Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संख्या घटली

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : एकेकाळी अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची शैक्षणिक प्रवेशाच्या सुरुवातीस प्रचंड धावपळ होत होती. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित झाल्यानंतर संस्थास्तरावरील प्रवेशासाठी म्हणेल ती 'किमंत' मोजून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला जात होता. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात रिक्त जागांचे प्रमाण वाढत असून यावर्षी राज्यातील सुमारे ६० हजार तर शिवाजी विद्यापीठतंर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील सात हजार १०० जागा रिक्त राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कार्पोरेट कार्यालयात गल्लेलठ्ठ पगराची नोकरी चालून येत असल्याने या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढू लागला. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन असे शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची खात्री होऊ लागल्याने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचेच व्यावसायिकरण होऊ लागले. त्यामुळे म्हणेल ती 'किमंत' मोजून या शाखेला प्रवेश घेतला जाऊ लागला. कमी टक्केवारी असून केवळ संपत्तीच्या जोरावर प्रवेश दिले जाऊ लागल्याने 'स्कील' इंजिनीअर्सचा मुद्दा निर्माण होऊ लागला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नोकरीला आवश्यक 'स्कील' नसल्यामुळे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थी अपात्र ठरू लागले. तसेच निकालाची टक्केवारीहू कमी होऊ लागली. त्यामुळे बेरोजगारीमध्ये वाढ होऊ लागली.

अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी स्थिती असताना प्रवेश प्रक्रियेतील बदलाचाही परिणाम या शाखेच्या अभ्यासक्रमावर होऊ लागला. सीईटी, जेईई, नीट अशा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत गेली. प्रवेश वेळापत्राकातील बदल आणि पात्रता परीक्षातील नियोजनाचा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये कायम राहिला. तर काही विद्यार्थी केवळ प्रवेश प्रक्रियेच्या अपुऱ्या माहितीमुळे वंचित राहिले. प्रवेश प्रक्रियेबाबत असा गोंधळ सुरू असतानाच उद्योग क्षेत्रातील मंदीचाही फटका या अभ्यासक्रमाला बसत आहे. अभ्यासक्रम पूर्ण करुन नोकरीची संधी नसल्यामुळे अनेक बेरोजगार पदवी प्रमाणपत्रे घेऊन कंपन्यांची उंबरटे झिजवत आहेत. अशा विद्यार्थ्यांकडे पदवी व केवळ पुस्तकी ज्ञान असून प्रॅक्टिकल नॉलेज नसल्याचा परिणाम त्यांना बेरोजगार ठेवण्यात सह्यभूत ठरत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढत असताना तज्ज्ञ प्राध्यपकांची उणीव भासत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या शाखेच्या टक्केवारीमध्येही घट होऊ लागली आहे. त्याचाही परिणाम अभ्यासक्रम प्रवेशावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

नियामांकडे कानाडोळा भोवला

ऑल इंडिया काउंन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) मागील काही वर्षांत अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाढीव जागांना परवानगी दिली. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्याही जागांमध्येही वाढ केली. त्याप्रमाणात महाविद्यालयातील सुविधा, नियमांची अंमलबजावणी झालेली नाही. याचा परिणाम प्रवेशावर झाल्याचे दिसून येत आहे.


मेक इन इंडिया', 'स्कील इंडिया', 'डिजीटल इंडिया'च्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे. भविष्यात या योजनांमुळे इंजिनीअरिंग क्षेत्रात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या पदवीधारकांना नोकरीची संधी मिळणार आहे.

प्रा. दिग्व‌िजय पवार, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंदची बैठक फिस्कटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाईचे समर्थन आयुक्त ​पी. शिवशंकर यांनी कायम ठेवल्याने काम बंद आंदोलनाबाबत रविवारी सकाळी आयुक्त व कर्मचारी संघाची झालेली बैठक फिसकटली. कर्मचारी संघाने काम बंद करण्याचा निर्णय जाहीर केला तर आयुक्तांनी बंदमध्ये सहभागी होणाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळपासून चतुर्थश्रेणीपासून सर्व कर्मचारी बंदमध्ये सहभागी होणार असल्याने महापालिकेच्या सेवा विस्कळीत होणार आहेत.

पाणीपुरवठा विभागाकडे घेतलेले कर्मचारी, त्यांना देण्यात येत असलेले काम, सुभाष स्टोअर्स यंत्रशाळा विभागप्रमुख चेतन शिंदे यांचे निलंबन या विषयावरून कर्मचारी संघाने काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत रविवारी सकाळी आयुक्त शिवशंकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई, दिनकर आवळे, विजय वणकुद्रे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये संघाच्यावतीने देसाई यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या नोटीस अन्यायकारक आहेत. महापालिकेच्या कामगारांना पाणीपुरवठा विभागाकडे घेऊन त्यांना सांगण्यात येत असलेले कामाचे स्वरुप चुकीचे आहे. तसेच शिंदे यांच्या निलंबनाची कारवाई योग्य नसल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी 'मी केलेली कारवाई योग्यच असून तो माझा अधिकार आहे' असे सांगितले. यामुळे कर्मचारी संघाने काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सांगताच 'तुम्ही तुमच्याप्रमाणे निर्णय घेऊ शकता, मी माझ्याप्रमाणे काम करतो' असे आयुक्तांनी सांगितल्यानंतर बैठक संपली. त्यानंतर कर्मचारी संघाने काम बंद आंदोलन केले जात असल्याचा निर्णय जाहीर केला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी शहरातील रस्त्यांवरील स्वच्छता होणार नाही. काम बंद आंदोलनामुळे महापालिकेच्या विविध सेवा ठप्प होण्याची भीती आहे. या बंदमधून पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, अग्निशमन, परिवहन या सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र सफाई कामगार रस्त्यावर सफाईसाठी उतरणार नसल्याने सोमवारी सकाळी शहरातील स्वच्छता होणार नसल्याचे स्पष्ट आहे. तसेच कचरा उठावही होणार नाही. महापालिकेमध्ये तीन हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. सोमवारी सकाळी नऊ वाजता सर्व कर्मचारी महापालिका चौकात जमणार आहेत. तिथे निदर्शने करून दसरा चौकात हद्दवाढीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा महापालिकेत येऊन कर्मचारी निदर्शने करणार आहेत. या आंदोलनातून अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्याचे संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी सांगितले.

बंद बेकायदेशीर, आयुक्त कारवाई करणार

कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कारवाईबाबतचे पत्र सरकारकडे पाठवले आहे. त्यानुसार मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्यासाठी केले जात असलेले आंदोलन योग्य नसल्याचेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्गणीच्या पावतीवर ‘दुर्गराज रायगड’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गडकिल्ल्यांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपुरा ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांची माहिती प्रत्येकाने शाळेच्या पुस्तकांमध्ये अभ्यास म्हणून वाचली. पण, प्रत्येकाला क्वचितच त्याला या सर्व किल्ल्यांना भेट देणे शक्य होते. काहीवेळा किल्ला आपल्या कोल्हापूरपासून किती अंतरावर आहे? किंवा त्या किल्ल्याची सध्याची स्थिती काय आहे? याची सविस्तर माहिती अनेकांना नसते. ही माहिती गणेशोत्सवाच्या निमित्ताने करून देण्याची जबाबदारी शिवाजी पेठेतील हिंदवी स्पोर्टस् या मंडळाने उचलली आहे. विशेष म्हणजे पावतीवरील जाहिरातीतून मिळणाऱ्या तीन-चार हजार रुपयांवर पाणी सोडत मंडळाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना दरवर्षी पावती दिली जाते. अनेक मंडळाच्या पावत्या दरवर्षी त्याच प्रकारच्या असतात. उत्सव संपल्यानंतर किंवा त्यापूर्वीच त्या फेकून दिल्या जातात. मात्र, हिंदवी स्पोर्टसची पावती संग्रही ठेवण्यासारखी आहे. गेल्या वर्षी या मंडळाने पावती पुस्तकावर एका शिवकालीन किल्ल्याची माहिती देण्याचा निर्णय घेतला. शिवरायांच्या जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्याची त्यासाठी निवड करण्यात आली. या किल्ल्याला भेट कशी देता येईल. किल्ल्यावर गेल्यानंतर कोठे काय पहायता येईल? या सगळ्याची माहिती पावतीवर देण्यात आली होती.

यंदा मंडळाने शिवरायांची राजधानी रायगडची निवड केली आहे. त्यानुसार पावतीवर रायगडाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 'दुर्गराज रायगड' असे पावतीला नाव देण्यात आले असून, रायगडावरील दहा महत्त्वाच्या ठिकाणांच्या छायाचित्रांचे कोलाज पावतीच्या पुढील बाजूस देण्यात आले आहे. मागील बाजूस रायगडचे मुंबई-गोवा महामार्गापासूनचे अंतर, समुद्र सपाटीपासूनची उंची, शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख याची माहिती देण्यात आली आहे. रायगडावरील इतर ठिकाणांमध्ये राजमाता जिजाऊंच्या समाधीचा उल्लेख होताना दिसत नाही. या पावतीमध्ये गडावर समाधी कोठे आहे? याची माहिती देण्यात आली आहे. त्याच बरोबर मेणा दरवाजा, राजवाडा, सिंहासनाचा चौथरा, भव्य नगारखाना, शिवरायांचे निवासस्थान, शिवछत्रपतींची समाधी, भवानी कडा या ठिकाणांचीही माहिती देण्यात आली आहे.

मंडळाचा दरवर्षी तांत्रिक देखावा असतो. दोन वर्षांपुर्वी मंडळाने केलेल्या सुपरमॅनला खूप लोकप्रियता मिळाली होती. यंदाही असाच देखावा करण्याचे नियोजन असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. गणेशोत्सवानंतर मंडळाच्या वर्गणीतून शिल्लक रक्कम गरजू कुटुंबाला देण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे.

राज्याभिषेक सोहळा राष्ट्रीय सण व्हावा
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला होता. सध्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने दरवर्षी गडावर राज्यभिषेक सोहळा होतो. या सोहळ्याला शिवप्रेमींसह मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री हजेरी लावतात. या लोकोत्सवाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करावे, अशी इच्छा मंडळाने या पावतीवर व्यक्त केली आहे.

गड-किल्लेच छत्रपती शिवरायांची खरी स्मारके आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन व्हावे, अशी आमच्या मंडळाची भूमिका आहे. या किल्ल्यांचे संवर्धन झाले, तरच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहचेल. त्यामुळे मंडळाच्या पावतीवर दर वर्षी एका किल्ल्याची माहिती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आमचा आदर्श घेऊन पुढच्या वर्षी एखाद्या जरी मंडळाने असा उपक्रम सुरू केला, तरी समाधान मिळेल.

- अमित जाधव, कार्यकर्ता, हिंदवी स्पोर्टस्

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजात कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्वीच्या लेखक, दिग्दर्शकांची अभिजात कलाकृती नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी जुन्या नाटकांना उजाळा देण्याची गरज आहे. संवाद, अभिनय, लेखन याबाबत जाणून घेण्यासाठी नटसम्राट सारखी पूर्वीची नाटकं नव्याने सादर करणे आवश्यक असल्याचे मत चर्चासत्रामध्ये कलाक्षेत्रातील नटश्रेष्ठांनी व्यक्त केले.

शाहू स्मारक भवन येथे प्रतिज्ञा नाट्यरंग आणि सुगुण नाट्यसंस्थेच्या वतीने 'नटसम्राट ते नटसम्राट' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कुलकर्णी, अभिनेता संजय तोडकर, दिग्दर्शक सुनील घोरपडे, अभिनेता प्रफुल्ल गवस, बालसाहित्यिक गोविंद गोडबोले, शफी नायकवडी आदी उपस्थित होते.

कुलकर्णी म्हणाले, 'पूर्वीची नाटक नव्याने सादर करण्यासाठी सरकार अनुदान देत असून ही केवळ अनुदानासाठी प्रयोग न होता ती नाटके रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहचली पाहिजेत. तसा प्रयोग सुनील घोरपडे यांनी नटसम्राट नाटक नव्याने सादर करुन केला आहे. दोन पिढ्यांच्या पोकळीतून निर्माण झालेली एका असामान्य नटाची ही शोकांतिका.

गोडबोले म्हणाले, प्रेक्षक हा कलाप्रेमी असतो. त्यांचे हे नाट्यवेड कलाकारांनी पूर्ण केलं पाहिजे. नाटकात संवाद, उत्तम अभिनय, संगीत, आवाज, विविध रसांच्या छटा, नाटकाची भाषा जर जमली तरच नाटक प्रेक्षक ते डोक्यावर घेतात.'

नायकवडी म्हणाले, 'शिरवाडकरांनी किंग लियरचे भाषांतर करुन ही अभिजात नाट्यकृती निर्माण केली. ज्याच्या जीवनावर दाखवायची होती ते पहिले नटसम्राट म्हणजे नानासाहेब फाटक. ज्याचे आयुष्य दारुमुळे बरबाद झाले. यानंतर श्रीराम लागू यांनी हे शिवधनुष्य उचलले. ४०० प्रयोगानंतर सतीश दुभाषींनी नटसम्राट उभा केला. अशा प्रकारे अनेक नामवंतांकडे हे नाटक हस्तांतरित झाले असले तरीही या नाटकातले आपलेपण टिकून आहे.'

तोडकर, घोरपडे यांनीही जुन्या नाटकाचे पुनरुज्जीवन होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पप्पू गवस अभिनित नटसम्राट नाटकाचे प्रयोगही सध्या सुरु असल्याचेही सांगितले. चर्चासत्राची सुरुवात पप्पू गवस यांनी सादर केलेल्या किंग लियरच्या स्वगताने झाली. सूत्रसंचालन कृष्णा जमदाडे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेतृत्वाची पोकळी भरणार कधी ?

$
0
0

Gurubal.Mali

@timesgroup.com

कोल्हापूर ः कोणत्याही शहराचा, जिल्ह्याचा अथवा भागाचा विकास हा कणखर नेतृत्व अथवा राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. राजकीय इच्छाशक्ती असेल त्या-त्या भागाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. औरंगाबाद, पुणे, नाशिक अशा शहरांचा झालेला विकास पाहता हे सहज लक्षात येईल. पण गेल्या अनेक वर्षांत कोल्हापूरला नेतृत्वाची पोकळी कायमच राहिल्याने विकासात हा जिल्हा कायमच मागे पडला आहे. जिल्ह्यात ताकदीचे अनेक नेते असूनही त्यांची इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी दोन्ही कमी पडल्याने कोल्हापूरचा म्हणावा तसा विकास झाला नाही. प्रत्येक बाबतीत संघर्ष करण्यातच कोल्हापूरकरांची बरीच ताकद खर्ची पडत आहे. ही नेतृत्वाची पोकळी जोपर्यंत भरून निघणार नाही, तोपर्यंत विकासाची गाडी सुसाट धावण्याची शक्यता फारच कमी आहे.

कोल्हापूरला समृद्ध आर्थिक व ऐतिहासिक परंपरा आहे. कोल्हापुरी चप्पल, गूळ, दागिने, ऊस, वस्त्रोद्योग केवळ राज्यात अथवा भारतात नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. सहकाराचे जाळे विणलेले पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे महत्त्वाचे केंद्र आहे. या सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याचा बराच विकास झाला. येथील वातावरण, धरणे, सुपिकता, माती, भरपूर पाऊस, पाणी अशा अनेक नैसर्गिक मुबलकतेमुळे जिल्ह्याचा विकास झाला; पण तो जेवढा व्हायला हवा होता, तेवढा झाला नाही. नेत्यांमुळे हा जिल्हा पुढे आला असे फारसे कधी दिसले नाही. राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता येथील अनेक नेत्यांमध्ये असूनही हे नेतृत्व राज्यपातळीवर चमकले नाही. येथील नेत्यांमध्ये प्रबळ राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा जिल्हा विकासापासून अनेक किलोमीटर दूर राहिला आहे.

राजर्षी शाहू महाराजांमुळे जिल्ह्याचा विकास झाला, त्यांची दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी बांधलेल्या राधानगरी धरणामुळे आज आपण पाणी पितो, शेती करतो. गेल्यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता. दुष्काळाच्या तीव्र झळा राज्यभरातील जनता सोसत असताना कोल्हापूरला त्या फारशा बसल्या नाहीत. काळम्मावाडी व राधानगरी धरणांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारसा भासला नाही; पण आता राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा ढोल वाजवत असताना आपण कधी काय करणार की नाही, याचा आता विचार करण्याची गरज आहे. त्यांची विकासाची दूरदृष्टी आपल्याला कधी कळणार, हा सर्वसामान्य लोकांच्या मनातील प्रश्न आहे.

नेतृत्वाची खाण, पण...

कोल्हापूरला अनेक नेते लाभले; पण त्यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे काम झाले नाही. रत्नाप्पाण्णा कुंभार, उदयसिंगराव गायकवाड, श्रीपतराव बोंद्रे, बाळासाहेब माने, सदाशिवराव मंडलिक, कल्लाप्पाणा आवाडे, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर, आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील अशा अनेक नेत्यांचा कोल्हापूरच्या विकासात मोलाचा वाटा आहे, पण त्यांच्याकडून जेवढ्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. काहीजण जातीच्या राजकारणात मागे पडले, काहींना राज्याच्या राजकारणापेक्षा मतदारसंघ आणि जिल्ह्याचे राजकारण महत्त्वाचे वाटल्याने त्यांनी त्यातच अधिक लक्ष घातले. ते स्वतःच्या मतदारसंघात अडकून बसल्यामुळे व त्यांनी व्यापक इच्छाशक्ती न दाखविल्याने जिल्ह्याचे, पर्यायाने त्यांच्यात राजकारणाचेही नुकसान झाले. क्षमता असूनही ते राज्यपातळीवर नेतृत्व करू शकले नाहीत. याउलट शेजारच्या सांगली जिल्ह्यातील वसंतदादा पाटील, सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण, सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे हे राज्याच्या राजकारणात केवळ चांगलेच चमकले; शिवाय राज्याचा कारभार त्यांनी सांभाळला. इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते हे या तिघांनी दाखवून दिले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांना भूषविता आले. या माध्यमातून त्यांनी आपल्या भागाचा विकास केला.

दुसऱ्या फळीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे हे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या बरोबरीने युवा नेतृत्व खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्याकडे आगामी काळात जिल्ह्याचे नेतृत्व येणार आहे. यातील मुश्रीफ, धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यात राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची नक्कीच क्षमता आहे; पण ते जिल्ह्याच्या गटबाजीत एवढे अडकले आहेत की, त्यांना राज्याचे नेतृत्व करायला संधीच मिळेना. त्यांनी ठरवले तर प्रत्येकाचे राजकारण बळकट होऊ शकते; पण तशी इच्छाशक्तीच दिसत नाही. नुकतेच खासदार झालेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्यात धमक आहे. या सर्वांनी ठरवले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही; पण या सर्वांचा रस एकमेकांना अडविण्यातच असल्याने कोणीच पुढे जाईनात. हे सर्व नेते गटबाजीत अडकले आहेत. एका पक्षात राहूनही एकत्र राहण्याची भाषा त्यांच्यात नाही. सर्वच पक्षांमध्ये गटबाजीची लागण झाली आहे. पक्ष एक आणि विचार वेगळे, त्यामुळे क्षमता असूनही कोल्हापुरात राज्यपातळीवर नेतृत्व तयार होण्यात अडचणी येत आहेत.

कोल्हापूरचा टोल हटवायचाच, असा नारा कोल्हापूच्या नेत्यांनी दिला. त्याला जनतेनेही साथ दिली. टोलमुक्तीच्या प्रश्नावर सर्वजण एकवटले. त्यामुळे टोलला महाटोला देण्यात नेते यशस्वी झाले. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते याचे ते उत्तम उदाहरण होय. पण अशी इच्छाशक्ती इतर प्रश्नांमध्ये दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या ​विमानतळाचा प्रश्न रखडला आहे, चित्रनगरीची अवस्था सुधारत नाही, थेट पाइपलाइनचे काम संथगतीने सुरू आहे, राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक पुढे सरकेना, शाहू जन्मस्थळाचे काम पूर्ण होईना, रेल्वेचे प्रश्न आहेत तसेच आहेत, चाळीस वर्षांनंतरही कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईना, आयटी क्षेत्रात कोल्हापूरची प्रगती होईना, औद्योगिक वसाहतींचे प्रश्न आहेत तसेच आहेत. हे सारे प्रश्न सुटायचे असतील तर नेतृत्वाची पोकळी भरून निघण्याची गरज आहे. नव्या दमाच्या जिल्ह्यातील तीन युवा नेत्यांनी मनावर घेतले तर हे सहज शक्य आहे.

माजी मंत्री विनय कोरे यांचे ध्येय मोठे होते; पण पुढे मर्यादा आल्या. त्यांच्या इच्छाशक्तीला बळ मिळाले नाही. विक्रमसिंह घाटगे या स्वच्छ चेहऱ्याच्या नेत्याचा शाहू साखर कारखाना आणि दूध संघ यापलीकडे झेप गेली नव्हती. कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी शहराच्या पलीकडे गेले नाहीत. नरसिंग गुरुनाथ पाटील चंदगडमध्ये, तर सा. रे. पाटील शिरोळमध्येच अडकले होते. खासदार राजू शेट्टी आक्रमक आहेत; पण पक्षाच्या मर्यादा असल्याने त्यांच्यासमोर अडचणी आहेत. भरमू सुबराव तर मतदारसंघाच्या राजकारणात अडकले. महादेवराव महाडिक यांचा तर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान भक्कम करण्यातच अधिक रस असतो. त्या पलीकडे जाण्याची त्यांची इच्छा दिसत नाही.

जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांनी सहकारात लक्ष घातले. साखर कारखाना, दूध संघ, बँका या माध्यमातून आपले राजकारण सुरू ठेवले आहे; पण हे करताना त्यांनी व्यापक दूरदृष्टी ठेवण्याची नितांत गरज आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याला राज्यपातळीवरील दोन नंबरचे पद मिळाले आहे. कोल्हापूरला प्रथमच एवढे मोठे पद मिळाल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. काम करण्याची त्यांच्यात धडाडी आहे. नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरून काढली तर विकासामध्ये जिल्हा नक्कीच भरारी घेईल यात शंका नाही.

या नेत्यांकडून अपेक्षा

खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरुडकर, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आवाडे, मालोजीराजे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रा. संजय मंडलिक.

'पर्यटन व्यवसाय वाढला तर कोल्हापूरच्या विकासाची फार मोठी​ भरारी आपल्याला दिसेल. पन्हाळ्यावर रोज मोठी गर्दी होते; पण तेथे सुविधा काहीच नाहीत, त्यामुळे पर्यटक तेथे थांबत नाहीत. अंबाबाई मंदिर परिसरदेखील सुविधांविनाच आहे. शेगावचा विकास होऊ शकतो, तर मग कोल्हापूरचा विकास का होऊ शकत नाही? यामध्ये राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असे वाटते. सर्व राजकीय नेत्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास कोल्हापूरचा विकास कोणीच रोखू शकणार नाही. त्याची सुरुवात म्हणून विमानसेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे.'

डॉ. संजय डी. पाटील

'कोल्हापुरात सकारात्मक गोष्टी हाणून पाडल्या जातात, अशी राज्यपातळीवर इमेज तयार झाली आहे. त्यामुळे अनेक उद्योजक येथे येण्यास तयार नाहीत. गुंतवणूकदारांमध्ये जोपर्यंत कोल्हापूरकरांविषयी आत्मविश्वास निर्माण होणार नाही, तोपर्यंत इकडे फारसे कोणी येणार नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या प्रगतीसाठी प्रथम या शहराची झालेली इमेज बदलायला हवी. विरोधाला विरोध करण्याचे जे येथे राजकारण सुरू आहे, ते प्रथम थांबायला हवे, तसे झाल्यास सकारात्मक गोष्टी येथे नक्की घडतील.'

दिलीप मोहिते, उद्योजक


'कोल्हापूर जिल्ह्याला एकमुखी आणि खमके नेतृत्व मिळाले नाही. जे नेतृत्व आहे, त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. खमके नेतृत्व नसल्याने वरिष्ठ पातळीवर कोल्हापूरकडे दुर्लक्ष केले जाते. एखाद्या प्रश्नासाठी पक्षीय मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही. श्रेय कोणाला मिळू नये यासाठी राजकीय नेत्यांची धडपड अधिक असते, यामुळे श्रेयवादात कोणतेच काम वेळेवर होत नाही. या पार्श्वभूमीवर जोपर्यंत राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येणार नाहीत , तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होणे शक्य नाही.'

विजय औताडे, कार्यकारी संचालक, शाहू कारखाना


एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा कोल्हापुरात होत नाही. त्याऐवजी प्रत्येक प्रश्नाला फाटे फोडण्यातच नेत्यांना मोठा रस असतो. विमानसेवा अचानक बंद पडते आणि चार-पाच वर्षे ती सुरू होत नाही यावरूनच हे लक्षात येते. नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नाही, समन्वय नाही, गांभीर्य तर नाहीच नाही आणि प्रशासनही समर्थ नसल्याने कोल्हापूर विकासात मागे पडले आहे.'

व्ही. बी. पाटील, उद्योगपती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉप थ्री खासदार म्हणजे काय ?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'उत्कृष्ट संसदपटू ऐकले होते, परंतु संसदेत कधी 'टॉप टेन' आणि 'टॉप थ्री' असे कधीच ऐकले नव्हते. केवळ प्रश्न मांडण्यापेक्षा किती प्रश्नांची सोडवणूक झाली हे महत्वाचे आहे. अभ्यास करायला जनमानसात मिसळायला पाहिजे. आरशासमोर प्रॅक्टिस करून काय साध्य होणार ? त्यापेक्षा दिवंगत मंडलिकांची काही शाश्वत अपूर्ण कामे पूर्ण करा. तुमचे अभिनंदनच नव्हे तर पुरस्कारही देवू,' असा टोला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी नाव न घेता खासदार धनंजय महाडिक यांना दिला.



मुरगूड (ता.कागल) येथे मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या ५१ व्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी प्रा.मंडलिक बोलत होते. अध्यक्षस्थानी मारुती ओतारी होते.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'लोकांनी सदाशिवराव मंडलिक हयात असताना आणि पश्चातही आमच्यावर प्रेम केले. विविध संस्था उभारून त्यांनी लोकांसाठी शाश्वत विकासाचे काम केले. चांगल्या लोकांना नेतृत्वाची संधी देऊन त्यांना राजकीय प्रवाहात आणले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वीरेंद्र काम करतील. त्या दिशेने त्यांचे काम सुरु आहे. आता प्राथमिक सोयींच्या पुढे जाऊन काम करण्याची गरज आहे. मंडलिकांची तिसरी पिढी युवकांसाठी काम करत आहे. यापुढे गरीब आणि महिलांसाठी काम करण्याची गरज आहे. घराणेशाही न ठेवता स्थानिकच्या आणि चांगल्या लोकांना नगरपालिकेत संधी देऊन दिवंगत मंडलिक याना अभिप्रेत असलेला विकास करूया. मुरगुडमध्ये अनेक विकासनिधी आले. त्यामध्ये कोल्हापूरसारखी टक्केवारी सुरु झाली असे वाटते, कारण नगरसेवकांचे बंगले पटापट उभे राहत आहेत. '



राजेखान जमादार म्हणाले,' संजय मंडलिक हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे. एएनएसयुआयच्या माध्यमातून त्यांनी तरुणांसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे. प्रा. मंडलिक आज खासदार नाहीत याला आपण सर्वजण जबाबदार आहोत. त्याची भरपाई मुरगूड पालिकेवर मंडलिक गटाचा झेंडा उभारून करू.'

वीरेंद्र मंडलिक म्हणाले, 'प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकांची आपुलकी मिळत आहे. त्यामागे दिवंगत मंडलिक आणि संजय मंडलिक यांचे कार्य आहे. युवा मंचच्या माध्यमातून मंडलिक यांचे विचार तळागाळात पोचवणार आहोत. प्रभागनिहाय युवा मंचच्या शाखा उभारू. नगरपालिकेत मंडलिक गटाला संधी द्या. मुरगूडला स्मार्ट सिटी करू.' यावेळी नामदेवराव मेंडके, विकी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत दत्तात्रय मंडलिक यांनी केले. याप्रसंगी नामदेवराव मेंडके,आर डी पाटील, वैशाली सुतार, रुपाली पाटील, अनिता सनगर, बाजीराव गोधडे ,किरण गवाणकर,सर्जेराव पाटील,एस व्ही चौगले, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.

'शाहू' बिनविरोध व्हावा

कागलच्या शाहू कारखान्याच्या निवडणुकीचा संदर्भ देवून प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून दिवंगत विक्रमसिंह राजेंनी सहकारातील मानदंड उभा केला आहे. कारखाना चांगला चालवून देशात आदर्श निर्माण केला आहे. ते पहाता समरजीतसिंह घाटगेंच्या नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व प्रयत्नांना आम्ही सहकार्य करू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन अपघातात १८ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मलकापूर आणि खोकुर्ले नजीक दोन एसटी बसच्या वेगवेगळ्या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले. देवगडहून अक्कलकोटकडे निघालेल्या देवगड-अक्कलकोट या बसला गगनबावडा-कोल्हापूर रोडवर खोकुर्ले गावानजीक अपघात होऊन त्यात बरसमधील १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर कोल्हापूरहून चिपळूणला जाणाऱ्या बसची मलकापूरजवळ ट्रकला समोरून धडक बसून झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले. रविवारी (ता. २१) सकाळी दहा ते एकच्या दरम्यान हे दोन्ही अपघात घडले.

देवगड आगाराची बस गगनबावडा मार्गे अक्कलकोटकडे निघाली होती. गाडी खोकुर्ले ते शेणवडे दरम्यान गुरववाडी जवळ आली असता, दुस-या वाहनाला ओव्हटेक करुन समोर आलेल्या ट्रकला चुकवताना चालकाचा ताबा सुटल्याने एसटी रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. त्यामुळे चालकासह बसमधील १५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कोल्हापूरहून चिपळूण कडे जाणाऱ्या बसची मलकापूर येथे ट्रकला समोरून धडक बसली. या अपघातात तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दत्त शिरोळ’ देणारमोबाइलव्दारे माहिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

ऊस लागण केल्यापासून गाळपापर्यंत उसाचे टनेज, बिल यासह अन्य माहिती आता शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या सभासदांना मोबाइलव्दारे मिळणार आहे. उसाचे पिक घेत असताना एकरी उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही एसएमएसव्दारे देण्यात येणार आहे. या सेवेचा प्रारंभ कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, 'आजच्या धावत्या आणि इलक्ट्रॉनिक्सच्या युगात शेतकऱ्यांनाही तत्काळ माहिती मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस तसेच क्षेत्र, उसाची जात याचबरोबरच कारखान्याकडे ऊस गळीतास आल्यानंतर त्याचे वजन एसएमएमव्दारे कळविण्यात येणार आहे. कारखाना ऊस विकासाच्या योजना राबवितो. उसास द्यावयाची खते, रोग प्रतिबंधक औषधे व वजन वाढीसाठी दिले जाणारे अन्न घटक याची माहिती शेतकऱ्यांना व्हावी याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील गावात चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित केले जातात. याची माहितीही सभासदांना एसएमएसव्दारे दिली जाणार आहे.'

'कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारे सभासदांनी ऊस शेती केली तर निश्चितच त्यांचे उसाचे एकरी टनेज वाढेल. आजच्या युगात शेतकऱ्यांनी शाश्वत, व्यापारी तत्वावर शेती करणे आवश्यक आहे, हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कारखाना अशा या अद्ययावत सेवा सुरु करीत आहे,' असेही चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिदगोंडा पाटील, संचालक विनया घोरपडे, रावसाहेब नाईक, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आघाडी सरकारनेगळा कापलाखासदार विकास महात्मे यांची टीका

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

राज्यातील सुमारे कोटी धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लटकण्यास पूर्वीचेच आघाडी सरकार जबाबदार आहे. सत्ता जाण्याचे लक्षात येताच शेवटच्या अधिवेशनानंतर केंद्राला पात्र पाठवून धनगर आणि धनगड हे वेगळे असल्याचे कळविल्याने आता फडणवीस सरकारला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागल्याची माहिती राज्यसभा सदस्य डॉ विकास महात्मे यांनी 'मटा'शी बोलताना केला.

महात्मे रविवारी पंढरपूर येथे आले होते. त्यांची संवाद सभा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व पक्षातील धनगर समाजाचे नेते उपस्थित होते.

राज्यभर धनगर आरक्षणामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांत आरक्षण देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, डॉ. महात्मे यांनी केलेल्या खुलाशानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न लटकावून ठेवण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी हेच जबाबदार असल्याचे पुढे आले आहे. फडणवीस सरकारने नवीन पात्र जरी पाठविले आणि केंद्र सरकारने जरी आरक्षणाला मंजुरी दिली तरी ते कोर्टात टिकणार नसल्याने आता पुन्हा फडणवीस सरकारने नव्याने कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे, असेही महात्मे म्हणाले. टाटा इन्स्टिट्यूटमार्फत पुन्हा पुरावे गोळा करायचे काम वेगात सुरू आहे. वर्षभरात सर्व ३६ जिल्ह्यांतील माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानंतर नव्याने प्रस्ताव देण्यात येईल, असेही महात्मे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक गणेश मंडळांनाघरगुतीपेक्षा कमी वीजदरअधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात. ३ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्वधर्मियांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार, असे वीजदर आहेत. हे दर घरगुती वीजदरापेक्षाही कमी आहेत. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्यिक वीज जोडणीतून गणेशोत्सवासाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचे दर घरगुतीपेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो. या शिवाय पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले, पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची दाट शक्यता असते.

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत, अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२००-३४३५/१८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.

गणेशोत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याने केला वाहनांचा केला पाठलाग

$
0
0



कराड

उंब्रज-पाटण मार्गावरील उरुल घाटात बिबट्याने काही दुचाकी व चारचाकींचा पाठलाग केल्याने खळबळ उडाली. परिणामी काहीकाळ या मार्गावरील वाहतूक थांबवावी लागली होती. मात्र, या बाबतची माहिती वनविभाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहनधारकाना घाटातून सोडण्यात आले. शनिवारी रात्री तासभर बिबट्याचा थरार अनेक वाहनधारकांनी अनुभवला.

ऊरुल घाटाच्या मल्हारपेठच्या बाजूकडील पहिल्याच वळणावर शनिवारी रात्रीच्या सुमारास तेथील सतीश सूर्यवंशी उंब्रजहून मल्हारपेठच्या बाजूकडे निघाले असता त्यांच्या दुचाकीचा बिबट्याने पाठलाग केला. मल्हारपेठहून उंब्रजकडे निघालेल्या रोहीत हिरवे व अजय भिसे तर मल्हारपेठ येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी निघालेले बोडकेवाडीचे सरपंच डॉ. आण्णासो देसाई यांच्या चारचाकी गाडीच्या आडवे बिबट्या गेला. त्यावेळी डॉ. देसाई यांनी प्रसंगावधान राखत त्यांनी घाटातून जाणाऱ्या वाहनधारकांना घाट ओलांडून जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर या बाबतची खबर सरपंच डॉ. आण्णा देसाई यानी मोबाइलवरुन वनविभागाला दिली. वनविभागाचे वनरक्षक घावटे व वनपाल रमेश कदम व महादेव कदम यानी बिबट्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी जाऊन पहाणी केली. गेल्या चार-पाच महिन्यांपासून विहे डोंगरपठारापासून ते मल्हारपेठ परिसराच्या पट्ट्यात त्याचा वावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडात गँग वॉरचा भडका

$
0
0




म. टा. वृत्तसेवा, कराड

प्रभात चित्र मंदिर चौकात खुन्नस दिल्याच्या कारणावरून तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे यांनी एकमेकांवर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. शनिवार पेठ, कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू जयपाल चांदणे व त्याचा चुलतभाऊ गोट्या उर्फ किशोर हरीभाऊ चांदणे (दोघेही रा. महात्मा फुले नगर, बुधवार पेठ, कराड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर बापू चांदणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भानुदास धोत्रेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास धोत्रे व गोट्या चांदणे यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

शहरातील शनिवार पेठेत राहणारा भानुदास धोत्रे हा सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर या पूर्वीही अन्य गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी सल्या चेप्या गोळीबार प्रकरणाची येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सकाळी तो कराडात आला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून भाजी मंडईकडून बसस्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी बापू चांदणे व भानुदास धोत्रे समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ला चढवला. सुरी व अन्य धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केल्याने भानुदास धोत्रे व बापूचा चुलतभाऊ गोट्या चांदणे दोघेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उप अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तसेच न्यायालय परिसरासह प्रभात टॉकीज परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.

या घटनेमुळे गेली अनेक दिवस शांत असलेल्या शहरातील गँग वॉर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा जणांना सात वर्षांची सक्तमजुरी

$
0
0





म. टा. वृत्तसेवा, कराड

कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील अकरा जणांपैकी सहाजणांना येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्या. एम. आर. देशपांडे यांनी सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तर तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींपैकी एक जण माफीचा साक्षीदार झाला होता. ऑगस्ट २०१३मध्ये या टोळीने न्यायालयाच्या आवारात सल्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

जयवंत सर्जेराव साळवे (वय ३२, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), किरण गुलाब गावीत (२६,रा. सैदापूर), युवराज सर्जेराव साळवे (३४,कोपर्डे हवेली, ता. कराड), मंदार कृष्णदेव कदम( २८, रा. करवडी), संकेत नारायण पवार ( २२, रा. बनवडी), अभिनंदन रतन झेंडे (३०, रा. शनिवार पेठ, कराड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

भानुदास लक्ष्मण धोत्रे (वय 33, रा. शनिवार पेठ, कराड), अमोल उर्फ सर्किट संपत मदने (25, रा. बनवडी) व सुरज ऊर्फ बाळू सर्जेराव पाटील (23, रा. मंगळवार पेठ, कराड) यांची निर्दोष मुक्तता झाली.

कोपर्डे हवेली येथील वाळू ठेक्याच्या कारणावरून कुख्यात गुंड सल्या चेप्या व साळवे यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. ३१ मार्च २०१३ रोजी याच कारणावरून त्यांच्यात खटकाही उडाला होता. त्या बाबत कराड पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. त्यानंतर वेळोवेळी सल्या व साळवे यांच्यात वादाची ठिणगी पडली. अशातच ३० ऑगस्ट २०१३ रोजी एका प्रकरणाची सुनावणी असल्याने सल्यासह अय्याज रोहिले, लाजम होडेकर व इरफान सय्यद हे चार जण अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात आले होते. न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयाने बाहेर थांबण्यास सांगितले. त्यामुळे चौघेही न्यायालयातून बाहेर आले. नजीकच असलेल्या झेरॉक्स दुकानाकडे जात असताना सल्याच्या दिशेने बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये सल्याच्या पाठीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला. सल्याने पाठीमागे वळून पाहिले असता त्याला पाच जणांनी तीन बाजुंनी घेरल्याचे दिसून आले. या प्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून भानुदास धोत्रे, अभिनंदन झेंडे यांच्यासह साळवे बंधूंना अटक केली. त्यांच्याकडून त्यावेळी दोन पिस्तूल, काडतूस, दुचाकी व कार जप्त करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटवडेकर हॉस्पिटलवरवाईमध्ये छापा, झडती

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

वाई येथील संतोष पोळ याने केलेल्या हत्याकांडाप्रकरणी मंगळवारी वाईतील घोटवडेकर हॉस्पिटलवर छापा मारून तेथील झडती घेण्यात आली. संतोष पोळ पासून या हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत होता.

त्याला खुनासाठी आवश्यक इंजेक्शन, औषधे, अॅम्ब्युलन्स याच हॉस्पिटलमधून उपलब्ध झाली असावीत, असा पोलिसांचा संशय आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये छापा मारण्यात आला. हॉस्पिटलचा अतिदक्षता विभाग, मेडिकल यांची तपासणी करण्यात आली. तेथून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबतचा अधिक तपशील त्यांनी दिला नाही.

पोळची साथीदार ज्योती मांढरे हिला मंगळवारी वाई पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मंगळवारी दुपारीच पोळ आणि मांढरे या दोघांनाही धोम येथील फार्म हाउसवर नेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

मृतदेह उकरून काढणाऱ्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू


वाईच्या कूरकर्मा संतोष पोळ याने खून करून पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम करणारे नगरपालिकेचे कर्मचारी सुभाष विठ्ठलराव चक्के (४९) यांना ताण न सहन झाल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्याचे निधन झाले. संतोष पोळने केलेल्या काळ्या कारनाम्याचा आणखी एक बळी गेला.

सुभाष चक्के हा नगरपालिकेत गेली चोवीस वर्षे सफाई कामगार म्हणून काम करीत होता. अतिशय प्रामाणिक काम करणारा कामगार म्हणून तो परिचित होता. संतोष पोळने केलेल्या खुनांचे सांगाडे काढल्याने त्याच्यावर दडपण आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकानी पालिकेकडून त्याच्या मुलाला कामावर घेण्याचे पत्र मिळत नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह न हलविण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी मध्यस्ती करून आमदार मकरंद पाटील यांच्या सांगण्यावरून पालिका प्रशासनाला तसे पत्र देण्यास भाग पाडले. तसेच पालिका प्रशासन जिल्हा अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

चक्के यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी व विवाहित दोन मुली असा परिवार आहे. वाई पालिका प्रशासनाला त्वरित आर्थिक तरतूद करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या आहेत. सुभाष चक्के यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, या घटनेची वाई पोलिस ठाण्यात आकस्मात मृत म्हणून नोंद झाली आहे.

सहा मृतदेहांचे सांगाडे मुंबईकडे

संतोष पोळने २००३ पासून खून केलेल्या सहा जणांच्या हाडांच्या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी हे सांगाडे सोमवारी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. सांगाडे बाहेर काढत असताना मुंबईतील फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांचे पथकही हजर होते. तज्ज्ञ मंडळी खड्ड्यात उतरून चाळणीने माती चाळून हाडे गोळा करीत होती. हे सांगाडे नक्की कोणाचे? याची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, खून केल्यानंतर आधी मृतदेहाच्या अंगावरील सोने विकायचे आणि नंतरच मृतदेहाची विल्हेवाट लावायची, अशी क्रूरकर्मा संतोष पोळची कार्यपद्धती होती, असे तपासात समोर आले आहे. तिघांच्या अंगावरील सोने खरेदी केल्याप्रकरणी वाईतील एका सोनाराबरोबरच घोटवडेकर हॉस्पिटलच्या दोन कर्मचाऱ्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली.

दरम्यान, दरम्यान, घोटवडेकर हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर घोटवडेकर यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दोन दुचाकी जप्त

पोळ याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल काही दिवसांपूर्वी भुईंज पोलिसांना महामार्गाच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडली होती. ती तसेच शहाबाग येथून ज्योती मांढरे हिची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दिवसभर गुन्ह्याची कागदपत्रे तयार करून पुरावे भक्कम करण्यात व्यस्त होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ मृतदेह काढणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

वाईचा कूरकर्मा संतोष पोळ याने खून करून पुरलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम करणारे नगरपालिकेचे कर्मचारी सुभाष विठ्ठलराव चक्के (४९) यांना ताण सहन न झाल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

पोळने केलेल्या खुनांचे सांगाडे काढल्याने त्याच्यावर दडपण आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मुलाला कामावर घेण्याचे पत्र मिळत नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. तसे पत्र मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.

सहा सांगाडे मुंबईकडे

पोळने २००३ पासून खून केलेल्या सहा जणांच्या हाडांच्या सांगाड्यांची ओळख पटविण्यासाठी ते सोमवारी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले. सांगाडे बाहेर काढत असताना मुंबईतील फॉरेन्सिक विभागाच्या तज्ज्ञांचे पथकही हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात आज निघणारललिताची भव्य मिरवणूक

$
0
0



सातारा

आंतरराष्ट्रीय धावपट्टू, माणदेश एक्सप्रेस ललिता बाबरचा आज, गुरुवारी सातारकरांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात येणार आहे. रॅलीत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांचे पाच हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हा सोहळा अत्यंत नेटका व भव्यदिव्य साजरा करण्याचा निर्धार सातारकरांनी केला आहे.

ललिताच्या या सत्कार सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्ह्यातील सर्व खेळांच्या क्रीडा संघटना, जिल्हा शारीरीक व क्रीडा संघटना, खेळाडू व नागरिकांची मंगळवारी साताऱ्यात बैठक झाली.

ललिता बाबरच्या नागरी सत्कारापूर्वी साताऱ्यातून रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये शाळा व महाविद्यालयांतील पाच हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सर्व क्रीडा संघटना, नागरिक, विविध संस्थांना बरोबर घेऊन भव्य सत्कार सोहळा होणार आहे. सकाळी दहा वाजता राजवाडा येथून मुख्य रॅलीला सुरूवात होणार आहे. या रॅलीचे ठिकठिकाणी उत्साहात व दणक्यात स्वागत केले जाणार आहे. गांधी मैदान, राजवाडा, मोती चौक, देवी चौक, राजपथ, कमानी हौद, शेटे चौक, पोलिस मुख्यालय, पोवईनाका, सातारा बसस्थानकमार्गे शाहू स्टेडियम, असा रॅलीचा मार्ग राहणार आहे. रॅलीमार्गावर कन्याशाळेच्या विद्यार्थिनी दुतर्फा उभे राहून स्वागत करणार आहेत. ठिकाठिकाणी स्वागत कमानी, शुभेच्छा फलक लावण्याचेही नियोजन करण्यात आले. या शिवाय ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या टाकल्या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोळने दिली सातव्या खुनाची कबुली

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा

घोटवडेकर हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय तुषार जाधव याचा इंजेक्शन देऊन खून केल्याची कबुली संतोष पोळने पोलिसांना दिली आहे. रुग्णवाहिकेतून सातारा जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेत असताना जाधवचा मृत्यू झाला होता. मात्र, हा खून पोळने नेमका कशासाठी केला या बाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. तसेच पोळने अजून किती जणांचे जीव घेतले आहेत, या बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, संतोष पोळ याने केलेल्या खून प्रकरणातील तपास संयुक्तपणे एलसीबीची टीम आणि वाई पोलिसांकडे होता. या प्रकरणात पोळ याचा ताबा वाई पोलिसांकडे सोपवण्यात आला असून, यापुढे वाई पोलिस तपास करणार आहे. दरम्यान डीएनएचा अहवाल महिन्याभरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या हत्याकांडातील संशयित ज्योती मांढरेकडे अनेक मुद्यांवर चौकशी सुरू आहे.

अंगणवाडी सेविका मंगल जेधे या बेपत्ता झाल्यापासून एलसीबीची टीम या प्रकरणाच्या तपासावर होती. मंगल जेधे यांच्या मोबाइलवरुन झालेल्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांनी अत्यंत शिताफीने प्रथम ज्योती मांढरे हिला व त्यानंतर या हत्त्याकांडाचा मास्टरमाईंड संतोष पोळला अटक केली. एलसीबीने संतोष पोळला कस्टडीत घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली. कोर्टासमोर दोनवेळा हजर करून पोलिस कस्टडी घेतली होती.

एलसीबीने पोळकडील तपास थांबविला असला तरी तिची साथीदार ज्योती मांढरे हिची चौकशी सुरूच राहणार आहे. या पुढील तपास वाई पोलिस करणार असून, यामध्ये गरज भासल्यास त्यांना एलसीबी मदत करणार आहे.

पोळला पाठिशी घालणाऱ्या डॉक्टरला सहआरोपी करा

पोळ प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची उकल संथ गतीने चालू आहे. पोलिस या हत्याकांडात सामील असणाऱ्यांना पुरावे नष्ट वेळ देत आहेत का? या मागील खरा सूत्रधार कोण? गुन्हेगार संतोष पोळ याला पाठिशी घालणाऱ्या डॉक्टरला सहआरोपी बनवा, या मागणीसाठी अँड. वर्षा देशपांडे यांनी निषेध मोर्चा काढून वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांना निवेदन दिले.

हत्याकांडामध्ये सहकार्य करणारे घोटवडेकर हॉस्पिटलवर कारवाई करण्यास इतका उशीर का? असा प्रश्न उपस्थित करून पोळला डॉक्टर म्हणून कोणी, कशी आणि कधी मान्यता दिली. याची चौकशी करा. तसेच तत्कालीन पोलिस अधिकारी, बीट अंमलदार, यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी विधेयकालामोदींचा विरोध होता

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कराड

जीएसटी कायदा करणे ही काळाजी गरज होती. यासाठी काँग्रेस सरकारने सन २००६ साली पहिले पाऊल टाकले होते. त्यावेळी राज्यांच्या उत्पादनात घट होईल, असे सांगत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विधेयकाला विरोध केला होता. मात्र, केंद्रात सत्तेत आल्यानंतर याच विधेयकात काही दुरूस्त्या केल्याचे भासवत ते पुन्हा आणले आहे. मात्र, त्यामुळे आकारण्यात येणाऱ्या कराचा दर काय असेल? तसेच १८ टक्क्यांपेक्षा जास्त दर आकारल्यास येत्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या एक दिवशीय अधिवेशनात काँग्रेस आमदार जीएसटी विधेयकाला विरोध करतली, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कराड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रेल्वेच्या खासगीकरणाचा डाव

कराड-चिपळूण रेल्वे मार्ग व प्रकल्प एका खासगी कंपनीला देण्यात आल्याचे देशातील पहिलेच उदाहरण आहे. रेल्वे अंदाजपत्रक स्वतंत्र सादर करण्याचेही रद्द करण्याचा या सरकारचा विचार असल्याने भाजप सरकार रेल्वेचे खासगीकरण करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

अखंड महाराष्ट्र हवा की वेगळा विदर्भ...

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी व विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा रेटला जात आहे. त्यामुळे भाजप सरकारला 'अखंड महाराष्ट्र हवा की वेगळा विदर्भ' हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. मी स्वत: अखंड महाराष्ट्राचा समर्थक आहे. कारण संयुक्त महाराष्ट्रातूनच विदर्भाचा विकास होणार असल्याचे माझे मत आहे. त्यामुळे वेगळा विदर्भ केल्याने विदर्भाचा विकास कसा होणार? हे भाजपने स्पष्ट करावे. शिवसेनेने वेगळ्या विदर्भाला विरोध केला आहे. मात्र, अखंड महाराष्ट्राच्या ठरावाला पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनही घेतली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.


ललिताला भरघोस मदत द्या

ललिता बाबर हिने ऑलंपिकमध्ये उज्वल कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने इतर राज्यांप्रमाणे भरघोस आर्थिक मदत करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमबीएचे विद्यार्थी प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत

$
0
0

Maruti.Patil@
timesgroup.com

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण रुरल डेव्हलपमेंटच्या एमबीए अभ्यासक्रमाचा निकाल लागून दोन महिन्यांचा कालावधीत होऊनही विद्यार्थ्यांना मूळ गणपत्रिका मिळाली नसल्याने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नोकरीवरच गंडातर आले आहे. त्यामुळे मूळ गुणपत्रिका मिळण्यासाठी विद्यार्थी दररोज परीक्षा विभागामध्ये हेलपाटे मारत आहेत. परीक्षा विभागाकडून याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने विद्यार्थी नोकरी गमावण्याच्या शक्यतेने हवालदील झाले आहेत.

स्थानिक उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ पुरवण्यासठी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने यशवंतराव चव्हाण रुरल डेव्हलपमेंटची २०१३ मध्ये सुरुवात करण्यात आली. यातंर्गत एमएसडब्ल्यू, एम.टेक, एमसीए, एमआरएस, एमबीए आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. इतर अभ्यासक्रमांप्रमाणेच वायसीआरडीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जाऊन प्रवेश मिळवावा लागतो.

अशा स्पर्धेला सामोरे जा‍ऊन प्रवेश मिळवलेल्या एमबीए विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करुनही मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. एमबीएच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची १४ एप्रिल रोजी अंतिम परीक्षा झाली. परीक्षेनंतर ६८ दिवसांनी ऑनलाइन निकाल प्रसिद्ध झाला. ऑनलाइन निकालानंतर एक महिन्यात मूळ गुणपत्रिका मिळेल या आशेने अनेक विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्या. अशा मुलाखत सत्रांमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाल्याचे कॉललेटरही देण्यात आले. त्यानंतर कंपनीकडून मूळ कागदपत्रांची मागणी होऊ लागली. त्यानंतर असे पात्र विद्यार्थी दररोज परीक्षा विभागासाठी मूळ गुणपत्रिकेसाठी संपर्क साधू लागले. मात्र त्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तरे न देता, संबंध‌ित विभागाची चूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी दररोज हेलपाटे मारून यातून तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. परीक्षा विभागाला दोन महिन्यानंतरही याचे गांभीर्य लक्षात न आल्याने कॉललेटर हातात पडलेल्या विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.

'विद्यापीठतंर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक, ऑनलाइन निकाल व मूळ गुणपत्रिका याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र याबाबत कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठात हेलपाटे मारावे लागत आहेत. एमबीएच्या गुणपत्रिकेबाबत सातत्याने विचारणा करूनही परीक्षा विभागाला गांभीर्य नसल्याने मोठ्या पॅकेजची नोकरी गमवण्याची वेळ आली आहे,' असे नीलेश बाबर यांने सांगितले.


परीक्षा विभागाच्या अखत्यारीत येत नसलेल्या तांत्रिक अडचणीमुळे एमबीएच्या गुणपत्रिका देण्यामध्ये अडचण निर्माण झाली होती. तांत्रिक अडचण दूर झालेली असून पुढील आ‍ठवड्यात विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळतील

महेश काकडे, परीक्षा नियंत्रक


एमबीएचा निकाल लागल्यानंतर मुंबई येथील कंपनीमध्ये मुलाखत दिली आहे. कंपनीमध्ये निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रांची मागणी होत आहे, मात्र अद्याप मुख्य गुणपत्रिका मिळालेली नाही. नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. गुणपत्रिका मिळण्यासाठी दररोज परीक्षा हेरपाटे मारत आहे, मात्र याचे गांभीर्य अद्याप परीक्षा विभागाला लक्षात आलेले नाही.

प्रशांत काळे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावी फेरपरीक्षेचा २८ टक्के निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक ​शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या फेर परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल २८ टक्के लागला. ९ ते २९ जुलै या कालावधीत २५ परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला.

या परीक्षेसाठी ९६९५ मुले तर १९४९ मुली बसल्या होत्या. त्यापैकी २५६० मुले तर ७१४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २६ टक्के असून मुलींचे प्रमाण ३६ टक्के आहे. या परीक्षेतील गुणप​त्रिकांच्या पडताळणीसाठी २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. सांगलीचा निकाल २८ टक्के तर साताऱ्याचा निकाल २५ टक्के लागला आहे. तसेच शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २९ टक्के आहे. कला शाखा २६ टक्के, वाणिज्य ३१ तर व्यावसायिक विभाग ३२ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images