Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘वसुंधरे’त पाण्याऐवजी झिरपला पैसा

$
0
0

गडहिंग्लज : सन २०१२ च्या दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा, नागरिकांसह जनावरांना मुबलक पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सुरू केला. त्यातून राज्यामध्ये वसुंधरा पाणलोट योजनेंतर्गत पाणी साठवणुकीसाठी सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, मजगी, शेततळे आदी कामे करण्यात आली. मात्र, योजनेतून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमधून पाणी नव्हे तर कंत्राटदार, अधिकाऱ्यांसह संबंधिसांसाठी पैसाच झिरपला अशी स्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या योजनेतील गैरव्यवहारांबाबत झालेल्या तक्रारीनंतर २०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी गोत्यात आले आहेत.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, वसुंधरा पाणलोट विकास योजना जरी शेतकऱ्यांच्या विकासासाठी असली तरी कृषी विभागानेच या योजनांचा लाभ अधिक घेतल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र आहे. पाणलोट विकासाची सर्व कामे ठेकेदारांच्या नावाखाली अधिकारी, निवृत्त अधिकारी, कर्मचारीच करीत असल्याचा आरोप यापूर्वी झाला आहे. यातून कोट्यावधी रुपयांचा घोळ केला गेल्याची चर्चा आहे.

केंद्र सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत एकात्मिक पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम देशभर सुरू केले. या माध्यमातून जिल्ह्यात यशस्वीरीत्या योजना राबविल्या जातील अशी अपेक्षा सामान्य शेतकऱ्याला होती. मात्र या सर्व योजना प्रामाणिकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. परिणामी भ्रष्टाचारने पोखरलेल्या या योजनांचा सर्वत्र बोजवारा उडाला आहे. कामे रितसर प्रक्रियेने ठेकेदारांना देण्यात आली. मात्र ती केवळ नावापुरती असल्याचा आरोप जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांनीही अनेकदा केले आहेत.

केंद्र सरकारने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या वसुंधरा पाणलोट योजनेत मोठा घोळ झाला आहे. निकृष्ट दर्जाचे बंधारे, त्यांची झालेली पडझड, काही ठिकाणी कागदोपत्री भक्कम वाटणारे बंधारे अशा प्रकारांमुळे पाण्याऐवजी फक्त सरकारचा पैसाच झिरपला अशी स्थिती आहे.

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची सद्यस्थितीची कल्पनाही अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसते. बहुतांश ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा पाया इस्टीमेटमध्ये दाखविला. मात्र, वस्तुस्थितीत बंधारे पायाविनाच बांधले गेले. त्यासाठी प्रस्तावातील पन्नास टक्के निधीची लुटमार झाली. निकृष्ट पद्धतीने झालेल्या कामाला शेरा मात्र 'उत्कृष्ट' दिला गेला. पाणी प्रश्नावरील बैठकांमध्ये कागदोपत्री घोडे नाचवून स्वतःची पाठ थोपटून घेतली गेली. परिणामी प्रत्यक्ष ठिकाणी बंधारे ढासळत असून 'पुढे काय' हा प्रश्न शेतकऱ्यांसमोरही आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उभारण्यात आलेल्या वसुंधरा योजनेतील अनेक ठिकाणच्या बंधाऱ्यांमध्ये यंदाही पाण्याचा थेंबही साचण्याची शक्यता नाही. मात्र, तरीही अनेक अधिकारी ठेकेदारांना वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा खेळ

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणची सद्यस्थितीची कल्पनाही अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसते. बहुतांश ठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा पाया इस्टीमेटमध्ये दाखविला. मात्र, वस्तुस्थितीत बंधारे पायाविनाच बांधले गेले. त्यासाठी प्रस्तावातील पन्नास टक्के निधीची लुटमार झाली. निकृष्ट पद्धतीने झालेल्या कामाला शेरा मात्र 'उत्कृष्ट' दिला गेला. पाणी प्रश्नावरील बैठकांमध्ये कागदोपत्री घोडे नाचवून स्वतःची पाठ थोपटून घेतली गेली. परिणामी प्रत्यक्ष ठिकाणी बंधारे ढासळत असून 'पुढे काय' हा प्रश्न शेतकऱ्यांसमोरही आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उभारण्यात आलेल्या वसुंधरा योजनेतील अनेक ठिकाणच्या बंधाऱ्यांमध्ये यंदाही पाण्याचा थेंबही साचण्याची शक्यता नाही. मात्र, तरीही अनेक अधिकारी ठेकेदारांना वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

तालुक्यातील बहुतांश बंधारे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. पहिल्याच पावसात तालुक्यातील बंधारा ढासळला. बंधाऱ्याच्या दुरवस्थेचे सर्व पुरावे प्रशासनाला सादर केले आहेत. प्रशासनाने बांधकामातील अनियमितता, दुरवस्था मान्यही केली. मात्र चौकशी अधिकारी सर्वांना पाठीशी घालत आहेत.

- संदीप कलगुटगीकर, सदस्य, वसुंधरा पाणलोट कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जागतिक योगदिनी पोलिसांना योगाची सक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. २१ जून) पोलिसांनाही योगासने करावी लागणार आहेत. याबाबतचे सामूहिक योगासने करण्याबाबत सक्ती करणारे, स्वतंत्र परिपत्रक गृह विभागाकडून पोलिस प्रशासनाला मिळाले आहे. पोलिस दलाकडून एकत्र योगा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच योगाला उपस्थित राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना विशिष्ट पोषाखाचीही सक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत पोलिसांना योगासने करावी लागणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योगदिनाच्या निमित्ताने गेल्यावर्षी सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी विभागांना योगासने करण्याचे आवाहन केले होते. केवळ देशातूनच नाही, तर परदेशातूनही या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी दुसरा जागतिक योगदिन साजरा करण्यासाठी राज्यात सर्वच विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. पोलिस विभागालाही गृह विभागाकडून योगदिन साजरा करण्याचे परिपत्रक पोहोचले आहे. विशेष म्हणजे यासाठी महिला आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांसाठी पोषाखाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांसाठी सफेद रंगाची पँट आणि टी शर्ट, पांढऱ्या रंगाचे शूज घालावे लागतील तर कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाची पँट, सफेद टी शर्ट, ब्राऊन पीटी शूज घालणे बंधनकारक होण्याची शक्यता आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत येताना सतरंजीही आणावी लागणार आहे. याबाबत सोमवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत विशेष बैठक होणार आहे. योगासनांचे ठिकाण, गणवेश, ग्रामीण परिसरातील पोलिस ठाण्यांमधील योगासने यांचे नियोजन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात ‘आरटीई’ला फाटानामवंत शाळांकडून कायद्याचा भंग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याऐवजी सोलापुरातील नामवंत शिक्षणसंस्था आणि प्रशासन अधिकाऱ्यांकडून आरटीई अर्थात शिक्षण हक्क कायद्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या माध्यमातून शिक्षणसंस्थांनी साटेलोटे करून आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. याही पुढे जाऊन ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते बजरंग जाधव आणि शामराव गांगर्डे यांनी याबाबतची माहिती घेतल्यानंतर धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. आरटीई सन २०१६-१७ साठी वंचित व दुर्बल घटकातील २५ टक्के आरक्षित जागा प्रवेशासंबंधी ऑनलाइन नोंदणीमध्ये पूर्व प्राथमिक (एलकेजी) वर्ग वगळण्याबाबतचा विषय होता. यंदाच्या वर्षासाठी ३० एप्रिल ते २९ मे २०१६ या कालावधीत पालकांकडून ऑनलाइन अर्ज करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील १९ शाळांपैकी फक्त ५ शाळांनी एन्ट्री लेव्हल पॉइंट पूर्व प्राथमिक (एलकेजी) आणि इयत्ता १ ली प्रवेशाकरीता नोंदणी केली. या पाच शाळांमध्ये एकूण २६८ जागा असून, त्यापैकी ९१ जागा 'एलकेजी'च्या तर १७७ जागा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आल्या. परंतु, अद्यापही बहुतांश विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश देण्यात आलेला नाही. तर उर्वरीत १४ शाळांनी पूर्व प्राथमिक (एलकेजी) वर्ग वगळले आहेत. बहुतांश शाळांनी प्रत्यक्षात पूर्व प्राथमिक वर्गाच्या प्रत्येकी चार चार तुकड्या असतानादेखील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये फक्त दोनच तुकड्या दाखवून शिक्षण हक्क कायद्याला फाटा दिला आहे. सोलापुरातील शिक्षण संस्थांनी केवळ पैसा कमविण्यासाठी म्हणून कायद्यांतर्गत २५ टक्के जागा भरलेल्या नाहीत.

१०० रुपयांच्या बॉँडवर

वर्ग वगळल्याचा मजकूर

एखादा बॉँड करावयाचा असेल, तर 'सेतू'मध्ये जाऊनच तहसीलदाराच्या सही शिक्क्यानिशी अ‍ॅफिडेव्हिट करावे लागते, तरच तो बॉँड ग्राह्य धरला जातो. परंतु सोलापुरातील प्रथितयश शिक्षणसंस्थांनी मात्र महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांशी संगनमत करून केवळ १०० रुपयांच्या बॉँडवर आमच्या शाळेचा प्रवेशस्तर (एन्ट्रलेव्हल पॉइंट) इयत्ता १ ली आहे व काही तांत्रिक अडचणीमुळे 'एलकेजी'चे वर्ग यंदा चालवू शकत नाही, असे लिहून दिले आहे.

आदेशाचा भंग

जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी १३ जून रोजी मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांना एका आदेशान्वये १४ शाळांनी पूर्व प्राथमिक वर्ग वगळले आहेत काय आणि वगळण्याचे नेमके कारण काय व सदर शाळा पूर्व प्राथमिक प्रत्याक्षात चालू केल्या आहेत काय? असल्यास त्यांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत सक्ती करावी अन्यथा सदरचे वर्ग बंद करण्याची कारवाई करावी, असे सांगितले होते. परंतु, साळुंखे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करीत त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन अधिकारी आणि शिक्षणसंस्था यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, साळुंखे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे टेमकर यांनीच शंभर रुपयांचे बॉँड संबंधित शिक्षण संस्थांकडून घेण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पोलिस अधिकाऱ्यांसहदहा पोलिसांवर खुनाचा गुन्हाकोठडीतील मृत्यू प्रकरण

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

सोलापूरच्या करमाळा येथील वडार समाजातील तरुण रावसाहेब ऊर्फ दशरथ लक्ष्मण जाधव यांच्या मृत्यूप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस व सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी या दोन अधिकाऱ्यांसह दहा पोलिस कर्मचाऱ्यांवर शहर पोलिस ठाण्यात अपहरण, मारहाण करणे आणि खून केल्याचा गुन्हा सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आला.

याबाबतची फिर्याद मृत रावसाहेब जाधव यांचे मेव्हुणे व शिक्षक हिराजी ऊर्फ अनिल दशरथ डिकोळे (वय ३०, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी येथील सीआयडी विभागाच्या तपास पथकाकडे दिली आहे.

दरम्यान, तत्पूर्वी कराड पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत यातील दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्या वतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील वडार समाजाचे विराट शक्तिप्रदर्शन पाहिल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

कराडमध्ये झालेल्या एका बस दरोड्यातील पाऊण कोटींचे चोरीस गेलेले सोने खरेदी घेतल्याच्या सशंयावरुन कराड शहर पोलिसांनी जाधव या सराफ व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांसह त्याच्या शिक्षक मेव्हुणा अनिल दशरथ डिकोळे यांना ताब्यात घेतले होते. मात्र, येथील पोलिसांनी त्यांना बेकायदा ताब्यात घेऊन करमाळ्याहून कराडपर्यंत त्यांना मारहाण करीत आणले. कार्वेनाका पोलिस चौकीत नेऊन तेथेही त्यांना मारहाण करण्यात आली. या वेळी काही दिवसांच्या रजेवर गेलेले कराड शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांनी व त्यांच्या पथकातील पोलिसांनी दोघांना बेदम मारहाण केली आणि सोडून देण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी तेथे उपस्थित असलेले साक्षीदार अनिल दशरथ डिकोळे यांनी केला होता. शनिवारी सकाळी पुन्हा त्याच ठिकाणी रावसाहेब जाधव यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे अनिल डिकोळे यांनी फिर्याद म्हटले आहे.

गुन्हे दाखल झालेले पोलिस कर्मचारी

कराड शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पो. नि. विकास धस, सहा. पो. नि. हणमंत काकंडकी. पोलिस कॉन्स्टेबल दिलीप क्षीरसागर, अतुल देशमुख, सुधीर जाधव, राजकुमार कोळी, नितीनद कदम, सुमित मोहिते, संजय काटे, अमोल पवार, शरद माने, वैभव डांगरे यांच्याविरूद्ध कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ३३२/१६ नुसार भादंविसक ३०२,३६५,३८६,३२४,३२३,५०४, व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास सीआयडी विभागाचे पो. नि. ए. जी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन

कराड शहर पोलिसांकडून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करीत दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. आपल्या मागणीचे निवेदन मोर्च्याच्या शिष्टमंडळाने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना सादर केले. संघटनेच्या वतीने सोमवारी दुपारी येथील शहर पोलिस ठाण्यापासून मोर्चास प्रारंभ झाला. निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना देण्यात आल्यानंतर त्याच ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

संघटनेचे राज्य सचिव भारत इटकर यांनी ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा पोलिसांना दिला. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅडम, माझ्या घरीही नगरसेवक आहेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नगरसेवकांची अरेरावी हा चर्चेचा विषय झाला असताना सोमवारी मात्र वर्कशॉपमधील एका वाहनचालकाने महिला सदस्याशी उद्धट वर्तणूक केली. नगरसेविका शोभा कवाळे यांनी प्रभागातील साफसफाईसाठी जेसीबीची पाठविण्याची सूचना केली असता, वाहनचालक सुशीलकुमार पागर यांनी त्यांच्याशी फोनवरून हुज्जत घातली. नगरसेविका कवाळे यांनी 'तुम्ही लोकप्रतिनिधींशी बोलत आहात, व्यवस्थित बोला' असे फोनवरून सुनावताच वाहनचालक पागर यांनी 'मॅडम, तुम्हीही हळू आवाजात बोला, माझ्या घरीही दोन-दोन नगरसेवक आहेत' असे उलटे उत्तर दिले. कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या वर्तणुकीने संतप्त झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वर्कशॉपवर धडक देत संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. अखेरीस आयुक्तांनी वर्कशॉपला भेट देऊन कर्मचाऱ्यावर कारवाईची ग्वाही दिली.

विक्रमनगर प्रभागातील नगरसेविका शोभा कवाळे या प्रभागातील साफसफाईसाठी वर्कशॉप विभागाला गेले चार, पाच दिवस जेसीबी पाठविण्याची सूचना करत आहेत. मात्र सोमवारी सकाळपर्यंत जेसीबी पा​ठविण्यात आला नव्हता. सोमवारी परत त्यांनी वर्कशॉपमध्ये फोन केला. वर्कशॉपमध्ये वरिष्ठ अधिकारी कुणीही नव्हते. ठोक मानधनावरील वाहन चालक सुशीलकुमार पागर यांनी फोन घेतला. कवाळे यांनी पागर यांना जेसीबीसंदर्भात विचारणा केली. तेव्हा अन्य प्रभागात जेसीबी पाठविण्यात आल्याचे उत्तर त्यांनी दिले. नगरसेविका कवाळे यांनी गेले चार, पाच दिवस जेसीबीची मागणी करूनही चालढकल कशासाठी करता? अशी फोनवरून विचारणा केली.

जेसीबीवरून नगरसेविका कवाळे आणि वाहनचालक पागर यांच्यामध्ये वाद वाढत गेला. जेसीबी पाठविण्याऐवजी वाहनचालक उद्धट बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर कवाळे यांनी पागर यांना फोनवरून चांगलेच खडसावले. यावेळी पागर यांनी कवाळे यांना उद्देशून, 'मॅडम, हळू आवाजात बोला, माझ्या घरी ही दोन-दोन नगरसेवक आहेत.'अशा शब्दांत उलटे उत्तर दिले. कवाळे यांनी नऊच्या सुमारास वर्कशॉपमध्ये येऊन संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारला. याठिकाणी पुन्हा वादावादी झाली.

पदाधिकाऱ्यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब

कवाळे यांनी या घटनेची माहिती महापौर अश्विनी रामाणे व इतर पदाधिकाऱ्यांना दिली. महापौर रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, परिवहन समिती सभापती लाला भोसले, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रताप जाधव, राहुल माने, दुर्वास कदम, इंद्रजित बोंद्रे यांनी वर्कशॉपमध्ये जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला फैलावर घेतले. वर्कशॉपमधील प्रकाराची माहिती आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना कळविण्यात आली होती. दोघेही अधिकारी वर्कशॉपमध्ये पोहचले. पदाधिकारी व नगरसेवकांनी, दोन्ही अधिकाऱ्यांच्यापुढे कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. अधिकारी घटनास्थळी येण्यापुर्वीच वाहनचालक पागर यांनी पदाधिकारी व नगरसेवकांपुढे सकाळी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. पगार वेळेवर नसल्यामुळे मानसिक स्थिती योग्य नव्हती, असा खुलासा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थींनीची शाळेविरुद्ध तक्रार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळा प्रशासनाने नववीच्या वर्गात हेतूपुरस्सर नापास केल्याची तक्रार भवानी मंडप, बाराईमाम परिसरातील एका मुलींच्या शाळेतील नऊ विद्यार्थींनीनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला लोकशाही दिनात केली आहे. सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात सात अर्ज दाखल झाले. त्यामध्ये महसूल खात्यासंबधी चार, पोलिस खात्यासंबधी दोन तर जिल्हा परिषदेकडे एका अर्जाची तक्रार दाखल केली आहे.

उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महिला लोकशाही दिनात तक्रार केली आहे. मुलींच्या शाळेतील नऊ मुलींनी नववीमध्ये हेतूपुरस्सर नापास केले आहे. मुख्याध्यापिका आणि शिक्षिका अपमानास्पद वागणूक देतात. वार्षिक फी देण्यास विलंब झाल्यास मैदानावर उन्हात अंगठे धरून उभे केले जाते. शाळेत शौचालय व बाथरुममध्ये सुविधा नाहीत. सहामाहीच्या​ निकालाच्यावेळी शिक्षकांनी पालकांना 'तुमच्या मुली वार्षिक परीक्षेत नापास होणार आहेत,' असे सांगितले होते. पालकांनी 'मुलींच्या अभ्यासाकडे तुम्ही लक्ष द्या' असे सांगितल्यावर शिक्षकांनी वर्गात पटसंख्या जास्त असल्याने आम्ही लक्ष देऊ शकत नाही, असे पालकांना सांगितले होते. यापुर्वी एका आठवीच्या मुलीने शाळा सुटल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेची चौकशी व्हावी. बऱ्याच मुलींना नापास केल्याने शाळेत भीतीचे वातावरण आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी योग्य विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयजीएम हस्तांतरण; आज शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नगरपालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) अखेर राज्य सरकारने चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आज (मंगळवार) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित पडलेला आयजीएम हस्तांतरणाच्या विषयाला पूर्णविराम मिळणार आहे.

सर्वसामान्यांना अल्पदरात औषधोपचार मिळावेत यासाठी नगरपालिकेने ३५० बेडचे आयजीएम हॉस्पिटल उभारले. प्रारंभीच्या काळात सुविधांनीयुक्त असलेले हे हॉस्पिटल कालांतराने आर्थिक दुष्टचक्रात अडकले. सर्वांत श्रीमंत नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खालावल्याने हा पांढरा हत्ती पोसणे नगरपालिकेला जड जाऊ लागल्याने सर्वसामान्य रुग्णांची परवड होऊ लागली. त्यामुळे मध्यंतरी हे हॉस्पिटल खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याच्या हालचाली झाल्या. मात्र, त्याला प्रचंड विरोध झाला. त्यानंतर हे हॉस्पिटल राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा मुद्दा पुढे आला. त्यालाही राजकीय कुरघोड्यांमुळे विरोध होऊ लागल्याने पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) चा मुद्दा पुढे आला. परंतु राजकारणामुळे आयजीएमचा हा विषय म्हणजे भिजत घोंगडे बनला होता.

दरम्यान, आयजीएम हस्तांतरणाबाबत अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हॉस्पिटल सक्षमीकरण आणि पीपीपी असे दोन पर्याय ठेवले होते. नगरपालिकेने हस्तांतरण संदर्भात सर्वसाधारण सभेत ठराव करून प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार सरकारने न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहत आयजीएम हस्तांतरण करून घेण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

यासंदर्भात सोमवारी सर्व सोपस्कर पार पडले असून, मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर मोहोर उठविण्यात येणार आहे. न्यायालयाने राज्य सरकारला ठणकावत ७ जुलैची डेडलाइन दिली होती. त्यामुळे सरकारला हस्तांतरणाचा निर्णय घेणे भाग पडले.

वारणा योजनेलाही मंजुरी

अमृत योजनेतून वारणा नदी उद्भव धरून शहराला थेट पाइपलाइनने पाणीपुरवठा करण्यासाठी ७० कोटी रुपये खर्चाची वारणा योजना राज्य सरकारने स्वीकारली आहे. या योजनेला मंगळवारी खास बाब म्हणून राज्य सरकार मंजुरी देणार आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या योजनेचा मार्ग सुकर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंत प्रोसेसर्सवर सत्तारूढ गटाचे वर्चस्व

$
0
0






म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील दि यशवंत को-ऑप. प्रोसेसर्स या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ सहकार पॅनेलने आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. सर्वसाधारण 'अ' गटातील नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व जागा जिंकल्या.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत यशवंत प्रोसेस या संस्थेच्या सन २०१६-१७ ते २०२१-२२ साठीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. सर्वसाधारण अ गटातील ९ जागांसाठी १० अर्ज शिल्लक राहिल्याने ९ जागांसाठी निवडणूक लागली होती. संस्थेच्या १०१० पैकी ६५० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर कल्याण केंद्र येथेच निवडणूक निर्णय अधिकारी एन. व्ही. चंदगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.

उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते ः सर्वसाधारण 'अ' वर्ग गट - चंद्रकांत दत्तात्रय घाटगे (६२१), मुकुंद शामराव पोवार (६१८), महावीर बाळू कुरुंदवाडे (६१४), आनंदा सदाशिव दोपारे (६२१), शशिकांत आदिशा केटकाळे (६२१), श्रेणिक बापूसाहेब मगदूम (६१६), उल्हास चद्रकांत मंडलिक (६१४), गजानन अण्णासाहेब लोंढे (६०७), रणजितसिंह भिकाजीराव गायकवाड (६१७). विरोधी गटातील सुनील बस्तवाड यांना अवघी ३२ मते मिळाली. निकालानंतर सत्तारुढ गटाचे प्रचारप्रमुख प्रकाश मोरे यांनी सर्व सभासद व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

मतदान प्रक्रियेवेळीे स्वप्निल आवाडे, सतीश डाळ्या, अशोकराव सौंदत्तीकर, राहुल आवाडे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'माहेरच्या सत्काराने भारावले’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'माझा जन्म गडहिंग्लजला झाला असला आणि बालपणाची काही वर्षे आजऱ्यात गेली असली तरी मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीत उभी हयात घालविल्यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारानिमित्त वटपौर्णिमेदिनी आजरेकरांनी माझा जो सत्कार केला, तो माझ्या माहेरचाच असल्याचे मानते. खरंच या घरच्या सत्काराने मी भारावून गेले,' असे भावोद्गार ज्येष्ठ मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी येथे काढले.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अभिनय क्षेत्राचा उंबरठा ओलांडत, उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीच्या रूपेरी जीवनातील सोनेरी क्षणांचा पट उलगडताना येथील श्रीमंत गंगामाई वाचनालयाच्या सभागृहामध्ये आयोजित प्रकट मुलाखतीस उत्साही प्रतिसाद देताना काळे संवाद साधत होत्या. निमित्त होते मराठी नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील 'निर्धार' कला, क्रीडा, सांस्कृतिक व शौक्षणिक संस्थेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभाचे. आजऱ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे अध्यक्षस्थानी होत्या. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

काळे म्हणाल्या, 'मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीमध्ये लौकिक मिळविला, पण या दरम्यान अनेक आमंत्रणे या परिसरातून येत राहिली. आजही येथील निसर्गरम्य रामतीर्थ आणि रवळनाथ मंदिरासह ओळखीच्या असंख्य स्थळांच्या दर्शनाने आणि परिचितांच्या सहवासाने बालपणीचे क्षण पुन्हा अनुभवले. मराठी रंगभूमीनेच माझ्यातील कलाकाराला घडविले. मराठी नाट्यप्रयोगांना प्राधान्य देत राहिले. अखंड आयुष्यात एकही नाट्यप्रयोग ना रद्द केला, ना पुढे ढकलला. नाट्यप्रयोगांच्या तारखा व वेळेबाबत समजून घेणारे कलाकार व दिग्दर्शक लाभले. हिंदी चित्रपटसृष्टीत ते घडले नसते. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रमू शकले नाही.'

कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, उमा भेंडे, दिग्दर्शक अनंत मानेंसारख्या दिग्गजांसह 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत यांच्यासारख्या साहित्यिकांबाबतचे अनुभव काळे यांनी खुमासदारपणे शेअर करण्यासाठी 'निर्धार'च्या समीर देशपांडेंनी संवादकाची भूमिका अतिशय नेमकेपणाने पार पाडली. आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी यांच्या हस्ते काळेंना सन्मानित करण्यात आले. सरपंच संजीवनी सावंत, मुकुंददादा देसाई, डॉ. शिवशंकर उपासे, डॉ. अंजनी देशपांडे, संभाजी इंजल, आदी उपस्थित होते.

आजऱ्याचा 'काळा जिरगा' सौंदर्यवर्धक

गेली पन्नास वर्षे नाट्य-चित्रपट क्षेत्रात असूनही तुमचे सौंदर्य अबाधित कसे राहिले, अशी विचारणा अनेकांनी केली. याबाबत बोलताना, लहाणपणी आईने येथील स्वादिष्ट व सुगंधी असा 'काळा जिरगा' भात आणि दूधभात भरविला होता. कदाचित येथील काळा जिरगा सौंदर्यवर्धक असावा. म्हणूनच आजही माझे सौंदर्य अबाधित राहिल्याची मिश्किल टिप्पणी काळे यांनी दिल्यानंतर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे औचित्त्य साधून येथील प्रा. विजय बांदेकर यांनी त्यांना गेल्यावर्षी पिकविलेला काळा जिरगा भेट म्हणून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसांत तावडेचा ताबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय अटकेतील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला चौकशीसाठी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यास सीबीआय कोर्टाने परवानगी दिली. कॉम्रेड पानसरे हत्येचा तपास करणारे अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्याचबरोबर पानसरे हत्या प्रकरणी हायकोर्टासह जिल्हा सत्र न्यायालयातही सुनावणी होणार असल्याने २४ जूननंतरच कोल्हापूर पोलिस तावडेचा ताबा घेणार आहेत. यानंतर समीर आणि तावडेची समोरासमोर चौकशी होऊ शकते

संशयित तावडेच्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून, त्याचा कोल्हापुरातील वावर, काही व्यक्तींशी असलेला संपर्कही उघड झाला आहे. तावडेची कोल्हापुरातील पार्श्वभूमी लक्षात घेऊन कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात त्याची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचा ताबा मिळावा यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आठवड्यापूर्वीच सीबीआय कोर्टात अर्ज दाखल केला होता. सोमवारी (ता. २०) झालेल्या सुनावणीत कोर्टाने तावडेला न्यायालयीन कोठडी मंजूर केली. तसेच कोल्हापूर पोलिसांकडे ताबा देण्यास परवानगी दिली. यानंतर तातडीने कोल्हापूर पोलिस तावडेचा ताबा घेतील आणि त्याला कोल्हापूरला आणतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी २४ जूननंतर संशयित तावडेचा ताबा घेणार असून, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येबाबत त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तावडेचे कोल्हापुरात सहा वर्षे वास्तव्य होते, त्याचबरोबर कोल्हापुरातील अनेकांशी त्याचा संपर्क होता. सीबीआयला साक्ष देणारा साक्षीदारही कोल्हापुरातीलच आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमके काय घडले होते याचा तपास केला जाईल, अशी माहिती दिली. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड आणि डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित तावडे या दोघांची समोरासमोर चौकशी होऊ शकते. यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागण्याची शक्यता आहे.

तावडेचे कोल्हापूर कनेक्शन लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांसह एसआयटीने वेळोवेळी सीबीआयकडून माहिती घेतली आहे. त्याचबरोबर साबीआयला अपेक्षित माहितीही पुरवली आहे. तावडेचे कोल्हापुरातील सहा वर्षांचे वास्तव्य आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या सक्रीय कार्यकर्त्यांशी संपर्क असल्याने तावडेच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या तपासात कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येविषयी पोलिस माहिती घेण्यास प्राधान्य देतील, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली आहे.

गुरुवार, शुक्रवार सुनावणी

या प्रकरणी गुरुवारी (२३ जून) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. संशयित समीर गायकवाडने केलेला जामीन अर्ज, तिन्ही तपास यंत्रणांचा प्रोग्रेस रिपोर्ट आणि समीरवर आरोप निश्चितीला स्थगिती मिळावी या कोल्हापूर पोलिसांच्या विनंती अर्जावर एकत्रित सुनावणी होणार आहे. यानंतर शुक्रवारी (२४ जून) कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छेडछाडप्रकरणी सहाजणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छेडछाडीतून बोंद्रेनगर येथील तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी करवीर पोलिसांनी सोमवारी (ता. २०) सहा संशयितांना अटक केली. पल्लवी बोडेकर (वय १८) या तरुणीने रविवारी रात्री आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी सहाजणांची नावे चिट्ठीत लिहून ठेवली होती. पल्लव्वीच्या आत्महत्येनंतर सर्व संशयित फरार झाले होते. देवाप्पा गणपती बोडके (वय २२), संजय सोनबा शेळके (१९), चौंडू गणपती बोडके, पांडुरंग बबन शेळके (१९), बबन नागू शेळके(३२) आणि राजू सोनबा शेळके(२३, सर्व, रा. बोंद्रेनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पल्लवीला हे तरुण छेडछाड करून त्रास देत होते. आई-वडिलांचे छत्र हरवलेली पल्लवी आजी आणि लहान बहिणीसोबत बोंद्रेनगरात राहत होती. तिच्या दोन मोठ्या बहिणींची लग्ने झाली आहेत. राहत्या घरापासून आठ किलोमीटर लांब असलेल्या नागाळा पार्क परिसरात ती धुण्याभांड्याचे काम करत होती. आधीच परिस्थितीने गांजलेल्या पल्लवीला गल्लीतील टोळक्याने त्रास द्यायला सुरवात केली होती. त्यांना विरोध करण्याची ताकद नसल्याने ती निमूटपणे हा अन्याय सहन करत होती. मात्र तिच्या असहायतेचा फायदा घेत गल्लीतील टोळक्यांनी तिला जास्तच त्रास द्यायला सुरूवात केली. यातूनच रविवारी (ता. २०) संध्याकाळी घरी परतताना देवाप्पा बोडके आणि त्याच्या मित्रांनी तिला रस्त्यातच अडवून छेडले. या घटनेचा धक्का बसून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी तिने टोळक्याच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. 'वारंवार हे सहाजण माझी छेड काढत होते. मला आईवडील नसल्याने माझी कैफियत कुणासमोर मांडायची? त्यामुळे आत्महत्या करत आहे', असे तिने लिहून ठेवले होते. या चिठ्ठीच्या मजकुरावरून छेडछाड करणाऱ्या टोळक्याच्या घरांवर नागरिकांनी रविवारी रात्री दगडफेक केली होती. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती होती. पल्लवीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच हे टोळके पळून गेले होते. मात्र करवीर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर बोंद्रेनगरातील धनगरवाडा परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. पोलिस उपअधीक्षक भरतकुमार राणे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन पल्लवीच्या नातेवाईकांची विचारपूस केली. दरम्यान, पल्लवीची लहान बहीण निकिता हिचे पालकत्व महादेवराव महाडिक यांच्या उद्योग समूहाने स्वीकारल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सहायकांची लाखांत झेप

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूर ः जिल्ह्यात आजअखेर २१९ सिमेंटचे बंधारे कागदोपत्री परफेक्ट आहेत. प्रत्यक्षात मात्र काही कंत्राटदारांनी बंधाऱ्याच्या मापात पाप केले आहे. कृषी सहायकांनी अनेक गावांतील सरपंच आणि सचिवांना 'मॅनेज' करून लाखो रुपये कमावले आहेत. प्रत्यक्षात झालेले बंधारे आणि आराखड्यातील बंधाऱ्यांची लांबी आणि रुंदी फुगीर असल्याने या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात वसुंधरा पाणलोट योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यामातून पाणलोटअंतर्गत येणाऱ्या गावांत सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, नाला बंडिंग, आदी कामे पूर्ण झाली आहेत. सन २०१४-१५ मध्ये नऊ तालुक्यांत १२१ सिमेंटचे बंधारे बांधले. त्यासाठी ५ कोटी ४ लाख रुपये खर्च केले आहेत. सन २०१५-१६ मध्ये २५ बंधारे बांधण्यात आले. आजअखेर जिल्ह्यात २१९ बंधारे बांधले असून, त्यापोटी ९ कोटी ७४ लाख रुपये खर्ची टाकले आहेत. या बंधारा बांधणीत पाणलोटशी निगडित तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, पाणलोट समिती, कृषी सहायक, सुपरवायझर, कंत्राटी कर्मचारी संबंधित आहेत. गावस्तरावर स्थापन केलेल्या वसुंधरा पाणलोट समितीचे अध्यक्ष व सचिव सहभागी झाले आहेत. वसुंधरा पाणलोट योजनेत कृषी सहायकांनी मोलाची भूमिका बजाविली आहे. बंधाऱ्यांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाला. यामध्ये गावचे सरपंच आणि सचिव यांना 'मॅनेज' करून काही कृषी सहायक लखपती बनले आहेत. पाणलोट समित्यांची कागदपत्रे, धनादेश, इतिवृत्त आणि मोजमाप पुस्तिका या अधिकाऱ्यांच्या ताब्यात राहिल्या. याप्रकरणी राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी तालुक्यांतून गावनिहाय कृषी विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. तांत्रिक चुका आणि आर्थिक अनियमितता अजूनही काही बंधाऱ्यांत कायम आहेत.

कागदावर बंधारे, बंधाऱ्याचे फोटो, रेकॉर्डिंग सारे काही पुराव्यानिशी आहे. मात्र, प्रत्यक्षात ऑनपेपर बंधाऱ्यांची लांबी आणि रुंदी वेगळी आहे. प्रत्यक्षात पाहणी केलेल्या बंधाऱ्याचे चित्र वेगळे आहे. सिमेंट नाला बांध, माती नाला बांध ही कामे कृषी विभागातील काही अधिकारी, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या संस्थांना दिली आहेत. तांत्रिक कामांचे ठेके कर्नाटकातील मजुरांना दिल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात मशिनरीचा वापर करून काहींनी लाखो रुपये मिळविले. कृषी सहायकांच्या मर्जीतल्यांना कामाचा ठेका देण्यात आला. प्रत्यक्ष केलेल्या कामाची पाहणी न करताच काही कामाच्या आराखड्यात नाल्याची लांबी-रुंदी कागदावर वाढविण्यात आली. त्याला मंजुरीही दिल्याचे समजते. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी तक्रारी केल्या. मात्र, त्यांची शहानिशा अद्याप झालेली नाही. तक्रार केलेल्या सदस्यांनी त्यांचा पाठपुरावा केलेला नाही, याचे गौडबंगाल कायम आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

पाणलोट विकास योजनेंतर्गत झालेल्या गावांतील कामासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी १७ जूनला बैठक बोलावली होती. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार संध्यादेवी कुपकेर या बैठकीस उपस्थित राहणार होत्या. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आपली बाजू मांडणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिच्या स्वप्नांचा केला चुराडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई वडिलांचे छत्र हरपलेले. मोठ्या बहिणींची लग्ने झाली. घरात लहान बहीण आणि आजीची जबाबदारी पडल्याने ती मायेनं या सगळ्यांचा सांभाळ करत होती. लहान बहिणीच्या शिक्षणासाठी तिने दहावीनंतर शिक्षण बंद केले. घरकाम करून घर चालवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र उनाडक्या करणाऱ्या टोळक्याची नजर तिच्यावर पडली व तिला त्रास देण्यास सुरुवात केली. 'लग्न केले नाहीस तर घर उद्ध्वस्त करुन टाकू' अशी धमकी दिलेली. एका बहिणीच्या नवऱ्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या साऱ्या भयानक प्रकाराने ती हडबडून गेली. पोलिसांकडे तक्रार केली. पण त्यांच्याकडूनही काही झाले नाही. शेवटी मोठ्या व लहान बहिणींचे फुलणारे आयुष्य आपल्यामुळे कोमेजून जाण्यापेक्षा स्वतःचेच आयुष्य संपवण्याचा निर्णय तिने घेतला. एकापाठोपाठ एक आलेल्या या संकटांनी तिच्या स्वप्नांचाच चुराडा या टोळक्याच्या धास्तीने झाला.

पल्लवी गणपती बोडेकर या १७ वर्षीय तरुणीने रविवारी केलेल्या आत्महत्येनंतर तिच्या आठवणीने बोंद्रेनगरमधील धनगरवाड्यातील साऱ्यांचेच डोळे डबडबून गेले होते. आत्महत्येच्या काही क्षणापूर्वी सोबत असलेली लहान बहीण निकिता ही तर ओक्साबोक्सी रडत होती. कांदे आणायला म्हणून बाहेर गेले नसते तर कदाचित ही वेळही टळून गेली असती असे सांगत रडून रडून तीही कुटुंबाच्या मागे लागेला दुर्दैवाचा फेरा जणू सांगत होती.

बोंद्रेनगर रस्त्यावरील धनगरवाडा म्हणजे गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा तालुक्यातून रोजगारासाठी आलेल्या २०० कुटुंबांची वस्ती. कुठे ना कुठे मोलमजुरी करणारी पुरुष मंडळी तर धुणीभांड्याची कामे करून घराला हातभार लावणाऱ्या महिला. त्याच वस्तीत असलेले बोडेकर कुटुंबीय. गणपती अंबाजी बोडेकर हे कधी सर्व्हिसिंग स्टेशनवर तर कधी इतर ठिकाणी, जिथे मजुरी मिळेल तिथे काम करणारे. इतरांपेक्षा जेमतेमच रोजगार असल्याने एका खोलीतील त्यांचा संसार. दहा वर्षापूर्वी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने त्यांच्यावर जणू आकाशच कोसळले. पण आई हौसाबाईने न डगमगता नागाळा पार्कात घरकामे करुन चार मुलींपैकी दोन मुलींची लग्न केली. दोन मुलींना चांगले शिकवण्याचे ठरवलेल्या या आईची इच्छा नियतीला मान्य नव्हती. अगदी दोन वर्षांतच नागाळा पार्कमध्ये घरकामाला त्या गेल्या असता दुचाकीस्वाराने त्यांना ठोकरले. त्यातच त्यांचे निधन झाले.

वडील गेले, त्यांचा धक्का जरा कमी होतो न होतो तोच आईही साथ सोडून गेली. ११ व्या वर्षी पल्लवी ही त्या घरातील कर्ती मुलगी होती. बहिणी व त्यांचे पती जरी सोबतीला असले तरी निकिताची जबाबदारी तिच्यावरच पडली होती. शेजारी चुलते असल्याने त्यांच्या व बहिणींच्या मदतीने तिने कशीबशी दहावी पुर्ण केली. पण लहान बहिणीच्या शिक्षण पुर्ण करायचे असेल तर आपल्याला शिकता येणार नाही, हे समजले असल्याने तिने दहावीनंतर शिक्षण सोडले. आईप्रमाणे नागाळा पार्कमध्ये घरकामाला जाऊन घर चालवण्याबरोबर विद्यापीठ हायस्कूलमध्ये असलेल्या निकिताचे शिक्षण पुर्ण करण्याचा प्रयत्न ती करत होती. मात्र घराच्या परिसरातील टोळक्याने तिला घरापासून नागाळा पार्कपर्यंत दररोज पाठलाग चालवला होता. त्याची कुठे तिने वाच्यता केली नव्हती. पण चार दिवसांपूर्वी तिच्या बहिणीचा पती राजू भागोजी शेळके याला या टोळक्याने या प्रकरणात मध्ये पडू नको, असे म्हणत वाद घातला. या वादातून खुरपे घेऊन त्यांचा पाठलाग केला होता. हा सारा प्रकार पाहून ती घाबरून गेली होती. चार दिवसांपासून ती शांत शांत असायची. टोळक्यातील मुले तिला वारंवार अडवून शेळकेशी लग्न केले नाही तर घर फोडून टाकू, पोलिस काही करू शकत नाहीत, असे सांगत धमकावत होती.

टोळक्याचा वाढत चाललेल्या त्रासामुळे तिला आपले घर उद्धवस्त होईल, अशी धास्ती वाटत होती. चांगला संसार सुरू असलेल्या बहिणींच्या आयुष्यात आपल्यामुळे वादळ येणार. लहान बहिणीच्या शिक्षणाचे सारे स्वप्न धुळीस मिळणार, सारे घर विस्कटणार या भीतीने आपलेच काय व्हायचे ते होऊ दे, म्हणून पल्लवीने स्वतःचेच आयुष्य संपवले.

आईबाप नसलेल्या पोरींना त्रास देणाऱ्या टोळक्याने आमच्या घराचे वाटोळे केले. या टोळक्याने घर फोडण्याची धमकी दिली, पोलिसही आम्हाला काही करत नाही, हे सांगून घरापर्यंत येण्याचे धाडस त्यांनी केले. टोळक्याच्या या अतिरेकाने आमची पोरगी गेली. पोलिसांनी आम्ही केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्षच केले आहे. आमच्या पोरगीला न्याय मिळाला पाहिजे. त्या आरोपींना जर कडक शिक्षा नाही मिळाली तर आता गप्प बसणार नाही. प्रसंगी आंदोलने करणार आहे.

अर्चना जानकर, पल्लवीची बहीण

मुलींची संख्या कमी झाली म्हणून सरकार मुलींना वाचवा, मुलगा मुलगी भेदभाव करू नका, असे सांगत असते. आता या मुली जगण्यासाठी, शिक्षणासाठी बाहेर पडत असताना त्यांच्या संरक्षणाचे काय? या उनाड टोळक्याने किती महिन्यांपासून पल्लवीचा त्रास चालवला होता हे माहीत नाही. मग या मुलींचा वाली कोण? कुणी पाठीमागे नाही हे पाहून त्रास द्यायचा हे कोण थांबवणार? याचा काही बंदोबस्त करा.

ताईबाई गावडे, पल्लवीची मावशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठोस पुराव्यानंतरअटकेची प्रक्रियासीआयडीच्या अधिकाऱ्यांची माहिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड पोलिसांच्या कोठडीतील रावसाहेब जाधव यांच्या मृत्यूप्रकरणातील आरोपींविरोधात ठोस पुरावे हाती येताच आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती 'सीआयडी'च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

फिर्यादी व मृत रावसाहेब जाधव यांचा शिक्षक मेहुणा हिराजी ऊर्फ अनिल दशरथ डिकोळे (वय ३०, रा. घोटी, ता. करमाळा) यांनी सीआयडी तपासादरम्यान दिलेल्या लेखी जबाबात या प्रकरणातील धक्कादायक माहिती बाहेर येऊ लागली आहे. फिर्यादीनुसार, १७ जून रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिराजी ऊर्फ अनिल हा घरी असताना रावसाहेब जाधव हे त्याच्याकडे आले. त्यांनी डिकोळे यांना आपण दोघे दुचाकीवरून केम रोडला जाऊ, असे म्हणून त्यांनी अनिलला सोबत घेतले. त्यानंतर हे दोघेही दुचाकीवरून (एमएच ४५ वाय ३४००) केम रोडच्या दिशेने निघोले होते. त्यावेळी पाठीमागून आलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार अचानक दुचाकीसमोर येऊन थांबली. त्यातून चौघेजण खाली उतरले, त्यांनी रावसाहेब व अनिल बसलेल्या दुचाकीवर जोरात लाथ मारल्याने ते दोघेही दुचाकीवरून खाली कोसळले. त्यानंतर त्यांनी दोघांचे मोबाइल जबरदस्तीने काढून घेत कारमध्ये बसलेल्यांनी या दोघांना कारमध्ये घातले व सदर कार केम, रोपळे, कुर्डुवाडी, शेटफळ चौक मार्गे पंढरपूरमध्ये नेण्यात आली. त्याठिकाणी आणखी एक इनोव्हा कार आली. रावसाहेब व अनिल यांना त्या कारमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर कार कराडच्या दिशेने निघाली असता रस्त्यात कारमध्येच पोलिसांनी या दोघांना वारंवार जबर मारहाण केली. तसेच पंचवीस लाख रुपये द्या, लगेच सोडतो, अशी धमकी दिल्यानंतर पैसे देण्यास रावसाहेब यांनी नकार दिल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली, अशी माहिती अनिल डिकोळे यांनी सीआयडी पथकाला तपासादरम्यान दिल्याने पोलिसांच्या मोगलाई कृतीने सारेच अवाक झाले आहेत. फिर्यादीनुसार तपास सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पायडरमॅन’ला अमेरिकेत शिष्यवृत्तीसाताऱ्याचा सिद्धार्थ कुलकर्णी करणार ‘कोळी’ कीटकावर पीएचडी

$
0
0

'स्पायडरमॅन'ला अमेरिकेत शिष्यवृत्ती

साताऱ्याचा सिद्धार्थ कुलकर्णी करणार 'कोळी' कीटकावर पीएचडी

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'कोळी' या कीटकावर संशोधन करणाऱ्या साताऱ्याच्या सिद्धार्थ कुलकर्णी याला अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. पुढील पाच वर्ष सिद्धार्थ वॉशिंग्टन विद्यापीठात राहून पीएचडी करणार आहे. या पूर्वी त्याला जगभरातील संग्रहालयात संग्रहित करण्यात आलेल्या कोळ्यांवर संशोधन करण्यासाठी हॉवर्ड विद्यापीठाने शिष्यवृत्ती दिली होती.

कोळी हा कीटक दिसायला आकर्षक नाही. सामान्य माणसाला त्याचा कोणताही दैनंदिन उपयोग नाही, किंवा हा कोणत्याही देशाचा राष्ट्रीय कीटकही नाही. तरीही साताऱ्याच्या सिद्धार्थ कुलकर्णी याने कोळ्यावर अत्यंत मूलभूत संशोधन केले आहे. त्याच्या संशोधनाची व्याप्ती इतकी आहे, की कोळी या कीटकावर संशोधन करणारे जगभरातील संशोधक सिद्धार्थची मदत घेतात. सिद्धार्थ साताऱ्यात प्राणीशास्त्रामध्ये एमएससी झाला आहे. एका प्रवासादरम्यान त्याला वेगळ्या प्रकारचा कोळी दिसला. या बाबत त्याने प्राणिशास्त्र विषयातील काही तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली. हा एक दुर्मिळ प्रकारचा कोळी असल्याचे त्याच्या लक्षात आले. इथूनच सिद्धार्थच्या संशोधनाला सुरुवात झाली. संशोधनामधील सिद्धार्थची तन्मयता इतकी होती, की एमएससी होण्यापूर्वीच त्याने आपल्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये शोधनिबंध सादर केले होते. सिद्धार्थने केलेल्या मूलभूत संशोधनाची दखल हार्वर्ड विद्यापीठाने घेतली आणि त्याला शिष्यवृत्ती देऊ केली. जगभरातील संग्रहालयातील कोळी कीटकांवर संशोधन करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली होती. आता त्याला जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊ केली आहे. दीड वर्षांपूर्वी सिद्धार्थच्या संशोधनाबाबत खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला; पण प्रसिद्धीच्या मागे न लागता त्याने आपले संशोधन सुरूच ठेवले. भारतीय उपखंडावरील कोळी कीटकांच्या प्रजातीवर तो संशोधन करीत आहे.

आपल्या संशोधनाबद्दल सिद्धार्थ सांगतो, 'कोळी हा कीटक नैसर्गिक विविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जगातील सर्वाधिक शक्तिमान किटक आहे. कोळी सोडत असलेला धागा अत्यंत मजबूत असतो. बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. या शिवाय काही कोळी विषारी असतात. त्याचा उपयोग अनेक औषधांमध्ये होतो. त्याचबरोबर कर्करोगाबाबत जी औषधे बनवण्यात येतात. त्यामध्ये कोळी कसा उपयोगी पडू शकतो, या बाबत संशोधन सुरू आहे. सौंदर्यप्रसादने बनवण्यासाठीही या कीटकाचा वापर होऊ शकतो. कोळी शेतामध्ये पडणारी कीडही खातो. तसेच गरज पडल्यास कोळी एकमेकांनाही खातात. त्यामुळे शेतात त्यांची संख्या वाढली तर त्यावरही नियंत्रण ठेवता येते. कोळ्यांच्या या उपयोगाबाबत जगभर संशोधन सुरू आहे. लवकरच या संशोधनाचे निष्कर्ष समोर येतील.

जगभरात कोळ्यांच्या ४६ हजार जाती

सिद्धार्थ सांगतो, जगात कोळ्यांच्या ४६ हजार प्रजाती सापडल्या आहेत. भारतात त्यातील सतराशे प्रजाती सापडतात. ब्रिटिशकाळामध्ये या बाबत काही संशोधन झाले; पण नंतर या बाबत कोणी संशोधन केले नाही. या सतराशे प्रजाती शोधणे त्यांचे वैशिष्ट्ये, आधिवास या गोष्टींची नोंद घेऊन त्यांचे नामकरण करणे हा माझ्या संशोधनाचा गाभा आहे. चीनमध्ये सापडणारे कोळी आसाम, मणिपूर येथे सापडतात. श्रीलंकेतील कोळ्यांमया प्रजाती तामिळनाडूमध्येही दिसतात.

आतापर्यंत सिद्धार्थने भारतीय उपखंडातील कोळी किटकांच्या पाच प्रजाती शोधल्या आहेत. देशभरातील अभ्यासकांचे एक जाळे सिद्धार्थने बनवले आहे. फेसबुकवर स्पायडर इंडिया नावाचे पेजही त्याने बनवले आहे.

कोळी ताकदवान कीटक

कोळी या किटकाच्या वैशिष्ट्यांबद्दल सिद्धार्थ सांगतो, 'कोळी हा किटक ताकदवान आहे. मणिपूर येथील जंगलात एका कोळ्याने गवत्या साप मारून आपल्या जाळ्यात अडकवला होता. संयम, ताकद आणि लपून राहण्याची खासियत कोळ्यांमध्ये आहे. कोळ्याची मादी जेव्हा शेवटची कात टाकते त्यावेळी ती प्रजननासाठी सक्षम झालेली असते. तेव्हा ही मादी असून, ती प्रजननक्षम असल्याचा संदेश इतर नरांना जातो. जन्माला येणाऱ्या पिल्लांमध्ये जर कोणी अशक्त असेल तर मादी त्याला खाऊन टाकते. या किटकाची जीवनशैली वेगळी आणि वैशिष्टपूर्ण आहे. म्हणूनच कोळ्यांवर संशोधन करणे आवश्यक वाटते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बंद बसेस, टाकाऊ साहित्याचे आगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टायरअभावी बंद अवस्थेतील सहा बसेस, स्क्रॅपमध्ये निघालेल्या जुन्या गाड्या, केएमटीच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आलेली अतिक्रमण विरोधी कारवाईतील केबिन्स, आरटीओ विभागाने जप्त केलेली वाहने, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जुन्या इमारतीवरील कौले, असे चित्र परिवहन विभागाच्या वर्कशॉपमध्ये नजरेस पडते. टायर खरेदीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आणखी काही दिवस सहा नव्या बसेस बंद राहणार आहेत. दुसरीकडे प्रत्येक विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जाणवते.

शास्त्रीनगर परिसरात केएमटीचे वर्कशॉप आहे. वर्कशॉप विभाग २४ तास सुरू असते. रात्रीच्या ​शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास 'वर्कशॉप'ला भेट दिली. सुपवायरझर, मेकॅनिकल, इलेक्ट्र‌िकल, टायर विभाग, ब्लॅकस्मिथ विभाग, स्टोअर विभाग, प्रशासकीय विभागात कर्मचाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. बसेसची देखभाल दुरुस्ती, कमानपाटा, बॅटरी दुरूस्ती, ब्रेक दुरूस्ती, टायर खोलणे, जोडणी अशी अनेकविध प्रकारची कामे वर्कशॉपमध्ये होतात. २४ तास आणि चार शिफ्टमध्ये वर्कशॉपचे काम चालते, अशी माहिती मेंटनन्स इंजिनीअर अमरसिंह राणे यांनी दिली.

६९ जागा रिकामी

वर्कशॉपसाठी १८८ पदे मंजूर आहेत. हे मनुष्यबळ ९९ बसेसच्या देखभाल, दुरूस्ती व इतर कामासाठी आवश्यक आहे. वर्कशॉपसाठी १८८ पदे मंजूर असली तर ११९ पदे कार्यरत आहेत. ६९ जागा भरल्या नाहीत. आज केएमटीच्या ताफ्यात १२९ बसेस आहेत. पण वर्कशॉपमधील मनुष्यबळात वाढ झाली नाही.

जुन्या साहित्याचा खच

केंद्र सरकारने केएमटीसाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र संपूर्ण निधी मुदतीत खर्ची न पडल्याने कोट्यवधी रुपये माघारी गेले. त्याचा फटका थेट वर्कशॉपचे सुशोभिकरण, वॉशिंग रॅम्प, पत्र्याचा शेड या कामांना बसला आहे. शिवाय २९ बसेसची खरेदीही झाली नाही. केएमटीची मोकळी जागा म्हणजे टाकावू साहित्य टाकण्याचे आगार बनले आहे. आरटीआने कारवाई केलेली वाहने, रिक्षा वर्कशॉप परिसरात ठेवल्या आहेत. महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहिमेत जप्त केलेल्या केबिन्स टाकल्या आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभिकरणावेळी जुने साहित्य येथे ठेवण्यात आले आहे.

वर्कशॉपमध्ये प्रवेश केल्या क्षणी, नजरेस जुन्या स्क्रॅपमध्ये विक्रीस काढलेल्या बसेस नजरेस पडतात. स्क्रॅपमधील ५१ बसेस एक कोटींहून अधिक रुपयास विक्रीस काढल्या आहेत. साधारणपणे बसेसचे आयुर्मान दहा वर्षे समजले जाते. १० लाख किलो मीटर अंतर प्रवास पूर्ण केल्या की बसेस सेवेतून बाजूला काढल्या जातात. केएमटीने स्क्रॅपमध्ये काढलेल्या बसेस १५ लाख किलो मीटर अंतर धावल्या आहेत. यामध्ये १९९४ मॉडलेच्या ३० बसेस आहेत. तर २००४ मधील २० बसेस आहेत. महिनाभरात त्या बसेसचे अस्तित्व संपुष्टात येणार आहेत.

सहा नव्या बसेस टायरअभावी बंद

केएमटीच्या ताफ्यात ७५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. वर्कशॉपमध्ये सहा नवीन बसेस बंद अवस्थेत दिसल्या. टायर खराब झाल्यामुळे त्या धावू शकत नाहीत. प्रशासनाकडून नवीन टायर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा प्रक्रिया राबवून टायर खरेदी केल्या जातात. या सहा बसेस गेले आठवडाभर रस्त्यावर उतरल्या नाहीत.

नियमित पगार द्या, अतिरिक्त काम करूच

वर्कशॉपमधील अपुऱ्या कर्मचारी असले तरी जादा कामाचे टेंन्शन नाही. कर्मचाऱ्यांना नियमित पगार आवश्यक आहे. दीड, दोन महिने पगार होत नाही. सप्टेंबर २०१४ मधील पगार अद्याप दिला नाही. मे २०१६ चा पगार अजून झाला नाही. नियमित पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अशा शब्दांत रवींद्र इंगवले, मारूती पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटलनंतर ‘आयएसओ’कडे वाटचाल

$
0
0

कोल्हापूर ः सुशोभित इमारत, डिजिटल क्लासरूम, इ लर्निंग सुविधा, शिष्यवृत्तीसह अन्य शाळाबाह्य स्पर्धात्मक परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्या मंदिराची वाटचाल आता आयएसओ प्रमाणितकडे सुरू आहे. महापालिकेची पहिली आयएसओसाठी शाळा पात्र ठरण्यासाठी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे प्रयत्न सुरू आहेत. अॅक्रेडिशन बोर्डाची समिती जुलैच्या पहिल्या आठवड्यात शाळेला भेट देणार आहे. विद्यार्थी वाचनालय, माय स्कूल, ग्रीन स्कूल अशा वेगळ्या संकल्पना राबवून शाळा विद्यार्थ्यांसह पालकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. येत्या काही दिवसांत शाळेच्या आवारात चिल्ड्रन पार्क साकारण्यात येणार आहे.

जाधववाडी, बापट कॅम्प परिसर, राजीव आवास योजना या भागातील विद्यार्थ्यांची ही हक्काची शाळा आहे. गेल्या पाच वर्षांत शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. शिक्षक, व्यवस्थापन समिती आणि नगरसेवकांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि लोकवर्गणीतून शाळेचा लूकच बदलला आहे. येथे पहिली ते सातवीपर्यंतची सुविधा आहे. सध्या विद्यार्थी संख्या ४०० पर्यंत आहे. २०१४ पासून शाळेत पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. शाळेची मोठी इमारत, प्रशस्त मैदान, स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, आवारात बसविलेले पेव्हिंग ब्लॉक आणि प्रत्येक वर्ग डिजिटल ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत.

प्रज्ञाशोध परीक्षा आ​​णि स्पेक्ट्रम परीक्षेतही विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. माजी महापौर वैशाली राजेंद्र डकरे, नगरसेवक राजसिंह शेळके शाळेला विविध सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. डकरे यांच्या कालावधीत शाळेच्या आवारात पेव्हिंग ब्लॉकची कामे झाली. तर शेळके हे आयएसओसाठी प्रयत्नशील आहेत.शाळेच्या आवारात बालवाडी सुरू केली आहे. यंदा ७० विद्यार्थ्याची नोंदणी झाली आहे. श्रीमंत माईसाहेब बावडेकर प्रशालेमार्फत बालवाडी दत्तक घेतली आहे.

..................

इ लर्निंग सुविधा

देणगीदारांच्या सहकार्याने शाळेत स्वतंत्र कम्प्युटर कक्ष आणि इ लर्निंगची सुविधा केल्याचे मुख्याध्यापक प्रतापसिंह निकम यांनी सांगितले. सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इ लर्निंगद्वारे अध्यापत केले जाते. विद्यार्थ्याची शिक्षणाची गोडी वाढण्यास ही शैक्षणिक पद्धत उपयुक्त ठरली आहे. शाळेचा परिपाठही वैशिष्टपूर्ण असतो. रोज वेगळी प्रार्थना, समूहगीताचा समावेश असतो. शालेय परिपाठ या नावाचे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला दिले आहे. मुलींचे लेझीम व झांज पथक आहे. या पथकासाठी ४० कीटस देणगीतून मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्कशॉपमधील १४ कर्मचाऱ्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या वर्कशॉप विभागातील चौदा कर्मचाऱ्यांना कामात हयगय व बेशिस्त वर्तणुकीवरून कारवाई का करू नये, अशी नोटीस काढण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सात दिवसाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. नोटीस काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य निरीक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी सोमवारी वर्कशॉपची तपासणी केली होती. वर्कशॉपमधील काही कर्मचारी मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याचे निदर्शनास आले होते. काही कर्मचारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळे अगोदरच सुटी घेतली होती. वर्कशॉपच्या आवारात दारूच्या बाटल्या आढळल्या. पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. तसेच आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची सूचना केली होती. आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. तसेच १४ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर नगरसेविकेंशी हुज्जत घालणाऱ्या वाहनचालक सुशीलकुमार पागर या कर्मचाऱ्याला कामावरून कमी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींचे वकीलपत्र घेऊ नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बोंद्रेनगरमधील धनगरवाड्यातील पल्लवी बोडेकर या तरुणीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणारे आरोपी निर्ढावलेले आहेत. पोलिस अटक करुन घेऊन जातानाही 'सुटून आल्यावर पाहून घेतो' अशी धमकी पोलिसांसमोर देणाऱ्या व परिसरातील मुलींच्या आयुष्यांशी खेळणाऱ्या या आरोपींचे वकीलपत्र वकिलांनी घेऊ नये, अशी विनंती धनगरवाडा परिसरातील महिला व नागरिकांनी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला केली आहे. यातून या आरोपींची लवकर सुटका होऊ नये, अशाच भावना परिसरात दिसत आहेत.

या परिसरात आरोपींचा वावर सतत असायचा. मस्तीत दिवस काढणाऱ्या या आरोपींनी कॉलेजला जाणाऱ्या अनेक मुलींची छेडछाड काढल्याचे हळूहळू समोर येत आहे. मात्र आरोपींची या परिसरात इतकी दहशत आहे की अजूनही कुणी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यास नागरिक कचरत आहेत. त्यांच्या पाठीमागे मोठा वरदहस्त असल्याचे बोलले जात असल्याने आरोपींना या प्रकरणाचे गांभीर्य वाटत नसल्याचे दिसून येत आहे.

धनगर समाज क्रांतीकारक संघाचे विलास वाघमोडे यांनी या दोन मुलींना गेल्या नऊ वर्षांपासून सातशे रुपयांची दरमहा मदत केली आहे. निकिता हिच्या शिक्षणाचा तसेच तिच्या आजीच्या औषधाचा खर्चही ते करण्यास तयार असून बोडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन पाठबळ देण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी वाघमोडे यांच्यासमोर वस्तीवरील काहींनी या टोळक्यांच्या कृत्याची माहिती दिली. हे टोळके अनेक मुलींची छेडछाड काढत असल्याचे सांगितले. 'तुम्ही करा, पोलिसातून मी सोडवून आणतो' अशी भाषा या टोळक्याचे पाठीराखे करतात. पोलिसांना खिशात ठेवल्याची मस्ती त्यांना मदत करणाऱ्या सूत्रधाराची आहे. त्यातूनच या टोळक्याने धुमाकूळ घातला होता, असे तेथील महिलांनी सांगितले.

पल्लवी बोडेकरच्या आत्महत्या प्रकारानंतर आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन जात असताना पोलिसांसमोरच 'सुटून आल्यावर पाहून घेतो' अशी धमकी देऊन गेल्याचे महिलांनी वाघमोडे यांना सांगितले. यामुळे क्रांतीकारक संघाच्यावतीनेही बार असोसिएशनकडे या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, म्हणून निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सडकसख्याहरींची वाढतेय मुजोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉलेज परिसरातील एकही कोपरा असा नाही की तिथे उनाड मुलांचे टोळके उभे नाही. कॉलेजची वेळ हेरून उभे रहायचे, मुली आल्या की मोठ्याने हॉर्न वाजवायचा आणि टोमणे मारायचे हा त्यांचा उद्योग. अनेकदा हा सगळा प्रकार सहनशक्तीच्या पलीकडे गेला आणि जाब विचारला तर मुजोर तरुण पुन्हा नवा त्रास देतात. हे चित्र कोल्हापुरातील अनेक कॉलेज आणि शाळा परिसरात दिसत आहे.

कॉलेजशी काही संबंध नसलेल्या मुलांची छेडछाड कॉलेजच्या गेटबाहेर तर वर्गातील मुले किंवा ​सीनियर्सकडूनही मुलींना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. घरी सांगितलं तर कॉलेज तरी बंद होतं किंवा वडील,भाऊ सोडायला आले तर नव्या कमेंट सुरू होतील याची धास्ती बाळगून मुली कुढत राहतात. एकीकडे मुलामुलींची निखळ मैत्री असे चित्र समाजात दिसत असताना कोल्हापुरातील अनेक कॉलेजमध्ये आणि परिसरात सडकसख्याहरींची मुजोरी वाढली आहे. गेटबाहेर आमचा संबंध नाही म्हणून कॉलेज प्रशासन हात झटकते तर रस्त्यावर होणाऱ्या छेडछाडीबाबत पोलि सस्टेशनमध्ये तक्रार केली तर ते प्रकरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अडकून पडतं. अशा परिस्थितीत आजही अनेक मुली भीतीच्या आणि असुरक्षितेच्या छायेतच जगत आहेत.

इथे हमखास छेडछाड

शिवाजी पेठेत सरदार तालमीच्या पुढे आल्यानंतर गांधी मैदानकडे वळणाऱ्या कोपऱ्यावर न्यू कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेडछाड काढण्यासाठी सकाळी सव्वासात वाजता मुलांचे टोळके उभे असते. तर कॉलेज सुटल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ही टोळकी पुन्हा याच कॉर्नरवर उभी असतात. राजारामपुरीतील कमला कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या गेटबाहेर सकाळी साडेसात आणि दुपारी बारा वाजता मुलींना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. राजारामपुरीतील पहिल्या गल्लीत आणि निगडे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुलींची वाट बघतच ही टोळकी उभी असतात. विवेकानंद कॉलेजसमोरील दोन ते तीन कोपरे कॉलेजच्या वेळेत केवळ मुलींची छेड काढण्यासाठीच मुलांच्या टोळक्यांनी भरलेले असतात. जिल्हा परिषदेपर्यंतच्या कोपऱ्यांवर मुलांचे घोळके थांबलेले असतात. शहाजी कॉलेज परिसरातील त्रिकोणी बाग कोपरा आणि शाहू कॉलेजसमोरील कॉर्नरही टोळक्यांनी भरलेला असतो.

सिद्धाळा गार्डनसमोरील बस स्टॉप, भवानी मंडप, खासबाग बस स्टॉप, खासबागेत महिला संकुल समोरील कॉर्नर, बाईचापुतळा बस स्टॉप, गंगावेश बस स्टॉप, कॉमर्स कॉलेज परिसरातील टेंबेरोड कॉर्नर, खरी कॉर्नर येथील कोल्हापूर हायस्कूल समोरील रस्ता या परिसरात कॉलेज, खासगी क्लासला येणाऱ्या मुलींना सडकसख्याहरींचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सिनेमातील नावाने हैराण

चर्चेतील किंवा हिट ठरणाऱ्या सिनेमातील ​नायिकेचे नाव असलेली मुलगी कॉलेजमध्ये असेल तर त्या नावावरून अश्लील कमेंटचा सामना मुलींना करावा लागत आहे. सध्या सैराट सिनेमातील आर्ची किंवा अर्चना या नावाची क्रेझ आहे. त्यामुळे अर्चना नाव असलेल्या मुलींना थेट नावावरून छेडले जात आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टाइमपास सिनेमातील प्राजक्ता हे नाव असलेल्या मुलींनाही याप्रकारच्या छेडछाडीचा त्रास झाला होता. हा त्रास इतका टोकाला पोहोचतो की सिनेमातील नायकाच्या नावानेही या मुलींची चेष्टा केली जाते. मुली ज्या भागात राहतात त्या भागाची नावे किंवा वडिलांच्या नावाने चिडवण्याचा प्रकार सर्रासपणे छेडछाडीत केला जातो. यामुळेही मुलींना नाहक त्रास होतो. मुली ज्या रंगाचा ड्रेस घालून येतात त्या रंगावरूनही कमेंट पास करण्यात काही टोळकी पुढे आहेत. तसेच मुली रस्त्याने चालत जात असताना, कुत्रे भुंकत असल्याचा, बाळ रडत असल्याचा, सायरन वाजत असल्याचा आवाज असलेले हॉर्न लावलेल्या गाड्या जोरात चालवून मुलींना घाबरवण्याचे प्रकारही या छेडछाडीत येत असल्याचे मुलींनी सांगितले.

तक्रारपेटीकडे कॉलेजचे दुर्लक्ष

अतिरिक्त पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या नेतृत्वाखाली रोडरोमियोंवर कारवाई करण्यासाठी महिला बीट मार्शल मोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी या टीमने कॉलेज प्रशासनाला सुचवले होते की मुली थेट तक्रारींबाबत बोलणार नाहीत. त्यामुळे कॉलेजमध्ये एक तक्रारपेटी ठेवावी. दर महिन्याला कॉलेजच्या हद्दीतील पोलिसांच्या उपस्थितीत कॉलेजने ती पेटी उघडावी. मात्र आजपर्यंत एकाही कॉलेज प्रशासनाने ही सूचना मनावर घेतली नाही. त्यामुळे ना तक्रारपेटी ठेवली गेली ना ती उघडली गेली.

कॉलेजच्या कॅम्पसपेक्षा कॉलेजकडे जाणारे रस्ते, कॉर्नर याठिकाणीच मुलींना छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच घरापर्यंत पाठलाग करत छेडछाड करणारी मुले मुलींचा पिच्छा पुरवतात. सध्या स्मार्टफोनमुळे मेसेज करण्यातूनही मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी मुलींनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे. पोलिसांपर्यंत जाण्यासाठी भीती वाटत असेल तर मुली लेखी पत्र पाठवू शकतात. प्रतिसाद नावाचे अॅप डाउनलोड करून त्यावर तक्रार देऊ शकतात. पालकांच्या मदतीने तक्रार नोंदवण्यासाठी मुलींनी धाडस दाखवले पाहिजे.

वैष्णवी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images