Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सर्वसामान्यांचा रेटा आवश्यक

0
0
आजरा व भुदरगड तालुक्यासाठीच्या प्रांत कार्यालयासंबंधी आमदार के. पी. पाटील लक्ष आलणार आहेत. याबाबत शुक्रवारी (ता.२३) ला दुपारी १२ वाजता आजरा तहसिल कार्यालयामध्ये बैठक होत असून यामध्ये याबाबतच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती येथील किसान भवनामध्ये झालेल्या सर्वपक्षीय सभेमध्ये देण्यात आली.

देखरेख संघाच्या जागेतील अतिक्रमण काढावे

0
0
कागल येथील हसनसो मुश्रीफ कागल सहकारी दूध संस्थेने कागल तालुका देखरेख संघाच्या मिळकत नं.भु.क्र.३४३ मधील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे.

इचलकरंजीत निषेध फेरी

0
0
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा इचलकरंजीत निषेध नोंदविण्यात आला. निषेधफेरीचे आयोजन केल्यानंतर पुरोगामी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

आयुष्याची सायंकाळ अंधारात

0
0
काठीच्या आधारे उठत पंच्याहत्तरी ओलांडलेली पत्नी थरथरत्या हाताने चहा पाजवते... घास भरवते... शेजारचं कुणीतरी भाजी आणून देतं.

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार

0
0
शिवाजी पूल येथे ट्रकने सायकलला पाठीमागून दिलेल्या धडकेत महेश अण्णासाहेब माने (वय २०, वडणगे, ता. करवीर) जागीच ठार झाला. अपघात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

छेडछाड करणा-यांना खाक्या

0
0
शिवाजी विद्यापीठ, सायबर व विवेकानंद कॉलेजसह शहरातील विविध कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बुधवारी अतिरीक्त पोलिस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंह, डीवायएसपी वैशाली माने यांच्यासह पथकाने सिव्हिल ड्रेसमध्ये टेहळणी केली.

विमानतळ विकासाला चालना शक्य

0
0
कोल्हापूरचे विमानतळ इंडियन एअरपोर्ट अथॉरिटीकडे जाणार असल्याने विमानतळ विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे विमानसेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

सरकारच्या विरोधात प्राध्यापक न्यायालयात

0
0
सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रक्कमसह विविध तेरा मागण्यांच्या सोडवणुकीसाठी चार महिने परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या प्राध्यापक संघटनेने पुन्हा एकदा लढाईच्या पावित्र्यात आहे.

भेकड राज्यकर्त्यांमुळेच दाभोलकरांची हत्या

0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार राज्य सरकारने मानला नाही. राज्यकर्ते भेकड असून केवळ ते खु्र्ची सांभाळण्याचे काम करताहेत’ असा आरोप बुधवारी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला.

आई-वडिलांकडे ‘सलोनी’ सुखरूप

0
0
नजरचुकीने मध्यवर्ती बसस्थानकावर हरवलेली तीन वर्षांची सलोनी बुधवारी आई-वडिलांच्या कुशीत सुखरुप झेपावली. तिची आई अर्चना सर्जेराव कांबळे (रा. पुलाची शिरोली, हातकणंगले) या गर्भवती असल्याने दवाखान्यात जाण्यासाठी मंगळवारी शहरात आल्या होत्या.

सागरमाळ तरुण मंडळाची ‘आयडियल’ पावती

0
0
शहिद कुंडलिक माने यांना श्रध्दाजंली, उत्तराखंडातील आपत्तीग्रस्तांना आदराजंलीसह झाडे लावा असे पर्यावरणपूरक आवाहन करणारा मजकूर व प्रतिमा सागरमाळ तरुण मंडळाने गणेशोत्सव वर्गणीच्या पावतीवर साकारली आहे.

अव्वल कारकून नियुक्तीच्या प्रमाणात वाढ

0
0
अव्वल कारकून पदसंख्येतील वाढ विचारात घेऊन अदलाबदलीने नियुक्तीच्या प्रमाणात वाढ करण्याबरोबरच महसूल विभागाकडील सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याची तसेच अन्य मागण्या सरकारकडून तत्वतः मान्य करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साखर वाटून महसूल कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

तीन कोटींची पिके पाण्यात

0
0
जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे आणि नदीकाठच्या भागातील पूरस्थितीमुळे ७ हजार २३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सेंट्रल किचन सिस्टीम हाच पर्याय

0
0
माध्यान्ह भोजनातील विषबाधा टाळण्यासाठी आणि मु्ख्याध्यापकांना जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी सेंट्रल किचन सिस्टीमची गरज आहे.

पी. एन. पाटील यांनी ठोकला शड्डू

0
0
नाही, नाही म्हणत अखेर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यांनी मारलेल्या उमेदवारीच्या या बाणाने आमदार महादेवराव महाडिक व धनंजय या काका-पुतण्यांना घायाळ होण्याची वेळ आली आहे.

‘पीएचडी’ला नियमांचा फटका

0
0
शिवाजी विद्यापीठातर्फे २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेतंर्गत गुणवत्ता यादीत काही त्रूटी निर्माण झाल्या आहेत.

यंदाही ५००० खड्डे

0
0
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात पडलेले रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

१८० टँकर तवंग उपसला

0
0
रंकाळा तलावातून गेल्या दहा दिवसांत मैला सक्शनव्दारे १८० टँकर हिरवा तवंग बाहेर काढण्यात आला आहे. गुरूवारपासून (दि. २२) मड पंपाव्दारे काम सुरू करण्यात येईल.

कोल्हापूर विमानतळ अखेर ‘रनवे’वर

0
0
कोल्हापूर विमानतळ अखेर रनवेवर येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने जुलै महिन्यात कोल्हापूर विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे (एएआय) हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला.

पेपर क्विलिंग आर्ट

0
0
एखादी कला शिकणे आणि ती छंद म्हणून पुढे जोपासणे असे बरेचजण करतात. मात्र हा छंदच जर व्यवसाय बनला तर त्यापेक्षा अधिक चांगले काही नसते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images