Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उत्पन्न दाखल्याअभावी लाभार्थी गोत्यात

$
0
0

कागल

कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या २०१५ -१६ या वर्षात तब्बल १० हजार १०८ ने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु वार्षिक उत्पन्न २१ हजाराच्या आतील दाखला तलाठी देत आहेत, पण तहसीलदार मंजूर करीत नसल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात सरकारकडून कोणालाही २१ हजारच्या आतील दाखला देवू नये अशा प्रकारच्या लेखी अथवा तोंडी सूचना नाहीत. परंतु चुकीचा दाखला अथवा बोगस लाभार्थी झाल्यास आता थेट गुन्हा दाखल होणार असल्याने अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी हात वर केले आहेत. सर्कल चौकशी करून असा २१ हजाराच्या आतील दाखला देणे शक्य असतानाही कुणीच दखल घेत नसल्याने खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे.

२०१३- २०१४ सालापर्यंत जिल्ह्यात एकूण ५९ हजार २४७ लाभार्थी होते. २०१४-१५ ला ती संख्या ७९ हजार ६७२ झाली तर २०१५-१६ ला ८९ हजार ७८१ झाली. म्हणजेच आतापर्यंत ३० हजार ५३४ लाभार्थी जिल्ह्यात वाढल्याचे स्पष्ट झाले. सर्वात जास्त करवीर मध्ये ६ हजार ९७२ तर कागलमध्ये ६ हजार ९०४ आणि शिरोळ मध्ये ४ हजार ५०२ लाभार्थी वाढले. एकीकडे २१ हजाराच्या आतील उत्पन्नाचा दाखला मिळत नसताना एवढे लाभार्थी नवीन सरकारच्या काळात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत जुन्या समितीकडून नव्या समितीवर आरोपही होत आहेत. शिवाय जिल्ह्यात अजूनही पाच ठिकाणी संजय गांधीच्या समित्याच गठीत झालेल्या नाहीत. याठिकाणी तहसीलदारच सगळे निर्णय घेत आहेत.

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी राजकीय द्वेषातून गरिबांच्या पेन्शन बंद केल्याचा आरोप करीत याबाबतची तक्रार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे केली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या फेर चौकशीचे आदेश सरकारी अधिकाऱ्यांनी तब्बल दोन वेळा धुडकावत पुन्हा चौकशी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. लाभार्थ्यांच्या चौकशीच्या आलेल्या आदेशाला सरकारी अधिकाऱ्यांनी आम्ही चौकशी केली आहे आणि ती बरोबर आहे. पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे मंत्री बडोले यांच्या पत्राला उत्तर देताना सांगितले होते .त्यामुळे आमदार मुश्रीफ यांनी पुन्हा आपले म्हणणे पटवून देत या चौकशीची गरज स्पष्ट केली. परंतु त्यांच्या मागणीला कुणीही दाद दिली नसल्याचेच स्पष्ट झाले.

जिल्ह्यात निराधार योजनेतील १४ हजार १०० लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले आहेत. यापूर्वी १७ हजार ६०७ लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले होते. त्याची फेरसुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर त्या अपात्र लाभार्थ्यांसह १८५१५ जणांची सुनावणी घेण्यात आली. त्यातील केवळ ४४१५ लाभार्थी पात्र ठरले. जिल्ह्यात निराधार योजनेत अनेक बोगस लाभार्थी असल्याच्या तक्रारी होत होत्या. त्यावर जिल्हा प्रशासाने तपासणी करत १७ हजार ६०७ लाभार्थी अपात्र ठरवले होते. यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी मोर्चे काढले, राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये या अपात्र लाभार्थ्यांची फेरसुनावणी झाली. त्यात १४ हजार १०० लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांचे अनुदान बंद करण्यात आले.

चौकट

सर्वाधिक लाभार्थी कागलमध्ये

अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांत कोल्हापूर दक्षिणमधील सर्वाधिक ३४२२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. करवीरमधील २९६२, कागलमधील २३३० तर भुदरगडमधील २४७७ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अन्य तालुक्यात तुलनेने कमी लाभार्थी अपात्र ठरले. जिल्ह्यात सध्या अन्य सर्व निराधार योजनेत सर्वाधिक लाभार्थी कागल तालुक्यात आहेत. या तालुक्यात १४ हजार ११४ लाभार्थी आहेत. यामध्ये श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात सर्वाधिक श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी कागलमध्ये असून त्यांची संख्या १० हजार १९६ इतकी आहे.

कोट

'२१ हजार ५०० रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला देवू नये याबाबत कोणत्याही लेखी अथवा तोंडी सूचना सरकारकडून आलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हीही कसल्याच सूचना कुणाला दिल्या नाहीत. हा निर्णय संबंधित तहसीलदारांचा असून त्यांना शंका वाटल्यास ते सर्कल चौकशी दाखला देवू शकतात. त्यातूनही नाही मिळाल्यास आमच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी. कुठल्याही गरजूवर अन्याय होणार नाही.

किरण कुलकर्णी ,उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीतील बेदाणा मार्केट मार्गी लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली

बेदाणा उत्पादकांपासून ते मार्केटमधील व्यवहारापर्यंतच्या अनेक प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सांगली मार्केट कमिटीत बैठक झाली. पावसाळी अधिवेशनानंतर पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून शासनस्तरावर व्यापक स्वरूपात बैठक घेऊन बेदाणा मार्केटचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय या प्राथमिक बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सांगली, तासगाव मार्केट कमिटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बेदाणा व्यापारी असोसिएशन आदींनी एकत्रित येऊन गुरुवारी सांगली मार्केट कमिटीत घेतलेल्या बैठकीला सभापती संतोष पाटील, उपसभापती जीवन पाटील, तासगावचे सभापती अविनाश पाटील, स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे, कमिटीचे सचीव प्रकाश पाटील, हुल्ल्याळकर, सोलापूर मार्केट कमिटीचे विभाग प्रमुख संजय खाडे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
सांगली, तासगाव, विजापूर आणि पिंपळगाव या ठिकाणी बेदाण्याच्या मोठ्या व्यापार पेठा असून तेथील पदाधिकारी, व्यापारी, बेदाणा उत्पादक यांच्याशीही सविस्तर चर्चा करण्यातची आवश्यकता असल्याचे मत पुढे आले. बेदाण्याचा दर निश्चित झाला पाहिजे. सौद्याच्या वेळी होणाऱ्या उधळणीची तूट ५०० ग्रॅमपेक्षा अधिक धरू नये. जादा तूट धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, किंवा त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानीचे महेश खराडे यांनी यावेळी केली.

त्याचबरोबर बेदाणा नियमन मुक्त असल्याने त्याची खरेदी विक्री मार्केट कमिट्यांच्या बाहेरही होऊ शकते. अशा व्यवहारातील अर्थिक देवघेवीची जबाबदारी निश्चित करणे अवघड असल्याने शेतकऱ्यांनी मार्केट कमिट्यांच्या आवारातच नोंदणीकृत व्यापाऱ्यांशी व्यवहार करावेत, असे आवाहन सांगली आणि तासगाव मार्केट कमिट्यांच्या सभापतींनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी तालुक्यांत किरकोळ पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली


सांगलीच्या पश्चिम भागात दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवसाची विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात दखलपात्र हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंच्या चोवीस तासातील नोंदीनुसार आटपाडी -२९.३, कवठेमहांकाळ १८.५ आणि जत मध्ये १७ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

सांगली आणि परिसरात बुधवारी रात्रभर पावसाची रिपरिप होती, परंतु त्यामध्ये जोर नव्हता. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर अगदीच कमी झाला आहे. परंतु दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात मात्र उशिरा का असेना बरा पाऊस झाला आहे. मध्यंतरी जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढून नद्यांना पूर आला. ओढे दुथडी वाहू लागले. नाले, बांध भरले. जत तालुक्याचा पूर्व भाग मात्र अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत चौकांची अतिक्रमणमुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सांगली

सांगली महापालिकेने नकाशाप्रमाणे चौकांचा विस्तार नजरेत येण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडली आहे. गुरुवारी राम मंदिर चौकातील तीन खोकी हटविण्यात आली. फुटपाथावरील अतिक्रमणांवरही जेसीबी चालविण्यात आला. खोकीधारकांनी केलेला विरोध झुगारून देत सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, परमेश्वर हालकुडे यांनी दिवसभर मोहीम राबविली.

स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील चौक सुशोभीकरण करण्याबरोबरच चौकाचा पन्नास मीटर पर्यंतचा परिसर पार्किंगमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त रवीद्र खेबुडकर यांनी घेतला आहे. बुधवारी संस्थांबरोबर चर्चा केल्यानंतर तत्काळ चौकाचौकांतील अतिक्रमणांवर हातोडा पडायला सुरुवात झाली आहे. राम मंदिर चौकातील गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेली अतिक्रमणे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. तत्कालीन नगरपालिकेचा पदाधिकारी असल्याचा आधार घेत मोठ्या इमारतींच्या समोर असलेले मोठे शेड जपून ठेवणाऱ्या एका महाशयाचे शेड उद्ध्वस्त करून प्रशासनाने त्याला धक्का दिला. तीन खोकी, रसवंती गृह आणि त्या परिसरातला पेव्हर ब्लॉकने झाकलेला भाग रिकामा करण्यात आला. एक चौक रिकामा केल्यानंतर दुसऱ्या चौकात ही मोहीम पोहोचणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडमधील ३८ चौक अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावात पिण्याच्या पाण्यात किडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बेळगाव

शास्त्रीनगरात भागात गुरुवारी नळाच्या पाण्यात किडे सापडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या निमित्ताने सरकारी यंत्रणएचा गैरकारभार चव्हाट्यावर आला.

शास्त्री नगर क्रॉस नंबर ३ परिसरातील नळानां मोठे लाल किडे मिश्रित पाणी आल्याने घबराट पसरली. पाणी भरताना लाल रंगाचे एक इंचाहून अधिक लांबीचे किडे पाण्यात आढळून आले. पाणी भरणाऱ्या महिलांनी आजूबाजूच्या घरातील नळाच्या पाण्याची पाहणी केली. त्यावेळी घरांममध्ये पाण्यात लाल रंगाचे किडे आढळून आले.

पाण्यात किडे आढळल्यावर जागरूक नागरिकांनी उपमहापौरांकडे तक्रार दिली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला, पण आयुक्तांचा मोबाइल बंद होता. शास्त्रीनगरमधील वकील महेश बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते राजू मरवे यांनी नागरिकांना घेऊन पाणी पुरवठा महामंडळाचे कार्यालय गाठले. नंतर संतप्त नागरिकांनी पाण्यातील लाल रंगाचे किडे पाणी पुरवठा महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रसन्नमूर्ती यांना दाखवून निवेदनही दिले. प्रसन्नमूर्ती यांनी त्याची दखल घेऊन त्वरित पाहणी करून समस्येचे निराकरण करण्याचा आदेश त्या भागातील कर्मचाऱ्यांना दिला. प्रसन्नमूर्ती यांनी घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केल्याने सरकारी यंत्रणेच्या गैरकारभाराचे दर्शन घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गो. मा. पवार यांनासोलापूर विद्यापीठाचाजीवन गौरव

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक प्रा. गो. मा. पवार यांना जाहीर झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाच्या बाराव्या वर्धापनदिनी एक ऑगस्ट रोजी पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी दिली.

२५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. २०१५पासून सोलापूर विद्यापीठाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. प्रा. पवार मूळचे सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह एकूण बारा पुरस्कार मिळाले आहेत.

निष्ठेचे फळ मिळाले

'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवन व कार्य आणि त्यांचा सर्वांगीन अभ्यास देशात, परदेशात जाऊन केला. त्यांनी भारतभर केलेले मौलिक कार्य उजेडात आणले. आपली कार्यनिष्ठा हिच महत्वाची मानून अध्यापनाचे व संशोधनाचे कार्य निरपेक्ष वृत्तीने केले. विनोद विषयक नवा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. हे काम निष्ठेने केल्याचे फळ म्हणून आपणास हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला,' अशा शब्दात प्रा. डॉ. गो. मा. पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यपीठ सेवक संघाचे आंदोलन मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरुवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याने १८ जुलैपासून विद्यापीठ सेवक संघाच्यावतीने सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. सेवक संघाची व्यवस्थापन समितीच्या बैठकीत १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर द्वारसभा घेऊन याबाबतची माहिती देण्यात आली.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी विद्यापीठ सेवक संघाने निषेधात्मक आंदोलन सुरू केले होते. सोमवारपासून कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजामध्ये सहभाग घेत प्रशासनाचा निषेध केला होता. याबाबतची गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठावरील मागण्यांचा त्वरित निर्णय घेण्याचा प्रयत्न असल्याचे अश्वासन दिले होते. चर्चा समाधानकारक झाली असली, तरी सेवक संघाने आंदोलनाची दिशा शुक्रवारी ठरवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्यानुसार दुपारी सेवक संघाच्या कार्यालयात व्यवस्थापन समितीची बैठक झाली. समितीमध्ये आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या द्वारसभेमध्ये अध्यक्ष बाबा सावंत व चिटणीस विशांत भोसले यांनी सेवक संघाची भूमिका विषद केली. यापूर्वी विविध कुलगुरूंच्या कार्यकाळात सातवेळा चर्चा झाली आहे. त्यावर अद्याप कोणताही कार्यवाही झालेली नाही, कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याबरोबरच प्रथमच चर्चा झाली असून प्रशासकीय स्तरावरील प्रश्न सात दिवसांत सोडविण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी विष्णू खाडे, सुरेश पाटील, अनिल साळोखे, अजय आयरेकर, मिलिंद भोसले, अतुल एतावडेकर, महेश सणगर, विश्वनाथ वरुटे, शशिकांत साळुंखे, वियन पाटील, शरद तळेकर, सुनीता यादव, देवयानी यादव, वर्षा माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ प्रदेशाध्यक्षपदी पाटील?

$
0
0


Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. राज्यात हा पक्ष सत्तेत असल्याने प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी संघटनेतच स्पर्धा लागली असताना बाहेरील काही नेत्यांनीदेखील या पदासाठी फिल्डींग लावली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. आवाडे, आवळे गटाला धक्का देण्यासाठी संघटनेने हा डाव खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय प्रा प्रकाश कोपळे, सतीश काकडे हे देखील या पदाच्या शर्यतीत आहेत.

खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दराच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढवली. यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर याबरोबरच विदर्भ आणि मराठवाडा भागात देखील संघटनेचा दबदबा आहे. हातकणगले लोकसभा मतदारसंघ वगळता संघटनेच्या स्वताच्या जिवावर कुठेही विजयापर्यंत पोहचत नसली तरी विजयाचा गुलाल मात्र रोखण्याची ताकद काही विधानसभा, जिल्हा परिषद मतदार संघात नक्की आहे. यामुळेच भाजपने या संघटनेबरोबर युती केली. ही युती करताना एक महामंडळ आणि राज्यमंत्र‌िपद बहाल केले आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे सध्या राज्य मंत्र‌िमंडळात कृषी व पणन राज्यमंत्री आहेत. रविकांत तुपकर यांच्याकडे वस्त्रोद्योग महामंडळ आहे. याशिवाय काही बाजार समितीवर सरकारी सदस्य म्हणून संघटनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष खोत मंत्री झाल्याने त्यांच्याऐवजी आता हे पद दुसऱ्याला देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत हा बदल करण्यात येणार असल्याने या पदासाठी संघटनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. शेट्टी आणि खोत यांच्यानंतर संघटनेत तिसरा मोठा नेता नाही. यामुळे हे पद कुणाच्या गळ्यात घालणार याची सध्या उत्सुकता आहे. संघटनेच्या स्थापनेपासून काम करणारे अनेकजण या पदासाठी इच्छूक आहेत. त्यामध्ये प्रा. जालिंदर पाटील, प्रकाश कोपळे (नांदेड) सतीश काकडे (बारामती​) दशरथ सावंत, राजेंद्र गड्ड्यान्नवर यांचा समावेश आहे. सावंत हे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचे वय या पदासाठी आडवे येण्याची शक्यता आहे. प्रा. पाटील हे सध्या कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे तातडीने प्रदेशाध्यक्ष देण्यात अडचणी असल्याचे समजते. यामुळे कोपळे आणि काकडे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

या पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी.सी. पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. पाटील हे काँग्रेसमध्ये असले तरी पक्षाने अलिकडच्या काळात त्यांना कुठेच संधी न दिल्याने ते नाराज आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. पण तशी संधी मिळाली नाही. पाटील हे जयवंतराव आवळे व आवाडे गटाचे असले तरी त्यांचे व शेट्टी यांचे संबंध चांगले आहेत. ते संघटनेत आले तर शेट्टीना ताकद मिळणार असल्याने त्यांच्या प्रवेशासाठी काही महिने प्रयत्न सुरू आहेत. आवळे व आवाडे गटाला धक्का देण्यासाठी पाटील यांचा या पदासाठी अधिक विचार होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सध्या संघटनेत जोरदारपणे सुरू आहेत. संघटनेत येताच थेट प्रदेशाध्यक्षपद देण्यात काही अडचणी आल्यास संघटनेत दुसरे मोठे पद देऊन नंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबतही सध्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांना तातडीने संघटनेत घेण्यात येणार असल्याचे समजते.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्वांची मते विचारात घेऊन प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. संघटनेची ताकद वाढण्यासाठी काही नवीन व्यक्ती येत असतील तर त्यांचे स्वागतच करू.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण काढताना तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नाल्यावरील अनधिकृत बांधकामामुळे नागरी वस्तीत पुराचे पाणी ​​शिरल्यानंतर चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. नाल्यावरील बांधकाम, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या चहाच्या टपऱ्या, हातगाड्या हटविण्यात आल्या. कसबा बावडा येथील ठोंबरे गल्ली येथील अतिक्रमण हटविताना नागरिकांनी विरोध केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. बेकायदेशीररित्या बांधलेला म्हशीचा गोठा पाडताना भाडळकर कुटुंबांतील एका सदस्याने पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. हातात विळा घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा देत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. आत्महत्येची भीती घालत कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने महापलिकेला मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली. पोलिस व महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेताना झटापट उडाली. या झटापटीत दोघे कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाडळकर कुटुंबांतील सदस्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कसबा बावडा येथील ठोंबरे गल्लीत ज्ञानदेव भाडळकर व एकनाथ भाडळकर यांनी दत्तात्रय माळी यांच्या भूखंडामध्ये विना परवाना बांधकाम केले आहे. माळी यांच्या प्लॉटमध्ये जनावरांसाठी शेड बांधले आहे. भाडळकर यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार दाखल झाली होती. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाने भाडळकर यांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी मोहीम राबवली. पोलिस बंदोबस्त घेऊन कर्मचारी अतिक्रमण हटविण्यास गेले असता भाडळकर यांनी कारवाईला विरोध केला. विळा घेऊन सामोरे येत 'अतिक्रमण हटवण्याचा प्रकार केल्यास आत्महत्या करीन,' असा इशारा दिला. पोलिसांशी हुज्जत घातली. विळा घेऊन मोहिमेला विरोध केल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना कारवाई अर्ध्यावर थांबवाली लागली. भाडळकर यांच्याशी महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांची झटापट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. कुटुंबांतील अन्य सदस्यांनी वाद घालण्यास सुरुवात केल्याने परिसरात पुन्हा तणाव निर्माण झाला.

दरम्यान शुक्रवारी सकाळी कावळा नाका ते राजगौरव मंगल कार्यालय परिसरातील हातगाडी हटविण्यात आले. लिशा हॉटेल समोरील १०० फुटी रोडलगतच्या नाल्यावर काही मिळकतधारकांनी अनधिकृतपणे बांधकाम केले होते. त्यांच्याविरोधातही तक्रारी होत्या. मिळकतधारक रत्नापगोळ, कांबळे व चोपडे यांनी चॅनेलवर स्लॅब टाकून कंपाऊंडची बांधणी केली. शुक्रवारी बेकायदेशीर बांधकाम काढून टाकले. उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, महादेव फुलारी, सुरेश पाटील, मीरा नगिमे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंब्यातील जैवविविधता पुन्हा बहरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाळ्यात पाणीसाठ्याअभावी कोरडा पडलेल्या कळंबा तलावातील जैव विविधताही संपुष्टात आली होती. पाण्याअभावी मासे, शिंपले, व पानवनस्पती नष्ट झाल्या होत्या. यंदा जोरदार पावसामुळे कळंबा तलाव पुन्हा भरला असून तलावात जैव विविधतेचे पुनर्जीवन करण्याचे महापालिकेच्या बैठकीत ठरले. कळंबा तलावात विविध प्रकारचे मासे, कासव, खेकडे, शंख, शिंपले सोडण्याचे ठरले आहे. मस्त्यबीज विभागाशी पत्रव्यवहार करून विविध प्रकारचे मासे तलावात सोडण्याचे निश्चित झाले. मासे सोडल्यानंतर एक वर्ष मासेमारीसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या जैवविविधता समितीची पहिलीच बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत महापौर रामाणे यांनी तलावातील वाहून जाणारे पाणी थांबविण्यासाठी बंधाऱ्यात फळ्या घालण्याचे आदेश दिले. गेले दोन दिवस फळ्या काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी जैविक विविधता कायद्याप्रमाणे शहरातील जैव विविधता समृद्ध करण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्याचे आदेश दिले. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी परताळा व रंकाळा तलावातील मासेमारीच्या न काढलेल्या जाळ्यांचा विषय उपस्थित केला. पाऊस थांबल्याने तलावातील पाणी अडविण्याची सूचना केली. सत्यजित कदम यांनी मस्त्यबीजसह मासेमारीचा ठेका देण्याचा विचार करावा, अशी सूचना मांडली. ​

भारतीय जनता पक्षाचे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी शहरातील इतर तलावांच्या स्थितीकडे लक्ष वेधले. सर्वच तलावांची निगा राखणे महापालिकेची जबाबदारी आहे. इतर तलावांचा विकास आराखडा तयार करावे, असे मत मांडले. सूरमंजिरी लाटकर यांनी विविध जातीच्या पक्षांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी जैव विविधतेचे महत्त्व पटवून दिले. शहरातील जैव विविधता करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होऊ शकतो हे निदर्शनास आणले. समिती सदस्य अमर जाधव यांनी स्थानिक माशांच्या विविध जातींची माहिती दिली. बैठकीस नगरसेवक सुभाष बुचडे, निसर्गमित्रचे अनिल चौगले, कृषी कॉलेजचे डॉ. डी. एस.पाटील, पर्यावरण अधिकारी आर. के. पाटील, उद्यान अधीक्षक प्रतिभा राजेभोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर सहाकर्मचारी निलंबित

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज

महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी सायंकाळी मिरज कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली कामकाजाचे संदर्भात प्रदीर्घ बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. तब्बल पाच तास ही बैठक सुरू होती. दरम्यान, या बैठकीस आदेश देऊनही गैरहजर राहिलेल्या पाणीपट्टी विभागातील आठ कर्मचाऱ्यांपैकी सहा जणांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे समजते. दोन कर्मचारी रजेवर होते.

मनपाची पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुली सुमार असल्याने आयुक्तांनी वसुलीची मोहीम जोरदार करण्याचे या पूर्वीच आदेश दिले होते. मात्र, वसुलीत सुधारणा होत नसल्याचे दिसून येत होते. विशेषतः पाणीपट्टी विभागातील थकबाकी, वसुलीच्या कामी होत असलेली दिरंगाई आणि पाणीगळती यामुळे आयुक्त नाराज होते. घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली बाबत या बैठकीत आयुक्तांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या कामाचा आढावा घेतल्याचे समजते.

दरम्यान, आयुक्तांनी मिरजेत बैठकीस हजर राहण्याची देऊनही वेळेत हजर न राहिलेल्या आठ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत दिले. एकाच वेळी सहा जणांचे निलंबन करण्याचे आदेश झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर

$
0
0

चंदगड

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे सोमवारी (ता.१८) सायंकाळी दोन सख्ख्या बहिणींचा घरासमोरील विहीरी बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून विहीरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही धोकादायक विहीर नसती तर हा प्रसंगच घडला नसता. त्यामुळे गावातील ही विहीर मुजवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ही विहीर असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमवारी सायंकाळी दोन सख्ख्या बहिणींचा विहीरीत बुडून झालेल्या मृत्यूची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र प्रत्येकाने हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही केले नाही. आपण रहात असलेल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात की ज्या धोकादायक असतात, मात्र जोपर्यंत एखादी दुर्घटना होत नाही. तोपर्यंत आपण त्याकडे गांभीर्याने बघत नाही. तेऊरवाडीतील दुदैवी घटनेने गावातील उघड्यावर असलेल्या विहिरींचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. झालेल्या घटनेवर हळहळ व्यक्त करत बसण्यापेक्षा अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जी उपाययोजना करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.

तेऊरवाडीतील वापरात नसलेल्या या पडक्या विहीरीकडे एरवी कोणचेही लक्ष नव्हते. मात्र सख्ख्या बहीणींच्या मृत्यूने मात्र विहीरीच्या धोक्याची कल्पना दिली. तेऊरवाडी गावच्या दक्षिणेला फडेवाडी नावाची वसाहत पंचवीस वर्षापूर्वी निर्माण झाली. गावातील अनेकांनी सोयीनुसार या ठिकाणी आपला संसार थाटला. मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून विहीरी खोदाई केली. केवळ बारा फुटावरच पाणी लागल्याने विहीरीची खोदाई थांबवली गेली. विहीरीत असलेल्या मोठ्या झऱ्यामुळे लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. मात्र दरम्यानच्या काळात नळपाणी पुरवठा योजना कार्यन्वीत झाल्याने घरोघरी नळांना पाणी येवू लागले. त्यामुळे या विहीरीकडे दुर्लक्ष झाले. दुर्लक्षामुळे विहीरीची पडझड होवून दगड व मातीने ती मुजली. उन्हाळ्यात यामध्ये पाणी नसते. मात्र पाऊस असल्यामुळे यामध्ये पाणी साठते. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या पडक्या विहीरीमध्ये काठोकाठ पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यामुळे या दोन कोवळ्या जीवांचा बळी गेला. अशी घटना पुन्हा होवू नये यासाठी ग्रामस्थांनी ही विहीरी मुजवावी अशी मागणी आहे.

कठडा नसल्यामुळे दुर्देवी मृत्यू

तेऊरवाडी (ता.चंदगड) येथील ही विहीर उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडी असते. शिवाय ही विहीर केवळ बारा फूट खोल आहे. वापरात नसल्यामुळे या विहीरीकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष झाले. जोरदार पावसामुळे विहीरीत पाणी साठून ती तुडूंब भरली. विहीरीला कठडा नसल्यामुळे पाटी धुण्यासाठी म्हणून गेलेल्या या सख्ख्या बहिणींचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवसायानातील बँकांचे ३२४ कोटी थकीत

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

कामकाजातील अनियमितता व प्रचंड कर्जाच्या थकबाकीमुळे अवसायानात काढलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १५ नागरी सहकारी बँकांतील थकीत ३२४ कोटींच्या कर्जाची अद्यापही वसुली झालेली नाही. सर्वाधिक थकबाकी सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेची १४१ कोटी ९१ लाख रुपये इतकी आहे. त्यापाठोपाठ इचलकरंजी अर्बन बँक, मिरज अर्बन को ऑप बँकांमधील कर्ज थकबाकीची रक्कम ४० कोटींवर आहे. दहा बँकांच्या अवसायकांना यापूर्वी मुदतवाढ देऊनही अजूनही ही परिस्थिती असल्याने ठेवीदारांत संभ्रमाचे वातावरण आहे.

नागरी सहकारी बँकांमधील अनियमित कारभारामुळे तीनही जिल्ह्यातील प्रचंड मोठ्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकांचा कारभार डळमळीत झाला. त्याची सुरुवात २००० सालापूर्वी झाली असली तरी चौकशी पूर्ण करुन अवसायक नेमण्यास २००४ पासून सुरुवात झाली. त्यापूर्वीही इचलकरंजीतील पीपल्स को ऑप बँकेवर १९९४ सालीच अवसायक नेमले होते. थकबाकी बँकांच्या संचालक मंडळांकडून वसूल होणार नसल्याने ठेवीदार व ग्राहकांचे हित जपण्यासाठी अवसायकांची नेमणूक केली होती. त्यांनी कर्जाची वसुली करुन ठेवीदारांच्या ठेवी भागवून बँकांचे व्यवहार संपवले जावेत अशी अपेक्षा होती. पण पंधरापैकी दहा बँकांच्या अवसायकांना वेळोवेळी मुदतवाढ देऊनही हे व्यवहार संपलेले नाहीत.

जिल्ह्यातील इचलकरंजी अर्बन, एस. के. पाटील सहकारी बँक. रवि को ऑप, शिवाजी बँक यांच्याकडील थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. जिल्ह्यातील सात बँकांपैकी पाच बँकांच्या अवसायकांना मुदतवाढ दिली असून ८८ कोटींवर अजूनही थकबाकी आहे. सांगलीतील थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. त्यातील वसंतदादा बँकेचीच थकबाकी १४१ कोटींवर असून मिरज अर्बनची थकबाकीही ४८ कोटी ८२ लाखावर आहे. सातारा जिल्ह्यातील लक्ष्मी सहकारी बँक ही एकमेव बँक अवसायानात असली तरी त्याची थकबाकीही १० कोटीवर आहे.

एक लाखाच्या आतील ठेवींना मिळालेल्या विमा संरक्षणातून काही प्रमाणात रक्कम ठेवीदारांना देण्यात आली. पण लाखावरील ठेवीदारांना २२७ कोटीवर रक्कम देणे अद्याप दिलेली नाही. एकीकडे विमा संरक्षणातून मिळालेली रक्कम बँकेने वसूल करुन परत द्यायची असताना कर्ज वसूल झाले नसल्याने त्यातीलही मोठ्या प्रमाणावरील रक्कम थकीत आहे. या साऱ्या कारभारामुळे या सहकारी बँकांचे भवितव्यच अंधकारमय दिसू लागले असून अवसायकांचाही मोठा कालावधी होत असल्याने ठेवीदारांच्या आशा धुसर होत आहेत.

अवसायक नेमलेल्या बँक

इचलकरंजी अर्बन, रवि, इचलकरंजी जिव्हेश्वर, एस. के. पाटील, साधना को ऑप, पीपल्स को ऑप, शिवाजी सहकारी बँक (सर्व जिल्हा कोल्हापूर), वसंतदादा शेतकरी सहकारी बँक, मिरज अर्बन, लॉर्ड बालाजी सहकारी बँक, कुपवाड अर्बन, कृष्णा व्हॅली, यशवंत सहकारी, धनश्री महिला सहकारी (सर्व सांगली) लक्ष्मी सहकारी बँक (सातारा)

बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू

अनेक वर्षांपासून अवसायक नेमलेले असल्याने त्यांना आता थकबाकीची वसुली तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक लाखावरील ठेवीदारांना पैसे परत करण्यासाठी थकबाकी वसुली अत्यावश्यक असल्याने त्यादृष्टीने काहींनी बोजा चढवण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया लवकर केली जावी असे आदेश दिले आहेत.

धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस भरती झालेल्या युवतीची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा (ता. करवीर) येथील दत्तोबा शिंदेनगर येथील चुलत्याच्या घरात वसुंधरा रंगराव पाटील (वय २०, रा. सडोली खालसा, ता. करवीर) या युवतीने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. वसुंधरा या दोन महिन्यापूर्वी पोलिस भरती झाल्या होत्या. शुक्रवारी पोलिस भरतीची कागदपत्रे सादर करण्यासाठी पोलिस मुख्यालयात जाणार होत्या. पण तत्पुर्वीच त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता आत्महत्येची घटना उघडकीस आली.

वसुंधरा यांचे चुलते बळीराम नामदेव पाटील (वय ३७ रा. कळंबा) हे भारतीय सैन्य दलात असून ते केरळ येथे नियुक्त आहेत. ते रजेवर असल्याने सहा दिवसांपासून घरी आले होते. त्यांच्या भावाची मुलगी वसुंधरा ही दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर पोलिस दलात भरती झाली होती पण रूजू झाली नव्हती. गेले पंधरा दिवस तिची मानसिक स्थिती ठीक नव्हती. ती असंबंध बडबडत होती. रात्री अपरात्री उठून रडत होती. मा​नसिक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी चुलते बळीराम पाटील बुधवारी (२० जुलै) सडोलीहून वसुंधराला कळंबा येथे घेऊन आले होते. पोलिस दलात रूजू होण्यासाठी कागदपत्रे पोलिस मुख्यालयात शुक्रवारी द्यावयाची होती.

शुक्रवारी सकाळी बळीराम पाटील व वसुंधरा मॉर्निग वॉकला गेले होते. साडेआठ वाजता ते दोघे घरी परतले. आंघोळ व नाष्टा करून वसुंधरा पहिल्या मजल्यावरील खोलीत एकटीच गेली. साडेनऊ वाजता वसुंधराला बोलावण्यास पाटील गेले असता तिने दरवाजा उघडला नाही. खोलीतून कोणताही प्रतिसाद न आल्याने हातोडा व गजाने दरवाजा उचकटून खोलीत प्रवेश केला. यावेळी वसुंधराने छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. करवीर पोलिस ठाण्यात आत्महत्येची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल पंपधारकांचा असहकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना पेट्रोल दिले जाणार नसल्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी, त्याला खो बसण्याची शक्यता आहे. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी असून, त्याला विरोध करण्याची भूमिका फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनेने घेतली आहे. या संदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोद यांनी महाराष्ट्र टाइम्सला माहिती दिली. येत्या दोन दिवसांत या विषयावर असोसिएशनची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यासाठी 'नो हेल्मेट नो पेट्रोल,' ही महत्त्वाकांक्षी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल (२१ जून) विधिमंडळात केली. मात्र, त्याच्या अंमलबजावणीविषयी शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'दुचाकी वाहने पेट्रोल पंपावर आठवड्यातून एक-दोनवेळा येतात. मात्र, आठवडाभर रस्त्यांवर धावत असतात. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर या निर्णयाची अंमलबजवाणी करावी. या निर्णयामुळे पेट्रोल पंपावर वादाचे प्रसंग घडू शकतात. आम्ही एका ज्वलनशील द्रव्याची विक्री करत असल्याने तेथे कमीत कमी वाद व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यात या सक्तीमुळे वेगळे वळण लागण्याचा धोका आहे.'

'सांगितले एक केले एक'

लोद म्हणाले, 'या संदर्भात असोसिएशनशी सरकारने चर्चा केली होती. त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत हा नियम लागू करण्यावर चर्चा झाली. आम्ही सहकार्याच्या भूमिकेत होतो. पंपांवर फलक लावण्याची तयारी दाखविली होती. त्यावेळी या सक्तीसाठी प्रत्येक पंपावर एक पोलिस नेमण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सरकारने संपूर्ण राज्यासाठी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे याला विरोध राहील.'

सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला नाही. नियम पाळला जातो की नाही हे पाहणे आमचे काम नाही. ते पोलिसांचे असून, त्यांनीच ते करावे. या निर्णयाला तीव्र विरोध असून, वेळप्रसंगी कोर्टात जाण्याचीही तयारी आहे.

उदय लोद, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तज्ज्ञांची समितीपाहणी करणार

$
0
0


सोलापूर

'सोलापुरातून मुंबईला विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री गजपती राजू यांनी सहमती दर्शवली आहे. विमानतळाची पाहणी करण्यासाठी चार तज्ज्ञांची समिती बुधवारी, (दि. २७) सोलापुरात येणार आहे,' अशी माहिती खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी दिली आहे.

बनसोडे म्हणाले, 'सोलापूर विमानतळ सल्लागार समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात विमानसेवा सुरू करण्याचा ठराव झाला होता. गजपती राजू यांना भेटून या बाबत निवेदन देण्यात आले. दरम्यान, लोकसभेच्या चालू अधिवेशनामध्ये या बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर राजू यांनी देशातील मेट्रो शहरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या शहरांना ३१ डिसेंबर २०१६पर्यंत विमान वाहतुकीने जोडण्यात येणार आहे. शिवाय त्याचे भाडेही अडीच हजार इतके असणार आहे, असे म्हटले होते. त्यांच्याकडे सोलापुराचा विषय काढताच त्यांनी तातडीने एक समिती पाठवून पाहणी करणार असल्याची माहिती दिली. विमानतळावरील सुविधा, धावपट्टी, भाडे आणि लोकांचा प्रतिसाद आदी बाबींचा समिती अभ्यास करील. खासगी विमान सेवेचे दर लोकांना परवडणर नाहीत. त्यामुळे एअर इंडियाकडून विमान वाहतूक सुरू झाल्यास लोकांची सोय होणार आहे. ३१ डिसेंबर पूर्वी विमान वाहतूक सुरू करण्याबाबत हालचाली होतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल अपघातात एकजण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल पंचता‌रांकित औद्योगिक वसाहत रस्त्यावर मोटारसायकलने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती शंकर पाटील (वय ३६, रा. ठिकपुर्ली ता. राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी अश्व‌िनी (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या. यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.

पाटील हे पत्नी अश्व‌‌िनीसह मोटरसायकलवरुन इचलकरंजीला एका रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. दुपारी ते गावाकडे पंचतारांकित औद्योगिक वसाहतमार्गे येत होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने समोर जात असणाऱ्या (एम.एच.०९ सी.ए.७८७९) या ट्रकवर जोरात आदळले. यामध्ये पाटील यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. पाटील दाम्पत्यास जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये आणले. मात्र, मारुती यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. गंभीर जखमी अश्व‌िनीवर उपचार सुरू आहेत. मारुती यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ट्रकचालक शिवराम सखाराम पाटील (वय ३३, रा. तवंदी ता.चिकोडी) याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डबक्यांची पाटोळेवाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कवळा नाक्यावरून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर उत्तरेला परख हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या पाटोळेवाडीत पावसाळ्यात अतिशय बिकट परिस्थिती आहे. काही रस्ते चांगले, तर काही ठिकाणी डर्ट ट्रॅक रेसचा अनुभव घ्यावा लागतो. महापालिकेने या खराब रस्त्यांची डागडुजी योग्य पद्धतीने करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

पाटोळेवाडीचा परिसर सध्या उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखला जातो. उंचच्या उंच अपार्टमेंट्स आणि आलीशान बंगले, यामुळे हा परिसर जुने कोल्हापूर आणि इतर उपनगरांपेक्षा वेगळा ठरतो. मात्र, या परिसरातील रस्त्यांची अवस्था फारशी समाधानकारक नाही. वाडीतील लक्ष्मीनगर परिसरातील रस्ते खराब आहेत. मोजकेच रस्ते सुस्थितीत आहे. मात्र, या रस्त्यांना जोडणाऱ्या इतर रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे.

सिद्धी हेरिटेजच्या मागील बाजूस असलेल्या लक्ष्मी नारायण नगरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेने रस्त्यांच्या स्थितीवर नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी, आमदारांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परिसरात उघडी गटर मोठ्या प्रमाणावर आहेत. ती तुंबल्याने बाहेर पडणारे पाणी थेट रस्त्यांवर येते आणि ठिकठिकाणी डबकी साचतात. लक्ष्मी नारायण नगरात एके ठिकाणी पालिकेने मुरूम टाकू़न तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा मुरूम पावसात पुन्हा भिजला असून, रस्त्यांवर चिखल झाला आहे. यातून दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळेस तर या रस्त्यांवरून जाताना खूप काळजी घ्यावी लागते. एकूणच पालिकाने या कॉलनीतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देऊन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची आणि गटर साफ करण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

===

गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस झालेल्या पावसाने कॉलनीत पाणी पाणी झाले होते. आमचे घर बैठे असल्याने घरात पाणी शिरले होते. पाण्याचा निचरा होण्यासाठी काहीतरी व्यवस्था होण्याची गरज आहे. अन्यथा मोठा पाऊस झाला की, असेच पाणी घरांत शिरणार.

मलवा कट्टी, पाटोळेवाडी

परिसरात काही रस्ते चागंले आहेत. मात्र, काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वी येथे पालिकेकडून मुरूम म्हणून माती टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

मंदा पावसे, पाटोळेवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अच्युत पालव यांची ‘अंब्रेला’ कार्यशाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळा येत्या २७ आणि २८ जुलैला सांगलीत होणार आहे. 'पाऊस' या संकल्पनेवर आधारित ही कार्यशाळा मोफत आहे. कार्यशाळा कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन येथे होणार आहे. कार्यशाळेत कॅलिग्राफी, चित्ररचना, अंब्रेला, कविता आणि पावसावरील गप्पा असणार आहेत. सुलेखनकार पालव यांच्या भारत आणि भारताबाहेर अनेक ठिकाणी कार्यशाळा झाल्या आहेत. सांगलीत पावसावरील अशा दृक्‍श्राव्य कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन केले आहे. शंभरहून अधिक विद्यार्थी अंब्रेलावर कॅलिग्राफीतून चित्ररचना साकारणार आहेत. तर माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी टी शर्टवर कॅलिग्राफी रेखाटणार आहेत. कॅलिग्राफीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट अंब्रेला कलाविश्व महाविद्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत पावसाचा जोरकमी

$
0
0


सांगली :

पावसाने शनिवारी दिवसभरात एकदाच हजेरी लावली. परंतु दिवसभर कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळेल, असे वातावरण कायम होते. दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावली. परंतु पावसाचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला काढण्याची संधी मिळाल्याने शनिवारच्या सांगलीच्या आणि माधवनगरच्या आठवडा बाजारात शेतकरी भाजी घेऊन धावत असताना दिसला.

भाजीपाल्याचे मुख्य पीक असलेल्या सांगली, मिरज आणि तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग पावसाने जेरीला आणले होते. शेतात पाणीच उभे राहिल्याने भाजी काढण्यासाठी शेतात पाऊलच ठेवता येत नव्हते. त्याचबरोबर जास्त पाण्याने पिकालाही धोका निर्माण होत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव येऊन त्यांना आपले पीक बाजारात आणण्याची संधी मिळाली आहे. भाज्यांची आवकच कमी असल्याने दर गगनाला भिडत आहेत. त्यात सरकारने भाजीपाला नियमन मुक्त केल्याचाही परिणाम झाला. आडत ही खरेदीदार व्यापाऱ्यांकडून घेतली जात असल्याने व्यापाऱ्यांने दरात वाढ केली आहे. त्यामुळे सरकारच्या नियमनमुक्तीचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे.

शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत सांगली-मिरज १४.९, वाळवा-इस्लामपूर १३.१, शिराळा १३, तासगाव ७.८, जत ६.५, पलूस १३.८ असा पाऊस नोंदला गेला. आटपाडी, कवठे महांकाळ, कडेगाव, खानापूर या भागात अगदीच अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. वारणा

कोयनेत ५५.१५ टीएमसी पाणीसाठा

कराड :

कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम कमी झाली आहे. शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या ५५.१५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने मागील काही दिवसांपासून दर रोज साधरण एक टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

शनिवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत कोयनानगर येथे १३, नवजा १०, महाबळेश्वर २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पाणीपातळी २११३ फूट १ इंच म्हणजेच ६४४.०६८ मीटर इतकी झाली होती.

चांदोलीत २५ टीएमसी

शिराळा

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण ७३.०७ टक्के भरले आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी धीम्या गतीने वाढत आहे. धरण परिसरात गेल्या चोवीस तासांत १० मि. मी पाऊस पडला आहे. धरणात एकूण पाऊस १३४३ मि. मी पाऊस पडला आहे. धरणात २५.१४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी ६१६.५० इतकी झाली आहे. धरणात ७११.८४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच धरण ७३.०७ टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images