Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अवघ्या २५ मतांनी मिळवला विजय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मतमोजणीवेळी विविध प्रभागांत अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. शेवटच्या फेरीपर्यत जय, पराजयाचे पारडे फिरत राहिले. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांची घालमेल सुरू राहिल्याचे चित्र मतमोजणी केंद्रात दिसले.

टेंबलाईवाडी प्रभागात कमलाकार भोपळे (१२३७) आणि बाळासाहेब ऐवळे (१२०८) यांच्यात शेवटपर्यंत चुरस राहिली. भोपळे हे २९ मतांनी विजयी झाले. पांजरपोळ प्रभागात भाग्यश्री शेटके (१२२३) आणि सुवर्णा कोगेकर (११९८) यांच्यामध्ये खरी लढत होती. यात शेटके २५ मतांनी विजयी झाल्या. रायगड कॉलनी जरगनगर प्रभागात गीता गुरव (११७३) आ​​णि वैभवी जरग (११४७) यांच्यामध्ये स्पर्धा रंगली. गुरव यांनी ही लढत २६ मतांनी जिंकली.

शिवसेना चौकटीतच

दरम्यान, शिवसेनेने ८१ जागावर निवडणूक लढविली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांनी ​​शिवसेनेचा महापौर करणार अशी वल्गना केली होती. मात्र निकालानंतर शिवसेनेच्या संख्याबळात वाढ झाली नसल्याचे स्पष्ट झाले. मावळत्या सभागृहातही शिवसेनेचे चार सदस्य आहेत. यंदा ताकत आणि सर्व यंत्रणा उभी करूनही सेनेचा विजय चौकटीतच अडकला आहे. शिवसेना नेत्यांनी आपआपसातील वाद मिटवून सगळे एकत्र आले होते. पण संघटित शक्ती दाखवूनही नगरसेवकांचे संख्याबळ काही वाढले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ताकद उरली केवळ कागदावरच

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : एकहाती सत्ता स्थापनेचे स्वप्न घेऊन निवडणुकीत नियोजनबद्धरित्या उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अतिआत्मविश्वासामुळे गेल्या सभागृहातील संख्याबळही गाठता आले नाही. आमदार हसन मुश्रीफ यांची एकतर्फी लढाई आणि परफेक्ट नियोजनही राष्ट्रवादीची २५ नगरसेवकांवरुन १५ नगरसेवकांवर झालेली घसरण थांबवू शकले नाही. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून शहरात बऱ्यापैकी नेटवर्क असलेले खासदार धनंजय महाडिक प्रचारापासून अलिप्त राहिल्यानेही पक्षाला त्याचा चांगलाच फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याबाबतीत पक्षाने काही पाऊले उचलली असती तर २० प्रभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर थांबलेले राष्ट्रवादीचे उमेदवार ​कदाचित विजयाचा टप्पाही गाठू शकले असते. त्यामुळे राष्ट्रवादीचा एकहाती विजयाबाबतचा विश्वास कदाचित सार्थ ठरला असता.

राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत सारी सूत्रे मुश्रीफ यांच्या हातात सोपवली होती. त्यानुसार त्यांनी सर्व्हे करुन सक्षम उमेदवारांची निवडही केली. पहिली यादी जाहीर केल्यानंतर इतर पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यांच्या तुलनेत राष्ट्रवादीची यादी वरचढ वाटत होती. त्याचबरोबर प्रभागातील स्थानिकांच्या जोडण्याही उमेदवारांना करुन देऊन नाराजांचा फटका बसू नये याचा प्रयत्न केला. मात्र घराणेशाहीची टिका यादीवर झाली. जुन्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना दिलेल्या ​उमेदवारीपाठीमागे त्यांची हक्काची मते मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. पण या हक्काच्या मतांचा विचार करताना त्यांची प्रभागातील नागरिकांच्या मनात प्रस्थापितांबाबतची असलेली नाराजी दुर्लक्षित केली. त्याचाही काही नकारात्मक परिणाम झाला. पाच वर्षात विकास कामे केली. पण त्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांमधील पदांच्या खांडोळीचा मुद्दा पाळता आला नाही. तसेच महापौरांच्या लाचखोरीचा मुद्द्याचाही या निवडणुकीत काही प्रमाणात फटका बसलाच.

राष्ट्रवादीने जोरदार प्रचाराची आघाडीही उघडली. भाजप व ताराराणी आघाडीवर जोरदार टिका करत सत्तेसाठी काहीही करण्यास तयार होणाऱ्या या महायुतीच्याविरोधात शहरवासियांची नस पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे या नेत्यांच्या सभा वगळल्यास प्रचार सभांचा मोठा परिणाम साधता आला नाही. महाडिकांना पक्षाच्या प्रचारात उतरवण्याचे प्रयत्न झाले असते तर त्यांचे काका आमदार महादेवराव महाडिक यांच्या मानल्या जात असलेल्या ताराराणी आघाडीला त्यांना सहाय्य करता आले नसते. पण मुश्रीफ यांनी महाडिकांच्या या भूमिकेबाबत काही तक्रार अथवा अहवाल देणार नाही असे सांगून एकप्रकारे पाठराखण केली.

पवारांच्या दौऱ्याअभावी...

शरद पवार व कोल्हापूरचे नाते सर्वश्रुत आहे. कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा दौरा पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक उत्साह देऊन जातो, तसेच पक्षासाठी अनेक बेरजाही करुन जात असतो हा आजवरचा अनुभव आहे. त्यांचा दौरा झाला असता तर कदाचित खासदार महाडिक यांना भूमिका बदलण्यास भाग पाडले असते. पण पवारांचा दौराच झाला नसल्याने पक्षाला दोन्ही अर्थाने फटका बसला. अनेक प्रभागात सक्षम उमेदवाराच्या मर्यादाही पक्षाला आल्या. त्याचवेळी उमेदवारांची यादी ताकदीची असल्याने पक्षामध्येही एकप्रकारचा अतिआत्मविश्वास निर्माण झाला होता. तोही अनेक उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सतेज’पुढे, सारे निस्तेज!

$
0
0

Appasaheb.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : काँग्रेसअंतर्गत गटबाजी, आमदार महादेवराव महाडिक यांनी मांडलेली वेगळी चूल, निवडणुकीच्या धामधुमीत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची अलिप्तता आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी इतर पक्षांची धरलेली वाट, भाजप-ताराराणी आघाडीने महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी उघडलेली मोहिम या साऱ्यावर मात करत माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाला एकहाती विजय मिळवून दिला. नेटके नियोजन, विकासाचा दृष्टिकोन, लढाऊ बाणा या सूत्राचा मिलाफ घडवित आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सोबतच्या राजकीय मैत्रीचा फायदा घेत काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचविले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांची कसोटी पाहणारी ही निवडणूक होती. महापालिकेतील काँग्रेसची सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजप आघाडीपासून राष्ट्रवादीपर्यंत साऱ्यांनी व्यूहरचना आखली. काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांच्या मार्गदर्शनाखालील ताराराणी आघाडीने माजी मंत्री पाटील यांना आव्हान दिले. भाजपने कोल्हापुरात कमळ फुलविण्याचा चंग बांधला. याउलट स्थिती काँग्रेसमध्ये होती. केंद्र-राज्यातील सत्ता गमाविल्यानंतर काँग्रेस नेत्यांसोबत कार्यकर्त्यांतही मरगळ आली होती. कार्यकर्त्यांच्या मनातील नैराश्य, मरगळ झटकून टाकतानाच पाटील यांनी पुन्हा एकदा महापालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केला.

काँग्रेसच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम, चंद्रकांत हंडोरे, अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांच्या सभा झाल्या. त्यातून भाजप आघाडीच्या विरोधात जनमत तयार केले. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे यांच्यासोबत पाटील यांनी निवडणुकीचे नियोजन केले. मात्र अंतिम निर्णय आपल्याबाजूनेच होईल याचे राजकीय चातुर्य दाखवत जवळच्या कार्यकर्त्यांना बहुतांश ठिकाणी उमेदवारी मिळवून दिली. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात समाविष्ट बहुतांश प्रभागात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणत पकड कायम असल्याचे दाखवून दिले. कोल्हापूर निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती ते उमेदवार निश्चितीपर्यंत प्रत्येक निर्णयावर त्यांचा प्रभाव राहिला. 'कोल्हापूर संवाद'सारख्या उपक्रमांतून थेट नागरिकांशी जवळीक साधली. थेट पाइपलाइन योजना, नगरोत्थान योजनेंतर्गत साकारलेली रस्ते, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे सुशोभिकरण, एसटीपी प्रकल्प ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवित कोल्हापूरच्या विकासासाठी काँग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचे त्यांनी मतदारांवर बिंबविले. या साऱ्याचे फलित म्हणून काँग्रेसला कोल्हापुरात पुन्हा सत्ता मिळाली. सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

'उत्तरे'तही नवी स्पेस

सतेज पाटील यांनी एकाकी लढा देत जिल्ह्याच्या राजकारणात नव्या शक्तीचे दर्शन घडवित असताना त्यांचे समवयस्क राजकारणी व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे राजे गटाचे अस्तित्वच संपुष्टात आले.

उमेदवार निश्चितीतही काही प्रभागात मातब्बरांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. कसबा बावड्यात प्रभागनिहाय लोकांच्या भेटी घेऊन लोकांना हवा तसा उमेदवार दिला. मालोजीराजे छत्रपती हे निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नकळतपणे पोकळी निर्माण झाली होती. तेथे लक्ष घालून उमेदवारी निश्चित करत 'उत्तरे'तही राजकारणाची नवी स्पेस निर्माण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज पाटील यांचा शड्डू

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूरः महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकहाती दणदणीत यश मिळवून देत माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. ही निवडणूक स्वतःच लढवणार असल्याची घोषणा करत आमदार महादेवराव महाडिक यांना त्यांनी उघड आव्हान दिले आहे. यामुळे ही निवडणूक पाटील विरूध्द महाडिक अशीच रंगणार आहे. या परिस्थितीत महाडिक कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार, याचीच उत्सुकता राहणार आहे.

विधान परिषदेची मुदत येत्या जानेवारीत संपत आहे. आमदार महाडिक काही महिन्यापासूनच निवडणुकीची तयारी करत आहेत. विधानसभा व महापालिका निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवणे मोठे आव्हान ठरणार आहे. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसऐवजी भाजपला जवळ केल्याने त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी सतेज पाटील यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीत सतेज पाटील यांनी एकहाती यश मिळवले आहे. २७ जागा मिळवण्याचे श्रेय त्यांनाच जाते. या जोरावर विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या उमेदवारीवर तेच दावा करू शकतात. त्यांनीच स्वतः शड्डू ठोकल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे. ही निवडणूक दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन लढवणार आहेत. सध्या ही जागा काँग्रेसला असून राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देणार आहे. आमदार हसन मुश्रीफ व पाटील यांची मैत्री पाहता तेही पाटील यांनाच संमती देण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे सध्या ११५ मते आहेत. जनसुराज्यकडे ३० मते असल्याने या निवडणुकीत राष्ट्रवादी व जनसुराज्यची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. आम्हाला मान्य असणारा उमेदवार दिला तर काँग्रेससोबत राहू, असे म्हणत मुश्रीफ यांनीही इरादा स्पष्ट केला आहे.

महाडिकांच्या हातात घड्याळ?

काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास साहजिकच महाडिक कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याची उत्सुकता निर्माण होणार आहे. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी चाचपणी केल्याचे समजते. भाजपची ताकद नसल्याने त्यांना राष्ट्रवादी हाच पर्याय उपलब्ध आहे, पण दोन्ही पक्षाची युती झाल्याने राष्ट्रवादी युती तोडणार का हा मोठा प्रश्न आहे. युती तोडत राष्ट्रवादीने महाडिक यांना उमेदवारी दिलीच तर मात्र सतेज पाटील विरूध्द महाडिक अशी प्रचंड चुरशीची निवडणूक होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रे‘सतेज’!

$
0
0

महापालिकेवर पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा झेंडा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत अटीतटीच्या आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा दोन्ही काँग्रेस पक्षाच्या हाती राहणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. काँग्रेस २७ जागा जिंकत महापालिकेतील मोठा पक्ष बनला आहे. तर भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीनेही ३२ जागा जिंकत मुसंडी मारली.

राष्ट्रवादीला मात्र यंदाच्या निवडणुकीत फटका बसला. त्यांना केवळ १५ जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत केवळ चार जागा जिंकलेल्या शिवसेनेला नामुष्की पत्करावी लागली. निकाल जाहीर होताच सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या. यंदाच्या सभागृहात ६१ चेहरे नवीन आहेत. ते पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणार आहेत. सध्याच्या सभागृहातील ११ नगरसेवक पुन्हा सभागृहात असतील. बारा विद्यमानासह २५ माजी नगरसेवकांना पराभव पत्करावा लागला. तीन अपक्षांनीही ताकद दाखवली.

माजी महापौर नंदकुमार वळंजू, उदय साळोखे, जयश्री सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर शारंगधर देशमुख, संभाजी जाधव, महेश सावंत यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. अतिशय चुरशीच्या लढाईत फिरंगाई प्रभागात नगरसेवक रवीकिरण इंगवले यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी त्यांच्या जाऊबाई व अजय इंगवले यांच्या पत्नी प्रज्ञा यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे संख्याबळ ११ ने घटले आहे. शहराध्यक्ष राजू लाटकर, उपमहापौर ज्योत्स्ना मेढे यांचे पती बाळकृष्ण मेढे, माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे संख्याबळ तीनवरून १३ पर्यंत पोहचले, पण सत्ता काबीज करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. या आघाडीचे शिलेदार सुनील मोदी, इंद्रजीत सलगर यांना पराभवास सामोरे जावे लागले. महापौरदाच्या दावेदार समजल्या जाणाऱ्या यशोदा मोहिते यांनाही पराभवाची चव चाखायला लागली. मालोजीराजे गटाचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश नाईकनवरे, विक्रम जरग यांचा पराभव झाला. माजी उपमहापौर जरग यांना नवखे अजिंक्य चव्हाण यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.

दुसरीकडे भूपाल शेटे, शारंगधर देशमुख, संभाजी जाधव, सुनील पाटील, संदीप नेजदार, किरण शिराळे, महेश सावंत, सत्यजित कदम यांनी विजयाची परंपरा राखली. ईश्वर परमार, विजय सुर्यवंशी, अशोक जाधव, निलेश देसाई, सरिता मोरे, आशीष ढवळे, विलास वास्कर या माजी नगरसेवकांनी पुन्हा सभागृहात प्रवेश केला. भाऊबंदकीमुळे तटाकडील तालीम प्रभागातून उदय व चंद्रकांत साळोखे या दोघा बंधूचा पराभव झाला. फुलेवाडी येथील राहूल माने व त्यांच्या आई इंदूमती माने या निवडून आल्या. विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मिरवणुका काढत जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात पहिला महापौर काँग्रेसचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत २७ जागा जिंकून काँग्रेस हा सर्वाधिक जागा जिंकणारा मोठा पक्ष बनला आहे. कोल्हापूरचा पहिला महापौर हा काँग्रेसचाच असेल असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात सत्ता स्थापण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य पातळीवरील नेत्यासोबत चर्चा झाली आहे. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापना होईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरात काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम काँग्रेस कमिटी येथे झाला. यावेळी कदम बोलत होते. महापालिकेतील सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांनी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत चर्चा केली.

कोल्हापुरत काँग्रेसच्या विजयी सोहळ्यात महाडिकांवर निशाणा

'ज्यांनी पक्षाच्याविरोधात कारवाया केल्या, काँग्रेसच्या उमेदवारांना पाडण्याचे कारस्थान रचले त्यांच्यावर काय कारवाई करणार ? सुनील मोदी हा कुणाचा माणूस आहे. अजून किती दिवस पक्ष त्यांना पाठीशी घालणार ?' अशी विचारणा काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजी मंत्री आणि नेते पतंगराव कदम यांच्याकडे केली. काँग्रेस कमिटी येथे झालेल्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात नगरसेवकांनी आमदार महादेवराव महाडिक यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. नगरसेवकांच्या भावना जाणून घेत कदम यांनी 'पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांच्या विरोधातील प्रभागनिहाय अहवाल द्या, शहानिशा करून पक्ष कारवाई करेल.' अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात क्लोरीन वायू गळतीत वृद्धेचा मृत्यू

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी उद्यमनगर येथे क्लोरीन वायूची गळती झाल्याने लक्ष्मीबाई पांडुरंग माने (वय ६५, रा. शिवाजी उद्यमनगर) यांचा मृत्यू झाला. तर कपिल मुदगल व निखिल सुरेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर असून अन्य ५० ते ६० व्यक्तींनाही वायू गळतीची बाधा झाली आहे. या सर्वांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी फ्रॅब्रिकेशनचा व्यवसाय करणाऱ्या प्रशांत सर्जेराव कांबळे भोई (२४, रा. शिवाजी विद्यापीठ) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





शिवाजी उद्यमनगर येथील मदनलाल धिंग्रा तरूण मंडळाजवळ प्रशांत कांबळे यांचे एस.एस. फॅब्रिकेशन हे छोटे युनिट आहे. मंगळवारी त्यांच्याकडे क्लोरीनच्या टाकीचा नट बोल्ड सैल करण्यासाठी दुरूस्तीला आला होता. नट बोल्ड सैल करत असताना सिलिंडर खाली पडले. त्यामुळे स्फोटासारखा मोठा आवाज आला. तसेच टाकीतून क्लोरीन वेगाने बाहेर आला. वायू बाहेर येणाऱ्या आवाजामुळे परिसरातील कारखानदार, कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली. पिवळ्या रंगाचा धूर सगळीकडे पसरला. गॅस गळती झाली म्हणून नागरिकांनी दरवाजे लावून घेतली. लक्ष्मी माने यांनीही दरवाजा बंद लावून घेतला व त्या बिछान्यावर झोपी गेल्या.

दरम्यान या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान नागरिकांना श्वासोश्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला. परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित ठेवण्यासाठी सुरूवात केली. माने यांच्या घराचा दाराला कडी असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढले. त्यांना रूग्णवाहिकेतून सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास दाखल केले. पण उपचार सुरू असतानाचा त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत सत्ता स्थापण्याचा भाजप ताराराणी आघाडीचा प्रस्ताव नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसने समान विचारधारा व नैसर्गिक मित्र असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी संयुक्तरित्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची घोषणा केली. पहिल्या वर्षात काँग्रेसचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर व स्थायी समिती सभापती होणार आहे. त्यानंतरचा फॉर्म्युला माजी मंत्री सतेज पाटील व मुश्रीफ एकत्रित बसून ठरवणार आहेत.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने काँग्रेस व भाजप, ताराराणी आघाडीने आपापल्या पातळीवर सत्ता स्थापण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय दोघांचीही सत्ता येऊ शकत नसल्याने काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेत सहभागाचे आवाहन केले. तर भाजप, ताराराणी आघाडीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करावी, त्यांना बाहेरुन पा‌ठिंबा देण्याचे सांगत सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची चाल खेळली होती. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले होते. त्यानुसार पाटील यांच्या प्रस्तावावर मुश्रीफ यांनी तटकरे यांच्याशी तसेच अजित पवार, नवाब मलिक यांच्याशी चर्चा करुन आघाडीबाबत हिरवा कंदील दाखवला होता.

मंगळवारी दोन्ही काँग्रेसच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी पक्ष कार्यालयात बैठका झाल्या. या बैठक झाल्यानंतर काँग्रेस कमिटीतून पतंगराव कदम यांच्यासह सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, अॅड. सुरेश कुराडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सुभाष बुचडे, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण हॉटेल सयाजीवर पोहचले. त्याबाबतचा निरोप राष्ट्रवादीला पाठवण्यात आल्याने हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, उत्तम कोराणे, प्रताप माने, आदिल फरास दुपारी सव्वाच्या सुमारास पोहचले. जवळपास सव्वा तास कदम, मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांची बंद खोलीत बैठक झाली. त्यानंतर कदम यांनी आघाडीची घोषणा केली. राष्ट्रवादीसोबत यापूर्वीही महापालिकेत आघाडी होती त्यामुळे यंदाही राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाचा फॉर्म्युला ठरला असून पुढील वर्षाचे फॉर्म्युले सतेज पाटील व हसन मुश्रीफ हे येत्या दहा दिवसात बसून ठरवतील असे स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, 'काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावानुसार प्रदेशाध्यक्ष तटकरे, अजित पवार, नवाब मलिक यांच्याशी चर्चा करुन काँग्रेसशी आघाडीचा निर्णय घेतला. केंद्र व राज्यात सरकार नसल्याने निधी आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण शहराच्या विकासासाठी विविध योजनांमधून निधी आणण्याचा प्रयत्न करु.' काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनीही जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काँग्रेस आघाडी जोरदार प्रयत्न करेल, असे सांगितले.

पराभूतांना स्वीकृतपद नाही

दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेते व प्रमुखांच्या झालेल्या बैठकीत पुढील पाच वर्षात कारभार करताना जे पराभूत झाले असतील, अशांना स्वीकृत नगरसेवकपदावर नियुक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही पक्षात पराभूत झालेले इच्छुक स्वीकृत नगरसेवकपदाच्या मार्गाने सभागृहात दाखल होण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून सातत्याने नेत्यांकडे प्रयत्न केले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाडिक-सतेज संघर्षाला धार

$
0
0

gurubal.mali@timesgroup.com

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भोपळाही न फोडता आल्याने बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीतील यशाने नवचैतन्य निर्माण झाले आहे. महाडिक गटाची ताकद सोबत नसताना मिळवलेले हे खणखणीत यश असल्याने निवडणुकीतील प्रचारानंतरही पुन्हा एकदा दोन्ही काँग्रसने महाडिक काका-पुतण्यांनाच टार्गेट केले आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना आव्हान दिले आहे. आता महाडिक-पाटील संघर्षाला आणखी धार येण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले. त्यानंतर जिल्हा बँक व बाजार समितीतही सत्ता मिळाली नाही. त्यामुळे वर्षभरात काँग्रेस यशाच्या शोधात होती. अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाला सतत दणका बसला.

या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी काँग्रेसला वाऱ्यावर सोडले. ताराराणी आघाडीला मदत होईल अशी सूत्रे त्यांनी हलवली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या प्रचारापासून अलिप्त राहिले. या दोघांच्या सोयीच्या भूमिकेमुळे पंधरा दिवस ते टिकेचे धनी ठरले.

प्रचारात सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांनी महाडिक काका-पुतण्याला लक्ष्य केले. त्यामुळे निवडणूक महाडिकांवरील टिकेनेही गाजली. स्थानिक नेत्यांबरोबरच राज्यस्तरीय नेत्यांनीही महाडिक यांच्यावर टीका केली. प्रचार नव्हे निकाल संपल्यावरही महाडिक टिकेचे केंद्रबिंदू आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही याच दोघांना टार्गेट करण्यात आले. महाडिक यांनी पक्षापेक्षा सोयीच्या राजकारणाला अधिक महत्व दिले आहे. त्यामुळे अनेक सत्तास्थाने त्यांच्याकडे आली. महापालिका निवडणुकीतही ताराराणी आघाडीचे १९ आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले ११ नगरसेवक महाडिक गटाचेच आहेत. म्हणजेच तब्बल ३० नगरसेवक महाडिकांचे नेतृत्व मानणारे आहेत. त्या जीवावरच ताराराणी आघडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना हे समिकरण मान्य होणारे नाही. मात्र पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला तर त्यांचा नाइलाज होणार आहे. मात्र दोन्ही काँग्रेसने एकत्र सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा राज्य पातळीवरून हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच झाली​ आहे. त्यामुळे यामध्ये बदल होणे अशक्य असले तरी पुन्हा या निमित्ताने महाडिक टिकेचे धनी होणार आहेत.

निवडणुकीत दोन्ही काँग्रसची गट्टी करू महाडिक यांना धक्का देण्यात सतेज पाटील यशस्वी झाले. त्याचा फायदा विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला होणार आहे. ही उमेवारी मिळवण्यासाठी पाटील आघाडीवर आहेत. मुश्रीफ-पाटील यांचे संबंध फारच मैत्रीपूर्ण असल्याने सध्या पाटील यांच्या उमेदवारीचा दावा प्रबळ ठरणार आहे. त्यामुळे महाडिक यांच्या विधानपरिषदेचा मार्ग अधिक बिकट झाला आहे. पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती ठेऊन काँग्रेसला यश मिळवून दिले. सतत पराभव पत्करावा लागत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत आलेले नैराश्य झटकून निघाले आहे. जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसची हवा निर्माण होण्यास हा निकाल कारणीभूत ठरणार आहे.

आनंदोत्सवापासून दूरच...

काँग्रेसला एवढे चांगले यश मिळूनही या पक्षाचे आमदार असलेल्या महाडिक यांना आनंदोत्सव साजरा करता आलेला नाही. कारण त्यांनी आपली ताकद ताराराणी आघाडीच्या मागे उभी केली. मात्र छुपी ताकद असल्याने ताराराणीचे १९ नगरसेवक येऊनही त्याचे श्रेय त्यांना घेत येत नाही. यश मिळूनही महाडिक गटाला सोयीच्या या राजकारणामुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे. विधानपरिषद निवडणूक महाडिक गटासासाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ते सोयीच्या राजकारणासाठी कोणत्या पक्षाचा वापर करणार हे पंधरा दिवसात स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना-भाजप ‘वॉर’ सुरूच

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमधील संबंध कमालीचे ताणल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्याच्या सत्तेत एकत्रित असूनही एकमेकांवर चिखलफेक करताना नेत्यांसह मुख्यमंत्र्यांचाही तोल सुटला. निकालावरही याचे परिणाम जाणवल्यानंतर आता सोशल मीडियात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वॉर भडकले आहे.

कोल्हापूर महापालिकेत भाजपने शिवसेनेची साथ सोडत ताराराणी आघाडीशी सोबत केल्यानंतर याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही उमटले. तिथेही शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली. भाजपने शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी हरेक प्रयत्न करून पाहिले, तर शिवसेनेनेही भाजपला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. कोल्हापुरातील जाहीर प्रचार सभेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एखनाथ खडसे यांच्यावर जोरदार तोफ डागली होती. कल्याण-डोंबिवलीतील सभेत याहीपुढे जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले. लाचारीने सत्तेत नसल्याचे सांगत भाजपने शिवसेनेच्या अंगावर येण्याच्या भानगडीत पडू नये असा स्पष्ट इशारा दिला होता.

सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना सत्तेतून बाहेर गेल्यास दोन पर्याय उपलब्ध असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मौन सोडत थेट शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेने भाजपला लक्ष्य करण्याऐवजी कॉँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य करावे असे सांगताना, 'वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारी आमची जात आहे' असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांचे हेच वक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. यातच कोल्हापुरात शिवसेनेला केवळ चार जागा मिळाल्या आणि कल्याण-डोंबिवलीतही भाजपच्या जागा पाच पटीने वाढल्या, त्यामुळे उत्साह संचारलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून शिवसेनेला डिवचले आहे.

कोल्हापुरात तिपटीने वाढ आणि कल्याण-डोंबिवलीत पाच पटीने जागा वाढल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांचे बाहुबल दाखवून शेजारी निपचित पडलेल्या वाघाचे व्यंगचित्र काढले आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यंगचित्रांची मालिकाच सोशल मीडियात झळकली आहे. हाताला प्लॅस्टर केलेल्या मुख्यमंत्र्यांचे चित्र दाखवून, 'वाघाच्या जबड्यात घालून हात... स्वतःचाच केला घात' अशी टिप्पणी केली आहे.

महाराष्ट्राची खुर्ची आमच्यामुळेच असल्याचा दावा करणा-या व्यंगचित्रासोबत वाघाने कमळाचे चित्र तोंडात धरल्याचेही दाखवले आहे. बाळासाहेब ठाकरे वाघांच्या टोळीला, 'कुठे चाललात?' असे विचारतात, तेव्हा 'भाजपमध्ये आलेल्या नवीन डेंटिस्टकडून दात मोजून येतो' असे उपहासात्मह व्यंगचित्रही सोशल मीडियात फिरत आहे. सोशल मीडियातील या वॉरमुळे वाचकांचे मनोरंजन होत असले तरी, प्रत्यक्षात मात्र या दोन्ही पक्षांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा मलिन होत आहेत हे नक्की. याचा परिणाम यापुढेही दोन्ही पक्षांना भोगावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडला होणार सहकार न्यायालय?

$
0
0

सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड व पाटण तालुक्यात सहकारी संस्थांची संख्या जास्त असल्याने येथे सहकार न्यायालय व्हावे, अशी कराड बार असोसिएशनची जुनी मागणी आहे. या बाबत भाजपाच्या येथील काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली असून, त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कराड व पाटण तालुक्यात चार सहकारी साखर कारखाने असून बँका, पतसंस्था, सोसायट्यांचे मोठे जाळे दोन्ही तालुक्यांत विस्तारले आहे. या शिवाय अन्य सहकारी संस्थाही आहेत. सहकारी संस्थांमधील दावे, वाद यासाठी सातारा येथील सहकार न्यायालयात धाव घ्यावी लागते. या न्यायालयात दोन्ही तालुक्यांतून दाखल प्रकरणांची संख्या ४५ टक्के इतकी आहे. दोन्ही तालुक्यांतील पक्षकारांना न्याय मिळवण्यासाठी सातारा येथे जावे लागते. यात गैरसोय होत असल्याने कराडला सहकार न्यायालय सुरू करावे, अशी दोन्ही तालुक्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. कराड बार असोसिएशनने सन २००४साली ठराव केला असून, बार पदाधिकारी सातत्याने या बाबत पाठपुरावा करीत आहेत. सद्या कराडला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यरत असून, या न्यायालयाची इमारतही बांधण्यात आली आहे.

राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी या बाबत पुढाकार घेतला आहे. या पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुबार अनुदानाचा घोळात घोळ

$
0
0

कृषी कार्यालयात जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुबार अनुदान जमा झाल्याची चूक सहा महिन्यानंतर उघडकीस आली आहे. लेखाशाखेतील अनियमिततेची विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चूक सुधारण्याऐवजी जबाबदारी झटकून कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून लेखाधिकारी शोभा घाटगे यांनी अपूर्ण रोखीची पुस्तके पूर्ण करण्याची जबाबदारी चक्क स्टेनो टायपिस्टवर सोपवली आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून दोन वर्षांपूर्वीचे ठिबक व तुषार सिंचनाचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना वितरीत केले आहे. मात्र अनुदान एकाच लभार्थ्याला दोनवेळा देण्यात आले आहे. लेखाधिकारी यांच्या गंभीर चुकीसह त्यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार तक्रारी होऊनही कृषी अधीक्षक मोहन अटोळे यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले. लेखाधिकाऱ्यांनाच हाताशी धरुन कार्यभाग साधण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने लेखाशाखेतील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. एकाच लाभर्थ्यांला दुबार अनुदान दिल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर चौकशीची सूत्रे वेगाने हलली. विभागीय सहसंचालक नारायण शिसोदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दुबार अनुदान जमा झाल्याचा प्रकार सहा महिन्यानंतर लक्षात आल्यानंतर अनुदान परत करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने लेखाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

यातून मार्ग काढण्यासाठी रोखीची पुस्तके पूर्ण करण्याची जबाबदारी चक्क स्टेनो टायपिस्टकडे दिली आहे. वास्तविक रोखीची पुस्तके भरण्याची जबाबदारी वरिष्ठ लिपिक मुकुंद पिसे यांची आहे. तसेच लेखा शाखेच्या दैनंदिन कारभारावर अधीक्षक मारुती माळी यांची देखरेख ठेवण्याची जबाबदारी असताना ते दुर्लक्ष करत आहेत.

अग्रीम अर्ज गहाळ

सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याची प्रथा बंद झाली आहे. यावर्षीच्या दिवाळीसाठी पाच हजार रुपये 'उत्सव अग्रीम' देण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज घेतले होते. कर्मचाऱ्यांच्या उत्सव अग्रीम अर्जांचा संपूर्ण बंच लेखाशाखेने गहाळ केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडे पुन्हा अर्जाची मागणी केली जात आहे. याविरोधात कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा कृषी अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.

लेखाशाखेबाबत असलेल्या तक्रारी

लेखाधिकारी मोजक्याचवेळी कार्यालयात असतात.

कर्मचाऱ्यांच्या विविध बिलांना जाणीवपूर्वक विलंब

कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रमाण कायम

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे हाताळण्यास सक्षम व्यक्ती नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाखांचा वाळूसाठा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहापूर परिसरातील खासगी जागेत विनापरवाना मोठ्या प्रमाणात वाळू साठा केल्याप्रकरणी गावकामगार तलाठी एस. एन. भानुसे यांनी कारवाई करत तब्बल अडीच लाखाची वाळू जप्त करुन सदरची जागाही सील केली आहे. शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठा केलेल्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात येत असल्याने असा साठा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर विनापरवाना साठा करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी सांगितले.

शहापूर परिसरातील ज्ञानराज गोंदकर यांच्या मालकीच्या गट नं. ३७ या जागेत मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्याची माहिती तलाठी भानुसे यांना मिळाली होती. या संदर्भात त्यांनी प्रांताधिकारी जिरंगे यांना माहिती दिली. प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने याठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गावकामगार तलाठ्यांनी याठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात वाळू साठा जप्त केला. याठिकाणी दिलीप पांडुरंग पाटील यांच्या मालकीची एक लाख ८५ हजार रुपये किंमतीची तब्बल ३७ ब्रास वाळू तसेच जान्हवी जितेंद्र पाटील यांच्या मालकीची ५० हजार रुपये किंमतीची १० ब्रास वाळू अशी एकूण अडीच लाख रुपये किंमतीचा वाळू साठा जप्त केला आहे. तसेच सदरची जागा सील करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिरवाजिरवीमुळे झाला आत्मघात

$
0
0

balasaheb.patil@timesgroup.com

कोल्हापूर : अवघ्या काही जागांवर तडजोड करण्याऐवजी उथळ राजकारणाचा फटका भाजप आणि शिवसेनेला बसला आहे. या दोन्ही पक्षांनी महापालिकेच्या निवडणुकीत ८७३४० मते घेतली. यामध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त मते घेऊनही पिछाडीवर आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काही तडजोडी करता आल्या असत्या सत्तेचा सोपान चढणे सोपे गेले असते, मात्र या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या जिरवाजिरवीत आत्मघात करून घेतला आहे.

महानरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले तेव्हा अन्य पक्षांआधी भाजप आणि शिवसेनेत एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली. या चिखलफेकीची जागा शिवराळ भाषा घेत गेली आणि त्यातून या दोन पक्षांचे इतके फाटले की त्यांच्यात समेट व्हावा असे वाटणाऱ्यांना ठिगळ लावायला जागाच उरली नाही. दोन्ही पक्ष एकत्र लढण्याआधीच एकमेकांपासून वेगळे व्हायचे ठरवून बसले होते. त्यामुळेच मुरब्बी राजकारणाअभावी दोन्ही पक्ष पदरात पराभव पाडून बसले. मागील निवडणुकीत शिवसेनेला ३९ हजार २४ मते मिळाली होती. तर भाजपला १३ हजार १०५ मते मिळाली होती. या दोन्ही पक्षांना अनुक्रमे ४ व ३ जागा मिळाल्या. या निवडणुकीत शिवसेनेला ४३ हजार ७७७ मते मिळूनही चारच जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला ४३ हजार ५६३ मते मिळूनही १३ जागांवर विजय मिळाला. याचाच अर्थ हे दोन्ही पक्षांनी केवळ एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात आत्मघात करून घेतला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले तेव्हा राज्यातील विजयामुळे अवसान आलेल्या भाजपने शिवसेनेला थेट फाट्यावर मारले. त्यात चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदामुळे त्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना महापालिकेत जाण्याचे स्वप्न पडू लागले. त्यामुळेच खासगीतील चर्चा खुली झाली आणि एकमेकांची उणीदुणी काढू लागली. दुसऱ्या फळीतील ही चर्चा मुख्य नेत्यांच्या तोंडी आली, आणि त्याचा टोकदारपणा शेवटपर्यंत कायम राहिला. आमदार क्षीरसागर यांच्या निवासस्थान परिसरातील प्रभागांतील जागांवर शिवसेनेने हक्क सांगितला होता. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्ते अस्वस्थ झाले, त्यामुळे तेथूनच खरी ठिणगी पडली.

भाजपने राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन आपले शक्त‌िप्रदर्शन केले, त्याला शिवसेनेने भगवा सप्ताह साजरा करून उत्तर दिले. पालकमंत्र्यांच्या आसपास असलेल्या कार्यकर्त्यांचे साडेतीन पालकमंत्री म्हणून संभावना केली तर भाजपने शिवसेनेच्या क्षीरसागर यांच्या आमदारकी आणि दहशतीवर हल्लाबोल सुरू केला. यातून दोन्ही पक्षांमधील दरी रुंदावत गेली. यातून दोघांना स्वतंत्र लढल्याचे समाधान मिळाले.

आघाडीवरून घेरले

टोकाच्या टीकेनंतर पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेविरूद्धची तलवार मतदानादिवशीच म्यान केली. मा‌त्र, हा वाद इतका टोकाला गेला होता की, आपल्या किती जागा येतील हे माहीत असूनही शिवसेनेने त्यांना फटकारले. क्षीरसागर यांनी त्यांना बेदखल करून तुटलेल्या युतीचे उट्टे काढून घेतले.

दादांची तलवार म्यान

पालकमंत्री पाटील यांनी ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली. महादेवराव महाडिकांचा शहरातील राजकारणावर असलेला ताबा लक्षात घेता आपल्याल सहज सत्ता काबीज करता येईल असे पाटील यांना वाटले असावे, मात्र, ताराराणी आघाडीतील कारभाऱ्यांवरून पहिल्या दिवसांपासून भाजप टिकेचे लक्ष्य ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा महाडिक काका-पुतण्या टार्गेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक प्रचारात आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक यांच्यावर असलेला नेत्यांच्या टीकेचा रोख निकाल लागला तरी अजूनही कमी झालेला नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंगळवारी झालेल्या बैठकांतही महाडिक यांच्यावरील संताप पुन्हा उफाळून आल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या बैठकीत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तर राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी आमदार, खासदार महाडिकांनी भाजप, ताराराणी आघाडीला बळ दिल्याचा थेट आरोप केला.

दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांच्या सत्कारावेळी महाडिकांवरील राग पुन्हा उफाळून आला. काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी पक्षविरोधात कारवाई केल्याचा आरोप महाडिक यांचे नाव न घेता करण्यात आला. तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशा तक्रारीही करण्यात आल्या. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार हसन मुश्रीफ यांनी दोन्ही महाडिकांचे बळ भाजप, ताराराणी आघाडीला मिळाल्याने राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्याचा थेट आरोप करण्यात आला.

आत-बाहेर करणाऱ्यांना बाजूला ठेवले होते. ज्या प्रभागात उमेदवारांना त्रास झाला त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी कराव्यात. शहानिशा करून त्या संदर्भात कारवाईचा निर्णय घेईल.

-पतंगराव कदम, काँग्रेस नेते

भाजप-ताराराणी आघाडीला मिळालेली तिन्ही महाडिकांची ताकद आणि आर्थिक, प्रशासकीय पाठबळामुळे राष्ट्रवादीच्या जागा कमी निवडून आल्या.

-हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भरपाईचा डीडी मिळाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मस्कत येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील (वय २४) याच्या नुकसानभरपाईचा नवीन डीडी अखेर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना मिळाला. २३ लाख ३९ हजार २७४ रुपयांचा डीडी तातडीने बँकेत जमा केला असून, चार ते पाच दिवसात डीडी क्लिअर होणार आहे. दिवाळीपूर्वी नितीशच्या नातेवाईकांना रक्कम देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे.

नितीश तुकाराम पाटील या तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर मस्कत प्रशासनाने सुमारे २३ लाख रुपयांचा डीडी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठवला होता. मृत नितीशच्या नातेवाईकांची ओळख पटवून त्यांना रक्कम अदा करावी अशी स्पष्ट सूचना दिलेली असताना जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. डीडीची मुदत संपली आणि दरम्यानच्या काळात डीडी गहाळ झाल्याचेही स्पष्ट झाले. याबाबत प्रसारमाध्यमांमधून जिल्हा प्रशासनाची नाचक्की झाल्यानंतर मस्कत दूतावासाकडून नवीन डीडी मागवला होता. नवीन डीडी अखेर मंगळवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. ०१६८३८ या क्रमांकाचा डीडी तातडीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजी चौक शाखेत जमा करण्यात आला आहे.

चार ते पाच दिवसांत डीडी क्लिअर होणार असून, दिवाळीपूर्वी नितीशच्या नातेवाईकांना रक्कम देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. जिल्हा प्रशानाकडून झालेल्या दिरंगाईने आणि गलथान कारभारामुळेच तब्बल आठ महिन्यांचा अतिरिक्त वेळ गेल्याने या काळातील व्याज देण्याची मागणी नितीशचे वडील तुकराम पाटील यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वायुगळतीने थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी उद्यमनगर येथे क्लोरीनच्या गळतीने लक्ष्मीबाई पांडुरंग माने (वय ६५, रा. शिवाजी उद्यमनगर) ही वृध्दा ठार झाली. दुर्घटनेत ५० ते ६० व्यक्तींनाही वायू गळतीची बाधा झाली असून, कपिल मुदगल व निखिल सुरेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी फ्रॅब्रिकेशन व्यवसायिक प्रशांत सर्जेराव कांबळे भोई (२४, रा. शिवाजी उद्यमनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

उद्यमनगर येथे मदनलाल धिंग्रा तरूण मंडळाजवळ कांबळे यांचे एस.एस. फॅब्रिकेशन हे छोटे युनिट आहे. मंगळवारी त्यांच्याकडे क्लोरीन टाकीचा नटबोल्ड सैल करण्यासाठी दुरूस्तीला आला होता. तो सैल करताना सिलिंडर खाली पडले. त्यामुळे स्फोटासारखा मोठा आवाज आला. टाकीतून क्लोरीन वेगाने बाहेर आला. आवाजामुळे परिसरातील कारखानदार, कर्मचारी व नागरिकांनी धाव घेतली. सर्वत्र पिवळ्या रंगाचा धूर सगळीकडे पसरला. गॅस गळती झाल्याचे समजून नागरिकांनी दरवाजे बंद करुन घेतले. लक्ष्मी माने यांनीही दरवाजा बंद लावून घेतला. त्या बिछान्यावर झोपी गेल्या. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. याचदरम्यान नागरिकांना श्वासोच्छ्वासास त्रास जाणवू लागला. नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. माने यांच्या दाराला कडी असल्याने परिसरातील कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून बाहेर काढले. त्यांना रूग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले, पण उपचार सुरू असतानाचा त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हयगय केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकांनी ५० ते ६० व्यक्तींना खासगी व सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केली.

क्लोरिन विषारी वायू आहे. औद्योगिक क्षेत्रात वायूचा काळजीपूर्वक वापर आवश्यक आहे. क्लोरिनची गळती झाल्यास श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. विशेषतः फुफ्फुसावर मोठा परिणाम होतो. गळतीसारख्या दुर्घटनेत याचे परिणाम गंभीर असू शकतात.

-डॉ. पी. एन. भोसले, रसायनशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला महापौर काँग्रेसचा

$
0
0

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब, महापौर निवड १६ ला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत सत्ता स्थापण्याचा भाजप ताराराणी आघाडीचा प्रस्ताव नाकारत राष्ट्रवादी काँग्रेसने समान विचारधारा व नैसर्गिक मित्र असलेल्या काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी संयुक्तरित्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याची घोषणा केली. पहिल्या वर्षात काँग्रेसचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर व स्थायी समिती सभापती होणार आहे. त्यानंतरचा फॉर्म्युला माजी मंत्री सतेज पाटील व मुश्रीफ एकत्रित बसून ठरवणार आहेत. महापौर निवड १६ रोजी होणार आहे.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने काँग्रेस व भाजप, ताराराणी आघाडीने आपापल्या पातळीवर सत्ता स्थापण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय दोघांचीही सत्ता येऊ शकत नसल्याने काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेत सहभागाचे आवाहन केले. तर भाजप, ताराराणी आघाडीने राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करावी, त्यांना बाहेरुन पा‌ठिंबा देण्याचे सांगत सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्याची चाल खेळली होती. मात्र राष्ट्रवादी​चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले होते. त्यानुसार पाटील यांच्या प्रस्तावावर मुश्रीफ यांनी तटकरे यांच्याशी तसेच अजित पवार, नवाब मलिक यांच्याशी चर्चा करुन आघाडीबाबत हिरवा कंदील दाखवला होता.

मंगळवारी दोन्ही काँग्रेसच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी पक्ष कार्यालयात बैठका झाल्या. या बैठक झाल्यानंतर काँग्रेस कमिटीतून पतंगराव कदम यांच्यासह सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, अॅड. सुरेश कुराडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सुभाष बुचडे, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण हॉटेल सयाजीवर पोहचले. त्याबाबतचा निरोप राष्ट्रवादीला पाठवण्यात आल्याने हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, उत्तम कोराणे, प्रताप माने, आदिल फरास दुपारी सव्वाच्या सुमारास पोहचले. जवळपास सव्वा तास कदम, मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांची बंद खोलीत बैठक झाली. त्यानंतर कदम व मुश्रीफ यांनी आघाडीची घोषणा केली.

भाजपला अद्याप चमत्काराची आशा

काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी जाहीर केली असली तरी भाजप, ताराराणी आघाडीच्यावतीने अजूनही सत्ता खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. १६ नोव्हेंबरला भाजपचा महापौर होणार, राजकारणात चमत्कार घडत असतात, असा आशावाद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेट घेणार आहेत. काँग्रेस सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष असला तरी मदतीशिवाय सत्ता घेऊ शकत नाही. त्याचवेळी ३२ जागा मिळवलेल्या भाजप, ताराराणी आघाडीलाही सत्तेसाठी मदतीची गरज आहे. काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा तर ताराराणीने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला आहे. राष्ट्रवादीने आघाडी जाहीर केली असली तरीही भाजपने हार न मानता सत्तेसाठी प्रयत्न चालवले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर डॉक्टरला अटक

$
0
0

पाच हजार रूपयाची लाच घेताना डॉ लादे याला अटकट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौक येथे पाच हजाराची लाच घेताना कळंबा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक भिमराव लादे (वय ४५, अजिंक्यतारा कॉलनी, कसबा बावडा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या घटनेने कारागृहातील गैरव्यवहारावर प्रकाश पडला आहे.

तक्रारदाराच्या भावावर खुनाचा गुन्हा दाखल असून तो कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला वैद्यकीय उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ लादे यांनी २० हजार रूपयाची लाच मागितली. तक्रारदाराने मंगळवारी (३ नोव्हेंबर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी डॉ लादे यांच्याविरूध्द सापळा रचण्यात आला. दसरा चौक येथे तडजोड केल्यानंतर पाच हजाराची लाच स्वीकारताना सापळा रचून अटक केली. कोल्हापूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक उदय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल वायदंडे, हवालदार श्रीधर सावंत, मनोज खोत, संदीप पावलेकर, चालक राजाराम शेंडे यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ टक्के नगरसेवकांवर गुन्हे दाखल

$
0
0

प्रतिज्ञापत्र विश्लेषणात एडीआरचा निष्कर्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवणुकीच्या निकालानंतर नव्या सभागृहाकडून शहरवासियांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या सभागृहात नवीन ६१ चेहरे आहेत. या सभागृहातील ७५ उमेदवारांमध्ये गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेले १८ व गंभीर स्वरुपांचे गुन्हे दाखल असलेले १० उमेदवार आहेत. गुन्हेगारी प्रकरणे दाखल असलेल्या उमेदवारांचे प्रमाण २४ टक्के आहे. त्याचवेळी २७ उमेदवार कोट्यधीश आहेत. ४३ उमेदवारांचे बारावी किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण झाले आहे. महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक​​ रिफॉर्म्स (एडीआर) यांनी ८१ उमेदवारांपैकी ७५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे.

एडीआरने निवडणुकीत विजयी झालेल्या ८१ पैकी ७५ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे विश्लेषण केले आहे. इतर उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे संकेतस्थळावर टाकली नसल्याने त्याचे विश्लेषण करता आलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ७५ उमेदवारांपैकी १८ (२४ टक्के) उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे घोषित केले आहे.

१० जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल

१० उमेदवारांनी त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे. काँग्रेस (आय) च्या २६ पैकी ७ (२७ टक्के), ताराराणी आघाडीच्या १७ पैकी ३ (१८ टक्के), राष्ट्रवादीच्या १५ पैकी २ (१३ टक्के), भाजपच्या १३ पैकी ५ (३९ टक्के) आणि शिवसेनेच्या ४ पैकी १ (२५ टक्के) उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरण दाखल आहेत. तर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात अनुक्रमे २६ पैकी ४ (१५ टक्के), ताराराणी आघाडीच्या १७ पैकी १ (६ टक्के), राष्ट्रवादीच्या १५ पैकी १ (१७ टक्के), भाजपच्या १३ पैकी ३ (२३ टक्के ) आणि शिवसेनेच्या ४ पैकी १ (२५ टक्के) उमेदवार आहेत. २७ (३६ टक्के) विजयी उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यात काँग्रेस (आय) चे २६ पैकी ९ (३५ टक्के), ताराराणी आघाडीचे १७ पैकी ९ (५३ टक्के), भाजपचे १३ पैकी ५ (३४ टक्के) आणि राष्ट्रवादीचे १५ पैकी ४ (२७ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. काँग्रेस (आय) च्या २६ उमेदवारांची सरासरी मालमत्ता अंदाजे एक कोटी तीन लाख, ताराराणी आघाडीच्या १७ उमेदवारांची तीन कोटी ८१ लाख, राष्ट्रवादीच्या १५ उमेदवारांची सरासरी मालमत्ता एक कोटी एक लाख रुपये, भाजपच्या १३ उमेदवारांची सरासरी मालमत्ता सहा कोटी सहा लाख रुपये व शिवसेनेच्या ४ उमेदवारांची सरासरी मालमत्ता ५७ लाख रुपये आहे.सात उमेदवारांची मालमत्ता पाच लाखापेक्षा कमी आहे. तर तीन उमेदवारांनी एक कोटीपेक्षा जास्त देणी असल्याचे स्पष्ट केले आहे.

४३ जण १२ वी पास

दोन उमेदवारांनी साक्षर असल्याचे घोषित केले आहे तर ४३ उमेदवारांनी १२ वी पास किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण असल्याचे स्पष्ट केले आहे. २२ उमेदवार पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित आहेत. ३ उमेदवारांनी शैक्षणिक माहितीच दिलेली नाही. ३ उमेदवारांचे वय २१ ते २४ च्या दरम्यान आहे. तर सर्वाधिक ५८ उमेदवार २५ ते ५० वयादरम्यानचे आहेत. १४ उमेदवार ५१ ते ७० दरम्यान वय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images