Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डॉल्बीवाल्यांना सवलत धोक्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये पोलिस प्रशासनाने केलेले डॉल्बीमुक्तीचे आवाहन धुडकावून लावत डॉल्बी लावणाऱ्या १६ मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कडक कारवाईसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याने या कारवाईतून सूट मिळवण्यासाठी मंडळांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे. या मंडळांना कारवाईतून सूट मिळाल्यास डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रामाणिक मंडळांवर अन्याय होणार आहे, त्याचबरोबर आधी गुन्हा करायचा आणि नंतर दिलगिरी व्यक्त करून सवलत मिळवायची अशी प्रवृत्तीही वाढण्याचा धोका आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने एक महिन्यापूर्वीच गणेश मंडळांसह डॉल्बी मालक आणि चालकांचे प्रबोधन सुरू केले होते. स्वतः विशेष पोलिस महानिरीक्षकांनीही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मोठ्या आवाजाच्या डॉल्बीला फाटा देण्याचे आवाहन केले होते. बहुतांश मंडळांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. गणेश आगमनासह विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज मर्यादेत ठेवला. शहरातील १६ मंडळांनी मात्र गणेश विसर्जन मिरवणुकीत ऐनवेळी आवाज मर्यादेचा भंग केला. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने पोलिसांनी तातडीने दुसऱ्या दिवशी संबंधित १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले. कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ हजार गणेश मंडळांनी आवाजाला मर्यादा घातली. केवळ १६ मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याने या मंडळांना अद्दल घडवण्यासाठी पोलिस प्रशासन सरसावले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दोषी मंडळांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना पाठबळ दिल्याने पोलिसांनी कायदेशीर उणिवा राहू नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांची आक्रमकता पाहून दोषी मंडळांच्या कार्कर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. या मंडळांनी कारवाईपासून पळ काढण्यासाठी लोकप्रतिनिधींचा आसरा शोधला आहे.

शहरात दोन पक्षांच्या नेत्यांनी सोळा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कारवाईत शिथिलता मिळावी, अशी विनंती केली आहे. यासाठी जनतेची माफी मागून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिलगिरीचे पत्रही देण्याचे नियोजन दोषी मंडळांसह लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे मंडळांचा आत्मविश्वास वाढू शकतो, त्याचबरोबर पुन्हा-पुन्हा ते अशा चुका करण्यास प्रवृत्त होऊ शकतात. याशिवाय डॉल्बीला फाटा दिलेल्या मंडळांमध्ये अन्याय झाल्याची भावना बळावणार आहे. डॉल्बी लावून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जनतेचीही भावना जाणून घ्यावी, असे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

कोडोलीत आठ मंडळांवर कारवाई

गणेश विसर्जन मिरवणुकीत विनापरवानगी ध्वन‌िक्षेपक लावल्याने आणि रात्री बारानंतरही ध्वन‌िक्षेपक सुरू ठेवल्याने कोडोली पोलिस ठाण्याने आठ मंडळांवर कारवाई केली. मुंबई पोलिस कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेल्या आठ मंडळांना कोर्टाने एक लाख ८८ हजार रुपयांचा दंड सुनावला. या मंडळांनी आवाज मर्यादेचे पालन केले होते. यांनी आवाज मर्यादेचा भंग केला असता, तर आर्थिक दंडासह कारावासाचीही शिक्षा भोगावी लागली असती.

दीडशेहून अधिकांवर कारवाईचा बडगा

गेल्या वर्षभरात शहरात विविध सार्वजनिक कार्यक्रमांसह खासगी क्रार्यकमांमध्ये डॉल्बीचा आवाज वाढवणाऱ्या दीडशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यातील दोषींवर न्यायालयात खटले दाखल केले असून, काही दिवसातच यांना शिक्षा होऊ शकते. सर्व दोषींना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये बऱ्याच मंडळांचाही समावेश आहे.

पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची

दोषी १६ मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच भयभीत झालेल्या मंडळांनी सत्तेतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे धाव घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी पालकमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त करण्याचा पर्याय मंडळांना सूचवला आहे. पोलिसांना कारवाईसाठी पाठबळ देणारे पालकमंत्री अवघ्या सोळा मंडळांवरील कारवाई शिथील करण्यासाठी इतर प्रामाणिक मंडळांवर अन्याय करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. पालकमंत्री काय भूमिका घेतात, यावरच दोषी मंडळांवरील कारवाईचे भवितव्य अवलंबून असेल.

गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केले, त्या मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शिवाजी विद्यापीठाचेही आवाज मापनाचे अहवाल कोर्टात सादर करणार आहोत. मंडळांनी स्वतःच डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते, त्यामुळे कोणत्याही मंडळांवर मेहरबानी दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

भारतकुमार राणे, पोलिस उपाधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांची चार दिवसांत बिले जमा होणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सांगली

कारखाना चालवायचे जमत नसेल, तर तो भाड्याने चालवायला का देत नाही? असा संतप्त सवाल करीत वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी थकीत ऊस बिलासाठी १० ऑक्टोंबरचा अल्टिमेटम बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला. त्यानंतर थेट आंदोलनच, असा निर्धार त्यांनी केला. मात्र, तुमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, येत्या चार दिवसांत थकीत बिले तुमच्या खात्यावर जमा झालेली दिसतील. कारखाना अडचणीत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बिलासाठी त्रास झाला, त्याबाबत मी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागतो. यापुढे शेतकऱ्यांने वेळेवर बिले मिळतील, अशी ग्वाही अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी शांततेत पार पडली. नाव नोंदवून प्रश्न विचारणाऱ्या सर्वांच्या प्रश्नांना अध्यक्ष पाटील यांनी उत्तरे दिली.

विशाल पाटील म्हणाले, बंद पडलेला कारखाना चालवितांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, तरीही सलग सहाव्यांदा गाळप हंगाम घेण्यात आपण यशस्वी झालो आहे. हे केवळ सभासदांची आणि कामगारांची साथ असल्यामुळेच शक्य झाले आहे. २०१५-१६च्या हंगामात सुरुवातीला ऊस घालणाऱ्या सभासदांना पैसे पंधरा दिवसांत देता आले. परंतु, अखेरच्या टप्प्यात आलेल्या ऊसाचे बील देण्यासाठी सात महिन्यांचा विलंब झाला, ही वस्तूस्थिती आहे. कारखान्याच्या इतिहासात साखर चोरीचा आरोप झाला, तो ही कारण नसताना. आता तपास यंत्रणेने लेखी दिलेले आहे की, साखर कुठेही गेलेली नाही, ती शाबूत आहे. परंतु त्यासाठी गुन्हा दाखल होऊन तपास सुरू झाल्याने साखर गोदामात बंद राहिली. बँकांची खाती सील झाली. त्यामुळे उसाच्या बिलापोटी दिलेले धनादेशाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सभासदांना सवलतीच्या दरातील साखर देता आली नाही. या संकटातून आता कारखान्याची सुटका झाली आहे. चार दिवसांत बीले देण्यास सुरुवात करण्याबरोबरच सवलतीच्या दरातील साखर वाटपही सुरु होणार आहे. कारखान्याचा कारभार हातात घेतला त्यावेळी साठ कोटींचे असलेले कर्ज एकोणीस कोटींवर आणले आहे. कर्जापोटी एकदम ६२ कोटी रुपये भरावे लागल्याने सभासदांची, कामगारांची देणी थकली, ही गोष्ट खरी आहे. पण, कारखाना कर्जातून बाहेर पडल्यामुळे बँकेचा कर्जपुरवठा पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. यापुढे जसे गाळप होईल, तसे सभासदांना बील देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शिवाय ऊस उत्पादनात घट झाल्याने पुढच्या हंगामात ऊसाला दरही चांगला मिळणार आहे.

कारखान्यावर माझं घर चालत नाही : विशाल पाटील.

काही सभासदांचे आरोप आणि कारखाना चालवायला देण्याच्या मागणीला उत्तर देताना अध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, ‘कारखान्यावर माझे घर चालते, असा समज कोणी करुन घेण्याचे कारण नाही. पूर्वी होती इतकीच तीनशे कोटीची देणी आहेत. आपण आल्यापासून एक पैशाचीही त्यात वाढ झालेली नाही. मलाही कारखान्यात पैसे घालावे लागतात. केवळ देणी थकविल्याने सर्वकाही अलबेल होईल, अशी स्थिती नाही. माझेही लग्न झाले आहे, मुलगी झाली आहे, त्यामुळे आम्हालाही संसार कळायला लागला आहे. सभासदांना अर्थिक चणचण आहेच, या बाबत कोणाचे दुमत नाही. त्याचवेळी कारखाना चालवला तरच हळूहळू तो पूर्वपदावर येणार आहे. कारखाने चालवायला घेणाऱ्या खासगी कंपन्यांशीही आपण चर्चा केली आहे. अन्य कोणा सभासदाच्या मध्यस्थीने एखादी कंपनी कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवून त्यांचे हित साधणार असेल तर कारखाना चालवायला द्यायचीही आपली तयारी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरा रूपांत सजणार अंबाबाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने तयारी शिगेला पोहोचली आहे. बुधवारी कारंजा चौकात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या व्यासपीठ उभारणीला सुरुवात झाली. सरलष्कर भवन प्रवेशद्वाराबाहेर दर्शनमंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, नऊ दिवस मंदिरावर दररोज एका रंगाने होणाऱ्या रोषणाईचे प्रात्यक्षिक गुरुवारी (ता.२९) घेण्यात येणार आहे. नवरात्रकाळात देवीची अकरा विविध रूपांत पूजा बांधण्यात येणार असून, श्रीपूजकांनी या रूपातील पूजा बांधण्याची तयारी केली आहे.

दरवर्षी नवरात्रकाळात अंबाबाई मंदिरात किमान दहा लाखांच्या आसपास भाविक येतात. त्यामुळे त्यांच्या सुविधेसह मंदिरातील सुरक्षेबाबत पोलिस प्रशासन व देवस्थान समितीने विशेष दक्षता घेतली आहे. चारही प्रवेशद्वारांबाहेर नवरात्रासाठी जादा सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

रोज २० हजार लाडू

नवरात्रकाळात देवीच्या प्रसादाच्या लाडूला वाढती मागणी लक्षात घेऊन कळंबा कारागृह प्रशासनाकडून दररोज २० हजार लाडू प्रसाद पुरविण्यात यावा असे देवस्थान समितीमार्फत सांगितले आहे. त्यानुसार कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून लाडू वळण्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी लाडूप्रसादाची किती विक्री होते यानुसार सरासरी लाडू किती लागतील याचे प्रमाण ठरविले आहे. त्यामुळे नवरात्रकाळात रोज २० हजार लाडू उपलब्ध होणार आहेत.

पावसामुळे रोषणाई थांबवली

नवरात्रासाठी मंदिराच्या शिखरांसह गरुडमंडप, दीपमाळा याठिकाणी विद्युत रोषणाई केली जाते. रोषणाईची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बुधवारी रात्री मंदिर उजळणार होते. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पाऊस आल्यामुळे रोषणाईचे काम थांबविण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास मंदिर आवारात काही ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याचा धोका निदर्शनास आल्यामुळे रोषणाई गुरुवारी करण्याचा निर्णय देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आला.

नवरात्रीची देवीची रूपे

शनिवार १ ऑक्टोबर सिंहासनारूढ भक्तांच्या उपासना स्वीकारणारी देवी

रविवार २ ऑक्टोबर मयूर वाहिनी नवशक्ती देवतांमधील एक शक्ती

सोमवार ३ ऑक्टोबर शैलपुत्री नवदुर्गातील एक देवता

मंगळवार ४ ऑक्टोबर सिंहवाहिनी महाभयांचा नाश करणारी देवी

बुधवार ५ ऑक्टोबर गरुड वाहिनी कोल्लासुर दैत्यास भयभीत करणारी देवी

गुरुवार ६ ऑक्टोबर गजारूढ त्र्यंबोली भेटीसाठी जाणारी देवी

शुक्रवार ७ ऑक्टोबर महा त्रिपुरसुंदरी दशमहा विद्येतील देवी

शनिवार ८ ऑक्टोबर बाला त्रिपुरसुंदरी विद्या उपासना करणारी कुमारी रूपातील देवी

रविवार ९ ऑक्टोबर महिषासुरमर्दिनी महिषासुर दैत्याचा नाश करणारी देवी

सोमवार १० ऑक्टोबर गायत्रीदेवी शक्ती उपासना करणारी देवी

मंगळवार ११ ऑक्टोबर रथामध्ये स्थानापन्न सीमोल्लंघनासाठी निघालेली देवी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू’ ची मशिनरी अत्याधुनिक करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

शाहू साखर कारखान्याच्या मशिनरींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिस्टिलरी आणि कारखान्यात एकूण ८० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीस सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. कारखान्याच्या ३९ व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन समरजितसिंह घाटगे होते.

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘ शाहू कारखान्याने दिवंगत विक्रमसिंह राजेंच्या ध्येयधोरणाने काम करताना साखर टेंडर, निर्यात, पाऊच पॅकींग अशा तीन प्रकारे स्वत:चे स्वतंत्र मार्केटिंग युनिट निर्माण करुन साखर विकली. एफआरपीप्रमाणे दर दिला. ठिबक सिंचनसाठीचे अनुदान पहिल्या एका एकराला पाच हजारावरुन सात हजार, त्यापुढील दोन एकरांना तीन हजार आणि तिथून पुढे प्रति एकर दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. कारखान्याने मागील गळीत हंगामात १७९ दिवसांत सात लाख ६९ हजार मेट्रिक टनाचे गाळप केले. यामधून सात कोटी २१ लाख ३१ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. यातील वीज कारखान्यासाठी वापरून उर्वरित चार कोटी १८ लाख ७८ हजार युनिट महावितरणला विकली आहे. ज्यामधून २६ कोटी ६७ लाख १९ हजार इतके उत्पन्न मिळाले. कारखान्याच्या शाहू इन्फोटेक कंपनीने तर आपली सॉफ्टवेअर इतर कारखान्यांना दिलीच शिवाय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनेही त्याची मागणी केली.’

स्वागत व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी केले. विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक विजय औताडे केले. आभार युवराज पाटील यांनी मानले.

-----------------------------------------------------------

चौकट

विक्रमसिंह राजेंचे जिवंत स्मारक उभारू

दिवंगत विक्रमसिंह घाटगे विचार व स्मरण प्रेरणादायी व्हावे यासाठी स्मारक उभारावे, अशी मागणी सभासदांनी केली. त्याला उत्तर देताना समरजितसिंह घाटगे म्हणाले,‘ विक्रमसिंह राजेंनी जसे शाहूंचे जिवंत स्मारक शाहू ग्रुपच्या माध्यमातून उभा केले आहे, अगदी तसेच शेतकरी,कार्यकर्ते आणि सभासदांच्या पिढ्यानपिढ्यांचे कोटकल्याण होईल, अशा प्रकारचे जिवंत स्मारक कामाच्या माध्यमातून उभारले जाईल, अशी ग्वाही दिली.

चौकट

मराठा मोर्चाला कागलकर मोठ्या संख्येने येणार

घाटगे म्हणाले, ‘माझ्यासह सर्वजण दिवंगत विक्रमसिंह राजेंच्या पुण्याईमुळेच संचालकपदावर विराजमान झाले आहेत. राजेंनी कमावलेली संपत्ती म्हणजे दवाखान्यातून सलाईन काढून लोक मतदानासाठी आले. चालता येत नव्हते, बोलता येत नव्हते अशी जिवाभावाची माणसेही माझ्या गळ्यात पडून मला भेटून जात होती. हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले.’ ते पुढे म्हणाले,‘ ‘आम्ही कागलकर जातपात मानीत नाही. म्हणूनच १५ ऑक्टोबरचा मराठा समाजाचा मोर्चा हा आमचा घरचा कार्यक्रम आहे. शाहूंचा मान,अस्मिता आणि विचारधारेची माणसे या मोर्चामध्ये दिसली पाहीजेत. मी देखील राजर्षी शाहूंचा कागलकर म्हणूनच मोर्चात सामील होणार आहे. सगळ्यात जास्त गर्दीचा मान कागल तालुक्याचा असल्याने ती आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीचा उद्योजककार अपघातात ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी -

सातारा-कराड मार्गावरील बोरगांव गावच्या हद्दीत थांबलेल्या कंटेनरला मारुती स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील तरुण उद्योजक निर्मल जयंतीभाई पटेल (वय ३४ रा. वखारभाग) हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र सचिन डोईजड हा जखमी झाला आहे.

येथील वखार भागात राहणारे उद्योजक निर्मल पटेल हे मंगळवारी रात्री बहिणीला पुणे येथील विमानतळावर सोडण्यासाठी मारुती स्विफ्ट कारमधून गेले होते. सोबत सचिन डोईजड हा देखील होता. पण कोलकाताकडे जाणारे विमान चुकल्यामुळे ते सर्वजण कारने मुंबई येथे गेले. तेथे बहिणीला सोडून इचलकरंजीकडे परतत असताना पहाटेच्या सुमारास बोरगाव (जि. सातारा) गावाजवळ रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला मागून स्विफ्ट कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये निर्मल हे जागीच ठार झाले तर सचिन डोईजड याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच पटेल यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली. निर्मल यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व सहा महिन्याची मुलगी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएस पथकाकडूनफातलेची कसून चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

ठाणे येथील एटीएस पथक बुधवारी तपासकामासाठी इचलकरंजीत दिवसभर ठाण मांडून होते. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश बिजलानी याच्या हत्येची सुपारी घेणारा व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या स्वप्निल फातले याची यावेळी कसून चौकशी करण्यात आली.

चार दिवसांपूर्वी शहापूर येथील म्हसोबा मंदिर परिसरात संशयितरित्या फिरताना स्वप्निल फातले याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या झडतीत त्याच्याकडे दहा हजाराच्या रोकडसह देशी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझिन व आठ जिवंत काडतुसे मिळून आली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक बिजलानी याच्या खुनाची सुपारी आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनिष नागोरी याने दिल्याचे फातले याने सांगितले होते. बिजलानी हा सुरेश लोहरीया नामक बांधकाम व्यावसायिकाच्या खून प्रकरणात सध्या ठाण्यातील कारागृहात आहे.

या प्रकरणाच्या तपासकामासाठी ठाण्यातील एटीएसच्या तीन अधिकाऱ्यांचे पथक इचलकरंजीत दाखल झाले असून दिवसभर ते ठाण मांडून होते. यापूर्वी बिजलानी याच्या हत्येसाठी इचलकरंजीतील शाहूनगर परिसरातून गेलेल्या दोघा युवकांना एटीएसच्या पथकाने आठ महिन्यापूर्वी मुंबईत जेरबंद केले होते. बिजलानी याच्या हत्येचा दोन वेळा प्रयत्न तसेच त्याची सुपारी शहरातील युवकांना देण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, मुख्य संशयित मनिष नागोरी अद्याप फरारी असून शहापूर पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील मोर्चा उच्चांकी होईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

‘सकल मराठा समाज न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असून त्यासाठी इतर समाजाचा मिळत असलेला वाढता पाठींबा लक्षात घेता कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला निघणारा मराठा समाजाचा मोर्चा गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करेल,’ असे प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील यांनी केले. चौंडेश्वरी सांस्कृतिक हॉल, सरूड (ता. शाहूवाडी) येथे मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राजू सावंत, रुपेश पाटील, बाबा महाडिक प्रमुख उपस्थित होते.

आमदार पाटील पुढे म्हणाले, ‘कोपर्डी घटनेतील अत्याचार पिडीत मुलीला न्याय देण्याच्या मागणीसह इतर प्रमुख पाच मागण्यांसाठी सकल मराठा समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. समाजासाठी काहीतरी करून दाखविण्याची संधी उपलब्ध झाल्याची प्रत्येकाची भावना निर्माण झाल्याने कोणाच्याही नेतृत्वाशिवाय आणि स्वयंशिस्तीने निघणाऱ्या या मूक मोर्चाची सरकारला दखल घ्यावीच लागेल. डोंगराळ आणि दुर्गम परिस्थिती लक्षात घेवून शाहूवाडीतील जिल्हा परिषदेचे चार, पंचायत समितीचे पाच तसेच पन्हाळा पंचायत समितीतील एक अशा दहा सदस्यांनी आपआपल्या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मराठा मोर्चाबाबत प्रबोधन करावे. हा कोणत्या एका पक्षाचा कार्यक्रम नसल्याने कोणाच्याही निमंत्रणाची वाट न पाहता कोल्हापूरच्या मूक मोर्चात सहभाग नोंदवा.’

राजू सावंत म्हणाले, ‘आरक्षणाअभावी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहिलेली मराठा समाजाची मुले गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे. जनआंदोलन, जनरेट्याची गरज ओळखून रस्त्यावर उतरलेला हा सकल मराठा समाज शोषित असला तरी सुसंस्कारित व जाणकार असल्याचे आजवर निघालेल्या लाखोंच्या मोर्चाने सिद्ध केले आहे.’ महामोर्चाचे वाढते स्वरूप पाहता १५ ऑक्टोबर रोजी ‘कोल्हापूरला नो व्हेईकल झोन’ घोषित करणाऱ्या पोलिस प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन सावंत केले.

रुपेश पाटील यांनी मोर्चासंबंधी आचारसंहिता स्पष्ट करताना मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी स्वयंशिस्त आणि स्वच्छता यांचे काटेकोर पालन करणे तसेच सोशल मिडीयाद्वारे आक्षेपार्ह मजकूर ‘फॉरवर्ड’ न करण्याची सूचना केली. शिवाय या मोर्चासाठी जिल्ह्यातून किमान दहा हजार स्वयंसेवकांची गरज असून त्यासाठी इच्छुकांनी संयोजकांकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन केले. या स्वयंसेवकांना आठवड्याभरात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही रुपेश पाटील यांनी सांगितले.

यावेळी युवराज पाटील, रमेश चांदणे, हंबीरराव पाटील, नामदेव पाटील-सावेकर, अमर पाटील, सर्जेराव पाटील-माणकर, जालिंदर पाटील, तानाजी चौगुले, निवास जगताप, दत्ता राणे, विजय पाटील, दिलीप पाटील आदींसह शाहूवाडी-पन्हाळ्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

मुस्लिम, ओबीसी समाजाचा पाठिंबा

दरम्यान, बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मराठा मोर्चाच्या नियोजनासंबंधी परिसरातील कार्यकर्त्यांची बैठक झाली. यामध्ये एका व्यापारी कार्यकर्त्याने दहा हजार प्रसिद्धी स्टीकर्स, पत्रके तर काहींनी पाचशे टी शर्ट्स, सहभागी मुलींसाठी फेटे पुरविणार असल्याचे सांगितले. १ ऑक्टोबर रोजी बांबवडे येथे मराठा मूक मोर्चा संपर्क कार्यालय सुरु होत असल्याची माहितीही यावेळी संयोजकांकडून देण्यात आली. ९ ऑक्टोबरनंतर मोर्चा प्रबोधनासाठी तालुक्याच्या मुख्य भागातून रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी अमर पाटील, सुनील पाटील, के. एन. लाड, अजित काटकर, उदय पाटील, अमर पाटील, अनिल पाटील, पैलवान पोपट दळवी आदींसह परिसरातील ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तर मलकापूर येथे झालेल्या बैठकीत मुस्लिम व ओबीसी समाजाने मराठा मोर्चाला पाठींबा व्यक्त केला. कोल्हापूर येथील नियोजित मोर्चासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींचा सक्रीय सहभाग राहणार असल्याचे सांगितले. येथील बैठकीला भाई भारत पाटील, राजू प्रभावळकर, उपनगराध्यक्ष सुरेश भोगटे, प्रकाश पाटील, रमेश पडवळ, मानसिंग पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधी मैदान की तपोवन ?

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने १५ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिकाणाबाबत संयोजन समितीची रविवारी (ता. २ ऑक्टोबर) जिल्हा पोलिस अधिक्षकांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चासाठी गांधी मैदान की तपोवन मैदान या दोनपैकी कोणते ठिकाण निवडायचे, तसेच मोर्चाचा मार्ग याबाबत निर्णय होईल. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या, वाहनांची संख्या, पार्किंगच्या ठिकाणांचा विचार करून मोर्चाचे मुख्य ठिकाण व मार्ग निश्चित करण्यात येणार आहे. संयोजन समितीच्या कोअर कमिटीची बुधवारी सायंकाळी शिवाजी मंदिरमध्ये बैठक झाली. मोर्चासाठी विविध समित्या नेमण्यासाठी गुरुवारी (ता. २९ ऑक्टोबर) सकाळी अकरा वाजता पुन्हा बैठक होईल.

मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात गांधी मैदानमधून करण्याचे नियोजन संयोजन समितीने केले आहे. आतापर्यंतच्या मोर्चाचे अनुभव पाहता शहराच्या चारही बाजूने प्रचंड संख्येने येणाऱ्या नागरिकांना गांधी मैदानपर्यंत पोहोचणे कसे शक्य होईल याचा विचार केला जात आहे. त्यासाठी पर्याय म्हणून तपोवन मैदान निवडण्याचा विचार सुरू झाला आहे. जिल्ह्यातील पश्चिमेकडील व दक्षिणेकडील भागातील नागरिकांना तेथे एकत्र जमण्यास सोपे होईल. मात्र पूर्व व उत्तर भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी शहर ओलांडून तपोवन मैदानावर येणे, मोर्चा संपल्यानंतर परत तपोवन मैदानाकडे जाणे शक्य होईल का? याचा विचार केला जात आहे. याऐवजी शहरातील विविध भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी येण्यापेक्षा त्या-त्या ठिकाणी थांबून मोर्चातील मार्गामध्ये सहभागी कसे होता येईल याची चाचपणी सुरू आहे. मोर्चाचा मार्ग कोणता ठेवायचा याचा निर्णय २ ऑक्टोबरला जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासोबतच्या बैठकीत होणार आहे.

मोर्चाची पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्यात एकत्र मेळावा घेतला जाणार आहे. तेथून मोर्चाच्या नियोजनाला आणखी गती येईल. गुरुवारी (२९ सप्टेंबर) शिवाजी मंदिरमध्ये पुन्हा बैठक होईल. त्यात स्वच्छता, वाहतूक, अॅम्ब्युलन्स, पाणी वाटप व स्वयंसेवकांची समिती नेमण्यात येणार आहे. तसेच हेल्पलाइनही सुरू करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिरमधील कार्यालयात सर्व बैठक होतील. त्यासाठी संगणक यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचे काम दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केएमटी सोसायटीच्या सभेत गोंधळ

$
0
0

 म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी कामगार सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केएमटीकडील थकीत रक्कम, लांभाश वाटप आणि ठेव व्याजवरून सत्तारूढ गट आणि विरोधकांत प्रचंड वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. गोंधळ वाढत गेल्याने अर्ध्या तासात सभा गुंडाळण्यात आली. सोसायटीचे अध्यक्ष मनोहर साळोखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

सत्तारूढ संचालक मंडळाने सभासदांच्या मागणीबाबत कोणतीही चर्चा न करता अजेंडा मंजूर, मंजूर म्हणत सभा आटोपली. सभेचे कामकाज पूर्ण होण्याअगोदरच सर्व संचालक संस्थेला कुलूप लावून बाहेर पडल्याचा आरोप विरोधी गटांनी केला. संचालक विश्वनाथ चौगुले, अनिल बोरचाटे यांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. दरम्यान सोसायटीच्या टेंबे रोड येथील कार्यालयात दुपारी तीन वाजता सभेला सुरूवात झाली. अध्यक्ष मनोहर साळोखे यांनी लाभांश वाटप, भेटवस्तू वाटपाची माहिती दिली. नऊ टक्के लाभांश देण्याचा मनोदय असल्याचे सांगितले. संचालक तानाजी मेंगाणे यांनी अहवाल वाचन केले. व्यासपीठावर संचालक मोहन निकम, विजय भोसले, राजेंद्र निगवेकर,आर.टी.वडर, एच.डी.लोहकरे, निलेश डोईफोडे, पूनम चव्हाण, शैनजा मोमीन आदी उपस्थित होते. अहवाल वाचन सुरू असतानाच गोंधळाला सुरूवात झाली.

सत्तारूढ गटाकडून सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देत असतानाच काही जणांनी गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. सभेत अनर्थ घडायला नको म्हणून सभा आटोपती घेतल्याचे अध्यक्ष साळोखे यांनी सांगिते.

समांतर सभेत सभासदांना पूर्वीप्रमाणे दिपावली भेट वस्तू, ११ टक्के प्रमाणे लाभांश वाटप आणि नऊ टक्के प्रमाणे व्याज मिळाले पाहिजे अशी मागणी केली. समांतर सभेला राजेश ठोंबरे, प्रमोद पाटील, ईर्शाद नायकवडी, निजाम मुल्लाणी, जितेंद्र संकपाळ, विनायक मेंगाणे, मुरलीधर कांबळे, आनंदा आडके आदी उपस्थित होते. सत्तारूढ संचालकांच्या कृतीबाबत जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार करणार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणलोट घोटाळा : ५५ अधिकाऱ्यांवर ठपका

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर ः ‘पाणलोट’ योजनेतून झालेल्या कामांची जागेवर जावून पाहणी व तपासणी न करणे, नियमबाह्य कामांना मंजुरी, चुकीच्या ठिकाणी निकृष्ट बंधारे घेऊ नये, याकडे लक्ष न देणे असे ठपके असलेल्या कृषी विभागाच्या ५५ अधिकारी, २० गाव समिती सचिवांची चौकशी झाली आहे. मात्र वर्षानंतरही ते ठोस कारवाईपासून मोकाट आहेत. चौकशी अहवाल माध्यमांसह पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या लोकप्रतिनिधींपासून दडवला. अहवाल दडपण्याचा नियोजनबद्ध कट कृषी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाल्याचेही उघड झाले आहे.

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेतून (वसुंधरा पाणलोट) प्रत्येक थेंब माथा ते पायथा अडवून जिरवण्यासाठी लहान, मोठे बंधारे बांधणे, गावातील शेतकरी, बारा बलुतेदारांना स्वंयपूर्ण करण्याचा मुख्य उद्देश आहे. परंतु, गाव समित्या आणि ठेकेदारांना हाताशी धरून अनेक कृषी अधिकाऱ्यांनी पैसे मुरवले. यामुळेच ‘पाणलोट’च्या कामांत सुमारे ३० कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विधानसभेत १८ जुलै २०१५ रोजी झाली.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली. देशमुख यांनी समिती सदस्यांना घेऊन अनेक गावांना भेट देऊन कामाची पाहणी केली, अहवाल तयार केला.

अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पाणलोट कक्ष तथा ‌माहिती केंद्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे दिला. अहवाल देऊन एक वर्ष पूर्ण झाले तरीही ठपका असलेले अधिकारी गंभीर कारवाईपासून दूरच आहेत. केवळ जुजबी नोटीस दिल्या आहेत. विधानसभेत या योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा ज्यांनी पोहचवला तेही दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा करत नाहीत, यामागचे गोडबंगाल काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा करणाऱ्यांना दोषी अधिकारी थेट, भेट घेऊन अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्याची चर्चा जाहीरपणे होत आहे.

कोण आहेत ते?

चौकशी झालेले कृषी विभागातील अधिकारी असे – तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदेवे, आर. एस. रानगे, आर. आय. रूपनर, राजमाने, एस. जी. निकम, पी. पी. पाटील, डोईफोडे, एन. एम. पाटील, डी. बी. पाटील, मंडल कृषी अधिकारी डी. वाय. कांबळे, एस. एम. नांगरे, बी. व्ही. पाटील, डी. इ. कांबळे, आर. के. उरणे, सी. डी. सरदेसाई, जी. एस. गोरे, डी. ए. गरगडे, एस. बी. बिरांजे, आर. पी. कामत, एन. एम. पाटील, एम. जी. कोरे, कृषी पर्यवेक्षक डी. व्ही. भांडवले, एस. व्ही. सानप, बी. ए. शिंदे, बी. व्ही. पाटील, एम. ए. आगा, ए. के. पाटील, सी. डी. सरदेसाई, डी. जे. कातकर, आर. व्ही. पाटील, एम. आर. गावडे, एम. एम. लाड, डी. एम. बरकाळे, डी. एम. बरकाळे, एल. एन. चौगुले, कृषी सहायक आर. बी. पाटील, पी. एम. खोपाडे, एस. एस. गावडे, आर. बी. पाटील, आर. ए. होनगेकर, एम. डी. पाटील, एस. बी. पोवार, एस. एस. शेटे, एस. पी. कुंभार, बी. आर. जाधव, एम. ए. गायकवाड, एस. एम. डवरी, डी. जी. कुंभार, एस. आर. नाईक, एम. टी. नलवडे, बी. आर. पाटील, एम. टी. नलवडे, ए. एम. लटके, एल. बी. होसुरे, के. जी. तामकर.


आठ तालुक्यांतील अधिकारी

चौकशी झालेल्या सर्व अधिकाऱ्यांकडे योजना अंमलबजावणी कालावधीत भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, करवीर या तालुक्यातील पाणलोट योजनेची कामे झालेल्या गावांचा कार्यभार होता. बदली न झालेल्या अधिकाऱ्यांकडे अजूनही कार्यभार आहे.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर कोणतंही पद स्वीकारेन!: चंद्रकांत पाटील

$
0
0

 म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू नाहीत. भाजपची तशी संस्कृतीही नाही. पक्षात मी कोरे पाकिट आहे. वरिष्ठ जो पत्ता टाकतील तिथे जाऊ. गरज पडल्यास मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहायकदेखील होईन’, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री पादाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरून विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेलाही उत आला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही याबाबत मुंबईतील एका कार्यक्रमात जाहीर वक्तव्य केल्याने फेरबदलाच्या चर्चेला गती मिळाली होती. मुख्यमंत्री पदासाठी खांदेपालट झाल्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची धुरा येणार, अशी अटकळ सोशल मीडियात बांधली जात आहे. मराठा आरक्षण मोर्चासह आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे संदर्भही याला जोडले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांनी केला असला तरी, तो तितकासा यशस्वी झालेला नाही. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनाच याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनीही सावध प्रतिक्रिया दिली.

‘राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली अजिबात सुरू नाहीत. मी यापूर्वीही मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेचे खंडन केले आहे. भाजपमध्ये तशी संस्कृतीही नाही. वेळप्रसंगी मी मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यकदेखील होण्यास तयार आहे.’ पक्षाने जबाबदारी दिल्यास स्वीकारणार का? असा प्रश्न विचारताच त्यांनी, ‘पक्षात मी कोरे पाकीट आहे. वरिष्ठ जो पत्ता टाकतील तिथे जाऊ,’ अशी सा‍वध प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाच्या क्रांती मोर्चांबाबत बोलताना त्यांनी, मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असून, न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हद्दवाढ व्हायची तेव्हा होईल. तत्पूर्वी प्राधिकरण हा हद्दवाढीचा पहिला टप्पा आहे, असे मानायला हरकत नाही. याबातच अंतिम निर्णय लवकरच सर्वसहमतीने जाहीर होईल.’

डाळींचे दर नियंत्रणात ठेवणार

गेल्या वर्षभरात डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यावर राज्य सरकारने विशेष भर दिला आहे. आगामी सणासुदीच्या तोंडावर दर वाढू नयेत यासाठी सरकार दक्षता घेत आहे. दर मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट मिटिंगमध्येही आ‍वर्जून या मुद्यावर चर्चा होते. गरज पडल्यास रेशनवर हरभरा डाळ देण्याचा सरकार विचार करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात सतर्कतेचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारताने ताबारेषेच्या पलिकडे जाऊन केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातही पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सतर्कतेचा इशारा दिला असून, गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. शीघ्र कृती दलाची एक तुकडी शुक्रवारी शहरात दाखल होणार आहे, त्याचबरोबर पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.

भारतीय सैन्य दलाने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अड्डा उद‍्‍ध्वस्त केल्यानंतर देशांतर्गत सुरक्षेत कोठेही उणीव राहू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली आहे. कोल्हापूर शहरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिकची दक्षता घेतली जात आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे, त्याचबरोबर शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांचीही तपासणी सुरू आहे. शहरातील लॉजवरही पोलिसांचे लक्ष आहे. गोपनीय शाखा, दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांना घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ केली असून, शीघ्र कृती दलाचे ९० जवानांचे एक पथक शहरात दाखल होणार आहे. अतिरिक्त ६०० होमगार्डही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.

शनिवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. या काळात शहरात राज्यासह परराज्यातूनही मोठ्या संखेने भाविक येतात. अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची गर्दी असते. या गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबाबाई मंदिर आणि परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव काळातील सुरक्षेच्या नियोजनासाठी गुरूवारी(ता. २९) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शहर पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना राणे यांनी उपस्थित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केली.

शहरातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाल्या आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील घडामोडी आणि नवरात्रोत्सव यामुळे पोलिस प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांध्यपर्वातील हिरवाई

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet:@anuradhakadamMt

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फुलेवाडी नाका ओलांडून डाव्या बाजुला वळण घेतल्यानंतर काही अंतरावर मातोश्री वृद्धाश्रमचा पाच एकरचा परिसर दिसतो. हिरव्यागार झाडांनी वेढलेल्या या परिसरात पाऊल टाकतानाच मनात येतं की आयुष्याच्या सायंकाळी नातवंडाच्या गोकुळात रमण्यात समाधान मानणारी ही ज्येष्ठ पाऊले वृद्धाश्रमाकडे वळली असतील तेव्हा त्यांच्या मनात वेदना झाल्या असतील का? याच विचाराने आश्रमातील ज्येष्ठांना बोलतं केल्यानंतर मात्र आपल्या मनातील समज दूर झाला. ‘या वयात काय हवं असतं?’ असा प्रतिप्रश्न करत ते जेव्हा म्हणाले, ‘निवृत्तीच्या टप्प्यावर आयुष्याची इतकी सुखद सायंकाळ वृद्धाश्रमात अनुभवता येते. इथे आमचे सगळे लाड पुरवणारी माणुसकी आहे. त्यामुळे जीवनाच्या क्षितीजरेषेवर समवयस्कांच्या गोकुळात राहण्याचा आनंद देणारे वृद्धाश्रम आमच्यासाठी मात्र प्रेमाश्रम आहे,’ अशा शब्दात मातोश्री आश्रमातील ज्येष्ठांनी भावना व्यक्त केल्या.

एक ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औ​चित्याने मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी गप्पा मारल्या तेव्हा ‘मस्त चाललय आमचं’ असाचा काहींसा सुखद आणि आश्वासन भाव आजीआजोबांच्या बोलण्यात होता.

वीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मातोश्री आश्रमात आलेल्या पहिल्या आजी म्हणजे प्रमिला कुलकर्णी. आज त्या ९३ वर्षाच्या आहेत. मुलांची, सुनांची, नातवंडांची आठवण येते का? या प्रश्नावर त्या म्हणतात, ‘आता वीस वर्षानंतर इथल्या कानाकोपऱ्याशी इतकं घट्ट नातं तयार झाल आहे की इथून कुठे जावसं वाटत नाही. त्यांना आठवण आली तर येतात. देवदासी असलेल्या शालाबाई सध्या आश्रमात राहतात. त्यांना साधना झाडबुके यांच्या संवेदना यासंस्थेतर्फे देवदासीतून मुक्त करण्यात आल्यानंतर आश्रमात ठेवले. जे आजीआजोबा थकले आहेत त्यांचे कपडे धुणे, त्यांना मदत करणे अशी काम करण्यात शालाबाईंना मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. ऐंशी वर्षांचे नंदकुमार आणि ७२ वर्षांच्या माधुरी हे कुलकर्णी दांपत्य सहा महिन्यांपूर्वीच आश्रमात आले. मुलगा सून नोकरीला, नातू त्याच्या विश्वात मग्न. सगळं असूनही घरात एकटेपणाचे काहूर. माधुरीआजी सांगतात, ‘साठीपर्यंत स्वयंपाक, घरकाम केलं. आता नको वाटतं. मुलगा आणि सुनेकडे सगळं सोपवून आश्रमात आलो. आठ दिवस राहून बघा, आवडलं नाही तर घरी जा,’ असं आश्रमाच्या संचालिकांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी आमचं ठरलं की, ‘आता आयुष्य संपेपर्यंत हेच आपलं घर.’

मुंबईत ऐसपैस बंगला, पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यामुळे पाच आकडी पेन्शन असलेलं शांत निवृत्त जीवन असं असूनही आनंद खाके वृद्धाश्रमात आनंदाने राहत आहेत. आश्रमाच्या आवारातील एक भकास कोपरा त्यांनी आपल्या बागकामातून फुलवला आहे. शिवाजी पेठेत घरदार असलेले अरुण लेले हेदेखील आश्रमात राहतात. आपल्या वार्धक्याचा नव्या पिढीला त्रास नको म्हणून स्वेच्छेने ते इथे आलेत. शोभाआजी, कमलआजी, वत्सला आजी, निवृत्त प्राध्यापक विजय बागडे यांच्यासारखे ५२ आजीआजोबा अगदी गुण्यागोविंदाने आश्रमात नांदत आहेत.

कुणी खरच इच्छेने तर कुणी मुलांनी दुर्लक्ष केल्यामुळे आश्रमात आले आहेत. मात्र कौटुंबिक चर्चा करायच्या नाहीत हा इथला नियम सगळे आवर्जून पाळतात. ज्यांचे हातपाय चालतात ते स्वत:ची कामं करतात. सणवार साजरे होतात. वाढदिवसाचे औंक्षण होते. आजी कधीकधी आश्रमाच्या स्वयंपाकघरात रमतात. इतकेच नव्हे तर रोजच्या जेवण्याच्या वेळापत्रकाला छेद देत कधी कधी आजीआजोबांच्या आवडीचा पदार्थही ताटात येतो.

हवं ते करण्याचा आनंद वेगळाच

आयुष्याची संध्याकाळ मुलासुनांच्या ताब्यात गेल्यामुळे अनेकदा मनाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यावर बंधने येतात. मात्र असे बंधनमुक्त आयुष्य आश्रमात जगायला मिळते. त्यामुळे वृद्धाश्रमातच खरं तर आमचं मन प्रसन्न राहतं. केवळ समाजाला दाखवण्यासाठी मुले सुनांसोबत राहून आयुष्याची संध्याकाळ कंटाळवाणी करण्यापेक्षा आश्रमात मुक्तपणे राहण्यात आम्हाला समाधान आहे हाच समानधागा इथल्या आजीआजोबांना जोडून ठेवत आहे.

संस्कारवर्गातील मुलांमध्ये नातवंडांचे सुख

आश्रमातील आजीआजोबांचे मन मुलं आणि सुनांमधून बाहेर पडले असले तरी नातवंडाभोवती अनेकदा त्यांचे मन फेर धरते. त्यांची हीच मानसिकता ओळखून मातोश्री वृद्धाश्रमाच्या संचालिका वैशाली राजशेखर, उपाध्यक्ष सूर्यप्रभा चिटणीस, समन्वयक पूजा पाटील यांनी आश्रमात लहान मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला आहे. चिमुकल्यांच्या सहवासात आजीआजोबांना नातवंडांना भेटल्याचा आनंद मिळावा यासाठी हा संकल्प राबवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कॉटलंड अहवालानंतर कारवाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या प्रकरणात आम्हाला अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले असून, कोठडीत असलेल्या आरोपींच्या चौकशीतूनही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे आम्हाला आता केवळ स्कॉटलंड यार्डकडून येणाऱ्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असून तो येताच आम्ही कारवाईची पुढची पावले उचलू, अशी हमी महाराष्ट्र एसआयटीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सीबीआयनेही अशीच हमी देत स्कॉटलंडच्या अहवालाच्या आधारे त्वरित पुढची कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने हा अहवाल मिळवण्यासाठी अंतिमतः सहा आठवड्यांची मुदत सीबीआयला दिली.

कर्नाटकमधील साहित्यिक एम. एम. कलबुर्गी व दाभोलकर-पानसरे हत्यांच्या प्रकारात साम्य असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आणि प्रयोगशाळांचे अहवाल वेगवेगळे आल्यानंतर सीबीआयने याची पडताळणी करण्यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलिसांची मदत घेत फॉरेन्सिक अहवालासाठी विनंती केली. मात्र, अनेक महिने होऊनही सीबीआयला हा अहवाल मिळवता आलेला नाही. त्यामुळे गुरुवारच्या सुनावणीत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने आणखी किती दिवस घेणार? आणि आम्ही किती दिवस तपासावर देखरेख करत बसायचे? अशी विचारणा दोन्ही तपास यंत्रणांना केली. ‘तुम्हाला मे महिन्यापासून वेळच देत आलो आहोत. आता लोकांची अशी भावना होऊ लागली आहे की, तुम्हाला यात काही करायचेच नाही, आरोपींचा शोध घ्यायचाच नाही आणि तुम्ही कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहेत. तुमच्याकडे अनेक संशयितांची माहिती आहे तर तुम्ही त्यांना ताब्यात का घेत नाही? ते दुसऱ्या देशांत पळालेले असतील तर त्या देशांच्या यंत्रणांची मदत का घेत नाही? असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. तेव्हा आता केवळ स्कॉटलंडच्या अहवालाची प्रतीक्षा असून त्यांच्याकडून संदेश मिळताच आमचा अधिकारी तत्काळ इंग्लंडमध्ये अहवाल घेण्यासाठी जाईल, असे सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. तर आम्हाला खूप महत्त्वाचे पुरावे व धागेदोरे मिळाले असून स्कॉटलंडचा अहवाल मिळताच पुढची पावले उचलू, अशी हमी एसआयटीतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी खंडपीठाला दिली.

दाभोलकर प्रकरणात अटकेत असलेले डॉ. वीरेंद्र तावडे व गोवा बॉम्बस्फोटातील आरोपी सारंग अकोलकर यांचे एकत्रित फोटो, रेखाचित्रे आदी तपशील देऊनही सीबीआयने त्याबाबत काही केलेले नाही, असे म्हणणे दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांतर्फे अॅड. अभय नेवगी यांनी मांडले. त्यामुळे फॉरेन्सिक अहवाल मिळवण्यासाठी आता सहा आठवड्यांपेक्षा आणखी कालावधी देणार नाही, असे स्पष्ट करतानाच कुटुंबीयांकडील माहितीही तपास यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. तसेच पुढच्या सुनावणीच्या वेळी तुमची ठोस कृती दाखवा, असे सांगतानाच दोन्ही यंत्रणा संयुक्त प्रयत्न करून तपासाला अंतिम रूप देतील, अशी अपेक्षाही खंडपीठाने आदेशात व्यक्त केली. न्यायालयाने याविषयीची सुनावणी आता २३ नोव्हेंबरला ठेवली आहे.

एसआयटीला झापले

सीबीआयचे अधिकारी शिस्त पाळत आहेत, मात्र एसआयटीचे पोलिस अधिकारी अतिउत्साहीपणा दाखवत आहेत. या महत्त्वाच्या तपासातील माहिती प्रसारमाध्यमांना पुरवत आहेत. त्याची काय गरज आहे? त्यांच्या अशा वागण्यामुळे तपासावर आणि या गंभीर खाटल्यावर किती गंभीर परिणाम होतात, याची कल्पना आहे का? बातम्यांमुळे संशयित आरोपी सावध होतात. तुम्ही त्यांना आणखी शहाणे करत आहात. आम्ही आता ती मोटारसायकल शोधणार आहोत, वगैरे सांगितले तर एका मिनिटात त्या मोटारसायकलचा चेहरामोहरा बदलवून टाकला जाईल. शिवाय अधिकारी प्रसारमाध्यमांमध्ये काहीही बोलले तर तेसुद्धा खटल्याच्यावेळी तपासले जाते. अधिकारी या साऱ्या गंभीर गोष्टी लक्षात कसे घेत नाहीत, असे नमूद करतानाच यापुढे तपासातील एक शब्दही प्रसारमाध्यमांना सांगायचा नाही, असा सज्जड दम खंडपीठाने तपास यंत्रणांना दिला. तसेच तपासावर आम्ही देखरेख करत असल्याने सर्व संबंधितांनी तपासातील माहिती उघड करायची नाही, याची दक्षता घ्यावी आणि कनिष्ठ न्यायालयांनीही सुनावणीच्या वेळी महत्त्वाचा तपशील उघड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांचा संगनमताने दरोडा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर: एका‌त्म‌िक पाणलोट विकास योजनेअंतरर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने डल्ला मारल्याचे चौकशी अहवालातून समोर येत आहे. या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी जिल्हा कार्यालयाकडूनच ठेकेदाराची नियुक्ती केली आहे, केलेली कामे चुकीच्या ठिकाणी झाली आहेत, माती व सिमेंट बंधारा कामात निम्मे पैसे खर्च केले आहेत, उर्वरित निधीवर डल्ला मारला आहे, हे सर्व उघड होऊ नये म्हणून मोजमाप पुस्तिका, कामांचा आराखडा, मंजुरी पत्रकेच गायब केली आहेत, असे चौकशी अहवालातून समोर आल्याने अधिका ऱ्यांनी संगनमताने निधीवर दरोडा टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

एकात्म‌िक पाणलोट योजनेतून जिल्ह्यात एकूण झालेल्या कामांपैकी तक्रारी असलेल्या फक्त २३ गावांतील कामांची चौकशी झाली आहे. त्यावरून तयार केलेल्या चौकशी अहवालाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ठपका असलेल्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा कारभार समोर आला आहे. समितीमधील सदस्यांकरवी राजकीय, आर्थिक वजन वापरून दोषींवर कडक कारवाई होण्याऐवजी ते बचावल्याची सध्याची परिस्थिती आहे.

‘पाणलोट’मधून सन २००९ पासून २०१५ अखेपर्यंत ४६५ गावांत कामे झाली आहेत. गाव सभेत सूचवलेली कामे पाणलोट समितीनी निवडायची, पात्र कामांना प्रशासकीय मंजूरी, नियंत्रण, दर्जा यावर संबंधीत गावच्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, प्रकल्प कार्यान्वीत यंत्रणा तथा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.

एकूण मंजूरी निधीपैकी हेक्टरी १२ हजार रुपये जमिनीवरील उपचारासाठी खर्च करणे अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम गावात सकारात्मक वातावरण निर्मिती, उपजिविका निर्मिती, प्रशासनावरील खर्च, क्षमता बांधणी यावर नियमाप्रमाणे खर्च करणे बंधनकारक आहे. अनेक गावांत हे निकष डावलेले आहे. कामे झाल्याची कागदे रंगवून पाणलोट समितीचे सचिव, सदस्यांच्या सह्या घेऊन पैसे उचलले आहेत.

अहवालानुसार लाखो रुपयांचा निधी विनानिविदा जिल्हा स्तरावरून खर्च केला आहे. त्याचा सरळ अर्थ डल्ला मारलेल्यातील वाटणी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत आल्याचे समोर येते. ढपला मारण्याची, नियमबाह्य कामे केल्याचा सर्वाधिक आरोप तत्कालिन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांच्यावर अनेक शेतकरी, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी केला होता. चौकशी अहवालात नमूद केलेल्या त्रुटींवरून आरोपात तथ्य असल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच ५५ अधिकारी आणि २० पाणलोट सचिवांवर ठपका ठेवून चौकशी केली आहे. केवळ जुजबी नोटीस देऊन प्रकरण गुंडाळण्याची तयारी केली आहे. विधानसभेपर्यंत या योजनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा ज्यांनी पोहचवले तेही दोषींवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत, यामागचे गौंडबंगला काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (क्रमशः)


चौकशी झालेली गावे (तालुकानिहाय)

भुदरगड- फये, महाळवाडी

पन्हाळा- गावडी, घोटवडे

शाहूवाडी- मरळे, गेळवडे.

चंदगड- जंगमहट्टी, राजगोळी खुर्द.

आजरा- किटवडे, हजगोळी ब्रद्रुक.

हातकणंगले- सावर्डे, नरंदे.

गडहिंग्लज- महागाव, येणेचवंडी, हसूरवाडी, हेब्बाळ जलद्याळ, तारेवाडी.

राधानगरी- ओलवण, राशिवडे, रामणवाडी, म्हासुर्ली.

करवीर- बोळोली.

वर्षनिहाय सरकारकडून आलेला निधी आणि गावांची संख्या अशी –

वर्षे आलेला निधी सामावेश गावांची संख्या

सन २००९-१० ६५ कोटी ९३ लाख १०५

२०१०-११ ५७ कोटी ८७ लाख ५५

२०११-१२ ८७ कोटी ६ लाख १७८

२०१२-१३ १४ कोटी ६ लाख १९

२०१३-१४ ३५ कोटी ३५ लाख ५३

२०१४-१५ ४२ कोटी ८२ लाख ५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोर्चात कागलकर मोठ्या संख्येने येणार

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,कागल

‘पंधरा ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात सकल मराठा समाजाचा क्रांती मूक मोर्चा निघत आहे. राज्यभरातूनही लाखोंच्या संख्येत लोक रस्त्यावर येत आहेत. कोल्हापूरचा मोर्चाही लाखोंच्या संख्येतच निघणार आहे. या मोर्चात उपस्थितीमध्ये कागल तालुका नंबर वनवर असेल,’ अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

येथील शाहू संस्कृतिक हॉलमध्ये मराठा क्रांती मोर्चा निमित्त आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुश्रीफ बोलत होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी प्रथमच एकत्र येत आहे. हा मोर्चा कोणत्याही जातीधर्माविरूद्ध नाही. तर तो मराठी माणसाच्या आस्मितेसाठी आहे. मराठ्यांची स्थिती आज बिकट बनत चालली आहे. त्यांना नोकरीत स्थान नाही. शिक्षणातही त्यांची कुचंबणा होत आहे. सर्वच स्तरावर त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मराठा आरक्षण हक्काचे असून भविष्यात ते त्यांना उपयुक्त ठरणारे आहे. सर्वच स्तरातून या मोर्चास पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आता चर्चेचे गुऱ्हाळ न घालता सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा तत्काळ निर्णय घ्यावा. या मोर्चास तालुक्यातील सर्व नेत्यांचा पाठींबा आहे. कागल ही शाहूंची नगरी आहे आणि कागल हे कोल्हापूर जवळ आहे. त्यामुळे कागल तालुक्यातून प्रचंड संख्येने लोक या मोर्चात उपस्थित राहतील.’

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, ‘ममराठा समाजाची शिक्षणात पिछेहाट झाली आहे. समाज जमीनमुक्त होत आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी तो लढतो आहे. या लढ्यास इतर समाजानेही पाठींबा दिला आहे. राज्यातील हे मोर्चे संयमी असून मराठा समाज राष्ट्रीयत्व जोपासत आहे. आरक्षणाबाबत सरकारने गरज भासल्यास कायद्यात बदल करावा.’

सुनील पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरातून या मोर्चास मुस्लिम समाजाने पाठींबा दिला आहे. प्रत्येकाला मराठा हा आपला वाटू लागला आहे. ९८ टक्के लोक राज्यभरातून रस्त्यावर येत आहेत. समाजातील जागृतीचे हे ज्वलंत उदाहरण आहे. ’

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत . कोपेर्डी येथील गुन्हेगारांना फाशी देणे, मराठ्यांना आरक्षण या मागण्या तत्काळ मंजूर झाल्या पाहिजेत. सर्वांना बरोबर घेऊनच आता कोल्हापूरची ताकद दाखवूया. या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.’ यावेळी दिलीप देसाई, भैय्या माने, प्रकाश गाडेकर,संजय हेगडे, किरण मुळीक, सदाशिव पिष्टे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय दलित महासंघाचे बळवंतराव माने यांनी मोर्चास पाठींबा व्यक्त केला. प्रकाश गाडेकर यांनी १५ ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या मोर्चासाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली.

स्वागत व प्रास्ताविक नितीन दिंडे यांनी केले. बैठकीस युवराज पाटील, गणपतराव फराकटे, शिवानंद माळी, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, आशाकाकी माने, रंजना सणगर, आशा जगदाळे, दिनकर कोतेकर आदींसह कागल नगरपालिकेचे नगरसेवक, विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर तलाठ्यासएक वर्ष कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तक्रारदाराने घेतलेली कर्जाची रक्कम जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी २५०० रुपयांची लाच स्वीकारणारा तलाठी सुभाष गजानन कोळी (भादोले, ता. हातकणंगले) याला न्यायाधीश के. डी. बोचे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नारायण मारुती पाटील (रा. भादोले, ता. हातकणंगले) यांनी कोळी याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर झालेल्या कारवाईत तलाठी कोळी याला अटक झाली होती.

तक्रारदार नारायण पाटील यांनी बँक ऑफ इंडियाकडून शेत जमिनीवर २० लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची नोंद सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी सुभाष कोळी याने तक्रारदाराकडे २५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारावाई करून कोळी याला अटक केली होती. तक्कालीन पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील न्यायालयात आरोपपत्र दाखल करून कोळी याच्या विरोधातील पुरावे सादर केले. न्यायाधीश के. डी. बोचे यांनी पुरावे ग्राह्य धरून कोळी यास एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच महिने साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. दिलीप मंगसुळे आणि अॅड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५ हजारांची रोकड लंपास

$
0
0

इचलकरंजी

शहरात गुरूवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी ७५,००० रुपयांच्या रोख रक्कमेसह पर्स लंपास केली. एक घटना मॉडर्न हायस्कूल परिसरात तर दुसरी घटना मध्यवर्ती बसस्थानकात घडली.

आण्णाप्पा शंकर व्हसमाने (वय ६४) यांनी सकाळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखतेनू ७५००० रुपयांची रक्कम काढली. ती एका बॅगेतून घेऊन ते मित्रासोबत गाडीवरुन बँकेतून निघाले. मित्राने व्हसमाने यांना एएससी कॉलेजजवळ सोडले. त्यानंतर व्हसमाने हे चालत घरी निघाले होते. मॉडर्न हायस्कूलजवळील शिवमंदिरासमोर ते आले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील बॅग हिसडा मारून पळविली. अचानक घडलेल्या या घटनेने व्हसमाने यांनी आरडाओरडा सुरु केला. तो ऐकून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण चोरटे पसार झाले. दरम्यान, बॅगेतील रोकड काढून घेऊन चोरट्यांनी ती बॅग जवाहरनगर परिसरातील डॉ. अरुण पाटील यांच्या दवाखाना परिसरात टाकली होती. ही बॅग एका महिलेला सापडली. त्यामध्ये आधारकार्ड, एटीएम कार्ड व बँकेचे चेकबुक असे साहित्य होते. महिलेने ती बॅग शिवाजीनगर पोलिसांकडे आणून दिली. कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी व्हसमाने यांच्याशी संपर्क साधला. व्हसमाने यांनी घरगुती कार्यासाठी पैसे काढले होते. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या घटनेत येथील मध्यवर्ती बसस्थानकात कॉलेज विद्यार्थिनीची पर्स चोरीला गेली. बसमधील प्रवाशांनी शोधाशोध करुनही पर्स न सापडल्याने वाहकाने एसटी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नेली. त्याठिकाणी सर्व प्रवाशांची तपासणी केली. मात्र पर्स मिळून आली नाही. बसस्थानक परिसरात पाकिटमारांचे प्रमाण वाढले असून याठिकाणी असलेल्या चौकीत कायमस्वरूपी पोलिसाची नेमणूक करावी अशी मागणी प्रवाशांतून केली जात आहे. या दोन्ही घटनांची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राधिकरण स्थापण्यास प्रारंभ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हद्दवाढीऐवजी कोल्हापूर शहर आणि आसपासच्या गावांच्या एकत्रित विकासासाठी स्थापन करावयाच्या विकास प्राधिकरण निर्मितीच्या प्रक्रियेला गुरुवारी सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ कृती समिती, विरोधक यांच्यासह कोल्हापुरातील ​विविध घटकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्राधिकरणाच्या तीन पर्यायांच्या प्रारूपाचे सादरीकरण झाले. कोल्हापूर आणि आसपासच्या गावांच्या विकासाच्या प्राधिकरणाबाबत नागरिकांकडून ३० सप्टेंबरपासून एक महिन्याचा कालावधीत सूचना, हरकती मागविल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त सूचनांच्या आधारे दोन आठवड्यांत अहवाल तयार करून तो राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर होताच राज्य सरकार नोव्हेंबर महिन्यात प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. महानगर विकास प्राधिकरण, क्षेत्र विकास प्राधिकरण आणि नवनगर विकास प्राधिकरण असे तीन प्रस्ताव ठेवले आहेत. यापैकी एका प्रा​धिकरणासाठी नागरिकांनी एका महिन्याच्या कालावधीत सूचना, हरकती नोंदवायच्या आहेत. गुरुवारी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या बैठकीत हद्दवाढ समर्थक व विरोधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी प्राधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मकता दर्शविली.

यामुळे प्राधिकरण स्थापण्याचा मार्ग सुकर बनला आहे. तत्पूर्वी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुहास दिवसे, नगर विकास विभागाचे संचालक एन. आर. शेंडे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी प्राधिकरणाची संकल्पना, स्वरूप आणि अधिकार या संदर्भात सादरीकरण केले.

क्षेत्र विकास प्राधिकरण ?

हद्दवाढीबाबत एकमत न झाल्याने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्वतंत्र प्राधिकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. आता प्राधिकरणाची प्र्रक्रिया सुरू झाली. कोल्हापूरसाठी क्षेत्र विकास प्राधिकरणाची शक्यता आहे.


शहरी आ​णि ग्रामीण विकासाचा सुवर्णमध्य

हद्दवाढीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासोबत आसपासच्या गावांचा सुनियोजित विकास घडावा अशीच सरकारची भू​मिका होती. मात्र, हद्दवाढीविषयी समर्थक आणि विरोधकांत एकमत झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत स्वतंत्र प्राधिकरण स्थापण्याचा पर्याय पुढे आला आहे. प्राधिकरण हे कोल्हापूरच्या शहरी आ​णि ग्रामीण विकासाचे सुवर्णमध्य ठरेल. परंपरागत प्राधिकरणापेक्षा कोल्हापूरचे प्राधिकरण वेगळ्या धर्तीवर काम करेल. नियमाच्या चौकटीबाहेर जाऊन विकासाचे पॅकेज देण्याची भूमिका आहे. जेणेकरून शहर आणि ग्रामीण विकासाचे नवे दालन ठरेल. मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरण स्थापण्यासाठी दहा लाख लोकसंख्येची अट शिथिल केली आहे. प्राधिकरणासाठी उपाध्यक्षपद नव्याने स्थापण्याची ग्वाही दिली आहे. प्राधिकरणांतर्गत पायाभूत सुविधांपासून नाट्यगृह, नवीन प्रशासकीय इमारत, बगीचा, पूल आणि नागरी सुविधांच्या प्रोजेक्टसाठी अर्थसाह्य मिळेल. कोल्हापूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी भरभक्कम निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोरा धनादेश माझ्या हाती दिला आहे. कोल्हापूरच्या दृष्टीने आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे. कारण नव्या विकास पर्वाची सुरुवात होत आहे. नागरिकांनी प्राधिकरणाबाबत चांगल्या सूचना कराव्यात.

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर कायमस्वरूपी उजळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर कायमस्वरूपी उजळण्यासाठी राज्य सरकारकडून एक कोटी व देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने एक कोटी अशी दोन कोटींची तरतूद केली आहे. चार दिवसांत याबाबतचे टेंडर निघणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव शनिवारी सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी विद्युत रोषणाईत मंदिर उजळले होते.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराला कायमस्वरुपी विद्युत रोषणाई व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दोन कोटींची तरतूद केली असून, चार दिवसांत याबाबतचे टेंडर निघणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. गुरुवारीही पावसाच्या अडथळल्यामुळे मंदिरातील विद्युत रोषणाईचे टेस्टिंग करताना अडथळा निर्माण झाला. रात्री उशिरा विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले. महाद्वारवरील क्रेनच्या सहाय्याने फांद्या हटविण्यात आल्या.

वॉकीटॉकी व हॅन्ड मेटल डिटेक्टर

मंदिर सुरक्षितेच्यादृष्टीने देवस्थान समितीच्यावतीने पोलिसांना व देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांना दहा हॅन्ड मेटल डिटेक्टर आणि १५ वॉकी टॉकी देण्यात आले.

रुद्रगर्जना ढोल पथक

अष्टमीला देवीचे वाहन पालखी पारंपरिक लवाजम्यासह नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. रात्री साडेनऊ वाजता अष्टमीच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. यंदा अष्टमीच्या जागरासाठी रूद्रगर्जना हे पारंपरिक ढोलवाद्याचे पथक गुजरी मित्रमंडळाने निमंत्रित केले आहे.

ज्योत नेण्यासाठी दुर्गामंडळे दाखल

राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून दुर्गा मंडळे ज्योत नेण्यासाठी अंबाबाई मंदिरात गुरुवारी दाखल झाली होती. ज्योत प्रज्वलित करून ते परत गावी रवाना झाले.

२४ तास पाणी, वॉटर एटीएम

मंदिरात चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्यावतीने पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण झाले असून, मंदिरात चोवीस तास पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मंदिरात एक हजार लिटरच्या पाच आणि पाच हजार लिटरची एक अशा पाण्याच्या टाक्या असून दत्तमंदिर, घाटी दरवाजा, विठ्ठल मंदिर, खंडोबा मंदिर आणि महाद्वार परिसरात पाण्याची व्यवस्था केली आहे, तसेच गुरुवारी इंडो काउंट कंपनीच्यावतीने मंदिराला वॉटर एटीएम दिले असून, भाविकांसाठी पाण्याची मोफत सुविधा देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images