Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कुटुंब गुंतलंय मूर्तीकामात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणरायाच्या आगमनाला काही दिवस राहिले असल्याने कुंभारगल्ल्यांमध्ये एकच लगबग उडाली आहे. मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाची तयारी कुठवर आली आहे, पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. घरगुती गणपतींच्या बुकिंगसाठी काहीजण सहकुटुंब कुंभारगल्ल्यांमध्ये येत आहेत. अनेकांच्या मूर्ती अजूनही तयार झाल्या नसल्याने संपूर्ण कुटुंबच रंगरंगोटी आणि कलाकुसर करण्यात गर्क झाले आहे.

गणरायांची तयारी घराघरांत सुरू झाली आहे. त्याच्या दुप्पट लगबग कुंभारवाड्यात सुरू झाली आहे. बुकिंग झालेल्या मूर्ती पूर्ण करण्याचे आव्हान बहुतांशी कुटुंबांसमोर आहे. कुंभारगल्ल्यांतील अनेकांची पहाट चारला सुरू होते. रात्री उशीरापर्यंत मूर्तीचे काम सुरू असते. माती, शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार असल्या तरी फिनिशिंग आणि रंगकाम अपूर्ण असल्याने लहान मुलेही कामाला लागली आहेत. अनेकांनी शाळेला दांडी मारली आहे. स्प्रे पेटिंगचे काम महिला आणि कुटुंबांनी हाती घेतले आहे.

विशेष म्हणजे डोळे, पितांबर आणि अन्य नाजूक कलाकुसर करण्यात मूर्तीकार मग्न आहेत. काही कलाकारांच्या घरी मनुष्यबळ नसल्याने पगारी कामगार घेतल्याचे चित्र आहे. सध्या पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्ती वाळविण्यासाठी त्या उन्हात ठेवल्या आहेत. मोठ्या मूर्तीचा रंग वाळण्यासाठी शेड खुले केले आहे. घरगुती गणपतीच्या मूर्ती पाहून बुकिंगसाठी सहकुटुंब कुंभारवाड्यात दाखल होत आहेत. कुटुंबातही बच्चेकंपनीच्या आवडीच्या बुकिंगवेळी पसंती दिली जाते.

शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश, लक्ष्मीपुरी परिसरातील कुंभारगल्ल्यांमध्ये गर्दी होत लागली आहे.

घरगुती गणपतीची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काही कुंभार व्यावासायिकांच्या शेडमध्ये रात्रभर काम सुरू आहे. वीस दिवसांवर आलेल्या गणशोत्सवासाठी कुंभारवाड्यातील रात्री जागू लागल्या आहेत. उंच मूर्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

अनेकजण आपल्या कारखान्यातील कामगार मूर्तीकामासाठी वापरतात. स्थानिक कामगार नगावर मजुरी घेतात. आता परगावी जाणाऱ्या मूर्ती पाठविल्या आहेत. स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूर्ती रंगविण्याचे आणि फिनिशिंग करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

- प्रकाश कुंभार, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दगडफेक पडली ५० हजाराला

0
0

केवळ समज नको; दंड पाहिजेच गोरंबेतील तरुणाला पाळत ठेवून पकडले

म. टा. वृत्तसेवा, कागल

गेले काही दिवस जिल्ह्यात चोर आल्याच्या अफेवेने लोकांची झोप उडालेली असताना घरांवर दगड पडू लागल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. गोरंबे (ता. कागल) येथेही गेले काही दिवस काही घरांवर दगडे पडत होती. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, नागरिकांनी पाळत ठेवून गावातीलच एका अल्पवयीन तरूणाला पकडून बेदम चोप दिला. एवढ्यावरच गाव थांबले नाही तर अशी कृत्ये करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी त्या तरूणाला तब्बल ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम गावातील देवालयाच्या उभारणीसाठी देण्याचे जाहीर केले असून या तरूणाला सहा महिने गावाबाहेर नोकरी करण्याची सूचना केली आहे.

शेजाऱ्याशी असलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मुलाच्या या कृत्यात सामील असणाऱ्या वडिलांनीही ही शिक्षा मान्य केली. गेले चार पाच दिवस गोरंबेच्या हदनाळ रोडवरील काही घरांवर दगड पडण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे तरुण हातात काठ्या घेवून गस्त घालण्याचे काम करीत आहेत.

रात्रीच्या वेळी ऊस अथवा भात पिकांतून गस्तकऱ्यांचा धुडगूस सुरू आहे. मात्र, चोरांची भीती असल्याने शेतकरीही गप्प आहेत. गावागावात अफवा सुटल्याने शेजाऱ्याशी असलेल्या भांडणाचा वचपा काहीजण काढत आहेत. गोरंबेतील 'त्या' तरूणाने गेल्या काही दिवसांपासून ठराविक घरांवर दगड फेकण्यास सुरूवात केली होती. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पडणारे दगड हे सिमेंटचे गोळे असून ते गावातील असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. तसेच ठराविक घरांवरच दगडे पडतात व एका घरावर दगडे पडत नाहीत हेही लक्षात आले. त्यानुसार सापळा लावला व बुधवारी रात्री साडेकअराच्या सुमारास तरूणांना कुणकूण लागली. त्यावेळी दगड फेकणारा एकटा नसून आणखी एकजण असल्याचे लक्षात आले.

'इतका लहान कशाला फेकतोस, अजून थोडा मोठा घे' असे ता सांगू लागला. त्यावेळी सापळा रचून बसलेल्या नागरिकांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यानंतर बापलेकांना बेदम चोप दिला.

गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या बैठकीत संबधित तरूणाला समज देवून सोडण्याचा आग्रह धरला. मात्र, एकीकडे जिल्ह्यात चोरीच्या अफवा पसरत असून अशा घटनांमुळे त्या खऱ्या असल्याचा समज होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या बैठकीत दंड ठोठावण्याचा निर्णय झाला. तसेच संबधित तरूणाने सहा महिने गावाबाहेर नोकरी करावे असेही ठ‌रविले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीसीवरून परीक्षा भवनात गोंधळ

0
0

परीक्षा प्रमाद समिती निर्णय घेणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ट्रान्सफर सर्टिफिकेट देत नसल्याच्या कारणावरुन न्यू कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने परीक्षा भवनातील डिजिटल युनिर्व्हसिटी डिजिटल कॉलेज कक्षात (डीओडीसी) गोंधळ घातला. संतप्त झालेल्या या विद्यार्थ्याने केबिनमधील काच फोडली. त्यामुळे काहीकाळ या विभागातील वातावरण तंग झाले होते.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवनमधील या कक्षात न्यू कॉलेजचा विद्यार्थी नरेंद्र धनवडे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आला. तो न्यू कॉलेजमधून बी कॉमचे दुसरे वर्ष उत्तीर्ण झाला आहे. अन्य ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेटची गरज होती. त्यासाठी गेले पंधरा दिवस धनवडे या कक्षात येत होता. मात्र ट्रान्स्फर सर्टिफिकेट देत नसल्याच्या कारणावरुन त्याने या विभागातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत झाली. संतप्त झालेल्या धनवडेने लाथ मारुन केबिनची काच फोडली. विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र झालेल्या झटापटीत सुरक्षा रक्षक मोहन पाटील यांच्या तोंडाला काच लागली. या प्रकारामुळे काहीवेळ परीक्षा भवनातील कामकाज थांबले. झालेला हा प्रकार प्रभारी उपकुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांना सांगण्यात आला. त्यावेळी संबधित विद्यार्थ्याची चौकशीची सुरुवात झाली. परीक्षा भवनमधील काही कर्मचाऱ्यांनी

या विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र परीक्षा कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी केली. न्यू कॉलेजच्या लिपिकाने विद्यापीठाकडून टी. सी. आणावा, असे सांगितल्याचे विद्यार्थी धनवडेने चौकशी समितीसमोर सांगितले. मात्र कॉलेजच्या लिपिकाने याबाबत विद्यापीठाकडे जाण्याचा सल्ला दिला नसल्याचे लेखी जबाबात लिहून दिले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाडेआकारणी रेडीरेकनरनेच

0
0

दुकानगाळ्यांप्रश्नी प्रशासनाचे स्पष्टीकरण



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मालकीच्या मार्केटमधील दुकानगाळ्यांच्या भाडेआकारणी आणि करारावरून प्रशासन आणि नगरसेवक आमनेसामने उभे ठाकले. नगरसेवकांनी रेडीरेकनरप्रमाणे शुल्क ठरविण्यास विरोध असल्याचे सांगत प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला. दुकानगाळ्यांना अव्वाच्यासव्वा भाडे लागू केले तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा दिला. मात्र सध्याच्या रेडीरेकनरपेक्षा कमी दराने भाडे आकारणी करता येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

इस्टेट विभागातर्फे दुकानगाळ्यांना भाडे आकारणी, हस्तांतरण व मुदतवाढ संदर्भातील ठराव मांडला होता. इस्टेट विभागाचे अधिकारी संजय भोसले यांनी सध्या दुकानगाळ्यांना माफक भाडे असून महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी भाडेवाढ, नव्याने करार अनिवार्य असल्याचे सांगितले. नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जयंत पाटील, निशिकांत मेथे, श्रीकांत बनछोडे, राजू लाटकर, आदिल फरास, आर.डी. पाटील, महेश कदम, भूपाल शेटे, सुभाष रामुगडे यांनी रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी गाळेधारकांना परवडणारे नाही. े धोरणात बदल आवश्यक असल्याचे सांगितले. शारंगधर देशमुख यांनी महापालिकेने स्वतःचा रेडीरेकनर दर निश्चित करून भाडे आकारणीची सूचना केली.

इस्टेट अधिकारी भोसले यांच्या उत्तराने नगरसेवकांचे समाधान झाले नाही. यामुळे गोंधळ वाढत गेला. नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता आयुक्त पी. शिवशंकर यांनी कायद्यानुसार सध्याच्या रेडीरेकनरप्रमाणेच भाडे आकारणी होईल, शिवाय ९९ वर्षांच्या करारावर दुकानगाळे भाड्याने देता येणार नाहीत असे सांगितले. नगरसेवक बनछोडे यांनी प्रति चौरस फूट एक ते तीन रुपये आकारणी, ९९ वर्षाचा करार असे पर्याय सुचविले. नगरसेवकांनी प्रशासन महापालिका चालवत नाही तर, सभागृह महापालिका चालविते असे प्रतिउत्तर देत दुकागाळ्यांचा प्रस्ताव चार पर्याय व उपसूचनेसह मंजूर केला. नगरसेवक सत्यजित कदम यांनी जनता बझारसाठी एक आणि इतर मार्केटसाठी दुसरा असा भेदाभेद का अशी ​विचारणा केली. भूपाल शेटे यांनी थकित घरफाळा प्रश्नी तर महेश कदम यांनी एचसीएल कंपनीच्या कामकाजावरुन अ‌‌िधकाऱ्यांना लक्ष्य केले.



कत्तलखान्याचा ठराव मागे

नेहरूनगर परिसरात बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्यात येणार आहे. या प्रकरणात महापालिकेतील ठराविक सदस्यांनी परस्पर डल्ला मारल्यावरून बुधवारी पार्टी मिटींगमध्ये जोरदार वादावादी झाली होती. कत्तलखाना उभारणीकरिता रेडीरेकनरप्रमाणे निधी पुनर्वर्गीकरण करून देण्याबाबतचा ठराव सभेपुढे होता. मात्र वादावादीमुळे हा ठराव मागे घेण्यात आला.

राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सभागृहाने निषेध नोंदविला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी काळ्या फिती लावल्या होत्या. नगरसेवक राजू लाटकर यांनी निषेधाचा ठराव मांडला.



स्मार्ट सिटीची चर्चा...

'स्मार्ट सिटी'योजनेत कोल्हापूरच्या समावेशासाठी महापालिकेने प्रयत्न केले. पण दहा शहरांत कोल्हापूरचा समावेश काही होऊ शकला नाही. ही वस्तुस्थिती असताना गुरूवारी स्मार्ट सिटीत कोल्हापूरचा समावेश झाल्याची वार्ता सगळीकडे पसरली आणि सोशल मिडीयावर कोल्हापूरचे अभिनंदन सुरू झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही एका उत्साही नगरसेवकाने कोल्हापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याचे सांगितले. त्या माहितीवर विश्वास ठेवत सभागृहाने बाके वाजवून स्वागत केले. पण काहीवेळाने वस्तुस्थिती समजली आणि अनेकांना हसू आवरता येईना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाचा टक्का आणखी घसरला

0
0

थेट पाइपलाइनचे फक्त साडेतीन टक्के काम पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या वर्षभरात थेट पाइपलाइन योजनेचे फक्त साडेतीन टक्के काम पूर्ण झाल्याचे गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. तरीही, कंत्राटदार कंपनीला २० टक्के कामाच्या बदल्यात द्यायचे ८० कोटी रुपये महापालिकेने दिल्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कंत्राटदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सल्लागार युनिटी कन्सल्टंटशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यानेच असा प्रकार झाल्याचा आरोप नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी सभेत केला.

योजनचे काम सुरू होऊन वर्ष झाले. पहिल्या वर्षी ४० टक्के काम होणे अपेक्षित होते. मात्र परवानग्यांच्या कचाट्यात आणि प्रशासनाच्या सावळ्यागोंधळात काम रखडल्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स'ने बुधवारी (२६ ऑगस्ट) प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत प्रा. पाटील, निशिकांत मेथे, मुरलीधर जाधव यांनी योजनेच्या कामाबाबत विचारणा केली.

करारानुसार वर्षभरात ४० कोटी रुपये मोबिलायझेशन फंड म्हणून सुरुवातीला दिल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगताच नगरसेवकांनी आक्षेप घेतला. प्रा. पाटील म्हणाले, 'पवार सभागृहाची दिशाभूल करीत आहेत. परवानगी मिळवायची जबाबदारी युनिटीची असताना कंपनीने आतापर्यंत काय केले? ५२ किलोमीटरच्या योजनेला अजूनही पाटबंधारे, जिल्हा परिषद, वन्य जीव विभागाची मान्यता नाही. केवळ ३३०० मीटर पाइपलाइन टाकली आहे. ठेकेदाराने अनावश्यक पाइप आणल्या आहेत. १६०० मिलीमीटर व्यासाच्या पाइप आवश्यक असताना ६००, ८०० मिलीमीटर व्यासाच्या पाइप पुरवून कंपनीने रक्कम उचलली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत गट झाले अॅक्टिव

0
0

व्हॉट्सअॅप ग्रुपवरून साधला जातोय संपर्क

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना गणशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे उत्सवाच्या तयारीबरोबरच निवडणुकीसाठी विविध बचत गटाच्या महिला आणि इतर क्षेत्रांतील महिला आतापासूनच अॅक्टिव झालेल्या दिसून येत आहेत.

शहरात सुमारे वीस हजार बचत गटांच्या माध्यमातून महिला कार्यरत आहेत. त्यांच्या मतांवर नजर ठेऊन बचत गटांकडे लक्ष दिले जात आहे.

गणेशोत्सवानंतर दिपावलीच्या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यासाठी प्रमुख काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसह अन्य अपक्ष इच्छुकांची मोठी गर्दी आहे. इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक महिला निवडणूक लढविण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. काही प्रभागांत विद्यमान नगरसेविका तर काही नवख्या महिला उमेदवार आहेत. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने महिला मतदारांमध्ये संभ्रमात दिसून येत आहे.

राज्यात बचत गटांची चळवळ विस्तारली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहिला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचले तर एकगठ्ठा मतदान मिळू शकते, अशी धारणा असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चढाओढ लागल्याचे चित्र दिसते. महिलांपर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवून देण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. बचत गटांना विविध आश्वासने देण्याबरोबरच अमिषेही दाखवली जात आहेत. कुठे त्यांच्यासाठी सहलींचे आयोजन केले जात आहे, तर कुठे कर्जाच्या बाबतीत कशी शिथिलतेचे आश्वासन दिले जाते. कुठे हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने भेटवस्तू दिल्या जात असल्याचे अगामी काळात दिसून येईल.

जिल्ह्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील ११ हजार ९२४ ‌आणि दारिद्रय रेषेवरील ४९ हजार ९३८ महिला बचत गटांची नोंद आहे. शहरातील हा आकडा थोडा २० हजारहून अधिक आहे. मध्यंतरीच्या काळात बचत गट कार्यरत नसल्यामुळे बंद करण्यात आले होते. ते पुन्हा नव्याने सुरू झालेले दिसून येत असून बचत गटाच्या माध्यमातून शहरातील महिलांची एकत्रित मोट बांधली जात आहे. श्रावण महिना आणि गणशोत्सव असल्यामुळे महिलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून श्रावणातील शुक्रवार असो किंवा सणादिवशी महिलांना एकत्र आणत आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न महिला उमेदवार करत आहेत.

व्हॉट्सअॅप अॅक्टिव्ह

आपल्या पक्षाच्या नगरसेविका उमेदवारांना निवडून येणासाठी आता नेत्यांच्या सौभाग्यवती पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून बचत गट तसेच आपल्या सखींच्या ग्रुपचा वापर केला जात असून 'त्या' सध्या व्हॉट्सअॅपवर चांगल्याच अॅक्टिव्ह झालेल्या दिसून येत आहेत. बचतगट महिलांचे ग्रुप, सखींचे ५० हुन अधिक महिला असलेल्यांचा ग्रुप सध्या निवडणुकीच्या काळात चांगलाच अॅक्टव्ह झालेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळे ‘कॅच’ करण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्वीचे मित्र आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांविरोधात उभ्या ठाकलेल्या शिवसेना आणि भाजप नेत्यांनी पोलिस दलाच्या गणराया अवॉर्ड वितरणाच्या कार्यक्रमातून आपापल्या स्टाइलने मंडळांवर छाप टाकण्याचा प्रयत्न केला.

गणेशोत्सवात अनेक मंडळे डॉल्बीसाठी सहकार्य मिळावे म्हणून गराडा घालत असल्याचे सांगून मंडळे आपल्या बाजूने असल्याचे आमदार ​राजेश क्षीरसागर यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉल्बी देण्यासाठी आपण सहकार्य करणार नसल्याचे सांगत, सामाजिक कामासाठी भरपूर निधी देऊ, असे सांगितले.

आमदार क्षीरसागर यांनी, 'डॉल्बीसाठी मी समर्थन केले नाही. मात्र त्यासाठी इतकी मंडळे येत आहेत की आमच्यासाठी डॉल्बीच्या खर्चासाठी एक लाख रुपयांची मदत करा असे सांगत आहेत. अनेक मंडळांचे कार्यकर्ते डॉल्बीसाठी विविध पोलिस ठाण्यांना सूचना करण्यासाठी घरात येऊन बसतात', असे सांगितले. त्यातून त्यांनी मंडळांचा ओढा आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले. त्यानंतरच्या भाषणात पालकमंत्री पाटील यांनी डॉल्बीला विरोधाची भूमिका घेतली. 'मी डॉल्बीसाठी कधी सहकार्य केले नाही आणि आताही करणार नाही. महापालिकेची निवडणूक आहे म्हणून भाराभर वर्गणी द्यावी असे होणार नाही. यापूर्वी महापालिकेत आमच्या पक्षाचे मोजके नगरसेवक होते. आता केंद्रात आणि राज्यात सत्ता आली, म्हणून डॉल्बीविरोधातील धोरणात काही बदल होणार नाही. त्याऐवजी सामाजिक कामासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल. सध्या तर दुष्काळग्रस्तांसाठी काही उपक्रम राबवले, तर त्याच्या खर्चातील ५० टक्के वाटा माझा असेल' असे सांगून मंडळांवर वेगळ्या पद्धतीने छाप पाडण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साग्रसंगीत जेवणावळी सुरू

0
0

नवख्या इच्छुकांकडून प्रभागात धडाका सुरू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका निवडणूक प्रचाराला अजून वेळ असला तरी इच्छुकांनी भागात प्रचार फेऱ्या व जेवणावळींना सुरुवात करुन प्रभागात वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे. ताकदवान इच्छुकांकडून भागातील मतदारांना आतापासूनच 'कॅच' करण्यासाठी ही पद्धत अवलंबली जात असली तरी सामान्य घरातील इच्छुकांना आगामी काळातील खर्चाचा आवाका येऊ लागला आहे.

मागासवर्गीय तसेच ओबीसी आरक्षण असलेल्या प्रभागात उमेदवारांसाठी अनेक पक्षांनी शोधमोहिम राबवली आहे. अजून तिथे सक्षम उमेदवार सापडलेले नाहीत. तर काही इच्छुकांनी आपली नावे जाहीर केलेली नाहीत. सर्वसाधारण तसेच सर्वसाधारण महिला यांच्यासाठी झालेल्या प्रभागात मात्र इच्छुकांची आतापासूनच भाऊगर्दी आहे. अनेकांनी विविध पक्षांकडे द्रोण लावून ठेवले आहेत. उमेदवारी कोणत्या ना कोणत्या पक्षाची मिळेलच. पण त्यासाठी थांबण्यासाठी विविध माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. घरोघरी पत्रके टाकून इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. काहींनी एखाद्या भागातील वजनदार मंडळींना भेटण्याचे काम दररोज सुरू केले आहे. याशिवाय विरोधक जे उभे ठाकले आहेत, त्यांनाही आतापासूनच रिंगणातून बाहेर काढण्यासाठीचे वेगवेगळे प्रकार अवलंबले जात आहेत.

एकाच प्रभागात अनेक इच्छुक असतात, पण त्यांच्याकडून वातावरण निर्मिती होण्यासाठी तयारी सुरु आहे. यातील सर्वात महत्वाचा व तातडीने प्रचार होण्याचा एकमेव मार्ग जेवणावळी. सध्या निवडणूक म्हणजे जेवणावळी हे ओघाने आलेच पाहिजे, असे झाले आहे. त्यामुळे इच्छुक आहे व जेवणावळी सुरू केलेल्या नाहीत असे होतच नाही. मुळात आपल्या गोटातील लोकांना आपल्याबाजूने ठेवण्यासाठी हा सोपा व प्रचाराचा चांगला मार्ग आहे. इतर विरोधकांकडे वळण्यापूर्वी आपल्याशी बांधून ठेवणे हे होतेच. पण यातून वेगवेगळे संदेशही प्रभागात जातात. एखाद्याने इतक्या लवकर जेवणावळी सुरू केल्यानंतर त्या उमेदवाराने जय्यत तयारी केली आहे हा एक संदेश जातो. शिवाय जे काठावर मतदार असतात, त्यांना या उमेदवाराकडे झुकण्यास एक कारण मिळते. यासाठी फक्त जेवण आहे म्हणून सांगितले जात नाही तर नियोजनाची बैठक असे त्याला गोंडस नाव दिले जाते. त्यात जरी नियोजनाची चर्चा होत असली तरी बैठक साग्रसंगीत असावी लागते हे उमेदवाराला व कार्यकर्त्यांनाही माहिती असते. त्यामुळे कोणाच्या रिकाम्या घरामध्ये, कोणाच्या शेतातील घरात तर कोणा कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये ही सारी व्यवस्था केली जात आहे.

निवडणूक लढवायची आहे तर वातावरण तयार केले पाहिजे, विरोधकांना आतापासूनच घाम फोडला पाहिजे ही इच्छुकांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. सध्या श्रावण असल्याने या जेवणावळीतील संख्या मोजकी असली तरी गणेशोत्सवात त्यांना चांगलाच रंग चढणार आहे.



खर्च वाढणार

एखाद्या प्रभागात दोन-तीन इच्छुक असले तरी त्यातील कोण जास्त संपर्कात हा प्रश्न मतदारांसमोर आहे. जो उमेदवार जास्त संपर्कात, त्यालाच मतदान हे साधारण सूत्र असते. महापालिकेच्या यापूर्वीच्या निवडणुकांत इच्छुक उमेदवारांचा अपक्ष म्हणून लढण्यावर अधिक भर असायचा. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. चारही प्रमुख राजकीय पक्ष कार्यरत असल्याने पक्षाचा विचारही होईल अशी स्थिती आहे. इच्छुकांनी आतापासून प्रचार सुरू केल्याने आगामी काळात खर्च वाढेल अशी स्थिती आहे. त्यातून निवडणुकीच्या अखेरच्या टप्पात गोंधळ निर्माण होऊ शकतो अशी शक्यताही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोलनाके फक्त निवडणुकीपुरतेच बंद?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ घेण्यासाठी आघाडी सरकारने टोलनाके तात्पुरते बंद ठेवले. त्याचीच री आता भाजप-शिवसेना युती सरकारने ओढली आहे. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांसाठी हा अजेंड्यावरील मुद्दा बनतो आणि निवडणूक संपताच पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' अशीच स्थिती अनुभवाला येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने नुकतीच टोल वसुलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

आयआरबी कंपनीसह पुर्न मूल्यांकन समिती आणि कोल्हापूर महापालिकेने केलेल्या रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनावर सरकार दरबारी सध्या चर्चा सुरू आहेत. सत्तारुढ नेत्यांकडून टोलमुक्तीचे आश्वासन वारंवार दिले जाते. मात्र टोलमुक्तीचा नेमका कालावधी जाहीर करण्याचे धाडस कुणीच केलेले नाही. यावरूनच राज्यकर्ते कितीही छातीठोकपणे टोलमुक्ती करण्याचा नारा देत असले, तरी प्रत्यक्षात ही बाब तांत्रिकदृष्या तितकीच किचकट असल्याचे स्पष्ट होत आहे. ११ ऑगस्टला राज्य सरकार नियुक्त मंत्री समितीने घेतलेल्या संयुक्त बैठकीत कोल्हापुरातील टोल वसुलीला १५ दिवसांची स्थगिती देऊन यांदरम्यान अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगितले. प्रत्यक्षात १५ दिवसांच्या मुदतीत केवळ चर्चाच होत राहिली. १५ दिवसांच्या स्थगितीची मुदत संपताच सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी स्थगिती वाढवली आहे. या निर्णयामुळेच कोल्हापूरकरांची शंका बळावली आहे. याआधीही लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन सरकारने अशाच पद्धतीने टोल वसुलीला स्थिगिती देण्याची भाषा करीत याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता.

कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे रस्ते विकास प्रकल्प आणणा-या आणि नंतर त्याला विरोध करणा-यांनाही हा मुद्दा निवडणुकीचे भांडवल असल्याचे जाणवले आहे. त्यामुळेच आपआपल्या परीने टोलचा मुद्दा मांडण्याची घाई लोकप्रतिनिधींना झाल्याचे दिसत आहे. सरकारच्या निर्णयानुसार तीन महिने वाहनधारकांची टोलमधून सुटका झाली असली तरी ही केवळ मलमपट्टी असल्याची भावना सर्वसामांन्य जनतेची आहे. आयआऱबी कंपनी तीन महिन्यांच्या चर्चेत अंतिम निर्णयाप्रत येईल का याबाबतही शंका आहेत. त्यामुळेच सध्या मिळालेली तीन महिन्यांची स्थगिती म्हणजे तात्पुरता दिलासा ठरण्याचीच भीती आहे.



दोन्ही पक्षांचा दावा

राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते, मंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कोल्हापूरचा टोल रद्द करण्यात सकारात्मक आहेत. शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष टोल रद्द होण्यासाठी साडेचार वर्षे आंदोलनात आहेत. यात मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील आघाडीवर होते. त्यामुळे आघाडी सरकारकडून फसवणूक झाली असली तरी युती सरकारकडून असे काही होणार नाही असा दावा दोन्ही मंत्री करीत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीनंतरही आपली टोलविरोधी भूमिका कायम राहील असे मंत्री पाटील, शिंदे यांनी ग्वाही दिल्याने त्यावर कोल्हापूरकरांचे लक्ष राहील. मात्र ही आश्वासने परिपूर्ण होण्यात अडथळे अधिक आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंच निवडीवरून दोन गटांत राडा

0
0

कराडः शेणोली (ता. कराड) येथे सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीवरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसन दोन गटांतील जोरदार हाणामारीत होऊन या हाणामारीत माजी सरपंच नारायण शिंगाडे, त्यांचा पुतण्या सतीश शिंगाडे यांच्यासह दोन्ही गटांतील मिळून दहा जण जखमी झाले. जखमींवर येथील कृष्णा व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या हाणामारीमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

शेणोली येथील सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी दुपारी पार पडली होती. मात्र या निवडणुकीतील बहुमतासाठी उमेदवारांची पळवापळवी झाली होती. सरपंच, उपसरपंच पदांची प्रत्यक्ष निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बहुमतानुसार आदित्या कणसे यांची सरपंचपदी तर अमोल पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

दरम्यान, माजी सरपंच नारायण शिंगाडे यांच्या गटाला ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरपंच-उपसरपंच आपल्या गटाचा होणार, असे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता तो त्यांच्या विरोधी कणसे गटाचा झाला. त्यावरून नारायण शिंगाडे व त्यांच्या विरोधातील कणसे यांच्या गटात किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. ही तणावाची परिस्थिती सरपंच निवडीनंतरही गुरुवारी दुसऱ्या दिवशी कायम होती. त्यातून गुरुवारी सकाळी शिंगाडे यांच्या गटातील काही जणांनी विरोधी गटातील एकास मारहाण केली होती. काही जणांनी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी नारायण शिंगाडे यांच्या घरी जावून त्यांना विचारणा केली. शिंगाडे यांना धक्काबुक्की झाल्याचे शिंगाडे यांच्या सर्मथकांना समजल्यानंतर सायंकाळी कणसे व शिंगाडे यांचे गट एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूनी घातक शस्त्रे, दगड यांचा वापर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरींचे पलूसमध्ये बोगस लाभार्थी

0
0

सांगलीः कडेगाव तालुक्यात २० तर पलूस तालुक्यात ४ विहिरी बोगस आढळून आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे सर्व निकष डावलून बोगस व अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्रत्येक विहिरीवर १.८० लाख रुपये सरकारी अनुदान खर्ची पडले, असे गृहित धरल्यास १ कोटी ८१ लाख रुपये निधी बेकायदा खर्च झाला आहे. आता बीडीओंसह संबंधित ५ उपअभियंते, तत्कालीन ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, रोजगार सहायकांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले. 'रोहयो' अंतर्गत झालेली ही कामे आहेत.

या दोन तालुक्यांतून विहिरींचे ४१६ प्रस्ताव महावितरणकडे चौकशीसाठी पाठविले होते, त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. पलूस तालुक्यात अनुदान घेतलेल्या विहिरींची संख्या २९२ आहे. ४ विहिरी केवळ कागदोपत्री दाखविल्या आहेत. तर १०० विहिरींचे लाभार्थी अपात्र असताना त्यांना लाभ दिला गेला आहे, अशा तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगरावांकडून स्वतः चेच पुनर्वसन

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'भाजप सरकारने पश्चिम महाराष्ट्रावर फुली मारल्याचा शोध लावणारे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी तत्कालीन मदत व पुनर्वसन कार्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेचे नाही तर स्वतःचेच पुनर्वसन करून घेतले आहे,' असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला. दानवे सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकार केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्याच्या तिजोरीतूनच दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचेही दानवे म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सांगली जिल्ह्यात अनेक कार्यक्रम पार पडले. तासगावातील मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला. त्यानंतर सांगलीत त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला.

दानवे म्हणाले, 'मी कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागातील काही कामांना भेटी दिल्या. पावसाने ओढ दिल्याने दिवसेंदिवस टंचाई वाढत निघाली आहे. राज्यात दुष्काळ आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळाचे हे सलग तिसरे वर्ष आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.

या संदर्भात आपण मुख्यमंत्री, महसुलमंत्री यांच्याशी तातडीने करणार आहोत.

सप्टेंबरपासून मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा, मंत्री तालुक्यांचा आणि खासदार, आमदार गावांचा दौरा करून मदतीबाबत सूचना देणार आहेत. सरकार काही अन्य योजनांना प्रसंगी कात्री लावेल, पण, दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. '

काँग्रेस, राष्ट्रवादीला आंदोलनाचा आधिकार नाही

काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना दानवे म्हणाले, ते खूप दिवसांनी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना दुधाला आणि साखरेला भाव पाहिजे. आतापर्यंत सरकारी दूध योजना कोणाच्या ताब्यात होत्या? त्या त्यांनीच मोडून टाकून स्वतःच्या संस्था उभ्या केल्या.त्यांना आंदोलन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे दानवे म्हणाले.

हे झाले भाजपवासी

काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे, माजी नगरसेवक विरेंद्र थोरात, कवठेमहांकाळचे हय्युम सावनूरकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, प्रा. डी. ए. माने आदींनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच स्वीकारताना तुडयेत तलाठी अटकेत

0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

तुडये (ता. चंदगड) येथील वडीलोपार्जित जमिनीच्या उता ऱ्यावर वारसानोंदी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तुडयेचे तलाठी सुधाकर गोविंदराव देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी रंगेहाथ पकडले. याबाबतची तक्रार शंकर बाबू नागवेकर (रा. तुडये) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

यासंदर्भात माहीती अशी, शंकर नागवेकर व त्यांच्या भावांची नावे सातबारा व आठ अ उताऱ्यावर लावून तसा उतारा देण्याची नागवेकर यांनी तलाठी सुधाकर देसाई यांच्याकडे मागणी केली होती. तडजोडीनंतर नागवेकर हे दोन हजार रुपये देण्यासाठी तयार झाले.

त्यानुसार तुडये तलाठी कार्यालयात सापळा रचून तलाठी देसाई यांनी तक्रारदार नागेवकर यांच्याकडे लाच मागणी करुन दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक श्रीमती पद्मा कदम, पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, श्रीधर सावंत, जितेंद्र शिंदे, मोहन सौदत्ती, संदीप पावलेकर यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीमध्ये काहींचा मक्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कागल, राधानगरी, भुदरगड म्हणजे सर्व राष्ट्रवादी नव्हे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यांकडेही लक्ष द्या. या तालुक्यांना जरा झुकते माप द्या,' अशा शब्दांत जिल्हा राष्ट्रवादीचे खजानिस अरुण इंगवले यांनी शुक्रवारी पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्याचबरोबर महापालिका निवडणूक तोंडावर असताना पक्षातील काही मंडळींनी दुसऱ्यांना रसद पुरवण्याची तयारी चालवली आहे. आपल्याच उमेदवारांना पाडण्याचा हा प्रकार असल्याची जोरदार टीकाही त्यांनी प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासमोर केली.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (ग्रामीण) नवीन कार्यकारिणी जाहीर झाली होती. त्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत इंगवले यांनी ही जोरदार टीका करताना पक्षवाढीसाठी सर्वांनी काम करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, 'सर्व काही आहे ते कागल, राधानगरी, भुदरगडमध्ये आहे. पूर्वेकडे काही नाही. त्यामुळे हे तीन तालुके म्हणजे राष्ट्रवादी नव्हे. जरा इतर तालुक्यांकडेही लक्ष द्या. अनेकजण पदे घेतात आणि बैठकीलाही येत नसल्याची परिस्थिती आहे. पक्षामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. त्या नाराजांची मनधरणी होणार की नाही? जे पक्षाचे ऐकत नाहीत, त्यांना येऊ नका, असे सांगण्याची ताकद असली पाहिजे. हजर न राहणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच पक्ष वाढेल. पक्षात तीच तीच माणसे सारखी दिसतात. नवीन माणसे येण्याची गरज आहे. महा​पालिका निवडणूक तोंडावर आहे. आपल्या काही मंडळींनी दुसऱ्यांना रसद पुरवण्याची तयारी चालवली आहे. नेता म्हणून घ्यायचे आणि आपल्या ​उमेदवाराच्या विरोधात काम करायचे. हे योग्य नाही.'

प्रदेश निरीक्षक दिलीप पाटील यांनी मात्र त्यावर काही भाष्य न करता सत्ता नसताना आता जो येईल त्याला जोडून घ्या. जो येणार नाही त्याला सोडून कामाला लागा, असे सांगितले. ते म्हणाले, 'इचलकरंजी, शिरोळमध्ये काही वाद आहेत; पण सर्वांनी एकसंध राहण्याची आवश्यकता आहे. सत्तेचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहकार चळवळ उद्धवस्त करण्याचे काम सरकारने चालवले आहे. अशावेळी जागरुक पक्ष म्हणून समोर आले पाहिजे. मी केवळ 'सह्या'जीराव नसून या परिस्थितीत जो पक्षासाठी चांगले काम करेल, त्या कार्यकर्त्याला भविष्यात विविध पदे देण्यासाठी नक्कीच वकिली करेन.' जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी स्वागत केले. यावेळी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, चंगेजखान पठाण, आदी उपस्थित होते.

काहींची नाराजी आहे, ती चर्चा करून दूर केली जाईल. पदाधिकारी निवडले जातात; पण ते पक्षाचे काम करत नाहीत. दर महिन्याला किंवा दोन महिन्यांनी अहवाल प्रदेश कार्यकारिणीला पाठवणार आहे. काम न करणाऱ्यांची नोंद त्यात केली जाईल. सत्ता नसतानाही संघटना मजबूतपणे बांधण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी निवडलेले सक्षम पदा​धिकारी काम करतील, अशी अपेक्षा आहे.'

-ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावड्यात काँग्रेसकडून कोण?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा परिसरातील सहा प्रभागांतील काँग्रेसच्या उमेदवारांच्या निश्चिती सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री सतेज पाटील यांनी आतापर्यंत चार प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. नागरिकांची मतेही आजमावली आहेत. त्यामुळे यंदा कुणाला संधी मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. काही प्रभागात विद्यमानांसह माजी नगरसेवकांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

कसबा बावडा पूर्व बाजू हा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी असून येथे इच्छुकांची संख्या मोठी आहे. शुगरमिल प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. कसबा बावडा हनुमान तलाव आणि लक्ष्मीविलास पॅलेस प्रभाग हे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. माजी मंत्री पाटील यांनी चारही प्रभागांतील इच्छुक उमेदवार, नागरिकांची मते जाणून घेतली आहेत.

माजी मंत्री पाटील हे शनिवारी कसबा बावडा पॅव्हेलियन (क्रमांक ४) प्रभागातील इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेणार आहेत. हा प्रभाग सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित आहे. येथून दहा उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये सभागृह नेते चंद्रकांत घाटगे यांच्या पत्नी अरूणा यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सुरेश चौगुले, संजय लाड, योगेश निकम, संदीप जाधव, सचिन पाटील, प्रमोद पाटील यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांचा इच्छुकांत समावेश आहे. पोलिस लाइन प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. माजी नगरसेवक मुश्ताक मोमीन, सागर येवलुजे, सचिन कोळेकर यांच्या कुटुंबातील महिला सदस्य निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. पहिल्या टप्प्यात नामदेव बिरांजे यांनी महिला सदस्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता गाड्या बऱ्याच पुढे गेल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप व शिवसेना दोघांच्याही महापालिका निवडणुकीसाठी सुटलेल्या गाड्या आता बऱ्याच पुढे गेल्या असल्याने आता युती शक्य नाही. तरीही शिवसेनेने सुचवलेल्या युतीच्या प्रस्तावाला न धुडकावता तो तो व्यवहारी आहे का? याचा विचार सुरू आहे. पण युती न झाल्यास दोघांनीही एकमेकांना कट्टर दुश्मन समजून निवडणूक लढवू नये हे मात्र शक्य आहे', अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.

शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी 'शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडीची युती होऊ शकते. अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही' असे वक्तव्य केले होते. त्यानंतर गेले काही दिवस पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का? यावर कार्यकर्त्यांमध्ये उलटसुटल चर्चा सुरू होती. त्याबाबत सर्किट हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांकडे विचारणा झाली.

मंत्री पाटील म्हणाले, 'हिंदुत्व हा दोन्ही पक्षांचा समान धागा आहे. त्यावर एकत्र आले पाहिजे. पण यापूर्वी स्थानिक पातळीवर युती झालेली नाही. लोकसभा, राज्य स्तरावरील संदर्भ वेगळे असतात. स्थानिक पातळीवरील संदर्भ वेगळे असतात. त्यामुळे पक्षाचे राज्य पातळीवरील नेते युती झालीच पाहिजे असा आग्रह कधी धरत नाहीत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांनी एकत्र राहता येते का? ते पहा असे सांगतात. पण, स्थानिक पातळीवर पहा असेही सांगतात. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या युतीचा प्रस्ताव तत्काळ न धुडकावता व्यवहारी आहे का? याचा विचार सुरू आहे. पण आता दोन्ही पक्षांनी तयारी केली आहे. दोघांच्या गाड्या बऱ्याच पुढे गेल्या आहेत. आता इतके परत मागे जाणे शक्य नाही. पण दोन्ही पक्ष एकमेकांचे जुने पुराणे दुश्मन आहेत असे समजून निवडणूक लढवू नये हे शक्य आहे. त्याबाबत विचार सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा

0
0

कोल्हापूर : पाटबंधारे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका संशयिताला करवीर पोलिसांनी अटक केली. नितीन वसंत कदम (वय ३७, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.

याबाबत इर्शाद मुसा तेलसंग (२४, रा. शहापूर, तेलगू सोसायटी, इचलकरंजी) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. संशयित कदमने तेलसंग यांना कार्यालयाचे बनावट शिक्के मारून बोगस ऑर्डर दिली आहे. करवीर पोलिसांनी सांगितले, इर्शाद हा बीएस्स्सी पदवीधर आहे. तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील होता. त्याच्या सांगलीच्या मित्राने त्याला नितीन कदम हा पाटबंधारे विभागात नोकरी लावतो, असे सांगितले होते. त्यानंतर इर्शादने कदमशी संपर्क साधला. २०१३ मध्ये भरतीतील वरिष्ठ लिपिकपदाची ऑर्डर देण्यासाठी कदमने इर्शादकडे आठ लाखाची मागणी केली. इर्शादने दोन टप्प्यात पाच लाख रुपये कदमला दिले. उर्वरीत तीन लाख रुपयांची रक्कम ऑर्डर मिळाल्यावर देण्याचे ठरले. २६ ऑगस्टला कदमने इर्शादचा भाऊ कय्यूम याला बोलावून नोकरीची ऑर्डर दिली. इर्शादच्या कुटुंबीयांनी विशेष कार्यकारी दंडाधिकारी युसूफ तासगावे यांना दाखवली. तासगावे यांनी ऑर्डरबाबत शंका उपस्थित केली. तसेच ऑर्डरवर साताऱ्याचा उल्लेख होता. त्यानंतर इर्शादने पुणे व साताऱ्यात चौकशी केली असता भरती झाल्याचे लक्षात आले. इर्शादच्या नातेवाईक व मित्रांनी कदमला पकडण्याबाबत सापळा रचून पकडले. त्यानंतर त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पॉश वागण्याची भुरळ

कदम अलिशान गाडीतून फिरत असे. त्याच्याकडे तीन नवनवीन मोबाइल असायचे. त्याचे कपडे, बोलणे पाहून तो पाटबंधारे विभागातील अधिकारी आहे, असे वाटल्यानेच त्याला पाच लाख रूपये दिल्याचे इर्शादच्या नातेवाईकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत पाणी महागणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नगरपालिका प्रशासनाने घरगुती पाणीपट्टीत केलेल्या दरवाढीला शुक्रवारच्या विशेष सभेत बहुतांशी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. मात्र, प्रशासनाने नगरसेवकांची समजूत काढत ही दरवाढ अन्यायकारक नसल्याचे स्पष्ट केल्याने सभागृहाने या दरवाढीला मुकसंमती दर्शविली. मात्र नगरसेवक महेश ठोके व भीमराव अतिग्रे यांनी पाणीपट्टी दरवाढीचा निषेध करीत सभात्याग केला. विषयपत्रिकेवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवाल, स्थानिक जैविक विविधता व्यवस्थापन प्रस्ताव, कबनूर ग्रामपंचायतीकडील कर्मचारी पालिकेकडे वर्ग करुन घेणे आदी महत्वाचे विषय पुढील सभेसमोर ठेवण्यात आले. तर इतर विषयावर फारशी चर्चा न करता मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या. दरम्यान, पाणीपट्टी दरवाढ विरोधात शिवसेनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.

विविध दहा विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे कामकाज सुरु होताच नगरसेवक महेश ठोके यांनी पाणीपट्टी दरवाढ विरोधात लक्षवेधी मांडली. आपले म्हणणे मांडताना ठोके यांनी शहरात एक-दोन दिवसाआड पाणी देऊन १२०० रुपये पाणीपट्टी आकारली जात आहे. त्यामुळे ती वर्षाला २४०० रुपये होत असताना आता ती १८०० रुपये करुन नागरिकांकडून ३६०० रुपये वसूल केल्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळे नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यासाठी पालिकेने बोगस नळ कनेक्शनधारकांचा शोध घेऊन वसुली करावी. तसेच ४० टक्के पाणी गळती थांबवावी आणि दरवाढ रद्द करावी, अशी मागणी केली. त्यानंतर माधुरी चव्हाण, सुनीता मोरबाळे, महादेव गौड, सयाजी चव्हाण, शशांक बावचकर, तेजश्री भोसले आदी सदस्यांनी पाणीपट्टी दरवाढीला तीव्र विरोध दर्शवत दरवाढीचा झालेला ठराव नामंजूर केला असताना तो मंजूर झालाच कसा असा सवाल करुन तो संपूर्ण सभागृहाचा अपमान झाला असल्याचा सांगितले.

या संदर्भात प्रशासनाची बाजू मांडताना प्रभारी मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी, पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे. इतर नगरपालिकांच्या तुलनेत इचलकरंजी पालिकेने लागू केलेली पाणीपट्टी कमी आहे. त्याचबरोबर विविध शासकीय योजनेचे अनुदान प्राप्त करताना शासन अनेक अटी-शर्ती लावत आहे. त्यामुळे १८०० रुपये केलेली पाणीपट्टी कोणावरही अन्यायकारक नसल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेवर सभागृहाने मुकसंमती दर्शविली. मात्र नगरसेवक ठोके व अतिग्रे यांनी दरवाढ विरोधात निषेध नोंदवत सभात्याग केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेक्टरी ११ टनांची घट

0
0

प्रकाश कारंडे, कागल

पावसाने मारलेली दडी आणि वातावरणातील अनियमितता यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनात हेक्टरी ११ टनांची घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पावसाची पुढील महिनाभर अशीच वाटचाल राहिल्यास हेक्टरी २० टनाची घट येवून रिकव्हरीही अर्धा टक्क्यांनी घसरण्याची भीती आहे. त्यामुळे अगोदरच विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या कारखान्यांना आता उसाच्या कमतरतेलाही तोंड द्यावे लागणार आहे. ऊस संशोधन केंद्राच्या निवृत्त शास्त्रज्ञानींही याला दुजोरा दिला आहे.

जिल्ह्यात सध्या १ लाख ४५ हजार हेक्टरवर ऊस आहे. जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी मिळून २३ कारखाने उसाचे गाळप करतात. त्यातील इंदिरा सहकारी साखर कारखाना आणि दौलत सहकारी साखर कारखाना बंद आहे. मुळातच कारखान्यांना गाळपाचे उद्दिष्ठ गाठण्यासाठी पळवापळवी आणि सीमाभागाचा आधार घ्यावा लागतो. त्यातच आताच्या या समस्येमुळे आणखी एक संकट कारखान्यांपुढे उभे रहाणार आहे.

सध्या कोणत्याच कारखान्याने मागील एफ.आर.पी दिलेली नाही. २७०० वरुन साखरेच्या दरात २२००० रुपयांपर्यंत झालेली घट त्याला कारणीभूत आहे. कर्जापेक्षा साखरेची किंमत कमी (शॉर्ट मार्जिन) झाले आणि जिल्ह्यातील कारखान्यांनी बसत नसतानाही दर दिले. यासाठी तोडणी, वाहतूक आणि पुवठादारांना थांबवले. वाहनधारकांच्याही राहिलेल्या पैशासाठी कारखान्यांनी बँकाना हमी देवून वाहनाला मंजूरीपेक्षा फयादा कर्ज देण्याची विनंती केली आहे. जसे उपलब्ध होतील तसे टप्याटप्याने कारखाने वाहन व इतर देणी भागवणार आहेत.

एप्रिल ते जून काळात चांगला पाऊस झाल्याने हेक्टरी १०० टन ऊस मिळेल अशी अपेक्षा होती परंतु जुलै व ऑगष्टमधील पावसाच्या लहरीपणाने आता हेक्टरी ११ टनांची घट होईल असा अंदाज आहे. ९ टनांची घट होणार आहे. शिवाय रिकव्हरीही पाव ते अर्धा टक्का घसरणार आहे.

- विजय औताडे, शाहू साखर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कागल’ची दादागिरी चालणार नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी कागलमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिव्या देण्याबरोबर घरात घुसण्याची भाषा करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही मुजोरी कदापि खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. या योजनेत जिल्ह्यात १७,५४४ लाभार्थी अपात्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांत सर्व लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकार लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर पुढील कारवाई करेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

लाभार्थ्यांचे अनुदान भाजप सरकारने अडवून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला होता. गरिबांच्या विरोधातील हे सरकार असल्याचा प्रचारही केला जात होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी शुक्रवारी सर्किट हाउस येथे पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले. शिवाय कागलमध्ये या अनुदानाबाबत केल्या जाणाऱ्या दादागिरीबाबत दमही दिला.

ते म्हणाले, 'या अनुदानाबाबत आतापर्यंत तीन अध्यादेश काढले आहेत. शेवटचा अध्यादेश भाजप- शिवसेना सरकारने काढला. त्यामध्ये यापूर्वी आघाडी सरकारकडून नागरिकांना नाकारला गेलेला नैसर्गिक न्याय मिळवून दिला आहे.'

कागलमधील प्रकाराबाबत ते म्हणाले, 'कागलमधील अपात्र लाभार्थ्यांना त​हसीलदारांकडून संपर्क साधला गेला पाहिजे होता. त्यांच्या अपात्रतेबाबत मत घ्यायला हवे होते. त्यांच्याकडून काही चूक झाली असेल, तर त्यांच्यावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, पण तहसीलदारच माझी गडचिरोलीला बदली करा, असे सांगत आहेत. यावरून त्यांच्यावरील प्रचंड तणाव समजू शकतो. प्रशासनातील अधिकाऱ्यांना दाब देण्याची मुजोरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांवरही दबाव टाकायचा, हे प्रकार बरोबर नाहीत. सरकार प्रशासनाबरोबर आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images