Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फसवणूकप्रकरणी तिघांना शाहूवाडीत अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

भारत सरकारचे योजना अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. वसंत ज्ञानदेव पाटील (रा. पेरीड, ता. शाहूवाडी), महेश सीताराम गुरव (रा. ओझरे, ता. संगमेश्वर) व सुप्रिया नागेश गुरव (रा. बामणेवाडी, ता. संगमेश्वर)अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक राजेंद्र रामचंद्र पाटील यांनी दिली. वसंत पाटील वापरत असलेल्या चारचाकी गाडीत कळे पोलिसांना एक बंदूक व ३१ जिवंत काडतुसे सापडली आहेत. कळे पोलिसांनी ही कारवाई काटेभोगाव, तालुका पन्हाळा येथे केली.

एम. एच. ११ जी. १६० वापरत असलेल्या या क्रमांकाच्या गाडीवर 'भारत सरकार' असे लिहून हे तिघेजण करंजफेण, बुरंबाळ, अनुस्कुरा, पेंडाखळे या दुर्गम व डोंगराळ भागात फिरत होते. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांना संबधितांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेऊन त्यांना दुपारी एकच्या सुमारास फौजदार राहुल पाटील, पोलिस नाईक महेंद्र पाटील, राजू पाटील, विश्वास चिले यांनी तिघांना पिशवी गावातून बांबवडेकडे येत असताना गाडीसह पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीचा खून करून आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून करून पतीने गळफास लावून घेतल्याची घटना बाराईमाम मोहल्ला परिसरात घडली. खासगी सावकराने कर्जवसुलीसाठी लावलेला तगादा व मटका, जुगार, व्हिडिओ गेमच्या व्यसनाबद्दल पत्नीने पतीला जाब विचारल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा खून केल्याचे प्राथमिक कारण पुढे आले आहे. या घटनेतील वैशाली सतीश कांबळे (वय २४) असे दुर्देवी पत्नीचे नाव असून सतीश संभाजी कांबळे (३२) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

बाराईमाम मोहल्ला परिसरात आबिद अब्बास मोमीन यांच्या घरातील एका खोलीत कांबळे दाम्पत्य भाडेकरू होते. सतीश हे महानगरपालिकेत आरोग्य कर्मचारी तर वैशाली या धुणीभांडी करत होत्या. त्यांना प्रज्योत (७) व अंजली (४) अशी दोन मुले आहेत. मंगळवारी सकाळी कांबळे यांच्या खोलीचे दार उघडले नसल्याने घरमालक मोमीन यांनी दरवाजा ठोठावला असता आतून उत्तर मिळाले नाही. त्यांनी कडी तोडून आत प्रवेश केला असता वैशाली यांचा खून झाल्याचे व सतीश यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. खून व आत्महत्येची घटना कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिस अधीक्षक भारतकुमार राणे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

सतीश हा झाडू कामगार होता. त्याला मटका, जुगार व व्हिडिओ गेम व दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्याने व्यसनासाठी खासगी सावकारांकडूनही कर्ज घेतले होते. कर्ज वसुलीसाठी खासगी सावकारांनी चोप दिल्याची घटना घडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे कांबळे दाम्पत्यात कायम भांडणे होत होती. सोमवारी वैशालीच्या बहिणीचा साखरपुडा होता. पण या कार्यक्रमाला सतीश उपस्थित नव्हता.

साखरपुडा झाल्यानंतर वैशाली घरी आल्या. दोन्ही मुले बाराईमाम परिसरातील त्यांच्या आई शोभा धनवडे यांच्याकडे होती. सावकरांनी कर्जवसुलीसाठी मारहाण केल्याने सतीशने कर्मचाऱ्यांच्या सोसायटीकडून एक लाख १४ हजार रूपये कर्ज काढले होते. कर्ज फेडण्यासाठी वैशालीनेही मदत केली होती. पण सतीशची व्यसने सुटत नव्हती. या कारणांवरून सोमवारी रात्री त्यांच्यात भांडणे झाली. या भांडण्यातून सतीशने वैशालीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून करून स्वतः आत्महत्या केली असावी असे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन अपघातांत नऊजण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात मंगळवारी जामदार क्लब, शिवाजी पार्क व उमा टॉकीज या तीन ठिकाणी झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले. जामदार क्लब गायकवाड वाड्याजवळ सायंकाळी साडेपाच वाजता एसटी व मोटारीचा अपघात झाला. गोव्याहून जोतिबाकडे निघालेल्या मोटारीची कागल रंकाळा एसटीला समोरासमोर धडक बसली. मोटार बसच्या खाली गेल्याने मोटारीतील चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. शिवाजी पार्क सेव्हन्थ डे स्कूल परिसरात मोटारीने एक दुचाकी व एक पादचाऱ्याला धडक दिली. दुचाकीवरील योजना अनिल खैरे (२३) व प्रिती दत्तात्रय सूर्यवंशी (२०) या जखमी झाल्या. उमा टॉकीज सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना कागल रंकाळा एसटीची धडक बसून बेबी बाबासो मुजावर (वय ६५, रा. मुडशिंगी) या जखमी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील प्रत्येक प्रभागाला मिळणार २५ लाख रुपये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारने शहराच्या विकासासाठी विशेष बाब म्हणून वीस कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहरासाठी अच्छे दिन कुठे आहेत, अशी बिनबुडाची टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. विरोधकांनी विरोधासाठी विरोध करण्याआधी आत्मपरीक्षण करावे,' असे आवाहन आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केले.

आमदार महाडिक म्हणाले, 'राज्य सरकारकडे शहरातील विकासकामांच्यासाठी २८ फेब्रुवारी २०१५ मध्ये मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. शहरातील पूर्वीच्या ७७ प्रभागासाठी निधी खर्ची टाकला जाणार आहे. प्रत्येक प्रभागाला सुमारे २५ लाख रुपये देण्याचे नियोजन आहे. या निधीतून रस्ते, गटर्स, पथदिवे, सार्वजनिक स्वच्छता आदी कामे केली जाणार आहेत.'

ते पुढे म्हणाले, 'महापालिका आर्थिक संकटात आहे. पहिला हप्ता सहा कोटी रुपयांचा मिळाला आहे. दुसरा हप्ताही तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पाचगावचा पाण्याचा प्रश्न, दलित वस्ती सुधारणा, रस्त्यांसाठी नाबार्ड योजना राबविली आहे.' पत्रकार परिषदेस गोकुळचे संचालक बाबा देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सुनील मोदी, सुहास लटोरे, 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे आदी उपस्थित होते.

लवकरच आणखी योजना

तत्कालीन आघाडी सरकारने शहरासाठी काय दिले, हे सर्वांना माहिती आहे. आरोप आणि टीका करण्याच्या पलिकडे त्यांनी काहीच केलेले नाही. त्याउलट महायुतीच्या सरकारने अनेक लोकविकासाच्या योजना आणल्या. येत्या पंधरा दिवसांत शहरात आणखी योजना आणल्या जाणार असल्याचे महेश जाध‍व यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारभाऱ्यांमुळे पक्षांची डोकेदुखी

$
0
0

अनेकजण अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

नेत्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कारभाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या कारभारामुळे आजी-माजी नगरसेवकांकडून सध्या तरी पक्षांकडे पाठ फिरवली जात आहे. इच्छुकांकडून पक्षांचे अर्ज जरी घेतले असले तरी त्यांच्या मनात कारभाऱ्यांच्या कारभाराबाबतची खदखद आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याऐवजी तुलनेने बंधने कमी असलेल्या आघाडीतून किंवा अपक्ष उभे राहण्याची त्यांची जास्त इच्छा दिसून येत आहे.

अपक्षांचा घोडेबाजार पाहणाऱ्या शहरवासीयांनी गेल्या दोन सभागृहात पक्षीय राजकारणाला सुरुवात झाल्याचेही पाहिले. यातून घोडेबाजार कमी होऊन विविध कारभारावर अंकुश ठेवला जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार घोडेबाजार कमी झाला. पक्षीय सत्ता आल्याने कारभारावर पक्षाचा म्हणजे नेत्यांचा थेट अंकुश आला. अनेक वर्षांपासून मोकाट सत्ता भोगणाऱ्यांना हा अंकुश सतावत होता. पक्षाच्या नेत्यांनी काही आदेश दिल्यानंतर तो डावलण्याचे अनेकांना जड जाऊ लागले. त्यातून कारभाऱ्यांचे प्रस्थही वाढत गेले. अनेक नगरसेवक नेत्यांच्या जवळचे बनल्याने त्यांच्या माध्यमातून कारभाराच्या किल्ल्या फिरवण्यात येऊ लागल्या. त्याचाही त्रास काही नगरसेवकांना होऊ लागला. काही ज्येष्ठ नगरसेवक असून, त्यांना कारभारी मंडळींमुळे स्थान दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात होती, तर काही निर्णयांमध्ये नेत्यांकडून आदेश आल्याने त्याप्रमाणे कारभार करण्याचे काम कारभाऱ्यांकडून केले जात असल्याने हा प्रकार म्हणजे हुकूमशाही असल्याचेही मत नगरसेवक खासगीत बोलत होते. ही खदखद गेल्या काही वर्षांत जास्त निर्माण झाली होती.

कारभाऱ्यांकडून परस्पर नेत्यांना शब्द देणे, नगरसेवकांच्या निधी तसेच विकासकामांबाबत नेत्यांसमोर स्पष्ट बाजू न मांडणे यामुळे नगरसेवकांमध्ये या कारभाऱ्यांबाबत नाराजी होती. स्वतःच्या भातावर तूप वाढून घेण्याचे प्रकार वाढल्याने काही कारभाऱ्यांचा अपवाद वगळल्यास अनेकांना दुषणेच मिळत होती. काँग्रेसमधील काही कारभाऱ्यांनी स्वतःच पदे घेतली, तर राष्ट्रवादीत नेत्यांच्या जवळच्या नगरसेवकांनी ज्येष्ठांना बाजूला ठेवून पदे घेतल्याबद्दल तेथील ज्येष्ठांची नाराजी आहे. सध्या दोन्ही पक्षांकडून काहीजणांनी अर्ज नेले आहेत, पण ते याच पक्षाशी बांधील राहतील याची शंकाच आहे. त्यातील काहींनी इतर आघाडीबरोबर चर्चा चालवली आहे, तर काही अपक्ष उभे राहण्याचीही तयारी करत आहेत. विद्यमान असल्याने त्यांना भागात मानणारा गट आहे. चौरंगी लढती होणार असल्याने पक्षांना सक्षम उमेदवार हवे आहेत. त्यामुळे या विद्यमानांना सध्या भाव आहेच. त्यांनी मात्र कारभाऱ्यांचा गेल्या काही वर्षातील त्रास सध्या उमेदवारीच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी निश्चित होईपर्यंत त्यांची रणनीती चांगलीच रंगणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज यांची ‘उत्तरे’तही तयारी

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी माजी आमदार मालोजीराजे काँग्रेसकडे 'नॉट रिचेबल' होऊ लागल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना गटबांधणी करण्याची संधी मिळाली आहे. कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर हे दोन्ही मतदारसंघ भविष्यात पाटील यांच्या 'हाता'त जाण्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीमुळे भाजप, ताराराणी आघाडीने बाळसे धरले आहे. काँग्रेसला मानणारे नगरसेवक, इच्छुक उमेदवार काँग्रेस विरोधातील भाजप, शिवसेना किंवा ताराराणी आघाडीच्या गळाला लागत आहेत. २०१० च्या निवडणुकीवेळी सतेज पाटील व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे दोन्ही नेते एकत्र होते. तेव्हा आमदार महादेवराव महाडिक एकाकी पडले होते. मालोजीराजे यांनी त्यावेळी दोन्ही गटांशी जमवून घेतले. आगामी निवडणुकीत महाडिक, पी. एन. पाटील, मालोजीराजे गट एकमेकांशी जमवून घेत असताना सतेज पाटील एकाकी पडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

गेल्यावेळच्या निवडणुकीत उत्तर मतदारसंघात ५१, तर दक्षिण मतदारसंघात २४ प्रभाग होते. त्यावेळी तिकीट वाटपात सतेज पाटील, मालोजीराजे यांनी बाजी मारली होती. महाडिक यांचे १० जागांवर, तर पी. एन. पाटील यांचे दोन जागांवर उमेदवार होते. निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने पदाधिकारी निवडीत सतेज पाटील यांना झुकते माप मिळाले. त्याखालोखाल मालोजीराजे गटाला संधी मिळाली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मालोजीराजे सक्रिय नसल्याने त्यांनी यंदाची निवडणूकही लढवली नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून सक्रिय होण्याची शक्यता नाही. त्यांनी ताराराणी आघाडीशी जमवून घेतल्याचे सांगण्यात येते. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदमही ताराराणी आघाडीकडे गेले आहेत. त्यामुळे बहुतांश ८१ प्रभागांत सतेज पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे.

उत्तरमधील बहुतांश प्रभागांतील जबाबदारी त्यांच्यावर पडणार आहे. कसबा बावडा हा त्यांचा बालेकिल्ला असला तरी जुन्या कोल्हापुरातील बहुतांश प्रभागांत काँग्रेसचे उमेदवार मिळवण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. पाटील काँग्रेसमध्ये एकाकी पडले असले तरी मालोजीराजे अलिप्त राहिल्याने महापालिकेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचा, सतेज पाटील यांचा नवा गट अस्तित्वात येऊ शकतो. त्याचा फायदा २०१९च्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकेल. भविष्यात दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांवर सतेज पाटील गट दावा करू शकेल अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांना घाई जाहीरनाम्याची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी सामोरे जाण्यासाठी प्रत्येक पक्षाने जंगी तयारी चालवली आहे. सक्षम उमेदवाराबरोबरच ज्या शहरवासीयांसमोर उमेदवारांना सादर केले जाणार आहे, त्या मतदारांना विकासाची आश्वासने देण्यासाठी जाहीरनामाही तयार केला जात आहे. शहर विकासातील मोठ्या प्रकल्पांबरोबर भागांमधील छोट्या विषयांचाही समावेश त्यामध्ये करण्याचा प्रयत्न आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्ते, शिक्षण, आरोग्य या पायाभूत सुविधांबरोबरच आयटी, स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवून शहरवासीयांना आकर्षित करण्याच्या विचारात पक्षाचे नेते आहेत. थेट पाइपलाइन योजना, टोलमुक्ती, हद्दवाढ, आरोग्य, शिक्षणाच्या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. विविध क्षेत्रांतील जाणकारांची मते आजमावून घेतली जात आहेत. त्यातून तयार होणारा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्यासाठी पक्षांनी लगबग चालवली आहे, तर काही पक्षांनी जाहीरनामा तयार करून ठेवला आहे.

भाजप-ताराराणी आघाडी

भाजप-ताराराणी आघाडीच्यावतीने संयुक्तरीत्या जाहीरनामा जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्याने शहरवासीयांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे विषय असतील असे भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. त्यामध्ये शहरांतर्गत रस्त्यांची अवस्था वाईट आहे. ती सुधारून रस्ते चकाचक केले जातील. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग व अस्वच्छता हे पूर्ण कमी करून कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रकल्प क्षमतेने उभा केला जाणार आहे. रस्त्यांवर दिव्यांची अवस्था अजूनही वाईट आहे. त्यादृष्टीने सर्व रस्त्यांवर दिवे लावण्याचा विषय जाहीरनाम्यामध्ये असेल. पाणीपुरवठा भरपूर आहे. पण वितरण वाहिन्यांना असलेल्या गळतीमुळे अशुद्ध पाणी मिळतेच. शिवाय लाखो लिटर पाणी वाया जाते. वितरण व्यवस्था मजबूत करणे हाही प्राधान्याचा विषय असेल. याबरोबरच शहरवासीयांच्या अन्य प्रश्नांचा विचार करुन लवकरच जाहीरनामा मांडला जाईल.

काँग्रेसचा 'कोल्हापूर संवाद'

लोकांशी चर्चा करून शहर विकासाच्या संकल्पना जाणून घेऊन काँग्रेस पक्ष यंदा जाहीरनामा तयार करणार आहे. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून 'कोल्हापूर संवाद' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहराच्या विकासाबद्दल कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, आयटी, अपंग, यंग सीनिअर्स आणि युवक-युवती यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. या मंडळीकडून ​शहर विकासाच्या अनुषंगाने सूचना, मते व मार्गदर्शनही घेतले जाणार आहे. या माध्यमातून लोकांच्या विचारांचे, भावभावनांचे प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटणार आहे. 'कोल्हापूर संवाद' उपक्रमाच्या माध्यमातून नेते मंडळी थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रातील नागरिकांशी बोलून जाहीरनाम्याला मूर्त स्वरुप देण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीची अपूर्ण कामांना चालना

गेल्या निवडणुकीत जी आश्वासने देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत सत्ता मिळवली, त्या आश्वासनांमधील बहुतांश कामांना निधी उपलब्ध करुन ती सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. यामध्ये थेट पाइपलाइनचा विषय अग्रक्रमावर होता. त्यानुसार प्रकल्पाला मंजुरी देऊन त्याच्या कामाला सुरुवातही केली होती. हद्दवाढीबाबतचा मुद्दाही पक्षाने उचलून धरला होता. अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. रंकाळा संवर्धनाचाही मुद्दा गेल्यावेळी आश्वासनांमध्ये होता. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा विषयही त्यावेळी मांडला होता. त्यातील थेट पाइपलाइन व रस्त्यांच्या कामाचा विषय सोडल्यास अजून इतर विषय पहिल्याच टप्प्यावर आहेत. नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही नवीन जाहीरनामा केला जात असताना या जुन्या विषयांना पूर्ण करण्याचे मत व्यक्त केले आहे. जुने विषय अपूर्ण राहिले आहेत, त्यांना प्राधान्याने पूर्ण करून शहरवासीयांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचे टार्गेट राष्ट्रवादीचे आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ते घेणार आहेत. त्यावेळी भागातील विकासकामाच्यादृष्टीनेही उमेदवारांना विचारणा होऊ शकते.

शिवसेनेचा वचननामा

जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली जातीलच याची खात्री नसते. त्यामुळे शिवसेना शहरवासीयांना वचननामा देत असते. वचने पूर्ण करण्यासाठीच दिली जातात. त्यानुसार शहरवासीयांना नागरी सुविधा देण्याबरोबरच नवीन सुविधांचा समावेश वचननाम्यामध्ये राहणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याचे वचन असेल. त्याचबरोबर रंकाळा तलावाचे सुशोभीकरण करून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असेल. पंचगंगा नदीघाटाचे सु​शोभीकरण, शिंगणापूर ते कसबा बावड्यापर्यंत नदीशेजारी पादचारी मार्ग, शाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाला चालना या मोठ्या वचनांचा समावेश केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर उठताहेत सापांच्या जीवावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोरांना कायद्याने मिळणाऱ्या संरक्षणाने वाढणारी संख्या, शेतांमध्ये त्यांचे सतत दिसणारे कळप, त्यांच्याकडून पिकांबरोबर सापांचा केला जाणारा सुपडासाफ यातून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सापांची संख्या जाणवण्यातइतपत कमी झाली आहे. शेतीत तसेच पठारांवर धामण, नागासारखे पहायला मिळणारे साप यामुळे सहजासहजी दिसत नसल्याची बाब सर्पमित्रांमधून समोर येत आहे. या प्रकारामुळे उंदीरांची संख्या वाढण्याचा धोका असून पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विषारी, बिनविषारी सापांची ओळख नसल्याने त्याला मारण्याचे प्रकार सर्रास होत आहेत, हा प्रकारही चुकीचा आहे. सर्पमित्र किशोर शिंदे यांनी एरव्ही सहज जंगलात, शेतीमध्ये, पठारांवर पहायला मिळणारे साप दिसत नसल्याची बाब समोर आणली आहे. ते म्हणाले, 'तीन ते चार वर्षाचा विचार केला तर मोरांचे प्रमाण वाढले आहे. जवळपास २० ते २५ मोरांचा कळप एखाद्या शेतात पहायला मिळतो. तो तेथील पिकांचा फडशा पाडतोच. पण त्यांचे आवडते खाद्य सरपटणारे प्राणी आहे.

साप लपून रहात असला तरी धामण, नाग, नानेटी, कुकरी हे प्रकार जमिनीखाली फार काळ रहात नाहीत. ते उघड्यावर फिरत असल्याने ते मोरांचे खाद्य बनतात. याशिवाय रस्त्यावर वाहनांखाली सापडून मरण्याचीही संख्या मोठी आहे. पर्यटनस्थळी हे प्रकार मोठ्या प्रमाणात असतात. घोणससारखे लपूनच बसणारे साप त्यातून वाचत आहेत. अंड्यांऐवजी थेट पिलांना ते जन्म देत असल्याने त्यांचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.'

शिल्डटेल स्नेकचा शहरात आढळ

सह्याद्रीच्या घाटामध्ये शिल्डटेल स्नेकच्या विविध जाती आढळतात. त्यातील एक प्रकार जवाहरनगर तसेच शेजारील उपनगरात त्याचे वास्तव्य आढळून आले आहे. खापरखवल्या नावाने ओळखल्या जाणारा साप वेगळाच आहे. त्याची शेपूट काप काढल्यासारखी असून तो मुख्यत्वे जमिनीतच असतो. त्याचे गांडूळ तसेच किटक हे खाद्य आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ढोलगरवाडीत सापांची शाळा

$
0
0

संपत पाटील, चंदगड

साप म्हटले की अगावर झर्ऱकन काटा येतो. मात्र, हाच साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप म्हटल्यानंतर भीती वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे साप दिसला की त्यापासून आपल्याला धोका असल्याने अनेकजण या सापाला शक्यतो मारतात. तो विषारी की बिनविषारी हे ही अनेकांना ओळखता येत नाही. मात्र या सापाबद्दल लोकांच्या मनात भीती असून ही भीती दूर करुन सापांचे संवर्धन व्हावे, लोकांना शास्त्रीय माहिती मिळावी, साप जवळून पाहता यावा व लोकांच्या गैरसमज दूर करावेत, या उद्देशाने चंदगड तालुक्यातील शेतकरी शिक्षण मंडळाची ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शाळा काम करते. या शाळेने गेल्या ४९ वर्षापासून हे काम अविरतपणे सुरु ठेवले आहे. नामपंचमीनिमित्त बुधवारी (ता. १९) सर्प प्रदर्शन आयोजित केले आहे.

ढोलगरवाडी येथील या सर्पशाळेत विविध जातीचे साप नागपंचमीनिमित्त लोकांना माहिती देण्यासाठी काचेच्या पेटीत ठेवले जातात. विद्यालयातील विद्यार्थ्यी-विद्यार्थींनी आलेल्या पर्यटकांना सापांची माहिती देतात. यासाठी प्रत्येक पेटीमध्ये स्वतंत्र साप ठेवून त्याची माहिती दिली जाते. अतिमहत्वाचे व विषारी जे साप आहेत. त्याची माहीती व फोटोचे डीजीटल फलकही प्रदर्शनावेळी विद्यालयाच्या आवारात ठेवले जातात. सापाबद्दलची मानसाच्या मनातील भीती दूर करुन साप हा शस्त्रू नसून तो मित्र असल्याचे धडे येथे दिले जातात.

१९६६ पासून ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयाचे विद्यार्थी सापांची शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली जाते. यापूर्वी जिवंत साप शिक्षक हातामध्ये घेवून लोकांना दाखवत होते. मात्र त्यामध्ये अनेकदा सापांकडून इजा होत असून व सापांचे हाल होत असल्याचे कारण पुढे करत सरकारने अशा सर्प प्रदर्शनावर बंदी घातली. त्यामुळे आता मात्र पेटीमध्ये साप ठेवून त्याची माहिती दिली जाते. या शाळेतून दरवर्षी हजारो मुले व मुली सर्पमित्र तयार होतात. त्यामुळे अनेक सापांना जीवदान दिले जाते. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नागनवाडी, हजगोळी, इसापूर, कोलिक, आंबेवाडी येथील हायस्कूलमधील विद्यार्थ्यीही स्वयंसेवकांचे काम करतात.

विविध प्रकारचे साप

दरवर्षी अनेक विद्यार्थ्यी सर्पमित्र म्हणून बाहेर पडतात. सर्प प्रदर्शनामध्ये सर्पप्रेमींना पाहण्यासाठी नाग, मण्यार, घोणस, फुरसे यासह अन्य विषारी जातींच्या सापांसह अजगर, धामण, इरूळा, सर्पटोळी, नानेट, तस्कर, चापडा आदी विनविषारी जातींचे साप पहायला मिळतात. वनखात्याच्या मार्गदर्शनाने बाहेरील साप दाखवून त्यांची माहीतीही दिली जाणार आहे.

आज सर्पप्रदर्शन

आज (ता. १९) सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्प प्रदर्शनाबरोबरच विज्ञान व चित्रकला प्रदर्शनही भरविले जाणार आहे. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला स्नेकपार्क असून येथे जिवंत साप हालचाल करताना बघायला मिळतील. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थ्यी चांगल्या पद्धतीने साप हाताळतात.

आमदार कुपेकरांचा निधी कधी?

ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे सर्प प्रदर्शनाला भेट देवून सर्पोद्यानासाठी आमदार फंडातून पाच लाख रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन चंदगड विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीमती श्रीमती कुपेकर यांनी दिले. या आश्वासनाला एक वर्ष उलटले तरी अद्याप त्यांच्याकडून निधी आलेला नाही.

सर्पप्रदर्शनातून सापांविषयी लोकांच्या मनात असलेली भीती दूर करुन त्यांना शास्त्रीय माहिती देणे हा याप्रदर्शनाचा उद्देश आहे. या कामासाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब माने यांचेही सहकार्य असते. या प्रदर्शनातून एकाजरी सापाचा जीव वाचला तर आमच्या प्रदर्शन सफल होईल.

- बाबूराव टक्केकर, सर्पमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा-रंकाळा वाचवणार !

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

प्लास्टिक मूर्ती आणि केमिकलमुळे होणारे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावात मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. नदी आ​णि तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठी इराणी खणीतच मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीवर जादा धक्के बांधणे,मूर्ती विसर्जनासाठी आणखी एखादी खण उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. इराणी खणीत सध्या सोळा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचेच विसर्जन केले जाते. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यांयांची माहिती शुक्रवारपर्यंत तयार केली जाणार आहे.

कोल्हापूरकरांनी यापूर्वी घरगुती गणेशमूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रम यशस्वी केला आहे. त्या पाठोपाठ आता सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे इराणी खणीतच विसर्जन व्हावे, जेणेकरून रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषण थांबेल या विचाराने यंदा नवे अभियान राबविले जाणार आहे. गेल्या वर्षी ४७ सार्वजनिक गणेश मूर्तींचे रंकाळा तलावात विसर्जन केल्याचे सामोर आले आहे. इराणी खणीत विसर्जनाची सोय असताना काही मंडळांनी तलावात गणेश मूर्ती विसर्जित केल्या होत्या.

येथील गणेश उत्सवांतर्गत विसर्जन मिरवणुकीत ४५० हून अधिक सार्वजनिक मंडळाचा समावेश असतो. १६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन इराणी खणीत केले जाते. तर सात, नऊ, ११, १४ फुटी गणेश मूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीत केले जाते. सगळ्याच मूर्तींचे विसर्जन इराणी खणीत व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याकरिता मूर्तींच्या उंचीनुसार माहिती संकलित केली जाईल आहे. मूर्ती विसर्जनासाठी इराणी खणीत पाणी सोडले जाणार आहे. शेजारील खणीसह अन्य पर्यायही शोधले जात आहेत.

२४ ऑगस्टला विशेष बैठक

पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे नियोजन आणि यासंदर्भातील कामाचा आढावा घेण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक होणार आहे. जिल्हा​धिकारी अमितकुमार सैनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासन अशी संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

'हायकोर्टाने पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाला मूर्ती विसर्जनासाठी पर्यायांची व्यवस्था करावी लागणार आहे. सार्वजनिक तालीम मंडळांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.

-उदय गायकवाड, पर्यावरणवादी कार्यकर्ते

शहरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. याकरिता मंडप उभारणीपासून, परवान्यापर्यंत नियमावली तयार केली जात आहे. सार्वजनिक मंडळांनी लोकांना त्रास होणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही या पद्धतीने मंडप उभारणी करावी.

-आर. के.पाटील, पर्यावरण अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन शस्त्रक्रिया ‘जीवनदायी’त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य

योजनेत नोव्हेंबरपासून तीन नव्या शस्त्रक्रियांचा समावेश केला जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दीपक सावंत यांनी ही माहिती दिली. स्टेंट बसवण्याची अँजिओप्लास्टी यापुढे तीनवेळा करता येणार आहे. शिवाय सांधा बदल आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एमबीबीएस डॉक्टरांची उपलब्धता होण्यासाठी वैद्यकीय शिक्षणातील जागा वाढवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ती दोन महिन्यात अंमलबजावणी करण्याबाबतचा अहवाल देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. सावंत म्हणाले, 'जीवनदायी योजनेत हृदयरोग तसेच कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी येणारा खर्च जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न आहे. गुडघा तसेच माकडहाड बदलण्याच्या शस्त्रक्रियेचाही समावेश करण्यात येत आहे. मुलींचा जननदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.'

डॉक्टरांचा शोध

आरोग्य सेवेतील ३०० डॉक्टर गेली पंधरा वर्षे हजर नाहीत. अशा डॉक्टरांना शोधून काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ४७ डॉक्टरांना काढून टाकले आहे, असे सावंत यांनी सांगितले. रिक्त पदांसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करून सरळसेवेने भरण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार सापांना जीवदान

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

राज्यात ठिकठिकाणी सर्पमित्रांकडूनच सापांची हानी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उंदरवाडी (ता. कागल) येथील सर्पमित्र बाजीराव कुदळे यांचे वेगळेपण डोळ्यांत ठसणारे आहे. आजवर त्यांनी विविध जातींच्या सुमारे चार हजार सापांना जीवदान दिले आहे. सापांबाबतची भीती घालविण्यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच जखमी सापांवर उपचार करण्याचे कामही कुदळे करतात. विद्यार्थ्यांतील सापाविषयीची भीती नष्ट करण्यासाठी ५० वर शाळांत प्रात्याक्षिके आणि मोफत व्याख्याने दिली आहेत. त्यांनी नागराजासह (कोब्रा) काही जातींच्या सापांची शेतात सापडलेली अंडी उबवून ९४ पिलांना अभयारण्यात सोडले आहे.

कुदळे यांनी कॉलेजमध्ये असतानाच धामण जातीचा साप प्रथम थरथर कापत पकडला. त्यातून वाढलेले धाडस आणि सरावाने आजपर्यंत नाग, घोणस, खापखवल्या, नानीटी, डुलक्या, कवड्या, चाफडा, हरणटोळ, रुकासर्प, रातसर्प, अजगर असे अनेक जातींचे साप त्यांनी पकडले आहेत. या सापांना दाजीपूर अभयारण्य आणि आता ज्या त्या ठिकाणच्या डोंगरात सोडून जीवदान दिले आहे.

कुदळे यांनी दिवड जातीच्या सापाची ५६ पिले ४७ दिवसांत, नानीटी जातीची १२ पिले आणि कोब्रा जातीची २६ अंडी उबवून वन्यजीव विभागाच्या मदतीने जंगलात सोडली आहेत. शिवाय सरड्याची अंडी घरातच उबवली आहेत. कासवांची पाच अंडीही घरातच उबवली आहेत. जखमी गरुड, कुत्रे, भांडणात जखमी झालेले साप असा कुठलाही पशु-पक्षी आढळल्यास कुदळे त्याच्यावर घरी आणून उपचार करतात.

मिलनकाळात नाग‌िणीच्या शरीरातून स्राव पाझरतो. यादरम्यान नाग‌िणीला काठ्या अथवा हत्याराने मारहाण झाल्यास तो स्त्राव मानवाच्या हाताला किंवा कपड्यांना लागतो. त्या वासाच्या आधारे नाग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, ज्याला भीतीने लोक डूख धरला, असे म्हणतात. अन्नसाखळीत साप हा महत्त्वाचा घटक आहे. सर्प नष्ट झाल्यास निसर्गही नष्ट होण्याची भीती आहे.

- बाजीराव कुदळे, सर्पमित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिकेच्या कारभारात लक्ष घालणार नाही’

$
0
0

कुपवाड : 'सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सत्ता कोणाच्या गटातटाची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे. माजी मंत्री मदन पाटील हे हुशार आहेत. ज्याला पद द्यायचे आहे, त्याला हळूच आपल्याकडे आशिर्वादासाठी पाठवतात. त्यामुळे कोण काय म्हणाला याला आपण महत्व देत नाही. ज्या संस्थेत सर्वकाही ठिक चालले आहे, तेथे आपण बिबं घालणार नाही,' अशा शब्दात महापालिकेतील पदाधिकारी निवडीत आपल्या नावाने ढवळा-ढवळ करणाऱ्यांना ज्येष्ठ कॉँग्रेस नेते पतंगराव कदम यांनी बुधवारी फटकारले.

सांगली महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतिपदाची गुरुवारी निवड होत आहे. या पार्श्वभूमीवर काही सदस्यांनी आपले नेते कदम असल्याचे सांगत गटबाजी जन्माला घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत कदम बोलत होते.

सत्तावीस नगरसेवक आपल्याला येऊन भेटून गेले आहेत. त्यानंतर त्यापैकी कोणी आले नाही. कोण मदन पाटील गटाचा, गटनेता किशोर जामदार काय करणार? याच्याशी आपल्याला देणेघेणे नाही. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी पक्षाचा एक नेता म्हणून आपण जरुर प्रयत्न केलेत. म्हणून तेथील प्रत्येक घडामोडीत आपण डोकावणार नाही. कोण काय केले. कोणत्या प्रभागात काय घडलेय. अशा बारीकसारीक गोष्टीत लक्ष घालणार नाही. कोणाला सभापतीपद द्यायचे हे महापालिकेचे नेते ठरवितील. भेटायला येणारे तावातावाने येतात आणि नंतर कोणत्या बोळातून कुठे गायब होतात, हेच कळत नाही, असेही कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पश्चिम महाराष्ट्रावर सरकारची फुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'राज्य सरकारने पश्चिम महाराष्ट्रावर फुलीच मारली आहे. या भागातील प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही आणि येथील भाजप-सेनेचे लोकप्रतिनिधीही याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. मराठवाड्यातल्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर होत निघाला आहे. छावण्या कुठे आहेत, माणसांनी जगायचे कसे आणि जनावरांना काय घालायचे, याचे उत्तर मंत्र्यांनी आणि सरकारमधील आमदार, खासदारांनी दिले पाहिजे. अन्यथा दुष्काळाने हैराण होऊ लागलेली जनताच त्यांना अनोख्या पद्धतीने जाब विचारेल,' असा इशारा माजी मंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.

टंचाईतील उपाययोजनांचा पत्ता नाही. पाऊस दिवसेंदिवस ओढच देत आहे. उगवलेले पीक डोळ्यांसमोर जळून गेले आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांची उपासमार सुरू आहे. जीव लावून सांभाळलेली जनावरे बाजारात विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा लागत आहेत. शेळ्यांमेढ्यांची अवस्थातर अधिक बिकट होत आहे. जत तालुक्यातील माडग्याळच्या बाजारात एका शेतकऱ्यांने नाईलाजाने शेळीची विक्री केली. तिचे पिल्लू उराशी धरून शेतकऱ्याची पत्नी आणि पोर तेथून जावू लागल्यानंतर शेळी व्यापाऱ्याच्या हाताला हिसडा मारुन मालकीणीकडे धावली. परंतु, पुन्हा त्या व्यापाऱ्याने त्या शेळीला ओढत नेले. त्यावेळी शेळीने मानवाप्रमाणेच हंबरडा फोडला आणि शेतकऱ्याच्या पोरीने दाबून धरलेला हुंदका बाहेर पडला. हे दृश्य पाहणारांचीही घालमेल झाली. वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले हे वृत्त वाचून काळीज हेलावून गेले. दुष्काळीची तीव्रता अशी वाढत आहे. खूप तातडीने निर्णय घेऊन दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे, असेही कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीकात्मक नागांची पूजा

$
0
0

भगवान शेवडे, शिराळा

कोर्टाच्या आदेशानुसार आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिराळकरांनी यंदाही परंपरेनुसार करण्यात येणाऱ्या जिवंतनागाच्या पूजेला फाटा देत प्रतीकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली. प्रतीकात्मक नागाच्या मिरवणुकीसाठीही हजारो यात्रेकरुंनी हजेरी लावली होती. महिलांनीही परंपरेला फाटा देत घरोघरी जिवंत नागाच्या पूजेऐवजी मातीच्या नागाच्या प्रतिमेचे पूजन केले.

शिराळावासियांनी यंदा मोठ्या संयमाने नागपंचमी उत्सव साजरा केला. उत्सवात तरुणांची संख्या जास्त दिसत होती. पावसाने उघडीप दिल्याने आसपासच्या जिल्ह्यातून तरुण सकाळी दहा वाजल्यापासून शिराळ्यात दाखल होत होते. साठ नागमंडळांनी नागांच्या प्रतिमा ठेऊन दुपारी दोन वाजता मिरवणुकीस प्रारंभ केला. पारंपारिक वाध्यांसह, डॉल्बी लावून नाग मंडळातील तरुणाई थिरकत होती. परंपरेनुसार दुपारी एक वाजता प्रमोद महाजन, सुनील महाजन यांच्या घरी कोतवालांनी नागाच्या प्रतिमेची पूजा केली. त्यांच्या घरातून मानाची पालखी प्रमुख बाजार पेठेतून अंबामाता मंदिरापर्यत नेण्यात आली. नागराज मंडळांनी नाग पूजनासाठी नाग अंबामाता मंदिरात आणले. मात्र, हे नाग प्रतिमात्मक होते. बॅजो, डॉल्बी आणि पारंपरिक वाद्याच्या निनादात सुरू झालेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

दरम्यान, प्रशासनानेही जय्यत तयारी केली होती. आरोग्य विभागाने सर्पदंशावरील लसींसह पथके तैनात केली होती. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, कोल्हापूर वनसंरक्षक एम. के. राव प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसीलदार विजय पाटील, पोलिस उपाधीक्षक वैशाली शिंदे आदी प्रमुख अधिकारी जातीने हजर होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि सध्या वेशातील कर्मचारी जिवंत नागांची कुठे पूजा होते का यावर लक्ष ठेऊन होते. वन विभागानेही कर्मचारी नियुक्त केले होते.

पाच जणांना सर्पदंश

शिराळ्यात बुधवारी पाच जणांना सर्पदंश झाला. संदीप माणिक मुळीक, तौसीफ शब्बीर पठाण, सचिन अशोक शिंदे, अमर संजय निर्मळे, संतोष निवास कणसे, अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर शिराळा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळाचे सावट होतेय गडद

$
0
0

प्रवीण कांबळे, हुपरी

ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. त्यामुळे नद्या, बंधारे, विहीरींच्या पाण्यची पातळी खालावल्याने शेतकरी ‌‌चिंतेत आहे. महत्त्वाच्या पिकांबरोबर पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा, वारणा या नद्यांच्या पाण्याच्या पातळी मोठया प्रमाणात घटत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात सधन तालुका म्हणून हातकणंगले व शिरोळ ओळखले जाते. हातकणंगले तालुक्यात सध्या केवळ एक मिलीमीटर पाऊस झाला आहे. मात्र या तालुक्यातून पंचगंगा आणि वारणा नद्या जात असल्याने फारसा फरक पडत नाही. मात्र, या नदीपात्रांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीपातळी घटली आहे. तसेच ‌विहिरींमध्ये पाणीपातळी घटली आहे. मध्यतंरी थोड्या काळासाठी अल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावली. परंतु अवेळी पडलेल्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. सध्या ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने सूर लावला नाही. त्यामुळे झालेल्या पावसासह पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होऊ लागली आहे. हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा व वारणा नदीच्या पातळीमध्ये या महिन्यांत घट झाली असून राजाराम बंधारा, वारणा बंधारा या ठिकाणी ही पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांच्या पाण्यासाठी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या आहेत. नद्यांना पाणी नसल्यामुळे याबाबत नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

पाणीटंचाई बाबत ग्रामपंचायतीकडे अहवाल मागितला असून येत्या दोन दिवसात तो अहवाल प्राप्त होताच पाणी नियोजनाचा आराखडा तयार करून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना सर्व ठिकाणी पाठवून पिण्याच्या पाण्याचे नियोजन लावणार आहे.

- एस. आय. माळी, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्री’ आणणार डोळ्यात पाणी

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

आजारा तालुका तसा भरपूर पाऊस पडणारा. पण या पावसाळ्यात जूननंतर पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश साठे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आजऱ्यासह गडहिंग्लज व कर्नाटक परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला चित्री प्रकल्प अद्याप ७२ टक्केही भरलेला नाही. परिसरातील धनगरमोळा व एरंडोळ धरण प्रकल्प भरले आहेत. पण खानापूर प्रकल्पानेही जेम-तेम ६५ टक्क्यांपर्यंतच मजल मारली आहे. अशा स्थितीत शेवटच्याही नक्षत्राने दगा दिल्यास भीषण पाणी संकटाला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. उन्हाळा येण्याआधीच पाणी टंचाईच्या झळा सोसताना आजरा, गडहिंग्लजसह कर्नाटक राज्यातील काही गावांना रडवण्याची शक्यता ठळक झाली आहे. पाण्याच्या बाबतीत कधी नव्हे अशी स्थिती निर्माण झालीच तर शेती आणि पिण्यासाठी उन्हाळ्याआधीपासूनच पाण्याचे स्त्रोत शोधत फिरण्याची वेळ शेतकरी व ग्रामस्थांवर येण्याची शक्यता आहे.

यावर्षी तालुक्यात पावसाला जोमाने सुरवात झाली. कधी नव्हे ते मृग नक्षत्रामध्येच हिरण्यकेशी नदी दुथडी वाहू लागली व या नदीवरील रामतीर्थचा धबधबाही धबधबा कोसळू लागला. पण जून महिन्याच्या मध्यावधी कालवधीनंतर पावसाने मोठी ओढ दिली. त्यानंतर अधून-मधून पाऊस येऊ लागला. पण पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. तालुक्याच्या पूर्व व उत्तर बागात बहुंतांश धूळवाफ पद्धतीने भाताच्या पेरण्या व उगवणही आटोपली होती. पण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील रोपलावणीसाठी प्रकर्षाने मोठ्या पावसाची व पाण्याची टंचाई भासू लागली. या दरम्यानच शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे स्त्रोत म्हणून नाले, ओढे, ओहोळ, विहीरी आणि कूपनलिकांचील पाणी शेतात सोडून लावणी आटोपली आहे. पण या प्रकराच्या लावणीला आताच पावसाची गरज भासू लागली आहे आणि पावसाचा लपंडाव अद्यापही सुरू आहे. चि‌त्रीची क्षमता १८८६ दशलक्ष घनफूट आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पावसाची गरज आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाचे प्रमाण कमालीचे कमी असले तरी या परिसरातील पावसाचा कोटा पूर्ण होतो, हा अनुभव आहे. अजूनही चित्री भरलेला नाही. आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पातील पाणी येथील टंचाई काळात सहाय्यभूत ठरेल.

- एल. डी. मोरे, उपअभियंता, गडहिंग्लज विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चिकोत्रा’ने वाढविली चिंता

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्याचा विचार करता सध्या तरी ८३ गावांत कुठेच पिण्याच्या पाण्याची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला जरी कापशी खोऱ्यातील जी गावे चिकोत्रा प्रकल्पावर अवलंबून आहेत त्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिन्हे आहेत. कारण चिकोत्रा प्रकल्प केवळ ३० टक्के भरल्याने चिंता वाढली आहे. तरीही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी पाणीटंचाई भासणार नसल्याचा नावा केला आहे.

तालुक्यातील कापशी खोऱ्यात चिकोत्रा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांत सध्या काही वेळेला पाण सोडण्याचे नियोजन बिघडल्यास पाणीटंचाई जाणवते. कारण या प्रकल्पात सध्या तरी ३० टक्केच पाणी साठा झाला आहे. तालुक्यातील बऱ्यापैकी गावच्या पिण्याच्या पाणी योजना या नदीवरुन आहेत. त्यामुळे सध्या तरी कुठेच पाणी टंचाई नाही. प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचा साठा ठेवूनच शेतीसाठी शिल्लक असेल तर पाणी दिले जाईल असे नियोजन करण्यात आले आहे. मौजे सांगाव आणि वंदूर या गावांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. तर मौजे सांगाव, पिंपळगाव खुर्द आणि बुद्रुक, कसबा सांगाव, केनवडे, सावर्डे बुद्रुक, सोनाळी दोन ठिकाणी, चौंडाळ, हळदी, खडकेवाडा आणि हमिदवाडा आदि ठिकाणी दुषित पाण्याचे नमुने सापडले आहेत.

चिकोत्रा खोऱ्यात सेनापती कापशीसह, पांगिरे, बेलेवाडी मासा, बेलेवाडी काळम्मा, कासारी, वडगाव मुख्य गावांसह गलगलेपर्यंतची सुमारे ३० हून अधिक गावे या प्रकल्पावर अवलंबून आहेत. पावसाने ओढ दिल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच आता उपलब्ध असलेले पाणी दिले जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने आता शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये पाणी पातळीत घट

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

पावसाने दडी मारल्याने शिरोळ तालुक्यात कोंडिग्रे, जैनापूर, चिपरी, धरणगुत्ती,संभाजीपूर, तमदलगे, चिपरी परिसरात विहिरी व कूलनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यात एक जूनपासून केवळ १२१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने याचा माळरानातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणी मात्र पिकांना कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांवरील पाणी योजनांनी आधार दिला आहे.

शिरोळ तालुक्यातील शेतीचे बहुतांशी क्षेत्र बागायती आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात असणाऱ्या या तालुक्यात सरासरी ३८५.३० इतके वार्षिक पर्जन्यमान आहे. यावर्षी एक जूनपासून केवळ १२१ मिलीमीटर इतकाच पाऊस पडला आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पावसाचे पाणी कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांद्वारे येथील शेतीला मिळते. यामुळेच शिरोळ तालुक्यात ३० हजार, ६८५ हेक्टर पेर क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र बागायत आहे. यापैकी २७ हजार, ७७० हेक्टर क्षेत्रात ऊस आहे. सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबीसह अन्य फळ व पालेभाज्यांचे उत्पादन येथे घेतले जाते.

यंदा मान्सूनपुर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मशागती करून पेरणी केली. पेरणीनंतर दमदार पाऊसही झाला. परिणामी पिकांची उगवण चांगली झाली. भुईमूग, सोयाबीन यासह अन्य पिके तरारून आली. मात्र यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे शिरोळ तालुक्यात कोंडीग्रे, तमदलगे, चिपरी, धरणगुत्ती, जैनापूर परिसरात पिकांची वाढ खुंटली. अनेक ठिकाणी पिके कोमेजून गेली. पावसाअभावी विहीरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यातील ऊस पिकाला मात्र नदीवरील पाणी योजनांनी आधार दिला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दमदार पावसामुळे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली होती. गेल्या दीड महिन्यात पाऊस थांबल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. बुधवारी तालुक्यात अंकली पूलाजवळ कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी केवळ तीन फूट आठ इंच इतकी होती. नृसिंहवाडी येथे २२ फूट, राजापूर बंधाऱ्याजवळ ११ फूट पातळी होती. तर पंचगंगेची पातळी तेरवाड बंधाऱ्याजवळ ३५ फूट ५ इंच इतकी होती. पावसाने आणखी ओढ दिल्यास ही पातळी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याचे पाणी पुरेसे असले तरी आगामी काळात ‌ि‌पकांना पाणी देण्यासाठी असलेल्या मोटरना पाणी मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

पावसाने दडी मारल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतातील विहिरी व कूपनलिकांची पातळी खालावली आहे, परिणामी पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. पिके धोक्यात आली आहेत.

- भास्कर शिंदे, शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाऊस अपुरा; पाणी पुरेसे

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

तालुक्यात कडवी मध्यम प्रकल्पाबरोबर पालेश्वर, कांडवण, कुंभवडे, केसरकरवाडी, भंडारवाडी, मानोली हे लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. पावसाचे आगर असलेल्या शाहूवाडी तालुक्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असले तरी ५२ गावांची वरददायिनी असलेल्या कडवी धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. लहानमोठे लघुपाटबंधारे तलाव भरले आहेत. वारणा धरणातही मुबलक पाणीसाठा असल्याने शित्तूर वारुण पासून सरुडपर्यंतच्या भागात बारा महिने पाणीटंचाई भासत नसते.

ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाचा म्हणावा तसा जोर नाही तरीही धरणक्षेत्रात मात्र पावसाची सतत रिपरिप चालू आहे. पावसाळा संपेपर्यंत तालुक्यातले मध्यम प्रकल्प व छोटेमोठे तलाव भरतात. त्यामुळे वारणा, कडवी खोरा आणि दक्षिणेकडच्या भागात कधीही पाणीटंचाई भासत नाही.

आंबर्डे खोऱ्यातील आंबर्डे गावासह आरूळ, करंजोशी, पनुंद्रे, शिराळे तर्फ मलकापूर व पिशवी खोऱ्यातील पिशवी, परखंदळे या भागात एकही प्रकल्प अथवा तलाव नसल्यामुळे एप्रिल व मे महिन्यात प्रकर्षाने पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या भागातील लोकांना पाणी विकत घ्यावे लागते. जिल्हा टँकरमुक्त असल्यामुळे लोकांना टँकर‍द्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनापुढे मर्यादा पडतात. पिशवी व आंबर्डे खोऱ्यांमध्ये पाटबंधारे तलाव झाल्यास पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे सध्या धरण व नदीच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस कमी असल्याने पातळी कमी झाली आहे. तरीही चिंता नसल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images