Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सैन्य भरतीसाठी करा ऑनलाइन नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्रातील सहा आणि गोव्यातील दोन जिल्ह्यांमधील पात्र उमेदवारांसाठी ३ ते २० फेब्रुवारी २०१६ दरम्यान कोल्हापुरात सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १९ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच भरती प्रक्रियेत प्रवेश दिला जाणार आहे.

भारतीय सैन्य दलातील सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क/स्टोअरकिपर टेक्नीकल, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर ट्रेडसमन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १९ जानेवारी २०१६ पर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरलेल्या उमेदवारांना अॅडमिट कार्ड उमेदवारांच्या ई-मेल आयडीवर १९ जानेवारीनंतर पाठविले जाईल. कार्डवर नमूद केलेल्या दिवशी व वेळी रॅलीच्या ठिकाणी अॅडमिट कार्डच्या प्रिंटसह हजर राहणे आवश्यक आहे अशी माहिती सेना भरती कार्यालयाचे कर्नल राहुल वर्मा यांनी दिली. अधिक माहितीसाठी ०२३१-२६०५४९१, २६०६४१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी संघटनेने ऊसतोड थांबवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

उसाला एकरकमी एफआरपीनुसार दर देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मिरज तालुक्यात ऊसतोडी रोखल्या. तसेच, ऊस वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. एफआरपीनुसार दर न दिल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे यांनी सांगितले.

रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी मिरज तालुक्यात एफआरपीसाठी आंदोलन करण्यात आले. महादेव कोरे, तालुकाध्यक्ष आमगोंड पाटील, किरण पाटील आदींनी आंदोलनात भाग घेतला.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हैसाळ येथील एसटी स्टँड चौकात उसाची वाहतूक करणारी वाहने रोखली. आरग येथील मुख्य चौकात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळपर्यंत वाहने रोखून धरली होती. कार्यकर्त्यांनी एका गटाने म्हैसाळ व आरग परिसरातील शेतात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोडसाखर’चा निर्णय उद्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

कारखान्याने एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ एम.जी.पोवार यांनी शुक्रवारच्या पुणे येथे होणाऱ्या बैठकीनंतरच निर्णय जाहीर करू असे स्पष्ट केले.

मागील गळीत हंगाम १३३ दिवस चालला असून ३ लाख २६ हजार टन उस गळीतास आला. यावर्षी कारखान्याकडे एकूण सात लाख टनाची नोंद झाली असून साडेतीन ते चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. परिसरात हेमरस, नलवडे (चंदगड), संताजी घोरपडे (कापशी), शाहू, हमीदवाडा (कागल), आजरा व हिरा शुगर्स (संकेश्वर) कारखान्याच्या तोडीही सुरु आहेत. मंगळवारी स्वाभिमानीचे राज्यसचिव राजेंद्र गड्ड्याण्णावर यांनी सर्व कारखान्यांना आज रात्री बारा वाजेपर्यंत दर घोषित करण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. परिसरातील हेमरस, इकोकोन, नलवडे, गोडसाखर, आजरा व संताजी घोरपडे कारखान्यांनी आज रात्री पर्यंत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.

शेतकरी हवालदिल

संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळस्थिती पाहता उद्भवलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतात वाळणाऱ्या उसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. येथील गोडसाखरतर्फे प्राधान्यक्रम देऊन वाळलेला उस उचलण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता आंदोलन सुरू झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुढील हंगामात उसाला चांगला दर मिळेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमी पर्जन्यमानामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात उसाचा जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. यामुळे सुरू असलेल्या हंगामासह पुढील हंगामात उसाचे उत्पादनामध्ये घट होणार आहे. उसाच्या उत्पादनात घट झाल्यास साखरेचेही उत्पादन कमी होऊन दर वाढणार आहेत. साखर दरात वाढ होत जाणार असल्याने एफआरपी रकम देण्यास सुलभ होणार आहे. त्यामुळे सोन्याचे दिवस येणार आहेत, थोडा दम धरावा असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हंटले आहे, 'केंद्र सरकारने १४ टक्के साखर निर्यात करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे देशातंर्गत साखरेच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. दर असेच वाढत राहिल्यास आणि साखरेची उचल केल्यास चांगला दर मिळेल, असेही पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसतोड, वाहतूक रोखली

$
0
0

'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची शिरोळ, हातकणंगल्यात मोटारसायकल रॅली
हंगाम रोखण्याचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठरलेल्या ८०:२० टक्के फॉर्म्युल्याप्रमाणेच एफआरपीची रक्कम द्यावी, या मागणसाठी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन तीव्र केले. जयसिंगपूर येथे ऊस वाहतुकीच्या चार ट्रॅक्टर रोखल्या. याचबरोबर कार्यकर्त्यांनी शिरोळ, हातकणंगले तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून ऊस तोडी थांबविल्या. आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी १७०० रूपयांचा पहिला हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. तसेच अन्य काही कारखान्यांनी याचप्रमाणे पहिला हप्ता देण्यासाठी हालचाली सुरू ठेवल्या होत्या. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी जयसिंगपूर व कुरूंदवाड येथे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त व जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय शेती कार्यालयास टाळे ठोकले होते. यानंतर बुधवारी आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली.

शिरोळ तालुक्यात कोथळी, दानोळी, कवठेसार, उदगाव, नांदणी, चिंचवाड, निमशिरगाव यासह परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढली. यानंतर कार्यकर्ते जयसिंगपूर येथे स्वाभिमानीच्या कार्यालयाजवळ आले. जवाहर साखर कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या चार ट्रॅक्टर जयसिंगपूर येथे कार्यकर्त्यांनी रोखले. या ट्रॅटर पोलिस ठाण्याजवळ आणून उभे करण्यात आले.

यानंतर स्वाभिमानीचे जिल्हा परिषद सदस्य अनिल मादनाईक, शैलेश चौगुले, विठ्ठल मोरे, सागर शंभूशेटे, मिलिंद साखरपे, आदिनाथ हेमगिरे, आण्णासो चौगुले, बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅलीस सुरूवात झाली. रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. जयसिंगपूर, उदगाव, शिरोळ, कुरूंदवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, घोसरवाड, हुपरी, पट्टणकोडोली, इचलकरंजी, हातकणंगले, नरंदे, दानोळी येथून मोटारसायकल रॅली पुन्हा जयसिंगपुरात आली. कार्यकर्त्यांनी साखर कारखाना परिसरात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणून गेला. स्वाभिमानीच्या या आंदोलनामुळे शिरोळ तालुक्यात ऊस तोडी बंद झाल्या आहेत. ऊस वाहतूकही बंद आहे.

आजरा कारखान्याची तोड सुरूच

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजरा साखर कारखान्याने ऊसतोड थांबविलेली नाही, अथवा टोळ्यांनाही तशा सूचना दिल्या नसल्याचे कारखाना अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील विविध भागासह गडहिंग्लज व चंदगड परिसरातही कारखान्याच्या ३०० ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. यामध्ये बीडसह स्थानिक टोळ्यांचा समावेश आहे. सध्या कारखान्याचे गाळप प्रतिदिन साडेतीन हजार टनाप्रमाणे सुरू आहे. एफआरपीबाबत जिल्हा बँकेशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

हंगाम रोखण्याचा इशारा

चंदगड तालुक्यातील हेमरस कारखान्याने गळीत केलेल्या उसाची बिले तातडीने न दिल्यास हंगाम बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी हेमरसचे युनिट हेड भरत कुंडल यांना निवेदनातून दिला आहे. हेमरस साखर कारखान्याने तालुक्यातील ऊस त्वरित उचलण्याचे नियोजन केले आहे. जळीत व हत्ती बाधीत उसाला कारखाना व्यवस्थापनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. तशा सूचनाही ऊसतोड यंत्रणेला दिल्या आहेत. कारखान्याचे सात लाखाचे उदिष्ट असून आतापर्यंत एक लाख सत्तर हजारांचे गाळप झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आडाखे चुकले, एकटे पडले

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : राजकारणात मागे काय घडले याचा विचार करण्यापेक्षा भविष्यात काय करायचे याचे अडाखे निश्चित पाहिजे. त्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही. नेमका याचाच विसर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना पडल्याने एक होता-होता तगडे पॅनेल कुंभीमध्ये होण्याचे राहून गेले. तर राजकीय अप्रगल्भता दाखवत संदीप नरके यांच्या बंडाच्या तोफेत रणांगणापूर्वीच पाणी गेल्याने आखाडे चुकले आहेत.

या सर्व घडामोडीत पी. एन. पाटील यांना मुत्सद्दी‌पणा दाखवून त्यांना चेअरमन चंद्रदीप नरके यांना आव्हान उभे करता आले असते. जयपराजयापेक्षा त्यांना ही रणनिती चार वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यासाठी उपयोगी येऊ शकली असती. मात्र त्यांनी ही संधी गमावली असल्याचे मंगळवारच्या घडामोडीवरुन स्पष्ट दिसत आहे. सूर्यवंशी कुटुंबीयाकडून 'शब्द' घेवून त्यांना पॅनेलमध्ये संधी दिली असती, तर पाटील यांना विधानसभेचे अनेक अडाखे सोपे करण्याची संधी मिळाली असती. पण दुर्दैवाने त्यांना हे साध्य करता आले नाही. त्यामुळे कारखान्यांबरोबरच विधानसभेची गणिते सोपी करण्यामध्ये आमदार नरके सध्यातरी यशस्वी झाले आहेत.

कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी-कासारीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चेअमरन चंद्रदीप नरके यांच्या एकतर्फी वर्चस्वाला शह देण्यासाठी दोन महिन्यापासून सर्वपक्षीय राजर्षी शाहू पॅनेलची मोट बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये बहुतांशी करवीर विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते. सर्वपक्षीय मोट बांधण्यामध्ये काँग्रेसमधील सर्व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे गत विधानसभा निवडणुकीतील उमेदवार राजेंद्र व त्यांचे बंधू शामराव सूर्यवंशी यांचा समावेश होता. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीमध्ये पाटील यांचा सुमारे ३०० मतांनी पराभव झाला होता. त्याचवेळी जनसुराज्यच्या राजेंद्र सूर्यवंशी यांनी सुमारे वीस हजारापर्यंत मते मिळाली होती. मात्र हीच मते आपल्या बाजूला झुकली असती, तर आपला विजय झाला असता, ही सल कायम असल्याने प्रत्यक्षात पॅनेल बांधणीवेळी शामराव सूर्यवंशी यांच्या नावाला जिल्हाध्यक्ष पाटील यांनी विरोध केला. आणि कोरे यांनी सूर्यवंशी यांच्याशिवाय पॅनेल होऊ शकणार नसल्याची भूमिका घेतली. दोन्ही नेत्यांमुळे मात्र आघाडीत बिघाडी झाली. याचा फायदा चेअमरन नरकेंना झाला.

दोन्ही विधानसभा निवडणुकीत पाटील यांना पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात नगण्य मतदान झाले आहे. पन्हाळा तालुक्यात तर त्यांना कार्यकर्त्यांची शोधाशोध करावी लागत आहे. कारखाना निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा हा शोध संपुष्टात येवू शकला असता. यशवंत बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देसाई यांच्या रुपाने एक तगडा नरके विरोधक मिळाला असता. याचबरोबर २१ पैकी सूर्यवंशी यांची मदत सोडली असती तरीही २० जणांची एक नवी आणि सक्षम फळी विधानसभा निवडणुकीमध्ये उपयोगाला आली असती. कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पन्हाळा व गगनबावड्यात अधिक विस्तारण्याची संधी मिळाली असती. मात्र पाटील यांनी भविष्याचा विचार न करता वर्तमानावर अधिक विश्वास ठेवला असल्याचे दिसून येत आहे. कुंभी बचाव पॅनेलचे सर्व उमेदवार पाटील यांना माननारे असले, तरी यामध्ये अपवाद वगळता एकही ज्येष्ठ उमेदवार नसल्याने मर्यादा येणार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असली, तरी ती उघडपणे दाखवली जात नाही, हेच पाटील यांचे यश मानावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कारणे दाखवा’नंतर शांत

$
0
0

एमपीसीबीच्या कारभाराने प्रदूषणाचे प्रश्न जैसे थे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी, रंकाळा तलावात विविध घटकांकडून होत असलेल्या प्रदूषणाच्या ​मुद्द्यांबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नेहमीच तटस्थतेची भूमिका स्वीकारल्याने जवळपास वीस वर्षांपासून या दोन्ही ठिकाणचा प्रदूषणाचा प्रश्न सुटलेला नाही. रंकाळा तलावाबाबत राष्ट्रीय हरित लवादासमोरही त्यांची हीच भूमिका राहिल्याने लवादाला एका सुनावणीतच त्यांचे खरे रूप दिसून आले. ज्या कामासाठी ही यंत्रणा बनवली, त्याकडेच या यंत्रणेची डोळेझाक सुरू असल्याचे लवादाच्या ताशेऱ्यामुळे समाजासमोर आले आहे. त्यामुळे एमपीसीबीचा कारभार प्रदूषण रोखण्यासाठी कमी आणि दबावतंत्रासाठीच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

रंकाळा तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न असो, पंचगंगा नदीतील सांडपाणी, उद्योगांचे पाणी मिसळण्याच्या प्रश्नाबाबत येथील पर्यावरणप्रेमींनी सतत एमपीसीबीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंचगंगा नदीत होणाऱ्या प्रदूषणामुळे पिण्याचे पाणीही घातक होत असल्याने सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर महापालिका, औद्योगिक वसाहत, साखर कारखाने, डिस्टिलरी यांच्यावर कारवाई करण्याबाबत दबाव आला. पाठपुरावा केल्यानंतर शंभरवर कारवाई करण्यात आल्या. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर नोटिसांचा भडिमार झाला; पण प्रदूषण करणाऱ्या साखर कारखाने, औद्योगिक वसाहतीतील कारखाने, डिस्टिलरींवर त्या धर्तीवर कारवाई झाल्याचे दिसत नाही. इचलकरंजीतील प्रोसेस युनिटमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक पाण्याबाबतही हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर कारवाई झाली. त्यापूर्वी केवळ कारणे दाखवा नोटीस व त्यानंतर सारे शांत इतकीच प्रक्रिया एमपीसीबीने केली आहे. एखाद्या प्रदूषणाने मासे मेले की, त्यानंतर कोण कारणीभूत यासाठी एमपीसीबीने बराच वेळ घेतल्याचे वारंवार दिसून आले. रंकाळ्याबाबतही हीच परिस्थिती आहे. तिथे खुलेआम जनावरे व कपडे धुण्याचे प्रकार होतात. रंकाळ्यातील प्रदूषण रोखण्याबाबत काही मार्गदर्शन केल्याचे आठवत नाही.

तक्रारदारांनी तक्रार केली की, ही यंत्रणा संबंधितांकडे जाते. तेथील परिस्थिती पाहून प्रदूषणाबाबतचा पंचनामा केला जातो. अनेकवेळा पंचगंगा व रंकाळा तलावाबरोबर इतर घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेतले. त्यामध्ये प्रदूषणाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत होते. प्रयोगशाळेतील परीक्षणानंतर ते स्पष्ट व्हायला हवे होते; पण अनेक नमुन्यांचे अहवाल कुठे आहेत हेच माहीत नाही. गेल्या वर्षभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मासे मरण्याचे प्रकार घडले. मेलेले मासे व तेथील पाणी हे प्रयोगशाळेत पाठवले; पण त्याच्या अहवालांचे काय झाले हे माहीत नाही. जर अहवाल आले असले तर कारवाई कुणावर केली हाही प्रश्न अनुत्तरित आहे. रंकाळ्यातील प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची चौकशी करण्यासाठीही पुढाकार न घेण्याची एमपीसीबीची भूमिका लवादालाही समजून आली. त्यामुळे त्यांच्याकडूनच या यंत्रणेला आता जागे करण्याची गरज व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॅबोरेटरीजचा काळा बाजार रोखा’

$
0
0

कोल्हापूरः कोल्हापूर शहरात रक्त तपासणी लॅबोरेटरीजची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली असून, यातून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप कोल्हापूर जनशक्ती संघटनेने केला आहे. शहरातील सर्व लॅबची तपासणी करून केवळ एमडी पॅथॉलॉजिस्टनाच परवानगी द्यावी आणि सर्वांचे दरही एकसारखे करावेत, अशी मागणी जनशक्तीच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याची अंमलबजावणी न केल्यास व्यापक आंदोलन उभारू, असा इशारा जनशक्ती संघटनेने दिला आहे.

एम.डी. पॅथॉलॉजिस्टनाच लॅब सुरू करण्याचा अधिकार असताना अनेक जण बेकायदेशीरपणे लॅब सुरू करतात असा आरोप कोल्हापूर जनशक्ती संघटनेने केला आहे. शहरात केवळ ३५ ते ४० एम. डी. पॅथॉलॉजिस्ट असताना प्रत्यक्षात लॅबची संख्या शेकड्याच्या घरात आहे. एखाद्या लॅबमध्ये नुकतीच केलेली तपासणी दुसऱ्या डॉक्टरकडे ग्राह्य धरली जात नाही. लॅब आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे साटेलोटे असल्यानेच रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे लॅब आणि दवाखान्यांमधील या कट प्रॅक्टिसवर आळा घालण्याची मागणी जनशक्तीने केली आहे.

लॅबोरेटरीजवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियंत्रण ठेवावे, सर्व लॅबोरेटरीजना समान दर निश्चित करावेत, डॉक्टरांनी विशिष्ठ लॅबचा आग्रह धरू नये आणि लॅबचालकांचे परवाने तपासावेत अशा मागण्या जनशक्ती संघटनेने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात येणार असून, वेळप्रसंगी व्यापक आंदोलनही करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुंतवणूकदारांमध्ये हवी एकी

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

पर्ल्स अॅग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड (पर्ल्स) या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील ५५ हजार गुंतवणूकदारांनी एकत्रित येऊन दबाव वाढवला तर शेकडो कोटी रुपये कंपनीला परत करावे लागतील. आंदोलन केलात तर पैसे ​बुडतील ही भीती न बाळगता एका झेंड्याखाली गुंतवणूकदार एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.

दामदुप्पट रक्कम, एक एकर जमीन नावावर करून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पर्ल्स कंपनीच्या एजंट व सबएजंटांनी आपले उखळ पांढरे करून घेतले व गुंतवणूकदारांना वाऱ्यावर सोडले आहे. एजंट मंडळींनी जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ठांना फशी पाडल्याने गुंतवणूकदारांची मोठी अडचण झाली आहे. एजंटांकडे फेऱ्या मारून गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा पडत आहेत. 'सेबी'ने सर्व व्यवहार बंद केल्याचे सांगून कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हात वर करत आहेत.

आंदोलन करण्यासाठी गतवर्षी शिवसेनेने पावले उचलल्यावर एजंटांनी गुंतवणूकदारांना भीती दाखवली. आंदोलन केले तर पर्ल्सच्या कार्यालयाला कायमचे टाळे बसेल, पैसे बुडतील या भीतीने गुंतवणूकदार आज ना उद्या पैसे मिळतील या आशेवर कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. शेकडो गुंतवणूकदार कार्यालयात पैशाची विचारणा करत आहेत; पण अधिकारी व कर्मचारी गुंतवणूकदारांना फक्त दिलासा देण्याचे काम करत आहेत. जे पूर्वी अधिकारी होते त्यांनीही कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. ५५ हजार गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी अडकले असले तरी प्रमुख राजकीय पक्ष व संघटनांकडून दुर्लक्ष होत आहेत. सभागृहातही जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्यतिरिक्त एकाही लोकप्रतिनिधीने पर्ल्ससंबधी आवाज उठवलेला नाही.

पर्ल्स कंपनीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिस संशयितांना अटक करतात. पोलिस ठाण्याची पायरी चढल्यावर कंपनीच्या एखाद्या अधिकारी, कर्मचारी अथवा एजंटाला अटक होऊ शकते. अटक झालेली मंडळी पैशाच्या जोरावर जामीनही मिळवतात. पण गुंतवणूकदाराला पोलिस ठाण्यात तक्रार करून पैसे मिळत नाहीत हे आजवरच्या घटनेत सिद्ध झाले आहे. पर्ल्स कंपनीवर दबाव वाढवण्यासाठी सर्व ठेवीदारांनी एकत्र येणे हीच काळाची गरज आहे.

आंदोलनाशिवाय पर्याय नाही

मुंबईत पर्ल्सचे गुंतवणूकदार एकवटले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर कंपनीविरुद्ध धरणे आंदोलनाची घोषणा केल्यावर सेबीलाही जाग आली आहे. सेबीने पर्ल्सच्या प्रवर्तक व संचालकाच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ५५ हजार गुंतवणूकदार आहेत. या सर्वांनी एकत्र आले तर राजकीय पक्ष व संघटनांनाही जाग येऊन सरकारला गुंतवणूकदारांची रक्कम देण्यासाठी कार्यवाही करावी लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीची अधिसूचना काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने कोल्हापूर शहरातील आयआरबीच्या टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी, यावर अंतिम तोडगा अद्याप निघालेला नाही. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकारने टोलमुक्तीची अधिसूचना काढावी; अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा टोल विरोधी कृती समितीचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता.१६) झालेल्या धरणे आंदोलनावेळी ते बोलत होते.

राज्य सरकारने कोल्हापूरला टोलमुक्तीचा शब्द दिला आहे. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनानंतर आयआरबी कंपनीची रक्कम भागविण्याबाबतही सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी आश्वासने दिली आहेत. ऑगस्टपासून शहरातील टोलवसुलीला स्थगिती दिली असून, तीनवेळा स्थगिती वाढवली आहे. मूल्यांकनातील रक्कम निश्चित करण्याचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्य सरकारने टोलवसुली स्थगितीला तिसऱ्यांदा दिलेली मुदतवाढही ३१ डिसेंबरला संपत आहे, त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी टोलमुक्तीची अधिसूचना सरकारने काढावी, असा आग्रह टोल विरोधी कृती समितीने धरला आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीच्यावतीने बुधवारी दिवसभर डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. एन. डी. पाटील यांनी राज्य सरकारला याआधीच्या आश्वासनांची आठवण करून देत आयआरबीचे मोठ्या रकमेचे दावे फोल असल्याचे सांगितले. ३१ डिसेंबरपूर्वी शहरातून टोल हद्दपार व्हावा, असे पत्र संबंधित मंत्र्यांना दिले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चाही झाली आहे. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात टोल हद्दपारीची अधिसूचना काढावी आणि कोल्हापुरातील टोलचा प्रश्न कायमस्वरुपी संपवावा; अन्यथा सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा डॉ. पाटील यांनी दिला आहे.

कृती समितीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेली पाच वर्षे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनानंतर टोलमुक्ती मिळेल अशी भावना कोल्हापूकरांची आहे. निमंत्रक निवास साळोखे यांनीही सरकारने दिलेला शब्द पाळावा असे आवाहन केले. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि टोल विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

आयआरबीकडून फसवणूक

महापालिकेने आयआरबी कंपनीला दिलेल्या भूखंडाची किंमत १०७ कोटी रुपये असल्याचे तज्ज्ञ समितीने सांगितले आहे. मात्र आयआरबीने भूखंडाची किंमत केवळ १५ कोटी असल्याचा दावा केला आहे. जागेच्या किमतीबाबत आयआरबी सरकारची फसवणूक करीत असल्याचे डॉ. एन. डी. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

आचारसंहितेनंतर सविस्तर चर्चा

आचारसंहितेचे निमित्त पुढे करीत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी टोलच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे टाळले. आचारसंहिता संपल्यानंतर टोलच्या प्रश्नावर बैठक घेऊ असे त्यांनी टोल विरोधी कृती समितीला आश्वासन दिले आहे, त्यामुळे सरकारने दिलेली ३१ डिसेंबरची मुदत पाळली जाणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनय कोरे यांचे पत्ते गुलदस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ, राजाराम साखर कारखाना निवडणूक महाडिकांविरोधात लढलो असताना आता त्यांच्या बाजूने जाऊ शकत नसल्याचे सांगत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार विनय कोरे यांनी महाडिकांना साथ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केल्याचे समजते.

तरीही अजून विचार करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने साऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचा शब्द कोरे यांनी नागपुरात दिला. त्यानंतर बुधवारी सायंकाळी वारणानगरमध्ये येताच त्यांची सतेज पाटील यांनी तातडीने भेट घेतली. कोरे यांच्याबरोबर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी पाटील यांनी चर्चा केली असली तरी ते निर्णय मात्र शुक्रवारी जाहीर करणार आहेत.

कोरे गटाकडे ३२ मते आहेत. तसेच ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे गडहिंग्लज, जयसिंगपूर, शिरोळमधील काही मते सोबत येण्याची शक्यता आहे. यानुसार ४२ हून अधिक मते कोरे गटाकडे असल्याने चुरशीच्या निवडणुकीत ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून कोरे यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु होते. दोन्ही उमेदवारांकडून कोरे यांची भेट घेऊन आपल्या पारड्यात मते टाकावी यासाठी प्रयत्न करण्यात येत होता. कोरे यांनी निर्णय घेतला नव्हता. मंगळवारी ते अचानक नागपूरला मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना होण्याने कोरे गटाचा पाठींबा महाडिकांना दिला जाण्याच्या चर्चेला वेग आला होता. मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट झाली त्यावेळी भाजपने पाठिंबा दिलेल्या महाडिकांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्याचे समजते. कोरे यांनी मात्र यापूर्वी महाडिक यांच्याविरोधात गोकुळ दूध संघ, राजाराम साखर कारखान्याच्या निवडणूक लढवली आहे. आता विरोधकांसमवेत कसा जाऊ? महाडिक यांनी भाजपची उमेदवारी घेतली असती तर मदत केलीही असती, असे सांगून कोरे यांनी महाडिकांना साथ मिळणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितल्याचे समजते. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे सांगितले.

त्यानंतर बुधवारी सायंकाळी वारणानगर येथे कोरे आल्यानंतर प्रा. पाटील, विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत पन्हाळा नगरपालिकेतील १९ सदस्यांची मते आजमावण्यासाठी बैठक बोलवली होती. त्यावेळी सतेज पाटील बैठकीस उपस्थित राहिले. यावेळी निवडून देण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोरे, पाटील, प्रा. पाटील यांची स्वतंत्र बैठक होऊन निर्णयाबाबत चर्चा केली व पाटील बाहेर पडले. कोरे यांनी गुरुवारी सायंकाळी मलकापूर, शिरोळ, जयसिंगपूर, इचलकरंजी, गडहिंग्लज येथील सदस्यांना बैठकीसाठी बोलवले आहे. त्यांच्याशी चर्चा करुन शुक्रवारी दुपारी निर्णय जाहीर करु असे कोरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावड्यात दाम्पत्याचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथे बुधवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दाम्पत्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. हल्ल्यात इंद्रजित कुलकर्णी व त्यांच्या पत्नी मेघा हे दोघेही ठार झाले. खुनाची ही घटना साऱ्या शहरभर पसरली. त्यामुळे बावड्यातील अनेकांनी गणेश कॉलनीतील घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजताच पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याचा मोठा फौजफाटा दाखल झाला. देशपांडे यांनी पोलिसांना तपासाविषयी सूचना दिल्या. हा प्रकार ऑनर किलिंग असल्याची चर्चा होती.

घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, कसबा बावडा येथील गोळीबार मैदानाजवळ गणेश कॉलनी आहे. तेथे कुलकर्णी दाम्पत्य राहत होते. त्यापैकी इंद्रजित हा सातवे सावर्डे, ता. शाहूवाडी येथील आहे. दीड वर्षांपूर्वी त्याने थेरगाव, ता. शाहूवाडी येथील मेघा पाटील या तरुणीशी विवाह केला होता. सहा महिन्यांपूर्वी ते कॉलनीतील प्रभाकर माधव यांच्या घरी भाड्याने राहत होते. दरम्यान, या प्रकाराने संतप्त झालेल्या मेघाच्या नातेवाईकांनी इंद्रजितला बघून घेण्याची धमकी दिली होती.

आज रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास दोन ते तिघे हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांच्याही वर्मी घाव बसल्याने दोघेही जागीच ठार झाले. आरडाओरडा झाल्याने नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. पोलिसांनी तपास पथके शाहूवाडीकडे पाठविली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालूच्या लिलावावर आज निर्णय शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

लिलावाच्या मूळ बोलीवर अपेक्षित बोली न लागल्याने अंबाबाईच्या शालू लिलावाची स्थगित केलेली प्रक्रिया सुरू करण्याबाबत गुरुवारी (ता.१७) देवस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीत ​निर्णय होण्याची शक्यता आहे. ८ डिसेंबरला अंबाबाईच्या मानाच्या शालूचा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती.

यावर्षी अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून आलेल्या शालूची मूळ रक्कम ७५ हजार रुपये आहे. पहिल्या प्रक्रियेत लिलाव बोलण्यासाठी नऊ भक्तांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार नऊजणांच्या उपस्थितीत पहिली बोली पाच लाख ४७ हजार रुपये जाहीर करण्यात आली होती. मात्र, नऊजणांपैकी एकाही व्यक्तीने या रकमेच्यापुढे बोली लावली नाही. लिलावाच्या नियमानुसार तीस मिनिटांची मुदत देण्यात आली. मात्र, त्यानंतरही मूळ बोलीच्या रकमेला कुणीही आव्हान न ​दिल्याने ​लिलावप्रक्रिया स्थगित केल्याचे देवस्थान व्यवस्थापनाच्या सचिव शुभांगी साठे यांनी जाहीर केले होते.

दरम्यान, शालूच्या लिलावाबाबत नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचेही देवस्थान समितीच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या देवस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीत शालू लिलावाचा​ विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकरकमी २०८० देणे शक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा साखर कारखाना शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्या घामाने उगवलेल्या उसाला दर नेत्यांनी ठरविण्याची पद्धतच चुकीची आहे. जिल्ह्यात नाहीतर राज्यात काय घडते आहे, याचा किंवा इतर कारखानदारांचा विचार करू नका. आजरा कारखान्याला शासनाच्या व स्वाभिमानी संघटनेच्या समझोत्याप्रमाणे ८० टक्के म्हणजे २०८० रूपये प्रतिटन उचल देणे शक्य आहे. त्याचे गणित आम्ही मांडून दाखवतो. मग एफआरपी देण्यासाठी मागेपुढे कसले बघता? असा सवाल आजरा कारखान्याचे संचालक आणि जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांनी आजरा येथील बैठकीत विचारला. संचालक मंडळातील काही सदस्य तोडग्यानुसार दर देण्यास राजी असताना अध्यक्ष व अन्य संचालक विरोधात असल्याचे चित्र समोर आले आहे. चराटी यांच्यासह संचालक दिगंबर देसाई, राजू जाधव व आनंदराव कुलकर्णी यांनीही चराटी यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. स्वाभिमानी संघटनेने आजरा कारखान्याला गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत अल्ट‌िमेटम् दिल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत कारखान्याच्या काही संचालकींनी ही भूमिका मांडली.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या सभागृहामध्ये आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य संघटक राजेंद्र गड्ड्याण्णावर व तालुकाध्यक्ष तानाजी देसाई यांनीही संघटनेची भूमिका मांडली. कागलसह जिल्ह्यातील काही कारखान्यांनी १७०० रूपये उचल जमा केली. शेतकऱ्यांचा कणा मोडणारी ही नीती राबविणाऱ्या नेत्यांना आपल्या तुंबड्या भरायच्या आहेत. पण, त्यासाठी शेतकऱ्यांवर दरोडा का घालता? अशी विचारणा यावेळी संघटनेच्या नेत्यांनी केली. केडीसीसी बँकेने अर्थपुरवठा नाकारल्यास राज्य सरकारने लक्ष घालावे. आहे.

अशोक चराटी म्हणाले, मागील आठवड्यात संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी २२०० रूपये उचल शक्य असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतही घेतली होती.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालकांत दरी

मे महिन्यामध्ये आजरा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यामुळे काही संचालक जिल्हास्तरीय नेत्यांचा शब्द ओलांडण्यास तयार नाहीत. तर या निवडणुकीत तालुक्यातील शेतकऱ्यांकडे मतांसाठी आपल्याला जायचे आहे, नेत्यांना नाही. ही भूमिका काही संचालकांनी स्पष्टपणे घेतली आहे. यावरून सत्ताधारी संचालकांमध्येच निवडणुकीच्या व एफआरपीच्या अनुषंगाने दरी रूंदावत आहे, हे आजच्या बैठकीमुळे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरला उद्या कोर्टात हजर करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशियत आरोपी समीर गायकवाडला शुक्रवारी (ता.१८) न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयात हजर होण्याचे समन्सही समीरला पाठविण्यात आले आहे.

समीरवर पानसरे हत्येचा कट रचून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ३९२ पानांच्या आरोपपत्रात समीरने त्यांच्या मैत्रिणीशी केलेल्या मोबाइलवरील संभाषणांचा संदर्भ दिला आहे. संभाषणांमधील समीरचा आवाज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि ७२ साक्षीदारांचे जबाब तपासून समीरवर आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी समीरला १६ सप्टेंबरला त्याच्या सांगलीतील घरातून अटक केली होती.

समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याने सनातनच्या मिरज, पनवेल आणि मडगाव येथील आश्रमांमध्येही चौकशी करण्यात आली. नियमानुसार संशयितास अटक केल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणे गरजेचे असल्यामुळे पोलिसांनी १४ डिसेंबरला समीरवर आरोपपत्र दाखल केले आहे. कोर्टाने त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचबरोबर समीरला अटक करून नुकताच तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यामुळे त्याला शुक्रवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. आरोपपत्र आणि दोन्ही बाजूंकडील वकील काय युक्तिवाद करतात, यावर समीरच्या जामिनाचे भवितव्य अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बिद्री संचालक’ बरखास्त

$
0
0

एप्रिलपर्यंत निवडणूक घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, कागल

दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (बिद्री ता. कागल) संचालक मंडळाची मे २०१५ मध्ये मुदत संपली आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले. तसेच एप्रिल २०१६ पर्यंत निवडणूक घेण्याची सूचनाही न्यायालयाने दिली आहे. न्यायमूर्ती गोगोई आणि रामण्णा यांच्या खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बिद्री कारखान्यात सत्तारुढ गटाने वाढीव चौदा हजार सभासद केले आहेत. त्यातील बहुसंख्य सभासद कार्यक्षेत्राबाहेरील व जमीन नावावर नसल्याने या सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी माजी आमदार दिनकर जाधव, आमदार प्रकाश आबिटकर आदींनी प्रादेशिक साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने वाढीव सभासदांना बाजूला ठेवून जुन्या मतदारयादीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय दिला होता. याविरोधात सत्तारुढ गटांसह सभासदांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत 'जैसे थे'चे आदेश दिले होते. याबाबतची सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे.

निवडणूक प्रक्रिया त्वरित राबवण्यासाठी आमदार आबिटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली. आमदार आबिटकर यांची याचिका निकालात काढताना संचालक मंडळाची मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर एप्रिल २०१६ पर्यंत जुन्या मतदारयादीप्रमाणे निवडणूक घेण्याची सूचना केली.

अनेक संस्थांच्या निवडणुका रखडल्या

बिद्री कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने सर्वोच्च न्यायालयाने संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय घेतला आहे. सहकार प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र अद्याप हजारो सहकारी संस्थावर मुदत संपलेले संचालक मंडळ कार्यरत आहे. अशा संस्थांची निवडणूक प्रक्रिया सहकार विभाग कधी राबवणार, याकडे लक्ष लागले आहे.

सहकार कलम ८८ किंवा ८५ नुसार संचालक मंडळाची चौकशी झाली नाही. केवळ मुदत संपल्याने संचालक मंडळ बरखास्त केले आहे. वाढीव सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखान्याच्यावतीने प्रयत्न करुन निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

- के. पी. पाटील, चेअरमन, बिद्री

वाढीव सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी साडेतीन वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे. संचालक मंडळ बरखास्त करुन आम्ही निम्मी लढाई जिंकली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत असून कारखान्यात सत्तातंर केल्याशिवाय राहणार नाही.

- आमदार प्रकाश आबिटकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किफ’चा माहोल आजपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापुरात चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुक्रवारी (ता. १८ डिसेंबर) सुरूवात होत आहे. या महोत्सवाची सुरूवात कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार सोहळ्याने होणार असून यंदा या पुरस्काराने दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आज, सायंकाळी सहा वाजता पुरस्कार सोहळा होणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे दालन खुले होणार आहे.

'फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे २५४ डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात महोत्सवाला प्रारंभ होईल.

कसरावल्ली यांच्याविषयी

पुरस्कार जाहीर झालेले दिग्दर्शक कसरावल्ली यांनी कन्नड भाषेतील सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. त्यांनी १९७० ते ८० च्या दशकात समांतर आणि कलात्मक चित्रपटांच्या चळवळीत योगदान दिले. भारत सरकाने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मान मिळाले आहेत. फार्मसीमधील करियर सोडून कसरावल्ली यांनी कलाक्षेत्रात काहीतरी करण्याची खूणगाठ बांधली. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

विद्यार्थीदशेतच कसरावल्ली यांनी केलेल्या 'अवशेष' फिल्मला राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट स्टुडंट फिल्म व उत्कृष्ट प्रायोगिक लघुपट म्हणून गौरवण्यात आले. फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बनवलेला पहिला सिनेमा घटश्राद्ध. या सिनेमाने सुवर्णकमळसारखा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

१९ ला 'झेल्या'चे स्क्रीनिंग

कोल्हापुरातील स्थानिक निर्मिती असलेला 'झेल्या' या मराठी सिनेमाचे स्क्रीनिंग १९ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. मकरंद अनासरपुरे, छाया कदम, बालकलाकर मल्हार दंडगे, संतोष, शिंदे आदींच्या यात भूमिका आहेत. निर्मिती विलासराव वाघमोडे यांची असून कृष्णा कांबळे (केके) यांचे दिग्दर्शन आहे. या सिनेमाचे लेखन युवराज पाटील केले आहे.

१८ डिसेंबर : कलामहर्षी बाबूराव पेंटर स्मृति पुरस्कार प्रदान. प्रमुख पाहुणे : अमोल पालेकर, संध्या गोखले, ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली

१९ डिसेंबर : लघुपट व माय मराठी विभाग सुरुवात, लघुपट पारितोषिक वितरण. प्रमुख पाहुणे : ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, हृषिकेश जोशी

२० डिसेंबर : १९१३ ते २०१४ मराठी चित्रपटसूची प्रकाशन अभिवाचन. प्रमुख पाहुणे : किरण शांताराम, दिलीप प्रभावळकर

२१ डिसेंबर : हकिकत सिनेमाचे पुस्तक प्रकाशन, लेखक- सतीश जकातदार. प्रमुख पाहुणे : सतीश जकातदार, प्रा. हिमांशू स्मार्त

२२ डिसेंबर : जागतिक सिनेमा : गणेश मतकरी

२३ डिसेंबर : बदलता मराठी सिनेमा : मकरंद ब्रह्मे

२४ डिसेंबर : स्थानिक कलावंताचा गौरव समारंभ

२५ डिसेंबर : सांगता समारंभ, पुरस्कार प्रदान


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षपदी बाबासाहेब पाटील

$
0
0


तासगावच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड

म. टा. वृत्तसेवा, सांगली

तासगावचे नगराध्यक्ष म्हणून भाजपचे बाबासाहेब पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड जाहीर झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी काम पाहिले. निवडीनंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह शहरातून पदययात्रा काढली. त्यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

या आधी नगरपालिकेत दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या गटाची सत्ता होती, पण अलीकडेच ही पालिका भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यात आली आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर पाटील म्हणाले, 'तासगाव शहरात खासदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील स्वच्छता अभियान राबवले जाईल. त्यासाठी शहरातील सर्व घरे व दुकानांत आठ हजार कचरा पेट्यांचे वाटप लवकरच केले जाणार आहे. त्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जाईल. तसेच कचरा उचलण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात येईल. त्याद्वारे कुठूनही फोन आल्यास एक तासात कचरा उचलणारी गाडी तेथे पोहोचेल. अद्यायावत भाजी मंडईचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्या हस्ते लवकरच होत आहे. शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येत असून, २४ तास पाण्याची उपलब्धता करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालक मंडळ बरखास्त करा

$
0
0

एफआरपीप्रकरणी सदाभाऊ खोत यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा कुपवाड

'शेतकऱ्यांच्या पैशांवर चालणाऱ्या साखर संघाने १५०० रुपयेच देण्याचा फतवा काढला आहे, त्यामुळे सरकारने साखर संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा आणि एफआरपीची ८० टक्के रक्कम देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावणाऱ्या साखर कारखान्यांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली. शुक्रवारी संपूर्ण सांगली जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले जात असून, केवळ आरोग्य सेवा वगळता भाजीपाल्यासह दूध वाहतूक रोखली जाईल,असा इशाराही खोत यांनी दिला.

ते म्हणाले, 'साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांसह जबाबदार मंत्र्याच्या उपस्थित झालेल्या बैठकीत एफआरपी देताना ८० आणि २० टक्के असे दोन भाग करण्यात आले. या निर्णयावेळी एकाही कारखानदाराने ब्र ही काढला नाही. याचा अर्थ त्यांना हा तोडगा मान्यच होता. बाहेर आल्यानंतर मात्र एकही कारखानदार एफआरपीची ८० टक्के रक्कम द्यायला तयार नाही. कोणी १५०० तर कोणी १७०० रुपये देण्याची भाषा करत आहे. सभागृहात शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढणाऱ्यांना हे शोभत नाही. आजवर कधीही मदत मिळाली नव्हती, इतकी मदत या सरकारने कारखानदारांना दिली आहे. तरीही यांची कुरकुर सुरूच आहे. त्यामुळे आता संघटना गप्प बसणार नाही.'

कवठेएकंदमध्ये एसटीवर दगडफेक

दरम्यान, गुरुवारी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद परिसरात एसटी बसेसवर दगडफेक करून स्वाभिमानीने आपल्या नेहमीच्या स्टाईलने आंदोलनाला सुरुवात केली आहे. ऊस वाहतुकीच्या वाहनांच्याही हवा काढल्याने रस्त्यावर काही ठिकाणी वाहने अडकून पडली. सांगलीतही एसटीवर दगड टाकण्याचा प्रकार घडला. काही ठिकाणची ऊस तोड बंद पाडण्यात आली आहे. शुक्रवारी गावकऱ्यांनी आपल्या गावाजवळील रस्त्यावर बसून रस्ता रोको करायचा आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही वाहन रस्त्यावरून धावताना दिसणार नाही. असा दावाही खोत यांनी या वेळी दिला आहे.

'चक्काजाम करुन कारखानदारांना वठणीवर आणण्याचे काम संघटना करणार आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याची रणनीति अवलंबली आहे. वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तर यामध्ये सर्वांत आघाडीवर आहे. मागची देणीबाकी आहेत. आतापर्यंत गाळप केलेल्या ऊसाचा एक छदामही दिलेला नाही. उतारा कमी दाखविण्याचा उद्योग सुरू आहे,' असा आरोपही खोत यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किफ’मधून घडणार आजपासून सिनेमासफर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जगाचा सिनेमा आणि सिनेमाचे जग हे ब्रीदवाक्य असलेल्या चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज शुक्रवार दि. १८ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे तीन स्क्रिन उभारण्यात आले असून आठ दिवसांच्या या महोत्सवात सिनेरसिकांना जगभरातील विविध भाषांमधील ५० सिनेमे आणि ३० लघुपटांची पर्वणी मिळणार आहे. अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक संध्या गोखले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. उदघाटन समारंभात कन्नड सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश कसरावल्ली यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महोत्सवाची सुरुवात बांगलादेशाच्या 'अँट स्टोरी या चित्रपटाने होणार असून, महोत्सवाची सांगता क्रोएशियाच्या 'मदर ऑफ असफाल्ट' या चित्रपटाने होणार आहे. यासह महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांचे वर्गीकरण करण्यात आले असून, यात वर्ल्ड सिनेमामध्ये हश्श ! गर्ल्स डोन्ट स्क्रिम (इराण), अॅव्हलॉन (स्वीडन), रेड कॉटन सिल्क फ्लॉवर (म्यानमार), सेक्स ड्रग्ज अॅन्ड टॅक्सेशन (डेन्मार्क), वॉरीयर्स ऑफ द स्टेप्प (कझाकिस्तान), दि किड्स फ्रॉम मार्क्स अॅन्ड एजंल्स स्ट्रिट (मॉन्टेरो), फालसीफइकेटर (सर्बिया), बघशाला (नेपाळ), वुई कम फ्रॉम फार अवे (अर्जेंटिना), थ्री डॉट्स (अफगाणिस्तान), प्लेयिंग द तार (अफगाणिस्तान), द बेट कलेक्टर (फिलिपिन्स).

कंट्री फोकस : मेक्सिको इनोसन्ट व्हॉइसेस, टाइम टू डाय, बॅड हॅबिट्स, बेनव्हेनिडोस (वेलकम). माय मराठी विभागात कोती (दिग्दर्शक सुहास भोसले), सायलेन्स (गजेंद्र अहिरे), भिडू (मिलिंद शिंदे), झेल्या (कृष्णा कांबळे), सुरक्या (प्रशांत गेडाम), साकव (मयुर शाम करंबळीकर), रिंगण (मकरंद माने), बाजार (डॉ. भालचंद्र गायकवाड) , पिंडदान (प्रशांत पाटील). यांसह पथेर पांचाली, देवदास, श्री ४२० , मुनिमजी यासारखे जुने सिनेमेदेखील महोत्सवात पाहता येणार आहेत.

महोत्सवातील चित्रपटांतून मानवी जीवनाचा वेध आणि शोध यांचे दर्शन घडेल. अप्रदर्शित नवीन आणि नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे १० मराठी चित्रपट आणि १९५५ मध्ये गाजलेले संगीतप्रधान ७ चित्रपट खास आकर्षण ठरणार आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त 'प्रतिभा' हा १९३६ सालातील चित्रपट व प्रख्यात दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो दिग्दर्शित 'चार्ली' हा चार्ली चॅप्लीनवरील चित्रपट यांचे विशेष आकर्षण असेल. सोसायटीच्यावतीने घेतलेल्या लघुपट स्पर्धेतील १५ लघुपटांचे प्रदर्शनही महोत्सवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images