Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराड खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

$
0
0



कराड : पश्चिम महाराष्ट्रात तालुका पातळीवरील खरेदी-विक्री संघामध्ये अग्रेसर असलेल्या येथील कराड तालुका खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्याकडे या संघाची सत्ता आहे.
कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी १० जून रोजी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सोमवारी (१३ जून) छाननीत सर्व अर्ज वैध असल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे शिक्कामोर्तब झाले. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २० जून रोजी होईल. नव्या संचालक मंडळामध्ये पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळाली असून, बारा जणांना प्रथमच संधी मिळणार आहे.
नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वसाधारण गटातून विद्यमान अध्यक्ष हणमंतराव चव्हाण (साजूर), उपाध्यक्ष महेशकुमार जाधव (उंब्रज), जगन्नाथ मोहिते (बेलवडे बुद्रुक), बाळासाहेब जाधव (पाडळी), प्रकाश पवार (हजारमाची), रंगराव थोरात (कार्वे), जगन्नाथ भोसले (खोडशी), संपतराव सुर्वे (आबईचीवाडी), लालासाहेब पवार (गोंदी), तुकाराम पाटील (नांदगाव), जगन्नाथ मोरे (कापील), अनिल मोहिते (तळबीड). महिला प्रतिनिधी गटातून वैशाली यादव (कवठे), रंजना पाटील (कोळे). आरक्षित गटातून संभाजी शिर्के (नांदलापूर), पांडुरंग हिंगसे (निगडी), दयाराम काळोखे (चचेगाव) यांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना अटपलवार, शिरीष कदम यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायीत फुटला ‘पर्चेस’चा बॉम्ब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्चेस नोटीसच्या माध्यमातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याची चर्चा वेगावली असताना गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही त्याचे पडसाद उमटले. नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनी सध्या फिरत असलेल्या निनावी पत्राचा उल्लेख करून याप्रकरणी नगरसेवकांची बदनामी सुरू झाली आहे. या पत्रामध्ये स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या नावाचा उल्लेख आहे. या लोकप्रतिनिधींची खरोखर बदनामी सुरू असेल तर या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी सुभेदार यांनी केली. सुभेदार यांच्या या मागणीमुळे पत्रातील नामोल्लेख खुला झाला.

निनावी पत्रामुळे महापालिका व सदस्यांच्या बदनामीचा प्रयत्न दिसतो. सभागृहातील अनेक सदस्य नवीन आहेत. मात्र सीनिअर नगरसेवकांचा पत्रात थेट उल्लेख आहे. हा सगळा काय प्रकार आहे, अशी विचारणा सुभेदार यांनी सभेच्या प्रारंभीच केली. नगरसेवकांची जाणूनबुजून बदनामी केली जात असेल तर संबंधितावर कारवाई का करत नाही. या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्याचे आदेश द्या, अशी मागणी त्यांनी सभापती जाधव यांच्याकडे केली. सभेत अचानक पर्चेस नोटीसचा विषय निघाल्याने नूरच पालटला. सभापती जाधव यांनाही या प्रश्नावर काय उत्तर द्यावे, हे सुचेनासे झाले. या पत्रात आरक्षित जागा, पर्चेस नोटीसची प्र​क्रिया, यामध्ये काही मंडळीकडून होणारा हस्तक्षेप आणि महापालिकेला होणारे नुकसान याचा तपशील दिला आहे. या पत्रात नगरसेवकासह स‌त्ताधारी आणि विरोधी आघाडीतील दोन नेत्यांच्या नावाचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

विश्वा कंपनीला नोटीस, ११ कोटीचा दंड

स्थायी सभेत शहरातील कचऱ्याचा प्रश्न, नाला सफाई, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा विषय निघाला. एसटीपी प्रकल्पाचे काम विश्वा इन्फ्रा कंपनीने मुदतीत केले नसल्याने कंपनीला ब्लॅकलिस्ट का करण्यात येऊ नये, अशी नोटीस काढल्याचे प्रशासनाने सांगितले. कंपनीची चार कोटी ५० लाख रुपयांची बँक गॅरंटी व १५ कोटीची देणे थकविली आहेत. आतापर्यंत कंपनीला ११ कोटी, ४२ लाख रुपये दंड केला आहे. दंडाची रक्कम बँक गॅरंटीमधून वसूल केली जाणार आहे. एसटीपीची देखभाल व चालविण्यासाठी लवकरच निविदा काढली जाईल, असे उत्तर यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना, भारत हाउसिंग सोसायटीमधील विद्युत दिव्यांची दुरवस्था, रविवार पेठेतील कचरा उठावचा प्रश्न यावरील चर्चेत सूरमंजिरी लाटकर, अजित ठाणेकर, सत्यजित कदम, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, उमा इंगळे, निलोफर आजरेकर, नीलेश देसाई यांनी सहभाग घेतला. देसाई यांनी महावीर कॉलेज, कसबेकर पार्क परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या निदर्शनास आणली. सुभेदार यांनी शाहू समाधीस्थळाच्या कामाकडे लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांसह वडिलांना जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छेडछाड प्रकरणात मुलीच्या वडिलांचा खून करणाऱ्या तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी (ता. १६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर मयताच्या वारसांना दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेशही न्यायाधीशांनी दिला. राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे २५ ऑक्टोबर, २०१२ मध्ये ही घटना घडली होती.

ठिकपुर्ली येथील विश्वास देवेंद्र कांबळे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार त्यांच्याच गल्लीत शेजारी राहणाऱ्या निशांत नंदू कांबळे (वय २३) याने केला होता. यावरून या दोन कुटुंबात जोरदार वादावादी झाली होती. या वादातून विश्वास कांबळे यांना निशांत कांबळे यांनी ठार मारण्याची धमकीही दिली होती, मात्र ही धमकी गांभीर्याने न घेता विश्वास कांबळे वावरत होते. २५ ऑक्टोबर, २०१२ रोजी मात्र निशांत कांबळे याने विश्वास कांबळे यांच्यावर हल्ला चढवला. त्याचा भाऊ राहुल (२५) आणि वडील नंदू ईश्वरा कांबळे (४८) यांनीही यावेळी विश्वास कांबळे यांना काठीने आणि चाकूने मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेले विश्वास कांबळे यांचा उपचारादरम्यान दोन नोव्हेंबरला मृत्यू झाला. यासंदर्भात तानाजी कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राधानगरी पोलिसांनी तपास केला. त्यानुसार जिल्हा सत्र व न्यायालयात याबाबतचे १४ साक्षीदार तपासले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून न्यायालयाने आज या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर प्रत्येकी सहा हजार रुपये दंड ठोठावला. यापैकी पाच हजार रुपये विश्वास कांबळे यांच्या पत्नी नंदा यांना देण्याचा निर्णय न्यायाधीश पी. एम. खंबायते यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंसिद्धातर्फे महिला स्वावलंबनावर पुरस्काराची मोहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि त्यांना उद्योगाचे धडे देण्यासाठी गेल्या दोन तपांपासून काम करणाऱ्या स्वयंसिद्धा संस्थेतर्फे विविध क्षेत्रात स्वावलंबी जीवन जगून इतर महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या महिलांना गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यंदा राजस्थान येथील दुर्गम भागात परिवर्तन घडवणाऱ्या उद्यो​जिका मीरादेवी चौधरी यांना 'परिवर्तनदूत' या पुरस्काराने गौरवण्यात आले. स्वयंसिद्धाच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात आले. बुधवारी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी स्वयंसिद्धाच्या संचालिका कांचन परूळेकर होत्या.

सेवाभावी डॉक्टर सूर्यकिरण वाघ यांना यंदाचा डॉ. शोभना तावडे मेहता आरोग्यम धनसंपदा पुरस्कार देण्यात येणार आला. हस्तकलाकार मेघना कामत यांना कै. स्मिता कोरगावकर पुरस्कार देण्यात आला. यावेळी मीरादेवी चौधरी यांची प्रेरणादायी यशकथा ऐकण्याची संधीही कोल्हापूरकरांनी मिळाली. तसेच अनेक गरजू मुलींना आर्थिक मदत करण्यात आली. स्वयंसिद्धातर्फे वंदना उपाध्ये आणि पद्मश्री तेरदाळे यांना उत्तम उद्योजिका म्हणून गौरवण्यात आले. सत्यवती तावडे आधार सेवानिधी राजलक्ष्मी पवार आणि तारा दिवेकर यांना देण्यात आला.

प्रास्ताविक तृप्ती पुरेकर यांनी केले. अर्पिता साधले यांनी स्वयंसिद्धा गीत सादर केले. श्रीया राव आणि ग्रुपने भरतनाट्यम्‍ नृत्य सादर केले. यावेळी महिला सबलीकरण या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. शीतल माने यांनी निवेदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाम फाउंडेशनला ६५ हजाराची मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समर्पण व मंथन फांउडेशनच्यावतीने आयोजीत केलेल्या स्वरमोहिनी व नाट्यरंग या कार्यक्रमातून जमलेला ६५ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून 'नाम' फांउडेशनाला देण्यात आला. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्याकडे हा निधी सोपवण्यात आला.

समर्पणचे अजिंक्य शिंदे व कोणार्क शर्मा तसेच मंथन फाउंडेशनच्या स्मिता माने यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बॅक टू स्कूल, राजा व दि सीरियस केस ऑफ या नाट्यकृतींचा नाट्यरंग कार्यक्रम तसेच नव्या व जुन्या हिंदी, मराठी गीतांची स्वरमोहिनी ही मैफल घेण्यात आली होती. ३१ मे रोजी ही सांस्कृतिक मेजवानी कोल्हापूरकरांसाठी देण्यात आली होती. त्याला भरभरुन प्रतिसादही दिला. यातून जमा झालेला ६५ हजार रुपयांचा निधी 'नाम' फाउंडेशनला देण्याचे 'समर्पण व मंथन' च्या कार्यकर्त्यांनी निश्चित केले होते. त्यानुसार 'नाम' च्या नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुण्यात भेटून हा निधी सुपूर्द करण्यत आला. याप्रसंगी अजिंक्य शिंदे, कोणार्क शर्मा, स्मिता माने, राहुल साळुंखे, निसर्गराज बसरे, अक्षय जाधव, तेजस कोळी, अमित यादव, अभिजीत खाबडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्यांसोबत पालिसांची ओली पार्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर रुग्णालयातील कैदी वॉर्डमध्ये पोलिसांचीच कैद्यांसोबत ओली पार्टी सुरू असताना लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ड्युटीवरील चार पोलिस दोषी आढळले. चारही दोषी पोलिसांच्या चौकशीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी दिली. तर कैद्यांच्या साथीदाराकडून मोक्काअंतर्गत कारवाईतील आरोपीला पळविण्याचाही प्लॅन फसला आहे. यातील तीन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे येथील गज्या मारणे टोळीतील सोमप्रशांत मधुकर पाटील हा गुंड मोक्काअंतर्गत कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. मूत्रनलिका आणि हृदयविकाराच्या त्रासामुळे १३ मे पासून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयाच्या कैदी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. जेलमध्ये असताना खुनाच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला कोल्हापुरातील गुन्हेगार संजय कदम यांच्याशी सोमप्रशांत पाटील याची ओळख झाली होती. पॅरोलवर सुटलेल्या कदम याने बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कैदी वॉर्डमध्ये येऊन ड्युटीवरील सहायक फौजदार बाबुराव चौगुले आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती पाटील यांना पार्टीचे आमिष दाखवून कैदी वॉर्डमध्येच ओली पार्टी करण्याची गळ घातली. रुग्णालयाच्या रुममध्येच बारप्रमाणे व्यवस्था करून मध्यरात्री पार्टी सुरू असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप सावंत यांना मिळाली. त्यानुसार सावंत, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे यांच्यासह पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिस आल्याचे समजताच सोमप्रशांत पाटील याचे साथीदार संजय कदम, जगदीश बाबर आणि अभिजित चव्हाण या तिघांनी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उड्या टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात या दोघांचा पायाला दुखापत झाली. तर एकाचा हात मोडला. पोलिसांनी संजय दिनेशराव कदम (वय ५२, रा. राजारामपुरी), दिग्विजय शिवाजीराव पोवार (३७, रा. सनसिटी, न्यू पॅलेस परिसर), जगदीश प्रभाकर बाबर (४४, सुभाष रोड, मंडलिक वसाहत) आणि सोमप्रशांत मधुकर पाटील (४४, रा. बालेवाडी, पुणे) या चौघांना अटक केली आहे. दोन्ही पोलिसांनाही लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, कैदी सोमप्रशांत पाटील याला रुग्णालयातून पळवण्याचा प्लॅन संशयितांनी केला होता. यासाठीच ड्युटीवरील पोलिसांनाच दारू देऊन त्यांना नशेत ठेवून कैद्याला पळवण्याचा त्यांचा प्लॅन होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे संशयितांचा हा प्लॅनही उधळला आहे.

पोलिसांवर होणार निलंबनाची कारवाई

कैदी वॉर्डमध्ये बंदोबस्तासाठी असलेले सहायक फौजदार बाबुराव चौगुले आणि पोलिस कॉन्स्टेबल मारुती पाटील या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याशिवाय ड्युटीवरील दोन कर्मचारी गैरहजर असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. गैरहजर पोलिसांवरही कारवाई होणार आहे.

सोमप्रशांत पाटील हा मोक्कातील गुन्हेगार

सोमप्रशांत पाटील हा पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गज्या मारणे याच्या टोळीतील गुन्हेगार आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. पुण्यातील येरवडा कारागृहातून कळंबा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. गज्या मारणे टोळीचे २५ गुंड सध्या कळंबा कारागृहात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बेसिक लाइफ सपोर्टचे ज्ञान सामान्यांपर्यत पोहचवणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बेसिक लाइफ सपोर्टचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणार असून या प्रशिक्षणामुळे हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांना जीवनदान मिळू शकेल,' असा विश्वास केएमएचे अध्यक्ष डॉ. प्रविण हेंद्रे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात बेसिक लाइफ सपोर्ट आणि अॅडव्हान्स कार्डअॅक लाइफ सपोर्ट या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

या कार्यशाळेमध्ये अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास घ्यावयाचा प्राथमिक उपचार व पेशंट आयसीयूमध्ये दाखल झाल्यावर अत्याधुनिक उपचार याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कोर्ससाठी अमेरिकन हार्ट असोसिएशन प्रमाणपत्र देण्यात आले. याचे प्रशिक्षण देण्यासाठी सिम्बॉयसिस विद्यापीठातून डॉ. वैजयंती गांधी, डॉ. रवींद्र विश्वकर्मा, अबोली बोरावके, मोना शहा, गोपाळ कुलकर्णी, विशाल चोकाकर व अमोल कोडोलीकर उपस्थित होते.

यावेळी सचिव आर. एस. कुलकर्णी, राजेंद्र अभ्यंकर, विविध हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व स्टाफनर्स उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवप्रसाद तेलींचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलला गेली चार वर्षे शिक्षक मिळत नसल्याच्या कारणावरुन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण समिती सदस्य शिवप्रसाद तेली यांनी सदस्यपदाचा गुरुवारी राजीनामा दिला. दिलेला राजीनामा शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे फाडून टाकला. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकरण मिटले, असे सांगत असतानाच पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले आणि शिवप्रसाद तेली यांच्यात वादावादी झाली.

जिल्हा परिषदेत गेल्या आठवड्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले आणि शिक्षण समितीचे सदस्य यांच्यातील वाद रंगला. सभाच झाली नसताना प्रशासनाने इतिवृत्त लिहण्याचा आरोप करीत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले होते. गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिक्षण समितीचे सदस्य तेली आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी चौगुले यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले.

शिवप्रसाद तेली म्हणाले, 'गेली चार वर्षे शिक्षण विभागाचा अनुभव वाईट आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम या ठिकाणी केले जात नाही. विभागातील लिपिकही पैसे दिल्याशिवाय काम करीत नाहीत. एम. आर. हायस्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहे. या ठिकाणी पूर्वी तीन महिला शिक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र त्यापैकी एकही हजर नाही. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी करुनही शिक्षक दिला जात नाही. त्यामुळे कार्यपद्धतीला कंटाळून राजीनामा दिला आहे.' दरम्यान राजीनाम्याचा प्रकार घडला नसल्याचे शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून हायस्कूलमधील चार शिक्षकांच्या जागी अतिरिक्त झालेले शिक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले.

कोट

'शिक्षण समिती सदस्यांची बैठक १८ जूनला होत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शनिवारी होत असलेल्या बैठकीस हजर राहणार नाही. विभागात असाच अनुभव येत असेल तर यापुढे समिती सदस्य म्हणून काम करण्याची काहीच गरज नाही. वैतागून राजीनामा दिला आहे.

शिवप्रसाद तेली, समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावीसाठी आठ हजार अर्ज विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अकरावी प्रवेशासाठी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी गुरूवारी १७ जून रोजी ८ हजार ९९६ अर्जांची विक्री झाली तर ८१९ अर्ज संकलित झाले. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार गुरूवारी शहरातील सर्व कनिष्ठ कॉलेजवर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच अर्ज वितरण केंद्रावर अर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी केलेल्या गर्दीमुळे रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता.

गेल्यावर्षी पहिल्यादिवशी अर्ज विक्रीची संख्या ८ हजार २९८ होती. त्यामुळे यंदा पाचशेने हे प्रमाण पहिल्या दिवशी वाढले असून शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी तीन शाखांमध्ये १३ हजार ४०० प्रवेश क्षमता उपलब्ध आहे. एकूण अर्जविक्रीपैकी विज्ञानशाखेसाठी ४ हजार ९४३, कला शाखेसाठी १ हजार, १८६ तर वा​णिज्य शाखेसाठी २ हजार, ८३७ अर्जांची विक्री झाली. सहा संकलन केंद्रावर पहिल्या दिवशी ८१९ अर्ज संकलित झाले.

अकरावीप्रवेशासाठी आजपासून सहा केंद्रांवर अर्ज विक्रीला सुरूवात झाली. यामध्ये कोल्हापूर हायस्कूल, स. म. लोहिया हायस्कूल, कमला कॉलेज, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज या अर्जविक्री केंद्रांचा समावेश आहे.


विद्यार्थ्यांना काहीही शंका असल्यास केंद्रावरील तक्रार निवारण केंद्रातील समन्वयक मदत करत असल्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. येत्या दोन दिवसात या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची शक्यता गृहित धरून अर्ज विक्री व संकलन केंद्रातील व्यवस्थापनाबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे

​ एम. के. गोंधळी, ​शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिस्तूलवाला अकोलकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला महत्त्वाची माहिती देणाऱ्या साक्षीदाराने 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना हत्येच्या कटाबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले. हत्येच्या कटात ओढू पाहणाऱ्या तावडेबद्दल साक्षीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारेच सीबीआयने संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. गेल्या सात वर्षांपासून हत्येचा कट रचला जात होता, त्याचबरोबर याच्या अंमलबजावणीसाठी अतिशय गोपनीयरित्या कामकाज सुरू होते. हत्या घडवण्यासाठी शस्त्रंही तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या कटात अनेकांचा सहभाग असून, कोल्हापूरसह परिसरातील जिल्ह्यांतील अनेकांचा यात समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. येणाऱ्या काही दिवसांत यातील आणखी काही धक्कादायक माहिती पुढे येईल, असा दावा साक्षीदाराने केला आहे. दरम्यान, तावडे याला अटक केल्यानंतर त्याला साक्षीदारापुढे उभे करण्यात आले. यावेळी या दोघांच्या भेटी झाल्याचे तावडेने मान्य केले.

तावडे आणि साक्षीदाराची भेट

साक्षीदार हा कोल्हापुरातील मूळचा रहिवाशी असून, त्यांच्या घरीच धार्मिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची उठबस होती. तरुण वयातच ते धार्मिक आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांमधील आक्रमक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. याच दरम्यान तावडे हा सनातन संस्थेचा जिल्हा संघटक म्हणून कोल्हापुरात दाखल झाला. तावडे आणि संबंधित साक्षीदाराने काही वर्षे एकत्रित काम केले. याच दरम्यान शहरात तोडकर महाराजांचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात साक्षीदार आणि त्यांच्या इतर मित्रांनी तोडकर महाराजांच्या विरोधात भूमिका घेतली. अशा महाराजाला कोल्हापुरात राहू द्यायचे नाही, असे म्हणत सनातनच्या गुप्त बैठकीत साक्षीदार अक्रमक बनले होते. यावेळी तावडे याने साक्षीदाराची समजूत घालून त्यांना रोखले. या घटनेनंतर तावडे आणि साक्षीदारामध्ये फारसा संपर्क नव्हता. २००९ नंतर तावडे आणि साक्षीदाराची प्रत्यक्षात दोनवेळा भेट झाली, तर मोबाइलवरून अनेकदा संपर्क झाला आहे.

साक्षीदाराचा व्यवसाय आणि तावडेचे निरीक्षण

सन २००८ च्या सुमारास साक्षीदाराने धार्मिक कामातून लक्ष काढले आणि पूर्णवेळ व्यवसायात लक्ष घातले. त्यामुळे तो व्यस्त होता. एखादी वस्तू दिल्यानंतर ती जशीच्या तशी तयार करण्याचे कौशल्य या साक्षीदाराकडे आहे. त्यांनी अनेकदा रेडिओ, टेपरेकॉर्डर अशा वस्तू बनवण्याच्या प्रयत्न केला होता. तावडे याने साक्षीदाराचा हाच गुण हेरून त्यांच्याकडे पिस्तूल बनवण्याचे काम सोपवले होते. पुढे तावडे याने पिस्तूलच्या गोळ्या उपलब्ध करण्यासही साक्षीदाराला सांगितले होते. तावडे हा सांकेतिक भाषेत पिस्तूलचा उल्लेख 'वस्तू' आणि गोळ्यांचा उल्लेख 'चॉकलेट' असा करीत होता.

तावडेने दिली दोन पिस्तुले

सन २००८ पासून कोल्हापुरातून गायब झालेला तावडे एप्रिल २०१३ मध्ये साक्षीदाराच्या भेटीला कोल्हापुरात आला. साक्षीदाराला नुकताच हार्ट अॅटॅक आला होता, त्यामुळे विचारपूस करण्याच्या निमित्ताने आलेल्या तावडे याने नव्या जोमाने धार्मिक कामात सक्रीय होण्याची विनंती केली. 'धार्मिक कामासाठीच देवाने नव्याने आयुष्य दिले आहे असे समजून धर्माचे काम करा. आपण सोबत काम करूया', असे सांगितले. यानंतर आठवड्याभरात पुन्हा तावडे याचा फोन आला. 'एका गोपनीय कामासाठी दोन विश्वासू माणसं हवी आहेत. त्यांना प्रत्येकी दहा लाख रुपये देऊ आणि त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यांच्या कुटुंबाचीही जबाबदारी घेऊ', अशी माहिती त्यांनी मोबाइलवरून दिली. याशिवाय एक वस्तू (पिस्तूल) बनवण्याचेही काम तुमच्यावर सोपवत असल्याचे त्याने सांगितले. यानंतरच चारच दिवसात तावडे याने साक्षीदाराला फोन करून शाहूपुरी रेल्वे फाटक येथे बोलवले. त्याठिकाणी असलेल्या एका व्यक्तीची भेट घडवून दिली. पुन्हा चार दिवसाने तीच व्यक्ती साक्षीदाराच्या कारखान्यात आली. शबनम बॅगमधून आणलेले एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर त्याने साक्षीदाराकडे सोपवले. ही व्यक्ती म्हणजेच सारंग आकोलकर असल्याचे साक्षीदाराने सांगितले.

पिस्तूल तयार करण्याची जबाबदारी साक्षीदाराकडे

साक्षीदाराचे कारागिरीतील कौशल्य लक्षात घेऊनच तावडे याने पिस्तूल बनवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. पिस्तूल बनवण्यासाठी एखादे पिस्तूल खोलून पाहावे लागेल, असे सांगितल्यानंतर तावडे यानेच पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरची उपलब्धता केली. शाहूपुरी रेल्वे फाटक येथे भेट घडवून दिलेल्या व्यक्तीनेच मे २०१३ मध्ये साक्षीदाराच्या कारखान्यात पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर पोहोच केले होते. साक्षीदाराने मात्र या कामासाठी वेळ मिळाला नसल्याचे सांगत टाळाटाळ केली.

रेकीसाठी पाठवले दोन तरुण

दोन व्यक्तींची राहण्याची सोय करण्याची विनंती तावडे याने साक्षीदाराला केली होती. याबाबत संशय आल्याने साक्षीदाराने तावडे याला दोन्ही तरुणांची पार्श्वभूमी विचारली. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचा निर्वाळा तावडे याने दिला. त्यांना 'फक्त राहण्याच्या जागेची व्यवस्था करा. ते शहरातील काही लोकांची माहिती गोळा करणार आहेत. घर, ऑफिसात जाण्याची आणि फिरायला जाण्याची वेळ, बाजारात जाण्याची वेळ याची माहिती घेणार आहेत ' असे तावडे याने साक्षीदाराला सांगितले. यानुसार जुलै २०१३ मध्ये पाठीवरती सॅक आणि डोक्यावर टोपी असलेले दोन तरुण साक्षीदाराच्या दुकानात पोहोचले. ऐनवेळी राहण्याची सोय झाली नसल्याचे साक्षीदाराने सांगितल्याने ते दोन्ही तरुण निघून गेले. यानंतर तावडे याने साक्षीदाराला भेटण्याचा प्रयत्न केला, साक्षीदाराने टाळाटाळ केल्याने या दोघांची भेट झाली नाही.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर साक्षीदाराला उलगडा

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर साक्षीदाराला तावडे याच्या वर्तनाचा उलगडा झाला. कोल्हापुरात रेकी आणि पुण्यात हत्या झाल्याने साक्षीदारही चक्रावले होते. त्यांनी तातडीने विजय पाटील या पोलिस मित्रास फोन करून माहिती दिली. पोलिसांकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने साक्षीदारही शांत राहिला. मात्र १६ फेब्रुवारी, २०१४ रोजी कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांना तावडेचा संशय आला. याही घटनेनंतर साक्षीदाराने पोलिसांशी संपर्क साधला. तावडे याचा कोल्हापुरातील वावर, त्याच्याकडून सुरू असलेली शस्त्रांची जमवाजमव, कोल्हापुरात केलेली रेकी या सर्वांची संगती लावल्यानंतर त्याच्यावरील संशय आणखी बळावत होता, त्यामुळे पानसरेंच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी साक्षीदाराने राजारामपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी भेट घेतली होती.

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर साक्षीदाराने पोलिस दलातील मित्राकरवी पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. विजय पाटील आणि सुनील जवाहिरे या दोन कॉन्स्टेबलना माहिती देली. याला प्रतिसाद मिळाला नाही. पानसरे यांच्या हत्येनंतर तातडीने दुसऱ्या दिवशीच साक्षीदाराने पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेतली. देशमुख यांनी सर्व माहिती तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना सांगितली. त्याच दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्या घरासमोरील एका बंगल्यात गोयल, देशमुख आणि साक्षीदाराची बैठक झाली. आठ महिन्यांपूर्वी तत्कालीन तपास अधिकारी एस. चैतन्य यांनीही साक्षीदाराची चौकशी केली. विशेष म्हणजे एटीएसच्या अधिकाऱ्यांनीही साक्षीदारास कराड येथे बोलवून घेऊन त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतरही संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई झाली नाही.

सीबीआयला मिळाली माहिती

स्थानिक पोलिसांसह एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केल्यानंतर साक्षीदाराकडील माहिती त्याच्या दोन मित्रांनी एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास दिली. संबंधित अधिकाऱ्याने सीबीआयला कळविल्यानंतर १२ फेब्रुवारी, २०१६ रोजी सीबीआयचे अधिकारी थेट साक्षीदाराच्या कोल्हापुरातील कारखान्यात पोहोचले. साक्षीदाराकडून माहिती घेतल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याची खातरजमा केली. गेली तीन महिने यातील संशयित तावडेवर नजर ठेवून अखेर एक जून २०१६ रोजी तावडेच्या घरावर छापा टाकला. १० जूनला अटकेची कारवाई केली. दोन दिवासांपूर्वीच सीबीआयने साक्षीदाराला पुन्हा मुंबईला नेऊन तावडेसमोर उभे करून तावडेची चौकशी केली. या चौकशीत तावडे आणि साक्षीदाराच्या अनेकदा झालेल्या भेटी आणि फोन कॉल्ससंदर्भात तावडे याने कबुली दिली आहे. दरम्यान सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रेकी करणारे तरुण आणि पिस्तूल घेऊन आलेल्या संशयितांच्या शोधासाठी साक्षीदारासमोर दहा छायाचित्रे ठेवली. यातील सारंग आकोलकर याचे छायाचित्र साक्षीदाराने ओळखले असून, तोच पिस्तूल घेऊन आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता कोल्हापूर पोलिसांच्या तपासालाही गती आली असून, लवकरच आणखी काही संशयितांनाही ताब्यात घेण्याची शक्यता बळावली आहे.

एका पोलिस अधिकाऱ्यानेही मदत केल्याची चर्चा

तावडे याला कोल्हापूर विभागातील एका पोलिस अधिकाऱ्यानेही वेळोवेळी मदत केल्याची माहिती सीबीआयच्या तपासात उघडकीस आली आहे. पिस्तूल तयार करण्यासाठी तावडे याने एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल साक्षीदाराकडे दिले होते. ही दोन्ही शस्त्रे तावडे याला कोणाकडून मिळाली? याचा सीबीआय शोध घेत आहे. तावडेला मदत करणारा तो पोलिस अधिकारीच असावा अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

यांना भेटला साक्षीदार

पोलिस कॉन्स्टेबल विजय पाटील

पोलिस कॉन्स्टेबल सुनील जवाहिरे

पोलिस निरीक्षक अमृत देशमुख

तपास अधिकारी अंकित गोयल

तपास अधिकारी एस. चैतन्य

एटीएसचे अधिकारी(नाव माहित नाही)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात पावसाची संततधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापुरात रविवारी मान्सूनचा पाऊस दाखल झाला. रविवारी दिवसभर पावसाने चांगलीच हजेरी लावली. पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

आठवडाभरापूर्वी सोलापुरात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. सर्वत्र पाणीपाणी झाले होते. ग्रामीण भागात करमाळा, माढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माळशिरस आदी तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना यंदा चांगली साथ मिळणार असल्याचे बोलले जात होते. सुरुवातीच्या पावसाने चांगली सुरुवात केल्यानंतर सुखावलेल्या बळीराजाने खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामालाही सुरुवात केली होती. परंतु, अचानक आठवडाभर पावसाने दांडी मारली त्यामुळे पुन्हा बळीराजाच्या चिंतेत भर पडली.

दरम्यान, शनिवारपासून शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी सातवाजेपर्यंत सुरू होता. रात्रभर पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी ढग भरून आले आणि सहा वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत शहर आणि परिसरात पावसाची संततधार सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अधिकाऱ्यांसहबारा पोलिस निलंबितकराड पोलिस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी कारवाई

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला संशयित रावसाहेब लक्ष्मण जाधव (वय ४२, रा. निंबोरे ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या कराड शहर पोलिस स्टेशनमधील कोठडीत शनिवारी झालेल्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिस अधिकारी व आठ कॉन्स्टेबल अशा बारा जणांना रविवारी निलंबित करण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. कोणताही गुन्हा दाखल न करता संशयिताकडे चौकशी सुरू केलेले कराड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह कॉन्स्टेबल दिलीप क्षीरसागर, अतुल देशमुख, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, नितीन कदम, सुमित मोहिते, संजय काटे, अमोल पवार, शरद माने, वैभव डांगरे यांची रविवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, ही घटना शनिवारी घडली होती. संबधिताचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांसह जेऊर-करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण आबा पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव रविवारी सकाळी शहर पोलिस ठाण्यात आले. आमदार पाटील यांचे बंधू राजन पाटील यांच्यासह नातेवाईकांनी रावसाहेब जाधव यांचा मृत्यू पोलिस मारहाणीतच झाल्याचा आरोप करत मारहाण करणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. आंदोलकांनी शहर पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मारल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

पोलिस निरीक्षक धस यांची

मृत जाधव यांना अमानुष मारहाण

कराडमध्ये काही दिवसांपूर्वी बस दरोड्यात पाऊण कोटींचे सोने चोरीस गेले होते. हे सोने खरेदी केल्याच्या सशंयावरुन कराड शहर पोलिसांनी शुक्रवारी ( दि. १७) पहाटे पाच वाजता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील निंबोरे गावातील रावसाहेब लक्ष्मण जाधव या सराफ व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचा शिक्षक मेव्हुणा अनिल दशरथ डिकोळे (३७, रा. घोटी, ता. करमाळा) या दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र, या बाबतची नोंद स्थानिक पोलिस ठाण्यात करण्याची कायदेशीर बाब पूर्ण केली नव्हती. पोलिसांनी त्यांना बेकायदा ताब्यात घेऊन करमाळा-कराडपर्यंत त्यांना आमानुष मारहाण करीत आणले. कराडमध्ये आल्यानंतर येथील पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद न करता शहरातील कार्वेनाका पोलिस चौकीत नेण्यात आले. तिथे काही दिवसांच्या रजेवर गेलेले कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांनी व त्यांच्या पथकातील पोलिसांनी दोघांना बेदम मारहाण करीत सोडून देण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी तिथे उपस्थित असलेले साक्षीदार व मृत जाधव यांचे मेव्हुणे अनिल दशरथ डिकोळे यांनी केला आहे. शनिवारी सकाळी परत आपल्यासमोर जीवघेणी मारहाण करीत असतानाच चौकीत जागेवरच रावसाहेब जाधव यांचा मृत्यू झाला असल्याचेही अनिल डिकोळे यांचे म्हणणे आहे. काही दिवसांच्या रजेवर असतानाही तुला मारण्यासाठी मी येथे आलो आहे, माझ्या भितीने तीन वर्षांपूर्वी एकाने इमारतीवरुन उडी मारली होती, तरीही माझे येथे कोणी काय करू शकले नाही, असेही पो. नि. विकास धस यांनी दम भरत जाधव यांच्या गळ्यावर पाय दिल्याचा गंभीर आरोपही अनिल डिकोळे या मारहाणीचा प्रत्यक्षदर्शीने पत्रकारांशी बोलताना केला आहे.

यांचे तडकाफडकी निलंबन

या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पो. नि. विकास धस, सहा. पो. नि. हणमंत काकंडकी यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल दिलीप क्षिरसागर, अतुल देशमुख, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, नितीनद कदम, सुमित मोहिते, संजय काटे, अमोल पवार, शरद माने, वैभव डांगरे यांना रविवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याचे सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी सांगितले. या प्रकरणाचा सीआयडी तपास सुरू झाल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात टपाल कार्यालयेकोअर बँकिंग प्रणालीने जोडली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

ब्रिटिश राजवटीत संदेश वहनासाठी देशात स्थापन झालेले टपाल खाते कात टाकत आहे. राज्यातील पाच ठिकाणच्या पोस्टांमध्ये पेमेंट बँक सुरू करण्यासाठी जानेवारी २०१७चा मुहूर्त निश्चित झाला आहे. त्यासाठीच्या पूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. पोस्टाच्या पेंमट बँकेमुळे जिह्यातील ग्राहकांना नवीन पर्याय तर बँकांना नवीन स्पर्धक येणार आहे. आजही पोष्ट खात्याकडे विश्वासाने पाहिले जाते. या बँकेची राज्यभर उत्सुकता असली तरी पहिला मान सातारकरांना मिळणार आहे.

देशातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेल्या इंटरनेट सेवा आणि स्मार्टफोनमुळे जग अगदी हाताच्या बोटावर येऊन ठेपले आहे. बहूतांश कामे इंटरनेट व स्मार्टफोनच्या माध्यमातून घर बसल्या केली जात आहे. ग्रामीण भागातही व्हॉट्स-अॅप, फेसबुक आणि टिव्टरसारखी सोशलमीडिया पोहोचली आहे. जगात कोठेही, कोणाशीही एका क्षणात सहज संपर्क करणे शक्य झाले आहे. यामुळे ब्रिटिश काळात स्थापन झालेला टपाल विभाग कालबाह्य झाला आहे. या विभागाचे पुनर्रुजीवन करण्यासाठी केंद्र सरकारने टपाल विभागामार्फत विविध उपक्रम सुरू केले. यात बचत योजना, जीवन विमा यांचा समावेश आहे; पण यावर टपाल खात्याचे पुनर्रूजीवन होणे शक्य नसल्याने पेमेंट बँकेचा पर्याय पुढे आला. याचा परवानासुद्धा रिझर्व्ह बँकेकडून मिळाला आहे. मार्च २०१७मध्ये देशभरात बँक कार्यन्वित होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने बँक उभारणीसाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सातारा, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर व मुंबई गिरगाव या सहा ठिकाणी पेमेंट बँकेचा जानेवारी २०१७मध्ये मुहूर्त आहे.

असे होईल सुरुवात

सातारा जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातील आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे निदर्शनास आले. यामुळे टपाल विभागाने साताऱ्याची निवड प्रथम केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालये कोअर बँकिंग प्रणालीने जोडण्यात आली आहेत. सातारा, कराड व फलटण शहरातील टपाल कार्यालयात एटीएम मशिन बसविण्यात आले असून, बचत खातेदारांना रुपी डेबिट कार्ड वितरित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्पात एक लाखांपर्यंत ठेवी या बँकेत स्वीकारल्या जाणार आहेत. या टप्पात कर्ज वितरण होणार नाही. तरी आरटीजीएस, एनएफटी, डीडीटीटी. या शिवाय मूळच्या पोस्टात उपलब्ध असलेल्या आरडी., विमा आदी सुविधा सुरूच राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टला टांगले हजारो जीव

$
0
0

Udaysing.patil @timesgroup.com

कोल्हापूर ः आधी सात मजली आणि नंतर आता अकरा मजली अशी इमारतींच्या उंचीमध्ये वाढ होत असताना त्यातील लिफ्टच्या परवानगीबरोबर त्याच्या सुरक्षेबाबत नियमित तपासणी करणारी यंत्रणाच जिल्ह्यात नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. इमारतींमध्ये ​लिफ्टची सोय केली जात असली तरी सरकारकडून तपासणी होत नसल्याने हजारो नागरिकांचे जीव लिफ्टला टांगले गेले आहेत.

परवानगी देणारी यंत्रणा मुंबईत असल्याने अनेक इमारतींमध्ये बेकायदेशीरपणे लिफ्ट लावल्या जात आहेत. राज्यभरात अथवा इतर कुठे लिफ्टबाबत मोठी दुर्घटना घडल्यांनतर या सुरक्षेबाबत सरकारही जागे होते. नंतर तपासणी अहवाल मागवले जात असल्याची स्थिती आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये उंच इमारतींची संख्या जास्त असली तरी आता राज्याच्या इतर शहरांतही कमी जागेमुळे उंच इमारती उभारण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरसारख्या शहराची अद्याप हद्दवाढ झाली नसल्याने उंच इमारती उभारण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी चार मजल्यांपर्यंत उंचीच्या असणाऱ्या इमारतींऐवजी ११ मजली इमारतींची उभारणी केली जात आहे. उपनगरांमध्ये जागेच्या कमरतेमुळे बांधकाम व्यावसायिकही जास्तीत जास्त उंच इमारती बांधण्याच्या मानसिकतेत आहेत. अशा परिस्थितीत दोन मजली इमारत असली तरी आता त्यामधील फ्लॅट घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना​ लिफ्टची सुविधा अत्यावश्यक वाटत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही लिफ्टसह इमारती बांधत आहेत.

इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून लिफ्टची सुविधा दिली जाते. त्यासाठी ​परवानगी घेणे आवश्यक असले तरी त्याची जबाबदारी लिफ्ट देणाऱ्या कंपनी घेत असतात. त्यांचे कंत्राटदार ठरलेले असून तेच ही सर्व प्रक्रिया पुर्ण करतात. ही परवानगी देणारे लिफ्ट इन्स्पेक्टर कार्यालय मुंबईत आहे. या कार्यालयाकडून विविध प्रकारच्या ना हरकती तपासून परवानगी दिली जाते. त्याबाबतचे प्रमाणपत्र अनेक ठिकाणच्या लिफ्टमध्ये लावलेले पहायला मिळते. त्यासाठी बांधकाम व्यावसायिक व संबंधित कंत्राटदार यांच्यामध्ये देखभालीचा करार असतो. तोपर्यंत त्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी साहजिकच कंत्राटदारावर असते. त्यामुळे कंत्राटदाराच्या देखभालीवरच अनेक लिफ्ट सुरू आहेत. पण सरकारकडून त्याची नियमित तपासणी होत नाही. तसेच अनेक लिफ्टसाठी परवानगीही घेतली जात नसल्याची परिस्थिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक सोसायटीमधील लिफ्टकडे दुर्लक्ष केले जाते. इतरत्र कुठे लिफ्टबाबत काही दुर्घटना झाली की सरकारकडून तपासणी करून घेण्याचा आदेश निघतो. त्यानुसार सरकारच्या उद्योग, उर्जा व कामगार खात्याच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून लिफ्ट इन्स्पेक्टर कार्यालय तपासणी करून घेते. मात्र ही तपासणी आदेश आल्यानंतरच होत असते.

परवानगीसाठी दर ठरलेले

राज्यभरातील लिफ्टच्या परवानगीचे काम मुंबईतील कार्यालयातून होते. तिथे प्रस्ताव दिल्यानंतर ​ती लिफ्ट कोणत्या शहरात, कुठे, सर्व सुरक्षा व्यवस्था पुर्ण करून बसवली आहे हे प्रत्यक्ष येऊन पाहणी न करताच परवानगी दिली जाते. त्यासाठी 'दर' ठरलेले असून त्यानंतरही परवानगी वेळेत मिळेल याची शाश्वती नसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे ‘मलबार हिल’

$
0
0

Udaysing.patil@timesgroup.com

कोल्हापूर ः शहराच्या भोवताली असलेल्या टेकड्यांपैकी एक शाहू जकात नाक्याच्या पाठीमागे असणारी टेकडी. सारा परिसर खडकाळ. त्यामुळे झाडांचे नामोनिशाण नसल्याने गावाबाहेरील उजाड टेकडी व आजूबाजूचा भकास परिसर अशीच ओळख होती. पावसाळ्याच्या दिवसात येथे येणाऱ्या हिरव्यागार गवतावर मोरेवाडी, उजळाईवाडी येथील शेतकरी म्हशी, शेळ्यांना चारण्यासाठी नेत. पण या परिसरात कायमस्वरूपी असणारा भन्नाट वारा व दिसणाऱ्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडून तीस वर्षांपासून येथे उच्चभ्रू वास्तव्यास येऊ लागले व पाहता पाहता याच उजाड टेकडीला कोल्हापूरचे 'मलबार हिल' म्हणून ओळखले जाऊ लागले. या टेकडीवरील वैभव को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून विस्तीर्ण परिसरात बांधलेले दिमाखदार बंगले म्हणजे कोल्हापूरचे एक वैभवच बनले आहेत.

खडकाळ व गावाबाहेरील असलेल्या टेकडीवर कुणी घरे बांधणार असे त्यावेळी सांगितले असते तर सांगणाऱ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले असते. पण पन्नास वर्षापूर्वी या टेकडीवर आरामदायी वाटेल अशा पद्धतीने बंगले बांधण्याची संकल्पना आखली गेली. जागा विकत घेऊन त्यावेळी उद्योगधंद्यामध्ये कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही सोसायटी १९६४ साली स्थापन झाली. १९६६ साली या परिसरात गेल्यानंतर भयाण शांतताच होती. या टेकडीपासून सुरू झालेला डोंगरमाथा मोरेवाडी, पाचगाव, गिरगाव, कात्यायनीपर्यंत पसरला असल्याने तिथे नागरी वस्त्यांचे अस्तित्वच नव्हते. अशा ठिकाणी घरे बांधून राहायचे मोठे धाडसच होते. लोहिया यांनी शंभरच सभासद करुन घेतले होते. त्यामुळे या टेकडीच्या विस्तीर्ण परिसरात लहानात लहान ३६०० चौरस फुटांचे तर जास्तीत जास्त ८४०० चौरस फुटांचे प्लॉट तयार केले आहेत. त्यातील आर्किटेक्ट आचरेकर यांनी पहिले घर बांधण्यास सुरुवात केली, तर उद्योजक विनायक शेटे या सोसायटीमध्ये प्रथम राहण्यास आले.

त्यानंतरही सभासदांकडून घरे बांधण्यास उत्सुकता दाखवण्यात आली नव्हती. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती. रस्त्यावरील लाइटचा तर प्रश्नच नव्हता. शेजारीच महामार्गाची वर्दळ असली तरी या परिसरात दिवसाही कुणी फिरकत नव्हते. त्यामुळे घर बांधून सुनसानपणाच अनुभवायला कुणी तयार नव्हते. त्याचवेळी रस्त्याच्या पूर्वेला असलेल्या माळावर उज्ज्वल को-ऑप. सोसायटीची सुरुवात झाली होती. हा परिसर ग्रामीण भागातील असल्याने तिथेही पाण्याची, रस्त्याची, लाइटची सोय नव्हती. मात्र, राजारामपुरी व परिसरातील काही कुटुंबांनी भविष्यासाठी म्हणून या परिसरात जागा घेऊन ठेवण्यास सुरुवात केली. काही मध्यमवर्गीयांनी घरेही बांधण्यास सुरुवात केली. १९७० नंतर या सर्व परिसरातील बांधकामांना सुरुवात झाली. वैभव टेकडीवरील शंभर सभासदांपैकी आताही ६० प्लॉट रिकामे आहेत. ४० सभासदांनी त्यावेळी बांधकाम करत असताना सुटीच्या दिवशी निवांतपणा अनुभवता येण्यासाठी एखादे घर असावे असे म्हणूनच सभासदांनी येथे बांधकामे केली. त्यांच्या बांधकामांवर गेल्यानंतर तिथे हवाहवासा वाटणारा वारा, पावसाळ्यामध्ये तर बंगल्यांच्या टेरेसवर बसून पावसाच्या बरसणाऱ्या सरी पाहण्याचा आनंद सभासदांना समजून आला.

त्यामुळे सभासदांनी प्लॉटमध्ये झाडे लावण्यास सुरुवात केली. चाळीसभर सभासदांनी बांधलेल्या घरांना गेल्या तीन वर्षांपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोयच नव्हती. दिनेश कोरगावकर यांनी तर तब्बल तेरा वर्षे टँकरने पाणी घेतले. पण या ठिकाणी असणारा निवांतपणा व सुखकारकपणा पाहून टँकरसाठी त्रास घेतल्याचे ते सांगत आहेत. या सोसायटीमध्ये शहरातील अनेक प्रथितयश उद्योजक, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांचे प्लॉट आहेत. हळूहळू या व्यावसायिकांनी बंगले बांधण्यास सुरुवात केली असून, टोलजंग व वेगळ्या धाटणीचे बंगले लक्ष वेधून घेत आहेत. बहुतांश सर्वांनीच झाडे लावल्याने ही टेकडी आता हिरवीगार झाली आहे. या सोसायटीमध्ये सांस्कृतिक हॉल बांधण्यात आला असून तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. एकीकडे उजाड टेकडी भरत असताना रस्त्याच्या पूर्वेकडील पठार बंगल्यांनी भरून गेले आहे. उज्ज्वल सोसायटी पाठोपाठ हनुमाननगर, दादू चौगुलेनगर या कॉलनी वसल्या आहेत.

नागरी वस्तीचाच हा परिसर असला तरी या परिसराजवळ आता शांतिनिकेतन, चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलसारख्या शाळा सुरू आहेत. काही मिनिटांच्या अंतरावरच विद्यापीठाचा अॅथलेटिक्सचा ट्रॅक आहे, तर विद्यापीठाचे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटही या परिसराजवळच आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिकेने पाण्याची टाकी बांधली असून, येथे पाण्याची सोय केली आहे, पण अजूनही तिथे महापालिकेकडून देखभाल होत नाही.


प्लॉटचा दर ३५ रुपयांवरून दोन हजारांवर
सोसायटी स्थापन झाली त्यावेळी चार हजार रुपये भरून घेऊन सभासद करून घेतले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी या परिसरातील जागेचा दर प्रतिचौरस फुटाला ३५ रुपये होता, पण नंतरच्या कालावधीत झालेल्या बांधकामांमुळे सध्या येथे चौरस फुटाचा दर दोन हजार रुपयांवर झाला आहे. हायवेच्या पलीकडे असलेल्या हनुमाननगर परिसरात साडेचार रुपये प्रतिचौरस फूट असा दर होता. आता एक गुंठा जागेची किंमत वीस लाख झाली आहे.

प्रथितयश मंडळी सभासद

स​चिन शिरगावकर, विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एम. चव्हाण, डॉ. शरद भुताडिया, शशिकांत ओऊळकर, हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर, प्रसाद कृष्णराव कामत यांच्यासह अनेक व्यावसायिक या सोसायटीमध्ये सभासद आहेत.

ज्यांना शहरालगत, पण निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी हा परिसर म्हणजे जणू स्वर्गच आहे. उन्हाळ्यात पंखाही लावण्याची आवश्यकता भासत नाही. पावसाळ्यात पाठीमागील टेकड्यांवर फुललेली हिरवळ पाहून स्वित्झर्लंडचाच अनुभव येतो. सायंकाळी येथे आल्यानंतर सुख, शांतता काय असते याचा दररोज अनुभव घेत असतो.

दिनेश कोरगावकर


पाच वर्षांपूर्वी या परिसरात राहायला आलो आहे. सुंदर, शांत परिसर म्हणून याकडे अनेक लोक पाहत आहेत. हवेशीर व प्रदूषणविरहित असलेल्या वातावरणामुळे दररोज रिफ्रेश व्हायला होते. लोकेशनही चांगले असल्याने पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य असाच होतो.

डॉ. शरद भुताडिया


वैभव सोसायटीमध्ये २०१२ मध्ये वास्तव्यास आलो. परिसर शांत, चांगला आहे. प्लॉट मोठे असल्याने एक वेगळाच निवांतपणा जाणवतो. पण महापालिकेच्या हद्दीत असूनही या भागात फारशा सुविधा नाहीत. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पाण्याची सोय झाल्याने मोठी समस्या सुटली आहे.

युवराज माळी, चेअरमन, वैभव को-ऑप. सोसायटी

....

उज्ज्वल सोसायटी, दादू चौगुलेनगर, हनुमाननगर या परिसरात वेगवेगळ्या परिसरातून नोकरी, व्यवसायाच्यानिमित्ताने आलेल्या उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांनी घरे बांधली आहेत. आपण भले आणि आपले काम भले, असा त्यांचा विचार असल्याने परिसरात शांतता असते. जनावरांना चारण्यासाठी असलेला हा परिसर आता खूपच बदलला आहे.

दीनानाथ सिंह, हिंदकेसरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन अधिकाऱ्यांसह बारा पोलिस निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला संशयित रावसाहेब लक्ष्मण जाधव (वय ४२, रा. निंबोरे ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या कराड शहर पोलिस स्टेशनमधील कोठडीत शनिवारी झालेल्या मृत्यूप्रकरणी दोन पोलिस अधिकारी व आठ कॉन्स्टेबल अशा बारा जणांना रविवारी निलंबित करण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. कोणताही गुन्हा दाखल न करता संशयिताकडे चौकशी सुरू केलेले कराड पोलिस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस, सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह कॉन्स्टेबल दिलीप क्षीरसागर, अतुल देशमुख, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, नितीन कदम, सुमित मोहिते, संजय काटे, अमोल पवार, शरद माने, वैभव डांगरे यांची रविवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी ही माहिती दिली. दरम्यान, ही घटना शनिवारी घडली होती. संबधिताचा मृत्यू पोलिस मारहाणीत झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांसह आंदोलकांनी ठिय्या मारल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू जयंती लोकोत्सव म्हणून साजरी करूया’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती व्यापक स्वरूपात साजरी करून तळागाळातील लोकांसह स्थानिक लोकांचा सहभाग कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करू, असे आवाहन शाहूप्रेमी पै. बाबा महाडिक यांनी केले.

टिंबर मार्केट येथील शिंदे लॉनमध्ये आयोजित तालीम मंडळांच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येक तालीम संस्थेला वर्गणी देण्यात येणार होती. मात्र, हा उपक्रम लोकोत्सव असल्यामुळे तालीम संस्थांनीच या उपक्रमासाठी ठराविक निधी समितीकडे सुपूर्द केला.

महाडिक म्हणाले, 'शाहू जयंती सोहळ्याचे महत्त्व सांगण्याबरोबरच हा सोहळा कर्तव्यभावनेतून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार समाजात रुजविण्यासाठी तसेच त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांनी व्यापक स्वरूपात शाहू जयंती साजरी करूया.'

डॉ. संदीप पाटील म्हणाले, 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आजही अनेकांना माहीत नाही. शाहूंविषयी कृतज्ञता म्हणून शाहू जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत त्यांना अभिवादन करणे गरजेचे आहे.'

सुधर्म वाझे म्हणाले, 'सध्याची पिढी सोशल नेटवर्किंगचा वापर अधिक करत असल्यामुळे त्याचा वापर करत व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शाहूंच्या कार्यावर आधारित ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात याव्यात.'

यावेळी छावा संघटनेचे राजू सावंत, शाहीर शहाजी माळी, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान, राजेंद्र पाटील यांनी शाहू जयंती साजरी करण्याबाबत काही सूचना मांडल्या. मेळाव्यास हिंदुराव हुजरे-पाटील, कृष्णात पाटील, वस्ताद पी. जी. पाटील, अशोक पोवार, संदीप कदम, उदय घोरपडे, किसन भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंजली समितीतर्फे उद्या योग अभ्यास

$
0
0


कोल्हापूर ः दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समितीच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हायस्कूल, शाळा, योग वर्ग अशा १५० हून अधिक ठिकाणी ४५ मिनिटांचा योग अभ्यास घेतला जाणार आहे. ३६५ जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे योग अभ्यासाचे आयोजन केले असून त्याचे नेतृत्व स्वामी रामदेव बाबा करत आहेत.

या अभ्यासक्रमासाठी पतंजली योग समितीच्या १५० योग शिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हायस्कूल, शाळांमधील १५०० शिक्षकांना १६ व १७ जूनला मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच हे शिक्षक मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. त्यानुसार ८५ हजार विद्यार्थी व नागरिक योग दिनामध्ये सहभागी होणार आहेत. मंगळवारी (ता.२१) ४५ मिनिटांचा अभ्यास घेण्यात येणार आहे. मानेचे, खांद्याचे, कमरेची आसने, वृक्षासन, ताद्रासन, भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, आदी २५ आसनांचा अभ्यास तसेच प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, ध्यान यांचा समावेश आहे.

मंगळवारी क्रीडा संकुलाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तर धोत्री गल्ली येथील जिजामाता हायस्कूलमध्ये आयुक्त पी. ​शिवशंकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. याशिवाय शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नजीकच्या शाळा, हायस्कूल, योगवर्ग या ठिकाणी सहभागी व्हावे, असे आवाहन भारत स्वाभिमान न्यासचे सह राज्य प्रभारी चंद्रेशेखर खापणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरुपती बालाजीचे दर्शन महागले

$
0
0

Janhavi.Sarate @timesgroup.com

कोल्हापूर : तिरुपती बालाजी देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. मात्र, आता देवाच्या दर्शनाचे पास महागल्यामुळे तिरुपती देवाचे दर्शन भाविकांसाठी महाग झाले आहे. पूर्वी ५० रुपयांना मिळणारा पास सध्या ३०० रुपयांनी मिळत आहे. कोल्हापूरमधून वर्षाला सव्वालाखांहून अधिक भाविक कोल्हापुरातील ई-बुकिंग सेंटरच्या माध्यमातून दर्शन, राहण्याच्या सोयीचा लाभ घेतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भाविकांना जादा अडीचशे रुपये दर्शनासाठी मोजावे लागत आहेत.

कोल्हापूरातील भाविकांना तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी ९ जुलै २००७ रोजी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष गुलाबराव घोरपडे आणि सदस्य, तसेच मठाचे व्यवस्थापक राघवेंद्र स्वामी यांच्या प्रयत्नातून श्री अंबाबाई मंदिर परिसरातच तिरुपतीच्या दर्शनासाठी ई बुकिंग सेवा सुरू करण्यात आली. या केंद्रातून गेल्या ९ वर्षात दिवसेंदिवस भाविकांचे ऑनलाइन बुकिंग करण्याची संख्या वाढत आहे. वर्षभर तिरुपतीच्या दर्शनासाठी भाविकांचे नियोजन सुरू असते.

ई बुकिंग केंद्राद्वारे कमीत-कमी दोन दिवस आधी आधि जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत बुकिंग करता येते. स्वतंत्र वाहन करून जाणाऱ्या भाविकांनी ३०० रुपयांच्या दर्शन पासला प्राधान्य दिले. मात्र, ५० रुपयांचा दर्शन पास नव्या वर्षापासून जूनपर्यंत बंदच होता. तिरुपती मंदिरातील गर्दीनुसार ५० रुपयांचा पास पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. कोल्हापुरात सुरू झालेल्या ई दर्शन सेंटरमधून दिवसाला साधारण ३०० भाविक तर महिन्याला ९ हजारांहून अधिक भाविक बुकिंग करीत आहेत.

बुकिंग सेवेत बदल

तिरुपतीला जाऊ इच्छिणाऱ्यांना बुकिंगसाठी दर्शन सुविधा केंद्रात उपस्थित राहणे अनिवार्य होते. त्यांच्या हातांचे ठसे, फोटो अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना दर्शन पास मिळत. मात्र, आता तिरुमला तिरुपती देवस्थानने यात बदल केला आहे. एकच व्यक्ती ग्रुपचे बुकिंग करू शकेल अशी सुविधा केली आहे. मात्र संबंधित व्यक्तींचे फोटो, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा पॅनकार्ड आवश्यक असेल. बारा वर्षाखाली मुलांना दर्शनपास मोफत आहे. बुकिंग दरम्यान ओळखपत्र आवश्यक असून तिरुपतीच्या दर्शनासाठी जातानाही तिथे ओखळपत्र सोबत असणे गरजेचे आहे.

तिरुपती ई बुकिंग केंद्रातून सेवा

भाविकांना राहण्याची सुविधेसाठी बुकिंग करता येते. चार ते पाच व्यक्तींसाठी एक दिवसासाठी ५०, १०० आणि ३०० रुपये दराने रुम उपलब्ध आहेत. दर्शन कोणत्या प्रकारचे, आणि किती व्यक्ती, रुमचे बुकिंग होते. तिथे केवळ पास दाखवताच सुविधा ‌दिल्या जातात. याशिवाय अन्य बुकिंगही केले जाते. सुप्रभात दर्शन, निजपाद दर्शन (शुक्रवार), उजेन सेवा, कल्याणोत्सव, वसंत उत्सव, सहस्त्रदीप सेवा, विशेष पूजा (सोमवार), अष्टदल, अर्जित ब्रह्मोत्सव सेवेसाठी १२० ते १२५० रुपयांपर्यंत सेवा बुकिंग होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदमांची पुन्हा होणार चौकशी

$
0
0

म. टा. पतिनिधी, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने सातारा येथील निवृत्त पोलिस अधिकारी मनोहर कदम यांची नुकतीच चौकशी केली आहे. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी यापूर्वीच कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी त्यांची चौकशी केली.

आता वीरेंद्रसिह तावडे याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार कदम यांची पुन्हा चौकशी होणार आहे. कदम आणि तावडे यांच्यामध्ये फोनवरील संभाषणासह तावडेच्या एका ई-मेलमध्येही कदम यांचा उल्लेख आहे. सातारा जिल्ह्यातील निवृत्त पोलिस निरीक्षक मनोहर कदम यांनी डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिले असावे, असा सीबीआयला संशय आहे. कदम आणि सध्या अटकेत असलेला तावडे या दोघांमध्ये मोबाइलवरून वारंवार संभाषण झाले आहे. या दोघांच्या गाठी-भेटी झाल्याचेही बोलले जाते. तावडे याने सारंग आकोलकर याला केलेल्या ई-मेलमध्येही कदमचा उल्लेख आहे.

दरम्यान, कदम सनातन संस्थेच्या काही सक्रीय कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्यांनी मारेकऱ्यांना मदत केल्याचा संशय सीबीआयला आहे. ई-मेलमधील संदर्भानुसार जत आणि फोंडा येथे मारेकऱ्यांना प्रशिक्षण मिळाले. दरम्यान, वेळप्रसंगी कदम यांना ताब्यातही घेतले जाईल, अशी माहिती कोल्हापूर पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. शिवाय, संशयित वीरेंद्रसिंह तावडे याला ताब्यात घेण्याचेही प्रयत्न आहेत.

साक्षीदार साडविलकर नार्कोला तयार

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला महत्त्वाची साक्ष देणारे साक्षीदार संजय साडविलकर यांनी रविवारी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. 'सनातनकडून नाहक बदनामी सरू असून, त्यांनी केलेल्या आरोपांची सत्यता लोकांसमोर येण्यासाठी मी नार्कोसह कोणत्याही चाचणीला तयार आहे. अंबाबाईच्या चांदीच्या रथाच्या कामाचा मुद्दा आत्ताच का उपस्थित केला? असा प्रतिसवालही साडविलकर यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images