Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वाळू उपशास विरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

लाखो रूपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यांची होणारी दुरावस्था, रूंदावणाने कृष्णा नदीचे पात्र, तसेच वाळू ठेकेदारांनी गावच्या विकासासाठी निधी न दिल्याने शिरोळ तालुक्यातील कोथळीच्या ग्रामस्थांनी वाळू उपशास ग्रामसभेत ग्रामसभेत कडाडून विरोध केला.

वाळू उपशासाठी देण्यात येणाऱ्या ठेक्यांच्या पार्श्वभूमीवर कोथळीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार सचिन गिरी, मंडलअधिकारी सानप, सरपंच बेबीजहिरा तांबोळी प्रमुख उपस्थित होत्या.

सभेत प्रांताधिकारी जिरंगे यांनी प्रशासनाची भुमिका मांडली. वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे गावातील रस्ते खराब झाले आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयास गौणखनिज अनुदान मिळाले नसल्याचे विजय खवाटे यांनी सांगितले. गावातील रस्ते खराब झाल्यानंतर वाळू ठेकेदार रस्ते, शाळांच्या संरक्षक भिंतीसाठी लोकवर्गणी देत नाहीत याकडे उपसरपंच प्रमोद कुंभार यांनी लक्ष वेधले. जयसिंगपूर-कोथळी रस्त्याकडेच्या शेतजमिनी क्षारपड झाल्या असून वाळू वाहतुकीमुळे रस्ता खराब झाल्याचे श्रीकांत पाटील यांनी सांगितले. ओव्हरलोड वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्था होते मात्र वाळू ठेकेदारांकडून रस्त्यांची दुरूस्ती होत नसल्याचे भीमगोंडा बोरगावे म्हणाले. बेसुमार वाळू उपशामुळे नदी पात्रात माती ढासळत असून शेतजमिनींचे नुकसान होत असल्याचे जमीर मुजावर यांनी सांगितले.

कृष्णा नदीतून वाळू उपसा करण्यास ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. लाखो रूपये खर्चुन गावातील रस्ते केले जातात. मात्र वाळू वाहतुकीमुळे या रस्त्यांची दुरावस्था होते. यानंतर पुन्हा रस्ते करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची दमछाक होते. ठेकेदारांकडून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने कोथळीत कृष्णा नदीचे पात्र ही रूंदावले आहे. कृष्णेला पूर आल्यास याचा फटका ग्रामस्थांनी बसू शकतो. गेल्या चार वर्षात वाळू ठेकेदारांनी गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीस निधी देण्याचे मान्य केले होते. ग्रामसभेची मंजुरी मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीस निधी देण्याची ग्वाही ठेकेदार देतात.

वाळू उपशातून लाखो रूपयांचा महसूल सरकारला मिळतो. याचबरोबर ठेकेदारही लाखो रूपयांची माया जमवितात. परंतु गावच्या विकासाऐवजी रस्त्यांची दुरावस्था होते असे मत सभेत ग्रामस्थांनी मांडले.

कोथळीत ग्रामसभा पुन्हा घेण्याचा निर्णय

वाळू उपशावरून जोरदार चर्चा झाली. यावेळी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेली वाळू उपशास विरोध करणारा ठराव धनपाल परीट यांनी माडला. यास विनोद कांबळे यासह ग्रामस्थांनी अनुमोदन दिले. अखेर गावकऱ्यांच्या भावना पर्यावरण विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास कळवू. वाळू उपशाबाबात ग्रामस्थांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करून उपशाबाबत निर्णय घेण्यात येईल असे प्रांताधिकारी जिरंगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


किणी नाक्यावर पैलवानांचा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावर ५० ते ६० पैलवानांनी हल्ला करून नाका फोडला. या हल्ल्यात १५ कर्मचारी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. पेठ वडगांव पोलिसांनी दोन संशयित पैलवानांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर पैलवान कोल्हापुरातील असल्याचे समजते. बुधवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली.

किणी टोल नाक्यावर बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास टोल वसुलीवरून एका पैलवानांचा कर्मचाऱ्यांची वाद झाला. वाद झालेला पैलवान आपल्या ४० ते ५० पैलवानांसह मोटारीतून रात्री आठच्या सुमारास टोल नाक्यावर आले. त्यांनी काठ्या व लोखंडी गजांनी टोल नाक्यावर हल्ला चढवला. उपस्थित कर्मचाऱ्यांना काठ्या व गजांनी मारहाण केली. या घटनेने नाक्यावर पळापळ झाली. हल्ल्यानंतर पैलवान निघून गेले. गंभीर जखमी असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक धनंजय जाधव तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४८ लाखांचा घरफाळा थकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अक्षता मंगल कार्यालय व यात्री निवासच्या व्यवस्थापनाशी संगनमत करून महापालिका अधिकाऱ्यांनी घरफाळा आकारणी केली नव्हती. यात्री निवासकडे १९९८ पासूनचे घरफाळा बिल १९,४५,५३८ इतके तर अक्षता मंगल कार्यालयाकडून १९९० पासून २९,५१,७३४ इतक्या बिलाची घरफाळा वसुली होणे अत्यावश्यक आहे. या दोन्ही मिळकतींचा थकीत घरफाळा आठ दिवसात वसूल करण्यात यावा आणि याप्रश्नी संबंधितांना पाठीशी घालून महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केली. शेटे यांनी या दोन्ही मिळकतींना घरफाळा लागू करण्यात आला नव्हता हे निदर्शनास आणून दिले. शेटे यांनी याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा करत यात्री निवास आणि अक्षता मंगल कार्यालयावर घरफाळा आकारणी करण्यास भाग पाडले. अ​धिकाऱ्यांनी या दोन्ही मिळकतीवर घरफाळा आकारणी करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली आहे. यासंबंधी १९९० पासूनचे कर संग्राहक अधिकारी, असेसमेंट क्लार्क, वसुली क्लार्क यांना निलंबित करावे.अधिकाऱ्यांनी संगनमत करून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले असून त्यांच्यावर फौजदारी करावी अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमी ‘रामभरोसे

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

सीटी स्कॅन व न्युरो सर्जनची कमतरता असल्याने सीपीआर हॉस्पिटलमध्ये अपघातातील जखमींवर रामभरोसे उपचार होत आहेत. अपघातातील रूग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने रूग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत आहे.

१८ ऑगस्ट रोजी फुलेवाडी बालिंगा रिंग रोड परिसरात जमावाने फिरस्त्याला चोर समजून बेदम मारहाण केली. जखमी फिरस्त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय नसल्याने फिरस्त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची गरज होती. पण फिरस्त्याचे कोणीही नातेवाईक नसल्याने चांगले उपचार होण्यासाठी खासगी हॉस्पिटमध्ये खर्चाचा भार कोण उचलणार हा प्रश्न पुढे आल्याने त्याला पुण्यातील ससून रूग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर सीपीआर हॉस्पिटलमधील अपघातातील गंभीर जखमींच्यावर यंत्रणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीपीआरमध्ये गेले दोन वर्षे सिटी स्कॅन मशिन बंद आहे. दहा वर्षापूर्वी सीपीआरमध्ये गेली अनेक वर्षे मानधन तत्वावर न्युरो सर्जनच्यामार्फेत अपघातात जखमींच्यावर उपचार केले जात होते. सीपीआर हॉस्पिटल राजर्षी छत्रपती शाहू सरकारी वैद्यकीय महविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले. महाविद्यालयाकडे न्युरो सर्जनची जागाच नसल्याने जखमींवर उपचार होत नाहीत. तसेच मानधन तत्वांवर न्युरो सर्जनची नियुक्ती नसल्याने जनरल डॉक्टरच उपचार करतात. त्यामुळे अपघातातील डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याशिवाय पर्याय नसतो.

सध्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रत्येक दिवशी अपघातातील अंदाजे पाच ते सात जखमींना उपचारास दाखल केले जाते. वर्षभरात अपघातातील अंदाजे अडीच हजार जखमी उपचारास दाखल होतात. प्रारंभी प्राथमिक उपचार केले जातात. अपघातातील जखमींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास सिटी स्कॅनव्दारे जखम व दुखापत तपासता येऊ शकते. पण सिटी स्कॅन मशिन नसल्याने जखमीला खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला जातो. पण ज्यांची ऐपत नसते त्यांना मात्र सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात. कोल्हापूर, सांगली, कर्नाटक व कोकणातील अपघातातील गंभीर जखमींना उपचारास दाखल केले जाते. न्युरो सर्जन नसल्याने व सिटी स्कॅन मशिन नसल्याने आहे त्या डॉक्टरी ज्ञानावर रूग्णांच्यावर उपचार केले जात आहेत. अपघातात जखमींच्या हाडाला दुखापत झाली असेल अथवा पोट, छाती, मांडीला दुखापत झाली असेल तर शस्त्रक्रिया केल्या जातात. पण जर डोक्याला दुखापत झाली असेल तर गरीब रूग्णांवर केवळ जनरल डॉक्टर्स उपचार करतात.

जीवनदायी योजनेतून मदतीचा प्रस्ताव

अपघातातील जखमींच्यावर खासगी हॉस्पिटलमधून सिटी स्कॅन व एमआरए राजीव गांधी जीवनदायी योजनेतून करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती राजीव गांधी जीवनदायी योजनेचे समन्वयक डॉ. अशोक देठे यांनी दिली. प्रस्तावासंदर्भात महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलनाकडे कोल्हापूरकरांची पाठ

$
0
0

संकेत लाड, कोल्हापूर

अंदमान येथे पुढील महिन्यात होणाऱ्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाकडे कोल्हापूरकरांनी मात्र पाठ फिरवली आहे. आतापर्यंत या संमेलनासाठी अधिकृत संयोजकांकडे २३० जणांनी नोंदणी केली असून त्यामध्ये कोल्हापूरहून एकही नोंदणी झालेली नाही.

अंदमान येथे ५ व ६ सप्टेंबर रोजी चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. संमेलनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंदमान येथील संमेलनाचे संयोजन 'ऑफबीट डेस्टिनेशन' या कंपनीतर्फे करण्यात येत आहे. कोल्हापुरात खूप प्रयत्न केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत 'ऑफबीट'चे नितीन शास्त्री यांनी व्यक्त केली.

शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे सावरकरांच्या स्मृती जागवण्यासाठी अंदमानचे दौरे आयोजित केले जातात. प्रतिष्ठानचा अंदमान दौऱ्याचा खर्च विमान प्रवासासह तीस हजार रुपये आहे. आपल्याकडे मराठी साहित्य परिषदेने विश्व संमेलनाचे संयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तथापि, त्यामध्ये परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना मोफत दौरा घडवण्याची अट होती. यांसारख्या काही अटी मान्य नसल्याने आपण हा प्रस्ताव नाकारल्याचे प्रतिष्ठानचे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

आतापर्यंत झालेल्या २३० नोंदणींमध्ये कोल्हापूरमधून एकही नोंदणी नाही. स्पर्धकांनी कमी पैशांमध्ये अंदमान सहली आयोजित केल्यामुळे संमेलनाच्या पॅकेजकडे वाचकांनी पाठ फिरवली आहे.

- नितीन शास्त्री, संयोजक, विश्व संमेलन

विश्व मराठी साहित्य संमेलनाविषयी अद्याप वाचकांमध्ये प्रसार व जागृती झालेली नाही. त्यातच अंदमान हे महाराष्ट्रापासून दूर असल्याने दोन दिवसांच्या संमेलनासाठी इतक्या दूर जाण्यास वाचकांनी उत्साह दाखवलेला नाही.

- प्रा. चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डबल पार्किंगमुळे कोंडी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापुरात

व्यापारी गोडावून, हॉस्पिटल व डायग्नोस्टीक सेंटरमुळे शाहुपुरीच्या पाचही गल्लीत डबल पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या नियमांचा भंग होत असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सपशेल कानाडोळा होत आहे.

शाहूपुरी व्यापारी पेठेसह पाच गल्लीत व्यापाऱ्यांची दुकाने आहेत. ३० फूटांहून अधिक रूंदीच्या रस्त्यांवर दुचाकी व त्याच्यापुढे चारचाकी वाहनांचे पार्किंग सर्रास दिसते. रस्त्यांवर अवजड वाहने थांबवून मालांची ने आण केली जाते. शाहूपुरीत व्यापाऱ्यांची दुकाने, गोडावून, बँका, हॉटेल, हॉस्पिटल व डायग्नोस्टीक सेंटर आहेत. या सर्व ठिकाणी वाहनधारकांकडून दोन ते तीन तास वाहने पार्क केली जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईड पट्ट्यांवर दुचाकी व चारचाकींचे पार्किंग असते. साईड पट्ट्यांवर जागा शिल्लक नसल्याने अजवड वाहने थेट रस्त्यांवर उभी करून माल भरणे व उतरणे ही कामे सुरू असतात. दोन्ही बाजूच्या पार्किंगमधील वाहने, थेट रस्त्यांवर पार्क केलेली वाहने यामधून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे.

स्टेशन रोड ते पार्वती टॉकीज हा नगरोत्थान योजनेतील रस्ता नव्याने झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट असतात. या सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कायम असते. शाहूपुरी कुंभार गल्लीत फ्लेक्स बोर्ड तयार करण्याचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. त्यामुळे या रस्त्यांवर दोन्ही बाजूने पार्किंग असते. लक्ष्मीपुरीतील कुंभार गल्लीत जाताना दोन्ही बाजूंच्या डबल पार्किंगमुळे वाट काढताना वाहनधारकांची मोठी कसरत होते. तसेच सुखसाखर हॉटेल परिसरात अनाधिकृत रिक्षा स्टॉप व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा थांबा झाला आहे. व्यापारी पेठेत लोकवस्ती कमी असल्याने त्याचा त्रास नागरिकांना कमी होतो. पण दिवसेंदिवस होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दुर्लक्षच होत आहे.

बंदी असूनही वाहतूक

नव्याने झालेल्या हॉस्पिटल, डायग्नोस्टीक सेंटरच्या मालकांनी पार्किंगची सोय न केल्याने रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वाहने हॉस्पिटलच्या बाहेर पार्क केलेली असतात. मंगळवारी झालेल्या अपघातातील कंटेनर अजूनही त्याच जागेवर उभा आहे. कंटेनरच्या पुढील बाजूस बुधवारी फोर व्हिलर पार्किंग पहायला मिळाले. तसेच अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. सकाळी नऊ ते बारा व दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असतानाही शाहूपुरी अवजड वाहनांची वाहतूक होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफबी, व्हॉट्सअॅप आणि एसएमएस

$
0
0

सोशल मीडियावरून मतदारांमध्ये प्रचाराची भरारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवानंतर अंतिम केली जाणारी उमेदवारी, त्यातच प्रचारासाठी कमी असणारा वेळ यामुळे सोशल साइटस, व्हॉटस अॅप, मोबाइल एसएमएसवरुन प्रचार करण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच यंत्रणा कामाला लावली आहे. भागातील घराघरापर्यंत पत्रके पोहचवताना त्या मतदारांचे आताच मोबाइल नंबर घेतले जात आहेत. तर सोशल साइटवरुन वेगवेगळ्या टप्प्यावर संदेश देण्यासाठी त्याचीही तयारी केली जात आहे. अनेकांनी यापूर्वीपासूनच प्रत्येक सण व विविध शुभेच्छांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वी कम्प्युटरवरुन एक​​त्रित संदेश टाकण्याची यंत्रणा निवडणुकांमध्ये वापरण्यात आली होती. त्यासाठी अनेकांनी मोबाइल नंबर कम्प्युटरमध्ये जमवून ठेवले होते. विविध सणांच्यानिमित्ताने एकाचवेळी त्या साऱ्यांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. पण सध्या स्मार्ट मोबाइल, व्हॉटस अॅप, सोशल साइटसचा वापर सुरु आहे. रस्त्यांवर फलक लावण्यापेक्षा थेट त्या व्यक्तीपर्यंत एखाद्या उमेदवाराची निवडणूक लढवण्याची तयारी एका संदेशातून देण्याची ताकद यामध्ये आहे. त्यामुळे प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होताच अनेकजण या माध्यमांचा उपयोग करत रिंगणात उतरले. सध्या या टप्प्यावर भागातील बहुतांशजणांना इच्छूक माहित झाले आहेत. यावेळी उमेदवार तिकिटासाठी पळापळ करत आहेत. ही पळापळ, अस्वस्थता गणेशोत्सवापर्यंत कायम राहणार असे दिसते. त्यानंतर महिनाभराचाच कालावधी शिल्लक राहणार आहे.

या धावपळीचा विचार करुन इच्छुकांनी तयारी चालवली आहे. पहिल्या टप्प्यावर भागातील घरात पत्रके वाटली जात आहेत. ती केवळ दारातून सरकवून कार्यकर्ते जात नाहीत. तर त्या घरातील कुटुंबातील सदस्याची भेट घेऊन त्यांच्याकडून मोबाइल नंबरही मिळवत आहेत. ही सारी माहिती इच्छूक एकत्र करत आहेत. या नंबरवरुन विविध प्रकारच्या आवाहनाबरोबरच सणांच्या शुभेच्छा देण्याची यंत्रणा राबवली जाणार आहे. याबरोबरच सोशल साइटवरुन फोटोसह संदेश टाकण्यासाठीही डिझाइन करणाऱ्यांना काम देण्यात आली आहे. विविध प्रकारची स्लोगन्स तयार करुन घेतली जात आहेत. त्यामध्ये गणशोत्सवाबाबतचेही संदेश मोठ्या प्रमाणावर देण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष आचारसंहिता सुरु झाल्यानंतर या सर्व यंत्रणेला आणखी वेग येणार आहे. थेट प्रचारासाठी जास्तीत जास्त वीस दिवस मिळणार आहेत. त्यामध्ये ही वेगवान यंत्रणा बहुतांश उमेदवारांकडून वापरली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कार्यकर्ते नेमले गेले आहेत. त्यांच्याकडून प्राथमिक पातळीवरील तयारीला वेग आला आहे.

नंबर झाले फिड

कोणत्याही प्रकाराच्या प्रचारासाठीही निवडणूक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. निवडणूक आयोग त्याचा खर्च किती आहे हे ठरवते. त्यानंतर संबंधित याच्यावर किती खर्च करणार आहेत, याचा अंदाज घेतात. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर त्याचा खर्च उमेदवारांमध्ये विभागला जातो. मात्र, निवडणुकीसाठी अद्याप अवकाश असल्याने त्याचा फारसा फरक इच्छुकांवर पडणार नाही. इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांचे मोबाईल, नंबर संगणकातही सेव्ह केले आहेत. दिवसातून दोन ते तीन वेळा मतदारांना ते संदेश पाठविले जात आहेत.

नागपंचमीच्या शुभेच्छा

निवडणुकीचा ज्वर आताच इतका शिगेला पोहोचला आहे की, मतदारांना स्वातंत्र्यदिन, श्रावण सोमवार, नुकतीच झालेली नागपंचमी अशा सणांनाही शुभेच्छा मिळू लागल्या आहेत. आता गणेशोत्सवात याचे प्रमाण वाढेल अशी शक्यता आहे. त्यासाठी मोबाइल कंपन्यांशी टायअप करण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे. त्यातून खर्च कमी होऊ शकेल. एखाद्या प्रभागातील उमेदवाराचा शुभेच्छा देणारा मेसेज आला तर पुढच्या पाच-दहा मिनिटांत अन्य उमेदवाराचा मेसेज येईल इतपत चुरस तीव्र झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्तींचा धुमाकूळ सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

न्हावेली व उमगांव (ता. चंदगड) येथील परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक प्रमाणात झाली आहे. भातासह , ऊस व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टस्कर रात्रीच्या वेळी भातशेतीतून जात असल्याने मोठ्या पायांच्यामुळे पिके जमीनदोस्त होत आहे. या टस्कर हत्तींचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

न्हावेली (ता. चंदगड) येथील म्हारतळ नावाच्या शेतामधील यशवंत चंदगडकर यांच्या शेतातील भुईमूग, गोविंद गावडे, रमेश पेडणेकर व तानाजी पेडणेकर यांचा ऊस तर उमगाव येथील भावई नावाच्या शेतामधील बुधाजी गावडे व गोविंद गावडे यांच्या शेतातील भुईमूग व भाताचे नुकसान केले आहे. सर्व शेतकऱ्यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पिके उभारीच्या काळात असताना टस्कराकडून फक्त केली जात असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हत्ती रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जंगलातून बाहेर पडत असल्याने हत्तीसमोर ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

वनविभागाचे कर्मचारी काहीवेळा रखवालीसाठी असतात. मात्र त्यांच्या रोजच्या हल्याला टस्कर सरावला आहे. त्यामुळे हत्तींचे बारमाही संकट सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आहे. हिवाळ्यात हत्तींचे आगमन होवून मृगाच्या सुरुवातीला हत्ती परतीची वाट धरत होते.

सध्या हत्तींनी आपल्या वेळापत्रकात बदल करत बारमाही चंदगड तालुक्यात वास्तव्य केल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. उन्हाळ्यात हिरवाचा चारा आणि मुबलक पाणी असल्याने हत्ती येथे ठाण माडून असतात. आता पावसाने दडी मारल्याने पाण्याची उलब्धता असल्याने हत्ती या पसिरातच ठाण मांडून आहे. अपुऱ्या पावसामुळे अगोदरच शेतकरी संकटात असताना हत्तींच्या रोजच्या नुकसानीने पुरता रसातळाला गेला आहे. ज्या पिकांच्यावर गुजराण होते, ते पिक हत्ती व गव्यांच्याकडून फस्त होत असल्याने खायचे काय असा प्रश्न उभा ठाकला आहे.

दिवसेनदिवस हत्तींकडून पिकांचे नुकसान वाढत असून वनविभागाने हत्तींपासून शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

खळणेकरवाडीत गव्यारेड्यांचा वावर

खळणेकरवाडी, सामंतवाडी, माळीसह परिसरातील गावामध्ये गवेरेडे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त करत आहे. शेतीवरच गुजरान होत असल्याने पिके गव्यांकडून उद्धस्थ होताना पाहून डोळ्यात पाणी येत आहे. गेल्या काही दिवसात आबा खळणेकर, आण्णा खळणेकर, विजय सामंत, सदानंद सामंत, यशवंत सामंत, नारायण नावळे यांच्या भात आणि भुईमुग पिकाचे गव्याकडून नुकसान झाले आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाचा दौरा करुन गवेरेडे, हत्ती सारख्या जंगली प्राण्यापासून शेतीची राखण व्हावी यासाठी खास उपययोजना राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखल्याचा दर लाखावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर जातीच्या दाखला काढण्यासाठी इच्छुकांनी युद्धपातळीवर काम सुरू केले आहेत. ओबीसी दाखला काढण्यासाठी दलालांनी एक लाख ते सव्वा लाख रुपये दर असल्याची चर्चा सुरू आहे. सेवा हमी कायद्यान्वये २१ दिवसांत दाखला देण्याचा नियम असल्याने दाखला सहज मिळत असला तरी अधिकाऱ्यांच्या सहीसाठी जादा 'वजन' मोजावे लागत असल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेक इच्छुक हिरमुसले होते. ८१ प्रभागांपैकी २२ प्रभाग इतर मागासवर्ग प्रवार्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने सर्वसाधारण गटातील मंडळींनी निवडणूक लढवण्यासाठी ओबीसी दाखले काढण्यासाठी खटपट सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांत काही नगरसेवकांनी ओबीसी दाखले काढले होते. या दाखल्यांविरोधात विरोधकांनी आक्षेप घेतले. त्यानंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. २००५ च्या निवडणुकीत दोन नगरसेवकांचे मराठा कुणबी जातीचे दाखले रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. काही नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागत नगरसेवकपदाची पाच वर्षाची मुदत पूर्ण केली. २०१० च्या निवडणुकीत निवडून आलेल्या एका महिला नगरसेविका, दोन नगरसेवकांच्या ओबीसीचे दाखले रद्द झाले आहेत. त्यांनीही न्यायालयात दाद मागितली आहे.

न्यायालयात काय होईल ते होईल, असे ठरवून याही निवडणुकीत इच्छुकांकडून ओबीसी दाखले काढले जात आहेत. मराठा कुणबी जातीचा दाखला काढण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावली आहे. जातीच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासाठी तलाठी कार्यालयापासून प्रातांधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांचे हात ओले केले जात आहेत.

जातीचा दाखल मिळवण्यासाठी सर्वप्रथम सेतू केंद्रात अर्ज दाखल करावा लागतो. नवीन सेवा हमी कायद्यामुळे २१ दिवसांत दाखला देण्याचे बंधन असल्याने आवश्यक पुरावे असलेल्या कागदपत्रांवर दाखले दिले जात आहेत. निवडणुकीसाठी जातीचा दाखल तयार करून देणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. इतर मागासवर्ग महिला गटातील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक महिलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी सर्व तालुक्यांतील प्रातांधिकारी कार्यालयात एजंटाचा वावर वाढला आहे. समर्थक असलेल्या इच्छुकाला जातीचा दाखला देण्यासाठी नेतेमंडळीही सरकारी कार्यालयात रस घेत आहेत. दाखल्यावर प्रातांधिकाऱ्यांची सही कधी होते याची इच्छुक मंडळी चातकासारखी वाट पहात आहेत.

अपात्रतेचा फटका

२००५च्या सभागृहातील अपात्र - शोभा भंडारी, तुकाराम तेरदाळकर, धनंजय सावंत, विजय साळोखे

२०१० मधील तक्रारी - राजेश लाटकर, आदिल फरास, सचिन चव्हाण, रेखा आवळे, प्रकाश गवंडी, शारदा देवणे.

प्रातांधिकारी कार्यालयात रोज जातीचे दाखले काढण्यासाठी ५० ते १०० अर्ज येतात. यातील बहुतांशी अर्ज हे शैक्षणिक, नोकरीच्या कारणांसाठी येतात. निवडणुकीसाठी जातीचे दाखले काढले जातात का हे अधिकाऱ्यांना माहित नसते. पुरावे व योग्य कागदपत्रे दिल्यास २१ दिवसांत दाखले देण्याचे बंधन आहे. ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतात, त्यांना दाखले दिले जात नाहीत. दाखल्यासंबधी पैसे घेण्याच्या तक्रारी असतील तर अर्जदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

- प्रशांत पाटील, उपजिल्हधिकारी, करवीर प्रांत कार्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत 'आयआरबी' कंपनीला द्यायची रक्कम निश्चित होईपर्यंत टोल वसुलीला आणखी तीन महिने स्थगिती देत प्रकल्पाच्या मूल्यांकनाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत टोल बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत झाला. प्रकल्पांतर्गत 'आयआरबी'ला द्यायच्या रकमेची निश्चिती करण्यासाठी तामसेकर समितीचा अहवाल मिळाल्यानंतर सरकार टोलप्रश्नी अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'समितीचा अहवाल येईपर्यत तीन महिने टोल वसुली स्थगितीचे आदेश 'आयआरबी'ला दिले आहेत. 'आयआरबी'ला तीन महिन्याची किती रक्कम द्यायची याचा निर्णय होईल आणि टोलचा प्रश्न कायमचा निकालात निघेल.' मंत्रालयात ११ ऑगस्टला झालेल्या बैठकीत १५ दिवसांसाठी टोल वसुलीला स्थगिती दिली होती. ती मुदत मंगळवारी संपली होती. बुधवारी अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी९, 'एमएसआरडीसी'चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, आमदार चंद्रदीप नरके यांची मंत्री शिंदे यांच्या दालनात बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त अभियंत्याकडे तीन कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोकण पाटबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसो पाटील यांच्या बंगल्यावर टाकलेल्या छाप्यात अंदाजे तीन कोटींची मालमत्ता आढळली. पोलिस उप अधीक्षक पद्मा कदम, पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांच्या पथकाने मंगळवारी तब्बल बारा तास ही कारवाई सुरू ठेवली होती. छाप्यातील संपत्तीची माहिती कदम यांनी बुधवारी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मंगळवारी ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील बाळासाहेब पाटील तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. सध्या ते कोल्हापुरातील महाडिक माळ विद्या कॉलनी येथे राहतात. त्यांच्या 'शुभलक्ष्मी' बंगल्यावर कारवाई केली. संपत्तीचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधकच्या ठाणे विभागाचे उप अधीक्षक दत्ता कराळे व रायगडचे उप अधीक्षक सुनील कलगुटकर यांना पाठवण्यात येणार आहे,' असे कदम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्स अॅपवर करा अभ्यास

$
0
0

विनायक जरांडे सीसीआर, गोखले कॉलेज

आजकाल व्हॉट्स अॅप म्हणजे टाइमपास असे समजले जाते. व्हॉट्सअॅप म्हणजे फक्त तरुणांचे, युगुलांचे चॅटिंग असे कोणीतरी म्हणतील, पण या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 'स्टडी ग्रुप' बनवले जात आहेत. त्याचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना होत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनाही सोबत घेऊन ज्या-त्या विषयाचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केले आहेत. गोखले कॉलेजच्या बीएसस्सी भाग तीनच्या जिऑलॉजीच्या विद्यार्थ्यांचा असाच ग्रुप ज्ञानाची देवाण-घेवाण करीत आहे. याशिवाय केमिस्ट्रिच्या विद्यार्थ्यांचाही ग्रुप कार्यरत आहे.

गोखले कॉलेजमधील बी. एस्सी भाग ३च्या जिऑलॉजी विषयाचा ग्रुप वैशिष्ट्यपूर्ण आहे. ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबरच फिल्डवरील ज्ञान, अनुभव शेअर करतात. प्रा. अमोल यादव, जीएसआयमध्ये कार्यरत असलेले प्रा. शैलेश यादव, सागर व्हटकर हे शिक्षक ग्रुपवर आहेत. बीएस्सी भाग तीनच्या केमिस्ट्रीच्या ग्रुपवर प्रा. स्मिता गिरी, प्रा. नरळे मार्गदर्शन करतात.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संबंधित विषयाबद्दल अधिक माहिती इंटरनेटवरील विषयाबाबतचे ब्लॉग शेअर करतात. विषयाचा अभ्यास करताना ज्या त्या विषयातील फोटोज, व्हिडिओज अधिक माहिती देतात. त्याबद्दलही शेअरिंग होते. शिक्षकांबरोबरच विद्यार्थीही अनेक नवीन गोष्टींचा अभ्यास करतात. एखादी नवी माहिती समजली तर ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता शेअर करून इतरांच्याही ज्ञानात भर पडते. शिक्षक त्यांचे संपूर्ण ज्ञान ४५ मिनिटांच्या एका तासात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना व्हॉटस अॅप ग्रुपची मदत होते.

त्यामुळे मुलांनाही अभ्यास करण्यासाठी सोपे जाते. अभ्यासाबरोबर इतर प्रेरणा देणारे फोटोज, व्हिडिओज या ग्रुपवर शेअर होतात. त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होतो. काही तातडीच्या सूचना, कल्पना, माहिती द्यायची असेल तर शिक्षकांना व्हॉटस अॅपच्या ग्रुपची मदत होते. एखादी न समजलेली गोष्ट विद्यार्थ्याला शिक्षकांना समोर विचारायला ​भीती वाटत असेल तर ते ग्रुपच्या माध्यमातून विचारू शकतात. त्याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होतो. अर्थातच या सर्व ग्रुपमध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो.

ग्रुपवर फक्त अभ्यासाबाबत चर्चा करावी. अशा ग्रुपनी एक दक्षता घेणे आवश्यक ठरते ती म्हणजे या ग्रुपमध्ये जातीयवाद, धर्मवाद अशा आक्षेपार्ह पोस्ट केले जाणार नाही, याची काळजी सर्वच सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. - जे. बी. पिष्टे, प्राचार्य, गोखले कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणक्वीनचा बहरला रँप

$
0
0

तेजल, प्रियांका आणि दिव्या श्रावणक्वीनच्या पुढच्या फेरीत

कोल्हापूर टाइम्स टीम

श्रावण म्हणजे निसर्गाला बहर येण्याचे दिवस. स्पर्धेच्या निमित्ताने मुलींमधील बुद्धिमत्ता आणि सौंदर्याचा मिलाफही रँपवर बहरला. तीन तास रंगलेल्या स्पर्धेत तेजल घुगरदरे, प्रियांका अपराध आणि दिव्या माळी यांनी पुणे येथे होणाऱ्या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत स्थान मिळवले. त्या आता कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करतील. महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजित स्पर्धेला हॉटेल कृष्णा इनचे सहकार्य मिळाले. मधुमती शिंदे आणि अनुराधा पित्रे यांनी परीक्षण केले.

ताराबाई पार्क येथील हॉटेल कृष्णा इन हॉटेलमध्ये सकाळी स्पर्धेला सुरूवात झाली. स्टेजला जोडलेला रँप आणि त्यावरील प्रकाशझोत यामुळे वातावरणाला ग्लॅमरस लूक आलाच होता, पुढचे तीन तास मुलींच्या सहभागाने तो ​अधिकच उंचीवर गेला. अपर्णा आचार्य रँपवरची पहिली स्पर्धक ठरली. क्लासिकल डान्स करत तिने कला सादर केली. दिव्या माळीने थेट ही 'पोरगी साजूक तुपातली' गाण्यावर डान्स करत परीक्षकांसह प्रेक्षकांची मनं ​जिंकली. लॅव्हेंडर कलरच्या नेटसाडीत रँपवर आलेल्या प्रियांका अपराधने आत्मविश्वासाच्या जोरावर यश खेचून आणले. पहिल्या क्रमांकाची पसंती मिळवलेल्या तेजल घुगरदरे हिने लहंगाचोलीच्या ड्रेसिंगने लक्ष वेधून घेतले, पण कलागुण फेरीत 'पिया तोसे नैना लागे रे' या गाण्यावर नृत्य करत ब्लॅक अँड व्हाइटच्या काळात नेले.

कुणी मैत्रीणीसोबत आले होते तर कुणी आईला सोबत आणले होते. प्रत्येकीच्याच चेहऱ्यावर जितकी उत्सुकता होती तितकीच हुरहूरही होती. पियूषा स्वामीने सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याने टाळ्या घेतल्या. पूनम सी.एन. हिच्या बॅलेडान्सवर अवघे सभागृह डोलायला लागले. ऋतुजा चिपडे हिने तर कलागुण फेरीत दागिने खरेदीला येणाऱ्या महिलांचा संवाद रंगवला. इंजिनीअर असलेल्या इंद्रजा कुलकर्णीने लहान मुलांच्या अपहरणावर बेतलेला एकपात्री अभिनय सादर करत डोळ्यात पाणी आणले. रोहिणी गव्हाळेची वक्तृत्वशैली भाव खाऊन गेली. वृषाली जाधवच्या 'मला वेड लागले प्रेमाचे' गाण्याने स्पर्धेचा मूड बनवला. हेमल इंगळेच्या 'अप्सरा आली'च्या अदांनी घायाळ केले. देवदास सिनेमातील 'काहे छेडछेड मोहे'... आणि अभिनेत्री जॅकलिनच्या ऑ​नस्क्रिन 'चिटियाँ कलायीयाँ' या गाण्यांनी धमाल आणली.

सुनसान रस्त्यावर एकट्याच असताना मुलाकडून लिफ्ट घ्याल का, करिअरमध्ये कुठल्या क्षेत्रात स्त्री कमी आहे असे वाटते अशा प्रश्नांवर परीक्षकांनी स्पर्धकांना बोलते केले. स्त्रीसुरक्षा, मुलामुलींची मैत्री, पालकांसोबतचे मतभेद याविषयी मुलींची मते व्यक्त झाली. या फेरीत आजच्या तरूण मुली किती आत्मविश्वासाने आपले मत मांडतात याचा कस पाहण्यात आला.

महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सहाय्यक संपादक गुरुबाळ माळी व मॅनेजर (आरएमडी) दिगंबर अतिग्रे उपस्थित होते.

पहिलाच रँपवॉक

श्रावणक्वीन स्पर्धेच्या निमित्ताने अनेकींनी पहिल्यांदाच रँपवर कॅटवॉक केले, पण या मंचाने स्टेज डेअरिंग दिल्याची प्रतिक्रिया मुलींच्या ओठावर उत्स्फूर्तपणे आली. प्रत्येकीचा उत्साह आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. पारंपरिक वेशभूषेपासून ते वेस्टर्न आउटफिटसमध्ये अतिशय आत्मविश्वासने रँपवर येणाऱ्या तरूणींनी कोल्हापुरात नवे ग्लॅमर कल्चर रूजवण्याचे पहिले पाऊल टाकले.

अनुराधा पित्रे यांच्याकडून ग्रुमिंग सेशन

स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निवडलेल्या ​तेजल घुगरदरे, ​दिव्या माळी आणि प्रियांका अपराध या तिघींना ब्युटी एक्स्पर्ट अनुराधा पित्रे यांच्याकडून खास ग्रुमिंग सेशन देण्यात येणार आहेत. यामध्ये फॅशन, मेकअप आणि मेकओव्हर याबाबत या तिघींनाही खास मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुणे येथे होणाऱ्या पुढच्या फेरीत तेजल, दिव्या आणि प्रियांका कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करणार असल्यामुळे त्यांना परफेक्शनचे धडे अनुराधा पित्रे यांच्याकडून मिळणार आहेत.

आजच्या मुलींना स्वत:ला सिद्ध करण्याची जी माध्यमे आहेत त्यापैकीच श्रावणक्वीन ही स्पर्धा महाराष्ट्र टाइम्स आयोजित करते. स्पर्धेच्या निमित्ताने मुलींना अभिनय, मॉडेलिंग या क्षेत्राची कवाडे खुली होतात. शिवाय या क्षेत्रात जाण्यासाठी एक सुरक्षित मार्ग देणारी ही स्पर्धा आहे. - अनुराधा पित्रे, परीक्षक

इंजिनीअर, डॉक्टर आणि टीचर

श्रावणक्वीनच्या पहिल्या फेरीत रँपवर आलेल्या स्पर्धकांपैकी बहुतांशी मुली या इंजिनीअरिंग स्टुडंट आहेत तर काहीजणी इंजिनीअर पदवी घेतलेल्या होत्या. मेडिकलच्या विद्यार्थिंनीसोबत डॉक्टर झालेल्या मुलींनीही रँप गाजवला. इतकेच नव्हे तर स्पर्धेत टीचर म्हणून काम करणाऱ्या मुलींनीही ब्युटी वुइथ ब्रेनच्या मंचावर पाऊल टाकले.



मी पुढच्या फेरीसाठी निवडले गेले आहे यावर विश्वासच बसत नाहीय. अनपेक्षित यश मिळाले. या स्टेजचा स्वत:च्या पर्सनॅलिटी डेव्हलपिंगसाठी चांगला उपयोग करून घेईन. स्पर्धेमुळे आत्मविश्वास मिळाला. महाराष्ट्र टाइम्सने हे व्यासपीठ दिले त्यामुळे या क्षेत्रातील पहिले पाऊल योग्य दिशेने पडल्याचा आनंद वाटतोय. - तेजल घुगरदरे

खरंतर अशा स्पर्धेचा पूर्वानुभव नाही, पण यामुळे जबाबदारीची जाणीव मिळाली की पुढच्या फेरीमध्ये कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व करताना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनाही योग्य मार्गदर्शन आ​णि संधी मिळाली तर त्यांच्या कलेला वाव मिळतो हेच या स्पर्धेने दाखवून दिले. - दिव्या माळी

स्पर्धेतील सर्वच मुली तयारी करून सहभागी झाल्या होत्या. मुलींना आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे. यावर्षी स्पर्धेचे दुसरे वर्ष असूनही उत्स्फूर्त प्रति​साद मिळाला. यानिमित्ताने दिसणं आणि असणं हे दोन्ही गुण कसे महत्त्वाचे आहेत याचीही मुलींना जाणीव झाली. परीक्षक म्हणून या मुलींच्या कलागुणांची पारख करता आली याचा आनंद आहे. - मधुमती शिंदे, परीक्षक

महाराष्ट्र टाइम्सतर्फे प्रत्येकासाठी कार्यक्रम होत असतात. श्रावणक्वीन या स्पर्धेची तरूणी अगदी आतुरतने वाट पाहत असतात. ही स्पर्धा हॉटेल कृष्णा इन येथे होणे हाच आमच्यासाठी खास सन्मान आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र टाइम्सच्या उपक्रमात सहभागी होता आले याचे समाधान वाटते. एका वेगळ्या आणि चांगल्या कार्यक्रमाची सुरूवात कोल्हापुरात झाली आहे असे वाटते. - सिद्धार्थ शिंदे, संचालक, हॉटेल कृष्णा इन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दालन’ २९ जानेवारीपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रेडाई कोल्हापूर म्हणजेच प्रमोटर्स अॅन्ड बिल्डर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर या संघटनेतर्फे 'दालन २०१६' हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बांधकामविषयक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २९, ३०, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारीला होणार आहे. शाहूपुरी जिमखान्याच्या पटांगणावर प्रदर्शन होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

यादव म्हणाले, 'सुनियोजित आणि अद्ययावा अशा तंत्राने परिपूर्ण असे आधुनिक वास्तू व बांधकामविषयक साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बांधकामविषयक नवे तंत्रज्ञान ग्राहकांना समजावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दर तीन वर्षाने हे प्रदर्शन भरवले जाते. त्याला दरवेळी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षीही जानेवारी महिन्यात प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या दालन प्रदर्शनानिमित्त कार्यकारणी निवडण्यात आली आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संस्था व व्यावसायिकांनी स्टॉल बुकिंग व माहितीसाठी क्रेडाईशी संपर्क साधावा.'

दालनचे अध्यक्ष कृष्णा पाटील म्हणाले, 'देशपातळीवरील बांधकामाशी निगडीत आधुनिक टिकाऊ आणि वाजवी दरातील साहित्य प्रकल्प व अनेक कंपन्यांचा अर्थ पुरवठा करणाऱ्या संस्थांचा प्रदर्शनातील सहभाग निश्चित आहे. त्यामुळे गृहबांधणीसाठी कर्ज, व्याजदर, कागदपत्रे आणि नव्या योजनांची माहिती ग्राहकांना समजावी तसेच कोल्हापूर परिसरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यादृष्टीने यंदाच्या प्रदर्शनात प्रयत्न असेल.

गेल्या तीन वर्षांत झालेले बदल, ग्राहकांची बदललेली गरज, आधुनिकतेशी वाढलेला संपर्क, वाढत्या शहराबरोबर कोल्हापूर शहराची निर्माण होणारी नवी ओळख या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.'

यावेळी समन्वयक चेतन वसा, सचिव विद्यानंद बेडेकर,राजीव परीख आदी उपस्थित होते.



'दालन' ची कार्यकारिणी

अध्यक्ष कृष्णा पाटील, कन्व्हेनर - चेतन वसा, सचिव- संजय डोईजड, खजानीस- निखील शहा, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजीव परीख, सहसमन्व्यक सागर नालंग व संदीप मिरजकर, सहसचिव राहुल देसाई व सहखजानिस विवेकानंद पाटील व क्रेडाइ कोल्हापूर कमिटी सदस्य तसेच दालन बिझनेस मार्केटिंग कमिटी चेअरमन श्रेहांस मगदूम, ग्राउंड कमिटी चेअरमन-विश्वजित जाधव, पब्लिक रिलेशन ‌कमिटी चेअरमन-के.पी.खोत, सोविनीयर कमिटी चेअरमन-प्रदीप भारमल, प्रिंटींग कमिटी चेअरमन अभिजित जाधव, हॉस्पिटलीटी कमिटी चेअरमन अजय कोराणे, इनॉग्रेशन व फेलिसिटेशन कमिटी चेअरमन सुधीर हंजे, लकी ड्रॉ कमिटी चेअरमन सचिन घाटगे व आउटडोअर होल्डींग कमिटी चेअरमन विक्रांत जाधव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतीत आणला साप

$
0
0

समस्येकडे दुर्लक्ष केल्याने सिद्धनेर्लीत प्रकार

म. टा. वृत्तसेवा, कागल

घरामागे तुंबणाऱ्या सांडपाण्याची निर्गत करण्याबाबत वारंवार तक्रार करूनही गेल्या काही वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या ग्रामस्थाने लक्ष वेधण्यासाठी सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीच्या चौकटीला चक्क जिवंत साप पिशवीत घालून बांधला. या प्रकारामुळे ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांची चांगलीच फजिती झाली. मा‌‌त्र, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच हा साप सोडून दिला व संबधित ग्रामस्थाने माफी मागून या विषयावर पडदा टाकला.

सिद्धनेर्लीतील आगळे गल्लीमध्ये संतोष रघुनाथ घराळ रहातात. संपूर्ण गल्लीचे गटारीचे पाणी पुढे आऊटलेट नसल्याने त्यांच्या घराच्या मागील बाजूस साचते. घरापासून पुढे गटारच नसल्याने ही समस्या उद्‍भवली आहे. गटारीसाठी जागा देण्यास १० वर्षांपासून विरोध आहे. भावकीच्या या वादात गटारीतील घाणीच्या पाण्यात साप, बेडूक आणि इतर प्राण्याचे वास्तव्य आहे. वाढती लोकसंख्या पहाता आता गटारीचे पाणी आणि घाणीचे साम्राज्यही वाढू लागले आहे. त्यामुळे व्यक्तींना भरपूर त्रास सहन करावा लागतो. घराळ यांनी वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत लक्ष देत नाही. ग्रामसेवक या विषयाकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ‌त्रस्त असलेल्या घराळ यांनी घरामागे तुंबलेल्या घाणीतील जिवंत साप येथील तरुणांमच्या मदतीने पकडला आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ग्रामविकास अधिकारी कार्यालयाच्या चौकटीलाच अडकला. यावेळी ग्रामसेवक व्ही. व्ही. गावडे यांनी घराळ यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभाजीपूरमध्ये घरावर गोळीबार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

संभाजीपूर (ता.शिरोळ) येथे माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्थेत आनंद परीट यांच्या घराच्या खिडकीवर अज्ञाताने गोळीबार केला. या घटनेत सुदैवात कोणीही जखमी झाले नाही. मात्र खिडकीची जाळी व दोन तावदाने फुटली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परीट कुटुंबियासह परिसरातील नागरिक भयभीत झाले. हा गोळीबार नेमका कोणी व कोणत्या बंदुकीने केला याचा तपास करण्याचे आव्हान शिरोळ पोलिसासमोर आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, संभाजीपूरमध्ये शिवाजी आलासकर यांच्या घरात भाड्याने राहतात. गुरूवारी दुपारी मुले शाळेत गेली होती तर आनंद परीट हे जेवण्यासाठी घरी आले होते. टीव्ही नादुरूस्त झाल्याने केबल व्यवस्थित आहे का हे आनंद परीट पाहत होते. यावेळी खिडकीवरील गोळीबारामुळे मोठा आवाज झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संलग्नतेत कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आगामी काळात पुरवठा विभागाच्या विविध योजनांसाठी आवश्यक असलेल्या आधार व रेशनकार्ड संलग्नतेच्या कामात जिल्ह्याने नागपूर व लातूरपाठोपाठ क्रमांक पटकावला आहे. इतर काही जिल्ह्यांमध्ये रेशनकार्डशी आधार संलग्न केले जाते. पण रेशनकार्डमधील सर्व माहिती संकलित करण्याचे कामही येथे केले जात आहे. त्यामुळे भविष्यात रेशनकार्डधारकांसाठी ज्या योजना सुरु होतील, त्यावेळी ही माहिती तयार असल्याने योजनांचा तत्काळ लाभ दिला जाऊ शकतो.

रेशनकार्डधारकांची माहिती संकलित करण्याचे काम जिल्ह्यात सुरु आहे. दरम्यानच्या काळात ही माहिती आधारशी संलग्न करण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यानुसार संलग्नीकरणाचे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात संलग्नतेचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार नेमण्यात आले असून एका मोठ्या हॉलमध्ये काम सुरु आहे. जिल्ह्यात ३५ लाख ८७ हजार ४५० नागरिकांचे आधार व रेशनकार्ड संलग्न केले जाणार आहे. सध्या ७ लाख ३२० नागरिकांचे संलग्नीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी १९.५२ टक्के आहे. हा आकडा जरी कमी वाटत असला तरी एकूण लोकसंख्या, त्यातील लोकसंख्येचे संलग्नीकरणाचे झालेले काम पाहता जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूरसारख्या शहरातील ११ लाख लोकसंख्येचे संलग्नीकरण झाले आहे.

या संलग्नीकरणाचा वेग वाढावा यासाठी केवळ आधार कार्ड जोडले जात आहे.

शिवाय भविष्यात अतिशय उपयोगी असलेल्या रेशनकार्डमधील सर्व सदस्यांची माहितीही भरुन घेतली जात आहे. त्यामुळे ही सर्व माहिती भविष्यात कोणत्याही योजनेसाठी महत्वाची ठरणार असून त्या माहितीच्या आधारे नियोजन करणे शक्य होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.

पहिल्या तीन शहरांची आकडेवारी

शहर लोकसंख्या आधार संलग्न

नागपूर ४५५०९२६ १११२४०८

लातूर २३६४९७२ ८३५४५७

कोल्हापूर ३५८७४५० ७००३२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शब्द’ गवसणे महत्त्वाचे

$
0
0

जयंत पवार यांच्या कथेचे सादरीकरण करताना अतुल पेठे.
ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सकस लेखन करण्यासाठी लेखकाला स्वतःचा 'शब्द' सापडणे महत्त्वाचे असते. मलासुद्धा स्वतःचा शब्द गवसण्यासाठी बराच काळ जावा लागला. मात्र, शब्द सापडल्यानंतरच मी पुन्हा कथालेखनाकडे वळलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभाग आणि साहित्य अकादमीच्यावतीने आयोजित 'कथासंधी' या कार्यक्रमात पवार बोलत होते.

पवार यांनी कथाकार होण्यापर्यंतचा प्रवास व एक स्वतंत्र लेखनप्रकार म्हणून कथेची वैशिष्ट्ये यासंबंधी विचार मांडले. मुंबईतील गिरणगावात कामगार वस्तीमध्ये बालपण गेल्यामुळे पांढरपेशा साहित्यातून तोपर्यंत रेखाटलेल्या मुंबईपासून भिन्न असलेल्या शहराची ओळख होती. गिरणगावात सादरीकरणाची परंपरा असल्यामुळे अभिव्यक्त होण्यासाठी नकळत नाटकाकडे ओढला गेलो. त्यावेळी लिहिलेली नाटके ही मुख्य प्रवाहातील नाटकांच्या प्रभावातूनच लिहिली गेली होती. परंतु, त्यात स्वतःचे अनुभव मांडता येत नसल्यामुळे अस्वस्थ होतो. त्याचदरम्यान, नामदेव ढसाळ, भाऊ पाध्ये आणि भालचंद्र नेमाडे या तिघांच्या साहित्याच्या सहवासात आल्यामुळे स्वतःचा शब्द सापडत गेला आणि बहुजन लेखक असल्याविषयीचा न्यूनगंड बाळगणे सोडून दिले, असे पवार यांनी सांगितले.

नाटककाराकडून कथाकाराकडे झालेल्या प्रवासाविषयी बोलताना पवार म्हणाले, 'नाटकात शब्द हे प्रमुख माध्यम नसते. त्यामुळे नाटककाराने लिहिलेला शब्द रंगभूमीवर वेगळेच स्वरूप धारण करतो. कथेतील शब्द मात्र पूर्णतः लेखकाच्या मालकीचा असल्यामुळे कथा लिहिताना शाब्दिक गमतीजमती करून पाहता आल्या.'

मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक राजन गवस यांनी ओळख करून दिली. रूपाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.



'तर्काच्या खुंटीवरून...'चे सादरीकरण

जयंत पवार यांच्या 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य,' या दीर्घकथेचे दिग्दर्शक-कलाकार अतुल पेठे यांनी नाट्यमय सादरीकरण केले. एका संस्कारशील लेखकाच्या स्वप्नात त्याचे रहस्यकथा लिहिणारे काका येऊन त्याच्याकडून रहस्यकथा लिहून घेतात, या कथानकाद्वारे पवार यांनी स्वतःची ओळख नसलेल्या माणसाची व्यथा प्रभावीपणे व्यक्त केली आहे. पेठे यांनी आपल्या वाचनातून कथेतील सर्व पात्रे प्रत्ययकारी साकारली. या अभिवाचनास उपस्थितांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमुना उत्तरपत्रिका बनविणार

$
0
0

दोष दूर करण्यासाठी विद्यापीठाचे पाऊल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातर्फे प्रश्नपत्रिका तपासणीचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तपासणीतील दोष दूर करण्यासाठी नमुना उत्तरपत्रिका बनविली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर अभियांत्रिकीच्या परीक्षांसाठी अशा नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात येणार आहेत. नमुना उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

गेल्या वर्षात शिवाजी विद्यापीठाने सुमारे ४६ हजार उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी दिल्या. या फोटोकॉपीत अनेक तक्रारी झाल्या. अनेकांना फोटोकॉपीज वेळेवर मिळाल्या नाहीत. त्याची दखल घेऊन सुमारे २२ हजार उत्तरपत्रिकांत विविध प्रकारचे बदल करण्यात आले. या चुकांच्या मागे नमुना उत्तरत्रिकांचा अभाव असल्याचा निकर्ष विद्यापीठ प्रशासनाने काढला आहे. नमुना उत्तरपत्रिका नसल्याने परीक्षा प्रश्नपत्रिका तपासताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विद्यापीठातर्फे त्या-त्या विद्याशाखेतील नामवंत कॉलेज रिसोर्स सेंटर म्हणून निवडले जाणार आहे.

या कॉलेजमधील दोन किंवा तज्ज्ञ आणि नियमित प्राध्यापक नमुना उत्तरपत्रिका तयार करतील. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर काही वेळात या तज्ज्ञ प्राध्यापकांच्याकडे प्रश्नपत्रिका जाईल. त्यानुसार संबधित प्राध्यापक नमुना उत्तरपत्रिका तयार करुन विद्यापीठाला देणार आहेत. ही नमुना उत्तरपत्रिका नंतर कॅप सेंटरला दिली जाणार आहे. तेथे विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका तपासताना या नमुना उत्तरपत्रिकांचा आधार घेतला जाईल. या नमुना उत्तरपत्रिका परीक्षा झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिल्या जातील.

ही सोय उपलब्ध झाल्यास नमुना उत्तरपत्रिका आणि लिहलेली उत्तरे यांच्यातील फरक समजू शकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तींमध्ये क्रेझ जय मल्हारची

$
0
0

सीसीआर, राजाराम कॉलेज

'गणेशोत्सव' म्हटलं तर त्याच्या नावातच उत्सव आहे. म्हणजेच सगळीकडे लोकांच्या आनंदाचा, भावनांचा उत्सवच सुरू असतो. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्व वातावरण खुलून येतं. जिथे तिथे लोकांची लगबग दिसू लागते. निसर्गसुद्धा असा बहरून येतो, जणू तो गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सध्या डेलीसोपची क्रेझ गणेशोत्सात दिसणार आहे. त्यातही जय मल्हार रुपातील मूर्तीचे आकर्षण जास्त आहे.

गणेशोत्सवासाठी सर्व बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने भरून गेल्या आहेत. गणरायांच्या मूर्ती बनवण्याचे कामसुद्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. दरवर्षी होणाऱ्या जनजागृतीमुळे यावर्षी मूर्ती या शाडूच्या मातीपासून बनवण्याकडे मूर्तीकारांचा कल दिसून येत आहे. मूर्तीसाठी वापरले जाणारे रंगसुद्धा नैसर्गिक व प्रदूषणरहित आहेत. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तरूण पिढीही मूर्ती करण्याच्या कामात आनंदाने सहभागी होताना दिसत आहे. बालचमूही त्यांच्या क्षमतेनुसार मूर्ती रंगवण्याच्या कामात हातभार लावत आहेत.

सध्या टीव्हीवर वेगवेगळ्या देवांवर आधारित कथा मालिकेमधून दाखविल्या जातात. त्या अनुषंगाने मूर्तींची रचना होताना दिसते. सध्या खूप गाजत असलेल्या 'जय मल्हार' मालिकेतील 'मल्हारी' अवतारातील मूर्ती खूप प्रमाणात बनवल्या जात आहेत. यावरून 'डेली सोप'ची क्रेझ कुठेकुठेपर्यंत आहे हे दिसून येते आणि अशा मूर्तीसाठी लोकांचीही मागणी जास्त असते. पूर्वी एकाच पद्धतीच्या बैठ्या मूर्ती बनवल्या जात असत पण एकूणच सध्या बदलत्या जगानुसार लोकांच्या आवडी आणि मागण्या सुद्धा बदलत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images