Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नवीन अध्यादेश पथ्यावर

$
0
0

अद्यादेशातील बदलांमुळे राजकारण्यांचे फावले

म. टा. प्रतिनीधी, कोल्हापूर

दरवर्षी काही लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे, त्यांची मुले कमावती होणे, मयत होणे, स्थलांतरित होणे अशा विविध कारणांनी लाभार्थी संख्या कमी व्हायलाच पाहिजे, असे सरकारला अपेक्षित आहे. यासाठी लाभार्थ्यांची तपासणी, सुनावणी घेणे आणि याद्यांचे ग्रामसभेत वाचन आणि आपल्या पातळीवरच लाभार्थी अपात्र करणे असे मुद्दे सरकारने आधीच्या अध्यादेशात नमूद केले आहेत. परंतु नवीन अध्यादेशानुसार सरकारने राबवलेल्या शोधमोहिमेतील लाभार्थ्यांचा पात्र-अपात्रचा अंतिम निर्णय विद्यमान समितीलाच असल्याने हे अपात्र आमच्यामुळेच पात्र झाल्याचे दाखवून व्होट बँक सांभाळण्यासाठी राजकीय आटापिटा सुरु आहे.

ऑगष्ट २०१५च्या अध्यादेशानुसार केवळ तपासणी करण्याचे अधिकार महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. वैयक्तिक तक्रार असेल, ठसे जुळण्याची अडचण असेल तरच सुनावणी घ्या आणि सोशल ऑडीट पूर्ण करा, असे सांगण्यात आले. परंतु, आता जे ऑडीट झाले ते जुन्या अध्यादेशाप्रमाणे झाल्याने महसूल विभागाने आताच्या अध्यादेशावर 'मार्गदर्शन' मागवले आहे. २६ ऑक्टोबर २०१०च्या जुन्या अध्यादेशानुसार 'फिजीकल व्हेरिफिकेशन' करुन ग्रामसभेसमोर अपात्र व पात्र लाभार्थ्यांचे वाचन करणे बंधनकारक होते. ५ डिसेंबर २०१२ नुसार वैयक्तिक तक्रारी असतील तरच सुनावणी घ्या, असे आदेश असून त्यावर समिती निर्णय घेईल असे सुचवले आहे. या अध्यादेशांचा फायदा घेऊन कागलमध्ये ही सुनावणी बेकायदेशीर आहे. गरिबांची थट्टा थांबवा, कुणाचीही पेन्शन बंद होऊ देणार नाही, अशा वल्गना विद्यमान आणि माजी समिती अध्यक्षांकडून करण्यात आल्या. हा वाद पालकमंत्री पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यापर्यंत गेला.

जिल्ह्यात कागल, गडहिंग्लज, इचलकरंजी, आजरा आणि हातकणंगले या पाच तालुक्यांतच्या योजनांच्या नवीन समित्या गठीत झाल्या आहेत. साहजिकच समितीला अधिकार आल्याने जुन्या लाभार्थ्यांच्या मंजुरी केल्या आहेत, असे सांगत हा श्रेयवाद रंगला आहे. कारण या तपासणीत कुठेही बोगस करणाऱ्यांना आणि लाभ घेतलेल्यांना शिक्षेची कोणतीही तरतूद नाही. शिक्षा होऊ शकते मात्र त्यासाठी वैयक्तिक तक्रार देणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून अशी एकही तक्रार आली नसल्याचे उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

अधिकाऱ्याला दोषी ठरायचे तरी कसे?

या योजनेच्या मंजुरीसाठी महत्वाचा असणाऱ्या वयाच्या दाखल्यासंदर्भात एका वैद्याकीय अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे वयाचा दाखला देण्यासंदर्भात कोणतेही ठोस नॉर्मस् नाहीत. अंदाजे दाखला द्यावा लागतो. अन्यथा बोन्सचे एक्सरे हा पर्याय आहे. परंतु त्याला खर्च आणि वेळही खूप जातो. ज्यांच्याकडे शाळेचा दाखला आहे तेही आमच्याकडून दाखला घेऊन जातात. यासाठी कुठल्याही बाऊंड्रीज ठरवून दिल्या नसल्याने जिल्ह्यातून वशिल्याने व राजकीय दबावाने अमुक वयाचा दाखला द्या म्हणून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु, आम्ही कागदोपत्री खात्री आणि काही प्रश्न विचारुन वयाचा अंदाज बांधून दाखला देतो, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगेचे प्रदूषण रोखा

$
0
0

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांची सूचना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून नदी प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी दिल्या आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर महानगरपालिकेने पंपिंग स्टेशनचे काम प्राधान्याने पूर्ण करून महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया केंद्रतील शुद्ध पाणी शेतकऱ्यांना द्यावे, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. तसेच इचलकरंजी नगरपरिषद हद्दीमधील ११० किलोमीटर पाइप लाइनचे काम हाती घेतले असून, आत्तापर्यंत २७ किलोमीटर पाइपलाइनचे काम नगरपालिकेने पूर्ण केले आहे. उर्वरित पाइपलाइनचे काम प्राधान्यक्रमाने करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रामार्फत प्रक्रिया केलेले पाण्याचा वापर शेतीसाठी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे विभागीय आयुक्तांनी सुचवले आहे.

प्रदुषणास कारणीभूत असणाऱ्या नदी काठावरील कंपन्या आणि साखर कारखान्यांना वारंवार सूचन देऊनही अपेक्षित उपाययोजना दिसत नाहीत, त्यामुळे औद्योगिक प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित घटकांवर कडक कारवाईचे आदेश बैठकीत देण्यात आले. यावेळी जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील दवाखान्यांमधील मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी डॉक्टर्स आणि दवाखान्यांनी नियमांचे पालन करण्याबात सूचना करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, प्रांताधिकारी प्रशांत पाटील, नीरीचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एम. आय. डी. सी., इचलकरंजी नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट हवी

जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आणि जिल्हा परिषदेला नियमावली दिली आहे, पण काही डॉक्टर्सकडून नदी, नाले, ओढ्यांमध्ये जैव वैद्यकीय कचरा टाकल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे अशा कचऱ्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील रुग्णालयांमधील मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी डॉक्टर्स आणि दवाखान्यांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा विभागीय आयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६ वर्षांपासून ‘सनातन’ कोल्हापुरात कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सनातन संस्थेचे काम कोल्हापुरात जवळपास १६ वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी सत्संग, साधना आदी कार्यक्रम चालत असत. १९९९ नंतर येथे प्रथम साप्ताहिक सुरू झाले. त्यानंतर ते दैनिक झाले. त्यावेळी काही काळ शिवाजी पार्क येथे, नंतर जरगनगर परिसरात कार्यालय होते. तिथून ते स्थलांतरित होऊन सध्या शाहूपुरी ४ थ्या गल्लीत आले आहे. २००२ च्या सुमारास प्रवीण लिमकर हा कार्यकर्ता तिथे कार्यरत होता. टेंबलाईवाडी, उचगाव परिसरात असलेल्या लिमकर याचा गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर तो आजतागायत फरार आहे. त्यामुळे येथील 'सनातन'च्या कामाची चर्चा सुरू झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासासाठी विविध आंदोलने

$
0
0

सामाजिक संघटनांचा तपास यंत्रणेवर सातत्याने दबाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सॉक्रेटिस ते पानसरे व्हाया दाभोलकर, तुकाराम' हे रिंगणनाट्य, प्रत्येक महिन्याचा २० तारखेला मॉर्निंग वॉक, निषेध सभा, आंदोलन आदी मार्गाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सातत्याने तपास यंत्रणेवर दबाव आणला. विचारांची लढाई विचारांनी लढण्याची आवश्यकता असताना, शस्त्रे हाती घेवून विचार मारता येत नसल्याचे आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून देत खरे मारेकरी ताब्यात घेण्यासाठी दबाव वाढविण्यात आला. सामाजिक संघटना आणि भाकपच्यावतीने केलेल्या आंदोलनांमुळे पोलिसांचा तपास पूर्णत्वाकडे जात असल्याचा भावना व्यक्त होत आहेत.

१६ फेब्रुवारीला कॉ. पानसरे यांच्यावर खुनी हल्ला झाल्यानंतर त्यांचे २० फेब्रुवारी रोजी निधन झाले. 'शिवाजी कोण होता ?, 'व्हू किल्ड करकरे' या व्याख्यानमालेत पानसरे यांनी सडतोड भूमिका मांडत प्रतिगामी व्यवस्थेवर हल्ला चढवला होता. विचारांची लढाई विचाराने लढता येत नसल्याने प्रतिगामी प्रवृत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा संशय पहिल्यापासून विविध पुरोगामी संघटनांकडून व्यक्त केला जात होता.

प्रतिगामी प्रवृत्तीचे सरकार असल्याने तपासाला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्वरीत तपास लागण्यासाठी पुरोगामी संघटनांनी सनदशीर आंदोलनांचा मार्ग पकडला होता. 'सॉक्रेटिस ते पानसरे व्हाया दाभोलकर, तुकाराम,' या रिंगणनाट्याचे जवळपास ३५० प्रयोग झाले.

'आम्ही भारतीय लोक आंदोलन'च्यावतीने मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कार्यकर्ते थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसले. तरीही तपासाला दिरंगाई होत असल्याने कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न मोर्चा काढून पोलिस यंत्रणेचे लक्ष वेधले होते. यानंतर भाकप, फेरीवाले, अंगणवाडी कर्मचारी संघ आदी संघटनांनी मोर्चा काढून पानसरे हत्याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी सातत्याने दबाव ठेवला.

हा दबाव वाढविण्यासाठी २० सप्टेंबर रोजी रक्ताने सही केलेले पत्र राज्य व केंद्र सरकारला पाठवण्यात येणार होते. त्याची सुरुवात ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या सहीपासून होणार होती. तर पानसरे यांच्या २० नोव्हेंबर जन्मदिनी एक लाख लोकांच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यापूर्वी त्यांच्या हत्येतील एक संशयित ताब्यात घेतला आहे. यामुळे आंदोलनाला यश मिळाले असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात झाली नागरिकांची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. डांगे यांच्या न्यायालयात संशयित समीर गायकवाडला पाहण्यासाठी वकीलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

गायकवाडला सोमवारी सकाळी न्यायालयात हजर केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. जामिनाची सुनावणी ऐकण्यासाठी वकिलांची पावले डांगे याच्या दालनाकडे वळू लागली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी संशयिताची माहिती न्यायालयाला दिली. सरकारी वकील विशाखा भरते यांनी युक्तिवाद केला. पानसरे यांचा हत्येचा तपास सात महिने सुरू असून या गुन्ह्यातील पहिल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताला १४ दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. 'आपला या हत्येशी संबध नसून घटना काळात दीड महिने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आपण नव्हतो,' असे संशयित गायकवाड याने न्यायालयाला सांगितले.

गायकवाड याचे वकीलपत्र घेण्यासाठी काही वकिलांनी तयारी सुरू केली होती. ही माहिती ज्येष्ठ वकील व बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी वकीलपत्र घेण्यास मज्जाव केला. कॉ. पानसरे हे ज्येष्ठ नेते होते, तसेच ते वकील होते याची जाणीवही वकीलपत्र घेणाऱ्या वकिलांना करून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरचे मडगाव, कर्नाटक कनेक्शन

$
0
0

सांगलीतील संपूर्ण गायकवाड कुटुंबच सनातन संस्थेशी निगडीत

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयिताला सांगलीत पकडल्याचे समजताच बुधवारी सर्वत्र खळबळ माजली. स्थानिक पोलिसांनी संशयित समीर गायकवाडच्या घराचा ताबा घेतला. पोलिसांची वर्दळ पाहून परिसरातील नागरिकांच्या भुवया आश्चर्याने उंचावत गेल्या. त्यातच मडगाव बाँबस्फोटातील संशयिताची पत्नी गायकवाडच्या घरात येवून वकीलपत्रावर सही घेऊन गेली. समीरचे संपूर्ण कुटुंबच सनातन संस्थेची जोडले गेल्याचे समोर येत आहे. या निमित्ताने सांगली आणि मिरज परिसरातील 'सनातन'चे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सांगलीतील दक्षिण शिवाजी नगरमधील शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या शनीमंदिरच्या पाठीमागे आणि माऊली विठ्ठल-रुक्मीणी मंदिरासमोर समीर गायकवाड याचे घर आहे. 'भावेश्वरी छाया' नावाचे हे घर १९८७ मध्ये बांधलेले आहे. सांगली आकाशवाणीतील सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले आणि सुमारे सात वर्षापूर्वी निधन झालेल्या विष्णू गायकवाड यांच्या तीन मुलांपैकी समीर हा सर्वात लहान. सर्वात मोठा सचिन हा पत्नीमुलांसह सांगलीतल्या घरात राहतोय तर मधला संदीप हा आपल्या कुटुंबासह कर्नाटकातील संकेश्वर यथे राहतो. समीरचे सांगलीतले वास्तव्य अगदी अल्प काळाचे अथवा अधूनमधून ये जा करण्यापुरतेच राहिलेले आहे. त्याचे शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण संकेश्वरमध्येच झाले आहे. संकेश्वर हे त्याची आई शांता यांचे माहेर. आईच्या दोन अविवाहित बहिणीही सनातनचेच काम करतात. त्यांच्याबरोबर शांता यादेखील काहीप्रमाणात सनातनचेच काम करीत असतात, अशी माहिती समोर आली आहे.

सनातनच्या सांगली परिसरातील कार्यात सक्रीय असल्याने सुमारे चार वर्षांपूर्वी समीर गायकवाड याने पुष्पराज चौकातील एका बिल्डींगमध्ये गाळा भाड्याने घेऊन ' गुरुकृपा' या नावाने मोबाइल शॉपी उघडली होती. जुने मोबाइलही तो खरेदी करीत होता. मोबाइलबरोबरच तो सनातन संस्थेची उत्पादनेही विक्रीसाठी ठेवत होता. त्यानंतर बराच काळ सांगलीतून गायब असलेल्या समीरने नवी मुंबई, मुंबई या परिसरात बस्तान बसवून त्या ठिकाणी मोबाइल शॉपी सुरु केली.

कॉ. पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेला समीर गायकवाडच्याबाबत संशय आल्यानंतर साध्या गणवेशातील पोलिसांनी त्याच्या घरावर पाळत ठेवली होती. मंगळवारी दुपारपासून पोलिसांची संख्या वाढली होती. त्या परिसरातील चहाच्या टपरीवर, झाडांच्या बाजूला लपून पोलिस घरावर नजर केंद्रीत करुन बसले होते. अलिकडे अजिबात नजरेला न पडणारा समीर हा दोन दिवसापूर्वीच सांगलीतल्या घरात दिसू लागला होता. मंगळवारी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी घरातील अन्य कागदपत्रे व साहित्यही पोलिसांनी जप्त करुन नेले.

पत्नी सनातनची साधक

समीरचे लग्न चुलत मामाच्या मुलीबरोबर झाले आहे. त्याच्या पत्नीचे नाव डॉ. हर्षदा असून दोघा पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर ती देखील सनातनचीच साधक म्हणून सध्या गोव्यातील रामनाथी सनातन आश्रमात रहाते. तर समीर हा सध्या पनवेल परिसरातील सनातन आश्रमात रहात होता.

भावाची पत्नीही सनातनमध्ये सक्रिय

समीरचा मोठा भाऊ सचिन हा रखवालदाराची नोकरी करुन कुटुंब चालवित असून त्याची पत्नीही सनातनच्या प्रचारकामात सक्रीय असल्याचे समोर आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करुन त्यांना सनातन धर्म समजून सांगण्याबरोबरच ती घरोघरी जाऊन सनातनची पत्रके वाटत होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन’वर बंदी घाला

$
0
0

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत ठराव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीही अनेक लोकशाहीविरोधी कृत्यांमध्ये सनातन प्रभात संघटनेचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सनातन प्रभातला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदीची कारवाई करावी, अशी भूमिका भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आली.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर व सांगली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाकपच्या कार्यालयामध्ये ही विशेष बैठक झाली. या मागणीसाठी शुकवारी (ता. १८ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीच्या सुरुवातीस पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, पोलिसांनी आता कोणत्याही दबावाला न जुमानता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन पानसरे यांच्या हत्येचे 'मास्टरमाइंड' शोधून काढावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. सनातन संस्थेचे नाव यापूर्वी गोवा व मालेगाव येथील स्फोटांमध्ये आलेले आहे. या संघटनेने पानसरे यांच्यावर १० कोटींचा दावा दाखल केला होता. आता पानसरे हत्येमध्ये पकडण्यात आलेला संशयितही याच संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारा ठराव करण्यात आला.

पानसरे यांची हत्या झाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही कौटुंबिक वादातून घडलेली हत्या असल्याचे विधान केले होते. मात्र आता या हत्येमागे कौटुंबिक वाद नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पाटील यांनी आपल्या विधानाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

संशयित पकडण्यात आला असला, तरी अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पक्षातर्फे यापुढेही वैचारिक लढाई सुरूच राहील, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील सर्व मारेकरी सापडेपर्यंत लढा सुरूच राहिल असे यावेळी सांगण्यात आले. भाकपचे शहर सहसचिव सुभाष वाणी यांच्यासह सतीश कांबळे, व्यंकप्पा भोसले, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, शिवाजी शिंदे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोन कॉल्समधून छडा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना कोल्हापूर पोलिसांना यश येणार असा विश्वास पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांना होता. सहा महिन्यांपूर्वी संशयितावर टेक्निकल सर्व्हेलन्स (तांत्रिक पाळत) ठेवला होता. पंधरा दिवसांपूर्वी समीर गायकवाडचा यातील सहभाग निश्चित झाल्यावर दिवसरात्र पाळत ठेऊन तपासाचा मोठा टप्पा कोल्हापूर पोलिसांनी गाठला.

पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रारंभी २२ पथके स्थापन केली होती. कौटुंबिक आणि व्यक्तिगत कारणांबरोबर कामगार संघटनांतील हेवेदावे, या अनुषंगानेही तपास सुरू होता. पानसरे कुटुंकीय आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मात्र जातीयवादी संघटनांवरच तपास केंद्रित करावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली.

दरम्यानच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चे, निदर्शने आणि प्रभात फेऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आणि तपास यंत्रणेवर तपासासाठी सातत्याने दबाव टाकला होता. दोन महिन्यापूर्वी एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी पानसरे हत्येतील संशयित हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती.

पोलिसांनी तपासाची पथके कमी करून विशिष्ट दिशेने तपास सुरू केला होता पण, तपासाबाबत गोपनीयता पाळली होती. कोल्हापूर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक डी.एन. मोहिते, कोल्हापूर विशेष तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, वडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपास सुरू केला.

त्यांना सांगलीचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील पेरीडकर यांचे सहकार्य लाभले. पंधरा दिवस समीर गायकवाड पाळत ठेवल्यानंतर त्याचा हत्त्येतील तपास निश्चित झाल्याचे लक्षात आल्यावर मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेतले. मुश्रीफ म्हणतात, मग इतके दिवस का लपवले?

'पानसरे यांच्या खुन्यांबाबत पोलिसांना माहिती आहे' असे विधान करून खळबळ उडवून देणारे आमदार हसन मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्याचा आता अर्थ लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यावेळी 'या' वक्तव्यावरुन अनेक उलटसुलट चर्चा झाली. त्याबाबत मुश्रीफ म्हणाले, 'पोलिसांना पुरावे सापडल्याखेरीज त्याला अटक करुन कोर्टासमोर सादर करणार नाहीत. सहा महिन्यांपासून आरोपीवर पाळत ठेवली जात होती. म्हणजेच त्याचे नाव पोलिसांना माहित होते. पण, यापूर्वी एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने आरोपीचे नाव उघड करु देत नाहीत असे सांगितले होते. इतक्या महिन्यांपासून नाव माहिती होते तर ते इतके दिवस गुप्त का ठेवले?, त्यापाठीमागील काय कारणे होती? किंवा कोणाचा दबाव होता का? याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे. यापूर्वी जे वक्तव्य केले होते, ती वस्तुस्थिती होती हे या पोलिसांच्या वक्तव्यावरुन ​स्पष्ट होते.'

कलबुर्गी यांच्या हत्येनंतर गती

३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध पुरोगामी कन्नड विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर पानसरे यांच्या हत्येचा तपास आणखी वेगावला. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक धारवाडला जाऊन तेथील घटनेची माहिती घेतली होती. त्यानुसार दोन्ही खुनाच्या घटनांमध्ये काही साधर्म्य सापडते का? त्याचा तपास केला होता. या घटनेला पंधरा दिवस पूर्ण झालेले असताना पानसरे यांच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे कलबुर्गींच्या हत्येनंतर पानसरे यांच्या तपासाला आणखी गती आली होती, असेच दिसते.

रेखाचित्र, फुटेज तपासणार

समीर गायकवाडचे साथीदार कोण, किती आणि ते कुठले आहेत? पोलिसांनी जारी केलेली रेखाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज यामध्ये काय साम्य आहे? गायकवाड याच्या घरात सापडलेल्या वस्तू आणि कागदपत्रे, गायकवाडचे सोशल मीडियावरील किंवा डायरीतील लेखन. सनातन प्रभातच्या इतर पदाधिकाऱ्यांशी झालेला गायकवाडचा पत्रव्यवहार, फोन कॉल्स आदी बाबी तपासात महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दाभोलकर-कलबुर्गी हत्येचे कनेक्शन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. या दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याने एकाच संस्थेने या दोन्ही हत्या घडवल्या असाव्यात, अशी चर्चा सुरू होती. धारवाडमध्ये डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाल्यानंतर ही शंका बळावली आणि पोलिसांनी सनातन प्रभात संस्थेवर लक्ष केंद्रित केले. डॉ. कलबुर्गींच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील तपास यंत्रणा गतीमान झाली. यातूनच पानसरे हत्येतील पहिला संशयित हाती लागला. यातून डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोलिस पोहचण्याची शक्यता आहे.

संश‌य‌िताच्या घराची झडती

गायकवाड याला ताब्यात घेताच त्याच्या सांगली, मुंबई आणि नवी मुंबईतील घराची झडती सुरू केली आहे. त्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. समीर गायकवाडच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे, पुस्तके, शस्त्रांच्या संदर्भात माहिती घेण्यात येत आहे.

'सनातन'वरच संशय

कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सर्वच पुरोगामी संस्थांनी 'सनातन' संस्थेवर थेट संशय व्यक्त केला होता. चार महिन्यांपूर्वी डॉ. भारत पाटणकर यांनाही धमकीचे पत्र आल्यानंतर 'सनातन' संस्थेच्या कोल्हापुरातील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न पुरोगामी संघटनांनी केला होता. पानसरे यांच्या हत्येतील संशयित या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्याने पुरोगामी संघटनांचा संशय खरा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोघांचा काटा काढायचा आहे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोघांचा काटा काढायचा आहे. एकाचा काढला आहे, दुसऱ्याचा काढायचा आहे..., अशा आशयाचे संभाषण असणारे दोन मोबाइल कॉल पोलिसांनी 'इंटरसेप्ट' केले. या कॉलने पोलिसांचे कान टवकारले. हे कॉल कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येशी संबंधित असावेत, असा संशय पोलिसांना आला. हे कॉल करणाऱ्या समीर गायकवाडभोवती जाळे विणले गेले आणि बुधवारी त्याला अटक झाली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींकडून झाल्याचा संशय व्यक्त होत होता. त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण आणि गोवा ​परिसरातील 'सनातन'च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर होती. पानसरेंची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या कार्यकत्यांवरील 'टेहळणी' अधिक वाढवली. पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी स्थापण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने सांगलीतील काही कार्यकर्त्यांवर लक्ष केंद्रित केले.

मडगाव स्फोटातील प्रमुख संशयित रूद्र पाटील अजून फरार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याला वाँटेड घोषित केले आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी निर्दोष सुटले असले तरी रूद्र पाटीलचा शोध सुरू आहे. त्याच्या तपासात सातत्याने समीर गायकवाडचे नाव समोर येत होते. पोलिसांनी समीर गायकवाड वापरत असलेले आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल 'इंटरसेप्शन'ला लावले होते. गायकवाडने त्याच्या जवळच्या दोन व्यक्तींशी काटा काढण्याचे संभाषण केले होते. त्याच्या या संभाषणाने पोलिसांचे कान टवकारले आणि त्याच्या भोवती फास आवळला गेला, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

सीएमच्या दौऱ्यामुळे अटक पुढे

गायकवाडकडे पोलिसांना तपास करायचा होता. मात्र, त्याच्या अटकेपूर्वी पोलिसांनी सावधगिरी बाळगत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती दिली. गायकवाड 'सनातन'शी संबंधित असल्याने पोलिस तपासाची दिशा स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला गेल्याच आठवड्यात अटक करायची होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने त्याची अटक पुढे ढकलण्यात आली होती, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या; संशयितास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख संशयिताला कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी पहाटे सांगलीत अटक केली. समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, शंभर फुटी रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर या प्रकरणातील प्रमुख संशयिताला सात महिन्यानंतर अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश मिळाले. गायकवाड हा सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आणखी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यात मुंबईतील एका युवतीचाही समावेश आहे. तसेच संकेश्वर येथील तरुणाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी समीरच्या सांगली येथील 'भावेश्वरी छाया' व मुंबईत वास्तव्यास असलेल्या घराची झडती घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली आहेत.

गायकवाड याच्यावर पोलिसांनी सहा महिने टेक्निकल सर्व्हेलन्स (तांत्रिक टेहळणी) ठेवली होती. या टेहळणीदरम्यानच तो कॉ. पानसरे यांच्या हत्याप्रकरणात असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी अटकेची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'पानसरे यांच्या हत्येच्या तपासादरम्यान सहा महिन्यांपूर्वी काही नावे निष्पन्न झाली होती. पण, यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी टेक्निकल सर्व्हेलन्सचा वापर करावा लागला. गेल्या पंधरा दिवसांत पानसरे हत्येच्या संदर्भातील धागेदोरे स्पष्ट झाल्याने समीर गायकवाड याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. सोमवारी रात्री आठ वाजता सांगली येथून गायकवाडला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पानसरे यांच्या हत्येसंबंधात त्याच्याकडे माहिती मिळाली. त्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी त्याला अटक करण्यात आली.'

पोलिसांनी त्याला कोल्हापूरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. डांगे यांच्यासमोर हजर केले. गायकवाडकडे या प्रकरणी अधिक तपास करायचा असल्याने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील विशाखा भरते यांनी केली. त्यानंतर न्यायदंडाधिकारी डांगे यांनी समीरला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पत्रकार ​परिषदेला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, सांगली पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते.

तीन संशयित ताब्यात

संशयित गायकवाड याच्याकडे कसून तपास केल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. संशयित सांगली किंवा कोल्हापूर, संकेश्वर व नवी मुंबईतील असून विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयात संशयितांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यात मुंबईतील एका युवतीचा आणि संकेश्वरातील तरुणाचा समावेश आहे. हल्लेखोर गोवामार्गे कोल्हापुरात आल्याचे समजते.

कोण आहे हा गायकवाड?

संशयित गायकवाड १९९८ पासून सनातन संस्थेचे काम करतो. तो या संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य काही सदस्यही सनातन संस्थेचे काम करत आहेत. त्याच्या दोन मावशीही सनातनच्या कार्यकर्त्या आहेत. समीरची पत्नी गोवा येथील सनातनच्या आश्रमात दहा वर्षे काम करते. पण, पत्नीचा या हत्येशी संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गायकवाडचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. त्याने इलेक्ट्रीशियनचे दोन वर्षाचे प्रशिक्षणही घेतले आहे. गेली चार वर्षे तो मोबाइल दुरूस्तीचे काम करतो. तीन दिवसांपूर्वी तो मुंबईतून कोल्हापुरात आला होता. मुंबईत तो सनातन संस्थेची धार्मिक पुस्तके विक्री करणारा 'धर्मरथ' चालवण्याचे काम करत होता.

गायकवाडच्या पाठीशी 'सनातन'

दरम्यान, सनातन संस्थेने समीर गायकवाड हा सनातनचा पूर्णवेळ साधक असून, तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. यासंबंधीचे पत्रक व्यवस्थापकीय विश्वस्त विरेंद्र मराठे यांनी प्रसिध्दीला दिले आहे. सनातन ही अध्यात्मिक संस्था असल्याने ती समीरला प्रत्यक्ष कायदेशीर सहाय्य करू शकत नाही. त्याला ‌हिंदू विधीज्ज्ञ परिषद किंवा हितचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत कायदेशीर सहाय्य पुरवण्यात येणार असल्याचेही मराठे यांनी म्हटले आहे.

टेक्निकल सर्व्हेलन्समधून ट्रॅप

टेक्निकल सर्व्हेलन्सद्वारे समीर गायकवाडवर पाळत ठेवण्यात आली. समीरचा मोबाइलवरील संवाद पोलिसांना कळत होता. प्रारंभी पानसरे हत्येसंबधी तो चर्चा करत नव्हता. नंतर तो उघड चर्चा करू लागला. चर्चेत पानसरे यांच्या हत्येसंबधीचे पुरावे मिळाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. समीर मोबाइल दुरूस्तीत निष्णात असल्याने तो हत्येतील मुख्य प्लॅनर होता, असे पुरावे मिळाले आहेत. त्याने पानसरे यांची मोबाइलव्दारे रेकी करून प्रत्यक्ष हत्येच्यावेळी हल्लेखोरांना सूचनाही दिल्या होत्या.

दीड लाख कॉल्सची पडताळणी

सहा महिन्यात पोलिसांनी दीड लाख मोबाइल आणि फोन कॉलची पडताळणी केली होती. सीसीटीव्ही फुटेजही तपासले होते. पोलिस मुख्यालयातील सायबर सेल १८ ते २० तास काम करत होता. अखेर टेक्निकल सर्व्हेलन्सव्दारे विशिष्ट संशयितांवर नजर ठेवायला सुरूवात करण्यात आली. त्यात समीर गायकवाडकडून काही धागेदोरे मिळाले. पंधरा दिवस समीर गायकवाडवर पाळत ठेवण्यात आली होती.

पानसरे यांच्या हत्येमध्ये गायकवाड हा संशयित आहे. सहा महिने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्याने पानसरे हत्याप्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली, हल्ल्याचा सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यात येणार आहे. मुख्य हल्लेखोर आणि सूत्रधाराची माहिती पुढील तपासात उघड होईल. दाभोलकर हत्येशी त्याचा संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येईल.

- संजयकुमार, एसआयटी प्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गणेश भक्तांचा अपघातात दुर्देवी मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

इचलकरंजी येथील नारायण चित्रमंदिर जवळील मंगळवार पेठ युवा मंचचे कार्यकर्ते गणेश मूर्ती आणण्यासाठी बेळगावला गेले होते. रात्री १२ वाजता मूर्ती घेवून येणाऱ्या ट्रॉलीला मागून आलेल्या कांद्याने भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात मंगेश बाळासाहेब गायकवाड, सुनील राजाराम माने हे तरुण ठार झाले. ते दोघेही मूर्तीजवळ ट्रॉलीलच्या चाकावर बसले होते. या अपघातात अन्य तिघे जखमी झालेत. हा अपघात पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संकेस्वर येथे झाला. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह आणण्यात येणार आहेत.

अन्य जखमी

संतोष जाधव, अक्षय सावंत व मंगेश मस्कर हे तिघे जखमी झालेत. सर्व जखमींना इंदिरा गांधी इस्पितळात दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक पाळत ठरली यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास करताना सहा महिन्यांपूर्वी संशयितावर टेक्निकल सर्व्हेलन्स (तांत्रिक पाळत) ठेवला होता. पंधरा दिवसांपूर्वी समीर गायकवाडचा या प्रकरणातील सहभाग निश्चित झाल्यावर दिवसरात्र त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे हत्येच्या तपासाचा मोठा टप्पा कोल्हापूर पोलिस गाठू शकले.

पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रारंभी २२ पथके स्थापन केली होती. कौटुंबिक आणि व्यक्तिगत कारणांबरोबर कामगार संघटनांतील हेवेदावे, या अनुषंगानेही तपास सुरू होता. पानसरे कुटुंबीय आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी मात्र जातीयवादी संघटनांवरच तपास केंद्रीत करावा, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. पण, पोलिस मात्र मौन बाळगून होते. गायकवाडवर पाळत ठेवल्यानंतर त्याचा हत्त्येतील तपास निश्चित झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेऊन पहाटे अटक करण्यात आली.

दीड लाख कॉल्सची पडताळणी

पोलिसांनी सहा महिन्यांत दीड लाख मोबाइल आणि फोन कॉलची पडताळणी केली होती. सीसीटीव्ही फूटेजही तपासले होते. पोलिस मुख्यालयातील सायबर सेल १८ ते २० तास काम करत होता. अखेर टेक्निकल सर्व्हेलन्सद्वारे विशिष्ट संशयितांवर नजर ठेवायला सुरुवात करण्यात आली. त्यात समीर गायकवाडकडून काही धागेदोरे मिळाले. १५ दिवस समीर गायकवाडवर पाळत ठेवण्यात आली. त्यानंतर पानसरे यांच्या हत्येत त्याचा तपास निश्चित झाल्याचे लक्षात आल्यावर मंगळवारी रात्री आठ वाजता त्याला ताब्यात घेऊन पहाटे अटक करण्यात आली.

'सनातन'वर बंदी घाला

सरकारने तातडीने 'सनातन'ला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घालावी, अशी मागणी 'भाकप'ने केली आली. तर काँग्रेसनेही संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

संशयिताच्या घराची झडती

गायकवाड याला ताब्यात घेताच त्याच्या सांगली, मुंबई आणि नवी मुंबईतील घराची झडती सुरू केली आहे. त्यासाठी तीन पथके तयार केली आहेत. समीर गायकवाडच्या घरातून संशयास्पद कागदपत्रे, पुस्तके, शस्त्रांच्या संदर्भात माहिती घेण्यात येत आहे.

कलबुर्गी हत्येनंतर गती

३० ऑगस्ट रोजी पुरोगामी कन्नड विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर पानसरे यांच्या हत्येचा तपास आणखी वेग आला. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक धारवाडला जाऊन तेथील घटनेची माहिती घेतली होती. त्यानुसार तपास केला होता. या घटनेला पंधरा दिवस पूर्ण झालेले असताना पानसरे यांच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

समीरच्या पाठीशी 'सनातन'

समीर गायकवाड हा आमचा पूर्णवेळ साधक असून, तो निर्दोष असल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. या संबंधीचे पत्रक व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी प्रसिद्धीला दिले आहे. सनातन ही अध्यात्मिक संस्था असल्याने ती समीरला प्रत्यक्ष कायदेशीर साह्य करू शकत नाही. त्याला ‌हिंदू विधिज्ञ परिषद किंवा हितचिंतक अधिवक्ता यांच्यामार्फत कायदेशीर साह्य पुरवण्यात येईल.

आठ दिवसांची पोलिस कोठडी

पोलिसांनी त्याला कोल्हापूरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर हजर केले. याप्रकरणी गायकवाडकडे अधिक तपास करायचा असल्याने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील विशाखा भरते यांनी केली. त्यानंतर न्यायदंडाधिकारी डांगे यांनी समीरला आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

घटनाक्रम

 १६ फेब्रुवारीला पानसरे दाम्पत्यावर हल्ला

 २० फेब्रुवारीला गोविंद पानसरे यांचा मृत्यू

 सहा महिन्यांपासून समीरवर पाळत

 १५ दिवसांपूर्वी हत्येचे धागेदोरे मिळाले

 मंगळवार, १५ रोजी रात्री ८ वा. ताब्यात

 बुधवारी, १६ सप्टेंबरला पहाटे ४ वा. ३५ मिनिटांनी अटक

 ११ वा. कोर्टात हजर आणि १२.४५ वाजता सात दिवसांची कोठडी

गायकवाड हा पानसरे यांच्या हत्येतील संशयित आहे. सहा महिने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्याने पानसरे हत्याप्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली, हल्ल्याचा सूत्रधार कोण, याचा शोध घेण्यात येणार आहे. त्याला सात दिवस कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून माहिती मिळणार आहे.

- संजयकुमार, एसआयटी प्रमुख

मला आजही ती जीवघेणी सकाळ आठवते. अतिशय बेसावध क्षणी बंदुकीच्या गोळ्यांनी आमचा वेध घेतला. कॉम्रेड कायमचे सोडून गेले. सात महिन्यांपासून मारेकऱ्यांचा शोध सुरू होता. कॉम्रेड यांच्या विचारांवर हल्ला करणारी भ्याड प्रवृत्ती पोलीसांच्या हाताला लागणे गरजेचेच होते. अखेर एक संशयित आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने तपासाला दिशा तर मिळणार आहेच पण तपासाने आता वेग घ्यावा, अशी इच्छा आहे. अटकेतील आरोपी हा मोहरा आहे, त्यामुळे प्रमुख सूत्रधार सावध होण्याची शक्यता आहे. - उमा पानसरे, गोविंद पानसरे यांच्या पत्नी





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या घरातून २३ मोबाइल जप्त

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सांगली

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या समीर गायकवाडच्या सांगली येथील घरावर पोलिसांनी आज छापा टाकला. यात २३ मोबाइल, एक मोठा चाकू आणि सनातनचे प्रचार साहित्य जप्त करण्यात आले.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला बुधवारी पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर उभे केले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी गुरुवारी पुन्हा त्याच्या सांगली येथील घरावर छापा टाकला. यात २३ मोबाइल सापडले आहेत. पानसरे यांच्या हत्येचा कट रचताना गायकवाडच्या घरात सापडलेल्या मोबाइल फोन्सचा वापर झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जप्त केलेल्या मोबाइल फोनच्या तपासणीसाठी पुणे सायबर सेलची मदत घेतली जाणार आहे.

समीर आणि त्याचे कुटुंबीय सनातन संस्थेशी संबधित असल्याची माहिती पुढे आली आहे. तो १९९८ पासून सनातनचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. त्याची पत्नी डॉ. हर्षदा सनातनचे मुख्यालय असलेल्या रामनाथी आश्रमात सेवेत आहे. पानसरे यांचा खून होण्यापूर्वी दोन दिवस आधी समीरचे सांगलीत वास्तव्य होते. तेव्हापासूनच्या सर्व हालचालींचा मागोवा पोलीस घेत आहेत. दरम्यान, बेळगांवमध्ये राहणाऱ्या समीरच्या सुनील आणि श्रीधर या दोन मेहुण्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात इचलकरंजीचे २ ठार

$
0
0

गणेशमूर्ती आणताना यमकनमर्डीजवळ अपघात

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बेळगावहून गणेशमूर्ती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील मंगळवारपेठ परिसरातील मंगळवारपेठ युवा मंचचे दोन गणेशभक्त कार्यकर्ते जागीच ठार झाले, तर पाचजण जखमी झाले आहेत. अपघात बुधवारी रात्री ११.३०च्या सुमारास पुणे-बेंगळुरू महामार्गावर यमकनमर्डी (जि. बेळगाव) गावानजीक घडला. मंगेश बाळासाहेब गायकवाड (३२ रा. होळीकट्टा परिसर) व सुनील राजाराम माने (३०, रा. संतुबाई गल्ली) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेची माहिती समजताच मंगळवारपेठ परिसरात शोककळा पसरली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी ः मंगळवारपेठ युवा मंच गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बुधवारी बेळगाव येथे श्रींची मूर्ती आणण्यासाठी गेले होते. मूर्ती घेऊन येताना यमकनमर्डी नजीक भरधाव

वेगाने आलेल्या ट्रकने ट्रॉलीला जोराची धडक दिली. ट्रॅक्टरमध्ये दोन्ही बाजूस बसलेले मंगेश गायकवाड आणि सुनील माने ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावर कोसळले. यामध्ये ट्रॅक्टरचे चाक गायकवाड याच्या छातीवरून गेल्याने आणि मानेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघेही जागीच ठार झाले, तर शाहरुख पठाण, राहुल काळे,

संतोष जाधव, अक्षय सावंत, मंगेश मस्कर हे पाचजण उडून पडल्याने जखमी झाले. अपघाताची माहिती इचलकरंजीत समजताच एकच शोककळा पसरली. मंगळवारपेठेतील काही कार्यकर्ते व तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल-बोलेरोच्या धडकेत दोघे ठार

$
0
0

शाहूवाडीः मोटारसायकल व बोलेरो पिकअप गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले. अंकुश चंद्रकांत वरुटे (वय ३२, रा. कातळेवाडी, ता. शाहूवाडी ) व वरद रामचंद्र पाटील (१०, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी) अशी मृतांची नावे आहेत. मृत नात्याने मामा-भाचे आहेत. अपघात करंजफेण-शेंबवणे मार्गावरील वारंग मळीजवळ बुधवारी रात्री उशिरा घडला.

अंकुश वरुटे मोटरसायकल (एम. एच. ०९ - सीपी २४४१ ) वरून वरद पाटीलसह शेंबवणे येथे गौरीची शिदोरी देण्यासाठी जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप (एम. एच. ०९ सीयू १८१०) शी जोराची धडक झाली.

यात मोटारसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अंकुशला उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआरमध्ये, तर वरदला मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु दोघांचाही उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. गणेशोत्सव सणाच्या पूर्वसंध्येला दोघांचा मृत्यू झाल्याने कातळेवाडी व करंजफेण गावांवर दुःखाची छाया पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...तरीही डॉल्बी वाजलाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ध्वनिप्रदूषणविरोधात जागृती करणाऱ्या पर्यावरणप्रेमींच्या हाकेला आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता लावत गुरूवारी बहुतांशी सार्व​जनिक मंडळांनी कर्णकर्कश डॉल्बीच्या ठेक्यावर बाप्पांची मिरवणूक काढत डॉल्बीमुक्तीचा विचार वाऱ्यावर सोडल्याचे चित्र ठळकपणे दिसले. डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची मोहिम राबवणाऱ्या प्रशासनाकडून डॉल्बीच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरूणाईला पुन्हा दणका देण्याची गरज आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यासाठी जेमतेम महिनाभराच्या उंबरठ्यावर गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना इच्छुकांकडून मागणी तसा पुरवठा होत आहे. इच्छुकांची पडद्याआडून ही सेवा सुरू आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांची डॉल्बीवर थिरकरण्याची हौस निवडणुकीतील इच्छुकांकडूनच पुरवली जात असल्याचे ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे यंदा टेंबे रोड येथील डॉल्बीच्या दुकानांमध्ये मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी गणरायच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा आवाज कानांवर आदळला.

सर्वात पुढे नाचणारे कार्यकर्ते, त्यानंतर बाप्पांची मूर्ती असलेली ट्रॅक्टरट्रॉली आणि त्यापाठोपाठ डॉल्बीसिस्टिमसह जनरेटरची जंत्री असा लवाजमा गुरूवारी बहुतांशी मिरवणुकींमध्ये दिसून आला. यावर्षी डॉल्बीने आवाजाची मर्यादाही ओलांडल्याचे दिसून येत होते. डॉल्बीच्या ठेक्यावर सुरू असलेला कार्यकर्त्यांचा आवेग पाहता डॉल्बीमुक्तीचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नसल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमाल करा ‘मटा’सोबत

$
0
0

गणेशोत्सवाचा आनंद होणार वेबसाइटवर द्विगुणित

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. संपूर्ण वातावरण गणेशमय झाले आहे. गणेशोत्सवाच्या या चैतन्यमय वातावरणात भर टाकण्यासाठी आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने खास वेबसाइट सुरू केली आहे. त्याद्वारे वाचकांना बाप्पाच्या आगमनाच्या तयारीपासून प्रत्यक्ष उत्सवातील धमाल सर्वांपर्यंत पोहोचविता येणार आहे.

'मटा'च्या http://www.mataganeshotsav.com/ या वेबसाइटवर तुम्ही तुमचे फोटो शेअर करू शकता, तसेच त्यातील एका क्लिकसरशी महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची झलकही तुम्हाला पाहायला मिळू शकते. गेल्या गणेशोत्सवात या वेबसाइटला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही या वेबसाइटच्या माध्यमातून या अनोख्या गणेशोत्सवात सहभागी होता येणार आहे. या वेबसाइटवरून बाप्पांची आरती डाउनलोड करता येणार आहे, तसेच आरतीचे व्हिडिओही पाहता येणार आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून गणेशोत्सव व्यापक करण्यासाठी 'मटा'ने हा पुढाकार घेतला आहे.

आमचा कलात्मक गणपती

प्रत्यक्ष गणपतीची मूर्ती साकारणाऱ्या हातांप्रमाणेच गणपती आणि कलेचे नातेही अगदी जवळचे आहे. पर्यायाने कलाकाराचेही. त्यामुळेच गणेशोत्सवादरम्यान चित्र, शिल्प, खडू, पाने-फुले किंवा साबणापासून तयार केलेले बाप्पाही पाहायला मिळतात. गणरायाच्या साकारलेल्या अशा विविध रूपांना आणि कलाकाराच्या कल्पकतेला दाद मिळवून द्यायलाच 'मटा'च्या वेबसाइटवरील 'आमचा गणपती' हे खास पेज. त्यावर तुम्ही साकारलेला 'आमचा गणपती' पाठवून फक्त आप्तेष्टांकडून नाही, तर इतरांकडून दाद मिळवू शकता.

अपलोड करा तुमच्या बाप्पांचा फोटो

या खास वेबसाइटवर विकसित केलेल्या पेजेसमध्ये एक आहे 'फोटो कॉन्टेस्ट'. गणेशमूर्ती, मंडळे, घरगुती गणेश, कुटुंबासह बाप्पा, बाप्पाचा फॅन या विभागांतर्गत तुम्ही तुमच्या घरात, मंडळात विराजमान झालेल्या गणरायाचे फोटो अपलोड करू शकता. यंदा तुमच्या घरच्या बाप्पांची मूर्ती कशी आहे, ती कशी सजवली आहे, हे या निमित्ताने तुम्ही जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकाल. ८८६६००१८३० या क्रमांकाच्या व्हॉट्स अॅपवर फोटो पाठवूनही तुम्ही हे इतरांपर्यंत पोहोचवू शकाल. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट फोटोंना 'मटा'कडून आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. त्याशिवाय निवडक फोटोंचे प्रदर्शन गणेशोत्सवानंतर आयोजित करण्यात येणार आहे.

खाद्यपदार्थ कला क्लिक

गणपती या विद्येच्या देवतेसह या उत्सवाची अजून एक महत्त्वाची बाब असते, ती खाद्यपदार्थ. उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर बाप्पाला दाखवला जातोच, शिवाय या निमित्ताने विविध पदार्थही घरी तयार केले जातात. याच दिवसांत तुम्ही तयार केलेल्या काही नव्या पदार्थांची रेसिपी किंवा नेहमीचेच, पण वेगळ्या पद्धतीने केलेले पदार्थ तुम्हाला 'रेसिपीज' या पेजवर अपलोड करता येणार आहेत. फक्त पदार्थांच्या रेसिपीज नाहीत, तर त्यासह त्यांचे सुंदर फोटोही आवर्जून अपलोड करा आणि तुमची ही पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरक्षित जागे’साठी २४ ला पुन्हा सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षित जागा संपादनावरून तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने महापालिकेला या संदर्भात निर्णय घेण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा बोलावली आहे. पर्चेस नोटीस लागू करण्यात आल्याने आरक्षित जागे संपादनासंदर्भात ​महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे. सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य आघाडीच्या नगरसेवकांतच हा ठराव मंजूर करून मतभेद आहेत. यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेतही या विषयावरील चर्चेत नगरसेवक आमनेसामने उभे ठाकले होते. आरक्षित जागा खरेदीवरूनही प्रशासन आणि नगरसेवकांतही संघर्ष सुरू आहे.

दुसरीकडे हायकोर्टाच्या आदेशानुसार गणेश उत्सव कालावधीत रस्त्यावर मंडप उभारणीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाराच्या अखत्यारित मार्गदर्शक तत्वे निश्चित केली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण सभागृहाची मान्यता आवश्यक आहे. मागील दोन सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर सार्वजनिक मंडळात नाराजी नको म्हणून नगरसेवक या विषयावर चर्चा न करता पुढील मिटींग अशा सूचना करत आहेत. गुरूवारपासून गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे. अजूनही मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळालेली नाही. विषयपत्रिकेत एकूण सात विषय आहेत. पर्चेस नोटीस लागू होऊन एक वर्षाच्या आत आरक्षित जागा संपादनाबाबत महापालिकेला निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिका सभेने यापूर्वीच आरक्षित जागेबाबतचा विषय सरकारकडे पाठवा अशी सूचनाही केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याचा डीपीआर १२५ कोटींचा

$
0
0

सभागृहाच्या मंजुरीनंतर केंद्राकडे पाठविणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणाचा दुसरा टप्प्याचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. १२५ कोटींचा हा विकास आराखडा (डीपीआर) असून सर्वसाधारण सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठविला जाणार आहे. एनजेएस इंडिया लिमिटेड या कंपनीने हा आराखडा तयार केला आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत रंकाळा तलावाच्या संवर्धनाकरिता निधी उपलब्धतेसाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

कोल्हापूर शहराचे सौंदर्य समजल्या जाणाऱ्या रंकाळा तलावाचे वाढते प्रदूषण हे मोठे आव्हान आहे. आसपासच्या परिसरातील सांडपाणी, तलावात टाकला जाणारा केर कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या यामुळे प्रदूषणाची तीव्रता वाढली आहे. तलावातील गाळाचे प्रमाण, जलपर्णी, प्रदूषणामुळे पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्याने तलावातील जलचरांना धोका पोहचत आहे. तलावातील मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी ड्रेनेज लाइन टाकली आहे. शाम सोसायटी ते दुधाळी पंपिग स्टेशनपर्यंत ड्रेनेज लाइन टाकली आहे. या व्यतिरिक्त देशमुख हॉलकडील नाल्यातील सांडपाणी हे ड्रेनेज लाइनला जोडण्यात आले आहे.रंकाळा तलावाचे प्रदूषण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून रंकाळा संवर्धनाचा टप्पा दोन हाती घेतला आहे. १२५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यापूर्वी महापालिकेने रंकाळा तलावाचा बॅथमेट्री व जीओ टेक्निक सर्व्हे केला आहे.

प्रस्तावित कामे

सांडपाणी प्रकिया केंद्राची उभारणी

तलावातील गाळ काढणे

रंकाळा तलाव परिसरात हेरिटेज वॉक तयार करणे

धुण्याची चावी विकसित करणे

रंकाळा संरक्षक भिंतीचे मजबुतीकरण

पदपथ तयार करणे.

असा होणार निधीचा विनियोग

तलावातील गाळ काढण्यासाठी ः ३० कोटी

सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी ः३५ कोटी

पश्चिम भागातील वसाहतीत ड्रेनेज लाइनः ३० कोटी

पक्षी निरीक्षक केंद्रासह इतर कामांसाठीः २० कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मास्टरमाइंड एकच?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे आणि प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची ज्या पद्धतीने हत्या झाली, ती पाहता या तिन्ही हत्या प्रकरणांचा मास्टरमाइंड एकच असल्याची चर्चा आता पोलिस दलात वेगावली आहे. पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेला समीर गायकवाड सनातन संघटनेशी संबधित असल्याने पोलिसांनी आता त्याच दृष्टीने इतर हत्येच्या तपासाची दिशा निश्चीत केल्याचे समजते.

दाभोलकर, पानसरे हे दोघांची हत्या सकाळी फिरायला गेल्यानंतर पाळत ठेऊन करण्यात आली. कलबुर्गी यांच्या हत्येने विशिष्ट विचारांच्या विरोधात सातत्याने लढणाऱ्यांचा गेम केला जात असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांची हत्या विशिष्ट वैचारिक भूमिकेतून झाल्याचा आरोप सातत्याने होत होता.

डाव्या चळवळीत काम करणाऱ्या अनेकांनी थेट सनातन संघटनेवर संशय व्यक्त केला होता. पानसरे आणि दाभोलकर यांची हत्या करणारे एकच आहेत असा आरोप निवृत्त पोलिस महासंचालक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केला होता. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी समीर गायकवाड यास अटक केली. समीर हा सनातनचा पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. पानसरेंना गोळ्या कोणी घातल्या हे अजून तपासात स्पष्ट व्हायचे आहे. पण तिघांची ज्या पद्धतीने हत्या झाली, ते पाहता या हत्येचा सूत्रधार, मास्टरमाइंड एकच असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी पोलिसांना या तपासाबाबत साशंकता व्यक्त केली होती. पोलिसांना या प्रकरणातील आरोपी माहिती आहेत. मात्र ते जाहीर केले जात नसल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. याबाबत पोलिस स्पष्टपणे काही सांगत नसले तरी खासगीत मात्र ते मास्टरमाइंड एकच असल्याचे बोलले जात आहे.

अटकेचा दिवस निवडला?

प्रचंड तपास केल्यानंतर संशयित पोलिसांच्या अगदी टप्प्यात आले होते. पण त्यावेळी हत्येबाबत काही उलटसुलट चर्चा घडवून आणल्या जात होत्या. त्यातून या प्रकरणात आणखी काही कंगोरे तपासण्याबाबत वरिष्ठांकडून दिलेल्या आदेशामुळे हा टप्पा पुढे ढकलला गेल्याची चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाचा पुन्हा एकदा आढावा घेऊन दिशा निश्चित केली. त्यानंतर गायकवाड व त्याच्याशी संबंधितांची त्यापुढील माहिती जमा करत अटक केली. त्यामुळे याबाबतची वरिष्ठांना माहिती देत १६ फेब्रुवारीनंतर १६ सप्टेंबर हा दिवस निवडला गेल्याचे दिसते.

चार वर्षापासून मुंबईत वास्तव्य

संशयित समीर गायकवाड याच्यावर जरी पोलिसांनी सहा महिन्यांपासून पाळत ठेवली असली तरी त्याच्या यापूर्वीचीही वास्तव्याची माहिती पोलिसांनी जमवली आहे. सनातन संस्थेचा तो पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी तो मुंबईत वास्तव्यास होता. धार्मिक पुस्तकांच्या विक्रीसाठी असलेला 'धर्मरथ' नावाची गाडी तो चालवत होता. तसेच मुंबईत तो मैत्रिणीसोबत रहात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असल्याचे समजते. तसेच चार वर्षांपूर्वीच त्याने मोबाइलचा व्यवसाय बंद केला असल्याचेही समजते. त्याला सांगलीत जरी अटक केली असली तरी तो वारंवार सांगलीला येत नव्हता हेही पोलिस चौकशीतून समोर आले आहे. जवळपास चार वर्षापासून तो मुंबईतच असून अगदी क्वचित तो येथे आला. मात्र अधूनमधून तो सांगलीला येत असावा असा पोलिसांचा कयास होता. तसेच कोल्हापुरात येऊन पानसरेंच्या निवासस्थानाजवळ किंवा कार्यालयात येऊन माहिती घेतली का याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे काही भाऊ संकेश्वर परिसरात आहेत. त्यामुळे कलबुर्गी हत्येमध्ये त्याचा काही थेट संबंध आहे का यादिशेनेही पोलिसांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images