Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नव्या अटींमुळे सामान्यांची फरफट

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात ५०० मीटर अंतरामधील नवीन बांधकामांसाठी सरकारने लागू केलेल्या किचकट अटींनुसार दोन वर्षांत कळंबा कारागृह परिसरासाठी स्थापन केलेल्या स्थायी सल्लागार समितीकडून केवळ सहा बांधकामांना परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात ५०० मीटरच्या परिसरात कळंबा, साळोखेनगर, जगतापनगर, आयटीआय परिसर असा उपनगरांचा विस्तीर्ण भाग असून ​येथील उपलब्ध जागेपैकी मोकळ्या असलेल्या जागांचे प्रमाण ३५ टक्क्यांपर्यंत आहे. यामध्ये बहुतांश छोटे प्लॉटधारक आहेत. कारागृहाच्या परिसराच्या नियमामुळे एक मजली घराची आवश्यकता असलेल्यांची फरफट सुरू आहे.

नगरविकास मंत्रालयाने डिसेंबर २०१३ मध्ये ५०० मीटरच्या अंतरातील बांधकामांना स्थगिती देण्याचा आदेश काढला. त्याचवेळी परवानगी देण्यासाठी समिती स्थापन केली. त्या परिसरात होणाऱ्या सर्व बांधकामांना या समितीची परवानगी आवश्यक आहे. ही समिती त्या बांधकामाची उंची, ती इमारत उंच होणार असेल तर त्यातून कारागृह परिसर सहज पाहता येऊ शकतो का याची माहिती घेते. त्यानंतरच परवानगी दिली जाते. यानुसार कोणतीही अडचण नसणाऱ्या केवळ सहा बांधकामांना या समितीने परवानगी दिली आहे. जागेअभावी अनेकांनी उपनगरांत पूर्वी जागा खरेदी करुनही ठेवल्या आहेत. त्यावेळी कारागृहाच्या भिंतीपासून केवळ १८२.८८ मीटरपर्यंतच्या बांधकामांना हरकत होती, आता पण ५०० मीटरची अट लागू केली आहे.

ऑगस्ट २०१५ मध्ये आणखी एक नवीन अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये जुन्या अटींमधून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. ज्या इमारतींमधून कारागृहाचा आवार दिसणार आहे, अशा इमारतींचे टेरेस, खिडक्या, बाल्कनीचा एरिया असू नये असे सांगितले आहे. त्याचवेळी परिसरात येणाऱ्या अडचणी पाहून कारागृहांनाही काही निर्देश दिले आहेत. त्यामध्ये कारागृहाच्या भिंतींची उंची वाढवता येते का पाहावे. कारागृहाच्या परिसरावर पूर्ण छत बांधून परिसर दिसणार नाही याची काळजी घेता येते का हे पाहण्यास सुचवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मशिदींत होते गणरायाची प्रतिष्ठापना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कुरुंदवाडमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पाच मशिदींमध्ये विघ्नहर्त्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. येथे श्रींची नियमितपणे पूजा, आरती करण्यात येत असून हिंदू, मुस्लिम बांधव एकत्रित गणेशोत्सव साजरा करीत आहेत.

कुरुंदवाडचा गणेशोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. येथे मंदिराबरोबर मशिदींमध्येही श्री गणेशाची प्रतिष्ठापना मनोभावे केली जाते. हेच येथील वैशिष्ट्य आहे. याची जपणूक दरवर्षी केली जाते. शहरात सुमारे पन्नासहून अधिक ठिकाणी गणरायाची सार्वजनिक प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील कारखाना पीर मशिदीत कारखाना पीर गणेशोत्सव मंडळ, शेळके मशिदीत शिवप्रेमी नवजवान मंडळ, बैरगदार मशिदीत सन्मित्र गणेशोत्सव मंडळ, ढेपणपूर मशिदीत शिवाजी तरुण मंडळ, कुडेखान मशिदीत कुडेखान गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. याचबरोबर येथे नियमितपणे श्रींची पूजा तसेच आरतीही सर्वधर्मीय गणेशभक्त करीत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच भक्तिगीतांमुळे वातावरण भक्तिमय बनले आहे. पावसाने उघडीप दिल्याने सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते गणेशोत्सवात दंग आहेत. विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी कुरुंदवाड शहरात गर्दी होत आहे. मशिदींबरोबरच कुरुंदवाडमधील विठ्ठल, लक्ष्मी, दत्त, काळाराम, मारुती आदी मंदिरांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भारत गणेशोत्सव मंडळाचे यंदा १०१ वे वर्ष आहे. श्री गणपती मंदिरातील श्री गणपत्युत्सव मंडळास यंदा ११९ वर्षे होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावनांशी खेळल्यास कोर्टात खेचू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रभाग रचना, फेर आरक्षण आणि आता मतदार यादीतील घोळ निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर चुका होत असून महापालिका प्रशासन निवडणूक राबविण्यासाटी असमर्थ असल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणूक कामात बाह्य हस्तक्षेप होत असून जाणूनबुजून चुका घडविल्या जात आहेत. प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे. कुणा मंत्र्यांचा फोन येतो का? प्रशासन दबावाखाली काम करत असून कोणताही अधिकारी निवडणुकीच्या कामाकडे गांभीर्याने पाहत नाही. जनतेच्या भावनेशी खेळू नका. अन्यथा कोर्टात खेचू अशा शब्दांत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मतदार यादीतील घोळावरून आयुक्तांवरही निशाणा साधला. आयुक्त पी. शिवशंकर आणि नगरसेवकांत खटके उडाले. आयुक्तांनी संतप्त होऊन, 'हरकती दाखल करा, सूचना करा, दुरूस्ती करतो. ८१ प्रभागात मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. दोषीवर कारवाई करू 'असे उत्तर नगरसेवकांना दिले.

'प्रत्येक प्रभागात एक हजार मतांचा घोळ झाला आहे. हा घोळ कसा निस्तरणार? असा सवाल करत प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'हरकती आ​​णि सूचना दाखल केलेल्या मतदारांच्या घोळाची दुरूस्ती करणार आणि जे तक्रार करणार नाहीत त्यांची दखल घेतली जाणार नसेल तर हे योग्य नाही. सदोष मतदार यादी प्रसिद्ध करू नका. मतदार यादीत चुका ठेवून निवडणुका पुढे ढकलण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

सर्वपक्षीय बैठक बोलवा, लोकांनी दाद कुणाकडे मागायची?

मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक पारदर्शक होईल का ? याविषयी शंका येत आहे. प्रगणक गट फोडले आहेत. मतदारांना वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. मतदार यादी अतिशय निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये पत्ता नाही, मतदारांचे फोटो ओळखत नाहीत. अधिकाऱ्यांना तरी त्यांच्या कुटुंबांतील लोकांचे चेहरे ओळखतात? लोकांनी दाद कुणाकडे मागायची ? सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक बोलावून घोळ कसा दुरूस्त करणार हे स्पष्ट करावे असे राजू लाटकर यांनी सांगितले.

हे गुरूचरण कोण ?

महापालिकेतर्फे निवडणूक कामात गुरूचरण हा अधिकारी असून त्याच्या हस्तक्षेप वाढला आहे. तो कुठे फिरतो, कुठल्या मंत्र्याच्या निवासस्थानी राहतो याची माहिती मिळाली असून योग्य वेळी पर्दाफाश करू. महा ऑनलाइन कंपनीच्या चुकामुळे मतदार यादीत घोळ झाला असून निवृत्त आयएएस अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन त्याची स्थापना केली आहे. महा ऑनलाइनने मुद्दाम चुका केल्या आहेत. असा आरोप प्रा. पाटील यांनी केला.

चुका प्रचंड, हरकतीला मर्यादा

प्रशासनाच्या सावळागोंधळामुळे मतदार यादीत प्रचंड चुका झाल्या आहेत. मात्र हरकतीला मर्यादा येणार आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळे लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे की नाही असा सवाल शारंगधर देशमुख यांनी केला. माजी महापौर आर. के. पोवार यांनी प्रशासनाने जलदतीने मतदार यादी दुरूस्तीचे काम हाती घेण्याची सूचना केली. नगरसेवक सुनील पाटील, परीक्षित पन्हाळकर, अनिल आवळे, मुरलीधर जाधव, संभाजी देवणे, संभाजी जाधव, अजित राऊत यांनी चुका निदर्शनास आणल्या. रमेश पोवार यांनी जुन्या मतदार याद्यांचा आधार घेण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणबाळाचा शब्दकोशच वेगळा

$
0
0

सहकारमंत्र्यांची मुश्रीफ यांच्यावर टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संस्था बुडवणे ही ज्यांची संस्कृती आहे त्यांच्या तोंडी सुसंस्कृत शब्द शोभत नाही. जिल्हा बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी कायदेशीर मार्गानी चौकशी सुरू असताना त्यांना सूडबुद्धी वाटते. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कागलच्या या कर्तृत्ववान 'श्रावणबाळाचा' शब्दकोषच वेगळा दिसतो. पक्षनेतृत्वाच्या गुडबुकमध्ये रहावे या उद्देशाने माझ्याविरोधात खोटे वक्तव्य करण्याचा हेतू दिसतो, अशा कडवट शब्दांत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता टीका केली आहे. तरीही त्यांना सुडबुद्धी दिसते म्हणजे 'खाई त्याला खवखवे' असाच प्रकार म्हणावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य बँकेनंतर जिल्हा बँकेतील घोटाळ्यांची चौकशी पुन्हा सुरू केल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांनी सुडबुद्धीने कारवाई चालवल्याचा आरोप केला. त्यावर वक्तव्य न करता पाटील यांनी मंगळवारी निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.

जिल्हा बँक असो वा राज्य बँक असो, तेथील कोट्यवधींच्या घोटाळ्यांची सरकारने सुरू केलेली चौकशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारी आहे. जिल्हा बँकेतील चौकशी पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनेच चालवली आहे. ती कायदेशीर प्रक्रिया राबवून पूर्ण करणे व घोटाळेबाजांच्या पदरात भ्रष्टाचाराचे पाप बांधणे ही सुडबुद्धी कशी ठरते? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळेच सरकारने बँकेवर संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नियुक्ती केली. प्रशासक नियुक्तीनंतर बँकेला उर्जितावस्था प्राप्त झाली हे विसरलेले दिसतात. अनेक घोटाळ्यांवर पांघरुन घालायच्या कार्यबाहुल्यामुळे हे विस्मरण झाले असावे, असा टोल लगावून पाटील म्हणतात, बँकेच्या अनेक शाखांत गैरव्यवहार झाला. कागल शाखेत कोट्यवधीचा अपहार झाला. कर्जमाफीतही शंभर कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा झाला. संचालकांच्या भ्रष्ट कारभाराने १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. घोटाळेबाजांचे कर्तृत्व चौकशी अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे. चौकशी केवळ एका दुसऱ्या नव्हे तर अनेक माजी संचालक व अधिकारी यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रश्नी ठपका ठेवला आहे.

आघाडीमुळेच अडचणी

बँकेची कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी सुरु आहे. पूर्वीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाने ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केले. गळीत हंगाम केंव्हा सुरु होईल याविषयी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी उगीच डोक्याला ताप करुन घेऊ नये. माझी राजकीय वाटचाल व फुंडकरांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना जबाबदारी देण्याविषयी भाजप नेतृत्व सक्षम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवकाळात स्वच्छतागृह सुविधा

$
0
0

सतेज पाटील फाउंडेशनचा महिलांसाठी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सव काळात महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सतेज पाटील फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गर्दीच्या प्रमुख ६० ठिकाणी स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. देखावे ते अनंत चतुर्दशी मिरवणूक काळात चार दिवसांसाठी ही सोय करण्यात आली असल्याची माहिती सचिन झंवर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

झंवर म्हणाले, 'गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. या काळात महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला जातो. फाऊंडेशनच्या वतीने शहरातील प्रमुख ठिकाणांचा सर्व्हे केला त्यानुसार महापालिकेच्या परवानगीने शहरातील ६० ठिकाणी पुण्याहून स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.'

डॉ. संदीप पाटील म्हणाले, 'देखावा काळात राजारापुरी येथील जगदाळे हॉल, लकी बाजार रोड, आईचा पुतळा तसेच शाहूपुरी परिसरातील भास्कर प्लाझा, बी. टी. कॉलेज त्याचबरोबर पार्वती टॉकीज परिसर, बिंदू चौक पार्कींग, शिवाजी चौक, भवानी मंडप, मिरजकर तिकटी रोड, इंदूमती गर्ल्स हायस्कूल परिसर, मंगळवार पेठ, शिंगोशी मार्केट, कसबा बावडा, भगवा चौक, पिंजार गल्ली येथे स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. तर अनंत चतुर्दशी मिरवणूकीच्या काळात पंचगंगा घाट, सिद्धेश्वर मंदिर, तांबट कमान, रंकाळा टॉवर, क्रशर चौक, पापाची तिकटी, गंगावेश पेट्रोलपंप, जामदार क्लब, आंबेडकर हॉल आदी ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानंतर नवरोत्सव काळातही अशी सोय करण्याचा ‌विचार केला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी विनायक सुर्यवंशी, अजय पाटील, उत्तम अंबवडे, राजू परीख, महेश सरनाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्याजवळ महिलेचा खून

$
0
0

पन्हाळा : पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सुर्वेवाडी-गुडे दरम्यानच्या रस्त्याशेजारील ओढ्यात एका महिलेचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. विद्या दीपक निकम (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विद्या निकम या संजीवन नॉलेज सिटीमधील मेसमध्ये चपाती लाटण्याचे काम करत होत्या. वाघवे येथून त्या दररोज सुर्वेवाडीमार्गे संजीवनमध्ये येत असत. त्यांचा २४ वर्षापूर्वी कोडोली येथील दीपक निकम यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून पती निधनानंतर गेली १८ वर्षे त्या आपल्या माहेरी वाघवे येथे राहात होत्‍या. सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेल्या विद्या निकम यांचा सुर्वेवाडी-गुडे दरम्यानच्या ओढयात डोक्यात दगड घालून अज्ञाताने खून केला. दुपारी ओढ्याकाठी खेकडी पकडायला गेलेल्या मुलांना त्‍यांचा मृतदेह दिसताच त्यांनी ही माहिती गुडे येथील पोलिस पाटील केशव कदम यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरिबांच्या चुलीत पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉँग्रेस राजवटीत गोरगरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी योजना बंद करण्याचा घाट सत्ताधारी भाजप सरकारकडून सुरु आहे. काही योजनांची नावे बदलण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना बंद करून गरीबांच्या चुलीत पाणी ओतण्याची मोहिम सरकारने उघडली आहे. या गोष्टी थांबवून योजनांची अंमलबजावणी तत्काळ करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

नागाळा पार्क येथील बालाजी गार्डन पासून केळवकर हॉस्पीटलमार्गे कलेक्टर ऑफीस या मार्गावर रणरणत्या उन्हात हा मोर्चा निघाला. जिल्ह्यातील शेतकरी, अपंग, महिला, वृध्द हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. 'गरीबांच्या योजना बंद करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्का असो', यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना ‌मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, 'कॉँग्रेस राजवटीत सरकारी अधिकाऱ्यांच्या पाहाणीनंतरच पेन्शन सारख्या योजना लागू करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यमान सरकारच्या सूचनेनुसार या योजना तपासणीच्या नावाखाली गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. विद्यमान सरकारला योजना द्यायच्याच असल्यास पूर्वीच्या बंद न करता नव्या योजना सुरु कराव्यात.' मोर्चात महापौर वैशाली डकरे, प्रतिमा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, पूनम जाधव, प्रल्हाद चव्हाण, शारंगधर देशमुख, जि. प. सदस्य मनीषा वास्कर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

सत्तेची मस्ती

सतेज पाटील यांनी यावेळी पालकमंत्र्यापासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांवर टिकास्त्र सोडले.ते म्हणाले,' गोरगरीब माता भगिनींना बोगस म्हणणाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे. पालकमंत्रीच पेन्शनसारख्या योजना बंद करून गरीबांचा घास हिसकावत आहे.'

अमल महाडिकांवर जोरदार टीका

सतेज पाटील यांनी आमदार अमल महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली. 'सर्वसामान्यांनी आपल्या समस्यांसाठी भाजपच्या आमदारांना शोधायचे कोठे ? शिरोलीत त्यांचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का ? शिरोलीत जायचे म्हटले तर गाडीभाडे आले. गरीबाची पेन्शनच बंद केल्याने हे गाडीभाडे भागवयाचे कसे ?, अशी टीका त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यादीतील घोळाचे षड‍्यंत्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रभाग रचनेपासून सध्याचा मतदार यादीतील घोळ पाहता आगामी विधानपरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याआधी महापालिकेची निवडणूक होऊ नये असे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. याबाबत आयुक्त व महापालिका प्रशासनावर दबाव असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.

शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालीम मंडळाच्या गणेशोत्सव देखाव्याचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी शिवसेनेचे आमदार ​राजेश क्षीरसागरही उपस्थित होते. पण राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे अनुपस्थित होते.

आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव या कार्यक्रमात घेतले नाही. पण सतेज पाटील यांच्या भाषणाचा रोख त्यांच्याशी संबंधित विधानपरिषद निवडणुकीच्या दिशेने होता. ते म्हणाले, 'भाजपचे नगरसेवक सुभाष रामुगडे यांचा मतदारसंघ ३१०० मतदारांचा होतो व काँग्रेसचे इच्छुक सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख यांचे मतदारसंघ सात ते आठ हजार मतदानाचे होतात. ताराबाई पार्कमधील मतदार लक्षतीर्थ वसाहतीमध्ये जातात. कसबा बावड्यातील मतदार इतरत्र घातले जातात. दोन प्रभाग ओलांडून तिसऱ्या प्रभागात मते कशी जातात? प्रभाग रचनेपासून मतदार यादीपर्यंतचे प्रकार पाहता आयुक्त व प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचे दिसते. सध्या असलेल्या नगरसेवकांना मतदान करता येऊ नये व नवीन मतदारही येऊ नयेत असा डाव भाजपचा असल्याची शंका आहे. आयुक्तांना या प्रकाराबाबत विचारल्यानंतर हरकती घेतल्यानंतर कार्यवाही करु असे सांगतात. मग जे हरकती घेणार नाहीत त्यांचे काय? यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व प्रभागात हरकती घ्याव्यात.'

पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर शहराचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करुन विकासकामांसाठी ५०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता द्यावा. आम्ही निवडणूक लढवत नाही, असे पुन्हा एकदा येथील भाषणात स्पष्ट केले. तसेच आम्हाला राजकारणापेक्षा शहराचा विकास महत्वाचा आहे, असेही सांगितले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी तालमीच्या इमारतीसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. यावेळी महापौर वैशाली डकरे यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर पत्रकार योगेश जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर सागर चव्हाण, उपमहापौर ज्योत्स्ना पवार मेढे, शारंगधर देशमुख, अजित राऊत आदी उपस्थित होते. नगरसेवक सचिन चव्हाण यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संकेश्वरात पोलिसांचे वास्तव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रमुख संशयित समीर गायकवाडला अटक केल्यानंतर कर्नाटकातील संकेश्वरमध्ये त्याचे वास्तव्य असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. संकेश्वरमध्येच हत्येचा कट रचला आणि तिथूनच अनेक महत्त्वाचे निर्णय झाल्याचे तपासात स्पष्ट होत असल्याने पानसरे हत्या तपासात संकेश्वर केंद्रबिंदूवर आले आहे.

अटकेत असलेला प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडचे संकेश्वरातील वास्तव्य आणि संकेश्वरातील सनातनच्या हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. समीर गायकवाड हा संकेश्वरातील त्याच्या मावशीकडे राहिला होता. सांगली आणि मुंबईप्रमाणेच संकेश्वरातही त्याचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान होते. मामांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाशेजारीच समीरचे दुकान होते. मात्र ते काही दिवस सुरू, तर काही दिवस बंद असायचे. समीरच्या मामाच्या घरीच सनातनच्या साधकांसाठी प्रत्येक आठवड्याला प्रवचनांचे आयोजन केले जाते. या प्रवचनाला संकेश्वरसह आसपासच्या खेड्यांमधील साधक उपस्थित राहतात. प्रवचनांच्या माध्यमातून धार्मिक विचारांच्या प्रसाराबरोबरच गोवंश हत्या बंदी, इतर धर्मांचा वाढता प्रभाव, दहशतवादी संघटनांकडून काश्मिरात होणारा हिंदूंवरील अत्याचार, देशात घडणारे दहशतवादी हल्ले, सर्व धर्मांना समान न्याय आणि समान कायदे अशा मुद्यांवर आवर्जून चर्चा घडते.

गेल्या काही वर्षांपासून संकेश्वरातील सनातनच्या प्रवचनांमध्ये तरुण-तरुणींची संख्या वाढली आहे. विशेषतः गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सनातनचे तरुण हिरीरीने सहभागी होत आहेत. गायींची होणारी चोरटी वाहतूक रोखून पोलिसांत तक्रारी देण्यातही सनातनचे साधक पुढे आहेत.

संकेश्वरसह खानापूरमध्येही अशाच प्रकारचे काम सुरू आहे. या सर्व घडामोडींमध्ये समीर गायकवाडचाही मोठा सहभाग होता. प्रवचनाला येणाऱ्या साधकांना धार्मिक पुस्तकांची विक्री करण्याची जबाबदारी समीरकडे होती. यातूनच समीर धर्मरथाकडे वळला होता. धर्मरथाच्या निमित्ताने सीमाभागात त्याचा साधकांशी संपर्क होता, त्यामुळेच संकेश्वरातील त्याचे वास्तव्य पोलिस तपासात केंद्रबिंदूवर आले आहे.

समीरच्या संपर्कात आलेले संकेश्वरातील इथर साधक आणि समीरच्या नातेवाइकांची कर्नाटक पोलिसांनीही नव्याने चौकशी सुरू केली आहे. कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचे ठोस धागेदोरे मिळाल्यास डॉ. कलबुर्गी यांच्याही मारेकऱ्यांचा सुगावा लागेल असा विश्वास पोलिसांना असल्याने केंद्रीय तपास यंत्रणा, कोल्हापूर पोलिस आणि कर्नाटक पोलिसांच्याही तपास केंद्रावर संकेश्वर आले आहे.

संकेश्वरात पोलिसांचे वास्तव्य

पानसरे हत्येच्यावेळी घटनास्थळावरील काही साक्षीदारांकडून समीरची ओळख परेड घेण्यात आली. काही साक्षीदारांनी समिरच्या साधर्म्य वाटते असे सांगितले. पण तोच समिरच हल्लेखोर आहे का याबाबत स्पष्ट सांगण्याचे टाळले. अतिशय कडक बंदोबस्तात मोजक्याच साक्षीदारांची ओळख परेड घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधकांमुळे सांगली चर्चेत

$
0
0

मडगाव स्फोटानंतर रूद्रचा गावाशी संपर्क

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सांगलीच्या समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर अनेक तपास यंत्रणांनी सांगली जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याचे पुढे येत आहे. मडगाव बॉबस्फोटात जागेवरच मृत्युमुखी पडलेला मलगोंड पाटील आणि सध्या संशयाच्या भोवऱ्यात असलेला रुद्र पाटील हे दोघेही जत तालुक्यातीलच राहणारे होते. पण सध्या रुद्र पाटील याचा शोध घेण्याबरोबरच कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील प्रवीण लिमकर याचाही शोध सुरू असल्याचे समोर आले आहे. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाबरोबर कर्नाटकातील डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिस जत आणि ढालगावबरोबरच सांगली-मिरजेत शोधमोहीम राबवत असल्याचे समोर येत आहे.

जत तालुक्यातील काराजगी येथील रहिवाशी असलेला रुद्र पाटील हा मडगाव बॉबस्फोटाच्या घटनेपासूनच गायब आहे. एनआयए या तपास पथकाने रुद्र पाटीलला फरार घोषित केले असून मडगाव बॉम्बस्फोटाचा तपास या पथकाकडे आहे. पुण्यातील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर काही काळ तपास यंत्रणा गतिमान झाल्या होत्या. त्यानंतर कॉ. पानसरे आणि लागोपाठ कर्नाटकात डॉ. कलबुर्गी यांची हत्या करताना हल्लेखोरांनी वापरलेली पद्धत एकच असल्याने तपास यंत्रणा पुन्हा कामाला लागल्या. समीर गायकवाडला अटक झाल्यानंतर तपास यंत्रणाचे लक्ष पुन्हा सनातन संस्थेच्या साधकांवर केंद्रित झाले आहे. समीरच्या सांगलीतील घराकडेही एनआयएचे पथक येणार असल्याची चर्चा होती. परंतु, घराच्या सुरक्षेत तैनात असलेल्या यंत्रणेने असे कोणतेही पथक आले नसल्याचे सांगितले. शिवाय तपासाला सामोरे जाऊन घरी परतलेल्या समीरच्या आईनेही प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

नातेवाइकांच्या संगतीने प्रवीण बनला साधक

मूळचा कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे राहणारा आणि पंचवीस वर्षांपासून दूर असलेला सनातनचा साधक प्रवीण लिमकर याचाही तपास यंत्रणा शोध घेत असल्याचे समोर आले आहे. गावात त्याचे चुलते व अन्य नातेवाईक राहत आहेत. सोमवारी त्याच्या गावी आलेल्या पथकाने नातेवाइकांकडून काही माहिती घेतली. संबंधित पथक हे कर्नाटक पोलिसांचे होते की, एनआयएचे हे नेमके समजू शकले नाही. जवळच्या नातेवाइकाच्या संगतीने सनातनचा साधक बनून पूर्णवेळ सनातनच्या कार्याला वाहून घेतलेला प्रवीण लिमकर हा कोल्हापुरात सनातन प्रभातचा पत्रकार म्हणून वावरत होता. २००६ मधील मडगाव बॉम्बस्फोटापासून तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागल्यानंत्तर रुद्र पाटील याच्याप्रमाणे तोही सध्या बेपत्ता आहे. सांगलीतल्या विलिंग्डन महाविद्यालयात प्रवीण लिमकरच्या मोठ्या भावाचे शिक्षण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणानंतर त्याने सोडत पध्दतीची योजना जाहीर करून अनेकांना गंडा घातला. त्यानंतरही तोही गायब झाला आहे.

मडगाव स्फोटानंतर रूद्रचा गावाशी संपर्क

मडगाव बॉम्बस्फोटानंतर गायब झालेला रुद्र पाटील हा सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असला तरी त्याचे वास्तव्य कोल्हापूरसह अन्य ठिकाणच्या सनातनच्या आश्रमातच अधिक राहिल्याचे समोर येत आहे. मडगाव बॉम्बस्फोटानंतर फरार असल्याच्या कालावधीत तो अनेक वेळा काराजगी या गावी येऊन गेल्याची चर्चा आहे. अगदी दोन वर्षांपूर्वी त्याने पेशाने वकील आणि सनातनची साधक असलेल्या तरुणीशी विवाह केल्याची माहितीही समोर आली आहे. तो मोबाइलचा वापर करीत नसल्याने त्याचे लोकेशन तपास यंत्रणांच्या रडारवर येत नसावे. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतरही सांगली आणि कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्तिक तपास पथकाने रुद्र पाटीलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पानसरे यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी तो पंधरा दिवस कोल्हापुरातच होता, असेही समजते. डॉ. कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वीही दोन दिवस तो त्या परिसरात होता. इथपर्यंत माहिती गोळा करण्यात तपास पथकांना यश आले होते असे समजते. पण, तो काही केल्या अद्याप हाताला लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी डॉ. कलबुर्गी प्रकरणाचा तपास करणारे कर्नाटक पोलिसांचे पथकही रुद्र पाटीलच्या गावी येऊन गेले. परंतु स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर आज पुन्हा कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गो​विंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याची पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (ता. २३) संपत आहे. त्यामुळे त्याला बुधवारी कोर्टासमोर उभे करण्यात येणार आहे. तो तपासकामी मदत करत नसल्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी विशेष पथक (एसआयटी) करणार आहे. अटक केल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी यापूर्वी समीरला आठ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.

समीरच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपणार आहे. समीर तपासकामी सहकार्य करत नसल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी अशी मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पानसरे वकील होते आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनशी ते संबंधित असल्याने स्थानिक वकिलांना वकीलपत्र घेण्यास अटकाव केला होता. पण हिंदू विधिज्ञ परिषदेकडून समीरचे वकीलपत्र घेण्यात येणार आहे. समीरला जामीन मिळावा यासाठी अॅड. पाटील व इचलकरंजीकर प्रयत्न करणार आहेत, तर समीरच्या पोलिस कोठडीत वाढ व्हावी या मागणीसाठी सरकारी वकिलांकडून प्रयत्न केले जाणार आहे. समीरच्या पोलिस कोठडीत वाढ व्हावी यासाठी पोलिसांकडून हत्येचा कट, सहआरोपींचा शोध व अटक, हत्येतील शस्त्रात्रे जप्त करणे हे मुद्दे मांडले जाणार आहेत.

साक्षीदारांकडून समीरची ओळखपरेड

पानसरे हत्येच्यावेळी घटनास्थळावरील काही साक्षीदारांकडून समीरची ओळख परेड घेण्यात आली. काही साक्षीदारांनी समिरच्या साधर्म्य वाटते असे सांगितले. पण तोच समिरच हल्लेखोर आहे का याबाबत स्पष्ट सांगण्याचे टाळले. अतिशय कडक बंदोबस्तात मोजक्याच साक्षीदारांची ओळख परेड घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'हू किल्ड करकरे’वर बंदी घालण्याची मागणी

$
0
0

कोल्हापूरः मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासाठी हिंदुत्ववाद्यांना दोषी ठरवणारे माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ हे 'हू किल्ड करकरे' या पुस्तकाच्या माध्यमातून न्यायसंस्थेचा अपमान करीत आहेत. मुश्रीफ यांच्याकडून आता सनातन संस्थाही लक्ष्य होत असल्याने त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावी, या मागणीचे पत्रक सनातनने प्रसिद्धीस दिले आहे.

शमशुद्दीन मुश्रीफ आणि कोळसे-पाटील भडक विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुश्रीफ यांचे पुस्तक आणि व्याख्यानांवरही बंदी घालावी, असे पत्रक सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी प्रसिध्दीस दिले आहे. दरम्यान, शिवाजी चौकात हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथकांच्या टार्गेटमुळे तपासाला पुन्हा वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलिस मुख्यालयातील दहा पथके कार्यान्वित झाली आहेत. त्यांना दिवसभरात तपासाचे टार्गेट दिले जाते. ते पूर्ण झाले की नाही हे पाहण्यासाठी रोज सायंकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा तपास करणाऱ्या दहा पथकांची बैठक घेतात. त्यामुळे तपासातील अचूक टायमिंगमुळे पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे.

एसआयटीचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आहे. समीर गायकवाडला अटक केल्यानंतर संजयकुमार दोन दिवस कोल्हापुरात होते. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक के. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पथके कार्यरत आहेत.

प्रत्येक दिवशी प्रत्येक पथकाला तपासासाठी टार्गेट दिले जाते. पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक पथकाच्या प्रमुख स्थानी आहेत. दिलेल्या टार्गेटची माहिती दर तासाला अपडेट केली जाते. स्थानिक गुन्हे अन्वेषण, स्थानिक एसआयटी, सायबर क्राईम, राजारामपुरी पोलिस ठाणे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची पथके माहिती घेऊन येतात. स्थानिक पथकाबरोबर मुंबई, नासिक, सांगली, कऱ्हाड येथील पथके कार्यरत आहेत. रोज सायंकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा तपास करणाऱ्या दहा पथकांची बैठक घेतात. या बैठकीत दिवसभर दिलेल्या टार्गेटची माहिती घेतली जाते., तसेच ज्यांची टार्गेट अपूर्ण असतात त्यांना पुन्हा सूचना दिल्या जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या मनात नेमके काय?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेऊन सहा दिवस झाले तरी तो कोणतीच माहिती देत नाही. त्यामुळे तपासात अडणी येत आहेत. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी गुजरातमधील फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. समीरच्या मानसिक स्थितीसोबतच आवाजाचे नमुने तपासण्याचे काम तीन सदस्यीस फॉरेन्सिक टीम करणार आहे.

समीर गायकवाडला पोलिसांनी अटक करून सहा दिवस उलटले तरी अजूनही त्याच्याकडून पोलिस तपासात अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही, त्यामुळे पोलिसांनी समीर गायकवाडच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. समीरच्या तपासासाठी आलेल्या सर्वच पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्या मनाचा ठावठिकाणा घेण्यात अडचणी जाणवल्या आहेत. अतिशय चाणाक्षपणे तो मुख्य मुद्द्याला बगल देत आहे. थंड डोक्याने तपास यंत्रणांना सामोरे जाणाऱ्या समीर गायकवाडच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज घेण्याचे काम गुजरातची फॉरेन्सिकची टीम करणार आहे. या टीममध्ये दोन महिला आणि एक पुरुष अधिकारी आहे. प्रामुख्याने समीरची मानसिक स्थिती आणि त्याच्या आवाजाचे मनुने तपासण्याचे काम या पथकाकडून केले जाणार आहे.

समीर गायकवाडच्या सांगली आणि मुंबईतील घरात पोलिसांनी छापे टाकल्यानंतर २३ मोबाइल हॅन्डसेट, ५० सीमकार्ड आणि एक लॅपटॉप सापडला होता. मोठ्या प्रमाणात सापडलेल्या सीमकार्डमुळे पोलिसांनी त्याचे मोबाइलवरील संभाषण तपासण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षभरातील समीरचे मोबाइलवरील संभाषण तपासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने याआधीच पोलिसांनी त्याच्या आवाजाचे नमुने तपासासाठी पाठवले होते. समीरचा आवाज आणि त्याचे मोबाइलवरील आवाजाचे नमुने यामध्ये साम्य आढळले आहे, पण तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

फॉरेन्सिक टीमकडून समीरच्या मनाचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होणार आहे. विशिष्ट प्रसंगातील त्याचे वर्तन, पोलिस तपासादरम्यान त्याच्या होणाऱ्या हालचाली, देहबोली याचेही निरीक्षण टीमकडून होणार आहे. संमोहनाच्या माध्यमातून समीरच्या अंतर्मनातील माहिती जाणून घेतली जाणार आहे. संमोहनातून त्याचा भूतकाळ, कौटुंबिक माहिती, सनातन संस्थेतील काम, इतर साधक, त्याचे मित्र याची माहिती पोलिसांना मिळणार आहे. याच तपासातून मडगाव स्फोटातील फरारी आरोपी रुद्र पाटील याचीही माहिती मिळण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणांनी अतिशय काळजीपूर्वक आणि सर्व अत्याधुनिक पद्धतींचा वापर सुरू केला आहे.

समीरचे सायकॉलॉजिकल प्रोफाइल तयार करणार

जेव्हा आरोपींकडून तपासात सहकार्य मिळत नाही तेव्हा त्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी त्याचे सायकॉलॉजिकल प्रोफाइल तयार केले जाते. त्याचा भूतकाळ, मानसिक स्थिती, विशिष्ट पद्धतीचे वर्तन, विशिष्ट प्रसंगांमध्ये प्रतिक्रिया देण्याची पद्धत याचा अभ्यास करून सायकॉलॉजिकल प्रोफाइल तयार केले जाते. समीरने चौकशीदरम्यान लपवलेल्या अनेक बाबी सायकॉलॉजिकल प्रोफाइलमधून उलगडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांना वगळून कॉँग्रेस लढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोयीची भूमिका घेणाऱ्या आमदार महादेवराव महाडिक यांना वगळून कॉँग्रेस महापालिका निवडणूक लढवेल, अशी माहिती माजी मंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली. निवडणुकीसाठी पक्षाची ७५ टक्के उमेदवारांची यादी तयार असून, गणेशोत्सवानंतर याची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीसाठी प्रदेश कॉँग्रेसने वीस जणांची समिती नेमली होती. या समितीची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी कदम, रमेश बागवे, सतेज पाटील, पी.एन. पाटील आदी उपस्थित होते. जवळपास साठ उमेदवारांची यादी निश्चित केल्याची माहिती देत गणेशोत्सवानंतर ८१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील महाडिक यांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने त्यांचा उमेदवार निवड प्रक्रियेत समावेश केलेला नाही. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही त्यांना गट-तट विसरून एकत्र लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र महादेवराव महाडिक यांचा या निवडणुकीसाठी कॉँग्रेससोबत सक्रीय सहभाग नसल्याने त्यांच्याशिवाय ही निवडणूक लढणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या निवडणुकीत महादेवराव महाडिक सक्रीय होते. मात्र पक्षासाठी त्यांचा फारसा फायदा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्यावेळी मीच चूक केली, आता मात्र महादेवराव महाडिक यांचा विषय माझ्यासाठी संपला आहे. असे सांगत आता होऊन जाऊदे असे कदम यांनी सांगितले.

महाडिकांनी अनेकदा कॉँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याने गट-तटांचा फटका पक्षाला बसल्याची कबुली देत योग्य वेळ आल्यास महाडिकांवर कारवाईचा विचार केला जाईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमा पानसरेंवर अॅन्जिओग्राफी यशस्वी

$
0
0

कोल्हापूरः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्यावर मंगळवारी दुपारी अॅस्टर आधार हॉस्पिटल येथे अॅन्जिओग्राफी करण्यात आली. उमा यांना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास छातीत दुखू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कॉम्रेड पानसरे हत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. पोलिसांनी समीर गायकवाड या संशयिताला ताब्यात केल्यापासून याबाबतच्या बातम्या आणि चर्चा उमा यांनाही सांगितल्या जात होत्या. पानसरे यांच्यावर गोळीबार झाला तेव्हा उमा पानसरे याही गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याने शस्त्रक्रिया केली होती. तसेच उमा यांना अर्धांगवायूचा सौम्य झटकाही आला होता. अशा परिस्थितीत गेल्या आठवडभर पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासातील बाबींचा विचार केल्यामुळे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नेहमीप्रमाणे त्यांनी योगासने केली. मात्र त्यानंतरही त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याचे त्यांनी स्नुषा मेघा यांना सांगितले. मेघा यांनी तातडीने उमा यांना अॅस्टर आधार येथे आणले. त्यानंतर डॉ. अजय केणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलबुर्गी हत्येतही कनेक्शन?

$
0
0

कोल्हापूर ः ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडची कर्नाटक सीआयडीचे पोलिस अधीक्षक बी. एस. राजाप्पा यांनी मंगळवारी दीड तास कसून चौकशी केली. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येतही समीरचे कनेक्शन होते काय, याचा शोध कर्नाटक सीआयडीचे पथक घेत आहे.

कर्नाटक सीआयडीचे पोलिस अधीक्षक बी. एस. राजाप्पा यांचे पथक मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस मुख्यालयात आले. राजाप्पा यांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. त्यानंतर पानसरे हत्या प्रकरणातील तपास प्रमुख अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे पानसरे हत्येचा तपास आणि समीरसंबंधी दीड तासाहून अधिक काळ माहिती घेतली. त्यानंतर राजाप्पा यांनी समीरचीही चौकशी केली. त्यांनी समीरला इंग्रजी व हिंदी भाषेत प्रश्न विचारले. तसेच कोल्हापूरच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी इंग्रजी प्रश्नांचे भाषांतर करून समीरकडून उत्तरे घेतली. पानसरे हत्येबरोबर त्यांनी कलबुर्गी हत्येसंबंधातही समीरवर प्रश्नांचा भडीमार केला. संकेश्वर, खानापूर येथील त्याच्या वास्तव्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आले. दीड तासाच्या चौकशीचा लेखी नोंदही राजाप्पा यांनी ठेवली. त्यांच्यासमवेत डीवायएसपी दर्जाचा अधिकारी आणि दोन कर्मचारी होते.

कर्नाटक पोलिस ताब्यात घेणार

कर्नाटक व पानसरे प्रकरणाचा तपास करणारी एसआयटीची पथके रूद्र पाटील व आणखी तीन संशयितांचा शोध घेत आहेत. पानसरे हत्येचा तपास करताना हल्लेखोर कर्नाटकात पळाले असल्याचा संशय सुरुवातीपासून व्यक्त केला होता. कोल्हापूर पोलिस व कर्नाटक सीआयडी पथक तपासासंबंधी देवाणघेवाण करत आहेत. समीरची कोठडी संपल्यावर समीरला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या ठाण्यातील घरावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या ठाणे शहरातील घरावर कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. या छाप्यात सनातन संस्थेसंबंधीची कागदपत्रे, कपडे आणि इतर साहित्य मिळाले आहे. जप्त केलेले साहित्य घेऊन पथक कोल्हापूरकडे निघाले आहे. दरम्यान, कर्नाटक सीआयडीने समीरची दीड तास चौकशी केली.

समीरला अटक केल्यानंतर एसआयटीकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पण, तो तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांसमोर अडचणी वाढल्या आहेत. मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा वापर करून तपास केल्यानंतर तो ठाण्यात राहत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचे पथक सोमवारी रात्री ठाण्याकडे निघाले. मंगळवारी सकाळी ठाणे शहरात समीरच्या खोलीवर पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सनातनसंबंधी असलेली कागदपत्रे व पुस्तके पोलिसांना मिळाली. तसेच समीरचे कपडेही पोलिसांना मिळाले. तपासाच्यादृष्टीने आवश्यक असलेली कागदपत्रे व पुस्तके घेऊन पथक कोल्हापुराकडे निघाले असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्यातील कारवाई करताना पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. यापूर्वी समीरला अटक केल्यानंतर त्याच्या सांगलीतील घरावरही छापा टाकला होत्या. या छाप्यात सनातन संस्थेसंबंधीची कागदपत्रे, २३ मोबाइल संच, ५० सीमकार्ड व लॅपटॉप मिळाला आहे. सांगली व ठाण्यातील टाकलेल्या छाप्यात मिळालेल्या कागदपत्रातून पोलिसांना तपासासाठी पूरक कागदपत्रे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकेशन ठाण्यात

पोलिसांनी दुसऱ्या पातळीवर तांत्रिक पद्धतीने केलेल्या तपासात समीरच्या मोबाइल संभाषणातील बरीच लोकेशन ठाणे परिसरात आढळली. पोलिसांनी चौकशीसाठी विविध प्रकारच्या पध्दतीचा वापर केल्यानंतर त्याने ठाणे येथे भाड्याच्या खोलीत रहात असल्याची कबुली दिली.

गुजरातची फॉरेन्सिक टीम दाखल

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील प्रमुख संशयित आरोपी समीर गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेऊन सहा दिवस झाले तरी तो कोणतीच माहिती देत नाही. त्यामुळे तपासात अडणी येत आहेत. त्यामुळे त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी गुजरातमधील फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. समीरच्या मानसिक स्थितीसोबतच आवाजाचे नमुने तपासण्याचे काम तीन सदस्यीस फॉरेन्सिक टीम करणार आहे. समीर गायकवाडला पोलिसांनी अटक करून सहा दिवस उलटले तरी अजूनही त्याच्याकडून पोलिस तपासात अपेक्षित सहकार्य मिळालेले नाही, त्यामुळे पोलिसांनी समीर गायकवाडच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता तरुणाचा बुडून मृत्यू

$
0
0

कुपवाड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने सोमवारी सांगलीत कृष्ण नदीकाठी आलेला तरुण बेपत्ता झाला होता. त्या तरुणाचा मृतदेह बुधवारी सापडला. मृतदेह विसर्जित केलेल्या गणेशमूर्तींखाली अडकला होता. मुळचा मराठवाडात राहणारा विठ्ठल गोविंद वलकले हा कामाच्या निमित्ताने कुपवाड रस्त्यावरील वसंतदादा सूतगिरणी परिसरात

रहात होता. सोमवारी तेथील मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत तो सहभागी होता. रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्या मंडळाच्या श्रींचे विसर्जन झाले. त्यावेळी तो नदीत उतरला आणि वाहून गेला, असे मंडळातील बालाजी वापनवाढ याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांकडून सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर त्याचा शोध सुरू होता. बुधवारी जीवरक्षकच्या जवानांना घाटानजीक त्याचा मृतदेह गणेशमूर्तींखाली आढळून आला. सांगलीतील या घटनेमुळे गणेश विसर्जन करतांना अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपन्यांना नाही ‘भविष्या’ची चिंता

$
0
0

भविष्य निर्वाह निधी देण्यास टाळाटाळ

Sanket.Lad@timesgroup.com

नोकरदारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) थकीत ठेवल्याप्रकरणी कोल्हापूर विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाअंतर्गत या वर्षी ऑगस्टअखेर २२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या वर्षी ऑगस्टपर्यंत थकबाकीची २० प्रकरणे निकालात काढण्यात आली असून १७ प्रकरणांमध्ये कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये कोल्हापूर पीएफ कार्यालयाने थकबाकी प्रकरणांमध्ये सुमारे साडेसात कोटी रुपयांची वसुली केली आहे.

कोल्हापूर पीएफ कार्यालयाचे विभागीय आयुक्त नीरज श्रीवास्तव म्हणाले, ज्या कंपन्या आपल्या नोकरदारांच्या पीएफ खात्याची थकबाकी ठेवतात, त्यांची चौकशी भारतीय दंडविधानाच्या ७-अ कलमान्वये करण्यात येते. मागील आर्थिक वर्षामध्ये थकबाकीची २३० प्रकरणे होती. याच कालखंडात ६० प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर ४२ प्रकरणांमध्ये पुढील कारवाई सुरू करण्यात आली. या वर्षात थकबाकीपोटी ७ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असून वर्षाअखेरीस ९३. ४१ लाख रुपयांची थकबाकी वसूल करणे बाकी होते. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत पाच महिन्यांत कंपन्यांकडून थकबाकीपोटी १ कोटी ३८ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. याच कालखंडातील ६.९१ लाखांची थकबाकी अद्याप मिळाली नसून १८.२५ लाखांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

पीएफ थकबाकीबाबत संबंधित कंपनीतील एखाद्या नोकरदाराने तक्रार केल्यास, तसेच पीएफ कार्यालयातील खाते विभागास याविषयी माहिती मिळाल्यास ही चौकशी सुरू करण्यात येते. एखादी कंपनी तोट्यात असल्यास नोकरदारांचे वेतन रखडल्याने, काही व्यवसाय बंद केल्यामुळे ही रक्कम जमा झालेली नसते. मात्र, काहींनी हेतूपुरस्सर पीएफ भरलेला नसतो. अशा कंपन्यांना नोटीस पाठवून त्यासंबंधी कारवाई करण्यात येते. पीएफ कापूनही तो खात्यात जमा केला नसल्यास संबंधित कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. संबंधित कंपनीची बँक खाते गोठवून, तसेच मालमत्ता ताब्यात घेऊन थकबाकीदारांची थकबाकी देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images