Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मिरजेत एक |ऑक्टोबरपासून नवरात्र संगीत उत्सव

0
0

मिरज : शहरातील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव समितीच्या वतीने दिला जाणारा संगीतकार राम कदम पुरस्कार यंदा गायक धवल चांदवडकर (पुणे) यांना आणि तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार उदयोन्मुख तबलावादक उन्मेशा आठवले (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. १ ऑक्टोबरपासून अंबाबाई नवरात्र संगीत उत्सवाला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मधुकर पाटील-मळणगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेचे सचिव विनायक गुरव, खजिनदार संभाजी भोसले, जेष्ठ सदस्य बाळासाहेब मिरजकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
महोत्सवाचे यंदाचे ६२वे वर्ष आहे. प्राप्तिकर अधिकारी शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते चांदवडकर आणि आठवले यांना पुरस्कार प्रदान केले जातील. संगीतकार विजय राम कदम उपस्थित राहणार आहेत.
१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाला प्रारंभ होईल. ११ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात रोज सायंकाळी अंबाबाई मंदिराजवळच होणाऱ्या कार्यक्रमात अनेक कलाकार गायन आणि वादन कला सादर करतील.
१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पं. भुवनेश कोमकली (देवास, मध्य प्रदेश) यांचे गायन, २ ऑक्टो. सायं. ५ वा. हेमा दामले-बेहरे (मिरज) यांचे गायन, सायं. ७ वा. विजय कदम, धवल चांदवडकर, मेघा चांदवडकर हे कलाकार संगीतकार राम कदम यांचे मराठी गीत सादर करणार आहेत.
३ ऑक्टो. रोजी सायं. ५ वा. अभिषेक काळे (सांगली) यांचे गायन, सायं. ६ वा. उन्मेशा आठवले यांना विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार प्रदान सोहळा जि. प. अध्यक्षा स्नेहल पाटील यांच्या जितेनभाई झवेरी मुंबई यांच्या उपस्थित होणार आहे. रात्री ८ वा. रेवती कामत (पुणे) यांचे गायन. ११ ऑक्टोबरला पालखी सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणानगर येथे २३ पासून इंडो जापनीज आंतरराष्ट्रीय परिषद

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज येथे 'आशिया खंडातील संसर्गजन्य रोग व औषध संशोधन' या विषयावर २३ व २४ सप्टेंबरला इंडो जापनीज आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. तात्यासाहेब कोरे फार्मसी, आयसीटी मुंबई, पर्ड अहमदाबाद, आयपीए गोवा टीयूएस टोकिओ यांच्या संयुक्त विद्यमाने परिषद होणार आहे. विविध देशांतील

२५० संशोधक सहभागी होणार असून, ५० हून अधिक विद्यार्थी व शिक्षक त्यांचे संशोधन पोस्टर स्वरूपात सादर करणार

आहेत.

परिषदेचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते व आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, वारणा समूहाचे अध्यक्ष विनय कोरे, सचिव जी. डी. पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आयटीसी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. एच. एल. भल्ला, डॉ. स्युनेजी नागाई, डॉ. हिरोशी तेराडा, डॉ. किमिको मॅकिनो उपस्थित राहणार आहेत.

जपान व भारतातील नुप्लस निगाटा जपान, टीयूएस टोकिओ, आयसीटी मुंबई, पर्ड अहमदाबाद, आयसर, सीडीआयआय या संस्थांतील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधक व्याख्यान देणार आहेत. मिटसुकी कवानो, हरिनाथ चक्रपाणी, सुमिओ शिनोडा, डॉ. प्रीती देसाई, डॉ. वैणव पटेल, डॉ. मिनिकी सेकी, डॉ. हिरोयुकी इनागावा, डॉ. अमित मिश्रा, डॉ. शैलजा भट्टाचार्य, डॉ. मरिअम देनागी यांची व्याख्याने होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यापूर्तीत माध्यमांची भूमिका महत्त्वाची

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जागतिक स्तरावरील चांगल्या-वाईट घटनांची नोंद प्रसारमाध्यमे घेत असतात. त्यामुळे सामाजिक परिणामांवर अंकुश ठेवण्यास मदत होते. या योगदानातूनच प्रसारमाध्यमांची भूमिका सामाजिक समस्या सोडविण्यात प्रभावी ठरते,' असे मत नॅशनल कास्टिंग कम्युनिकेशनच्या संस्थापिका वैदैही सचिन व्यक्त केले. सायबर महाविद्यालयातके केनियन व आफ्रिकन स्टुडंट्स असोसिएशन व महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्या बोलत होत्या.

आसिफ जमादार म्हणाले, 'माध्यमांमुळे समाजात घडणाऱ्या घटनेची नोंद त्वरित घेतली जाते. त्यामुळे समाजातील संवेदनशीलता जोपासली जाते. याचा फायदा निश्चितपणे सर्वदूर पोहोचतो. आजच्या प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेच्या जगात दूरदर्शनसारखे माध्यम भारतातील काना-कोपऱ्यात संवाद साधण्याचे काम करत आहे.'

समारोपाच्या सत्रात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रसारमाध्यमे सामाजिक भान जागृत ठेवत असल्याचे मत व्यक्त केले.

डॉ. दीपक भोसले यांनी परिसंवादामागची भूमिका स्पष्ट केली. परिसंवादास आभास फाउंडेशनचे अतुल देसाई, पत्रकार अमोल पांढरे, प्रमोद पवार, शीतल सूर्यवंशी, नूतन घाडगे, प्रणाली मोहिते, धनश्री गुजर, राहील शेख उपस्थित होते. पूजा जकाते यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे सहसंयोजक डॉ. के. प्रदीपकुमार यांनी आभार मानले. संस्थेचे विश्वस्त डॉ. रणजीत शिंदे, संचालक डॉ. एम. एम. अली, डॉ. व्ही. एम. हिलगे यांचे विशेष सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषानेफसवणूकप्रकरणी एकास अटक

0
0

म. टा. वृतसेवा, हुपरी

सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे पन्नास हजाराचा गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी तिघाजणांवर हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवशांत बाळासो माळी (रा.पट्टणकोडोली, ता.हातकणंगले) याला अटक करण्यात आली आहे, तर निळकंठ शंकर माने (रा.अपेक्षा कॉर्नर, हुपरी ता.हातकणंगले),निलेश चंदू बनसोडे (रा.पुणे) हे दोघे फरारी आहेत. याबाबत अरुण पोपट फडतारे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , हुपरी (ता.हातकणंगले) येथील अरुण फडतारे यांचा निळकंठ माने हा नातेवाईक आहे. त्याने आपले मित्र शिवशांत माळी, निलेश बनसोडे यांच्याबरोबर येवून अरुण व त्यांची पत्नी यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून एक वर्षापूर्वी लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी अरुण यांनी या तिघांना पन्नास हजार रुपये रोख स्वरुपात दिले. सहा महीने झाले उलटले तरी नोकरी न मिळाल्याने अरुण यांनी संबधितांकडे नोकरीसाठी तगादा लावल्याने निळकंठ माने याने महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव यांची सही असलेले नोकरीस रुजू होण्याचे पत्र दिले. याबाबत नोकरीची खातरजमा करण्यासाठी अरुण यांनी मुंबई येथे जावून चौकशी केली असता ते पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अरुण यांनी हुपरी पोलिसांत या तिघांविरोधात फिर्याद दिली. शिवशांत माळी याला अटक करुन इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू’ साठी ८६ टक्के मतदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासाठी शांततेत ८६.३९ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. एकूण १५ हजार ९१७ पैकी मयत दोन हजार १३४ व २८३ कारखाना कर्मचारी वगळता ऊर्वरित १३ हजार ५०० पैकी ११ हजार ६६२ इतके मतदान झाले. उत्पादक गटाच्या ११ जागांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजता कारखान्याच्या आठ नंबर गोडावूनमध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल एकतर्फी असला तरी एकमेव विरोधी उमेदवार सदाशिव तेलवेकर किती मते घेणार, याचीही उत्सुकता आहे.

सकाळी साडेसात वाजल्यापासूनच श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल येथे मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. चेअरमन समरजितसिंह घाटगे, प्रविणसिंह घाटगे यांच्यासह अन्य उमेदवार मतदारांचे स्वागत करीत होते. पहिल्या दोन तासातच २५४९ म्हणजेच १८.८८ टक्के मतदान झाले.१० ते १२ या वेळेत ४१३९ म्हणजेच ३०.६६ टक्के ,१२ ते २ वेळेत ३२२२ इतके २३. ८७ टक्के, दुपारी २ ते ४ यावेळी १३९६ म्हणजेच १०.३४ टक्के आणि ४ ते ५ या वेळेत ३५६ म्हणजेच २.५६ असे एकूण ८६.३९ टक्के इतके मतदान झाले.

मतदान केंद्राच्या बाहेर चारचाकी वाहने, दुचाकी व सभासदांमुळे पटांगण भरुन गेले होते. बहुतांश केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. १६ मतदान केंद्रांवर दोन-दोन बूथ केल्याने मतदान प्रक्रिया वेगाने होत होती. मतदारांसाठी अचूक मतदान केंद्रात जाण्यासाठी सुविधा केली होती. यासाठी सहा चौकशी बूथ उभारण्यात आले होते. अपंग,वयोवृध्द मतदारांना ने आण करण्यासाठी व्हील चेअर आणि वॉकरची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये ९० वर्षांपासून १०३ वर्षाच्या सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११ वाजता श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे, नवोदिता समरजितसिंह घाटगे यांनी मुरगूड -शिंदेवाडी केंद्र क्रमांक ७ मध्ये मतदान केले. माजी आमदार संजय घाटगे ,गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे, विरेंद्रसिंह प्रविणसिंह घाटगे, अखिलेशराजे घाटगे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. आमदार हसन मुश्रीफ यांनी मतदान केंद्र क्रमांक एक मध्ये मतदान केले. तर दुपारी अडीच वाजता चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पश्चात शाहू कारखान्याची ही पहिलीच निवडणूक झाली. सभासद मतदारांच्या स्वागतासाठी उभारलेल्या समरजितसिंह घाटगे यांना भेटूनच मतदार मतदानासाठी जात होते. तर वयोवृध्द मतदार घाटगे यांची गळाभेट घेत होते. आम्ही मतदान करुन दिवंगत राजेंना श्रध्दांजलीच वाहण्यासाठी आलो असल्याच्या भावना ते व्यक्त करीत होते. तर विरोधी उमेदवार सदाशिव तेलवेकर हे एकटेच मतदान केंद्राबाहेर उभारून ओळखीच्या मतदारांना नमस्कार करताना दिसत होते. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख , तहसीलदार किशोर घाडगे, सहाय्यक निबंधक सुनील चव्हाण यांनी नेटके नियोजन केले.

-----------------------------------------------------------

चौकट

आज मतमोजणी

साखर कारखान्याच्या गोडावून क्रमांक आठमध्ये बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. एकूण १६ टेबलवर ही मोजणी होवून दुपारी दोन वाजता संपेल असे नियोजन आहे. त्यानंतर तहकूब झालेली सर्वसाधारण सभा लगेच घेण्यात येणार आहे. तर शनिवारी (ता.२४) चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड होईल.

......

कोट

'या निवडणुकीत चुरस नसतानाही ८६.३९ टक्के मतदान करुन सभासदांनी विक्रमसिंह राजेंवरील श्रध्दा आणि प्रेम व्यक्त केले आहे. जे लोक विविध व्याधींमुळे घरातही फिरु शकत नाहीत अशांनीही उत्स्फूर्तपणे मतदान केले. दिवंगत विक्रमसिंह राजेंनी लोकांच्या प्रेमाची मिळवलेली संपत्ती आज सिध्द झाली.

समरजितसिंह घाटगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा रस्ता खचण्याचा धोका

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान जोतिबा, पर्यटकांचे आकर्षण असलेला पन्हाळा, आंबा, गणपतीपुळे तसेच रत्नागिरीकडे जाण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. रेडेडोहाच्या पुराच्या पाण्यासाठी केलेल्या तकलादू व्यवस्थेमुळे या महामार्गावरील आंबेवाडी ते केर्ली या गावादरम्यानच्या रस्त्याचा भराव दोन ते अडीच फुटाने तुटून गेला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे जवळपास शंभर मीटर परिसराचा भराव तुटला आहे. त्याबाबत काहीच खबरदारी घेतली नसल्याने रस्ताही खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी महामार्गावर केर्ले गावापर्यंत विविध ठिकाणी पुराचे पाणी येत असते. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. त्यातील आंबेवाडी ते केर्ली दरम्यानच्या भागात पुराच्या पाण्याचे प्रमाण प्रचंड असते. चिखली गावाच्या पाठीमागून येणारे पुराचे पाणी हा रस्ता ओलांडून वडणगेच्या दिशेने जाते. रेडेडोहच्या ठिकाणी त्याचे प्रमाण मोठे असते. या ठिकाणाहून पाण्याने रस्ता ओलांडला की महापूर आल्याचे समजण्यात येते. तोपर्यंत हे पाणी चिखली परिसरात पसरत जाते. २००५ च्या पुरावेळी हे पाणी वाहून जाण्याची आवश्यकता स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर रेडेडोहाच्या ठिकाणी पाइप टाकून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पूर आला नसल्याने या पाइपचे महत्व समजून आले नाही. मात्र या पावसाळ्यात सलग दोनवेळा आलेल्या महापुरावेळी त्या पाइपची व्यवस्था तकलादू ठरल्याचे स्पष्ट झाले.

पाण्याचे प्रमाण पाहता त्या पाइप कुचकामी ठरल्या. नेहमीप्रमाणे पाणी रस्ता ओलांडून वाहून गेले. ते वाहून जात असताना त्याचा वेग व दाबही वाढला. या पाण्यामुळे या रस्त्याचा जुना भराव तुटून गेला आहे. पाइप टाकलेल्या ठिकाणाच्या रस्त्याचा भराव जवळपास अडीच फुटापर्यंत तुटला आहे. शंभर मीटर अंतराच्या रस्त्याचा भराव खचला व तुटला आहे. त्यासाठी लावण्यात आलेली मोठे दगडही निसटून बाहेर पडली आहेत. त्यामुळे त्याखाली असलेल्या मातीवरच त्या रस्त्याची भिस्त आहे. दोन महिन्यात सलग आलेल्या पुरामुळे ही अवस्था झाली असून पाइपऐवजी या रस्त्यावर छोटे पूल बांधले असते तर त्यातून पाणी प्रवाहित होऊन त्याचा दाब कमी होऊन रस्त्याला कोणताही धोका निर्माण झाला नसता हे स्पष्ट होत आहे.

छोट्या पुलांची आवश्यकता
रत्नागिरी महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत सरकारच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत. नवीन काम होत असताना या परिसरात येत असलेल्या महापुराचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह वाहता ठेवण्यासाठी आंबेवाडी ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी छोटे पूल उभे केले तरच या रस्त्यावरील पुराच्या पाण्याचा दाब कमी होऊन धोका कमी होणार आहे. पुराचे पाणी येऊ नये म्हणून रस्त्याची उंची वाढवली जाईल. मात्र पूल न केल्यास भरावामुळे थोपवले जाणारे पाणी आंबेवाडी, चिखली, वरणगे या परिसरात वाढू शकते.

सध्याचा धोका

आंबेवाडीपासून केर्लीपर्यंतच्या असलेल्या रस्त्याच्या दुतर्फाची जागा कमी होत आहे. पाण्यामुळे तुटलेला भरावामुळे सुरक्षेसाठी लावलेले दगडही निसटले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी या परिसरात वाहनधारकांसाठी मोठा धोका आहे. दुचाकीस्वारांनाही थांबण्याइतपत जागा रस्त्याशेजारी नाही. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रस्ताही खचण्याचा धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुलांसाठी उपोषण सुरुच

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्वसन योजनेंतर्गत तयार झालेली ४४४ घरकुले वितरित करावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीतील बारा लाभार्थ्यांनी नगरपालिकेसमोर सुरु केलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.

केंद्र सरकारच्या एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना (आयएचएसडीपी) अंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम चार वर्षापासून सुरू आहे. यापैकी ४४४ घरकुले तयार असूनही लाभार्थ्यांना ती मिळत नसल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तयार घरकुले तातडीने ताब्यात द्यावीत यासाठी झोपडपट्टीवासियांकडून मागील सहा महिन्यांपासून नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. प्रशासनाच्या या कारभारच्या निषेधार्थ झोपडपट्टीतील अकरा लाभार्थ्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या प्रश्नाबाबत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन शुक्रवारी(ता.२३) ठेकेदाराबरोबर सर्वांची बैठक घेण्याचा आणि २६ सप्टेंबरला लाभार्थ्यांची यादी निश्चित करून घरांना क्रमांक देण्याचे ठरविण्यात आले आहे. परंतु तोपर्यंत हे उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

या आंदोलनात विठ्ठल शिंदे, विजय डोईफोडे, बाबासाहेब जाधव, मोहन बनसोडे, पिंटू गायकवाड, दत्ता चंदनशिवे, मुकेश जावीर, महादेव राठोड, गिरीजाप्पा तोरणे, संदीप चौधरी, सुरेश कांबळे आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी चा चेंडू पोलिस प्रमुखांच्या कोर्टात

0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी

इचलकरंजी साउंड असोसिएशनतर्फेडॉल्बी संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर कोल्हापूर पोलिस अधिक्षकांनी लक्ष घालून त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर गणपती उत्सव संपला असल्याने सध्या याचिकेवर निर्णय देण्याची गरज नसल्याचे सांगत ही याचिका निकाली काढण्यात आली.

इचलकरंजी साउंड असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष अविनाश नेजे व इतर ६२ व्यावसायिकांनी ध्वनिक्षेपक लावण्याच्या इचलकरंजी पोलिसांनी चालविलेल्या कारवाई विरोधात याचिका दाखल करून दाद मागितली होती. त्यावर गतवेळी झालेल्या सुनावणीत पोलिस प्रशासनाने याचिकाकर्त्यांचे अर्ज स्विकारून कायद्यानुसार निर्णय घ्यावा, असे अंतरिम आदेश दिले होते. त्यानुसार कारवाईसुध्दा झाली होती.

परंतु याचिकाकर्त्यांच्यावतीने अॅड. धैर्यशील सुतार यांनी पोलिसांनी ध्वनिक्षेपक लावण्यासाठीचा परवानगी देण्याचा अर्जच स्वीकारला नसल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्याचबरोबर सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्याने परवानगी घेऊनसुद्धा आवाजाची मर्यादा ओलांडल्याने गुन्हा नोंद केल्याचे सांगितले. त्यावर हा गुन्हा गैर असून तो आम्हास मान्य नसल्याचे सुतार यांनी सांगितले. तर न्यायालयाने सध्या गणपती उत्सव संपल्याने सध्या निर्णय घ्यायची गरज नाही, असे सांगत या संदर्भात कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी निर्णय घ्यावा, असा आदेश देत ही याचिका निकाली काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिठा ठार केल्याप्रकरणी पती गजानन उत्तम दंडेल (वय २४, रा. वसमत, जि. हिंगोली) याला जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय २५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. बुधवारी (ता. २१) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

आरोपी गजानन दंडेल हा त्याची पत्नी सपना आणि सासू विमल सुतारे यांच्यासह कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याकडे ऊस तोडणी कामगार होता. दंडेल इतर ऊसतोडणी मजुरांसह कसबा सांगाव येथील झोपडीत राहत होता. ९ जानेवारी २०१५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास गजानन याने झोपडीत पत्नी सपना हिच्याशी इतरांकडे पाहून हसते या संशयावरून वाद घातला. यावेळी त्याने धारदार कोयत्याने सपनाच्या डोक्यावर वार केले. गजानन याची सासू विमल सुतारे या त्याला रोखण्यासाठी धावल्या असता, आरोपीने विमल यांच्याही डोक्यात कोयत्याने वार केला.

दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी गजाननने घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील उस तोडणी कामगारांनी गंभीर जखमी सपना आणि विमल या दोघींना उपचारासठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच सपना यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. विमल यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत आरोपी गजाननवर कागल पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी त्याला अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला. सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी दंडेल यास जन्मठेप आणि २५०० रुपयांची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपाधीक्षक अमरसिंह जाधव यांनी केला, तर सरकारी वकील मंजुषा पाटील आणि एस. पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांची तात्पुरती सोय

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भवानी मंडपातील प्रांत कार्यालयासमोर पुरुष व महिलांकरिता तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहे व शौचालय उभारण्याचा निर्णय झाला. पे अँड यूज धर्तीवर त्याचा वापर करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता घटस्थापनेच्या अगोदर शौचालय आणि स्वच्छतागृहांची उभारणी होणार आहे.

प्रांत कार्यालयासमोर स्वच्छतागृह बांधणीला इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूल व स्थानिक नागरिकांनी मंगळवारी विरोध केला होता. स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नाही, भागात दुर्गंधी पसरत असल्यामुळे या भागात स्वच्छतागृहे नकोत, अशी भूमिका शाळा प्रशासन व नागरिकांनी घेतली. दुसरीकडे नवरात्रोत्सवात महिला भाविक व पर्यटकांची संख्या वाढते. मंदिर परिसरात शौचालय व स्वच्छतागृह नसल्यामुळे भाविकांची कुचंबणा होते. नागरिकांच्या सोयीसाठी या भागात नव्याने स्वच्छतागृह बांधणीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बुधवारी पुन्हा शाळेतील शिक्षक, स्थानिक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची

बैठक झाली.

इंदुमती देवी गर्ल्स हायस्कूलमधील शिक्षिका व स्थानिक नागरिकांनी या भागातील अस्वच्छतेवरून प्रश्नांचा भडिमा केला. स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्यामुळे भागात दुर्गंधी पसरते, असा मुद्दा मांडत स्वच्छतागृह उभारणीला विरोध केला. स्थानिक नगरसेविका हसिना फरास, आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, उपशहर अभियंता एस. के. माने, प्रकल्प अधिकारी अनुराधा वांडरे, मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव या भागातील नागरिक व महान भारत केसरी दादू चौगले, विनोद चौगुले यांच्यात चर्चा झाली.

भवानी मंडप परिसरात असलेली सध्याची फायबरची स्वच्छतागृहे बंद आहेत. बंद स्वच्छतागृहे हटवून त्या ठिकाणी व भिंतीलगत नव्याने स्वच्छतागृह उभारताना देखभाल, साफसफाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली. महिला व पुरुषांकरिता स्वतंत्ररीत्या चार सीटरचे स्वच्छतागृह, शौचालय व दोन सीटर शौचालय उभारण्याचे ठरले. या ठिकाणी प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या

बसविण्यात येणार आहेत. याकरिता साधारणपणे साडेसहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पे अँड यूजच्या धर्तीवर वापर होणार आहे. सुलभ इंटरनॅशनलकडे ठेका असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​झिरो प्रेशरने होणार स्वच्छता

0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या स्थापत्यकलेच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षक स्मारकाच्या यादीत मंदिराचा समावेश करण्याचा विषय ऐरणीवर असल्यामुळे यावर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर स्वच्छतेसाठी पाण्याचे ​झिरोप्रेशर ठेवण्यात येणार आहे. बुधवारपासून मुंबई येथील संजय मेंटेनन्सच्यावतीने मंदिर स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी देवस्थान समिती आणि मंदिर आर्द्रता व तापमान नियंत्रण समिती सदस्यांनी

हा निर्णय घेतला. दरम्यान, आठवड्यावर आलेल्या नवरात्रोत्सवासाठी मंदिर स्वच्छतेसह दर्शनमंडप उभारणीलाही प्रारंभ झाला.

दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली जाते. गेल्या १६ वर्षांपासून मुंबई येथील संजय मेंटेनन्सतर्फे मंदिर स्वच्छता मोफत केली जाते. त्यासाठी या संस्थेचे प्रमुख संजय खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांकडून अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने मंदिराची अंतर्बाह्य स्वच्छता केली जाते. पाण्याचा हायप्रेशर फवारा मारून मंदिराच्या ​​​​शिखरापासून ते आवारातील फरशीपर्यंतची स्वच्छता या यंत्रणेच्या माध्यमातून केली जाते. मात्र, सध्या मंदिराच्या स्थापत्यकलेच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पाण्याचे प्रेशर मंदिराच्या शिलांना धोकादायक ठरू शकते, असे आर्द्रता व तापमान नियंत्रण समितीच्या तज्ज्ञ सदस्यांनी अधोरेखित केले आहे. त्यानुसार मंदिराच्या स्वच्छतेसाठी पाण्याच्या कमी प्रेशरचा वापर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरजीतसिंहावर विश्वास

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथील छ. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उत्पादक सर्वसाधारण गटाच्या ११ जागांसाठीचा निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सत्ताधारी समरजितसिंह घाटगे यांच्या स्व. विक्रमसिंहराजे श्री छ. शाहू शेतकरी पॅनेलचे सर्व उमेदवार अपेक्षेप्रमाणे उच्चांकी मतांनी विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते समरजितसिंह घाटगे यांना १० हजार ९२६ इतकी पडली. सभासदांनी त्यांच्यावरील विश्वासच यानिमित्ताने व्यक्त केला. विरोधी अपक्ष उमेदवार सदाशिव रामचंद्र तेलवेकर यांना १५१५ मते मिळाली.

निवडून आलेल्या ११ उमेदवारांना मिळालेली मते अशी - पांडूरंग दत्तात्रय चौगुले (म्हाकवे) - १० हजार ७६५ , अमरसिंह गोपाळराव घोरपडे (माद्याळ) -१० हजार ८२६ , समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (कागल) - १० हजार ९२६, सचिन सदाशिव मगदूम (पिंपळगांव खुर्द) - १० हजार ८५१ , यशवंत जयवंत माने (कागल) - १० हजार ८७२ , मारुती दादू निगवे (नंदगांव) -१० हजार ९०७ , बाबूराव ज्ञानू पाटील (गोकूळ शिरगांव) - १० हजार ८७२, भूपाल विष्णू पाटील (कोगिल बुद्रुक) -१० हजार ८७६ , धनंजय सदाशिव पाटील (केनवडे) - १० हजार ८९४, मारुती ज्ञानदेव पाटील (पिंपळगांव बुद्रुक) -१० हजार ८८७ , वीरकुमार आप्पासो पाटील (कोगनोळी) - १० हजार १७ मते . एकूण १३० मते बाद झाली.

दरम्यान, यापूर्वी उत्पादक महिला गटातून श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे (कागल) व रुक्मिणी बंडा पाटील (दिंडनेर्ली) या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. तसेच उत्पादक मागासवर्ग गटातून डॉ. टी.ए. कांबळे (व्हन्नूर) तर बिगर उत्पादक संस्था गटातून युवराज अर्जूनराव पाटील (मौजे सांगाव) हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे व सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली १६ टेबलांवर ही मतमोजणी पूर्ण झाली. एकूण १०६ कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले होते. अत्यंत शांततेत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी अडीचच्या सुमारास निकाल घोषित करण्यात आला. त्यानंतर तहकूब झालेली सभा घेण्यात आली . या सभेत निवडणुक निर्णय अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सविस्तर निवडणूक निकाल घोषित केला. यावेळी समर्थकांनी गुलालाची उधळण करीत समरजितसिंह घाटगेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेरलेत दारू दुकानावर महिलांचा हल्लाबोल

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले



हेरले (ता. हातकणंगले) येथील सिल्वर कंट्री लिकर शॉप हे देशी दारूचे दुकान बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देवूनही बंद न केल्याने संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी या दुकानावर हल्लाबोल करत दारूच्या बाटल्या, भरलेले बॉक्स फोडून निषेध व्यक्त केला केला. महिलांचे रौद्ररुप पाहून अनेक तळीरामांनी धूम ठोकली तसेच दुकान चालकही क्षणार्धात परागंदा झाला.

हेरले येथे श्रीमती सुमन रामचंद वड्ड यांच्या मालकीचे सिल्वर कंट्री लिकर शॉप आहे. या देशी दारू दुकानाचे चालक संजय घोटणे असून ते गेली तीन चार वर्ष हे दुकान चालवत आहे. या दारूच्या दुकानाचा त्रास येथील रहीवाशांना व येणाऱ्या -जाणाऱ्या महिलांना होत होता. त्यामुळे या महिलांनी अनेकवेळा हे दुकान बंद करावे किंवा स्थलांतरीत करावे अशी मागणी दुकान चालक,मालक यांच्याकडे केली होती. मात्र दुकान बंद झाले नाही. त्यामुळे महिलांमध्ये याचा असंतोष खदखदत होता. या सर्व महिलांनी एकत्र येऊन मागील आठवडयात दुकान बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले होते. ग्रामपंचायतीने चालक घोटणे याला १२ सप्टेंबर रोजी दारू दुकान सात दिवसात स्थलातंर करण्यास लेखी नोटीस दिली होती. नोटीस देऊन नऊ दिवस झाले तरी दुकान स्थलांतर अथवा बंद झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्व महिला एकत्र येऊन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. ग्रामपंचायतीतून निघून सर्व महिला गावातील प्रमुख मार्गाने दुकान बंद करण्याच्या घोषणा देत मोर्चा देशी दारूच्या दुकानासमोर आल्या. महिलांनी संतप्त होवून दुकानातील दारू भरलेल्या बाटल्याचे बॉक्स दुकानासमोर आणून फोडले. तसेच पिंप ,बॅरेल,रिकामी कॅनही आणून फोडले. यामुळे दुकानासमोर काचांचा खच पडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम क्षेत्राला येणार ‘अच्छे दिन’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील चौदा ड वर्ग महानगरपालिकेसाठी बांधकामविषयक नवी नियमावली मंजूर करण्यात आली असून नगरविकास विभागाने अधिसूचना काढली आहे. नव्या नियमावलीचा सर्वाधिक फायदा मोठे मिळकतधारक आणि गृहप्रकल्पांना होऊ शकेल. नव्या नियमावलीत पूर्वीच्या चटई ​निर्देशांकामध्ये वाढ झाली आहे. ०.१० वाढीव एफएसआय मिळणार असल्याने मिळकतधारकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. शिवाय इमारतीची उंची ३५ मीटरवरून ५० मीटरपर्यंत करण्यास मंजुरी मिळाल्याने बांधकाम क्षेत्रासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

नव्या बांधकामविषयक नियमावलीला मंजुरी मिळाल्याने बांधकाम संदर्भातील १९९९ ची नियमावली रद्द होणार आहे. नगर विकास विभागाने चौदा ड वर्ग महापालिकेसाठी नव्या बांधकामविषयक नियमावलीची अधिसूचना काढली असली तरी ती राजपत्रात (गॅझेट) समाविष्ट झाल्यानंतरच अंमलबजावणी होणार आहे.

सध्या कोल्हापूर शहरात ३५ मीटर उंचीपर्यंत बांधकामाला परवाना आहे. नव्या नियमावलीनुसार आता ५० मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येणार आहे. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सध्या चटई निर्देशांक एक (बेसिक) इतका आहे. नव्या नियमावलीत मिळकतधारकांना ०.१० टक्के वाढीव एफएसआय मिळणार आहे. मात्र छोट्या प्लॉटधारकांना नव्या नियमावलीचा फटका बसणार आहे. ज्या प्लॉटला नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचा रस्ता आहे त्याला टीडीआर व पेडअप मिळणार नाही. कोल्हापुरात ५० टक्क्याहून अधिक मिळकती या सहा ते साडेसात मीटर रस्ता असलेल्या आहेत. त्यामुळे अशा मिळकतींना नव्या नियमावलीचा फायदा मिळणार आहे.

गावठाण परिसरातील बांधकामांना पूर्वी सेटबॅक नव्हता. नव्या नियमावलीनुसार आता २५० चौरस मीटर क्षेत्रावरील प्लॉटला सेटबॅक लागणार आहे. शिवाय इमारतीची उंची १६ मीटरपेक्षा उंच असल्यास त्यासाठी स्वतंत्र निकष असून सामासिक अंतर सोडावे लागणार आहे. ५००० चौरस फुटापर्यंतच मिळकतधारकांना १६ मीटर उंचीमध्ये पूर्वी प्लॉटचा एफएसआय वापरता येत नव्हता. नव्या नियमावलीत इमारतीची उंची १६ मीटरपेक्षा वर जाणार आहे. १६ मीटरपेक्षा इमारत उंच गेली तर त्यांना अ​​धिक सामासिक अंतर सोडावे लागणार आहे. छोट्या प्लॉटमध्ये अधिक सामासिक अंतर सोडल्यावर बांधकाम क्षेत्र अत्यल्प राहणार आहे. परिणामी ५००० चौरस फुटापर्यंतच्या मिळकतींना नव्या नियमावलीचा फायदा कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.


या महापालिकांसाठी नवी​ नियमावली

कोल्हापूर, सांगली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, औरंगाबाद, परभणी, लातूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, मालेगाव या ड वर्गामध्ये समाविष्ट महापालिकेसाठी ही नवी नियमावली लागू असणार आहे.

एफएसआय आणि टीडीआर

ज्या मिळकतीचा आकार व त्या समोरील रस्ता मोठा त्यांच्यासाठी नवी नियमावली म्हणजे 'अच्छे दिन' ठरणारी आहे. १०० फुटी रस्त्याला १.१० एफएसआय, त्याला १.४० टीडीआर व ३० टक्के पेड अप मिळून २.८० एफएसआय मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना आधार हायटेक काठीचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोलिस आणि त्याच्या हातातील दंडुका हे चित्र तसे जुनेच. पण पोलिसांचा दंडुकाही हायटेक करण्याचा प्रयत्न भुसावळमधील चेतन नंदानी या तरुणाने केला आहे. पोलिसांच्या हातातील काठीच आता घटनांचे व्हीडिओ शूटिंग करेल. अंधारात प्रकाश देईल आणि आसपासच्या पोलिसांना स्वतःचे लोकेशनही सांगेल. चेतन नंदानी याने या काठीचे प्रझेंन्टेशन गृह खात्याकडे केले असून, राज्य सरकारची मंजुरी मिळताच पोलिसांना नव्या काठीचा आधार मिळणार आहे.

नाशिकच्या संदीप फाऊंडेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅँड टेलिकम्युनिकेशनच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या चेतनला दीड वर्षांपूर्वी पोलिसांसाठी हायटेक काठीची कल्पना सुचली होती. वर्षभर त्यावर काम करून चेतनने काठी बनवली आहे.

या काठीमध्ये सलग सहा तास चालणारा टॉर्च आहे. समोर घडणाऱ्या घटना चित्रित करण्यासाठी कॅमेरा आहे. समोरचा व्यक्ती काय बोलतो हे टिपण्यासाठी माइकचीही सोय आहे. सर्व चित्रिकरण रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था यात केली आहे. याशिवाय जीपीएस सिस्टिममुळे पोलिस कुठे आहे ते संबंधिताला समजते. त्याचबरोबर मुख्यालयात किंवा संबंधित पोलिस ठाण्यालाही माहिती मिळते. ही सर्व उपकरणे काठीच्या आत असल्याने ती सुरक्षित आहेत. काठीतील उपकरणे मोबाइलप्रमाणे चार्ज करता येतात.

चेतन नंदानी याने बुधवारी (ता. २१) पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर या काठीचे प्रेझेंटेशन केले. आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनीही या हायटेक काठीचे कौतुक केले. नंदानी याने नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही हायटेक काठीची माहिती पोहोचवली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या काठीचे

कौतुक केले आहे. पोलिस दलासाठी या काठीच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारच्या परवानगीनंतर लवकरच ही काठी पोलिसांच्या हातात दिसेल. नंदानी याने केंद्र सरकारकडून काठीचे पेटंटही मिळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साजणीच्या युवकाचा खून

0
0

साजणीच्या युवकाचा

खून

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

लक्ष्मी औद्यौगिक वसाहत, हातकणंगले ते रुईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला. शशिकांत बबन कांबळे (वय २८, रा.साजणी ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून ही घटना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत हा सूत गिरणीत कामाला होता. वर्दळीच्या ठिकाणी हा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मृताचा भाऊ दिपक कांबळे याने हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी, साजणी येथील शशिकांत कांबळे हा तरुण कामानिमित्त हातकणंगले येथे आपली मोटारसायकल घेऊन गेला होता. तो लक्ष्मी औद्यौगिक वसाहतीमध्ये आला असता त्याला अज्ञातांनी मोटारसायकलवरुन खाली पाडून त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यामध्ये शशिकांत हा अतिरक्त रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन सायंकाळी शशिकांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हातकणंगलेकडे कामासाठी तसेच औद्यौगिक वसाहतीतीत जाणाऱ्या कामगारांची या रस्त्यांवर नेहमीच गर्दी असते. मारेकरी हे माहीतगार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हातकणंगले पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यरत केली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.

------------------

चौकट

परिसरात खळबळ

हातकणंगले पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील हा दोन महिन्यांतील चौथा खून आहे. रुकडीतील डॉक्टर दाम्पत्याच्या खुनातील मारेकरी अजून सापडलेले नाहीत. हेरले येथे वृद्धाने पत्नीचा किरकोळ कारणावरुन खून करुन तो स्वःत पोलिस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर गुरूवारी झालेल्या साजणीच्या तरुणाच्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा द्या कॉरिडॉर देऊ : सुभाष देसाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बेंगळुरू-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर कोल्हापुरातून जाण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पण, त्यासाठी सुमारे चार ते पाच हजार एकर जमीन लागणार आहे. एवढी जमीन उपलब्धता करून दिल्यास कॉरिडॉर कोल्हापुरातून जाण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी एकत्र येऊन जागा उपलब्ध करून द्यावी. त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवावा,' अशी भूमिका बुधवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुंबईतील बैठकीत मांडली. त्याचबरोबर कॉरिडॉरच्या मार्गावर अजूनही अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे कोल्हापूरला वगळले असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेंगळुरू-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी आणि सहा आमदारांनी मुंबईत देसाई यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. उद्योग सचिव अपूर्वा चंद्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक आणि डॉ. सुजित मिणचेकर उपस्थित होते. कोल्हापुरात महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने आयोजित मेक इन कोल्हापूर विषयावरील 'मटा कॉन्क्लेव'मध्ये उद्योगमंत्री देसाई यांनी कोल्हापूरच्या उद्योजकांच्या प्रश्नांसदर्भात मुंबईत बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर उद्योजकांची प्राथमिक बैठक घेऊन पुढे लोकप्रतिनिधींसोबत तातडीची बैठक घेऊन उद्योगमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी उद्योजकांना वेळ दिला.

सकाळी अकराच्या सुमारास उद्योगमंत्री आणि आमदार यांची बैठक झाली. त्यानंतर बारा वाजता उद्योजकांसमवेत एकत्रित बैठक झाली. यात कॉरिडॉरसह जिल्ह्यातील उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर सुमारे एक तास चर्चा झाली. उद्योगमंत्री देसाई यांनी दोन्ही बैठकींमध्ये कोरिडॉर कोठून जाणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी कोल्हापुरात जागा उपलब्ध होत नसल्यास इतर प्रस्ताव असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना दिली.

बैठकीत जैन यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित एमआयडीसी अशा तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नाही. कॉरिडॉरच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे उद्योग येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कॉरिडॉर कोल्हापुरातून जावा, अशी मागणी केली.

त्यावर देसाई म्हणाले, 'कॉरिडॉरसाठी एकट्या कोल्हापुरातून चार हजार एकर जमीन लागणार आहे. कॉरिडॉर कोल्हापूर परिसरातून गेला तर निश्चितच आनंद होईल. मात्र, यामध्ये जमिनीची मुख्य अडचण आहे. कॉरिडॉरसाठी प्रचंड जमीन लागते. त्यामुळे प्रतिसाद मिळेल, तिथे संपादन केले जाते. कॉरिडॉर हवा असल्यास त्यासाठी आवश्यक जमीन कोल्हापूरकरांनी देण्याचे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. औरंगाबादमध्ये चार हजार हेक्टर जमीन ताब्यात आहे. आणखी शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत. कोल्हापुरातील जमीन घेताना जनजागृती आवश्यक असून, त्यासाठी सर्वांचेच सहकार्य लागणार आहे.' मोठ्या प्रमाणावर जमीन लागणार असल्याने विरोध होऊ नये यासाठी सर्व आमदार, खासदार आणि उद्योजकांनी एकत्र येऊन जमीन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

0000

००

उद्योगमंत्र्यांसमवेत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. बैठकीस उपस्थित राहिलेल्या सर्व आमदारांनी कॉरिडॉर संदर्भात सर्व ते प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. येत्या आठवड्यात उद्योजक आणि लोकप्रतिनिधींची कोल्हापुरात पुन्हा बैठक घेऊन जागेच्या उपलब्धतेविषयी चर्चा केली जाईल.

सुरेंद्र जैन, अध्यक्ष, स्मॅक

००

सरकारने आता उद्योगांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर काम करण्याची गरज आहे. यात रेल्वे, पोर्ट कनेक्टिव्हिटी, विमानसेवा या सुविधांमध्ये झपाट्याने प्रगती करून कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राला बुस्टर दिला पाहिजे.

सतेज पाटील, आमदार
विकासासाठी बंगळूरू-मुंबई कॉरिडॉरमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होणे अत्यावश्यक आहे. यासाठी गेले काही महिने विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी लागणारी जमीन संपादित करण्यासाठी कार्यवाही होणे गरजेचे आहे.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचारीच करणार स्वच्छता

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कचरा उठाव व स्वच्छतेचा ठेका देवूनही शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायम राहिल्याने आता हेच काम नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. नगरपालिकेमार्फत २० वॉर्डात दोन शिफ्टमध्ये कचरा उठाव व त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा देण्यास सभागृहाने गुरुवारच्या विशेष सभेत मान्यता दिली. यामुळे नगरपालिकेचे वर्षाकाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर उर्वरीत सहा वॉर्डातील कचरा उठावाचे काम खासगी ठेकेदारांमार्फत केले जाणार आहे. स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन सेवा कर, दुकानगाळे आदी प्रश्नांवरुन लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला भंडावून सोडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.

दरम्यान, सभा सुरु असताना सभागृहाबाहेर जयभीम झोपडपट्टीतील लाभार्थ्यांनी घरकुल प्रश्नावरुन जोरदार घोषणाबाजी सुरु केल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. पालिकेला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. मुख्याधिकारी रसाळ यांना पोलिस बंदोबस्तातच सभागृहाबाहेर नेण्यात आले.

शहरातील कबनूर वाढीव हद्दीसह २६ वॉर्डातील घरोघरी जावून कचरा गोळा करणे व तो डेपोवर नेऊन टाकणे या सहा महिन्याच्या कामासाठी एक कोटी ७१ लाख ७३ हजार ४४७ रुपयांच्या खर्चाला तसेच पाच वॉर्डातील रस्ते, गटारी साफसफाई व कचरा उठावासाठी ८० लाख ३१ हजार ५०१ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देणे आणि या दोन्ही कामांसाठी लागणारी ५० टक्के रक्कम १४ व्या वित्त आयोगातून खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यासाठी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा बिरंजे यांनी ही विशेष सभा बोलविली होती.

सुरुवातीला नगरसेवक शशांक बावचकर यांनी, वृत्तपत्रांच्या थकीत बिलाबाबत प्रश्न उपस्थित केला. शब्द, मनगट आणि ताकद वापरली जाते अशा व्यक्तींची बिले नगरपालिका तातडीने अदा करते. वृत्तपत्रांना मात्र वर्षानुवर्षे बिले दिली जात नाहीत. ही बाब गंभीर असल्याचे सांगत हा प्रश्न किती दिवसात मार्गी लागणार असा सवाल केला. तसेच नगरसेवक महादेव गौड यांनीही प्रशासन वृत्तपत्रांच्या बिलांबाबत उदासीन असल्याचा आरोप केला. त्यावर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील शिवाजी पुतळा परिसरात नगरपालिकेने दुकानगाळे बांधले आहेत. त्यांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. मात्र या दुकानगाळ्यांना विशिष्ट राजकीय पक्षाचा रंग देण्यात आल्याचा मुद्दा नगरसेवक बावचकर यांनी उपस्थित केला. अजितमामा जाधव यांनी शहरातील शुध्दपेयजल प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केल्याने उपनगराध्यक्ष महावीर जैन, संजय कांबळे, बाळासाहेब कलागते, भाऊसो आवळे यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरुन या सर्वांच्यात शाब्दिक वाद झाला.

चौकट

जांभळे-जाधव वाद

भागातील कचरा उठावाबाबत माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी शविआचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांनी स्वच्छता कामाबाबत काल बैठक झाली असून त्यानुसार काम होणार असल्याचे सांगताच संतापलेल्या जांभळे यांनी बैठकीचे मला सांगू नका. भागासह शहरातील स्वच्छतेबाबत काय निर्णय घेणार ते सांगा असा सवाल केला. विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर प्रशासनाऐवजी तुम्ही का देता?, असे जांभळे यांनी म्हणताच त्यावरुन जाधव संतापले आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. रकुलांच्या प्रलंबित कामासाठी शुक्रवारी बैठक घेवून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवाजी द ग्रेट’चे उद्या प्रकाशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजाराम कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिलेले आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेले 'शिवाजी द ग्रेट' या ग्रंथाचे प्रकाशन उद्या शनिवारी (ता. २४) केशवराव भोसले नाट्यगृहात होत आहे. सर्वात मोठे आणि अभ्यासपूर्ण शिवचरित्र म्हणून या ग्रंथाचा उल्लेख केला जातो.

माजी मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आणि इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे यांच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता प्रकाशन सोहळा होईल.

शिवाजी द ग्रेट हा ग्रंथ पंजाब प्रांतातील मुलतान येथील डॉ. बाळकृष्ण यांनी लिहिला होता. डॉ. बाळकृष्ण हे लंडन विद्यापीठातील पीएचडीधारक होते. राजाराम कॉलेजच्या प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आणि संशोधनही केले. त्यांनी कोल्हापुरात १८ वर्षे वास्तव्य केले होते. त्यापैकी १० वर्षे शिवचरित्रासाठी खर्ची घातली. या काळात त्यांनी १८०० पानांचा शिवाजी द ग्रेट हा चार खंडातील ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिला. तत्कालीन व्यक्ती, नकाशे, ठिकाणे, गडकोटांची छायाचित्रे, कागदपत्रांचा ऐवज चार खंडात आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या चार खंडाचे संपादन केले आहे. 'आमदार नितेश राणे, सतेज पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित राहतील', अशी माहिती इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटी ग्रामीण रूग्णालयासउपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा

0
0

म.टा.वृत्तसेवा,गारगोटी

भुदरगड तालुक्यातील आरोग्य सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या गारगोटी ग्रामीण रूग्णालयास राज्य सरकारने उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला असून यासाठी १६ कोटी ३५ लाख रूपयाचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. गारगोटी ग्रामीण रूग्णालयाजवळ झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. याबद्दल रूग्णालयाचे कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक व कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

गारगोटी हे तालुक्याचे मुख्य केंद्र असून या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात तालुक्यातील रुग्ण दाखल होतात. येथे उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या आरोग्य सुविधा तसेच वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होत असल्याने रुग्णांची गर्दी असते. तालुक्यात जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्रे असली तरी त्याठिकाणी मर्यादित सुविधा तसेच बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांअभावी सेवा मिळत नाहीत. यामुळे ग्रामीण रूग्णालयावर ताण पडतो. त्यामुळे या रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी होत होती. या मागणीचा विचार करून आमदार प्रकाश आबिटकर यांनी हा प्रश्न सरकार दरबारी लावून धरला होता. त्यासाठी आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीने रूग्णालयाचा दर्जा उंचावण्यास मंजुरी दिली.

उपजिल्हा रूग्णालयामुळे गारगोटी येथे तज्ञ डॉक्टर, विविध शस्त्रक्रिया करण्याची सोय, विविध प्रकारच्या यंत्रसामुग्रीची सोय यासह विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेची चांगलीच सोय होणार आहे. या मंजुरीच्या आनंदाप्रित्यर्थ रूग्णालयाजवळ समारंभ झाला.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, 'केवळ लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा जनतेच्या गरजा ओळखून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर असून भविष्यात मतदारसंघातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याकामी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी पंचायत समिती सदस्या विजयमाला चव्हाण, सरपंच रूपाली राऊत, उपसरपंच अरुण शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.सी.अभिवंत, डॉ.सचिन कोरे, वैशाली पाटील, धनाजी खोत, सर्जेराव मोरे, संजय चिले यांच्यासह कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images