Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गोळ्या घालून विचार संपत नाहीत

$
0
0

'सॉक्रेटिस ते दाभोळकर‍, ‍पानसरे व्हाया तुकाराम' रिंगण नाट्यातून संदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सत्याचा विवेकी विचार मांडणाऱ्या थोर व्यक्तींचा गोळ्या घालून खून केला तरी त्यांचे विचार संपत नाहीत,' असा संदेश 'सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम' या रिंगण नाट्याद्वारे देण्यात आला. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देवल क्लब येथे रिंगण नाट्याचे आयोजन करण्यात आले होते. विवेकाला बळ देण्याचे आवाहन नाटकाच्या प्रयोगातून करण्यात आले.

ज्यांनी धर्माची चिकित्सा केली. कालबाह्य विचार नाकारून कालसुंगत नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला त्यांचा प्रचंड छळ वा खून झाल्याचा इतिहास आहे. परिवर्तनाचा व विवेकी विचार मांडणाऱ्या सॉक्रेटिस, संत तुकाराम, नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे यांचा खून करून विचार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीविरोधातील ज्येष्ठ लेखक राजाभाऊ शिरगुप्पे लिखित नाटकाचे सादरीकरण करण्यात आल. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे, तर कॉ. पानसरे यांच्या खुनाला सहा महिने उलटले तरी मारेकरी व सूत्रधार सापडत नाहीत. याचा संताप मनात ठेवून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक सादर केले.

नाटकाच्या सादरीकरणापूर्वी निबंध, पथनाट्य व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. शरद भुताडिया, राजाभाऊ शिरगुप्पे, अरुंधती महाडिक व मेघा पानसरे यांच्या हस्त बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. भुताडिया यांनी, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे विचार पोहोचविण्याचा सर्वजण मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन केले. नाटकाचे लेखक राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, 'दाभोलकर व पानसरे सत्य बोलले. सत्य बोलणाऱ्या मंडळींना समाजातील काही लोकांचा विरोध असतो. दाभोलकर व पानसरे यांचे विचार नाटकातून मांडले आहेत. नाटकाद्वारे सांस्कृतिक उत्तर दिले आहे.'

यावेळी महापौर वैशाली डकरे उपस्थित होत्या. सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. सुजाता म्हेत्रे यांनी आभार मानले. दत्ता घुटगडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष प्रकाश भोईटे, पी. डी. पाटील, कृष्णात कोरे, सीमा पाटील, अरूण पाटील, बाळासो कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः

निबंध स्पर्धाः पूजा कुंभार, विकास मोरे, सुजाता गुरव.
पथनाट्य स्पर्धाः सुनील पारके, रोहन आदमापुरे, राहुल देसाई.
वक्तृत्व स्पर्धाः किंग मेकर, घाळी कॉलेज, गडहिंग्लज, कलारंग, उत्तेजनार्थ भारती विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत दुष्काळ जाहीर करा

$
0
0

जिप सदस्यांची मागणी

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

दुष्काळाच्या प्रश्नावरून आक्रमक होत जिल्ह्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. जिल्ह्यात तत्काळ चारा छावण्या सुरू करा अथवा रस्त्यावर उतरू असा इशारा देत सभा सुरू असतानाच दुष्काळाचा ठराव घेऊन जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

अध्यक्ष रेश्मक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा पाटील सभागृहात सभा झाली. या वेळी तासगावच्या सदस्य कल्पना सावंत यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला वाचा फोडली. जिल्ह्यातील कायम दुष्काळी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील व भिमराव माने यांनी 'याबाबत केवळ ठराव न करता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांची भेट घेऊन दुष्काळ जाहीर करून वैरण विकास प्रकल्पात जिल्ह्याचा समावेश करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे,' असे सुचविले.

शिक्षण विभाग धारेवर

दरम्यान, शिक्षकांविरोधातील पाढा वाचत भिमराव माने, मीनाक्षी महाडिक, रणधीर नाईक, बसवराज पाटील यांनी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांना चांगलेच धारेवर धरले.

सभेतील ठराव

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा
वैरण विकास प्रकल्पात जिल्ह्याचा सहभाग करा
चुकीची माहीती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडे भत्ता रोखा
पी. बी. पाटील समितीने शिफारस केलेले सर्व अधिकार द्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0

फेरीवाले युनियनची मोर्चाने मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करा, फेरीवाल्यांसंबंधीच्या कायद्याची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर फेरीवाले युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांना देण्यात आले.

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांचा दिवसाढवळ्या खून झाल्याच्या घटनेला सहा महिने झाले तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात सरकार व पोलिस यंत्रणेला अपयश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा व गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. आता तेच सत्तेवर असताना त्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निमुर्लन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंगण नाट्य झाले.

दरम्यान, गुरूवारी सकाळी फेरीवाल्यांचा राजारामपुरी येथील आप्पाज कॉम्प्लेक्स येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात बोलताना कॉ. दिलीप पवार म्हणाले, '२०१४ च्या फेरीवाला धोरणाची अद्यापही अमंलबजावणी झालेली नाही, ती व्हावी. तसेच सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश दिले आहेत, त्यानुसार अंमलबजावणी व्हावी.' कॉ. नामदेव गावडे म्हणाले, 'कॉ.पानसरेंचा संघर्षावर विश्वास होता. लढल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही हे फेरीवाल्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.' कॉ.रघुनाथ कांबळे यांनी फेरीवाल्यांच्या धोरणाचा सर्व्हे करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नगरपरिषदेच्या हद्दतील फेरीवाल्यांसंदर्भात लवकरच समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॉ. बाळासो प्रभावळे, कॉ.सुमन घोसे, विठ्ठल येडगे, इम्तियाज पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आम्ही सारे दाभोलकर’

$
0
0

साताऱ्यात घुमला नारा, निषेध फेरीला तरुणाईचा प्रतिसाद

म. टा. वृत्तसेवा, सातारा

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या यांच्या हत्येला अनुक्रमे दोन वर्षे आणि सहा महिने उलटून गेले, तरी मारेकरी व सूत्रधार अद्याप सापडले नाहीत, याचा निषेध करण्यासाठी साताऱ्यात परिवर्तन संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुरुवारी निषेध फेरी काढण्यात आली. या फेरी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'फुले- शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर' या घोषणेने सातारा परिसर दुमदुमून गेला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाले, तरी अजून मारेकरी तसेच सूत्रधार सापडलेले नाहीत. गेल्या दोन वर्षांत प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला चळवळींच्यावतीने निवेदन देण्यात येते. आजपर्यंत विविध आंदोलने करण्यात आले. परंतु, तरीही उपयोग झालेला नाही. दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शासनाचा निषेध करण्यासाठी साताऱ्यातून निषेध फेरी काढण्यात आली. राजवाडा येथील गांधी मैदान येथून निषेध फेरीची सुरुवात झाली. या फेरीत विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

डॉ. दाभोलकर यांचे पोस्टर आणि 'आम्ही सारे दाभोलकर' लिहिलेले फलक घेऊन विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. फेरी राजवाड्याहून मोती चौक, देवी चौक राजपथावरून पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. पोवई नाक्यावर नगराध्यक्ष सचिन सारस, उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे आणि पालिकेचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. त्याचबरोबर विविध संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचे सभेत रुपांतर झाले.

या वेळी डॉ. प्रसन्न दाभोलकर म्हणाले, 'या घटनेचा अजून तपास लागला नाही, याबद्दल खेद तर आहेच. परंतु, कार्यकर्त्यांनी शासनावर अवलंबून न राहता प्रत्येकाने आपल्या पातळीवर विवेकवादाचा विचार जोपासला पाहिजे. विचार मरत नाही हे केवळ न म्हणता ते कृतीतून शासनाला दाखवले पाहिजे. आज सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिका बदलल्या असल्या, तरी दोघांमध्ये फरक नाही.' कॉम्रेड वसंतराव नलावडे म्हणाले, 'डॉ. दाभोलकर यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते पुढे आले आहेत. दाभोलकर यांचा विचार पुढे जाऊ नये, हा हेतू असल्यानेच मारेकरी सापडत नाहीत. शासनाने मनात आणले तर मारेकरी आणि सूत्रधार पकडले जाऊ शकतात. परंतु, शासनाची मानसिकता दिसत नाही.' विजय मांडके म्हणाले, 'शासनाला मारेकरी, सूत्रधार कोण आहे हे माहीत आहे. परंतु, त्यांना पकडायचे नाही हीच त्यांची भूमिका आहे. जोपर्यंत मारेकरी, सूत्रधार सापडत नाही तोपर्यंत आपला लढा थांबणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​तूरडाळीने गाठला दीडशेचा टप्पा

$
0
0

दोन महिन्यात ४४ ते ५० रूपयांची दरवाढ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विदर्भात अतिवृष्टीमुळे तर मराठवाड्यातील दुष्काळामुळे तूरडाळीच्या दरात दोन महिन्यात ४४ ते ५० रूपयांची वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तुरीसह सर्वच डाळींचा किरकोळ बाजारातील दर १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पावसाअभावी त्रस्त झालेल्या नागरिकांना आता डाळींच्या भाववाढीला सामोरे जावे लागत आहे. देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये तूरडाळीचे उत्पादन होते. पावसाअभावी तेथेही उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम डाळींच्या दरावर झाला. पुढील काळामध्ये दरवाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमध्ये प्रतिक्विंटल दर १० हजार १०७ रुपयांपर्यंत गेला आहे. कोल्हापूर धान्य मार्केटमध्ये दुष्काळ आणि गारपिटीमुळे सध्या तूर, मूग आणि इतर डाळींची आवक घटली आहे. या डाळींच्या दरात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांची तर भाजलेल्या डाळीच्या दरात ४० किलोमागे ८० ते १०० रुपये दरवाढ झाली आहे.

सध्या किरकोळ बाजारात तूरडाळ महाग झाल्यामुळे जेवणातील वरण कमी झाले असून ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा चटका आता लोकांना सहन करावा लागणार आहे.

'मे महिन्यात तूरडाळ १०० रूपये होती. ती सध्या १४४ ते १५० रूपये किलोने किरकोळ बाजारात विक्री होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाच्या परिस्थितीमुळे दरावर परिणाम झाला आहे. तसेच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे भविष्यात दर वाढण्याची शक्यताही आहे.
महेश नष्टे, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पानसरे हत्येचा तपास; अधिकाऱ्यांची बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गो​विंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. लवकरच हल्लेखोरांना पकडू, असे उत्तर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पहिल्या दिवसापासून आजही मिळते. हत्येचा तपास करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने तपासाबाबत डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडून शंका उत्पन्न केल्या जात आहेत. डाव्या चळवळीतील कार्यकर्ते तपास वेगाने व्हावा यासाठी आंदोलनाव्दारे प्रयत्न करीत असले तरीही १८० दिवसांत हल्लेखोर शोधण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.

तपास सुरू असतानाच दोन महिन्यांनी तत्कालीन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांची अचानक बदली करण्यात आली. रितेशकुमार यांनी कोल्हापूर, कर्नाटक व गोवा पोलिसांच्यात समन्वयाची बैठक घेऊन तपासासाठी ज्या वेळी पावले उचलली त्यावेळी त्यांची बदली करण्यात आली. बदलीच्या ठिकाणी तीन वर्षे एकाच ठिकाणी पदावर काम करण्याची अट असताना रितेशकुमार यांची बदली अवघ्या सव्वा वर्षात केल्याने डाव्या चळवळीतील कार्यकर्ते व पानसरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करूनही कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. पानसरे हत्येचे तपास अधिकारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची बढती झाल्याने त्यांची वर्धा पोलिस अधीक्षक पदी बदली झाली. दोन्ही अधिकारी पानसरे तपासात सर्वात जास्त सक्रिय होते. एक महिन्यापूर्वी हत्येच्या तपासातील प्रमुख गडहिंग्लज अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार यांचीही सोलापूरला बदली करण्यात आली. हत्येच्या तपासातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांची बदली झाल्याने तपास कुमकुवत झाला आहे.

पानसरे हत्येचा तपास करताना पोलिसांनी तब्बल दीड लाख लोकांच्याकडे चौकशी केली आहे. वैयक्तिक कारणांबरोबर जातीयवादी संघटनांचा पानसरे यांच्या हल्ल्यात हात आहे का याबाबतही पोलिस कसून तपास करत असल्याचे पोलिस सांगत असले तरी डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा पोलिसांचा विश्वास नाही. हत्या झाल्यानंतर प्रारंभी युध्दपातळीवर २७ पथके महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात तपास करत होते. पानसरे यांच्यावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील फोन व मोबाइल कॉलची तपासणी करण्यात आली. छोट्या कॉलकडे जास्त लक्ष देण्यात आले; तसेच एसएमएस, व्हॉटस् अॅप्स, फेसबुक, ई मेलची तपासणी करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुंड, टोळी युध्दातील गुंड, सुपारी घेणारे गुंड, रेकॉर्डवरील गोळीबाराच्या गुन्ह्यातील आरोपींची कसून चौकशी करण्यात आली.

पानसरे हत्येची व्याप्ती पाहता कर्नाटक, गोवा राज्यातील पोलिसांच्याबरोबर बैठका घेऊन हल्लेखोरांनी शोध मोहिम घेतल्या. पानसरे हे जातीयवादी संघटना व पक्षांवर टीका करत असल्याने त्यांना विरोध करणाऱ्या मंडळीकडेही चौकशी करण्यात आली. पानसरे यांनी ज्या ठिकाणी भाषणे व व्याख्याने दिली त्या कोकण, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे येथे त्यांनी दिलेल्या व्याख्यानाच्यावेळी विरोध करणाऱ्या व्यक्तींच्याकडेही चौकशी केली. हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांना २५ लाखाच्या बक्षिसाची घोषणाही राज्य सरकारने केली. मात्र, हल्लेखोर मिळालेले नाहीत.

कारणच अस्पष्ट

पानसरे यांच्यावर हल्ला का झाला?, कोणत्या कारणावरून झाला हेच स्पष्ट होत नसल्याने तपास कोणत्या दिशेने करावा याबाबत पोलिस अजूनही अनभिज्ञ आहेत. पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन तपासासाठी एसआयटी नियुक्ती करावी व न्यायालयाला तपासाचा अहवाल द्यावा अशी मागणी केली. राज्य सरकारने एसआयटीची नियुक्ती केली. सीआयडीचे अतिरिक्त महानिरीक्षक संजयकुमार तपास करत आहेत. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून हल्लेखोरांची छायाचित्रे पोलिसांनी तब्बल चार महिन्यांनी प्रसिध्द केली. पोलिसांनी हल्लेखोरांची छायाचित्रे सुरवातीला का प्रसिध्द केली नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या एसआयटी व स्थानिक पोलिस तपास करत आहेत. पण हा तपास नरेंद्र दाभोलकर यांच्या तपासाप्रमाणे होणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमित्र ‘मटा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचा आज तिसरा वर्धापन दिन. महाराष्ट्राच्या या पुरोगामी विचारांच्या शहरात 'मटा'ने पाऊल ठेवले आणि अल्पावधीतच ते वाचकांच्या आवडीचे वृत्तपत्र ठरले. 'मटा'ने नेहमीच शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा ही वैशिष्ट्ये जपली आहेत. हे करत असताना शहराच्या विविध प्रश्नांवर कायम फोकस ठेवला. प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली.
विकासासाठी आवश्यक विषयांचा पाठपुरावा केला. 'वूमन्स बाइक रॅली', 'कोल्हापूर टाइम्स कार्निव्हल', 'हॅपी स्ट्रीट' आदी उपक्रमांच्या माध्यमातून 'मटा'ने वाचकांचे; वाचकांसाठीचे उपक्रम राबविले. हजारो कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या उपक्रमांना प्रतिसाद देत 'मटा'वरील विश्वास दृढ केला. 'कोल्हापूर रायझिंग'च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील कोल्हापूर शहराचे सामर्थ्य आणि भविष्यातील संधींवर प्रकाश टाकला, तर 'सेलिब्रेट कोल्हापूर'द्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी सादर केली. 'प्लॅनेट कॅम्पस'ने विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठीच्या संधी आणि मार्ग नेहमीच खुल्या केल्या आहेतत. सर्व वयोगटाच्या वाचकांना 'लाइक अॅण्ड शेअर' मधून हक्काचे व्यासपीठ दिले. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सांस्कृतिक ओळख राखत 'वर्धापन दिन सप्ताह' साजरा करण्याची परंपराही 'मटा'ने सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाशबीजे रूज‌वित चाललो...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो,' ही ​कविता सामूहिकरित्या गाऊन ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणी जागवत त्यांच्या हत्येचा तपास लवकर करावा, अशी मागणी करण्यात आली.

कॉ. पानसरे यांच्या हत्येला सहा महिने तर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली असून हल्लेखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही. हल्लेखोरांचा शोध लवकर लागावा, या मागणीसाठी गुरूवारी सकाळी 'निर्भय मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात आले. कॉ. पानसरे ज्या मार्गावरून सकाळी फिरायला जात असत त्या मार्गावरून निर्भय मॉर्निंग वॉकचा मार्ग ठेवण्यात आला. सकाळी साडेसहा वाजता मॉर्निग वॉकला सुरूवात झाली. त्यामध्ये मेघा पानसरे, कॉ दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, कॉ. चंद्रकांत यादव, तनुजा शिपुरकर यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते, नागरिक, युवक व युवती सहभागी झाले होते. मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. 'कॉम्रेड पानसरे यांच्या हल्ल्याचा निषेध' असे फलक कार्यकर्ते घेऊन आले होते.

शिवाजी विद्यापीठातील भाषा भवनात कॉ. पानसरे ज्या ठिकाणी विश्रांतीला थांबत व सहकाऱ्यांसमवेत चर्चा करत त्या ठिकाणी रॅली थांबवण्यात आली. 'आम्ही प्रकाशबीजे रूजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो' ही ​कविता सर्वांनी म्हटली. 'कॉ. पानसरे व डॉ. दाभोलकर अमर रहे' च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पुढचा लढा पानसरे व दाभोलकर यांच्या मार्गावरून लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैशाचा खेळ करणाऱ्यांना जागा दाखवू

$
0
0

जुना बुधवार पेठेतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेनेचा झंझावात पाहून हडबडलेल्या काही पक्षांनी पैशाचा खेळ सुरू केला आहे. पैशावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना कोल्हापुरची स्वाभिमानी जनता त्यांची जागा दाखवेल. जनताच शिवसेनेकडे एकहाती सत्ता देईल' असा विश्वास शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. जुना बुधवार पेठेतील तोरस्कर चौक येथील द्विमुखी हनुमान मंदिरात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जुना बुधवार पेठेतील कोकणे मठ, सिध्दार्थनगर, खोलखंडोबा, बाजारगेट या चारही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील सर्व पेठा हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत जुना बुधवार पेठेत मिळालेले मताधिक्य विरोधक कधी कमी करू शकले नाहीत. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत अनेकांकडून जनतेला पैशाचे प्रलोभन दाखवण्यात येत आहे. परंतु शाहू महाराजांची स्वाभिमानी जनता पैशाची मस्ती उतरवेल. काँग्रेस व राष्ट्रवादीने अनेक वर्षे सत्ता भोगताना घोडेबाजार, भ्रष्टाचार आणि लाचखोरी अशा गैरकारभारांनी शहराची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. शहर आणि उपनगरात मुलभुत सोयीसुविधा नाहीत. टोल, पाणी दरात वाढ अशा प्रश्नांवर शिवसेनेने आवाज उठवला आहे. त्यामुळे पेठातील स्वाभिमानी सुज्ञ जनता सेनेच्या उमेदवाराला विजयी करतील.'

बैठकीला उप शहरप्रमुख अनिल पाटील, विभागप्रमुख उमेश जाधव, नागेश घोरपडे, उदय भोसले, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीचा घडा भरला

$
0
0

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंचे सेना-भाजपवर टीकास्त्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप, शिवसेनेने चालविलेल्या फसवणुकीचे दिवस संपले आहेत. त्यांनी सहकार मोडीत काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे राजकारण चालवले आहे. त्यांना आता निर्णायकपणे उत्तर देण्याची वेळ आली असून विचारांची बांधिलकी जोपासत महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास सज्ज व्हा', असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तटकरे गुरुवारी प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा व सत्कार समारंभ झाला. त्यावेळी 'महापालिकेत राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने उतरावे' असे आवाहन तटकरे यांनी केले.

'देशाच्या सत्तेवर येताना अच्छे दिनचा वादा केलेले पंतप्रधान लोकशाहीचा अपमान करत संसद सुरू असताना परदेश दौरे करत आहेत. टिकाही करायची व सत्ताही सोडायची नाही अशी दुटप्पी भूमिका शिवसेना घेत आहे,' अशी टिका करून तटकरे म्हणाले, 'देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर देशवासियांचा सव्वा वर्षातच भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधानांनी तर परदेश दौऱ्यांचा विक्रमच केला आहे. महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमधील सहकारमंत्री चंद्रकांत पाटील वेगवेगळ्या घोषणा करत सहकार मोडित काढण्याचे काम करीत आहेत. हे काम भाजप, सेना जाणीवपूर्वक करीत आहे. सकाळी उठल्यापासून फडणवीस, खडसे, तावडे ट्विटरवर असतात. ट्विटरवर सरकार चालत नसून जनतेचे प्रश्न समजावून घेऊन त्यानुसार कणखरपणे निर्णय घेऊन मार्गक्रमण करायचे असते. या सरकारचा छुपा अजेंडा वेगळाच आहे. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर सरकार अजून हतबल होऊन पहात आहे. सरकारकडून नाकर्तेपणाची भूमिका घेतली जात असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.'

तटकरे म्हणाले, 'आम्ही गेल्या पाच वर्षात मोठा निधी महानगरपालिकेत आणला. आता निवडणुकीच्यानिमित्ताने परीक्षा देण्याची वेळ आली आहे. भाजप व सेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यांची फसवणुकीची व दुटप्पी भूमिका जनतेला माहिती झाली आहे. सामाजिक समतेचे असलेल्या शहरात विचारांची बांधिलकी जपणारे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी करावेत.'
खासदार धनंजय महाडिक, निवेदिता माने, के. पी. पाटील, इलियास नायकवडी, आर. के. पोवार, राजेश लाटकर यांची भाषणे झाली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी स्वागत केले.

तर निवडणूक लढवणार नाही

'गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाची कामे केली आहेत. कुठेही टीडीआर, आरक्षण उठवण्याचे काम केलेले नाही. जर कुणी त्याचे उदाहरण दिले तर निवडणूक लढवणार नाही' अशा शब्दांत मुश्रीफ यांनी विरोधकांना आव्हान दिले. 'यापुढे राष्ट्रवादीचा स्वबळावर महापौर झाल्यास स्मार्ट सिटीच नव्हे तर शहराला देशात प्रथम क्रमांकाचे शहर बनवू' अशी ग्वाहीही दिली.

खिशात कॅट घेऊन दलाल फिरताहेत

आमदार हसन मुश्रीफ यांनी उमेदवारांसाठी पैशांचे लालूच दाखवणाऱ्या पक्षांचा अतिशय तिखट शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, 'विविध पक्ष समोर आहेत. अनेक मंडळी नगरसेवकांचा शोध घेत आहेत. पण 'आयजीच्या जिवावर बायजी उदार' या म्हणीप्रमाणे काही दलाल नगरसेवक शोधण्यासाठी हिंडत आहेत. त्यांच्या खिशात पै नाही, पण इतके देतो-तितके देतो केवळ वाफ घालवत आहेत. त्यांच्या खिशात केवळ पत्त्यांचे कॅट आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस हा सेवा करणाऱ्यांचा पक्ष आहे. पक्षाचा नगरसेवक गरीबाला आधार वाटणारा असेल.'

पालकमंत्र्यांनी पेन्शन थांबवली

'भाजपने आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे' अशी टिका करून मुश्रीफ म्हणाले, 'संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शन बंद करण्यासाठी काही जीआर आहेत. पण तीन हजार नागरिकांची पेन्शन बंद करुन त्यांचे पैसे बिनव्याजी अडकून ठेवले आहेत. पालकमंत्र्यांनी थांबवले असे अधिकारी सांगत आहेत. त्यांनी जर पेन्शन सुरु केली नाही तर विधवा भगिनी त्यांच्या घरात घुसतील. हा त्यांच्यासाठी इशारा आहे.'



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैलवानाचे ऑपरेशन करू

$
0
0

गटबाजीची पतंगराव कदम यांच्याकडून झाडाझडती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेसमध्ये वाघ आणि सिंह एकाच पिंजऱ्यात आहेत. दोघांनी एकमेकांना पाडण्याशिवाय दुसरे काही केले नाही. तेच दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये आहेत. या दोन पैलवानांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायला हवी. नाहीतर एकाचे ऑपरेशन करावे लागेल', असा टोला कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या समन्वय समितीचे प्रमुख, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी लगावला. राजीव गांधी यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील शेतकरी मेळाव्यावेळी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी दोघांचीही झाडाझडती घेतली.

माजी मंत्री पतंगराव कदम म्हणाले, 'काही जण आमदार होण्यापेक्षा गोकुळचे संचालक होण्यातच धन्यता मानतात. खरेतर काँग्रेस हा बलाढ्य पक्ष आहेत. काही चुकांमुळे काही जिल्ह्यांमध्ये पक्षाला सत्ता गमवावी लागली. काँग्रेसमध्ये एकोपा नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. मात्र यापुढे पाडापाडीचे राजकारण करण्याची गरज नाही. जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट करण्याची गरज आहे. यापूर्वी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस अधिक बळकट होती. केवळ आपापसातील भांडणामुळे बलाढ्य असलेल्या काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदेतही परिवर्तनाची लाट आहे. सध्याच्या भाजप आणि शिवसेना या युती सरकाराला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. त्यामुळे परिवर्तनाची लाट सुरू आहे. काँग्रेस पक्षात अनेकांनी अहंकार बाजूला ठेवायला हवा. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला शंभर टक्के यश मिळेल. सर्वसामान्य मतदार काँग्रेसलाच मतदान करतील. फक्त सत्ता घ्यायची की नाही, याचे चिंतन करा.'

शाहू महाराजांची भेट

प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी गुरूवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते मंडळी त्यांच्यासोबत होते. काँग्रेसच्या नेत्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित नव्हते. मालोजीराजे यांनी यापूर्वीच महापालिका निवडणुकीपासून तटस्थ राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक दुसरे पर्याय शोधत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शाहू महाराजांची घेतलेली भेट महत्वपूर्ण ठरली. दरम्यान ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले.

सतेज पाटील यांची कबुली
'आमच्या भांडणांमुळे दुसरी सत्ता आली, हे निर्वावादपणे मान्य करावे लागेल' अशी कबुली देत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. आमदार महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता पाटील म्हणाले, 'जिल्ह्यात काहीही वातावरण असले तरी यापुढे काँग्रेस अधिक भक्कम होणार आहे. महापालिकेत यापुढेही पी. एन. पाटील, मालोजीराजे आणि सतेज पाटील यांची आघाडी कायम राहणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसची वाटचाल सुरू राहिल.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात काँग्रेसचे पॅचवर्क

$
0
0

बैठकीपासून महादेवराव महाडिक लांबच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गटातटांत आणि नेत्यांमध्ये विखुरलेल्या काँग्रेसमध्ये पॅचवर्क करण्यासाठी राष्ट्रीय तसेच प्रदेश पातळीवरील नेत्यांना गुरुवारी पुढाकार घ्यावा लागला. सर्किट हाउसवर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत तासभर खलबते झाली, पण या बैठकीस आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार मालोजीराजे उपस्थित नव्हते. त्यामुळे महाडिक यांना सामावून घेण्याची जबाबदारी पी. एन. पाटील यांच्यावर सोपवण्यात आली तर न्यू पॅलेसवर श्रीमंत शाहू महाराज यांची प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतली.

महापालिका निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची काँग्रेस कमिटीत बैठक आयोजित केली होती. तीत बदल करून सर्किट हाउस येथे बैठक झाली. प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश कार्यकारिणीचे चिटणीस अॅड. सुरेश कुराडे, पक्षाचे महापालिका निवडणुकीसाठीचे पक्ष निरीक्षक व माजी मंत्री रमेश बागवे, सत्यजित देशमुख, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

दरम्यान, पक्षातील मतभेद मिटविण्यासंदर्भात सोमवारी आमदार महाडिक आणि सतेज पाटील यांची बैठक घेऊ, असे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले.

काँग्रेसमध्ये वाघ आणि सिंह एकाच पिंजऱ्यात आहेत. दोघांनी एकमेंकांना पाडण्याशिवाय दुसरे काही केले नाही. तेच दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये आहेत. या दोन पैलवानांनी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायला हवी. नाहीतर एकाचे ऑपरेशन करावे लागेल.

- डॉ. पतंगराव कदम, समन्वय समितीचे प्रमुख, दिंडनेर्लीत बोलताना



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्प १३९ कोटींचा

$
0
0

महापालिका आणि 'एईए'चा सरकारला अहवाल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पाच्या करारानुसार प्रकल्पाची किंमत २५९.७५ कोटी रुपये निश्चित केल्याचा अहवाल महापालिका व आर्किटेक्ट अँड इंजिनीअ​रिंग असोसिएशनने राज्य सरकारला गुरुवारी दिला.

खराब रस्ते, निकृष्ट बांधकाम साहित्य, न केलेल्या कामाची किंमत, जागेवर उपलब्ध न केलेल्या सुविधा आणि आजवरचा देखभाल खर्च १२०.३९ कोटी रुपये झाला आहे. करारानुसार निश्चित केलेल्या रकमेतून १२०.३९ कोटी रुपये रस्ता बांधणी खर्चातून वजा केल्यास प्रकल्पाचा खर्च १३९.३५ कोटीच होते. हा हिशेब लक्षात घेता कंपनीकडे आजपर्यंत जमलेली टोलची रक्कम, टेंबलाईवाडीतील भूखंडाची रक्कम धरूनच प्रकल्पाची अंतिम रक्कम निश्चित करावी, असेही अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, शनिवारी कोल्हापुरात प्रकल्पाच्या उपसुकाणू समितीची बैठक होत आहे. महापालिका व असोसिएशनने मूल्यांकनाचे दोन अहवाल सादर केल्यामुळे सरकारला आता कंपनीला द्यावयाची रक्कम निश्चित करावी लागेल. यापूर्वी सदस्य आमदारांनी कंपनीला १०२ कोटी देण्याचा प्रस्ताव मांडला होता. प्रकल्पाच्या पुनर्मूल्यांकना अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव एस. जी. तामसेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली.

असोसिएशनच्या राजेंद्र सावंत यांनी नोबेल कंपनीने २०१०-११ च्या जिल्हा दर सूचीनुसार रस्ते बांधणीचा प्रत्यक्ष खर्च १८२.८८ कोटी निश्चित केला आहे. त्यावर महापालिका व रेल्वेकडील चार्जेस २९.७६ कोटी आहेत. खराब कामाचे ५४.३८ कोटीची वजावट मागितली आहे. त्यामुळे नोबेल कंपनीच्या अहवालानुसार रस्ते बांधणीचा खर्च १५८.५६ कोटी इतका होतो. या खर्चाचा हिशेब करत असताना टोल वसुलीची रक्कम, महापालिकेस दिलेली २७ कोटीची निगेटिव्ह ग्रँटचा हिशेब स्वतंत्ररीत्या करूनच प्रकल्पाची अंतिम रक्कम निश्चित करावी, अशी भूमिका मांडली.

टोल वसुलीची रक्कम आणि कंपनीला टोल वसुलीचे सर्टिफिकेट देताना अपुऱ्या कामांची पूर्तता ६० दिवसांत करण्याचे ठरले होते. मात्र अपुऱ्या कामांची पूर्तता झाली नाही. यामुळे कंपनीला दर दिवसाला दोन लाख दंड आकारला जात आहे. ती रक्कम गृहीत धरावी.

- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

सरकारने प्रकल्पाची किंमत भागवताना महापालिकेवर बोजा टाकू नये. रस्ते देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेला विशेष अनुदान द्यावे.

- चंद्रदीप नरके, आमदार



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅट्रॉसिटीबाबत जागृती करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जातीयतेच्या समूळ उच्चाटनासाठी अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याबरोबरच लोकशिक्षण, जागृती आणि प्रबोधन याही गोष्टींवर भर देण्याची गरज आहे. जातीयता नष्ट करून एकसंध समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:च्या कुटुंबापासून संस्कार आणि जनजागृतीचे काम हाती घेणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (बार्टी) शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या सामाजिक समता, बंधुता आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रारंभ सैनी यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अनुसूचित जाती-जमातींच्या असणाऱ्या योजना त्या त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष रहावे, असे सांगत सैनी म्हणाले, 'योजना राबवताना लाभार्थ्याचे हित डोळ्यासमोर ठेवून प्राधान्यक्रमाने या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. जात वैधता प्रमाणपत्र देताना यंत्रणांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि खात्री करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तक्रारींची तत्काळ नोंद घेऊन त्यानुसार प्राधान्यक्रमाने कार्यवाही करण्याचे सक्त आदेश सर्वांना देण्यात आहेत. कायद्यामधील वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांची संबंधितांनी माहिती घेऊन कायद्याची जनजागृती आणि प्रबोधनाबाबतही दक्ष राहावे.'

यावेळी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची भाषणे झाली. 'बार्टी'चे प्रकल्प संचालक राजेंद्र मुठे यांनी स्वागत केले. वृषाली शिंदे यांनी आभार मानले. निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक अशोक धीवरे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज उलगडणार ‘तो आणि ती’चे नाते

$
0
0

'महाराष्ट्र टाइम्स'च्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त करवीरकरांना स्वरमय भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तो आणि ती...मित्र मैत्रीण म्हणून तर कधी पती-पत्नी म्हणून एकमेकांसोबत नात्याची ​वीण गुंफत आयुष्य जगतात. कधी मौनातून तर कधी दिलखुलास संवादातून त्यांच्या मनाची स्पंदने एकमेकांची होतात. आयुष्यातील अशाच अनेक वळणावर तो आणि ती यांच्या नात्यातील भावस्पर्शी तारांना छेडणारा 'तुझे नि माझे नाते काय,' या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त शुक्रवार, ता. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही मैफल रंगणार आहे. मटा कल्चर क्लब सदस्यांसाठी २५० रुपये तर अन्य वाचकांसाठी ३५० रुपये तिकीट दर आहे. श्री ट्रॅव्हल्स हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

आयुष्यात अनेक वेगवेगळ्या नात्याचे पदर असतात, पण यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या नात्याला प्रत्येक वळणावर वेगवेगळा गंध असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या नवथर प्रेमापासून ते सहजीवनाच्या वाटेवर सोबत चालताना होणाऱ्या जवळीकपर्यंत तो आणि ती हे नातं फुलत जातं. आयुष्याच्या संध्याकाळी तर त्याच्या आणि तिच्या नात्याला वेगळाच गहिरेपणा येतो. काहीही न बोलता ते भावना व्यक्त करत असतात. तर प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं आणि तिचं असंही एक नातं असतं जे कधी यशस्वी होत नाही, ते एकमेकांपासून दूर असतात, मात्र त्यांच्या मनात मात्र ते अबोल नातं जपत असतात. तो आणि ती... दोघांच्या त्या प्रत्येक नात्याची पाकळी अलगद उमलवणारा 'तुझे नि माझे नाते काय' कार्यक्रम कुटुंबातील प्रत्येकाने पहावा असा आहे.

डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या निमित्ताने नव्या कवितांची भेट घेऊन आले आहेत. शब्दांच्या सखोल अर्थातून नात्याची परिभाषा सांगणारा हा कार्यक्रम आहे. तो आणि ती यांच्या नात्यातील काव्याविष्कार घडवणाऱ्या या कार्यक्रमात संदीप, सलीलसह सोनिया खरे, अमर ओक, मनाली नेरीकर, आदित्य आठले आणि रितेश ओहोळ सहभागी होणार आहेत. प्रेमात पडलेल्या, पडू इच्छिणाऱ्या, प्रेमाची अनुभूती घेतलेल्या अशा साऱ्याच तरुण आणि युवादिलांसाठी हा कार्यक्रम वेगळा अनुभव देणारा ठरेल. नव्या कविता, नवी गीतं आणि प्रेमासारखा चिरतरुण विषय घेऊन हा कार्यक्रम सादर होतो आहे. संपूर्ण कुटुंबाला आनंद घेता येईल, काही आठवणी जाग्या होतील, तर एकमेकांतील प्रेमाची पुन्हा नव्यानं जाणीव होईल, असा हा कार्यक्रम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्किट बेंचबाबत आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय

$
0
0

न्यायमूर्ती शहा यांचे कृती समितीला आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासंदर्भात आठ सप्टेंबरपर्यत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. तोपर्यंत आंदोलन करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. न्यायमूर्ती शहा यांनी संस्थानकालीन हायकोर्टासंबधीची कागदपत्रे व सोलापूर जिल्ह्यातील सर्किट बेंचला पाठिंबा देणारे ठराव मागितले आहेत. कृती समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सहा जिल्ह्यातील वकिलांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पणजी येथे शहा यांची भेट घेतली.

सर्किट बेंचसाठी कृती समितीने २३ ऑगस्ट डेडलाइनही दिली होती, पण तत्पूर्वीच न्यायमूर्ती शहा यांनी कृती समितीला चर्चा करण्याचे निमंत्रण​ दिले. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी पणजी हायकोर्टात न्यायमूर्ती शहा यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या संदर्भात निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी बैठकीची माहिती दिली. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी मांडलेले मुद्दे न्या. शहा यांनी नोंदवले. कोल्हापुरात संस्थानकालात असलेल्या हायकोर्टासंबधीची कागदपत्रे त्यांनी मागितली. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यांनी सर्किट बेंचची मागणी केली आहे त्यांचे ठराव पाठवायला सांगितले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आठ सप्टेंबरपर्यंत सर्किट बेंचबाबत निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत कोणत्याची प्रकारचे आंदोलन करू नये अशी सूचना केली. त्याला कृती समितीने सहमती दर्शवली. शिष्टमंडळात सांगलीचे अॅड. श्रीकांत जाधव, कराडचे संभाजी मोहिते, संतोष शहा, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, माणिकराव मुळीक, महादेवराव आडगुळे, अजित मोहिते, विवेक घाटगे, संपतराव पवार, राजू किंकर, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रपतींना पाठवली पाच हजार पत्रे

$
0
0

कुपवाड : अंधश्रद्धा निमुर्लन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना केव्हा पकडणार? असा सवाल करणारी पाच हजार पोस्टकार्ड गुरुवारी सांगलीतून राष्ट्रपती भवनकडे पाठविण्यात आली. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक पुरोगामी संघटनांनी दिवसभर टेबल मांडून लोकांना, युवकांना पोस्टकार्डाबाबत केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अंधश्रद्धा निमुर्लन समिती, शहर सुधार समिती यासह सांगली आणि परिसरातील पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सांगलीत डॉ. दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी हा उपक्रम राबविला. सर्वसामान्य नागरिकांपासून ते महाविद्यालयीन युवक-युवतींनी उस्फूर्तपणे पुढे येवून पोस्टकार्ड लिहिले. काहींनी स्वतःच पोस्टकार्ड आणले तर इतरांसाठी संघटनांनी तेथे कोरी पोस्टकार्ड उपलब्ध केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगाव तालुक्यात पाण्यासाठी बंद

$
0
0

सांगली : तासगाव तालुक्यातील पूर्व भागात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सावळज या परिसरातील मोठ्या गावात बंद पाळण्यात आला. हा बंद सर्वपक्षीय होता. परिसरात सध्या कमालीची पाणीटंचाई व चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यातच पूर्व भागातील पाणी योजना बंद आहेत. पाणी योजना व चारा छावण्या सुरू करा, संपूर्ण कर्जमाफी द्या आदी मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात आला. ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगाम तर वाया गेलाच आहे. पाण्याविना द्राक्षबागाही धोक्यात आल्या आहेत. पूर्व भागाला वरदान ठरणारी विसापूर-पुणदी ही योजना सुरू केली जावी, अशा मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निष्क्रीय सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील मेळाव्यात शुक्रवारी करण्यात आला. पुढील आठवड्यात राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मेळाव्यात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हासंपर्क मंत्री आमदार शशिकात शिंदे, युवकचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, पक्षाच्या निरीक्षक राजलक्ष्मी भोसले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला.

सोशल मीडियाचा वापर करीत, अच्छे दिनचे खोटे स्वप्न दाखवत आलेले हे सरकार आहे. ग्रामीण भागातील जनतेची व जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसणारे, आहे. गृहखाते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे असतानाही गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेच्या गाऱ्हाणी ऐकू येत असतानाही बहिरेपणाचे, जनतेच्या समस्या दिसत असतानाही आंधळेपणाचे व समस्यांवर बोलणे शक्य असतानाही केवळ किर्तन करण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी केला.

सांगली जिल्ह्यासह राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. सिंचन योजना विजबिलासाठी बंद आहेत. या सर्व योजनांचे पाणी तत्काळ सुरू करा. शेतकऱ्यांना सोई-सुविधांसह अन्य प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारला मदत करण्यास भाग पाडू, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. शशिकांत शिंदे म्हणाले, सरकारचे शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. सत्तेच्या मस्तीत असणाऱ्या सरकारची मस्ती उतरवून सरकार उलथवून टाकण्याचे काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी शिवसेनेचा दुटप्पीपणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'सत्तेत राहूनही विरोधात असल्यासारखा आव आणण्याचा शिवसेनेचा दुटप्पीपणा महाराष्ट्रात फार काळ चालणार नाही. सेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दावणार नाही. जरी धाडस दाखवून सेना सत्तेतून बाहेर पडली तरी राष्ट्रवादी आता भाजपला पाठींबा देणार नाही, ' अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष तटकरे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे शुक्रवारी सांगलीच्या दौऱ्यावर होते. मेळाव्यानंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तटकरे म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्रच अपेक्षापेक्षा कमी पर्जन्यमान असल्याने दुष्काळाची गंभीर समस्या उभी ठाकली आहे. सरकारला एलबीटी, टोल रद्द करताना त्यासाठी तरतूद करायला पैसे आहेत, पण अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही. गेल्या आठ महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झालेली वाढ हा खूपच गंभीर प्रश्न आहे. हजारोंच्या पटीत आत्महत्या झाल्या असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे केंद्र सरकारला केवळ तीन आत्महत्या झाल्याचा अहवाल देतात. तिघांच शेतकऱ्यांनी कळवून आत्महत्या केल्याचा त्यांचा दावा आहे. सिंचन योजना सुरू केल्या जात नाहीत. छावण्यांचा पत्ता नाही. टँकर मुद्दाम सुरू केले जात नाहीत. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न उग्र होत चालला आहे. १९७२पेक्षाही हा दुष्काळ भयावह रुप धारण करीत आहे. हे सरकार सहकार मोडून काढण्याबरोबरच बळीराजाच्या मानेवर पाय देण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्शभूमीवर राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन मोर्चे, जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात सांगलीतील मोर्चाने होणार आहे. या मोर्चात राज्यपातळीवरील नेते सहभागी होणार आहेत.

राज ठाकरेंचे आरोप बालिश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, राज ठाकरे यांचे आरोप बालिश आहेत. त्यांना शरद पवार आणि महाराष्ट्र अद्याप कळलाच नाही, असा त्याचा अर्थ होतो. मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरणाच्यावेळी पवारांनी मुख्यमंत्र‌िपद पणाला लावले होते. त्यामुळे पवारांच्या पुरागामीत्वाबाबत शंका घेण्याला जागाच नाही. जाती-पातीच्याही पलिकडे ते पोहचलेले आहेत. केवळ पवारांचे नाव घेतले की, झटपट प्रसिद्धी मिळते, एवढेच ठाकरेंना माहित आहे. पुरंदरेंच्या लिखाणाबद्दल राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीच नाहीतर ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी भालचंद्र नेमाडे, नागनाथ कोत्तापल्ले आदींनी आक्षेप घेतले आहेत. आता या प्रकरणावर पडदा पडलेला आहे.

'मुख्यमंत्र्यांना शेतीच्या प्रश्नांची जाण नाही'

सरकार अपघातानेच आलेले आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांची जाण मुख्यमंत्र्याना नाही. शहरी वातावरणात वाढलेली मंडळीच मंत्रिमंडळात आहेत. त्यांना ग्रामीण जनतेचे प्रश्नच माहित नाहीत. नेमक्या प्रश्नांची जाण नसलेले सरकार सत्तेत आले की काय होते, याचे हे उदाहरण आहे. या सरकारला सहकारही कळलेला नाही. सहकार बदनाम झालेला आहे तर मग भाजपने स्थानिक संस्थामध्ये निवडून येण्यासाठी धडपड का केली? असेही तटकरे म्हणाले.

तावडेंनी आम्हाला शिकवू नये

ज्या शरद पवारांनी महाराष्ट्र घडविण्यासाठी पन्नास वर्षे घालविली आहेत. त्यांच्या बाबतीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. ज्यांना आपल्या बोगस पदवीचा खुलासा करता आला नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये. या महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविलेले वसंतदादा पाटील यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. पण, त्यांनी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. जनतेच्या मनात घर केलेल्या नेत्यांना आपली पदवी सांगण्याची वेळच येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images