Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अल्पवयीन मुलीवर बलात्कारकोरेगाव तालुक्यातील घटना; आरोपीला पोलिस कोठडी

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

आई-वडील शेतात कामावर गेलेले असताना घरात एकट्याच असलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर गावातीलच ४५ वर्षांच्या संतोष भोईटे याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी तडवळे-संमत वाघोली (ता. कोरेगाव. जि. सातारा) या गावात घडली. पीडित मुलीवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, भोईटे याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने त्याला पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पीडित मुलीचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले होते. ती घरात एकटी होती. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष भोईटे घरात आला. त्याने मुलीला फरफटत घराच्या मागील बाजूस नेऊन बलात्कार केला. आई-वडील कामावरून परतल्यावर त्यांनी मुलीची स्थिती बघून तिची विचारपूस केली. तेव्हा मुलीने सगळी घटना सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करून संतोष भोईटे याला अटक केली. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसल्याने सुमारे दोन तास मुलीवर उपचार होऊ शकले नाहीत.

'बलात्काराची घटना मन सुन्न करणारी आहे, अशा नराधमास दगडाने ठेचून मारले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया सातारा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा समींद्रा जाधव यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलीच्या प्रकृतीची चौकशी केली. तृप्ती देसाई यांनी प्रकरणातील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून, तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हटले आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणी आपण अधिवेशनात तारांकीत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. कोरेगाव तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक होऊन आरोपींला चांगलाच चोप दिला. शिवसैनिकांच्या वतीने पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतही देण्यात आली.

प्रत्येक गावात महिला सुरक्षा पथक

पीडित कुटुंबीयांना जिल्हाधिकाऱ्यांनी तीन लाख रुपयांची मदत दिली आहे. जिल्ह्यातील वाढते महिलांवरील अत्याचाराची गंभीर दखल घेऊन प्रत्येक गावात महिला सुरक्षा पथक निर्माण करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेजकुमार करणार हेल्मेटसक्तीची जागृती

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर ः हेल्मेट न घालता वाहन चालवल्याने जे अपघात होतात त्यात तरूणांची विशेषतः कॉलेजकुमारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याच युवकांमध्ये हेल्मेटसक्तीसाठी जनजागृती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील एक लाख मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून वाहनधारकांत जनजागृती करण्यात येणार आहे. कॉलेज सुरू झाल्याने प्रशिक्षण तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने हेल्मेटसक्ती केली आहे. हेल्मेट न घालणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचा आदेश दण्यात आला आहे. याला वाहनधारकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे राज्य पातळीवर हेल्मेटसक्तीचा विषय वादग्रस्त ठरला आहे. हेल्मेट आवश्यक असतानाही जनजागृती नसल्यानेच हेल्मेटसक्तीला विरोध होत आहे. यामुळे प्रथम जागृती करा आणि नंतर सक्ती करा, अशी मागणी जनतेतून होत आहे.

एकीकडे हेल्मेटसक्ती करतानाच राज्य पातळीवर पुन्हा एकदा जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कॉलेजकुमारांनाच नियुक्त करण्यात येणार आहे. राज्यभर मोहीम राबवण्यात येणार आहे. गेल्यावर्षी अशी मोहीम राबवण्यात आली आहे. पण आता त्याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत सर्व कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. रस्ते वाहतूक सुरक्षेविषयी दोन तासाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. सरकारने हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. हे तज्ज्ञ प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मुलांना वाहतूक सुरक्षेचे धडे देतील.

प्रशिक्षित मुलांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातच लाखावर कॉलेजकुमार या कामात सहभागी होणार आहेत. राज्यभर लाखो कॉलेजकुमारांच्या माध्यमातून वाहनाधारकांना हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. यामुळे हेल्मेटला सुरू असलेला विरोध काही प्रमाणात तरी मावळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

===

अपघातात सर्वाधिक तरुण जखमी

सध्या जे रस्त्यावर दुचाकी स्वारांचे अपघात होतात. त्यात युवकांची संख्या जास्त आहे. अपघातात जागीच ठार होण्याचे प्रमाणही अधिक आहे.जे जखमी होतात. त्यातही तरूणांचे प्रमाण जास्त आहे. मेंदूला मार लागल्याने हे तरूण जिवंत राहूनही आयुष्यभर अपंग राहतात. बहुसंख्य कॉलेजकुमार भरधाव वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक असल्याने त्यांच्यात जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच १८ ते २५ या वयोगटातील मुलांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांचा वापर जागृतीसाठी करण्यात येणार आहे.

===

कोल्हापुरात यापूर्वी २७ हजार कॉलेकुमारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आता याला व्यापक स्वरूप देताना एक लाखापेक्षा अधिक मुलांच्या माध्यमातून हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. आता सर्व कॉलेज सुरू झाल्याने तातडीने ही मोहीम सुरू करण्यात येणार असून यासाठी आठ अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे.

लक्ष्मण दराडे, आरटीओ

००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटारीतून पाणी थेट पंचगंगेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवर परीट घाटाच्या बाजूने येणाऱ्या गटारातील पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून अलीकडच्या बाजूने नदीत मिसळत आहे. परीट घाटाच्या बाजूने असलेल्या गटरमधून पाणी नदीत सोडले आहे.

याबाबत नागरिकांनी सांगितले की, उन्हाळ्यात गटारातील खरमाती मुळात काढलेली नाही. त्यामुळे गटर पूर्ण भरले आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पाणी वाहत न जाता मध्येच तुंबून राहते. परिणामी पाणी नदीत मिसळत आहे. काही नागरिकांनी गटारीतील खरमाती काढून पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सांडपाण्यामुळे पुन्हा हा बांध फुटत आहे.

याबाबत नागरिकांनी येथील पंचगंगा हॉस्पिटल येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात लेखी तक्रार दिली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी हा भाग आमच्या प्रभागात येत नाही. सी वॉर्डमध्ये सांगा, कामगार कमी आहेत, अशा स्वरूपाची उत्तरे दिली. आरोग्याचा गंभीर होण्याआधीच गटारातील खरमाती काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चर बुजविण्याची गरज

या परिसरातील स्थानिक नागरिक म्हशी नदीत नेतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी येथे तीन ठिकाणी चर खोदली आहे. मात्र, म्हशी वरच्या बाजूने पाण्यात नेल्या जातात. शिवाजी पुलाकडून गंगावेसकडे जाणाऱ्या या रस्त्यावर उतार आहे. त्यामुळे म्हशींच्या रस्त्यावर येण्याने आणि त्याचवेळी उतारामुळे वेगात असणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चर बुजवावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्शापासून ‘संसद ग्राम’ दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदारांनी दत्तक घेतलेल्या जिल्ह्यातील राजगोळी खुर्द (ता. चंदगड), पेरीड व सोनवडे (ता. शाहूवाडी) ही तीन गावे आदर्श होण्यापासून अद्याप फार दूर आहेत. लाखो रुपयांची कामे मंजुरीतच अनेक दिवसांपासून अडली आहेत. आदर्श गाव झाल्याची घोषणा करण्यासाठी केवळ दोन महिने शिल्लक राहिलेले आहेत. मात्र, प्रशासकीय दिरंगाई, नि‌धीचा अभाव यामुळे इतक्या कमी कालावधीत गाव आदर्श करणे आव्हान आहे. हे आव्हान न पेलल्यास संबंधित गावांचा अपेक्षाभंग होणार आहे.

संसद आदर्श ग्राम योजनेतून ऑक्टोबर २०१६ पर्यंत एक गाव आणि २०१९ पर्यंत एक अशी दोन गावे आदर्श करणे अपेक्षित आहे. मे २०१५ मध्ये प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेतले. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी कर्नाटकच्या सीमेजवळ असलेले चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गाव दत्तक घेतले. हातकणंगले मतदारसंघाचे खासदार राजू शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्यातील पेरीड आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सोनवडे गाव दत्तक घेतले.

प्रत्येक दत्तक गावात एका चार्ज ऑफिसरची नियुक्ती केली. अधिकारी व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन ग्राम विकास आराखडा तयार केला. स्वतंत्र निधी नसल्याने सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांतून या गावांना झुकते माप दिले. तिन्ही गावांत प्रत्येकी दहा कोटींवर विकासकामांचा आराखडा तयार केला. खासदार महाडिक व शेट्टी यांनी ‌कार्यक्रम ‌घेऊन विकासकामांना प्रारंभ केला. खासदार राऊत यांनी अजून दत्तक गावास एकदाही भेट दिलेली नाहीत; पण मंजूर विकासकामे सुरू आहेत. महाडिक व शेट्टी शक्य तितक्या लवकर विकासकामे करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत, पण विविध योजनांतून काम निवडणे, प्रशासकीय मंजुरी घेणे, प्रत्यक्ष कामास प्रारंभ करणे या पक्रियेला विलंब लागत आहे. यामुळे दत्तक गाव घेतल्यानंतर गावचा चेहरामोहरा बदलेल अशी आशा बाळगलेल्या ग्रामस्थांची निराशा झाली आहे.

प्रलंबित कामे अशी

राजगोळी खुर्द ः ग्रामसचिवालय, स्मशानशेड, वाचनालय इमारत व साहित्य पुरवठा करणे, अंतर्गत गटर्स बांधकाम, नळ-पाणीपुरवठा योजना, तलावातील गाळ काढणे, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधणे, प्राथमिक शाळा वर्ग खोल्या, सुसज्ज वाचनालयासाठी इमारत बांधणे, अंगणवाडी इमारत बांधणे, आरसीसी गटर्स, रस्ते बांधणे, पर्यटन केंद्र सुरू करणे, व्यायाम साहित्य पुरवणे.

पेरीड ः अंतर्गत गटर्स व रस्ते बांधणी, शाळेत ई-लर्निंगअंतर्गत एलईडी प्रोजक्टर पुरवणे, क्रीडांगणाचे सपाटीकरण करणे, माती नाला बंधारा, सिमेंट बंधारा, ठिबक व तुषार संच पुरवणे, अनुदानावर अवजारे पुरवणे, विद्युत सुधारणा करणे, खराब झालेले खांब बदलणे.

सोनवडे ः सोलर लायब्ररी, विद्युत पंपांना अनुदान देणे, मुलींना सायकल पुरवणे, कुटुंबांना आरोग्य कार्ड पुरवणे, ई-लर्निंग व डिजिटल क्लासरूम सुविधा निर्माण करणे, क्रीडांगण सपाटीकरण, विश्रांतीगृह बांधणे, पर्यटन केंद्र विकसित करणे, गावांतर्गत रस्ते करणे, सांडपाणी व्यवस्थान प्रकल्प, बहुउद्देशीय सभागृह, पाणंद रस्ते करणे, नळकनेक्शन पाणी मीटर बसविणे, विजेचे सबस्टेशन उभारणे.


मूलभूत सुविधाही

नियोजित आदर्श गावांमध्ये रस्ते, गटारी, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत मूलभूत सुविधांसह सर्वांगीण विकासाची कामे कशी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. निधी देतानाही खासदार हात आखडता घेत असल्याने ‌कृती विकास आराखड्यावर नजर टाकल्यानंतर समोर येते.


दत्तक गावासाठी स्वतंत्र निधी नाही. केंद्र, राज्य सरकारच्या योजनेतूनच कामे करावी लागत असल्याने प्रशासकीय दिरंगाई होत आहे. गतीने विकासकामे होत नाहीत. परिणामी निर्धारित वेळेत गाव आदर्श करणे अवघड जात आहे.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लज पालिकेत अस्तित्वासाठी लढाई

$
0
0

दीपक मांगले, गडहिंग्लज

आगामी नगरपालिका निवडणूक गडहिंग्लज तालुक्यात सर्वच इच्छुकांसह पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. परिणामी गेल्या दोन आठवड्यांत गडहिंग्लज तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून 'न भूतो न भविष्यती' बदल या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. गेल्या दहा वर्षांत गडहिंग्लज तालुक्यात कुठेच नसलेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी महाआघाडीच्या माध्यमातून पालिकेत सत्ता काबीज करायचीच, हा चंग बांधला असून त्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व नीतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या अध्यक्षांसह काही सदस्यांचा भाजप प्रवेश ही याच नांदीची सुरुवात असून, इतर पक्षांतील बंडखोरसुद्धा याच मार्गावरून वाटचाल करीत आहेत. गडहिंग्लजमध्ये लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता आहे.

गेली चार-सहा दशकभरात आपले वर्चस्व अबाधित ठेवलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाला आज भाजपच्या निमित्ताने एक वजनदार विरोधक लाभला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यानंतर सगळ्याच पक्षांतील हालचाली गतिमान झाल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ताधारी असलेल्या भाजरला गडहिंग्लज शहरात आपले अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. गेल्या वर्षभरापासून पक्षानेही त्यादृष्टीने अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचाच भाग म्हणून सर्वप्रथम त्यांनी भाजपची कार्यकारणी बदलून तालुक्यात पक्षावर आलेली मरगळ दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

महाआघाडीची मोट बांधत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीला शह देण्याचा 'गोडसाखर'च्या निमित्ताने पहिला प्रयत्न दखल घेण्यासारखाच होता. 'गोडसाखर'ची निवडणूक महाआघाडीसाठी ट्रायल ठरली असून, त्यानिमित्ताने भाजपने गडहिंग्लज शहर व तालुक्याचा बारकाईने अभ्यास केल्याचे दिसून येत आहे. परिणामी आगामी पालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. देशभरात असलेल्या मोदी लाटेच्या कृपेने भाजप 'प्रवेशाला' वेग आला आहे. बहुतांश इच्छुकांनी आपली पहिली पसंती केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला दिली आहे. त्यामुळे येणारी निवडणूक 'परिवर्तनाची लाट' घेऊन येईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या दशकभरात गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल या दोनच पक्षांनी पकड मजबूत ठेवत सत्ताधारी व विरोधक अशी सोयीनुसार भूमिका बजावली. सध्या गडहिंग्लज नगरपालिकेत जनता दलाची सत्ता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणून कार्यरत आहेत. तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता असून, सदस्य बाळेश नाईक यांच्या रूपाने जनता दलाचा एक भक्कम विरोधक आहे. मात्र, सध्या या दोन्ही पक्षांना फुटिरांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे एकंदर राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित.

'गोडसाखर'च्या निमित्ताने एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाने सध्यातरी स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, आजअखेरचा अनुभव पाहता आमदार हसन मुश्रीफ आणि अॅड. श्रीपतराव शिंदे हे कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात किंवा अनपेक्षितरीत्या कुणाशीही आघाडी करू शकतात. एकंदरीत संपूर्ण राजकीय संदर्भ बदलणार हे नक्की.

भाजपमध्ये नवचैतन्य

अनपेक्षितरीत्या चार महिन्यांपूर्वी पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांनी भाजप तालुकाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर कार्यकारी मंडळ बदलाचे वारे भाजपमध्ये वाहतच राहिले. यातील जुन्या काही मंडळींनी या बदलाचा स्वीकार खुल्या मानाने केला, तर काही मंडळी नाराज झाली. मात्र सद्यःस्थितीत हा कार्यकारिणी बदल पक्षाच्या पथ्यावरच पडल्याचे चित्र असून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रमेश रिंगणे यांना शहराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. कोलेकर आणि रिंगणे या दोन अनुभवी नेतृत्वाखाली भाजपमध्ये अनेक सकारात्मक बदल घडतील अशी आशा आहे.

सोयीचे राजकारण

राजकारणात बंडखोरी नवीन नाही. परिणामी आपला हेतू साध्य करीत सत्तेवर येण्यासाठी प्रत्येकजण सोयीचे राजकारण करत आहेत. सध्या राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपची चलती आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर पक्षातील नाराज तसेच जनता दलही सत्तेचा उपभोग घेता यावा यासाठी भाजपसोबत येण्यासाठी इच्छुक असल्याचे वरिष्ठ कार्यकारी सदस्याने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक विमा योजनेचा फज्जा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : विमा रक्कम देण्यास होणारी टाळाटाळ आणि कागदपत्रे तयार करण्यात होणारी दिरंगाई अशा घटनांमुळे केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीकविमा योजनेचा फज्जा उडाला आहे. योजनेत सहभागी व्हायला केवळ दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्यांत केवळ १८ हजार ४३७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. योजनेत सहभागासाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्ती करुनही अल्प प्रतिसाद मिळाला असल्याने केंद्राच्या 'ड्रीम प्रोजक्ट' चांगलाच धक्का बसला आहे.

खरीप भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, भूईमुग, सोयबीन, मका, कापूस व कांदा पिकांसाठी राष्ट्रीय पीक विमा योजना रद्द करुन पंतप्रधान पीकविमा योजना जाहीर करण्यात आली. ३१ जुलैपर्यंत मुदत असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंडल, तालकास्तरावर धावपळ सुरू झाली. अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामपंचायतींनाही यात सहभागी करुन घेण्यात आले. कोल्हापूरमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, सातारा भारतीय कृषी विमा कंपनी तर सांगलीमत इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपन्या ही योजना राबवत आहेत.

विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना अनिवार्य करण्यात आली होती. कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेताना पीक विम्याचा हप्ता काढून घेतला असल्याने योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. अन्यथा तिनही जिल्ह्यातील चित्र यापेक्षा वेगळे दिसले असते. योजनेतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कंपन्यांकडून नुकसान क्वचितच मिळत असल्याचा वाईट अनुभव असल्याने शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नसल्याने शेतकरी विमा हप्ता देण्यास तयार नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. नुकसान झाल्यास महसूल किंवा कृषी खात्याकडून त्वरीत पंचनामे होत नाहीत, झालेच तरी अनेक जटील अटीद्वारे यातून पळवाट शोधली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून होत आहे. नवीन पीक योजनेमध्ये मंडल हे क्षेत्र नुकसानीसाठी निश्चित केल्याने मंडलमधील दोन चार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळणार याची शाश्वती नसल्याने यातून स्पष्ट होत आहे.

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पिके पाण्याखाली गेली. आठवडा उलटल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले. मात्र तीन आठवड्यानंतरही नुकसानीचे आकडे अद्याप महसूल यंत्रणेकडे नाहीत. अनेक विमा कंपन्याकडून भरपाई देण्यास टाळटाळ केल्याने शेतकऱ्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याची शक्यता शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे.

योजनेत सहभागी शेतकरी

जिल्हा कर्जदार बिगर कर्जदार एकूण

कोल्हापूर १७३६ १६३ १८९९

सांगली १२०० १४,२४९ १५,४४९

सातारा ० १०८९ १०८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ अधिकाऱ्यांच्या वेतनवाढीला ब्रेक

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

दप्तर दिरंगाई, कामात हलगर्जीपणा आणि लाड स​मितीच्या शिफारसीनुसार कामगार नियुक्त्या करण्यात ढिलाईपणा आणि वेळेत कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याच्या कारणाखाली महापालिकेतील तेरा अधिकाऱ्यांना वेतनवाढीला मुकावे लागले आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी ही कारवाई केली.

गेल्या दोन महिन्यात कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने वेतनवाढ रोखण्याची कारवाई पहिल्यांदाच झाली आहे. एक ऑगस्टपासून महापालिका कर्मचाऱ्यांना नवी वेतनवाढ लागू होते. जुलैच्या पगारातच वेतनवाढीच्या रकमेचा समावेश केला जातो. एकीकडे वेतनवाढीची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे आयुक्तांच्या धडाकेबाज कारवाईने कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली.

महाद्वार रोडवरील एका इमारतीच्या बेसमेंटमधील बांधकामावरून उपशहर अभियंता एस. के. पाटील, परवाना विभागाचे अधीक्षक सचिन जाधव यांच्यावर कारवाई झाली. लाड कमिटीनुसार कामगारांच्या नियुक्ती प्रक्रियेत ढिलाईपणा दाखविल्याबद्दल कामगार आणि आस्थापना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी धरले आहे. वेतनश्रेणीचा फरक काढणाऱ्या लिपिकावरही कारवाई झाली आहे. कोर्ट कामासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून दिले नसल्याच्या कारणावरून वर्ग एकच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले आहे. तसेच विधी विभागातील नोंदणी नियमित करण्याच्या सूचना करूनही त्याकडे डोळेझाक करणाऱ्या सहाय्यक अधीक्षक, क्लार्कला दोषी धरले आहे. कारवाईपूर्वी संबंधितांकडे खुलासाही मागविला होता.

कारवाई झालेले अधिकारी व कर्मचारी वर्ग

शीला पाटील (सहायक आयुक्त, आता अन्यत्र बदली), धनंजय खोत (नगररचना सहाय्यक संचालक), एस. के. पाटील (उपशहर अभियंता), सचिन जाधव (अधीक्षक, परवाना विभाग), विलास साळोखे (सहायक अधीक्षक, विधी विभाग), अच्युत आडूरकर (लिपीक, विधी विभाग), सविता तिबिले (अधीक्षक), सीमा येसादे (वरिष्ठ लिपीक, दोघेही रेकॉर्ड विभाग), उमाकांत कांबळे (कामगार अधिकारी), राजकुमार पंडीत (क्लार्क, कामगार विभाग), बाजीराव कांबळे व विजय वणकुद्रे (दोघेही, आस्थापना), राजेंद्र पाटील (ड्रेनेज). यांच्यापैकी काही जणांवर एका वर्षासाठी, काहीजणांच्या दोन वर्षे तर काहींच्या कायमस्वरुपी वेतनवाढी रोखल्या आहेत. बाबूराव दबडे व आणखी एका अधिकाऱ्याला सक्त ताकीद देण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकारीही कचाट्यात

दरम्यान, टीबी रुग्णांच्या तपासणीत काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले आहे. या रुग्णांची थुंकी तपासणी योग्य पद्धतीने केले नसल्याचा अहवाल मिळाला आहे. याप्रकरणी बारा वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित आहे. त्यांना नोटिसा काढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी वापरणा‍ऱ्यांवर कारवाई करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

'डॉल्बीचा वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर कायदेशीर कारवाई करून वाहनासह डॉल्बी जप्त केला जाईल. मंडळांनी गणेश मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर तसेच सामाजिक उपक्रम व सजीव देखाव्यांवर भर द्यावा,' असे आवाहन भुदरगडचे पोलिस निरीक्षक अशोक पोवार यांनी केले. कूर (ता. भुदरगड) येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक जीवन पाटील होते.

जीवन पाटील यांनी, कूर येथील मंडळे कायदेशीर अटी मान्य करून सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतील असा विश्वास व्यक्त केला. मिरवणुकीत कोणतेही गालबोट लागणार नाही अशी हमी येथील सर्व मंडळांनी दिली.

यावेळी उपसरपंच संभाजी कुंभार, पोलिसपाटील युवराज धोंगडे, डॉ. संदीप पाटील, रणजित पाटील, सूरज हळदकर, नीलेश डवरी, कपिल राजिगरे, सचिन प्रभावळे, कृष्णात मिसाळ, उत्तम चोडणकर, सुनील भरमल, रवी हळदकर, भैरवनाथ पाटील, आदींसह मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. संदीप पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हवालातील २४ लाख हस्तगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गजबलेल्या स्टेशन रोडवर हवालाची तीस लाखाची रोकड लुटीच्या गुन्हाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश लाभले. या गुन्ह्यातील एका महिलेसह सहाजणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. संशयितांना धारावी झोपडपट्टी, हुबळी आणि सांगलीतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख २४ लाख ३५ हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली.

लखन चंद्रकांत देवकुळे (वय २२ रा. ​शिवाजी पार्क), देवेंद्र उर्फ ढेब्या रमेश वाघमारे (टेंबलाई रेल्वे फाटक झोपडपट्टी), विशाल जयसिंग मछले (२४,आंबेडकरनगर, कसबा बावडा), शुभम कृष्णात पाटील (२२, केर्ले), केतन सुरेश खोत (चौथी गल्ली, राजारामपुरी) सुजाता कमलेश पटेल (रा. साई रिजन्सी, हरभट रोड, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. प्रदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

२३ जुलैला रात्री पावणेआठच्या सुमारास अरूणभाई अमृतभाई सुतार (रा. खेरवा वेराईवास, जि‍. मेहसाना,. गुजरात) व त्यांचा मित्र निकेश पटेल मोटारसायकलवरून जात होते. स्टेशन रोडवरील हॉटेल राधाकृष्णजवळील वळणावर तोंडाला रूमाल लावून आलेल्या दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघा संशयितांपैकी एकाने निकेश यांच्या कानावर जोरात फटका मारन मागे बसलेल्या संशयिताने पैशाची बॅग हिसकावून पळवून नेली होती. या गुन्ह्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेज आणि मोटारसायकलवरून काही संशयितांवर नजर ठेवली होती. निरीक्षक दिनकर मोहिते यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांची तीन पथके मुंबई, हुबळी व सांगलीला पथके पाठवली होती.

पोलिस उप निरीक्षक इलियास सय्यद यांच्या पथकाने धारावीत लखन देवकुळे व ठाण्यातील कळवा येथून देवेंद्र वाघमारेला ताब्यात घेतले. उपनिरीक्षक गजानन पालवे यांच्या पथकाने हुबळीतील गांधी वाडा येथून विशाल मछले, शुभम पाटील यांना ताब्यात घेतले. उपनिरीक्षक सचिन पंडित यांनी राजारामपुरीतून केतन खोत व सांगलीतून सुजाता पटेल यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकल व २४ लाख ३५ हजाराची रोकड हस्तगत केली.

सुजाताने दिली संशयितांना टीप

संशयित सुरेश खोत व सुजाता पटेल यांची ओळख आहे. सुजाताने केतनला अरूण सुतार सांगलीतून नेहमी पैसे घेऊन जात असतो, अशी माहिती दिली होती. २३ जुलैला तिने केतनला अरूण सांगलीहून पैसे घेऊन कोल्हापूरला गेल्याचे सांगून त्याचे वर्णनही सांगितले होते. त्याच्या हातात एअर बॅग असल्याची टीप दिली. केतनने ही टीप विशाल मछले, देवेंद्र वाघमारे, लखन देवकुळे व शुभम पाटीलला दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून कट रचला. अरूणभाई सीबीएस परिसरात वाट पहात थांबले. त्यांची ओळख पटल्यावर त्याचा पाठलाग करुन ही रक्कम लंपास केली. त्यानंतर ते सर्वजण एसटीने मुंबई व हुबळीकडे पळाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ १२ रुपयांनी उतरली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले काही दिवस उच्चांकी दर गाठलेल्या तूरडाळीचे दर या आठवड्यात तब्बल १२ रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे १४८ किलो मिळणारी तूरडाळ १३६ रुपये किलो अशी उतरली आहे. मागील आठवड्यात वाढलेले टोमॅटोचे दरही आवाक्यात आले असून २० रुपये किलोने टॉमेटोची विक्री होत असून हा आठवडा सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारा ठरला.

या आठवड्यात साखरेच्या दरात ५० पैशांची वाढ झाल्यामुळे साखर ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बुधवारपासून श्रावण सुरू होत असल्यामुळे शाबू, शेंगदाणे, वरीचा तांदूळ अशांची अधिक मागणी वाढणार असल्यामुळे यामधील दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत.

याचबरोबर सोमवारी अडत रद्द व्हावी, या मागणीसाठी भाजीपाला मार्केट बंद असल्यामुळे पुढील आठवड्यात पालेभाज्यांच्या दरात फरक पडण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात जवारी गाजराची आवक कमी झाली असून महाबळेश्वरहून परदेशी गाजरांची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तर कोथिंबीर, पालेभाज्यांची आवक प्रचंड वाढली आहे.



भाजी दर (दर प्रतिकिलो)

वांगी : ६० रु.

टोमॅटो : २० रु.

भेंडी : ६० रु.

दोडका : ६० रु.

कारली :५० रु.

ढबू मिरची : ७० रु.

कोबी : ४० प्रति नग

फ्लॉवर : २० ते ३० रु.

गवार : ८० रु.

मेथी : १० रु. पेंडी

पोकळा : १० रु पेंडी

पालक : १० रु पेंडी

शेपू : ८ ते १० रु पेंडी

कोथिंबीर : १० रु. पेंडी

कांदापात : ८ ते १० रु पेंडी

तांदळी : ८ ते १० रु पेंडी

कांदा : २० किलो

बटाटा : ३० रु. किलो

...............

डाळींचे दर (प्रतिकिलो)

तूरडाळ : १३६

मूगडाळ : ८० रु.

उडीद डाळ : १८० रु.

हरभरा : १०८ रु.

हरभरा डाळ :१२० रु.

.............

खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)

सरकी : ८० रु.

सूर्यफूल ९६ रु.

शेंगतेल : १३६ रु.

फळांचे दर (प्रतिकिलो)

डाळिंब : ८० ते १०० रु.

सफरचंद : १४० रु.

विदेशी सफरचंद : १८० ते २०० रु.

पेरू : १२० रु.

केळी वसई : ४० (डझन)

केळी जवारी : ८० रु.


किरणा दर -

पोहे : ४४ रु. कि.

साखर : ४० रु. कि

मैदा : ३० रु. कि

वरी ः ९२ रु. कि

रवा : ३० रु. कि.

शाबू : ६० रु. कि.

आटा : ३० रु. कि.

गोळी चहा : ३०० रु. कि.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना शिक्षकाची मारहाण;शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा

$
0
0

सातारा

सातारा जिल्हा परिषदेच्या भिलकटी (ता. फलटण) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील चार विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून काठीने अमानुष मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यात एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. संबंधित शिक्षिकाला बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दरम्यान, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. अधिकराव पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. देसाई यांनी या मुलांना झालेली मारहाण गंभीर स्वरूपाची आहे. मुलांच्या पाठीवरील काठीच्या वळावरून अहवाल तयार करण्यात येत असून, तो पोलिसांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. गणिताचा पेपर लिहिता न आल्याने विद्यार्थ्यांना काठीने मारहाण करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंवरदेशद्रोहाचा गुन्हा करा

$
0
0


सातारा :

ऑट्रॉसिटी कायदा रद्द करा, म्हणणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक प्रकारे भारतीय संविधान न मानण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंवर ऑट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करून संविधानातील कलमाला विरोध केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. रिपाई नेते दादा ओव्हाळ, श्रमिक ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, मदन खंकाळ यांच्या नेतृत्वाखाली रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून ही मागणी करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरणा-गुरेघर धरणग्रस्तांचाजलसामाधी घेण्याचा इशारा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यातील मोरगिरी येथील मोरणा गुरेघर प्रकल्पासाठी ज्यादा संपादन केलेल्या जमिनीचे सन २००७पासून सात-बाऱ्यावरील पीकपाणीप्रमाणे सहव्याज पीक, झाडांची नुकसान भरपाई व जमिनीचा मोबदला येत्या १५ ऑगस्टपूर्वी मिळाला नाही तर स्वातंत्र्यदिनी मोरणा प्रकल्पग्रस्तांसमवेत मोरणा जलाशयामध्ये जलसमाधी घेणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मोरणा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बशीर खोंदू यांनी दिला आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदनात देण्यात आले आहे.

सन १९९५पासून मोरणा-गुरेघर प्रकल्पाचे काम सुरू असून, या प्रकल्पात आठ गावांतील एकूण २६१ हेक्टर जमीन संपादन झाली आहे. सदर संपादीत झालेल्या जमिनीचा मोबदलाही शेतकऱ्यांना मिळाला आहे. सन १९९९साली सदर प्रकल्पाची घळभरणी झाली असून, या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने म्हणजे १.३६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मात्र, प्रकल्पात पूर्ण संचय पातळीच्या रोवलेल्या दगडाच्यावर किमान दहा ते बारा मीटर ज्यादा पाणीसाठा झाला असून, त्यामध्ये सहा गावच्या ज्यादा जमिनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्या आहेत. बुडलेल्या जमिनीचे वाढीव भूसंपादन प्रस्ताव तयार करून तो विशेष भूमीसंपादन अधिकारी सातारा यांच्याकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही परिणामी नुकसान भरपाईही मिळालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरंकारी मिशनचे कार्य अतुलनीय

$
0
0

कोल्हापूर : 'संत निरंकारी मिशनने महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी केलेले काम अतुलनीय आहे. मिशनमुळे भगिनींचे जीवन सुखी व समृद्ध झाले आहे', असे मत मिशनच्या हैदराबाद येथील विभागप्रमुख मोहिनी अहुजा यांनी व्यक्ते केले. मार्केट यार्ड येथील रामकृष्ण लॉनमध्ये झालेल्या नारी संत समागमामध्ये त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, 'मिशनमध्ये जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन मानवता दृढ करण्यासाठी अखंडपणे सेवा कार्य केले जाते. सतगुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी ३६ वर्षांच्या सेवेत प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सर्वांनी त्यांचे मानवकल्याणाचे काम पुढे न्यावे.'

यावेळी इशाजी, अशोक अहुजा, कऱ्याप्पा हराळे, जालिंदर जाधव, दत्तात्रय जगताप, कृष्णात उथळे, गणपतराव गाडीवडर, टी. एल. देसाई, श्रीपती जाधव, दत्ता माळी, माधुरी उगवे आदी उपस्थित होते. कोल्हापूरचे विभागप्रमुख अमरलाल निरंकारी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. गौरी शेटगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरळक पावसाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शहरात अधून मधून हजेरी लावली. दिवसभर ऊन आणि पाऊस असे वातावरण राहिले. धरणक्षेत्रातही काही प्रमाणात तुरळक पाऊस झाला. राधानगरी धरण ९२ टक्के भरले आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ९.६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात ३२ मिलिमीटर पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला. गेले दोन दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने रविवारी पुन्हा एकदा हजेरी लावली. जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी १२ फूट राहिली. इचलकरंजी येथील बंधाऱ्याची पाणी पातळी ३९. ३ इंच झाल्याने हा बंधारा पाण्याखाली गेला. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीही झपाट्याने कमी झाली आहे. जिल्ह्यातील बंधारे आणि नाल्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे.


धरणसाठा असा (टीएमसी)

राधानगरी: ८.३६

तुळशी ३.४७

वारणा ३४.३९

दुधगंगा २५. ३९

कासारी २.७७

कडवी २.५१

कुंभी २.७१

पाटगाव ३. ७१

चिकोत्रा १.५२

चित्री १. ८८

जंगमहट्टी १. २२

घटप्रभा १.५४

जांबरे ०.८२

कोदे ०. २१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिराळकरांचेबहिष्काराचे अस्त्र

$
0
0


शिराळा

शिराळा येथे साजऱ्या होणाऱ्या जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवात नागांची पूजा करण्यास व नाग पकडण्यास जोपर्यंत रीतसर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत होणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. रविवारी, सात ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबामाता मंदिरात रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिराळ्याच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.

बैठकीला गावातील सर्व नागराज मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत गावबंद, रस्ता रोको, सरकारी कामात अडथळा, अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य करण्यात येणार नसल्याचा निर्णयही बैठकीत झाला. या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख अॅड. मुकुंद जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विश्वास कदम, कॉँग्रेसचे सम्राट शिंदे, भारतीय जनता पक्षाचे संतोष गायकवाड, भारिप बहुजन पक्षाचे वसंत कांबळे, महाडीक युवा शक्तीचे केदार नलवडे, यांनी आपले पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही व शिराळा ग्रामस्थांच्या पाठीशी सर्वच पक्ष ठामपणे राहतील, अशी ग्वाही दिली.

पंधरा जणांची समिती

नागपंचमीच्या बाबत न्यायालयीन बाबीबाबत लागणारा पाठपुरावा करण्यासाठी पंधरा लोकांची समिती स्थापन करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. नागपंचमीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद प्रतिनिधींनींकडे या कमिटीने पाठपुरावा करावा असाही निर्णय झाला. बैठकीला रणजितसिंह नाईक, विश्वप्रतापसिंह नाईक, विजयराव नलवडे, महादेव कदम, शिवाजी शिंदे, लालासाहेब तांबीट, देवेंद्र पाटील, प्रताप मुळीक, संदीप पाटील, संतोष हिरुगडे, उत्तम, पृथ्वीसिंग नाईक, प्रतीक हसबनीस, मंगेश कांबळे, अॅड. नरेंद सूर्यवंशी, सत्यजित कदम आदींसह नाग मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसुरुंग स्फोटातगोकाकचा जवान शहीद

$
0
0


बेळगाव

जम्मू आणि काश्मीरच्या बटालिक सेक्‍टरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात बसवराज चन्‍नप्‍पा पाटील (वय ४४) या जवानाला वीरमरण आले. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. बसवराज पाटील मद्रास रेजिमेंट कार्यरत मध्ये होते. बसवराज गोकाक तालुक्यातील खनगावचे रहिवासी होते. त्याच्या मृत्यूमुळे खनगाववर शोककळा पसरली आहे. बसवराज २४ ऑगस्‍ट १९९०मध्‍ये भारतीय लष्‍करात दाखल झाले होते. युनिट २१ मद्रास १९२ ग्रेडमध्‍ये कार्यरत होते. त्‍यांचे पार्थिव जम्‍मू-काश्‍मीरमधून बेळगावमध्‍ये रविवारी रात्री आणण्‍यात येणार आहे. त्याच्या मूळगावी लष्करी इतमामात सोमवारी सकाळी दहा वाजता

अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक सोसायटीच्या सभेत राडा

$
0
0

वंदे मातरम् सुरू असतानाही गोंधळ; विरोधकांची समांतर सभा

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीतील शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी राडा झाला. धक्काबुक्की करीत एकमेकांना बाहेर खेचण्याचा घटना घडल्या. सभासदांचे ऐकून न घेताच स्वतःच मंजूर-मंजूर, अशी आरडाओरडा करीत सत्ताधाऱ्यांनी सभेतून पळ काढला. सभा संपल्याची घोषणा करून त्यांनी वंदे मातरम्, चा सूर आळवला. शिक्षक आणि सेवक असल्याने किमान वंदे मातरम् हे शब्द कानावर पडताच ते शांत होतील, असे वाटले होते. परंतु, काही शिक्षकांनी वंदे मातरम् सुरू असतानाही गोंधळ घातला. सभासदच नव्हे तर व्यासपीठावरील संचालकही ऐकमेकांच्या अंगावर धावून गेले.

दरम्यान, विरोधी परिवर्तन पॅनेलने त्याच ठिकाणी समांतर सभा घेत आटपाडी जागा खरेदी रद्द करा, निकष डावलून केलेल्या स्वीकृत संचालकांची निवड रद्द करणे, असे ठराव केले. शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा रविवारी डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स हॉलमध्ये झाली. संस्थेच्या अध्यक्षा सुलभा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या सभेत मानद सचिव सुभाष कदम यांनी स्वागत केले. सभासदांना आत बसण्याचे आवाहन करण्यावरूनच वादाला सुरवात झाली. अनिल मिसाळ यांनी कदम यांच्या वक्तव्यास आक्षेप घेत दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले. मागील सभेचे इतिवृत्त्तास आक्षेप घेत पेठभाग शाखेतील खर्चाबाबत केलेला ठराव चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. लेखी आणि पैसे भरूनही आपल्यास माहिती मिळाली नाही, असा आरोप दत्ता पाटील यांनी केला. याला सभासदांनी ही साथ दिली. त्यामुळे मागील सभेतील इतिवृत्तात घेण्यात आलेला ठराव रद्द करण्यात आला.

कदम यांच्याकडून ध्वनीक्षेपकाचा ताबा घेत बोलण्याचा प्रयत्न करणारे रवींद्र गवळी व तानाजी पवार हे ऐकमेकांच्या अंगावरच धावून गेले. त्यानंतर सभासदांमध्येही वाद पेटला. संजयकुमार झांबरे, या सभासदास बोलण्यापासून रोखत धक्काबुक्की करण्यात आली. लाभांशाच्या टक्केवारीवरुन सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू राहिला. अध्यक्षा पाटील यांनी १२.५ टक्के लाभांश देण्याची तयारी दाखवली मात्र, सभासद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुमच्या चैन्या (मौज-मस्ती) कमी करा, पण सभासदांना लाभांश वाढवून द्या, असा आग्रह धरला. ही मागणी मान्य झाल्याशिवाय खाली बसणार नाही, असे सांगत सभासद व्यासपीठासमोरच ठाण मांडून उभारले. त्यामुळे विरोधी परिवर्तन पॅनेलने घोषणाबाजी केली.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी सभा गुंडाळली ः सौंदत्ते

सभासद महावीर सौंदते म्हणाले, सभासद शांतपणे प्रश्न विचारत होते. मात्र, सत्ताधारी त्यापासून विषय अन्यत्र वळवत उत्तरे टाळत होते. सभासदांच्यात गोंधळ उडवून देण्याचेच काम सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक केले. स्वतःच गोंधळ निर्माण करून भ्रष्टाचार दडपण्यासाठीच सभा गुंडाळुन पळ काढला. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, सभा चालवणे यामध्ये सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे.

व्यवस्थापकांवर धावून जाण्याचा प्रकार

अध्यक्षांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याने सर्व साहित्य घेऊन निघत असताना व्यवस्थापक महेशसिंग रजपूत यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न राजेंद्र नागरगोजे यांनी केला. या वरून वातावरण चांगलेच तापले. व्यासपीठावरील टेबल व खुर्च्या विस्कटण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलेआम होतेय लूट

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

कोल्हापूर : महा ई- सेवा केंद्रात दाखला दिल्यानंतर कमीत कमी दीडशे रुपयांपासून अधिकाधिक हजारांच्या घरात सांगून लूट केली जाते. माझे कोणीही काहीही करू शकत नाही, या अविर्भावात मनमानी पद्धतीने पैसे घेतले जातात. यामुळे ई- सेवा केंद्रे लोकांच्या सोयीसाठी नसून पैसे गोळा करणारे अनअधिकृत अड्डे बनले आहेत, असा सार्वत्रिक आरोप होत आहे.

जिल्ह्याचे ठिकाण, तालुका, बाजार भरणारी निमशहरे येथे पुर्वी सेतू केंद्र होते. त्या केंद्रातही भ्रष्ट्राचाराने शि‌रकाव केला. त्यामुळे त्याच शहरात ई- सेवा केंद्र चालवण्यास जिल्हा महसूल यंत्रणेणे परवाना दिला. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाशेजारी केंद्र सुरू झाली. शहरात विविध भागात केंद्रे उघड्यात आली. केंद्राचा परवाना मिळताना सरकारने निश्चित केलेल्या दराची अट मान्य करायची, दाखलानिहाय दराचे फलकही बाहेर लावायचे. प्रत्यक्षात आम्हाला परवडत नाही, असा सूर आळवत मनमानी पद्धतीने पैसे घ्यायचे असा धंदा तेजीत आहे.

दाखला वेळत न दिल्यास पुढील कामे थांबतात. लाभ मिळत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती दाखला दिल्यानंतर मागेल तितके पैसे देतो आणि निघून जातो. हे ग्राहकांचे वर्तन केंद्रचालकांच्या पथ्यावर पडली आहे. एखाद्या ‌व्यक्तीने मागितलेल्या पैशांवर आक्षेप घेतल्यास तुम्हाला किती द्यायचे तेवढे द्या, असे किंवा 'आमचा हा दर आहे, तुला कोठे तक्रार करायची तेथे कर' असे उर्मट उत्तर मिळते. कामाची निकड असल्याने अनेकदा तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. यामुळे अनेक महिन्यांपासून केंद्र चालकांकडून लूट सुरू आहे.

केंद्र चालकांचे सुगीचे दिवस

रहिवाशी, उत्पन्न, जात, डोंगरी, नॉन क्रिमिलियर हे दाखले शाळा प्रवेश, सैन्य व पोलिस दलात भरती, सरकारी योजनांचा फायदा, शालेय शिष्यवृत्ती, निवडणुकांतील उमेदवारी अर्ज दाखल करताना या महत्त्वाच्या कारणांसाठी वारंवार दाखले लागत असतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी शैक्ष‌णिक सत्राची सुरूवात, भरती प्रक्रिया, निवडणुका हा कालावधी केंद्र चालकांना सुगीचा दिवस असतात. या वेळी लुटीला पोषक परिस्थिती असते. त्यामुळे सुगीचे दिवस कधी येतात, याचीच प्रतिक्षा केंद्र चालकांना असते.

काम काय असते ?

ई- सेवा केंद्रात दाखल्यासाठी ऑनलाइन विहित नमुण्यातील अर्ज भरून घेतले जाते. आवश्यक कागदपत्रे घेतली जातात. स्वॉप्टवेअरमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार व इतर प्राधिकृत अधिकारी पडताळणी करतात. मंजुरीनंतर डिजीटल सहीने केंद्रातूनच पुन्हा दाखला दिला जातो. अर्ज भरणे, दाखल करणे, कागदपत्रे घेणे असे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काम केंद्र चालकाच असते.

महा-ई सेवा केंद्रात सौजन्याची वागूणक दिली जात नाही. मनमानी पद्धतीने पैसे घेतले जातात‍. एकही दाखला सरकारच्या निर्धारित दराप्रमाणे मिळत नाही. तक्रार करण्यास वेळ नसल्याने ‌लूटच सुरूच राहते.

किरण पडवळ, नागरिक


शहरातील केंद्रे : जरगनगर, सानेगुरुजी वसाहत, मार्केट यार्ड, कळंबा, सदर बजार, मंगळवारपेठ, कसबा बावडा, बेलबाग, राजारामपुरी, टेंबलाईवाडी, पाचगाव, पंचगंगा रोड, गांधीनगर, गोकुळ ‌शिरगाव‍. याशिवाय तालुक्याची ठिकाणे व आठवडा बाजार भरणारी गावांत केंद्रे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवाला लुटीतील सूत्रधारास पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हवालाची तीस लाखांची रक्कम लुटल्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार कुलदीप अरुण पोवार (वय २८, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) याला तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. शाहूपुरी पोलिसांनी पोवार याला रविवारी (ता. ३१) कोर्टात हजर केले होते. पोवार याच्याकडून गुन्ह्यातील रक्कम वसूल करण्याचे काम सुरू आहे, तर दीड महिन्यांपूर्वी झालेल्या सव्वा दोन कोटींच्या लुटीच्या अनुषंगानेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

आठवड्यापूर्वी शाहूपुरी येथील स्टेशन रोडलगत एम. माधवन या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी मारहाण करून हवालाची तीस लाखांची रक्कम लुटण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील सहा आरोपींना तीन दिवसांपूर्वीच अटक केली आहे, तर शनिवारी (ता. ३०) लुटीचा सूत्रधार कुलदीप पोवार यालाही पोलिसांनी अटक केली. शाहूपुरी पोलिसांनी रविवारी पोवार याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोवार याच्याकडे लुटीतील सहा लाखांची रक्कम आहे. ही रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत, त्याच बरोबर या टोळीने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत काय? याचाही तपास सुरू आहे. दीड महिन्यांपूर्वी शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे एका कुरिअर कंपनीचे सव्वा दोन लाखांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लुटले आहेत. ती चोरी आणि शाहूपुरीतील चोरीमध्ये साम्य असल्याने पोलिस दागिने लुटीच्या चोरीच्या अनुषंगानेही पोवार टोळीची तपासणी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images