Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मसाई पठार घालतेय साद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पावसाळ्यात चिंब भिजण्यासाठी आणि कपल्सना रोमँटिक रेनी सिझन एन्जॉय करायचा असेल तर पन्हाळ्याशेजारीच असणारे मसाई पठार गेलेच पाहिजे. कोल्हापूर मधील काही हौशी पर्यटक आणि कपल्स पन्हाळा सोडून मसाईचा रस्ता धरत आहेत. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, ऊन-पावसाच्या लपंडावात दाट धुक्यात हरवत येथील निसर्गसौंदर्य पाहतच बसावे वाटते. २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे. सध्या हे पठार पावसाळी पर्यटनासाठी फेव्हरिट बनत आहे.

पन्हाळ्यापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवारपेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते. आपटी सोडली की रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडे-झुडपातून लहान वळणांच्या रस्त्याने जावे लागते. अलिकडेच मसाई रेसॉर्ट नावाचे हॉटेल येथे झाले आहे. हे या परिसरात असणारे एकमेव हॉटेल. भूक लागली की या हॉटेलशिवाय पर्याय नाही. मसाई जाताना जंगलातून जावे लागते. पूर्वी या ठिकाणी शाहूकालीन चहाचे मळे होते. थोडा घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेल्या मसाई पठारावर वारे प्रंचड वेगाने वाहते. दाट धुक्यामुळे पठारावर भरकटलेल्यांना परतीचा मार्ग सापडत नाही. वाहनांच्या मळलेल्या वाटांवरूनच परतीचा मार्ग शोधावा लागतो. धुके थोडे कमी झाले की कासारी नदीचा विस्तीर्ण प्रदेश न्याहाळता येतो.

पठारावर साचणा‍ऱ्या डबक्यात खेळण्यासाठी, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत कुटुंबिय रममाण होतात तर कॉलेज युवक-युवती धुक्यात हरवत रोमँटिक रेन्स एन्जॉय करत आहेत. पठारावर एकांत मिळत असलेने कपल्सचे हे फे व्हरिट ठिकाण बनले आहे. मसाईच्या एका टोकापासून दुसरे टोक साधारण ४ ते ५ किलोमीटर आहे. या दुसऱ्या टोकावरच मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे, त्यामुळे या पठाराला मसाई पठार नाव पडले. पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत.

एका बाजूला इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी असून अजून त्या आपले अस्तित्व टिकवून आहेत. पन्हाळा ते मसाई पठार रोप-वे, पर्यटकांसाठी पठारावर नैसर्गिकपणाला बाधा न आणता झोपड्या बांधून राहण्याची व्यवस्था करणे, हौशी गिर्यारोहकांसाठी ट्रेल-ट्रेक करणे, खुला निसर्ग मंच (अ‍ॅम्पी थिएटर)बोटिंग क्लब, पॅराग्लायडिंग अशा योजना राबविल्या तर राज्यातील हे पठार एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मारकासाठी दोन कोटींचा निधी

$
0
0

कोल्हापूरः आंतराष्ट्रीय किर्तीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण, डॉ. जे.पी.नाईक यांच्या आजरा तालुक्यातील मौजे बहिरेवाडीतील स्मारकासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रश्नी पाठपुरावा केला होता.

नाईक मूळचे आजरा तालुक्यातील मौजे बहिरेवाडी या गावचे. युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटतेतील तज्ज्ञही त्यांचे मार्गदर्शन घेत. शिक्षण हे राष्ट्रविकासाचे साधन आहे हे त्यांनी दाखवून दिले होते. आरोग्य, ग्रामविकास, नगररचना, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, समाजसेवा या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचे प्राविण्य होते. त्यांचे स्मारक मौजे बहिरेवाडी येथे उभारण्यास सरकारने १६ मे २०१४ रोजी ३ कोटी ४६ लाख ४० हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये ४० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. उर्वरित रकमेसाठी पालकमंत्री पाटील यांनी पाठपुरावा करुन या महिन्यात २ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. काम तत्काळ मार्गी लावावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी महापालिकाही तीन हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांचे अर्थसहाय्यची तरतूद केली आहे. आता लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी एकूण १५,००० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दुसरीकडे शहरातील ११३ कुटुंबियांकडे सार्वजनिक शौचालयाची उपलब्धताही नसल्याचे सामोर आले आहे.

चौदाव्या वित्त ​योजनातून महापालिकेला सात कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्या अनुदानातून वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेने वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. १५७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५३५ अर्जांची अनुदान मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. जागेचा नकाशा, कागदपत्रे यासंबंधीची शहानिशा करून अनुदान मंजूर केले जाणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

शहरातील विविध भागात दाटीवाटीची घरे आहेत. विशेषतः पेठांमध्ये अरूंद रस्ते आहेत. जागेच्या अभावी अनेक कुटुंबियांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. ही कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. महापालिकेने २०११ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरात ३१८ सार्वजनिक शौचालये होती. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये सहांनी भर पडली आहे. आज शहरातील सार्वजनिक शौचालयांची संख्या ३२४ इतकी आहे. २०११ मधील सर्व्हेनुसार वैयक्तिक शौचालय असणाऱ्या कुटुंबियांची संख्या ९५ हजार ६६० इतकी होती. तर वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या कुटुंबे २५,०१८ इतकी होती.

सात टक्क्यांनी वाढ

महापालिकेकडील उपलब्ध माहितीनुसार शहरात वैयक्तिक शौचालय असणाऱ्या कुटुंबियांची संख्या १,११,४६६ इतकी आहे. गेल्या पाच वर्षांत वैयक्तिक शौचालय असणाऱ्या कुटुंबियांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोल्हापूर शहर आणि परिसरातील १६ हजार ६७० कुटुंबियांकडे वैयक्तिक शौचालय नाही. ही कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अतिप्रसंग केल्यानेच पतीचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पोटच्या मुलीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या व दोन ते तीन वेळा अतिप्रसंग करणाऱ्या पतीचा पत्नीने खून केल्याची घटना पोलिस तपासात पुढे आली आहे. कोदे खुर्द (ता. गगनबावडा) येथे मंगळवारी पहाटे वसंत कृष्णा निकम (वय ५०) याचा झोपडीत घुसून तोंडाला काळे कापड बांधलेल्या दोन चोरट्यांनी खून केल्याचा बनाव पत्नीने केला होता. पत्नी वासंती निकम हिने खुनाची कबुली दिली असून तिला अटक केली आहे.

निकम याच्या खुनाच्या घटनेनंतर चोरानीच खून केला अशी अफवा या परिसरात पसरल्याने गगनबावडा तालुका परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. खुनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी कोदे येथील खून झालेल्या ठिकाणी मंगळवारी रात्री भेट दिली. घटनास्थळी पाहणी करून मयत कृष्णा निकम याची पत्नी वासंती हिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.

या संदर्भात पोलिस निरीक्षक मोहिते यांनी तपासाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. वसंत निकम याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो मुलांना त्रास देत होता. तसेच मुलीकडे वाईट नजरेने पहात होता. त्याने मुलीवर दोन ते तीन वेळा ​अतिप्रसंग केला होता. या संदर्भात निकम यांच्या पै पाहुण्यांनी वसंत याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी रात्री तो मद्यपान करून आला. पत्नीशी भांडण काढून तो पुन्हा मुलीकडे वाईट नजरेने पाहू लागला. तसेच त्याने अतिप्रसंग करणार असल्याचे सांगितले. पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने मारहाण केली. त्यानंतर तो झोपी गेला. पतीकडून वारंवार होणारा छळ व मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याच्या सवयीचा साक्षमोक्ष लावण्यासाठी वासंतीने वसंतच्या गळ्यावर पारळी या धारदार हत्याराने वार करून खून केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नि.श्री. गोकावे, उपनिरीक्षक विकास जाधव, गजेंद्र पालवे, हेड कॉन्स्टेबल सचिन पंडीत, बळवंत पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांचे पालकत्व फरास कुटुंबीयांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतर अनाथ बनलेल्या चिमुकल्या प्रजोत कांबळे आणि अंजली कांबळे यांना आधार देण्यासाठी फरास कुटुंबिय पुढे सरसावले आहे. या दोन लहान मुलांच्या कपडेलत्त्यापासून रोजच्या जेवणाची सोय आणि शैक्षणिक पालकत्व नगरसेवक आदिल फरास यांनी स्वीकारले आहे. गेली सात वर्षे कांबळे कुटुंबिय बाराईमाम परिसरात राहत होते. परिसरातील नागरिकांशी या चिमुकल्यांचा जिव्हाळा निर्माण झाला आहे. यामुळे या परिसरातच ही मुले राहावीत याकरिता ते राहत असलेल्या खोलीचे भाडेही भागविण्यात येणार आहे. माणुसकीच्या नात्याने फरास यांनी मदतीचा हात पुढे केल्याने निराधार बनलेल्या मुलांना आधार लाभणार आहे.

महापालिकेत झाडू कामगार असलेल्या सतीश कांबळे याने मंगळवारी पत्नी वैशालीचा खून केला आ​णि स्वतःला गळफास लावून घेतले. आई-वडीलांचा अंत झाल्याने त्यांची दोन्ही मुले अनाथ बनली. सातवर्षीय प्रजोत हा भक्ती सेवा संस्थेच्या विद्यापीठ मराठी शाळेत शिकतो तर चार वर्षाची अंजली ही बालवाडीत शिकते.

नगरसेवक आदिल फरास म्हणाले, 'कांबळे कुटुंबिय गेली सात,आठ वर्षे बाराईमाम परिसरात वास्तव्य करून आहे. परिसरातील लोकांशी ते मिळून मिसळून वागत होते. आई वडिलांविना पोरके झालेल्या प्रजोत व अंजली कांबळे या लहानग्यांच्या आयुष्याची परवड होऊ नये, त्यांना हालअपेष्टा सोसाव्या लागू नयेत याकरिता त्यांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दोन मुलांसाठी होणारा खर्च फरास कुटुंबिय करणार आहे. प्रजोत व अंजलीचा सांभाळ त्यांची आजी करणार असल्याचे समजते. त्यांनी बाराइमाम परिसरात राहावे, दरमहा घराचे भाडे देखील भरणार आहे. कपडेलत्ता, जीवनावश्यक वस्तू, अन्न या सर्व वस्तू त्यांना पुरविल्या जाणार आहेत. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सगळा खर्च केला जाणार आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करून भविष्यात सतीश कांबळे यांच्या जागी त्यांच्या मुलाला कामावर हजर करून घ्यावे यासाठी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी याकरिता नाव नोंदणीसह इतर प्रक्रिया पूर्ण करणार आहे.'

परिसरातील रुग्णांना रोज अर्धा लिटर दूध

परिसरातील रुग्णांनाही फरास कुटुंबीयांनी मदतीचा हात दिला आहे. क्षय, न्यूमोनियाग्रस्त रूग्णांना ते आजारातून बरा होईपर्यंत रोज अर्धा लिटर दूध आणि दोन अंडी दिली जातात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूल्यांकन निश्चिती आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयडियल रोड बिल्डर्सला (आयआरबी) द्यावयाची रक्कम आज (गुरुवारी) निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुंबईत सार्वज​निक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (गुरुवारी) दुपारी मंत्रालयात बैठक होणार आहे. महापालिका व आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशन प्रकल्पाच्या रकमेचा सविस्तर अहवाल आज राज्य सरकारला सादर करण्यात आहेत.

आयआरबीने रस्ते विकास प्रकल्पातील करारानुसार रस्त्याच्या किमती व तां​​त्रिक बाबीनुसार खर्च निश्चित करावा. करारात प्रत्येक रस्त्याची किंमत ठरवली असून, त्या आधारे प्रकल्पाची किंमत निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. नोबेलने प्रकल्पाचा खर्च २३९ कोटी निश्चित केला आहे. नोबेलच्या सर्व्हे व मूल्यांकनाच्या आधारावर महापालिका आणि आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी अहवाल तयार करत आहेत. यापूर्वी झालेल्या मूल्यांकनातून निकृष्ट दर्जाची साठ कोटीची कामे आणि न झालेली २१ कोटीचे काम समोर आले आहे. ही रक्कम वगळावी अशी मागणी आहे.

सरकारपुढे दोन पर्याय

नोबेल कंपनीने प्रकल्पाचे मूल्यांकन २३९ कोटी रुपये केले आहे. त्यापैकी १८२ कोटी रुपये प्रत्यक्ष कामाचे मूल्यांकन आहे. निकृष्ट रस्ते व अर्धवट रस्त्याची किंमत मिळून ८० कोटी रुपये वजा करावेत. यामुळे प्रकल्पाची किंमत १०२ कोटी ठरते, असा मुद्दा यापूर्वीच्या बैठकीत सदस्यांनी मांडला होता. मात्र आयआरबीने तो अमान्य केला आहे. आता नवा अहवाल सादर झाल्यानंतर कंपनीला द्यावयाची रक्कम किंवा पूर्वीच्या मूल्यांकनात ठरलेली रक्कम असे दोन पर्याय सरकारपुढे असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी यात्रेला ६५ लाख खर्च

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

लोकवर्गणीतून चौदा वर्षानंतर संपन्न झालेल्या महालक्ष्मी यात्रेचा खर्च यात्रा समितीने जाहीर केला. यात्रेसाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ८४ लाख ६२ हजार ९१८ रुपये लोकवर्गणी जमा झाली. त्यापैकी ६५ लाख ६६ हजार २३८ रुपये खर्च झाले. तर उर्वरित १८ लाख ९३ हजार ६५० रुपये शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी दिली.

गडहिंग्लजची महालक्ष्मी यात्रा सर्वांच्या सहकार्याने अत्यंत पारदर्शक, उत्साही व शांततेत पार पडली. स्त्रीशक्तीचा जागर व संस्कृती संवर्धन या उदात्त हेतूने लोकवर्गणीतून हा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. लोकवर्गणीतून जमा झालेल्या देणग्या व झालेला खर्च यांचा लेखाजोखा जाहीर केला. यात्रा कमिटीने हायडेफिनिशन ३१ सीसीटीव्ही कॅमेरे लोकार्पण केली आहे. हा राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. तसेच निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, डर्ट ट्रक स्पर्धा अशा विविध स्पर्धा, करमणूक कार्यक्रम, महालक्ष्मी प्रस्थान, कलश मिरवणूक व विसर्जन मिरवणूक हे यात्रेचे वैशिष्ट्य ठरले. यात्रेसाठी पन्नास रुपयांपासून लाखो रुपयांची देणगी देऊन भाविकांनी सहकार्य केले. भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा हिशोब जनतेसमोर मांडण्यात आला आहे. महालक्ष्मी यात्रा सुरळीतपणे पार पडली. यावेळी खातेदार यशवंत पाटील, सुधीर पाटील, कमिटी उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, काशिनाथ देवगोंडा, अर्जुन भोईटे, दत्तात्रय बरगे, शिवाजीराव खणगावे, अरुण बेल्ल्द, बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा खाणार भाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने ओढ दिल्याने आणि आवक कमी झाल्याने रोजच्या जेवणातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याला चांगलाच भाव आला आहे. गेल्या महिन्याभरापासून कांदा दराने उचल खाल्ली असून बुधवारी स्थानिक किरकोळ बाजारात किलोचा दर ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. कांदा दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहिणी व हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा वापर कमी केला आहे. कांद्याच्या विक्रीमुळे व्यापाऱ्यांचा फायदा होत असला, तरी गृहिणींचे महिन्याचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नवीन कांदा बाजारात येणार नसल्याने पुढील दिवसांत कांदा आणखी भाव खाणार असल्याचे संकेत बाजारपेठेत मिळत आहेत.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामुख्याने नगर, पुणे भागातून कांद्याची आवक होत असते. गेल्या महिन्यापासून समितीमध्ये येणाऱ्या कांद्याची आवक स्थिर आहे. मात्र कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव, पिंपळगाव, येवला व सटाणा येथे कांद्याच्या घाऊक दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक होणाऱ्या कांदा विक्रीवर झाली आहे. समितीमधील सौद्यामधील दरात सातत्याने वाढ होत आहे. दुय्यम प्रतीचा कांदा २५०० तर उच्च प्रतीच्या कांदा प्रतिक्विंटल ५१०० रुपयाने विक्री होत आहे.

समितीमध्ये सरासरी दर ४० रुपये मिळत असल्याने किरकोळ बाजारात हाच दर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. जूनच्या सुरुवातीस १५ ते २० रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्याने पन्नाशी पार केल्याने स्वयंपाकातील कांद्याचा वापर कमी केला आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप कांदा काढणीस अद्याप उशीर होणार असल्याने कांद्याचे आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुय्यम प्रतीच्या कांद्याची विक्री

कांद्याचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी काही विक्रेते व व्यापारी दुय्यम प्रतिचा कांदा उच्च प्रतिचा असल्याचे सांगून चढ्या दराने विक्री करत आहेत. चढ्या दराने कांदे खरेदी करताना उच्च प्रतिचा कांदा मिळत नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहिता गणपतीनंतरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अजून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नसताना महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण आतापासूनच तापण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी जोरदार तयारी चालवली असली तरी ऐन गणेशोत्सवामध्ये आचारसंहिता लागणार का याची मोठी धाकधूक लागली आहे. पण गणेशोत्सव झाल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता लागू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे इच्छुकांवर गणेशोत्सवातील आचारसंहितेची टांगती तलवार राहणार नाही असे दिसते.

१५ नोव्हेंबरपूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येण्याची गरज आहे. त्यानुसार ४५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम सप्टेंबरच्या मध्यावर लागू शकतो. या प्रकारे निवडणूक कार्यक्रम लावला गेल्यास १७ सप्टेंबरपासून सुरु होणारा गणेशोत्सव पूर्णपणे आचारसंहितेच्या सावटाखालीच साजरा होण्याची शक्यता होती. यामुळे इच्छुकांची गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची व जास्तीत जास्त मतदारांना आपल्याबाजूने ओढण्याची संधी वाया जाणार होती. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जाऊन वर्गणी देण्याबरोबरच काही अमिषे देणेही दुरापास्त होणार होते. मंडळांच्या आरतीला जाणेही इच्छुकांना अडचणीचे होणार होते. यासाठी प्रचंड अस्वस्थता राजकीय पक्षांचे नेते, इच्छूक तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही होती. प्रत्येक हालचालींवर विरोधकांचे लक्ष ठेवले जाण्याच्या शक्यतेने गणेशोत्सवातील या पद्धतीने निर्माण होणारा उत्साह कमी होण्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतरच आचारसंहिता लागू केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. ऑक्टोबरअखेरीस मतदान होऊन मतमोजणी होण्याची गरज असते. त्यासाठी ४५ दिवसाऐवजी ३० दिवसाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे २७ सप्टेंबरला ​गणेशविसर्जन झाल्यानंतर तातडीने ​कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबरला हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नाही तर २८ सप्टेंबरला तरी निश्चितच कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी जास्तीत जास्त ३२ दिवसाचा कालावधी मिळू शकतो. त्यातही अर्ज सादर करण्यानंतर प्रचारासाठी अगदी मोजकेच दिवस मिळू शकतील.

ऑक्टोबरमध्ये धावाधाव

इच्छुकांना गणेशोत्सवातील दिवसांचा फायदा प्रचारासाठी होणार असला तरी प्रत्यक्षात प्रचाराला कमी दिवस मिळणार असल्याने शहरात त्या मोजक्या दिवसात प्रचार फेऱ्यांचा धडाकाच लागणार आहे. यामुळे आतापासून उमेदवारीसाठी जरी धावाधाव सुरु असली तरी ऑक्टोबर महिना या सर्व प्रक्रियेतील सर्वात मोठा पळापळीचा व प्रचंड उलाढालीचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात वाढली गस्त पथकाची दहशत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात ग्रामस्थांच्या गस्ती पथकाच्या दहशतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आंबेवाडीत गावकऱ्यांनी चोर समजून चार परप्रांतीय मजूर आणि हळदीतील पाच जणांना बेदम मारहाण केली. फुलेवाडी रस्त्यावर एका फिरस्त्याला जमावाने चोर समजून मारहाण केली. त्याचीही प्रकृती गंभीर आहे.

मंगळवारी सकाळी कागल येथील महालक्ष्मी दूध संस्थेत कामासाठी परराज्यातील पाच मजूर बस चुकल्याने सकाळी चालत निघाले होते. या वेळी गस्त घालणाऱ्या जमावाने त्यांना चोर समजून बेदम मारहाण केली. करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक केली. पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी संयमाने बबलीप्रसाद चौधरी (वय २५), रामनारायण चौधरी (३४), प्रमोदकुमार रावत (३२), हितकुमार चौधरी (२५, सर्व रा. मध्य प्रदेश), कमलेशप्रसाद चौधरी (२२, रा. लोहारी, मध्यप्रदेश) यांची सुटका केली. मारहाण करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या घटनेत शिरढोण (ता. शिरोळ) येथील पाच जण देवाळेतील मित्राकडे जेवायला गेले होते. मंगळवारी रात्री जेवण आटोपून गावी जात असताना हळदी येथे गस्त घालणाऱ्या नागरिकांच्या हातातील बंदुका, काठ्या आणि तलवारी पाहून माघारी देवाळेकडे निघाले. त्यावेळी चोर समजून नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पाचही जणांनी मोटारसायकल सोडून देवाळेजवळील जंगलात पलायन केले. पहाटे त्यांनी देवाळेतील मित्र संभाजी खाडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. संभाजीने त्यांना हळदीत यायला सांगितले. हळदीत संभाजीची भेट झाल्यावर रात्री चोरटे परत आल्याचा संशय घेऊन ग्रामस्थांनी त्यांना बेदम चोप दिला. संजय लक्ष्मण कदम (वय ३२), श्रेणिक जिन्नाप्पा उपाध्ये (४५, रा. इंगळी), आण्णाप्पा उर्फ मंगेश बबन भंडारे (४९), प्रकाश शंकर कांबळे, आदम खुदबुद्दीन मुजावर व संभाजी खाडे अशी जखमींची नावे आहेत.

गस्त घालणारे ग्रामस्थ निष्पाप व निरपराध नागरिकांची अडवणूक करून मारहाण करत आहेत. कायदा हातात घेऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हॉटस अॅपवर पोस्ट टाकून अफवा पसरवणाऱ्या अॅडमिनला जबाबदार धरून कारवाई केली जाईल.

- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे पॅचवर्क

$
0
0

बैठकीपासून महाडिक लांबच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गटातटांत आणि नेत्यांमध्ये विखुरलेल्या काँग्रेसमध्ये पॅचवर्क करण्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रदेश पातळीवरील नेत्यांना गुरुवारी पुढाकार घ्यावा लागला. सर्किट हाउसवर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत तासभर खलबते झाली, पण या बैठकीस आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार मालोजीराजे उपस्थित नव्हते. त्यामुळे महाडिक यांना सामावून घेण्याची जबाबदारी पी. एन. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली तर न्यू पॅलेसवर श्रीमंत शाहू महाराज यांची प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतली.

महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची काँग्रेस कमिटीत बैठक आयोजित केली होती. तीत बदल करून सर्किट हाउस येथे बैठक झाली. प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश कार्यकारिणीचे चिटणीस अॅड. सुरेश कुराडे, पक्षाचे महापालिका निवडणुकीसाठीचे पक्ष निरीक्षक व माजी मंत्री रमेश बागवे, सत्यजित देशमुख, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीत पक्षाची सद्यस्थिती, तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत आमदार महाडिक नसल्याने यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचण्यात आल्याचे समजते. सद्भभावना दौडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम वगळता आमदार महाडिक दिवसभर काँग्रेसच्या नेते मंडळीसोबत दिसले नाहीत. आमदार महाडिक यांच्या आशिर्वादाने ताराराणी आघाडी भाजपसोबत निवडणूक लढवित आहे. याकडेही काहींनी लक्ष वेधले. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना सामावून घेणार असल्याने महाडिक यांनाही सामावून घेण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी माजी मंत्री पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष पी. एन.पाटील यांच्यावर समजवण्याची जबाबदारी सोप​वल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण हेही आमदार महाडिकांशी बोलणार आहेत. महापालिका निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली लढण्यात येणार असून साऱ्यांनी एकदिलाने लढावे, असे आवाहन नेत्यांनी केल्याचे समजते.
....

'काँग्रेसमध्ये वाघ आणि सिंह एकाच पिंजऱ्यात आहेत. दोघांनी एकमेंकांना पाडण्याशिवाय दुसरे काही केले नाही. तेच दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये आहेत. या दोन पैलवानांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायला हवी. नाहीतर एकाचे ऑपरेशन करावे लागेल.
- डॉ. पतंगराव कदम
समन्वय समितीचे प्रमुख, दिंडनेर्लीत बोलताना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी हिटलिस्टवर

$
0
0

शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षण खात्यात भ्रष्टाचार करणाऱ्या राज्यातील आठ अधिकाऱ्यांना आतापर्यंत निलंबित केले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. राज्यात शिक्षण उपसंचालक, सहायक शिक्षण उपसंचालकांसह काही अधिकारी हिटलिस्टवर आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावाढीसाठी तीन चाचण्यांसह त्रयस्थ संस्थेतर्फे चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.

डॉ. भापकर म्हणाले, 'शिक्षण विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. खात्यातील काही अधिकारी कारवाईच्या रांगेत आहेत. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ऑगस्टअखेर बेसलाइन चाचणी घेतली जाईल. वर्षभरात तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी त्रयस्थ संस्थेमार्फतही चाचण्या घेतल्या जाणार आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'आरटीईतील दुर्बल घटकांसाठी २६ कोटी पैकी १९.५० कोटींचे वाटप झाले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित निधी शाळांना मिळेल. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. त्या लवकरच दूर केल्या जातील. सरल डाटा बेस प्रणालीबाबत शिक्षण सचिव आणि एनआयसी संस्थेची बैठक झाली आहे. यातील त्रुटीही दूर केल्या जात आहेत. त्याचे विभागीय वेळापत्रकही जाहीर केले आहे. काही शाळांत इंटरनेटची सुविधा नसल्यास मोबाइलवरून शाळांची ऑनलाइन माहिती भरता येऊ शकते. शिक्षकांना अधिकाधिक प्रशिक्षण दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅपसह ऑडिओ, व्हिडिओ क्लिपचाही उपयोग केला जाणार आहे. एमपीएससीसह केंद्रीय पद्धतीने शिक्षक भरतीची पद्धत सुरू करण्याचा विचार सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पैशाचा खेळ करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल’

$
0
0

जुना बुधवार पेठेतील बैठकीत आमदार क्षीरसागर यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेनेचा झंझावात पाहून हडबडलेल्या काही पक्षांनी पैशाचा खेळ सुरू केला आहे. पैशावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना कोल्हापुरची स्वाभिमानी जनता त्यांची जागा दाखवेल. जनताच शिवसेनेकडे एकहाती सत्ता देईल' असा विश्वास शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. जुना बुधवार पेठेतील तोरस्कर चौक येथील द्विमुखी हनुमान मंदिरात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जुना बुधवार पेठेतील कोकणे मठ, सिध्दार्थनगर, खोलखंडोबा, बाजारगेट या चारही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील सर्व पेठा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत जुना बुधवार पेठेत मिळालेले मताधिक्य विरोधक कधी कमी करू शकले नाहीत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत अनेकांकडून जनतेला पैशाचे प्रलोभन दाखवण्यात येत आहे. परंतु शाहू महाराजांची स्वाभिमानी जनता पैशाची मस्ती उतरवेल. काँग्रेस व राष्ट्रवादीने अनेक वर्षे सत्ता भोगताना घोडेबाजार, भ्रष्टाचार आणि लाचखोरी अशा गैरकारभारांनी शहराची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. शहर आणि उपनगरात मुलभुत सोयीसुविधा नाहीत. टोल, घरफाळा वाढ, पाणी दरात वाढ अशा प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठवला आहे. त्यामुळे पेठातील स्वाभिमानी सुज्ञ जनता शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करतील.'

बैठकीला उप शहरप्रमुख अनिल पाटील, विभागप्रमुख उमेश जाधव, नागेश घोरपडे, उदय भोसले, किशोर घाटगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस करणार ‘पर्दाफाश आंदोलन’

$
0
0

२२ ते २५ ऑगस्ट कालावधीत राज्यभर मोर्चा, निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाने स्वच्छ प्रशासनाच्या दिलेल्या घोषणा या पोकळ आणि फसव्या ठरल्या आहेत. केंद्र आणि राज्यातील भाजपचे अनेक मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. राज्यासमोर दुष्काळाचे आव्हान आहे. शेतकऱ्यांसमोर संकटाची मालिका उभी राहिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी भाजपचे सरकार बेजबाबदारपणे वागत आहेत. सरकारच्या या निष्क्रीयतेविरोधात काँग्रेसने एल्गार पुकारला असून २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत राज्यभर 'पर्दाफाश आंदोलन' करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे गुरूवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. पर्दाफाश आंदोलनादरम्यान संपूर्ण राज्यभर निदर्शने, मोर्चा, मेळावे होणार आहेत. संसदेचे अधिवेशन काँग्रेसमुळे नव्हे तर भाजपमुळे व्यवस्थित होऊ शकले नाही. संसदेतील गोंधळाला भाजपच जबाबदार आहे हे जनतेला आंदोलनाच्या माध्यमातून पटवून दिले जाणार आहे. आपणाला पाहिजे तशी संसद चालली पाहिजे ही भाजपची भूमिका चुकीची आहे. बहुमताच्या रेट्यावर सगळ्या गोष्टी रेटून नेण्याची भाजपची प्रवृत्ती लोकशाहीला मारक आहे. लोकांच्या मतांची मुस्कटदाबी सुरू असून सरकारने न्याय भूमिका घेण्याऐवजी दंडेलशाही सुरू केली आहे. एफटीआयच्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. संसदेत काँग्रेसने गोंधळ घातला अशी टीका करणाऱ्या भाजपने विरोधी पक्षात असताना पाच वर्षे केवळ गोंधळच घातला होता, असा टोलाही चव्हाण यांनी लगाविला.

चव्हाण पुढे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी करायला हवी. भाजप सरकार विकासाच्या नावाखाली राजकारण करत आहे. निवडणुकीवर डोळा ठेवून बिहारला पॅकेज जाहीर करते, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार निर्णय घेताना दिसत नाही. सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उपस्थित राहून विरोधकांशी चर्चा करायला हवी होती. पण पंतप्रधान केवळ अधिवेशनाच्या सुरूवातीच्या वंदे मातरम व अधिवेशन संपल्यानंतर जन गन मन म्हणण्यापुरतेच उपस्थित राहतात. मधल्या काळात ते त्यांच्या कार्यालयात बसून होते. भाजप सरकारने विकासाचा खोटा प्रचार चालविला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात रस्त्यावर उतरू

$
0
0

राजीव गांधी जयंतीनिमित्त दिंडनेर्लीतील शेतकरी मेळाव्यात इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्रात सात महिन्यांत दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीच पॅकेज जाहीर केलेले नाही. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. भाजप सरकारकडून असा दुजाभावा केला जात आहे. सरकारकडून केवळ अच्छे दिनच्या भूलथापा मारल्या जात आहेत. सर्वसामान्य जनता वैतागली असून मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी रस्त्यावर उतरू,' असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिला. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त दिंडनेर्ली (ता. करवीर) येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, 'तत्कालीन आघाडी सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली होती. युती सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे. अच्छे दिन आणणार असे म्हणत आघाडी सरकारने बुरे दिन दाखविले आहे. केवळ काँग्रेसच अच्छे दिन आणू शकते. सात महिन्यात दोन हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सव्वा लाख कोटींची रसद पुरविली जाते, तर दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कोणतेही पॅकेज दिले जात नाही. उसाला १९०० रुपये दर दिला जात आहे. एफआरपी आणि ऊसदरातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात नाही. बहुमताच्या जोरावर खोटे बोलण्याची स्पर्धा भाजपमध्ये सुरू आहे. त्याचा झळ सर्वसामान्यांना बसत आहे.'

काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश म्हणाले, 'भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळ केला आहे. हे सरकार लुटारूंचे सरकार आहे. त्यांना जनता लवकरच धडा शिकवेल. संघाचे मोहन भागवत तर पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. अमित शहा यांना तर राज्याबाहेर काढले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर भविष्यात काँग्रेस लोकसभा चालवू देणार नाही.'

माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, 'येत्या निवडणुकीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडविला जाईल.'

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'काही कार्यकर्त्यांच्या चुका झाल्या आहेत. मात्र त्या सुधारणा झाली पाहिजे. युतीचे सरकार शेटजी आणि भटजीचे सरकार आहे. उद्योगपती, भांडवलदारांचे सरकार आहे. येत्या काही दिवसांत हुकूमशाहीसारखी परिस्थिती निर्माण होईल.'

यावेळी भारतरत्न राजीव गांधी सद्भावना पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात आला. पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढल्याचे भावे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, श्रीपतरावदादा सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील, राजीवजी सूतगिरणीचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, केडीसीसीचे उपाध्यक्ष विनायक पाटील, उदयानीदेवी साळोखे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, उदयसिंह पाटील, पी. डी. धुंदरे, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे यांचा सत्कार झाला. माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री रमेश बागवे, चंद्रकांत हंडोरे, आमदार शरद रणपिसे, सरचिटणीस यशवंत हाप्पे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमलताई व्यवहारे आदी उपस्थित होते. राहुल पाटील यांनी स्वागत केले. प्रा. राजेखान शानेदिवाण यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकाशबीजे रूजवीत चाललो ...

$
0
0

अंनिसतर्फे 'निर्भया मॉर्निंग वॉक'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो,' ही ​कविता सामूहिकरित्या गाऊन ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवत त्यांच्या हत्येचा तपास लवकर करावा, अशी मागणी करण्यात आली.

कॉ. पानसरे यांच्या हत्येला सहा महिने तर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली असून हल्लेखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही. हल्लेखोरांचा शोध लवकर लागावा, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी 'निर्भया मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात आले. कॉ. पानसरे ज्या मार्गावरून सकाळी फिरायला जात असत त्या मार्गावरून निर्भय मॉर्निंग वॉकचा मार्ग ठेवण्यात आला. सकाळी साडेसहा वाजता मॉर्निग वॉकला सुरूवात झाली. त्यामध्ये मेघा पानसरे, कॉ दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, कॉ. चंद्रकांत यादव, तनुजा शिपुरकर यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, नागरिक, युवक व युवती सहभागी झाले होते. मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. 'कॉम्रेड पानसरे यांच्या हल्ल्याचा निषेध' असे फलक कार्यकर्ते घेऊन आले होते.

शिवाजी विद्यापीठातील भाषा भवनात कॉ. पानसरे ज्या ठिकाणी विश्रांतीला थांबत व सहकाऱ्यांसमवेत चर्चा करत त्या ठिकाणी रॅली थांबवण्यात आली. 'आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो' ही ​कविता सर्वांनी म्हटली. 'कॉ. पानसरे व डॉ. दाभोलकर अमर रहे' च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पुढचा लढा पानसरे व दाभोलकर यांच्या मार्गावरून लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि. प. च्या ३१ शाळांत स्वच्छतागृहे

$
0
0

इंडसइंड बँकेने एक कोटी खर्चून राबविला उपक्रम

>> मारुती पाटील, कोल्हापूर

समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांसह कार्पोरेट कंपन्याही विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अशाच प्रयत्नातून 'कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व' (सीएसआर) संकल्पनेतून इंडसइंड बँकेने जिल्हा परिषदेच्या ३१ शाळांमध्ये एक कोटी रुपये खर्च करुन विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहे बांधून दिली आहेत. बँकेच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अनेक पायाभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली आहेत, पण अजूनही जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. अशावेळी त्यांना पिण्याची पाण्यापासून सर्वच पायाभूत सुविधांसाठी केवळ प्रतीक्षाच करावी लागते. सरकारच्या विविध योजनांतून जिल्ह्यातील शाळांचा कायापालट होत असला, तरी अजूनही विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. विद्यार्थीनींची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी मदतीबरोबर कार्पोरेट कंपन्यांनी विकासाला हातभार लावावा यासाठी सरकारने आवाहन केले होते.

कार्पोरेट कंपन्यांनी भरघोस नफा मिळवण्याबरोबरच 'कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व' स्वीकारावे अशी संकल्पना पुढे आली. सरकारने केलेल्या आवाहनाला कोल्हापूर येथील इंडसइंड बँकेच्या शाखेने प्रतिसाद दिला आहे. बँकेने आपले सामाजिक ऋण व्यक्त करताना जिल्हा परिषदेच्या ३१ शाळांमध्ये एक कोटी रुपये खर्चून स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. स्वच्छतागृहे बांधण्यापूर्वी बँकेने आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांचे सर्वेक्षण केले. बँकेने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि सुविधांचा विचार करुन प्रत्येकी तीन ते पाच क्षमतेची स्वच्छतागृहे बांधली आहेत. कार्पोरेट कंपनीने केलेला जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे इतर कार्पोरेट कंपन्यांनी इंडसइंड कंपनीचे अनुकरण केल्यास अनेक जटील समस्या निर्गत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकार्पण सोहळा उद्या

'जलयुक्त शिवार' अभियानामध्ये सिद्धीविनायक व साई संस्थांनने कोट्यवधींचा निधी दिला आहे. त्याचप्रमाणे शाळांसाठी निधी मिळाला असल्याने जिल्ह्यातील सामाजिक अभिसणाला सुरुवात झाली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले. शुक्रवारी (ता.२१) या सामाजिक उपक्रमाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका पैलवानाचे ऑपरेशन करायला हवे

$
0
0

काँग्रेसमधील गटाबाजीची पतंगराव कदम यांच्याकडून झाडाझडती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेसमध्ये वाघ आणि सिंह एकाच पिंजऱ्यात आहेत. दोघांनी एकमेंकांना पाडण्याशिवाय दुसरे काही केले नाही. तेच दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये आहेत. या दोन पैलवानांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायला हवी. नाहीतर एकाचे ऑपरेशन करावे लागेल', असा टोला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या समन्वय समितीचे प्रमुख, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी लगावला. राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील शेतकरी मेळाव्यावेळी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी दोघांचीही झाडाझडती घेतली.

माजी मंत्री पतंगराव कदम म्हणाले, 'काही जण आमदार होण्यापेक्षा गोकुळचे संचालक होण्यातच धन्यता मानतात. खरेतर काँग्रेस हा बलाढ्य पक्ष आहेत. काही चुकांमुळे काही जिल्ह्यांमध्ये पक्षाला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसमध्ये एकोपा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यापुढे पाडापाडीचे राजकारण करण्याची गरज नाही. जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट करण्याची गरज आहे. यापूर्वी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट होती. केवळ आपापसातील भांडणामुळे बलाढ्य असलेल्या काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेतही परिवर्तनाची लाट आहे. सध्याच्या भाजप आणि शिवसेना या युती सरकाराला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट सुरू आहे. काँग्रेस पक्षात अनेकांनी अहंकार बाजूला ठेवायला हवा. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला शंभर टक्के यश मिळेल. सर्वसामान्य मतदार काँग्रेसलाच मतदान करतील. फक्त सत्ता घ्यायची की नाही, याचे चिंतन करा.'

सतेज पाटील यांची कबुली

'आमच्या भांडणांमुळे दुसरी सत्ता आली, हे निर्वावादपणे मान्य करावे लागेल' अशी कबुली देत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता पाटील म्हणाले, 'जिल्ह्यात काहीही वातावरण असले तरी यापुढे काँग्रेस अधिक भक्कम होणार आहे. महापालिकेत यापुढेही पी. एन. पाटील, मालोजीराजे आणि सतेज पाटील यांची आघाडी कायम राहणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसची वाटचाल सुरू राहिल. अच्छे दिन आले का, याबाबत सर्वसामान्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तीचे मूळ स्वरूप बदलण्याचा घाट

$
0
0

अंबाबाई भक्तांच्या बैठकीत डाव हाणून पाडण्याचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुका तातडीने दुरूस्त कराव्यात, पंढरपूरच्या धर्तीवर श्रीपूजकांची नेमणूक करावी, पुजाऱ्यांना आचारसंहिता असावी याबरोबरच अंबाबाई मूर्तीचे मूळ स्वरूप बदलण्याचा श्रीपूजकांचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.

शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने अंबाबाई भक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई म्हणाले, 'अंबाबाई मंदिरात जो गोंधळ सुरू आहे, त्यावर आवाज उठविण्याची गरज आहे. देवीच्या मूर्तीवर तीन किलो एमसील आणि सातशे ग्रॅम लोखंड लावण्याचा अधिकार श्रीपूजकांना कोणी दिला? देवीच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग असून ती पार्वती आहे. महालक्ष्मी ही बालाजीची पत्नी आहे असे नाते सांगून शैव-वैष्णव पंथाचे राजकारण निर्माण केले जात आहे. त्यात महालक्ष्मी कॅलेंडरनेही गोंधळ निर्माण केला आहे. पुजाऱ्यांनी आपल्या चुका कबूल कराव्यात. जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवला पाहिजे.'

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 'इसवीसनापूर्वीपासून अंबाबाई असा उल्लेख असतानाही काही वर्षांपासून महालक्ष्मी असा उल्लेख केला जात आहे. त्याचबरोबर शिवलिंग व नागमुद्रा काढण्याचा त्यांचा हेतू काय आहे ?, मूर्तीचे स्वरूप बदलणे हे फार मोठे षडयंत्र सुरू आहे. देवीचे रक्षण करण्यासाठी त्यांना बाहेर काढले पाहिजे. तीर्थाजवळ झुरळ, उंदीर आणि अस्वच्छता असते. प्रसादाचे पेढे कचऱ्यात फेकले जातात.'

मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, 'या रासायनिक संवर्धनादरम्यान चित्रीकरण झाले आहे का?, रासायनिक प्रक्रियेदरम्यान त्रुटी कशा राहिल्या? जे जे महालक्ष्मी मंदिर म्हणून फलक आहेत त्यावर अंबाबाई मंदिर फलक करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. पंढरपुरामध्ये ज्याप्रमाणे महिलांच्या हस्ते पूजा केली जाते तशीच पूजा महिलांच्या हस्ते इथेही झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेला कारभार रोखण्यासाठी यासंदर्भात जिल्हाधिकारी अमित सैनी यांना निवेदन देऊ. त्यानंतर परिसंवादाचे आयोजन केले जाईल. '

यावेळी दिलीप पाटील, शिरीष देशपांडे, बाळासाहेब जाधव, शैलजा भोसले, सुरेंद्र घोरपडे, शरद तांबट, रामदास पाटील, गिरीश फोंडे, बबन रानगे आदी उपस्थित होते.

श्रीपूजकांसाठी आचासंहिता करा

इंद्रजित सावंत यांनी यावेळी श्रीपूजकांना आचासंहिता घातली पाहिजे, अशी मागणी केली. ते म्हणाले, ' मद्य, गुटखा खाणाऱ्या श्रीपूजकांना मंदिरात जाऊ देऊ नये. मूर्तीच्या मस्तकावरील शिवलिंग, नागमुद्रा काढण्याच्या ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेणे आवश्यक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना कधी पकडणार?

$
0
0

* तेरवाडमधील विद्यार्थ्यांचा प्रश्न * राष्ट्रपतींना पाठविली ११११ पत्रे

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन दोन वर्षे झाली. त्यांचे मारेकरी शोधण्यात अपयश आले आहे, यामया निषेधार्थ तेरवाड (ता.शिरोळ) येथील सिद्धार्थ हायस्कूल व संत कबीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना सामुदायीक पत्रे पाठविली. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांमया मारेकर्यांना कधी पकडणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी पत्रात उपस्थित केला आहे. 1111 पत्रे सामुदायिकरित्या राष्ट्रपतींना पाठविण्यात आली.

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांमया मारेकर्यांचा शोध घेण्यास तपास यंत्रणा निष्क्रीय ठरली आहे. याचा निषेध करण्यासाठी अन् तपासला गती मिळावी याकरीता तेरवाड येथील सिद्धार्थ हायस्कूल व संत कबीर विद्यालयाने वेगळा उपक्रम राबविला. कुरूंदवाड येथील डॉ.आंबेडकर पुतळ्यापासून पोस्टापर्यंत विद्यार्थ्यांनी रॅली काढली. विद्यार्थ्यांमया हातात घोषणा फलक होते. दुपारमया कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले दप्तर डो्नयावर घेतले होते. पोस्टाजवळ रॅली आल्यानंतर विद्यार्थ्यांनी पत्रे पोस्टात टाकली.

शिक्षण संस्थेचे संस्थापक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास कांबळे, राष्ट्र सेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, डी.एन. सुतार,जे.पी.जाधव, संदिप बिरनगे, संजय शिंदे, जे. व्ही. कांबळे, मुख्याध्यापिका रूपाली हसूरे, शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images