Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिस उपअधीक्षक हुंबरेलाचलुचपतच्या जाळ्यात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तक्रारदाराला जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सोइस्कर अहवाल देण्यासाठी व नमूद गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच वाईचे पोलिस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांच्यासाठी स्वीकारताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा सरचिटणीस युवराज ढमाळ यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खंडाळा येथे रंगेहाथ पकडले. हुंबरे यांना सातारा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. उपअधीक्षकाला लाचप्रकरणी पकडल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

मॅफेड्रॉन ड्रग्ज तस्करीप्रकरणी खंडाळा तालुक्यातील कण्हेरी या गावी ९ मार्च २०१५रोजी मुंबई येथील पोलिस हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडून अमली पदार्थांचा मोठा साठा केल्याचे उघड झाल्यानंतर महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून यांची पाळेमुळे खणण्यात पोलिसांना यश आले होते. यामध्ये बेबी पाटणकर यांच्या नातेवाईकांसह अनेक पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. यातच प्रयोग शाळेतून हा अंमली पदार्थ नसल्याचा दाखला बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांना मिळाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते.

दरम्यान, खंडाळा आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी या बाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सूत्रधार बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे यांना पोलिस कोठडीही देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास विभागीय पोलिस अधिकारी दीपक हुंबरे करीत होते. कोर्टात केस डिस्चार्ज करण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी दीपक हुंबरे यांनी तक्रारदाराकडे मुंबई येथे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅप लावला. शनिवारी सकाळी मुंबई येथून निघताना संबंधितांचे बोलणे फोनवरुन झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील हॉटेल आमराई येथे पोलिसांचे हस्तक व मनसेचे माजी सरचिटणीस युवराज ढमाळ याच्याकडे तक्रारदार यांनी पैशांची बॅग सुपूर्त केली. त्यांच्यासोबत आलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रक्कमेसह युवराज ढमाळ याला ताब्यात घेतले. त्यानंतर दीपक हुंबरे सातारा येथे कोर्टात कामकाजासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी सातारा येथे दोन पथके रवाना करून दीपक हुंबरे यांना ताब्यात घेऊन खंडाळा येथे चौकशीसाठी आणले. उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती.

दोघांच्या घराचीही झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दीपक हुंबरेंनाजामीन मंजूर

$
0
0

सातारा :

पाच लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना रविवारी जामीन मंजूर झाला. त्यांना प्रत्येक रविवारी पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावणे बंधनकारक आहे.

मेफेड्रोन ड्रग्ज प्रकरणात तपासी अधिकारी असणाऱ्या पोलिस उपअधीक्षक दीपक हुंबरेंना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. बेबी पाटणकरच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

हुंबरे यांना रविवारी कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या. त्यानुसार त्यांना दर रविवारी पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजेरी लावणे बंधनकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या अटकेची किंमत सरकार मोजेलः पवार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सातारा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सत्तेचा गैरवापर करुन अटक करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला आज साताऱ्यात दिला.

दिल्लीतील सदन घोटाळा आणि बेहिशोबी संपत्तीप्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर कारवाई करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्याच्या आरोपाखाली भुजबळ सध्या जेलमध्ये आहे. राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतील नेते भुजबळ यांना अटक करण्यात आल्याने ही कारवाई म्हणजे सुडाची कारवाई आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यापासून जेलमध्ये असलेल्या भुजबळावर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर करून केली आहे असे सांगतानाच शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुकीचे केले असेल तर त्याची किंमत त्यांना मोजू द्या परंतु त्यांनी काहीच चूक केली नसेल तर त्यांच्या अटकेची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा शरद पवारांनी दिला.



छगन भुजबळ यांना अटक केल्याने त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण सुद्धा पवार यांनी येथे बोलताना दिले. दरम्यान, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आलेल्या छगन भुजबळ यांचा दाढी वाढवलेला चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. भुजबळांच्या नव्या लुकची सोशल मीडियावर चर्चाही खूप झाली होती. तसेच त्याआधी खासदार सुप्रीया सुळे यांनी जेलमध्ये जावून छगन भुजबळांची भेट घेतली होती अशा बातम्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाबळेश्वरमध्येगारांचा पाऊस

$
0
0


सातारा

महाबळेश्वरमध्ये सोमवारी दुपारी एक तास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. पावसामुळे शहरात सर्वत्र सुखद गारवा पसरला आहे. स्थानिकांसह पर्यटकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

गेले दोन दिवसांपासून उन्हाच्या झळांनी गिरीशिखराला उकाड्याने हैराण केले होते. महाबळेश्वरवासियांना तसेच येथे फिरावयास आलेल्या पर्यटकांनाही उकाडा असाह्य होत होता. दुपारी तीन वाजल्यापासून सुमारे एक तास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने थोडा दिलासा मिळाला. शहरात सध्या सर्वत्र सुखद गारवा पसरला आहे. तीन वाजता पावसाला प्रारंभ झाला. त्यानंतर त्याचा वेग वाढत गेला. यातच जोरदार वारेही सुरू झाल्याने एकच पळापळी झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. नाले तुंबल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. याच दरम्यान काही वेळ गारांचाही शिडकाव झाला. त्यामुळे वातावरण आणखीनच गार व आल्हादायक झाले. सध्या येथे उन्हाळी पर्यटन सुरू आहे. मान्सून पूर्व पडलेल्या या पावसात भिजण्याचा आनंद बालचमूंसह सर्वांनीच घेतला चारच्या सुमारास पाऊस थांबला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्याच्या प्रमुखासारखे वागापवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

केंद्राकडे राज्याची स्थिती मांडताना विभागप्रमुखासारखी नव्हे तर राज्याच्या प्रमुखासारखी मांडा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५७व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी सोमवारी साताऱ्यात आलेले पवार पत्रकार परिषदेत बोलत होते.

'दुष्काळाबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले परंतु, त्यावेळेस त्यांनी जी मांडणी केली त्यावरून विदर्भ, मराठवाड्याला झुकते माप दिल्याचे दिसत आहे. त्या भागाला अधिक मदत मिळाली पाहिजे याबद्दल तक्रार नाही. परंतु, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक इथेही दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. केंद्राकडे राज्याचे म्हणणे मांडताना मुख्यमंत्र्यांनी एखाद्या विभाग प्रमुखांसारखे नाही तर राज्याचा प्रमुख म्हणून म्हणणे मांडली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा बरोबरच उर्वरित महाराष्ट्रासाठीही दीर्घकालीन कार्यक्रम राबवला पाहिजे. या भागातील कामेही अपुरी असून, त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको, हे आपण मुख्यमंत्र्‍यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. या बाबत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. दुष्काळाबरोबरच रयतमधील शिक्षकांच्या प्रश्नांबाबतही चर्चा करणार आहे, असेही पवार म्हणाले,' असेही पवार म्हणाले.

........

मोदी फॅक्टर चालणार नाही

देशात सध्या सुरू असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर फारसा चालणार नाही. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या सर्व ठिकाणी स्थानिक पक्षांनाच यश मिळेल. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वत्र मोदींच्या नावाचा गजर सुरू होता. त्या बळावरच भाजप केंद्रात सत्तेत आले. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या कारभारानंतर आणि बिहारच्या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांच्या वलयाला आहोटी लागल्याचे दिसत आहे. पाच राज्याच्या विधानसभांचा निकाल लागल्यानंतर ते स्पष्ट होईल, असेही शरद पवार म्हणाले.

...........

पवार म्हणतात...

मी पंतप्रधानपदाबाबत नितीशकुमार यांच्याशीही बोललेलो नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत इतर घटकांना बरोबर घेऊन जाण्यायोग्य कोण आहे, असे विचारल्यास मला नितीशकुमार यांच्यामध्ये ती क्षमता असल्याचे दिसते.

........

बोफोर्सवेळीही वादानंतर सरकारने पुढील तीन वर्षे कोणतीच संरक्षणसामग्री खरेदी केली नाही. त्याचा परिणाम देशाच्या संरक्षणसिद्धतेवर झाला. संरक्षणसिद्धतेसाठी सामग्री आवश्यक असून, त्याची प्रक्रिया लवकर झाली पाहिजे.

..........................

वेगळा विदर्भ हा तेथील जनतेची मागणी नाही, केवळ तेथील नेत्यांकडून तशी मागणी करण्यात येते आहे. महाराष्ट्र एकसंघच राहिला पाहिजे.

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी उपसाबंदी आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गहिरे होऊ लागले आहे. ‌शिल्लक साठा १५ जुलैपर्यंत पुरवायचा आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री बारा वाजल्यापासून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. तो अनिश्चित काळासाठी ही उपसाबंदी राहील. दरम्यान, शेतीसाठी पाणी उपश्यावर बंदी घालू नये, शेतकऱ्यांना अखंडीत १६ तास वीज द्यावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी जिल्हा​धिकारी अमित सैनी यांच्याकडे केली आहे.

राधानगरी धरणात अवघे पाऊण टीएमसी (०.७५) पाणी शिल्लक राहिल्याने शहराचे पाणी संकट गहिरे झाले आहे. पिण्याचे पाणी पुरवण्याचे आव्हान व शेतकऱ्यांचा उपसा बंदीसाठी असलेला विरोध यामुळे जलसंपदा खात्याची दिवसेदिवस कोंडी होऊ लागली आहे. मात्र शेतीसाठी पाणी उपसाबंदीचे धोरण काटेकोरपणे राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लहान मोठी तेरा धरणे आहेत. कोल्हापूरसह पंचगंगा नदीकाठच्या गावांना राधानगरी धरणातून पाणी पुरवठा होतो. दूधगंगा व वेदगंगा नदीकाठच्या गावांना दूधगंगा धरणातून पाणी पुरवठा आहे. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणात अवघे पाऊण टीएमसी पाणी आहे. तसेच अर्धा टीएमसी पाणी १५ जुलैपर्यंत राखून ठेवायचे आहे. पाऊण टीएमसी पाण्यात गाळ व माती किती आहे याचाही अंदाज प्रशासन घेत आहे. तुळशी धरणात १.०९ टीएमसी तर दूधगंगा धरणात १.३८ टीएमसी पाणी आहे. १३ धरणातील अवघा ५.६२ टीएमटी उपयुक्त साठा शिल्लक राहिल्याने पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य द्यावे लागणार आहे.

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पण शेतीला पाणी मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ही मागणी तीव्र होऊ लागली असून राजकीय नेतेही प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. थेट जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनाही घेराव घालण्यात येत आहे. नदीकाठच्या शेतात ऊस असल्याने पाणी उपश्यावरील बंदी उठवण्याची मागणी होत आहे. जलसंपदा खात्याला पिण्याच्या पाण्याबरोबर पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून नदी प्रवाहित ठेवण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. नदीकाठची शहरे व गावातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. नदीपात्रात काही ठिकाणी जलपर्णी फोफावू लागली आहे. नदीतील अशुद्ध पाणी एकाजागी साचण्याऐवजी ते शेतीसाठी देण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून दबाव वाढू लागला आहे.

जिल्ह्यातील धरणसाठा

राधानगरी ०.७५

तुळशी १.०९

वारणा ३.६५

दूधगंगा १.३८

कासारी ०.६४

कडवी १.३४

कुंभी १.१०

पाटगाव ०.८९

चिकोत्रा ०.२३

चित्री ०.३४

जंगमहट्टी ०.२०

घटप्रभा ०.७१

जांबरे ०.०९

एकूण ५.६२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी लावणाऱ्या ५७ जणांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा आदेश झुगारून डॉल्बीचा दणदणाट करणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या सहा मंडळांचे कार्यकर्ते, डॉल्बीमालक आणि ट्रॅक्टरचालकांसह एकूण ५७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शाहूपुरी पोलिसांनी साडेतीन लाखांचे साहित्य जप्त केले. उर्वरित सर्व मंडळांचे डॉल्बीचे साहित्य जप्त करण्यात येणार आहे. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह डॉल्बी मालकांनाही नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.

शिवजयंतीच्या निमित्ताने रविवारी(ता. ८) रात्री शहरात अनेक मंडळांनी मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर करू नये, अशा सक्त सूचना पोलिसांनी तरुण मंडळांना दिल्या होत्या, मात्र काही अपवाद वगळता सर्वच मंडळांनी डॉल्बीच्या आवाजाने शहर दणाणून सोडले. रात्री उशिरापर्यंत डॉल्बी सुरू ठेवून मिरवणुका काढल्या. यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी डॉल्बी बंद करून वेळेत मिरवणूक संपवण्याचे आवाहन मंडळांच्या पदाधिऱ्यांना केले, मात्र याकडे दुर्लक्ष करून आवाज मार्यादेचा भंग करीत डॉल्बी सुरू ठेवल्याने शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी शहरातील सहा मंडळांच्या ५७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये डॉल्बी मालक, टॅक्टर चालक, मालक यांचाही समावेश आहे. शाहूपुरी पोलिसांनी दोन ट्रॅक्टर, ८ स्पीकर, डॉल्बी मशिनसह साडेतीन लाखांचे साहित्य जप्त केले. गुन्हे दाखल केलेल्या मंडळांमध्ये संयुक्त जुना बुधवार पेठ तरुण मंडळ, संयुक्त जाधववाडी तरुण मंडळ, संयुक्त भोसलेवाडी तरुण मंडळ, लोणार वसाहत तरुण मंडळ, संयुक्त शाहूपुरी तरुण मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ या मंडळातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये १४ डॉल्बी मालक, चालक आणि वाहनचालकांचाही समावेश आहे.

कलम १८८, २९०, २९१, ३४ यासह पर्यावरण संरक्षण कायदा कलम १५ नुसार गुन्हे दाखल झालेल्या सर्वांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत, त्याचबरोबर डॉल्बी, ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांच्या जप्तीची कारवाई होईल. कोर्टात दोषारोपपत्र दाखल करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी दिली.


सूचनांकडे कानाडोळा

सर्वच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना डॉल्बीचा आवाज मर्यादेत ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार दिल्या जात होत्या. याशिवाय वाहतुकीला अडथळा होऊ नये असे मिरवणुकीचे नियोजन करण्यासही सांगितले जात होते, मात्र मंडळांनी पोलिसांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. काही ठिकाणी तर सूचना करणाऱ्या पोलिसांनाच आरेरावी करण्याचे प्रकार घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षय्य खरेदीसाठी झुंबड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताचे औचित्य साधून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सोमवारी संध्याकाळर्पंत दिसत होते. गुढीपाडव्याला सराफ बाजार बंद असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे सोने खरेदीमध्ये मोठी उलाढाल झाली. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर फ्लॅट, बंगल्यांसाठी बुकिंग व खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून झालेल्या खरेदीने बाजारपेठेत फील गुडची प्रतिक्रिया उमटली आहे.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळपासून खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. दुचाकी व चारचाकीचे बुकिंग केलेल्या ग्राहकांनी मुहूर्तावर शोरूममध्ये चाव्या घेऊन ड्राइव्हचा आनंद लुटला. बांधकाम व्यवसायात मंदीची लाट असतानाही अक्षय्य तृतीयेला फ्लॅट व रो बंगल्यांच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. शुभ मुहूर्त असल्याने फ्लॅट व बंगल्यात गृहप्रवेशाचा मुहूर्त अनेकांनी साधला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

गुजरी हाउसफुल्ल

अक्षय्य तृतीयेला गुंजभर तरी सोने खरेदी करायचीच, अशी प्रथा असल्याने गुजरी व शहरातील सोने दागिन्यांच्या शो रूममध्ये गर्दी दिसत होती. सोन्याच्या वळ्याबरोबर, सोन्याची नाणी, अंगठ्या, चेन यासह दागिन्यांची खरेदी झाली. मोठ्या शोरूममध्ये सोन्याचे वळे खरेदीसाठी स्वतंत्र काउंटर उघडण्यात आले होते. या काउंटरवर खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या.

एसी, फ्रीजला मागणी

वाढत्या उन्हामुळे सोमवारी फ्रीजला सर्वांत जास्त मागणी होती. एसी खरेदीलाही चांगला प्रतिसाद लाभला असला तरी फ्रीजची खरेदी दणक्यात झाली. एलइडी टीव्ही, डिशलाही मागणी होती. वॉशिंग मशिनच्या अत्याधुनिक टेक्निकची विचारणा होत होती. सिद्धी होम अप्लाएन्सचे सचिन मांगले म्हणाले, 'दुष्काळामुळे ग्राहकांच्याकडे खरेदीची क्रयशक्ती कमी असली तरी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर भर होता.'

बाइक व कार सुपरफास्ट

बाइक व कारच्या खरेदीसाठी सकाळपासून शोरूममध्ये गर्दी होती. नवीन बाइक आणि कार नेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. शिवगंधा सुझुकीच्या शुभांगी काशिद याबाबत म्हणाल्या, 'आम्ही नवीनच शोरूम सुरू केली आहे. दिवसभरात आमच्या शोरूममधून वीस बाइकची डिलि​व्हरी झाली. बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमच्या शोरूममधून १०१ वी बाइक बाहेर पडली.

२० हजार बॉक्स आंब्यांची आवक

अक्षय्य तृतीयेला आंबा खायचा ही पद्धत असल्याने शाहू मार्केट यार्ड येथे २० हजार बॉक्स आंब्याची आवक झाली. हापूस आंब्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. फळाचे व्यापारी डी. एम. बागवान म्हणाले, 'हापूस आंब्याचा दर दोनशे ते चारशे रूपये आहे. रत्नागिरी हापूसची चार ते आठ डझनाची पेटी एक हजार ते दीड हजार रूपयाला होती.'

बांधकाम व्यवसायात उत्साह

बांधकाम व्यवसायातील मंदीचा काळ, बांधकामविषयक नवीन नियम, व्याजांचा दर या पार्श्वभूमीवर अक्षय्यतृतीयेला ग्राहकांकडून फ्लॅट व रो बंगल्याच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद लाभला आहे. परांजपे स्कीमचे आनंद पराडकर म्हणाले, 'अनेक ग्राहकांनी साइटला भेट देऊन पाहणी केली. तसेच बुकिंगमध्येही रूची दाखवली.'

======

सकाळी साडेनऊ वाजता दुकान उघडल्यापासून ग्राहकांकडून खरेदी सुरू होती. सोमवारी सोन्याचा दर ३० हजार १५०च्या आसपास दिवसभर फिरत होता. सोन्याच्या दरामध्ये चढउतार न बघता पारंपरिक ग्राहकांनी सोन्याची खरेदी केली.

मुरली चिपडे, चिपडे शोरुम

दुष्काळामुळे बाजारपेठ थंड असेल असा आमचा अंदाज ​फोल ठरला. ग्राहकांनी कार खरेदीसाठी चांगली उत्सुकता दाखवली. दुपारपर्यंत आमच्या शोरूममधून १४ कारची डिलव्हरी झाली.

आर.ए. नदाफ, श्राइन शोरूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन जणांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथील विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या तीन गावगुंडांना समवारी कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली. सागर प्रकाश खोत, इंद्रजित उर्फ रोहित उर्फ बंटी प्रकाश खोत, ओमसिद्ध उर्फ अप्पासो नरसाप्पा बबलेश्वर, अशी पोलिस कोठडी ठोठावण्यात आलेलेल्या तीघांची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार राजेंद्र विठ्ठल पवार उर्फ राजू तपकीरे अद्यापही फरार आहे.

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडीला चार दिवसांपासून जत्रेचे स्वरुप आले आहे. सर्वपक्षीय राजकीय नेते, सरकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील लोक भेट देऊन ग्रामस्थांना धीर देत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता दोषींवर कारवाई होईपर्यंत माघार घ्यायची नाही, असा विश्वास भेट देणाऱ्या व्यक्ती ग्रामस्थांना देत आहेत.

प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार शैलजा पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी सोमवारी लोकांचे म्हणने जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली. प्राताधिकारी राजेंद्र जाधव म्हणाले, 'या प्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधनतांवर कारवाई होईलच. मात्र, अजूनही कोणाची काही तक्रार असेल त्यांनी तक्रार दाखल करावी. तक्रार दाखल करणारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील. गावातील महिला आणि पुरुषांनी कोणत्याही दडपणाखाली वावरण्याची गरज नाही. प्रशासन त्यांच्या सोबत आहे. गावाला सर्व ती मदत देण्यात येईल. पोलिस तपासात कोणतीही ढिलाई राहणार नाही या बाबत प्रशासन दक्ष आहे, अशा प्रकारची वाईट प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. आजच्या मुलांवर टीव्ही, मोबाइल आणि संगणकाचा वाईट परिणाम होत आहे. पालकांनी सजग रहायला हवे.'

प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार

ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. गेल्या चार दिवसांपासून यातील मुख्य सूत्रदार फरार आहे. त्यांच्या अटके संदर्भात काहीच हालचाल दिसत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांनी वैयक्तिक तक्रार दिल्याशिवाय कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मग सरकारने ग्रामसभेला एवढे अधिकार दिलेत त्याला काहीच अर्थ नाही का? ग्रामसभेचा ठराव असताना पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रांताधिकारी म्हणाले, 'ग्रामसभेचे अधिकार निर्विवादपणे मोठे आहेत. काय प्रकार घडला या बाबत मी पोलिसांकडून माहिती घेतो.'

आम्ही दडपणाखाली वापरतोय

एका महिला बैठकीत म्हणाली, 'आमच्या गावातील महिला आपसात बोलतानाही दडपणाखाली वावरत आहेत. गुन्हा दाखल झाला, कुणाला तरी अटक झाली. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरारी आहे. त्याचीच खरी दहशत आहे. त्यामुळे तक्रार द्यायाला कुणीही पुढे येणार नाही. या बाबत सरकारकडून आम्हाला अभय मिळावे, अशी मागणीही त्या महिलेने केली. या वेळी झालेल्या बैठकीला सरपंच सुहास कदम, उपसरपंच संभाजी कदम यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

मसुचीवाडी भयमुक्त करा

आठवड्यात पोलिस आणि प्रशासनाने मसुचीवाडी गाव भयमुक्त केले नाही तर जिल्ह्यातील शिवसैनिक पाटच्या भावाप्रमाणे येथील माता भगिणींचे संरक्षण करतील. प्रशासनाने शइवसैनिकांचे संरक्षण घेण्याची वेळ येऊ देवू नये, असा इशारा शिवसेनेचे उपनेते व जिल्हासंपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी दिला.

पाटील यांनी मसुचीवाडीला त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, 'समाजातील प्रत्येकाला त्याच्या घराची प्रतिष्ठा त्याच्यासाठी महत्वाची असते. दोन वर्षांपासून हे प्रकार घडत आहेत. पोलिस प्रशासनाने असे प्रकार घडल्यानंतर फिर्याद दाखल होण्याची वाट पाहण्याची गरजच नव्हती. खरे तर असे प्रकार घडू नयेत म्हणूनच काळजी घेण्याची गरज होती. गेल्या दोन वर्षांपासून पोलिस काय करीत होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलायला हवी होती. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे.'

वकीलपत्र घेण्यास नकार

मसुचीवाडी प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेणार नाही, अशी भूमिका इस्लामपूर बार असोशिएशनने घेतली आहे. या बाबतची माहिती अध्यक्ष अॅड. विकास पाटील दिली. आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन सोमवारी शिवसेनेच्या वतीने इस्लामपूर बार असोशिएशनला देण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकीप्रकरणी चार सावकारांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारांनी तगादा लावल्याने जरगनगरमधील तरुणाने सोमवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघा सावकारांना रात्री अटक केली. त्यामध्ये इसा उर्फ बाळासाहेब हारुण मुल्लाणी (वय ३३,आझाद गल्ली), नुकतार अजीज मोमीन (वय ५७, रा लक्षतीर्थ वसाहत), साजिद मोहम्मद गोलंदाज(वय ३२ रा. रविवार पेठ), अमित उक्रर उरणे (वय ३८ रा. लक्षतीर्थ) यांचा समावेश आहे.

माळकर तिकटी ते मटण मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मयूर नॉव्हेल्टी हे दुकान रौफ पटवेगार या तरुणाचे आहे. रौफने बाळासाहेब मुल्लाणी आणि सादिक गोलंदाज या खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. एप्रिल महिन्यातील कर्जाचा हप्ता वेळेत न दिल्याने सावकार मुल्लाणी याने शनिवारी रात्री रौफ याला धमकावले होते. पैसे परत न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्या भितीने रौफने सोमवारी दुपारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत रौफचे वडील मेहबूब पटवेगार यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी तातडीने त्या चौघांना अटक केली. अटक केलेल्या सावकारांना मंगळवारी कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांदूळ महोत्सवात दीड कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषी विभागातर्फे आयोजित तादूळ महोत्सवात आजरा घनसाळ, इंद्रायणी, काळा जिरगा, रत्नागिरी २४, भोगावती यांना सर्वाधिक मागणी होती. तीन दिवसांच्या या महोत्सवात १७० टन तांदळाची विक्री दीड १ कोटी ४८ हजार रुपयांची रुपयांची उलाढाल झाली आहे. महोत्सवात शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांशी १६ करार करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी व पणन विभाग, आत्मा आणि स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी, उत्पादक कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तांदूळ महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. तीन दिवस या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी १५५० क्विंटल तांदूळ विक्रीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तीन दिवसांत १७२० क्विंटल तांदूळाची आवक झाली. यामध्ये भोगावती, तेली हंसा, जया, बासमती, आजरा घनसाळ, इंद्रायणी, रत्नागिरी २४, काळा जिरगा, दप्तरी इत्यादी तांदळाचे प्रकार उपलब्ध होते. तांदळाबरोबरच नाचणी, सेंद्रीय हळद, नारळाचे उपपदार्थ, सेंद्रीय गूळ व गुळाचे पदार्थ, काकवी, गूळ पावडर विक्रीस उपलब्ध होती.

यावर्षी उत्पादक शेतकरी, शेतकरी कंपन्यांनीच आपल्या मालाचा दर निश्चित केला. अनेक खासगी, सहकारी कंपन्या उत्पादित तांदळाच्या प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकेजिंग व विपणन प्रक्रियेत कार्यरत आहेत. मात्र यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी होणारा व्यवहार मर्यादित आहे. मध्यस्थांची साखळी डावलून थेट शेतकरी, १४ शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रक्रिया उद्योगांना एकत्र आणून दूरगामी कराराद्वारे थेट खरेदी, विक्री व मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सांगितले. यामध्ये राज्यातील ९ खरेदीदार कंपन्यांचा सहभाग होत. शेतकरी व कंपन्यांमध्ये १६ करार झाले. पुढील वर्षी उत्पादक कंपन्यातर्फे महोत्सव भरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यांचे झाले करार

महोत्सवात सी. पी.सीड्स, कॅमसन अॅग्रो यांच्याशी बेबीकॉर्नचे ४ करार, प्रतिष्ठा अॅग्रो सेल्स सर्व्ह‌िसेसचे यांत्रिकीकरणाचे ९ करार आणि समृद्धी एंटरप्रायजेसचे नाचणीचे ३ करार झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या महापौरांची एक्झिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या काँग्रेसच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह नगरसेविका दीपा मगदूम आणि सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांचे जातीचे दाखले अवैध ठरल्याने नगरसेवकपद रद्द करण्यात आले. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने या तीनही सदस्यांचे कुणबी जातीचे दाखले अवैध ठरविले. राष्ट्रवादीच्या हसीना फरास आणि ताराराणी आघाडीचे नगरसेवक किरण शिराळे यांचे जातीचे दाखले वैध ठरले. महापौर रामाणे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. जातीच्या दाखल्यावरून महापौरांचे नगरसेवकपद रद्द होण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रकार आहे. महापौरांना पुरविण्यात येणाऱ्या मोटारीसह अन्य सुविधाही काढून घेण्यात आल्या.

महापौरांसह सात नगरसेवकांचे पद रद्द झाल्याने राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेगावल्या. ८१ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ४१ सदस्य संख्या आवश्यक आहे. आतापर्यंत जातीचे दाखले अवैध ठरल्याने एकूण सात नगरसेवकांची पदे रद्द झाली. त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसून त्यांना चार सदस्या गमवावे लागले आहेत. शिवाय सत्तारूढ काँग्रेस, आणि राष्ट्रवादीच्या मिळून पाच नगरसेवकांचे पद रद्द झाले असून त्यांची सभागृहातील सदस्य संख्या ३९ झाली आहे. तर भाजप, ताराराणी आघाडीचे दोन सदस्य कमी झाल्याने त्यांची संख्या ३१ झाली आहे.

विभागीय समितीकडे गेले महिनाभर जातीच्या दाखल्याच्या पडताळणीबाबत सुनावणी सुरू होती. सोमवारी महापौर अश्विनी रामाणे, नगरसेविका दीपा मगदूम, हसीना फरास, सचिन पाटील आणि किरण शिराळे यांच्या जातीच्या दाखल्याचा निकाल अपेक्षित होता. समितीने सायंकाळी सातच्या सुमारास महापौर रामाणे, दीपा मगदूम आणि सचिन पाटील यांचे दाखले अवैध ठरल्याचा अहवाल दिला. या तिघांनी कुणबी जातीचा दाखला जोडत ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. आयुक्त पी. शिवशंकर यांनी सातच्या सुमारास तिघांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे सांगितले.

तरूण महापौर ते पदरद्दची नामुष्की

महापौर रामाणे यांनी शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागातूननिवडणूक लढविली होती. वयाच्या २१ व्या वर्षी त्या महापौर बनल्या. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांची महापौरपदी निवड झाली. तरूण महापौर म्हणून त्यांचा उल्लेख होत असे. त्यांनी जवळपास सहा महिने महापौरपद भूषविले. सोमवारी आयुक्त कार्यालयात एलइडी प्रकल्पाबाबत बैठक आयोजित केली होती. सायंकाळी बैठक सुरू असतानाच त्यांच्यासह अन्य तिघांच्या दाखल्याचा अहवाल प्राप्त झाला. बैठक संपवून त्या घरी जात असतानाच आयुक्तांनी त्यांच्यासह अन्य दोघांचे नगरसेवकपद रद्द केल्याचे सांगितले.

जातीच्या दाखल्याच्या निकालानंतरचे बलाबल

(एकूण सदस्य संख्या ८१)

पक्ष पूर्वीची संख्या आताची संख्या

काँग्रेस २९ २५

राष्ट्रवादी १५ १४

भाजप १४ १३

ताराराणी आघाडी १९ १८

शिवसेना ४ ४

...............

तेरा नगरसेवकांचा निकाल राज्य सरकारच्या हाती

नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ३३ नगरसेवक आरक्षित प्रभागातून निवडून आले होते. त्यांनी जातीच्या दाखल्याच्या वैधतेचे प्रमाणपत्र ३० एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक होते. ३३ पैकी १३ नगरसेवकांनी मुदतीत प्रमाणपत्र सादर केले. वीस नगरसेवकांच्या दाखल्याची सुनावणी मुदतीनंतरही सुरू होती. पडताळणी समितीनेही २० सदस्यांच्या दाखल्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे पत्र महापालिकेला दिले होते. २० पैकी सात नगरसेवकांचा दाखला अवैध ठरला. तेरा सदस्यांचे जातीचे दाखले वैध ठरले. मात्र त्यांनी मुदतीनंतर प्रमाणपत्र सादर केले आहेत. महापालिकेने यांच्या दाखल्याबाबतचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. मुदतीनंतर सादर झालेल्या दाखल्यावरून नगरविकास विभाग संबंधित नगरसेवकांवर काय कारवाई करणार, यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

..........

नगरसेवक पद रद्द झालेले सदस्य

काँग्रेस ः महापौर अश्विनी रामाणे, वृषाली कदम (महिला व बालकल्याण समिती सभापती), दीपा मगदूम, डॉ. संदीप नेजदार.

राष्ट्रवादी ः सचिन पाटील

भाजपः संतोष गायकवाड

ताराराणी आघाडी ः निलेश देसाई


महापौरांचे जातीचे दाखले अवैध ठरण्याची कारणे

महापौर रामाणे व त्यांचे वडील रामचंद्र भोगम यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीची नोंद मराठा अशी आहे.

महापौरांच्या रक्ताच्या नातेसंबंधतील कोणत्याही नातेवाईकांच्या कागदपत्रात कुणबी अशी नोंद नाही

महापौरांना महसूल पुराव्याच्या आधारे वंशावळ सिद्ध करता आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आर्ची’च्या ‘सैराट’ चाहत्यांवर लाठीमार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

सैराट चित्रपटातील अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्याया आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या चाहत्यांना सोमवारी कवठेमहांकाळमध्ये पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद मिळाला. एका खासगी कार्यक्रमासाठी रिंकू कवठेमहांकाळ येथे आली होती. तिच्या गाडीभोवती गराडा घातलेल्या जवळपास शंभर ते दीडशे चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः काठीने झोडपून काढले. त्यावेळी कुठे रिंकूला गाडीतून खाली उतरता आले आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

शहरातील मुख्य बाजारपेठेत एका कापड दुकानाच्या उद्घाटनासाठी आर्ची येणार.., ही बातमी आठ दिवसांपूर्वीच पुर्ण तालुक्यात पसरली होती. तिला पाहण्यासाठी उतावीळ झालेले चाहते सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी करून उभे होते. कार्यक्रम स्थळाकडे येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर चाहत्यांची तोबा गर्दी पहायला मिळत होती. रिंकूच्या आगमनाची वाट बघत जवळपास एक हजारांवर चाहते आयोजकांनी लावलेल्या 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर बेभान होऊन नाचत होते. अखेरीस या गर्दीतून वाट काढत सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी रिंकूची इनोव्हा कार कार्यक्रमाच्या ठिकाणी आली.

शंभर ते दीडशे चाहत्यांनी रिंकूच्या गाडीला गराडा घातला. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची चढाओढ लागली. चाहते गाडीला चिकटूनच उभे राहिल्याने रिंकूला खाली उतरण्यासाठी गाडीचे दारही उघडता येत नव्हते. निवेदकांनी आणि आयोजकांनी चाहत्यांना गाडीपासून दूर होण्याची विनंती केली पण 'सैराट' झालेले चाहते कुणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे जवळपास दहा मिनिटे तरी रिंकू गाडीतच बसून होती.

गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच चालली. शेवटी आयोजकांनी गर्दीला पांगवण्याची विनंती पोलिसांना केली. एव्हाना काही चाहते पोलिसांचे बॅरीकेटिंग बाजूला करून व्यासपीठाकडे धाव घेऊ लागले होते. पोलिसांचाही संयम संपला, त्यांनी लाठीमार सुरू केला. पाच ते सहा मिनिटांत त्यांनी शंभर ते दीडशे चाहत्यांना अक्षरशः लाठीने झोडपून काढले. पोलिसांची काठी पडू लागताच चाहत्यांनी पळ काढला. त्यावेळी कुठे रिंकूला गाडीतून खाली उतरता आले. यानंतर नियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सैराट’मुळे कसबा बावड्यातील ऑनर किलिंग चर्चेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अरे, हा तर बावड्यातलाच शेवट, हे असंच झालं होतं की बावड्यात. आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला तिच्या भावांनीच मारलं होतं ना? नागराज मंजुळेने शेवट कोल्हापुरातलाच घेतला,' या प्रतिक्रिया आहेत 'सैराट' चित्रपट पाहून थिएटरबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकांची. शहरातील कुठल्याही थिएटरजवळ गेल्यानंतर अशीच वाक्ये ऐकायला मिळतात. 'सैराट' चित्रपटाच्या अखेरच्या दृश्याचा संबंध कसबा बावड्यातीच ऑनर किलिंगच्या घटनेशी जोडला जात असल्याने पुन्हा एकदा बावड्यातील ऑनर किलिंग घटनेच्या आठवणी जागत आहेत.

सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या 'सैराट' चित्रपटामुळे पाच महिन्यांपूर्वी कसबा बावडा येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेची चर्चा शहरात सुरू आहे. चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या बहुतांश प्रेक्षकांच्या तोंडून बावड्यातील ऑनर किलिंगच्या घटनेची आठवण व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही घटनांची थेट तुलना होत असली तरी, या दोन्ही घटनांचा काहीच संबंध नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अडीच वर्षांपूर्वीच 'सैराट' ची कथा लिहिली होती. या कथेनंतर त्यांनी आधी 'फॅन्ड्री' हा चित्रपट प्रदर्शित केला. 'फॅन्ड्री'नंतर काही दिवसातच 'सैराट'चे शुटिंग सुरू केले आणि दोन महिन्यात ते पूर्णही झाले. दोन वर्षांपूर्वीच 'सैराट'चे चित्रीकरण झाल्याचे खुद्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले आहे. बावड्यातील गणेश कॉलनीत घडलेली ऑनर किलिंगची घटना १६ डिसेंबर २०१५ म्हणजे सुमारे पाच महिन्यांपूर्वीचीच आहे. नातेवाईकांच्या मर्जीविरुद्ध आंतरजातीय विवाह करणारी बहीण मेघा (वय २१, थेरगाव, ता. शाहूवाडी) आणि तिचा पती इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (वय २८, रा. बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा) या दोघांना मेघाच्या दोन्ही सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने वार करून ठार केले होते. मेघाने घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर सहा महिन्यातच हा प्रकार घडला होता. या घटनेने राज्यभर खळबळ माजली होती.

'सैराट' चित्रपटातील घटनाही याच्याशी मिळतीजुळती आहे. नातेवाईकांच्या इच्छेविरोधात लग्न करणारी आर्ची आणि परशा या दोघांचा खून आर्चीचा भाऊ करतो. चित्रपटगृहात हा प्रसंग पाहताना कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रेक्षकांना बावड्यातील मेघा आणि इंद्रजितच्या खुनाची आठवण होतेच, त्यामुळे या दोन्ही घटनांमधील साधर्म्याबाबत खूप बोलले जात आहे.

'सैराट'च्या दिग्दर्शकाने चित्रपटाचा शेवट बदलला आहे काय? बावड्यातील घटनेनंतर नागराजला धक्कादायक शेवट मिळाला असावा, अशा अनेक शंका लढवल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही घटनांचा काहीच संबंध नाही हेच खरे आहे. यातून साहित्याचे वैश्विकपण मात्र स्पष्टपणे जाणवते. मानवी भावना, प्रथा, परंपरा, सूड, प्रतिष्ठेच्या कल्पना हे सारे काही 'सैराट'मधून दिसते. त्यामुळे चित्रपटातील आणि प्रत्यक्षात घडलेल्या दोन भिन्न काळातील घटनांचे साम्य चर्चेला आले आहे.

कुटुंबच उध्वस्थ

प्रतिष्ठेला धक्का बसल्याच्या कल्पनेतून गणेश आणि जयदिप पाटील या दोघांनी रागाच्या भरात बहिणीसह तिच्या पतीचा खून केला, मात्र या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. पोटच्या मुलीचा जीव गेलाच, पण त्याच आरोपात दोन्ही मुलेही तुरुंगात गेली. आई-वडिलांना म्हातारपणी आधारालाही कोणी उरले नाही, अशी अवस्था पाटील कुटुंबाची झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजारांपैकी पंधराशे प्रकरणे निकालीराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

'महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून तीन महिने झाले आहेत. या कालावधीत आयोगाच्या कामकाजात मोठे बदल करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून तब्बल पाच हजार प्रलंबित प्रकरणांतील सुमारे पंधराशे प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित तीन हजार प्रकरणांचे वर्गिकरण करून अनेक गंभीर प्रकरणांवर सुनावणी सुरू केली आहे. महिलांचा वेळ व पैशाची बचत होऊन त्यांना तत्काळ न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग तुमच्या दारी, ही अभिनव योजना आयोगाने सुरू केली आहे, ' अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.

कौटुंबीक हिंसाचाराची प्रकरणे अधिक

रहाटकर म्हणाल्या, आता आयोग विभागीय व जिल्हा पातळींवर देखील महिलांना न्याय मिळवून देणार आहे. दहा फेब्रुवारीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाला तब्बल साडेसहा वर्षांनंतर अध्यक्ष मिळाला व त्यानंतर आता आयोगाच्या सर्व सदस्यांची नियुक्ती झाली असल्याने आयोग परिपूर्ण झाला आहे. त्यामुळे आयोगाच्या कामकाजात गतीमानतेबरोबरच अमुलाग्र बदलही केले आहेत. या बदलाच्या पहिल्याच टप्प्यात तब्बल पाच हजार प्रलंबित प्रकरणांतील जवळजवळ दीड हजार प्रकरणांत संबंधित महिलांना न्याय देत ती प्रकरणे निकाली काढली आहे. यामध्ये कौटुंबीक हिंसाचाराची प्रकरणे जास्त होती. आता उर्वरित साडेतीन हजार प्रकरणांचेही वर्गिकरण करण्यात आले असून, यामध्ये कौटुंबीक हिंसाचार, गंभीर तक्रारी व सामान्य तक्रारी, असे भाग केले आहेत. यामध्ये सदर प्रकरणे कोणत्या वर्षांपासून प्रलंबित राहिली आहेत व का राहिली, यावरही भर देत त्यांचा कायद्याच्या चाकोरीत राहून निपटारा करण्यात येत आहे. आतापर्यंत गंभीर दहा प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली आहे. महिन्याला सरासरी सहा प्रकरणांवर सुनावणी होऊन निकाल दिला जातो.

महिलांच्या मंदिर व मशिद प्रवेशाबाबत, भारतीय घटनेने महिला व पुरुषांना समान संधी व हक्क दिले आहेत. हे सर्व हक्क महिलांनाही मिळाले पाहिजेत, असे म्हणत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

आयोग करणार मेडिएटेशन व कॉन्सलिंग

महिलांवरील अन्यायाबाबत आयोग केवळ तक्रारींचा निपटारा करण्याचेच काम करणार नाही तर महिलांच्या सामाजिक समस्या कमी करण्यासाठी महिलांचे मेडिएटेशन व कॉन्सलिंग करण्यावरही भर देणार आहे. त्यासाठी कोल्हापूर येथे महिलांसाठीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रहाटकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवनऊर्जा निर्मितीत सातारा आघाडीवरदोन हजार पवनचक्क्यांमधून दरमहा २० कोटी युनिटची निर्मिती

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

कोयना प्रकल्पामुळे वीजनिर्मितीत जिल्हा आघाडीवर आहे. त्यात पवन ऊर्जेची मोठी भर पडत आहे. जिल्ह्याला लाभलेल्या डोंगररांगांमुळे पवन ऊर्जा प्रकल्पासाठीही अनुकूल वातावरण मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर सुमारे दोन हजार पवनचक्क्यांच्या माध्यमातून तब्बल दरमहा २० कोटी युनिट वीज तयार होत आहे. पवन ऊर्जेमुळे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीमध्येही जिल्हा आघाडीवर आहे.

जिल्ह्यात मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. प्रदूषणविरहित, कमी उत्पादन व व्यवस्थापन खर्च यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा चांगला पर्याय पुढे आला. त्यातून पवन ऊर्जा प्रकल्प निर्मितीच्या संकल्पनेची सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या ठोसेघर व चाळकेवाडी पठारावर १९९६मध्ये पहिली पवनचक्की उभारली गेली. काही वर्षांत जिल्ह्यातील पठारावर पवनचक्क्यांचे जाळे उभे राहिले आहे. दुष्काळी भागातही डोंगरांच्या उजाड माथ्यावर पवनचक्क्यांची पाती भिरभिरत आहेत.

वीज वितरण कंपनीचे जिल्ह्यात सातारा, कराड, वडूज व वाई असे चार उपविभाग आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात दोन-तीनच आंतरराष्ट्रीय कंपन्या केवळ उभारणीच्या क्षेत्रात होत्या. गेल्या काही वर्षांत या कंपन्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यांच्या माध्यमातून चार विभागांमध्ये आतापर्यंत तब्बल दोन हजार पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. त्यातून २० कोटी युनिट वीजनिर्मिती होत आहे. या माध्यमातून राज्याची विजेची तूट भरून काढण्यास मोठी मदत होत आहे.

३० हजार युवकांना रोजगार; पवनचक्क्या तिप्पट होणार

पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे ऊर्जानिर्मिती वाढली आहेच. शिवाय जिल्ह्यातील सुमारे ३० हजार युवकांना थेट रोजगारही मिळाला. अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळालेल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. पवन ऊर्जानिर्मितीला अजूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्या अनुषंगाने वाऱ्याचा वेग तपासणारी यंत्रणा जिल्ह्याच्या विविध भागांत उभारलेली आहे. पुरेशा वेगामुळे आगामी काळात सध्याच्या तिप्पट पवनचक्क्यांची निर्मिती होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या अधिकाऱ्यांच्या बदलीने तपासावर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील अतिसंवेदनशील गुन्ह्यांपैकी एक असलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे तपास अधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांचीही बदली झाली आहे. चैतन्य यांच्या बदलीने या प्रकरणातील तपासात सहभागी असलेल्या चौथ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली आहे. तपास कमी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्याच अधिक अशी स्थिती यात आहे. संघटनांचा विरोध झुगारून अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याने कॉम्रेड पानसरे यांच्या हल्लेखोरांच्या तपासाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

कोल्हापुरातील सागरमाळ येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सव्वा वर्ष उलटले तरी अद्याप एका संशयित वगळता पोलिसांच्या हाती फारसे काहीच लागलेले नाही. पोलिसांनी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्यावर आरोप निश्चिती करण्यातही पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या तपासात पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली. कोल्हापूर जिल्हा पोलिसांसह एसआयटी आणि सीबीआयही या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तपासात गती घेतली होती. अनेक महत्त्वाचे पुरावे जमा करण्यातही या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. मात्र काही महिन्यांत या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तपास अधिकारी म्हणून काम पाहणारे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची बदली झाल्यानंतर या जागेवर एस. चैतन्य यांची नियुक्ती झाली होती. आता त्यांचीही बदली झाल्याने पुढील तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्यांचा तपास महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तपास यंत्रणा समन्वयाने करीत आहेत. याबाबत उच्च न्यायालयातही काही याचिका दाखल आहेत. संशयित आरोपी गायकवाड याच्यावर आरोप निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर अधिक तपासासाठी तिन्ही हत्यातील गोळ्या आणि पुंगळ्या स्कॉटलंड यार्डकडेही पाठवल्या जात आहेत. विविध स्तरांवर सुरू असलेला तपास, वेळोवेळी मिळाणारी माहिती आणि न्यायालयात सुरू असलेल्या याचिका यामुळे सलग एकच अधिकारी असणे अपेक्षित होते. मात्र वारंवार अधिकारी बदलल्याने तपासाला खीळ बसत आहे. परिणामी हल्ल्यातील संशयित आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत आहेत.

तपास अधिकारी बदलू नयेत यासाठी कॉम्रेड पानसरे कुटुंबीयांसह शहरातील विविध संघटनांनीही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडेही मागणी केली आहे, मात्र राज्य सरकारने या मागणीकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. आता चौथे अधिकारी बदलल्याने पुन्हा तपास लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचा आवार होणार हिरवागार

$
0
0

Anuradha.kadam

@timesgroup.com

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वनराई, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती यांच्या संवर्धन व रक्षणाबाबत संस्कारक्षम वयात जाणीव व आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या एकूण परिसरापैकी ३३ टक्के जागेत वृक्षारोपण करण्याचा अध्यादेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढला आहे. यानुसार कोल्हापुरातील शाळा आता हिरव्यागार होणार आहेत. येत्या पावसाळ्यात जुलै महिन्यात वृक्षारोपण करण्याची मोहीम शाळांमध्ये सुरू होणार आहे.

अध्यादेशानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषद, नगरपालिकेच्या शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांच्या आवारात २० रोपांची लागवड करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे, तर उच्च माध्यमिक विभाग संलग्न असलेल्या शाळांच्या आवारात ३० रोपे लावावी असे सूचित केले आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे, माती भरणे, कीटकनाशकांचा वापर करणे आणि लागवडीसाठी रोपांची निवड करणे यासारख्या पूर्वपावसाळी नियोजनाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी त्याबाबतची कार्यवाही मेअखेर पूर्ण करण्याबाबतही या आदेशामध्ये सूचना केल्या आहेत.

या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी विशेष सॉप्टवेअर तयार करण्यात आले आहे. ज्यामधून शाळांच्या आवारात वृक्षलागवडीसाठी निश्चित केलेल्या जागांचे क्षेत्रफळ, छायाचित्रे, रोपांच्या प्रजाती, वृक्षारोपणानंतर रोपांचे संवर्धन याबाबतची माहिती अपलोड करता येणार आहे. हवामान, जमिनीचा प्रकार यानुसार रोपांची निवड करण्याबरोबरच वृक्षलागवडीच्या प्रक्रियेत कुशल मनुष्यबळाचा वापर करण्यात येणार आहे.

वृक्षसंवर्धनाचा दररोज अहवाल

या योजनेबाबतचा अहवाल जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना दर दोन तासांनी ऑनलाइन अपलोड करावा लागणार आहे. यामध्ये रोपांची सद्यःस्थिती, संगोपनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी यांचा समावेश आहे. लागवड केलेल्या वृक्षारोपणापैकी रोपे जिवंत राहण्याचे प्रमाण ८० ते ९० टक्के असावे याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच या मोहिमेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील खासदार, पालकमंत्री, आमदार यांना सहभागी करून घेण्याबाबतही पुढाकार आवश्यक आहे.

'राज्य सरकारने शाळांच्या आवारात वृक्षारोपण करण्याचा अध्यादेश काढला असला तरी अद्याप तो शाळा प्रशासनापर्यंत पोहोचलेला नाही. मात्र, ही मोहीम अतिशय चांगली आहे. त्यामुळे शाळांमार्फत या मोहिमेच्या यशस्वितेसाठी पूर्णपणे सकारात्मक पुढाकार घेतला जाईल.'

व्ही. बी. लोहार, मुख्याध्यापक, महाराष्ट्र हायस्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैनीसाठी अडीच लाखांचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोरीचा बनाव झाल्याची फिर्याद देऊन एक लाख सोळा हजार रुपये लंपास करणाऱ्या श्रीनाथ बसाप्पा नेलकिरी वय, १९, रा. नवरत्न अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. महालक्ष्मी पतसंस्थेत ग्राहकांकडून जमा झालेल्या वीजबिलातील पैसे त्याने लांबवले होते. नेलकिरीचा साथीदार राजमहंमद बाबूलाल शेख (वय २२, रा. यादववाडी, मणेर मळा) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मेकॅनिकल डिप्लोमाचा विद्यार्थी असलेल्या नेलकिरी याने चैनीसाठी २ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

श्रीनाथ हा कावळा नाका येथील महालक्ष्मी पतसंस्थेत अर्धवेळ काम करत होता. पतसंस्थेत बीजबिल भरणा केंद्रात कॅशिअर म्हणून काम करताना रोजची रक्कम रुईकर कॉलनीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत भरणे बंधनकारक आहे. मात्र, नेलकिरी पू्र्ण रक्कम भरत नव्हता. गेल्या दोन महिन्यांत त्याने १ लाख ४६ हजार रुपये परस्पर लांबवले. बुधवारी (ता. ११) दुपारी तीनच्या सुमारास, रुईकर कॉलनीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी पैशाची सॅक हिसकावून नेल्याची तक्रार नेलकिरीने शाहूपुरी पोलिसात दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास केल्यानंतर त्याच्या माहितीत विसंगती आढळली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरीचा प्रकार हा बनाव असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

श्रीनाथने अपहारातील काही रक्कम घरी दिली असून, उरलेल्या रकमेतून मोटारसायकलचे कर्ज भागवले. उर्वरित रक्कम त्याने चैनीसाठी वापरल्याची कबुली पोलिसांकडे दिली. चोरीच्या बनावातील १ लाख १६ हजार ८०० रुपये त्याने मित्र राजमहंमद शेख याच्याकडे ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी शेख यालाही ताब्यात घेतले. श्रीनाथ नेलकिरी याच्यावर कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल असून, आर्थिक फसवणुकीप्रकरणी महालक्ष्मी पतसंस्थेकडूनही फिर्याद दाखल होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

लाइफ स्टाइलसाठी...

श्रानाथचे वडील गवंडीकाम करतात, आई शिवणकाम करते. आई-वडिलांनी मोठ्या कष्टाने तीन्ही मुलांना इंजिनिअर करण्याचे स्वप्न बाळगले. दोन्ही मोठ्या मुलांना त्यांनी इंजिनिअर बनवले. श्रीनाथलाही डिप्लोमाला अॅडमिशन मिळवून दिले. डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या श्रीनाथला किमती कपडे, शूज, गॉगल्स वापरण्याची हौस होती. त्यामुळेच तो आर्थिक अपहाराकडे वळल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जकात नाके अडगळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकेकाळी महापालिकेच्या उत्पन्नाचे सगळ्यात मोठे साधन असलेल्या जकात विभागाला सध्या पालिकेत कुणी विचारेना, अशी परिस्थिती आहे. शहराच्या वेशीवर असणारे सर्व जकात नाके अडगळीत पडले आहेत. या नाक्यांची गोडावून झाली आहेत. अनेक नाक्यांवरील साहित्य चोरीला गेले आहे. यात शिरोली जकात नाक्याची स्थिती सर्वांत वाईट आहे. अन्य नाक्यांवरही तेच चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, शिरोली व शाहू जकात नाक्यांवर रात्र निवारा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे.

राज्य सरकारने महापालिकात हद्दीत जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पालिकांचे जकात नाके बंद झाले. जकात बंद केल्यानंतर एन्ट्री टॅक्स बसवण्याचा विचार होता. एलबीटीमध्ये एन्ट्री टॅक्सचाही पर्याय न राहिल्याने नाके बंदच पडले. एकेकाळी महत्त्वाचा आणि मोठा विभाग असलेल्या जकात विभाग धूळखात पडला आहे. या जकात नाक्यांच्या इमारती पडून आहेत. शहराच्या चारही रस्त्यांवरील वेशीवर जकात नाके उभे आहेत. त्यातील कळंबा, सरनोबतवाडी, राजेंद्रनगर, आरके नगर, लोणार वसाहत हे छोटे नाके सोडल्यास इतर ठिकाणी मुख्य रस्त्यांवर नाक्यांच्या मोठ्या इमारती आहेत. यातील शिये नाका, फुलेवाडी, कळंबा असे नाके, तर रस्त्यावरच आहेत. इमारती असलेल्या ठिकाणी जकात विभागाचे साहित्य त्यामध्ये भरुन ठेवले आहे.

शिरोली जकात नाक्यावरचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. तेथील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा, गज तुटलेले आहेत. त्यातून नाक्याच्या इमारतीतील धूळ खात पडलेले साहित्य दिसते. यात कम्प्यूटर, कागदपत्रांचे गठ्ठे, टेबल-खुर्च्या आणि इतर साहित्य दिसत आहेत. इमारतीच्या काही भिंतींनाही तडे गेले आहेत. शिरोली नाक्यावरील इमारत मोठी असल्याने इतर नाक्यांमधील साहित्यही येथे आणून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे हा जकात नाका अडगळीचे ठिकाण आहे.

00000000000000000000

असाही पर्याय शक्य

कोल्हापूर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. अंबाबाई मंदिराबरोबरच न्यू पॅलेस, रंकाळा, जोतिबा, पन्हाळा पाहण्यासाठी अनेकजण कोल्हापूरला भेट देतात. मात्र, शहरात प्रवेश करताना अनेक पर्यटकांची तारांबळ उडले. रस्ते माहिती नसतात. तसेच एक-दोन दिवसांत कोल्हापूर दौरा कसा करायचा? यावरून त्यांचा गोंधळ सुरू असतो. त्यांच्यासाठी शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर असलेल्या जकात नाक्यांवर पर्यटन गाइडची व्यवस्था होणे शक्य आहे. तेथे पर्यटकांना अंबाबाई मंदिरासाठी कसे जावे? पार्किंगची व्यवस्था कोठे व कशी आहे? पन्हाळा, जोतिबाचे नियोजन कसे करता येईल? याची माहिती देता येऊ शकते. महापालिकेला इतर कारभाराच्या गर्दीत हे काम जमणे शक्य नसल्याचा मुद्दा उपस्थित होतो. त्यावर उपाय म्हणून ही पर्यटक मार्गदर्शन केंद्रे एखाद्या स्वयंसेवी संस्थेला चालविण्यासाठी देणे शक्य आहे. या केंद्रांवरच शहरातील खाद्य पदार्थांची ठिकाणे व त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करणे शक्य आहे. या जाहिरातींमधून पर्यटन मागदर्शन केंद्रावरील कामाचा खर्च निघू शकतो.

000000

शाहू, शिरोली नाका येथेच मोठी इमारत आहे. शहरात एक लाख लोकसंख्येमागे एक रात्र निवारा केंद्र उभारण्याचे सरकारचे धोरण आहे. या धोरणातील दोन रात्र निवारा केंद्रे शाहू, शिरोली नाका येथे करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शिरोली नाक्याच्या इमारतीत असलेले अडगळीचे साहित्य कावळा नाका येथील जुन्या गोडावूनमध्ये लवकरच शिफ्ट करण्यात येणार आहे.

सचिन जाधव, सहायक, मालमत्ता अधिकारी, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images