Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापुरातील गुंडाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील गुंडाचे अंडवर्ल्ड कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा गुंड कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करू लागला आहे. या गुंडाला रोखण्यासाठी पोलिसांनी मोका व हद्दपारीसाठी तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे.

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचा हत्येचा तपास करताना कोल्हापुरातील गुंडाच्यांवर पोलिसांनी शॅडो वॉच ठेवला होता. या शॅडो वॉचमध्ये काही गुंडांचे संबध थेट अंडरवर्ल्ड असल्याचे लक्षात आले आहे. कळंबा कारागृहात मुंबई टोळीयुद्धातील गुंड आहेत. अटक केलेल्या स्थानिक गुंडांनी कळंबा कारागृहात टोळी युध्दातील गुंडाशी जवळीक साधली आहे. या जवळकीतून एका गुंडाने थेट अंडरवर्ल्डमधील गुंडाशी संपर्क साधल्याचे लक्षात आले आहे.

टोळी युध्दातील गुंडाशी जवळीक साधणाऱ्या स्थानिक गुंडांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम पोलिसांनी सुरू केली आहे. काही गुंड व्हाईट कॉलर बनण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पहात असून नगरसेवक होण्याचे 'स्वप्न' पहात आहेत. एका गुंडाने मुक्त सैनिक वसाहत परिसरात वाढदिवसाच्या माध्यमातून दहशत माजवण्यासाठी प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या गुंडाचा वाढदिवस उधळून लावला होता. त्याच्या वाढदिवसाच्या पत्रिकेवर एका आमदाराचेही नाव होते.

शहरातील १५० हून अधिक गुंडाच्या हद्दपारीचे ठराव महसूल प्रशासनाकडे आहेत. त्यांनी या प्रस्ताव निर्णय न दिल्याने पोलिस अधीक्षकांकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून या गुंडांनी निवडणुकीत उतरू नये यासाठी प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्किट बेंचलाही खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सोलापूर, पुणे, जळगाव येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करू नये अशी भूमिका घेत अॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने (अवि) सोमवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला. १२५ सदस्य असलेल्या 'अवि'च्या १०० सदस्यांनी सर्किंट बेंच होऊ नये असे मत मांडले तर २५ वकिलांनी कोल्हापुरात हायकोर्टाचे ​सर्किंट बेंच स्थापन करावे या मागणीसाठी मतदान केले. पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील वकिलांच्या प्रतिनिधींनी सर्किंट बेंच स्थापन होऊ नये म्हणून ठरावाच्या बाजूने मतदान केले.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी 'अवि'ला कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि जळगाव येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करावे का? याबाबत प्रदर्शन करण्यास कळविले होते.

सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता 'अवि'च्यावतीने मुंबई हायकोर्टात बैठक बोलावली होती. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करावे या मागणीसाठी मतदान करावे यासाठी खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी रविवारीच मुंबईला गेले होते. सोमवारी सकाळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रविंद्र जानकर, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे, डी. जी. पाटील, ए. एच. पाटील, व्ही. प. चिदमुंगे, पी. आर. शिंदे, अजय कुलकर्णी, सुशांत गुडाळकर, अतुल रेंदाळे यांनी सोमवारी दुपारी 'अवि'चे अध्यक्ष राजीव चव्हाण यांची भेट घेतली.

तसेच मुंबईत प्रॅक्टिस करणाऱ्या सहा जिल्ह्यांतील वकिलांची भेट घेतली. कोल्हापुरात सर्किंट बेंच स्थापन करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली.

सायंकाळी साडेपाच वाजता 'अवि'चे अध्यक्ष राजीव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. १२५ सदस्य बैठकीला उपस्थित होते. अॅड. विनीत नाईक, अॅड राजेश पाटील, अॅड संदेश पाटील यांनी मुंबईबाहेर खंडपीठ स्थापन होऊ नये असे मत व्यक्त केले. हायकोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या अॅड अनिल साखरे, अॅड अशोक मुंडरगी, अॅड तेजपाल इंगळे, अॅड बोरूलकर यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करावे अशी मागणी करून जोरदार मतप्रदर्शन केले.

त्यानंतर अध्यक्ष नाईक यांनी हात वर करून मतदान घेतले. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, जळगाव येथे हायकोर्टाचे खंडपीठ स्थापित करण्यात येऊ नये या मागणीला शंभर सदस्यांनी पाठिंबा दिला तर २५ वकिलांनी मुंबईबाहेर खंडपीठ स्था​पन करावे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मतदान केले. २५ सदस्यांनी कोल्हापुरात सर्किंट बेंच स्थापन करण्यासाठी मतदान केले, अशी माहिती बार असोसिएशनचे सचिव रविंद्र जानकर यांनी दिली. पुणे, जळगावमधील अनेक वकील अविचे सदस्य असतानाही त्यांनीही मुंबईबाहेर खंडपीठ स्थापित करू नये अशी भूमिका घेत ठरावाच्या विरोधात मतदान केले. दरम्यान, यामुळे कोल्हापूरच्या खंडपीठाच्या मागणीला खिळ बसण्याची शक्यता आहे. किमान सर्किट बेंच होणेही अवघड होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे तपासाबाबत चिंता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येला पाच महिने उलटून गेल्यावरही तपासात प्रगती नसल्याने डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त करत तपास लवकर लागावा या मागणीसाठी किती वेळा प्रतिकात्मक कार्यक्रम करायचे असा सवाल केला. पानसरे यांच्या हत्येला पाच महिने पूर्ण झाले असून मंगळवारी कार्यकर्त्यांनी पानसरे यांच्या घरापासून शिवाजी विद्यापीठापर्यंत प्रभात फेरी काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी हत्येच्या तपासास विलंब होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

गोविंदराव पानसरे यांची हत्या २० फेब्रुवारी रोजी झाली होती. त्यामुळे दर महिन्याच्या २० तारखेला पानसरे यांच्यावर प्रेम करणारे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते तपास लवकर लागावा या मागणीसाठी प्रभात फेरी काढतात. सोमवारीही सकाळी सात वाजता सागरमाळ-तोरणानगर येथील पानसरे यांच्या घरापासून प्रभातफेरीस सुरूवात झाली. पानसरे ज्या मागावरून विद्यापीठात फिरायला जात होते, त्या मार्गावरून फेरी काढण्यात आली. शिवाजी विद्यापीठात ज्या ठिकाणी पानसरे बसत होते, त्या ठिकाणी थांबून कार्यकर्त्यांनी काही काळ चर्चा केली.

यावेळी चर्चेत सुरेश शिपूरकर म्हणाले, 'गेले पाच महिने पोलिसांकडून हल्ल्याचा तपास सुरू आहे, पण हल्लेखोर सापडलेला नाही. हत्येचा तपास लवकर लागावा म्हणून किती दिवस प्रतिकात्मक आंदोलन करायचे हा प्रश्न आहे.'

नंतर फेरी पुन्हा सागरमाळ येथील हुतात्मा स्मारकाजवळ आल्यावर विसर्जित झाली. मेघा पानसरे, व्यंक्काप्पा भोसले, दिलीप पवार, निहाल शिपुरकर, सुभाष वाणी, रसिया पडळकर, सुचेता पडळकर उपस्थित होते.

पोलिस अधीक्षकांची भेट

डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी पानसरे हत्येच्या तपासाबाबत विचारणा करण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. तपासात किती प्रगती झाली? असा प्रश्न शर्मा यांना विचारण्यात आला. पाच महिने होऊन हल्लेखोरांचा व हत्येचा कारणांबाबत तपास होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली. यावेळी मनोजकुमार शर्मा म्हणाले, 'गेले पाच महिने पोलिसांनी कसून तपास केला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी चौकात डाव्या पक्षांची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळलेल्या जनतेला 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने केवळ एक वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या घोटाळेबाज मंत्र्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी आणि भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत या मागणीसाठी देशभर डाव्या पक्षांच्यावतीने सोमवारी भ्रष्टाचार विरोधी दिन पाळण्यात आला. कोल्हापुरात डाव्या पक्षांच्यावतीने शिवाजी चौकात निदर्शने करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीबाबत वेगवेगळी विधाने केली जात आहेत. तर शेकडो कोटी रुपयांचा देशाला गंडा घातलेल्या ललित मोदी यांना भाजप पाठिशी घालत आहे. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संगनमताने 'व्यापम' घोटाळा केला आहे. राज्यातील मंत्री पकंजा मुंडे यांनी अंगणवाडी साहित्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवीमुळे भाजपने जनतेचा भ्रमनिराश केला आहे. भाजपने वर्षात घोटाळ्यांची मालिका निर्माण केली आहे. भाजपच्या या भ्रष्टाचार प्रवृत्तीचा पडदापाश करण्यासाठी डाव्या पक्षांच्यावतीने देशात निदर्शने केली. सर्व डावे पक्ष एकत्र आल्यानंतर शिवाजी चौकात सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी केली. साधनसुचितेचे ढोल बडवत सत्तेवर आलेल्यांनी काय केले हे जनतेसमोर आल्याचे आले आहे असे सांगण्यात आले.

निदर्शनामध्ये भाकप, माकप, शेकाप, लाल निशाण, जनता दल, श्रमिक मुक्तीदल आणि भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने सहभाग घेतला होता. यावेळी चंद्रकांत यादव, संभाजी जगदाळे, बाबूराव कदम, मधूकर हरेल, दिगंबर लोहार, कुमार जाध‍व, दिलीप पोवर, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणाच्या जागेवर अपार्टमेंट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पेठेतील खंडोबा देवालयानजीक असलेली 'माधव प्लाझा' अपार्टमेंट सीमा सामानगडकर यांनी रस्ता रुंदीकरणाच्या जागेत बांधली आहे. माधव प्लाझाच्या बेकायदेशीर बांधकामावर त्वरित कारवाई करावी. या इमारतीचा बांधकाम परवाना देताना भ्रष्ट मार्गाचा अवलंब झाला असल्याचा आरोप खंडोबा तालीम रोड अन्याय निवारण कृती समितीने केला आहे.

याबाबत कृती समितीचे बाजीराव खोत, चंद्रकांत यादव, चंद्रकांत जाधव, अमर जाधव, विक्रम मोरे आदींनी संयुक्तपणे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'बेकायदेशीर बांधकामाविषयी तक्रार करूनही महापालिकेकडून कारवाई होत नाही. या परिसरातील लोकांनी स्वतःहून मास्टर प्लॅनची मागणी केली. त्यानुसार ८० टक्के मास्टर प्लॅन झाले. वीस टक्के मास्टर प्लॅन शिल्लक आहे. महापालिकेचे ​अधिकारी या इमारतीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. गांधी मैदान विभागीय कार्यालयाने तरतुदीचा भंग करून बांधकाम परवाना दिला आहे.

जागा मालक दिलीप नरके यांच्याकडून २९ सप्टेंबर २००१ रोजी सामानगडकर यांनी नकाशा मंजूर करून घेऊन जागा खरेदी केली. नरके यांनी पूर्वी रस्त्यामध्ये जागा गेली असे सांगितले होते. प्रत्यक्षात सिटी सर्व्हेतर्फे मोजणी केली असता त्यांची पूर्वी २८५.५० चौरस मीटर जागा होती.

मोजणीतही २८५.५० चौरस मीटर जागा दाखवली आहे. त्यामुळे त्यांनी जागा सोडलेली नाही हे सिद्ध होते. बांधकाम परवाना देताना या इमारतीसाठी पार्किंग सुविधा नसल्याचे पाहिलेले नाही. इमारतीत वीज पुरवठा सुरू आहे, मात्र त्याला विद्युत निरीक्षकांची कोणतीही परवानगी नाही.'

पत्रकावर विक्रम मोरे, सचिन राऊत, विजय कुलकर्णी, संजय निकम, अनिल मोरे, शिवानी मोरे आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हशीवरून पडून गावावर रुसू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्षाची कोल्हापूर शहरात वाढलेली ताकद हे शिवसेनेच्या पोटदुखीचे मुख्य कारण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांवर उठसूठ टीका करून स्वबळाचा घोषा करणे म्हणजे म्हशीवरून पडून गावावर रुसल्यासारखा प्रकार आहे' अशी टीका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अशोक देसाई यांनी केले आहे. शिवसेनेच्या रविवारी झालेल्या मेळाव्यात साडेचार पालकमंत्री अशा झालेल्या टिकेला प्रत्त्युतर देण्यात आले आहे. 'अकारण पालकमंत्र्यांवर टीका आणि चिखलफेक करून स्वबळाची भाषा करणे म्हणजे चांगल्यात मिठाचा खडा टाकून राजकारण नासवणे आहे' असा सल्लाही देसाई यांनी दिला आहे.

याबाबत भाजपचे सहकार्यालय प्रमुख शंतनु मोहिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या उपाध्यक्ष अशोक देसाई यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या प्रत्येक सभा, कार्यक्रमात शिवसेनेचे नेते उठसूट स्वबळाची भाषा बोलत आहेत. शहर, जिल्ह्यात भाजपची वाढलेली ताकद हे आमच्या मित्रपक्षाचे खरे दुखणे आहे. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अवघ्या १० दिवसांत भाजपच्या उमेदवाराने ४० हजार मते घेतली हे नेत्यांचे यश आहे. नुकतेच भाजपचे केंद्रीय पदाधिकारी ते राज्य पातळीवरील नेत्यांचे भव्य अधिवेशन यशस्वी झाले. त्यात आमच्या नेत्यांनी कोणत्याही मित्रपक्षांवर टीका केली नाही. तरीही भाजपवर आणि न झालेल्या घोटाळ्यांवर शिवसेनेची टीका म्हणजे म्हशीवरून पडून गावावर रुसल्याचा प्रकार आहे. भाजपवर, नेत्यांवर कडाडून टीका हा शिवसेनेच्या अजेंड्यावरील एककलमी कार्यक्रम आहे.

पत्रकात म्हटले आहे, कालच्या कार्यक्रमात गुरूजींनी भाजपचे नेते श्राद्ध, जावळ, निधनाचे कार्यक्रमही सोडत नसल्याची टीका केली. जिल्ह्यात साडेचार पालकमंत्री कार्यरत असल्याची खिल्ली उडवली. मात्र, तोरणाला आणि मरणाला जाणे गैर आहे का ? सेवानिवृत्तीच्या वयात महापालिकेत जाऊ इच्छिणारे गुरूजी कुणाच्या श्राद्धाला, जावळाला आणि मातीला जात नाहीत का ? असा सवाल करण्यात आला आहे.



ज्यांनी तिकीट कापले..

गेल्या निवडणुकीत ज्यांनी गुरुजींचे तिकीट कापले, त्यांचे श्राद्ध गुरुजींनी पदोपदी घातले होते. त्याची ध्वनीमुद्रीत टीप आमच्याकडे आहे असेही अशोक देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे. पालकमंत्र्यांवर उठसुट, अकारण टीका, चिखलफेक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कदार श्रीपूजकांच्यावतीने विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाईच्या मूर्तीवर होत असलेल्या रासायनिक संरक्षण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने २२ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. मंदिर परिसरात उभारलेल्या मुख्य यज्ञमंडपात सकाळी साडेसात वाजता आणि गरुड मंडप येथे सांयकाळी पाच वाजल्यानंतर विविध धार्मिक विधी होतील. श्रीपूजक मंडळाचे प्रमुख अजित ठाणेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ठाणेकर म्हणाले, 'न्यायालयाच्या निकालानुसार श्री अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेच्या दरम्यान धार्मिक विधीही केले जाणार आहे. देवीच्या उत्सवमूर्तीवर सर्व प्रकाराचे नित्य विधी केले जाणार आहेत. २२ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत मूर्तीवर केंद्रीय पुरातत्व खात्याचे तज्ज्ञ रासायनिक प्रक्रिया करणार आहेत. त्यामुळे देवस्थान समितीकडे या कालावधीत भाविकांचे अभिषेक स्वीकारले जाणार नाहीत. मुख्य मंडपाशिवाय याच कालावधीत गरुड मंडप येथे श्रीपूजक मंडळ, शाहू वैदिक स्कूल, जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ, करवीर निवासिनी पुरोहित मंडळ, दक्षिण काशी पुरोहित मंडळाच्यावतीने दररोज जप, पठण आणि ग्रंथ पारायणे होतील.'

ठाणेकर म्हणाले, 'दररोज सायंकाळी ५ वाजता गरुड मंडप येथे श्री देवी भागवत कथा निरुपण होईल. सायंकाळी ७ वाजता मुख्य यज्ञमंडपात पीठस्थ देवतांची महाआरती त्यानंतर अष्टावधान सेवा होईलधारवाडचे उप्पनबेट्टीगिरी, पंडित राजेश्वरशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी मुख्य आचार्य वेदमूर्ती सुहास जोशी आहेत. या विधीत सुमारे शंभरहून अधिक विद्वान सहभागी होतील. ६ ऑगस्ट रोजी प्राणप्रतिष्ठा विधीच्या वेळी करवीर पीठाचे शंकराचार्य श्रीविद्यानृसिंहभारती स्वामी, श्री मध्याचार्यमठाचे जगदगुरुश्री सत्यात्मतीर्थस्वामी उपस्थित राहतील.'

यावेळी गजानन मुनीश्वर, ऐश्वर्या मुनीश्वर, शेखर मुनीश्वर, गजानन नारायण मुनीश्वर, अॅड. केदार मुनीश्वर आदी उपस्थित होते.





असे होतील कार्यक्रम

२२ जुलै : महापूजा, सकाळी १०.३० वाजता, हस्ते श्रीमंत शाहू छत्रपती कुष्मांड होम, श्रीकर नारायण विधान

२३,२३ जुलै : कलाकर्षण विधी, मूर्तीतील प्राणतत्व कलशात काढण्याचा विधी

२२ ते ३० जुलै : देवी भागवत नवाह पारायण

२३ जुलै : श्री मंत्र होम

२४ ते २७ जुलै : सहस्त्रचंडी अनुष्ठान, श्री सूक्त लक्ष जप

२५ ते ३१ जुलै : करवीर माहात्म्य सप्ताह पारायण, श्री गुरु चरित्र सप्ताह पारायण

२८ जुलै : श्री सूक्त विधान

२९ जुलै : चतु:षष्टी योगिनी विधान

३० जुलै : श्री रंक भैरव विधान

३१ जुलै : श्री अंबाबाई सहस्त्र कुंकुमार्चन, श्री बृहतीसहस्त्र महाविष्णू होम

१ ऑगस्ट : श्री बृहतीसहस्त्र महाविष्णू होम

१ ते २ ऑगस्ट : नवावरण श्री विद्या होम

२ ऑगस्ट : श्री लक्ष्मीनारायण होम

३ ऑगस्ट : श्री ललिता सहस्त्र होम

४ ऑगस्ट : क्षेत्रस्थ देवता अभिषेक

५ ऑगस्ट : प्रक्षाळनविधी

६ ऑगस्ट : प्राणप्रतिष्ठा, सहस्त्रकुंभाभिषेक, महापूजा (हस्ते शाहू महाराज) अवभृतस्नान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करु नये. धर्मशास्त्रानुसार नवीन मूर्तीची पुनः प्रतिष्ठापना करावी. रासायनिक प्रक्रिया ही धर्मविरोधी असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा संघटक मधुकर नाझरे, अॅड वीरेंद्र इचलकरंजीकर, राजेंद्र मुणगे यांनीपत्रकार परिषदेत केला.

अध्यक्ष नाझरे म्हणाले, 'श्री अंबाबाई लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया धर्मविरोधी आहे. मूर्तीभोवती रासायनिक कवच निर्माण केल्यास मूर्तीतून सात्विकता प्रक्षेपित होण्याची क्षमता कमी होईल. धर्मशास्त्रानुसार भंग पावलेल्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना आवश्यक आहे. त्याबाबतचे संदर्भ प्रतिष्ठामौक्तिकम् आणि निर्णयसिंधू या ग्रंथात दिले आहेत. मूर्तीची झीज किंवा भंग झाल्यास धर्मशास्त्राप्रमाणे देवता तत्व कमी होते. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार तत्वोत्तारण विधी करुन देवत्व काढावे. नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी.'

मधुकर नाझरे म्हणाले, 'पुरी, ओडिसा येथे श्री जगन्नाथ देवाची यात्रा सुरु आहे. येथे असलेल्या मंदिरातील श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन या देवतांच्या काष्ठमूर्ती प्रत्येक बारा वर्षांनी पुर्नप्रतिष्ठापना करून पालटल्या जातात. झिजलेल्या मूर्तीचे पूजन न करण्याचा धर्मशास्त्रीय दृष्टिकोन आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतही श्री गणेशमूर्ती भंग झाल्यास विसर्जन करुनच नवीन मूर्तीची पूजा केली जाते. अध्यात्मशास्त्रीय सिद्धांतानुसार भंग पावलेल्या मूर्ती विधीवत विसर्जन न केल्यास देवतेचा अपमान होतो. धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने धार्मिक क्षेत्रात पुरातत्व खाते लुडबुड करीत आहे. श्री पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समितीनेही धर्मशास्त्रानुसारच कार्यवाही करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैरा फेडायचा, पण कुणाचा?

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत नेमकी कोणाला मदत करायची​? कोणाचा पैरा फेडायचा या संभ्रमावस्थेत सध्या आमदार हसन मुश्री​फ आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयाला हातभार लावणाऱ्या सतेज पाटील यांना 'हात' द्यायचा की जिल्हा बँकेत अध्यक्ष होण्यासाठी मदत करणाऱ्या विनय कोरेंच्या नावाने गुलाल उधळायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीतील घडामोडींवर विधानपरिषदेचा फैसला होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आदेशाने आजऱ्यात उमेश आपटे यांनी मुश्रीफांना मदत केली. यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. साहजिकच सतेज पाटील यांनी केलेल्या या मदतीचा पैरा आपण फेडणार आहोत असे मुश्रीफ सतत सांगत आहेत. 'गोकुळ' च्या निवडणुकीत ते पैरा फेडतील अशी अपेक्षा सतेज पाटील यांना होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे विधानसपरिषद निवडणुकीत तरी मुश्रीफ हे सतेज पाटील किंवा ते सांगतील त्या उमेदवाराच्या मागे ताकद लावतील का? याबाबत मुश्रीफांचा निर्णय झालेला नाही. अजून निवडणुकीला वेळ आहे, पण आतापासून त्याची चर्चा होत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पी. एन. पाटील यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. तशी त्यांनी जमवाजमवही केली होती. पण ऐनवेळी विनय कोरे यांनी आपली मते मुश्रीफांच्या पदरात टाकल्याने मुश्रीफ अध्यक्ष होऊ शकले. त्यामुळे मुश्रीफांना आता कोरे यांचाही पैरा फेडावा लागणार आहे. त्याची कोरे सतत आठवण करून देत आहेत. कोरे विधानपरिषद लढवण्यासाठी इच्छूक आहेत. सतेज पाटील देखील ऐनवेळी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

महाडिक यांचे काय?

आमदार महादेवराव महाडिक यांनी गेल्या काही महिन्यात मुश्रीफांना पुढे चाल देण्याची भूमिका घेतली आहे. गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये मुश्रीफ यांना मदत होईल अशीच भूमिका महाडिक यांनी घेतली. विधानसपरिषद निवडणुकीत मुश्रीफांनी मदत करावी यासाठीच त्यांना न दुखावण्याचे धोरण महाडिकांनी कायम ठेवले. त्याच्या परतफेडकीच्या प्रतीक्षेत महाडिक राहणार आहेत.

मुश्रीफ करामत करणार?

बाजार समिती​त मुश्रीफ कोरे व पाटील एकत्र आले, अशीच युती आगामी महापालिका व विधानपरिषद निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. दोघांनाही मदत करत एकाचवेळी दोघांचा पैरा फेडण्याची करामत मुश्रीफ करू शकतात. पण ते न करता राष्ट्रवादी पक्षही ही निवडणूक लढवू शकतेा. महापालिका निवडणुकीत काय काय घडामोडी होणार यावरच मुश्रीफांची पुढील वाटचाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुश्रीफ कोणाचा पैरा फेडायचा या कात्रीत सापडले आहेत.

'भाजप-ताराराणी' घोषणा?

महापालिका निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडी यांची होणार आहे. त्यादृष्टीने चर्चा होऊन आता आठ दिवसात अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक सुहास लटोरे व माजी महापौर सुनील कदम हे या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. या आघाडीला महाडिक गटाची मदत मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील गुंडाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील गुंडाचे अंडवर्ल्ड कनेक्शन असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हा गुंड कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करू लागला आहे. या गुंडाला रोखण्यासाठी पोलिसांनी मोका व हद्दपारीसाठी तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे.

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचा हत्येचा तपास करताना कोल्हापुरातील गुंडाच्यांवर पोलिसांनी शॅडो वॉच ठेवला होता. या शॅडो वॉचमध्ये काही गुंडांचे संबध थेट अंडरवर्ल्ड असल्याचे लक्षात आले आहे. कळंबा कारागृहात मुंबई टोळीयुद्धातील गुंड आहेत. अटक केलेल्या स्थानिक गुंडांनी कळंबा कारागृहात टोळी युध्दातील गुंडाशी जवळीक साधली आहे. या जवळकीतून एका गुंडाने थेट अंडरवर्ल्डमधील गुंडाशी संपर्क साधल्याचे लक्षात आले आहे.

टोळी युध्दातील गुंडाशी जवळीक साधणाऱ्या स्थानिक गुंडांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम पोलिसांनी सुरू केली आहे. काही गुंड व्हाईट कॉलर बनण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पहात असून नगरसेवक होण्याचे 'स्वप्न' पहात आहेत. एका गुंडाने मुक्त सैनिक वसाहत परिसरात वाढदिवसाच्या माध्यमातून दहशत माजवण्यासाठी प्रयत्न केल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्या गुंडाचा वाढदिवस उधळून लावला होता. त्याच्या वाढदिवसाच्या पत्रिकेवर एका आमदाराचेही नाव होते.

शहरातील १५० हून अधिक गुंडाच्या हद्दपारीचे ठराव महसूल प्रशासनाकडे आहेत. त्यांनी या प्रस्ताव निर्णय न दिल्याने पोलिस अधीक्षकांकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून या गुंडांनी निवडणुकीत उतरू नये यासाठी प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू सुविधा केंद्र सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेळेत दाखले मिळत नसल्याच्या कारणावरून करवीर तहसीलदार कार्यालयाने कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील राजर्षी शाहू सुविधा केंद्र सील केले. प्रशासनाच्या या कारवाईमुळे दाखले काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना हेलपाटे मारावे लागले.

राज्य सरकारने सेवा हमी कायदा केला असून नागरिकांना सात ते वीस दिवसाच्या मुदतीत दाखले देण्याचे बंधनकारक केले आहे. शाहू सुविधा केंद्रातून मुदतीत दाखले देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला असतानाही ठेकेदाराकडून चालढकल होत असल्याने करवीर तहसिलदार योगेश खरमाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सुविधा केंद्र सील केले. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने नागरिकांना अडचण जाणवली नाही, पण सोमवारी सुविधा केंद्रात आलेल्या नागरिकांना सुविधा केंद्र सील केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना अन्य सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागले. प्रलंबित दाखल्याची विचारपूस करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी दाखले कधी मिळणार असा प्रश्नही उपस्थित केला. १६ जुलैपासून सुविधा केंद्रातून दाखले, स्वीकृती, प्रतिज्ञापत्र, फॉर्म विक्री बंद केली आहे.

या संदर्भात करवीरचे तहसिलदार योगेश खरमाटे म्हणाले, 'सध्या शाहू सुविधा केंद्रात १५२७ दाखल्यासाठी केलेले अर्ज प्रलंबित केले आहेत. सरकारने सेवा हमी कायदा केला असल्याने नियमानुसार दाखले विशिष्ट मुदतीत देणे बंधनकारक आहे. पण सुविधा केंद्राच्या ठेकेदाराला वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक काम न झाल्याने सुविधा कार्यालय सील केले आहे. ​प्रशासन केंद्र चालवेल अन्यथा अन्य पर्याय स्वीकारेल. लवकरच केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.



स्थलांतर करून कामात विलंबच

राजर्षी शाहू सुविधा केंद्र यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात होते. दाखले देण्यास विलंब होत असल्याने या केंद्रात कायम वादावादी व्हायची. गतवर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या बोगस जातीच्या दाखल्याचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. दीड वर्षापूर्वी हे कार्यालयात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत हलवण्यात आले. पण सुविधा केंद्राच्या कामात सुधारणा झाली नव्हती. अधिकारीही कानाडोळा करत होते. पण सेवा हमी कायद्यामुळे अधिकारी जबाबदार राहणार असल्याने केंद्रावर कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’साठी प्रबळ दाव्याचा विश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्मार्ट सिटी योजनेतील समावेशासाठी आवश्यक निकषांपैकी घनकचरा व्यवस्थापन, ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा, इ न्यूज, अंदाजपत्रक वेबसाइटवर, सेवा हमी कायदा, इ गर्व्हनन्स, वैयक्तिक शौचालय वापरणाऱ्या कुटुंबीयांची वाढती संख्या असे विविध घटक महापालिकेच्यादृष्टीने जमेच्या आहेत. या योजनेसाठी शंभर गुणांसाठी मार्किंग होणार असून महापालिका ८७ गुण मिळवून समावेशासाठी प्रबळ आहे, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

सर्वसाधारण सभेने या योजनेत कोल्हापूरच्या समावेशासाठी मान्यता दिली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्यापुढे २३ जुलैला सादरीकरण होईल.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी महापालिकच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'स्मार्ट सिटीसाठी महापालिकेला पाच वर्षात २५० कोटी रुपये उभे करायचे आहेत. निधी उभारण्यासाठी काय योजना आहेत, की नागरिकांवर बोजा टाकणार आहे?' नगरसेवक प्रकाश पाटील यांनी इ वॉर्डातील ड्रेनेज लाइन दुरूस्तीची मागणी केली.

पर्यावरणीय अहवाल सरकारला सादर करायचा आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. नगरसेवक शारंगधर देशमुख, राजू लाटकर यांनी अहवालाचे पहिल्यांदा सादरीकरण करा, नगरसेवकांना अहवालाची प्रत द्या, त्याचा अभ्यास झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सां​गितले. यामुळे सोमवारच्या सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला नाही.

टँकरबाबतचा ठराव मागे

मार्केटमधील गाळेधारकांचा करार, विनावापर शाळा खासगी संस्थांना देणे, वैद्यकीय व्यवसायांना व्यवसाय परवाना या विषयावर पुढील मिटींगमध्ये निर्णय घेण्याचे ठरले. पाणी टँकरसाठी शुल्क आकारण्याचा ठराव मागे घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग भरतीवरून हल्लाबोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपंग कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याच्या कारणावरून नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. नोकरीसाठी अपंग महापालिकेत वर्षभर हेलपाटे मारत आहेत. अजून अर्जांची छाननी झाली नाही. अपंगांबाबत अधिकाऱ्यांचा दुजाभाव कशासाठी ? निराधारांचा छळ कशाला मांडता ? असा थेट हल्ला चढवित येत्या १५ दिवसांत भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला नाही तर अ​धिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. तसेच याप्रश्नी संबंधितांवर फौजदारी करायला मागे पाहणार नाही असा सज्जड दमही ​अधिकाऱ्यांना भरला. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत अधिकाऱ्यांच्या दिशेने फायली भिरकावत नगरसेवकांनी सभा तहकूब केली.

महापौर वैशाली डकरे यांनी अपंग नोकर भरती संदर्भातील छाननी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून प्रत्यक्ष भरतीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या अस्थापनावरील पदांचा आकृतीबंद सुधारित करण्याच्या प्रस्तावावरून अपंगाच्या भरतीचा मुद्दा निघाला. दोन वर्षापूर्वी आकृतीबंद सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला अद्याप मंजुरी मिळाली की नाही अशी विचारणा करत प्रा. जयंत पाटील यांनी चर्चेला सुरूवात केली. आकृतीबंदात केएमटी, प्राथमिक शिक्षण मंडळातील रिक्त पदांचा त्यामध्ये समावेश करून पुढील सभेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राजू लाटकर, महेश जाधव

यांनी केल्या.

अपंग कल्याण कृती आराखड्यात कुष्ठरोग्यांचा समावेश करून त्यांना दरमहा एक हजार रुपये अनुदान सुरू करण्याची सूचना नगरसेवक भूपाल शेटे यांनी केली. अपंगांच्या पुनर्वसनाकरिता दरवर्षी ५५ लाख रुपयांची तरतूद केली जाते, मात्र प्रशासन या निधीचा संबंधितासाठी ​विनियोग करत नसल्याचा आरोप त्यांनी अ​धिकाऱ्यांवर केला.अपंगांची नियुक्ती करण्याबाबत प्रशासन उदासीन का ? गेल्या वर्षी अर्ज मागवूनही अद्याप भरती केली नाही या संदर्भातील कागदपत्रे सभागृहापुढे सादर करा अशी मागणी करत शारंगधर देशमुख यांनी अस्थापनाविभागाकडील सहायक आयुक्त शीला पाटील यांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. आदिल फरास, राजू लाटकर, मुरलीधर जाधव, महेश गायकवाड, विजय सुर्यवंशी, मधुकर रामाणे, किरण, शिराळे, सचिन खेडकर यांनी या प्रश्नी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सहायक आयुक्त पाटील यांनी प्राथ​मिक छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आठ दिवसात अंतिम छाननी प्रक्रिया होईल असे सांगिलते. त्यावर वर्षभर प्रशासनाचे हात कुणी बांधले होते का असा प्रतिप्रश्न करत भरती प्रक्रियेस विलंब लावल्याबद्दल सहायक आयुक्त पाटील यांच्यावर कारवाई करा अशी मागणी लावून धरली. उपायुक्त विजयकुमार खोराटे यांच्या उत्तरानेही नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी या संदर्भात संबंधिताकडून खुलासा मागविले जाईल असे उत्तर दिले.

दफ्तर दिरंगाईवर काय कारवाई?

शारंगधर देशमुख यांनी विकासकामांची निविदा प्रक्रिया राबविण्यापासून कंत्राटदाराचे बिल भागविण्यापर्यंत क्लार्कपासून फायली अडविल्या जातात. इंटरेस्ट ठेवून कामे केली जातात असा आरोप केला. नगरसेवक श्रीकांत बनछोडे यांनी खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. लोकसेवा हक्क अध्यादेश विषयावर चर्चा करताना प्रा. जयंत पाटील म्हणाले, दफ्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली? अशी विचारणा केली.

आयुक्तांचा निषेध

सुभाषनगर येथील रात्र शाळेतील मुख्याध्यापक काझी हे गेली २२ वर्ष कमी पगारावर राबत आहेत. शिपाई, क्लार्क, शिक्षक, मुख्याध्यापक अशी सगळी कामे करत असूनही त्यांना नियमित नियुक्ती, पगार, फरकाची रक्कम दिली जात नसल्याचा मुद्दा लाटकर व सतीश घोरपडे यांनी उपस्थित केला. यावेळी सहायक आयुक्त पाटील यांनी मुख्याध्यापकांची फाइल आयुक्तांच्या समोर ठेवली आहे.आयुक्तांनी शाळेला भेट देऊन निर्णय घेण्याचे सांगितल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. आयुक्तांना शाळेला भेट देण्यास वेळ नसेल तर सभागृह त्यांचा निषेध करत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

टॉवरची अनधिकृत उभारणी

नगरसेविका दीपाली ढोणुक्षे यांनी विविध भागात अनधिकृतणे उभारलेल्या टॉवर व बांधकामाचा मुद्दा मांडला. माधुरी नकाते यांनी राजाराम पार्कमधील चार मजली इमारत महापालिकेच्या ताब्यात घेण्यास विलंब होत असल्याबद्दल अधिकाऱ्यांकडे विचारणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात रणधुमाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया १० सप्टेंबरनंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी दिली. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सहारिया यांनी सोमवारी महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महापालिकेकडून प्रभाग रचनेबाबतचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्याबाबत सूचना केल्या जातील, असे स्पष्ट करून सहारिया म्हणाले, 'लवकरच प्रस्ताव मान्य करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ही प्रभाग रचना कधी जाहीर करण्यात येईल हे निश्चित नाही. मात्र, निवडणुकीत पारदर्शकता वाढवावी, निर्भय वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.'

महापालिकेच्या सध्याच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत आहे. त्यापूर्वी ४५ दिवस अगोदर आचारसंहितेचा कालावधी जाहीर करावा लागतो. या कालावधीत गणेशोत्सव येत असल्यामुळे इच्छुकांची अडचण होणार आहे. गणेशोत्सव ही निवडणुकीचा प्रचार करण्याची नामी संधी आहे, असे इच्छुक उमेदवारांना वाटत असले तरी त्यांना ते जाहीरपणे करता येणार नाही. छुप्या पद्धतीने प्रचार केल्यानंतरही तक्रार झाल्यास त्याची गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे.

उत्सवावर आचारसंहितेचे सावट

निवडणूक काळातच गणेशोत्सव आल्यामुळे त्या काळात उमेदवारांना आचारसंहितेबाबत दक्ष रहावे लागणार आहे. नेत्यांना स्टेजवर जाऊन पक्षाचा उल्लेख करणे किंवा मंडळांचे स्वागत करणे, त्यांना भेटवस्तू देणे असे प्रकार करता येणार नाहीत. त्याबरोबरच कार्यक्रम पत्रिकेतही नाव ठळकपणे छापता येणार नाही, पत्रिकेवर कोणत्याही नेत्याचा फोटो लावता येणार नाही.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विटा, साळगाव बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी विटा आणि तासगाव तालुक्यातील सावळज येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मिरजेत आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सोमवारी तासगावसह अन्य काही गावात बंद पाळून निषेध करण्यात आला होता. दरम्यान, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे.

रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भिडे यांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधाने केल्याने परिषदेत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. यामुळे हाणामारी झाली. कार्यकर्ते, पोलिस असे पाचजण जखमी झाले. याचे पडसाद अद्यापही उमटत असून, जिल्ह्यातील विविध गावांत आव्हाड यांचा निषेध केला जात आहे. आव्हाड हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि प्रवक्ते असतानाही सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र याबाबत मौन पाळून गप्प आहे. जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'त्या परिषदेची आपल्याला कल्पना देण्यात आलेली नव्हती. सध्या आपण सांगली बाजार समितीच्या निवडणुकीच्या तयारीत आहोत. आव्हाडांच्या प्रकरणाबाबत नंतर बोलू.' तर दुसरीकडे शिवसन्मान जागर परिषदेच्या आयोजकांनी पुन्हा आव्हाडांना निमंत्रित करून दुसरी परिषद घेण्याची गर्जना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीडीआरप्रकरणी गुन्हा दाखल करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या पंधरा वर्षांत पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या टोळीने संगनमताने टीडीआर घोटाळा करून सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे या संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या टोळीचा पर्दाफाश करावा,' अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिष्टमंडळासह जिल्हा प्रशासनाकडे केली.

यावेळी पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांना या घोटाळ्याची माहिती दिली. सभागृहातील चार ते पाचजणांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना टोळीत सहभागी करून पंधरा वर्षांत २०३ प्रकरणात कोट्यवधीचा घोटाळा केला. यातून सरकारचा महसूल बुडाला असून यामध्ये महसूल विभागासह भूमिअभिलेख कार्यालयातीलही काही मंडळी सहभागी आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबतचा तपास केल्यास घोटाळा उघड होईल. यामध्ये बोगस कागदपत्रे तयार करण्याची इतर सरकारी कार्यालयांना सवय लागण्याची भीती असल्याने याबाबत कारवाई करावी. यामध्ये जबाबदार अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा. शिष्टमंडळात रवी चौगुले, सुजीत चव्हाण, दिलीप पाटील, हर्षल सुर्वे, दिलीप जाधव आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विनाअनुदानित’ची फरफट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने विनाअनुदानित शाळांना मूल्यांकनानुसार द्यायच्या निधीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. गेली सोळा वर्षे विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे. टप्पा अनुदानावरील एक पैही अनुदान नसल्याने मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या लेखी आश्वासनाकडे राज्यातील १८२९ शाळांचे लक्ष आहे.

राज्य सरकारने २०१२ मध्ये विनाअनुदानित शाळांची मूल्याकंनाची प्रक्रिया राबविली. २००० हून अधिक शाळांची मूल्यांकनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात १८२९ शाळा मूल्यांकनास पात्र ठरविण्यात आल्या. यात जिल्ह्यातील ४५ शाळा आहेत. राज्यातील १९३७ वर्गांना आणि तुकड्यांना अनुदान देण्याचे ठरले. त्यासाठी २२८ कोटींच्या निधीला तत्त्वतः मान्यता देण्याचे ठरले. यातून या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान द्यायचा निर्णय झाला.

पहिल्या वर्षी वीस टक्के अनुदान दिल्यानंतर पुढील पाच वर्षांपर्यंत दरवर्षी अनुदानात वीस टक्के वाढ करण्याचे ठरले. अनुदान मिळाले असते तर मूल्यांकनास पात्र ठरलेल्या शाळांना पाच वर्षांत अनुदान मिळून शंभर टक्के अनुदानाची प्रक्रिया पूर्ण झाली झाली असती. या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनही मिळाले असते. गेली अनेक वर्षे विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांची ससेहोलपट सुरू आहे. एक हजार रुपयांवर मानधनावर गेली सोळा वर्षे कार्यरत आहेत.

अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील या शाळांना अजूनही राज्य सरकारने शाळांना एक पैही दिलेली नाही. त्याविरोधात राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने शाळा बंद आंदोलन सुरू आहे. मूल्यांकनानुसार राज्य सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी, या मुख्य मागणीसाठी कृती समितीचे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू आहे.

यात जिल्ह्यातील ७८ शाळा सहभागी झाल्या आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत समितीच्या झालेल्या चर्चेत या शाळांना अनुदानासाठी तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय दिला जाईल, असे आश्वासन शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे विनाअनुदानित कृती समितीचे आंदोलनाची व्याप्ती वाढविली आहे.

राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर दोन हजार शिक्षकांचे बेमुदत आंदोलन सुरु आहे. ठोस आर्थिक तरतूद देत नाहीत, तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. भर पावसातही आंदोलन सुरुच राहील. सरकारचा मराठी शाळा बंद पाडून इंग्रजी शाळा सुरु करण्याचा कुटिल डाव असल्याचे या प्रवृत्तीवरुन स्पष्ट होते

- खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष

मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात चार जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्याची पर्वा राज्य सरकारला नाही. सनदशीर मार्गाने हा लढा सुरु आहे. शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

- ए. डी. वारंगे, निनाई माध्यमिक विद्यालय, करुंगळे, ता. शाहूवाडी

२००३ पासून विनाअनुदान तत्वावर शाळा सुरु आहे. त्यामुळे बिनपगारी सेवा बजावावी लागत आहे. अनुदान नसल्याने लिपिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- गजानन काटकर, सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल, मार्केट यार्ड

अनुदानाअभावी पगार नाही. त्यामुळे अध्यापनाचे काम केले जात आहे. आर्थिक परिस्थितीही खालावत असल्याने शिक्षकांची अवस्था गंभीर झाली आहे. त्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

- भानुदास गाडे, सिद्धेश्वर हायस्कूल, विक्रमनगर

विनाअनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने पाठिंबा दिला आहे. शैक्षणिक व्यासपीठाकडून प्रत्येक शाळेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थी हा मुख्य केंद्रबिंदू आहे. शाळा बंद मोहिमेस जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे पाठबळ आहे.

- एस. डी. लाड, सभाध्यक्ष, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ

विनाअनुदानित शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार आणि पाठ्यपुस्तके दिली जात नाही. अनुदानित झाल्यास आहार आणि पाठ्यपुस्तके मिळतील. आरटीइच्या सर्व नियमांची अंमलबजावणी शाळा करतात.

- सावंता माळी, न्यू इंग्लिश स्कूल, सुर्वेनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंहस्थ पर्वणीची ‘निर्मिती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कल्पकता, अभ्यास आणि त्याची मांडणी यासाठी प्रसिद्ध असलेल्या निर्मिती अडर्व्हटायझिंगला प्रकाशा (जि. नंदूरबार) येथील सिंहस्थाचे बोधचिन्ह करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या सिंहस्थाच्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करून अनंत खासबारदार आणि शिरीष खांडेकर यांनी हा लोगो बनविला आहे. 'प्रकाशा सिंहस्थ पर्वणी २०१५' असे त्याला नाव देण्यात आले असून अत्यंत सुंदर रचना केल्यामुळे लोगो आकर्षणाचा केंद्र ठरला आहे.

नाशिकचा कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी येतो. तर प्रकाशा सिंहस्थाला साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे. प्रतिकाशी म्हणून या परिसराला ओळखले जाते. याठिकाणी सिंहस्थाचे ठिकाण आहे तिथे ८० फूटांची दीपमाळ आहे. त्याबरोबरच येथे तापी, गोमाई आणि पुलिंदी या तीन नद्यांचा संगम आहे. संगमावर वसलेले प्रकाशा या गावाचा या लोगोमध्ये सहभाग करण्यात आला आहे. सिंहस्थाचे प्रेरणास्थान आणि पवित्र शंखालाही याठिकाणी महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.

कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेला लोगो हा अत्यंत अभ्यासपूर्णरित्या करण्यात आला आहे. त्यामध्ये मंदीरे, दीपमाळ, शंख, ध्वज आणि प्रकाशा हे ठिकाण या सर्वांचा वापर करून एक परिपूर्ण लोगो तयार करण्यात आला आहे.'

-अनंत खासबारदार, निर्मिती अॅडव्हर्टायझिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजमध्ये मुलगा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

येथील बसस्थानकावरून हनिमनाळकडे जाणारी बस (एमएच२० डी-७९५५) फलाटावर लावताना झालेल्या अपघातात ओमकार राजेंद्र कापसे (वय १२, रा. हनिमनाळ, ता.गडहिंग्लज) हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला. तो शहरातील जागृती हायस्कूलच्या विद्यार्थी आहे. तो शाळा संपवून मित्रांसमवेत बसने घरी जाण्यासाठी बसस्थानकावर आला होता. बस फलाटावर लावताना बसमध्ये चढण्यासाठी गर्दी झाली. त्यावेळी तो मागील चाकात सापडला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. त्याच्या पायाला गंभीर जखम झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर होती. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचा काम सुरु होते. अधिक तपास गडहिंग्लज पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मा शाहूवाडी आउट ऑफ रेंज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

गेल्या वर्षभरापासून शाहूवाडी तालुक्यातल्या दूरध्वनी सेवेचा खेळखंडोबा चालू आहे. गेल्या एक महिन्यापासून तर येळवण जुगाई, विशाळगड व परळे निनाई या दुर्गम व डोंगराळ भागातली मोबाइल रेंज गुल झाली आहे. त्यामुळे बी. एस. एन. एल. ग्राहकांना सेवा मिळत नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकाबरोबर बँक, ग्रामपंचायती व विविध संस्थांवर होत आहे.

येळवण जुगाई व विशाळगड परिसरासाठी पांढरेपाणी येथे तर परळे निनाई परिसरासाठी कराळेवाडी या ठिकाणी बी. एस. एन. एल. चे टॉवर्स उभारले आहेत. येळवण जुगाई परिसरात येळवण जुगाई, गेळवडे, मांजरे व शेंबवणे ह्या ग्रामपंचायती व एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने निव्वळ रेंज अभावी येथील कारभार बंद झाले आहेत. रेंज नसल्यामुळे लोकांना बँकेतली खाती, रोजचे व्यवहार करण्यात तर ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारचे दाखले मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशाळगड देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही मोबाइलची रेंज मिळत नसल्याने तेही वैतागले आहेत. पूर्ण दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या परळे निनाई भागतल्या आळतूर, पुसार्ळे, भेंडवडे, वाकोली, लोळाणे या भागात गेल्या महिन्यापासून रेंज नाही. रेंजअभावी इथले ग्राहक अन्य मोबाइल सेवेंकडे वळू लागले आहेत.

येथील कारभार वारणानगरमधून चालत असल्याने इथल्या ग्राहकांच्या समस्यांविषयी कोणालाच काहीच सोयरसुतक नाही. फॅक्स, इंटरनेट कनेक्शन्स, एस. टी. डी. सेवा वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. दीड हजारांहून अधिक असलेली इथली दुरध्वनी कनेक्शन्स अवघी दीड दोनशेच राहिली आहेत. त्यामुळे इथल्या ग्राहकांची बी. एस. एन. एल. च्या सेवेबाबत नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images