Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घरवापसीत गैर नाही

$
0
0

सेनेवरील टीका निरर्थक असल्याचा राऊत यांचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी या ​चिमण्यांनो परत या असे आवाहन केले होते. त्यामुळे सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या घरवापसीत काही गैर नाही. कोल्हापुरातही माजी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी पक्षात परतत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत असल्याची टीका निरर्थक आहे', अशी माहिती शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'जे निष्ठावंत आहेत, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात येईल' असे राऊत म्हणाले.

खासदार राऊत म्हणाले, 'शिवसेनेकडे हुशार व विकासाची जाण असलेल्या उमेदवारी मागितली आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार पटल्याने आणि त्यांचे नेतृत्व मानणारे माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. घरवापसीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. निष्ठावंत, निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली ​जाणार आहे. एकाच प्रभागात तीन ते पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी बंडखोरी करणार नसल्याचे सांगितले आहे. शिवसेना जो उमेदवार जाहीर करेल, त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मुलाखत देणाऱ्या उमेदवारांनी सांगितले आहे. सेनेत कोटा सिस्टीम नाही. हवसे, गवशांना उमेदवारी मिळणार आहे. आमच्याकडे निष्ठावंताची फळी आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. मंगळवारीही निलम गोऱ्हे यांच्यासह पदाधिकारी मुलाखती घेतील. इच्छुकांची यादी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात येईल. निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल.'

खासदार राऊत म्हणाले, 'कोणीही बंडखोरी करण्याचा प्रयत्न करू नये. पक्षाकडून योग्य व्यक्तींना संधी दिली जाईल. ज्याला संधी पक्ष देईल त्याच्या पाठीमागे इतर कार्यकर्त्यांनी आपली ताकद लावावी. अन्य पक्ष आम्हाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण शिवसेना स्वबळावर लढणार आहे. केंद्र आणि राज्यात शिवसेना व भाजपमध्ये समन्वय असल्याने तसा कोल्हापुरातही व्हावा असा आमचा प्रयत्न होता. मात्र त्याला यश आले नाही. त्यांनी आपमतलबी मताचे नाटक केल्याने आम्ही स्वबळावर लढणार आहे.'

मुश्रीफ सैरभैर झालेत

शिवसेनेवर आमदार हसन मुश्रीफ टीका करीत असल्याबद्दल विचारणा केली असता खासदार राऊत म्हणाले, 'मुश्रीफ हे सैरभैर झाले आहेत. ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी ते महाडिक यांच्यावरही घसरले होते. सैरभैर झाल्यामुळेच मुश्रीफ सध्या शिवसेनेवर टीका करीत आहेत. मात्र हा त्यांचा सगळा प्रयत्न स्वतःकडेच लक्ष वेधून घेण्यासाठी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेने घेतली माघार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या असल्या तरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र अजूनही निवडणूक लढवायची की नाही याच्या संभ्रमात आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत उत्सुक होती. मात्र पक्षाने सोमवारी वरिष्ठ स्तरावरून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढणार नसल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकला.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. मात्र या सगळ्यात मनसेच्या गोटात भलतीच शांतता दिसत आहे. ना कुणा नेत्याचा दौरा, ना कुठली सभा, ना इच्छुकांची चाचपणी. सगळ्याच पातळ्यांवर मनसेमध्ये शांतता असल्याने मनसे निवडणूक लढवणार की नाही इथपासून चर्चा सुरू होती. विधानसभा निवडणुकीआधी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. ठाकरे यांच्या सभेला कोल्हापुरात नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण या प्रतिसादाचे रुपांतर कोल्हापुरात मनसेची वाढ करण्यात झाली नसल्याचे दिसते. याचाच परिणाम कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीवरही दिसत आहे. इतर पक्षांनी उमेदवार निवड, वातावरण निर्मिती करण्यात आघाडी घेतली आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे कोल्हापूर दौरे सुरू आहेत. थेट उमेदवार निवडीतही वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आहे, मात्र एकमेव मनसेत सारे काही शांत आहे. पक्षाने वरिष्ठ स्तरावरूनच यावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला.

दुर्लक्ष होऊ नये म्हणून...

नाशिक महापालिकेतील सत्तेनंतर औरंगाबादमध्ये फटका बसलेला मनसे पक्ष कोल्हापूरबाबत मात्र उदासिन आहे. कोल्हापूरसोबत कदाचित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी कोल्हापूरची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मनसेमध्ये शांतता आहे. आमची पूर्वतयारी सुरू होतीे. पक्षनेत्यांकडून आदेश येताच यंत्रणा गत्मान होईल. महापालिकेसाठी २० ते २५ जागा लढवण्याचा विचार स्थानिक पदाधिका-यांचा होता.

- राजू दिंडोर्ले, जिल्हाध्यक्ष

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लढवण्याबाबत अजून स्पष्टता नाही. पक्षादेश आल्यानंतरच पुढील कार्यवाहीला सुरुवात होईल. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आमचा आग्रह आहे.

- संदीप मोझर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीषण अपघातात चौघे ठार

$
0
0

ट्रक-मोटारीची उदगावजवळ धडक; मृत नांद्रे, कर्नाळचे

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

उदगांव येथे ट्रक आणि मोटारीच्या भीषण अपघातात चौघेजण जागीच ठार झाले तर दोघेजण गंभीर जखमी झाले. सर्व मृत सांगली जिल्ह्यातील कर्नाळ व नांद्रे येथील तर जखमी मुंबईचे आहेत. मोटारीचा पुढील टायर फुटल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. शिवराज बाजीराव पाटील (वय ३०), कपिल विजय पाटील (वय २८), प्रवीण प्रकाश मोहिते (वय ३५, सर्व रा.कर्नाळ) अनंतकुमार शांतीनाथ खोत (वय ३५, रा.नांद्रे) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात संतोष गणू दैत्य (वय ३०, रा.१/१४ साईप्रसाद को ऑप सोसायटी भांडूप, मुंबई) व सचिन सोमा जामखंडेकर (रा. तांबेनगर मुलूंड वेस्ट) जखमी झाले आहेत.

अपघातातील तरूण महिंद्रा झायलो (एम.एच.०५ ए.एस. ८७४१) मधून रात्री दीडच्या सुमारास जयसिंगपूरहून कर्नाळकडे जात होते. याचवेळी चिकुर्डेतील शिवपार्वती रोडलाइन्सचा दुधाचा टँकर (एम.एच.१० बीआर १०१०) सांगलीहून जयसिंगपूरच्या दिशेने येत होता. उदगांव येथे मोटारीचा पुढील टायर फुटल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मोटारीच्या चालकासह चौघेजण जागीच ठार झाले. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जहाँगीर मुजावर यांनी जयसिंगपूर पोलिसांना तत्काळ घटनेची वर्दी दिली. घटनास्थळाचे चित्र विदारक आणि हृदय पिळवटून टाकणारे होते. कारमध्ये अडकलेले मृतदेह सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. जखमींना डॉ. सतीश पाटील यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत शिक्षिका ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

येथील संकेश्वर रोडसमोर मोटारसायकल आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात गडहिंग्लज येथील शिक्ष‌िका जागीच ठार झाली. येथील संकेश्वर रोडवर अर्बन बँकेसमोर हा अपघात झाला. फरहाद उर्फ फातिमाबेगम जल्लाउद्दीन पटेल (वय ४५, सिद्राम कॉलनी, संकेश्वर रोड, गडहिंग्लज) असे महिलेचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा असीम जल्लाउद्दीन पटेल हा जखमी झाला आहे. गडहिंग्लज पोलिसात ट्रकचालकाविरोधात अपघाताची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फरहाद या हसूरचंपू येथे शिक्षिका असून त्या कुटुंबांसोबत मार्केटयार्ड परिसरातील सिद्राम कॉलनी येथे राहतात. आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोटारसायकल (एमएच०९-डीझेड- ८६७३) वरून मुलगा असीम याच्यासोबत गाडीवरून जात होत्या. त्यावेळी गडहिंग्लजकडून संकेश्वरकडे जाणाऱ्या ट्रक (केए-२३-१९७६)शी त्यांच्या मोटारसायकलची जोराची धडक झाली. त्यामुळे त्या उडून पडल्याने ट्रकच्या मागील चाकात सापडल्या. फरहाद यांच्या पायावरून चाक गेल्याने शरीराचे दोन तुकडे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्य इतके हृदयद्रावक होते. मुलगा असीम आपल्या आईच्या मृतदेहाकडे हताशपणे पहात विमनस्क बसला होता. तर अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहारप्रकरणी जामीन नामंजूर

$
0
0

कुराडे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या अटकेची शक्यता

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

बहुचर्चित शिवाजी सहकारी बँकेतील अपहारप्रकरणी संचालकांसह २९ जणाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यावर झालेल्या सुनावणीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी २७ जणांचा अंतरिम जामीन फेटाळला. मात्र महिला संचालिका प्रेमला खोत व विजयमाला रणनवरे यांचा जामीन मंजूर करण्यात आला.

संशयिताना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. गडहिंग्लजच्या न्यायालयीन इतिहासात जामीन अर्जावर दीर्घकाळ चाललेली ही सुनावणी प्रतीक्षेनंतर रात्री आठ वाजता संपली.

१९९८ ते २०१० या कालावधीत शिवाजी बँकेतून बोगस कर्ज खाते, कर्जमाफीतील सवलतीत गैरव्यवहार तसेच अपहर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. संचालक व कर्मचाऱ्यांची नावे अशी सुधीर देसाई (जनरल मॅनेजर), आबासो देसाई, सुधाकर देसाई, कृष्णा कांबळे, गजानन कळेकर (सर्व शाखाअधिकारी), तुकाराम पाटील, सुनील मोकाशी, संजय कर्नेकर, विजय शिंदे, आप्पासो नार्वेकर( सर्व कॅशिअर), अरुण देसाई (वसुली अधिकारी), प्रमोद रणनवरे, बाबासो पाटील, दिलीप माने, तानाजी मोहिते, प्रकाश चव्हाण, किसन कुराडे, दत्ताजी नलवडे, बाजीराव देसाई, किरण कदम, बाळासो चव्हाण, भरत पाटील, संजय मोकाशी, चंद्रकांत कांबळे, गुरुनाथ पाथरवट, गोविंदराव देसाई, विष्णू शिंदे.

संबधितांनी ठेवतारण कर्ज अपहार (३४.९५ लाख), आयडीबीआय बँक अपहार (१ कोटी ५७ लाख), आंबेडकर सुतगिरणी अपहार (१ कोटी), आंबेडकर सुतगिरणी गैरव्यवहार (१ कोटी २१ लाख), रोख रक्कम अपहार (७.५० लाख), जिल्हा उद्योग केंद्र अपात्र अनुदान (२७१ लाख), ना देय प्रमाणपत्र अदा (१२ लाख), बोगस कर्ज (२१ व १७ लाख), सेविंग खाते अपहार (२ लाख), केंद्र शासन कर्जमाफी (३ कोटी ९० लाख), महाराष्ट्र शासन कर्ज माफी (८१ लाख), ताळमेळ अपहार (७० लाख) असे एकूण १३ कोटी ३१ लाख ३२ हजार रुपयांचा अपहार उघडकीस आला. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील तपास करीत आहेत. तर अॅड. पी. आर. देशपांडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. आरोपींतर्फे अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. रवींद्र तोडकर, अॅड. बी. बी. घाटगे, अॅड. सतीश इटी यांनी काम पहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करा‍वे आणि प्रमाणापेक्षा केवळ ३५ टक्के पर्जन्यमान झाल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव सरकारला सादर करण्याची मागणी करत जिल्हा परिषदेची सभा तहकूब करण्यात आली. जोरदार घोषणा देत सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. तहकूब सभा गणेशोत्सवानंतर घेण्याचे अध्यक्षा विमल पाटील यांनी जाहीर केले.

यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून सदस्यांना निधी मिळावा, असे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. सर्किट बेंच स्थापन करावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर बार असोसिएशनच्यावतीने कोर्ट बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आंदोलन केवळ बार असोसिएशनशी संबंधित नसून यामध्ये जिल्ह्याची अस्मिता जोडली आहे.

यामुळे वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सदस्य अरुण इंगवले यांनी आवश्यकता व्यक्त करत सभा तहकूब करण्याची मागणी केली.माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले म्हणाले, 'सर्किट बेंच जिव्हाळ्याचा विषय असला तरी, अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. डोंगराळ तालुक्यातील वाड्या-वस्त्या आणि गावातील पिके पूर्णपणे पावसाअभावी कोमेजून गेली आहेत.

त्यामुळे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.' धैयर्शील माने यांनी जिल्ह्यात पाणीटंचाई भासत असताना सभागृहात मिनरल वॉटर न देता जिल्हा परिषदेतील पाणी द्यावे अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरू असलेल्या संपूर्ण कर्जमाफी आंदोलनाला पाठिंबा देण्याची मागणी केली.

उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेला निधितील रक्कम आमदार, खासदार यांनी नेली असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर सभाध्यक्षांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर करत गणेशोत्सवानंतर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. सभा तहकूब झाल्यानंतर सर्व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सदस्यांच्या हक्काच्या निधीवर गदा आणली असल्याने विकासकामे कशी करायची, अशा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सैनी यांनी याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सीईओ अविनाश सुभेदार, सदस्य अर्थ व शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, राहुल देसाई, समाजकण्याण सभापती किरण कांबळे, भाग्यश्री पाटील, महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

निधी जाहीर

सामाजिक उत्तरदायित्वानुसार इंडसइंड बँकेने जिल्ह्यात एक कोटीचा निधी खर्च केला आहे. इंडसइंड बँकेप्रमाणेच कॅनरा, युनियन बँकेसह आणखी दोन बँकांनी दोन लाखांपासून पाच लाखांचा निधी जाहीर केला आहे. बँकांनी सीएसआर योजनेतून दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे.

अधिकाऱ्यांचा सत्कार

इंडसइंंड बँकेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या ३१ शाळांत एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून स्वच्छतागृह व पाणीपुरवठ्याचे साधन उपलब्ध करुन दिले आहे. बँकेच्या सामाजिक कार्याबद्दल बँकेचे क्षेत्रीय अधिकारी सतीश शहा व शाखा व्यवस्थापक संदीप जानकर यांचा अध्यक्षा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत व्यक्तींनाही लाभ

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सरकारच्या विविध योजनांचा फायदा करून घेण्यासाठी गावचे स्थानिक नेते, सरकारी नोकर, एजंट आणि मोठ्या नेत्यांनी अक्षरश: रॅकेट चालवून कराचा पैसा आपल्या बाजूला वळवून केवळ बगलबच्च्यांचा फायदा करून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दारिद्रयरेषेखालील यादीत नसताना नाव बसवणे, वार्षिक २१ हजारांच्या आतील उत्पन्न दाखवणे, वयाचे खोटे दाखले बनवणे आणि यापुढेही जाऊन एका महिलेला दुसऱ्याची पत्नी दाखवून लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. कळस म्हणजे अनुदान देण्याची 'बायोमेट्रिक' पद्धत असताना मृत लाभार्थ्यांनीही नोव्हेंबर २०१४ पर्यंत योजनेचा लाभ घेतला आहे. अशा परिस्थितीत अपात्र शोधले, पण बोगसगिरी करून सरकारी तिजोरी लुटली त्याचे काय? याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही.

'महाराष्ट्र टाइम्स'ने याबाबत उपलब्ध पुरावे माहिती अधिकार कायद्यानुसार कागल तालुक्यातील मळगे खुर्द गावात लाभार्थ्यांची चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक प्रकार उघडकीस आले. याची गंभीर दखल घेऊन झालेल्या चौकशीत जिल्ह्यात १७ हजार ५४४ लाभार्थी अपात्र ठरवले आहेत. ही तपासणी निष्पक्षपाती होण्यासाठी एका तालुक्यातील अधिकारी दुसऱ्या तालुक्याला वापरण्यात आले. या तपासणीत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्षदर्शी माहिती घेतली. ज्यामध्ये लाभार्थ्याचे नाव, धारण केलेले शेती क्षेत्र, झालेली सुधारणा, त्यांच्या घरची सांपत्तिक स्थिती आणि मुलांचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त आहे का? एवढ्याच बाबी तपासण्यात आल्या. तसेच खात्रीसाठी लाभार्थ्याची सही घेतली.

ज्या ग्रामसेवकांनी दारिद्रयरेषेत नसताना असल्याला दाखला दिला, लाभार्थी मृत असतानाही ठसे जुळणे आवश्यक असताना अनुदान उचलले आणि उत्पन्न जास्त असतानाही कमी उत्पन्नाचा दाखला दिला, तसेच वय ४० असतानाही त्याला तालुक्याबाहेर जाऊन ६५ वर्षांचा दाखला वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीमंत असतानाही कुणाची तरी पत्नी कागदोपत्री कुणाची तरी आई दाखवून पेन्शन उचलली त्यांच्यावरील कारवाईचे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. खऱ्या लाभार्थ्याला जाणीवपूर्वक वगळून केलेल्या या बोगसगिरीने कराचा पैसा आणि सरकारी तिजोरीची लूटच केली आहे.

जिल्ह्यातील अपात्र लाभार्थी संख्या

तपासणीनुसार अपात्र लाभार्थ्यांची संख्या कोल्हापूर उत्तरमध्ये २०८, कोल्हापूर दक्षिणमध्ये ३ हजार ५११, करवीरमध्ये ३ हजार १०९, कागलमध्ये ३ हजार ६२५, पन्हाळ्यात ३८९, शाहूवाडी १०३, हातकणंगले १ हजार २१९, इचलकरंजी शहर ४१०, शिरोळ ६३०, राधानगरी २२०, भुदरगड २ हजार ८७२, गगनबावडा ५०, गडहिंग्लज ६८४, आजरा ३२५ आणि चंदगड १८९ असे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धशिल्प बनणार प्रेरणा केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगवान गौतम बुद्धांची शिकवण, त्यांनी मानव जातीला दिलेला संदेश, त्यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग यावर आधारित बुद्धशिल्प सदर बाजार परिसरात साकारले आहे. फायबरच्या माध्यमातून म्यूरल्सची निर्मिती केली असून, त्यामुळे सदर बाजार परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. कोल्हापुरात नवीन प्रेरणा केंद्र म्हणून बुद्ध शिल्प विकसित होणार आहे. या शिल्पाकृतीच्या परिसरात बगीचा, अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. गोलाकार आकारातील या शिल्पकृतीची लांबी ५५ फूट, आणि उंची सहा फूट आहे.

बुद्धशिल्पाचा लोकार्पण सोहळा रविवारी झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात भगवान बुद्धांच्या म्यूरल्सची निर्मिती केली आहे. आर्किटेक्ट मोहन वायचळ यांनी बुद्धशिल्पाचे डिझाइन केले आहे. स्थानिक मूर्तिकार किशोर पुरेकर यांनी म्यूरल्स घडविले आहेत. बुद्धशिल्प निर्मितीची संकल्पना नगरसेवक राजू लाटकर आणि प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती महेश जाधव यांची आहे. स्थायी सभापती असताना लाटकर यांनी बुद्धशिल्पासाठी २२ लाख रुपयांची तरतूद केली होती. याविषयी पुरेकर म्हणाले, 'शिल्पामध्ये बुद्धांच्या जीवनातील निवडक प्रसंग मांडले आहेत. सदाचरण, चारित्र्य, समृद्धीचे प्रतीक दर्शविण्यासाठी रंगाच्या शेड्स दिल्या आहेत.'

खासदार महाडिक, मुश्रीफ यांची निधीची ग्वाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकसित करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी दहा लाख रुपये, तर आमदार हसन मुश्रीफ यांनी तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. नगरसेवक लाटकर व जाधव यांनी बगीचा विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

म्यूरल्सची बनविताना त्यावर धूळ, ऊन, पावसाचा परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यासाठी कोटिंग केले आहे. प्रेरणा केंद्र म्हणून बुद्धशिल्प विकसित होणार आहे. परिसरात बगीचा तयार केला जाणार असून येथे अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू होणार आहे. बुद्धशिल्पमुळे सदर बाजार, विचारेमाळ परिसराची ओळख बदलणार आहे.

- महेश जाधव, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साळोखे, पार्टे, इंगवलेंची सेनेकडे मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सुरू असलेल्या मुलाखतींसाठी मंगळवारीही इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती. माजी महापौर उदय साळोखे, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांची सून प्रणाली, प्रज्ञा अजित इंगवले आदींनी सेनेकडे उमेदवारी मागितली आहे. मुलाखतीचा अहवाल कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी दिली.

सोमवारपासून शिवसेनेच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस प्रारंभ झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यत पहिल्या ४५ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत, आमदार सुनील मोरे यांनी घेतल्या. मंगळवारी सकाळपासून महापालिकेसमोरील सेनेच्या निवडणूक संपर्क कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती दुधवडकर यांनी घेतल्या. यावेळी तटाकडील तालीम प्रभागात जनसुराज्यचे माजी उपमहापौर उदय साळोखे यांनी उमेदवारी मागितली. साळोखे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. फिरंगाई मतदारसंघात प्रज्ञा अजित इंगवले आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम यांची कन्या भाग्यश्री उमेश जाधव यांनी सेनेकडून निवडणूक लढविण्याची इच्छा दर्शवली.

शिवसेनेचे माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्या सून प्रणाली यांनी तिकीट मागितले आहे. माजी नगराध्यक्ष वसंतराव निगडे यांचे चिरंजीव उदय यांनी दुधाळी प्रभागासाठी मुलाखत दिली.

माजी नगरसेवक दत्ताजी टिपुगडे यांनी संभाजीनगर बसस्थानक, नगरसेविका रेखा राजेंद्र पाटील यांनी फुलेवाडी तर त्यांचे पती राजेंद्र यांनी रंकाळा तलाव प्रभागात उमेदवारी मागितली आहे. फुलेवाडी प्रभागातून माजी नगरसेवक किरण दरवान यांच्या पत्नी सुनीता यांनी मुलाखत दिली. ​नगरसेवक राजू हुंबे यांच्या पत्नी सुनीता यांनी सम्राटनगर प्रभागातून उमेदवारी मागितली आहे.

मुलाखतींवेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, ​जिल्हा महिला आघाडी प्रमुख शुभांगी साळोखे उपस्थित होत्या.

आर्थिक ताकद किती?

शिवसेनेच्यावतीने इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेताना प्रश्न विचारण्यात आले. पक्षाचे सदस्य कधी झाला, सामाजिक कार्य, पक्षाच्या आंदोलनातील सहभाग याबाबत प्रश्न विचारून गुण देण्यात आले. तसेच निवडणूक लढवताना उमेदवाराची ​आर्थिक ताकद किती आहे असा प्रश्नही विचारला जात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांचे ‘एकला चलो रे’

$
0
0

Sagar.Yadav@timesgroup.com

कोल्हापूरः यंदा महापालिकेच्या निवडणूकीच्या धामधूमीतच गणेशोत्सव आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या कामात बहूतांशी कार्यकर्ते गुंतल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 'एकला चलो रे' पद्धतीचा प्रचार करावा लागत आहे. अनंत चतुर्थीपर्यंत किमान दहा दिवस तरी उमेदवार आणि त्यांच्या कुटूंबियांना प्रचाराची भूमिका सांभाळावी लागत आहे. निवडणूकीचा खरी रंगत गणेशोत्सवानंतरच पाहायला मिळणार असल्याने त्यानंतरच्या हातघाईच्या प्रचारासाठी उमेदवारांनी तयारी चालविली आहे.

सर्व जाती धर्मियांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसांत होत आहे. गणरायाच्या आगमणानाची जय्यत तयारी घरोघरी आणि सार्वजनिक तालीम मंडळांकडून सुरु आहे. बहूतांशी तरुण कार्यकर्ते गणेशोत्सवात गुंतल्याने मनपा निवडणूकीच्या प्रचाराकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या गराड्यात दिसणारे उमेदवार एकएकटे फिरताना दिसत आहेत.

उमेदवारांनी आपल्या नियोजनानुसार प्रभागात प्रचाराचे वेळापत्रक आखले आहे. त्यानुसार मतदारांच्या भेटीगाठीचे नियोजन सुरु आहे. गणेशोत्सवामुळे प्रचारासाठी सोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या रोडावली आहे. यामुळे उमेदवाराला नियोजीत वेळापत्रकानुसार प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी आपल्या कुटूंबीयांची मदत घ्यावी लागत आहे. तर अनेकांना प्रचाराच्या नियोजनात बदल करावा लागला आहे. गणेशोत्सव काळात बहूतांशी युवावर्ग गणेश मंडळातच भेटणार असल्याने उमेदवारांनी तालीम मंडळांच्या भेटी गाठीचे नियोजन केले आहे. प्रभागातील एकूण मंडळांच्या एकूण संख्येनुसार सकाळी व संध्याकाळच्या सत्रात आरतीला जाण्याचे बहूतांशी उमेदवारांचे नियोजन आहे. मंडळाना वर्गणीच्या पावतीसह भेटण्याची अनेकांनी तयारी केली आहे.

उमेदवारांच्या घरच्यांनीही गणेशोत्सव कालावधीत घरोघरी गणेश दर्शन आणि हळदीकुंकू यासह कार्यक्रमांना उपस्थिती लावून प्रचाराची यंत्रणा राबविली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेत बदल झाला असला. तरी गणेशोत्सवानंतर सुरु होणाऱ्या धडाकेबाज प्रचाराची तयारी सध्या सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा कारखान्यावर कोंडिग्रेत छापा

$
0
0

जयसिंगपूर : कोडिंग्रे (ता. ‌‌शिरोळ) येथे गुटखा कारखान्यावर छापा टाकून जयसिगपूर पोलिसांनी गुटखा पॅकिंग मशीन, अन्य मुद्देमाल व सहा परप्रांतीयांसह १० जणांना ताब्यात घेतले.

सहा लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी विलास जमदाडे (रा. हरीपूर, जि. सांगली), गोविंद कुबडगे (रा. हरीपूर) कुमार कचरे (कोंडिंग्रे), हुसेन कोतवाल (निमशिरगाव), मुकेश कडवा, गणेश भानावत, विष्णू भानावत, पुनाराम गोरन, रामनिवास गोरन, (सर्व राजस्थान) राज‌सिंग अनुरागी (उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. मंगलनगरमध्ये गुटखा कारखान सुरू असल्याची माहिती जयसिंगपूरचे उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांना मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगावात कमळ फुलणार

$
0
0

खासदार संजय पाटील यांची मोर्चेबांधणी

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावातील राजकीय घडामोडीनी प्रचंड वेग घेतला आहे. राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर नगराध्यक्ष झालेले काँग्रेसचे एकमेव नगरसेवक संजय पवार यांच्यावर खासदार संजय पाटील गटाने अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, अविश्वास ठराव मंजूर होण्याची चिन्हे दिसताच पवार यांनी राजीनामा दिला आहे. खासदार संजय पाटील यांनी तासगाववरची आपली मांड भक्कम करताना राष्ट्रवादीच्या काहींना थेट भाजपमध्ये प्रवेश देऊन तर काहींना तात्पुरते पाठीराखे म्हणून आपल्याकडे खेचल्याने तासगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तासगाव नगरपालिकेतील एकूण १९ सदस्यांपैकी १६ जण राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. दोन अपक्षांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यपद घेतले आहे तर काँग्रेसचा एकमेव सदस्य आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर पालिकेत राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. पण, त्यावेळीही राष्ट्रवादीतही आबा-काका अशी उभी फुट असलेली गटबाजी होतीच. याचाच फायदा होऊन कॉँग्रेसचा एकमेव सदस्य नगराध्यक्षपदी बसला होता. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर खासदार गटाचे सहा जण भाजपवाशी झाले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला आणखी गळती लागली. तीन जण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले. त्यामुळे नगराध्यक्ष बदला, या मागणीला जोर आला होता. खासदार गटाने अविश्वास ठरावाची तयारी सुरू केली होती. अविश्वास ठरावासाठी १४ सदस्यांची गरज होती. सोमवारी खुद्द खासदार संजय पाटील हेच पालिकेत आल्याने अविश्वासाच्या ठरावावर स्वाक्षरी करणारांची संख्या थेट १६ वर गेल्याने काम फत्ते झाले. जिल्हाधिकाऱ्यांकडे ठराव दाखल करण्यासाठी १६ जण सांगलीला धावले. त्यांचा ठराव दाखल होतो न होतो तोच नगराध्यक्ष पवार आपला राजीनामा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर झाले.

मुख्यमंत्री तासगाव दौऱ्यावर

काही विकास कामांच्या उद्घाटनाच्या आणि काही कामांच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच तासगावच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच तासगावातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उरले सुरले राष्ट्रवादीवाले नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरीवर ‘दामिनी’ची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट असल्याने विजेचा जपून वापर करावा लागणार आहे. कोयना धरणातील पाणीसाठा कमी असल्याने संभाव्य वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर विजेची बचत हीच विजेची निर्मिती या मूलमंत्राचा वापर करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच वीजचोरी आणि विजेचा अपव्यय टाळण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान महावितरणच्या दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे.

उत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांचा वीज वापर प्रचंड वाढतो. त्यामुळे महावितरणला अतिरिक्त वीज उपलब्ध करुन द्यावी लागते. महावितरणने यंदा वाढीव आणि अखंडित वीज सेवेची तयारी केली आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयातील २५ अभियंता आणि २५० कर्मचारी कार्यरत आहेत. अखंडित पुरवठ्यासाठी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १०६४ मेगावॅट विजेची गरज असते. सणासुदीच्या काळात अतिरिक्त तीन ते चार मेगावॅटची गरज असते.

घरगुती वापरापेक्षा कमी दराने मंडळांना वीज देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मंडळांनी अधिकृत जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जोडणी, विजेचा अपव्यय, वीज चोरी आणि दक्षता यांबाबत गणेश मंडळांचे उद‍्बोधन करण्यासाठी महावितरणने दामिनी पथक स्थापन केले आहे. एका महिला अधिकाऱ्यासह सहा कर्मचाऱ्यांचे पथक गणेश मंडळांवर नजर ठेवणार आहे. वीजचोरी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

अधिकृत जोडणी घेताना

गणेश मंडळांनी अधिकृत जोडणी घेताना ए-१ प्रपत्र भरावे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि अधिकृत वीज कंत्राटदाराकडून टेस्टिंग रिपोर्ट घेऊन महावितरणकडे सादर करावा. एक हजार रुपये सुरक्षा ठेव आणि प्रति जोडणी २९० रुपये महावितरणकडे भरावेत. यानंतर तीन दिवसांच्या आत पुरवठा सुरू होईल. घरगुती वीज दर ४ ते ८ रुपये प्रति युनिट आहे. मात्र गणेश मंडळांसाठी ३ रुपये ७१ पैसे दराने वीज मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वरूप यांचा राजीनामा घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ताराराणी आघाडीशी संबंध नसल्याचे आमदार महादेवराव महाडिक सांगतात. तसे असेल तर तुमचे चिरंजीव स्वरूप आघाडीचे अध्यक्ष कसे काय? त्यांचा राजीनामा का घेत नाही, अशी विचारणा मी केली आहे,' असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कोल्हापूर स्मार्ट सिटी केल्यास काँग्रेस निवडणुकीतून माघार घेईल, असेही आव्हानही पाटील यांनी दिले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारपासून सुरू झाल्या. काँग्रेस कमिटीत आयोजित मुलाखतीला ​आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित नव्हते. या संदर्भात विचारणा केली जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत यापूर्वी बैठक झाली होती. त्या बैठकीत आमदार महाडिक यांनी काँग्रेससोबत असल्याची ग्वाही दिली आहे. मालोजीराजे यांनीही काँग्रेस सोडून काही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीत सक्रीय व्हायचे की अलिप्त राहायचे याबाबत अजून त्यांचा निर्णय व्हायचा असल्याचे समजते.'

आमदार महादेवराव महाडिक काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र ते निवडणूक प्रक्रियेत नाहीत. त्यांचे चिरंजीव स्वरूप ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आहेत. याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, 'आमदार महाडिकांना सूचना दिल्या आहेत. ताराराणी आघाडीशी तुमचा संबंध नसेल तर मुलगा आघाडीचा अध्यक्ष कसा काय? त्यांचा राजीनामा घ्या अशी स्पष्ट सूचना केली आहे.'

स्मार्ट सिटी केल्यास काँग्रेसची माघार

महापालिकेची सत्ता आणि स्मार्ट सिटीचा सुतराम संबंध नाही. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा देणे न देणे ही सर्वस्वी केंद्र सरकारच्या अखत्यारितील बाब आहे. भाजप आणि महायुतीचे नेते, सत्ता द्या, कोल्हापूरला स्मार्ट सिटी बनवू, असे आमीष दाखवून जनतेची दिशाभूल करत आहेत. हिम्मत असेल तर भाजपने निवडणुकीआधी कोल्हापूरचा समावेश स्मार्ट सिटीत करावा, तसे झाल्यास काँग्रेस निवडणुकीतून माघार घेईल, असे जाहीर आव्हानही जिल्हाध्यक्ष पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिले. वर्षभरात एकाही आश्वासनाची पूर्तता भाजपने केली नाही. भाजपच्या नेत्यांत तशी धमकही नाही, असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी करतेय हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील इतर अनेक वर्दळीच्या रस्त्याप्रमाणेच बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्यावर अनेक अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या, नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे इतर रस्त्यांप्रमाणेच बिंदू चौक ते दसरा चौक रस्त्यावरील वाहतुकीची समस्या बिकट बनली आहे.

पूर्वी शहराची सीमा (वेस) असणारा बिंदू चौक आज शहरातील मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, खासबाग कुस्ती मैदान या पर्यटन स्थळांबरोबरच लक्ष्मीपुरी, शाहूपुरी अशा व्यापारपेठांनी आणि जुन्या काळापासूनच्या दाट लोकवस्तीने व्यापलेला हा भाग आहे. यामुळे मुळातच या परिसरात लोकसंख्याची घनता अधिक आहे. शिवाय गोरगरीबांचा जुना बाजार, मटण मार्केट, धान्य व्यापार, लुगडी ओळ, कोंडाओळ, शिवाजी रोड, बकरी बाजार, कोंबडी बाजार आदींना जोडणारा हा परिसर आहे. किंबहुना बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्याच्या दुतर्फा हे बाजार वसले आहेत. यामुळे सहाज‌िकच या परिसरात कायम गर्दी असते. विविध हॉटेल्स, टॉकीज यामुळे यात अधिकच भर पडते.

या सर्व कारणांमुळे बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळते. या वर्दळीला अनेक कारणांनी अडथळे निर्माण होतात. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारचे व्यावसायीक असल्याने तेथे खरेदीसाठी सतत गर्दी असते. शिवाय या रस्त्यावर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने लोक रस्त्यावरच वाहने उभे करतात. दुकान गाळ्यातील व्यापाऱ्यांशिवाय ‌किरकोळ विक्रेते, फेरीवाले, भाजीविक्रेते यांचीही रस्त्याच्या दुतर्फा दुकाने मांडलेली असतात. या रस्त्यावर काही ठिकाणी फुटपाथ आहे. मात्र त्याचेही अस्तित्व असून नसल्या सारखे आहे. फुटपाथ म्हणजे विविध प्रकारच्या वस्तू ठेवण्याचे ठिकाण बनले आहे. बिंदू चौक ते दसरा चौक या मुख्य रस्त्याला शिवाजीरोड, बकरी बाजार, कोंबडी बाजार, जुना बाजार, लक्ष्मीपूरी लुगडी ओळ, कोंडा ओळ असे अनेक उपरस्ते येवून मिळतात. यातील काही रस्ते एकेरी (वन वे) आहेत. मात्र लोकांकडून या नियमाचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढच होत आहे. मुख्य रस्त्यावर दुभाजक नसल्याने वाहतूक कोंडीत वाढच होते.

एकेरी मार्ग, पार्किंग यासारख्या वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी व्हावी. फूटपाथ, डिव्हायडर (दुभाजक) सारख्या गोष्टींचा वापर झाल्यास वाहतुकीला शिस्त लागेल.

- दीपक खांडेकर, व्यावसायिक

बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्यावरील पार्किंगला शिस्त लागणे गरजेचे आहे. यासाठी वाहतूक शाखेकडून नियोजन गरजेचे आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

- किशोर पाडळकर, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे हत्येप्रकरणी एकाला अटक

$
0
0

सनातनच्या समीर गायकवाडला अटक

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर


कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता आहे. तो गेल्या १७ वर्षापासून सनातन संघटनेसाठी कार्यरत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पानसरेंच्या हत्येप्रकरणी सात महिन्यांनी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. समीर विष्णू गायकवाड (वय ३२ वर्ष) असं या आरोपीचं नाव आहे. तो सांगलीतील मोती चौक परिसरातील राहणारा आहे. पोलिसांनी त्याला कोल्हापुरातील कोर्टात हजर केलं. आरोपी गायकवाडला कोर्टाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गायकवाडच्या चौकशीसाठी १४ दिवसांची रिमांड पोलिसांनी मागितली होती.

पोलिसांनी पहाटे साडेचार वाजता कारवाई करत सांगली शहरातून आरोपी समीर गायकवाडला अटक केली. कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त मोहीमेतून ही अटक करण्यात आली. आरोपी समीर गायकवाडला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी सुमारे दोन कोटी फोन कॉल्स तपासले. त्यानंतर पोलिसांना समीर गायकवाडवर संशय आला आणि त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. तो पानसरेंच्या हत्येत सहभागी असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी समीर गायकवाडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास आता पोलिस करत आहेत.

समीर गायकवाड सनातनचा कार्यकर्ता

पानसरेंच्या हत्येत थेट किंवा अप्रत्यक्ष सहभगाच्या संशयावरून समीर गायकवाडला अटक केली आहे. सर्व तांत्रिक सर्वेक्षणाच्या आधारावर ही अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेने काही धागे मिळाले आहेत. गायकवाडची अटक म्हणजे केस उलगडली आहे, असं होत नाही. समीर मोबाइल रिपेरिंगचं काम करतो. त्याचा हिंदू राष्ट्र सेनेशी संबंध नाही. सनातन संघटनेत काम करतो. त्यांचं संपूर्ण कुटुंब १९९८ पासून सनातनशी संबंधीत आहे. आरोपी समीर गायकवाड हा १९९८ पासून संघटनेत पूर्ण वेळ काम करतोय. त्याच्या कुटुंबातील काही जण गोव्यातील आश्रमात सदस्य आहेत. - संजयकुमार, पोलीस महानिरीक्षक

कशी झाली पानसरेंची हत्या?

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ ला हल्ला करण्यात आला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी ते राहत असलेल्या सागरमळा परिसरात दोन बंदुकीतून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा गंभीर जखमी झाले होते.

गोविंद पानसरेंवर सुरूवातीला कोल्हापुरातच उपचार करण्यात आले. पण नंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात आलं. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी २० फेब्रुवारीला गोविंद पानसरेंचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाड निर्दोषः सनातन संस्था

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या समीर गायकवाड याच्या मदतीसाठी सनातन संस्था धावून आली आहे. समीर गायकवाड हा निर्दोष असल्याचं सांगत त्याच्यावरील सर्व आरोप संघटनेने फेटाळून लावले आहेत.

पानसरे हत्या प्रकरणात सनातनला गोवण्यात येतंय. सनातनला रोखण्याचं काम याआधीही झालं आहे. समीर गणपतीसाठी गेलेला असताना त्याला अटक करण्यात आली आहे. सनातन संस्था समीरच्या पाठिशी आहे. समीर गायकवाड हे आमचे साधक आहेत. त्याचे संपूर्ण कुटुंब आमचे साधक आहे. त्यामुळे गायकवाड यांच्या कायदेशीर मदतीसाठी सनातन प्रयत्न करणार, असं सनातन संस्थेचे प्रवक्ते संदीप शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, आरोपी समीर गायकवाडच्या घरी पोलिसांनी झाडाझडती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३० खाणमालकांना ८९ कोटींचा दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील वडगाव हवेली, संजयनगर-शेरे, पाडळी-केसे, सुर्ली, शेणोली, नांदलापूर येथील सह्याद्री पर्वत रागांच्या डोंगरांमध्ये दगड खाणी काढून त्यामध्ये बेकायदा तब्बल पाऊणे चार लाख ब्रास दगडांचे (डबर) उत्खनन केल्याप्रकरणी तालुक्यातील ३० दगडखाण मालकांना एकूण ८९ कोटी ४६ लाख ४२ हजार रुपयांच्या दंडाच्या नोटिसा येथील तहसीलदार कार्यालयाने बजावल्या आहेत. मात्र, तब्बल पाऊणे चार लाख ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होईपर्यंत तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना याचा मागमूसही कसा लागला नाही. संबधितांवर कारवाई करण्यास विलंब करण्यामागे काय गौडबंगाल आहे, या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

दरम्यान, तब्बल पाऊणे चार लाख ब्रास दगडांचे (डबर) उत्खनन होईपर्यंत येथील तहसीलदार व प्रांताधिकारी गांधारीच्या भूमिकेत का राहिले, याची वरीष्ठ पातळीवरून विभागीय चौकशी होऊन त्याच्यावरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कराड तालुक्यातील ३० दगडखाण मालकांनी बेकायदा खाणीतून डबर(दगडां)चे उत्खनन केल्याची बाब येथील महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आली नाही. मात्र, या बाबत येथील काही निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींच्याकडून वारंवार तक्रारी होऊ लागल्यामुळे अखेर मलिदा खाऊन गारद झालेले महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका सोडत कारवाईचे नाटक सुरू केले. कागदी घोड्यांचा भाग म्हणून महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई करत केवळ दंड भरण्याबाबतच्या नोटीसा बजावल्या आहेत. यातून नेमका किती आणि केव्हा दंड वसूल होणार यापेक्षा इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन होत असतानाही, संबंधित महसूल विभाग आंधळ्याचे सोंग घेऊन गप्प का होता, या बाबत येथे आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच कारवाई होण्यापूर्वी लाखोंची डबर विकून मालामाल झालेले हे खाणसम्राट आता काही हजारांचा दंड भरून स्वत:ची सुटका करूनही घेतील, पण यामुळे सरकारने आणि पर्यावरणाचे झालेले नुकसान कसे भरून निघणार? कोणीही लाखोंची कमई करेल व हजारांत दंड भरून दगडाखालचा हात काढून घेईल, ही प्रवृत्ती थांबण्यासाठी महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी काही कारवाई करणार का?असे प्रश्न विचारले जावू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस लाखांचा गांजा जप्त

$
0
0

कुपवाड : जत पोलिसांनी जत तालुक्यातील शेड्याळ येथे कारवाई करत चाळीस लाख रुपयांचा ओला गांजा पकडल्याची माहिती बुधवारी जिल्हा पोलिस प्रमुख सुनील फुलारी यांनी सांगलीत पत्रकारांना दिली. या प्रकरणी शेतमालक ज्ञानोबा जाधव याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे आणि जतचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने तालुक्यातील शेड्याळ येथे कारवाई करताना ऊसाच्या पिकात असलेली सुमारे चार एकरातील गांजाची शेती उघडकीस आणली. पाच्छापूर येथे राहणारा ज्ञानोबा जाधव याची शेड्याळ गावच्या हद्दीत शेती आहे. त्या शेतील ऊसात त्याने लावलेली आठ फूट उंचीची १९० गांजाची झाडे मिळाली. याचे वजन सुमारे चारशे किलो असून, त्याची किमत सुमारे चाळीस लाख रुपये असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. गांजाची शेती सापडलेला परिसर कर्नाटक सीमेलगत आणि तसा दुर्लक्षित परिसर आहे. याचाच फायदा घेऊन तेथील लोक गांजाची शेती करत असावेत, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयावर आरपीआयचा मोर्चा

$
0
0

कोल्हापूरः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटातर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांच्या अनेक मागण्या राज्यसरकारसह केंद्र सरकारकडेही प्रलंबित आहेत. वारंवार निवेदने देऊनही याबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी धढक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संखेने आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे बंद झालेले अनुदान पूर्ववत सुरू करावे, केशरी रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे, बांधकाम कामगारांना वैद्यकीय आरोग्य विमा योजना सुरू करावी आदी मागण्याचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images