Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

३० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधात विविध पक्ष, संघटनांकडून होणारी आंदोलने, त्याच प्रमाणे मराठा समाजासाठी आरक्षण लागू करावे व अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करावा या मागणीसाठी मराठा समाजाचा १५ऑक्टोबर रोजी नियोजित मोर्चा तसेच सरकारने अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करू नये यासाठी दलित समाजाच्यावतीने घेण्यात येणारी भूमिका आणि प्रतिमोर्चा काढण्याचे नियोजन या अनुषंगाने दोन्ही समाजाच्यावतीने ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

१ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरु होत असल्याने या उत्सव व आंदोलन या घटनांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी ३० सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत विविध वर्तनास मनाई आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्रे, बंदुका, सोटा, तलवारी, भाले, सुऱ्या, लाठी अगर काठी किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्याही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रह पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड वा तत्सम शस्त्रे साठविणे अगर सहज फेकून त्याचा मारण्यासाठी उपयोग करणे, व्यक्ती, अगर त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन आणि दहन करणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे आणि वाद्ये वाजविणे, असभ्य हावभाव करणे, शांततेस आणि कायदा सुव्यवस्थेस बाधा येईल अगर कोणताही जिन्नस तयार करणे व त्याचा प्रसार करुन उपयोग करणे, जमाव जमण्यास, मिरवणुका काढणे व सभा घेणे आदींसाठी मनाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पट्टणकोडोलीची बिरदेवयात्रा २० ऑक्टोबरपासून

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले



महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांत प्रसिध्द असलेल्या पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस २० ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. याच दिवशी फरांडेबाबांची प्रसिध्द भाकणूकही होणार आहे. पट्टणकोडोली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत समस्त धनगर समाज, पुजारी , हेगडे, बोते, मानकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

अनंत पौर्णिमेच्या दिवशी कर्नाटकातील संकेश्वर, बूदनूर येथील शेकडो हेगडे बांधव पायी चालत पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा कार्यक्रम ठरविण्यासाठी दरवर्षी येतात. याही वर्षी परंपरेनुसार हेगडे बांधवांनी आणलेल्या मानाच्या दुधाच्या घागरी येथील भानस मंदिरात अर्पण केल्या. यावेळी घागरीतील दूध उतू घालवण्याचा पारंपारिक धार्मिक कार्यक्रमही पार पाडण्यात आला. त्यानंतर श्री विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शन घेवून येथील ग्रामपंचायत कार्यालयात यात्रा कार्यक्रम ठरविण्यासाठी हेगडे बांधव जमले. गेल्या अनेक वर्षांपासून यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करणारे दिनकर जोशी हे मयत झाल्याने त्यांच्या जागी त्यांचा मुलगा नंदकुमार जोशी यांना यात्रेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्याचा मान देण्यात आला. यावेळी हेगडे, बोते बांधवांनी आपल्या समस्या मांडल्या.

सरपंच खाना अवघडे, ग्रामसेवक शिवाजी कांबळे यांनी हेगडे, बोते बांधवानी केलेल्या सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावाणी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यात्रा काळात येणाऱ्या भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नसल्याचे समस्त धनगर समाज कमिटी मार्फत सांगण्यात आले.

यावेळी प्रकाश पाटील, ग्रामसेवक शिवाजी कांबळे, सरपंच खाना अवघडे, माजी सरपंच महेश नाझरे, ओमा पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत गंगाराम पुजारी यांनी केले.

चौकट

मुश्रीफ सोडून निषेध

निमंत्रण पत्रिकेत आमदार हसन मुश्रीफ, ए.वाय. पाटील यांचे नाव होते. मात्र दोघेही कार्यक्रमाला गैरहजर राहिले. हा संदर्भ घेत संयोजक नितीन पाटील प्रास्ताविकात म्हणाले, 'आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहे. पण काहीजण आमच्यावर टीका करत आहेत. पक्षातील काहीजण जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत. आमदार मुश्रीफ सोडून अन्य लोकांचा ‌मी निषेध करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉरिडॉरमधून कोल्हापूर वगळू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बेंगळुरू - मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून कोल्हापूरला कोणत्याही परिस्थितीत वगळू देणार नाही. याविषयावर जिल्ह्यातील उद्योगकांसोबत किंबहुना त्यांचा पुढे राहू', अशी ग्वाही रविवारी सर्वपक्षीय नेत्यांनी विशेष बैठकीत दिली. कॉरिडॉरसाठी प्रादेशिक आराखड्यात इंडस्ट्रियल झोन असणे आवश्यक असल्याने या संदर्भातील माहिती घेण्यासाठी उद्या (ता. १९ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता बैठक घेण्यावरही सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले. कॉरिडॉर सांगली, सोलापूर जिल्ह्यातून नेऊन कोल्हापूरला वगळल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील औद्योगिक संघटनांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलविली होती. शिरोली एमआयडीसीतील स्मॅक भवनात ही बैठक झाली.

दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैन यांच्यासह प्रादेशिक आराखडा तयार करणारे नगररचना विभागाचे उपसंचालक एम. आर. खान यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. त्यानंतर मंगळवारी (ता. २० सप्टेंबर) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुंबईत बैठक घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीला लोकप्रतिनिधींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेंगळुरू - मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये (बीएसईसी) सुरुवातीला कोल्हापूरचा समावेश होता. राज्य सरकारने ऐनवेळेला कॉरिडॉरचा फायदा सांगली जिल्ह्याच्या पूर्वभागातील दुष्काळी पट्ट्याला देण्याचे कारण दाखवत कोल्हापूरला यातून वगळले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून घोषणा केली होती. तसेच प्रादेशिक आराखड्याच्या बैठकीतही विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी कॉरिडॉर कोल्हापुरातून होणार नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर 'स्मॅक', 'गोशिमा', 'मॅक', 'कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन' या औद्योगिक संघटनांनी लोकप्रतिनिधींना या विषयाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी बैठक बोलविली होती. 'स्मॅक'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन बैठकीचे समन्वयक होते. बैठकीस खासदार धनंजय महाडिक यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

स्मॅकचे अध्यक्ष जैन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, 'दुष्काळी भागाचा विकास होऊ नये, अशी आमची भूमिका नाही. पण, कोल्हापूरच्या काही भागांचा अजूनही विकास झालेला नाही. येथील औद्योगिक क्षेत्राच्या विकासालाही अजूनही खूप संधी आहे. असे असताना कोल्हापूरची संधी हिरावून घेतली जाऊ नये.'

आमदार सतेज पाटील यांनी कॉरिडॉर केवळ तांत्रिक उद्योगांसाठी नसून, जिल्ह्यातील शेती पुरक उद्योगांनाही फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले. 'जिल्ह्यासाठी खूप मोठी संधी असल्याने कोल्हापूरच्या समावेशासाठी राजकीय पाठबळ महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कॉरिडॉरबरोबरच त्यांनी विजेच्या दरांमुळे भविष्यात येथील उद्योजकांना स्पर्धेला तोंड द्यावे लागणार असल्याचा मुद्दाही उपस्थित केला.

आमदार मुश्रीफ यांनी, दोन्ही नेत्यांच्या माहितीमधील विसंगतीचा संदर्भ देत याचा छडा लावण्याचे आवाहन उपस्थित उद्योजक आणि नेत्यांना केले. त्यासाठी प्रादेशिक आराखड्यातील आरक्षणांची माहिती घेण्यासाठी उपसंचालक खान यांच्याकडून माहिती घेण्याची सूचना केली. आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे विदेश दौऱ्यावर असल्याने या संदर्भात उद्योगमंत्र्यांची मंगळवारी (२० सप्टेंबर) वेळ घेण्याची ग्वाही दिली. त्याला उपस्थितांनी तयारी दर्शविली. आमदार मिणचेकर यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व विषय समजावून सांगण्याची गरज असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी, 'शेतकरी संघटना या विषयात दांडके आणि बुडक्यासह उद्योजकांच्या पाठिशी आहे' असे सांगितले.

खासदार म्हणतात... कोल्हापूरला वगळलेले नाही

खासदार महाडिक यांनी 'कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश आहे. तो सांगली जिल्ह्यातून वळविल्याची केवळ अफवा आहे' असा दावा केला. त्यावर सुरेंद्र जैन यांनी प्रादेशिक विकास आराखड्यातील बैठकीत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या माहितीचा दाखला दिला. वाहतूक तज्ज्ञ विनायक रेवणकर यांनीही विकास आराखड्यात इंडस्ट्रीयल झोन दाखविण्यात आला नसल्याचे सांगितले. तसेच फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या कात्रणांचे दाखले दिले. त्यावर खासदार महाडिक यांनी दिल्लीत घेतलेल्या भेटींचा दाखला देत कॉरिडॉरमधील शहरांची नावे कळविण्याविषयी राज्य सरकारांना अद्याप सूचनाच मिळाल्या नसल्याचे सांगितले. तसेच कोल्हापूर वगळले जाणार नाही, याची दक्षता घेऊन कोणत्याही परिस्थितीत असे होऊ देणार नसल्याचे आश्वसन दिले.

'मटा'चा पाठपुरावा

जिल्ह्यातील उद्योगांचा विकास व्हावा, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने सातत्याने पुढाकार घेतला आहे. गेल्या २६ ऑगस्टला 'मेक इन कोल्हापूर' या विषयावर 'मटा कॉन्क्लेव'चे आयोजन केले होते. त्यातही प्रमुख पाहुणे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यापुढे कॉरिडॉरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रापुढील समस्यांना वाचा फोडण्यात आली होती. या पाठपुराव्यानंतरच कॉरिडॉर संदर्भातील चर्चेला चालना मिळाली.


असा ठरला अजेंडा

- कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर वळवू दिला जाणार नाही

- सोमवारी (१९ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बैठक

- मंगळवारी (२० सप्टेंबर) उद्योगमंत्र्यांची मुंबईत भेट घेणार

- मंगळवारच्या भेटीसाठी उद्योजक, लोकप्रतिनिधी मुंबईला जाणार

- कोल्हापूरला वगळण्यासाठी दिलेली कारणे खोडून काढणार

- यासाठी तज्ज्ञांच्या अभ्यास समितीची स्थापना

- कोल्हापूरच्या जमेच्या बाजूही उद्योगमंत्री, मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉरिडॉरसाठी उद्योजकांसोबत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, को्हापूर
मुंबई-बेंगळुरू इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची रविवारी तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी कोणत्याही परिस्थिती कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले जाणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही सर्व लोकप्रतिनिधींनी दिली.

कोल्हापूरचा समावेश होणारच

कॉरिडॉरचा विषय माझ्या प्राधान्यक्रमात आहे. यासंदर्भात मला सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉरिडॉरचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यासाठी कर्नाटक सरकारने सहा आणि महाराष्ट्र सरकारने चार शहरांची नावे केंद्र सरकारला द्यावयाची आहेत. अजून दिल्लीकडून यासंदर्भात राज्य सरकारना पत्र आलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारने अद्याप आपल्याकडील शहरांची नावे दिली नसल्याने कोल्हापूरचा या कॉरिडॉरमध्ये समावेश होईल. महाराष्ट्रातून नावे पाठविताना जर कोल्हापूरचे नाव नसेल किंवा दिल्लीला नावे कळविल्यानंतर कोल्हापूरचे नाव वगळण्यात आले, तर आपण निश्चितच या विरोधात आंदोलन उभे करू. या संदर्भात तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत ब्रिजेशकुमार शर्मा यांची भेट घेतली होती. त्यांनी मुंबई-दिल्ली कॉरिडॉरचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे बेंगळुरू-मुंबईचे काम सुरू होण्यास खूप उशीर आहे, असे सांगितले. त्यासंदर्भात मी बारीक लक्ष ठेवून आहे. या संदर्भातील १५ ऑक्टोबरचा अहवालदेखील माझ्याकडे आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. त्यामुळे मी या संदर्भात मेलवरून माहिती मागविली आहे. त्यात अजूनही कोल्हापूरचे नाव आहे. त्यामुळे कॉरिडॉर कोल्हापूरऐवजी सांगली जिल्ह्यातून वळविण्यात आल्याची केवळ चर्चा आहे. कॉरिडॉरचा मुख्य उद्देशच हायवेला संलग्न असा आहे. पोर्ट कनेक्टिविटी, एअर कनेक्टिविटी, रेल्वे, रस्ते या सगळ्यात आपण उजवे आहोत. तरीही जर, कोल्हापूरला यातून वगळले, तर आपण निश्चितच त्या विरोधात लढा उभारू. जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी कार्यक्षम आणि सक्षम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर कोल्हापूर वगळून जाणार नाही, याची ग्वाही देतो.

- धनजंय महाडिक, खासदार


'वेस्टर्न घाट'वर समितीची गरज

बेंगळुरू-मुंबई हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. या संदर्भात एजीएस कंपनीने या भागाचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल त्यांनी राज्य सरकारला जमा केला आहे. त्यात कॉरिडॉर सातारा, सांगली ते बेळगावला वळविण्यात आल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात कोल्हापूरचे नाव न घेता वेस्टर्न घाटातील जैवविविधतेचा उल्लेख केला आहे. मुळात मुंबई-दिल्ली कॉरिडॉरमध्येही राजीव गांधी नॅशनल पार्कमधील ५८ हेक्टर जागा येते. त्याला आक्षेप घेतलेला नाही. चेन्नई आणि बेळगाव येथेही वेस्टर्न घाटाचा विषय आहे. मात्र, कोल्हापूरच्या हायवेपासून पश्चिम घाटातील जैवविविधता काही किलोमीटर दूरवर असताना हा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला आहे. नाही कसे होणार, हे सांगण्यासाठी अधिकारी कायम पुढे असतात त्यामुळे त्यांना तांत्रिक बाबींवर योग्य प्रतिवाद करण्यासाठी आपल्याकडील एक अभ्यासू समिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढता येईल. अशा पद्धतीनेच आपण हे काम करून घेऊ शकतो. जागेचा विषय काढलाच तर विकासवाडीतील ७७ हेक्टर जागा आपल्याकडे उपलब्ध आहे. या विषयामध्ये राजकीय ताकद वापरली, तरच आपण यातून मार्ग काढू. या विषयावर फेब्रुवारीत राज्यसभेमध्ये चर्चा झाली आहे. बेंगळुरू-मुंबई कॉरिडॉरचा अंतिम प्रारूप आराखडा सादर केल्याचे म्हटले आहे. यातील कागदपत्री टप्पा झाला आहे. आता आपले सहा महिने वाया गेलेले आहेत. त्यामुळे या विषयावर आता अधिकवेळ न घालवता येत्या आठ ते दहा दिवसांतच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांची भेट घ्यावी.

- सतेज पाटील, आमदार

कॉरिडॉरसाठी आम्ही सोबत

मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले असेल, तर हा फार मोठा अन्याय आपल्यावर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण मंदीच्या फेऱ्यात आहोत. वीज दरवाढीचा मुद्दा आहे. त्याला धरून कर्नाटकात स्थलांतरित होण्याचा विषय पुढे आला. विजेबाबत आपल्याला ओपन अॅक्सेसमध्ये जाण्याची परवानगी दिली होती, पण आपण वीज मंडळावर अवलंबून राहिलो. सध्या सरकारकडे वीज शिल्लक आहे. तरीही आपल्याला महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. कॉरिडॉर कोल्हापुरातून जाणार नसेल तर आपण सातत्याने किती अन्याय सहन करायचा? त्यामुळे या कॉरिडॉरसाठी आपण, जी जी पावले उचलाल, त्याला आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत तुमच्या पुढे असणार आहोत. जमिनीच्या किमती आपल्याकडे जास्त आहेत. तसेच इको झोन किंवा पश्चिम घाटातील जैवविविधता याचीही भीती ते दाखवत असतील. पण, इतर कॉरिडॉरमध्ये इको झोनचा समावेश असेल, तर कोल्हापूर निश्चितच अन्याय होत आहे. कागल एमआयडीसी होताना साडेतीन हजार एकर जमिनी एकाही शेतकऱ्याने तक्रार न करता दिली. प्रादेशिक नियोजन आराखड्यात कॉरिडॉरसाठी जर जमिनी आरक्षित ठेवलेल्या नसतील, तर कोल्हापूर प्रादेशिक आराखड्याचे उपसंचालक एम. आर. खान यांच्याशी चर्चा करून याबाबत माहिती घेतली पाहिजे. जर इंडस्ट्रीसाठी आरक्षण नसेल, तर खूप अवघड परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे प्रादेशिक आराखड्यात इंडस्ट्रीसाठी जागा आरक्षित केल्या पाहिजेत, झोन केले पाहिजेत.

- हसन मुश्रीफ, आमदार

उद्योगमंत्र्यांशी भेट घेऊ

कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश होण्यासाठी मोठा जोर लावला पाहिजे. विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी सांगितल्यानुसार कॉरिडॉरमध्ये समावेश नसल्यानेच इंडस्ट्रीसाठी आरक्षण ठेवलेले नाही. यात पहिला इंडस्ट्रीयल झोनिंगबाबत निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील चार दिवस परदेश दौऱ्यावर आहेत. मात्र, आपण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुंबईत भेट घेऊ. त्यासाठी आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सोबत घेऊ. आपण सांगत असाल, तर मंगळवारसाठी मी उद्योगमंत्र्यांची मुंबईत वेळ घेतो. प्रादेशिक आराखडा २१ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. तत्पूर्वी २० सप्टेंबरला मुंबईत उद्योगमंत्री देसाई यांची आपण सगळ्यांनी मिळून भेट घेतल्यास ती बैठक महत्त्वाची ठरेल आणि सकारात्मक हालचाली होतील.

- राजेश क्षीरसागर, आमदार


मुख्यमंत्र्यांना महत्त्व पटवून देऊ

आमदार सतेज पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वेक्षण केलेल्या एजीएस कंपनीचा अहवाल आहे. त्यात कोल्हापूरचा समावेश नाही. आता आपण कॉरिडॉरमध्ये कोल्हापूर आहे की नाही, या वादात न पडता या विषयात पुढे गेले पाहिजे. यासंदर्भात तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटू आम्हाला कॉरिडॉरमधील समावेश हवा असल्याचे सांगितले पाहिजे. तत्पूर्वी आपण मंगळवारी उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊ शकतो. मुळात ज्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून हा कॉरिडॉर वळविण्यात आला आहे, तेथून पोर्ट, विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग दूर आहे. या गोष्टी आपण मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्या तर मुख्यमंत्री निश्चितच या विषयावर सकारात्मक विचार करतील.

- डॉ. सुजित मिणचेकर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या दमदार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने राधानगरी, कासारी आणि कुंभी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी दोन फुटाने वाढली. पात्रातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरीतून पाच हजार क्युसेक्स विसर्ग सुरू झाला असून रविवारी रात्री पंचगंचेची पाणी पातळी साडेअठरा फुटांवर गेली. गेले दोन दिवस तुरळक झालेला पाऊस रविवारी धरणक्षेत्रात दमदार बरसला. सर्वांधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ५७ मिलिमीटर झाला. पन्हाळा तालुक्यात १७.८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १२ तालुक्यात १४६ मिलीमीटर आणि सरासरी १२.१८ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून ५ हजार ५ क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. त्यासह कासारीतून १००८, कुंभीतून ३५० क्युसेकस विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.

कोयनेचे सहा दरवाजे उचलले

पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या जोरदार पावसाने कोयना धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी ६.४५ वाजता ६ फुटांवर उचलण्यात आले. सध्या धरणातून ५६, ७७० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२६ टीएमसी असून, सध्या १०५.३६ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. पाण्याची आवक धरणाचे दरवाजे आणखी उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या कोल्हापूरचे पहिले पाऊल

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet: @anuradhakadamMT

कोल्हापूर ः कोल्हापूर बदललंय असं जरी आज आपण म्हणत असलो तरी कोल्हापूरचं ते रांगडं चित्र बदलण्याचं पहिलं पाऊल ठरलेल्या भक्तिपूजानगर या सोसायटीने दहा वर्षापूर्वीच ही बदलाची कास धरली. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये दिसणाऱ्या टाउनशिपबद्दल कोल्हापूरकरांच्या मनात असलेली उत्सुकता दूर करण्याचं श्रेय नक्कीच भक्तिपूजा या टाउनशिपला जातं. शहरापासून हाकेच्या अंतरावर तरीही शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या भक्तिपूजानगरने बदलत्या कोल्हापूरचा श्रीगणेशा केला. दहा वर्षांच्या काळात कोल्हापुरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वसाहती, कॉलनी, सोसायटी उभ्या राहिल्या असल्या तरी मंगळवारपेठेच्या शेवटच्या टोकाला असलेल्या भक्तिपूजानगरने शहर आणि उपनगर यांचा सुवर्णमध्य साधला आहे.

मंगळवारपेठेतील बेलबाग ओलांडल्यानंतर पद्मावती मंदिरापासून डाव्या बाजूचे वळण घेतले की, अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसर असलेल्या पद्मावतीनगर परिसरात भक्तिपूजानगरचा डोलारा लक्ष वेधून घेतो. या सोसायटीच्या एका बाजूला जयप्रभा स्टुडिओसारखी कोल्हापूरची ओळख सांगणारी वास्तू, तर दुसऱ्या बाजूला आयटीपार्कचा परिसर. भक्तिपूजानगर ओलांडले की, कोल्हापूरच्या उपनगरांकडे जाणारी वाट सुरू होते. आजूबाजूला सुरू, आंबे, नारळ यांची झाडे असल्यामुळे निसर्गसौंदर्य आणि गारवा या दोन्ही सुखामुळे हा परिसर आल्हाददायक वाटतो.

अशा परिसरात सन २००२ मध्ये भक्तिपूजानगर या नव्या संकल्पनेवर बेतलेल्या उपनगराचे भूमिपूजन झाले. शहरातील पूजा बिल्डर्स या बांधकाम कंपनीने या जागेची निवड करताना टाउनशिप उभारण्याचा विचार आजच्या काळाला स्तुत्य होता याची प्रचिती आज येते. कोल्हापुरात अपार्टमेंटचे स्वरूप बदलत होते. अपार्टमेंटचा ऐसपैसपणा वाढत होता. इतकेच नव्हे तर जुन्या कोल्हापुरातही कौलारू घरांच्या जागी इमारती उभ्या राहत होत्या. मात्र, या पंक्तीतही भक्तिपूजानगरचे वेगळेपण होते ते टाउनशिपचे. पाचमजली तीन अपार्टमेंट आणि ४० बंगले असे डिझाइन तयार झाले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तीन वर्षांत कोल्हापुरातील पहिली टाउनशिप भक्तिपूजानगर या नावाने आकाराला आली.

भक्तिपूजानगरमध्ये प्रवेश केला की, चकचकीत स्वच्छ अंतर्गत रस्ते, दुतर्फा टुमदार दुमजली बंगले, डाव्या बाजूला अपार्टमेंट, मध्यभागी मुलांसाठी बाग, दोन मंदिरे, क्लब हाउस, स्वीमिंग पूल, ज्येष्ठांसाठी वॉकिंग ट्रॅक अशी प्रत्येक सुविधा करण्यात आली आहे. एकदा गेटच्या आत आले की, सर्व काही या कॉलनीमध्येच अशी रचना असलेल्या भक्तिपूजानगरची आखीवरेखीव मांडणी लक्ष वेधून घेते. दैनंदिन स्वच्छता, सुरक्षितता याकडे वि​शेष लक्ष दिले जाते. मनोरंजन, सामूहिक सणसमारंभ यामुळे भक्तिपूजानगरमध्ये नेहमीच चैतन्यदायी वातावरण असते. जैन मंदिर आणि अंबाजी मंदिर येथे सतत विविध उपक्रम आयो​जित केले जातात. महिला, युवक एकत्र येऊन विविध कार्यक्रम सादर करतात.


फक्त शाकाहारी

भक्तिपूजानगर ही कोल्हापुरातील पहिली टाउनशिप अशी सोसायटीची ओळख आहेच, पण या कॉलनीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे या नगरात राहणारे प्रत्येक कुटुंब शाकाहारी आहे. शाकाहारी असलेल्यांना अनेकदा शेजारच्या घरांमधून मांसाहाराचा दर्प सहन होत नाही. त्यामुळे ही कॉलनी वसवतानाच फक्त शाकाहारी असलेल्या कुटुंबांनाच प्राधान्य देण्यात आले.

भक्तिपूजानगरातील प्रसिद्ध व्यक्ती

उद्योजक ललित गांधी, बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, प्रमोद ढोले, सुभाष नियोगी, मोहनलाल ओसवाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर भक्तिपूजानगरमधील स्थानिक नागरिक आहेत.


सुविधा आणि सुरक्षितता यादृष्टीने भक्तिपूजानगर सोसायटी अतिशय चांगली आहे. बहुतांश जैन, गुजराथी, मारवाडी समाजातील कुटुंबे येथे राहतात. त्यामुळे सण, समारंभ, धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून एकमेकांशी चांगल्याप्रकारे जोडले आहेत. कोल्हापूरच्या बदलत्या राहणीमानाची नांदी म्हणून भक्तिपूजानगर सोसायटीचा उल्लेख केला जातो.

महेंद्र ओसवाल, स्थानिक नागरिक


राजर्षी शाहू महाराजांनी शाहूपुरी, राजारामपुरी या वसाहती वसवल्या तेव्हा त्यांच्या डोक्यातही एक आखीव मांडणी असलेल्या वसाहतीचे चित्र होते. भक्तिपूजानगरमध्ये आल्यानंतरही अशाच प्रकारचा अनुभव येतो. सोसायटीतच दोन मंदिरे आहेत. त्यामुळे वातावरण प्रसन्न ठेवणारे धार्मिक उपक्रम सातत्याने होतात. सर्व सुविधांमुळे महिला, लहान मुले, युवक यांच्यासाठी सुरक्षित कॉलनी आहे.

प्रदीप ओसवाल, सोसायटी सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा लाखांचा मोर्चा काढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला त्वरीत आरक्षण मिळालेच पाहिजे, 'कोपर्डी' घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजातील १५ लाख लोकांच्या सहभागाने मूक मोर्चा काढण्याचा निर्धार रविवारी झालेल्या नियोजन बैठकीत करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघेल. या मोर्चात मराठा समाजातील नागरिकांनी शिक्षणसंस्था, उद्योग, व्यवसाय, दवाखाने बंद करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. मराठा क्रांती महामोर्चाच्या नियोजनासाठी मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओनजीकच्या शुभंकरोती हॉलमध्ये ही बैठक झाली. यावेळी हजारो मराठा बांधवांनी उपस्थिती लावून एकीची वज्रमुठ दाखवली. मोर्चासाठी ३० लाख रुपयांचा निधी यावेळी जाहीर झाला.

मोर्चात मनोगत व्यक्त करण्यास उभे राहिलेल्या अनेक वक्त्यांनी निधी जाहीर केला. मोर्चासाठी कोणत्याही स्थिती आर्थिक अडचण येऊ देणार नाही, असा निर्धार केला. तासाभरात सुमारे तीस लाख रुपयांचा निधी जमा झाला. मोर्चावेळी वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांचा पुरवठा करण्याचीही घोषणा करण्यात आली. मोर्चात अधिकाधिक लोकांचा सहभाग होण्यासाठी सोशल मीडिया आणि कोपरा सभा घेण्याचे नियोजनही करण्यात आले. हिंगोलीसारख्या लहान जिल्ह्यात आठ लाख मराठा समाज एकत्र होतो. मग कोल्हापूर जिल्ह्यात दुप्पट संख्येने मोर्चा काढत राज्यात सर्वाधिक संख्येचा मोर्चा काढू असा निर्धार यावेळी करण्यात आला.

सत्तेवर येऊन दोन वर्षाचा कालावधी होऊनही भाजप-सेना सरकार मराठा आरक्षणावर निर्णय घेत नसल्याने सर्वच मराठा संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाला जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याने सर्वांत प्रथम १५ जुलै रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषद घेवून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्व मराठा संघटनांची बैठक गुप्त बैठक पुण्यात झाली. या बैठकीत सर्व राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रमुख पाच मागण्यांसह राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. समाजाच्या मागणीला प्रथम गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सुरुवात झाली. मोर्चाची दखल न घेतल्यास सरकार उलथवून टाकण्याची धमक आहे अशा भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. मोर्चाच्या नियोजनासाठीच्या या बैठकीला लोकप्रतिनिधींनीची मोठी उपस्थिती होती. खासदार संभाजीराजे छत्रपती, धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, संध्यादेवी कुपेकर, सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, के. पी. पाटील, प्रकाश आवाडे, बजरंग देसाई, भरमू पाटील, माजी खासदार निवेदिता माने, उद्योजक चंद्रकांत जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

निधीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची

बैठकीदरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी मोर्चासाठी भरघोस निधी जाहीर केला. मात्र, 'नियोजन समितीला निधीची अपेक्षा नाही. सर्व लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर आले हीच जमेची बाजू आहे. या सर्व लोकप्रतिनिधींनी लोकसभा आणि विधानसभेत कायदेशीर बाजू मांडून आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा. अशा जबाबदार लोकप्रतिनिधींची हत्ती - घोड्यावरुन मिरवणूक काढू' असे राजू सावंत यांनी सांगितले.

क्रांती मोर्चाचा मार्ग

१५ ऑक्टोबर रोजी मोर्चाला सकाळी दहा वाजता गांधी मैदान येथे मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चा तेथून खरी कॉर्नर - महाद्वार रोड - पापाची तिकटी - पापाची तिकटी - शिवाजी रोड - बिंदू चौक - दसरा चौक - व्हिनस कॉर्नर - बसंत बहार टॉकिज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असेल. मराठा समाजातील पाच मुली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील असे यावेळी ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाचा आज सोलापुरात एल्गार

$
0
0

सोलापूर : सोलापुरात आज, बुधवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात 'एक मराठा लाख मराठाचा एल्गार' दिसून येणार आहे. किमान आठ ते साडेआठ लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुमारे १२ लाख बांधव येतील असा अंदाज संयोजकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी संपूर्ण शहर अघोषित बंद राहणार असून, या मोर्चामुळे सोलापुरात येणाऱ्या सर्व मार्गांवरील जड वाहतुकीला एक दिवसाचा ब्रेक देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी दहा वाजता जुना पुना नाका येथे मोर्चाला सुरुवात होणार आहे. दुपारी होम मैदानावर मोर्चाचा समारोप होणार आहे. या संपूर्ण मूकमोर्चाचे नियोजन पाच युवतींकडे असून, सुमारे ६ हजार स्वयंसेवकांची टीम तैनात करण्यात आली आहे. युवक स्वयंसेवकांना मावळे आणि युवती व महिलांना हिरकणी असे संबोधले जाणार आहे.
दरम्यान, होम मैदानावर भव्य मंच उभारण्याबरोबरच शौचालये तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्यासह उपमहापौर प्रवीण डोंगरे तसेच परिवहन सभापती राजन जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे आदी तयारीवर लक्ष ठेवून आहेत. होम मैदानाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून, मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. शहरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे, विजापूर, तुळजापूर, बार्शी, मंगळवेढा, होटगी, हैदराबाद, अक्कलकोट या मार्गांवरून येणारी अवजड वाहने बाहेरच थांबवली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूळगाव पूल पाण्याखाली

$
0
0

कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पाटण परिसरामध्ये सोमवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला. मात्र, धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे पाटणजवळील मूळगाव सह तालुक्यातील तीन पूल पाण्याखाली गेले. अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
कोयनानगर धरणात पाण्याची जास्तीची आवक होत असल्याने धरणाचे सहाही वक्र दरवाजे सहा फुटांवरच स्थिर ठेवण्यात आले आहेत. धरणातून ५५,२७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरूच आहे. कोयना धरणात सध्या १०४ टीएमसी पाणीसाठा आहे. सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत कोयनानगर येथे ७, नवजा येथे ३७, महाबळेश्वरला १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारपासून धरणातू पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी शिवसागर जलाशयात अद्याप ४१,०१४ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना नदीला पूर आल्याने मूळगाव, संगमनगर (धक्का) व निसरे येथील फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. मूळगाव येथील पूल रविवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने मुळगावकडे जाणारी दुधाची व इतर वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे तर कोयना धरणाच्या पाणी सोडण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे कोयना नदीकाठावरील शेतीपंपदेखील पाण्याखाली गेले आहेत.

सजगतेचा इशारा

हवामान खात्याने येत्या ४८ तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने व सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरणातील पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदी काठांवरच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्य विद्यापीठ काळाची गरज

$
0
0

कराड : 'शहरी व ग्रामीण भागातील शिक्षणाची दरी दूर करण्यासाठी कौशल्य विकास विद्यापीठ ही काळाची गरज आहे. असे विद्यापीठ उभारणीसाठी आदरणीय पी. डी. पाटील प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा,' असे प्रतिपादन पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी येथे केले.
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते मुजुमदार यांना प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
डॉ. मुजुमदार म्हणाले, '१९९१ मध्ये आर्थिकदृष्ट्या क्रांतिकारक पावले उचलली गेली, पण अद्याप देशात शिक्षण क्षेत्राला स्वातंत्र्य मिळालेले नाही. शिक्षण क्षेत्रात शासनाचा होणारा प्रचंड हस्तक्षेप हा मोठा असून शिक्षणामधून क्रांती अपेक्षित आहे. त्यासाठी संस्कार व ज्ञानाच्या बरोबर पाश्चिमात्य विज्ञानाचा मिलाफ असणे गरजेचे आहे. आज जगात भारतात युवाशक्ती मोठ्या प्रमाणावर असून त्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिले तरच ही पिढी योग्य रीतीने वाटचाल करेल.'
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, 'पुणे हे विद्येचे माहेर घर असले तरी डॉ. मुजुमदार यांनी शिक्षणामध्ये सर्वार्थाने क्रांती केली.'
आमदार बाळासाहेब पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांची भाषणे झाली. मुकुंद कुलकर्णी यांनी मानपत्र वाचन केले. प्रा. श्रीकृष्ण जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाला मुस्लिमांचा पाठिंबा

$
0
0

कराड : सातारा येथे ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला मुस्लिमांसह हिंदू एकता आंदोलन, रामोशी समाज, देवांग कोष्टी समाज आदींना पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
मुस्लिम समाजाबरोबरच अखिल महाराष्ट्र बेडर रामोशी समाज कृती समिती,देवांग कोष्टी समाज,बिल्डर असोसिएशन,तालुका बेरोजगार असोसिएशन तसेच हिंदू एकता आंदोलन यांनीही आपला पाठिंबा दिला आहे.
मराठा समाज क्रांती मोर्चासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून जिल्ह्यातील मराठा समाज प्रथमच एकवटला आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, पुसेगाव येथे मराठा मोर्चा कार्यालये उभारण्यात आली आहेत. तसेच विविध ठिकाणी पंचक्रोशीतील मराठा बांधवांची बैठक घेण्यात येत आहेत. मराठा समाजासाठी एक दिवस देण्याच्या उद्देशाने मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, वडाप जीप, रिक्षा यासह विविध तीन-चारचाकी गाड्या विनामोबदला देणार असल्याचे अनेकांनी सांगितले.
मोर्चाच्या प्रचारासाठी रिक्षा, जीपगाडी, पदयात्रा याचबरोबर सोशल मीडियाचाही मोठा वापर करण्यात येत आहे. वाहनांवर झेंडे लावण्याबरोबरच चारचाकी वाहनांवर मराठा समाज मोर्चाची चित्रे,स्टिकर्स काढण्यात आली आहेत. गांधी टोप्याही बनविण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा गलांडेंवर अंत्यंसंस्कार

$
0
0

सातारा : जम्मू-काश्मीर मधील उरी येथे रविवारी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जाशी (ता. माण) येथील लान्स नाईक चंद्रकांत शंकर गलांडे यांच्या पार्थिवावर मंगळवारी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जय, चंद्रकांत गलांडे अमर रहे, शहीद तेरा बलिदान व्यर्थ न होगा, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला.
गलांडे यांचे पार्थिव पुण्याहून सोमवारी मध्यरात्री बारा वाजता सातारा येथे लष्कराच्या वाहनाने आणण्यात आले. साताऱ्यात सैनिक कल्याण अधिकारी कर्नल राजेंद्र जाधव, दादासाहेब जमदाडे यांनी मानवंदना दिली. तेथून पार्थिव गोंदवलेमार्गे जाशी येथे मंगळवारी सकाळी पावणेनऊ वाजता आणण्यात आले. फुलांनी सजविलेल्या लष्करी वाहनांतून अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांना अंत्यदर्शन घेता यावे यासाठी काही काळ पार्थिव ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात आले. त्यानंतर गलांडे वस्ती येथील त्यांच्या घरी सुमारे दीड तास पार्थिव ठेवण्यात आले.
चंद्रकांत यांचे आई-वडील, पत्नी निशा, भाऊ, ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. आई-वडील, पत्नी यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. चंद्रकांत यांची चिमुकली मुले श्रेयस (वय चार) व जय (वय नऊ महिने) हेही कावरेबावरे झाले होते. वस्तीवरच गलांडे यांमयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत यांचे वडील बंधू मंफाबापू यांनी मुखाग्नी दिला. पार्थिवासोबत आलेल्या लष्करी जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हवेत मानवंदना दिली. अंत्यविधीवेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधींनीही पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

तालुक्यातील तेरावे हुतात्मा

चंद्रकांत हे माण तालुक्यातील तेरावे हुतात्मा जवान आहेत. या दु:खद घटनेने संपूर्ण जाशी गाव सुन्न झाले होते. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. गावकर्यांनी अंत्ययात्रा मार्गावर तसेच विविध चौकांमध्ये हुतात्मा जवान 'चंद्रकांत अमर रहे' असे फलक लावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू’ साठी आज मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२०) श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूलच्या इमारतीत मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरवात होईल. मतमोजणी बुधवारी (ता.२१) होणार आहे.

सदाशिव तेलवेकर या एका व्यक्तीने ही निवडणूक लावली आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. ती बिनविरोध व्हावी,यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, एका व्यक्तीसाठी ११ जागांसाठी १२ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उभे राहावे लागले. १५ पैकी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांना १५ हजार ९०८ सभासद मतदान करतील. त्यापैकी २२०० च्या आसपास मृत सभासद आहेत.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्यानंतर ही निवडणूक बिनविरोधच होईल अशी अपेक्षा होती. परंतु तेलवेकर यांची मागणी धुडकावून लावत 'शाहू'ची सिस्टम कुणापुढेही झुकणार अथवा गुडघे टेकणार नसल्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले. यानिमित्ताने राजे गटाने भविष्यातील लढाईची रंगीत तालीम घेतली. घाटगे हे आपल्या गटाला लढण्याचा नवा संदेश देण्यात यशस्वी ठरले. यानिमित्ताने त्यांनी समाजमनाचा कौल घेत नवीन संचालक घेताना तब्बल आठ बदल केले. शिवाय कोणताही धोका न पत्करता गटाला चार्ज करण्याची संधी म्हणूनच त्यांनी या निवडणुकीकडे पाहीले.

३५ वर्षात एकचवेळा या कारखान्याची निवडणूक झाली. तत्पूर्वी एकदा आमदार मुश्रीफ यांनी सदाशिवराव मंडलिकांच्या नेतृत्वाखाली १९९९ मध्ये पॅनेल केले होते. पण न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतदानापूर्वीच निवडणूक स्थगित झाली आणि निवडणूक टळली. तर २००६ मध्ये माजी आमदार संजय घाटगेंच्या नेतृत्वाखाली पॅनेल झाले आणि निवडणूक लागली. संजय घाटगेंचा अर्ज छाननीत उडाल्याने दगडफेकीची घटनाही घडली. हा अपवाद वगळता कारखान्याची निवडणूक कायम बिनविरोध झाली. विक्रमसिंह घाटगेंच्या हातातच सत्ता राहिली . त्यांच्यानंतर समरजितसिंह यांनी यशस्वी धुरा सांभाळली आहे. निवडणुकीचा निकाल स्पष्ट असला तरी तेलवेकर किती मते घेतील आणि मतदान किती होईल ?, याबाबत उत्सुकता आहेच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनय कोरे करणार भाजप प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. हा राजकीय भूकंप वारणा परिसरात होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी मंत्री विनय कोरे आणि शाहू कारखान्याचे चेअरमन समरजित घाटगे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. येत्या काही दिवसांतच त्यांचा हा प्रवेश होणार असून, घाटगे यांची वर्णी 'सिडको'वर लावण्यात येणार आहे. कोरे यांचे पुनर्वसन कसे करायचे, याबाबत सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपने पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून तालुका पातळीवरील नेत्यांच्या हातात कमळ देण्यात येत आहे. गोपाळ पाटील, डॉ. प्रकाश शहापूरकर, रामचंद्र डांगे, प्रकाश चव्हाण, डॉ. अजित चौगुले अशा अनेकांना पक्षात घेतल्यानंतर आणखी काही नेत्यांना गळ घातली जात आहे. समरजित घाटगे व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी.शिंदे यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. शाहू कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांत ती संपल्यानंतर पक्षप्र्रवेशाला वेग येणार आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपद, म्हाडा किंवा सिडकोवर वर्णी अशा चार पर्यायावर सध्या चर्चा सुरू आहे. देवस्थान समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची घाटगे यांची मानसिकता नसल्याने म्हाडा किंवा सिडको हा पर्याय निश्चित होऊ शकतो. संजय घाटगे यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी पक्ष इच्छुक आहे, मात्र हा प्रवेश तूर्त होण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश शक्य आहे. दरम्यान, घाटगे यांनी मात्र शिवसेना सोडणार नसल्याचे जाहीर केले आहे.

जि.प., पालिका निवडणुकीसाठी...

जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता आणायची आहे. यामुळे एकेक सदस्य त्यांना महत्त्वाचा आहे. सध्या जनसुराज्यचे सहा सदस्य आहेत. स्वाभिमानी त्यांच्यासोबत राहणार आहे. जनसुराज्य पक्ष सोबत आला तर चारपाच जागा वाढणार आहेत. सत्तास्थापनेत या जागा महत्वाच्या ठरणार आहेत. शिवाय मलकापूर, पन्हाळा व पेठवडगाव नगरपालिकेतही भाजपला फायदा होणार आ​हे. कोरे यांची ताकद काही तालुक्यापुरती मर्यादित असली तरी तीही भाजपला उपयोगी पडणार आहे. यामुळे जिल्हा परिषद व पालिका निवडणुकीपूर्वी कोरेंना पक्षात आणण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रिन्स शिवाजी विद्या मंदिरला ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुणवत्तापूर्ण शिक्षण, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि खासगी ​शिक्षण संस्थेलाही लाजवतील, एवढ्या चांगल्या दर्जाच्या भौतिक सुविधांची उपलब्धता याची सांगड घालत आदर्शवत ठरलेल्या महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर (जाधववाडी) आयएसओ मानांकन मिळाले आहे. दर्जेदार शिक्षण आणि सुविधा विचारात घेत शाळेला आयएसओ 9001 : 2015 मानांकन मिळाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी महापालिकेची ही पहिली शाळा ठरली आहे.

प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर येथे पहिली ते सातवीपर्यंत ​शिक्षणाची सुविधा आहे. संत गोरा कुंभार वसाहत, राजीव गांधी वसाहत, जाधववाडी, कदमवाडी येथील विद्यार्थी या शाळेत शिकतात. सुशोभित इमारत, बोलक्या भिंती, पहिलीपासून सेमी इंग्लिश, इ लर्निग सुविधा, वर्गामध्ये ग्रीन बोर्ड अशा वैशिष्ट्यांमुळे शाळेच्या पटसंख्येत दरवर्षी भर पडत आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी अॅक्वागार्ड बसविले आहे. ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण दिले जाते.

विद्यार्थी वाचनालय, 'माय स्कूल ग्रीन स्कूल,' यांसारख्या वेगळ्या संकल्पना राबविल्या आहेत. शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य परीक्षेतही विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे. देणगीदारांच्या सहकार्यातून शाळेत कम्प्युटर कक्ष, इ लर्निंग सुविधा दिली आहे. शाळेचा परिपाठ वै​शिष्ट्यपूर्ण असून रोज वेगळी प्रार्थना, समूहगीत म्हटले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय परिपाठ या नावाचे पुस्तक दिले आहे. मुलींचे लेझीम व झांजपथक असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

.............

शाळेवर दृष्टीक्षेप

शाळेची स्थापना : १९४३

शिक्षणाची सोय : पहिली ते सातवीपर्यत

पटसंख्या : ३३१

इ लर्निंग सुविधा, कम्प्युटर कक्ष

पहिली ते तिसरीपर्यंत सेमी इंग्लिश

डिजीटल क्लासरूम, विद्यार्थी वाचनालय

..................................

आयएसओ मानांकन मिळवतानाचे टप्पे

शाळेने मे महिन्यात संस्थेला माहिती सादर केली

जून महिन्यात अॅक्रिडेशन बोर्डाकडून शाळेची पाहणी

शाळेकडून आएसओसाठी २३ जुलैला नोंदणी

संस्थेच्या त्रिसदस्यीय समितीकडून २५ ऑगस्टला शाळेची तपासणी

त्रूटी दूर करून करण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी

शाळेकडून तत्काळ त्रूटी दूर करण्याची प्रक्रिया

तीन सप्टेंबर रोजी आयएसओ मानाकंन जाहीर

.....................

मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. शिक्षक आणि लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यावर लक्ष दिले. आयएसओ मानाकंन मिळाल्याने शिक्षकांचा हुरूप वाढला आहे.

प्रतापसिंह निकम, मुख्याध्यापक, प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर

........................

आमदारांकडून कॅमेरे, नगरसेवकाकडून मानाकंनासाठीचा खर्च

आमदार सतेज पाटील यांनी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ​निधी देणार असल्याचे सांगितले. आमदार पाटील व आमदार हसन मुश्रीफ, महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते सगळ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रभागाचे नगरसेवक राजसिंह शेळके व त्यांच्या मित्रपरिवारांनी आयएसओ मानांकन प्रक्रियेसाठी येणारा ३२ हजार रुपयांचा खर्च केला. माजी महापौर वैशाली डकरे यांच्या कालावधीत शालेय परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले.

......................

शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षक हे कौतुकास पात्र आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी शाळेसाठी प्रयत्न केले ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. पटसंख्या वाढ आ​णि मुलांना शैक्षणिक सुविधा या गोष्टीवर भर राहील.

नगरसेवक राजसिंह शेळके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका शाळा दत्तक देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिका शाळा सामान्य मुलांसाठी आधारवड आहेत. शिक्षकांचा पुढाकार आणि लोकसहभागातून महापालिका शाळांचा लौकिक उंचावत आहे. महापालिका शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी खासगी​ शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेत त्यांना शाळा दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. शाळा दत्तक देणे म्हणजे त्या खासगी संस्थांना विकल्या जाणार नाहीत. तसेच चालवायला द्यायच्या नाहीत तर मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून महापालिका शाळांचा विकास असे सूत्र राहील,' असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले.

प्राथमिक शिक्षण समितीतर्फे महापालिका व खासगी शाळेतील ११ शिक्षकांना आदर्श व विशेष ​शिक्षक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आमदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उप​स्थिती तर महापौर अश्विनी रामाणे अध्यक्षस्थानी होत्या. उपमहापौर शमा मुल्ला, सभापती मुरलीधर जाधव, शिक्षण समिती उपसभापती सुरेखा शहा आदींच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृह येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. शाळा दत्तक देण्यासंदर्भात २८ किंवा २९ सप्टेंबरला महापालिका पदाधिकारी-अधिकारी, संस्था प्रतिनिधींची बैठक होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'चांगली पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. महापालिका शाळेसमोर इंग्रजी शाळांचे मोठे आव्हान आहे. पालक व विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे आहे. महापालिका शाळांनी विद्यार्थी व पालकांना आवडेल ते शिक्षण देण्याची भूमिका घेतली पाहिजे. सध्याची मुले स्मार्ट असून शिक्षकांनी ज्ञानांनी अपडेट बनले पाहिजे.'

आयुक्त पी. ​शिवशंकर यांनी महापालिकेतर्फे ​शिक्षण समितीसाठी दरवर्षी तीस कोटींचे अनुदान देत असल्याची माहिती दिली. पुरस्कारप्राप्त शिक्षक रावसो कांबळे व पंडीत मस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडलेले रस्ते : वाहतुकीची कोंडी हटेना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गणरायाला भावपूर्ण निरोप देणाऱ्या सार्वजनिक मंडळांनी रस्त्यांवरील मंडप उतरवले नसल्याने सार्वजनिक वाहतुकीत मोठा अडथळा होत आहे. महापालिका विभागीय कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडूनही मंडप काढण्यासाठी पाठपुरावा होत नाही. त्यामुळे आता उभारल्‍ेले मंडप नवरात्र उत्सवापर्यंत तसेच राहणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रस्ते अडवून मंडप घालणाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मंडप उभारणीला महापालिका परवानगी देते. पण गणेशोत्सवापूर्वी दहा दिवस अगोदर मंडळांनी विना परवाना, रस्ते उकरून मंडप उभारले. रस्त्यांवर मंडपांसाठी खड्डे मारण्यासाठी जे शुल्क भरावे लागते त्याची पावती मंडळांना महापालिकेकडून दिली जाते. पण, मडळांना शुल्क भरल्यावर त्यांना देण्यासाठी सुरवातीला दोन दिवस महापालिकेकडे पावतीबुक नव्हते, इतके ढिसाळ नियोजन होते.

शहरातील १७७३ सार्वजनिक मंडळांपैकी केवळ ६८५ मडळांनी खड्डे मारण्यासाठी पैसे भरले. पैसे भरतानाही अनेक मंडळांनी चार खड्ड्याचे पैसे भरून वीस ते चाळीस खड्डे मारले. मंडळांनी नियमबाह्य खड्डे आणि मंडप उभारूनही महापालिका आणि शहर वाहतूक शाखेने दुर्लक्ष केले. काही मंडळांनी थेट महापालिकेच्या अधिकृत पार्किंगमध्ये मंडप उभारले. उत्सवापूर्वी आणि उत्सवात पंधरा दिवस नागरिकांना मंडपांचा त्रास झाला. नागरिकांनी महापालिका व पोलिसांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

उत्सव संपल्यानंतर जी शिस्तबद्ध मंडळे आहेत त्यांनी गणपती विसर्जन झाल्यानंतर ताबडतोब मंडप काढले. अनंत चतुर्दशीला सकाळीच ज्या मंडळांनी मूर्तीचे विसर्जन केले त्या मंडळांच्या जागरूक कार्यकर्त्यांनी मूर्ती विसर्जन केल्यानंतर ताबडतोब मंडप उतरवून रस्ता वाहतुकीसीसाठी खुला केला. पण, अशा मंडळांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. पण अनेक मंडळांनी डेकोरेशनकडून मंडप उभारले त्यांनी मंडप अजूनही काढलेले नाहीत. मंडप डेकोरेशनवाल्यांकडे कामगारांची कमरतरता आहे. तर काही मंडळांनी मंडपवाल्याने हिशोब क्लिअर केलेले नाहीत. 'नवसाचे' आणि 'शिस्तबद्ध' म्हणून टेंभा मिरवणाऱ्या मंडळांनीही मंडप काढलेले नाहीत. जुन्या शिवाजी, मंगळवार, शुक्रवार, शनिवार, जुना बुधवार पेठेतील गल्लीबोळातील मंडळांनी अद्याप मंडप न काढल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. अग्निशमन दल आणि रूग्णवाहिकांना वळसा मारून अन्य पर्यायी मार्ग शोधत वाहने न्यावी लागत आहेत. ज्या मंडळांनी एक वाहन जाण्यासाठी दहा फूट जागा रस्त्यांवर मोकळी ठेवली आहे तिथे एकेरी वाहतूक सुरू आहे. मंडपाचा परवाना केवळ अकरा दिवसाचा असताना २० ते २५ दिवस मंडप रस्त्यांवर ठेवणाऱ्या मंडळांवर महापालिका व शहर वाहतूक शाखा कधी कारवाई करणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

महापालिकेला दोन दिवस आधी जाग

डॉल्बी व मंडपाविरोधात नागरिकांनी तक्रार कराव्यात, असे आवाहन महापालिकेने अनंत चतुर्दशीच्या दोन दिवस आधी केले. मंडपाबद्दलच्या तक्रारीचे आवाहन उत्सव सुरू होण्यापूर्वी महापालिकेला करता आले असते. पण कोर्टात आम्ही असे उपाय योजले हे फक्त दाखवण्यासाठी महापालिकेने दोन दिवस आधी आवाहन करण्याचे नाटक केले.

हवा प्रदुषणाचे काय?

डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होते म्हणून पोलिसांनी मंडळांवर कारवाई केली. पण मंडप रस्त्यांवर उभारल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि कोंडीमुळे वाहनांचा धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून होणारे हवा प्रदूषण याबाबत कोण कारवाई करणार? असा प्रश्न उरतोच. या हवा प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या मंडळांवर महापालिका कधी कारवाई करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.

===

मंडप न काढल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. काही वेळा वाहतूक संथ होते. त्यामुळे नोकरदार मंडळींनी कार्यालयात जाण्यासाठी विलंब होतो. हजेरीवर लेट मार्क पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवरून लवकर मंडप हटवावेत.

दीपक सावंत, शिवाजी पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगावातून आणणार एक लाख कार्यकर्ते

$
0
0

सांगली : सांगलीत २७ सप्टेंबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी सोमवारी तासगाव येथे बैठक झाली. या मोर्चाला तालुक्यातून लाखावर लोक आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
मराठा मोर्चाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकांमुळे सध्या जिल्हा सध्या ढवळून निघत आहे. तासगावातील बैठकीपूर्वी शहरातून फेरीही काढण्यात आली. त्यात खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील सहभागी झाले. हजारो समाजबांधव या फेरीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. बैठकीपूर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. फेरीमध्ये भगवे फेटे बांधून युवतीही सहभागी झाल्या होत्या. मुलींच्या हस्ते मशाला पेटवून, झाडाला पाणी घालून बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत अनेकांची भाषणे झाली.
मुस्लिम, ब्राह्मण समाजाचाही या मोर्चाला पाठिंबा असल्याचा दावा मोर्चाच्या आयोजकांकडून केला जात आहे. वकील, उद्योजक, केमिस्ट आदी संघटना मोर्चात सक्रिय सहभागी होणार आहेत. लाखोंच्या संख्येने निघणार्या या मोर्चाची शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी माजी मंत्री पतंगराव कदम यांनी कडेगाव येथे बोलताना केली आहे. मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचा आक्रोश कळलाच नाही, अशी टीका श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ललित कला’च्या पार्सलला प्रथम क्रमांक

$
0
0



सांगली : आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक स्पर्धेत सांगलीच्या ललित कला व नाट्य तंत्र शिक्षण महाविद्यालयाच्या 'पार्सल' या एकांकिकेने बाजी मारली. इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूटच्या 'दो बजनी ए'ला द्वितीय तर इचलकरंजीच्या नाइट कॉलेजच्या 'प्रेम अ-भंग' या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया आणि सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या हस्ते रविवारी रात्री झाले.
प्रथम कमांकास फिरता करंडक, स्मृतीचिन्ह व पंधरा हजार रुपये व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे १२ हजार व १० हजाराचे रोख पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ स्तरावरील तेरा संघांनी सहभाग घेतला होता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भुताडिया यांनी नाट्यचळवळ ही अखंड सुरू राहिली तरच सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे आणि कलाकारांची निर्मिती होणार आहे. परंतु कलाकारांबरोबरच रंगभूमीला कार्यकत्र्यांचीही तितकीच आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, नाट्यपरिषदेच्या शाखेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, उपाध्यक्षा चेतना वैद्य, श्रीनिवास जरंडीकर, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, प्रसाद बर्वे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालयांचे होणार संगणकीकरण

$
0
0


मिरज : राज्यातील सर्व ग्रंथालयांचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ग्रंथालयांनी बदलत्या परिस्थितीचे आव्हान लक्षात घेऊन वाचकाभिमुख उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा राज्याचे ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी व्यक्त केली.
मिरजेतील खरे मंदिर येथील मुक्तांगण सभागृहात कोलकता येथील राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान आणि राज्य ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा ग्रंथालय कार्यशाळेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते.
धांडोरे म्हणाले, शासनमान्य ग्रंथालयांची संख्या खूप मोठी आहे. या ग्रंथालयांच्या माध्यमातून ग्रंथांच्या देवाण-घेवाणी बरोबरच अनेक वाचकाभिमुख उपक्रम राबवावेत. कर्मचाऱ्यांचे वेतन, अपुरे अनुदान, ग्रंथालयांचा दर्जा, नवीन ग्रंथालयांची मान्यता असे अनेक प्रश्न असून टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रमाने हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बदलत्या काळाची आवाहने लक्षात घेऊन सर्वच ग्रंथालयांनी आधुनिकतेची कास धरावी. येत्या वर्षात राज्यातील शासकीय ग्रंथालयांबरोबरच अ आणि ब ग्रंथालये ई ग्रंथालय करण्याचे काम हाती घेतले आहे. गुजरातपेक्षाही महाराष्ट्र राज्य हे ग्रंथालयांना अधिक मदत करणारे राज्य असल्याचे सांगून सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सचिन कवळे, चिमण लोकूर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात पुण्याच्या सहाय्यक ग्रंथालय संचालिका उज्वला लोंढे, धर्मादाय उपायुक्त महावीर जोगी, माजी निरीक्षक शाम दाईंगडे, ग्रंथालय जिल्हा सचिव भगवान शिंदे यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images