Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आता तहसीलदारांकडून ‘एनए’

$
0
0

औरंगाबाद : 'महापालिका आणि नगरपालिकांकडून बांधकाम परवानगी घेतल्यानंतर तहसीलदारांकडून अकृषक परवानगी घ्यावी लागेल. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही,' असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी मंगळवारी सांगितले. या सुधारणेनुसार जिल्हा‌धिकाऱ्यांकडे असलेल्या अकृषक परवान्यासाठी असलेल्या संचिका आता सं‌बंधित तहसीलदारांकडे परत पाठवाव्या लागणार आहेत.

महापालिका आणि नगरपालिकांचा विकास नियोजन आराखडा असल्यामुळे या भागातील क्षेत्रांमध्ये बांधकामासाठी एनएची आवश्यकता राहिलेली नाही. या संदर्भात डॉ. दांगट म्हणाले, 'राज्य सरकारने विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात ‌असलेल्या जमिनीच्या अकृषक वापरासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ व ४४ खालील परवानगीची आवश्यकता राहिलेली नसून त्याबाबत महसूल व वन विभागाने शासन निर्णय काढला आहे. सुधारणेनुसार वर्ग १ च्या जमिनीच्या अकृषक परवान्यासाठी तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत. वर्ग २च्या अकृषक परवाना देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आणि नगरपालिकाक्षेत्रातील जमीन अ‌कृषक करण्याची आवश्यकता नाही. बांधकाम परवाना घेऊन तहसीलदारांकडून अकृषक परवानगी मिळेल.' शासनाने शहरी भागातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी आणि नियोजन विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने जमीन महसूल अधिनियमांच्या प्रक्रियेसह नियमांमध्ये सुधारणा करून अकृषक परवान्यासाठी एन. ए. ४४ करण्याची अट शिथिल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापुरात आज पाण्याचा ठणठणाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिंगणापूर ते पुईखडी यांदरम्यान ११०० ​मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याने शहराती ए, बी आणि ई वॉर्डात बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही. शहरातील निम्याहून अधिक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गळती काढण्याचे काम सुरू राहिले.

जलवाहिनीला गळती लागल्याचा फटका निम्म्याहून अधिक भागाला बसला आहे. सध्या शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नियमित पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी वाढत आहे. एक दिवसाआड पाणी येत असल्याने काही भागांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाइपलाइनला गळती लागल्याने पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामधून होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद पडला. परिणामी साळोखेनगर, सुर्वेनगर, महाराष्ट्रनगर, देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर, दत्त कॉलनी, मनाली हौसिंग सोसायटी, वसंत विश्वास पार्क, तात्यासो मोहिते कॉलनी, यशवंत पार्क परिसरातील नागरिकांना पाणी मिळणार नाही.

या भागालाही फटका

संभाजीनगर परिसर, सुधाकर जोशीनगर, नाळे कॉलनी, मोरे कॉलनी, हनुमाननगर, रायगड कॉलनी, गजानन महाराजनगर, एनसीसी ऑफीससमोरीर परिसर, जरगनगर ले आऊट नंबर एक ते चार, शेंडापार्क परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर, चिले कॉलनी, आरकेनगर संपूर्ण भाग, राजेंद्रनगर, बागल चौक, शाहूपुरी, राजारामपुरी, सम्राटनगर, प्रतिभानगर, वायपी पोवारनगर, पांजरपोळ, दौलतनगर, शाहूनगर, शिवाजी विद्यापीठ परिसर, टाकाळा, जामसांडेकर माळ, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, लोणार वसाहत या भागात एक दिवसाआड पद्धतीने पाणी पुरवठा होणार नाही.

पाणी पुरवठा खंडीत होणाऱ्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याचे जल अभियंता मनीष पवार यांनी सांगितले. पाइपलाइनच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. संबंधित भागात सहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

मनीष पवार, जलअभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेली मोपेड परत देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणारा शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय चंद्रकांत बेडगे (रा. कागल) एसीबीच्या जाळ्यात सापडला. याच्या विरोधात कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडजोडीनंतर दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाईची चाहूल लागल्याने पळून गेलेल्या बेडगेला पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.

गुन्ह्याच्या तपासासाठी प्रदीप विठ्ठल माळी (रा. कोरोची, ता. हातकणंगले) यांची मोपेड(एमएच ०९ डीजे ६७७२) शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ही मोपेड परत देण्यासाठी बेडगे याने माळी यांच्याकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासंदर्भात माळी यांनी मंगळवारी (ता. १६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बेडगे हा कागल येथे रहात असल्याने माळी यांना रक्कम घेऊन कागल येथे येण्यास सांगितले होते. त्यानुसार माळी हे कागल बसस्थानक परिसरात बेडगे याला रक्कम देत होते. त्याचवेळी सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चाहूल लागल्याने बेडगे याने रक्कम न स्वीकारता तेथून पलायन केले. मोपेड सोडण्यासाठी दहा हजारांची रक्कम मागितल्याची खात्री झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात बेडगे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पलायन केलेल्या बेडगे यालाही संध्याकाळी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अमर भोसले, मनोज खोत, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हान‌िकारक पदार्थांवर कारवाई करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याकडेला गटर आणि घाणेरड्या जागांवर खाद्यपदार्थ विकले जात आहेत. अनेक भाजी मंडईमध्ये आरोग्याला हानिकारक कृत्रिमरित्या पिकवलेला, रंगवलेला भाजीपाला विकला जात आहे. अशा ठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने छापे टाकून कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. यावेळी सहायक जिल्हा पुरवठाअधिकारी अमर वाकडे, ग्राहक हक्क संरक्षण संघटनेचे संजय हुक्केरी, वसंत हेरवाडे, बी. जे. पाटील, सतीश फणसे, जगन्नाथ म्हाळंक, रेखा हांजे, सीमा शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात नमुने घेऊन कारवाई करावी. कारवाईसाठी महानगरपालिका, पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी असे विवेक आगवणे यांनी सांगितले. बैठकीत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सेवा नागरीकांसाठी सुलभ कराव्यात अशी मागणी ग्राहक हक्क संरक्षणच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

बैठकीत राधानगरी एसटी स्टँडवरील कँटीन बंद आहे, घरपोच गॅस वितरणाबाबतच्या तक्रारी, वीज बिल देयक तारखेनंतर मिळणे याबाबतही चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्यनाट्य’ चा माहोल रंगू लागला

$
0
0

यंदा संहिता कोणती निवडायची...नाटकाचा बाज कुठला ठेवायचा...कलाकार निवड, तालीम अशा सगळ्या चर्चांना आता उधाण आले आहे. ७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी तयारीचे बिगुल वाजण्यास सुरूवात झाली असून अर्ज भरण्यापूर्वीच्या तयारीला वेग आला आहे. कोल्हापुरातील प्रायोगिक नाट्यसंस्था आणि हौशी कलाकारांच्या वर्तुळात राज्यनाट्य स्पर्धेचा माहोल चांगलाच रंगला आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेची पहिली फेरी कोल्हापुरात नोव्हेंबरमध्ये घेण्यात येते. दरवर्षी या स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागातून दहा ते पंधरा नाट्यसंघ सहभागी होतात. यावर्षीही होणाऱ्या स्पर्धेचे वेध हौशी रंगकर्मींना लागले आहेत. यासंदर्भात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राज्य नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यासंदर्भातील माहिती कोल्हापूर केंद्राच्या समन्वयक टीमला देण्यात आली आहे.

प्रत्यक्ष स्पर्धेला अद्याप दोन महिन्यांचा अवधी असला तरी रंगकर्मींनी संहिता निवड आणि संहिता वाचनाला सुरूवात केली आहे. तसेच स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकासाठी संहिता निवडीसोबत कलाकारांची निवड करण्याच्या प्रक्रियेलाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सक्रिय हौशी नाट्यसंस्थांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

गेल्यावर्षी कोल्हापूर केंद्रातून १५ संघ नाट्यस्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये विविध विषय आणि आशय असलेल्या संहिता नाट्यकृतीच्या माध्यमातून मांडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी या स्पर्धेसाठी किती प्रायोगिक संस्था सहभागी होणार याबाबत उत्सुकता आहे.

चौकट

'त्या' संघांना यंदा डच्चू

गेल्यावर्षी राज्य नाट्यस्पर्धेत ज्या संघांनी प्रयोगाच्या पूर्वदिनी ऐनवेळी प्रयोग करणार नाही असे सांगितले, त्या संघांना यंदा स्पर्धेत सहभागी करून न घेण्याचा निर्णय केंद्र समन्वयक टीमतर्फे घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी दोन महिने वेळ देऊनही आयत्यावेळी प्रयोग रद्द केल्यामुळे स्पर्धेच्या दर्जावर आणि वेळापत्रकावर परिणाम होतो. त्यामुळे यावर्षी अशा किमान तीन संघांना रंगमंचाबाहेर थांबावे लागणार आहे.

...

यंदा 'केशवराव'च

गेल्यावर्षी राज्यनाट्य स्पर्धेच्या काळात केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले होते. त्यामुळे राज्यनाट्यस्पर्धेने या नाट्यगृहाचे उदघाटन व्हावे अशी इच्छा रंगकर्मींनी व्यक्त केली होती. मात्र राजकीय श्रेयवादामुळे केशवराव नाट्यगृहाचे उदघाटन लांबले आणि त्यामुळे राज्यनाट्य स्पर्धा शाहू स्मारकमध्ये घेण्यात आल्या. शाहू स्मारकची आसनक्षमता कमी आणि नाटकांना मिळालेला चांगला प्रतिसाद यामुळेही रंगकर्मींमध्ये महापालिका प्रशासनाबाबत केशवराव नाट्यगृह उपलब्ध न झाल्याबद्दल नाराजी होती. यंदा मात्र समन्वयसमितीने राज्यनाट्य स्पर्धेसाठी केशवराव भोसले नाट्यगृहाचे बुकिंग केले असल्याने यावर्षीची स्पर्धा 'केशवराव'च्या मंचावरच रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिलांचे उद्या लाक्षणिक उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. शुक्रवारी (ता. १९ ऑगस्ट) एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याची घोषणा केली. जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे होते.

राज्य सरकारने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करावे, असा ठराव सात सप्टेंबर २०१५ रोजी केला आहे. पण न्यायव्यवस्थेने या ठरावाची पूर्तता केलेली नाही. सरकार व न्याय व्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा जनआंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत झाला. माजी उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, अॅड. राजेंद्र मंडलिक, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, अॅड. संतोष शेलार, रणजित गावडे, पिराजी भावके, पंडीत सोडोलीकर, उदय पाटील यांची भाषणे झाली. शुकवारी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत लाक्षणिक उपोषण करण्याचा ठराव केला. सचिव सर्जेराव खोत यांन स्वागत केले. अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अरूण पाटील यांनी आभार मानले.

एक हजार रुपये दंड

आंदोलनात वकिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जे सहभागी होणार नाहीत त्यांना एक हजार रुपये दंड करण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानसेवेबाबतच्या मुंबईतील बैठकीकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विमानतळाचे विस्तारीकरण आणि विमानसेवेबाबत मंत्रालयात गुरुवारी (ता. १८) बैठक होत आहे. केंद्र सरकारने छोट्या विमानतळांसाठी जाहीर केलेल्या योजनेत कोल्हापूर विमानतळाचा समावेश करण्यासाठी बैठकीत ठोस निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीत अंतिम निर्णय झाल्यास कोल्हापूरची विमानसेवा आणि रखडलेले विस्तारीकरण लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अडीच हजारांत प्रवास योजनेवरही विचार होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात अनेक विमान कंपन्या सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने काही कंपन्यानी नापसंती दर्शविली. मात्र केंद्र सरकारने छोट्या विमानतळांसाठी अनेक योजना जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर या योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी मंत्रालयात बैठक होत आहे. विमान कंपन्यानी अडीच हजारांत प्रवास करण्याच्या योजनेवरही शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यासह विमानसेवा सुरू करण्यासाठी योजना आणि निविदा काढण्यात येणार आहे. या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे दिल्ली आणि मुंबई येथील अधिकारी, राज्य आणि जिल्हा पातळीवरील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर विमानतळासाठी गडमुडशिंगी ग्रामपंचायत जागा देण्यास अद्याप तयार नसल्याने त्याबाबत तोडगा निघालेला नाही. जिल्हा प्रशासनाने वनविभागाची जमीन वगळून विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडाही तयार केला.

वनविभागाची जागा वगळून विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडा तयार करा, असे पत्र जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन विभागाच्या संचालकांना पाठविले होते. त्याबाबत गुरुवारी होत असलेल्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-मीटरचे कॅलिब्रेशन २२ ऑगस्टपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑटो रिक्षाच्या ई-मीटरचे कॅलिब्रेशन शासकीय तंत्रनिकेनतने तात्काळ सुरु करण्याचे आदेश आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी दिले. आमदार सतेज पाटील यांनी आरटीओ दराडे यांना सूचना दिल्या. 'वादात अडकले कॅलिब्रेशन', 'रिक्षांचे पासिंग रखडले', 'ई-मीटरप्रश्नी रिक्षाचालकांसमोर नवा पेच' असे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मधून प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत ही कार्यवाही करण्यात आली.

शहरात साडेसहा हजार ऑटोरिक्षा आहेत. यापैकी केवळ एक हजार रिक्षांच्या ई-मीटरचे कॅलिब्रेशन झाले होते. वैधमापनशास्त्र विभाग, आयटीआय या दोन सरकारी कार्यालयाच्या वादात कॅलिब्रेशन झाले नसल्याने पासिंग अडकले होते. त्यामुळे साडेपाच हजार रिक्षाचालक हवालदिल झाले होते. त्याबाबत श्री शाहू रिक्षा मंडळ आणि न्यू करवीर ऑटोरिक्षा युनियनच्या शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यांनी कॅलिब्रेशनचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आरटीओ दराडे यांनी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांना कॅलिब्रेशनचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. २२ ऑगस्टपासून कॅलिब्रेशनच्या कामाची सुरूवात होणार आहे. शिष्टमंडळात शाहू रिक्षा मित्र मंडळाचे अध्यक्ष महादेव विभूते, राजेंद्र थोरवडे, गजानन नाकील, नंदू सुतार, सुनील जाधव, जयपाल सोळांकुरे, गणेश रजपूत, कमलाकर जगदाळे, बसवराज विभूते, प्रशांत काडापुरे, अविनाश पाटील, मनोज थोरावडे, रवींद्र थोरावडे, भगवान रावळ, प्रशांत अतकिरे, चंद्रकांत बराले आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिनी मांजामुळे पक्षी धोक्यात

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील डंगरी गल्लीत अॅड. बी. एस. पवार यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील मोबाइल टॉवरमध्ये अडकलेल्या चिनी मांजात साळुंखी पक्षी अडकला. सकाळी सहा वाजल्यापासून कावळे साळुंखीला टोचून हैराण करत होते. परिसरातील जागरुक नागरिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली. घटनास्थळी आलेल्या ​अग्निशमन दलाच्या जवानांनी साळुंखीच्या पंखात अडकलेला चिनी मांजा कटरने कापला. मात्र चिनी मांजामुळे साळुंखीच्या पंखांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे साळुंखीला पांजरपोळ संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चिनी मांजामुळे पक्षांचे जीवन कसे धोक्यात आले आहे याचे उदाहरण दर्शवणारी ही एक घटना. दिल्लीत नुकत्याच घडलेल्या घटनेत एका बालिकेला आपला जीव गमवावा लागला. कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः ५०० पक्ष्यांना दुखापत होऊन जायबंदी होण्याची वेळ येते. पतंगाचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर चिनी मांजावर जिल्हा प्रशासनाने बंदी घालावी अशी मागणी पक्षीप्रेमी व नागरिकांतून होत आहे.

कोल्हापुरात पंतगाचा हंगाम १५ ऑगस्टपासून सुरू झाला. पावसाची उघडीप मिळाल्यावर पंतग उडवले जातात. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आकाशात भिरभिरणारे पंतग दिसू लागतात. ऑक्टोबर आणि नोव्हेबर या दोन महिन्यात पतंगाच्या हंगामाला खरा बहर येते. पंतग उडवताना काटाकाटीसाठी मांजा वापरला जातो. या मांजासाठी काच वापरली जाते. मात्र चिनी मांजा हा नायलॉनच्या दोरीचा असतो. याचे दुःष्परिणाम मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. या मांजावर बंदी असल्याचे सांगितले जात असले तरी बाजारात उघडपणे त्याची विक्री सुरू आहे.

चिनी मांजाच्या वापराचा फटका पक्ष्यांना बसू लागला आहे. पतंगाच्या हंगामात पक्षी माजांत अडकून जखमी होतात. पंतग उडवताना अथवा कटल्यावर मांजा झाडे, विजेच्या तारा, उंच इमारती, मोबाइल टॉवरला अडकळून लोंबकळत राहतो. दोऱ्याचा मांजा ऊन किंवा पावसामुळे खराब होतो. पण चिनी मांजा नायलॉन दोऱ्याचा असल्याने टिकून राहतो. या मांजात अनेक पक्षी अडकून राहतात. शहरात असे प्रकार घडल्यावर अग्शिनमन दलाकडे पक्ष्यांची सुटका करण्यासाठी मदत मागितली जाते.

पतंगाच्या सिझनमध्ये चिनी मांजामध्ये अडकलेल्या पक्षांना सोडवण्यासाठी अनेक वेळा कॉल येतात. वर्षभरात अनेकदा मांजात पक्षी अडकले आहेत, त्यांची सुटका करा अशा विनंतीचे फोन येतात. चिनी मांजा हाताने तोडता येत नसल्याने, अग्निशमन दलाच्या जवानांना कटर बाळगावा लागतो. मांजामध्ये कावळा, घार, चिमणी, साळुंखी, कबुतर या पक्ष्यांबरोबर घुबड, भारद्वाज असे दुर्मिळ पक्षीही अडकल्याचे प्रकार घडले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी कळंबा येथे मोर मांजा दोऱ्यात अडकला होता. मात्र ताकद जास्त असल्याने त्यांची सुटका झाली होती.

चिले, मुख्य अग्निशमन अधिकारी

नायलॉन दोऱ्याने पक्षांचे पंख कापले जातात. काही वेळा पायही तुटल्याचे प्रकार घडले आहेत. मांजामुळे पक्षी कायमचे जायबंदी होतात. दरवर्षी साधारणतः १०० हून अधिक पक्ष्यांची सुटका मी करतो. प्रशासनाने चिनी मांजावर बंदीची प्रक्रिया गांभीर्याने घेतल्यास शेकडो पक्ष्यांना मुक्तपणे विहार करता येईल.

धनंजय नामजोशी, पक्षीमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत भाजपची सत्ता न आल्याची खंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिका निवडणुकीत आणखी दोन जागा मिळाल्या असत्या तर भाजप सत्तारूढ बनला असता. पण महापालिकेत सत्ता नसली म्हणून काय झाले, केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे. त्या माध्यमातून शहर विकासासाठी योजना राबवू' असे उद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. पक्षाचे नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पुढाकारातून तटाकडील तालीम प्रभागातील नागरिकांच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मोबाइल अॅपचे उदघाटन व १२५ महिलांना पंतप्रधान विमा सुरक्षा योजना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. महापालिकेत सत्ता संपादन करता न आल्याची सल त्यांच्या मनात असल्याचे यावेळी दिसले.

कार्यक्रमात भाजप आणि ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'स्वच्छ शहरासाठी कचरामुक्त प्रभाग ही संकल्पना राबवायची आहे. चार प्रभागातील कचरा एकत्र केला जाईल. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण, त्यावर प्रक्रिया करून कोळसा व खत निर्मिती होईल. कचरा वर्गीकरणाच्या माध्यमातून चार प्रभागात मिळून ४० महिलांना रोजगार प्राप्त होईल. प्रत्येक प्रभागातील कचरा संपुष्टात येणार असल्याने कोठेही कोंडाळा दिसणार नाही. नगरसेवकांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देताना आपापल्या प्रभागातील २०० कुटुंबांना अटल पेन्शन योजना लागू करावी.' नगरसेवक अजित ठाणेकर यांनी मोबाइल अॅप आणि विमा योजनची माहिती दिली. विनायक पाचलग यांनी मोबाइल अॅपच्या वापराबद्दल माहिती ​दिली. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, रमेश आंबर्डेकर, प्रताप देसाई यांची भाषणे झाली. हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, किरण नकाते, तटाकडील तालीमचे राजू जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार प्रवेश लटकले

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्यावतीने राज्य सरकारकडे अतिरिक्त तुकड्यांचे प्रस्ताव पाठवले होते. अशा १२३ अतिरिक्त तुकड्यांना मान्यता देऊनही प्रथम वर्षाच्या तीन हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत, तसेच ऑगस्टअखेर बारावी पुरवणी परीक्षांचा निकाल प्रसिद्ध होणार आहे. पुरवणी परीक्षेतील ४० टक्के निकाल अपेक्षित धरला तरी, सुमारे चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पुन्हा दहा अतिरिक्त तुकड्यांसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे.

अलीकडे बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढत आहे. व्यावसायिक व विज्ञान अभ्यासक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत. तरीही पारंपरिक कला व वाणिज्य शाखेतून पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहेत. वाढती संख्या गृहित धरून विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकड्यांसाठी प्रस्ताव पाठवले होते. १२७ पैकी १२३ प्रस्तावांना राज्य सरकारची मान्यता मिळाली होती. अतिरिक्त तुकड्यांना मान्यता दिल्यानंतर विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीच्या तपासणीनंतर प्रवेशाला सुरुवातही झाली होती. १२३ तुकड्यांमधून सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला असला, तरी अद्याप तीन हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर होऊन नऊ जुलैला पुरवणी परीक्षा घेतली. यासाठी ११ हजार विद्यार्थी बसले होते. पुरवणी परीक्षेचा निकाल ३० ते ४० टक्के गृहित धरल्यास तीन ते चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे पूर्वीचे तीन हजार व पुरवणी परीक्षेचे तीन हजार विद्यार्थी अशा एकूण सहा हजार विद्यार्थ्यांचा प्रथम वर्ष परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा अतिरिक्त दहा तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली तरी, एका तुकडीसाठी १२० प्रमाणे १२०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित पाच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.


अतिरिक्त १० तुकड्यांसाठी पुन्हा प्रस्ताव

शिवाजी विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकड्यांसाठी प्रस्ताव पाठवले होते. १२३ तुकड्यांना मान्यता मिळाल्यानंतर सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी मिळूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्याने महाविद्यालयांसमोर गोंधळ घातला होता. त्यातच पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार असल्याने प्रथम वर्ष प्रवेशाचा पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी विद्यापीठाच्यावतीने दहा तुकड्यांचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, त्यातून केवळ एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांचा प्रश्न निकालात निघणार आहे.

'१२३ अतिरिक्त तुकड्यांना मान्यता मिळूनही अद्याप प्रथम वर्ष प्रवेशाचा प्रश्न निकालात निघालेला नाही. यासाठी पुन्हा दहा अतिरिक्त तुकड्यांचा प्रस्ताव पाठवला असून, ऑगस्टअखेर प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न काहीसा निकालात निघेल.'

डॉ. डी. आर. मोरे, बीसीयूडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंग समित्या कागदावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे रॅगिंग होऊ नये यासाठी सरकारने रॅगिंगप्रतिबंधक कायदा केला आहे. या कायद्यानुसार सर्व महाविद्यालयांमध्ये रॅगिंगप्रतिबंधक समित्यांची दरवर्षी स्थापना केली जाते. मात्र, कागदावर अपडेट असलेल्या या समित्यांकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारीच येत नाहीत. तक्रारी नसल्याने बैठका घेण्यापलीकडे समित्यांचे कामकाज होत नाही, त्यामुळे रॅगिंगप्रतिबंधक समित्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच राहिले आहे. त्यामुळे समित्यांचे हे यश की अपयश, याबाबत महाविद्यालयेच साशंक आहेत.

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे शोषण करण्याचे गंभीर प्रकार वाढल्याने राज्य सरकारने सन २००९ मध्ये रॅगिंग प्रतिबंधक कायदा केला. कायद्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली रॅगिंगप्रतिबंधक समिती स्थापन केली जाते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला स्थापन होणाऱ्या समितीच्या वर्षातून चारवेळा बैठका होतात. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यास रॅगिंगच्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही या समितीला दिले आहेत. या समितीमध्ये प्राचार्यांसह महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांचा सहभाग असतो. तक्रारींसाठी महाविद्यालयांच्या आवारात स्वतंत्र तक्रारपेटीही लावली जाते. रॅगिंग रोखण्यासाठी ही योजना चांगली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच राहिले आहे.

पुण्या-मुंबईच्या तुलनेत कोल्हापूर परिसरात रॅगिंगचे प्रमाण कमी आहे. मात्र, रॅगिंग होतच नाही हे म्हणणे अवास्तव आहे. आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजमध्ये अपवादानेच रॅगिंगचे प्रकार घडले आहेत. या उलट मेडिकल आणि इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रॅगिंगच्या घटना घडतात. कोल्हापुरातील महाविद्यालयांमध्ये घडलेल्या रॅगिंगच्या घटना महाविद्यालय प्रशासनापर्यंत पोहोचत नाहीत, असाही सूर आहे. तक्रारीतून वाद वाढून करिअरमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, या भीतीपोटी अनेक विद्यार्थी तक्रारी करण्याच्या फंदात पडत नाहीत.

गेल्या चार वर्षांत कोल्हापुरात रॅगिंगच्या केवळ दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेषतः शिक्षणासाठी परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्येच रॅगिंगच्या घटना घडतात. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात अशा घटना घडतात. विद्यार्थ्यांची टिंगलटवाळी करणे, टोपण नावाने हाका मारणे, रूम, टॉयलेट, बाथरूम स्वच्छ करण्यास भाग पाडणे अशा घटना घडतात. सीनिअर्सचे न एकल्यास सिगारेटचे चटके देणे किंवा मद्यप्राशन करण्यासही जबरदस्ती होते. होस्टेलमधील रेक्टर्सच्या नकळत किंवा कधी कधी त्यांनाच सोबत घेऊन असे प्रकार घडतात. शिक्षण अर्ध्यावर सुटेल या भीतीपोटी विद्यार्थी तक्रारी देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तक्रारीच येत नसल्याने सर्व काही आलबेल असल्याच्या आविर्भावात रॅगिंगप्रतिबंधक समित्या कार्यरत आहेत. तक्रारी का येत नाहीत, याचा शोधही समित्यांकडून घेतला जात नाही.

प्रवेशावेळीच प्रतिज्ञापत्र

'महाविद्यालयासह वसतिगृहात रॅगिंग करणार नाही. अशा घटनेतही मी सहभाग घेणार नाही. माझ्याकडून असे कृत्य घडल्यास कॉलेज प्रशासनाकडून होणारी कारवाई माझ्यावर बंधनकारक राहील', असे प्रतिज्ञापत्र प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले जाते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी रॅगिंगपासून दूर राहतात, असा दावा महाविद्यालयांकडून केला जात आहे.

कागदोपत्री बैठका

रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या एका टर्ममध्ये दोन अशा वर्षात चारवेळा बैठका होतात. बऱ्याचदा या बैठका केवळ कागदोपत्री उरकल्या जातात. तक्रारपेटीत तक्रारी नसल्याने बैठकीचे गांभीर्यच उरत नाही, अशी भावना महाविद्यालयातील रॅगिंग प्रतिबंक समित्यांची आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी न येण्यातच समित्यांचे यश आहे, असा युक्तिवादही समितीमधील प्राध्यापकांकडून केला जातो.

'आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजमध्ये येणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. आपण भले आणि आपला अभ्यास भला, अशा पठडीतील या मुलांवर कॉलेज प्रशासनाचा धाक आहे, त्यामुळे शक्यतो रॅगिंगच्या घटना घडत नाहीत. याशिवाय आमची रॅगिंगप्रतिबंधक समितीही कार्यरत असतेच. गेल्या चार वर्षांत आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही.'

डॉ. प्रा. राजेंद्र कुंभार, प्राचार्य, शाहू कॉलेज

'रॅगिंग होऊ नये यासाठी महाविद्यालये नेहमीच प्रयत्नशील आहेत. गेल्यावर्षी झालेल्या एका घटनेत आम्ही संबंधित दोषी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी सातत्याने विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून त्यांचे प्रबोधन केले जात आहे.'

डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

महाविद्यालयांची संख्या

आर्टस्ः १४५

इंजिनीअरिंगः ४१

शिक्षणशास्त्रः ३९

मॅनेजमेंटः १८

फार्मसीः १५

लॉः ७

इतरः १४

एकूणः २७९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोम गावात तब्बल आठ संतोष पोळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सहा खून झालेल्या धोम गावात संतोष पोळ नावाच्या आठ व्यक्ती असल्याचे पुढे आले आहे. मात्र, क्रूरकर्मा डॉ. संतोष पोळच्या कृत्यामुळे या सर्वच संतोष पोळना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

'संतोष पोळ या नावाचे आमच्या गावात आठ जण आहेत. यातील संतोष पोळ या नावाचे त्यातील पाचजण तर आम्ही एकाच वर्गात होतो. संतोष पोळ नावाचे बहुसंख्या असल्याचा अभिमानही वाटायचा. एकाच नावाचे आठ जण असल्याने होणाऱ्या गमती-जमतीतून आनंदही मिळायचा; पण यातीलच एका संतोष पोळने राक्षसी कृत्य केले. त्यामुळे उर्वरित आम्हा सर्व संतोष पोळ या नावकऱ्यांना संतोष' या नावाचीच आता लाज वाटू लागली आहे,' अशी उद्विग्न प्रतिक्रिया धोम येथील संतोष पोळ नावाच्या तरुणांनी दिली.

डॉ. संतोष पोळचे प्रताप उघडकीस आल्यानंतर संतोष या नावाच्या तरुणांना दूरदूरच्या नातेवाईक व मित्रांकडून होणाऱ्याया चौकशीचा नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तो संतोष पोळ मी नाही...,' असे समजावून सांगताना इतर साऱ्या संतोष पोळांची चांगलीच दमछाक होत आहे. पोळची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उपाध्यक्ष नलिनी कोंढाळकर यांनी केली आहे.

सपोनि राजेश नाईक यांचाही घातपातच?

मेढा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक राजेश नाईक यांनी डॉ. संतोष पोळ याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळवली होती. त्यानंतर काही दिवसातच राजेश नाईक यांचा अपघातात मृत्यू झाला होता. नाईक यांच्या अपघाती मृत्यूमागे डॉ. संतोष पोळच असावा, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारा बहिणींनी सीमेवर गुंफला नात्याचा बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जीव धोक्यात घालून सीमेवर देश रक्षणाचे कर्तव्य बजाविणाऱ्या जवानांना कोल्हापुरातील १२ बहिणींनी गुरुवारी राखी बांधली. जम्मूजवळील रामबनमध्ये लष्कराने या महिलांसाठी रक्षाबंधनाचा खास सोहळा आयोजित केला होता. चोवीस तास देशरक्षणाची सेवा बजावत असल्याने सुटी मिळत नाही. परिणामी बहिणींकडून राखी बांधून घेण्यास ते जवान मुकले होते. त्यांना या १२ जणींनी राखी बांधल्याने जवान भारावून गेले.

दरम्यान, राखी बांधण्याचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर लष्काराने १२ जणींसाठी भोजनाची व्यवस्था केली. भोजन करून महिला पुन्हा कोल्हापूरच्या परतीच्या प्रवासाला लागल्या. सीमेवर कर्तव्य बजावित असलेल्या जवानांच्या हाती राखी बांधण्यासाठी जैन सोशल ग्रुप पुरस्कृत संगीनी फोरमच्या अध्यक्षा प्रतिमा गांधी, साक्षी गांधी, शरयू शहा, शैला पाटील, अॅड. प्रतिभा बहिरशेठ, रुपाली पोकळे, आराधना पोकळे, सोनाली पोकळ, सुनीता पाटील, सुनीता जैन, भारती वाघरे, सरीता मगदूम १२ ऑगस्ट रोजी जम्मूत पोहचल्या.

गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता जम्मूजवळील पठनीटॉप येथील मराठा बटालिनच्या ४० जवानांना त्यांनी राखी बांधली. तेथून रामबनमधील लष्करी छावणीत त्यांना नेण्यात आले. ते‌थे या १२ जणींनी ८० जवानांना राखी बांधली. मराठा बटालियनचे कर्नल जॉयदास गुप्ता, कॅप्टन रोहित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा रक्षाबंधनचा कार्यकम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा वाढली, थरार संपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहीहंडीची उंची २० फुटांहून अधिक ठेवता येणार नाही आणि १८ वर्षांखालील गोविंदांना पथकात सहभागी होता येणार नाही या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने कोल्हापूर शहर-जिल्ह्यातील काही संस्था, संघटनांनी दहीहंडी स्पर्धा रद्द केल्या आहेत. वीस फुटांची दहीहंडी असेल तर पहिलेच गोविंद पथक हंडी फोडून बक्षिस मिळवेल. त्यामुळे स्पर्धेला अर्थ उरणार नाही. सुरक्षा वाढली असली तरी त्यातील थरार संपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही मंडळांनी मात्र नियमांचे पालन करून स्पर्धा होईल असे सांगितले.

कोल्हापूर शहरात धनंजय महाडिक युवाशक्ती, गुजरी कॉर्नर मित्र मंडळ, गोकुळ, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ यांच्यासह अन्य मंडळे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करतात. याशिवाय गल्लोगल्ली छोट्या-मोठ्या हंड्या बांधल्या जातात. गेल्या पाच वर्षात कोल्हापूरच्या दहीहंडीला एक ग्लॅमरस रूप आले होते. मात्र, सुप्रिम कोर्टाच्या दणक्याने संयोजकांसह मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यावर्षी नव्या नियमानंतर कोल्हापूर जिल्ह्या दूध उत्पादक संघाने (गोकुळ) आपली दहीहंडी रद्द केली आहे. काही मंडळांनी नियमांचे पालन करत दहीहंडी आयोजित करू असे सांगितले.

कोल्हापूरातील दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळ, गडहिंग्लज, तासगाव या भागातील संघ दोन महिन्यांहून अधिक काळ सराव करतात. अनेक मंडळे त्याहून अधिक काळ सरावात व्यग्र असतात. मात्र या नव्या नियमांमुळे काही मंडळांनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेत आहेत. गेल्यावर्षीपर्यंत साधारणतः ३५ ते ४० फुटांपर्यंत गोविंदांचे थर असायचे. मात्र कोर्टाने ही उंची वीस फुटांवर आणल्याने यातील रोमांच नाहीसा होणार आहे. यामुळे दहीहंडीच्या क्रेझवर भविष्यात परिणाम होणार असल्याच्या भावना मंडळांनी व्यक्त केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने जे नियम केले आहेत, ते लक्षात घेऊन गोकुळच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी दहीहंडी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. २० फुटांपर्यंत दहीहंडी बांधायची असेल तर त्यात स्पर्धा उरणार नाही. त्यामुळे गोकुळची दहीहंडी यावेळी होणार नाही.

- विश्वास पाटील, अध्यक्ष गोकुळ

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळाच्यावतीने दरवर्षी १८ ते १९ फुटांचीच दहीहंडी बांधली जाते. आम्ही आधीपासूनच या नियमाचे पालन करतो. कोल्हापुरातील आमची मानाची हंडी असल्यामुळे अनेक मंडळे ही फोडण्यासाठी येतात. ही परंपरा सुरुच राहिल.

- विजय कागले, लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ

सध्या आमचा दहीहंडीचा सराव सुरू आहे. गेल्यावर्षीही असे नियम करण्याचा प्रयत्न झाला होता. जर संयोजकांनीच २० फुटांपर्यंत दहीहंडी ठेवल्यास मंडळ सहभाग घेणार नाही. मंडळाने ३० फुटांची दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे उभारण्याची तयारी केली आहे.

- अरुण साळोखे, महाराणा प्रताप गोविंदा पथक, तासगाव

शिवाजी चौकातील दहीहंडी दरवर्षीप्रमाणे नियमानुसारच होणार आहे. दहीहंडीमध्ये १८ वर्षांखालील गोविंदांना सहभागी करून घेतले जाणार नाही. दहीहंडीची उंचीही २० फुटांपर्यंतच असणार आहे.

- स्वप्नील गवळी,
शिवाजी चौक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हॅलो, मी पालकमंत्री बोलतोय...’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोलहापूर

'हॅलो! मी पालकमंत्री बोलतोय. एसपी आहेत काय?' अशी विचारणा करणारा फोन पोलिस मुख्यालयात आला. हा फोन पालकमंत्र्यांचा नसून कुणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने केल्याचे लक्षात येताच पोलिस मुख्यालयात खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

स्थळ पोलिस मुख्यालय. वेळ गुरूवारी(ता. १८) संध्याकाळी साडेपाच वाजता. पोलिस मुख्यालयातील अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या ऑफिसमध्ये फोन खणखणला. अधीक्षकांच्या पीएने फोन उचलला आणि पलिकडून आवाज आला... 'हॅलो! मी पालकमंत्री बोलतोय. एसपी आहेत काय?' एसपी साहेब ऑफिसमध्ये नसल्याचे कळताच पलिकडच्या व्यक्तीने फोन ठेवला. आवाजाबाबत शंका आल्याने पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्याने लॅण्ड लाइनवरील नंबर चेक केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मुंबईत आहेत. मुख्यालयातील लॅण्ड लाइनवर त्यांचा फोन कसा येईल? याची शंका बळावल्याने मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी खात्री करण्यासाठी पालकमंत्र्यांचे शहरातील पीए राहुल चिकोडे यांना फोन लावला. फोनबाबत पालकमंत्र्यांकडून काहीच माहिती मिळाली नसल्याने त्यांनी आलेल्या फोनची खातरजमा करण्यास सांगितले. पोलिसांनी आलेल्या नंबरवर फोन लावला आणि उलट तपासणी केली. पोलिसांनी आवाज वाढवताच पलिकडील व्यक्तीने खोटे बोलल्याची कबुली देत एका कामासाठी पोलिस अधीक्षकांशी बोलायचे असल्याने फोन केल्याचे सांगितले. हा नंबर देवकर पाणंद परिसरातील पांडुरंग नगरी येथील असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना संबंधिताच्या चौकशीचे आदेश दिले.
जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी संबंधित संशयिताला ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चासत्रातून उलगडणार ‘नटसम्राट ते नटसम्राट’

$
0
0

कोल्हापूर ः प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे शुक्रवारी (ता. १९ ऑगस्ट) दुपारी ठीक १२ वाजता 'नटसम्राट ते नटसम्राट' या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हे चर्चासत्र होईल. यानिमित्ताने एकूणच 'नाटक' या विषयावर भाष्य होणार आहे.

'नटसम्राट' या नाटकाही निर्मिती अनेक संस्थांनी केली. त्यातील आप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा ज्या-त्या काळच्या अभिनेत्यांनी अभ्यासपूर्ण साकारताना रसिकप्रेक्षकांना अंतर्मुख केले. माष्टर दत्ताराम, डॉ. श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, मधुसूदन कोल्हटकर अशा अभिनेत्यांनी आपल्या कसदार अभिनयाने 'नटसम्राट' नुसताच गाजवला नाही तर नाटकही अजरामर केले. आता कोल्हापूरचे एक गुणी अभिनेते प्रफुल्ल गवस नटसम्राट साकारीत आहेत. कोल्हापुरच्या सुगुण नाट्यसंस्थेने याची निर्मिती केली आहे.

'नटसम्राट ते नटसम्राट' या चर्चासत्राचे सूत्रसंचालन कृष्णात जमदाडे हे करणार आहेत. चर्चासत्रात ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, सांगलीचे नाट्यकर्मी शफी नायकवडी, प्रेक्षक प्रतिनिधी म्हणून साहित्यिक गोविंद गोडबोले, अभिनेते दिग्दर्शक संजय तोडकर, नाट्यनिर्माते सुनील घोरपडे आणि अभिनेते प्रफुल्ल गवस यांचा सहभाग असणार आहे. हे चर्चासत्र निशुल्क आहे. शुक्रवारी (ता. १९ ऑगस्ट) दुपारी ठीक १२ वाजता शाहू स्मारक भवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होईल. सर्व नागरिक, ज्येष्ठ-युवा नाट्यरसिक प्रेक्षकांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना या चर्च्यासत्रात सहभागी होण्याचे आवाहन प्रतिज्ञा नाट्यरंगतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवडाव घाटाला हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-कोकणाशी कमी अंतराने जोडणाऱ्या सोनवडे शिवडाव घाट रस्त्याला वन्यजीव विभागाची केंद्रीय समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. डेहराडून येथे भारतीय वन्यजीव संस्थेसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. वन्यप्राण्याच्या भ्रमणमार्गात कोणताही अडथळा येणार नाही, याची दक्षता घेऊनच हा मार्गाला मान्यता दिली आहे.

हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर केला जाणार आहे. हा मार्ग झाल्यास अन्य मार्गांपेक्षा कोकणाकडे जाणारे अंतर सुमारे ४० किलोमीटरने कमी होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

कोकणात जाणाऱ्या अन्य मार्गांपेक्षा या मार्गाने ३० ते ४० किलोमीटरने अंतर कमी होणार आहे. या मार्गावर अवघड घाट नाही. त्यामुळे इंधनासह पैसे व वेळेची बचत होणार आहे. त्याचा पर्यटकांना चांगला फायदा होणार आहे. वन्यजीव विभागाची केंद्रीय समितीने काही दिवसांपूर्वी या मार्गाची पाहणी केली होती. समितीने या मार्गाची पाहणी करून डेहराडून येथे बैठक घेतली. या बैठकीस समितीचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरला जवळचा दळणवळणाचा मार्ग असलेला गारगोटी, शिवडाव, घोडगे, सोनवडे असा मार्ग होण्याची मागणी गेली तीन वर्षे होती. गेली सोळा वर्षे वनविभाग, वन्यजीव विभाग यांच्या तांत्रिक अडचणीमुळे या मार्गाचे काम रखडले होते. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार वैभव नाईक यांनी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

०००

सोळा वर्षे मागणी

माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी १९८५ या मार्गाची मागणी तत्कालीन सरकारकडे केली होती. माजी आमदार बजरंग देसाई, नामदेवराव भोईटे, शंकर धोंडी पाटील, के. पी. पाटील यांनीही प्रयत्न केले होते. त्यानंतर १९९८ साली तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी या मार्गासाठी सकारात्मकता दाखविली होती. इंधन बचतीबरोबर व्यापार, उद्योगाविषयी विकासासाठी मार्ग करण्याची साततत्याने मागणी केली होती. अखेर या मार्गाला वन्यजीव विभागाच्या केंद्रीय हिरवा कंदील दाखविला आहे.

०००

काय होणार ?

शिवडाव घाट रस्त्यात ३०० मीटर लांबीचा १ पूल, ८० मीटर, १०० मीटर असे एकूण तीन पूल होणार आहेत. ११०० मीटर लांबीचा फ्लायओव्हर ब्रीज केला जाणार आहे. ६०० मीटर लांबीचा पोहोच मार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत केला जाणार आहे. तर काही पुलांची कामे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत केली जाणार आहे. हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सादर केला जाणार आहे. वन्यप्राण्याच्या भ्रमण मार्गांत कोणताही अडथळा न येता हा मार्ग तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्किंगसह जनावरेही रस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ता रुंदीकरण करूनही गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावरील रिक्षास्टॉप, अस्ताव्यस्त पार्किंग आणि जनावरेही रस्त्यातच बांधली जातात. त्यामुळे वाहनधरकांना उरलेल्या जागेतून वाट काढावी लागते. या मार्गावरून अवजड वाहतूक वाढल्याने वाहतूक कोंडी नित्याची ठरत आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खासगी बसही याच मार्गावर पार्क केल्या जातात, त्यामुळे वाहनधरकांना या रस्त्यावर कसरत करावी लागत आहे.

गंगावेश बस स्टँडपासून ते शिवाजी पुलापर्यंतचा रस्ता म्हणजे पूर्वीचा शहरातील वर्दळीचा रस्ता. शहरातून रत्नागिरी आणि कोकणाकडे जाणाऱ्यांसाठी हा मार्ग सोयीचा असल्याने इथे नेहमीच वर्दळ असते. वाढती वाहतूक आणि भविष्यातील ट्रॅफिक जामचा अंदाज घेऊन महापालिकेचे तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी गंगावेश बस स्टँड ते गायकवाड वाड्यापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम केले. यासाठी त्यांनी रस्त्याचा आराखडाही तयार केला. रस्ता रुंदीकरणानंतर वाहतुकीचा ताण आणखी वाढला आणि कोंडीही वाढली. गंगावेश चौकातील रिक्षा स्टॉपवर नेहमीच रिक्षांची वर्दळ असते. यातील काही रिक्षा रस्त्यातच असतात.

संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजुला असलेल्या घरमालकांचे स्वतःचे पार्किंग अपवादात्मकच आहे. घरांच्या समोर लावलेली वाहने अर्धीअधिक रस्त्यातच असतात. काही दुकानांसमोरही रस्त्यातच वाहने उभी असतात, त्यामुळे वाहनांची कोंडी होते.

शहरातून रत्नागिरीसह कोकणात जाण्यासाठी हा मार्ग सर्वात सोयीचा मार्ग आहे, त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक वाढली आहे. रंकाळ्यावरून कागल आणि हुपरीकडे जाणाऱ्या एसटी बसही याच मार्गावरून धावतात. जोतिबा, पन्हाळ्याकडून शहरात येणारे पर्यटक याच मार्गावरून पुढे अंबाबाई मंदिराकडे जातात. भाविकांची काही मोठी वाहने, खासगी बस गायकवाड वाडा, जामदार क्लब परीट गल्ली परिसरात रस्त्याकडेला उभ्या असतात. जामदार क्लबसमोर जनावरांचे गोठे आहेत. याशिवाय परिसरातील काही नागरिकांच्या म्हैशी याच मार्गावरून नदीकडे जातात. अनेकदा ही जानावरे वाटेतच उभी असतात. अशावेळी वाहनाधरकांना वाट काढत पुढे जावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू कुलकर्णींची मनपाकडून दखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर,

शालेय वयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या बिंदू नारायण कुलकर्णी यांचा १६ ऑगस्ट रोजी स्मृतिदिन साजरा करावा, अशी एक दशकाहून अधिक काळच्या मागणीसंबंधी बातमी करून 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाशझोत टाकला. त्याची दखल महापालिका प्रशासनाने अखेर घेतली आहे. शनिवारी (दि. २०) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बिंदू कुलकर्णी यांचा स्मृतिदिन साजरा करणे, त्यांच्या कामगिरीची माहिती देणारे फलक लावणे याविषयीचा ठराव मांडण्यात येणार आहे.

बिंदू नारायण कुलकर्णी यांच्या हौतात्म्याचे ठिकाण म्हणून शहराच्या मध्यवस्तीतील चौकास बिंदू चौक असे नाव दिले आहे. मात्र त्यांचा स्मृतिदिन महापालिकेतर्फे साजरा होत नाही. भारत छोडो चळवळ गतीमान झाली असताना या चौकात १६ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटीशाविरूद्ध स्वातंत्र्यसंग्रामसाठी सभेचे आयोजन केले होते. ती सभा उधळून लावण्यासाठी ब्रिटीशांनी बेछुट लाठीहल्ला केला. त्यामध्ये बिंदू कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. त्यांचे स्मरण कायम राहवे, यासाठी पुर्वी मिरची बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि चौकास हुतात्मा बिंदू चौक असे नाव‌ देण्यात आले. या चौकात प्रत्येक वर्षी ९ ऑगस्ट रोजी शहरातील विविध संस्था, संघटना उपक्रम साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेने १६ ऑगस्ट हा दिवस महापालिकेने बिंदू कुलकर्णी यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा करावा, नव्या पिढीच्या महितीसाठी त्यांच्या कार्याची माहितीचा फलक लावावा, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्या सभेत याबाबतचा ठराव करून स्मृतिदिन साजरा करण्याची विनंती गेली दहा वर्षे करण्यात येत होती. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत राहिले. यासंबंधी ९ ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले. त्याची दखल घेवून सर्वसाधारण सभेत मागण्यांचा ठराव करण्याचा होणार असल्याचे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत म्हटले आहे.

ठरावाचे वाचन

जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे बिंदू कुलकर्णी यांचा स्मृतिदिन बिंदू चौकात साजरा करण्यात आला. यावेळी स्मृतिदिन पुढील वर्षी महापालिकेतर्फे साजरा करण्यात येईल,अस नगरसेविका निलोफर आजगेकर यांनी सांगितले. त्यांनी स्मृतिदिनाच्या ठरावाचे वाचन केले. पद्माकर कापसे, सुजय देसाई, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्राचार्य व्ही. डी. माने, भक्तीसेवा विद्यापीठाचे चेअरमन अॅड. धनंजय पठाडे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, उमा पानसरे, खादी संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, गीता गुरव, छाया भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images