Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इचलकरंजीत भरदिवसासव्वालाखाची रोकड लंपास

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,इचलकरंजी -

येथील रिक्रीएशन हॉल सांस्कृतिक भवन आवारातील रखवालदाराचे घर फोडून चोरट्याने एक लाख १५ हजार रुपयाची रोकड लंपास केली. भरदिवसा लोकवस्तीत झालेल्या या चोरीमुळे खळबळ माजली आहे. या प्रकरणी प्रदीप आण्णासो कुंभार (वय ४०) यांनी गावभाग पोलिसात तक्रार दिली आहे.

नगरपालिका मालकीच्या रिक्रीएशन हॉल या सांस्कृतिक भवनाच्या देखरेखीसाठी प्रदीप कुंभार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक भवनच्या आवारात असलेल्या खोलीत तो राहण्यास आहे. जागा खरेदीसाठी कुंभार यांनी एक लाख पंधरा हजाराची रोकड पंधरा दिवसापूर्वी आणून घरात ठेवली होती. बुधवारी सकाळी ते कुटुंबियासमवेत कार्यक्रमानिमित्त मिरज येथे गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीस लावलेला पत्रा व गज वाकवून आत प्रवेश केला. तिजोरीचा लॉकर फोडून त्यात ठेवलेली रोकड घेऊन पोबारा केला. चोरीची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहितीगार व्यक्तीने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदीतील वस्त्रोद्योगाला सावरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मंदीच्या गर्तेत गटांगळ्या खात असलेला यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. या यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळावी यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात यंत्रमागधारकांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह कारखानदारांनी उत्स्फूर्त पाठींबा दर्शविला.

दोन वर्षांपासून वस्त्रोद्योग उद्योग मंदीत सापडला आहे. वीज दरातील अवाजवी वाढ, सूत दरातील चढ-उतार अन् कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसान सोसून व्यवसाय चालवित आहे. यंत्रमाग व्यवसायाला सरकारकडून मिळणाऱ्या सवलती कमी होत चालल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. शहरात बहुतांशी यंत्रमागधारकांनी आठवड्यातून दोन-तीन पाळ्या बंद केल्या आहेत. या गर्तेतच हत्ती चौक परिसरातील यंत्रमागधारकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे सरकारने या व्यवसायाकडे गांभिर्याने लक्ष पुरवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. त्यातूनच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगांवे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहे. पाच दिवस हे आंदोलन सुरु राहणार असून यातूनही सरकारने लक्ष न दिल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यंत्रमागधारकांच्या मागण्या ....

कर्नाटक व तामिळनाडूच्या धर्तीवर साध्या यंत्रमागासाठी प्रति युनिट एक रुपयाप्रमाणे वीज पुरवठा करावा, व्यवसायासाठी चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, व्यवसायाला पोषक असे निर्यात धोरण राबवावे, यार्न बँक सुरु करुन लहान कारखानदारांना प्रोत्साहन द्यावे, सूत साठेबाजी व गैरप्रकारास आळा घालण्यासाठी सूत दर एक महिना स्थिर ठेवावेत, सूत व्यापाऱ्यांनी दैनंदिन सूत स्टॉक ऑनलाईन जाहीर करावा, यंत्रमाग महामंडळाकडून यंत्रमागधारकाला बीम पुरवठा करावा, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी यंत्रमाग कामगाराबरोबरच ठरविली जावी, अन् त्यातील ट्रेडींगधारकांची अपप्रवृत्ती रोखावा आदी मागण्या यंत्रमागधारकांनी मांडल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता झाल्यास संकटातील यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळू शकेल. त्याचबरोबर कारखानदारांनी आपला व्यवसाय नुकसानीत न चालविता तो संयमाने चालवावे. शिवाय सूत व्यापाऱ्यांनीही कारखानदारांना वेठीस न धरता सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांनी सतत भीतीच्या छायेत का जगायचं?

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

घरात नेहमी येणारा काका, मामा, दादा यांची कधी नियत बदलेल माहित नाही. ऑफीसमधल्या एखाद्या सहकाऱ्याची ​किंवा अधिकाऱ्याची वासना चाळवेल माहित नाही. ज्यांच्याकडून ज्ञान घ्यायचे त्या शिक्षकांचीही नैतिकता अनेकदा घसरते. कामासाठी बाहेर जाताना नेहमीच्या रस्त्यावरचे कोपरे धरून बसणाऱ्या अनेक नजरा रोखून बघतात. प्रवासात पाठीमागच्या सीटवर बसलेल्यांकडून त्रास होतो. पैशांचा हव्यास असलेल्या सासरी कधी जीव जाईल याचा नेम नसतो...माणूस म्हणून महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या या प्रसंगात तिने सतत भीतीच्या छायेखाली का जगायचं? असा सवाल करत जवळपास तीनशेहून अधिक महिलांनी कोल्हापूर पोलिसांसमोर व्यथा मांडल्या.

महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाय करण्यासाठी कोल्हापूर पोलिस दलामार्फत बुधवारी महिला सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन केले होते. अलंकार हॉल येथे झालेल्या कार्यशाळेस जिल्ह्यातील पोलिस दलासह महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्थांच्या संचालिकांसह महाविद्यालयीन तरूणी सहभागी झाल्या. असुरक्षिततेची भावना दृढ करणाऱ्या कोणत्या घटना घडतात, प्रतिकार करताना कोणत्या अडचणी येतात आणि अशा कोणत्या जागा आहेत की तिथे छेडछाडीच्या घटना सातत्याने घडतात याबाबत महिला व तरूणींना यावेळी बोलते करण्यात आले. यावेळी ज्योती पाटील, आरती नांद्रेकर, वैष्णवी पाटील यांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या.

पोलिस उपअधीक्षक भारतकुमार सबनीस, पोलिस निरीक्षक वितीन सबनीस, प्रभारी पोलिस गृह उपअधीक्षक, अर्थिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील, महिला दक्षता समितीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती नांद्रेकर, सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील आदींच्या उपस्थितीत कार्यशाळेला प्रारंभ झाला.

भारतकुमार राणे म्हणाले, सतत असुरक्षितेतच्या भावनेमुळे महिलांवरील मानसिक ताण वाढत आहे. घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत आणि नातेवाईकांपासून ते अनोळखी व्यक्तीपर्यंत, जिथे जिथे महिलांचा संपर्क येतो तिथे त्यांना छेडछाड, कौटुंबिक अत्याचार, अश्लील टोमणे अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठेही जाताना महिलांच्या मनावर असुरक्षिततेचे दडपण असते. समाजस्वास्थ्यासाठी ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अशा घटना होणार नाहीत यासाठी पोलिस दल सक्षम राहणार आहेच, पण घटना घडल्याच तर महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे विश्वासार्ह वातावरण तयार करण्यासाठीही पोलिसदलाची टीम कार्यरत राहणार आहे.'

न्यायाधीश चंद्रशीला पाटील म्हणाल्या, अत्याचार हे बाहेर होतात असे नाही तर घरातही अनेक महिला भीतीने जगत असतात. सुरक्षितता ही घरापासूनच मिळायला हवी. आजही हुंडाबळीसारख्या घटना घडतात. नवविवाहित महिला आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक अत्याचार हे कारण असते. तर मुलगा होत नाही म्हणून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिला आयुष्य संपवतात. हे थांबायला हवे. महिलांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती घेतली पाहिजे. तर तरूणींनी स्वातंत्र आणि स्वैराचार यातील सूक्ष्म फरक ओळखून वागले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना सुरक्षितता धोक्यात येणार नाही याचे भान बाळगणे ही नव्या काळातील तरूणींची जबाबदारी आहे.

आरती नांद्रेकर म्हणाल्या, 'कौटुंबिक अत्याचार आणि समाजात घडणाऱ्या छेडछाडीच्या घटना अशा दोन ठिकाणी महिला अधिक असुरक्षित आहेत. त्यामुळे पोलिसदलाकडून या घटना रोखण्यासाठी आणि जरब बसवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.​ महिलांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बोलावे, तक्रारीसाठी पुढे यावे म्हणून व्यासपीठ तयार केले जाणार आहे. त्यातून छेडछाड आणि अत्याचारासारख्या गुन्ह्यांना आळा बसेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडाबळीची प्रथाबंद करण्याचा निर्णय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

येथील संजयनगर येथील मरगुबाई मंदिरात ४० वर्षांपासूनची रेडाबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. संजयनगर पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, यात्रा समिती आणि प्राणीमित्र संघटनांची बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. पहाटेच्या सुमारास रेडा बळी दिला जायचा.

दरम्यान, 'अंनिस'ने पुढकार घेतल्याने जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे यात्रेत सुरू असलेली रेडाबळीची प्रथाही बंद करण्याचा निर्णय झाला. 'अंनिस', प्राणिमित्र आणि ग्रामस्थ व पोलिस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. काही दिवसांपूर्वी जत तालुक्यातील हळ्ळी येथील रेडाबळीची प्रथा बंद झाली होती. आता गोंधळेवाडीची प्रथाही बंद झाली आहे.

अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, १९९३मध्ये सांगलीतील नवीन वसाहतीसह तासगाव तालुक्यातील काही गावांतील प्राणीबळीची प्रथा बंद करण्यात यश आले आहे. आरेवाडी यात्रेतील हजारो बोकडांची कत्तल प्रबोधनामुळे कमी प्रमाणात आली आहे. उघड्यावर प्राण्यांची कत्तल करता येत नाही. नियमावलानुसार अधिकृत कत्तलखान्यात कापण्यायोग्य प्राणी आणावा लागतो. त्याची पशुवैद्यकीय अधिकारी चाचणी करतात. या नियमावलीचा भंग केल्यास दंड आणि साडेचार वर्षांपर्यंत शिक्षेची कायद्यात तरतूद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात जागोजागी टपरीराज

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

कोल्हापूर : शहरात केबीन सुरू करण्यासाठी परवाना लागतो. ऑफिस प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता लागते. इस्टेट विभागाकडून भाडेशुल्क आकारणी करावी लागते. मात्र या कुठल्याच प्रक्रियेची परवानगी न घेता केवळ सदस्य ठरावाच्या बळावर शहरात केबीनधारकांची दुकानदारी सुरू आहे. नगरसेवकांचा वरदहस्त आणि प्रशासनाची डोळेझाक यामुळे शहरात अनधिकृत केबीनधारकांची संख्या ८०० पर्यंत पोहचली आहे. काहीजणांकडे स्थायी समिती सभेतील सदस्य ठरावाची प्रत असून त्याआधारे ही मंडळी बिनधिक्कतणे केबिन व्यवसाय करत आहेत.

एकीकडे फेरीवाला झोनची अंमलबजावणी रखडली आहे तर दुसरीकडे शहरात बेकायदेशीर केबीन वाढत आहेत. इस्टेट विभागाकडील नोंदीनुसार ३५० केबीन या अ​धिकृत आहेत. सहा महिन्यांपूर्वी इस्टेट विभाग आ​णि अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरातील केबिनचा सर्व्हे केला होता. अनधिकृत केबीनधारकांच्या विरोधातील मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही. कारवाई सुरू झाली की लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप ठरलेला असतो. लोकप्रतिनिधींकडून टाकला जाणारा दबाव आणि अधिकाऱ्यांची सोयीची भूमिका यामुळे बेकायदेशीर केबीनविरोधातील कारवाई थंडावली आहे. मात्र अनधिकृत केबीन थाटण्याची प्रक्रिया बिनधिक्कत सुरू आहे.

सदस्य ठराव म्हणजे मान्यता नव्हे

काही नगरसेवक नातेवाईक, मर्जीतील कार्यकर्त्यांना बेकायदेशीर केबीन थाटण्यास पाठबळ देत असल्याचे चित्र आहे. केबीन थाटण्यासाठी स्थायी समिती सभेची मंजुरी, ऑफीस प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता, त्यानंतर इस्टेट विभागाकडून भाडेशुल्क आकारणी अशी प्र​क्रिया असते. मात्र स्थायी समिती सभेतील सदस्य ठरावाला मान्यता मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण न करता अनेक ठिकाणी अन‌धिकृत केबीन थाटल्या आहेत. परवाना म्हणून स्थायी समिती सभेतील सदस्य ठरावाचा प्रत केबीनमध्ये लावल्या आहेत.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, महावीर गार्डन, आरटीओ ऑफीस परिसर, राजारामपुरी, पर्ल हॉटेल समोर, लक्ष्मीपुरी, दसरा चौक अशा ठिकाणी असा प्रकार दिसतो. मंगळवार पेठ, हुतात्मा गार्डन परिसरात चार केबीन्स सदस्य ठरावाच्या आधारे सुरू झाल्या आहेत. महापालिकेचे अधिकारी, अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांनी या अनधिकृत केबीनधारकावर कारवाईचा बडगा उगारायला सुरूवात करताच संबंधित केबीनधारकाकडून सदस्य ठरावाचा दाखला दिला जात आहे.

महापालिकेला आ​र्थिक फटका

महापालिकेने रेडीरेकनरप्रमाणे केबीनधारकांना भाडेशुल्क आकारणी सुरू केली आहे. जादा दर देणाऱ्या व्यावसायिकाना केबीन दिल्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. फुलेवाडी फायर स्टेशन येथील एका व्यावसायिकाला पूर्वी ५०२ रुपये भाडे होते रेडीरेकनरप्रमाणे व लिलाव पद्धतीने भाडेशुल्क आकारणी केल्याने ५१,५५५ रुपयापर्यंत निविदा पोहचली. आयसोलेशन हॉस्पिटल येथे ४५०० रुपये, आरटीओ ऑफिससमोर पाच हजार रुपये, फुलेवाडी येथे आठ हजार भाडेशुल्क लागू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली. संबंधित ​केबीनधारकाला दहा वर्षे भाडे लागू करण्यात आले. मात्र काही केबीनधारकांनी सदस्य ठरावाचा आधार घेत परस्पर दुकानदारी सुरू केल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसत आहे. शहरात अनधिकृत केबीनची संख्या ८०० पर्यत पोहचली आहे. इस्टेट विभागाकडून भाडे आकारणी झाली नाही. महापालिकेची जागा, पाणी पुरवठा अशा विविध सुविधा घेऊनही त्यांच्याकडून परवाना फी, भाडेशुल्क भरले जात नाही. अनेक केबीन चौकालगत, रस्त्याच्याकडेला असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.

स्थायी समिती सदस्य ठराव झाल्यानंतर संबंधित केबीन भाड्याने देण्यासंदर्भात ऑफीस प्रस्ताव तयार केला जातो. विविध विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतरच केबीन परवाना दिला जातो. सर्वसाधारण सभेत त्याच्यावर मान्यतेची मोहोर उमटते. मात्र विनापरवाना केबीन सुरू करणे चुकीचे आहे. महापालिका नियमानुसार अनधिकृत केबीनविरोधात कारवाई केली जाईल.

प्रमोद बराले, इस्टेट विभाग अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढीला स्वार्थी राजकारणाचा खोडा

$
0
0

Gurubal.Mal @ timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्यात आला असताना, कोल्हापूरच्याच नेत्यांनी पुन्हा त्याला खो घातला. शहराच्या विकासापेक्षा स्वतःचे राजकारण महत्वाचे मानणाऱ्या नेत्यामुळेच मुख्यमंत्र्यांना हद्दवाढीची अधिसूचना स्थगित करावी लागली. हद्दवाढीला आडवे पडणाऱ्या नेत्यांचे चेहरे बदलले, पण भूमिका तीच राहिल्यानेच विकासाला मर्यादा येणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शहरात राहुनही शहराच्या विकासाला विरोध करण्याची मानसिकता असणाऱ्या आमदारांमुळेच हद्दवाढ लांबली.

कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हाच सर्व राजकीय नेत्यांचा अजेंढा असायला हवा. त्यांच्या भाषणातून तरी तो असल्याचा जाणवतो. पण त्यातील अनेकांच्या कृतीतून मात्र शहराच्या विकासापेक्षा त्यांना त्यांचे राजकारण महत्वाचे वाटत असल्याचे स्पष्ट होते. शहराची हद्दवाढ होत असताना त्याला स्थगिती देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. त्यामागे विकासाचे नव्हे तर स्वार्थाचे राजकारण आडवे आले. यामध्ये कुणी छुपी तर कोणी उघडपणे विरोधासाठी आपली ताकद उभी केली. आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, माजी आमदार संपतराव पवार यांसह अनेक नेत्यांचा हद्दवाढीला उघडपणे विरोध आहे. त्यांच्या विरोधामुळेच हद्दवाढीत सतत अडथळा येत आहे. जोपर्यंत जनतेपेक्षा या नेत्यांची मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत हद्दवाढीत अडथळे कायम येतील.

कोणत्याही शहराचा चौफेर विकास व्हायचा असेल तर त्या शहराचा भौगोलिक वाढ होणे आवश्यक आहे. पण भौगोलिक वाढ करण्यापेक्षा प्रिमीयम भरा आणि बांधकामे करा असे म्हणावे लागत आहे. आहे त्या शहरातच आहे गर्दी वाढवली जात आहे. राज्यातील अनेक शहरांनी आपल्या विकासासाठी हद्दवाढ करून घेतली. पण ही अक्कल कोल्हापूरच्या नेत्यांनी नसल्याने ते सतत विरोध करत आहेत. ज्या शहरांची हद्दवाढ झाली, त्यांचा विकास झाल्याचे आपल्याला दिसते. त्यामध्ये राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली अशा अनेक शहरांचा समावेश आहे. या शहरातील नेत्यांनी आपली ताकद हद्दवाढीसाठी वापरली, याउलट येथील नेते मात्र आपली ताकद हद्दवाढ होऊ नये यासाठी वापरत आहेत.

राजकीय ताकद आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतेही गोष्ट साध्य होते. पण कोल्हापूरच्या नेत्यांची इच्छाशक्ती तर कमी पडतेच. अनेक नेत्यांना स्वतःचे राजकारण महत्वाचे वाटत असल्याने इथल्या हद्दवाढीचा प्रश्न धुळखात पडत आहे. आता हद्दवाढ करण्याची चांगली संधी होती. राज्य सरकारच्या समितीने, जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिला होता. त्यामुळे कागदोपत्री सरकारकडे सक्षम पुरावा असताना सरकारने धाडस दाखवणे आवश्यक होते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणे भाजपनेही राजकीय स्वार्थच महत्वाचे मानला आणि हातातोंडाशी आलेला हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा लांबणीवर पडला.

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरची आणि माजी मंत्री अजित पवार यांनी पुण्याची हद्दवाढ करून घेतली. इतर काही नेत्यांनीही आपापल्या शहराची हद्दवाढ करून घेतली. येथे मात्र नेत्यांनी ग्रामीण ​जनतेला हद्दवाढ होणे गरजेचे आहे हे पटवून न देता आपल्या मतावर डोळा ठेऊनच राजकारण करत आहेत. मुळात कोल्हापुरात एकमुखी, खमके नेतृत्व नाही. प्रत्येक नेता आपल्याच मतदार संघापुरताच विचार करतो. मी कसा आमदार होईन, माझ्या पक्षाला कसे यश मिळेल यावरच नेत्यांनी लक्ष दिल्याने हा प्रश्न भिजत पडला आहे. प्रथम काँग्रेसच्या नेत्यांनी नंतर राष्ट्रवादी आणि आता सेनेच्या नेत्यांनी या प्रश्नाला खो घातल्याने शहराचा विकास खुंटला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमुळेच...

जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर असल्याने चंद्रदीप नरके, अमल महाडिक आणि मिणचेकर यांनी हद्दवाढीला प्रखरपणे विरोध केला. ज्या विधानसभा मतदार संघात हे तिघे आमदार आहेत, तेथील जनतेचा हद्दवाढीला विरोध आहे. यामुळे हद्दवाढ झाली तर त्याचा फटका काही प्रमाणात या तिघांना बसण्याची शक्यता आहे. पहिला दणका जिल्हा परिषद आणि नंतर विधानसभेला फटका बसणार असल्यानेच त्यांनी हद्दवाढ होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाड प्रकरणी २ साक्षीदारांचे जबाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीची सुनावणी हायकोर्टाने ११ ऑगस्टपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणी १२ ऑगस्टला होईल असे आदेश दिले. दरम्यान, बुधवारी (ता. २७) जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन साक्षीदारांचे लेखी जबाब नोंदवले आहेत. जबाबाची प्रत जिल्हा व सत्र न्यायालयाकडे सोपवली आहे असे सांगण्यात आले. जबाबाच्या प्रती वादी आणि प्रतिवादींना देण्याच्या सूचना कोर्टाने बुधवारी दिल्या.

पोलिसांच्या अटकेतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्यावरील आरोप निश्चितीला मुंबई उच्च न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. अपूर्ण तपास, गुन्ह्यातील गोळी आणि पुंगळ्यांचा स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडील अहवाल अशा मुद्यांवर हायकोर्टाने सुनावणीला स्थगिती दिली आहे. जिल्हा न्यायाधीश बिले यांच्यासमोरील सुनावणीवेळी हायकोर्टाच्या स्थगितीमुळे सुनावणी १२ ऑगस्टला घेण्याचा आदेश कोर्टाने दिला.

दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन साक्षीदारांचे लेखी जबाब नोंदवले आहेत. शैलेंद्र दिगंबर मोरे या साक्षीदाराचा १४ जुलैला तर सीबीआयला महत्त्वाची माहिती देणारे संजय अरुण साडविलकर यांचा जबाब १५ जुलैला नोंदवण्यात आला. लेखी जबाब बंद लखोट्यातून न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे सोपवण्यात आला. न्यायाधीश बिले यांनी या जबाबाची प्रत वादी आणि प्रतिवादींना देण्याच्या सूचना दिल्या. नव्याने सादर साक्षींबात कोर्टाने सरकारी वकिलांना विचारणा केली. जुन्या आरोपपत्रातील साक्षी ग्राह्य मानायच्या, की पुरवणी आरोपपत्राच्या साक्षी ? अशी विचारणा केल्यानंतर सरकारी वकील अॅड. चंद्रकांत बुधले यांनी जुन्याच आरोपपत्रात साक्षी गृहीत धराव्यात अशी विनंती केली.

संशयित समीर याला कोर्टाच्या आदेशानुसार कारागृहात दुपारी १२ ते ३ या वेळेत फिरण्याची मोकळीक दिली होती. प्रभारी कारागृह अधीक्षकांनी मात्र यावर निर्बंध घातल्याने समीरने अधीक्षकांकडे तोंडी तक्रार केली आहे. समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी याबाबत बुधवारी कोर्टात लेखी विनंती केली. कारागृह प्रशासनाकडून कोर्टाच्या सूचनांचा अवमान होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोर्टाने यावर तातडीने कारागृह प्रसासनाला नोटीस दिली.

संशयाला बळकटी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांमागे एकाच विचाराचे लोक असल्याची शंका तपास यंत्रणांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने साक्षीदार संजय साडविलकर यांचा जबाब घेतला आहे. पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही साडविकर यांचा जबाब नोंदविला गेला आहे. त्यामुळे या दोन्ही हत्यांमागे समान धागा असल्याच्या संशयाला बळकटी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमार शिंदे यांनी नाकारले सोलापूर पालिकेचे मानपत्र

$
0
0

सोलापूर : अमृतमहोत्सवानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने प्रस्तावित सत्कार आणि मानपत्र स्वीकारण्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला आहे. अमृत महोत्सव समितीच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील यांचा एकमेव सत्कार स्वीकारणार असल्याचे शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले. या सत्कारावरून मोठा वाद सुरू आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ४ सप्टेंबरला येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर शिंदे यांचा नागरी सत्कार करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते; परंतु त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यास भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने विरोध केला.
या वादाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. शिंदे म्हणाले, सार्वजनिकरीत्या वाढदिवस साजरा करण्याच्या मी विरोधातच आहे. आजवर माझा वाढदिवस मी कुटुंबासमवेतच छोटेखानी पद्धतीने साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी मुंबईत कार्यक्रम घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र, मीच त्याला नकार देत सोलापुरात कार्यक्रम घेण्यास सांगितले होते. त्यानुसार कार्यक्रम घेण्याचे गेल्या वर्षीच ठरले होते. मात्र, खर्चाला फाटा देत मोठ्या मनाने मी महापालिकेचे मानपत्र व सत्कार ४ सप्टेंबरला स्वीकारणार नाही.
यापूर्वी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आंध्र प्रदेशचा राज्यपाल झाल्यानंतर सोलापूर महापालिकेने मला मानपत्र दिले आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा मानपत्र स्वीकारण्यात काय अर्थ आहे, असा प्रतिप्रश्नही शिंदे यांनी केला.
शिंदे यांच्या वाढदिवसाचा मोठा सोहळा करण्यास माजी आमदार नरसय्या आडम यांनी विरोध केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, 'आडमांना आरोप करण्याची सवयच आहे. शहरात ३० हजार घरकुले उभारणीला मी विरोध केल्याचा आरोप चुकीचा आहे. मी गरिबांना मदतच करतो. यापूर्वी त्यांच्या घरकुलांना पाणी आणि सरकारकडून कर्ज मी मिळवून दिले आहे. आम्ही दोघेही गरीब परिस्थितीतून पुढे आलो आहोत. त्यांचे मी कौतुकच करतो.'



वाढदिवसाचा कार्यक्रम काही लाख रुपयांतच होऊ शकतो. त्यासाठी दीड कोटी रुपये लागतातच कशाला? मी अशा खर्चाच्या विरोधातच आहे.

सुशीलकुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डोळ्यांत मिरचीपूड टाकून ११ लाख लांबवले

$
0
0

कराड : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ (ता. कराड) चोरट्यांनी बोलेरो कारच्या ड्रायव्हरसह कामगाराच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून साडेअकरा लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी गाडीही पळवून नेली. ती कासेगावनजीक बेवारस स्थितीत पोलिसांना मिळाली.
जगदीश जेठाराम बिश्नोई (३१, रा. टिंबर मार्केटनजीक, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जगदीश बिश्नोई हे पुण्यातील कोंढवा येथील प्रकाश घाशी यांच्याकडील गाडीवर ड्रायव्हर आहेत. निपाणी येथील व्यापाऱ्यांशी त्यांचे नियमित आर्थिक व्यवहार होतात. घाशी यांच्याकडून मंगळवारी रात्री पिकअप बोलेरो गाडीतून (एमएच १२ एलटी ५९५५) साडे अकरा लाख रुपये घेऊन जगदीश व त्याचा मित्र राजेश चौधरी निपाणीला निघाले होते. वाठारजवळ जगदीशने लघुशंकेसाठी जीप थांबविली. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून काळे जॅकेट घातलेले तिघे जण तेथे आले. त्यांनी जगदीश आणि त्यांनी राजेशच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. राजेशला जीपमधून बाहेर ओढून दोघा चोरट्यांनी जीप घेऊन पोबारा केला तर एक जण दुचाकीवरून तेथून निघून गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

आई-वडील शेतात कामावर गेलेले असताना घरात एकट्याच असलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर गावातीलच एका ४५ वर्षांच्या व्यक्तीनं बलात्कार केल्याची संतापजनक घटना सातारा जिल्ह्यातील कोरगाव तालुक्यातील तडवळे-संमत वाघोली या गावात घडली. पीडित मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडित मुलीचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले होते. ती घरात एकटी होती. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती आरोपी संतोष भोईटे हा घरात आला. त्यानं त्या मुलीला फरफटत घराच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. आई-वडील कामावरून परतल्यावर त्यांनी मुलीची स्थिती बघून तिची विचारपूस केली. तेव्हा मुलीनं सगळी घटना सांगितली. मग गावकऱ्यांच्या मदतीनं मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडं तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून संतोष भोईटे याला अटक केली.

अत्याचारग्रस्त मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होतं असल्याचं समजतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंबळीत चेनस्नॅचरला बेदम चोप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल-बिद्री मार्गावर केंबळी येथील गावालगतच्या शेतात काम करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सर व कर्णफुले असा सुमारे पन्नास हजाराचा ऐवज घेवून एक चोरटा पळून गेला. मात्र ग्रामस्थांनी त्याचा साथीदार शकील बाबासो मुल्ला याला पकडून बेदम चोप देवून कागल पोलिसांच्या ताब्यात केले.

केंबळी (ता.कागल) येथे आनंदी तुकाराम पाटील (वय ६०) या गुरूवारी सकाळी ११ वाजता गावाशेजारील रस्त्यालगतच्या शेतात भात भांगलत होत्या. याचवेळी मोटारसायकलवरून अलेल्या दोघा सराईत चोरट्यांनी रस्त्यावरच आपली मोटारसायकल सुरू स्थितीत ठेवून रस्त्यापासून पंचवीस-तीस फूट अंतरावर असणाऱ्या शेतात भांगलत असणाऱ्या आनंदी पाटील यांच्या गळ्याला दुधारी धारदार अडकीत्ता लावून गळ्यातील मंगळसूत्र, सर व कानातील सोन्याची फुले हिसकावून घेतली. चोरटे पळून जात असतानाच या महिलेने आरडाओरड केल्यामुळे शेजारील शेतातील शेतकरी, मजूर व रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी मोटरसायकलस्वार शकील बाबासो मुल्ला (रा.आपटेनगर, कोल्हापूर) या चोरट्याला पकडले आणि त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्याचा दुसरा साथीदार सुमारे पन्नास हजाराचे दागिने घेवून शेजारच्या उसाच्या शेतात पळून गेल्याने पाठलाग करूनही तो सापडा नाही. चोरट्यांशी झटापटीत वृध्द महिला जखमी झाली आहे. कागल पोलिसांनी मोटारसायकल व चोरट्याला ताब्यात घेतले.

चौकट

भीतीचे वातावरण

ग्रामीण भागात सध्या समाधानकारक पावसामुळे शेतीकामाची धांदल उडाली असून चोरीच्या या घटनेमुळे शेतीकाम करणाऱ्या महिला व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर शेताकडे जाताना किंमती दागिने घालून महिलांनीही जावू नये, अशीही चर्चा घटनास्थळी सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपात उद्यापासून काम बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लागावी, दैनंदिन कामकाजाचे अपडेटस कळावेत यासाठी आयुक्त पी. शिवशंकर यांनी कामकाजात तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे. कार्यालयीन वेळेची नोंद होण्यासाठी कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक मशिनद्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक केले आहे. मात्र बायोमेट्रिक मशिनमधील हजेरीवरून महापालिका कर्मचारी संघात असंतोष आहे. प्रशासन हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत महापालिका कर्मचारी संघाने शनिवारपासून (ता.३०) काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापौर व आयुक्तांनाही आंदोलनाची माहिती दिली आहे.

प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्याची बायामेट्रिक मशीनद्वारे हजेरी नोंदणी बंधनकारक केले आहे. जे कर्मचारी बायामेट्रिकद्वारे हजेरी नोंदविणार नाहीत त्यांचा जुलै महिन्याचा पगार करू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाला आहेत. बायामेट्रिक म​शीनवरील हजेरीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पडत आहे. काही जण सकाळी हजेरी नोंदवून सोयीप्रमाणे महापालिकेत ये जा करतात. दुसरीकडे कार्यालयीन वेळेनुसार कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षाही जादा वेळ काम करत असतात. सकाळी कामावर येण्यास उशिरा झाला तर पगारात कपात होते. मात्र जादा वेळ काम करूनही दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. बायोमेट्रिकमधील त्रुटीवरून कर्मचाऱ्यांत असंतोष आहे.


बायामेट्रिक मशिनमधील त्रुटी दूर कराव्यात. वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना स्पॉट बिलींगचे (वर्ग तीन) सोपविलेले काम चुकीचे आहे. त्यामध्ये सुधारणा करावी. वेगवेगळ्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची पद्धत बरोबर नाही. याबद्दल कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. महापालिकेतील प्रशासकीय अधिकारीच कार्यालयीन वेळेनुसार कामकाज करत नाहीत.

रमेश देसाई, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी संघ


कार्यालयीन कामकाजाला शिस्त लागावी यासाठीच बायोमेट्रिक मशिनद्वारे हजेरी बंधनकारक केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याचे व कामाची जबाबदारी निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी शुक्रवारी चर्चा करणार आहे. जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.

आयुक्त पी. शिवशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक बंदला बेळगावात प्रतिसाद

$
0
0


बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाचे सात टीएमसी पाणी मलप्रभा नदीत वळविण्याची कर्नाटक सरकारची याचिका महादेई जल लवादाने फेटाळल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी आवाहन केलेल्या बंदला बेळगाव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. धारवाड, हुबळी, नरगुंद भागात बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुरुवारच्या कर्नाटक बंदला धारवाड, हुबळी आणि नरगुंद भागात हिंसक वळण लागले. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कार्यालयांना लक्ष्य करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. धारवाड येथील आकाशवाणी केंद्राच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली तर नवलगुंद येथे आंदोलक शेतकऱ्यांनी बीएसएनएलचे कार्यालय जाळले. बेळगाव जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांनी तसेच कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करून शहर आणि बाहेरील बससेवा गोंधळ घालून बंद पाडली. बस स्थानकात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बसचालक आणि वाहक यांच्यावर दमदाटी करून बस डेपोमध्ये घ्यायला लावून त्यांना शिवीगाळही केली.
कित्तूर चन्नमा चौकातदेखील आंदोलकांनी रस्त्यावर झोपून वाहतूक काही काळ अडवली. यावेळी कन्नड संघटनेच्या उद्दाम कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला पण पोलिसानी त्यांच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष न देता उद्दाम कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील काही भागात फिरून दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केली पण शहरातील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालय, चन्नम्मा चौक, शहर बस स्थानक आदी ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून, बैलगाडी आडवी लावून, काटे पसरून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्यातील शाळा, कॉलेजांना जिल्हा प्रशासनाने सुटी जाहीर केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांसह शंभर आंदोलकांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने मनाई आदेशाचा भंग करीत शहरात विनापरवानगी रॅली काढल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह शंभर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आंदोलकांनी रॅलीदरम्यान २५ रिक्षांची तोडफोड केली, तर एका एसटीसह दुकानावर दगडफेक करण्यात आली.

शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना रखडल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीने गुरूवारी (ता. २८) शहर बंदची हाक दिली होती. सकाळी अकराच्या सुमारास महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र जमले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आला होता. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी विनापरवानगी जमाव एकत्रित करणे, भाषणे करणे आणि वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महापौर रामाणे, उपमहापौर मुल्ला, हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, नियाज खान, शेखर कुसाळे, अजिंक्य चव्हाण, वृशाली कदम यांच्यासह राजेश लाटकर, आदिल फरास, बाबा पार्टे, महेश जाधव आदी शंभर आंदोलकांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. यावेळी लक्ष्मीपुरी, राजारामपुरी येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादही झाला.

आंदोलकांनी रॅलीदरम्यान शहरात २५ रिक्षांची तोडफोड केली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका एसटीवर दगडफेक केली. तर राजारामपुरीच्या बाराव्या गल्लीत एका बेकरीवरही दगडफेक झाली. चार रिक्षा चालकांनी जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तोडफोडीत रिक्षांचे सुमारे २५ हजारांहून अधिक नुकसान झाले. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यातही चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

रिक्षाचालकांच्या मदतीसाठी वकिलांचा हात

बंद दरम्यान १५ रिक्षांची तोडफोड झाली. हातावरचे पोट असलेल्या रिक्षाचालकांना बंदचा आणि तोडफोडीचाही मोठा फटका बसला. विनाकारण नुकसान झाल्याने संबंधित रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करीत नुकसानग्रस्त रिक्षाचालकांना मदतीचा हात दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वपक्षीय रॅलीने शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरची हद्दवाढ तातडीने करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालयांसह व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोल्हापूर महापालिका आणि केएमटी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बंददरम्यान काढलेल्या रॅलीवेळी काही ठिकाणी आंदोलकांची रिक्षाचालक आणि दुकानदारांशी बाचाबाची झाली. आंदोलकांनी तीन रिक्षा आणि एका एसटी बसच्या काचा फोडल्या. दोन हॉटेल्स आणि एका दुकानाची आंदोलकांनी मोडतोड केली. एका दुकानावर दगडफेक करताना आंदोलकाला ताब्यात घेताना राजारामपुरीत आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाल्याने तणाव वाढला. हद्दवाढीचा निर्णय लवकर न घेतल्यास सर्व नगरसेवक आपापल्या पक्षाच्या गटनेत्याकडे राजीनामा देतील, असा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांच्या नेतृत्वाखालील हद्दवाढ कृती समितीने दिला. दरम्यान, मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी रात्री उशीरा महापौर-उपमहापौरांसह शंभर जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेला स्थगिती दिल्याने बुधवारी शहरात संतापाची लाट उसळली. बुधवारी रात्रीच सर्वपक्षीय शहर हद्दवाढ कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार शांत होते. विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेने बंद पाळल्याने सकाळच्या सत्रातील सर्व इंग्रजी शाळा बंद होत्या. महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. पायाभूत चाचणी परीक्षाही पुढे ढकलून मराठी माध्यमांच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

सकाळी नऊ वाजल्यापासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते शिवाजी चौकात जमू लागले. त्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर समर्थक मोटारसायकल रॅलीसह आले. यावेळी महापौर अश्विनी रामाने, उपमहापौर शमा मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, बाबा पार्टे, कॉ. सतीश कांबळे, दिलीप देसाई उपस्थित होते. दरम्यान शिवसेना शहर कार्यालयापासून नगरसेवक नियाज खान, ऋतुराज क्षीरसागर, चेतन शिंदे, रमेश खाडे, पद्माकर कापसे, अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर बंदचे आवाहन करण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

रॅलीदरम्यान रिक्षा, दुकानाची मोडतोड

या सर्वपक्षीय रॅलीत भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, महेश जाधव, काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी, माजी नगरसेवक महेश जाधव, दुर्वास कदम, लाला गायकवाड सहभागी झाले. रॅली शिवाजी चौकातून माळकर तिकटी, हत्तीमहल रोडमार्गे बिंदू चौकात आली. यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आंदोलकांनी अडवून प्रवासी उतरवण्यात आले. हवा सोडण्यात आली. महापौर अश्विनी रामाणे यांनी स्वतः प्रवासी उतरवले. बिंदू चौकातील माधुरी बेकरीजवळ दोन रिक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. कॉमर्स कॉलेजमार्गे राजारामपुरीकडे रॅली जाताना पार्वती टॉकीजजवळील एम. के. गांधी मार्केट व बागल चौकात दोन रिक्षा फोडण्यात आल्या. शहाजी लॉ कॉलेजजवळ इलेक्ट्रॉनिक्स दुकानाची काच फोडण्यात आली.

बसवर दगडफेक

मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कोल्हापूर इचलकरंजी एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. रिक्षा स्टॉपवरील सर्व रिक्षांना प्रवासी भरण्यास मज्जाव करण्यात आला. खाद्यपदार्थांच्या गाड्याही बंद करण्यात आल्या. सीबीएस परिसरातून राजारामपुरी मुख्य मार्गावर आवाहन करत रॅली माऊली चौकात आली.

पोलिस-कार्यकर्त्यांत बाचाबाची

राजारामपुरीत बेकरी व स्नॅक सेंटरवर शिवसेना कार्यकर्त्याने दगडफेक केल्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख, शहर वाहतूक शाखेचे अशोक धुमाळ यांनी प्रतिबंध करत त्याला ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांनी कार्यकर्त्याला मोटारीत बसवण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिस निरीक्षक देशमुख व आर. के. पोवार, बाबा पार्टे, राजू लाटकर यांच्यात खडाजंगी उडाली. कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले. पोलिस व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की झाली. आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेतल्यानंतर पोलिसांचा नाईलाज झाला.

यावेळी निरीक्षक देशमुख यांनी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

वाहनांतील हवा सोडली

राजारामपुरीतून रॅली परिख पुलावरून न्यू शाहूपुरीतून ताराबाई पार्कात आली. तेथे सुरू असलेल्या कॅफेमध्ये आंदोलक घुसले. रॅली जाईल त्या मार्गावर दुकाने पटापट बंद होत होती. रिक्षा व सहा आसनी आणि वडाप वाहने रोखून चाकातील हवा सोडण्यात आली. शिवाजी चौक, महाद्वार रोडवरील दुकाने बंद करत आंदोलकांनी रॅलीने लक्ष्मी टॉकीज, रंकाळा वेस बस स्टँड परिसरातील वडापची वाहने सक्तीने बंद करण्यात आली.

विरोधकांच्या नावाने शंखध्वनी‌

शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार अमल महाडिक यांनी हद्दवाढीला विरोध केल्याने त्यांच्या नावाने आंदोलकांनी शिवाजी चौकात शंखध्वनी केला. त्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. तीनही आमदारांचा कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी निषेध केला तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांचे अभिनंदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, शहर पोलिस अधीक्षक भारतकुमार राणे यांचाही निषेध करण्यात आला.

केएमटी कर्मचारी उतरले रस्त्यावर

केएमटी कर्मचाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. सर्व बसेस बंद ठेवल्या होत्या. परिवहन सभापती लाला भोसले, सदस्य प्रवीण केसरकर, नियाज खान, शेखर कुसाळे, विजय खाडे, शोभा कवाळे, उमा बनछोडे, चंद्रकांत सूर्यवंशी, केएमटी कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक, इर्शाद नायकवडी, प्रमोद पाटील, राजेंद्र तिवले, नीलेश डोईफोडे यांच्यासह कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले. शिवाजी चौकातून निघालेल्या मोटारसायकल रॅलीतही कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंत्रमागधारकांचा आज रास्ता रोको

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, इचलकरंजी-

आर्थिक संकटात सापडलेल्या वस्त्रोद्योगाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला दुसऱ्या दिवशी शहर व परिसरातून उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. दरम्यान, शुक्रवारी आंदोलन तीव्र करत प्रांत कार्यालय चौकात सकाळी ११ वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहे.

दोन वर्षापासून वस्त्रोद्योग मंदीच्या गर्तेत अडकत चालला आहे. त्यामुळे या उद्योगाशी निगडीत सर्वच व्यवसायावरही संकट आले आहे. वीज दरात सातत्याने होणारी वाढ, सूत दरातील चढ-उतार, कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमागधारक नुकसानीत व्यवसाय करत आहे. त्यातच यंत्रमाग व्यवसायाला सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीत घट होत चालल्याने यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. या उद्योगाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, गणेश शहाणे, सचिन भुते व फारुक शिरगांवे यांनी बुधवारपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरु केले. वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळावी यासाठी कर्नाटक व तामिळनाडूच्या धर्तीवर साध्या यंत्रमागासाठी प्रति युनिट एक रुपयाप्रमाणे वीज पुरवठा करावा, व्यवसायासाठी चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, व्यवसायाला पोषक असे निर्यात धोरण राबवावे, यार्न बँक सुरु करुन लहान कारखानदारांना प्रोत्साहन द्यावे, सूत साठेबाजी व गैरप्रकारास आळा घालण्यासाठी सूत दर एक महिना स्थिर ठेवावेत, सूत व्यापाऱ्यांनी दैनंदिन सूत स्टॉक ऑनलाईन जाहीर करावा, यंत्रमाग महामंडळाकडून यंत्रमागधारकाला बीम पुरवठा करावा, खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची मजुरी यंत्रमाग कामगाराबरोबरच ठरविली जावी आणि त्यातील ट्रेडींगधारकांची अपप्रवृत्ती रोखावा आदी मागण्या यंत्रमागधारकांनी मांडल्या आहेत.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कारखानदारांसह मान्यवरांनी भेटी देऊन आपला पाठींबा दर्शविला. त्यामध्ये माजी खासदार जयवंतराव आवळे, शहर विकास आघाडीचे अजितमामा जाधव, नगरसेवक प्रमोद पाटील, यंत्रमागधारक संघटनांचे अध्यक्ष सतिश कोष्टी, विनय महाजन, दीपक राशिनकर, सचिन हुक्किरे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष शहाजी भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय भोसले, सुरेश गडगे, पै. अमृत भोसले यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पसार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तंबाखू खाण्याच्या बहाण्याने राजारामपुरी परिसरात एकास दोघांनी धमकावून लुबाडले. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारातील संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी तत्परता दाखवत ताब्यात घेतले, मात्र संशयितास पोलिस ठाण्यात घेऊन जाताना त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.

फिर्यादी सुहास शामराव पाटील (वय ४४ मूळ, रा. गडहिंग्लज, सध्या रा. राजारामपुरी) हे एका वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करतात. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास ते काम आटोपून घरी परतत होते. राजरामपुरी येथील जनता बजारजवळ त्यांना दोघा अज्ञातांनी थांबवून तंबाखूची मागणी केली. पाटील यांनी तंबाखू नसल्याचे सांगताच त्या दोघांनी पाटील यांना मारहाण सुरू केली. त्यांच्याकडील ३०० रुपये आणि मोबाइल जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले. यानंतर पाटील यांनी याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री अडीचच्या सुमारास तक्रार दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पाटील यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राजारामपुरी येथे शोध घेत असता, मातंग वसाहतीमध्ये एक चोरटा दिसून आला. त्याला पकडून पोलिस ठाण्याकडे नेताना काही अंतर गेल्यानंतर चोरट्याने पोलिसांच्या तावडीतून पलायन केले. पोलिसांनी पुन्हा काही वेळाने पोलिस ठाण्यातून पाच ते सहा कॉन्स्टेबलना बोलवून घेऊन परिसरात चोरट्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. लूटमार करणारे दोन्ही संशयित गुरूवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सापडले नव्हते. पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पळाल्याने याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोयने’त वाघांची जोडी येणार

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) राखीव जंगलातील वाघांची नर-मादीची जोडी कोयना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पट्ट्यात सात वाघ असून, वाघांची जोडी जोडल्यावर वाघांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात मेळघाट, ताडोबा, अंधारी पेंच हे तीन व्याघ्र प्रकल्प आहेत. २००७ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय अभयारण्य असा साडेसातशे चौरस किलोमीटरचा परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास राखीव ठेवला आहे. या प्रकल्पाला राधानगरी व तिलारी जंगलाचा भाग जोडल्यास हा परिसर 'टायगर कॅरिडॉर' म्हणून ओळखला जाईल. नुकत्याच झालेल्या प्राणिगणना मोहिमेत 'टायगर कॅरिडॉर'मध्ये सात वाघांचे पुरावे मिळाले असले तरी नर व मादी यांच्या संख्येबाबत स्पष्टता झालेली नाही. चांदोली, कोयनेत चार, तिलारीत दोन तर राधानगरी परिसरात एका वाघाचे अस्तित्व आढळले आहे. पूर्वी वाघांच्या पायांच्या ठशांवरून वाघांची गणना केली जात होती; पण जंगलात कॅमेरा ट्रॅप बसविल्यामुळे प्राणिगणनेत अचूकता येत आहे. कॅमेऱ्यात ट्रॅप झालेला वाघ किती वेळा दिसला, त्याच्यात साम्य आहे का, याचीही पाहणी केली जाते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यासाठी ब्रह्म्पुरी येथील दोन तरुण वाघांची (नर-मादी) कोयना अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गेले वर्षभर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नियोजन केले जात आहे. प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तळी तयार केली आहेत. सागरेश्वर येथून सांबर, चितळ, हरीण हे प्राणी सोडण्यात आले आहेत. या प्राण्यांचे प्रजनन वाढल्याने वाघांना शिकार मिळू शकते यावर वनखात्याचे एकमत झाले आहे. नागपूर येथील राष्ट्रीय वाघ संवर्धन प्रकल्पाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व महानिरीक्षक देवव्रत स्वाइन यांनी ​नुकतीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असून, ब्रह्मपुरीतील वाघांची जोडी कोयनेत सोडण्यास त्यांना संमती दिली आहे. ही जोडी सोडल्यावर प्रजनन होऊन वाघांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वाघांची जोडी सोडण्यासाठी कोयना अभयारण्यात तळी तयार केली आहेत. वाघांचे भक्ष्य असलेले हरीण, सांबर व चितळ हे प्राणी जंगलात सोडण्यात आले असून, त्यांची संख्या वाढत आहेत. या सर्व प्रक्रियेवर आमचे लक्ष असून, त्यानंतर वाघांची जोडी सोडण्यात येईल.

क्लेमेंट बेन, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा सांगावमध्ये मुस्लिम कुटुंब वाळीत

$
0
0

कागल

कसबा सांगाव (ता.कागल ) येथे मुस्लिम समाजाच्या जातपंचायतीकडून इब्राहिम अब्बास मुल्ला यांच्या कुटुंबास वाळीत टाकण्यात आले आहे. समाज बहिष्कृत करुन मानसिक व शारिरीक त्रास दिल्याची तक्रार कुटुंबियांनी कागल पोलिस स्टेशन, तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. २२ फुटाच्या रस्त्यावर केवळ आपल्यालाच घर बांधकामाचे अतिक्रमण केले म्हणून त्रास दिल्याचे मुल्ला कुटुंबाचे म्हणणे आहे तर अतिक्रमण काढताना ट्रस्टींना मुल्ला कुटुंबियांनी अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे जात पंचायतीचे म्हणणे आहे. यातूनच हे २० जणांचे कुटुंब गेल्या आठ महिन्यांपासून एकाकी आणि तणावाचे जीवन जगत आहे.

कसबा सांगावमध्ये मुस्लिम समाजाची ४०० घरे आणि दान हजार लोकसंख्या आहे. 'सुन्नत जमातुल्ल मुस्लेमिन' या जात पंचायतीमार्फत समाजाचे कामकाज चालते. मुल्ला कुटुंबियांनी वर्षभरापूर्वी घराचे बांधकाम काढले. त्याचे अतिक्रमण होते आहे, म्हणून समजातीलच काहीजणांनी ग्रामपंचायतीत तक्रार केली. त्यानुसार मुल्ला यांनी आपले बांधकाम तीन लाख रुपये सोसून काढून घेतले. हे अतिक्रमण काढताना बाचाबाची झाली. त्यानंतर समाजाने बैठक बोलावून ट्रस्टींना शिवीगाळ केली आणि मंडळाच्या कामात बाधा आणली असे सांगत मुल्ला यांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार वीस हजार दंड भरावा आणि जाहीर माफी मागावी असे सांगतानाच आपल्याला समाजातून बहिष्कृत का करु नये अशी विचारणा केली आहे.

चार ऑगष्ट २०१५ पासून या कुटुंबाशी समाजातील कुणीही बोलत नाही. बोलणाऱ्याला दमदाटी केली जाते. कुठल्याही समारंभाचे आमंत्रण दिले जात नाही. लग्न केल्यास रजिस्टर देणार नाही, रस्ता बंद करणार तसेच लहान मुलांनाही तुम्हाला समाजातून काढले आहे असे सांगितले जात असून मुल्ला कुटुंबियांच्या मोबाइलवर घाणेरड्या शब्दात मेसेज येत आहेत. अशा बाबी केल्याने घरातील महिलांना तीन चार महिने पाहुण्यांच्यात ठेवण्याची वेळ आल्याचे कुटुंबियांनी सांगितले. कागल पोलिसांनी दोन वेळा हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्हीकडील 'इगो' मुळे यश आले नाही. चार - पाच कुटुंबिय मुल्ला कुटुंबियांशी त्यातूनही बोलतात आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांनाही दमदाटीमुळे तसेच चालढकलीमुळे यश आलेले नाही.

कोट

' केवळ आमच्या घराचे बांधकाम झाल्यावर अतिक्रमणाच्या नावाखाली आम्हाला समाजाकडूनच त्रास होत आहे.आमच्या बाजूने कुणी जबाब द्यायलाही येत नाही.आम्ही प्रचंड मानसिक तणावाखाली आहोत. जातपंचायतीच्या या नियमावलीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही.

इब्राहिम मुल्ला ,कुटुंब प्रमुख

-----------------------------------------------------------

कोट

'रस्ता २२ फुटांचा असून सुरवातीला तो १५ फुटांचा होता. तो सर्वांसकट २२ फुटाचा ग्रामपंचायतीमार्फतच होणे आवश्यक आहे. परंतु चुकीच्या पध्दतीने मुल्ला कुटुंबियांवर अन्याय झाला आहे. ट्रस्टी आणि मुल्ला कुटुंबियांनी दोन्ही बाजूने सामंजस्याने हा वाद मिटवणे गरजेचे आहे.

आयुब सनदी, मुल्ला कुटुंबियांचे शेजारी

-----------------------------------------------------------

कोट

' समाजाची जागा मोजून घेत असताना आणि खासगी मोजणी करताना मुल्ला कुटुंबियांनी अर्वाच्च शिवीगाळ ट्रस्टींना केली आहे, त्यामुळे त्याबाबत माफी मागावी. तसेच मोजणी आणि इतर खर्चाची नुकसानभरपाई द्यावी .पत्रात चुकून दंड असे झाले आहे. समाजाने बैठक बोलावून निर्णय घेतला असला तरी मुल्ला कुटुंबियांना वाळीत टाकलेले नाही किंवा त्यांच्याशी बोलणाऱ्यांना धमकावलेही नाही. समाजविरोधी वर्तनाबद्दल केवळ समज दिली आहे.'

इनायत मुल्ला ,उपाध्यक्ष, सुन्नत जमातुल्ल मुस्लेमिन, कसबा सांगाव

चौकट

माघार कुणी घ्यायची ?

या गल्लीत २२ फुटांचा मूळचा रस्ता आहे. सुरवातीला १५ फूट आणि मुल्ला कुटुंबियांच्या घराजवळ आणखी कमी फुटाचा होतो. सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना मुस्लिम समाजाने खासगी मोजणी आणून आपली जागा नक्की केली आणि मुल्ला कुटुंबियांना केलेले बांधकाम पाडायला लावले. त्यातून बाचाबाची झाली. चूक कुणाची आणि माघार कुणी घ्यायची यातच घोडे अडले असून दोन्ही बाजूने 'इगो' वाढतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पावसाचाजोर मंदावला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. धरण परिसरातील पाटण तालुक्यासह शेजारील कराड व जावली, महाबळेश्वर तालुक्यांतही पावसाने दांडी मारल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून सध्या केवळ आकाशात ढगाळ वातावरण असून काळ्या-पांढऱ्या ढगांनी संपूर्ण आकाश व्यापून टाकले आहे. मात्र, एखाद दुसरी सर बरसली तर बरसली अन्यथा आले ढग निघून जात आहेत.

कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिनाही पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो, या महिन्यात मोठ्या पावसाने हजेरी लावली तर धरण लिलया भरून जाईल, असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयनानगर येथे ७६, नवजा ५४, महाबळेश्वर २७, मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोयना धरणात ५ हजार ५५७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणात एकूण ५७.३५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी २११५ फूट ०७ इंच व ६४४.८३० मीटर इतकी उंची झाली आहे. गतवर्षी याच दिवशी कोयना धरणात ६३.८८ टीएमसी इतका पाणीसाठा होता.

सांगलीत रिमझिम पाऊस

सांगली :

ऐन पावसाळ्यात कडक उन्हाळ्याचा अनुभव देणाऱ्या वातावरणात शुक्रवारी बदल झाला. दुपारपर्यंत संततधार पावसाने सांगली आणि परिसरात हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी रात्रीच्या सुमारास कायम दुष्काळी जत तालुक्याला पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला. अवघ्या दोन तासांत १८ मिलीमीटर पाऊस झाला. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील सर्वाधिक टँकर याच तालुक्यात असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.

पावसाने दीर्घकाळ केवळ विश्रांतीच घेतली नाही तर सलग चार दिवस उन्हाचे चटकेही सहन करायले लावले. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाळी वातावरण असून, गुरुवारी रात्री उशीरा रिमझीम पावसाने हजेरी लावली. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जतमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच काही ठिकाणच्या नाल्यांतून तर काही भागातील ओढ्यांतून पावसाचे पाणी वाहताना दिसले. जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ, तासगाव , खानापूर, विटा या भागातही काहीसा पाऊस झाला आहे.

अलमट्टी धरण भरले

सांगली

कृष्णेसह वारणा व पंचगंगा या उपनद्यांतून गेल्या दोन महिन्यांत कर्नाटकात तब्बल १३५ टीएमसी पाणी वाहून गेले आहे. त्याचा परिणाम म्हणून अलमट्टी धरण तुडूंब भरले आहे. हे पाणी म्हैसाळ सिंचन योजनेतून उचलून जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्वभागासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात टाकावे, अशी मागणी होत आहे. टेंभू योजनेतून आटपाडी, खानापूर तालुक्यांना पाणी द्यावे, या मागणीनेही जोर धरला आहे. या मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला आहे.

दर वर्षी कृष्णेतून सरासरी २५० टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून जाते. या वर्षी जुलै महिन्यात जोराचा पाऊस झाला. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. तीनही नद्या दुथडी भरून वाहिल्या. त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरण शंभर टक्के भरले आहे.

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत या प्रश्नावार आवाज उठविला. या तिन्ही नद्यांचे कर्नाटकात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागातील तलाव भरून घेण्यासाठी का वापरले नाही, असा प्रश्न त्यांनी केला. म्हैसाळ, ताकारी, टेंभू योजना कार्यान्वित करा, तलाव भरून घ्या, जेणे करून दुष्काळी भागातील जनतेला दिलासा मिळेल. उन्हाळ्यात पाणीवाटप करताना प्रशासनावर ताण येणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images