Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजऱ्यात बंधाऱ्यांना बरगे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातून वाहणाऱ्या हिरण्यकेशी व चित्री नदीचे पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. यावर्षीच्या पावसाचा निच्चांक आणि वर्षभरासाठी पिण्यासह जनावरांना व इतर उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन तालुक्यातील सर्व बंधारे अडविण्यात आले आहे. सध्या या बंधाऱ्यांमध्ये १९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने बंधाऱ्यात पाणी साठल्यास २७५ दशलक्षघनफूट पाणीसाठा उपलब्ध होईल. यामुळे या नद्यांच्या तीरासह परिसरातील ४० गावच्या पाणी योजनांनाही मुबलक पाणी उपलब्ध होउ शकते, अशी प्रतिक्रिया पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर. ए. हारदे यांनी व्यक्त केली.

दरवर्षी नोव्हेबर नंतरच बंधाऱ्यातील पाणीसाठे अडवले जातात. मात्र यावर्षीची गरज व पाणीसमस्याही गंभीर होण्याची स्थिती आहे. यामुळे नद्यांमधील पाणी वाहून जाऊ नये व त्याचा वापर काटकसरीने होण्यासह नजिकच्या गडहिंग्लज तालुक्यातील गावांनाही याचा लाभ मिळण्यासाठी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये बरगे व मुरूम तसेच माती भरून पाणी अडविण्याचे काम जलसंपदा व पाटबंधारे विभागाकडून सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने दिवाळी दरम्यान सर्व बंधाऱ्यातील पाणी क्षमतेने अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, साळगाव व देवर्डे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

याबरोबरच चित्री नदीकडील परिसरातील तारओहोळवरील येमेकोंड, शृंगारवाडी, वाटंगी, शिरसंगी, किणे, पोश्रातवाडी, कोळिंद्रे, हांदेवाडी येथील बंधाऱ्यामध्येही पाणी अडविण्यासाठी बरगे व मातीकाम पूर्ण करण्यात आले आहे. याबरोबरच चित्री जलाशयातील १६०५, धनगरमोळामधील ९३, एरंडोळमधील १४८ व खानापूर येथील १२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा जपून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भविष्यातील पाणीसाठ्यांची गंभीर स्थिती पाहून प्रशासन निर्णय गेणार असून उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्यासाठी शक्यतो नवी ऊसलावण करू नये व कमी पाण्यावरील पिकपद्धती विकसीत करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. नियोजनानुसार पाणी वापर झाल्यास व उपलब्ध पाणीसाठे सुरक्षित राहिल्यास टंचाईसदृष्य स्थिती नियंत्रणात राहू शकेल असा विश्वासही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोनस व पगारामुळे उत्साह

$
0
0

कर्मचाऱ्यांना उचल मिळाल्याने खरेदीसाठी गर्दी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेला बोनस आणि राज्य कर्मचाऱ्यांना उत्सव अॅडव्हान्स म्हणून दिलेली दहा हजार रुपये यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वर्किंग डेच्या शेवटच्या दिवशी होणारा पगार आणि उत्सव अग्रीम एकदम मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत आहे. यामुळे कापड, सराफ, वाहन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीत वाढ होऊ लागली आहे.

राज्य कर्मचाऱ्यांना २००० पासून बोनस देण्याची पद्धत बंद केली आहे. सरकारी तिजोरीवर बोनस रुपाने मोठा भार पडत असल्याने पंधरा वर्षापूर्वी बोनस देण्याची पद्धत बंद केली होती. आता उत्सव अग्रीम देण्यास सुरुवात केली. सुरुवातीस राज्य कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास सुरुवात केली. पाच हजार रुपये पाच समान हप्त्यामध्ये परतावा करण्याच्या अटीवर प्रत्येक विभाग निहाय मागणी अर्जाचे एक महिन्यापूर्वी संकलन करुन दिवाळीच्या पूर्वी देण्यात येत आहे. यामध्ये यावर्षी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे जिल्ह्यातील वीस हजार कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीमचा फायदा झाला आहे.

रेल्वे, पोस्ट, आयकर आदी ग्रेड सी व डीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये प्रमाणे बोनस दिला जात आहे. याचा लाभ जिल्ह्यातील चार हजार कर्मचाऱ्यांना झाला आहे. बोनससोबत राज्य व कर्मचाऱ्यांना वर्किंग डेच्या शेवटच्या दिवशी वेतन अदा केले आहे. वेतन, बोनस व उत्सव अग्रीममुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह आहे.

सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पूर्वी मिळालेल्या आर्थिक पुरवठ्यामुळे कर्मचाऱ्यांनी विविध खरेदीसाठी बाजारपेठे गर्दी करु लागले आहेत. मुहूर्ताने खरेदी करण्यासाठी वाहन, इलेक्ट्रॉनिक व सोने-चांदीच्या दागिन्यांची आगाऊ बुकिंग केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाता जाता तोडपाणी करण्याचा नगरसेवकांचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे नवीन सभागृह आठवड्यानंतर स्थापन होणार आहे. त्यापूर्वी मुदत संपलेल्या जुन्या सभागृहाची येत्या शनिवारी (ता.७) शेवटची सभा होत असून त्यामध्ये जाता जाता काही 'अर्थ' शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षण टाकलेल्या दोन ठिकाणच्या जागा संपादनाचा प्रस्ताव असून जुन्या बस व वाहने अशा ५४ वाहनांचा लिलाव करण्याचाही प्रस्ताव आहे.

२०१० ते २०१५ मधील या सभागृहाला फार काही मिळाले नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांमधून करण्यात येत होत्या. ऐच्छिक निधीही पुरेसा मिळाला नसल्याची त्यांची खंत आहे. १५ नोव्हेंबर रोजी या सभागृहाची मुदत संपते. गेल्या महिन्यात शेवटची सभा बोलवण्यात आली होती. पण प्रचारामुळे कोरमअभावी ही सभा तहकूब करण्यात आली. ही सभा आता ७ नोव्हेंबर रोजी बोलवण्यात आली आहे. त्यामध्ये आरक्षण टाकलेल्या दोन ठिकाणच्या जागांचे संपादन करण्याचे प्रस्ताव विषयपत्रिकेवर आहे. जागा संपादनाचा विषय मंजूर केला तर मालकाची वर्षानुवर्षे पडून असलेली ही जागा हातातून निघून जाणार आहे. त्यामुळे यामध्ये काही तोडपाणी करायची संधी जाता जाता घ्यायची या नगरसेवकांनी ठरवले आहे. त्याचबरोबर ५१ निरुपयोगी बसेस, दोन ब्रेकडाऊन व्हॅन, एक कमांडर जीप अशी ५४ वाहने व निरुपयोगी स्क्रॅप मालाची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचा विषय आहे. तर दत्तात्रय हौसिंग सोसायटीला दिलेली खुली जागा बदलून देण्याबाबतचा विषयही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांगे कॉलेजकडून विमान खरेदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

आष्टा येथील आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी चालू स्थितीतील विमान खरेदी केले आहे. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी चालू स्थितीतील विमान खरेदी करणारे डांगे महाविद्यालय राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे. या विमानामुळे विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड्. चिमण डांगे व महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली.

'एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करणारे हे राज्यातील दुसरे महाविद्यालय आहे. या विभागातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी चालू स्थितीतील विमान उपलब्ध असेल तर त्यांचे प्रॅक्टिकल चांगले होते. यासाठी अमेरिकन बनावटीचे 'सेसना १५२' हे विमान खरेदी केले आहे. या विमानाचा वापर फक्त शैक्षणिक कारणासाठी करण्यात येणार असल्याने सरकारकडून या विमानाच्या उड्डाणाला परवानगी नाही. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हा आजच्या युगातील अद्यावत अभ्यासक्रम आहे. त्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान महाविद्यालयात उपलब्ध व्हावे म्हणून चालू स्थितीतील विमान खरेदी करण्यात आले आहे, असेही डांगे म्हणाले.

विमानाविषयी अधिक माहिती देताना एरोनॉटिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. राममूर्ती म्हणाले, 'एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या तृतीय व अंतिम वर्षांमधील विद्यार्थ्यांना विमानाच्या सर्व तांत्रिक बाबींची माहिती होणे गरजेचे असते त्यासाठीच हे विमान खरेदी केले आहे. सेसना १५२ हे विमान अमेरिकेमध्ये बनविलेले आहे. छोट्या आकाराच्या या विमानात एक पायलट व एक पॅसेंजर, अशा दोन व्यक्ती बसू शकतात. हे विमान बहुउद्देशीय नागरी विमान आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय शैक्षणिक विमान म्हणून याचा गौरव झाला आहे. केवळ शैक्षणिक कारणासाठी विमानाचा वापर होणार असल्याने त्यास उड्डाणाची परवानगी नाही. हे विमान सजीव प्रयोगशाळा म्हणून वापरता येणार आहे. एरोनॉटिकल बरोबरच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. सध्या महाविद्यालयाच्या मैदानावर हे विमान ठेवण्यात आलेले आहे. विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानासाठी हॅन्गर बनविण्याचे काम सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा कोरडी ठणठणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीनजीक कृष्णा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. शेरीनाल्याचे दूषित पाणी मात्र नदीच्या पात्रात मिसळत आहे. कोयना धरणातून त्वरित नदीपात्रात पाणी सोडले जावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

यंदा पाऊस फारच कमी झाल्याने कोयना धरणात पाणीसाठा नेहमीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे धरणातून मोजकेच पाणी सोडले जात आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावे, असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच पाटबंधारे विभागानेही तसे आवाहन केले आहे.

पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात आधीच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता जिल्ह्याची प्रमुख नदी मानल्या जाणाऱ्या कृष्णा नदीची अवस्थाही बिकट झाल्याने आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. कोयना धरणातून पाणी सोडले तरच कृष्णा नदी पात्रात पाणी येते, त्यामुळे यापुढील काळ केवळ कोयना व इतर धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहे. कोयना धरणातून अत्यंत काटकसरीने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे सांगली परिसरात आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. पुढील जून-जुलैपर्यंत हे पाणी कसेबसे पुरवावे लागणार आहे.

सांगली-कुपवाडसाठी रोज १०० एमएलडी पाणी उपसा होतो. बायपास पूल ते आयर्विन पुलापर्यंत थोडेफार पाणी दिसते. पण नंतरचे पात्र मात्र कोरडे ठणठणीत झाले आहे.

सांगलीत कधी नव्हे इतकी पाणी टंचाई यंदा जाणवणार आहे. एकूण स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पाणी कपात अटळ आहे. परतीच्या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळेल, असे वाटत होते, पण त्याबाबतही निराशाच झाली. यापुढे पाणी कपातीचा निर्णय घ्यावाच लागेल. हळूहळू ही कपात वाढविणेही भाग पडेल.

- अजीज कारचे, आयुक्त सांगली महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी गाळपामुळे धास्ती

$
0
0

पाण्याचा प्रश्न गंभीर; आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपी दरावरुन साखर कारखानदार व शेतकरी संघटनांनी बेटचेपी भूमिका घेतल्याने कोल्हापूर विभागातील केवळ सात कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये कोल्हापूर तीन व सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. एफआरपीची कोंडी कोणताच कारखाना फोडत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. ऊस दरावरुन त्वरीत तोडगा न निघाल्यास उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

ऑक्टोंबरअखेर किंवा मध्यावर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होत असतात. मात्र नोव्हेंबर महिन्या पहिल्या आठवड्यापर्यंत डॉ. डी. वाय. पाटील, तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, वारणानगर, सरसेनापती संताजी घोरपडे, धामणे, सदाशिव मंडलिक कारखाना व दालमिया साखर कारखाना सुरू झाले आहेत. यापैकी दालमिया पुन्हा बंद केला आहे. तर उर्वरित तीन कारखाने सुरू असले, तरी पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. यामुळे ऊस उत्पादकांमध्ये चांगलीच अस्वस्था निर्माण झाली आहे. कोल्हापूर व सांगील जिल्ह्यात पंधरा दिवसांत केवळ एक लाख १७ हजार मेट्रिक टनाचे गाळप झाले आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण्य नगण्य राहिल्याने डिसेंबरनंतरच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. उसासारख्या पिकाला पाण्याची जास्त गरज असल्याने विहिरीवरील ऊस क्षेत्राला जास्त धोका पोहोचणार आहे. कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास कारखानदार आणि त्यांच्या समर्थकांचा ऊस प्राधान्याने उचलला जाणार असल्याने सामान्य ऊस उत्पादकांची मोठी अडचण होणार आहे.

एफआरपीच्या मुद्यावरुन सद्या कारखानदार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. कारखानदार अशी भूमिका घेत असताना शेतकरी संघटनांची भूमिका गुलदस्तात राहिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद शुक्रवारी होणार आहे. परिषदेतील दराच्या मागणीवरुन स्वाभिमानीच्या आंदोलनाची दिशी ठरणार आहे. मात्र अशी परिषद ऑक्टोंबरच्या सुरुवातीस घेवून चर्चेसाठी किमान १५ दिवसांचा अवधी मिळाला असता. मात्र ऊस परिषदेला विलंब झाल्याने हंगामाला विलंब लावण्याची भूमिका घेत असल्याचा आरोपच शेतकरी करु लागले आहेत. यामुळे ऊस परिषद ऑक्टोंबरच्या सुरुवातीला घेण्याची मागणी होऊ लागली आहे. शेतकरी संघटनांचे असे धोरण असताना संघटना व सरकार यांना कोंडीत पकडण्यासाठी कारखानदारही एफआरपीच्या मुद्यावरुन बैठका घेऊ लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील १८ कारखाने पूर्णक्षमतेने सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी गतवर्षीची एफआरपी पूर्णपणे आदा केली आहे. यालट सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने एफआरपीची रक्कम दिलेले नाही. शेतकरी बिलाच्या प्रतीक्षेत असताना जिल्ह्यातील तब्बल १८ कारखाने पूर्णक्षमतेने सुरू झाले आहेत. यालट कोल्हापूर जिल्ह्यातील तीन तर सांगली जिल्ह्यातील चार कारखाने तेही पूर्णक्षमतेने सुरू नाहीत.

विहीर, बोअरवेलवर अवलंबित उत्पादकांची अडचण

विहीर, बोअरवेलवर अवलंबित उत्पादकांची अडचण

पाळीपत्रकात वशिलेबाजी होण्याचा धोका

अनेक कारखान्यांचा केवळ शुभारंभ

पंधरा दिवसांत सव्वा लाख मेट्रिक टनाचे गाळप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस पुरवठा सुरळीत राहणार

$
0
0

'केरोसिनमुक्त गाव' संकल्पना राबवणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरची पुरेशी उपलब्धता असून, ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या टंचाईचा समना करावा लागणार नाही. गॅस वितरक कंपन्यांकडून सौजन्याने आणि वेळेतच सिलिंडर मिळतील, असा दावा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी केला आहे. ग्राहकांना सौजन्याची वागणूक देण्याच्याही सूचना गॅस कंपन्यांना दिल्या आहेत. याशिवाय केरोसिनचा वापर कमी करण्यासाठी 'केरोसिनमुक्त गाव' संकल्पना राबणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. गॅस वितरकांच्या बैठकीत ते बोलत होते.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही गॅसची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने दक्षता घेतली आहे. सणासुदीच्या काळात नेहमीपेक्षा जास्त सिलिंडरची मागणी असते. राज्यात आणि देशातही एकाचवेळी मागणी वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गॅसची टंचाई निर्माण होऊन ग्राहकांनी गैरसोय होऊ नये यासाठी पू्र्व नियोजन करण्यासाठी जिल्हापुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरक कंपन्या आणि वितरकांची बैठक आयोजित केली होती. शाहू स्मारक येथे झालेल्या बैठकीत आगवणे यांनी सर्वच गॅस कंपन्यांच्या वितरकांना आवश्यक सूचना दिल्या. गॅस पुरवठा कार्यालयांनी सर्व दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित ठेवावेत आणि ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना डिपॉझिट फ्री कनेक्शन देण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी सर्व गॅस एजन्सींनी दारिद्र्यरेषेखालील याद्या वैयक्तिकरित्या न घेता एकत्रितरित्या प्राप्त करुन घ्याव्यात. त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील किती दारिद्र्यरेषेखालील कुटुंब गॅस जोडण्यापासून वंचित आहेत याचा सर्व्हे करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दारिद्र्‌यरेषेखालील सर्वच्या सर्व कुटुंबांना गॅस जोडण्यांचा १०० टक्के लाभ देऊन 'केरोसिन मुक्त' गाव संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही आगवणे यांनी सांगितले. बैठकीला जिल्ह्यातील गॅस वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गॅस कनेक्शन

दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यासाठी गॅस कंपन्या, वितरक, प्रायोजक, महसूल आणि पुरवठा यंत्रणा यांनी एकत्रितपणे गॅस जोडण्यांसाठी त्यांना मदत करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. या मोहिमेत स्वस्त धान्य दुकानदारांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात ८० गॅस वितरक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगराध्यक्षांची झाली ‘व्हिप’ कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेची उद्या (शनिवार) होणाऱ्या विशेष सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (जांभळे गट) यांनी घेतला आहे. त्यामुळे या सभेचे कामकाज चालणार की गणपूर्ती अभावी ती रद्द करावी लागणार याकडे लक्ष लागले आहे. या विशेष सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पालिकेतील राजकारणाला संघर्षाची धार येऊ लागली आहे. दरम्यान, काँग्रेसच्यावतीने सभेला हजर न राहण्याबाबत व्हीप जारी केला असल्याने नगराध्यक्षांची नेमकी काय भूमिका राहणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

आगामी उन्हाळा काळात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या नियोजनबाबत चर्चा करुन निर्णय घेणे यासाह विविध ११ विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी शनिवारी (७ नोव्हेंबर) विशेष सभा बोलविली आहे. गत काही महिन्यांपासून पालिकेतील शहर विकास आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय मतभेदाची दूरी रुंदावली आहे. काँग्रेसच्या सदस्यांना विश्वासात न घेता कामे केली जात आहेत. तर काँग्रेस सदस्यांनी सूचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नगराध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. विश्वासात न घेताच विशेष सभा आयोजित केली आहे. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे विषय असतानाही ते डावलले गेले असल्याने या सभेला काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसा पक्षादेशसुद्धा सर्व सदस्यांना बजावण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार अशोकराव जांभळे गटानेसुद्धा हीच भूमिका घेतली आहे. सबका साथ सबका विकास धोरण अवलंबले असतानाही पालिकेतील राजकारण आता पुन्हा ढवळू लागले असून काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षा बिरंजे यांनाही व्हीप लागू केलेला आहे. त्यामुळे आजच्या सभेत त्या कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरूळच्या जवानाचा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

आरूळ येथील विश्वास बापू कुंभार या जवानाचा उत्तरप्रदेश येथे कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू झाला. उत्तरप्रदेश येथील बरालीमध्ये ते नायक पदावर कार्यरत होते. कुंभार यांनी याआधी दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, अंदमान -निकोबार या ठिकाणी सेवा बजावली होती. ३१ जून २०१६ ला ते या सेवेतून निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व मुलगी आहे. आज दुपारी त्यांचे पार्थिव नायब सुभेदार सुनील मांडरे व डी. एस. शिंदे त्यांच्या आरूळ या गावी घेवून आले. यावेळी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. बटालियनच्या वतीने त्यांना अखेरची मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरजेनुसार योजनांचा लाभ घ्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

केंद्र व राज्य सरकारने जनतेसाठी राबविलेल्या अनेक कल्याणकारी योजना या थेट लाभार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. यामध्ये लोकप्रतिनिधींसह जनतेचे योगदान महत्त्वाचे आहे. आवश्यकता नसताना सरकारी योजना स्वीकारण्याऐवजी गरजेनुसार तिचा स्वीकार करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने महसूल विभाग व जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने लोक माहिती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सै‌नी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची संस्कृती बदलण्याची गरज आहे. यासाठी या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. सर्व अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम करून सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सरकारच्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.यावेळी जिल्हाधिकारी अमित सैनी व पोलीस अधिक्षक मनोजकुमार शर्मा यांनी मार्गदर्शन केले. प्रतिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आली.

तीन दिवस चालणाऱ्या या अभियानात जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि येथील उपजिल्हा रुग्णालयाकडून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तगट तपासणी, डोळे व कान तपासणी आदि सुविधा उपलब्ध करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विविध विभागांच्या अधिकारी व विभागप्रमुख, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पना शर्मा यांनी स्वागत केले. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यमगेत ६० एकरांवरील ऊस खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

यमगे(ता. कागल)येथे शेतावरुन गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने सुमारे ६० एकारातील ऊस जळून खाक झाला.यामध्ये सोळा शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. मंडलिक साखर कारखाना, बिद्री साखर कारखाना आणि मुरगूड नगरपालिकेच्या तीन अग्न‌िशामन दलाच्या गाड्यांनी तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मुरगूड निपाणी रस्त्यालगतच असणाऱ्या या शेतातील लागलेली आग पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

मुरगूड निपाणी रस्त्यालगतच शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या सरपिराजीवराव ट्रस्टची सुमारे १५ एकर ऊस शेती आहे. या शेतीवरुन विद्युत वाहिनी गेल्या आहेत. आज सकाळी अकराच्या सुमारास विद्युत तारेमध्ये शॉर्टसर्किट झाले आणि त्याच्या ठिणग्या शेतात पडल्यानो उसाने पेट घेतला. दुपारची वेळ आणि उसाची सलग शेती असल्याने आग काही क्षणातच भडकली. ही माहिती मिळताच तत्काळ मंडलिक साखर कारखाना, बिद्री साखर कारखाना आणि मुरगूड नगरपालिकेच्या अग्न‌िशामन दलाच्या गाड्यांना बोलवण्यात आले. या तिन्ही गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला पण ऊस शेती लागून असल्याने व गाड्या आतमध्ये जावू शकत नसल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. सकाळी अकरा वाजता लागलेली आग दुपारी चार वाजता विझवण्यात यश आले. या उसाच्या शेजारीच घरे होती. अग्न‌िशामन दलाच्या गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणल्याने अन्य मोठे होणारे नुकसान टळले. या लागलेल्या आगीत शाहूचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या सरपिराजीराव ट्रस्ट्रची १५ एकरासह,शिवाजीराव पाटील,शंकरराव किल्लेदार,आबा खराडे,गणपतराव किल्लेदार,भारत मांडवे, के. डी. चौगले, बाजीराव पाटील, अमोल पाटील, अभिजीत पाटील, शामराव पाटील, मोहन ढेरे, शिवाजी ढेरे, गणपतराव दारवाडकर, अनिल पाटील, पंड‌ित पाटील, विक्रांत भोपळे या १६ शेतकऱ्यांच्या ६० एकर शेतातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये ९० लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी विद्युत मंडळाचे उपअभियंता आर. एस. चिकोडे,सर्कल सुंदर जाधव,तलाठी एकनाथ शिंदे,पी. एस. आय. चंद्रकांत मस्के, शिंदेवाडीचे सरपंच दत्तमामा खराडे आदिंनी भेट देवून पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसंगी कायदा हातात घेऊ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे गत हंगामातील एफआरपीची एक हजार १६ कोटी इतकी रक्कम थकित आहे. सरकारने या कारखान्यांना दिलेली एक महिन्याची मुदतही आता संपत आली आहे. गतवर्षीची एफआरपी कारखाने देणार नसतील तर त्यांना तुरूंगात टाकावे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रमाणे सरकारने कारवाई करावी. अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेत केली. एफआरपीची वसुली होत नसेल तर कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, साखरेच्या बाजारात सट्टा खेळणारे कोण याचा सरकारने शोध घ्यावा. साखरेचे भाव पाडण्यासाठी वायदे बाजाराचा उपयोग केला जात आहे. साखरेचे भाव पाडून एफआरपी द्यायला पैसे नाहीत असे कारखानदार म्हणत असतील तर खपवून घेणार नाही असे खासदार शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे गेल्या १४ वर्षांत उसाला प्रतिटन ५५० रूपयावरून २७०० रूपये दर मिळाल्याचे स्पष्ट करून प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले, राज्य आपलं येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा वनवास संपणार आहे. कार्यकर्त्यांनी रक्त सांडले म्हणून शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली. सदाभाऊंना मंत्री व्हायचे आहे, शेट्टी मॅनेज झाले असे आरोप होतात.

एफआरपी कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, यामुळे या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. न लढता पैसे मिळणार असतील तर आता लाठ्या का खायच्या असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.

परिषदेत प्रारंभी आण्णासो चौगुले यांनी स्वागत केले. शेतकरी चळवळीतील हुतात्म्यांमया प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलनाने परिषदेस सुरूवात झाली. राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, विठ्ठल मोरे, जि. प. सदस्य अनिल मादनाईक, जालंदर पाटील, सतीश काकडे यांची भाषणे झाली.

साखरेचे दर स्थिर रहातील

यंदा देशात २५० लाख टन साखरेचे उत्पादन होणार असून तेवढीचा देशातील साखरेची गरज आहे. उत्पादनापैकी १२ टक्के साखर निर्यात करणे बंधनकारक आहे. यामुळे वर्षभरात साखरेचे दर २८०० ते तीन हजार रूपयापर्यंत स्थिर रहातील, असेही खासदार शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यायी मार्ग रखडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील शतकोत्तर शिवाजी पुलाला पर्यायी मार्ग म्हणून उभारण्यात येत असणाऱ्या पुलाचे काम पुन्हा रखडले आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने हेरिटेज परिसर असल्याने तर, पूर्वेकडीलबाजूस असणारी १३ झाडे तोडण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्याने पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने काम थांबविले आहे.

कोल्हापूर शहराकडून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गाला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून शिवाजी पुलाची ओळख आहे. शंभर वर्षे पूर्ण झालेल्या या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ होते. या पुलाला पर्याय म्हणून पुलाच्या उत्तरबाजूला दुसरा पुल उभारण्याचे काम सुरु आहे. तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून यासाठी भरघोस निधी मिळविण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुल बांधणीचे काम सुरु आहे. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची रुंदी १४.८० मीटर असून लांबी १३४.८० मीटर इतकी आहे. तीन गाळ्यांच्या या पुलाचा अपेक्षीत खर्च १५ कोटी ७४ लाख इतका असून यापैकी ७० टक्के कामावर आजअखेर ११ कोटींचा खर्च झाला आहे.

सन २०१५ पर्यंत हा पुल वाहतुकीला खुला करण्याची अट पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीला होती. मात्र शिवाजी पुलाच्या पुर्वेला असणाऱ्या राजर्षी शाहूकालीन हौद व त्या सभोवती असणाऱ्या झाडांमुळे हे काम थांबले. शिवाय शाहू कालीन हौद असल्याने हा परिसर 'हेरिटेज' असल्याने विरोध झाल्याने काम थांबले. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागविण्यात आला. त्यांच्या अहवालानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी परिसराची पाहणीही केली होती. अहवालासाठी काम थांबल्याने शंभराहून अधिक कर्मचारी बसून होते. पुलाच्या आडवी येणारी १३ झाडे तोडण्यास पुरातत्वकडून परवानगी न मिळल्याने सध्या पुलाचे काम थांबले आहे.

पाच हजार स्क्वेअर फुटाची मागणी

शिवाजी पुलाला पर्यायी पुलासाठी रस्ते विकास मंडळाला पुरातत्व विभागाकडून ५ हजार स्क्वेअरफुट जागा मिळावी अशी मागणी प्रस्तावीत आहे. मात्र, शिवाजीपुलासह संपूर्ण ब्रम्हपूरी परिसर हेरिटेज (वारसास्थळ) असल्याने याबाबत पुरातत्व विभागाकडून कोणता निर्णय होतो यावर कामाची पुर्तता अवलंबून असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता रत्नाकर बामणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न-औषधचा अधिकारी जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बनावट गुटखा उत्पादनावरील कारवाई थांबवण्यासाठी तीन लाखाची लाच घेताना अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यास पकडण्यात आले. अभिनंदन रणदिवे असे त्याचे नाव आहे.

गुटखा उत्पादन करीत असल्याचा आरोप असलेल्या राजू पाच्छापुरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंबंधीची तक्रार केली होती. येथील जुना चंदूर रोड परिसरात पाच्छापुरे बनावट गुटख्याचा कारखाना चालवित होता. वर्षभरात दोन वेळा याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी मशिनरीसह मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला होता. त्यावरुन त्याच्यावर पोलिसी कारवाई सुरू आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडूनही गुटख्याच्या दर्जाची तपासणी केली जात आहे. हे काम अभिनंदन रणदिवे या अधिकाऱ्याकडे आहे. रणदिवे यांनी अनुकूल अहवाल नोंदवावा यासाठी पाच्छापुरे याचे प्रयत्न सुरू होते. त्यातून दोघांमध्ये चर्चा झाली होती.

त्यावेळी रणदिवे यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी तीन लाख रुपये देण्यावर तडजोड झाली, अशी माहिती पाच्छापुरे याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली होती. या आधारे लाचलुचपत शुक्रवारी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर भाजपचाच

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुनरूच्चार, सेनेशी चर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीत कोल्हापूरच्या जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत दिले नाही तर भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी भाजप सत्ता स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहे. सोळा नोव्हेंबरला महापौर शंभर टक्के भाजपचाच होईल, असा पुनरूच्चार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजप ताराराणीचे संख्याबळ ३२ आहे. शिवसेनेच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळावा यासाठी चर्चा झाली आहे. तीन अपक्षही आमच्या आघाडीसोबत रहावेत, यासाठी बोलणी सुरू आहेत. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळत आहे. अपक्षांना पक्षांतरबंदीचा कायदा लागू होत नाही. भाजप-ताराराणी आघाडी व्यतिरिक्त इतर नगरसेवकांची संख्या ४९ आहे. त्यांच्यासोबत बहुमताची मॅजिक फिगर नक्कीच गाठू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, 'भाजपला महापौरपद मिळवून देताना अन्य पक्षातील कुठल्याही नगरसेवकावर दबाव टाकणार नाही. घोडेबाजाराला थारा देणार नाही आ​णि कुठल्याही नगरसेवकाला कसल्याही प्रकारचे आमिष दाखवणार नाही. महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कुठलाही राजकीय पक्ष हा निवडणुका जिंकण्यासाठी लढतो. शिवसेनेसोबतचा वाद संपुष्टात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महाडिकांचा ताराराणी आघाडीशी संबंध नाही

आमदार महादेवराव महाडिक यांनी महापालिकेत सतेज पाटील गटाला सत्ता मिळू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला ताराराणी आघाडीचा पाठिंबा राहील अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे निदर्शनास आणले असता पालकमंत्री पाटील म्हणाले, 'आमदार महाडिक हे काँग्रेसचे आमदार आहेत. त्यांचा आणि ताराराणी आघाडीचा काही एक संबंध नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. आमदार महाडिकांनी काय वक्तव्य केले हे मला माहित नाही. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भाजप ताराराणी आघाडीला अन्य कुणी पाठिंबा दिला तर तो घेण्यात काहीच गैर नाही. अगदी काँग्रेसच्या सतेज पाटील यांनीही भाजप आघाडीला पाठिंबा दिला तर आम्ही घेऊ.'

टोल पुन्हा सुरू होणार नाही

टोल वसुलीला तीन महिन्याची स्थगिती दिली असली तरी कोल्हापुरातून कायमस्वरूपी टोल हद्दपार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एक डिसेंबरपासून कोल्हापुरात टोल वसुली होणार नाही. प्रकल्पाची ​किंमत भागवून कोल्हापूरकरांची टोलपासून सुटका केली जाईल. अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाच्या दोन्ही अहवालांचा अभ्यास सुरू आहे. प्रकल्पाची नेमकी किंमत निश्चित केली जाणार आहे. महापालिका निवडणुका आणि आचारसंहितेच्या कालावधीत हा प्रश्न बाजूला पडला असे वाटत असले तरी अधिकाऱ्यांच्या पातळीवर मूल्यांकन निश्चितीचे काम सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकांनी नुकतीच भेट घेतली असून त्यांनी मूल्यांकनाच्या कामाचे पेपरवर्क सुरू असल्याचे सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाभिमानीचा अल्ट‌िमेटम

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

गेल्या हंगामातील एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारखानदारांना तुरूंगात टाकावे. तसेच त्यांची साखर लिलावात काढून शेतकऱ्यांची देणी द्यावीत. चालू गळीत हंगामात साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी अन्यथा डिसेंबरनंतर कारखाने बंद पाडू, कारखान्यांच्या गोदामातील साखरही बाहेर सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. साखर कारखाने सुरू करण्यास कोणताही अडथळा नसल्याचे नमूद करून त्यांनी यावेळी हिरवा कंदिलही दाखविला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १४ वी ऊस परिषद येथील नगरपालिकेसमोरील विक्रमसिंह क्रीडांगणावर झाली. संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते. या परिषदेस सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा व कर्नाटकच्या सीमाभागातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेत खासदार शेट्टी यांनी आपण कोणत्याही कारखान्याचा ऊस रोखणार नसल्याचे स्पष्ट केले.

सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे आहे की नाही हे सिद्ध करण्याची नामी संधी राज्यक्तर्यांसमोर आहे. एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांना सरकारने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र एवढ्यावर न थांबता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकावे. सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला.

ते म्हणाले, 'राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. ऊस उत्पादन घटले आहे. शेतकरी संघटनांच्या दीर्घकाळच्या आंदोलनामुळे सरकारने रंगराजन समिती नेमली. शेतकऱ्यांना एफआरपी कायद्याची कवचकुंडले मिळाली. यामुळे आता एफआरपीमध्ये मोडतोड करण्याचा अधिकार कुणालाही नाही. एफआरपीमध्ये तोडणी व वाहतूक खर्च वारेमाप दाखविला जात आहे, मात्र तो खपवून घेणार नाही. तोडणी व वाहतूक खर्चाचे धोरण ठरविण्यासाठी सरकारने समिती नेमलीच पाहिजे.'

एफआरपीतून बेकायदा कपात करणाऱ्या कारखान्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ठेवून गुन्हे दाखल करावेत, असा ठराव यावेळी करण्यात आला. विनाकपात एकरकमी एफआरपी १४ दिवसांच्या आत द्यावी, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा घाट घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्दानी खेळ प्रशिक्षण आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब अंतर्गत शिवसंस्कार प्रतिष्ठानतर्फे रविवार (ता.८)पासून मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. कळंबा जेलसमोरीलमोहिते कॉलनी, यशवंत लॉनजवळील स्वामी समर्थ मंदिर परिसरात हे शिबिर होणार आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत शिबिर होईल.

शिवकालीन मर्दानी खेळाचे जतन, संवर्धन व्हावे या उद्देशाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. शिवछत्रपतींनी सह्याद्री डोंगररांगेतील गडकोट-किल्ल्यांच्या आधारे गनिमीकावा या आपल्या युध्दशास्त्राच्या जोरावर ज्या शस्त्रास्त्राच्या सहाय्याने रयतेचे स्वराज्य निर्माण केले त्या शस्त्रास्त्रांविषयी माहिती देणारी ही कार्यशाळा असणार आहे.

तलवार, पट्टा, वीटा, भाला, बाणा, दांड, फरीगदका अशी विविध शस्त्रास्त्रे चालविण्याची माहिती शिबिरात मिळणार आहे. शस्त्रास्त्रे कशी हाताळावीत, त्यांचे वार कसे असतात, युद्धकलेसाठी उभारताना पवित्रा कसा असावा, युध्दाच्या चाली कशा असाव्यात आदींची इत्यंभूत माहितीही दिली जाणार आहे.

शि​बिरात सहभागी होणाऱ्या मटा कल्चर क्लब सभासदांसाठी ३०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.

शिबिरासंदर्भातील अधिक माहिती व नावनोंदणीसाठी महालक्ष्मी स्टेशनर्स अॅण्ड बेकर्स, मोहिते कॉलनी, कळंबा जेल समोर, यशवंत

लॉनजवळ, श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर किंवा प्रियांका पाटील (९८९०५९४४६३) यांच्याशी साधण्याचे आवाहन प्रशिक्षक राजेश पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांसाठी उद्या ‘दीपरंग’ची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या कलाकारांच्या आठवणी जपण्याबरोबरच त्यांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्बच्यावतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला 'दीपरंग' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता.९) सायंकाळी साडेपाच वाजता राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम होईल.

विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ साली 'सीता स्वयंवर' या नाटकाचे सादरीकरण करुन संगीत नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर अनेक नाटककारांनी संगीत व मराठी रंगभूमी समृद्ध केली. नाट्य तसेच संत परंपराही आपल्याला लाभली आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सोपी केली. कितीतरी कवी, साहित्यिकांनी मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या थोरामोठ्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येला ​'दीपरंग' या नाट्य-साहित्य-संगीतावर आधारित कार्यक्रमाद्वारे मानवंदना देणार आहे.

राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, बाळ कोल्हटकर, वसंत कानेटकर, विद्याधर गोखले यांच्या नाट्य-साहित्य-संगीतावर आधारित असलेला हा 'मानवंदना' कार्यक्रम 'वसंत वलय' ठाणे निर्मित आहे. कार्यक्रमात नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, अभंग, उत्तमोत्तम कविता आणि स्वगत सादर केली जाणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन, कल्याणी जोशी, आयडिया सारेगमपचे मयूर सुकाळे, गौतम मोरडेश्वर सहभागी होणार आहेत. 'वादळवाट', 'असंभव', 'जुळुनी येती रेशीमगाठी' या मालिकांमधील कलाकार विघ्नेश जोशी हे हार्मोनियमच्या साथीबरोबर निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत. तबला साथ संदीप पवार देणार आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या कल्चर क्लब सभासदांसाठी कार्यक्रम मोफत आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध असून एका व्यक्तीस दोन प्रवेशिका दिल्या जातील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने आसन व्यवस्था असणार आहे. नागाळा पार्क येथील महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात प्रवेशिक वितरण सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या सुवर्ण खरेदीसाठी चिपडे सराफ पेढी सज्ज

$
0
0

कोल्हापूर ः केशव मार्तंड चिपडे यांनी सुरु केलेल्या सुवर्ण व्यवसायाची शतकोत्तर परंपरा जोपासणाऱ्या गोपीनाथ अनंत चिपडे अॅण्ड सन्स सराफ पेढी दिवाळी सणानिमित्त ग्राहकांसाठी सज्ज आहे. दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शुभ महूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आदरातिथ्यासाठी चिपडे सराफांच्यावतीने विशेष तयारी करण्यात आली आहे.

शुध्द सोने, उत्कृष्ट गुणवत्ता, ग्राहकांची आवड निवड जपणारी डिझाईन्स आणि विक्रीपश्चात सेवा आदी चिपडे सराफांची वैशिष्ट्ये आहेत. दिवाळीसाठी चिपडे सराफांचे नवे भव्य दालन, परंपरा व आधुनिकता यांचा मिलाफ असलेल्या दागिन्यांच्या अप्रतिम व्हरायटीने सजले आहे. डिझाईन, कलाकुसर, भारदस्तपणा यात वेगळेपणा असलेली फेस्टिव्ह अलंकार आणि अस्सल सौंदर्याला शोभून दिसणारे हिऱ्यांचे अलंकार ही चिपडे सराफांची खासियत आहे. परंपरा, विश्वास,

सचोटी, कलाकुसर, नाविन्य अशा विविधतेने नटलेले हिरे येथे उपलब्ध आहेत. आधुनिक स्त्रीच्या अभिरुचिला साजेशा नव्या डिझाईन ट्रेंडशी सुसंगत, वजनाला हलके, स्मार्ट, फॅशनेबल असे अलंकार येथे एकवटले आहेत. अॅंटीक अलंकारांची श्रेणी खास आकर्षण आहे. साज, ठुशी आदी परंपरारिक दागिने वाजवी दर आणि विविध आकर्षक योजनांसह उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन बन्सीधर चिपडे, मुरलीधर चिपडे, गिरीधर चिपडे व तुषार चिपडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे घंटानाद आंदोलन

$
0
0

शिक्षण बचाव कृती समितीचे राज्यभरात आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने आरटीई धोरणातंर्गत कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्यावतीने राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. याचअंतर्गत शैक्षणिक व्यासपीठातंर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केले. शिष्टमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारने सात ऑक्टोबर रोजी राज्यातील कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांच्या पदांना कात्री लावणारा अन्यायकारक निर्णय जाहीर केला आहे.

निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील महत्त्वाचा समजला जाणारा घटक कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शनिवारी दुपारी महावीर गार्डन येथे सर्व शिक्षक एकत्र आल्यानंतर घंटानाद करतच प्रवेशद्वाराजवळ आले. सर्व शिक्षकांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवल्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी बर्गे यांची भेट घेतली.

'राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील कला, क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रावर दूरगामी दुष्परिणाम होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक, वैचारिक, सामाजिक विकासासाठी हे विषय अतंत्य महत्त्वाचे आहेत. केंद्र व राज्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये या विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करुन विषयांच्या अद्यापनासाठी एटीडी, एएम, बीपीएड व एमपीएड अर्हताधारकांची नेमणूक केली जात होती. परंतु नवीन निर्णयानुसार अप्रशिक्षित आणि कोणतीही शैक्षणिक अर्हता नसलेल्या अतिथी निदेशकांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. अशी जबाबदारी सोपवून विद्यार्थ्यांसोबत आर्हताधारक उमेदवारांवरही अन्याय होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.

आंदोलनात जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष एस. डी. लाड, जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे आर. डी. पाटील, जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष दादा लाड, वसंतराव देशमुख, भरत रसाळे, राम पाटील, महेश सूर्यवंशी यांच्यासह शैक्षणिक व्यासपीठातंर्गत येणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images