Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या

$
0
0
कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असून कोल्हापूरच्या जागेसाठी मीही पात्र आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनीही उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. दोन्ही काँग्रेस दोन्ही मतदार संघावर हक्क सांगत असल्याने हा वाद आतापासूनच रंगण्यास सुरुवात झाली आहे.

पोलिसांना ‘पीएसआय’चे वेध

$
0
0
भल्या भल्या चोरांना घाम फोडणाऱ्या पोलिस‘दादां’नाच सध्या घाम फुटलाय. तो एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा गुन्ह्यामुळे नव्हे, तर एका साध्या परीक्षेमुळे. पोलिस खात्यात काम करणाऱ्यांना बढती मिळावी म्हणून ही परीक्षा घेतली जाते.

शिक्षकांची ऑक्टोबरमध्ये निदर्शने

$
0
0
विद्यार्थ्यांना दर्जेदार माध्यान्ह भोजन देण्यासह तामिळनाडू येथील व्यवस्थेप्रमाणे सक्षम यंत्रणा निर्माण करावी, यासह अन्य मागण्यांसाठी येत्या २१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत निदर्शने केली जाणार आहेत.

‘सुटा’ची निदर्शने

$
0
0
कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ. विद्युल्लता निळेकर या काही प्राचार्यांच्या प्रभावाखाली कारभार करत आहेत. प्राचार्यांतर्फे, प्राध्यापकांच्या सेवाशर्तीबाबत शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे मार्गदर्शन मागण्यात येते. प्राध्यापकावर कारवाई करण्यासाठी त्या मार्गदर्शन पध्दतीचा दुरूपयोग केला जातो.

सद्‍भावना दौड’

$
0
0
झांजपथकाचा ताल, मोटरसायकल रॅली, राजीव गांधींचा जयघोष अशा वातावरणात राजीव गांधी यांच्या ६९ जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सदभावना रॅलीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सदभावना दौडसाठी ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

कोल्हापूरला धक्का

$
0
0
‘साधना’चे संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने कोल्हापूरला मोठा धक्का बसला आहे. अत्यंत निष्ठेने सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या डॉक्टरांसारख्या विज्ञाननिष्ठ आणि निःस्पृह कार्यकर्त्यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला का‌ळिमा फासणारी आहे.

‘मटा’चा आज पहिला वर्धापनदिन

$
0
0
करवीर नगरीतील सुजाण वाचकांचे प्रेम आणि पाठबळावर दमदार वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र टाइम्सचा आज (दि. २१) पहिला वर्धापनदिन आहे.

कडकडीत बंद, निषेध फेरी

$
0
0
महाराष्ट्राला पुरोगामी दिशा दाखविणा-या विचारवंताची पुण्यात हत्या झाल्याचे समजताच साताऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सातारकरांनी कडकडीत बंद पाळला, निषेध फेरी काढण्यात आली.

सांगलीतही तीव्र निषेध

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मंगळवारी सांगलीत विविध पुरोगामी संघटना आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.

वारकरी संप्रदायाकडून दाभोलकरांच्या हत्येचा निषेध

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा वारकरी संप्रदायातून तीव्र निषेध करण्यात आला. अंधश्रद्धा विधेयकाबाबत वारकरी संप्रदाय आणि दाभोळकर यांच्यात तीव्र वैचारिक मतभेद होते.

कराडमध्ये झोपडपट्टीत भीषण आग

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाउन हॉल परिसरातील वारांगणांच्या झोपडपट्टीस सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला.

लाभार्थींची यादी अद्ययावत हवी

$
0
0
ज्या शाळांत विद्यार्थी घरातून दुपारच्या जेवणाचे डबे आणतात. त्या ठिकाणी शालेय पोषण आहाराची गरज नाही. खिचडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांची खरी यादी अपडेट होणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा पोशिंदा हरपला

$
0
0
कुशल संघटक, परखड वक्ता आणि कोणत्याही सामाजिक प्रश्नाला मूळापासून भिडण्याची वृत्ती असणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणजे सामाजिक आणि परिवर्तनवादी चळवळींमध्ये काम करणा-या लाखो कार्यकर्त्यांचा पोशिंदा होते.

‘पुरोगामी विचारांवरील हल्ला’

$
0
0
ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर यांची हत्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांवर हा हल्ला असून, कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

पी.एन.-सतेज यांची ठरवून खेळी

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये उमेदवारांची चणचण नसून सतेज पाटलांनी नकार दिल्यास मी लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमोर जाहीर केले.

जमीन सुधारणेची गरज नाही

$
0
0
‘नवीन जमीन सुधारणा कायद्याच्या निमित्ताने जनतेत संभ्रम निर्माण झाला असून महाराष्ट्राला या नवीन कायद्याची आवश्यकता नाही,’ अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथमच मांडली.

महसूल कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन मागे

$
0
0
विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून चालवलेले बेमुदत काम बंद आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या मागण्या मंत्रिमंडळासमोर ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले आहे.

‘कळंबा’ संवर्धनासाठी १० कोटी

$
0
0
कळंबा तलाव सुशोभिकरण व संवर्धन करण्यासाठी दहा कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केली.

सामाजिक संघटनांची बिंदू चौकात निदर्शने

$
0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सामाजिक संस्था, संघटनांनी मंगळवारी बिंदू चौकात निषेध सभा घेऊन निदर्शने केली.

‘रिक्षा बंदमध्ये कोल्हापूर नाही’

$
0
0
मुंबई व अन्य जिल्ह्यात रिक्षा भाडेवाढीसाठी पुकारलेल्या बंदमध्ये कोल्हापुरमधील रिक्षा सहभागी नाहीत. येत्या २२ ते २४ ऑगस्टच्या दरम्यान हा बंद पुकारला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images