Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘टक्केवारी हवी तर, टेंडर भरणार नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विविध कामांच्या निविदा मंजूर करण्यापासून ते धनादेश काढेपर्यंत आर्थिक व्यवहार केले जातात, यामध्ये ४० ते ५० टक्के इतका खर्च होतो. त्यामुळे कामाची गुणवत्ता राखली जात नाही. परिणामी मक्तेदारांना नागरीक व प्रशासनाचा रोष पत्करावा लागतो. त्यामुळे टक्केवारी कमी करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांसाठी शनिवारपासून आपली कामे बंद ठेवण्याचा तसेच नवीन निविदाही न भरण्याचा निर्णय मक्तेदारांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून मक्तेदारांची १० कोटी रुपयांची बिले थकीत असून ती लवकर मिळावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नगरपालिका प्रशासनाकडून बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य आदी विभागाची कोट्यवधी रुपयांची कामे मक्तेदारांमार्फत केली जातात. ही कामे करताना मक्तेदारांना प्रत्येक ठिकाणी आर्थिक तडजोड करावीच लागते. हा प्रकार केला नाही तर मक्तेदारांना पदाधिकारी व प्रशासनाकडून धारेवर धरले जाते. शिवाय धनादेशही काढतानाही अडवणूक केली जाते. या प्रकारास सर्वच मक्तेदार त्रासले आहेत. हा त्रास कमी व्हावा वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे सर्व मक्तेदारांनी बुधवारी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, सागर चाळके, बांधकाम समिती सभापती भाऊसो आवळे यांची भेट घेतली. या बैठकीत मक्तेदारांनी टक्केवारी कमी करावी, असा आग्रह धरला. याशिवाय प्रत्येक ठिकाणी मक्तेदारांना त्रास दिला जातो, तो कमी करावा आणि थकीत बिलांचे धनादेश विनाविलंब काढण्यात यावेत, आदी मागण्या केल्या. मात्र पदाधिकाऱ्यांकडून त्यांना समर्पक उत्तरे मिळू शकली नाहीत.

मक्तेदारांनी या प्रश्नावर संयुक्तपणे चर्चा करुन यापुढे पालिकेचे कोणतेही काम करायचे नाही. तसेच नवीन निविदाही भरावयाच्या नाहीत असा निर्णय घेतला. हा निर्णय झाल्यानंतर मक्तेदारांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पक्षप्रतोद रवींद्र माने, अशोकराव जांभळे, सागर चाळके यांची भेट घेऊन त्यांना आपला निर्णय तोंडी स्वरुपात सांगितला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूबाबत दक्ष राहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात दिवसेंदिवस स्वाइन फ्लू डोके वर काढत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी वेळीच काळजी घ्यावी. यासाठी सरकारच्यावतीने गर्दी ठिकाणी तसेच ग्रामीण व शहरी भागात जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. साठे म्हणाले, 'स्वाइन फ्लूचे १९१ रुग्ण संशयित आढळले असून, ८५ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. या दरम्यान कोल्हापूर, सांगाली आणि सातारा जिल्ह्यातील २१ रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावले आहेत. यात सर्वाधिक १५ रुग्ण कोल्हापुरातले दगावले आहेत. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांवर योग्य उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, उपजिल्हा रुग्णालय कोडोली, वसाहत रुग्णालय गांधीनगर आणि सेवा रुग्णालय कसबा बावडा या चार उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोय करण्यात आली आहे.

स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून, शहरात आयसोलेशन हॉस्पिटल, अॅपल सरस्वती, अॅस्टर आधार, सिद्धीविनायक, मोरया, डी.वाय.पाटील, इचलकरंजीमध्ये आय.जी.एम. रुग्णालय तसेच ग्रामीण भागात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ ग्रामीण रुग्णालये तसेच चार उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शाळा, सिनेमागृह येथे स्वाइन फ्लूबाबत माहिती दिली जाणार असून, स्वाइन फ्लूबाबत पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे.' यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. देशमुख, उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे उपस्थित होते.

शाळांनी घ्यावयाची काळजी

वर्ग सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांपैकी कोणी फ्लूच्या लक्षणांनी ग्रस्त नाही ना याची पाहणी करावी. सर्दीसह अल्पज्वर, अंगदुखीसह घसा खवखवणे, डोकेदुखी, उलट्या व जुलाब यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. असा विद्यार्थी आढल्यास शाळेच्या वैद्यकीय विभागाकडे पाठवून संबंधित विद्यार्थ्यास सात दिवस घरी राहण्याचा व जनसंपर्क टाळण्याचा सल्ला द्यावा.

स्वाइन फ्लूची लक्षणे

ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, डोकेदुखी.

रोग टाळण्यासाठी

सातत्याने हात साबणाने धुवून स्वच्छ ठेवा, पौष्टिक आहार घ्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या अशा पदार्थांचा आहार घ्या. धूम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या, मधुमेही, ह्दयरोगी, वयस्कर, लहान मुले, गरोदर महिला यांची विशेष काळजी घ्या.

अशी घ्या दक्षता

हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका, फ्लूसदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, खोकताना, शिंकताना, जांभई देताना तोंडावर, नाकावर हातरूमाल किंवा मास्क वापरा, समतोल व सकस आहार घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मारहाण

$
0
0

कोल्हापूर : गणेशोत्सवाची वर्गणी देण्यावरून झालेल्या वादातून शिवाजी स्टेडियमजवळील हिंद स्टेशनरीची नासधूस तसेच दुकानदाराला मारहाण करण्याचा प्रकार सायंकाळी घडला. यामध्ये अझरुद्दीन अल्ताफ मोमीन (वय ३०, रा. मंडलिक वसाहत) जखमी झाले असून त्यांच्या भावाने पाटाकडील तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याची माहिती पत्रकारांना सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यात आली नव्हती.

मोमीन यांचे शिवाजी स्टेडियमजवळ हिंद स्टेशनरी हे दुकान आहे. सायंकाळी काही तरुण वर्गणी मागण्यासाठी त्यांच्या दुकानात गेले होते. त्यावेळी त्या तरुणांनी जादा रुपयांची वर्गणी देण्याची मागणी केली. मोमीन यांनी ती मान्य न केल्याने तरुणांच्या या गटाशी त्यांची वादावादी झाली. त्यातून तरुणांनी दुकानातील साहित्य विस्कटले. तरुणांनी केलेल्या मारहाणीत मोमीन यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना सीपीआरमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले. दुकानातून मंडळाचे पावती बुक पोलिसांनी जप्त केल्याचे समजते; पण रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगतकर हिमनगाचे एक टोक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवशाहू मागासवर्गीय गृहनिर्माण औद्योगिक सहकारी संस्थेला जमीन विक्री करण्याची परवानगी देण्यासाठी लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्याचे सहकार उपनिबंधक सुनील सिंगतकर शनिवारी दोन सहकाऱ्यांसह लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारी प्रकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यातील सिंगतकर हिमनगाचे टोक असून, सहकारातील 'दुकानदारी' सांभाळणारे अनेक जण मोकाटच असल्याची चर्चा आहे.

सिंगतकर यांच्या रूपाने एक मासा गळाला लागला असला, तरी असे अजून अनेक बडे मासे उजळ माथ्याने मोकाट फिरत आहेत. सिंगतकर यांच्या अटकेने सहकार क्षेत्रातील 'खाबुगिरी' मात्र चव्हाट्यावर आली असली, तरी अशा बड्या धेंडांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील शिवशाहू मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला वीस गुंठे जमीन प्रकल्पासाठी दिली होती. मात्र, तांत्रिकदृष्ट्या प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने आणि देणी भागविण्यासाठी संस्थेने जमीन विक्रीची परवानगी मागितली होती. यासाठी सिंगतकर याने दहा हजारांची लाच मागितली होती. देणेकरांना वायदा देऊन हताश झालेल्या संचालकांनी थेट लाचलुचपत खात्याशी संपर्क साधला. दोनवेळा पैसे स्वीकारण्यास नकार दिलेल्या सिंगतकरने कार्यालयातील सहकारी संजय थैल याच्याकरवी लाच स्वीकारली. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी खासगी वाहनचालकासह काल रात्री सिंगतकरसह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पुणे येथील फ्लॅटची झडती घेतली. झडतीमध्ये ऐवज सापडल्याची माहिती अद्याप समोर आली नसले, तरी यामुळे सिंगतकरांची 'काळी' कारकीर्द समोर आली आहे.

सिंगतकर नोकरीमध्ये वादग्रस्त ठरले होते. तशा तक्रारीही सहकार खात्याकडे दाखल झाल्या होत्या. अमरावती बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्त असताना केलेल्या गैरप्रकारामुळे त्यांना निलंबित केले होते. तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या आशीर्वादाने पुणे येथील साखर संकुल कार्यालयात त्यांनी वर्णी लावून घेतली. तेथून धुळे येथे बदली झाल्यानंतर तेथील पदाचा कार्यभार न स्वीकारता ते रजेवर गेले होते. त्यानंतर पुन्हा आपली जुनीच पद्धत वापरत करवीरचे सहायक निबंधक म्हणून ते रुजू झाले. तीन वर्षाच्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीचे अनेक किस्से चर्चिले जात होते. हातकणंगले येथे उपनिबंधक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कारभाराच्या तक्रारी थेट मुख्यमंत्र्यांकडे झाल्या होत्या. सहकारी संस्थांच्या वार्षिक सभेला उपस्थिती लावत ते हजारापासून पाच हजारांपर्यंत भत्ता उकळत असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल होत्या, जिल्हा उपनिबंधकपदी वर्णी लागण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आजही चर्चेत आहे.

बिनविरोध संस्थांकरून वरकमाई

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका लागल्या होत्या. काही संस्था बिनविरोध करण्यात संस्थाचालकांना यश आले होते. मात्र, बिनविरोध झालेल्या संस्थांकडून निबंधक कार्यालयातील एक कर्मचारी वरकमाई देण्यासाठी 'हात' मारत असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र, संस्था बिनविरोध होत असताना जिल्ह्यातील काही आजी-माजी आमदारांनी कान धरल्यानंतर या महाशयांनी नमते घेतल्याची चर्चाही निवडणुकीदरम्यान होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहांचे डर्टी पिक्चर

$
0
0

janhavi.sarate@timesgroup.com

धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत 'स्मार्ट' असलेले कोल्हापूर स्वच्छतागृह पुरविण्यात मात्र फेल ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शहरात उभारण्यात आलेल्या फायबरच्या स्वच्छतागृहांत पुरेसे पाणी, औषध फवारणी होत नाही. अस्वच्छतेमुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असताना शहरात विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना स्वच्छतागृहांची सुविधा मिळत नाही. महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शहरातील महिलांनी आवश्यक तेथे स्वच्छतागृह उभारण्याची मागणी लावून धरली आहे. महापालिका निवडणुकीच्या वातावरणात महिलांनी स्वच्छतागृहाचा मुद्दा अनेक ठिकाणी मांडला. परंतु आपल्या परिसरात स्वच्छतागृह नको म्हणत विरोध होत असल्यामुळे आणि त्यासाठीच्या पुरेशा निधीच्या अभावी शहरात अजूनही महापालिकेला कायमस्वरूपी स्वच्छतागृह उभारता आलेले नाही.

महापालिकेतर्फे शहरात ४० ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी १७ ठिकाणी फायबर स्वच्छतागृह उभारली आहेत. त्यासाठी १५ लाखांचा निधीही खर्च करण्यात आला. अंबाबाई मंदिर, सिद्धाळा गार्डन, फुलेवाडी, शहर वाहतूक शाखा दसरा चौक, पद्माराजे गार्डन, जुना वाशी नाका, मंगेशकर गार्डन, यल्लमा मंदिर परिसर, रविवार पेठ, तपोवन ग्राउंड, फुलेवाडी दत्तमंदिर मागे, बापट कॅम्प, शाहू मैदान बस स्टाँप, सासने ग्राऊंड शेजारी फायबरची स्वच्छतागृहे बसविली आहेत. मात्र यापैकी तीन ते चार स्वच्छतागृहे सोडली तर शाहू मैदान, न्यू शाहूपुरी यासह इतर ठिकाणाची स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली आहेत. देखभालीचा अभाव आणि लोकांची मानसिकता यामुळे शहरात उभारण्यात आलेली १७ स्वच्छतागृहे काही महिन्यातच मोडकळीस आलेली आहेत.

जिल्ह्यात महिलांची संख्या १९ लाखांहून अधिक असून त्यापैकी ७० टक्के महिला नोकरी, भाजीविक्री व्यवसाय, हॉस्पिटल यानिमित्ताने घराबाहेर पडत असते तर महिला पर्यटकांची संख्याही तुलनेत अधिक आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तरी २०११ च्या जनगणनेनुसार ती ५ लाख ६१ हजार ८४१ आहे. त्यामध्ये पुरुषांची संख्या २ लाख ८७ हजार ३७६ तर महिलांची २ लाख ७४ हजार ४६५ आहे. त्यामुळे शहरात लाखाच्या घरात महिलांचा वावर होत असतानाही अद्यापही महापालिकेला कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधता आलेले नाही.

कर्नाटकमध्ये प्रत्येक स्टँड परिसरात स्वच्छतागृह असून ती स्वच्छ आहेत. मात्र कोल्हापुरात स्वच्छतागृहांअभावी महिलांची खूपच कुचंबणा होते. मार्केट, महाव्दार रोड,गार्डन, धार्मिक स्थळे या ठिकाणी पूरक स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे.

- समृद्धी प्रभू

सध्या जी फायबरचे स्वच्छतागृहे आहेत त्याचा महिला फार वापर करत नाहीत, अगदी नाईलाजास्तव तो काही ठिकाणी केला जात आहे. मुलांना शाळेत सोडायला गेले असता त्या परिसरात किंवा भाजी मार्केटमध्ये कायम स्वरूपाची स्वच्छतागृह उभारण्याची आवश्यकता आहे. अंबाबाई मंदिरात असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर पैसे देऊन करावा लागतो.

-स्वाती काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक किलो सोन्यासह चोरटे अटकेत

$
0
0

कुपवाड : आठवड्यापूर्वी रत्नागिरी परिसरात आराम बसमधून एक किलो सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली. विलास रामदास पवार (वय २६) आणि हिरामण सर्जेराव डिकोळे (वय २७) माढा (सोलापूर) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनी रविवारी दिली.

मुंबईतील सराफ व्यापारी राकेश महेंद्र जैन २२ ऑगस्ट रोजी रत्नागिरी ते मुंबई असा आराम बसमधून प्रवास करीत होते. त्यावेळी संगमेश्वर (रत्नागिरी) पोलिस ठाण्याच्या हद्दीतून त्यांची २८ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड असलेली बॅग चोरीला गेली होती. या चोरीचा तपास सुरू असतानाच सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना एका स्कार्पिओमधून संशयित दागिने विक्रीसाठी सांगलीत येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सराफ पेठे पोलिसांनी सापळा लावला होता. त्यावेळी पवार आणि डिकोळे हे दोघे एक किलो सोन्याच्या दागिन्यासह सापडले. पोलिसांनी दागिन्यांबरोबरच त्यांच्याकडून २३ हजार रुपयांची रक्कम आणि स्कार्पिओ जप्त केली आहे.

पोलिस निरीक्षक घनवट, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार अरुण टोणे, अशोक डगळे, जितेंद्र जाधव, बिरोबा नरळे, संदीप मोरे, संदीप गुरव, अझहर पिरजादे या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर पोलिसांचे पथक धारवाडला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धारवाड येथे प्रसिद्ध कन्नड विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी व येथील ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या पद्धतीत साधर्म्य दिसून येत असल्याने कोल्हापूर पोलिसांचे एक पथक रविवारी तातडीने धारवाडला रवाना झाले. या पथकाकडून कलबुर्गींवर झालेल्या हल्ल्याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यातून पानसरेंच्या हल्लेखोरांबाबतची काही माहिती मिळू शकते का? याचा शोध घेण्यात येणार आहे.

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यानंतर मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी कलबुर्गी यांचीही त्याच पद्धतीने गोळ्या झाडून हत्या केली. या हल्लेखोरांच्या हल्ल्याचे पानसरे यांच्या हल्ल्याशी साधर्म्य दिसून येत असल्याने तातडीने एक पथक धारवाडला पाठवले आहे. या पथकाकडून कलबुर्गी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची, त्यामध्ये मोटसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांच्या वर्णनाची माहिती घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पानसरे यांच्या संशयित हल्लेखोरांशी काही माहिती जुळते का, याचा तपास करण्यात मदत होणार आहे.

पानसरे यांच्यावरील हल्ल्याला सहा महिने झाले असून, पोलिसांनी संशयित हल्लेखोरांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. कर्नाटकची हद्द कोल्हापूरपासून जवळ असल्याने मोटरसायकलवरून आलेले हल्लेखोर कर्नाटकच्यादिशेने पळून गेल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार पानसरे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज व कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले होते. याशिवाय कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील सीमेवरील ११ जिल्ह्यांच्या अधीक्षकांशी संपर्क करून त्यांच्याकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याकरिता यापूर्वी गोव्यातील बॉम्बस्फोटामधील संशयित आरोपींचे कोल्हापूर कनेक्शनही कारणीभूत होते. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पानसरे यांच्या हल्ल्याच्या प्रकाराला पोलिसांकडून उजाळा दिला जात असून, त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅटऱ्या चोरणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेठवडगाव, शिरोली व पंचतारांकित एमआयडीसीच्या परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केली. त्यांच्याकडून ४१ बॅटरी, स्कॉपिओ, मारुती कार, एस्टीम, व्हॅन अशा चार वाहनांसह सात लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. अकरा जणांच्या टोळीने दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

एमआयडीसीच्या परिसरात रात्री ट्रक, ट्रॅक्टर अशा वाहनांमधील बॅटरी चोरीस जात होत्या. त्याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने खास पथके तयार केली होती. त्या पथकांच्या माहितीतून जवाहरनगरमधील शंकर शामराव भास्कर हा साथीदारांसोबत शहराच्या परिसरातील गावांमध्ये जाऊन बॅटरी चोरी करत असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार एका पथकाने शनिवारी खडीच्या गणपतीजवळ भास्कर, राजू उदयसिंग बागडे (रा. खणभाग, जवाहरनगर), सिकंदर किंगकाँग गागडे ( रा. राजगुरुनगर, राजेंद्रनगर), संदीप बुद्धिसिंग मिणेकर (रा. राजगुरुनगर, राजेंद्रनगर) यांना बॅटरी विकण्यासाठी गोकुळ शिरगावकडे जात असताना दुपारी पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वडगाव, एमआयडीसी, दोनवडे, वाकरे, रंकाळा अशा विविध परिसरातील वाहनांमधील बॅटरी चोरल्या असल्याची कबुली दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंतप्रधानांच्या भाषणाची शाळांना पुन्हा सक्ती‌

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विविध माध्यमांतून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याची सक्ती केली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षक दिन साजरा होणार असून, पंतप्रधानांनीही शिक्षकांची 'मन की बात' जाणून घेण्याची आवश्यकता आहे.

यंदा शिक्षक दिन शनिवारी असल्यामुळे शुक्रवारी, ४ सप्टेंबरला सकाळी १० ते ११.४५ या वेळेत पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे. याचे प्रक्षेपण विविध माध्यमांमार्फत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांनी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असून, त्यानुसार काही दिवसांत तो अहवालही सरकारला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्याध्यापक, शिक्षकांनी पंतप्रधानांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकण्याची सोय व्हावी म्हणून एज्युसेंटमार्फत तसेच ज्या उपकरणांवर इंटरनेटची सुविधा आहे, अशा लॅपटॉप, मोबाइल या साधनांचा वापर करावा. अतिदुर्गम भागात दूरदर्शनची सुविधा उपलब्ध नसेल त्या ठिकाणी रेडिओ अथवा ट्रान्झिस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

याचबरोबर त्या-त्या शाळांनी या भाषणाबाबतचा अहवाल पाठवायचा असून, या अहवालामध्ये जिल्हा, शाळांची संख्या, शाळेमध्ये भाषण ऐकण्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध केली, शिक्षकांची संख्या, एकूण विद्यार्थी, भाषणास उपस्थित असलेले विद्यार्थी व शिक्षकांची संख्या अशी एकत्रित माहिती शाळांनी भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता ४ सप्टेंबरची तयारी शाळांमध्ये सुरू झाली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगाच्या मांजाने विद्यार्थिनी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कार्वेनाका परिसरात रस्त्यावरून चालत निघालेली विद्यार्थिनी पतंगाचा मांजा कापल्याने गंभीर जखमी झाली. मुलीच्या गळ्याला मांजा कापला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पतंगाच्या चायनीज मांजावर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा समोर आली आहे.

कार्वेनाका परिसरातील सुमंगलनगर येथे असलेल्या एका मैदानावर सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काही मुले पतंग उडवीत होती. या वेळी मैदानाजवळील रस्त्यावरून निघालेल्या शाळकरी मुलीच्या गळ्याला पतंगाच्या मांजाने वेढा दिला. त्यामुळे तिच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने ती जखमी झाली. हा प्रकार पाहिल्यानंतर काही जण तेथे आले. त्यांनी तातडीने तिच्या गळ्याभोवती गुंडाळला गेलेला मांजा काढून टाकला. मात्र गळ्याला जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. मुलीला वेणूताई चव्हाण उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, संबधित मुलीच्या आईने पतंग उडविणाऱ्या मुलांच्या घरी जावून त्यांच्या पालकांना या बाबतची माहिती दिली. पालक त्यांच्या मुलांना पतंग उडविण्यापासून परावृत्त करतील अथवा समज देतील, अशी जखमी मुलीच्या आईची अपेक्षा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे अखेर संबंधित मुलीच्या आईने शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल झाली नाही. मात्र, पोलिसांनी संबंधित मुलांच्या घरातील फोनवर संपर्क साधत त्यांच्या पालकांना फोनवरून तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना घरी पाठवून तोंडी समज दिली.

फलटण येथे काही दिवसांपूर्वी मांजाने गळा चिरल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात घडलेल्या या घटनेची नागरिकांनी गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व प्रशासनाने कराड परिसरात पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या चायनीज मांजावर बंदी घालत त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी वसुलीसाठी कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

राज्य सरकारने एलबीटी भरण्यासाठी जाहीर केलेल्या 'अभय' योजनेची मुदत सोमवारी संपल्याने मंगळवारपासून एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचे एलबीटी अधीक्षक रमेश वाघमारे यांनी सांगितले.

वाघमारे म्हणाले, 'शहरातील २०० हून अधिक व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्याची कारवाई केली जाईल. आतापर्यंत दंड-व्याज सोडून अंदाजे १०७ कोटीची तूट एलबीटी वसुलीत आली आहे. सरकाने मागचा थकित एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांना ही अभय योजना जाहीर केली होती. तरीही बऱ्याच व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा केला नाही. आता त्यांच्यावर कारवाई करून एलबीटी वसूल करणे एवढेच आमच्या हाती राहिले आहे.'

महापालिका हद्दीतील एलबीटी न भरणाऱ्या १३३ व्यापाऱ्यांना जप्तीच्या नोटिसा आधीच दिल्या आहेत. ६२ दुकानांचे तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तर ५३ व्यापाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. यापुढे नोटिसा बद, फक्त कारवाई सुरू, हे प्रशासनाचे धोरण राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप हंगाम गेला वाया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराडसह पाटण तालुक्यात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. यापुढेही पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने संपूर्ण खरीप हंगामच वाया जाणार आहे.

कराडचा पूर्व भाग वगळता उर्वरीत कराडसह पाटण तालुके हे प्रचंड पर्जन्यवृष्टीचा तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांत प्रतिवर्षी पूर, महापुराचे संकट ओढवले जाते. कराडचा काही भाग व पाटण तालुके दुर्गम व डोंगराळ असल्याने येथे भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या वर्षीही भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग आदी पिकांची पेरणी, टोकणी झाली आहे. मात्र, जूनच्या प्रारंभी पडलेल्या पावसावरच येथील खरीप हंगामातील ही सर्व पिके आजअखेर तग धरून राहिली आहेत. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील हातातोंडाला आलेली पिके सध्या पडणाऱ्या उन्हामुळे करपू लागली आहेत.

दरम्यान, पावसाने चांगलीच दडी मारल्याने व उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भात, सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून, ज्वारी, भुईमुगाने माना टाकल्या आहेत. पावसाच्या उघडीपीमुळे भात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीचे पीक फुलोऱ्यात कुचमले आहे तर इतर पिके करपून, वाळून गेली आहेत. शिवाय ऊसावर लोकरी मावा पडला आहे. सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्यातील बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. सणासुदीच्या काळात महागाईने तोंड वर काढल्याने जनता त्रस्त झाली आहे. खरीप हंगामातील हाता-तोंडाला आलेले सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार का? सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस हजेरी लावणार का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभे राहिले आहेत. गणेशोत्सव जवळ आला असून, बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. एकूणच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

$
0
0

sachin.yadav@timesgroup.com

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळ सुरु आहे. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभाग, विद्यापीठातील कर्मचारी यांच्यातील वाद आणि असमन्वयचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी याबाबत ठोस कारवाईची भूमिका घेण्याची गरज आहे. जबाबदारी झटकणारे अधिकारी, नियोजनाचा वाजलेला बोजवारा, कर्मचारी अधिकारी यांच्यातील वाद, काही अधिकाऱ्यांची अरेरावीची भाषा, महिला कर्मचाऱ्यांना दिली जात असलेली उद्धट वागणूक या कारणांचा थेट फटका विद्यापीठाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. स्पेशल कॅम्प घेऊन प्रकरणाचा निपटारा अत्यावश्यक आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे. विद्यापीठातील ४७ अभ्यासक्रमाच्या निकालात अजूनही दोष आहेत. सेमिस्टरच्या सहा विषयांची परीक्षा देऊनही पाच विषयांचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी उत्तीर्ण असूनही मार्कलिस्टमध्ये अनुत्तीर्ण अशी छपाई झाली आहे. पुनर्परीक्षणासाठी फोटोकॉपीसाठीही महिभावर वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे सुमारे वीस हजार विद्यार्थी हवालदिलच आहेत. काही विद्यार्थ्यांना कॉलेजने तात्पुरते प्रवेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या वारंवार होत असलेल्या तक्रारीमुळे काही जबाबदारी अधिकारी आणि कर्मचारी रजेवर जात असल्याचे प्रकार शिवाजी विद्यापीठात सुरु आहे. शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा विभाग, संगणक विभाग, एमकेसीएल मध्ये समन्वय नाही. कामकाज सुरळीत होण्यासाठी संगणक विभागाची कनेक्टिव्हीटी परीक्षा विभागाकडे केली आहे. . थेट विद्यार्थी रस्त्यावर येऊन विद्यापीठ प्रशासनावर राग काढण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोन वेळा घडल्या. ट्रान्सफर सर्टिफिकेट देत नसल्याच्या कारणावरुन एका विद्यार्थ्याने परीक्षा भवनातील डिजिटल युनिर्व्हसिटी डिजिटल कॉलेज कक्षातील (डीओडीसी) काच फोडली. तर सोमवारी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनाचा फलक फोडून घोषणाबाजी आणि मोर्चा काढला.

शिवाजी विद्यापीठाने पदवीच्या पहिल्या वर्षाचे परीक्षेचे कामकाज एमकेसीएल कडून काढून घेतले. पीएचडी आणि एम. फिल परीक्षेचे कामकाजही ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यात आले. विद्यापीठाने बदलाचे पहिल पाऊल टाकले असले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तक्रारीचा ओघ मात्र कायम आहे. एमकेसीएल रोजदांरी कर्मचारी असल्याने उत्तरदायित्व घेण्यास कोणीही पुढे येत नाही. परीक्षा भवन आणि कंम्प्युटर विभागातील अंतर्गत वादामुळे परीक्षांची कामे रेंगाळली आहेत.

विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न येत्या काही दिवसांतच मार्गी लागतील. त्यासाठी परीक्षा विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. कंम्प्युटर आणि परीक्षा दोन्ही विभागाकडून युद्धपातळीवर काम सुरु आहे.

- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक

विद्यार्थ्यांच्याकडून वारेमाप शुल्क आकारले जाते. मार्कलिस्ट कोणती यंत्रणा देते, त्याबाबत विद्यार्थ्यांना काही देणे घेणे नाही. विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.

- प्रवीण पाटील, विद्यार्थी

या सर्वांच्या पाठीमागे एमकेसीएल आहे. त्यांनी केलेल्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. एमकेसीएल कडूनच कामे करुन घेण्यासाठी काहींचे आर्थिक हित आहे.

- अमित कुलकर्णी, सिनेट सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडला तो चोर...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

सापडला तो चोर... या उक्तीप्रमाणे उपनिबंधक सुनील सिंगतकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर चर्चेला ऊत आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबड उडाली असून गोरगरीबांना चिरीमिरीसाठी त्रास देणाऱ्या अशा अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. मात्र, सहकारासह महसूल विभागातही असे अनेक मासे अद्यापही आपले हात साफ करून घेत आहेत. हातकणंगले तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत लाचलुचपत विभागाने केलेली पाचवी कारवाई आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात सधन तालुका म्हणून हातकणंगले गणला जातो. त्यामुळे याठिकाणी सर्वच विभागात काम करणेसाठी किंवा येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागलेली असते. तसेच महत्त्वाच्या महसूल, महावितरण, सहकारी संस्था, पोलिस अशा सर्व खात्यामध्ये नियुक्ती होण्यासाठी अधिकारी वर्ग राजकीय वजन वापरून आपली नियुक्ती करून घेत मोठया प्रमाणावर मलिदा मिळविला जातो. जानेवारीमध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता सागर शिवाजी कांबळे याला एक हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. कबनूरचा मंडल अधिकारी हंबीरराव हिंदूराव संकपाळ व त्याचा पंटर शीतल नरसिंगा बेनाडे या दोघांना दोन लाख ५५ हजार रुपयांची तर हुपरी पोलिस ठाण्याचा कॉन्स्टेबल जालंधर बाबूराव भाट याला तीन हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. इचलकरंजी नगरपालिकेचा शिपाई बाळू चंदर कांबळे याला पाचशे रूपये घेताना जाळ्यात पकडले होते.

क्वॉइन बॉक्स

सिंगतकर यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता त्यांचे एकेक कारनामे चव्हाट्यावर येत आहेत. दबक्या आवाजात सुरू असलेली चर्चा उघड होऊ लागली आहे. सहकार खात्यातील अनेक अधिकारी क्वाइन बॉक्स या नावाने ओळखले जातात. कारण बॉक्समध्ये पैसे टाकल्याशिवाय पुढील बोलणीच केली जात नाही. अशा अनेकांनी बॉक्स भरले आहेत. तसेच कामे होण्यासाठी साखळी तयार केली जाते.

लाच मागितल्यास किंवा कोणा अधिकाऱ्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्यास तत्काळ तक्रार करा. कारवाई जलद गतीने करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास लाचलुचपत विभाग पुढाकार घेईल.

- उदय आफळे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळेला लागले वादाचे ग्रहण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गारगोटी

भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडीची विद्यामंदिर प्राथमिक शाळा म्हणजे संपूर्ण राज्यात बिनघंटेची शाळा म्हणून नावारुपाला आलेली शाळा, मात्र गेल्या चार महिन्यांपासून खुद्द मुख्याध्यापिकेच्या वादाचेच या शाळेला ग्रहण लागले आहे. मुख्याध्यापिका सुनीता कालेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या ग्रामस्थांनी मुख्याध्यापिकेच्या बदलीची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे, तर कालेकर यांनी शाळा व्यवस्थापन समितीसह एका सहकारी शिक्षकाला याच वादातून न्यायालयात खेचले आहे. याहीपुढचा कळस म्हणजे शिंदेवाडीतील पालकांनी गेल्या सोमवारासून एकाही मुलाला शाळेत पाठवलेले नाही, त्यामुळे शिक्षक आणि ग्रामस्थांच्या वादात नावाजलेली शाळा सध्या बंद अवस्थेत आहे.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुली राहणारी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नाव‌िण्यपूर्ण उपक्रम राबवून नावारुपला आलेली शाळा म्हणून शिंदेवाडीच्या प्राथमिक शाळेची ओळख आहे. शाळेतून घंटा हद्दपार करून विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेची भीती पळवून लावणाऱ्या या शाळेला बिनघंटेची शाळा म्हणूनही कौतुक झाले. जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाहण्याचा दृष्ट‌िकोन बदलणारी ही शाळा गेल्या आठवड्याभरापासून विद्यार्थ्यांच्या प्रत‌िक्षेत आहे, आणि विशेष म्हणजे याचे कारण येथील मुख्याध्यापिकाच आहेत. शिक्षक समायोजन प्रक्रियेतून सुनीता कालेकर यांची नियुक्ती आठ महिन्यांपूर्वी शिंदेवाडीच्या शाळेत झाली, मात्र नियुक्तीपासूनच त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सहकारी शिक्षकांशी वाद घालणे, विद्यार्थ्यांना शिकवण्यात कुचराई करणे, जाणीवपूर्वक शाळेतील विधायक उपक्रम बंद पाडण्याचे उद्योग कालेकर यांनी केल्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत, मात्र जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना महिन्याभरात पाचवेळा भेटूनही कालेकर यांच्यावर कारवाई झाली नाही. मुख्याध्यापिका सुनीता कालेकर आणि ग्रामस्थांमधील वाद इतका विकोपाला गेला आहे, की आता जोर्यंत या शिक्षिका शाळेत आहेत, तोपर्यंत एकाही मुलाला शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे, त्यामुळे गेल्या सोमवारपासून एकही विद्यार्थी शाळेकडे फिरकलेला नाही.

मुख्याध्यापिका सुनीता कालेकर यांच्यावरील कारवाईबाबत प्राथमिक शिक्षण विभागाला सूचना दिल्या आहेत. कायदेशीर बाबींमुळे कारवाईस विलंब होत आहे, पण शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवणे योग्य नाही. मुलांना नियमित शाळेत पाठवावे. शाळा बंद ठेवणे हा यावरील उपाय नाही.

- अभिजीत तायशेटे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागलचे आरोग्य केंद्र भोगतेय मरणकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

कागलचा जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र आता गैरसोयीमुळे अखेरची घटका मोजत आहे. या रुग्णालयात औषधे आहेत, मात्र डॉक्टर नाहीत. दुर्धर आजार झाल्यासारखी या रुग्णालयाची अवस्था केवळ अतिक्रमण आणि इमारतीच्या दुरावस्थेने झाली आहे. केवळ एका कर्मचाऱ्यावर या केंद्राचा कारभार चालला आहे. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत जाब विचारून आंदोलन करण्याच्या तयारीत असताना आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असतानाच जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सीमा विजय पाटील यांनी आज अचानक अधिकाऱ्यांसमवेत या रुग्णालयास भेट देवून पहाणी केली आणि सूचनाही दिल्या.

कागल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खर्डेकर चौकानजीक असणाऱ्या या आरोग्य केंद्राची स्थापना २३ एप्रिल, १८९१ मध्ये झाली. सर्वसोयीनीयुक्त सव्वाशे वर्षांचा दवाखाना असा या केंद्राचा लौकिक जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकावयास मिळतो. तालुक्यातील कानाकोपऱ्यातून या रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रुग्ण येत असत. अशा या आरोग्य केंद्रात तळीरामाचा अड्डा बनला आहे. जागोजागी रिकाम्या बाटल्या, दवाखान्याच्या आवारात भरणारा बाजार आणि त्यामुळे झालेली घाण, कचरा, दुर्गंधी ,डासांचा उपद्रव पाहून पाटील अचंबित झाल्या. इमारतीच्या मागच्या बाजूस झाडे, झुडपे वाढून त्यामध्ये सरपटणारे प्राणी आढळतात. मंगळवारी सभापतींची भेट असल्याने कर्मचारी उपस्थित होते. दररोज येणाऱ्या ४० ते ५० रुग्णांसाठी औषध निर्माता तपासून औषधे देतात. २०१३ पासून केंद्राच्या दुरावस्थेबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असे पाटील आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. वयोवृद्ध, अपंग महिलांना माळावरच्या ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी यामुळे त्रास होतो असेही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सागर कोंडेकर, प्रभू भोजे, सात्ताप्पा माळी, संदीप माळी, राजू कालेकर, तानाजी मगदूम, अमर माने, नागेश कासोटे, राजू पाटील, नगरसेवक संजय कदम आदी उपस्थित होते.

या रुग्णालयास येत्या महिनाभरात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देऊ. रुग्णालयाच्या जागेची मोजणी करुन सभोवार कंपाउंड करण्यात येईल. अतिक्रमणे काढून रुग्णालयाची जागा रिकामी करू.

- सीमा पाटील, आरोग्य समिती सभापती

जिल्ह्यात ४० ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नाहीत. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नेमणे माझ्या हातात नाही. याबाबत मी काहीही करू शकत नाही.

- डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वकष्टातून फुलवला डोंगर

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावाजवळील जंगली झुडुपांनी व्यापलेली खडकाळ टेकडी अवघ्या तीन वर्षातच भारतीय प्रकाराच्या विविध झाडांनी बहरली आहे. वृक्षारोपणाचा फोटो छापून येण्यासाठी वृक्षारोपण करणाऱ्यांची नंतर त्या रोपांकडे पाठ फिरते हा बहुतांशवेळेचा अनुभव असतो. पण जवळपास १७०० हून अधिक झाडांसाठी स्वतः खड्डे काढून त्यांना प्रसंगी कावडीने पाणी घालून जगवणाऱ्या पर्यावरण मित्र दिनकर चौगुलेंचा उपक्रम वृक्षारोपणानंतर पाठ फिरवणाऱ्यांसाठी एक धडाच आहे. वृक्षसंपदेवरील या प्रेमामुळे ही खडकाळ टेकडी हिरवीगार झाली आहे.

पोर्ले गावातील चौगुले वन ​विभागात नोकरीस होते. त्यामुळे निसर्गाचा सहवास तसा कायमच होता. पण वन विभागात माणसांची कार्यपद्धती पाहून १२ वर्षानंतर नोकरीला राम राम केला. जगण्यासाठी काही तरी साधन हवे म्हणून गावात किराणा मालाचे दुकान थाटले. तेही काही काळानंतर बंद केले व केबल व्यवसायाला सुरुवात केली. त्यामध्ये स्थिरस्थावर झाल्यानंतर पुन्हा निसर्गप्रेम खुणावू लागले. पर्यटनाच्यानिमित्ताने काही ठिकाणी​ फिरुन आल्यानंतर पोर्लेसारख्या निसर्गाच्या कुशीत असलेल्या गावातही निसर्ग फुलवण्याचा त्यांना ध्यास लागला. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची घटना झाली.

तंबाखू, अंडी, मटण यांचा त्यांनी त्याग केला व दररोज १५० रुपयांची पिग्मी भरण्यास सुरुवात केली. या जमा होणाऱ्या पैशाचे काय करायचे? हा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. कुटुंबियांशी चर्चा करुन २००६ मध्ये वन विभागाच्या जागेजवळील व घराजवळील एकवीराच्या टेकडीवर वनराई फुलवण्याचे ठरवले.

त्याची प्रत्यक्ष सुरुवात २०१२ मध्ये झाली. चौगुलेंनी मुलाच्या साथीने २० एकराच्या परिसरात वर्षभरात १५०० खड्डे मारले. त्यामध्ये २०१३ मध्ये त्यांनी वृक्षारोपणाला प्रारंभ केला. त्यांनी वन विभागात काम केले असल्याने सरसकट झाडे न लावता अगदी विचारपूर्वक वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. भारतीय जातीच्या वृक्षांवरच पक्षी, प्राणी यांचा वावर असतो. तसेच त्यातून निसर्गाच्या चक्रातील बरेच काही मिळून जाते हे माहिती होते. त्यानुसार सर्व भारतीय प्रकाराची झाडे लावली. दोन वर्षात १७०० हून अधिक झाडे लावली आहेत.

या कालावधीत काही झाडे दहा फुटापर्यंत वाढली आहेत तर काही सहा फुटापर्यंतची झाली आहेत. यामुळे केवळ जंगली झुडुपांनी पावसाळ्यापर्यंत हिरवीगार दिसणाऱ्या टेकडीवर आता वर्षभर या वृक्षारोपणांमधून हिरवाई निर्माण झाली आहे. त्यांनी भैरवनाथ वनराई असे नामकरण केले आहे. एखादी संस्था वृक्षारोपणाचे काम करते, पण त्याची निगा नंतर राखली जात नाही

पण त्यांनी कावडीने पाणी आणून या झाडांची केलेली देखभाल पाहून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमी भारावून भेट ​देत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना इथे आणून मार्गदर्शन केले जात आहे. त्यांच्याकडूनही ते वृक्षारोपण करुन घेत आहेत.

माणसांच्या सहवासापेक्षा निसर्गाचा सहवास किती तरी पटीने चांगला आहे. निसर्गाकडून शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण मिळत असल्याने नागरिकांनाही निसर्गाचा आनंद लुटता यावा हा माझा उद्देश आहे. याकरिता या वनराईत मॉर्निंग वॉकसाठी नैसर्गिक ट्रॅक तयार करण्याचा मनोदय आहे. या वनराईत येताना चप्पल काढून अनवाणी फिरावे व निसर्गाचा सहवास मिळावा हा उद्देश आहे.

- दिनकर चौगुले, पर्यावरण मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेट खांडेकरांमधील हळव्या माणसाची...

$
0
0

anuradha.kadam@timesgroup.com

ज्यांच्या साहित्यसंपदेवर ज्ञानपीठ पुरस्काराची मोहर उमटली ते सिद्धहस्त साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा आज (२ सप्टेंबर) स्मृतिदिन. कोल्हापूरच्या या सुपुत्राचे नाव विपुल लेखनाने जगभर पोहोचले. वार्धक्याने दृष्टी गेली तरीही लेखनाची ज्योत न विझू देता त्यांनी साहित्य अधिक प्रखर केले. कोल्हापुरातील हस्ताक्षर संग्राहक राम देशपांडे हे खांडेकर यांचे लेखनिक म्हणून त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत सहवासात होते. खांडेकर यांच्या सहवासातील अनेक हृद्य आठवणी सांगत राम देशपांडे यांनी खांडेकरांमधील हळव्या माणसाची भेट घडवली.

कोल्हापूर : पत्र पाठवणाऱ्या प्रत्येक वाचकाला जिव्हाळ्याने उत्तर देणारे, नवोदित लेखकांशी संपर्क साधून त्यांना प्रोत्साहन देणारे, अनेक कवींच्या कविता संकलित करून काव्यसंग्रह प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेणारे, साहित्यकृतींवर बेतलेल्या नाटकाची रॉयल्टी आनंदाश्रमास देणारे ते अगदी स्वयंपाकाच्या बाईंच्या कष्टाची जाणीव ठेवणारे आणि मानलेल्या मुलींचे माहेरपण करणारे वि. स. खांडेकर... प्रत्येक साहित्यप्रकाराला समर्थपणे स्पर्श करणाऱ्या वि. स. खांडेकर यांच्या स्मृतिविश्वात जाणे हाच एक सुखद अनुभव असतो असे सांगतच राम देशपांडे यांनी खांडेकरांसोबतच्या आठवणींचे एकेक पान उलगडले. माझ्या नोकरीत मला कधीच पदोन्नती मिळाली नाही, पण खांडेकर यांचा लेखनिक हे बिरुद माझ्यासाठी कोणत्याही पदोन्नतीपेक्षा कमी नाही, अशा शब्दांत देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या खुर्चीवर बसून खांडेकर यांनी लेखन केले ती खुर्ची आजही देशपांडे यांच्याकडे आहे, जी सतत एक ऊर्मी देते असेही देशपांडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

खांडेकरांच्या साहित्यवाचनाने भारावलेले अनेक वाचक त्यांना पत्र पाठवायचे. कुणी त्या पत्रात आपली व्यथा मांडायचे, तर कुणी खांडेकरांच्या साहित्याशी स्वतःच्या आयुष्याची नाळ जोडायचे. त्या प्रत्येक पत्राला उत्तर गेलेच पाहिजे हा खांडेकरांचा शिरस्ता होता जो त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही मोडला नाही. त्या पत्रोत्तरात एक विलक्षण जिव्हाळा असायचा. खांडेकरांना वाचकांशी जोडणारा धागाच त्या पत्रव्यवहारात असायचा. तीच गोष्ट खांडेकरांना नवोदित लेखकांविषयी वाटणाऱ्या भावनांची. नवीन लेखक पुढे आले पाहिजेत अशी त्यांची निर्मळ भावना असायची. त्यासाठी त्यांना बळ द्यायचे. त्यांच्या वाढदिनी ११ जानेवारीला घरी खूप राबता असायचा. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची आस्थेने चौकशी करण्यात खांडेकरांना भरून पावल्यासारखे व्हायचे.

​तो काळ मुलींच्या शिक्षणाला विरोधाचा होता, पण या प्रवाहाविरोधात जाऊन शिकणाऱ्या मुलींचे त्यांना भारी कौतुक वाटायचे. शिकण्याच्या हट्टामुळे ज्या मुली घरापासून दुरावल्या, त्यांना मुली मानून खांडेकरांनी अनेकींचे माहेरपण केले. त्यांच्या घरात स्वयंपाक करणाऱ्या हिराबाईंची दृष्टी अधू झाल्याचे कळल्यावर त्यांना तातडीने दवाखान्यात नेणारे खांडेकर पाहिले की, ते मोठे का होते यांची प्रचिती येते.

खांडेकर यांच्या 'ययाति' नाटकावर कुसूम शेंडे यांनी 'वैरीण झाली सखी' हे नाटक ​मंचावर आणले. या नाटकाची रॉयल्टी म्हणून मिळालेले पैसे खांडेकर यांनी बाबा आमटे यांच्या आनंदाश्रमाला दिले. आपले 'नटसम्राट' हे नाटक खांडेकरांनी पाहावे अशी डॉ. श्रीराम लागू यांची इच्छा होती. खांडेकर येऊ शकले नाहीत म्हणून लागू यांनी या नाटकाची रेकॉर्ड स्वतः येऊन खांडेकर यांना ऐकवली इतके लोक खांडेकरांवर निस्सीम प्रेम करत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायअलर्टने यंत्रणा धास्तावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवाचा डामडौल व देखावे पाहण्यासाठी उत्सवाच्या शेवटच्या दिवसांमध्ये आबालवृद्ध महिलांसह रस्त्यावर उतरणारी जनता, गर्दी व वाहतुकीच्या नियोजनासाठी रात्रभर झटणारे आणि ३६ तासांपर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत दक्षतेसाठी पोलिस उभे असूनही त्यांच्या जाणवणाऱ्या मर्यादेमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनच सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सीसीटीव्हीची व्यवस्था, मंडळासमोर काम करणारे स्वयंसेवक, देखावे टप्प्याटप्प्याने खुले करणे असे अनेक पर्याय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अवलंबण्याची गरज आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. अनेक मंडळे उत्सवादरम्यान व वर्षभरही सामाजिक भान राखत उपक्रम राबवत असतात. मात्र, देखावे पाहण्याच्या दिवसांमध्ये बहुतांश मंडळांसमोर वाहतुकीची कोंडी, नागरिकांची गर्दी व रांग पाहायला मिळते. त्यावेळी पोलिसांनी त्यावर मार्ग काढावा अशी अपेक्षा तेथील मंडळांच्या कार्यकर्त्यांची असते. शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, सी वॉर्ड परिसर, शिवाजी चौक, मंगळवार पेठ मुख्य मार्ग, रंकाळा रोड, कसबा बावडा अशा विविध भागात रात्री आठनंतर गर्दी होत असते. तिथे वाहने उभी करण्यापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत साऱ्यांचीच कसरत सुरू असते.

यंदा घरगुती गणेशविसर्जनानंतर पाच दिवस मिळतात. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. अशावेळी मंडळांकडून सुरक्षेबाबत विविध उपाय अवलंबले गेल्यास पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेला बळ मिळेल. विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिस सीसीटीव्ही कॅमेरे लावतात. पण त्याआधी कॅमेरे बसवण्यास पोलिसांना अडचणी आहेत. मंडळांनी वर्गणीतून केवळ आपल्या मंडळासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच ठेवल्यास अनुचित प्रकार करणाऱ्यांना वचक बसेल.

नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष अनेकवेळा देखावे सुरू असताना मंडपाच्या पाठीमागे कुणी नसते. सीसीटीव्ही हे अत्यावश्यक असून, आम्ही ते उत्सवकाळात बसवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- भाऊ घाटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते, संयुक्त सेवा मंडळ

आदेश आल्यानंतर कारवाई करण्यास पोलिस दल सज्ज आहे. महत्त्वाच्या इमारतींचे आराखडे मागवले असून, भविष्यात त्याआधारे कोणतीही कारवाई करण्यास पोलिस यंत्रणेकडे एकप्रकारची ब्लू प्रिंट उपलब्ध होणार आहे.'

- डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक

शिवाजी चौकात गर्दी असते. त्यावेळी मंडळाचे ५० कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून पोलिसांसमवेत असतात. मंडळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. विजेपासून भाविकांना धोका ठरू शकतो, त्यासाठी मंडळाने दोन वायरमन कायम तैनात केलेले असतात.

- नंदकुमार वळंजू, अध्यक्ष, शिवाजी चौक तरुण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयस्तरावरील शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत बुधवारी (ता.२) पुकारण्यात आलेल्या संपामध्ये २५ हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून सकाळी ११ ला टाऊन हॉल येथून बालगोपाल तालीम मंडळापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून तेथून 'व्यासपीठ'चे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देणार आहे.

शैक्षणिक व्यासपीठच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सध्याचे सरकार शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, श्रमिक, कामगार, सरकारी कर्मचारी यांच्याविरोधातील धोरण राबवित आहे. सरकार शिक्षण क्षेत्राबाबतीत उदासीन असून स्वयंअर्थसहाय्य शाळांच्या नावाखाली भरमसाठ नवीन शाळा देवून जुन्या मराठी शाळा बंद पाडत आहे. शाळांना वेतनेत्तर अनुदान दिले जात नाही. यासह अनेक प्रश्नांमुळे सध्या शिक्षणक्षेत्रातील कर्मचारी अस्थिर आहेत. विद्यार्थ्यांना घडविणा‍ऱ्या शिक्षकांप्रती सरकारचे धोरण उदार असण्याची गरज आहे. सरकारने हिवाळी अधिवेशापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार आहे. सरकारच्या या सर्व धोरणाविराधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

हिवाळी अधिवेशनापूर्वी जर यासंदर्भात सरकारने कोणतीच सकारात्मक भूमिक घेतली नाही तर भविष्यात आम्हाला टप्याटप्याने आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबावा लागेल. सरकाने शिक्षकांच्या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

- एस. डी. लाड, सभाध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ

अशा आहेत मागण्या

शिक्षण विभागाचे महसुलीकरण रद्द करून पूर्वीप्रमाणे अस्तित्व चालू ठेवावे.

शिक्षक व शिक्षकेतर सेवक भरतीवरील बंदी उठविण्यात यावी.

संस्थेचे शिक्षक भरतीचे अधिकार काढून घेणारा निर्णय तातडीने रद्द करावा.

कायम विनाअनुदानित तत्वावरील सर्व प्रकारच्या शाळांना व महाविद्यालये यांना विनाअट अनुदान द्यावे.

स्वयं अर्थ -सहाय्यित शाळा देण्याचे धोरण रद्द करावे.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजनाच लागू करावी.

सध्या सुरू असलेली कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये.

सर्व शाळांना थकीत वेतनेतर अनुदानासह सरसकट वेतनेतर अनुदान मिळावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images