांचा ढपला पाडला गेल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार पाटील यांनी आयुक्त चौधरी यांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते. आयुक्त चौधरी यांनी याबाबत कन्सल्टंट, कंत्राटदार, महापालिकेचे अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. त्याबाबतची माहिती पालकमंत्री पाटील यांना मंगळवारी आयुक्त देणार आहेत.

याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘थेट पाइपलाइन योजनेत जे आरोप झाले आहेत, त्याबाबत घेतलेली माहिती मंगळवारी मंत्री पाटील यांच्याकडे देण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या प्रकल्प आराखड्याची सखोल छाननी करण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. योजनेमध्ये ढोबळ कामांसाठी खर्च दाखवण्यात आला आहे. त्याऐवजी प्रत्येक कामाचा खर्च निश्चित करून नवीन इस्टिमेट करण्याची गरज आहे. त्यानुसार प्रत्येक कामाचे बिल स्वतंत्ररित्या करण्यात येणार आहे.’

ढोबळ खर्चांची तपासणी

पुलांसाठी ढोबळ कामाचा खर्च २० कोटी रुपये गृहित धरण्यात आला आहे. तर कॉपर डॅम व पाणी उपसा करण्यासाठीही अशाच प्रकारे ढोबळ खर्च पकडण्यात आला आहे. याशिवाय आणखी कोणत्या कामांसाठी ढोबळ खर्च गृहित धरण्यात आला आहे याची तपासणी इस्टिमेटमधून केली जाणार आहे. यातून ढोबळ खर्चाऐवजी आता प्रत्येक कामाचा खर्च निश्चित करुन बिले देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापुरी’चा नव्या वर्षात नवा लूक

$
0
0


Sachin.Yadav@timesgroup.com

tweet : @sachinyadavMT

कोल्हापूर ः कोल्हापुरी चप्पल नव्या तीन आकर्षक डिझाइन्समध्ये नव्या वर्षात उपलब्ध होणार आहेत. खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे कोल्हापुरी चप्पल कारागिरांसाठी शुक्रवारी कार्यशाळा झाली. कार्यशाळेतील सहा कारागीर नव्या डिझाइन्सचे काम करणार आहेत. या पंधरा डिझाइनमधून तीन डिझाइन्स निवडण्यात येणार आहेत. तीन महिने डिझाइन आणि त्यानंतर मार्केटिंग करण्यात येणार आहे. नव्या वर्षांत ‘कोल्हापुरी’चे आकर्षक डिझाइन्स जागतिक बाजारपेठेत पाठविण्यात येतील. कोल्हापुरीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार मदत करणार असल्याने व्यवसायाला चालना मिळणार आहे.
‘कोल्हापुरी’चे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात आश्वासन दिले आहे. त्यासह कोल्हापुरी चप्पल आकर्षक रूपात आणण्याचे आवाहनही केले. त्याची दखल घेत सहा कारागिरांनी डिझाइन्स करण्याची जबाबदारी घेतली आहे. बाजारपेठेत वेलीचे आकर्षण असलेली खास कापशी, दीड इंची पट्टा असलेली खास कोल्हापुरी आणि कटिंगचे कान आणि दोन्ही बाजूने आकर्षक पट्टा असलेली पुडा कापशी चप्पल तसेच कुरुंदवाडी चप्पलही प्रसिद्ध आहे. बदलत्या काळात युवक आणि युवतींची फॅशन आणि ड्रेसकोडनुसार चप्पलची मागणी आहे. ग्रामोद्योग मंडळाने कोल्हापुरीला मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी चप्पल डिझाइन्स, मार्केटिंग आणि निर्यात करणारे कारागीर असे तीन ग्रुप तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यात आकर्षक डिझाइन्सवर भर दिला आहे. डिझाइन्स तयार झाल्यानंतर त्यांपैकी तीन डिझाइन्स निवडल्या जाणार आहे. या डिझाइन्सना ग्राहकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहून बाजारपेठेत नव्या चप्पल आणण्यात येणार आहेत.
उद्योगक्षेत्राच्या रखडलेल्या प्रश्नांसह लघुउद्योगाला चालना आणि विकासाचा अजेंडा निश्चित करण्यासाठी २६ ऑगस्ट २०१६ ला ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘मेक इन कोल्हापूर’ची संकल्पना मांडली. कोल्हापुरात ‘मटा कॉन्क्लेव’ झाला. यात उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाला नवी चालना दिली. यात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरी चप्पलचे पेटंट आणि या व्यवसायाला नवी चालना देण्याचे आश्वासन दिले होते. कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्याचेही घोषणा केली होती, ती यानिमित्ताने प्रत्यक्षात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजार ठेकेदार, मजूर रस्त्यावर

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

Tweet : @udaysingpatilMT

कोल्हापूर : सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या ज्या नोंदणीवर ठेकेदाराने व्यवसाय उभा केला, तीच नोंदणी सरकारने रद्द केली. त्याचबरोबर टेंडरमधील रकमेच्या दहा टक्के रक्कम बँक खात्यात शिल्लक, त्या खातेदाराबाबत बँकेकडून २५ टक्के अर्थसहाय्याची हमी, टेंडर मिळवण्याची गरज असल्याने टेंडरपेक्षा कमी खर्चात काम करणाऱ्या ठेकेदारांकडून परफॉर्मन्स सिक्युरिटीखाली जादा रक्कम आकारण्याच्या विसंगत नियमांमुळे चार महिन्यात जिल्ह्यातील सरकारी कामे ठप्प झाली आहेत. नवीन कोणत्या कामांची टेंडर काढण्यात आलेली नाहीत. या प्रकारांमुळे जवळपास पाच हजारावरील छोट्या व मोठ्या ठेकेदारांबरोबर मजूर हातावर हात ठेवून बसले आहेत.

टेंडरच्या कामात पारदर्शक आणण्याच्या नावाखाली सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांच्या टेंडरसाठी डिसेंबरपासून सतत नवनवीन आदेश काढले आहेत. गुणवत्तापुर्ण काम करण्यासाठी नियम आणखी कडक केले तर समजले जाऊ शकते. पण विसंगत नियमांमुळे कामाला चालना मिळण्याऐवजी काम ठप्प होण्याचाच प्रकार सरकारने चालवला आहे. पारदर्शक कारभारासाठी ई टेंडरिंग केले जात आहे. पण प्रशासनाकडे प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करावी लागणार असल्याने गोपनीयता राहणारच नाही. कमी दरामध्ये काम होत असले तरी त्यासाठी जादा आकारणी करण्याचा प्रकार म्हणजे कोणतेही काम कमी दरात न करता, त्यासाठी जास्त खर्च झाला पाहिजे, असाच हेतू सरकारचा दिसून येत आहे. तसेच रजिस्ट्रेशन रद्द करुन ठेकेदारांच्या डोक्यावर कायम असणारी काळ्या यादीत टाकण्याची टांगती तलवार कायमची काढून टाकली आहे. यामुळे काम पुर्ण झाल्यानंतर त्यामध्ये दोष आढळल्यास कशा पद्धतीने कारवाई करणार? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे.

कामाच्या देखभालीची जबाबदारी दोन वर्षे ठेवण्याच्या निर्णयापासून सुरुवात झाली व सध्या ठेकेदारांचे रजिस्ट्रेशनच रद्द करुन कामाचा अनुभव असलेल्या व काम केलेले कुणीही टेंडर भरण्यासाठी पात्र ठरवले आहे. हा निर्णय ठेकेदारांना, त्यातीलही नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्या व छोट्या ठेकेदारांसाठी अक्षरशः रस्त्यावर आणणारा ठरला आहे. पूर्वी सत्तेवर आलेल्या युतीच्या सरकारमधील भाजपच्याच मंत्र्यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी घेतलेला निर्णय या सरकारमधील भाजपनेच बंद करुन त्यांना बेरोजगार करुन टाकले असल्याची भावना ठेकेदारांमध्ये आहे. जुनी रजिस्ट्रेशन रद्द केल्याने व्यावसायिकांची पतच सरकारने घालवली आहे. तसेच नव्याने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची सवलतीही काढून घेतल्या आहेत. नवीन नियमानुसार काम घेणाऱ्या ठेकेदाराकडे स्वतःची यंत्रणा असलीच पाहिजे हा त्रासदायक नियम लावल्याने ५० लाखाच्या आत काम घेणाऱ्यांच्या पोटावर पाय आणले आहेत.

सरकारने या नियमामुळे नवे ठेकेदार बनवण्यावर गदा आणली आहेच. शिवाय मोठ्या ठेकेदारांचीही मुस्कटदाबी केली आहे. टेंडर भरले जात असताना त्यातील रकमेच्या जवळपास ४० टक्क्यापर्यंतची आर्थिक क्षमता ठेकेदाराने दाखवल्याशिवाय टेंडर देता येणार नाही. कमी दराच्या टेंडरसाठी परफॉर्मन्स सिक्युरिटीनुसार पैसे आकारले जाणार असल्याने कुणीही कमी दरात टेंडर भरणार नाही. परिणामी सरकारचे पैसे वाचण्याऐवजी जादा पैसे खर्च होतील हा प्रकार विसंगतच वाटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात फर्म भागीदारीची संकल्पना प्रथमच आणली आहे. यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे अशी अगदी परदेशी व्यक्तीही स्थानिक फर्मशी भागीदारी करून टेंडर घेऊ शकणार आहे. यामुळे ज्या ठेकेदारांनी आतापर्यंत व्यवसाय उभे केले, त्यांचा चरितार्थ बंद करण्याची व्यवस्था या नियमांमधून केल्याची संतप्त भावना ठेकेदारांमध्ये आहे. याबाबत राज्यपातळीवर ठेकेदार संघटीत केले जात आहेत.



सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून व्यवसायाचा मूळ ढाचा बदलला आहे. पण नवे नियम त्यांना नेमके कशासाठी हवे आहेत, हे स्पष्ट होत नाहीत. त्यातून केवळ मागील सरकारपेक्षा आपण काही तरी वेगळे केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. नियम पारदर्शक कारभारासाठी सांगितले जात आहेत, पण या नियमातून सरकारच्याच धोरणावर शंका उपस्थित होत आहे.

बापू लाड, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ


टेंडर रकमेपेक्षा दहा टक्के कमी दर भरल्यास एक टक्का आकारणी

दहा टक्क्यापेक्षा आणखी खाली दर भरल्यास प्रत्येक टक्क्याला एक टक्का

टेंडर भरताना प्री क्वॉलिफिकेशन सादर करावे लागणार

काळ्या यादीचा धसकाच संपवला

जॉईंट व्हेचरचा प्रकार आणल्याने स्थानिकांना फटका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४७५ लोकांनी एका दिवसात बांधले २१० बंधारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. बिदाल गावात रविवारी २४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधले. या श्रमदानाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.
बिदाल गावाने वॉटर कप जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसांत २१० दगडी बंधारे श्रमदानातून बांधून नवा विक्रम केला आहे.

असे केले नियोजन

प्रत्येक बंधाऱ्यासाठी दहा लोक आणि एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर, असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील आयडीएलच्या संस्थापिका वैशाली शिंदे यांच्या ४५ जणांच्या ग्रुपसह माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती. ठरल्याप्रमाणे प्रत्येकाने श्रमदान करून २१० दगडी बंधारे बांधले. यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास
मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

३२ गावांचा पाणीदार होण्याचा संकल्प

वॉटर कप स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवत पावसाचे पडणारे पाणी मुरवण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते. गावाला जैन फाउंडेशनने एक, सरकारचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशिन मोफत तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० दगडी बंधारे बांधण्यात यश आले आहे.

बिदाल ग्रामस्थांच्या एकीमुळे दोन तासांमध्ये केलेले श्रमदान एक कोटी रकमेपेक्षा जास्त मोलाचे आहे. रविवारच्या श्रमदानामुळे अडीच कोटी लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ही एकजूटच बिदाल ग्रामस्थांना वॉटर कप स्पर्धा जिंकून देईल.
- भगवानराव जगदाळे, जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएसीतील निराशेतून तरुणीची आत्महत्या

$
0
0

सातारा : लोकसेवा आयोगाची नुकतीच परीक्षा दिलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण बाजूस सोनगांवच्या हद्दीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. सायली रामचंद्र पवार (वय २३, मूळ, रा. उंब्रज, सध्या रा. कोडोली) असे युवतीचे नाव असून सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या दहा सदस्यांनी सायलीचा मृतदेह शोधण्यात मदत केली.

सातारा तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. सायली गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. गेल्या काही आठवड्यापासून ती निराशेच्या गर्तेत होती, अशी माहिती प्राथमिक पोलिस तपासात समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी ती अचानक घरातून गायब झाली. काहींनी तिला अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेने जाताना पाहिले आणि त्याची माहिती त्यांनी तिचे वडील रामचंद्र पवार यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ सहाय्यक आयुक्तांच्याकार्यालयाची झाडाझडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य विभागाकडील कर्मचारी संजय होटकर यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक आयुक्त अभिजित हराळे यांच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी सोलापूर पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, त्याना कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली नाहीत.

संजय होटकर मनपाची वादग्रस्त ठरलेली कचरा टेंडरची फाइल सांभाळत होते. या पूर्वी बेकायदा काम करण्यासाठी दबाव टाकला म्हणून दोन नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून होटकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच गुरुवारी त्यानी होटगी रस्ता परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिट्टीमध्ये सहायक आयुक्त हराळे यांच्यासह राजू सावंत, ए. के. आराधे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. संबधितांनी भ्रष्टाचार केला असून, त्याची चौकशी करावी, असेही चिठीत लिहिले होते. त्यानंतर पोलिसांनी हराळे, सावंत आणि आराधे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिसांनी होटकर यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेले हराळे तसेच अन्य दोघांची चौकशी करण्यासाठी महापालिका गाठली. हराळे यांच्या कार्यालयात जाऊन झाडाझडती घेतली मात्र. पोलिसांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु आत्महत्येचे नेमके कारण कचरा टेंडरची फाइल होती की, आणखी काय याची चौकशी सदर बाजार पोलिस करीत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब चेसीमुळे८७ बसची नोंदणी रद्दसोलापूर मनपाच्या बसेसवर आरटोओची कारवाई

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू शहरी विकास योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सोलापूर महानगरपालिकेला अशोक लेलेंड कंपनीमार्फत शंभर बसेसची चेसी पुरविण्यात आल्या होत्या. १०० पैकी तब्बल ८७ बसेसची चेसी खराब असल्याचे पुराव्यानिशी आढळून आले आहे. सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने या सर्व ८७ बसेसची नोंदणी रद्द केली आहे. आरटीओ बजरंग खरमाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. या कारवाईमुळे अशोक लेलेंड कंपनीला जबरदस्त दणका बसला आहे.

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आपल्या प्रयत्नातून महापालिका परिवहन उपक्रमासाठी २०० बसेसची मागणी केली होती. त्यापैकी १९० बसेस मंजूरही करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सरकार आणि मनपा यांचा हिस्सा भरण्याचे ठरले होते. त्यानुसार मनपाच्या ताफ्यात पहिल्या टप्यात शंभर बसेस आल्या. त्यांची नोंदणी करून त्या सर्व एसी आणि नॉन एसी बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु २०१५ सालात तत्कालीन विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी अशोक लेलेंड कंपनीने पुरविलेल्या या बसेसची चेसी खराब असल्याची तक्रार सोलापूरचे आरटीओ बजरंग खरमाटे यांच्याकडे केली होती. त्यानुसार परिवहन अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्यात ४७ बसेसची पाहणी आणि नंतर उर्वरित बसेसची पाहणी केली असता या सर्व ८७ बसेसची चेसी खराब असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार आरटीओने महापालिकेला या बसेस बंद ठेवण्यास सांगितले.

दरम्यान, मनपाने बस पुरविणाऱ्या कंपनीला खराब बसेसची चेसी बदलून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. शिवाय पालकमंत्री विजयकुमार देशमुख, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत मुंबईत बैठकही घेण्यात आली होती, तेव्हाही कंपनीने चेसी बदलून देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरटीओने आपली कारवाई सुरू केली. बस पुरविणारी कंपनी कोणत्याच हालचाली करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मनपाने आपल्या वाट्याची सुमारे २४ कोटींची रक्कम अडवून ठेवली आहे. साठ कोटींपैकी ३४ कोटी रक्कम कंपनीला देण्यात आली आहे.

...........

चेसी खराब असल्याचा अहवाल

बसेसची चेसी खराब असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्याकडूनही अहवाल आल्यानंतर सोलापूर आरटीओने बसेसची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र तत्काळ मनपा आयुक्तांना पाठवून देण्यात आले. गाड्यांची नोंदणी करताना आरटीओने दिलेले आरसी बुक, योग्यता प्रमाणपत्र, टॅक्स भरलेली कागदपत्रे तातडीने आरटीओ कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आरटीओ खरमाटे यांनी या वेळी बोलताना दिली.

सोमपासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५६ कोटी खर्चाच्या १९० बसेसपैकी काही बसेस २०१४ सालापासून खरेदी करण्यास सुरुवात झाली. प्रथम सुमारे ६० कोटी रक्कम असलेल्या १०० बसेस खरेदी करण्यात आल्या. त्यामधील एक बस जळाली आहे. उर्वरित ९९ पैकी ८७ बसेसची नोंदणी आरटीओने रद्द केल्यामुळे आता या बसेस रस्त्यावर कधीच धावू शकणार नाहीत. उर्वरित १२ बसेस चांगल्या आहेत, भविष्यात जर त्यामध्येही काही त्रुटी निर्माण झाल्यास त्या बसेसवरही कारवाई करू, असा इशाराही आरटीओ खरमाटे यांनी दिला आहे.

अपिलासाठी ३० दिवसांची मुदत

आमच्या निर्णयाविरोधात मनपा किंवा कंपनीला अपील करायचे असेल तर त्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे. अपील थेट परिवहन आयुक्तांकडे करावयाचे आहे. चेसी खराब असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने कंपनी अपील करण्याचे धाडस कितपत दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५५ (३) आणि ५५ (५), अन्वये आरटीओने बसेसची नोंदणी रद्द केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजनीच्या कालव्यातसख्खे भाऊ बुडाले

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील उजनीच्या उजव्या कालव्यात मामासोबत पोहण्यासाठी गेलेली चार शाळकरी मुले वाहून गेली. त्यापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे भाऊ मुंबई येथील रहिवाशी असून, श्रीपूर येथे उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावाला आले होते.

ओम सतीश लोणी (वय १३) व प्रसन्न सतीश लोणी (वय १०) अशी मृत भावांची नावे आहेत. तर विराज संतोष शिवनगी व विकी संतोष शिवनगी या दोघाना बोरगांव येथील रोहित साठे यांनी कालव्यात उडी टाकून वाचवले. बुडालेल्या दोन्ही सख्ख्या भावांच्या मृतदेहाचा अद्याप शोध सुरू आहे. या घटनेने श्रीपूर व बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरमध्ये मालगाडीचे डबे घसरले

$
0
0

सूर्यकांत आसबे । सोलापूर

सोलापूरमधील दुधणी स्थानकादरम्यान ब्रेक फेल झाल्याने इंजिनसहित मालगाडीचे काही डबे घसरले. त्यामुळे दक्षिण भारतातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाडीहून होटगीला मालगाडी जात असताना रूळाला तडे गेल्यानं हा अपघात झाला. या अपघतात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. ही घटना समजताच रेल्वे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊ रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु केलं आहे.

रविवारी मध्यरात्री १२:३० वाजता ही घटना घडली. दुधनीनजीक रुळांना तडे गेल्याने मालगाडीच्या इंजिनसह ५ वॅगन घसरले, त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून दक्षिण भारताचा संपर्क तुटला आहे. वाडी जंक्शन वरुन होटगी स्थानकाकडे ही मालगाडी येत होती. सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल घेऊन ही मालगाडी येत होती. दरम्यान रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती घोटाळा: दोन अधिकाऱ्यांना अटक

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

सोलापुरातील समाजकल्याण विभागातील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळाप्रकरणी सहाय्यक समाजकल्याण आयुक्त मनीषा फुले आणि निलंबित सहाय्यक समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे या दोघांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांनाही ९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागील वर्षी सोलापुरातील समाजकल्याण विभागात रोजंदारीवर काम करणारी सारिका काळे हिला शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. सोलापुरसह अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीच्या यादीत बोगस नावे घालून त्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाटली होती. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले होते. काळे हिच्या सांगण्यावरून पहिल्या टप्यातील तपासात सुमारे १८ ते २० कोटींचा घोटाळा झाला असल्याचे समोर आले होते. तिच्याकडून अधिक माहिती घेतली असता यामध्ये फुले, घाटे यांच्यासह जवळपास शंभर जणांना आरोपी करण्यात आले. काळे ही सध्या कारागृहात आहे तर काहीजण त्यावेळीच जामिनावर सुटले होते. यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. घाटे सोलापुरातून बदली होऊन गेला होता आणि तो सांगली येथे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त म्हणून कामकाज पाहत होता.

दरम्यान फुले आणि घाटे यांनी यापूर्वी अटकपूर्व जमीन घेतला होता. त्यावेळी त्यांनी या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु बराच कालावधी उलटून गेला तरीसुध्दा या दोघांकडूनही तापसकामात कोणतेच सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळण्याचे ठरविले. त्यानुसार फुले आणि घाटे यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माझे मंत्रिपद धनगर आरक्षणासाठी नाही’

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

‘बारामतीमध्ये धनगर समाजाने मते दिली असती, तर मी केंद्रात मंत्री झालो असतो. मला मराठा आणि ब्राह्मण समाजाने अधिक मतदान झाले आहे. धनगरबहुल भागांत मला कमी मते मिळाली. माझ्या पक्षाचा पहिला आमदार मराठा समाजाचा होता. मी धनगरांचा नेता किंवा धनगर आरक्षणासाठी मला मंत्री केलेले नाही,’ असे खळबळजनक वक्तव्य पशू व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. पंढरपूर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

जानकर म्हणाले, ‘माझ्या पक्षात सर्वच जातींची लोक आहेत. बैलगाडी खालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत असते, आपल्यामुळेच बैलगाडी चालत्ये, अशी अवस्था सध्या काहींची झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यातील वाद असो किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील वाद असो, तो संपविण्यासाठी मी सगळ्यांच्या पाया पडण्यास तयार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि पुरंदरे विठ्ठल दर्शनाविनाच परतले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, पंढरपूर

इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे याना मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे दर्शनाविनाच परतावे लागले. बाबासाहेब पुरंदरे विठुरायाच्या दर्शनासाठी आज दुपारी पंढरपूरला आले. मात्र मंदिर सुरक्षेला असलेल्या पोलिसांकडून त्यांना मंदिरात न सोडण्यात आल्याने महाराष्ट्र भूषण पुरंदरेंना दर्शनाशिवाय परत फिरावे लागले.

बाबासाहेब पुरंदरे येणार असल्याची माहिती मिळताच मंदिराचा एक कर्मचारी त्यांच्यासोबत त्यांना घ्यायला बाहेर आला. मात्र वयोमानानुसार बाबासाहेबांना सारखीच धाप लागू लागल्याने त्यांनी जवळ असलेल्या पश्चिम दरवाजाने मंदिरात जायची इच्छा व्यक्त केली. मंदिराचे कर्मचारी आणि बाबासाहेब यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या स्वीय सहाय्यकाने त्यापद्धतीने तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र या दरवाजातून कोणालाही सोडता येणार नसल्याचे फर्मान येथील पोलिसांनी काढले. बाबासाहेब पुरंदरेंना रुक्मिणी दरवाजापर्यंत चालत जाणे अशक्य बनल्याने त्यांनी अखेर कोणताही बडेजाव न दाखवता दर्शनाविनाच परत जाणं पसंत केलं.

विठ्ठल मंदिराचा गलथान कारभार मात्र यामुळे पुन्हा एकदा समोर आला. कोणत्याही वृद्ध व्यक्तीला दर्शनाची सुलभ व्यवस्था करण्याची जबाबदारी मंदिराची आहे. पण सुरक्षेसाठी असलेले पोलीस महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलेले व्यक्तीला अशी वागणूक देतात तर सामन्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. याबाबत बाबासाहेबांनी मात्र कोणाच्याही विरोधात तक्रार केलेली नाही. विठ्ठल मंदिराला समितीच नसल्याने येथील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणाचेच बंधन उरलेले नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाने ३० जूनपूर्वी मंदिर समिती अस्तित्वात आणण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. निदान आता तरी फडणवीस सरकारचे डोळे उघडतील एवढीच विठ्ठल भक्तांची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images