Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

क्लिकवर मिळणार जन्म-मृत्यू दाखला

$
0
0

Janhavi.Sarate@timesgroup.com

कोल्हापूर : जन्म किंवा मृत्यूचा दाखला मिळवायचा असेल तर सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र सरकारी कार्यालयेही नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी दीड महिन्यात जिल्ह्यात सीआरएस संगणक प्रणालीद्वारे एका क्लिकवर जन्म-मृत्यू दाखले मिळण्याची सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारिरीक त्रास कमी होणार आहे.

राज्य सरकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून नवीन सीआरएस संगणक प्रणालीद्वारे जन्म-मृत्यू नोंदणी करून दाखला तत्काळ कोठुनही मिळविण्याची सुविधेसाठी प्रयत्नशील आहे. या प्रणालीचे काम जिल्ह्यात सुरू आहे.

संबंधित जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. ही प्रणाली जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना जोडण्यात येणार असून काही डाटा या प्रणालीत अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सीआरएस प्रणालीसाठी राज्यातील १५ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. देशभर या प्रणालीचा वापर केला जात आहे. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र आयडी, पासवर्ड देण्यात आले आहेत. एकदा या प्रणालीमध्ये नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या नोंदणी क्रमांकावरून या प्रणालीमुळे कोणालाही घरबसल्या, सायबर कॅफेमधून किंवा बाहेर कोठेही कामानिमित्त गेल्यास तेथे जन्म-मृत्यू दाखल्याची प्रत ऑनलाइन मिळू शकेल. आहे. या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पुण्यात ट्रेनिंग देण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्यावतीने पुन्हा ट्रेनिंग देण्यात येणार आहे. लवकरच ही प्रणाली जिल्ह्यात कार्यान्वित होणार आहे.

जन्म नोंदणीचे फायदे

बाळंतपणासाठी सरकारी फायदे घेण्यासाठी, लसीकरण, शिधापत्रिकेत नावनोंदणी, शाळाप्रवेश, जातीचा दाखला किंवा रहिवाशी दाखला, कायदेशीर घोषणापत्र, पासपोर्ट, आयुर्विमा, मतदार यादीत नाव नोंदणी, वाहन चालक परवाना, नोकरी, सरकारी नोकरी, आजारपणाचा विमा, विवाह दाखला आदींसाठी जन्मनोंदणी आवष्यक आहे.

मृत्यू नोंदणीची गरज

कायदेशीर वारसाहक्क, मालमत्ता हस्तांतरासाठी, आयुर्विमा दावा, बँक आणि मुदत ठेवी, काँटुंबिक निवृत्तीवेतन, गॅस नोंदणीचे नाव बदलण्यासाठी, दूरध्वनी नोंदणी नाव बदलण्यासाठी, दूरध्वनी नोंदणी नाव बदलण्यासाठी, वीज व पाणी मीटर नाव बदलणे, मतदार यादीतील नाव कमी करण्याकरिता, ज्येष्ठ नागरिकांचे फायदे व पेन्शन आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आष्ट्याजवळ तीन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने ठोकरल्यामुळे माधवनगर येथील भरडिया कुटुंबातील पित्रा-पुत्रासह वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला. मृतांत आठ वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. इतर चार जण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
आष्टा तालुक्यातील कारंडवाडी गावाजवळ मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याचे आष्टा पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, माधवनगर येथील भरडिया कुटुंबीय क्रुझर गाडीने आष्ट्याहून सांगलीकडे येत होते. कारंडवाडीजवळ सांगलीहून इस्लामपूरकडे निघालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकशी या गाडीची टक्कर झाली. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने क्रुझर गाडीचा चालक दिलीप नामदेव साळुंखे (वय २९, रा. ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ) जागीच ठार झाला. त्याबरोबरच माधवनगरचे रहिवासी असलेले पवन शंकरलाल भरडिया (वय ३५), त्यांचा लहान मुलगा पुनीत पवन भरडिया (वय ८) हेही ठार झाले. क्रूझर आष्ट्याकडून सांगलीकडे येत होती तर उसाने भरलेला ट्रक आष्ट्याच्या दिशेने चालला होता, त्यावेळी ही जोरदार टक्कर झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओसाड जयप्रभा परिसराला आशेची पालवी

$
0
0

Anuradha.Kadam
@timesgroup.com

कोल्हापूर : मराठी सिनेमाच्या निर्मितीचा मान​बिंदू आ​णि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सहवासाचे स्मृतिस्थान असलेल्या जयप्रभा स्टुडिओची वास्तू आर्थिक व्यवहारातून जमीनदोस्त होऊ नये यासाठी गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहो. जागेच्या मालक, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि कोल्हापूर महापालिका यांच्या न्यायालयीन लढ्याबरोबरच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कोल्हापुरातील कलावंतांनी जयप्रभा वाचविण्यासाठी आवाज उठवला. या लढ्याला यश आले आणि जयप्रभा स्टुडिओची वास्तू राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीत समाविष्ट झाली. मात्र, एकेकाळी मराठी सिनेमाच्या वर्तुळात मानाचे पान असलेला हा स्टुडिओचा परिसर आजच्या घडीला ओसाड आणि भकास आहे.

मंगळवारी स्टुडिओच्या परिसरात फेरफटका मारल्यावर हिरवाईने नटलेली वृक्षसंपदा झुडपे बनल्याचे दिसले. ऐटबाज वाड्यांची रया गेली आहे. ​जिथे पडद्यावरचे गजबजलेले गाव वसायचे, त्या परिसरात नीरव, भयाण शांतता पहायला मिळाली. भटक्या कुत्र्यांच्या आवाज त्यात भर घालतो. सिनेमासाठी प्रॉपर्टी म्हणून वापरल्या जाणाऱ्या सामानाची उचलबांगडी झाल्यामुळे कुलूपबंद वैभव अंगावर अक्षरश: शहारे आणते.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती केली. त्यांचे स्टुडिओच्या रुपातील हे स्मृतिस्थळ आज ओसाड आणि भकासपणे उभे आहे. त्यांनी आपले स्वप्नसंचित गायिका लता मंगेशकर यांच्याकडे सोपवले, ते सिनेमाच्या निर्मितीचा वारसा जपला जावा म्हणून. मात्र, मंगेशकर यांनी तीन वर्षांपूर्वी हा स्टुडिओ विकण्यासाठी आर्थिक व्यवहार केले. त्याला न्यायालयाने आक्षेप घेतल्याने आता जयप्रभा स्टुडिओ संरक्षित स्मारकांच्या यादीत आला आहे. त्यामुळे भालजींच्या आवाजातील लाइट... अॅक्शन... कॅमेरा ही आरोळी नव्याने घुमण्याच्या आशेला पालवी फुटली आहे.

पाटलाच्या वाड्याचे वैभव झाकोळले

मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळात ग्रामीण बाजाच्या सिनेमांनी मराठी रसिकांवर गारूड केले होते. गावाकडची कथा पडद्यावर सशक्तपणे मांडताना पाटलाचा वाडा हमखास पडद्यावर दिसायचा. स्टुडिओच्या आवारातील ही वास्तू कधी पाटलाचा तर कधी गावातल्या धनिकाचा वाडा म्हणून नेहमीच दिसायची. पडद्यावरच्या कथेला वैभवाची फ्रेम देणारा हा स्टुडिओतील वाडा मात्र असा एकाकी उभा आहे. झाडांच्या वाढलेल्या सुकलेल्या फांद्यांनी या वास्तूला तर विळखा घातला आहेच; पण या भकासपणाने स्टुडिओच्या भव्यतेलाही झाडा झुडपांनी झाकोळून टाकले आहे. ना रंगरंगोटी ना देखभाल अशा अवस्थेत ही वास्तू गेल्या पाच वर्षांपासून पडून आहे.

अडगळ पाहवेना

सिनेमा निर्मितीच्या साहित्याला स्टुडिओच्या कानाकोपऱ्याने खूप मोलाने जपले. विशेषत: ऐतिहासिक सिनेमांचा बाज सांभाळताना मोठे खांब, सिंहासने, राजदरबारातील बैठका असा ऐवज स्टुडिओच्या खास दालनात जपून ठेवला जायचा. आजही ती जागा स्टुडिओच्या आवारात आहे. मात्र, तिचे रूप बदलले आहे. मोठे चौरंग, राजदरबार उभारणीचे साहित्य अडगळीप्रमाणे कोपऱ्यात पडले आहे. लाकडी सामानाची अवस्था अडगळीची झाली आहे. ना तिला डागडुजी आहे ना तेलपाणी. गेल्या काही वर्षांत स्टुडिओच्या आवारातील गजबज जशी थंडावली तशी या साहित्याचीही किंमत उरली नाही, त्याचे हे दर्शन.

झुडपांचा विळखा

स्टुडिओच्या आवारातील वास्तूंवरचे पत्रे दोन वर्षांपूर्वी काढून नेण्यात आले. स्टुडिओच्या विक्रीने कलावंतांप्रमाणे इथल्या वास्तूंच्या पायाखालची जमीन तर सरकलीच, पण छतही काढले गेले. आता सभोवताली झाडेझुडपेच आहेत. 'जयप्रभा'ची सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या या झाडांनी दोन वर्षातील उन्हाच्या झळा सहन केल्या आहेत. ही झाडे आता वठली आहेत. भव्य वास्तू मात्र झुडपांच्या विळख्यांमध्ये गुदमरली आहेत.

कुलूपात अडकले वैभव

​जिथे गाव उभं राहिलं, पडद्यावरच्या सभागृहाचा सेट लागला, राजदरबार आकाराला आले त्या कक्षाचे वैभव कुलूपात बंद झाले आहे. सिनेमाची एकेक फ्रेम जिथे दृश्य रुपात कॅमेऱ्यात बंद व्हायची त्या दालनाची अवकळा कलावंताच्या डोळ्यात पाणी आणल्याखेरीज राहणार नाही. या कक्षात जाण्यासाठीच्या वाटेवरही मधल्याकाळाने आपल्या खुणा पेरल्या आहेत. अशी अवस्था इथल्या प्रत्येक वास्तूची आहे.

फक्त निर्जीव ​​भिंती

स्टुडियोच्या आवारात आता फक्त निर्जीव भिंती दिसतात. आवारातील ज्या वास्तूंनी एकेकाळी पडद्यावरच्या कथा बोलक्या केल्या, त्या भिंती निःशब्द आहेत. येथील पार, झाडे भकास झाली आहेत. भिंतीला गेलेले तडे आ​णि हरवलेल्या सौंदर्यामुळे परिसराला अवकळा आली आहे.

पानगळीत हरवली वास्तू

स्टुडिओच्या आवारातील प्रत्येक वास्तू, कोणत्या ना कोणत्या संदर्भाने मराठी सिनेमाच्या पडद्यावर दिसली आहे. मात्र, ही स्मृती आजघडीला कोसळली आहे. तीन वर्षात जयप्रभाच्या आवारातील एकाही वास्तूची देखभाल न झाल्यामुळे अशी अवस्था झाली आहे. भालजी पेंढारकर यांच्या सहवासाने फुललेली ही वास्तू आज अशी पानगळीत हरवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरीश कसरावल्ली यांना बाबूराव पेंटर पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कोल्हापूर चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचे वितरण उदघाटनादिवशी होईल. तर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना महोत्सवाच्या सांगतेप्रसंगी (ता. २५ डिसेंबर) चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार प्रदान केला जाईल. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सचिव, सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सचिव दिलीप बापट म्हणाले, 'फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात महोत्सवाला प्रारंभ होईल. पुरस्कार जाहीर झालेले दिग्दर्शक कसरावल्ली यांनी कन्नड भाषेतील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. त्यांनी १९७० ते ८० च्या दशकात समांतर आणि कलात्मक चित्रपटांच्या चळवळीत योगदान दिले. भारत सरकाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान मिळाले आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सिनेमा, नाटक, टिव्ही मालिका, जिंगल्स अशा विविध माध्यमांना संगीतसाजाने लिलया सजविले आहे. ४० वर्षाच्या संगीत क्षेत्रातील प्रवासात त्यांनी वादक ते संगीतकार असा पल्ला गाठला. हे योगदानाबद्दल त्यांचाही पुरस्काराने गौरव होईल.'

या वेळी सेक्रेटरी दिलीप बापट, महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके उपस्थित होते.

आजपासून प्रवेशिका उपलब्ध

दरम्यान, किफ महोत्सवासाठी बुधवारपासून (ता. १६ डिसेंबर) राजर्षी शाहू स्मारक भवनात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. एक दिवसीय प्रवेशिकेचे मूल्य १०० रुपये आहे. संपूर्ण महोत्सवासाठी प्रवेशिका मूल्य ४०० रुपये आहे. फिल्म सोसायटी आणि चित्रपट महामंडळाच्या सभासदांसह कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवेशिका उपलब्ध करून दिल्या जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किफ’चा पडदा शुक्रवारी उघडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवारपासून होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून एकूण ५० चित्रपट आणि ३० लघुपटांचा खजिना उलगडणार आहे.

महोत्सवात वर्ल्ड सिनेमा, विविध भारती हा भारतीय प्रादेशिक भाषा विभाग, प्रेक्षक पसंती पुरस्कारातील नवीन मराठी चित्रपट, माय मराठी विभागात, भारतीय व विदेशी दिग्दर्शक मागोवा, कंट्री फोकस, ब्युटी इन सिक्सस्टीज या विभागात ५० चित्रपट आणि ३० लघुपट असतील. या चित्रपटांतून मानवी जीवनाचा वेध आणि शोध यांचे दर्शन घडेल. अप्रदर्शित नवीन आणि नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे १० मराठी चित्रपट आणि १९५५ मध्ये गाजलेले संगीतप्रधान ७ चित्रपट खास आकर्षण ठरणार आहे.

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त 'प्रतिभा' हा १९३६ सालातील चित्रपट व प्रख्यात दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित 'चार्ली' हा चार्ली चॅप्लीनवरील चित्रपट यांचे विशेष आकर्षण असेल. सोसायटीच्यावतीने घेतलेल्या लघुपट स्पर्धेतील १५ लघुपटांचे प्रदर्शनही महोत्सवात होणार आहे.

यावेळी चित्रपट दिग्दर्शक संध्या गोखले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लघुपट आणि माय मराठी विभागाची सुरुवात अभिनेता हषीकेश जोशी व ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते १९ डिसेंबर रोजी होणार आहे. महोत्सवात दररोज सायंकाळी ४ वाजून ४५ वाजता खुलामंच कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. नव्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक आणि कलावंत त्यांच्या चित्रपटासाठी उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधणार आहेत.

.................

कार्यक्रम असे

१८ डिसेंबर : पोस्टर प्रदर्शन, महोत्सव सुरुवात, कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृति पुरस्कार प्रदान

प्रमुख पाहुणे : अमोल पालेकर, संध्या गोखले, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली

१९ डिसेंबर : लघुपट व माय मराठी विभाग सुरुवात, लघुपट पारितोषिक वितरण

प्रमुख पाहुणे : ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, अभिनेता हषिकेश जोशी

२० डिसेंबर : १९१३ ते २०१४ मराठी चित्रपटसूची प्रकाशन अभिवाचन

प्रमुख पाहुणे : किरण शांताराम, दिलीप प्रभावळकर

२१ डिसेंबर : हकिकत सिनेमाची पुस्तक प्रकाशन, लेखक- सतीश जकातदार

प्रमुख पाहुणे : सतीश जकातदार, प्रा. हिमांशू स्मार्त

२२ डिसेंबर : जागतिक सिनेमा : गणेश मतकरी

२३ डिसेंबर : बदलता मराठी सिनेमा : मकरंद ब्रह्मे

२४ डिसेंबर : स्थानिक कलावंताचा गौरव समारंभ

२५ डिसेंबर : महोत्सव सांगता समारंभ, चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार प्रदान

माय मराठी प्रेक्षक पसंती पुरस्कार प्रदान, प्रमुख पाहुणे - दिग्दर्शक अशोक पत्की

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्निशमन दलाने मधमाशाही जाळल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेलबागेतील एका घरासमोरील झाडावर तयार झालेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी अग्निशमन दलाने आगीच्या सहाय्याने जाळून काढले. यामध्ये मधमाशा मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडल्या. नागरिकांनाही त्रास होता कामा नये आणि मधमाशांनाही त्रास होऊ नये यासाठी नवी पद्धत अस्तित्वात असताना पोळे काढण्याची जुनी पद्धत वापरल्याबद्दल अग्निशमन दलाबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

बेलबागेतील एका घरासमोरील झाडावर मधमाशांचे पोळे तयार झाले होते. त्यापासून नागरिकांना धोका होऊ नये म्हणून नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ते पोळे जाळून काढले. त्यामुळे मेलेल्या शेकडो मधमाशांचा खच परिसरात पडला होता. एकीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू असताना त्यातील एक घटक असलेल्या मधमाशांना अशा प्रकारे मारल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. वृक्ष प्राधिकरणाबरोबरच महापालिकेने शहरातील जैवविविधता जपण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. मात्र, अशा समितीकडेही दुर्लक्ष केले गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांच्या कामाचा पाटील यांनी मांडला लेखाजोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अठरा वर्षे आमदार असणाऱ्या महादेवराव महाडिक यांनी जिल्ह्याच्या विकासाचा एकही प्रश्न सोडवला नाही. अधिवेशनात एकही प्रश्न विचारलेला नाही. त्यांनी किती निधी आणला हा संशोधनाचाच विषय आहे. अठरा वर्षांतील अधिवेशनाच्या ९६७ दिवसांपैकी ते ८२६ दिवस ते गैरहजर होते. त्यांच्या या प्रगतीपुस्तकाचा शांतपणे विचार करा', अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी ३८२ मतदारांना पाठवले आहे. महाडिकांनी आतापर्यंत केवळ स्वार्थासाठी राजकारण केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांना कधीच सन्मानाची वागणूक मिळालेली नाही, असेही त्या पत्रात म्हटले आहे.

विधानपरिषदेच्या प्रचारासाठी प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. एकावेळी सर्वांना भेटता येत नसल्याने प्रचाराचे काही मुद्दे मांडता येत नाहीत. त्यातून पाटील यांनी पत्र पाठवण्याचा मार्ग निवडला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, 'महाडिक यांनी १८ वर्षात केलेल्या कामाचा आढावा मांडला. अधिवेशनाच्या काळात केवळ १४१ दिवस उपस्थित असलेल्या महाडिक यांची ही टक्केवारी १४.५८ टक्के होते. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी किती निधी आणला याचाही विचार मतदारांनी करण्याची गरज आहे. स्वार्थासाठी राजकारण करणारे एकीकडे व दुसरीकडे विकासाची दृष्टी ठेवून समाजासाठी झटणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ही परिस्थिती आहे.

माझ्या राजकीय प्रवासात जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले.

थेट पाइपलाइन योजनेसाठी ४५० कोटींचा निधी मंजूर करण्यात यश मिळाले. जिल्हा परिषदेला निधी मिळवून दिला. मंत्रिमंडळात काम केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेमके काय प्रश्न आहेत हे माहिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. महाडिक यांनी १८ वर्षात मी कोणत्याही पक्षाशी बांधिल नाही, मी स्वतः एक पक्ष असल्याची भाषा वापरतात. मुलाला भाजपमधून आमदारपदासाठी, सुनेला भाजपमधून जिल्हा

परिषदेसाठी निवडून आणले. मोठ्या मुलामार्फत महापालिकेची निवडणूक काँग्रेसविरोधात लढवली. पुतण्या राष्ट्रवादीचा खासदार आहे. हे सर्व त्यांनी काँग्रेस पक्षात असताना केले. याला पक्षनिष्ठा म्हणायची का?' असा प्रश्न उपस्थित केला.

पत्रकात म्हटले आहे की, 'खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी ज्यांनी काम केले, त्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत पाठ फिरवली. सध्या मात्र ते काकांच्या प्रचारासाठी जोमाने कामाला लागले आहेत. घरच्या माणसाच्या प्रचारात उतरणाऱ्या महाडिक यांनी कार्यकर्त्यांचा प्रचार का केला नाही? यातून महाडिक कुटुंबिय केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विचार करतात व राजकारण करतात हे स्पष्ट झाले आहे. त्याचा मतदारांनी विचार करावा आणि मते देताना आपला स्वाभिमान जागृक ठेवावा' असे आवाहन पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवाडमध्ये घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

जयसिंगपूर : दानवाड (ता.शिरोळ) येथे राजगोंडा जोतगोंडा पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद कुरूंदवाड पोलिसांत झाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवार (ता.१४) रोजी राजगोंडा पाटील हे कुटूंबियांसह परगावी गेले होते. रात्री चोरट्यांनी कटावणीने घराचे कुलूप तोडून पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीची आरती, ४० हजार रूपयांची रोख रक्कम तसेच २० हजार रूपये किंमतीचा कॅमेरा असा एक लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्याने शेजाऱ्यांनी पाटील कुटुबीयांशी मोबाइलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर राजगोंडा पाटील यांनी कुरूंदवाड पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पथकातील श्वानाने कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यापर्यंत माग काढला व श्वान घुटमळले. अधिक तपास पोलिस निरीक्षक डी. एस. हाके करीत आहेत.

कुरूंदवाड येथे सोन्याचे दुकान फोडून किमती ऐवज लंपास

कुरूंदवाड येथे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान फोडले. दादासो उपाध्ये यांच्या आराधना ज्वेलर्सचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रूपये किंमतीची सीसीटिव्हीची सामुग्री लंपास केली. रात्री अडीच वाजता मोटारसायकलवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील सहा इसमांनी चोरी केली. चोरट्यांनी तोंडाला स्कार्फ बांधला होता असे उपाध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर.के.रानगर करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दौलत’ यंदाही वाया

$
0
0

चौथा हंगामही बंद झाल्याने चंदगड तालुक्यात अस्वस्थता

संपत पाटील, चंदगड

गेले चार हंगाम बंद असलेला दौलत सहकारी साखर कारखाना यावर्षी तरी सुरु होईल अशी आशा होती. मात्र यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होवून दोन-अडीच महिने झाले तरी दौलतबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने दौलत यावर्षी तरी सुरु होणार का? असा प्रश्न शेतकरी, कामगार व सभासदांना पडला आहे. एकीकडे दौलतच्या विझलेल्या धुरड्याकडे पहात शेतातील ऊस खासगी कारखान्यांच्या बेभरवाशी धोरानांनुसार घालण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिला नाही. दौलतवर केडीसीसी बँकेचा ताबा असल्यामुळे बँकेने कारखाना सुरु करण्यासाठी अनेकदा निविदा काढली, मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. आता कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी ११ अर्जांची विक्री झाली आहे. मा‌त्र, डिसेंबर महिना संपत आला तरी अजूनही निर्णय होत नसल्याने शेतकरी हाताश होत आहे. गेली चार वर्षे दौलत बंद असल्यामुळे या परिसराला अवकळा आली आहे. संपूर्ण परिसर भकास दिसत आहे. नेहमी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर आता क्वचितच वाहने दिसत आहेत. तर शेडबाहेरची यंत्रसामग्री गंजून गेली आहे.

एकेकाळी दौलत कारखान्यावर तालुक्यावर आर्थिक गणित अवलंबून होते. दौलतमध्ये नोकरी करणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. मात्र, नरसिंग पाटील व गोपाळ पाटील या मेहुण्या-पाहुण्यातील सत्ता संघर्षामुळे दौलतची आजची स्थिती ओढवली आहे. आजच्या स्थितीला सत्ताधाऱ्यांबरोबर कामगार वर्गही जबाबदार आहे. या काळात क्षणाचीही ऊसंत नसणारा कारखान्याचा परिसर सध्या भकास दिसत आहे. मशिनरी गंजत चालली आहे. कामगारांनीही अनेक महिने पगार नसल्याने कारखान्याकडे पाठ फिरविली आहे. कारखाना सुरु होईल या आशेवर बसलेले कामगार व कारखान्यावर अवलंबून असलेले सर्वच घटक हळूहळू कारखाना सोडून जात आहेत.

मुबलक ऊस

कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविणारा कारखान्याच्या परिसर आहे. कारखान्यापासून २५ किलोमीटर अंतरावर उसाचे क्षेत्र विपुल प्रमाणात आहे. तालुक्यामध्ये दहा लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होतो. तिन्ही कारखाना चालतील इतका ऊस आहे. भविष्यात १५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची भौगोलिक परिस्थिती आहे.

मशिनरींची दुरवस्था

कारखान्याची मशिनरी गंजली असून पुढील काळात ती उपयोगात येईल की नाही? याबाबत साशंकता आहे. परिसर ओस पडला आहे. पार्टीकल बोर्डची मशिनरीही गंजत चालली आहे. कारखाना परिसरात झुडपे व गवत वाढले आहे. पाण्यासाठी असलेला हौदही माती पडून बुजून गेला आहे. यावरील पाण्याची मोटर बील न भरल्याने बंद असून गंजून गेली आहे. कारखान्यामार्फत चालविलेले धान्य व रॉकेल दुकान बंद आहे. त्यामुळे रॉकेलची टाकी गंजून गेली आहे.

कामगारांनीही फिरवली पाठ

कामगार वसाहतीमध्ये वीज, पाणी व इतर मुलभूत सुविधा नाहीत. घरांची पडझड झाली आहे. कारखाना सुरु होईल या आशेवर बसलेले अनेक कामगार हळू-हळू वसाहत सोडून गेले आहेत. त्यामुळे कामगार वसाहत ओस पडली आहे. कामगारांच्या अवलंबून असलेले तेथील छोटे व्यावसायिकही सोडून गेले आहेत. त्यामुळे कामगार वसाहतीला अवकळा प्राप्त झाली आहे. काही कामगार वसाहत सोडून हलकर्णी गावामध्ये रहायला गेले आहेत. चार वर्षापूर्वी रुबाबात रहाणाऱ्या कामगाराकडे बघण्याचा दृष्ट‌िकोन बदलला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा नोकरभरतीचा पुन्हा डाव

$
0
0

कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याबाबत नेत्यांकडून संचालकांना सूचना

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर ः कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये बेकायदेशीर नोकरभरती केल्यामुळे प्रशासकांनी संबंधित ३७ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला खरा. मात्र, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा समितीमध्ये सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठ नेतमंडळींकडून संचालकांना तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. ज्या कारणामुळे समितीवर प्रशासकांची नियुक्ती झाली, त्याचीच पुनरावृत्ती समितीत होत असल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याची चर्चा दबक्या आवाजात समिती परिसरात सुरू आहे.

राष्ट्रवादी, जनसुराज्य व शेकापने समितीवर वर्चस्व मिळवल्यानंतर २०११ मध्ये १८ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा ठराव केला होता. प्रत्यक्षात मात्र कामावर घेतले नव्हते. त्यानंतर २०१२ मध्ये ४१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्यामध्ये कोणाला किती जागा द्यायच्या यावरून अंतर्गत कलह निर्माण झाल्यावर यापैकी चार कर्मचाऱ्यांना कमी केले होते. मात्र, संपूर्ण नोकरभरती बेकायदेशीर असल्याने पणन संचालकांकडे याविरोधात तक्रार दाखल केली होती.

पणन संचालकांनी तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेशचे आदेश दिले होते. जिल्हा उपनिबंधकांनी नोकरभरती प्रकरणाची चौकशी करण्यासाठी २०१३ मध्ये करवीरचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांची नियुक्ती केली होती. मालगावे यांनी आदेशाप्रमाणे १८ कर्मचारी भरतीची चौकशी करून भरती बेकायदेशीर असल्याचा अहवालही जिल्हा उपनिबंधक व पणनसंचालकांना दिला होता. समितीवर प्रशासक नियुक्ती करण्यामागे भूखंड विक्रीबरोबरच बेकायदेशीर नोकरभरतीही प्रमुख कारण होते. सप्टेंबर २०१३ मध्ये प्रशासक नियुक्ती झाल्यानंतर ३७ कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रशासकांच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीनंतर उच्च न्यायालयातील दावा मागे घेऊन कर्मचाऱ्यांच्यावतीने तडजोडीचा प्रयत्न केला. तसेच पुन्हा कनिष्ठ न्यायालयात कर्मचाऱ्यांनी दावा दाखल केला.

सध्या नोकरभरती प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पुन्हा या कर्मचाऱ्यांना भरती करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नेत्यांकडून असे आदेश आल्याने संचालकांमध्ये खळबळ माजली आहे. समितीमध्ये केलेल्या गैरकारभारामुळे प्रशासक नियुक्ती झाली होती. पुन्हा असा कारभार केल्यास बदनामीला सामोरे जावे लागल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नोकरभरतीबाबत काळेबेरे

संचालकांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी प्रदीप मालगावे यांची लवाद म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी आपला अहवाल जिल्हा उपनिबंधकांना नुकताच सादर केला आहे. मात्र, या अहवालामध्ये नोकरभरती प्रश्नाचा उल्लेख केलेला नाही. यामुळे शिरापूरकर यांनी कोणकोणत्या मुद्द्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले होते, यामध्ये नोकरभरतीचा मुद्दा होता किंवा नाही हे गुलदस्त्यात राहिले आहे. मात्र, कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा घेण्याचा डाव आखला जात असल्याने यामागचे काळेबेरे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचारी उद्यापासून संपावर

$
0
0

अन्य कर्मचाऱ्यांनाही सहभागी होण्याचे इंटकचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा २०१२-२०१६ हा करार रद्द करून २५ टक्के पगारवाढ मिळावी यासाठी गुरुवार (ता. १७) पासून राज्यातील एस. टी. कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. केवळ मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संघटना न पाहता संपामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आहे. राज्यभरातून ६५ हजार कर्मचारी संपात सहभागी होतील. कोल्हापूर ​जिल्ह्यात ५२०० एसटी कर्मचाऱ्यांपैकी १२०० कर्मचारी इंटक संघटनेशी संलग्न आहेत.

इंटकच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनामध्ये संघटना न पाहता झालेले आर्थिक नुकसान पाहावे असे आवाहन केले आहे. मान्यताप्राप्त संघटनेच्या भूमिकेमुळे पगारवाढीच्या करारामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. देशभरातील इतर एसटी महामंडळे व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा महाराष्ट्र एस. टी. कर्मचाऱ्यांचे कमी पगार आहेत, असे इंटकने जाहीर केले आहे. त्यामुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले असून २५ टक्के पगारवाढ मिळवण्यासाठी कर्मचारी आग्रही आहेत.

त्यासाठी ६५ हजार कर्मचाऱ्यांनी औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार जुना करार रद्द करून पगारवाढ देण्यात यावी यासाठी अर्ज केला आहे. ते महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, प्रधान सचिवांना दिले आहेत. पगारवाढीबरोबर २०१२ पर्यंत ज्या ​कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी निश्चित करावी, रोटेशनची अंमलबजावणी करावी, संगणकीकृत रजा व्यवस्थापन लागू करावे, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मिळणाऱ्या सुविधा, सवलती देण्यात याव्यात, ठरलेल्या वेळेत काम द्यावे अशाही मागण्या केल्या आहेत. मागण्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच असल्याने सर्वांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन इंटकचे विभागीय सचिव आप्पासाहेब साळोखे, अध्यक्ष आनंदा दोपारे, बंडोपंत वाडकर, यांनी केले आहे.

वेळापत्रक बिघडणार

कोल्हापूरः इंटक संघटनेचे १२०० कर्मचारी संपामध्ये उतरणार आहेत. त्यांच्या आवाहनानुसार मागण्यांसाठी अन्य संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले तर जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त चालक व वाहकच असल्याने फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी प्रवाशांना तिष्ठत बसावे लागू शकते.

जिल्ह्यात ५२०० एसटी कर्मचारी आहेत. बारा तालुक्यांत बारा डेपो आहेत. इंटक संघटनेचे कर्मचारी विविध डेपोमध्येही आहेत. आमदार जयप्रकाश छाजेड यांनी कर्मचाऱ्यांना इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी यासाठी आंदोलन छेडले आहे. इंटक संघटनेबरोबरच इतर संघटनांच्या कर्मचाऱ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन आहे. राज्यभरातून ६५ हजार कर्मचाऱ्यांनी २५ टक्के पगारवाढ करण्यात यावी असे अर्ज केले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची संपाची मानसिकता दिसून येत असल्याचे इंटकचे मत आहे. त्यामुळे इंटकने इतर संघटनेच्या कर्मचाऱ्यांनाही संपात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यात इंटकचे १२०० कर्मचारी आहेत. त्यांच्यासोबत अन्य संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले तर एसटीच्या वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. चालक व वाहकांची संख्या संघटनेमध्ये जास्त असल्याने बसच्या फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. फेऱ्या कमी झाल्या तर आपोआपच गर्दी होऊ शकते. तसेच प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलन कराल तर ठेवींना मुकाल

$
0
0

एजंटांकडून गुंतवणूकदारांना धमकी

satish.ghatage@timesgroup.com

पर्ल्स अॅग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीएल) कंपनीचे गुंतवणूकदार अगोदरच ठेवी मिळत नसल्याने अस्वस्थ असतानाच आंदोलनाचा प्रयत्न कराल, तर सर्व पैसे बुडतील, अशी धमकीच एजंटांकडून मिळत असल्याची चर्चा गुंतवणूकदारांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. कोर्टाची अथवा आंदोलनाची धमकी देणाऱ्या गुंतवणूकदारांना थोडी रक्कम देऊन गप्प बसवले जात आहे.

सेबीने (भांडवल बाजार नियंत्रण सेक्युरिटीज अॅड एक्स्चेंज बोर्ड) पर्ल्समधील फसवणूक लक्षात घेऊन गतवर्षी आर्थिक व्यवहार बंद केले आहे. दामदुप्पट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पर्ल्सवर सेबीने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पर्ल्समध्ये देशभरातील पाच ते सहा कोटी गुंतवणूकदार आहेत. सेबीकडून परवाना न घेताच सामूहिक गुंतवणूक योजना राबवून पर्ल्सने तब्बल ४९ हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून जमा केले आहेत. या गुंतवणुकीच्या बदल्यात जमीन देण्याचे वचन देऊन गुंतवणूकदारांना फसवल्याची बाब पुढे आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५५ हजार गुंतवणूकदारांनी शेकडो कोटींची गुंतवणूक केली आहे. मुदत पूर्ण झालेल्या ठेवींची रक्कम ६०० कोटी इतकी आहे.

पर्ल्सकडून गेल्या दीड वर्षात पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार होत होती. पर्ल्सच्या फसवणुकीविरोधात गतवर्षी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना ग्राहक संघटना जिल्हाप्रमुख कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांनी स्टेशन रोडवरील पर्ल्सच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. ठेवी परत न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. सेनेच्या आंदोलनानंतर सांगली व मिरजेतील अधिकारी पाठवून ठेवी परत दिल्या जातील असे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांनी आक्रमक धोरण स्वीकारल्यावर सेनेच्या जगदाळे व जाधव यांना पुण्यातील अधिकाऱ्यांनी धमकी दिली. दोघांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धमकीबद्दल तक्रार दिली आहे. तसेच पोलिस अधीक्षकांना निवेदनही दिले होते.

सेनेचे आंदोलन आक्रमक झाल्यावर एजंट व सबएजंटांनी गुंतवणूकदारांना धमकावण्यास सुरुवात केली. आंदोलन केल्यावर तुमचे पैसे परत मिळणार नाहीत. कार्यालय बंद झाल्यावर तुम्हाला दिल्ली, मुंबईला जावे लागेल. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास गुन्हा दाखल होईल. कोर्टात प्रकरण जाईल. त्यामुळे पैसेच मिळणार नाहीत, अशी भीतीही दाखवण्यात आली. त्यामुळे पर्ल्सचे गुंतवणूकदार एकत्र येण्याची प्रक्रिया थंडावली व आंदोलनाची तीव्रताही कमी झाली. जे गुंतवणूकदार कोर्टात गेले त्यांना थोडी रक्कम देऊन कोर्टातून केसेस मागे घेण्यास भाग पाडले. कंपनीच्या 'फूट डालो' रणनीती अवलंबली आहे. पण देशभरातील पर्ल्सचे गुंतवणूक एकत्रित येऊ लागल्याने सेबीकडून कारवाईचा फास आवळू लागला आहे.

'सेबी'कडून पर्ल्सच्या मालमत्तेवर टाच

कोट्यवधी गुंतवणूकधारकांना फसवणाऱ्या पर्ल्सच्या कंपनीच्या सर्व प्रवर्तक, संचालक यांच्या मालमत्तांवर सेबीकडून टाच आणली आहे. सेबीने सोमवारी याबाबत निवेदन प्रसिध्द केले आहे. सेबीने केलेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारांना रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यापूर्वी सेबीने पर्ल्सला फसव्या योजनेखाली पैसे गोळा केल्याबद्दल ७२६९ कोटी रुपये दंड भरण्यास सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत घरफाळा ३८ कोटींवर

$
0
0

कारवाईचा बडगा उगारण्यात महापालिका प्रशासन कुचकामी

Appasaheb.mali@timesgroup.com

वारंवार सूचना देऊनही मिळकतधारकांनी घरफाळा भरण्यासाठी केलेली टाळाटाळ, बड्या थकबाकीधारकांच्या थकीत रकमेवर आकारल्या जाणाऱ्या दंडाची वाढत जाणारी रक्कम, काही मिळकतधारक आणि महापालिका प्रशासनातील कायदेशीर लढाई आणि शैक्षणिक संस्थांतील घरफाळासंबंधी जनरल टॅक्सप्रश्नी महापालिका आणि संस्था यांच्यामध्ये नसलेला समन्वय यामुळे थकीत घरफाळ्याचा आकडा ३८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्यात कुचकामी ठरल्याने थकीत रक्कम वसुलीस विलंब लागत असल्याचे ताशेरेच राज्य लेखा परीक्षण विभागाने ओढले आहेत. शहरातील नामांकित बँका, शैक्षणिक संस्था, बिल्डर्स, व्यापारी, उद्योजक, इन्शुरन्स कंपन्या थकबाकीदारांच्या यादीमध्ये आहेत.

२०१२-१३ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणातून ३८ हजार ३५० थकबाकीधारकांकडे मिळून ३८,८२,०८,७३४ इतकी रक्कम थकीत असल्याचे सामोरे आले आहे. शहरातील ५०३ थकबाकीधारकांनी वर्षानुवर्षे घरफाळ्याचा भरणा केला नाही. एक लाखापेक्षा जास्त घरफाळा त्यांच्या नावावर आहे. संबंधितांकडे १५,८९,७०,३२३ रुपये घरफाळा थकीत आहे. वारंवार सूचना, नोटिसा पाठवूनही त्यांनी महापालिकेच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. या थकबाकीधारकांकडून संबंधित रक्कम तत्काळ वसूल करावी. प्रत्येक वर्षी थकबाकीत वाढ होत आहे. वसुलीअभावी शहरातील विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. थकीत खातेदारांच्या थकबाकीबाबत महापालिका मुख्य लेखापरीक्षकांकडून तपासणी करून थकबाकी वसूल करण्याच्या सूचना आहेत.

लेखापरीक्षणादरम्यान ओढलेले ताशेरे

महापालिका अधिनियम तरतुदीनुसार थकीत रकमेची वसुली करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही केली नाही, असे ताशेरे ही राज्य लेखा परीक्षण विभागाने ओढले आहेत. आधुनिक काळात कर हे केवळ उत्पन्नाचे माध्यम नसून ते आर्थिक विकासाच्या संदर्भातील आ​र्थिक हत्यार म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या कर निर्धारण संकलन व एचसीएल कंपनीत (संगणक प्रणाली विभाग) समन्वय नाही. कर विभागाकडे मागणी, वसुली व थकबाकीबाबत पुरेसे कागदपत्रे नाहीत. कराची थकीत रक्कम वसूल करण्याच्या दृष्टीने महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे.

जनरल टॅक्सच्या सवलतीचा मुद्दा

शहरातील शैक्षणिक संस्था, बोर्डिंग्ज, शाळांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे या संस्थांनी घरफाळा भरला नाही. शैक्षणिक संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे असून, सार्वजनिक उपक्रमासाठी या संस्था कार्यरत आहेत. यामुळे जनरल टॅक्स वगळावा अशी या संस्थांची मागणी आहे. २०१० मध्ये जिल्हा कोर्टाने जनरल टॅक्स वगळून सुधारित बिले देण्याचा निर्णय दिला होता. मात्र, त्यानंतर शैक्षणिक संस्था आणि महापालिका एकत्र येऊन जनरल टॅक्स वगळून उर्वरित थकीत रक्कम भरण्यासंदर्भात कार्यवाही झाली नाही. यामुळे दरवर्षी या संस्थेच्या घरफाळाच्या रक्कमेत भर पडत आहे.

लता मंगेशकरही थकबाकीदार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नावही घरफाळा थकबाकीदारांच्या यादीत आहे. मंगेशकर यांच्या मालकीचा जयप्रभा स्टुडिओ आहे. त्यांनी २००७ पासून घरफाळा भरलेला नाही. घरफाळ्याची मूळ रक्कम ४ लाख ५४ हजार ८७८ रुपये असून त्यावर ३ लाख ७२ हजार ५१२ रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेकडे उपलब्ध माहितीनुसार त्यांच्याकडे ७ लाख ७३ हजार ३७२ रुपये घरफाळा थकीत असल्याचे विभागाचे म्हणणे आहे.

वसुलीसाठी सध्या सुनावणी सुरू आहेत. काही मिळकतधारकांच्या घरफाळाप्रकरणी वाढीव बिलांच्या तक्रारी आहेत. सुनावणीदरम्यान खातरजमा केली जात आहे. सुनावणीत तोडगा काढण्यावर भर आहे. जादा नोंद झाल्याचे निष्पण्ण झाल्यास नियमानुसार कमी केले जाईल.'

-ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथे घडत होता सिनेमा..!

$
0
0

Anuradha.Kadam@timesgroup.com

'जयप्रभा स्टुडिओ' हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्याचा राज्य सरकार व महापालिकेचा निर्णय मुंबई हायकोर्टाने वैध ठरवित निर्णयाला आव्हान देणारी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची याचिका फेटाळून लावली. मंगळवारी स्टुडिओच्या परिसरात फेरफटका मारल्यावर हिरवाईने नटलेली वृक्षसंपदा झुडपे बनल्याचे दिसले. ऐटबाज वाड्यांची रया गेली आहे. ​जिथे पडद्यावरचे गजबजलेले गाव वसायचे, त्या परिसरात नीरव, भयाण शांतता पहायला मिळाली.

मराठी सिनेमाच्या निर्मितीचा मान​बिंदू आ​णि चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या सहवासाचे स्मृतिस्थान असलेल्या जयप्रभा स्टुडिओची वास्तू आर्थिक व्यवहारातून जमीनदोस्त होऊ नये यासाठी गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहो. जागेच्या मालक, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि कोल्हापूर महापालिका यांच्या न्यायालयीन लढ्याबरोबरच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कोल्हापुरातील कलावंतांनी जयप्रभा वाचविण्यासाठी आवाज उठवला.

या लढ्याला यश आले आणि जयप्रभा स्टुडिओची वास्तू राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीत समाविष्ट झाली. मात्र, एकेकाळी मराठी सिनेमाच्या वर्तुळात मानाचे पान असलेला हा स्टुडिओचा परिसर आजच्या घडीला ओसाड आणि भकास आहे. मंगळवारी स्टुडिओच्या परिसरात फेरफटका मारल्यावर हिरवाईने नटलेली वृक्षसंपदा झुडपे बनल्याचे दिसले. ऐटबाज वाड्यांची रया गेली आहे. ​जिथे पडद्यावरचे गजबजलेले गाव वसायचे, त्या परिसरात नीरव, भयाण शांतता पहायला मिळाली. भटक्या कुत्र्यांच्या आवाज त्यात भर घालतो.

सिनेमासाठी प्रॉपर्टी म्हणून वापरल्या जाणाऱ्या सामानाची उचलबांगडी झाल्यामुळे कुलूपबंद वैभव अंगावर अक्षरश: शहारे आणते. चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती केली. त्यांचे स्टुडिओच्या रुपातील हे स्मृतिस्थळ आज ओसाड आणि भकासपणे उभे आहे. त्यांनी आपले स्वप्नसंचित गायिका लता मंगेशकर यांच्याकडे सोपवले, ते सिनेमाच्या निर्मितीचा वारसा जपला जावा म्हणून. मात्र, मंगेशकर यांनी तीन वर्षांपूर्वी हा स्टुडिओ विकण्यासाठी आर्थिक व्यवहार केले. त्याला न्यायालयाने आक्षेप घेतल्याने आता जयप्रभा स्टुडिओ संरक्षित स्मारकांच्या यादीत आला आहे. त्यामुळे भालजींच्या आवाजातील लाइट... अॅक्शन... कॅमेरा ही आरोळी नव्याने घुमण्याच्या आशेला पालवी फुटली आहे.

पाटलाच्या वाड्याचे वैभव झाकोळले

मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळात ग्रामीण बाजाच्या सिनेमांनी मराठी रसिकांवर गारूड केले होते. गावाकडची कथा पडद्यावर सशक्तपणे मांडताना पाटलाचा वाडा हमखास पडद्यावर दिसायचा. स्टुडिओच्या आवारातील ही वास्तू कधी पाटलाचा तर कधी गावातल्या धनिकाचा वाडा म्हणून नेहमीच दिसायची. पडद्यावरच्या कथेला वैभवाची फ्रेम देणारा हा स्टुडिओतील वाडा मात्र असा एकाकी उभा आहे. झाडांच्या वाढलेल्या सुकलेल्या फांद्यांनी या वास्तूला तर विळखा घातला आहेच; पण या भकासपणाने स्टुडिओच्या भव्यतेलाही झाडा झुडपांनी झाकोळून टाकले आहे. ना रंगरंगोटी ना देखभाल अशा अवस्थेत ही वास्तू गेल्या पाच वर्षांपासून पडून आहे.

पानगळीत हरवली वास्तू

स्टुडिओच्या आवारातील प्रत्येक वास्तू, कोणत्या ना कोणत्या संदर्भाने मराठी सिनेमाच्या पडद्यावर दिसली आहे. मात्र, ही स्मृती आजघडीला कोसळली आहे. तीन वर्षात जयप्रभाच्या आवारातील एकाही वास्तूची देखभाल न झाल्यामुळे अशी अवस्था झाली आहे. भालजी पेंढारकर यांच्या सहवासाने फुललेली ही वास्तू आज अशी पानगळीत हरवली आहे.

कुलूपात अडकले वैभव

​जिथे गाव उभं राहिलं, पडद्यावरच्या सभागृहाचा सेट लागला, राजदरबार आकाराला आले त्या कक्षाचे वैभव कुलूपात बंद झाले आहे. सिनेमाची एकेक फ्रेम जिथे दृश्य रुपात कॅमेऱ्यात बंद व्हायची त्या दालनाची अवकळा कलावंताच्या डोळ्यात पाणी आणल्याखेरीज राहणार नाही. या कक्षात जाण्यासाठीच्या वाटेवरही मधल्याकाळाने आपल्या खुणा पेरल्या आहेत. अशी अवस्था इथल्या प्रत्येक वास्तूची आहे.

परिसराला झुडपांचा विळखा

स्टुडिओच्या आवारातील वास्तूंवरचे पत्रे दोन वर्षांपूर्वी काढून नेण्यात आले. स्टुडिओच्या विक्रीने कलावंतांप्रमाणे इथल्या वास्तूंच्या पायाखालची जमीन तर सरकलीच, पण छतही काढले गेले. आता सभोवताली झाडेझुडपेच आहेत. 'जयप्रभा'ची सावलीप्रमाणे सोबत करणाऱ्या या झाडांनी दोन वर्षातील उन्हाच्या झळा सहन केल्या आहेत. ही झाडे आता वठली आहेत. भव्य वास्तू मात्र झुडपांच्या विळख्यांमध्ये गुदमरली आहेत.

उरल्या फक्त निर्जीव ​​भिंती

स्टुडियोच्या आवारात आता फक्त निर्जीव भिंती दिसतात. आवारातील ज्या वास्तूंनी एकेकाळी पडद्यावरच्या कथा बोलक्या केल्या, त्या भिंती निःशब्द आहेत. येथील पार, झाडे भकास झाली आहेत. भिंतीला गेलेले तडे आ​णि हरवलेल्या सौंदर्यामुळे परिसराला अक्षरशः अवकळा आली आहे.

अडगळ पाहवेना

सिनेमा निर्मितीच्या साहित्याला स्टुडिओच्या कानाकोपऱ्याने खूप मोलाने जपले. विशेषत: ऐतिहासिक सिनेमांचा बाज सांभाळताना मोठे खांब, सिंहासने, राजदरबारातील बैठका असा ऐवज स्टुडिओच्या खास दालनात जपून ठेवला जायचा. आजही ती जागा स्टुडिओच्या आवारात आहे. मात्र, तिचे रूप बदलले आहे. मोठे चौरंग, राजदरबार उभारणीचे साहित्य अडगळीप्रमाणे कोपऱ्यात पडले आहे. लाकडी सामानाची अवस्था अडगळीची झाली आहे. ना तिला डागडुजी आहे ना तेलपाणी. गेल्या काही वर्षांत स्टुडिओच्या आवारातील गजबज जशी थंडावली तशी या साहित्याचीही किंमत उरली नाही, त्याचे हे दर्शन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेंची मुख्यमंत्र्यांसोबत खलबते

$
0
0

दोन्ही काँग्रेसची सहल रवाना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीत निर्णायक मते असलेल्या जनसुराज्य शक्तीची मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांना माजी मंत्री विनय कोरे यांनी मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना चर्चेला नागपूरला बोलवले आहे. दरम्यान, आमदार महाडिक यांनी मंगळवारी इचलकरंजीत आवाडे पितापुत्रांशी तर सतेज पाटील यांनी प्रा. जयंत पाटील यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या.

विधानपरिषद निवडणुकीत जनसुराज्यकडे ३४ मते आहेत. ती निर्णायक असल्याने महाडिक व सतेज पाटील यांनी अनेकदा कोरे यांची भेट घेत त्यांची मदत ​मागितली. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वारणेत जाऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. विधानपरिषदेत दोन्ही काँग्रेसचे बहुमत आहे. त्यामुळे महायुती सरकारला अनेक निर्णय घेता येत नाहीत. यासाठी विधानपरिषदेत जागा वाढवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. याचाच एक भाग म्हणून महाडिक यांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरे यांना भाजपने काही ऑफर दिली आहे. त्यांना चर्चेसाठी तातडीने मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बोलवले. त्यानुसार दुपारी विमानाने कोरे नागपूरला रवाना झाले. भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी मदत करण्यावर यावेळी चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, खासगी कामासाठी नागपूरला आल्याचा खुलासा कोरे यांनी

केला. महाडिक यांनी मंगळवारी पुन्हा इचलकरंजीत आवाडे पितापुत्रांची भेट घेतली. आवाडे यांच्याकडे तीसहून अधिक मते असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. त्यानंतर त्यांनी राधानगरीत काही नेते व मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सतेज यांनी सकाळी प्रा. जयंत पाटील यांची भेट घेत मदतीची विनंती केली. विनय कोरे यांचा जो निर्णय होईल, त्याप्रमाणे भूमिका राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

दोन्ही काँग्रेसची सहल रवाना

मतदारांना विरोधकांचा संपर्क होऊ नये यासाठी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांना मंगळवारी सहलीला पाठवण्यात आले. ही सहल नेमकी कुठे जाणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. सहलीतील प्रत्येक मतदारांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी काही कारभारी लोकांची फौजच सोबत ठेवण्यात आली आहे. काही मतदारांना परदेशात सहलीवर पाठवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाईग्रस्त गावच नसल्याचा जावईशोध

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

जिल्हा प्रशासनाने अंतिम पीक आणेवारी जाहीर केली असून, त्यात जिल्ह्यातील एकही गाव टंचाईग्रस्त नसल्याचा जावईशोध लावला आहे. सर्वच गावांतील पीक स्थिती टंचाईच्या निकषांमध्ये बसत नसल्याने जिल्ह्यातील पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पीक आणेवारीच्या पद्धतीवर आक्षेप घेतला असून, याबाबत रिसतर तक्रारी नोंदवण्यात येणार आहेत.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक गावांत पीकस्थिती स्थिती समाधानकारक नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी २५ टक्क्यांच्या आसपास असल्याने पिकांचे नुकसान झाल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

शासन दरबारी मात्र कमी पावसाचा काहीच परिणाम झालेला नाही, उलट जिल्ह्यात पिकांची स्थिती अलबेल असल्याचेच महसूल विभागाचे आणेवारीचे अहवाल सांगतात. पहिली पीक आणेवारी १५ सप्टेंबरला झाली, तर दुसरी ३१ ऑक्टोबरला झाली आहे. या दोन्ही आणेवारींत एकाही गावात पीक नुकसान पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याचे निष्कर्ष नोंदवले आहेत. अंतिम पीक आणेवारी मंगळवारी (ता. १५) झाली असून, यातही पिकांचे नुकसान पन्नास टक्क्यांच्या आतच असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आणेवारीवर तक्रारी असलेल्या गावांमध्येही फारसा फरक पडलेला नाही.

जिल्हा प्रशासनाने अंतिम आणेवारी झाल्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र शेतात आणेवारीचे काम झालेच नसल्याचे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनीही नव्याने तक्रारी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही अंतिम पीक आणेवारीची गंभीर दखल घेतली असून, यावर तक्रारी दाखल केल्या जाणार आहेत. पीक आणेवारीच्या प्रचलित पद्धतीवरच शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला असून, आणेवारीच्या पद्धतीत सुधारणेची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अंतिम आणेवारीतही एकही गाव चंटाईग्रस्त नसल्याने आणेवारीच्या कामाबाबत शंका वाढल्या आहेत.

शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यात एकाही गावातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. ज्या गावांनी तक्रारी केल्या आहेत, तिथे पुन्हा पीक पाहणी केली जाईल. शंका असतील तर तक्रारी कराव्यात.'

- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

'महसूल विभागाने शेतात जाऊन पीक पाहणी केलेली नाही. पावसाचे प्रमाण निम्म्यावर आहे, तरीही सरकारी अधिकाऱ्यांना टंचाई दिसत नाही हे गंभीर आहे. आम्ही सुधारित आणेवारी करण्याची मागणी करणार आहे.'

- भगवान काटे, जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

एकूण गावे : १२३३

पीक पाहणी केलेल्या गावांची संख्या : १२१२

५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी : ०

पहिली आणेवारी : १५ सप्टेंबर

दुसरी आणेवारी : ३१ ऑक्टोबर

अंतिम आणेवारी : १५ डिसेंबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-कोकण रेल्वे कनेक्ट कधी?

$
0
0

Raviraj.Gaikwad

@timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक, पर्यटन विकासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जोर कधी लागणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 'कराड-चिपळूण' या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पाच्या भूमिपूजनाची प्रक्रिया सुरू झाली असताना कोल्हापूर ते वैभववाडी हा प्रस्तावित रेल्वे मार्ग मात्र अजूनही कागदावरच राहिला आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी असलेल्या या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आता जोर लावण्याची गरज आहे. 'कोल्हापूर-कोकण' रेल्वे कनेक्टबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता आहे.

कराड-चिपळूण रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, रेल्वेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात त्याला मंजुरीही देण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प वेगाने पुढे सरकत असताना, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाची मात्र पुढील कोणतीही घोषणा झाली नाही. कराड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनाच्या हालचाली सुरू आहेत. या मार्गाच्या कामाचे भूमिपूजन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चिपळूणला असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीस रेल्वेच्या सूत्रांकडून दुजोरा मिळाला नसला तरी कोल्हापूर-कोकण रेल्वेबाबत कोल्हापुरात सर्वच आघाड्यांवर सामसूम आहे.

कराड-चिपळूण या सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला रेल्वे अंदाजपत्रकात मंजुरी दिली होती. या मार्गाचा कराड ते चिपळूण मार्गाचा निम्मा खर्च उचलण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात राज्य सरकारने हा निर्णय घेतला. यासंदर्भात कोकण रेल्वे मंडळाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला बजेटपूर्वी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली.

कोल्हापूरच्या प्रकल्पावर कोणताही परिणाम नाही

कोल्हापूर : 'कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचा कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित मार्गावर कोणताही परिणाम होणार नाही', असे खासदार धनंजय महाडिक यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना स्पष्ट केले. खासदार महाडिक म्हणाले, 'कराड-चिपळूणचा प्रस्ताव पूर्वीच मंजूर झाला आहे. त्याच्या खर्चाची काही जबाबदारी राज्य सरकारने उचलण्याची तयारी दर्शविली आहे. त्याची सगळी प्रेझेंटेशन्स झाली आहेत. त्यावेळी खासदार राजू शेट्टी हेदेखील उपस्थित होते. या मार्गासाठी जिंदाल पोर्टनेसुद्धा काही गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्ड आणि मंत्रालयाकडूनही लवकर मंजुरी मिळेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनातच प्राथमिक तरतूद व्हावी, यासाठी पाठपुराव करू.'

हवी राजकीय इच्छाशक्ती

कोल्हापूरला कोकण रेल्वेशी जोडण्यासंदर्भात प्रारंभिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल तयार केला असून, तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी निकम यांनी दिली. हा प्रकल्प मंजूर करून घेऊन पुढील कार्यवाहीसाठी राजकीय दबाव गरजेचा आहे. त्यासाठी मात्र नेत्यांकडून आग्रह धरण्याची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या शहरासाठीचा प्रकल्प मार्गी लावून घेतला. मात्र, तशी इच्छाशक्ती आता कोल्हापूरच्या नेत्यांनी दाखविण्याची गरज आहे.


कराड-चिपळूण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण होऊन त्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. त्याला गेल्या अर्थसंकल्पात मंजुरीही मिळाली आहे. मात्र, या कामासाठीचा कंत्राटदार अद्याप निश्चित झालेला नाही.

- बाळासाहेब निकम, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे


कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारीदृष्ट्या मोक्याचे ठिकाण आहे. चिपळूण-कराड रेल्वेमार्ग झाल्यास हा मार्ग पूर्वभागाला जोडण्यासाठी पुन्हा पुणे किंवा मिरजेला जावे लागेल. कराड-चिपळूण काम सुरू झाले, तर कोल्हापूरचा प्रकल्प गुंडाळला जाण्याची भीती आहे.

- कृष्णराव सोळंकी, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगाव-मंगळुरू रो-रो सेवा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोकण रेल्वेने पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूकदारांसाठी माल भरलेले ट्रक वाहून नेणारी रो-रो रेल्वे सेवा सुरू केली आहे. गुरुवारपासून (ता. १७ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथून मंगळुरूपर्यंत ही सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी असोसिएशनने पत्रकाद्वारे ही माहिती दिली. असोसिएशनच्या कार्यालयात कोकण रेल्वे कार्पोरेशनचे अधिकारी विनयकुमार, बी. बी. निकम, रघुराम शेट्टी यांनी माहिती दिली.

यापूर्वी पनवेल जवळील कोलाड येथून मंगळुरू पर्यंत ही सेवा सुरू होती. मात्र, या रेल्वेला तळ कोकणात कोठेही स्टॉप नव्हता. कोलाडयेथेच ही रेल्वे भरलेली असायची त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील वाहतूकदारांना याचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे कोकणातील एखाद्या स्थानकातून ही सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. उद्यापासून नांदगाव ते मंगळुरू सेवा सुरू होत आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, जयसिंगपूर, इचलकरंजी येथील वाहतूकदारांना होणार आहे.

नांदगाव ते मंगळुरू हे ४५० किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी रो-रो रेल्वेने १२ तास लागणार आहेत. मंगळुरू आणि केरळमध्ये मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना, उद्योजक, व्यापाऱ्यांना या सेवेचा फायदा होणार आहे. वाहतूकदारांना भाड्यावर ४.३५ टक्के सेवा कर लागू होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, बाबला फर्नांडीस, शिवाजी चौगुले, विलास पाटील, दिनकर पाटील, बाळासाहेब पाटील, गोविंद पाटील, उमेश महाडिक, मारुती चौगुले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेमुळे समित्यांच्या निवडी रखडल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरुवारी होणाऱ्या नव्या सभागृहाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेवर विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे आणि नगरसेवकांच्या सहलीचे सावट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुसंख्य सदस्य बुधवारी सहलीवर गेले. मात्र विरोधी भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीचे नगरसेवक सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोरमसाठी आवश्यक २७ सदस्य संख्या पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. महापौर अश्विनी रामाणे यांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच सभा आहे.

विधानपरिषदेच्या आचारसंहितेमुळे सभेत धोरणात्मक बाबीवर चर्चा होणार नाही. केवळ प्रश्नोत्तरापुरताच सभा मर्यादित राहणार आहे. नव्या सभागृहात काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. विरोधी भाजप, ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक आहेत. विधानपरिषदेसाठी माजी मंत्री सतेज पाटील आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्यात लढत होत आहे. त्यासाठी नगरसेवकांची मते ही निर्णायक ठरणार असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बुधवारी सहलीवर पाठविण्यात आले. भाजप, ताराराणी आघाडीचे सदस्यही २२ तारखेला सहलीवर जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी होणारी सभा ही तहकूब सभा आहे.

सदस्य निवडी पुढील महिन्यात

स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला व बालकल्याण समिती सदस्याच्या निवडीही आचारसंहितेमुळे लांबणीवर पडल्या आहेत. साधारणपणे २० जानेवारीपर्यंत महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार असून त्यामध्ये सदस्य निवडी होतील. त्यावेळीच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या होतील. सदस्य निवडीनंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी, परिवहन आणि महिला बालकल्याणसाठी सभापती, उपसभापतीच्या निवडी होतील. पाचही ​पक्षांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे स्वतंत्र आघाड्यांची नोंद केली आहे. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाने अद्याप त्यासंदर्भात माहिती कळविलेली नाही.

अंदाजपत्रकानुसार विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. पण प्रशासनाकडे अद्याप निधी उपलब्ध नाही. नगरसेवकांचा ऐच्छिक निधीही उपलब्ध नसल्याने या निधीतील कामे रखडल्याची तक्रार नगरसेवक राजाराम गायकवाड यांनी केली. आचारसंहितेपूर्वी ज्या कामांची वर्कऑर्डर काढली होती, त्यामधून रस्ते डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. आचारसंहितेमुळे आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत फारसे काही होणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पापाची तिकटी परिसरात वाहतुकीचे तीन-तेरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील प्रत्येक रस्त्याची समस्या असलेला पार्किंगचा मुद्दा पापाची तिकटी परिसरासाठी अपवाद नाही. दुचाकीपासून अवजड वाहनांची ये-जा असलेल्या या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र, येथील कोंडीतून मार्ग काढण्यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

पापाची तिकटी ते गंगावेश हा शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक. एसटी, केएमटीसह ट्रक, टेम्पो, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या छोट्या, मोठ्या गाड्या अशा सर्वच प्रकारच्या वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. यात सकाळी दहा ते साडे अकरा आणि सायंकाळी सहा ते साडे सात या काळात येथील वाहतूक कोंडी रोखणे कोणालाच शक्य होत नाही. अनेकवेळा परिसरातील व्यावसायिक रस्त्यावर येऊन कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करतात. वाहन चालकांमध्ये वादाचे प्रसंग देखील उद् भवतात. कधी कधी हातघाईचा प्रसंग येतो.

वाहतूक पोलिस केवळ सणासुदीच्या काळातच पापाची तिकटी परिसरात दिसतात, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. पापाची तिकटी येथे पाच मिनिटे जरी वाहतूक कोंडी झाली, तरी एका बाजूला शिवाजी चौकापर्यंत, तर दुसऱ्या बाजूला गंगावेशपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेकवेळा कोंडी फुटली, तरी पुन्हा पाच दहा मिनिटांत कोंडी होते, असे प्रसंग वारंवार होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्ताव्यस्त पार्किंग दिसते. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून, वाहने पुढे सरकण्यास अडथळे येतात. रस्त्यावर सम-विषय असा पार्किंगचा पर्याय सुरू करणे शक्य आहे. मात्र, त्याकडे कोणी लक्षच देत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images