Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सीबीएसवर बालिका सापडली

$
0
0
मध्यवर्ती बसस्थानक परिरसरात सलोनी या नावाची तीन वर्षांची बालिका मंगळवारी पोलिसांना आढळली. ‘मला आईने येथे सोडले आहे’ असे तिने पोलिसांना सांगितले.

विवेकाचा ‘रक्षाबंध’च तुटला

$
0
0
मंगळवार...रक्षा बंधनाचा सण...अंधश्रद्धांचे जोखड झुगारून विवेकाचे खंबीर संरक्षण करणारा डॉ. नरेंद्र दाभोलकररूपी धागाच तुटला.... सातारकरांसाठी मंगळवारचा दिवस अत्यंत दुःखाचा ठरला. घरातीलच एखादी व्यक्ती गेल्याची भावना साताऱ्यात पाहायला मिळाली.

उद्योगांसाठी होणार गॅसचा वापर

$
0
0
दाभोळ ते बंगळुरू मार्गावर गेल कंपनीतर्फे टाकण्यात आलेल्या गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. ही गॅस पाइपलाइन शिरोली, कागल पंचतारांकित एमआयडीसी आणि हुपरी परिसरातून गेल्यामुळे येथील उद्योजकांनी पारंपरिक दगडी कोळसा आणि वीजेऐवजी उद्योगासाठी गॅस मिळावा अशी मागणी केली आहे.

माहिती देणा-यास १० लाखांचे बक्षीस

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही राजकीय आहे. ज्या विचाराने महात्मा गांधींची हत्या केली. त्याच विचाराने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निषेध नोंदवला.

स्टार हॉटेल्सची संख्या वाढतेय

$
0
0
कोल्हापूरची प्रगती ज्या वेगाने होत आहे, त्याच वेगाने अद्ययावत हॉटेल्सची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत टू आणि थ्री स्टार कॅटेगिरीतील हॉटेल्स पर्यटकांसाठी उपलब्ध होती.

कॅन्सर अचूक निदान : ‘गॅमा रे कॅमेरा’

$
0
0
कॅन्सरचे अचूक निदान व उपचारासाठी उपयुक्त ठरेल अशा ‘गॅमा रे कॅमेरा’ या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाच्या निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आखण्यात आला आहे.

वुई वॉण्ट दाभोलकर...

$
0
0
शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी कबड्डीपटू विजय जाधव यांनी त्यांच्या संघातील एकेकाळचे सहकारी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवल्या. जाधव हे सोमवारी मुंबईला गेले होते. मंगळवारी पुण्यात नातेवाईकांकडे गेले असता त्यांना सकाळीच दाभोलकर यांच्या हत्येची बातमी समजली.

सुधारणावादी अध्वर्यू हरपला

$
0
0
विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. अहिंसावादी आणि परिवर्तनवादी नेते हरपल्यांची खंत व्यक्त करण्यात आली. अखिल भारत हिंदू महासभेच्या बैठकीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस

$
0
0
गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आल्याने गणेश मुर्तीला फिनिशींग टच देण्यासाठी कुंभारवाडे रात्र जागवू लागले आहेत. त्यामुळे शहरातील कुंभारवाड्यांमध्ये रात्रीचा दिवस होऊ लागला आहे. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण मुर्तीकामामध्ये दंग झाले आहेत.

शेतकऱ्यांचे झिरो बजेट फार्मिंग

$
0
0
रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यामुळे शेतीपुढे आणि पर्यावरणापुढे विविध प्रकारच्या समस्या उभ्या राहत आहेत, शिवाय रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

अनौरस बालकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू

$
0
0
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या, पण कायदेशीर अडचणीमुळे पुनर्वसनापासून वंचित राहणाऱ्या बालकांना हक्काचे घर व पालक मिळवून देण्यासाठी राज्यभरातील प्रकरणांची माहिती संकलित केली जात आहे.

खंडपीठप्रश्नी उद्या मेळावा

$
0
0
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा शुक्रवारी (दि. २३) शाहू स्मारक भवन येथे दुपारी बारा वाजता होणार असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव राणे यांनी दिली.

ठेकेदारांसाठी डबल धमाका

$
0
0
‘बांधा, वापरा, हस्तांतरीत करा’ या तत्वावरील टेंडरना प्रतिसाद मिळत नसल्याने ठेकेदारांना ३० ऐवजी ६० वर्षांची मुदत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

चंदगडला प्रांत कार्यालयाची मागणी

$
0
0
चंदगड तालुका हा डोंगराळ व दुर्गम असून वाडी व वस्त्यांत पसरलेला आहे. प्रांत कार्यालय गडहिंग्लजला असल्याने चंदगडहून गडहिंग्लजला जाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

निपाणीत ३ दिवसांत २१ घरफोडी

$
0
0
निपाणीच्या सहा उपनगरांत गेल्या तीन दिवसांपासून दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. या टोळीने तीन रात्रीत तब्बल २१ बंद घरे फोडली आहेत.

सत्ता उलथविण्यासाठीच भाजपचा ‘एल्गार’

$
0
0
‘यल्गार अगेन्स्ट आघाडी सरकार’ या संकल्पातून सरकारचा नाकर्तेपणा, भ्रष्ट कारभार आणि घोटाळे याबाबत जनतेत जनजागृती करण्याची मोहीम भाजप युवा मोर्चाने सुरू केली आहे.

जिल्हाध्यक्षासह ४ शिक्षक निलंबित

$
0
0
ग्रामस्थांच्या तक्रारी, बेकायदा वर्तन, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान आदी कारणांसह स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान या कारणांवरून सातारा जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक व दोन मुख्याध्यापकांना जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित बांगर यांनी निलंबित केले आहे.

हत्येची चौकशी CBI मार्फत करा

$
0
0
‘अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याने त्यांची चळवळ कमजोर होईल, असे हत्या करणाऱ्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. सर्व सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन श्रमिक मुक्ती दल अंनिसची चळवळ गतिमान करणार आहे.

कार्यकर्त्यांचा निर्धार कायम

$
0
0
‘जादूटोणाविरोधी कायद्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती यापुढे आंदोलन करणार नाही. या सरकारला अजूनही कायदा करण्याची गरज वाटत नसेल, तर त्याबाबत आता जनताच निर्णय घेईल.

इचलकरंजीतील योजनेसाठी केंद्राकडे शिफारस करावी

$
0
0
इचलकरंजी शहर आणि परिसराच्या विकासासाठी मॉडीफाईड इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन स्कीम (एमआयआययूएस) या १०० कोटी रुपयांच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावासाठी राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images