Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तिक‌िटावर ठरणार कागलची ‘रसद’

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

विधानपरिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते यावर कागल तालुक्यातून मिळणारी 'रसद' अवलंबून आहे. तालुक्यात सध्या विधानपरिषदेसाठी पाच गटांना महत्त्व प्राप्त झाले आहे. यातील चार गट या वर्षभरात लोकसभेपासून झालेल्या सर्व निवडणूकांचे उट्टे काढण्याचीच सध्या तरी शक्यता दिसते. काँग्रेसमधून महादेवराव महाडिक यांना उमेदवारी मिळाल्यास कागलमध्ये रणजित पाटील गट वगळता कोणी त्यांना मदत करेल, असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. परंतु सतेज पाटील अथवा जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास कागलमधून यांना फायदा होऊ शकतो.

कागल तालुक्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे १० मते कागल नगरपरिषदेची आहेत. संजय मंडलिक गटाकडे जिल्हा परिषद सदस्य, आणि मुरगूड नगरपरिषदेची ४ अशी आणि कागल नगरपरिषदेचे एक अशी सात मते आहेत. संजय घाटगे गटाकडे जिल्हा परिषदेची दोन आणि पंचायत समिती सभापती तसेच कागल नगरपरिषदेचा एक अशी चार मते आहेत. समरजितसिंह घाटगे गटाकडे कागल नगरपरिषदेचे पाच नगरसेवकांची मते आहेत. मुरगूड नगरपरिषदेची १० मते रणजित पाटील गटाची आहेत. मुश्रीफ गटातून उभारुन तत्कालिन परिस्थितीत विभक्त झालेल्या राजेखान जमादार गटाकडे तीन नगरसेवकांची मते आहेत. असे सर्व गटांचे मिळून ३९ आणि जि. प. सदस्य तावरे यांच्यासह ४० मतांना आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून गटप्रमुखांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता संजय मंडलिकांना महादेवराव महाडिक यांची काहीच मदत झाली नाही त्यामुळे त्याचे उट्टे काढण्याची संधी म्हणूनच मंडलिक गट बघेल असे सध्या तरी दिसते. संजय घाटगे गटाचा गोकुळमधील ऐन वेळी कट रचून पत्ता कट केल्यामुळे याही गटाची शक्यता सध्या तरी अँटी महाडिकच असेल. तसेच मंडलिक यांनी संजय घाटगे यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्याचे सांगितल्याने दोन्ही गटांकडे ११ मते होतात. त्यांनाही महत्त्व प्राप्त होणार आहे. आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांनी प्रचार केला आहे. त्यामुळे मुश्रीफांनी त्याला प्रतिउत्तर देत सतेज पाटील यांच्याशी जमवून घेतलेले पहाता राष्ट्रवादी जिल्ह्यातील १२४ मतांसह महाडिकांबरोबर रहाण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. समरजितसिंह घाटगे गटाला सतेज पाटील यांच्या करवीरमधून साखर कारखान्यासाठी नेहमीच सभासद, ऊस,कारखान्याचे मतदान यानिमीत्ताने मदत मिळते. त्यामुळे महाडिक पॅटर्न हादेखील गट स्वीकारणे शक्य वाटत नाही. मुरगूडचा राजेखान जमादार गट आपली तीन मते घेऊन संजय मंडलिक यांच्याबरोबरच रहाणार की एकला चलो रे ची भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवेल. घाटगे मंडलिक युतीतून निवडून आलेले व सध्या भाजपमध्ये असणारे बाबासाहेब तावरे यांचीही भुमिका गुलदस्त्यात आहे. केवळ रणजित पाटील गट आपली दहा मते घेऊन महाडिक यांच्या पाठीशी रहाणार कारण २५ वर्ष त्यांच्या घरात महाडिकांच्या सहकार्यानेच 'गोकुळ' नांदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षणासाठी कायदा बदला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका मांडून न्यायालयाला मराठा आरक्षणाचा मुद्दा पटवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रसंगी कायद्यात बदल करावेत, अशी मागणी करत यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी दिला.

दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूरला राज्य सरकारकडून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याने इथले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सूर उमटला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावपातळीवरून ठराव करण्याबरोबरच १२३८ गावांत मराठा महासंघाच्या शाखा स्थापण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीस शंकरराव शेळके, मिलिंद ढवळे-पाटील, संतोष सावंत, उत्तम जाधव, शिवाजीराव पाटील, शिवाजीराव गराडे, सर्जेराव पाटील, शैलजा भोसले, शशिकांत पाटील, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उप‌स्थित होते.

सीपीआरमध्ये दारूच्या बाटल्या

सीपीआरची अवस्था दयनीय आहे. दारूच्या बाटल्या १३ पैकी ११ व्हेंटिलेटर बंद स्थितीत आहेत. डिजिटल एक्स-रे, औषध विभाग, हृदयशस्त्रक्रिया विभागांची अवस्था बिकट आहे. यामुळे गरिबांचा दवाखाना वाचविण्यासाठी प्रयत्न करा.

'लक्ष्मी'करणाचे षङयंत्र उधळवून लावा

करवीरनिवासीनी श्री अंबाबाईची ओळख तिरूपती बालाजी म्हणजेच विष्णूची पत्नी लक्ष्मी म्हणून करण्याचे षङयंत्र सुरू आहे. कोल्हापूकरांचा हा घोर अवमान आहे. देवीच्या मूर्तीवरील नागमुद्रा काढणे हा त्याचाच एक भाग आहे. नागमुद्रा पूर्ववत बसेपर्यंत आंदोलन अखंड सुरू ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. भविष्यात देवीचा सिंह, आयुधे व मातृलिंग, आदी गोष्टीही गायब केल्या जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. पंढरपूरप्रमाणे अंबाबाई मंदिरातही बहुजन समाजातील पुजारी आणि महिलांना पूजेचा मान, आदी गोष्टींसाठी प्रयत्न सुरु राहाणार असल्याचे सांगितले.

मराठा भवन बहुजनांचे मंदिर व्हावे

५५ बहुजन समाज मराठा समाजाला पाठबळ देण्याचे काम करत आहेत. यामुळे मराठा भवन हे 'बहुजनांचे मंदिर' म्हणून नावारुपाला यावे. यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महिला सबलीकरणाठीची योजना आणि शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी पोषक माहिती केंद्र म्हणून याची ओळख व्हावी. मराठा भवनसाठी राज्य सरकारकडून सहा एकर तर, महापालिकेकडून वीस गुंठे जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. समाजातील दानशूर लोकांकडूनही भरघोस निधी देण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओला पार्किंगचा वेढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एजंटांच्या टपऱ्यांचा सभोवती पडलेला विळखा, कार्यालय परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहने, आरटीओ निरीक्षकांसमोरचा बेदरकारपणे चालविली जाणारी वाहने, मोटारसायकल व फोर व्हिलर पार्किंगच्यामधून अंग चोरून वाट काढत जाणारे अधिकारी, कर्मचारी असे दररोजचे चित्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दिसत आहे. जेथे नियमांची आखणी होते, तेथेच नियमांची पायमल्ली होत आहे. जबाबदार अधिकाऱ्यांच्या याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे आरटीओ कार्यालय परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जेथे नियम बनवले जातात, तेथे तरी किमान नियमांचे पालन व्हावे अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालते. नवीन वाहन नोंदणी, वाहनचालक परवाना, एनओसी, वाहन तारण कर्ज कमी करणे, वायू तपासणी, आदी स्वरूपाची कामे आरटीओ कार्यालयातून केली जातात. आरटीओ कार्यालयातून होणारी कामे करून देण्यासाठी येथे जवळपास शंभर-सव्वाशे एंजट कार्यरत आहेत. यासाठी काहींनी अनधिकृत केबिन उभारल्या आहेत. रस्त्यावर थाटलेल्या केबिनमुळे कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांना पार्किंग करताना जागेची अडचण येथे.

कार्यालयाच्या परिसरात वाहनतळ आहे. मात्र तेथे वाहनांच्या पार्किंगसाठी दिशादर्शक फलक किंवा पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे कार्यालयात आलेले नागरिक कोठेही आणि कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत तर अशा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे नागरिकांना कार्यालयात पोहोचताना अडचणीतून मार्ग काढावा लागतो. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अधिकारी, कर्मचारी चहा, जेवण यासाठी अनेकदा कार्यालयाबाहेर येतात; पण ते कोणालाही याबाबत मार्गदर्शन करताना दिसत नाही.

वाहनधारक आणि अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे येथे वाहनधारकांसाठी नियम तयार केले जातात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मनात आणले तर येथील पार्किंगला शिस्त लागू शकते. 'पण लक्षात कोण घेतो' अशीच स्थिती या कार्यालय परिसरात झाली आहे.

रस्त्याची प्रचंड दुरवस्था

महापालिकेच्या विविध योजनांतून शहरातील अनेक रस्ते चकाचक झाले आहेत. मात्र, आरटीओ कार्यालयासमोरील रस्ता म्हणजे उत्कृष्ट डर्ट ट्रॅकचा नमुना बनला आहे. खराब झालेला रस्ता आणि कडेला एजंटांच्या केबिनच्या झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहनधारकांना येथून जाताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चमत्काराला राष्ट्रवादीचा खो

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर ः वर्षभरापूर्वी असलेली​ भाजपची हवा राज्यात राहिले​ली नाही, मोदी नावाची जादू ओसरली आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाऊन टीकेचे धनी होण्यापेक्षा काँग्रेसच्याच हातात हात घालण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. राज्याच्या राजकारणाची दोन्ही काँग्रेसची पुढील वाटचाल काय राहील हे कोल्हापूर महापलिकेच्या राजकारणाने दाखवून दिले. राज्यात दुखावलेली शिवसेना अजूनही नाराज असल्याचा पुरावा या निवडीने दिला. याशिवाय किंगमेकर आपणच असल्याचे सिद्ध करताना भाजपच्या चमत्काराला राष्ट्रवादीने खो दिला. महापालिकेच्या या निवडीचे पडसाद नक्कीच विधानपरिषद निवडणुकीत उमटणार आहेत.

राज्यपातळीवर भाजप व राष्ट्रवादीची जवळीकता वाढली आहे. याच जोरावर महापालिकेत ताराराणी आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवत या दोन पक्षांची आघाडी करण्याचा बराच प्रयत्न झाला. पण निवडणुकीपूर्वीच गट्टी झालेल्या हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांना वेगळे करता आले नाही. कोल्हापूरच्या राजकारणात त्यांची मैत्री जगजाहीर आहे. मोठी राजकीय हुशारी असलेले मुश्रीफ प्रत्येकाच्या ताकदीचा वापर करत राष्ट्रवादीचे पाय रोवत आहेत. जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती आणि महापालिका अशा जिल्ह्यातील सर्व मोठ्या संस्थांमध्ये ते भागीदार आहेत. काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा ते उठवत आहेत. एकीकडे महाडिक आणि दुसरीकडे सतेज पाटील यांची मदत घेत ते राष्ट्रवादी बळकट करत आहेत. याउलट काँग्रेसचे नेते एकमेकांना पाण्यात पाहत आहेत, त्यातून पक्षाचे नुकसान होत आहे.

महा​पालिका राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे राष्ट्रवादीने सिद्ध केले आहे. राष्ट्रवादीमुळेच काँग्रेसच्या अश्विनी रामाणे महापौर झाल्या. हे करताना मुश्रीफ यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. सतेज पाटील यांच्या गटामुळे म्हणजे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष उमेश आपटे यांच्या मदतीमुळे मुश्रीफांची आमदारकी वाचली. याची जाणीव असल्याने गेले वर्षभर ते पैरा फेडण्याची संधी शोधत होते. महापौरपदाच्या निवडणुकीत ती मिळाली. सते​ज पाटील यांना सत्तेबाहेर ठेवण्याचे महाडिक यांचे प्रयत्न मुश्रीफांनी उधळवून लावले. केवळ पदाचा शब्द घेत जनसुराज्य आघाडीत प्रवेश केलेल्या मधुकर रामाणे यांना पाच वर्षांत मुश्रीफांनी एकही पद दिले नव्हते. सुनेला महापौर करून रामाणेंची नाराजी दूर केली. वर्षभरापूर्वी जी भाजपची हवा होती, ती आता राहिली नाही. त्यामुळे भाजपबरोबर जाऊन चार पावले मागे जाण्यापेक्षा काँग्रेसच बरा असे म्हणत आहे ती आघाडी कायम ठेवली. राष्ट्रवादी जर भाजपबरोबर गेली असती राज्यात चुकीचा मेसेज गेला असता, याची जाणीव राज्य पातळीवरील नेत्यांनाही होती, त्यामुळेच इच्छा असूनही त्यांनी मुश्रीफांना ताराराणीबरोबर जाण्याचा आदेश दिला नाही. पुढील राजकारणात दोन्ही काँग्रेस एक राहतील, हा मेसेज या निवडणुकीने राज्याला दिला आहे. विधानपरिषद निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

पाच वर्षे दोन्ही काँग्रेसची एकतर्फी सत्ता होती. आता मात्र भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाने प्रबळ विरोधक मिळाले आहेत. शिवाय राज्यात सत्ताही विरोधकांची आहे. यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना आणि सत्ताधारी नगरसेवकांना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये नवीन चेहरे आहेत. महिलांची संख्या जास्त आहे. अनुभवी चेहरे कमी असले तरी बरेच कारभारी महापालिकेत आले आहेत. त्यामुळे या कारभाऱ्यांच्या जीवावरच दोन्ही आघाड्यांचा कारभार चालणार आहे. दहा वर्षे ​पदाधिकारी निवडीत फारशी चुरस नसायची. आता मात्र प्रत्येक निवडीत रंग येणार आहे.

पडसाद विधानपरिषद निवडणुकीत

महापालिका निवडणुकीत मुश्रीफ व सतेज पाटील यांची गट्टी झाली. त्याचे पडसाद आता विधानपरिषदेत नक्की उमटणार आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आहे. आम्ही काँग्रेससोबत राहू, असे म्हणत मुश्रीफांनी अचूक बाण मारला आहे. काँग्रेसचा उमेदवार शक्यतो राष्ट्रवादीच्या शिफारशीवर ठरण्याची शक्यता आहे. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही मुश्रीफ यांच्या भूमिकेला अतिशय महत्त्व येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइन, हद्दवाढीला प्राधान्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट पाइपलाइन योजनेचे काम सुरू आहे. योजनेच्या कामास गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याला प्राधान्यक्रम राहील. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ अत्यावश्यक असून, याकरिता सरकार दरबारी पाठपुरावा करू. महापौर म्हणून काम करत असताना शहराचा विकास, पायाभूत सुविधांची पूर्तता आणि जलद प्रशासनाच्या माध्यमातून शहरवासीयांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबरोबरच टोल कायमपणे हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नूतन महापौर अश्विनी रामाणे यांनी दिली.

महिला स्वच्छतागृहे उभारणार

कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांचा मोठा ओघ आहे. रोज हजारो भाविक करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी आहे. नवरात्रोत्सव काळात तर भाविकांची संख्या लाखाच्या पटीत असते. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटक, भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. महिला भाविकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यात येतील. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता या बाबींना प्राधान्यक्रम असेल. महिला भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष घालणार आहे. शहरातील मार्केट, पार्किंगच्या जागा येथे स्वच्छतागृहे उभारू.

तीर्थक्षेत्र आराखड्याचा पाठपुरावा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महापौर म्हणून सरकारचे याकडे लक्ष वेधले जाईल. शहरात कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. कचरा प्रकल्पातील अडचणी दूर करून कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी काम करू. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात आज विविध प्रकल्प सुरू आहेत. शहरवासीयांना सुविधा देण्यासाठी हे प्रकल्प मुदतीत पूर्ण होणे गरजेचे आहे. विकास प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्नशील असणार आहे. सरकारने विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करावा याकरिता पाठपुरावा करणार आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी काम करेन.

..........

महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जनतेशी संवाद साधला. लोकांच्या चांगल्या सूचनांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे. जनतेशी संवाद साधून तयार केलेल्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची कसोशीने अंमलबजाणी करून शहर विकासाला गती देणाऱ्या प्रकल्पाची पूर्तता करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुराज पाटील यांचे प्रोजेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांचे प्रोजेक्शन पाटील गटाने केले. ऋतुराज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सुरू होती. कोल्हापूरच्या राजकारणात महादेवराव महाडिक-धनंजय महाडिक या काका-पुतण्यांच्या प्रभावाबरोबर आता सतेज पाटील-ऋतुराज पाटील या काका-पुतण्याच्या राजकारणाचा प्रभाव भविष्यात कसा राहिल याची चर्चा रंगली होती.

महापौरपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चत्मकाराची घोषणा केली असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने चांगलीच खबरदारी घेतली. काँग्रेसकडून माजी मंत्री पाटील यांच्यासह नगरसेवक शारंगधर देशमुख, सुभाष बुचडे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण हे लक्ष ठेऊन होते. त्यात नंतर ऋतुराज पाटील यांचाही समावेश झाला.

सोमवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कराडहून कोल्हापुरात आणताना ऋतुराज यांची उपस्थिती ठळक जाणवत होती. नेत्यांसह ऋतुराज पाटील यांनीही पिवळा फेटा बांधला होता. त्यांचे धाकटे बंधू पृथ्वीराज फॉर्मल ड्रेसमध्ये होते. ऋतुराज यांच्यासमवेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. निवड प्रक्रिया सुरू झाल्यावर सतेज पाटील चौकातून गेल्यानंतर माजी नगरसेवकांसह विद्यमान नगरसेवकांच्या नातेवाईकांनीही ऋतुराज पाटील यांच्यासोबत उपस्थित होते. ऋतुराज सभागृहातील घडामोडींची माहिती पाटील घेत होते. रामाणे महापौर झाल्याची घोषणा होताच समर्थकांनी ऋतुराज यांना खांद्यावर उचलून चौकात जल्लोष केला. निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऋतुराज शेवटपर्यंत थांबून होते.

महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला निवडीनंतर सभागृहातून बाहेर आल्यावर त्यांनीही ऋतुराज यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. काही कार्यकर्त्यांनी ऋतुराज आणि महापौर रामाणे यांचे पती अमर यांना खांद्यावर उचलून घेऊन जल्लोष केला. महापालिकेच्या राजकारणात ऋतुराजही सक्रीय झाल्याची चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दगडात दोन पक्षी?

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : शिवसेना सोबत येईल या आशेवर भाजप-ताराराणी आघाडीने शेवटपर्यंत चालवलेल्या प्रयत्नांवर शिवसेनेने तटस्थता स्वीकारून पाणी फेरण्यास सहाय्यच केले. भाजपबरोबर स्थानिक पातळीपासून राज्यपातळीपर्यंत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ही सावध भूमिका असली तरी भाजप-ताराराणी आघाडीला बहुमताच्या आकड्यापासून दूर ठेवून ती एकप्रकारे काँग्रेस आघाडीला मदतच झाली आहे. या पवित्र्यामुळे निवडणुकीपूर्वीची काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या छुप्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बहुमत असले तरी भाजप-ताराराणी आघाडीने सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्न चालवले होते. राष्ट्रवादीने एकसंधपणे पाठिंबा द्यावा असे प्रयत्न होते. पण ते होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अपक्ष, शिवसेनेचे चार व उर्वरित काही अस्वस्थ नगरसेवकांना सोबत घेण्याचेही प्रयत्न सुरू होते. त्यासाठी चाचपणी सुरू होती. यामध्ये शिवसेना सोबत येईल, अशी अपेक्षा भाजपची होती. एकप्रकारे त्यांना गृहित धरले जात होते. ​शिवसेनेने मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणासोबत जायचे हे उघड केले नसल्याने भाजप-ताराराणी आघाडीची कोंडी झाली. त्यांचे चार नगरसेवक मिळाले असते तर बहुमतापर्यंत पोहोचण्याचा फरक कमी झाला असता व जोडण्या करण्यास आणखी वेग आला असता. शिवसेनेने शेवटी निर्णय घेऊन भाजपचा हा वेग थोपवून ठेवला. कदाचित सेनेचा निर्णय भाजपच्या बाजूने झाला असता तर सोमवारची परिस्थिती काही वेगळी पाहायला मिळाली असती.

एकमेकांवर जोरदार आरोप करून शेवटी पाठिंबा द्यायचा ही भूमिका घेतल्यास आणखी वेगळ्याप्रकारे चर्चा होईल हे सावध कारण भाजप-ताराराणी आघाडीला पाठिंबा न देण्यामागे आहे. पण त्याबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबतही न जाता पक्षाची हिंदुत्ववादाची भूमिकाही जपली आहे. भाजप, शिवसेनेतील राजकारणाचे हे परिणाम म्हणता येत असले तरी या निवडणुकीच्यानिमित्ताने भाजपने गृहित धरून काही नियोजन करू नये असा एकप्रकारे संदेशच शिवसेनेने दिला आहे. या दोन पक्षांतील दुराव्यामुळे येथील सत्ता दुरापास्त झाली. त्यांची सावध भूमिका असली तरी दुसरीकडे काँग्रेस आघाडीच्या बहुमताला धक्का बसण्यापासून वाचवणारी ठरली असेही दिसते. सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक स्वतंत्र बसणार असल्याने त्यांना महापालिकेतील काही पदांना मुकावे लागणार आहे; पण त्यांची भूमिका कारभारात महत्त्वाची ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक, पी.एन. आणि आवाडेंची गट्टी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषदेसाठी आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्या, तिकीट द्याल त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील, असे सांगत काँग्रेसच्या तीन नेत्यांनी पुन्हा तिघांची गट्टी दाखवून दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेत आमदार महादेवराव महाडिक व पी.एन. पाटील यांनी सतेज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. परदेशात असलेल्या प्रकाश आवाडे यांनी चव्हाण यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधत या दोघांची भूमिका मान्य असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उमेदवारीबाबत मंगळवारी (ता. १७) सर्व नेत्यांची अधिकृत बैठक होणार आहे.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. या उमेदवारीसाठी महाडिक यांच्यासह पी.एन., सतेज पाटील व प्रकाश आवाडे हे चौघे इच्छुक आहेत. सतेज पाटील व महाडिक यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मंगळवारी उमेदवार निवडीसाठी मुंबईत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस आवाडे वगळता तिघे इच्छुक व जयवंतराव आवळे, मालोजीराजे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाडिक व पी.एन. यांनी चव्हाण यांची भेट घेतली. उमेदवारी आमच्या तिघांत कोणालाही द्या, निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील असे सांगत सतेज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्यास आपण बंडखोरी करू असा इशारा महाडिक यांनी दिला. आवाडे हे परदेशात आहेत. त्यांनीही आपण पी.एन. व महाडिक यांच्यासोबत आपण असल्याचे चव्हाण यांना सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षात उमेदवारीबाबत रस्सीखेच आहे, शिवाय गटबाजी देखील असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंगळवारी सर्व नेत्यांशी एकत्रित बोलण्याचे ठरले. चर्चेनंतर एकमत झाल्यास एकच नाव दिल्लीत पाठवण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरला उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात मंगळवारी राष्ट्रवादीची कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हायचं होतं सीए, झाल्या महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉमर्स कॉलेजमधून इंग्रजी माध्यमातून बी. कॉमची पदवी घेतलेल्या अश्विनी यांना खरेतर सी. ए. क्षेत्रात करिअर करायचे होते. पदवी घेतल्यानंतर त्यांचा अमर रामाणे यांच्याशी विवाह झाला अन् करिअरची दिशाच पालटली. सीए होण्यासाठी पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अश्विनी यांना सासऱ्यांच्या प्रभागातील महिला आरक्षणामुळे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली अन् मग निवडणुकीतील विजयासह महापौरपदाची माळही गळ्यात पडली. कोल्हापूरच्या सर्वात कमी वयाच्या महापौर असलेल्या अश्विनी पुढील महिन्यात आपला २२ वा वाढदिवस साजरा करतील.

अश्विनी यांचे वडिल रामचंद्र भोगम हे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे तर सासरे मधुकर रामाणे हे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक. दोन्ही कुटुंबांतील राजकीय पार्श्वभूमीमुळे आश्विनी यांना निवडणूक फारशी अवघड गेली नाही. मात्र गेल्या आठवड्यापासून उत्सुकता आणि राजकारणातील उलथापालथीमुळे मानसिक तणावात असलेल्या रामाणे, भोगम कुटुंबियांनी सोमवारच्या निवडीनंतर जल्लोष केला. कुटूंबियांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. लेकीच्या यशाचे कौतुक करताना आई बाळाबाई यांनी अश्विनी यांना मारलेली मिठी आणि औक्षण करताना सासू विमल यांचे पाणावलेले डोळे गेल्या काही दिवसांतील अस्वस्थता स्पष्ट करून गेले.

दहा वर्षांपासून नगरसेवकपद भूषविलेले मधुकर रामाणे यांना पहिल्या पाच वर्षात विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र, गेल्या पाच वर्षात त्यांना कोणतेच पद मिळाले नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत ते एकनिष्ठ राहिले. प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्यानंतर त्यांनी सून आश्विनी यांना संधी दिली. महापौरपदही याच प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षीत असल्याने नियोजनबद्ध प्रचारातून विजयश्री खेचून आणली. महापौरपदाच्या पहिल्या चर्चेत स्वाती यवलुजे यांच्यासह आश्विनी यांचे नाव पुढे आले. त्यानंतर रामाणे, भोगम कुटुंबीयांनी आपापली रणनिती आखत नेत्यांकडून महापौरपदासाठी ग्रीन सिग्नल मिळवला. भाजप-ताराराणी आघाडीच्या चमत्काराच्या अपेक्षेने दोन्ही कुटुंबात अस्वस्थता होती. सोमवारच्या निवड प्रक्रियेवेळी महापालिकेच्या चौकात रामाणे पिता-पुत्र तर दुसरीकडे भोगम पिता-पुत्र सभागृहातील संदेशाची वाट पाहत होते. विजयाची वाट सूकर झाल्याचे दिसताच त्यांनी एकमेकांना अलिंगन देत आनंद व्यक्त केला. निवडीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे आणि डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष केला. अजिंक्यतारा कार्यालयात माजी मंत्री पाटील यांची भेट घेऊन रामाणे कुटुंबीयांनी कळंब्यात अंबाबाईचे दर्शन घेतले. अवघ्या काही क्षणांच्या भेटीत आई-लेकींच्या अलिंगनामुळे उपस्थितही गहिवरले. नंतर प्रभागात अभिवादन करून सुमारे सहा तासाच्या मिरवणुकीनंतर त्या रायगड कॉलनीतील निवासस्थानी दाखल झाल्या.

चर्चा 'चमत्कारा'ची

बिन आवाजाचा बॉम्ब फुटल्याचा साक्षीदार असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे चौकात सोमवारी दुपारपर्यंत चमत्काराचीच चर्चा सुरू राहिली. अखेरच्या क्षणी भाजप - ताराराणी आघाडीकडून चमत्कार घडेल की काय? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चमत्काराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता कराडहून काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयात आले. तेथून नगरसेवकांना फेटे बांधून आरामबसमधून महापालिकेत आणण्यात आले. सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी महापौर आर. के. पोवार, प्रा. जयंत पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्या ४४ नगरसेवक महापालिकेत आले. नेत्यांनी पिवळे तर नगरसेवकांनी गुलाबी फेटे बांधले होते. ‍‍त्यानंतर सर्वांच्या नजरा भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांकडे लागल्या होत्या. पावणेअकरा वाजता आरामबसने भाजप - ताराराणीचे आघाडीचे नगरसेवक आले. भाजपच्या नगरसेवकांच्या गळ्यात भाजपचे कमळ चिन्ह असलेले तर ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या गळ्यात कपबशीचे पिवळ्या रंगाचे स्कार्फ होते. ताराराणी आघाडीचे कारभारी माजी महापौर सुनील कदम यांनी आघाडीच्या विजयाच्या घोषणा दिल्याने वातावरण बदलले. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांनी घोषणांनी प्रत्युत्तर दिले. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावरही चौकात चमत्काराची चर्चा सुरू होती. महापौरपदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहणार असल्याची माहिती मिळताच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता कमी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसच्या अश्विनी रामाणे महापौर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चमत्काराची भाषा व नगरसेवक फोडाफोडीच्या शेवटपर्यंत सुरु असलेल्या चर्चेमुळे प्रचंड उत्सुकता ताणल्या गेलेल्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने भाजप, ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करत बाजी मारली. महापौरपदासाठी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांनी भाजपच्या सविता भालकर यांचा तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांनी ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांचा ४४ विरुद्ध ३३ मतांनी पराभव केला. चर्चेप्रमाणे भाजप, ताराराणी आघाडीकडून काहीच चमत्कार घडला नाही. पण शिवसेनेचे चार नगरसेवक शेवटच्या क्षणी तटस्थ राहिल्याने भाजप, ताराराणी आघाडीला बहुमताच्या आकड्यापासून बरेच दूर रहावे लागले.

अश्विनी रामाणेंनी सर्वात तरुण महिला महापौर होण्याचा मान मिळवला आहे. शेवटपर्यंत काहीही घडू शकते असे सांगत हवा निर्माण केलेल्या विरोधकांमुळे निवडणूक होईपर्यंत सभागृहात तसेच महापालिका आवारात तणाव जाणवत होता. दोन्ही निवडणुकांसाठी हात वरुन करुन घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेमुळे तब्बल दोन तासांचा वेळ खाल्ला. यामुळे एक वाजेपर्यंत समर्थकांना ताटकळत उभे रहावे लागले. विजयी उमेदवारांची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणीत जल्लोष सुरु केला.

सकाळी साडेदहा वाजता सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांचे गुलाबी फेटे बांधून महापालिकेत आगमन झाले. तर अकराला पाच मिनिटे शिल्लक असताना भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक दाखल झाले. अकरा वाजता जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. महापौरपदाच्या निवडीला सुरुवात केल्यानंतर माघारीसाठी वीस​ मिनिटांची मुदत देण्यात आली. त्यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी भाजप, ताराराणी आघाडीला उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. पण पीठासन अधिकाऱ्यांनी माघारीच्या मुदतीमध्ये असे आवाहन करता येणार नाही, असे सांगत त्यांना थांबवले. भाजप, ताराराणी आघाडीचे विजय सुर्यवंशी यांनीही आक्षेप घेतला. त्यानंतर महापौरपदासाठी ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांचा अर्ज माघार घेऊन भाजपच्या सविता भालकर यांची उमेदवारी ठेवण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या अश्विनी रामाणे व सविता भालकर यांच्यासाठी हात वरुन करुन मतदान घेतले. त्यामध्ये रामाणे यांना ४४ तर भालकर यांना ३३ मते पडली. त्यानंतर उपमहापौरपदासाठीची प्रक्रिया सुरु केली. त्यावेळी भाजपचे संतोष गायकवाड यांचा अर्ज माघार घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला व ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके यांच्यात निवडणूक झाली. त्यामध्येही मुल्ला यांना ४४ व शेळके यांना ३३ मते पडली. ही प्रक्रिया सुरु असताना शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यांनी मतदानात भाग घेतला नाही. भाजप व ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा अकरा मतांनी पराभव केल्यानंतर काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी विजयाच्या घोषणा दिल्या.

तणाव

निवडणुकीसाठी नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण वेगावले असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कारभाऱ्यांमध्येही अस्वस्थता होती. काहीही होऊ शकते, असे सांगितले असल्याने व अगदी रविवारी रात्रीही भाजप, ताराराणी आघाडीकडून सभागृहात महापौर आमचाच होणार हे सांगितल्याने ती अस्वस्थता आणखीनच वाढली होती. नगरसेवक खरोखरच फुटणार का याची शंका उपस्थित केली जात होती. त्यामुळे सभेचे कामकाज सुरु झाल्यापासून कारभारी नगरसेवकांच्या चेहऱ्यावर तणाव जाणवत होता. शिवसेनेचे नगरसेवक आले नसल्याने काँग्रेस आघाडी थोडी निवांत झाली. भाजप, ताराराणीच्या गोटात मात्र शांतता होती.

थेट पाइपलाइनने शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आपण प्राधान्य देऊ. याबरोबरच टोलचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो तातडीने सुटावा यासाठी प्रसंगी नगरसेवकांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे. - अश्विनी रामाणे, नूतन महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द : प्रवाशांचा गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीची सुटी संपून मुंबईला तसेच इतरत्र जाण्यासाठी मोठा आटापीटा करून मिळवलेले रिझर्व्हेशन आणि मंगळवारी दुपारी अचानक रद्द झालेली महालक्ष्मी एक्सप्रेस यामुळे प्रवाशांना मंगळवारी अभुतपूर्व गोंधळाला सामोरे जावे लागले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांना पुढे कसे जायचे याचा प्रश्न पडला. अनेकांनी महागड्या खासगी आराम बस, एसटीचा पर्याय स्वीकारला.

चेन्नई तसेच आंध्र प्रदेशमध्ये पावसाने झोपडून काढले आहे. अनेक​ ठिकाणी पाणी साठल्याने रस्ते तसेच रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. तिरुपतीहून कोल्हापूरला येणारी हरिप्रिया एक्सप्रेस रेल्वे रात्री मुंबईसाठी महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणून पाठवली जाते. पावसामुळे तिरुपतीहून दुपारी येणारी हरिप्रिया एक्सप्रेस तब्बल बारा तास उशिरा येणार आहे. त्यामुळे रात्रीची महालक्ष्मी एक्सप्रेस सोडणे शक्यच नसल्याने प्रशासनाने दुपारी महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द केल्याचा फलक स्टेशनमध्ये लावला. अनेक प्रवाशांना त्याची कल्पना नव्हती.

सुटी संपली असल्याने पूर्वी जसे ​रेल्वेचे आरक्षण मिळाले आहे, तसे मुंबईला जाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार अनेकजण कुटुंबियांसमवेत साहित्यासह स्टेशनवर दाखल होत होते. जिल्ह्याच्या विविध भागातून अशा प्रकारे येत असलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडण्यास सुरुवात झाली. अनेकांनी स्टेशनवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढे काय करायचे हे समजत नसल्याने अनेकांची धावाधाव होत होती. त्यांना मुंबईला जाण्यासाठी पर्याय सुचवण्यात येत होते. सातनंतर तर प्रवाशांची गर्दी होऊ लागली. रेल्वे रद्द केली असल्याने नियमाप्रमाणे तिकिटाचे पैसे देण्याची व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे आरक्षण कार्यालयात आरक्षण करण्यापेक्षा रिफंड घेण्यासाठीच जादा रांग होती.

प्रवाशांना उशिरा मिळणाऱ्या माहितीमुळे रेल्वे सुटण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांची गर्दी वाढतच होती. नेहमी आठ वाजता आरक्षण कार्यालय बंद होते. पण ही रेल्वेच आठ वाजून २० मिनिटांनी सुटणार असल्याने त्याला येणाऱ्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्यासाठी नऊ वाजेपर्यंत आरक्षण कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. अनेकांनी तिकिटाचे पैसे घेऊन रात्री सह्याद्री एक्सप्रेसने जाण्याचा मार्ग अवलंबला तर काहींनी एसटी, खासगी आराम बसचा मार्ग अवलंबला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून कुरघोड्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यातील शेतीला पाणी देण्यावरून सध्या तालुक्यातील तीन नेत्यांमध्ये परस्परांवर कुरघोडी करण्याची चढाओढ सुरू आहे. तिन्ही नेत्यांनी या प्रश्नी समन्वयाने मार्ग काढावा, अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करीत आहे.

चांदोली धरणातून वाकुर्डे बुद्रुक योजनेद्वारे परिसरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या पाणीपट्टी थकल्याने योजना बंद आहे. योजनेची थकबाकी २३ लाख रुपयांची होती. त्यापैकी १० लाख रुपये आतापर्यंत वसूल झाले आहेत. या बाबत नुकतीच आमदार शिवाजीराव नाईक यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एक डिसेंबरपासून धरणातून पाणी सोडावे, अशी सूचना आमदार नाईक यांनी केली. त्यावर थकबाकीचा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. ही थकबाकी बड्या शेतकऱ्यांकडे आहे. ती वसूल करण्यासाठी छोट्या शेतकऱ्यांवर अन्याय करू नये. जाणीवपूर्वक थकबाकी ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचीच कनेक्शन तोडावीत, असे नाईक यांनी सुचवले.

माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार नाईक यांच्या विरोधात भूमिका पाडळी येथील एका कार्यक्रमात घेतली. आमदार विकासाच्या आड येत आहेत, असा आरोप मानसिंगराव नाईक यांनी केला. पाणीपट्टी भरल्यानंतरच पाणी सोडण्याचा पाटबंधारे विभागाचा हट्ट असल्यास विश्वासराव नाईक कारखाना सर्व थकीत पाणीपट्टी भरेल, अशी कुरघोडी त्यांनी केली.

त्याच गावातील अन्य एका कार्यक्रमात सत्यजित देशमुख यांनी, मोरणा धरणात पाणी नसाताना आमदारांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची भाषा करणे हा विश्वासघात असल्याची टीका केली. चांदोली धरणाचे पाणी विनामोबदला मोरणा धरणात सोडण्यासाठी आपण संघर्ष करू, असे देशमुख यांनी जाहीर केले.

कोणतीही निवडणूक नसताना नेत्यांमधील या वाग्युद्धाने सामान्य जनता मात्र गोंधळात पडली आहे. नेत्यांनी वाद घालण्याऐवजी समन्वयाने मार्ग काढण्याची अपेक्षा परिसरातील रहिवासी व्यक्त करीत आहेत.

वाद जुनाच

पाण्याच्या प्रश्नावरून शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वाद जुनाच आहे. पूर्वी दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदाद पाटील आणि दिवंगत ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्यात चांदोली धरण खुजगावात उभारायचे की चांदोलीत यावरून वाद झाला होता. वादाची हीच परंपरा पुढील पिढ्यांतील नेत्यांनीही कायम राखली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोरमध्ये पाण्यासाठी शिमगा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, भोर

भोर शहरांत ऐन दिवाळीत जुन्या योजनेची मुख्य पाणी वितरण जलवाहिनी फुटल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना शिमगा करावा लागला. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबिजेनंतर दोन दिवसाने अनेक भागांत पिण्याचे पाणी नागरिकांना मिळाले नाही. ज्या घरांत पाणी साठविण्याची पुरेशी सोय नाही अशा घरांतील नागरिकांना आंघोळीसाठीही पाणी मिळाले नाही.

१९७२ व १९८६ मध्ये लाखो रुपये खर्चून शहरासाठी पाणीपुरवठा योजना भाटघर धरणाच्या पाण्यावरून राबविण्यात आल्या. या दोन्ही योजना सदोष निघाल्या. त्यातच शहराचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेउन दोन वर्षापूर्वी चार कोटी रुपये खर्चून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र,त्यानंतरही नागरिकांची पाणी समस्या समाधानकारक प्रकारे सुटलेली नाही.

नव्या योजनेत अनेक कामे अपुरी राहिलेली आहेत. स्टार्टर खराब होणे, पंप बिघडणे,मोटार जळणे, जुन्या योजनेतील जलवाहिनी फुटणे, वीज पुरवठा खंडित होणे या तक्रारी सतत होतात. त्यामुळे महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा हमखास बंद होतो.

तिसरी योजना भाटघर पंपहाउसपासून राबविली गेली. त्यामध्ये जिंदाल कंपनीची डी. आर. प्रकारातील सात किमी लांबीची आणि १२ इंच व्यासाची मुख्य जलवाहिनी, ९० अश्वशक्तीचे दोन पंप, १२ व ४ लाख लिटर क्षमतेच्या दोन पाणी साठवण टाक्या यांचा समावेश आहे. त्याला पूरक म्हणून जून्या योजनेतील सिमेंटची मुख्य जलवाहिनी, तसेच चार व सात लाख लिटर क्षमतेच्या पाणी साठवण टाक्यांचा उपयोग केला आहे. दोन्ही जुन्या टाक्या मोठ्या प्रमाणात गळत आहेत. त्यामुळे नव्या साठवण टाक्या पूर्ण भरल्या जात नाहीत. गेल्या आठवडयात भोर इंडस्ट्रीज जवळ जुनी जलवाहिनी फुटली. त्यामुळे ऐन दिवाळीत पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. त्यामुळे नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली.

पाणी योजनेसाठी निधीची कमतरता

जुन्या योजनेतील सात किमी लांबीची पाइपलाइन बदलणे व दोन्ही टाक्यांची गळती काढणे या उपाय योजनांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, ही समस्या सोडविण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ आणि निधी दोन्ही गोष्टींची भोर नगरपरिषेदकडे कमतरता आहे. सध्या नगरपरिषदेत ७५ मंजूर पदांपैकी ३६ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये राज्यस्तरीय संवर्ग ६, वर्ग-३ मधील १६ वर्ग-४ मधील १४ यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रब्बी हंगामही येणार धोक्यात

$
0
0

सांगली जिल्ह्यात शाळूसह इतर पिके अडचणीत

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पावासाअभावी जिल्ह्यातील खरीप हंगाम तर वाया गेलाच, आता रब्बी हंगामही वाया जाण्याची चिन्हे आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे शाळूसह इतर पिके अडचणीत आली आहेत.

जिल्ह्यात रब्बी हंगामात या हंगामात शाळू ज्वारीचे प्रमुख पीक घेतले जाते. शिवाय मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, भुईमूग ही पिके घेतली जातात. पाण्याअभावी ही पिके कशी जगवायची या विचाराने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. सलग तिसरा रब्बी हंगाम हातचा जाण्याची यावेळी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ८ हजार हेक्टर आहे. खरीप हंगाम गेल्याने रब्बीचे क्षेत्र काहीसे वाढले; पण आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही. जिल्ह्यात सरासरी ५११ मिलिमीटर पाऊस होत असताना यावेळी ३५८ मिलिमीटर पाऊसच झाला. जिल्ह्यात रब्बीसाठी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज व तासगावचा पूर्व भाग आणि खानापूर तालुक्यातील क्षेत्र उपलब्ध आहे, पण पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. आता थोडी थंडी पडू लागली आहे, त्याचा या पिकांना कसा व किती फायदा होतो हे यावर हंगामाचे चित्र अवलंबून आहे. बरीचशी पिके कोमेजून चालली आहेत. सध्याच्या स्थितीत येत्या १५ दिवसांत पाऊस न झाल्यास रब्बी हंगाम वाया जाईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगोली, पिळणी परिसरात हत्तींचा उच्छाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

भोगोली, पिळणी (ता. चंदगड) येथील परिसरात गेले काही दिवसापासून हत्तींच्या कळपाचे वास्तव्य असून त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. हत्तींच्या कळपासून भात, नाचणा, केळी व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तींच्या रोजच्या त्रासाला बळीराजा कंटाळला असून नुकसान भरपाई नको, पण हत्ती आवरा, अशी मागणी नागरिकांची आहे.

वाढत्या महागाईने शेतकरी त्रस्त असताना मेहनत व पैसा वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वन विभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी असल्याने नुकसान भरपाई नको, मात्र हत्तींचा आवरा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यामध्ये रावजी देसाई यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रसंगी शेती केली आहे. मात्र हत्ती व गव्याकडून होणाऱ्या रोजच्या नुकसान भरपाईमुळे शेतकरी त्रासून गेला आहे. वनविभाग केवळ आश्वासना पलिकडे काहीही करत नसल्याचे दिसत आहे.

भोगोली व पिळणी परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भात पिकांची मळणी करण्यासाठी पिकांची कापणी केली आहे. कापलेले भात एकत्र करुन त्याच्या गंजी घातल्या आहेत. दीपावली सण झाल्यानंतर शेतकरी मळणी करण्याच्या विचारात असतात. मात्र, याच दरम्यान गेले दोन दिवस हत्तीने भोगोली गावातील शेतकऱ्यांच्या भाताच्या गवत गंजींचे मोठे नुकसान केले आहे. सर्वत्र भात इतरत्र फेकून, खावून, तुडवून नाश केले आहे. तसेच बैलगाड्यांचेही नुकसान केले आहे. रखवालीसाठी तयार केलेल्या झोपड्या तोडून उद्ध्वस्त केल्या आहेत. या प्रकारामुळे भोगोली व पिळणी परिसरातील सर्वच शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायसंकुलाचा ताबा दोन आठवड्यांत

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर : शहरातील वास्तूसौंदर्यात भर घालणाऱ्या नवीन न्याय संकुलाचे काम पूर्ण झाले असून दोन आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतराची प्रक्रिया जिल्हा न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. न्याय संकुलाचे उद्घाटन नवीन वर्षात होण्याची शक्यता असली तरी खंडपीठ मागणीचा आंदोलनामुळे उद्घाटनाला खो बसू नये यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

कसबा बावडा रोडवर सहा मजली न्यायसंकुलाची देखणी इमारत पूर्ण झाली आहे. ७ सप्टेंबर, २००७ मध्ये न्यायनगरीच्या मोकळ्या जागेत न्याय संकुल उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर १४ ऑगस्ट, २००९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची वर्कऑर्डर काढली. न्याय संकुलासाठी ३१ कोटी रूपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला. १४ ऑगस्ट २०११ मध्ये काम पूर्ण करण्याची मुदत होती पण निधीच्या अडचणीमुळे काम करण्याची मुदत २०१३ पर्यंत वाढवली. तत्कालिन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ३१ कोटीचा निधी मंजूर केला. ३१ कोटीचा खर्च ५५ कोटीपर्यंत वाढल्यानंतर वाढी निधी मंजूर करण्यात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याने इमारत व फर्निचरचे काम पूर्ण झाले.

२५ हजार ३३० स्केअर मीटरवर सहा मजली इमारत पूर्ण झाली असून पार्किंगची सोय झाली. या इमारतीत ४३ न्यायालय एकत्रित होणार आहेत. त्यामुळे न्यायाधीश वकिल, कर्मचारी, पक्षकार हे एका छत्राखाली येण्यास मदत होणार आहे. न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्याने हस्तांतरणाची प्रक्रियाही सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे.

हस्तांतरण झाल्यावर जिल्हा न्यायालयाच्या ताब्यात ही इमारत येणार आहे. या इमारतीच्या स्वच्छता व मेंटेनन्सचा खर्चाबाबत तरतूद करण्यासाठी जिल्हा न्यायालयाला करावी लागणार आहे. न्यायालयाचे उद्घाटन झाल्यानंतर सीपीआर हॉस्पिटलसमोरील जिल्हा न्यायालयाच्या आवारातील सर्व न्यायालये व शहरात अन्य ठिकाणी असलेली न्यायालये नवीन न्याय संकुलात शिफ्ट केली जाणार आहे. पण मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन होण्यासंबधी आंदोलन सुरू असल्याने उद्धाटन कार्यक्रमात आडकाठी होण्याची शक्यता आहे. सर्किंट बेंच स्थापन होईपर्यंत सर्व कार्यक्रमावर बार असोसिएशनने बहिष्कार घातला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समन्यायी’च्या निविदेला मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

निसर्गातील पाण्यावर सर्वांचाच समान हक्क आहे. ही संकल्पना घेवून गावातील सर्वानाच समान पाणी देवून पाणी बचतीसह सर्वांचाच शाश्वत विकास करणारा, देशातील पथदर्शी चिकोत्रा खोरे समन्यायी पाणी वाटप योजनेंतर्गत आजरा तालुक्यातील बेलेवाडी (हुबळगी) व भुदरगडमधील बामणे या दोन गावच्या योजनांसाठी सात कोटी रुपयांची 'क' वर्गातील निविदा काढण्यास सरकारने मंजुरी मंजूरी मिळाली. समन्यायी पाणी हक्क परिषदेचे कार्याध्यक्ष व श्रमशक्ती प्रतिष्ठानचे संस्थापक आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत काळम्मा बेलेवाडी(ता. कागल) येथे ही माहिती दिली.

पाटील म्हणाले, 'देशातील पथदर्शी समन्यायी पाणी वाटप प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील योजनेची निविदा काढण्यास मंजूरी मिळाल्याने सात कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात होईल. त्याची 'क' निविदा असल्याने प्रकल्प कमी रक्कमेत होईल. शिवाय ठेकेदाराला प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय रक्कम मिळणार नसल्याने काम सुरु झाल्यावर ते गतीने होईल. सद्या चिकोत्रा प्रकल्पावरील पाणी परवाना असलेले क्षेत्र वगळून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यामध्ये काळम्मा बेलेवाडी, बेलेवाडी हुबळगी, बेगवडे, बामणे, तमनाकवाडा व धामणे या गावांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात बेलेवाडी हुबळगी व बामणे या दोन गावातील योजनेसाठी निविदा काढण्यास शासनाची मंजूरी मिळाली आहे. दोन गावातील ३७७ हेक्टर क्षेत्राचा त्यात समावेश आहे. संपूर्ण योजनतेत शेतीला ठिबक सिंचनानेच पाणी दिले जाणार आहे. क्षेत्रानुसार पाणी नव्हे तर मानसी पाणी वाटपाची ही नवी संकल्पना आहे. माणसी आठशे घनमीटर प्रमाणे पाणी मिळणारी ही योजना आहे.'

पाटील म्हणाले,'चिकोत्रा प्रकल्पाचे काम एक मे १९९७ मध्ये सुरु झाले. त्यानंतर प्रकल्पाचे काम पूर्ण होत असतानाच ही समन्यायीची संकल्पना घेऊन आतापर्यंत १५ वर्षे लढा दिल्यावर निविदा मंजूरीपर्यंतचे यश मिळाले आहे. अनेकवेळा बैठका, परिषदा झाल्या. सरकारी अधिकारी, मंत्री यांच्याकडे दाद मागावी लागली, योजना समजून द्यावी लागली. अजूनही अधिकारी आणि मंत्री यांच्या सहकार्याची गरज आहे. लोकांना प्रकल्प समजून देऊन पाणी वाचविणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे येवढेच आमचे ध्येय आहे. यात निश्चितपणे यशस्वी होऊ. शेती नसली तरी प्रत्येकाचा पाण्यावर हक्क आहे. त्यामुळे भूमिहिनांनाही पाणी मिळेल. या दोन गावात चार कुटुंबातील केवळ अठरा व्यक्ती अशा आहेत फयांमया वाट्याला शेती नाही. त्यामुळे हा प्रश्न गौन राहणार आहे. नदीपासून २५ मीटर उंची पर्यंत भीजक्षेत्र आहे. सद्या येथे ऊस पीकच आहे. त्या पलिकडील शेतीसाठी या योजनेतून पाणी मिळणार आहे. त्यामयामध्ये ५० मीटर व पुढे ७५ मीटरपर्यंत उंचीवरील शेती नियोजनाने होईल. त्याला योग्य ते पाणी मिळेल. या योजनेमुळे ज्यांच्या जुन्या सिंचन योजना आहेत, त्यांनी विरोध करण्याचे कारणच नाही.' यावेळी श्रमशक्ती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आर. बी. पाटील, चिकोत्रा खोरे सहकारी पाणलोट व्यवस्थापन व पाणीवापर संस्था संघाचे उपाध्यक्ष किशोर मेस्त्री, भरत पाटील, भारतीय जनता युवा मंचचे विनायक परुळेकर, आर. के. पाटील उपस्थित होते.

असे असेल पाणीवाटप

या प्रकल्पाअंतर्गत बामणे (१३७ हेक्टर),बेलेवाडी हुब्बळगी(२४० हेक्टर) वर स्वंचलीत ठिबक यंत्रणेने सध्याचे लाभक्षेत्र दुप्पट करुन पाणी मिळणार आहे. ८० टक्के रक्कम शासन अनुदान देणार असून लाभार्थीने पाच टक्के रोख आणि १५ टक्के बँक कर्ज याप्रमाणे २० टक्के रक्कम भरावयाची आहे. गावातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाला किमान एक ते अडीच एकर पर्यंत पाणी मिळणार असून निराधार महिलाना १० गुंठे, भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकरी याना प्रत्येक कुटुंबाला एक एकर प्रमाणे गावातील सहकारी पाणलोट व्यवस्थापन व पाणी वापर संस्था मोठ्या शेतकर्यांकडून तीन वर्षाजकया खंडाने जमिनी मिळवून देणार आहे. यामुळे गावात कोणीही वंचित रहाणार नाही. संगणकाच्या सहाय्याने स्वयंचलित ठिबकने पाणी मिळणार असल्याने प्रति ईस्त्रायल प्रमाणे सर्वच कुटूंबाना याचा लाभ होणार आहे. खते,पाणी,मजूर खर्च वाचवून एकरी एक लाख रुपये उत्पन्नाचे उदिष्ठ आहे. प्रति व्यक्ती ८०० घनमीटर पाणी या प्रकल्पांतर्गत मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रान्स्पोर्ट, फर्निचरमध्ये बस्तान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे सर्वांगीण परिपूर्ण असणाऱ्या कोल्हापुरात सर्व जाती-धर्मीयांना आसरा आहे. यामुळे संपूर्ण देशभरातील विविध समाज कोल्हापुरात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. यातील एक समाज म्हणजे पूर्वोत्तर भारतीय समाज. फर्निचर, ट्रान्सपोर्ट आणि फाउंड्री अशा विविध व्यवसायांत कार्यरत असणाऱ्या पूर्वोत्तर भारतीय समाजाची कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्या ४० हजारांच्या आसपास आहे.

बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या परिसरातील विविध जाती-धर्मातील लोक पूर्वोत्तर भारतीय म्हणून ओळखले जातात. सुतारकाम, फाउंड्री, वाहतूक अशी कष्टाची कामे करणारा समाज अशी यांची ओळख आहे. पंचवीस वर्षांपासून बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश या परिसरातून लोक व्यवसायासाठी आले. यात आझमगड, गोरखपूर, बलिमा, छापरा, दरबंगा या परिसरातील लोकांचा समावेश होता. कोल्हापुरातील गांधीनगर, इचलकरंजी यासह कोल्हापूर शहर परिसरात राजारामपुरी, नेर्ली, तामगाव, शिरोली, आदी भागात पूर्वोत्तर भारतीय लोकांच्या वस्त्या आहेत. कोल्हापुरातून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी 'धनबाद एक्स्प्रेस'सारख्या विशेष रेल्वेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघ...

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात विखुरलेल्या पूर्वोत्तर भारतीय लोकांना एकत्रित करण्याचे काम दहा वर्षांपूर्वी झाले. 'राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघा'ची स्थापना करून या लोकांचे संघटन सुरू झाले. राजारामपुरी परिसरातील टाकाळा येथील 'रामजी संकुल' येथे संघाचे कार्यालय आहे. याच्या माध्यमातून पूर्वोत्तर भारतीय लोकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. याशिवाय वर्षभर विविध सण-उत्सवाच्या निमित्ताने संघाच्या माध्यमातून हे लोक एकत्रित येतात. याशिवाय धुलिवंदनानिमित्त टेंबलाई परिसरात पूर्वोत्तर भारतीय लोक एकत्रित येतात. सामाजातील समस्या, प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी दरमहा संघाच्या कार्यालयात बैठक होते. कोल्हापूरच्या सर्व सण-उत्सव, समारंभातही पूर्वोत्तर भारतीयांचा सक्रिय सहभाग असतो.

कार्यकारिणी

२००५ मध्ये पूर्वोत्तर भारतीय संघाची स्थापना झाली. संघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून संजय विभूती सिंह, उपाध्यक्ष अरविंद मिश्रा व कामेश्वर मिश्रा आहेत. याशिवाय कार्याध्यक्ष ओम मिश्रा, महामंत्री निरंजन झा, कोषाध्यक्ष उपदेश सिंह, मंत्री राजकुमार वर्मा व शैलेशकुमार राय अशी समिती सक्रिय आहे. इचलकरंजी शाखेच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार श्रीवास्तव आणि उपाध्यक्षपदी विजयकुमार मंडल आहेत. नेर्ली तामगाव शाखेच्या अध्यक्षपदी देवेंद्रसिंह व उपाध्यक्षपदी सिंगार प्रसाद हे सक्रिय आहेत.

छट्पूजा मोठा सण...

भारतीय सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाची असणारी 'छट्पूजा' दिवाळीनंतर सहाव्या दिवशी साजरी केली जाते. परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी छट्पूजा करण्याची प्रथा आहे. सलग ४८ तासांच्या उपवासानंतर महिला छट्पूजेच्या मुख्य दिवशी सायंकाळी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे मंत्रोच्चारात सूर्याला अर्ध्य ‌देतात. कोल्हापुरात छट्पूजेची परंपरा १९९६ पासून सुरू आहे. पंचगंगा नदीघाटावर छट्पूजेचे आयोजन केले जाते. पूर्वोत्तर भारतीय लोक सहकुटुंब या पूजेसाठी उपस्थित असतात. याअंतर्गत चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यात 'नहा खाय', 'खरना व्रत' यासह सूर्याला सायंकाळी व पहाटेचे अर्ध्य देण्याचा धार्मिक विधी होतो.

पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबीयाच्या उदरनिर्वाहासाठी भटकंती करत पूर्वोत्तर भारतीय लोक देशभर विखुरले आहेत. कोल्हापुरात स्थायिक झालेल्या पूर्वोत्तर भारतीयांची संख्या ४० हजारांवर आहे. त्यांना शिक्षणाचे पाठबळ देऊन अधुनिक जगातील स्पर्धेसाठी सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

- संजय सिंह, अध्यक्ष, पूर्वोत्तर भारतीय संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज, महाडि‌क, पी. एन. यांचा दावा

$
0
0

विधान परिषदेसाठी प्रदेशाध्यांसमोर मुलाखती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेल्या इच्छुकांच्या मंगळवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह माजी खासदार जयवंतराव आवळे, आवाडे गटाशी स्वतंत्ररित्या भेटून मुलाखती घेतल्या. त्यातून प्रत्येकाच्या ताकदीचा अंदाज घेतलाच शिवाय निरीक्षक रमेश बागवे व सत्यजित देशमुख यांच्याकडूनही जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

याबाबतचा अहवाल आता प्रदेशाध्यक्ष २४ नोव्हेंबरपर्यंत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवणार आहेत. त्यानंतर केंद्रीय समितीकडून निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी दिल्लीतूनच जाहीर होणार आहे.

मुळात प्रदेशाध्यक्षांनी याबाबत बैठक बोलवली नव्हती. पण इच्छुकांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने या मुलाखती झाल्या. त्यामध्ये सतेज पाटील, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्याशी स्वतंत्ररित्या चर्चा केली. यावेळी प्रत्येकाने आपल्यालाच उमेदवारी देण्याबाबतची आग्रहाने मते मांडली. आवाडेंच्यावतीने इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका मांडली. कोणाला उमेदवारी देऊ नये यापेक्षा पक्ष देईल त्याच्या पाठीशी आम्ही असू अशी बहुतांशजणांची भूमिका होती.

सत्यजित कदमांना बाहेर घालविले

आमदार महाडिक यांच्यासोबत ताराराणी आघाडीचे नगरसेवक सत्यजित कदम हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मुलाखतीवेळी भेटण्यास गेले होते. त्यावेळी भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक इथे कसे अशी विचारणा सतेज पाटील यांनी आक्षेप घेतला. तसेच केवळ इच्छुकांशी चर्चा सुरु असल्याने इतरांचा संबंध नाही असे सांगितल्याने चव्हाण यांनी कदम यांना तिथून बाहेर घालविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलप्रश्नावर आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील आयआरबी कंपनीच्या टोलबाबत तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत सचिवस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत टोलबाबत पुढे आलेल्या पर्यायांचा आढावा घेतला. बुधवारी (ता.१८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.

सरकारला सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाली तरी, अजूनही टोलचा प्रश्न संपवण्यात यश आलेले नाही. पुनर्मूल्यांकन समितीचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने शहरातील टोल वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे, मात्र १ डिसेंबरला ही मुदत संपत असल्याने सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. मंगळवारी (ता.१७) मुंबईत रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी झालेल्या बैठकीत टोलमुक्तीच्या पर्यायांचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images