Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरच्या भरतकामाची दिल्लीत छाप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशभरातील राज्यांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा कलाकृतीतून घेण्यासाठी नवी दिल्ली येथे ३५ व्या अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन केले आहे. प्रदर्शनामध्ये राज्यातील विविध कलाकृतींसह राज्यांची वैशिष्ट्ये जपणाऱ्या वस्तूंचे स्टॉल मांडले आहेत. प्रदर्शनामध्ये कोल्हापुरातील ज्वेलरी, गूळ, चप्पल यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अस्मिता अरुणकुमार पोतदार यांच्या भरतकाम कलाकृतींचा समावेश आहे. देशातील राज्यांनी कलाकृती आणि वस्तूंच्या माध्यमांतून राज्याची कृषी, औद्योगिक, व्यापर क्षेत्रातील प्रगती मांडली आहे. प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनामध्ये कोल्हापुरातील वस्तूंसह अस्मिता पोतदार यांच्या कलाकृतीने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.

देशातील राज्यांच व्यापार क्षेत्रातील प्रगतींचा आढावा आणि कलाकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी नवी दिल्ली येथे मेळ्याचे आयोजन केले जाते. देशभरातील कलाकृतींना अत्युच्च स्थान असलेल्या मेळ्यामध्ये वस्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेल्या अस्मिता पोतदार यांना सलग तिसऱ्या वर्षी निमंत्रित केले आहे. पोतदार यांनी पंजाब, हरियाणा व नवी दिल्ली येथील अनेक महिलांना भरतकाम कलेचे प्रशिक्षण दिले आहे. राजस्थानी शेतकरी, नववधू आणि प्राण्यांच्या कलाकृती त्यांनी भरतकामातून साकारल्या आहेत. पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली येथील प्रदर्शनानंतर त्यांनी इटली येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्येही भरतकाम कलेची छाप पाडली आहे. पोतदार या प्रदर्शनामध्ये भरतकाम कलेचे प्रात्यक्षिक सादर करुन कलेचा प्रसार करत आहेत.

पोतदार यांच्या कलाकृतींसह राज्यातील ६० स्टॉल उभारण्यात आले. राज्यातील विविध भागातील वैशिष्ट्ये प्रदर्शनात मांडली आहेत. कोल्हापूरच्या कलाकृतींसह राज्यातील कलाकृतींनी प्रदर्शनामध्ये चांगलीच धूम उडवली आहे. शनिवारी(ता.१४) प्रदर्शनाला सुरुवात झाली असून २७ नोव्हेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहे. तब्बल चारशे रुपये तिकिट दर असूनही प्रदर्शनाला अलोट गर्दी होत आहे. शनिवारी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सचिव अपूर्वा चंद्रा, केंद्रीय आयुक्त अभा शुक्ल, विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बगाडे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापक शिवाजी दौंड आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसचे कराड पर्यटन, तर भाजपचे स्नेहभोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर आपल्याच पक्षाचाच करायचा या इराद्याने कंबर कसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी आपल्या ४४ नगरसेवकांवर वॉच ठेवली आहे. प्रत्यक्ष निवडी दरम्यान कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. सोमवारी (ता. १६ नोव्हेंबर) सकाळी नगरसेवकांना कराडहून थेट महापालिकेत आणले जाणार आहे. दरम्यान सहलीवर गेलेल्या दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी रविवारी कोयना पर्यटनाचा आनंद लुटला. हे नगरसेवक पर्यटनाचा आनंद लुटत असताना भाजप आघाडीच्या नेत्यांनी पक्षाच्या नगरसेवकांसाठी स्नेहभोजनाचा बेत आयोजित केला. रविवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक एकत्र आले.

महापालिकेत दोन्ही काँग्रेस एकत्र येऊनही बहुमत काठावरच आहे. त्यातच गेले काही दिवस पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महापौर आमचाच करणार अशी घोषणा केली होती. त्याबाबतच्या घडामोडीही सुरू होत्या. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोडेबाजार करणार नाही असे सांगत महापौरपदावरील आपला दावा मागे घेतला. तरीही निवडी दरम्यान कसल्याही प्रकारचा धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नेतेमंडळी नाहीत. दोन्ही काँग्रेसच्या आणि दोन अपक्ष अशा ४४ नगरसेवकांना शनिवारी रात्री कराड येथे सहलीवर नेण्यात आले. दोन हॉटेलमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी सकाळी या सदस्यांना कुटुंबासहीत कोयना परिसराची सैर घडविण्यात आली. कोयना धरण, परिसरातील उद्यान आणि इतर स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. नूतन नगरसेवकांनी सहकुटुंब पर्यटनाचा आनंद लुटला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदस्य कराडला परतले.

भाजप-ताराराणी आघाडीचे स्नेहभोजन

सत्ता स्थापण्यासाठी आवश्यक सदस्यांची जुळवाजुळव करू न शकलेल्या भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने रविवारी रात्री सदस्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. आमदार अमल महाडिक, स्वरुप महाडिक, भाजप महानगरचे अध्यक्ष महेश जाधव, माजी महापौर सुनील कदम, सुनील मोदी, यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सोमवारी सकाळी १०.३० वाजता हे सगळे नगरसेवक हॉटेल पॅव्हेलियन येथे जाणार आहेत. तेथून एकत्रितणे महापालिकेत दाखल होतील. दरम्यान पालकमंत्री पाटील यांनी रविवारी सकाळी भाजप कार्यालयात पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या ३७ उमेदवारांची बैठक घेतली. पराभूत उमेदवारांनी नाऊमेद न होता पक्षाचे कार्य करत राहावे. त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी संबंधित प्रभागातील पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली.

आराम बस, कोल्हापुरी फेटे

महापौर निवडीच्या प्रक्रियेस सोमवारी सकाळी ११ वाजता प्रारंभ होईल. त्यामुळे नगरसेवकांची वेळेत उपस्थिती दर्शविण्यासाठी काँग्रेस आघाडीच्या ४४ सदस्यांना कराडहून थेट महापालिकेत येईल. यासाठी आराम बसची सोय केली आहे. एका बसमधून सगळे नगरसेवक महापालिकेत दाखल होतील. एकजूट दर्शविण्यासाठी सदस्य फेटे बांधतील.

मतदान हात उंचावून

सोमवारी सकाळई जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवड प्रक्रिया होणार आहे. हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे कोणता नगरसेवक कुणाच्या बाजूने आहे, हे उघड होणार आहे. व्हीप लागू करण्यात आल्याने आजारपणाचे किंवा अन्य कारण दाखवून गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. पहिल्यांदा महापौर निवड होईल. त्यानंतर उमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामाणे कुटुंबाच्या एकनिष्ठेनेच पद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग दोनवेळा म्हणजे दहा वर्षे नगरसेवक होण्याची संधी मिळाली. या कालावधीत केवळ विरोधी पक्षनेता पद सोडल्यास इतर महत्त्वाच्या पदांपासून दूर असले तरी नेत्यांशी एकनिष्ठ राहिले. पदांची अपेक्षा करण्यापेक्षा भागात विकासकामे करण्याचा त्यांच्या स्वभावाने नवीन प्रभागात घर नसतानाही मतदारांनी निवडून देऊन विश्वास दाखवला. या सर्वांचेच फळ मधुकर रामाणे यांना सून अश्विनी रामाणे यांच्या महापौरपदाच्या उमेदवारीने मिळाले आहे. त्यांची महापौरपदावरील निवड जवळजवळ निश्चित आहे. या निवडीतून सर्वात तरुण महिला तसेच उपनगरातील महापौर होण्याचा मान सासरे मधुकर रामाणे यांच्या दहा वर्षांच्या निष्ठावान कारकिर्दीमुळे मिळणार आहे.

रायगड कॉलनी हा शहराच्या दक्षिणेकडील वाढत्या उपनगराचा परिसर. सध्या शहराशेजारील ग्रामीण भागात जशी वाढ सुरू आहे, तशीच वाढ पंधरा वर्षापूर्वी येथे सुरू झाली. पण सुविधांबाबतीत बोलायचे झाल्यास अगदी तुटपुंज्या. हा विकासकामाचा धागा पकडत रामाणे यांनी प्रभागात निवडणुकीची बांधणी सुरू केली. त्यातून २००५ साली प्रथम अपक्ष म्हणून मधुकर रामाणे निवडून आले. सतेज पाटील आणि महाडिक यांच्या तत्कालीन एकत्रित गटात ते सक्रिय होते. त्यानंतर भागातील विकासकामांना जोर लावला. विकासकामे करताना त्यातून इतर काही अपेक्षेपेक्षा आणखी जास्त काम होईल का असे प्रयत्न केल्यान विकासकामांची गती वाढली. रायगड कॉलनीपासून कळंब्याजळील कात्यायनी कॉम्प्लेक्सपर्यंत असलेल्या प्रभागात विकासकामे दिसू लागली. या कालावधीत केवळ विरोधी पक्षनेतेपद मिळाले. याच जोरावर २०१० साली पक्षीय राजकारण सुरू असताना अपक्ष म्हणून ते विजयी झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीला विकासकामे व पदाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला. या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी विकासकामांवर भर दिला. रस्ते, गटारी, स्ट्रिट लाइटच्या कामांना गती दिली. इतर उपनगरांमध्ये रस्त्यांची अवस्था खराब असताना रामाणे यांच्या प्रभागातील कॉलन्यांमधील रस्ते डांबरीकरणामुळे सुस्थितीत आले. उपमहापौरपद, स्थायी समितीच्या पदाची संधी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र पाच वर्षात काहीच मिळाले नाही. तरीही नेते आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याशी ते एकनिष्ठ राहिले.

कोणतीच पदे न मिळाल्यानंतरही रामाणे तितक्याच उमेदीने कार्यरत राहिल्याचे, नेत्यांशी एकनिष्ठ राहून केलेल्या कामाचे चीज अश्विनी यांच्या महापौरपदाच्या उमेदवारीच्या रुपाने झाले आहे. दिड वर्षापूर्वी अमर रामाणे यांच्याशी लग्न झालेल्या २२ अश्विनी यांचे बी. कॉम शिक्षण झाले आहे. इतक्या कमी वयात नगरसेवकपदी निवडून जाण्याचे भाग्य सासऱ्यांमुळे मिळालेच. पण त्याशिवाय बहुमतात असलेल्या काँग्रेस आघाडीची महापौरपदाची उमेदवारी मिळावी ही संधीही महत्त्वाची. आजच्या राजकारणाचा रंग पाहता त्यांच्या महापौरपदाचा मार्ग स्पष्ट आहे. यातून उपनगराला, त्याही महिला महापौर मिळण्याचा मान प्रथमच मिळत आहे. यापूर्वी दिवंगत दिलिप मगदूम उपनगरांतील महापौर बनले होते. त्यानंतर आता रामाणे यांच्याकडील पद म्हणजे शहर-ग्रामीण सीमेवरील प्रभागाला मिळालेली संधी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान विकासाचे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काठावरच्या बहुमतामुळे सत्तेची टांगती तलवार, प्रबळ विरोधी पक्षाचे आव्हान आणि महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्याने विकासासाठी निधीची उपलब्धता यावरून नव्या सभागृहाची कसोटी लागणार आहे. सत्ता संघर्षामुळे प्रत्येकाला पदे मिळतील, पण खरी कसोटी पदाधिकारी होऊन स्वत:ला सिद्ध करण्याची आहे. स्मार्ट सिटी, पाइपलाइन योजना पूर्णत्वासाठी नेत्यांचा कस लागणार आहे. महापालिकेत पहिल्यांदाच सक्ष​म विरोधीपक्ष असल्याने कारभाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे, ही जमेची बाजू आहे. गेल्या पाच वर्षांत विकासकामांसाठी १२०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. विकासाचा तोच वेग कायम ठेवण्यासाठी नव्या सभागृहाला धावपळ करावी लागणार आहे.

सद्यस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी सत्ता टिकविण्यासाठी प्रत्येकाला पदाचे आमिष दाखविले आहे. स्थायी समिती सभापती, परिवहन, शिक्षण व महिला बाल कल्याण समिती सभापती यांठिकाणी वर्णी लावण्याचा शब्द दिला आहे. परिणामी पाच वर्षात

प्रत्येकाला कुठले ना कुठले पद मिळणार आहे. सभागृहातील दोन तृतीयांश सदस्य पहिल्यांदाच निवडून आले आहेत. सत्ता संघर्षातून त्यांना पदे मिळतील, पण पदाधिकारी झाल्यानंतर कामकाजातून प्रत्येकाला स्वतला सिद्ध करावे लागणार आहे. पद केवळ शोभेपुरता न राहता त्या माध्यमातून प्रभागाचा आणि पर्यायाने शहराचा विकास साधण्यासाठी त्यांना कंबर कसावी लागणार आहे.

सीनिअर सदस्यांकडे जबाबदारी

महापालिकेच्या या नव्या सभागृहात भूपाल शेटे, महेश सावंत,

सुनील पाटील, शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, संभाजी जाधव, राजाराम गायकवाड, संजय मोहिते, मुरलीधर जाधव, संदीप नेजदार, किरण शिराळे, सुभाष बुचडे,अशोक जाधव, दिलीप पोवार, आशिष ढवळे, निलेश देसाई, ईश्वर परमार, सरिता मोरे, विजय सूर्यवंशी, अनुराधा खेडकर यांच्यासह २१ आजी-माजी नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. सभागृहात त्यांची छाप राहिल हे नक्की. काहींनी विजयाची हॅटिट्रक साधली आहे. काहींनी विविध पदेही भूषविली आहेत. अभ्यासू नगरसेवक म्हणून काहींची ओळख आहे. पक्ष आणि

गटातटाच्या भिंती ओलांडून त्यांनी सिनीअॅरिटी निभावली तर नवख्या नगरसेवकांना त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. मागील सभागृहाप्रमाणे कुरघोडीचे राजकारण झाले तर विकास कामांना खीळ बसण्याची शक्यता अधिक आहे.

सतेज पाटील, मुश्रीफांची कसरत

राज्यात आणि केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी हजारो कोटी रुपयांचा निधी आणला. पाइपलाइन योजना, नगरोत्थान, एसटीपी प्रकल्प सुरू केले. आता मात्र स्थिती उलट आहे. सतेज पाटील यांच्याकडे आमदारपदही नाही. सत्ता गेल्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांनी शहरवासियांना स्मार्ट सिटीसह, शहर विकासासाठी निधी खेचून आणण्याची ग्वाही दिली आहे. राज्यात-केंद्रात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे​ निधीची उपलब्धता, नवीन प्रकल्पांना मान्यता, पूर्वीच्या मंजूर प्रकल्पासाठी निधीची तरतूद अशा प्रत्येक टप्प्यावर संघर्षाची, राजकारणाची शक्यता नाकारता येत नाही. शहरवासियांना दिलेल्या आ​श्वासनांची पूर्तता करताना पाटील, मुश्रीफ यांना कसरत करावी लागणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शहर विकासाचा अजेंडा राबवावा लागणार आहे. स्मार्ट सिटीत कोल्हापूरचा समावेश झाला नसल्याने त्यांच्यावरही टिका झाली आहे. ती लक्षात ठेऊन महापालिकेत सत्ता कुणाची, यापेक्षा कोल्हापूरचा पालकमंत्री ही भूमिका चंद्रकांत पाटील यांना बजावावी लागणार आहे.

२८ नगरसेवक कोट्यधीश

महापालिकेतील ८१ नगरसेवकांपैकी जवळपास २८ नगरसेवक हे कोट्यधीश आहेत. राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तपशीलात कोट्यवधीची मालमत्ता असल्याचा उल्लेख आहे. यामध्ये सर्वाधिक श्रीमंत नगरसेविका म्हणून जयश्री चंद्रकांत जाधव यांचा क्रमांक लागतो. त्यानंतर माजी नगरसेवक सतीश घोरपडे यांच्या पत्नी व नगरसेविका सविता घोरपडे, नगरसेवक सत्यजित कदम आदींचा समावेश होतो.

पाचवी ते दहावीपर्यंतच शिक्षण जास्त

नव्या सभागृहात बीकॉम, एमबीएसह पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यामध्ये पदवीधर नगरसेवकांची संख्या १७ आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या २८ इतकी आहे. सोळा नगरसेवक दहावी पास आहेत. तर तेरा जण बारावी उत्तीर्ण आहेत. कोट्यधीश सदस्यौकी काही जणांनी शेती व घरकाम हा व्यवसाय असल्याचे त्यांच्या शपथपत्रात नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर पिराजीराव तलाव झाला कचरामुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड शहर, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारा सरपिराजीराव तलाव प्रदुषणाच्या विळख्यात अडकला आहे. याचे महत्त्व ओळखून मुरगूडच्या झेड झेड ग्रुप बॉइजच्यावतीने सरपिराजीराव तलावाची स्वच्छता करण्यात आली. दसऱ्याच्या निमित्ताने एक दिवसाने श्रमदार शिबिर आयोजित करुन ही स्वच्छता करण्यात आली.

या मंडळाने स्वच्छता मोहिमेत तलावाच्या काढावरील सर्व कचरा एकत्र‌ित करुन त्याची अन्यत्र विल्हेवाट लावण्यात आली. तसेच तलावाच्या काठावर मद्यपिने फोडलेल्या काचेच्या बाटल्या एकत्र करुन त्या अनत्र हलवल्या. तलावास पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य ओढ्यातील गारवेल काढून टाकण्यात आले. तलावात वाहन धुणाऱ्या लोकांना प्रदुषणाची जाणीव करुन देवून पुन्हा वाहने न धुण्याची विनंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

या श्रमदान मोहिमेत झेड झेड बॉईज मंडळाचे सक्रिय सदस्य सुनील भोई, अध्यक्ष रमेश भोई, विनायक दरेकर, राहुल पाटील, सुमित भोई, आकश जगताप, सूरज घुगरे, विजय भपई, बाळू भोई, रोहित रणवरे, ऋषिकेष चौगले, प्रणव चौगले, केतन गोंधळी आदी तरुण कार्यकर्त्यानी या स्वच्छता मो‌हिमेत सहभाग घेतला. तसेच तलावाजवळ बाटल्या फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिरवाईने नटले विद्यापीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा परिसर हिरवाईने अच्छादलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे विद्यापीठ कडक उन्हाळ्यातही मंद गार वा ऱ्याच्या झुळकीने मनाला उल्हासित बनवते. विविध रंगी गुलाबाची बाग, आकर्षक फुले, दुर्मिळ वृक्षे, डोळ्याची पारणे फेडणाऱ्या बागेने शिवाजी विद्यापीठाचे सौदर्यं खुलले आहे. विद्यापीठाच्या सौदर्यांत भर घालण्यासह परिसर कार्बन कुंडाचे आणि प्राणवायू स्त्रोताचे काम करीत आहे. कार्बन ग्रहण क्षमतेतही वाढ झाली आहे. शिवाजी विद्यापीठाचा ८५३ एकरचा परिसर आहे. दहा सेटिमीटर पेक्षा जास्त परिघ आणि चार फूटापेक्षा अधिक जास्त उंचीची झाडे परिसरात असून १३ हजार २१७ झाडे आहेत. तर नव्याने १३ हजार रोपे लावली आहेत.

शिवाजी विद्यापीठात उद्यान विद्या विभागात देखभालीसाठी पूर्णवेळ ८ माळी असून एक गार्डन अधीक्षक आहे. १९९५ मध्ये गार्डन विभागाकडे १०० कर्मचारी होते. मात्र या कर्मचाऱ्यांतून काही जण शिपाई पदावर वर्ग झाले. तर काही सेवानिवृत्त झाले. त्यामुळे सध्या ८ कर्मचारी आणि रोजदांरीवर असलेली कर्मचारी, कुली यांच्यावर बागेची निगा राखली जात आहे. कमी कर्मचारी असूनही या परिसराचे सौदर्यांत भर घातली आहे. शोभिवंत फुले आणि फळांच्या बागांनी विद्यापीठाची हिरवाई नटली आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील बागही सौदर्यांत भर घालत आहे. मानव्यशास्त्र विद्या विभागाजवळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याजवळील बागही सजली आहे. विद्यापीठाच्या गेट क्रमांक आठ जवळील क्रांतीवनही हिरवाईने नटले आहे. पाणी साठवणुकीसाठी विद्यापीठातील तलावातील पाणी पातळी पुरेशी आहे. तर विद्यार्थींनी वसतिगृहाच्या पाठीमागे, बी. टेक विभागाच्या पाठीमागे पाण्याचा पुर्नवापर करणारा प्रकल्प आहे. या पुनर्वापरातून विद्यापीठाचा चाळीस टक्के भाग सिंचनाखाली आला आहे.

'ग्रीन ऑडिट'

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीमुळे येथील हवा शुद्ध आहे. वातावरणातील प्रदूषकांची पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विहित केलेल्या पातळीहूनही कमी आहे. विद्यापीठाच्या सन २०१३-१४च्या हरित लेखापरीक्षण (ग्रीन ऑडिट) अहवालातून स्पष्ट करण्यात आले. या ग्रीन ऑडिटमधून विद्यापीठ परिसरातील बहुतांश कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात आहे. विघटनशील घनकचऱ्यापासून खतनिर्मिती व गांडूळ खतनिर्मिती केली जात आहे. विद्यापीठात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पाळण्यात येणाऱ्या 'नो व्हेईकल डे', पेपर वेस्टचे बारीक तुकडे करून तो कचरा पल्पिंगसाठीसह पुनर्वापर केला जातो.

कार्बन ग्रहण क्षमतेचे मापन

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने विद्यापीठातील वृक्षगणना व वृक्षांद्वारे शोषून घेतल्या जाणाऱ्या कार्बनचे प्रमाण मोजण्याचा शास्त्रीय उपक्रम घेतला. या सर्वेक्षणामध्ये विद्यापीठ परिसरातील मोठ्या झाडांमधील कार्बन साठ्याच्या माध्यमातून आतापर्यंत ६६७.३७ टन एवढा हवेतील कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषला गेला आहे. परिसरातील १३ हजार २१७ मोठ्या झाडांनी आतापर्यंत सुमारे १७ हजार ८०३.६६ टन ऑक्सिजन निर्माण केला आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरात ३६३८.३५ टन एवढे मोठ्या झाडांचे एकूण बायोमास आहे. ऑस्ट्रेलियन बाभूळ आणि गिरीषुष्प या वनस्पतीचे बायोमास सर्वांधिक आहे.

१८१९.१७ टन कार्बनसाठा

बायोमाच्या निम्म्या प्रमाणात कार्बनसाठा आहे. या गृहितकानुसार १८१९.१७ टन कार्बनसाठा शिवाजी विद्यापीठातील परिसरातील झाडांत आहे. शिरिष, ऑस्ट्रेलियन बाभूळ, गिरीपुप्ष, सुबाभूळ, निलगिरीत या साठा आहे. शिवाजी विद्यापीठ परिसरातील मोठ्या झाडांतील कार्बन साठ्याच्या माध्यमातून आतापर्यंत ६६७६. ३७ टन एवढा हवेतील कार्बनडायऑक्साइड वायू शोषला गेला आहे. सर्वसाधारपणे एक झाड वर्षाला २१८ किलो एवढा कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेते. या गृहितकानुसार शिवाजी विद्यापीठ परिसरातील १३ हजार २१७ मोठी झाडे वर्षाला २८७००० किलो एवढा कार्बन डाय ऑक्साईड शोषतात

प्राणवायू

परिसरातील १३ हजार २१७ मोठी झाडांनी आतापर्यंत १७८०३.६६ टन प्राणवायू उत्सर्जित केला आहे. उत्सर्जित प्राणवायूचे प्रमाण ग्रहण केलेल्या कार्बनच्या २.६८ एवढे असते. पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या गणनेनुसार ७६६२९० किलो एवढा प्राणवायू दरवर्षी उत्सर्जित करतात. त्यामुळे एक झाड दोन व्यक्तिंना आयुष्यभर पुरेल एवढा प्राणवायू त्याच्या आयुष्यात उत्सर्जित करते. विद्यापीठ परिसरातील १३ हजार २१७ मोठी झाडे २६ हजार ४३४ लोकांच्या प्राणवायूची गरज भागवितात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सत्तेमुळे शेट्टींची भाषा बदलली’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

खासदार राजू शेट्टी व आपल्यामध्ये काही तात्व‌िक मतभेद आहेत. ज्या गोष्टी व्यवहारिक नाहीत त्या मी मान्य केल्या नाहीत. सत्तेत आल्यानंतर बदलेल्या भूमिकेमुळेच त्यांच्यात व माझ्यात मतभेद झाले आहेत. खासदार शेट्टींनी ऊस परिषदेत सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याने तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिल्याने कारखान्याचे कौतुक केले. पण माझे जिल्हा बँकेकडे लक्ष आहे म्हणाणाऱ्या शेट्टींनी जिल्हा बँकेची ३१ मार्चची बॅलन्सशीट पाहिल्यानंतर तोंडात बोटे घालतील, अशी उपरोधित टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ते आणूर (ता.कागल) येथील राजर्षी शाहू राजे हेल्थ क्लब जीम लोकार्पन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी काकासो पाटील होते.

मुश्रीफ म्हणाले, 'पुरोगामी विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व नियतीने माझ्याकडे दिले. मी ते आपल्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे समर्थपणे पेलत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी पैशाचा अमाप वापर केला. तर भाजपने निवडणुकीच्या तोंडावर सुनिल तटकरे, अजित पवार यांची चौकशी सुरू केली. जिल्हा बँकेच्या थकित कर्जाचे प्रकरण मतदारांसमोर आणल्यामुळे मतदारांची दिशाभूल झाली. याचा फटका राष्ट्रवादी कॉग्रेसला बसला. निरपेक्ष भावनेने काम करुन जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वागत उमेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सागर कोळी यांनी कले. यावेळी सुनील गायकवाड, राजेंद्र कुंभार, ईश्वरा शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी येथील संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते प्रकाश रेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल तसेच कागल तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी निवड झालेबद्दल सिद्राम पाटील म्हाकवेकर यांचा सत्कार मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन लखन जगताप यांनी केले. तर आभार मारुती भोळे यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉल्स, शोरूम्समध्ये अपंगांना मिळतेय अर्थार्जनाची संधी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कधी अपघाताने तर कधी जन्मजात नियतीने केलेल्या आघाताने ज्यांच्या आयुष्यात अपंगत्व आले आहे, त्यांच्यातील आत्मविश्वास लुळा पडू नये यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. शारिरीक अपंगत्वावर मात करून आयुष्यात हिंमतीने काही करू पाहण्याचे बळ देणाऱ्या या संस्थांना आता शहरातील मॉल्सचीही साथ मिळत आहे. कौशल्यपूर्ण ​शिक्षण घेऊन संस्थेतून बाहेर पडलेल्या अपंगांना आर्थिक उभारी देण्यासाठी मॉल्स, कारखाने, शोरूम्स, दुकाने याठिकाणी खास रोजगाराच्या संधी दिली जात आहेत. यामुळे हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड या संस्थेतील मुलांना आर्थिक स्रोत निर्माण झाला आहे.

अपंगत्वानंतर मानसिकदृष्ट्या खचून जाणाऱ्यांसमोर परावलंबी आयुष्य कसे काढायचे हा मोठा प्रश्न असतो. शारिरीक अपंगत्वामुळे आलेले परावलंबत्व एकीकडे आणि दुसरीकडे येणारे मानसिक अपंगत्व अशा व्दिधा मनस्थितीत अपंगाच्या आयुष्याचा प्रवास सुरू असतो. हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड या संस्थेच्या माध्यमातून अपंगांना कौशल्यपूर्ण ​शिक्षण देण्याचा उपक्रम राबवला जातो. मात्र वसतिगृहात राहून जे अपंग कौशल्य कमावतात त्यांच्या हातांना काम देण्यासाठी समाजाचीच साथ आवश्यक असते. हीच गरज शहरातील काही संवेदनशील उद्योजक, व्यावसायिकांनी पूर्ण केली आहे.

स्टार बझार या मॉलच्या बेकरी सेक्शनमध्ये हेल्पर्स संस्थेतील सुमित्रा माने ही मुलगी काम करते. सध्या ती या मॉलमधील बेकरी विभाग समर्थपणे सांभाळत आहे. तसेच एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांमध्ये बॅकऑफीस सांभाळण्यासाठी अपंगांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये ​शिपुगडे अॅल्युमिनीयम या कारखान्यात चार अपंगांना कौशल्याची कामे देण्यात आली आहेत. या​शिवाय शहरातील काही अकाऊंट फर्म, आर्किटेक्ट फर्म, इंटिरिअर डिझायनर या क्षेत्रातही अपंग मुलामुलींना रोजगाराची संधी देण्यात आली आहे.

साथ महत्त्वाची

याबाबत बोलताना हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेचे समन्वयक अयाज संग्रार म्हणाले,' शारिरीक अपंगत्वापेक्षा मानसिक अपंगत्व धोकादायक असते. यामुळे अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन त्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असते. संस्थेमध्ये या मुलांना विविध कामाचे प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असलो तरी संस्थेतून बाहेर पडल्यानंतर या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाजाची साथ गरजेची आहे. समाजातूनही ही भावना वाढते आहे. त्यामुळे आमच्या संस्थेतील अनेक अपंग मुलेमुली आज प्रत्यक्ष काम करत आयुष्य घडवत आहेत याचा आनंद वाटतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटील-महाडिक लढाई

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या नव्या सभागृहात सत्ताधारी व विरोधक म्हणून आमनेसामने येणाऱ्या माजी मंत्री सतेज पाटील व महाडिक गटात आता उघड लढाई छेडली जाणार आहे. यापूर्वी कुठे प्रत्यक्ष, तर कुठे अप्रत्यक्ष लढाई लढली जात होती. पण येथूनपुढे दोन्ही गट थेट एकमेकांना​ खिंडीत गाठण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्याची छोटीशी झलक टोलमुक्तीसाठी आयआरबीचे पैसे भागवण्यासाठी सतेज पाटील गटाशी संबंधित असलेल्या जागा विकण्याचा मुद्दा उपस्थित करुन दाखवून दिली आहे. येथून पुढे एकमेकांची काही ना काही

उणीदुणी काढून त्याच्यातून सारा राग बाहेर काढले जाईल, अशी शक्यता आहे.

नुकतीच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली. त्यावेळी एका जागेतून आयआरबीची किंमत भागवता येणार नाही. त्यामुळे आणखी काही जागा विकता येतील का, याबाबत मते मागवली. त्यावेळी नगरसेवक सत्यजित कदम यांनी जागांचे पर्याय सुचवले ते पाहता त्यांचा सारा रोख सतेज पाटील गटावरच होता हे स्पष्ट होते.

सयाजी हॉटेलशेजारील एक पार्किंगची जागा विकता येईल. तसेच वॉटर पार्कच्या जागेचा करार संपत आला आहे. त्याबाबतही निर्णय घेता येईल. याशिवाय जनता बझारच्या जागांबाबतचीही तशीच अवस्था आहे. त्यामुळे या तीन जागा विक्री करता येतील असे सुचवले.

वॉटर पार्क व जनता बझार या जागांचा संबंध पाटील गटाशी थेट येतो. यातून या गटाला अस्वस्थ करुन सोडण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. यापुढेही अशाच प्रकारे या गटाशी सं​बंधित विषयावर आडवा पाय घालण्याचे धोरण अवलंबेल असे दिसते. या प्रकारामुळे पाटील गटाकडूनही त्याचप्रकारे नीती अवलंबली जाईल. यातून सभागृहात दोन्ही गटाचे नगरसेवक अजेंडा राबवून एकमेकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी चुरस रंगणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी चर्चा सुरूच आहे, चर्चेतून निष्पण्ण झाले तर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. महापौर निवडीत भाजप आघाडीच्या नगरसेवकांना विजयी करण्यासाठी नेतेमंडळीची प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. असा आक्रमक पवित्रा भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या बैठकीत नेते व शिलेदारानी स्पष्ट केल्याने महापौरपदाच्या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे. अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी भाजप आघाडीत प्रवेश केल्याचे सुनील मोदी यांनी जाहीर केले. सोमवारी सकाळी १०.३० वाजता भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक हॉटेल पॅव्हेलियन येथून लक्झरीयस बसमधून महापालिकेकडे जाणार आहेत.

हॉटेल पॅव्हेलियन येथे भाजप आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. आमदार अमल महाडिक, भाजप महानगरचे अध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे प्रमुख स्वरूप महाडिक, माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम, सुनील कदम यांच्या उपस्थितीत आघाडीच्या नगरसेवकांची बैठक झाली. सुनील मोदी म्हणाले, 'महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू आहे. चर्चेतून निष्पण्ण झाले तर सकारात्मक निर्णय होऊ शकतो. सोमवारी सकाळी ९.३० वाजता भाजप आघाडीच्या नगरसेवकांनी हॉटेल पॅव्हेलियन येथे एकत्र यायचे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नगरसेवकांना काही सूचना करणार आहेत.' माजी महापौर सुनील कदम म्हणाले, 'भाजप, ताराराणी आघाडीने निवडणुकीत बाजी मारली आहे. महापौर निवडीत विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. अनेक पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. सभागृहात गेल्यानंतर​ विरोधकांना कळेल महापौर कुणाचा होणार आहे.' आमदार अमल महाडिक यांनीही नगरसेवकांना सूचना केल्या.

काँग्रेस आघाडीचे एकूण नगरसेवक ४४

काँग्रेस २७

राष्ट्रवादी काँग्रेस १५

अपक्ष नगरसेवक २

भाजप आघाडीचे संख्याबळ ३३

भारतीय जनता पक्ष १३

ताराराणी आघाडी १९

अपक्ष नगरसेवक १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० हजार संस्था अवसायनात

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्ह्यातील ६५ टक्के लोकसंख्या विविध कारणांनी सहकार क्षेत्राशी निगडित आहेत. सहकारावरच संपूर्ण कुटुंबाचा डोलारा अवलंबून असताना गेल्या पंधरा वर्षांत १० हजार संस्था अवसायनात निघाल्या आहेत. सहकारावरील नागरिकांचा विश्वास दृढ करण्यासाठी नियमित लेखापरीक्षण करून वार्षिक सभेपुढे ठेवण्याची आवश्यकता आहे. यासाठी निवडणूक प्रक्रियेत बदल करतानाच संस्थांची गुणात्मक वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सहकाराचा स्वाहाकार रोखण्यासाठी सहकार सप्ताहाच्या निमित्ताने संस्थांची गुणात्मक वाढ करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात सहकार क्षेत्राने भरारी घेतल्यानंतर सरकारी अनुदान आणि कर्जे लाटण्यासाठी अनेक बोगस संस्थांची स्थापना केली. यामध्ये पतसंस्थांची संख्या लक्षणीय होती. संचालकांच्या मनमानी आणि गैरकारभारामुळे संस्थांना कुलूप लागले. पतसंस्थांबरोबरच जिल्ह्यातील दत्त-आसुर्ले पोर्ले, उदयसिंगराव गायकवाड आणि दौलत साखर कारखाना मोडीत निघण्याचा मार्गावर आहे. संचालक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे सभासदांचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल बुडीत निघाले आहे. सध्या पतसंस्थांच्या नोंदणीचे निकष कडक केले असले, तरी बुडीत झालेल्या संस्थांतील भागभांडवलाबाबत सभासदांमध्ये असंतोष अद्याप कायम आहे.

सहकार विभागाने सहकाराच्या शुद्धिकरण प्रक्रियेला सुरुवात केली आहे. दूध संस्था वगळता झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन हजार ३७२ सहकारी संस्था बंद स्थितीत आढळून आल्या आहेत. बंद असलेल्या संस्थांचे पुन्हा लेखापरीक्षण करून काही संस्थांना अभय दिले जाणार आहे. तसेच ज्या संस्था अंतिम बंद स्थितीत निघतील त्यांच्याकडून ठेवी व भागभांडवल परत करण्याचे उद्दिष्ट पार करावे लागेल. संस्थांमधील गैरव्यवहाराला केवळ संचालक मंडळ करणीभूत नसून याला संबंधित अधिकारीही जबाबदार आहेत. यासाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी आणि सभासदांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. यंत्रमागधारक व मागासवर्गीय कागदोपत्री संस्थांनी सरकारचे कोट्यवधी रुपयांचे अनुदान हडप केले आहेत. प्रशिक्षणातून जागृत झाल्यास अशा बोगस अनुदानाला अटकाव होऊन योग्य कामासाठी निधीचा विनियोग होईल.

.......

९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक निवडीचे अधिकार संस्थांना प्राप्त झाले आहेत. अशी निवड वार्षिक सभेत होणार असली, तरी यामुळे पक्षपाती लेखापरीक्षण होण्याचा धोका निर्माण होणार आहे. जिल्हा निबंधकांकडून कलम ८९ 'अ' अतंर्गत तपासणी होणार असली, तरी अशी तपासणी तीन वर्षांतून होणार असल्याने संचालकांना मोकळीक मिळणार असल्याचा धोका सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे एकरांतील ऊस जळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे रविवारी (ता.१५) दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास दीडशे एकरांतील ऊस जळाला. या आगीत ६५ हून अधिक शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले.

प्रयाग चिखली येथील सरवळ फाटा परिसरात विद्युत तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडून उसाला आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत जवळपास दीडशे एकरांतील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत ६५ हून अधिक शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोसट्याच्या वाऱ्यामुळे आग अधिकच भडकली आणि दीडशे एकर परिसरात पसरली. आगीचे वृत्त समजताच कोल्हापूर महापालिकेतील अग्निशमन विभागाकडील तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल चार तासांनंतर सायंकाळी सहा वाजता आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह ग्रामस्थांना यश आले. गळीत हंगाम सुरू होण्याच्या आधीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या उसाचे आता करायचे तरी काय, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील गुऱ्हाळघरे सुरू करून जळालेला ऊस गुऱ्हाळघरांनी घ्यावा, त्याचबरोबर काही साखर कारखान्यांनीही ऊस घ्यावा अशी विनंती प्रयाग चिखलीतील ग्रामस्थांनी केली आहे. कृषी विभाग आणि महावितरणनेही जळालेल्या उसाचा पंचनामा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तरी भाजप-ताराराणी आघाडी मैदानात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर निवडीवेळी चमत्काराची भाषा करणाऱ्या भारतीय जनता पक्ष- ताराराणी आघाडीने महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सोमवारी (ता.१६) होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान कायम आहे. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ असले तरी धोका नको म्हणून काँग्रेस आघाडीने सहलीवर पाठवलेले नगरसेवक, दोन्ही काँग्रेसने काढलेले व्हिप आणि विविध प्रकारातून अनुपस्थितीत राहण्याच्या चर्चेमुळे या निवडींची उत्सुकता ताणली गेली आहे. शिवसेनेने कुणालाही पाठिंबा जाहीर न करता संदिग्धता आणखी वाढवली आहे. दरम्यान, भाजप आघाडीने महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालूच ठेवल्याने चमत्कार घडणार का याकडेही लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी रामाणे या महापौरपदाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात भाजपच्या सविता भालकर उभ्या ठाकल्या आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला आ​णि ताराराणी आघाडीचे नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यामध्ये लढत होणार आहे. बहुमतासाठी ४१ नगरसेवकांची गरज असून काँग्रेस आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ असल्याने महापौरपदी रामाणे आणि उपमहापौरपदी मुल्ला यांची निवड निश्चित मानली जात आहे.

महापौर निवडीत कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करण्याबाबत दोन्ही पक्षांनी नगरसेवकांना व्हीप बजावला आहे. माजी राज्यमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी रविवारी रात्री कराडमध्ये जाऊन आघाडीच्या नगरसेवकांशी संवाद साधला. तर भाजप, ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी रविवारी रात्री दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांची एक​त्रित बैठक घेत महापौर उपमहापौरपदाच्या निवडीबाबत रणनिती आखली. भाजप नेत्यांच्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, नगरसेवक अन्य कुणाच्या संपर्कात येऊ नयेत याची पुरती खबरदारी घेतली आहे. नगरसेवकांवर लक्ष ठेवत पकड मजबूत केली आहे. सहलीवर गेलेल्या अनेक नगरसेवकांचे मोबाइल रविवारी बंद होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांच्या भूमिकेबाबत रविवारी सायंकाळी बैठक झाली. सभेपूर्वी ते निर्णय घेणार आहेत.

माघार

भाजप ताराराणी आघाडीतर्फे महापौरपदासाठी अनुक्रमे सविता भालकर आणि स्मिता माने यांनी तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून संतोष गायकवाड व ताराराणी आघाडीकडून राज​सिंह शेळके यांचे उमेदवारी अर्ज आहेत. सोमवारी प्रत्यक्ष निवडी दरम्यान महापौरपदासाठी सविता भालकर तर उपमहापौरपदासाठी शेळके हे उमेदवार असणार आहेत. माने आणि गायकवाड हे माघार घेणार असल्याचे भाजप आघाडीचे शिलेदार सुनील मोदी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

भाजपचे चमत्काराचे दावे फोल ठरवत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं आज कोल्हापूर महापालिकेवर डौलानं तिरंगा फडकवला. भाजपविरुद्ध झालेल्या सरळ लढतीत काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांनी सहज विजय मिळवत भाजपच्या सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला.

कोल्हापूर महापालिकेच्या अनपेक्षित निकालानंतर महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता होती. त्यातच भाजपच्या नेत्यांनी या निवडणुकीत चमत्कार करून दाखवण्याचे दावे केल्यानं उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, ताराराणी आघाडीच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत झाली. शिवसेनेचे चारही नगरसेवक मतदानाला अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थितीत ७७ नगरसेवकांनी मतदान केले. यात काँग्रेसच्या रामाणे यांना ४४ तर, भाजपच्या सविता भालकर यांना ३३ मते पडली. पीठासीन अधिकारी अमित सेनी यांनी रामाणे यांना विजयी घोषित केले.

उपमहापौरपदी शमा मुल्ला

उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला यांची निवड झाली आहे. त्यांनाही रामाणे यांच्या इतकीच म्हणजेच ४४ मते मिळाली. शिवसेनेचे नगरसेवक उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही तटस्थ राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लंडनमध्ये मिरजेतला पुतळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा मिरजेतील नामवंत शिल्पकार विजय गुजर यांनी तयार केला आहे. गुजर यांच्या या कामगिरीमुळे मिरजेच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.

गेल्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडन येथे लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तीन फूट उंचीचा हा पुतळा अत्यंत देखणा आणि आकर्षक झाला आहे. गेल्या वर्षी बेंगळुरू येथील डॉ. धीरज पाटील यांनी हा पुतळा शिल्पकार विजय गुजर यांच्याकडून बनवून घेतला होता. डॉ. पाटील हे सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्याच आग्रहावरून पंतप्रधान मोदी यांनी लंडन दौऱ्यात या पुतळ्याचे उदघाटन केले. परदेशातही महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची व त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या हेतूने डॉ. धीरज पाटील यांनी हा पुतळा बनवून घेतला आहे.

याबाबत बोलताना शिल्पकार विजय गुजर म्हणाले, 'गेल्या दहा ते बारा वर्षांत महात्मा बसवेश्वरांचे वीसहून अधिक पुतळे मी तयार केले आहेत. तीन फुटांपासून बारा फुटांपर्यंत अर्ध आणि अश्वारूढ व पूर्ण आकारातील पुतळ्यांचा यात समावेश आहे. कर्नाटक व महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी या पुतळ्यांची स्थापना करण्यात आली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीस रेटसाठी समिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

राज्यातील यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनासह टाइम रेट यथास्थिती पीस रेटमध्ये रूपांतरित करण्याबाबत तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. सोलापूर, इचलकंरजी, मालेगाव, भिवंडी येथे समक्ष जाऊन कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची सूचना सरकारने या समितीला केली आहे.

यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाची फेररचना करण्याबाबत राज्य सरकारने २९ जानेवारी २०१५ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यात या कामगारांना टाइम

रेटनुसार किमान वेतन निश्चित करण्यात आले होते; परंतु त्याला यंत्रमागधारकांचा विरोध आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात यंत्रणागधारकांना कोर्टात धाव घेतली आहे. सरकारने या विषयी शपथपत्रही कोर्टात सादर केले आहे.

दरम्यान, यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नामुळे अधिसूचनेचा फेरविचार करावा, अशी विनंती काही आमदारांनी सरकारला केली आहे. त्यामुळे कामगारांचे वेतन टाइम रेटसह यथास्थिती पीस रेटमध्ये रूपांतरित करण्याचा विचार सरकार करीत आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या नेमणुकीचा अध्यादेश सोमवारीच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अहवाल सादर करण्यासाठी समितीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.

समितीत कोण?

एकूण सदस्य ः सहा अध्यक्ष ः कामगार आयुक्त एच. के. जावळे सदस्य ः अतिरिक्त आयुक्त आर. आर. हेंद्रे, वस्त्रोद्योग उपसंचालक डी. रविकुमार, डीकेटीई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सी. डी. काणे, वस्त्रोद्योग तज्ज्ञ पी. एन. माहुरकर, वस्त्रोद्योग सहायक संचालक विजय रणपिसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या उचलीवरून मतभेद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सभासदांना उचल किती द्यायची यावरून जिल्ह्यातील साखर कारखानदारांत मतभेद निर्माण झाले आहेत. या साखर कारखानदारांनी वाजवी रास्त भाव (एफआरपी) तीन हप्त्यांत देण्याचे ठरविले असून, सक्षम कारखाने पहिली उचल (हप्ता) दोन हजार रुपये देण्याच्या तयारीत आहेत. दुष्काळी भागातील साखर कारखान्यांनी त्यास नकार दिला आहे. ही कोंडी कशी व केव्हा फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

साखरेचा दर मध्यंतरी क्विंटलला २७५० रुपयांपर्यंत गेला होता, तो आता पुन्हा २४०० रुपयांच्या आसपास आला आहे. साखरेच्या दराची जागतिक स्थिती काय राहील, याचा अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांनी पहिली उचल जाहीर करताना सारासार विचार करावा, असे या विषयातील जाणकारांचे मत आहे.

'एफआरपी' तीन हप्त्यांत देण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. तसे झाल्यास सरकारकडे तक्रार करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यासाठी ठिकठिकाणी ऊसतोड बंद पाडणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा काढून टाकणे, ऊसतोड कामगारांना पळवून लावणे असे आंदोलन सुरूच आहे. काही साखर कारखान्यांचे गळीत सुरू झाले आहे. काहींनी अद्याप गाळपास सुरूवात केलेली नाही. एकूण वातावरण गोंधळाचे आहे. त्यातून मार्ग कसा निघणार हे न उलगडणारे कोडे होऊन बसले आहे.

पाऊस कमी पडल्याने उसाचे, साखरेचे उत्पादन घटेल. पर्यायाने साखरेचे दर वाढतील, असा विश्वास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यावीच लागेल. त्यातून अडचण आल्यास सरकार शेतकऱ्यांना मदत करेल, असे ते सांगत आहेत. यंदाच्या हंगामासाठी राज्यभरातून १६४ साखर कारखान्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यात सहकारी साखर कारखाने १०१ असून खाजगी ६३ साखर कारखान्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही साखर उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लहरी निसर्गामुळे शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात दर्जाहीन लाडू

$
0
0

Anuradha.Kadam@timesgroup.com

कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांना देण्यात येणारे प्रसादाचे लाडू घटकपदार्थांच्या तपशीलासह पॅकिंग तारखेची नोंद असलेल्या पाकीटा​शिवाय भाविकांना दिले जात आहेत. तसेच दररोज किमान दहा हजार लाडूची गरज असतानाही लाडू बनवण्याचा ठेका असलेल्या मागासवर्गीय बहुउद्देशीय महिला बचत गटातर्फे पूर्ण मागणीचे लाडू देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याने नवरात्रकाळापासून ते सध्या सुरू असलेल्या पर्यटनपर्वात अंबाबाई मंदिरात प्रसादाच्या लाडूचा तुटवडा भासत आहे. दर्जाहीन लाडू भाविकांच्या आरोग्याला हानिकारक ठरण्याची शक्यता असून अन्न व औषध प्रशासनाचे याबाबत अद्याप दुर्लक्ष आहे.

अंबाबाई मंदिर देवस्थानतर्फे भा​विकांना प्रसादाचा लाडू दिला जातो. या लाडू बनवण्याचे टेंडर १५ ऑक्टोबर, २०१५ पासून मागासवर्गीय बहुउद्देशीय महिला बचत गटाकडे देण्यात आले आहे. या गटाने दोन रूपये ९९ पैसे या दराने एक लाडू देवस्थानला द्यायचा आ​णि देवस्थानने तो लाडू पाच रूपये प्रमाणे भाविकांना विक्री करायचा अशी ही प्रक्रिया आहे. निविदा भरताना या बचतगटाने सर्वात कमी दराने निविदा भरल्यामुळे देवस्थानच्या नियमानुसार टेंडर या गटाला देण्यात आले. मात्र टेंडर मंजूर झाल्यापासून गेल्या दीड महिन्यात एकदाही या गटाने देवस्थान समितीच्या मागणीनुसार लाडूचा पुरवठा केलेला नाही. दररोज किमान दहा हजार लाडूची गरज असताना गटातर्फे तीनशे ते चारशे लाडू दिले जातात. सध्या मंदिरात भाविकांची गर्दी असून भाविकांकडून देवीच्या प्रसादाच्या लाडूला मागणी वाढली आहे. परंतु ठेकेदार गटाकडून लाडूचा पुरवठाच होत नसल्यामुळे भाविकांना लाडू मिळत नसल्याचे ​चित्र आहे. तसेच लाडूविक्रीतून देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नातही घट झाली आहे.

...

गटातर्फे जे लाडू पुरवले जातात ते दर्जाहिन असल्याचे देवस्थानच्या लक्षात आले आहे. तसेच भाविकांमधूनही लाडूच्या दर्जाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात ठेकेदार गटातर्फे देण्यात आलेल्या लाडूला पॅ​किंग नव्हते, तसेच लाडूबाबतचा तपशीलही नव्हता. त्यामुळे ते लाडू कधी बनवलेत, किती दिवसांपर्यंत खाण्यास योग्य आहेत याची माहिती भाविकांना मिळत नाही. असे लाडू खाल्ल्यास भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न भाविकांमधून विचारला जात आहे.

...

मंदिरात सुरू असलेल्या लाडूप्रकरणी भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठेकेदाराचे काम व्यव​स्थित नसेल तर दीड महिन्यानंतर त्याचे काम काढून घेण्याचे अ​धिकार देवस्थानला आहेत. मात्र, याचा निणय घेण्याचा अधिकार देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांना आहे. सध्या त्या सुटीवर असल्यामुळे लाडू प्रकरणी जाब विचारण्यासाठी देवस्थान कार्यालयात येणाऱ्या भाविकांच्या प्रश्नांना कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर ठेकेदार गटातील प्रमुख संपर्कक्षेत्राबाहेर आहेत.

....

देवस्थानतर्फे लाडूचा ठेका देत असतानाच लाडू वेळेवर आणि नियमित देण्याचा नियम सांगण्यात आला आहे. मात्र, ठेकेदाराकडून गेल्या दीड महिन्यात लाडूचा पुरवठा योग्यरित्या न झाल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. तसेच लाडूचा दर्जाबाबतही भाविकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तीन महिन्यांचा मुदतकाळ संपल्यानंतर लाडू ठेकेदाराच्या कामाबाबत ​निणय घेणे आवश्यक आहे. - संगीता खाडे, सदस्या, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हाळवणकरांना लवकरच लाल दिवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वस्त्रनगरीत राजकारण करणे सोपे नाही. पण, आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या कार्यपद्धतीतून विरोधकांना पुरते नामोहरण केले आहे. म्हणूनच त्यांच्याकडे महिन्याभरात लाल दिव्याची गाडी निश्चितपणे येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे बोलताना दिली.

येथील लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सन २०१४-१५ या एक वर्षाच्या कार्यकालातील कामकाजाचा लेखा-जोखा चे प्रकाशन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.

जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आमदार सुरेश हाळवणकर हे सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करत असतात असे सांगून नामदार पाटील म्हणाले, आगामी उन्हाळी अधिवेशनामध्ये आमदार हाळवणर यांनी केलेल्या सर्व शिफारशी स्वीकारून राज्यातील वस्त्रोद्योगाला नवीन दिशा देण्याचे काम करण्यात येईल.

यामाध्यमातून इचलकरंजीला टेक्स्टाईल हब, दत्तोपंत ठेंगणी यांच्या नावाने यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना, पाच वर्षे यंत्रमागाचे वीज दर कायम आणि वीज दरातील इंधन आधिभारावर ५० टक्के सबसिडी आदिसह विविध सवलती वस्त्रोद्योगाला देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. आमदार हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी जो शब्द सरकारकडे टाकतील त्याची पुर्तता १०० टक्के करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

खासदार संजय पाटील यांनी, इचलकरंजीच्या जनतेने हाळवणकर यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवून देऊन धनशक्ती विरूद्ध जनशक्ती कशी लढाई असते हे दाखवून दिले आहे. समाजाची सेवा करणारे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून आमदार हाळवणकर यांचा उल्लेख करावा लागेल.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, चांगली कामे करणाऱ्याला जनता निवडून देत असते आणि काम करत राहणे हे विजयाचे गणित असते. लेखा जोखा सादर करणे हे लोकप्रतिनिधींवर कायद्याने बंधनकारक नसले तरी ती माझी नैतिक जबाबदारी आहे, या भावनेतून हा उपक्रम मी राबवत आहे. विरोधकांनी टीका केली मात्र त्या टिकेला नेहमी कृतीतून उत्तर दिले आहे. केलेल्या कामांचा आढावा दरवर्षी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजितमामा जाधव, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत भाजपाचे शहराध्यक्ष विलास रानडे यांनी तर सूत्रसंचलन शहाजी भोसले यांनी केले. आभार नगरसेवक संतोष शेळके यांनी मानले. यावेळी बाबा देसाई, जयवंत लायकरू आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५९१ कोटींचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरणने इंधन समायोजन आकार या नावाखाली सरासरी प्रतियुनिट ७३. २४ पैसे दरवाढ केल्याने ग्राहकांना ऐन दिवाळीत दरवाढीचा जोरदार फाटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच ही दरवाढ लागू केल्याने राज्यातील महावितरणच्या सव्वादोन कोटी ग्राहकांवर दरमहा ५९१ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे.

वीज नियामक आयोगाने २६ जून २०१५ रोजीच वीज दर निश्चिती केली होती, त्यानुसार जुलै २०१५ मध्येच इंधन समायोन आकार शून्यावर यायला हवा होता, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. प्रत्यक्षात मात्र जुलैमध्ये ‍वीज खरेदीपोटी झालेल्या जादा खर्चाची आकारणी ऑक्टोबर महिन्याच्या बिलामध्ये करण्यात आली आहे. ही आकारणी सरासरी प्रतियुनिट ७३.२४ पैसे इतकी आहे. या आकारणीमुळे ग्राहकांवर प्रतिमहिना तब्बल ५९१ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. ही दरवाढ तीन महिन्यांसाठी असली तरी यातून ग्राहकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. नियमित दरवाढ ८.५ टक्के आणि इंधन समायोजन आकाराच्या माध्यमातून १२.५५ टक्के असा एकूण २१.२५ टक्के दरवाढीचा बोजा तीन महिन्यांसाठी ग्राहकांवर असणार आहे.

महावितरणने वीज नियामक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन करून महागड्या दराने वीज खरेदी केली आहे, त्यामुळे समायोजन आकारणी बेकादेशीर असल्याचा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे. मंजुरीपेक्षा वाढीव दराने वीज खरेदीचा निर्णय रद्द करावा आणि ग्राहकांवरील बोजा मागे घ्यावा, या मागणीसाठी ग्राहक संघटनेने वीज नियामक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहेत. दरवाढ रद्द करावी असा आग्रह संघटनेने धरला आहे. वीज नियामक आयोगाने ३.७८ रुपयांनीच वीज खरेदीची सूचना केली असूनही महावितरणने ४.२५ ते ५.२५ रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी केली आहे. ग्राहकांचा काहीच दोष नसल्याने याचा फटका ग्राहकांना बसू नये यासाठी संघटनेने प्रयत्न सुरू ठेवले आहे.

घरगुती ग्राहक : ५०.१४ पैसे ते १२३.२३ पैसे

व्यापारी ग्राहक : ९१.८० पैसे ते १२७.१० पैसे

औद्योगिक ग्राहक : ५५.९७ पैसे ते १२७.१० पैसे

यंत्रमागधारक : १०८.६० पैसे ते १३७.६० पैसे

कृषीपंप : ३२.२ पैसे ते ४३.४४ पैसे

उच्चदाब औद्योगिक : ९५.९६ पैसे ते ८७.३२ पैसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images