Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

परप्रांतीयांची रेशन कार्ड रद्द करा

$
0
0
कामधंद्याच्या​ निमित्ताने आलेले बहुतांशी परप्रांतीयांनी भ्रष्टाचाराने रेशनकार्ड मिळवली असून त्यांची रेशन कार्ड रद्द करावीत. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयांबाबत कोणतीही सहानभुती दाखवू नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण विभागाच्यावतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली.

उन्हाळ्यात मासेमारी, पावसाळ्यात चोरी

$
0
0
उन्हाळ्यात मासेमारी आणि पावसाळ्यात चोरी असा पार्टटाइम उद्योग करणाऱ्या दोघा चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदीरातील चांदीच्या वस्तू या दोघांनी चोरल्या असून त्या कोल्हापूरात विकण्याचा प्रयत्न केला जात होता.

नोंदणी करा, कारवाई टाळा

$
0
0
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना वर्गणी जमा करण्यासाठी मंडळ नोंदणीकृत करण्यासाठी सध्या धर्मादाय कार्यालयात कार्यकर्ते गर्दी करत आहेत. १६ ऑगस्टपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.

डांबराची गुणवत्ता तपासा

$
0
0
डांबरी रस्ते तयार करताना डांबर योग्य गुणवत्तेचे व योग्य प्रमाणात आहे हे महानगरपालिका, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी तपासून पहावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

ग्राहक राजा, जागा हो...!

$
0
0
ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करताना पावती घेण्याची खबरदारी घेतली तर फसवणुकीचा धोका टाळता येतो. मात्र शहरात सर्रासपणे पावतीशिवाय माल विकला जात आहे. ग्राहकांनी कोणताही व्यवहार करताना पावती घेतल्याशिवाय तो करू नये, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केले आहे.

फळबाजार तेजीत!

$
0
0
श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम, सणांमुळे उपवास सुरू होतात. त्यासाठी यंदाही बाजारात सफरचंद, मोसंबी, केळी, सिताफळ आणि डाळिंब या फळांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

दर्शनासाठी गर्दी

$
0
0
श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिरांत दिवसभर भजन, कीर्तन, अभिषेक, प्रवचन, धार्मिक ग्रंथांचे वाचन आदी कार्यक्रम झाले.

सुटीदिवशी पूजा-अर्चा

$
0
0
श्रावण महिन्यात रविवारी अथवा सणाच्या सुटीदिवशी पूजा करण्याचा भाविकांचा कल वाढला आहे. सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, भूमिपूजन अशा कार्यक्रमांमुळे पूजाविधी करण्यासाठी भटजींची वानवा भासू लागली आहे. नारळी पौर्णिमेदिवशी सत्यनारायण पूजा हाउसफुल्ल ठरणार आहेत.

रंकाळा संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करा

$
0
0
रंकाळा तलावात प्लॅस्टर मूर्ती विसर्जनास बंदी करावी, रंकाळा सवंदेनशील क्षेत्र म्हणून जाहीर करावे, २१ फूटी मूर्ती असणाऱ्या मंडळांना मार्ग बदलण्यास विनंती करणे, तलाव संवर्धन करण्याचा कार्यक्रम महापालिकेने जाहीर करावा, तलावातील जैवविविधता वाढवणे, परताळ्यातील दलदल कायम ठेवणे असे ठराव शिवाजी पेठेत रंकाळाप्रेमी मंडळींच्या बैठकीत करण्यात आल्या.

भक्तांवर काळाचा घाला

$
0
0
गोकाक येथे अपघातात ठार झालेल्या स्मिता पाटील रविवारी दोघे जावई, मुली व मुलगा यांच्यासह सौंदतीला देव दर्शनासाठी गेल्या होत्या. दुपारी दर्शन घेऊन हे सर्वजण कोल्हापूरकडे येत होते.

महिलेसह दोघांना सक्तमजुरी

$
0
0
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे सव्वादोन वर्षापूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी एका महिलेसह दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी सोमवारी सुनावली.

५० लाखांच्या फसवणूक : सीएला अटक

$
0
0
पन्नास कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या अमिषाने एका व्यापा-याची ५५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रजनीश प्रकाशचंद मेहता (रा. मुंबई) या चार्टड अकाउंटटला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

त्यागीच्या खूनप्रकरणी ५ जणांना अटक

$
0
0
जयसिंगपूर येथे भरत त्यागीचा वर्चस्ववादातून काटा काढल्याची कबुली पोलिसांनी अटक केलेल्या पाच संशयितांनी सोमवारी दिली.

मुलाचा इराणी खणीत मृतदेह सापडला

$
0
0
बेपत्ता झालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास इराणी खणीत सापडला. इंद्रनील गजानन गवळी (वय १५, रा. नाळे कॉलनी) असे त्याचे नाव आहे.

स्टेशन रोडवर सतत वाहतूक कोंडी

$
0
0
गेल्या काही महिन्यांत काँग्रेस नेत्यांच्या वाहनांमुळे वर्दळीच्या स्टेशन रोडवर सतत वाहतूक कोंडीचा अनुभव येतो.

आईच मारेकरी

$
0
0
क्रांतिसिंह नाना पाटील नगरमधील आर्यन शिरीष सासने (वय २) या बालकाचा खून त्याची आई ज्योती (२९) हिनेच केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती ‌दिली.

मुख्याध्यापिकेसह कुटुंबातील ४ ठार

$
0
0
कर्नाटकात गोकाकजवळ हायवेवर थांबलेल्या ट्रकला कारने मागून धडक दिल्याने कारमधील एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाले. अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत.

दाभोलकरांची हत्या राजकीय : CM

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला.

शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप

$
0
0
सत्ताधारी, विविध राजकीय पक्षांचे नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी माहुली येथील कैलास स्मशानभूमीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. तत्पूर्वी तेथे आलेल्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना जनक्षोभाचा सामना करावा लागला.

आगीत होरपळून महिलेचा मृत्यू

$
0
0
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या टाउन हॉल परिसरातील वारांगणांच्या झोपडपट्टीस सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत २१ झोपड्या जळून खाक झाल्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images