Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंबाबाई मंदिरात ठिय्या बंदोबस्त

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

चारही दरवाजात भाविक प्रवेश करताना मेटल डिटेक्टरचा आवाज होतो. एखादा पोलिस भाविकांच्या पिशवीकडे पाहतो. दोघी तिघी महिला पोलिस कर्मचारी हसत खिदळत असतात. त्यांच्याजवळ ना काठी ना कार्बाइड गन. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या अंबाबाई मंदिराच्या चारही दरवाजावर पाट्या टाकणारा असा हा ठिय्या बंदोबस्त आहे. या ठिय्या बंदोबस्ताची ना कुठल्या वरिष्ठाला काळजी ना कर्मचाऱ्यांना. मंदिराचा बंदोबस्त नशिबावर हवाला ठेवून सुरू आहे.

मंगळवार हा ​देवीचा वार. दुपारी पावणेदोन ते अडीच या वेळेत भाविकांची मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. मंदिराच्या सुरक्षेसाठी महाद्वार, घाटी, पूर्व, दक्षिण या दरवाजावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. दोन पुरूष आणि एक महिला पोलिस कर्मचारी अशा तीन शिफ्टमध्ये प्रत्येक दरवाजावर बंदोबस्त असतो. पण काही दरवाजावर निम्मे कर्मचारीही बंदोबस्तास उपस्थित नव्हते.

महाव्दार रोडवरून सर्वांत जास्त भाविक येतात. या दरवाजावर एकच पुरूष पोलिस कर्मचारी ड्युटीवर. एक महिला व एक पुरूष कर्मचारी या दरवाजावर गैरहजर होते. महिलांची तपासणी करणारी केबिन या दरवाजात नव्हती. ही केबिन गरूड मंडपाजवळ ठेवली आहे. विद्यापीठ हायस्कूलजवळ गरूड मंडपाजवळ मात्र दोन पोलिस आणि तीन महिला कर्मचारी बंदोबस्तास होत्या. दोघी महिला कर्मचारी गप्पा मारत होत्या. एक पोलिस उभा होता तर दुसरा पोलिस खुर्चीवर बसून. कुणाचीही तपासणी केली जात नव्हती.

पूर्व दरवाजावर मेटल डिटेक्टरच्या दोन्ही बाजूला चपलांचे ढीग होते. या ठिकाणीही एक महिला व दोन पुरूष कर्मचारी बसून होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सिमेंटच्या बंकरमध्ये पिशव्या ठेवल्या आहेत. यापूर्वी पोलिसांकडे कार्बाइडसारखी गन असायची. पण आता कोणत्याच कर्मचाऱ्यांकडे अशी गन दिसत नाही. घाटी दरवाजाजवळ बंदोबस्तासाठी एकमेव पोलिस होता.

चारही दरवाजावर कोणत्याही भाविकांच्या पिशव्यांची तपासणी केली जात नव्हती. कुणावरही संशय व्यक्त केला जात नव्हता. केवळ ड्युटीवर आहे हे दाखवण्यासाठी पोलिस बंदोबस्त असल्याचे चित्र होते. काही वेळा पोलिस मोबाइलवर गेम खेळत बसतात. सलग आठ तासांच्या ड्युटीमुळे पोलिस कंटाळत असल्याने व नियमित तेच काम असल्याने बंदोबस्तात शैथिल्य निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


KMT कर्मचाऱ्यांना दरमहा पगार, देणीही मिळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगार आणि अन्य योजनेतील फरकासंदर्भात महापालिकेतील मॅरेथॉन बैठकीत तोडगा निघाला. ऑक्टोबर महिन्यापासून दरमहा २५ तारखेच्या आत पगार करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. तसेच भविष्य निर्वाह निधी, अल्पबचत खाते आणि विम्याच्या रकमाही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची हमी प्रशासनाने दिली. सहावा वेतन आयोग लागू करण्यावरून कर्मचारी संघटना शेवटपर्यंत आक्रमक राहिल्या. महापालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केला आहे तर केएमटी कर्मचाऱ्यांना सापत्नपणाची वागणूक कशासाठी? असा सवाल करत वेतन आयोग लागू करणार नसाल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. यावरून आयुक्त-परिवहन समिती सदस्य आणि कर्मचारी प्रतिनिधी दरम्यान खटके उडाले.

कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठक अर्ध्यावर सोडून जाण्याचा पवित्रा घेतला. चर्चा फिसटकल्याने दुपारच्या बैठक निर्णयाविना संपली. मात्र सायंकाळी झालेल्या बैठकीत केएमटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे ठरल्याने संघटनेच्या प्रतिनिधींनी संपावर जाण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. केएमटीच्या उत्पन्नाच्या मर्यादा आणि नियमावलीमुळे वेतन आयोग लागू करण्यास अडचणी आहेत. राज्यातील अन्य महापालिकेतील परिवहनच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध वेतनश्रेणी, एसटी महामंडळाची वेतन नियमावलींचा अभ्यास करून निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी स्पष्ट केल्यानंतर याप्रश्नी १९ ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

परिवहन समिती सभापती लाला भोसले, आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मान्यताप्राप्त संघटनेच्या कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चेला सुरुवात झाली. संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक, सचिव राजेंद्र तिवले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. दोन दोन महिने पगार होत नाहीत. कर्मचारी व्याजाने पैसे काढून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ठराविक तारखेला करावा, अशी भूमिका मांडली. ऑक्टोबर महिन्यापासून दरमहा २५ तारखेच्या आत पगार जमा करण्याची ग्वाही अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली. आयुक्तांनी येत्या तीन आठवड्यात पीएफची चार कोटीची रक्कम दिली जाईल. तसेच विम्याची व अल्पबचतची रक्कमही खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू केली जाईल, अशी ग्वाही दिली. सभापती भोसले, सदस्य शेखर कुसाळे, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजू घेत प्रशासनाला दबाव वाढविला.

सहावा वेतन आयोग ठरला कळीचा मुद्दा

महासभेने सप्टेंबर २०१३ पासून सहावा वेतन आयोग लागू करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी कधी करणार ? असा सवाल करत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष, सचिवासह अन्य पदाधिकारी प्रमोद पाटील, ईर्शाद नायकवडे, मनोज नार्वेकर, विनायक मेंगाणे, निजाम मुल्लाणी, सतीश परकाळे, राजू ठोंबरे, तानाजी पाटील यांनी याप्रश्नी माघार घेणार नाही असा इशारा दिला. आयुक्तांनी सहावा वेतन आयोग लागू करता येणार नाही. अन्य ठिकाणचा अभ्यास करून महिनाभरानंतर पुन्हा बैठक घेण्यावर ठाम राहिल्याने दुपारची बैठक तोडग्याविना आटोपली.

पदाधिकारी, गटनेत्यांची मध्यस्थी ठरली मोलाची

स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, लाला भोसले, संभाजी जाधव, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, नियाज खान, प्रवीण केसरकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी पुन्हा बैठक झाली. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात संपूर्ण सभागृह सकारात्मक आहे. पुढील महिन्यात बैठक घेऊन याप्रश्नी निर्णय घेण्याचे ठरल्याचे संघटना प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना पटवून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बालिकेवर अतिप्रसंग

$
0
0

मिरज : मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये धावत्या रेल्वेत झोपलेल्या सात वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अतिप्रसंगी करणाऱ्या अमोल शशिकांत कुलकर्णी (वय ३७ रा. वायफळे ता. तासगाव) याला अटक केली आहे.

पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील कल्याणहून साताऱ्याला जाण्यासाठी सर्वसाधारण बोगीतून प्रवास करीत होते. त्यांच्या बोगीत संशयित अमोल कुलकर्णी हाही प्रवास करीत होता. गाडी पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी मध्यरात्री आली असता, पीडित बालिका आणि तिचे आई-वडील झोपलेले होते. अमोलने बालिका झोपलेल्या अवस्थेत असतानाच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जागे असलेल्या इतर प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. बालिकेचे आई-वडीलही जागे झाले. बोगीतील इतर प्रवाशांनी अमोलला बेदम चोप दिला. गाडी मिरज रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याला मिरज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अमोलवर बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात दमदार पाऊस

$
0
0

सोलापूर

सोलापूर शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी साडेचार वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशीरापर्यंत कोसळत होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील भैय्या चौक, हरीभाई देवकरण प्रशाला, रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅन्ड, कौतम चौक यासह सखल भाग जलमय झाला. वाहनधारकांची प्रचंड तारांबळ उडली.

शहरासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोलापूर शहरातील नवीपेठ, चाटीगल्ली, सराफ बाजार, सुराणा मार्केट, एसटी बसस्थानक परिसर, कुंभारवेस, बाळीवेस, टिळक चौकातील बाजारपेठांमधील व्ययवसायावर मोठा परिणाम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस गायब

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

सोलापूरजवळील हिप्परगा येथील मशरुम गणपती मंदिरावरील २५ तोळ्यांचा सोन्याचा कळस चोरट्यांनी लांबवला आहे. पुजारी आज सकाळी मंदिरात आल्यानंतर कळस चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सोलापुरातील हिप्परगा येथे मशरुम गणपती मंदिर आहे. भाविकांच्या योगदानातून या मंदिरावर मिश्र धातूंचा कळस बसवण्यात आला होता. त्यावर २५ तोळे सोन्याचा मुलामा होता. हा कळस चोरट्यांनी लंपास केला आहे. मुसळधार पावसामुळे रात्रभर वीज गूल होती. चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन हा कळस चोरल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्ताद राशिद खाँ यांची शनिवारी मैफल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील व्हायोलीन अकॅडमीच्या वतीने दरवर्षी कोल्हापुरातील गानरसिकांसाठी स्वरझंकार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. संगीत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणाऱ्या या महोत्सवात यंदा ख्यातनाम गायक पद्मश्री उस्ताद राशिद खाँ यांचे गाणे ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे. येत्या २३ जुलैला केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री नऊ वाजता ही मैफल आयोजित करण्यात आली आहे.

उस्ताद राशिद खाँसाहेब रामपूर घराण्याचे गायक आहेत. मैफलीत त्यांना तबला साथ विजय घाटे करणार आहेत. हार्मोनियमवर अजय जोगळेकर संगत करणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती कादंबरी शिवाय यांच्या ओडिसी नृत्याने होणार आहे. जगविख्यात संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा, पंडीत हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद शाहिद परवेझ (सितार), पंडीत विश्वमोहन भट (मोहनवीणा) पंडीत अतुलकुमार (व्हायोलीन), पतियाळा घराण्याच्या कौशिकी चक्रवती, मेवाती घराण्याचे संजीव अभ्यंकर, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना अशा अनेक संगीत कालाकारांनी कोल्हापुरात उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांच्या चरणी आपली कला अर्पण केली आहे.

कोल्हापुरात २०१०पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाला दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी मोलाचे सहकार्य केले होते. राजर्षी शाहू महाराजांनी उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांच्या रुपाने जयपूर घराण्याच्या गानपरंपरेला संजीवनी दिली होती. तीच परंपरा विक्रमसिंह घाटगे यांनी जोपासली होती. यंदाच्या राशिद खाँ यांच्या स्वरमैफलीतून चारही प्रहरातील राग रगिनींचा अस्वाद रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमास शाहू ग्रुप, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, गार्डियन डेव्हलपर्स व हॉटेल पर्ल यांचे सहकार्य लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे यांच्या भाषणाचे पुस्तक प्रकाशित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ कामगार नेते दिवंगत अॅड. गोविंद पानसरे यांचे गोवा येथे महापरिनिर्वाणदिनानिमित्त डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या भाषणावर आधारित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे का म्हणाले?' या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. अभिषेक मिठारी लिखित पुस्तकाचे प्रकाशन रघुनाथ कांबळे यांच्या हस्ते बिंदू चौकातील भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या कार्यालयात करण्यात आले. श्रमिक प्रतिष्ठानने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर आरडे होते.

कांबळे म्हणाले, 'पानसरे यांनी ‌'शिका, संघटीत व्हा' या डॉ. आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार, प्रचार केला. आंबेडकरांवर प्रस्थापितांनी लिहून ठेवले आहे. त्याही पलिकडे जावून ज्ञान मिळवा, असे पानसरे नेहमी सांगत होते. मात्र आताचे सरकार भांडवलदारांच्या हिताचा निर्णय घेत आहे. चळवळी मोडीत काढण्यासाठी सरकार विविध घटकांना मंत्रीपद देत आहे. जातीपातींना नेतृत्व देऊन संघर्ष थांबणार नाही.'

यावेळी कृष्णात कोरे यांनी स्वागत केले. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. उमा पानसरे, आनंदराव परूळेकर, चिंतामणी मगदूम आदी उप‌स्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुम्ही फक्त झोपा काढा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मैदानाचा विकास, चौक सुशोभिकरण अशा प्रोजेक्टसाठी आम्ही पुढाकार घ्यायचा. निधीसाठी पाठपुरावा करायचा. लोकसहभागातून बागा विकसित करण्यासाठी धडपड करायची. मग महापालिकेचे अधिकारी काय करतात? नगरसेवकांनी निधी आणायचा आणि अधिकाऱ्यांनी झोपा काढायच्या असा प्रकार सुरू आहे, अशा शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. दत्तक तत्त्वावर बगीचाचा विकास, गॅस वाहिनीच्या प्रस्तावातील त्रुटींवरून नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.

काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी बागा दत्तक तत्वावर देण्याच्या ठरावावरून प्रशासनाचा टीका केली. 'शहरातील एकही उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू नाही. कुटुंबाला सोबत घेऊन फिरायला जाण्यासारखी एक तरी बाग आधी विकसित करा' अशी सूचना त्यांनी केली. नगरसेवक अशोक जाधव, रुपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, राहुल चव्हाण, तौफिक मुल्लाणी यांनीही या विषयावरून प्रशासनाला लक्ष्य केले. आयुक्तांनी, कुठल्याही बागेचे खासगीकरण होणार नाही, त्या मालकी हक्काने खासगी संस्थेला दिल्या जाणार नाहीत. फक्त विकासकाच्या नावाचे फलक चार ठिकाणी लावले जातील असे सांगितले.

आयुक्त स्वच्छ, पण...

प्रा. जयंत पाटील यांनी, उपायुक्त नालेसफाई, आपत्कालिन व्यवस्थापनवरून टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, 'पुराच्या कालावधीत यंत्रणा कमकुवत ठरली. पूरस्थितीला सामोरे जाताना प्रशासनाने काय उपाययोजना केल्या ते सांगावे. जनसंपर्क विभाग नेमके काय करतो?' उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे व विजय खोराटे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत प्रा. पाटील म्हणाले, 'एमएस्सी झालेल्या या अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा बागा विकसित करण्यासाठी कधी उपयोग करणार? आयुक्त स्वच्छ आणि अधिकाऱ्यांचा कारभार तांबरलेल्या झारीसारखी आहे.'

दरम्यान, महापालिकेच्या जागा रेडीरेकनर दराप्रमाणे भाड्याने देण्याचे सात ठराव पुढील मिटींगपर्यत प्रलंबित ठेवण्याचा निर्णय झाला.

करमणूक कर विभागाची नोटीस

तलावात खरमाती टाकून बांधकाम केल्याप्रकरणी देवराज बोटिंग क्लबवरील कारवाईचे पडसाद सभेत उमटले. नगरसेवक किरण नकाते यांनी करमणूक कर विभागाने देवराज बोटिंग क्लबला करमणूक करावरून नोटीस दिल्याचे व बोटिंग बंद करण्याचा आदेश काढल्याचे निदर्शनास आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झ‌िरो पोलिस निघाला मोबाइल चोरटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (ता. २०) मोबाइलसह लॅपटॉप चोरणारा सराईत चोरटा अभिषेक अर्जुन पाटील (वय २४, रा. दूधगंगा बिल्डिंग, वारणा कॉलनी, नागाळा पार्क) याला अटक केली. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे आठ मोबाइल आणि तीन लॅपटॉपही जप्त केले. अभिषेक हा करवीर पोलिस ठाण्यात झीरो पोलिस म्हणून काम करीत होता.

शाहूपुरी पोलिसांना चोरीतील मोबाइल आणि लॅपटॉप विक्रीसाठी एक संशयित मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. यानुसार बुधवारी (ता. २०) दुपारी तीनच्या सुमारास सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले. संशयिताची अंगझडती घेतल्यावर सॅकमध्ये तीन लॅपटॉप आणि आठ मोबाइल मिळाले. चौकशीत त्याने मोबाइल आणि लॅपटॉप चोरीचे असल्याची कबुली दिली. अभिषेक याने सर्व मोबाइल आणि लॅपटॉप मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थांबलेल्या बसमधील प्रवाशांकडून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी अभिषेक पाटील याच्यावर चोरीचा (कलम ३७९) गुन्हा दाखल केला. त्याच्याकडील १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सराईत चोरटा झिरो पोलिस

अभिषेक करवीर पोलिस ठाण्यात झिरो पोलिस म्हणून काम करीत होता हे लक्षात आल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर सुनील कदम स्वीकृत नगरसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी महापौर आणि ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्तीवर राज्य सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. माजी महापौर कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपदावरून महापालिकेत शह, काटशहाचे राजकारण सुरू होते. त्यात विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने बाजी मारली.

महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर कदम यांच्या स्वीकृत नगरसेवकपदाची शिफारस करणारा ठराव दोनवेळा फेटाळला होता. राज्य सरकारने, महापालिकेचा कदम यांच्या विरोधातील ठराव रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वीकृत नगरसेवकपदावरून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. तर महापालिकेच्या सभागृहातील सत्तासंघर्षाला अधिक धार येईल अशी चिन्हे आहेत.

ताराराणी आघाडीकडून कदम यांच्या नावाची स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिफारस केली होती. मात्र महापालिकेतील सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण सभेत बहुमताच्या बळावर ठराव फेटाळला होता. माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या लाच प्रकरणात कदम यांनी महापालिकेच्या हिताविरूद्ध काम केल्याचा आरोप होता. दरम्यान, माजी महापौर कदम यांनी, 'माझी बाजू सत्याची होती 'अशी प्रतिक्रिया दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलाल होतात मालामाल

$
0
0

Bhimgonda.Desai @timesgroup.com

कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागेल तेवढी अडत, हमाली, ताेलाई, कमिशन वर्षानुवर्षे देऊन काबाडकष्ट करणारा शेतकरी कंगला बनला आहे. याउलट दलाल मालामाल झाले आहेत.

नव्या आदेशामुळे काही प्रमाणात का असेना, लुटीला चाप बसणार आहे. उत्पादकांच्या हातात चार पैसे अधिक आणि ग्राहकांना कमी भावात शेतमाल मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही नवी व्यवस्था तयार होवू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोल्हापूर बाजार समितीमध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातून फळे, भाजीपाल्याची आवक वर्षभर असते. त्यांची रोज सव्वाकोटींची उलाढाल होते. उलाढालीवर जुन्या नियमाप्रमाणे सहा टक्के अडत आकारली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला किती मोठ्या प्रमाणात झळ बसते, हे स्पष्ट होते. ‌

सर्व उत्पादक शेतकऱ्याना सहा टक्के अडतीचा नियम माहीत नसल्याने, अडते मागेल तितके पैसे दिले जातात. अडत्यांकडे विक्री झाल्यानंतर अडत, हमाली, तोलाई दिल्यानंतर शेतकऱ्यांना पदरमोड करून वाहनभाडे देण्याची अनेकदा वेळ आली आहे. काही दलाल कमी दराने माल मिळवून देऊन खरेदीदार आणि उत्पादकांकडूनही पैसे उकळतात. अशाप्रकारे केवळ चार ते पाच तासात दलाल चांगली कमाई करतात. दलालांच्या आर्थिक परस्थितीचा आलेख उंचावत राहिला. उलट शेतकऱ्यांवर शेती विकण्याची वेळ आली आहे.

एका दिवसात राज्यात सुमार तीन हजार कोटी रुपये तर एका कोल्हापूर बाजार समितीत साडेसहा लाखांच्या अडतीचा बोजा शेतकऱ्यांवर पडत होता. नव्या नियमानुसार अडतीचे पैसे शेतकऱ्यांच्या ‌खिशात राहतील. खरेदीदार नेहमी आपल्या फायद्याचे गणित मांडूनच शेतमालाची खरेदी करतो. त्यामुळे अडत दिल्यानंतर मोठे आर्थिक नुकसान होते, अशी ओरड सुरू आहे. अडते, दलाल यांना वगळूनही खरेदीदार थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करू शकतो.

बाजार समितीमध्ये अडते आणि खरेदीदारांची मिलिभगत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळत नाही. त्यामध्ये दलाल श्रीमंत होत आहेत. शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. हे नव्या नियमनानुसार थांबणार आहे.

- सावकार मादनाईक, भाजीपाला उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्त पार्किंगने गुदमरला जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौक ते उमा टॉकीज हा मार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यातच दिसून येतो. या मार्गावर हॉस्पिटल, बँका, मॉल आणि व्यापार पेठ असल्यामुळे वाहतुकीचे तीन-तेरा नेहमीच वाजलेले असतात. या मार्गावर अवजड वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे केवळ दोन वाहतूक पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण आणणे अशक्य होत आहे. वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग, अरुंद रस्ते, वाढलेले अतिक्रमण आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे विस्कळीत नियोजन यामुळे दिवसेंदिवस ही कोंडी वाढतच आहे.

दसरा चौकाच्या कॉर्नर परिसरात घड्याळाचे दुकान, ज्वेलरी आणि बँका असल्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या जातात. तसेच हा रस्ता मुळातच अरुंद असून, त्यात हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका आणि एसटी, केएमटी बसेसची वर्दळ नेहमीच असते. यामुळे मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीने अपघाताचे अनेक प्रकारही घडत आहेत. बँकेत येणारे लोकही रस्त्यातच वाहने पार्क करतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी असल्याने वाहतुकीची कोंडी होते. वाहनांची वाढती संख्या आणि अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यास पोलिस कमी पडत आहेत.

लक्ष्मीपुरीमध्ये व्यापारी पेठा असल्याने या ठिकाणी धान्यासह इतर वाहतूक करणारी अवजड वाहने रस्त्यावर असतात. व्यापारी पेठांसह महत्त्वाच्या मार्गांवर अवजड वाहतुकीला गर्दीच्या वेळेत प्रवेश बंदी असली तरीही वाहनांची संख्या वाढल्याने ट्राफिकचा खोळंबा वाढला आहे. अरुंद रस्ते आणि पार्किंगचा अभाव असल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी या मार्गावर स्वतंत्र नियोजन करणे गरजेचे आहे. शहरात सध्या वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. जिथे पार्किंग नाही, तिथे वाहन उभे केले जाते. एकेरी मार्ग असलेल्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू असते. त्यामुळे बेशिस्त पार्किंगवर कारवाई केल्यास हा मार्ग नक्कीच मोकळा श्वास घेईल.

हातगाड्यांमुळे ट्राफिक जॅम

लक्ष्मीपुरी सिग्नल ते उमा टॉकीज या रोडवर फळविक्रीच्या अनेक हातगाड्या दिसून येतात. याच मार्गावर मॉलमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यातच धान्यबाजारात येणारी अवजड वाहने आणि रस्त्याच्या बाजूला लावलेली बेशिस्त पार्किंग यामुळे या परिसरात नेहमीच ट्राफिक जॅम होत असते.

गेल्या काही वर्षांपासून या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मॉलमधून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांसाठी, दसरा चौकाकडे जाणाऱ्या, धान्य बाजारात जाणाऱ्यांसाठी आणि लक्ष्मीपुरीत जाणाऱ्यांसाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. याच परिसरात रिक्षा थांबे आणि चुकीच्या पार्किंगमुळे रस्ता वाहतुकीसाठी अधिकच त्रासदायक ठरतो आहे.

संजय भालेकर, लक्ष्मीपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात प्रथम लॅप्रोस्कोपीद्वारे मीडकॅब

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

कोल्हापूर : पित्ताशय, कॅन्सर किंवा पोटाशी निगडित असलेल्या आजारांसाठी सध्या लॅप्रोस्कोपी (दुर्बिनीद्वारे) शस्त्रक्रिया सर्रास केली जाते. मात्र, कोल्हापुरात प्रथमच लॅप्रोस्कोपीद्वारे मिनिमली इन्व्हॅझिव्ह डायरेक्ट कोरोनरी आर्टरी बायपास (मीडकॅब) शस्त्रक्रिया करण्यात यश आले. कदमवाडी येथील अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये डॉ. सुदर्शन जी. टी यांनी अशा तीन सर्जरी केल्यामुळे मुंबई, पुण्यानंतर कोल्हापुरातील वैद्यकीयक्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान येत असल्याचे अधोरेखित होत आहे.

लॅप्रोस्कोपिक बायपासद्वारे हृदयशस्त्रक्रिया करण्यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. लॅप्रोस्कोपी तंत्रामध्ये शरीराला छिद्र पाडून त्यातून दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव कमी होतो, शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असते, जखम तत्काळ भरून येणे, त्यामुळे अॅडमिट होण्यासाठीचा लागणारा वेळ कमी होणे, कमी वेदना, जखमेचे व्रण न राहणे असे या सर्जरीचे फायदे आहेत.

लॅप्रोस्कोपीच्या तंत्रातही वेगाने सुधारणा होत आहेत. यासाठी पाच मि.मी.चे छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून झडप बदलणे, हृदयाला असलेले छिद्र बंद केले जाते. मात्र, या शस्त्रक्रियेसाठी पारंपरिक उपकरणांचा वापर न करता यासाठी अद्ययावत उपकरणे वापरली जातात. त्यामुळे नेहमीच्या शस्त्रक्रियेपेक्षा यासाठी ५० हजार अधिक मोजावे लागतात. मात्र, ही शस्त्रक्रिया राजीव गांधी योजनेतून मोफत केली जाते. अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ही शस्त्रक्रिया केली जात असून, आतापर्यंत अशा प्रकारच्या तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांत लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण ३० टक्क्यांवरून ७० टक्के झाले आहे. मात्र, अजूनही ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ते अद्ययावत कौशल्य डॉक्टरांमध्ये असणे गरजेचे आहे. मुंबई, पुणे, नगरनंतर कोल्हापुरात लॅप्रोस्कोपीद्वारे बायपास शस्त्रक्रिया केली जात आहे.

'मीडकॅब'मुळे रुग्णांना शस्त्रक्रियेवेळी फारसा त्रास होत नाही. कोल्हापुरात अशा प्रकारची शस्त्रक्रिया यापूर्वी झालेली नसून प्रथमच येथे झाली आहे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी युके आणि बेंगळुरूमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रॅक्टिस केली आहे. लॅप्रोस्कोपीद्वारे बायपास करण्यासाठी अद्ययावत कौशल्य महत्त्वाचे आहे.'

डॉ. जी. टी. सुदर्शन, हृयविकारतज्ज्ञ, अॅपल सरस्वती हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंचे खुनी दहशतवादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुनातील संशयितांना अतिरेकी, दहशतवादी जाहीर करून सनातन संस्थेच्या अनुयायांची माहिती पोलिसांनी संकलित करावी. सीबीआयच्या अटकेतील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याचा ताबा घेऊन चौकशी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. बुधवारी पक्षाच्यावतीने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर एसआयटीने एका संशयिताला ताब्यात घेण्यापलीकडे तपासात फारशी प्रगती नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. भाकपच्यावतीने बुधवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना निवेदन देऊन तपासाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, 'सनातन संस्थेकडून पोलिसांच्या तपासाबाबत वारंवार बेताल वक्तव्ये होत आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. तपासावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक देशविघातक कारवायांमध्ये सनातन संस्थेच्या साधकांचा सहभाग स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अशा साधकांची माहिती संकलित करावी. डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुनातील आरोपींना दहशतवादी, अतिरेकी घोषित करावे. सनातनवर बंदी घालावी, सूत्रधारांना अटक करावी.'

भाकपचे सतीशचंद्र कांबळे यांनी सीबीआयच्या अटकेतील संशयित आरोपी डॉ. तावडे याचा ताबा घेण्यास एसआयटीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला. 'तपास रेंगाळत असल्याने गुन्ह्याचा उलगडा होईल की नाही, याबाबत साशंकता वाढत आहे' असे कांबळे म्हणाले.

यावेळी भाकपच्या कार्यकर्त्यांनी नांगरे-पाटील यांना कॉम्रेड पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाची प्रत भेट दिली, त्याचबरोबर मेघा कुलकर्णी आणि इंद्रजित कुलकर्णी या दाम्पत्याचा खून खटला चालवण्यासाठी अॅड. प्रकाश हिलगे यांची नियुक्ती करण्याचीही विनंती केली. यावेळी नारायण गावडे, अनिल चव्हाण, दिलावर मुजावर, बी. एल. बर्गे, आरती रेडेकर, सुनीता अमृतसागर, स्वाती क्षीरसागर, अरुण देवकुळे आदी उपस्थित होते.

आयजींनी घेतला तपासाचा आढावा

आयजी विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी सकाळी कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्याकडून आढावा घेतला. तपासाबाबत चर्चाही झाली. आवश्यक त्या सूचना त्यांना दिल्या असून, योग्य दिशेने तपास सुरू असल्याचेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात दम‘धार’

$
0
0


सोलापूर : शहर आणि जिल्ह्यात बुधवारी दुपारपासून झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांची अनेक वस्त्यांत पाणी घुसले. ग्रामीण भागात पडलेल्या समाधानकारक पावसाने खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासनू दडी मारलेल्या पावसाने बुधवारी दुपारी मुसळधार बरसायला सुरुवात केली. दिवस-रात्र शहरासह ग्रामीण भागातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तसेच माढा तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
सोलापूर शहरात पावसाने कहर केला. रात्रभर बरसलेल्या पावसाने शहराच्या मध्यवर्ती भागातील अरुंद ओढा वाहून त्याचे पाणी अवंतीनगर, वसंत विहार, गणेशनगर तसेच आनंदीनगर परिसरातील वस्त्यांमध्ये शिरले. या भागातील अनेक ठिकाणी तळी साचली. भागातील छोटा पूलसुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातून शहरात येणारा रस्ता बंद झाला. होटगी रोडवरील लोकमान्य नगर व ब्रह्मदेव नगरातील नागरिकांच्या घरात पावसाच्या पाण्याबरोबरच सापसुद्धा घरात आल्यामुळे नागरिकांची झोप उडाली.महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील आणि विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी या भागाची पाहणी करून पाण्याचा निचरा होण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावामध्ये वीस घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. पावसामुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळाला असला तरी शहरवासीयांची मात्र मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातसुद्धा मुबलक पाणीसाठा झाला आहे. या तालुक्यातून वाहणाऱ्या हरणा नदीलासुद्धा पाणी आल्यामुळे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.

पावसामुळे दाणादाण

- सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा तालुक्यांत पाऊस
- कुरनूर धरणात मुबलक पाणी
- सोलापुरातील अवंतीनगर, वसंत विहार, गणेशनगर, आनंदीनगर परिसरात पाणी
- धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथे वीस घरांची पडझड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोयनेत रिमझिम

$
0
0



कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गुरुवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. दिवसभरात शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात १३,३३१ क्युसेक पाण्याची आवक झाली. धरणात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.८३ टीएमसी पाणीसाठा होता.
पावसाचे सातत्य असले तरी प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठ्यात केवळ एक टीएमसीने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते गुरुवारी सायंकाळी पाच या काळात २४ तासांमध्ये कोयनानगर येथे १९ ( एकूण २१८२), नवजा ४८ (२७८४), महाबळेश्वर ३२ (२२२८) मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कोयना, पाटणसह कराड परिसरात पावसाने पूर्णपणे उसंत घेतली असली तरी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची रिमझिम सुरूच होती. नवजा येथील ओझर्डे धबधबाही ओसंडून वाहात आहे. सध्या धरणात क्षमतेच्या निम्मा पाणीसाठा असून, वीज निर्मिती कपात टळली आहे. पावसाने पुन्हा जोर धरल्यास १५ ऑगस्टपूर्वी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेनन’ करणार १५ कोटींची गुंतवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील पहिली लिस्टेड कंपनी असलेल्या मेनन बेअरिंग्जने आगामी वर्षात १५ कोटींची नव्याने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. बुशिंगच्या निर्मितीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार असल्याची माहिती कंपनीचे व्हाइस चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आर. डी. दीक्षित यांनी कंपनीच्या २५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

रेसिडेन्सी क्लबमध्ये झालेल्या सभेला कंपनीचे भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत भागधारकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना खेळीमेळीच्या वातावरणात उत्तरे देण्यात आली. त्याचबरोबर कंपनीने भागधारकांसाठी यंदा १०० टक्के डिव्हिडंट जाहीर केला असून, बोनस शेअर्सही देऊ केल्याचे दीक्षित यांनी जाहीर केले. कंपनीचे चेअरमन राम मेनन, सह व्यवस्थापकीय संचालक नितीन मेनन, संचालक सचिन मेनन आणि संचालक एम. एल. शिंदे उपस्थित होते.

कोल्हापुरातून १९९३मध्ये लिस्टेड झालेली पहिली कंपनी म्हणून मेनन बेअरिंग्जची ओळख आहे. सध्या कंपनी ऑटो कम्पोनंट क्षेत्रात आघाडीवर आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्या ८० रुपये असून, मार्केटमधील बी ग्रुपमध्ये कंपनी सध्या अग्रेसर असल्याचे दीक्षित यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितले. कंपनीचे बरेच प्रोडक्टस् ऑइल रिफायनरीजसाठी निर्यात होतात. मात्र, तेल क्षेत्रात वर्षभरात असलेल्या मंदीतही कंपनीने चांगला परफॉर्मन्स दिल्याची माहिती दीक्षित यांनी सभेत दिली. कंपनीला टॅक्स वजा करण्यापूर्वी २३ कोटी ३२ लाख रुपयांचा तर टॅक्स वजा करून १४ कोटी ८९ लाख रुपयांचा झाल्याची माहिती त्यांनी दिली. कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात ३० ते ४० टक्के विक्री वाढीचे उद्दीष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.

===

नव्या युनिटमध्ये कंपनीची उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या मनुष्यबळात १० टक्के मनुष्यबळाची भर पडणार असल्याने रोजगारनिर्मितीही होणार आहे. यासाठी १५ कोटींची गुंतवणूक होणार असून, यासाठी कंपनीकडील रिझर्व्ह फंड्स व काही छोट्या मुदतीतील कर्जातून निधी उभारण्यात येईल.

आर. डी. दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, मेनन बेअरिंग्ज

कौशल्य विकासासाठी 'सीएसआर'

कंपनी सध्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या (सीएसआर) माध्यमातून सामाजिक संस्थांसाठी काम करत आहेत. यात स्वयंम मतीमंद मुलांची शाळा, हेल्पर्स ऑफ हँडिकॅप, तसेच अपंग मुलांच्या स्पर्धा यासाठी कंपनीने आर्थिक सहकार्य केल्याची माहिती सभेत देण्यात आली. भविष्यात गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये 'गोशिमा' या उद्योजक संघटनेच्या माध्यमातून मल्टिपर्पज हॉल उभारण्यात येणार आहे. तेथे उद्योजकांना कर्मचाऱ्यांसाठी शॉर्ट टर्म अभ्यासक्रम, तसेच कंपनीच्या बैठका घेण्याची सोय असेल. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी कंपनी उभारणार असल्याची माहिती दीक्षित यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवारी केळीने गाठली शंभरी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

स्थानिक आणि परराज्यातून येणारी आवक कमी झाल्याने बाजारात जवारी केळीचा डझनाचा भाव १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जवारी केळीचा भाव वाढल्याने बहुतांशी ग्राहकांचा कल वसई केळी खरेदी करण्याकडे वाढला आहे. त्यामुळे या केळ्यांच्या दरात गेल्या आठवडाभरात चांगलीच वाढ झाली आहे.

उत्पादक प्रामुख्याने कांदेबाग आणि मृगबाग जातीच्या केळीची लागवड करतात. त्याची बारमाही आवक सुरू असते. हंगामी फळांच्या स्पर्धेला तोंड देत केळ्यांचे दर नेहमी कमी-अधिक होत असतात. श्रावण, दसरा आणि दिवाळी सणासह महाशिवरात्रीच्या पर्वावर केळीला चांगला भाव मिळतो. उर्वरित काळात केळीचे दर आवाक्यात असतात. त्यामुळे अन्य फळांपेक्षा केळीला प्राधान्य दिले जाते. यातही जवारी केळी खरेदी करणारा एक वेगळा वर्ग आहे. मात्र, गेले आठवडाभर दोन्ही प्रकारच्या केळ्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

शहरात आणि बाजार समितीत दररोज तीन ते चार टन केळीची आवक होते. कर्नाटकातून जवारी केळीची आवक एक ते दीड टन होते. दोन जुलैपासून दोन्ही प्रकारच्या केळ्यांची आवक बंद आहे. बुध‍वारपर्यंत (ता. ९ जुलै) एक टन आणि १९ जुलैलला एक टन केळीची आवक झाल्याची नोंद बाजार समितीत झाली. समितीमध्ये वसई (कच्ची केळी) दहा ते ११ हजार रुपये टन तर जवारी केळीची विक्री २० ते २२ हजार रुपये टन दराने झाली आहे. केळी पक्व झाल्यानंतर वजनात घट होत असल्याने दरात वाढ झाली आहे. जवारी केळीचा (एक डझन) दर ६० ते ७० रुपयांवरुन १०० ते १२० रुपयांपर्यंत पोहोचल तर वसई केळीचा सरासरी दर ४० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

०००

वसई, देशी केळीला प्राधान्य

जवारी केळीच्या लागवडीनंतर एका रोपापासून सुमारे १० ते १५ किलोचा एक घड तयार होतो. एक किलोला २० ते २२ रुपये दर मिळाल्यास यापासून २०० ते २५० रुपयांचे उत्पादन मिळते. वसई किंवा देशी केळीच्या एका रोपापासून ३० ते ३५ किलोचा घड तयार होतो. बाजारभावाप्रमाणे दहा रुपये किलो गृहीत धरल्यास त्यातून ३०० ते ३५० रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी, व्यापारी देशी किंवा वसई केळीला प्राधान्य देतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीतील एटीएममशिन फोडणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी



येथील स्टेट बँकेचे एटीएम मशिन फोडून २४ लाख रुपये लंपास केल्याप्रकरणी पोलिसांना चकवा देणारा आरोपी केदार बहादूरटंक भुजबळ (वय २६, रा.होलेवस्ती, उंड्री, पुणे) याला पकडण्यात गुन्हा अन्वेषण विभाग आणि भुदरगड पोलिसांना यश आले. मागील वर्षी सात जून रोजी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी रक्कम लंपास केली होती. यातील चोरट्यास पुण्यातील कोंडवा येथून अटक केली.

गारगोटी कोल्हापूर मुख्य मार्गावरील आबिटकर कॉम्प्लेक्स समोर स्टेट बँकेने दोन एटीएम मशिन सुरु केली होती. ही दोन्ही मशीन ७ जून २०१५ रोजी गॅस कटरच्या सहाय्याने कापून तब्बल २४ लाख ३५ हजार ६०० रुपये लंपास केले होते. यातील फक्त २० हजार हस्तगत करण्यात यश आले. या प्रकरणातील चार आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. मात्र यातील केदार बहादूरटंक भुजबळ याने बऱ्याचदा पोलिसांना चकवा दिला होता. पण केदार हा पुण्यात कोंडवा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना कळताच अप्पर अधीक्षक दिनेश बारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक एन.बी लोणकर, पोलीस सुरेश मेटील, संजय पाटील यांच्या पथकाने गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने पुण्यातील कोंडवा परिसरात शोध मोहीम राबवून त्यास अटक केली. त्याला प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्सयांमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर सुरक्षेचा प्रस्ताव अद्याप फाइलबंद

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन अधिकारी आणि १०२ पोलिसांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव सव्वा दोन वर्षापूर्वी राज्य सरकारला पाठवला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या मंदिरात पोलिस चौकी असावी, अशी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. देशात एखादी घटना घडली की सुरक्षेत वाढ केली जाते. मात्र, कायमस्वरुपी उपाययोजनेकडे गृह मंत्रालय दुर्लक्ष करत आहे.

अंबाबाई मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा अहवाल यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला होता. एटीएस, एनआयएच्या सूचनेनुसार मंदिरात सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. चारही दरवाजावर मेटल डिटेक्टर, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, ज्या गांभीर्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने अहवाल दिला आहे त्याच्या अगदी उलट सुरक्षा व्यवस्था येथे असल्याचे निदर्शनास येते. मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने चारही दरवाजात सिमेंटचे मोर्चेही बांधले आहेत.

मंदिराची भिंत वाढवावी, मंदिराजवळची अतिक्रमणे हटवावीत. रस्ते आपत्कालीन योजनेच्यादृष्टीने सुसज्ज ठेवावेत, अशी सूचना केली आहे. पण या सूचनेकडे जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अद्याप कार्यवाही केलेली नाही.

पोलिस प्रशासनाने मात्र सव्वा दोन वर्षांपूर्वी तत्कालिन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन अधिकारी आणि १०२ पोलिसांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी पाठवला होता. त्यांनी हा प्रस्ताव राज्याच्या गृहखात्याकडे पाठवला आहे.

सध्या अंबाबाई मंदिरात एक पोलिस उपनिरीक्षक व दोन शिफ्टमध्ये चारही दरवाजावर एक महिला व दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्तास आहेत. ३६ पोलिस कर्मचारी तीन शिफ्ट कर्मचाऱ्यांवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेची धुरा आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्याचा ताण जुना राजवाडा पोलिसांवर पडत आहेत. वाढत्या दहशतवादी कारवाया, पर्यटक व भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने जादा पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रस्ताव मंजूर केल्यास अंबाबाई मंदिराला सुरक्षा कवच मिळू शकेल.

कोल्हापूरबद्दलच दुजाभाव का?

तत्कालीन पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या कक्षेत सोलापूर ग्रामीण हा भाग येत असल्याने त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेसाठीही २०० पोलिसांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. तसेच तुळजापूर मंदिरासाठी ७२ पोलिसांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव औरंगाबाद परिक्षेत्रानेही पाठवला. दोन्ही प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केले असून पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तुळजापूर व पंढरपूर येथे वाढीव पोलिस बंदोबस्त करत आहेत. एकीकडे तुळजापूर व पंढरपूर तीर्थक्षेत्राचे प्रस्ताव मंजूर झाले असताना अंबाबाई मंदिर सुरक्षेचा प्रस्ताव गृहखात्याकडून गेले सव्वा दोन वर्षे प्रलंबित आहे.

हायअलर्टवेळीच कडक बंदोबस्त

ज्यावेळी राज्य सरकारकडून हायअलर्टचा आदेश येतो तेव्हा अंबाबाई मंदिरात कडक बंदोबस्त ठेवला जातो. बंदूकधारी पोलिस अंबाबाई देवळात पाचारण केले जातात. यावर्षी २६ जानेवारी रोजी राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला होता. यापूर्वी याकूब मेमन फाशी कार्यवाही (जुलै २०१५), पंजाबमध्ये अतिरेकी हल्ला (जुलै २०१५), पुण्यात बॉम्बस्फोट (ऑगस्ट २०१२), दिल्ली हायकोर्टाबाहेर स्फोट (२०११) यावेळी हायअलर्ट देण्यात आला होता. अतिरेकी हल्ल्याची सूचना दिल्यावर हायअलर्ट जारी करण्यात येतो. गणेशोत्सव, दिवाळी, महाशिवरात्री, नवरात्र या सणाच्यावेळी हायअलर्टचा आदेश असतो.

कन्यागत पर्वावेळी होणार गर्दी

नृसिंहवाडी कन्यागत पर्वकाल १३ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. कन्यागत पर्वासाठी भाविक मोठ्या संख्येने येणार आहे. नृसिंहवाडी येथील दर्शनानंतर भाविक अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेवर ताण पडण्याची शक्यता आहे. कन्यागत पर्वानंतर एक ऑक्टोबरला नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षिततेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्री व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images