Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कचरा उठावासाठी ३०० कंटेनर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर सातत्याने टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर महापालिकेने साधनसामग्री खरेदी प्रक्रियेला सुरुवात केली. स्थायी समिती सभेने ३०० कंटेनर खरेदीची १ कोटी १८ लाख ८० हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. कंटेनर पुरविणाऱ्या कंपनीवर एक वर्ष देखभालीसह वॉरंटी असणार आहे. मात्र २०० घंटागाडी खरेदीबाबत फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दरम्यान सत्ताधारी गटाचे सदस्य उशिरा आल्याने विरोधी ताराराणी भाजप आघाडीच्या सदस्यांनी नीलेश देसाई यांना अध्यक्षस्थानी बसवत सभा सुरू केल्याने तणाव निर्माण झाला. तर सभेच्या उत्तरार्धात नगरोत्थान योजनेतील आरईइन्फ्रा कंपनीनला दिलेली मुदतवाढ आणि बिलावरून प्रशानसानाने बेदखल केल्याप्रकरणी सत्ताधारी गटाने सभात्याग केला.

आजच्या सभेत प्रशासनाकडून कंटेनर खरेदीचा प्रतिकंटेनर ६१ हजार रुपयांच्या एस्ट‌िमेटचा प्रस्ताव मंजुरीचा ठराव ठेवण्यात आला होता. कंटेनर खरेदीच्या निविदा प्रक्रियेत सुशीलानंद इक्व‌िपमेंटसने प्रति कंटेनर ४६,००० रुपये दराने निविदा सादर केली होती. नागपूर येथील तिरुपती रिक्षा ट्रेडर्सची ३९,६०० रुपयांची कमी दराच्या निविदेला मंजुरी मिळाली. निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेत अपुऱ्या कागदपत्राअभावी तिरूपती ट्रेडसची निविदा पहिल्या टप्प्यात अपात्र ठरली होती. स्थायी समिती सदस्या मेहजबीन सुभेदार यांनी तिरुपतीच्या कमी दराच्या निविदेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या कंपनीकडून कंटेनर घेतल्यास महापालिकेची सुमारे १८ लाख रुपयांची बचत होईल हे सामोरे आणल्यानंतर ‘तिरुपती’ च्या निविदेवर शिक्कामोर्तब झाले. विरोधी आघाडीच्या सतर्कतेमुळे दोन प्रकल्पात गेल्या तीन महिन्यात महापालिकेची ५० लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा भाजपाचे अजित ठाणेकर यांनी केला.

नगरसेवक सत्यजित कदम, सूरमंजिरी लाटकर, रुपाराणी निकम यांनी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे पगार का थांबवले? अशी विचारणा केली. रिना कांबळे यांनी फुलेवाडी रिंगरोड रस्त्याची दूरवस्था निदर्शनास आणली. पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील प्रोजेक्टच्या कामास विलंब झाल्याने ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले. चर्चेत निलोफर आजरेकर, सुनील पाटील यांनी सहभाग घेतला.

सत्ताधाऱ्यांचा सभा संपताना सभात्याग

आरईइन्फ्रा कंपनीने निकृष्ट कामे केली असताना बिल का दिले? कंपनीला मुदतवाढ कशाच्या आधारे दिली? कंपनीच्या कामाविषयी सदस्यांनी विचारणा करूनही प्रशासनाकडून माहिती मिळत नसल्याचा आरोप नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम यांनी केला. प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभापतीसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सभा संपताना सभात्याग केला.



नीलेश देसाई सभाध्यक्ष झाले

सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडी एकमेकावर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नाहीत. स्थायी समिती सभेची नियोजित वेळ सकाळी ११ ची होती. यावेळी सत्ताधाऱ्यांनी पार्टी मिटींग सुरू होती. तर भाजप, ताराराणी आघाडीचे सभेसाठी दाखल झाले होते. बारा वाजेपर्यंत सभापती जाधव हे सभेसाठी न आल्याने भाजप, ताराराणी आघाडीच्या सात सदस्यांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे नियमावलीची माहिती घेतली. कोरम पूर्ण होताच नगरसेवक नीलेश देसाई यांची सभाध्यक्ष म्हणून निवडून कामकाजाला सुरुवात केली. सभापती जाधव यांना याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता सभागृहात दाखल झाले. सभापती जाधव यांचे आगमन होताच देसाई यांनी सूत्रे जाधव यांच्याकडे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सदाभाऊंचे मंत्रिपद गेले तरी बेहत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्पादन खर्चावर शेतीमाला दर मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. अशा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी ५० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून आगामी काळात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, प्रसंगी सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद गेले तरी, बेहत्तर अशा निर्वाणीचा इशारा खासदार राजू शेटी यांनी दिली. नागाळा पार्क येथील स्वाभिमानी पक्षाच्या कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘राज्यासह देशातील कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय आत्महत्या थांबनार नाहीत, यासाठी ५० लाख शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेवून पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. याबाबत आंदोलन करावे लागले तरी, चाले पण २०१९ पर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोऱ्या केल्याशिवाय राहणार नाही. ऊस व दूध दरावरुन स्वाभिमानीवर होणाऱ्या टिकेला प्रत्युत्तर देताना खासदार शेट्टी यांनी कारखान्या शेजारी नव्या कारखाना सुरू करण्यासाठी एनओसी द्यावी तुमच्यापेक्षा जास्त दर देण्याचे आव्हान दिले. उत्पादकांच्या हितासाठी स्वाभिमानी दूधाचा लिटरमागे पाच रुपये दर कमी केल्यानंतर अमूल आपल्या दुधदरात दोन रुपयांची घट केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाणार असून त्यासाठी ४०८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरातील पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

पक्ष कार्यालयाचे उद्‍घाटन खासदार शेट्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनिल मादनाईक, अजित पवार, बांधकाम सभापती सीमा पाटील, सागर शंभुशेटे, शिरोळच्या पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराध, सांगली जिल्हाध्यक्ष विकास देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहापूरकर तोंड सांभाळून बोला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

डॉ. प्रकाश शहापूरकर हे पातळी सोडून राष्ट्रवादीच्या नेत्यावर सातत्याने टीका करीत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असूनही पेशाची नितीमूल्ये न सांभाळणाऱ्या शहापूरकर यांनी तोंड सांभाळून बोलावे अन्यथा त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिले जाईल. वैचारिक प्रबोधनासाठी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगणाऱ्या शहापूरकर यांचे हेच वैचारिक प्रबोधन का? असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, शहापूरकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र या प्रवेशादरम्यान त्यांनी दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या विरुद्ध अतिशय वाईट पद्धतीने टीका केली. हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल ते सातत्याने असे वक्तव्य करीत आहेत. ही आपली संस्कृती नाही. त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसायातही डॉक्टरांनी काही संकेत पाळायचे असतात. पण भाजपा मेळाव्यात शहापूरकर यांनी कै.बाबासाहेबाच्यावर व्यक्तीगत स्वरुपाची हीन टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एन. पाटील यांच्याबद्दलही शहापूरकर यांनी गोडसाखर सर्वसाधारण सभेत अनुद्‍गार काढले. अजातशत्रू म्हणून ओळख असणाऱ्या पाटील यांनी गेली ४० वर्षे गडहिंग्लज तालुक्यातील सर्व जाती-धर्मामध्ये जातीय सलोखा व शांतता नांदावी यासाठी कै.बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पाटील यांच्यावर टीका करताना सामाजिक कार्याचा व ज्येष्ठत्वाचा विसर पडला. शहापूरकर यांच्या या कृतीचा पक्षातर्फे निषेध त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, एखाद्याच्या निधनानंतर त्या व्यक्तीबद्दल गैर न बोलणे ही आपली संस्कृती आहे. तर डॉक्टर म्हणून आपल्या पेशंटबद्दल अथवा त्यांच्या आजाराबाबत कधीही जाहीर वक्तव्य करू नये हे तत्व सांगते. एकेकाळी कै. बाबासाहेब कुपेकर यांचे डॉ. प्रकाश शहापूरकर जिवलग मित्र होते. पण शहापूरकर हे बाबासाहेब कुपेकरांची वारंवार खिल्ली उडवत आहेत. याआधी हि शहापूरकर यांची शैली आहे म्हणून दुर्लक्ष केले. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी वैद्यकीय तत्व बाजुला ठेवत ‘मी यांच्या आईला, वडिलांना व बायकोला वाचवले’, असे वक्तव्य केले. आताचे त्यांचे वक्तव्य सहन होण्यापलीकडचे आहे. याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड रोष आहे.

शहापूरकरांना घरी जावून जाब विचारू

शहापूरकर यांनी सोशल मीड‌ियाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी एकवटलेला मराठा समाज, मराठा समाजातील नेते, युवक यांची आळशी, व्यसनी अशी निर्भत्सना केली आहे. ज्या मराठा नेत्यांमुळे त्यांना दवाखान्यातून थेट कारखान्यात जाण्याची संधी मिळाली त्या नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी त्यांनी गद्दारी केली आहे. त्यांच्या या कृतीचा मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम यांनी तीव्र शब्दात निषेध केला. तसेच यासंदर्भात तत्काळ माफी न मागितल्यास मराठा समाज त्यांना याबाबत घरी जाऊन जाब विचारेल, असा इशाराही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंधाऱ्यात मुरविले पैसे

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet:@bhimgondaMT

कोल्हापूर: एकात्मिक पाणलोट योजनेतून लाखो रुपयांच्या बांधलेल्या माती, सिमेंट बंधाऱ्यात कृषी अधिकाऱ्यांनी पाण्याऐवजी पैसे मुरवल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट होते. भौगोलिक, नैसर्गिकदृष्ट्या पाणी ज्या ठिकाणी अडवणे शक्य नाही, अशा ठिकाणी बंधारे बांधून अधिकाधिक पैशांवर डल्ला कसा मारता येईल, यावर विशेष लक्ष दिले आहे.

पावसाचा प्रत्येक ‌थेंब ‘माथा ते पायथा’ अशा पद्धतीने अडवणे हे योजनेचे मुख्य सूत्र आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी हे सूत्र गुंडाळून ठेवले. पाणी अडवण्यासाठी करावयाचे सीसीटी, मजगी, माती बांध मनमानीपणे सोयीच्या ठिकाणी बांधली आहेत. तांत्रिकदृष्या योग्य आहे की नाहीत, याचाही विचार झालेला नाही. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसाने माती नाला बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे पाणी अडवण्याचा मुख्य उद्देश असफल झाला. याउलट पैसे मुरवून आपले खिसे भरून घेण्याचा हेतू सफल झाला.

चौकशी केलेल्या सर्वच २३ गावातील कामांत मजगी, माती नाला बांध, सिमेंट नालाबांध मोठ्या प्रमाणात घेतल्याच‌े समितीने अहवालात म्हटले आहे. ही कामे घेतल्यानंतरच कमीशनचा अधिकाधिक वाटा तालुका ते जिल्हा पातळीवर अधिकाऱ्यापर्यंत सहजपणे पोहचतो, हे उघड गुपीत आहे. घोटवडे (ता. पन्हाळा) येथे सविस्तर प्रकल्प अहवालात केलेल्या विकास कामांचा सामावेश नाही. जबाबदार अधिकाऱ्यानी केलेल्या कामाचा तपासणी अहवाल नाही. समपातळीनुसार आखणी करून मजगीचे काम पुर्ण झालेले दिसून येत नाही.

हाजगोळी बुद्रुकमध्ये मजगीचे काम करताना बांधाची धुमसनी योग्य रितीने केलेली नाही. बांधकामाचा दर्जा निकृष्ट आहे. जागा निवड अयोग्य आहे. कामे पुर्ण झालेली दाखले घेतलेली नाहीत. महागाव (ता. गडहिंग्लज) माती नाला बंधाऱ्यात पाणी साठा होत नाही. नैसर्गिकदृष्या तसे ठिकाणही नाही. एका मशीन धारकाकडून २५ लाखांपर्यत काम करून घेणे बंधनकारक असताना ४० लाख ९० हजारांची कामे करून घेतली आहेत. आयकराची ५ हजार ३९२ रूपयेही भरलेली नाहीत. ओलवण गावातील माती नाला बंधारा वाहून गेला आहे. बोलोलीत पाणलोट समितीच्या इतिवृतातील सह्या जुळलेल्या नाहीत.

घोटवडे, किटवडे, हाजगोळी ब्रुदुक, हसूरवाडी, हेब्बाळ जलद्याळ, तारेवाडी येथे सुधारित सविस्तर विकास आराखडा नाही. पाणलोट समिती स्तरावर मृद, जलसंधारणाच्या कामांची अंदाजपत्रकेच गायब केली आहेत. बंधारा बांधण्यासाठी खरेदी केलेले सिमेंट, डबर, काळीमाती, वाळू, खडी खरेदी केलेल्याच्या पावत्याही नाहीत. याचा अर्थ कामे न करताही पैसे काढल्याचा निघू शकतो. समित्यांना अंधारात ठेवून ठेकेदारांची निवड केली आहे. हाजगोळी बुद्रुक, बाळोली, म्हसुर्ली या गावातील माती नाला बांधांची गुणवत्ता असमाधानकारक आहे. अपवाद वगळता सर्वच सिंमेट, माती नाला बंधाऱ्यांना प्रचंड गळती लागली आहे. (समाप्त)


इ-निविदा नाही

एकाही कामांची इ-निविदा काढलेली नाही. यामुळे कामात जास्त टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारास अधिकाऱ्यांनी काम दिल्याच्या आरोपात तथ्य आहे. समित्यांना समजू नये, यासाठी निधी देताना ठरावही घेण्यात आलेला नाही. कामाच्या प्रत्येक टप्याचे फोटो घेण्यात आलेले नाहीत. शाहुवाडी तालुक्यातील मरळे, कांटे, येळवडे पाणी अडवण्यासाठी काढलेले खाचर क्रमांक नमूद नसतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.


५० टक्केच कामावर

योजनेतील मंजुरी निधीपैकी ५० टक्केच निधी प्रत्यक्ष कामावर खर्च झाला आहे. उर्वरित ५० टक्केवर जिल्हा ते तालुका, गाव पातळीवरील अधिकाऱ्यांनी डल्ला मारला आहे. सरकारी कामकाजातील कागदपत्रे गायब होणे, अधिकाऱ्यांना कागदपत्रे पाहायला न मिळणे फौजदारी गुन्हा आहे.

‘पाणलोट’मध्ये भ्रष्टाचार झाला आहे. प्रभावी लोकसहभाग नसल्याचा गैरफायदा घेत बंधारे न बांधता कृषी अधिकाऱ्यांनी पैसे काढले आहेत‌. त्याचा जाब जिल्हा सनियंत्रण समितीच्या सभेत अधिकाऱ्यांना विचारले आहे. त्यांच्या पगारातून पैसे वसुल करावेत, अशा स्वरूपाच्या कारवाईसाठी पाठपुरावा करणार आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सवाची जल्लोषी सांगता

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

हलगीचा कडकडाट, घुमक्याचं घुमणं, ढोलकीचा मनं झिंगवणारा ताल, दिमडीचा ठेका आणि संबळाबरोबरची अनोखी जुगलबंदी, ढोल-ताशांच्या निनादांसह आणि नृत्य, गीत, संगीत अभिनयाच्या स्पर्धात्मक सादरीकरणासाठीच्या मनस्वी अपूर्व उत्साहाला आज आजरा महाविद्यालयामध्ये उधाण आले. सारा माहोलच जल्लोषी युवामय झाला होता. प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त साथ देत, वातावरण अधिकच जोशपूर्ण केले. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या यावर्षीच्या जिल्हास्तरीय युवा-महोत्सवाचे. विद्यापीठाच्या ५१ महाविद्यलयांनी या महोत्सवात सहभाग घेतला.

विद्यापीठाच्या ३६व्या युवा महोत्सवाचे संयोजन आजरा महाविद्यालयाने केले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या महाविद्यालयातील तरुण-तरुणींचे जथे मोठ्या आवेशात आजऱ्यामध्ये एकवटले. शिक्षक, मार्गदर्शक आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या दिग्दर्शनानुसार संयोजकांनी निश्चित केलेल्या रंगमंचांवर आपापल्या कलागुणांचे दिमाखदार सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालय प्रांगणातील मुख्य दाजी टोपले रंगमंचावर उद्‍घाटन कार्यक्रमानंतर लोकसंगीत वाद्यवृंदाने उपस्थितांना आपल्या मातीतील विविध लोकवाद्यांच्या अवीट ताल आणि ठेक्यांनी मंत्रमुग्ध केले. अंगभूत ठेक्यावर आधारित ही वाद्य-जुगलबंदी आस्वादताना आणि त्यातील ठेक्यांवर डोलताना अनेकांचे भान हरपून गेले. नाशिक ढोल, ताशे, मृदंग, ठोलकी, दिमडी, टाळ, मंझिरी, कैताळ, हार्मोनियम, घुंगरू, हलगी, घुमकं, चौंडकं, चिपळ्या, शंख, तुता-या आदी वाद्यांनी या कलास्पर्धेतील रंग खुलविला. यानंतर दुपारी येथे लोककला नृत्यांना प्रारंभ झाला. वाघ्या-मुरळी, गोंधळ, जागर, पोतराज, सासनकाठी, आराधी, जोगवा, बाल्या, आदिवासी, दिंडी, मंगळागौर आणि सकवार लावणीसारख्या मराठमोळ्या नृत्यांसह राजस्थानी, गरबा, त्रिपुरातील नृत्यांतून सरावदार पदन्यास, बहारदार मुद्रा (स्टंट), सुयोग्य गीत-संगीत वादन, नेमके नेपथ्य आणि बहारदार सादरीकरणाने अनेकांची मने गीत-संगीत-नर्तनात चिंब झाली. यावेळी मिळालेल्या रसिकांच्या उदंड उत्साहाने मान्यवरांसह अवघे वातावरणच बेहोष झाले.

श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या सभागृहात सुगम व समूह गीत स्पर्धांचा रंग बहरला. उत्तमोत्तम भावकविता आणि विविधरंगी देशगीते व लोकगीतांनी सभागृहच सरगमी बनले होते.आजरा हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर याच दरम्यान लघुनाटिका व मूकनाट्यांतून तर अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये अभिनयगुणांचे ताकदवान सादरीकरण करण्यात युवाजन गुंतले होते. भ्रष्टाचार, दुष्काळ, स्त्री-भृणहत्या, महिला सक्षमीकरण, शासकीय धोरणांचील विसंगती आदींबाबत नेमके बोट ठेवून सादर केलेल्या प्रहसनांनी गुगुल्या टाकल्या. मूकनाट्यानेही काही हृदयस्पर्शी विषयांना हात घालण्याचा व निराकरणाचा प्रयत्न केला. ‘भारतीय महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झाले आहे का?’ या विषयावर आवेशपूर्ण वक्तृत्व सादर झाले. पहाटे तीन वाजेपर्यंत लोकनृत्ये व एकांकिका सुरू होत्या.

कही खुशी कही गम

तगडी मेहनत आणि बराच सराव करून मनाप्रमाणे कलागुणांचे सादरीकरण झाल्यानंतर अनेक रंगमंचावरून विद्यार्थी कलाकारांच्या ओठी मेहनत फळाला आली, या आशयाचे हास्य आपसूकतेने तरंगले. तर तात्कालिक चुका झाल्याने सादरीकरणात झालेल्या घोळाने काहींना आपली निराशा लपविता आली नाही. पण तरीही उत्साहपूर्ण आवेशात उर्वरित कलासादरीकरणासाठी संबंधितांना मित्र-मैत्रिणींकडून दिला जाणारा ‘बॅकअप’ वैशिष्ट्यपूर्ण होता. युवा महोत्सवांमागील हेतू यामुळे अधोरेखित झाला.

आठवडी बाजारात पथनाट्य

आजऱ्याचा आठवडी बाजार असतानाही संयोजकांनी बाजारपेठेतील आजरा अर्बन बँकेच्या चौकात ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पथनाट्याचे आयोजन करीत खऱ्या अर्थाने हे नाट्य व त्यातून अपेक्षित जना्रबोधनाचे दालन सर्वसामान्यांसाठी खुले केले. दिवसभर येथील पथनाट्यांची लयलूट प्रेक्षकांनी रिंगण-गर्दी करून केली. याची दिवसभर चर्चा होती

नेटके संयोजन

सहभागी विद्यार्थी कलाकारांना केंद्रबिंदू मानून पुरविलेल्या विविध सुविधा आणि रसिक गर्दीचे नियमन अनोखे होते. यामुळे कोठेही गडबड गोंधळ नव्हता. प्रशस्त पार्किंगची व्यवस्था, एनसीसी, एनएसएस आणि स्टुडंट्स आयक्यूएसीच्या स्वयंसेकांसह पोलिस उपअधिक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले. विद्यार्थी कल्याचे संचालक डॉ. आर. बी. गुरव यांनी पहाटे सहा वाजता गुणानुक्रमे निकाल ऑनलाइन जाहीर केला. यामध्ये प्रतिष्टेच्या लोकनृत्य स्पर्धेत आजरा महाविद्यालयाने बाजी मारीत १४ कलाप्रकारात विविध ८ पारितोषिके मिळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपवासाच्या पदार्थांना मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजी, धान्य, तेल बाजारात फार मोठी दरवाढ नसली तरी तूरडाळ व हरभरा डाळींच्या दरातील वाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यांच्या तुलनेत या दोन्ही डाळींच्या दरात पुन्हा दहा रुपयांनी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सव सुरू झाल्याने खजूर, खारीक, वरी, राजिगरा लाडू, फळे अशा उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. आगामी काही दिवसांत फुलांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या निशिगंध फुलांचा दर आठवड्यात दुपटीने वाढला आहे. तेलांच्या दरात मात्र वाढ होण्याची शक्यता नाही.

पितृपंधरवड्याच्या काळात भाज्यांना मागणी नव्हती. त्यामुळे बाजार एकदम शांत वाटत होता. गवारीच्या भाजीला जास्त मागणी असल्याने तिचा दर ८० रुपये किलोवर पोहचला आहे. इतर भाज्यांच्या दरात मात्र फार मोठा बदल झालेला नाही. टोमॅटोचा दर अजूनही दहा रुपयांवर गेलेला नाही. कोबीची आवक अजूनही सुरूच असल्याने व मागणी फार नसल्याने दहा रुपयाला एक गड्डा मिळत आहे.

डाळींमधील तूर व हरभरा डाळीचा दर या आठवड्यात आणखी दहा रुपयांनी वधारला. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपयांवर असलेली तूरडाळ १४० रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळही १३० रुपयांवर पोहचली आहे. किराणा बाजाराच्या दरात फरक नसला तरी नवरात्रीमुळे दुकानांमध्ये खजूर, राजिगरा लाडू, खारीक, वरीला मागणी वाढली आहे. दसरा तोंडावर असल्याने फुलांचे दर वाढू लागले आहेत. दोन आठवड्यापूर्वी ५० रुपये किलोला मिळणारा निशिगंध दोन दिवसात १०० ते १२० रुपये किलोवर पोहचला आहे. आगामी काही दिवसांत त्याचा दर १५० रुपये ओलांडेल असा अंदाज आहे. झेंडू व गलाट्याची आवक मोठी असल्याने ही फुले १० रुपये किलोने मिळत आहेत. तेलांच्या दरात वाढ झालेली नाही. पाम तेलाचा आयात कर कमी केल्याने या तेलाचा दर स्थिर राहणार आहे. त्यामुळे आपोआपच इतर तेलांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

भाज्यांचे दर (किलो)

वांगी : ३५ रु.

टोमॅटो : १० रु.

कारली : २५ रु.

ढबू मिरची : ३० रु.

कोबी : १० प्रतिनग

फ्लॉवर : २५ रु.

गवार : ८० रु.

मेथी : १० रु. पेंडी

कोथिंबीर : १० रु. पेंडी

ओली मिरची : २५ रु. कि.

कांदा : १५ रु.

बटाटा : २० रु.

लसूण : १५० रु.

वरणा : २० रु.

आले : ४० रु.

शेवगा : ३० रु.

....

खाद्यतेल

सरकी : ८० रु.

सूर्यफूल : ९० रु.

शेंगतेल : १४० रु.

फळांचे दर (किलो)

डाळिंब : १०० रु.

सफरचंद : १०० रु.

विदेशी सफरचंद : २०० रु.

सीताफळ : १२० रु.

केळी : ३५ रुपये डझन

...

फुलांचे दर (किलो)

निशिगंध : १२० रु.

झेंडू : १० रु.

गलाटा : १० रु.

डाळींचे दर (किलो)

तूरडाळ : १४० रु.

मूगडाळ : ९० रु.

उडीद डाळ : १४० रु.

हरभरा डाळ : १३० रु.

मूग ८० रु.

मसूर डाळ ९० रु.

किराणा दर (किलो)

पोहे : ३९ रु.

साखर : ३८ रु.

मैदा : ३० रु.

रवा : ३० रु.

शाबू : ६० रु.

आटा : ३० रु.

वरी : ८० रु.

खारीक : ३५० रु.

खजूर : ८० ते २४० रु.

राजगिरा लाडू : २० रु. पॅकेट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पन्हाळा

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नवरात्रोत्सवाला शनिवारी मोठ्या धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला श्री जोतिबाची नागवेली पानातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली. तसेच धुपारती सोहळ्याने घटस्थापनेचा धार्मिक विधी करण्यात आला.

श्री जोतिबाच्या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ पहाटे तीन वाजता महाघंटेच्या नादाने झाला. पहाटे चार वाजता श्री जोतिबा मूर्तीचे मुखमार्जन करून पाद्यपूजा करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाभिषेक सोहळा संपन्न झाला. शनिवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला नागवेली पानातील आकर्षक अलंकारित महापूजा बांधण्यात आली. सकाळी नऊ वाजता श्री जोतिबा मंदिरात मंत्रोच्चारच्या स्वरात घट बसविण्यात आले. साडेनऊ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, महालदार, चोपदार, देवसेवकांच्या लवाजम्यासह श्री यमाई मंदिराकडे धुपारती सोहळा निघाला. श्री यमाई मंदिर, श्री तुकाई मंदिरात घट बसविण्याचा विधी झाला. सुवासिनींनी पाणी घालून धुपारतीचे दर्शन घेतले. यावेळी सुगंधी दूध वाटप करण्यात आले. कपुरेश्वर तीर्थावर दिवे सोडण्यात आले. घुपारती समवेत श्रींचे पुजारी देवसेवक, देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधीया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, सरपंच डॉ. रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. दुपारी एक वाजता तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला. रात्री भजनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान जोतिबा दर्शनासाठी भाविकांची शनिवारपासून गर्दी सुरु झाली. तेल घालण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक भागातील लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येतात.

उपवासधारक संख्या वाढली

जोतिबाच्या नवरात्र उपवासाची शनिवारपासून सुरुवात झाली.यंदाचे संपूर्ण नऊ दिवसाचे नवरात्र उपवास असल्याने नवीन उपवासधारकांची संख्या वाढली आहे. दोनवेळा फराळ, अनवाणी, उपरणे-धोतराचा पेहराव, प्रवास कमी असे जोतिबा नवरात्र उपवासाचे स्वरुप असते.

खडकलाटची पाने

शनिवारी महापूजेसाठी खडकलाट (ता.चिकोडी) येथील एका भाविकाने पाच हजार नागवेलीची (खाऊची) पाने आणली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला हवा कर्जमुक्तीसाठी बूस्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल विकास साधण्यासाठी प्राधिकरण स्थापण्यासाठी सहमतीचे चित्र आहे. राज्य सरकारकडून प्राधिकरण स्थापनेनंतर मोठे प्रकल्प आणि सेवा सुविधांसाठी निधी मिळणार आहे. आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या शहरातील सेवा सुविधा, विविध प्रकल्प साकारताना महापालिकेवरील कर्जाचा बोजा ३०० कोटीपर्यंत वाढला आहे. महापालिकेच्या केएमटी बस सेवा, आरोग्य सेवा, नगरोत्थान योजनेंतर्गत साकारलेले रस्ते आणि पाणी पुरवठा योजनेचा लाभ आसपासच्या गावासह जिल्ह्यातील नागरिकांना होतो. सरकारने प्राधिकरण स्थापताना महापालिकेला कर्जमुक्त करण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी महापालिका आणि हद्दवाढ कृती समिती प्रयत्नशील आहे.

प्राधिकरणसंदर्भात तीस ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना द्यायच्या आहेत. या कालावधीत रितसर सूचना केली जाणार आहे. नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतरण होवूनही शहराची हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढीअभावी शहर विकासाला मर्यादा पडल्या. शहराचा विस्तार न झाल्याने महापालिकेला आर्थिक उत्पन्नासाठी झगडावे लागत आहे. जकात, एलबीटी बंद झाल्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला. दुसरीकडे महापालिकेने ना नफा ना तोटा या तत्वावर आसपासच्या गावासाठी केएमटी बस सेवा सुरू केली. केएमटीतर्फे यापूर्वी ३३ गावांना बस सेवा पुरविली जायची. ग्रामीण भागातील रुट हे तोट्याचे असतानाही नागरिकांच्या सोयीसाठी बस सेवा सुरू आहे. महिन्याला तीस लाखापर्यंत तोटा आहे.

महापालिकेच्या सेवा सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिक घेतात. सरकार प्राधिकरणानंतर मोठ्या प्रकल्पासाठी निधी देणार असला तरी महापालिकेला थेट निधी मिळणार नाही. सगळे अधिकार प्राधिकरणकडे राहणार आहेत. सेवा सुविधांचा महापालिकेवर आणखी ताण पडणार आहे. नोकरी, व्यवसाय, कारखानदारीमुळे कोल्हापुरात स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. शिक्षण आणि नोकरीसाठी रोज हजारो लोक कोल्हापुरात ये जा करतात. त्यांच्यासह आसपासच्या गावांना पाणी पुरवठा केला जातो.

थेट पाइपलाइन योजनेसाठी महापालिकेला स्व निधीतून ४२ कोटी रुपये गुंतवावे लागणार आहेत. नगरोत्थान योजनेंतर्गत ६० कोटी रुपयांचे कर्ज आहे. शिंगणापूर पाणी योजनेचे कर्ज ३२ कोटी रुपयांवरून ११५ कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. थेट पाइपलाइन योजनेसाठी महापालिकेचा खर्च साठ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो. राज्य सरकारकडून प्राधिकरणची स्थापना होताना महापालिकेवरील कर्जाचा बोजा काढून टाकावा. महापालिकेला कर्ज मुक्त करावी अशी सूचना हद्दवाढ कृती समिती व महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

..................

कोल्हापुरात सरकारी विभागीय कार्यालये, जिल्हा कार्यालये आहेत. विद्यापीठासह शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. शाळा, रेल्वे स्टेशन, आरोग्यविषयक सुविधा असल्याने नागरिकांची पावले कोल्हापूरकडे वळतात. सोयी-सुविधा निर्माण करताना जवळपास ३०० कोटीचे कर्ज फेडताना आणि दुसरीकडे सेवा सुविधांची पूर्तता करताना महापालिकेची कसरत होणार आहे. महापालिकेला कर्जमुक्त केल्यास नवीन प्रकल्प हाती घेणे सुलभ होईल

राजू लाटकर (पदाधिकारी, हद्दवाढ कृती समिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ड्राय डे’ला तीन लाखांचे मद्य जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभर मद्यविक्रीस बंदी असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रविवारी (ता. २ ऑक्टोबर) गोवा बनावटीच्या अवैध साठा करून मद्यविक्री करणाऱ्या चौघांना अटक केली. सुमारे ३ लाख रुपयांच्या देशी, विदेशी मद्यासह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

‘ड्राय डे’ला मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने मद्यविक्री सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर विभागाच्या भरारी पथकाने रविवारी पाच ठिकाणी कारवाई केली. नाळे कॉलनीत एका वाहनात अवैध मद्य विक्री सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. मारुती झेन कारमधून (एमएच ०९ एबी २२७०) मद्याची विक्री सुरू होती. पथकाने कारची झडती घेऊन गोव्यात विक्रीसाठीचे १ लाख ३१ हजार ९४० रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले. एक दुचाकीही(एमएच ०९ सीबी ८८३८) पोलिसांनी ताब्यात घेऊन अजित अरविंद ढवण याला अटक केली.

टेंबलाईवाडीतील शनिवार पोस्ट ऑफिस आणि राजेंद्रनगर झोपडपट्टीत सैन्य दलासाठीच्या मद्याची विक्री होत असल्याचे उघडकीस आले. पथकाने १ लाख ७६ हजार ६५७ रुपयांचे मद्य जप्त केले. कणेरीवाडी आणि सरनोबतवाडीतही देशी बनावटीच्या मद्य विक्रीवर कारवाई झाली. कारवाईत गजानन कृष्णा शेंडे, महादेव दौलू पाटील आणि अविनाश जितेंद्र अभंगे या तिघांना अटक केली. भरारी पथकाने एकूण २ लाख ८९ हजार ८२७ रुपयांच्या मद्यासह एक कार आणि एक दुचाकी असा ५ लाख १४ हजार ८२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदयात्रा, पाठिंब्यासाठी सरसावल्या संघटना

$
0
0

राजारामपुरीतून पदयात्रा

मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी रविवारी सकाळी राजारामपुरी परिसरातून पदयात्रा काढण्यात आली. शिवसेना व राजारामपुरी सकल मराठा समाजाच्यावतीने ही पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मारुती मंदिर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. जनता बझार चौक, बसरुट ते माऊली पुतळा या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये ​शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, बाबा इंदूलकर, संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा झाली. जय ​शिवाजी, जय भवानी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, आरक्षण हे मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या पदयात्रेत किशोर सराफ, शशी हराळे, हेमंत पाटील, किरण पडवळ, अभिजीत धनवडे, अरुण तोरस्कर, अनिल कोळेकर, अमर निंबाळकर, विजय घाटगे आदी सहभागी झाले होते.

प्राथमिक शिक्षक संघटनांचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या नऊ संघटनांनी एकत्रितपणे जाहीर पाठिंबा दिला. मोर्चा नियोजनाबाबत सर्व संघटनांच्या शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्राथमिक शिक्षक संघ, समिती, पुरोगामी संघटना, शिक्षक सेना, परिषद, कास्ट्राइब, पदवीधर व सेवानिवृत्त अशा पाठींबा दिलेल्या संघटनांची नावे आहेत. मोर्चावेळी पाचशे शिक्षक स्वच्छता मोहीम राबवतील, असेही सांगण्यात आले.

बैठकीमध्ये प्रा. मधुकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, दुष्काळ पिकू देत नाही. आरक्षण समाजाला शिकू देत नाही. मोर्चा शक्त‌िप्रदर्शन नसून मराठा समाजाचा आक्रोश सरकारला समजण्यासाठी आहे. १६ टक्के आरक्षण मराठ्यांना मिळायला हवे. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी शिक्षकांमधील गट तट विसरुन सर्वजण मोर्चामध्ये सहभागी होतील, असे सांगितले. पुरोगामीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनीही शिक्षक मोर्चाचे प्रबोधन करण्याबरोबरच मोर्चातील शिस्तीसाठी मावळा म्हणून काम करतील, असे सां​गितले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव रेपे, रविकुमार पाटील, एम. व्ही. गोंधळी, शिक्षक सेनेचे कृष्णात धनवडे, कृष्णात कारंडे, तुकाराम संघवी, लक्ष्मी पाटील, दीपाली भोईटे, अर्जुन पाटील, व्ही. एस. पाटील, शंकर पोवार, सुनील पाटील यांनीही जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या बैठकीस बँकेचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, सर्व संचालक तसेच राजेश सोनपराते, स्मिता डिग्रजे, विद्युलता पाटील आदी उपस्थित होते. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे अध्यक्ष बजरंग लगारे यांनी आभार मानले.

जैन मारवाडींचा पाठिंबा

जैन मारवाडी समाजानेही मराठा मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सर्व मंदिर, ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संभवनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, वासुपूज्य स्वामी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लिलाचंद ओसवाल, आशापुरण पार्श्वनाथ ट्रस्टचे अध्यक्ष ललित गांधी, ​श्री सिमंधर स्वामी जैन आराधना भवनचे अध्यक्ष अमर गांधी, शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिरचे ट्रस्टी जयेश ओसवाल आदी प्रमुख उपस्थित होते. जिल्हा सराफ संघ्घचे उपाध्यक्ष राजेश राठोड, भरत गांधी, राजेश निंबजिया, सचिन रामसीना, प्रवीण ओसवाल, जवाहर गांधी, माणिक ओसवालही उपस्थित होते.

नाभिक समाजाची दुकाने बंद राहणार

दुकाने व व्यवसाय बंद ठेवून नाभिक समाज मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे पत्र समाजाने मराठा समाजाला दिले. भारत माने, अॅड. डी. एन. जाधव, राजाराम शिंदे, सूर्यकांत मांडरेकर, बाबासाहेब काशीद, मोहन चव्हाण, एम. आर. टिपुगडे, प्रभा टिपुगडे यांची पत्रावर स्वाक्षरी आहे. पत्र देताना गजानन काशीद, अविनाश यादव, सुनील टिपुगडे, राजाराम शिंदे, मनोहर झेंडे, रघुनाथ टिपुगडे, सुरेश फडतारे, ​दीपक माने, मोहन चव्हाण, उदय माने, मोहन साळोखे, प्रभाकर भोगुलकर, रामभाऊ संकपाळ उपस्थित होते.


गंगाराम कांबळे प्रतिष्ठानचा पाठिंबा

शाहूभक्त समाजसेवक गंगाराम कांबळे प्रतिष्ठानने मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. अशोकराव साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कांबळे म्हणाले, मोर्चाच्यानिमित्ताने रक्तदात्यांचे रक्त संकलन करुन ते रक्त सीपीआरकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या बैठकीस निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश भारत जगताप, बाबा लिंग्रस, अॅड. दिलीप पोतदार, मदन चव्हाण, सदाशिवराव जरग, व्यंकोजी शिंदे, शेखर पाटील, शेखर कांबळे, रणधीर खराडे, सुनील जाधव, डॉ. मिलिंद मांगलेकर, मधुकर महेकर, यतीन कांबळे, उदय संकपाळ, प्राची मांगलेकर, आप्पासो शिंदे उपस्थित होते.

ब्राह्मण संघाचा पाठिंबा

राज्यात सर्वत्र अत्यंत शांततेने व शिस्तीमध्ये मराठा समाजाने मोर्चे काढले आहेत. कोल्हापुरात होणाऱ्या मोर्चासाठी ब्राह्मण महासंघाच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार वेठे यांनी सांगितले. याबाबतच्या झालेल्या बैठकीस महासंघाचे राष्ट्रीय महासचिव शाम जोशी, पांडुरंग यज्ञोपवीत, के. रामाराव, भालचंद्र कुलकर्णी, अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, देवीदास सबनीस, हर्ष कुलकर्णी, अमर साठे, केदार पारगावकर, सतीश सांगरुळकर, अॅड. सुधीर जोशी आदी उपस्थित होते.

टिंबर व्यवसाय बंद

मराठा क्रांती मोर्चाला ​जिल्हा टिंबर व्यापारी व लघुऔद्योगिक संघाने पाठिंबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यामध्ये सचिव हरिभाई पटेल यांनी मराठा समाजाच्या मोर्चास संघाच्या सर्व सभासदांचा पाठिंबा असल्याचा ठराव मांडला. त्याला जयंती पटेल, काका पटेल, दारवाड यांनी अनुमोदन दिले. यानंतर सॉ मिलधारक, बांबू व्यापारी, रंधा मशिन, टेम्पो चालक, हमाल हे व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी होतील, असे देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरला पावसाने झोडपले

$
0
0

कोल्हापूर :

सकाळपासून प्रचंड उष्म्याने काहिली काहिली होत असतानाच रविवारी रात्री झालेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. सोसाट्याचा वारा, गडगडासह आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने शहराच्या सखल भागात पाणीच पाणी झाले. रविवारी सकाळी काहीवेळ पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळी पाच नंतर काही वेळ तुरळक पाऊस झाला. साडेसात नंतर मात्र जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. पाऊस आणि प्रचंड वाराही सुरू राहिला. रात्री नऊ वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने लक्ष्मीपुरी, शाहुपूरी, पारिख पूल परिसरात पाणी साचले. अनेकांनी इमारती आणि शहरातील ठिकठिकाणच्या दुकानाच्या ठिकाणी आसरा घेतला. महाद्वार रोडवरील विक्रेते आणि ग्राहकांची तारांबळ उडाली.

धरणक्षेत्रात तुरळक पाऊस

धरणक्षेत्रात तुरळक पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळीही झपाट्याने कमी झाली. रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत १३ फूट पाणी पातळी झाली. गेले काही सुरु असलेले राधानगरीचे स्वयंचलित दरवाजेही बंद झाले. राधानगरी धरणातून विसर्ग बंद झाला आहे. वारणेतून ७७५, कुंभीतून ३५० आणि घटप्रभेतून ४०० क्युसेस विसर्ग सुरु आहे. इचलकरंजी येथील एकमेव बंधारा पाण्याखाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव यांचा माफीनामा म्हणजे नाटकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘‘सामना’ मधील व्यंगचित्रावरुन उद्धव ठाकरे यांनी मागितलेली माफी म्हणजे दसरा मेळाव्याकडे मराठ्यांनी पाठ फिरवू नये केलेले नाटक आहे,’ असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्याचवेळी ‘राज्यातील क्राइम रेशो प्रचंड वाढला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला क्राइम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आली आहे. फडणवीस सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे,’ अशीही जोरदार टिका विखे पाटील यांनी केली. नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाई दर्शनासाठी विखे पाटील रविवारी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी सर्किट हाऊसवर ते पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाने मागितलेल्या माफीबाबत विखे- पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबत सरकार चालढकल करत आहे. तातडीने न्यायालयात भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. पण येत्या दसरा मेळाव्यात मराठ्यांनी पाठ फिरवू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले हे नाटक आहे. शिवसेना ही मराठी व बहुजनांच्या बळावर उभी आहे. तो आधारच हरवून बसण्याची भीती असल्याने हा माफीनाफा सादर केला आहे.

‘कोपर्डी प्रकरणात सरकार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे’ असा आरोप करून विखे पाटील म्हणाले, ‘कोपर्डी येथील घटना मद्यप्राशन केलेल्या युवकांकडून झाल्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. या वक्तव्यातून अवैध दारूचा व्यवसाय फोफावला असल्याचेच दिसते. दारुबंदीचे धोरण अवलंबण्यासाठी कुणी अडवले आहे? त्यासाठी कोणता मुहुर्त हवा आहे? कोपर्डीसारख्या घटनेनंतर सरकारवरील विश्वास राहिलेला नाही. राज्यातील क्राईम रेशो प्रचंड वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमध्ये क्राईमच्या घटना पाहता क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री देण्याची आवश्यकता आहे.’

आगामी अधिवेशनामध्ये कोपर्डी, शेतकरी आत्महत्या, ओला दुष्काळ, कर्जमाफी यासारख्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्यात येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार ग्रामसेवकांवर ठपका

$
0
0

कोल्हापूर

घोटवडे (ता. पन्हाळा) येथील गायरान जमिनीत अतिक्रमण करून बांधलेल्या घरांची बेकायदेशीर नोंदी करणे, निमयबाह्य व बेजबाबदार कामकाज करून कर्तव्यात कसूर करणे असे ठपके चार ग्रामसेवकांवर ठेवण्यात आले आहेत. तत्कालीन ग्रामसेवक एस. टी. कराळे, वाय. के. जाधव, बाजीराव शामराव गायकवाड, अवधूत आनंदा पाटील अशी त्यांची नावे आहेत. या चारही ग्रामसेवकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कुणाल खेमनार यांनी तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करू नये, अशी नोटीस दिली आहे.

ग्रामस्थ विजय दिवाण, बाजीराव पाटील यांनी ग्रामसेवक, सरपंच, सदस्या यांनी संगनमताने ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार सीईओंकडे केली होती. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून सुरूवातीला चौकशीसाठी टाळाटाळ झाली. पण दिवाण, पाटील यांनी वेळोवेळी आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनास चौकशी करावी लागली. चौकशी अहवालात म्हटले आहे, ग्रामसेवक गायकवाड, जाधव, कराळे, पाटील यांनी गायरानातील नोंदी योग्य त्या कागदपत्राची शाहनिशा न करता बेकायदेशीरपणे केल्या आहेत. नोंदीसाठी सदस्यांनी केलेल्या बेकायदेशीर ठरावाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन घेतलेले नाही. ग्रामपंचायतकडील घरठाण पत्रके करताना मूळ मालकी हक्काची कागदपत्रे पाहिलेली नाहीत. सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी पंधरा टक्के मागासवर्गीय खर्चातून मंडप साहित्य खरेदी बेकायदेशीरपणे केली आहे.

साहित्य खरेदी निविदेवर सरपंच, ग्रामसेवकांच्या सह्या नाहीत, अनियमितता आहे. सन २०१३-१४ मधील पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत गायरान हद्दीत विनापरवाना पारकट्ट्याचे बांधकाम केले आहे. यासाठी वाळू, सिमेंट ग्रामपंचायतीने खरेदी केली आहे. पण खरेदी पावत्या नाहीत. काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. स्ट्रिट लाईट एल.ई.डी बल्ब खरेदीसाठी दीड लाख खर्च झाला आहे. खरेदी अनियमित व नियमबाह्यपणे केली आहे. गायरानमधील गट नंबर ११७८ मधील अतिक्रमणास प्रोत्साहन दिले. गायरानमधील अतिक्रमण काढण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. अशाप्रकारे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे.

........................................................

चौकट

सरपंचांसह सदस्यही दोषी

गावातील स्ट्रिट लाईट, एलईडी बल्ब खरेदीतील अनिय‌मितता, पारकट्टा गायरानात बांधणे, गायरान जमीनीत अतिक्रमणास जबाबदार प्रकरणी सरपंच बाळाबाई कांबळे, उपसरपंच प्रणिता पाटील, सदस्य धोंडीराम कुंभार, श्रीकांत गाडगीळ, बाजीराव पाटील, बेबीताई लव्हटे, नामदेव पाटील, मालुबाई लव्हटे, येसाबाई पाटील यांचे सदस्यत्व अपात्र करावे, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे डॉ. खेमनार यांनी पाठवला आहे. त्याची सुनावणी सोमवारी(ता.३) होणार आहे.

....................................

चौकट

उपोषण

दरम्यान, एल.ई.डी बल्बच्या चौकशीचा अहवाल देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत तक्रारदार दिवाण यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकासच्या नागाळा पार्कातील विभागीय अधिकारी कार्यालयासमोर रविवारी ‌उपोषण केले.

……………..

कोट

‘घोटवडे ग्रामपंचायतीने केलेल्या भ्रष्टाचारातील दोषींना ग्रामपंचायत विभाग पाठीशी घालत आहे. विविध चौकशीच्या नावाखाली कारवाई करण्याचे टाळत आहेत. यामुळे आठवड्यानंतर जिल्हा परिषदेच्या दारात बेमुदत उपोषण सुरू करणार आहे.

विजय दिवाण, तक्रारदार

…………

कोट

‘नियमाप्रमाणे तक्रारदाराच्या सर्व आरोपांची चौकशी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात तक्रारदार दिवाण यांनी चुकीचे आरोप करू नये.

एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकने ठोकरल्याने वृध्दा ठार

$
0
0

जयसिंगपूर

कोल्हापूर सांगली मार्गावर तमदलगे येथे ट्रकने ठोकरल्याने वृध्दा ठार झाली. श्रीमती आक्काताई आण्णाप्पा परीट (वय ६५,रा.तमदलगे) असे त्यांचे नाव आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, सकाळी श्रीमती परीट वैरणीचा बिंडा घेऊन जात होत्या. तमदलगे येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रत्नत्रय रोपवाटिकेनजिक जयसिंगपूरहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऊीप वाळू वाहतुकीच्या ट्रकने त्यांना ठोकरले. या अपघातात श्रीमती परीट गंभीर जखमी झाल्या. त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने पलायन केले. या घटनेची वर्दी अमोल आण्णाप्पा परीट यांनी जयसिंगपूर पोलिसाटत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ ऑक्टोबरला जिल्हापरिषदेसमोर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लेखणीबंद आणि १३ रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी येथील आप्पाज कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीत घेतला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघातर्फे बैठकीचे आयोजन केले होते.

महासंघाचे अध्यक्ष स्वप्निल गोसावी म्हणाले, ‘तुटपुंजा मानधनावर ८ ते १० वर्षे अधिकारी, कर्मचारी अभियानात काम करत आहेत. त्यामुळे अभियानातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना आरोग्य विभागात नोकरीत कायम करावे, अभियान सुरू ठेवावे आदी मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. लोकशाही मार्गाने विविध आंदोलने केली आहेत. पण सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे यापुढील काळात आंदोलन ‌तीव्र करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी आरोग्य संचालक डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. मात्र मागण्यासंबंधी ठोस आश्वासन मिळाले नाही. ३१ मार्चनंतर अभियान सुरू राहणार की नाही, हे सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले. आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनीही प्र‌तिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलन ‌तीव्र करण्यात येणार आहे.’ कार्याध्यक्ष संदीप देसाई यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी उपाध्यक्ष निंगोजी पाटील, ज्ञानेश्वर वाटेगाव, स्मिता खंडारे, नितीन लोहार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपेक्षितांसाठी दातृत्वाची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘प्रत्येकांनी समाजातील उपे‌क्षितांसाठी दातृत्वाची वृत्ती वाढवणे काळाची गरज आहे’, असे प्रति‌पादन मेजर जनरल मधुकर काशीद (निवृत्त) यांनी शनिवारी केले. अनंतराव गोविंदराव कोरगावकर सामाजिक सेवा ट्रस्ट व कोरगावकर पेट्रोलपंपातर्फे आयोजित जेष्ठ नागरिक दिनानिमित्त आदर्श जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

जेष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे अध्यक्षस्थानी होते. महसूल व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.

काशीद म्हणाले, ‘सैन्यात ४० वर्षे सेवा करताना गरजूंना मदत केली. कारगील युध्दावेळी माझ्यासोबत सेवेत असणारे आणि हल्यात शहीद झालेल्या दोन जवानांच्या मुलांचे शै‌क्षणिक पालकत्व मी स्वीकारले आहे. दिंडनेर्ली येथे मोफत युवकांना सैन्य भरतीसंबंधी मार्गदर्शन करत असतो. कोरगावकर ट्रस्टही देण्याची वृत्ती ठेवून चांगले काम करते आहे.’

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते माजी न्यायाधीश गिरीष टंकसाली, संजयसिंह बेनाडीकर, वसंत धोंड, रजनी मगदूम, विलास आंबोले, शिवाजी माळकर, छाया कस्तुरकर, भीमराव पाटील, प्रकाश शिंदे, नामदेव देसाई, एम. बी. शेख, एम. बी. शेख, विनायक कुलकर्णी, ‌डॉ. चित्रा भोरे, धोंडीराम कस्तुरे, चंद्रकांत चव्हाण, प्रताप चिपळूणकर, आर. एन. कारखानीस, नामदेवराव देसाई आदीसह विविध ढोलपथकांचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी प्रास्त‌ाविक केले. राज कोरगावकर, शुभ्रता यान, टंकसाली, अभ्यंकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उद्योगपती घोडके-पाटील आदी उपस्थित होते. संदीप व्हनाळे यांनी सूत्रसंचालन केले. आकाश कोरगावकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतमालाच्या हमीभावासह कर्जमाफीसाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हमीभाव व शेतकरी कर्जमाफीसाठी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने रविवारी दसरा चौकातील शाहू पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतीमाल नियमनमुक्त करण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरी शेतकरी, हमाल, मापाडी यांच्या होणाऱ्या फरफटीबाबत सरकारने काहीही दखल घेतलेली नाही. त्यासाठी पंचायतीने आंदोलन केले.

शेतमालाच्या हमीभावाची जबाबदारी सरकारने घ्यावी, शेतमाल विकण्यासाठी संघटित व्यवस्था निर्माण करावी. हमीभाव फंड तयार करावा, शेतमालाची नासाडी टाळण्यासाठी गोदामे, शीतगृहे, प्रक्रिया उद्योग उभे करावेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मोर्चांचेही आयोजन केले होते. पण सरकारने दखल घेतलेली नाही. पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी, हमाल, मापाडी यांची परवड होत आहे. सरकार डोळ्यावर कातडी ओढून बसल्याने निकराचा संघर्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचे जिल्हा संघटक कृष्णात चौगले यांनी सांगितले. हमाल मापाडी महामंडळाच्या राज्यातील १८ व अधिक केंद्रात धरणे आंदोलने, उपोषण केली जात आहेत. पुण्यामध्ये डॉ. बाबा आढाव ​यांनी, निर्णय लागेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जिल्हा पंचायतीने दसरा चौकात लाक्षणिक उपोषण केले. यावेळी आण्णाप्पा शिंदे, नामदेव बागल, गणपती पाटील, गोरख लेंडवे, संभाजी खांडेकर, विनोद बोरे, सुदर्शन शहाबादी, रुद्राप्पा तेली, लहुदास डोंगरे सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठानगर! आरक्षणासाठी गावाचं नावंच बदललं!

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व अॅट्रॉसिटी बदलासारख्या मागण्यांसाठी मराठा समाजानं मूक मोर्चांच्या माध्यमातून सुरू केलेला संघर्ष आता अधिक व्यापक होऊन ग्रामपंचायतींपर्यंत पातळीवर पोहोचला आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील 'गुंडेवाडी' गावानं ग्रामसभेत ठराव करून गावाचं नावच 'मराठानगर' केलं आहे.

गुंडेवाडी हे गाव खटाव तालुक्यात आहे. या गावाची लोकसंख्या १४०० असून गावात सर्वच लोक मराठा समाजातील आहेत. सरपंच पूनम निकम यांच्या अध्यक्षेखाली गुंडेवाडीची ग्रामसभा झाली. त्यात पांडुरंग निकम यांनी गावचे नाव बदलून 'मराठानगर' असं ठेवण्याचा ठराव मांडला. त्यास अनिल निकम यांनी अनुमोदन दिलं. मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर या ठरावाला एकमुखी संमती देण्यात आली.

काल २ ऑक्टोबरच्या गांधी जयंतीदिनी राज्यातील गावागावांत झालेल्या अनेक ग्रामसभांमध्ये मराठा आरक्षणाचे ठराव करण्यात आले होते. मराठवाड्यांतील जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींनी अशा प्रकारचे ठराव केले. मात्र, साताऱ्यातील गुंडेवाडी गावानं नामांतर करून मराठा आरक्षणाच्या मागणीला वेगळीच धार दिल्याचं बोललं जात आहे.

साताऱ्यात आज भगवं वादळ

मराठी क्रांती मूक मोर्चांची लाट आज साताऱ्यात उसळणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचा मतदारसंघ असलेल्या साताऱ्यातील मराठा मोर्चा विक्रमी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण शहर भगवेमय करण्यात आलं आहे. या मेळाव्याला नेमकी किती गर्दी उसळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात आज मराठा एल्गार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

साताऱ्यात आज, सोमवारी मराठा क्रांती मूक मोर्चा निघणार आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत मोर्चाची लगबग दिसून येत आहे. लाखोंचा मोर्चा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पोवई नाक्यावर अर्थातच शिवतीर्थावर धडक देतील.

अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने शिवतीर्थावर भगवे वादळ कसे घोंगावणार याची उत्सुकता लागून आहे. सातारा शहर भगव्या झेंड्यानी शिवमय झाले असून, माहुली-राजवाडा व शिवतीर्थ-लिंबखिंड या साडेआठ किमीच्या परिघात फक्त आणि फक्त मराठा मोर्चाचीच चर्चा आहे. मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यातील बदल, कोपर्डी प्रकरणातील बलात्काऱ्यांना शिक्षा, शेतीला हमीभाव आदी मागण्यांसाठी निघणाऱ्या या मोर्चाचे काऊंटडाऊन सुरू आहे.

शिवतीर्थावर येणार एकत्र

शहर व ग्रामीण भागातील मोर्चाची माहिती लोकांना देणे त्याचा प्रसार प्रचार करणे त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणे यासाठी स्वयंसेवक अक्षरश: घाम गाळत आहेत. शहरात २१ ठिकाणी स्टेज व एलसीडी स्क्रिन लावण्याचे काम ठिकठिकाणी सुरू होते. रविवारी शहराच्या सहा वेगवेगळ्या भागात स्वयंसेवकांच्या बैठका होऊन मोर्चाच्या तयारीचा पूर्ण आढावा घेण्यात आला. अडीच अडीच हजारांच्या गटांनी स्वंयसेवक साताऱ्याच्या चार दिशेला सक्रिय असून, जिल्हा परिषद मैदानावर विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. दुपारी बाराच्या दरम्यान येथूनच मोर्चाला सुरूवात होणार आहे. या मोर्चासाठी कोरेगाव- सातारा, लिंब-सातारा, शेंद्रे-सातारा, मेढा-सातारा या चारही मार्गाने मोर्चेकरी शिवतीर्थावर पोहोचण्यासाठी धडपडणार आहेत.

चार हजार बॅरिकेड

सुमारे चार हजार बॅरिकेडची सोय करण्यात आली आहे. विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, मोळाचा ओढा, मेढा खिंड, कुरणेश्वर परिसर इत्यादी भागांमध्ये मोकळ्या जागांचा उपयोग करून पार्किंगसाठी त्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहर व उपनगरात पसरलेल्या मोर्चेकरांना पाणी देणे, वाहनांसाठी वाहनतळ उभारून तेथे वैद्यकीय सुविधा देणे, त्यासाठी डॉक्टरांची कमिटी नेमण्यात आली आहे. नियोजनानुसार पाणी वाटप समितीत २४०, स्टेज मॅनेजमेंट साठी १२०, फोटो समिती ४०, पार्किगसाठी १०४, वैद्यकीय सुविधा समितीत ६२, प्रचार-प्रसार समितीत ४८०, स्वच्छता समितीत ११०, जनसंपर्क समितीत ३६० इत्यादी स्वयंसेवकांचा समावेश आहे. या शिवाय सहा हजार युवक व दोन हजार युवती अशा आठ हजार स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे आपली नावनोंदणी मोर्चासाठी केली आहे.

सर्वधर्म व सर्वपक्षीयांचा मोर्चा

कराड : सातारा जिल्ह्यातील विविध संघटनांचा व जाती, धर्मांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. जातीय संघटना, कामगार, व्यापारी, दुकानदार, उद्योजक यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील हिंदू-खाटीक समाज, काँग्रेसची अल्पसंख्यांक संघटना, अखिल महाराष्ट्र वीरशैव तेली समाज, सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन, महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा गुरव समाज संघटना, भोई समाज, पाटीदार समाज, कच्छ कडवा पाटीदार समाज आदींनी पाठिंबा दिला आहे.

कराड परिसरात मोर्चाची लगबग

कराड : सातारा येथे आज, सोमवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या तयारीची लगबग कराड,पाटणसह तालुक्यांतील सर्वच गावे, वाड्या-वस्त्यांवर दिसून येत आहे. तरुणाई व शालेय किशोरवयीन मुलेही शालेय कामकाजातून वेळ काढून मोर्चाच्या तयारीला लागल्याचे चित्र सध्या गावागावांत दिसत आहे. दिवसभर जाण्याची पूर्व तयारी, वाहतूक व्यवस्था, स्टिकर, बॅनरची लगबग तर रात्री गावागावांत नियोजन बैठकांचा धडाका सुरू आहे. सर्वच स्तरांतून मराठा मोर्चाबाबतची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. साताऱ्याला जाण्यासाठी विविध वाहनांसह दोन, चार चाकी गाड्यांसह रिक्षाने जाण्याचीही काहींची तयारी आहे. आपल्या बरोबर कोणी कोणी जायचे, किती कार्यकर्ते, मुली, महिलांना सोबत न्यायचे तसेच शालेय किशोरवयीन तसेच लहान मुलांचीही या मोर्चासाठी लगबग सुरू झाली आहे. यासाठी अनेक प्रकारचे नियोजन सध्या ग्रामीण भागात घराघरांमध्ये केले जात आहे. मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. कराड-पाटण आणि सातारा तालुक्याच्या दक्षिणेकडील बोरगावच्या बाजूकडून येणाऱ्यां वाहनांना शाहूनगरमध्ये पार्किंग व्यवस्था केली आहे. शिवराज पेट्रोलपंप, हॉटेल मराठा पॅलेस मार्गे ही वाहने सातारा शहरात जातील व त्यांच्यासाठी शाहूनगरमध्ये जागा आरक्षित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाख, लाख मराठा... अवघा सातारा रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

आरक्षण, कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी व अॅट्रॉसिटी बदलासारख्या मागण्यांसाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात उसळलेली मराठा क्रांती मोर्चाची महालाट आज 'मराठ्यांची राजधानी' अशी ओळख असलेल्या साताऱ्यात थडकली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या साताऱ्यातील मोर्चाला प्रचंड गर्दीत दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. छातीवर शिवरायांचे बिल्ले, डोक्यात भगवे फेटे आणि हातात भगवे झेंडे घेतलेल्या मावळ्यांच्या गर्दीचा प्रवाह साताऱ्यात लोटला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे वास्तव्य असलेल्या साताऱ्यातील मराठा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून लाखोंच्या संख्येनं चाकरमानी काल रात्रीच साताऱ्यात पोहोचले होते. घरांना टाळे लावून जिल्ह्यातील गावा-गावांतून एसटी, वडापच्या गाड्या पकडून लोक साताऱ्यात आले होते. महिला व तरुणी मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. शहरातील शेकडो तरुणींनी बाइकरॅलीद्वारे मोर्चात सहभाग नोंदवला. साताऱ्याकडं येणारे सर्व रस्ते भगव्या झेंड्यांनी फुलून गेले होते. सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images