Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

२४ एकरांत डिफेन्स कॉलनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सैन्यदलामध्ये कार्यरत असलेल्या जवान आणि निवृत्त झालेल्या माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मेजर शिवाजी पाटील मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने चोवीस एकरात डिफेन्स कॉलनी उभारण्यात येणार आहे. फाइव्ह स्टार एमआयडीसी ते कसबा सांगाव परिसरात होणाऱ्या प्रोजक्टमध्ये डॉक्टर्स कॉलनी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष कर्नल धनाजीराव पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कर्नल पाटील म्हणाले, 'मेजर शिवाजीराव पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावाने येळावी (जि. सांगली) येथे मेमोरियल फाउंडेशनची स्थापना केली आहे. फाउंडेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यात जवान व निवृत्तांसाठी सहा एकर जागेत डिफेन्स कॉलनीचा प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील फाइव्ह स्टार एमआयडीसी ते कसबा सांगाव परिसरात डिफेन्स कॉलनीचा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जागा मालकाशी करारही करण्यात आला आहे. २४ एकरामध्ये १६ एकर जवानांसाठी तर आठ एकर जागेवर डॉक्टर कॉलनी उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वागत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची स्थापना केली आहे.'

'सैन्य दलातील कुटुंबांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी डॉक्टर्स कॉलनीची समावेश केला आहे. सैन्य दलातील व्यक्तीला एक गुंठा जमिनीसाठी चार लाख रुपये दराने जागा खरेदी करावी लागणार आहे. डॉक्टर्स तीन गुंठ्यापेक्षा जास्त जागेची खरेदी करु शकणार नाहीत. प्लॉटची खरेदी केल्यानंतर रस्ते, पाणी, लाइट, गटर्स आणि प्लॉटभोवती वृक्षारोपण संस्था करुन देणार आहे. अधिक माहितीसाठी कागल-सांगव रोड येथील माधव हॉस्पिटल येथील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कर्नल पाटील यांनी केले आहे. पत्रकार बैठकीस निवृत्त कर्नल विजयसिंह गायकवाड, कॅप्टन हेमंत पाटील, दत्ता पाटील, डॉ. शीतल पाटील, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. रमेश जाधव उपस्थित होते.

स्पोर्टस कॉम्प्लेक्स

कॉलनीमध्ये स्पोर्टस कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्वीमिंग टँक, जीम, बॅडमिंटन हॉलचा समावेश करण्यात येणार आहे. स्पोटर्स कॉम्प्लेक्समध्ये कॉलनीतील रहिवाश्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलेच्या प्रांतातही मुशाफिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जातीधर्माच्या भिंती ओलांडून आज अनेकजण विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुस्लिम समाजातील व्यक्तींनी शाहिरी, चित्रकला, व्यंगचित्रकार अशा ​विविध कलाप्रकारात ठसा उमटविला आहे. काहीजणांचाकडून प्रबोधनाचा जागर सुरू आहे. कुणी व्यंगचित्राच्या माध्यमातून दैनंदिन जीवनातील विसंगतीवर भाष्य करत नागरिकांच्या जीवनात हास्य फुलवीत आहे. साहित्यातून समाजमनाचा कानोसा टिपताना समीक्षा, चरित्रात्मक ग्रंथातून प्रेरणादायी लेखनही केले आाहे.

साहित्यातही संचार

​मुस्लिम समाजातील जाणीवा शब्दबद्ध करतानाच थोरामोठ्यांच्या जीवनावर ग्रंथ, समीक्षा, कथा, कविता, कांदबरी, चरित्रात्मक अशा वाङमयीन प्रकारात मुस्लिम समाजातील लेखकांनी भर घातला आहे. साहित्याच्या माध्यमातून स्त्रीविषयक जीवन उलगडताना आयुष्यातील संघर्ष, ध्येयपूर्तीकडील वाटचाल टिपले आहे. बाबा मोहम्मद अत्तार, हुसेन जमादार, प्रा. आशा अपराद, प्रा. राजेखान शानेदिवाण, रफीक सूरज यांच्यापासून ते नवाब शेख यांच्यापर्यंतच्या लिखाणातून मुस्लिम समाजातील अंतरंग, वाटचाल उलगडली आहे.

शाहिरी परंपरा

शाहिरीच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा देताना प्रबोधनाची भूमिकाही पार पाडली जातात. महापुरुषांचे जीवनचरित्र, पुरोगामी चळवळ, प्रबोधनवादी विचार लोकांपर्यंत पोहचविली जातात. येथील नायकवडी कुटुंबीयांनी शाहिरी कला जोपासली आहे. शाहीर पापालाल नायकवाडी, त्यांचे पुत्र शाहीर आझाद नायकवडी, गायक-वादक अमूल नायकवडी हे कलाप्रांतात प्रतिनिधीत्व करीत आहेत. आझाद नायकवडी यांनी पोवाड्यातून शिव-शाहूंची कर्तबगारी समाजासमोर मांडताना सामाजिक विषयावरील रचनांतून वेगळा संदेश पोहचण्यावर भर असतो.

चित्रांच्या दुनियेतही रंग

रंगरेषेच्या दुनियेतही अनेकांनी कलाकारी सिद्ध केली आहे. रंगाची अचूकता, कुंचल्यावरील पकड या बळावर निसर्गचित्र, व्यक्तिचित्रे हुबेहूब रेखाटली आहेत. महंमदअली मुजावर, रियाज शेख, रियाज समाधान, दारा सरदार, नादिया सरदार, जावेद मुल्ला रियाज पुणेकर (इचलकरंजी) असे जुन, नवे दमाचे चित्रकार कार्यरत आहेत. त्यांच्या कलाकृतीचे ठिकठिकाणी प्रदर्शन भरले आहे.

'खट्याळ कुंचला' ते हा, हा, हा'

व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे आणि वसंत सरवटे यांच्यापासून प्रेरणा घेत शिराज मुजावर यांनी व्यंगचित्रकलेला सुरूवात केली. मुजावर हे १९८३ पासून व्यंगचित्राच्या दुनियेत आहेत. ​विविध दैनिक, साप्ताहिकासाठी व्यंगचित्रे रेखाटली आहेत. मुजावर यांची कार्टूनवर आधारित 'खट्याळ कुंचला, मिश्किल गुंडूराव' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे 'हा ! हा !! हा !!!' हे कार्टूनवरील तिसरे पुस्तक प्रकाशित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इको व्हिलेज’ची चौकशी होणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

इको व्हिलेज अंतर्गत प्रचार व प्रसार करण्यासाठी तयार केलेल्या बोर्डाच्या खर्चात अनियमितता आढळून आली आहे. याप्रकरणी वाळवा तालुक्यातील ६४ ग्रामसेवकांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. त्या बाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत अडसुळ यांनी दिली आहे.

अडसूळ म्हणाले, 'इको व्हिलेज अंतर्गत सरकारकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या अनुदनातून इको व्हिलेज अंतर्गत प्रचार व प्रसार करण्यासाठी लागणाऱ्या बोर्ड व प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी तरतूद आहे. तथापि हा खर्च करताना योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्याची आहे. त्यासाठी नियम व अटी असून, त्या पाळणे आवश्यक आहे. पण, वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी यासाठी लागणारे बोर्डस् खरेदी करताना नियम व अटी पाळल्या नाहीत. चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया राबविली. या संदर्भात तक्रारी आल्याने या संपूर्ण प्रकरणाची सहायक लेखा अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत बोर्डस् खरेदीत अनियमितता आढळून आली. काहीनी कोटेशन घेतलेले नाही, तर काहीनी आवश्यक त्या नोंदी ठेवल्या नाहीत. म्हणून ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागपंचमीसाठी राष्ट्रपतींना निवदेन

$
0
0

शिराळाः शिराळयांची जगप्रसिद्ध नागपंचमी साजरी करण्यास परवानगी मिळावी यासाठी वीस हजार सह्या असलेले निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवांनाही हे निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती माहिती शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड भगतसिंग नाईक यांनी दिली. निवेदनावर वीस हजारांहून अधिक लोकांच्या सह्या आहेत. निवेदन देताना भगतसिंग नाईक यांच्यासह पृथ्वीसिंग नाईक उपस्थित होते. भगतसिंग नाईक म्हणाले, 'निवेदन देतेवेळी काही पुरातन पुरावेही देण्यात आले आहेत. येणारी नागपंचमी साजरी करण्याबाबत २६ तारखेला नाग मंडळांची सहविचार सभा बोलावली आहे. शिराळा व केंद्र सरकार यांच्या एकत्रित विचारांची गरज आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर घातलेली गावबंदी बालिशपणाची आहे'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीतील विश्रामबाग पोलिसांनी चार मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद करून त्यांनी चोरलेल्या अठरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई कौतुकास्पद आहे. या प्रकरणात चोरीच्या मोटारसायकली विकत घेणारेही तितकेच दोषी आहेत. त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख सुनील फुलारी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांना दिली. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलनजीक १४ जुलैरोजी मोटारसायकल घसरल्याने अमोल अधिक आपटे (वय २५, रा. रेठरे बुद्रुक ) पडून जखमी झाला. त्यावेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याची विचारपूस केली. त्याच्याकडील मोटारसायकलची चौकशी केली तेव्हा ती त्याने चोरलेली असल्याचे समोर आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर मोटारसायकली चोरणारी टोळी उघडकीस आली.

यामध्ये अमोल चंद्रकांत काळे (वय २८), अजित नारायण मोहिते (वय २४, दोघेही रा. मांजर्डे, ता. तासगाव), उमेश संभाजी भोसले (रेठरे बुद्रुक) यांनाही अटक करण्यात आली. या टोळीच्या चौकशीत त्यांनी सांगली, तासगाव, कराड या परिसरातून चोरुन विकलेल्या अठरा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीच्या गाड्या विकत घेणाऱ्यांनी त्यांनी त्या अगदी स्वस्तात आणि कोणत्याही कागदपत्राविना घेतल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवठेएकंद स्फोटाची चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील शोभेच्या दारूच्या स्फोटामध्ये झालेल्या मृत्यूची व जखमींची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. मिरजेचे उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांची चौकशी अधिकारी म्हणून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नेमणूक केली असल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली.

दंडाधिकारीय चौकशीकामी संबधितांना चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय दंडाधिकारी, मिरज यांच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे. या घटनेमध्ये मयत व जखमी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यू व जखमी संबंधी कोणास काही सांगण्याचे असेल किंवा तक्रार नोंदवावयाची असेल तर संबधितांनी योग्य त्या कागदपत्रांसह कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन निकम यांनी केले आहे. चौकशीच्या दिवशी कोणीही हजर न राहिल्यास कोणाचीही काहीही तक्रार नाही, असे गृहीत धरून चौकशीचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही निकम यांनी स्पष्ट केले आहे.

कवठेएकंद येथे ४ मे २०१५ रोजी रामचंद्र तुकाराम गुरव यांच्या कवठेएकंद ते जुना तासगाव रोडवरील ईगल फायर वर्क्स् या शोभेची दारू तयार करण्याच्या कारखान्यामध्ये सायंकाळी स्फोट होऊन कारखान्यामध्ये काम करणाऱ्या सहा व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तसेच पाच व्यक्ती गंभीर जखमी व तीन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्या पाचही व्यक्तींचा सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेमध्ये एकूण अकरा जणांचा मृत तर तीन जण जखमी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिराळ्यात रिपरिप सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

शिराळा तालुक्यात गुरुवारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पाऊस मोठा नसला तरी किमान वातावरण पावसाळी झाल्यामुळे उन्हाने कोमेजलेल्या पिकांना तरतरी आली आहे. शुक्रवारीही रिपरिप सुरू आहे. गुरुवारी सकाळी तालुक्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या दुपारी पुन्हा उन्हाचा पारा चढला. सायंकाळी पावसाळी वातावरण तयार झाले. शुक्रवारीही पावसाची रिपरिप सुरू होती. पिकांना मोठ्या पावसाची गरज असून, नदीकाठावरील घरी आणलेले विद्युतपंप पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.

दरम्यान चांदोली धरण परिसरात शुक्रवारी १५ मी. मी पाऊस पडल्याची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. आतापर्यंत ९४७ मी. मी. पाऊस धरण परिसरात झाला आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी गेल्या वीस दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील नदीनाले भरून वाहू लागले आहेत. धरण ७१.५४ टक्के भरले आहे. धरणात २४.६१ टीएमसी पाणी आहे. पाणी पातळी ६१५.९० इतकी आहे. परीसरात भातपिकाची मोठी शेती असून सध्या पिके कोळपणीला आली आहेत. पावसाअभावी पिके करपू लागली आहेत, त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. शिराळ्यात जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस असतो, परंतु यंदा पावसाने हुलकावणी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुरळक पाऊस अन् उन्हाचा तडाखाही

$
0
0

कराड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह कराड, पाटण शहरांत व दोन्ही तालुक्याच्या विविध भागात पावसाने तुरळक हजेरी लावली. गेली दोन दिवस वातावरणात होत असलेल्या बदलानंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी पावसाने थोडी हजेरी लावली. मात्र, दिवसभर ऊन पडले होते. गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने दडी मारली आहे. खरीपाच्या टोकणी, पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भात लागणीची कामेही पूर्णपणे रखडली आहेत. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मादील दोन दिवस कराड, पाटण शहरासह तालुक्यात पावसाला तुरळक सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

विहिरींनी गाठला तळ

ऊस पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.कराड तालुक्यात दक्षिण व उत्तर पूर्वे भागातील काही गावे वगळता सर्वत्र ऊस शेती केली जाते. प्रतिवर्षी ऊसाची आडसाली लागण करून दुहेरी उत्पन्न घेण्यात येते. या वर्षी देखील सरीमध्ये ऊस आणि वरंब्यावर सोयाबीन, भूईमुग आदी पिके घेण्यात आली आहेत. विहिरीतील पाण्यावर उसासह अन्य भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची शेती ही खरे तर पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळ्याच्या हंगामात पुरेसा पाऊस पडला तर विहिरींतील जलसाठ्याचा जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत वापर करता येतो आणि उसाची शेती करणे सोयीचे होते. मात्र, यंदा पावसाच्या परिस्थितीचा विचार करता फक्त सात ते आठ दिवस काही प्रमाणात तालुक्यात पाऊस पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरट्यांच्या शोधासाठी पथके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडीप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहे.त तर अटक केलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयितांकडे चौकशी केली असता अन्य तिघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. गारगोटीतील एटीएएम फोडीप्रकरणातील आरोपींची संख्या वाढू लागली असून या गुन्हेगारांकडून घरफोडीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता भुदरगड पोलिसांनी वर्तवली आहे.

सात जून रोजी रात्री स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएएम मशीन फोडून मशीनमधील ३४ लाख, ३५ हजार रूपये लंपास केले होते. या व अन्य प्रकरणी पोलिसांनी छापा मारून मल्हारे भीमराव केदार (रा. वारणी, ता. शिरूर, जि. बीड), आणि रमेश महादेव कुंभार (रा. कसबा बावडा, कोल्हापूर) या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना कणकवलीनजीक पकडले होते. या प्रकरणी गुरूवारी त्यांना प्रथम वर्ग न्यायाधीश गो. म. चरणकर यांच्या समोर उभे केले असता. पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसाकडून या दोन गुन्हेगारांची कसून चौकशी सुरू असून त्यांनी गुन्हा केल्याचे ठिकाण आणि गॅस सिलिंडर केलेले ठिकाण पोलिसांना दाखविले आहे. गॅस कटरच्या वापराने जळालेल्या नोटा पुणे-बंगळुरू हायवेवरील यमगर्णीनजीक वेदगंगा नदीत फेकून दिल्याचे सांगितले. या प्रकरणात गुन्हेगारांची नावे पुढे येवू लागली असून यामध्ये समावेश असलेले बाळू एकनाथ केदार (रा. वारणी ता. शिरूर), अजिनाथ उर्फ बंडू गहीनाथ बडे (रा. लोणी, ता. शिरूर), केदार बहादूर टंकभुजळ (नेपाळी) हडपसर, पुणे या तीन आरोपींची नावे पुढे आली आहेत. या आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाल्याची माहिती गडहिंग्लज पोलिस उपअधीक्षक सागर पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रकार शांताराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

$
0
0

गारगोटी : येथील महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिन‌िधी शांताराम पाटील (वय ३४)यांचे अल्पश: आजाराने शुक्रवारी निधन झाले. कोनवडे (ता. भुदरगड) येथे त्यांच्या गावी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय व दोन पुतणे असा परिवार आहे.

पाटील यांच्या निधनामुळे एक समाजभान असलेला संवेदनशील पत्रकार हरपल्याची भावना अनेक मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केली. अंत्यसंस्काराला माजी आमदार बजरंग देसाई, जि. प. सदस्य अर्जुन आबिटकर, शेतकरी संघाचे संचालक एच. आर. पाटील, ग्रंथालय संघाचे तानाजी मगदूम, बिद्रीचे संचालक जीवन पाटील, कवी गोविंद पाटील आदी उपस्थित होते. शांताराम पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत पत्रकारितेत आपले स्थान निर्माण केले. अतिशय मनमिळावू असलेल्या पाटील यांनी वंचितांना न्याय देण्यासाठी वार्तांकन केले.

ग्रंथालय चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच काही गरीब मुलांना त्यांनी शिक्षणासाठी दत्तकही घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजता कोनवडे येथे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात घरफोडीत दागिने, रोख रक्कम लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जयसिंगपूर येथे आठव्या गल्लीत सरीता सुखवंत नाईक यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख २९ हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, सरीता नाईक या खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करतात. गुरूवारी रात्री आठ वाजता त्या घराला कुलूप लावून रूग्णालयात गेल्या होत्या. रात्री चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने घराचे कुलूप तोडले. तिजोरीतील चार तोळ्याचे गंठण, अंगठ्या तसेच ताट, जोडवी यासह अडीचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अकरा हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. शुक्रवारी सकाळी घरी आल्यानंतर सरीता नाईक यांना चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसांना घटनेची वर्दी दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. कोल्हापूर येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले. पथकातील श्वानाने कोल्हापूर रस्त्यालगतच्या बीएसएनएल कार्यालयापर्यंत माग काढला व श्वान घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यात यश आलेले नाही. नाईक यांच्या घरातील भांड्यांवर ठसे तज्ज्ञांना ठसे आढळले. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमचे एटीएम आहे का?

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

हिंदीतून व अत्यंत लाघवी भाषेत एटीएमवरील नंबर व त्याचा पिन नंबर मोबाइलवरुन विचारुन ग्रामीण एटीएम ग्राहकांना फसविले जात आहे. इस्टेट बँकेतून बोलत असल्याचा बहाणा करुन फसविण्याचे प्रकार वाढले आहेत. पंधरा दिवसापूर्वी कापशीतील एका शेतकऱ्याला तेरा हजार रुपयांना असेच फसविले होते. त्यानंतर वाळवे खुर्द येथील एकाला १४ हजाराला फसवले. पुन्हा असे कॉल येतच आहेत. परिणामी ए.टी.एम.कार्डधारक धास्तावले आहेत.

नमस्कार! तुमचे एटीएम आहे का? मग लक्षपूर्वक ऐका. मी इस्टेट बँकेतून बोलत आहे. तुमचे एटीम बंद झाले आहे. ते नव्याने सुरु करायचे असेल तर त्याचा नंबर आणि पिन नंबर ताबडतोड सांगा. तरच त्याचे नुतनीकरण होईल. अन्यथा कायमचे बंद होईल. पिन नंबर दिलात तर लगेच सुरु करुन देवू. असे लाघवी आवाजात सांगितले. जाते याला विरोध करून एखाद्याने 'तुमच्या इस्टेट बँकेशी माझा संबंधही नाही, मी माझा हा मोबाइल नंबर बँकेला दिलेला नाही, मग हा तुम्हाला कसा मिळाला?' असा प्रश्न विचारल्यावर त्याला बगल देत बँकेत दिलेला नंबर लागत नाही, तो तुमच्या अन्य कागदपत्रावरुन मिळवून तुम्हाला कॉल केल्याचे सांगण्यात येते. अशा पद्धतीने पिन नंबर घेवून एटीएम ग्राहकांना फसविले जात आहे.

पंधराच दिवसापूर्वी कापशीतील एका जेसीबी ड्रायव्हरला असाच एक फोन आला आणि त्याचा पिन नंबर विचारून तेरा हजार रुपये खात्यावरून उचलले. गेल्या आठवडाभरात पुन्हा येथील काही जणांना तसे कॉल आले. आपले एटीएम कोणत्या बँकेचे आहे, ते २०१५ मध्ये नुतनीकरण केलेले नाही. त्यावरील नंबर सांगा अशी माहिती विचारली जात होती. आज ज्यांना असे कॉल आले त्यांनी मात्र 'पोलिसांना कळवू का?' असा प्रतिसवाल केल्यावर फोन बंद करण्यात आले. त्यातीलच कॉल करण्यात आलेला एक मोबाईल नंबर ७३५२६८१२७० मोबाइल क्रमांक आहे. या नंबरवर पुन्हा कॉल केल्यानंतर मात्र तो बंद करण्यात आला. त्यामुळे एटीएम ग्राहकांना फसविण्याचा प्रकार सुरुच आहे. विशेषत: ग्रामीण लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. सध्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणाऱ्या प्रत्येकाला एटीएम कार्ड दिले जाते. ग्रामीण भागात अशा बँकाकडून पिक कर्ज घेणाऱ्या शेतकर्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे एटीएम आहेतच. परंतु या सुविधेचे लाभ व धोके सर्वांनाच माहिती नसल्याने असे कॉल करुन गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. बँकेकडून पिन नंबरची, खात्याच्या नंबरची कोणतीही माहिती विचारली जात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’साठी ठेवी जमा करणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखान्यावर जिल्हा बँकेता ताबा आहे. जिल्हा बँक कर्जाच्या वसुलीसाठी दौलत विक्रीच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. बँकेच्या या प्रक्रियेला थांबविण्यासाठी प्रसंगी जनतेकडून ठेवी जमा करुन त्या रकमेतून कारखाना चालविण्याच विचार झाला. यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हा बँकेला सोमवारी (ता. २०)भेट देण्याचे ठरले. यशवंतनगर (ता. चंदगड) येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते व सभासदांच्या मेळाव्यात हा निर्णय झाला. याला सभासद, शेतकरी, कामगार व वाहतूकदार यांनीही प्रतिसाद दिल्याने दौलतबाबत सत्कारात्मक विचार पुढे आल्याचे दिसून आले. तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील, माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, नरसिंगराव पाटील भरमू पाटील, डॉ. सुभाष जाधव, भैय्यासाहेब कुपेकर आदी संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयस, प्रणालीचा राज्यात झेंडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

राज्य माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तूर येथील कुमार विद्यामंदिर येथील श्रेयस देशमाने याने राज्यात प्रथम तर धामणे विद्यामंदिरच्या राम लोकरे याने द्व‌ितीय क्रमांक पटकावला. कापशी (ता. शाहूवाडी) येथील प्रणाली चांदणे हिने पूर्व माध्यमिक (चौथी) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माध्यमिक विभागात यश मिळविलेल्या श्रेयसला संतोष शिवणे यांचे तर राम लोकरेला मधुकर भाटले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कोणतीही सुटी न घेता, दिवाळीच्या सुटीदरम्यान अभ्यासक्रम संपवून या विद्यार्थ्यांचा सराव घेतला. सुमारे दिडशेहून अधिक प्रश्नपत्रिका व त्यातील चुकांचे प्रत्यक्ष विश्लेषण करीत केलेल्या मार्गदर्शनामुळे हे यश त्यांना संपादन करता आले आहे. दुर्गम भागातील आजरा तालुक्यातील या दोन विद्यार्थ्यांनी राज्यात क्रमांक पटकावून गुणवत्ता सिद्ध केली आहे. या दोन्ही ‌विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असून त्यांनी केवळ मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शनाच्या बळावर यश मिळविले आहे.

आदित्य पाटील १६ वा

कागल : व्हनाळी (ता.कागल) विद्या मंदिरमधील आदित्य शहाजी पाटील याने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत ३०० पैकी २८६ गुण मिळवत राज्यात सोळावा क्रमांक पटकावला. त्याचे मूळ गाव सिद्धनेर्ली (ता. कागल) आहे. त्याला वर्गशिक्षक शहाजी गणपती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक जी. वाय. कांबळे आणि शिक्षकांचेही मार्गदर्शन लाभले. कोणत्याही सोयी सुविधा नसतानाही या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.

प्रणाली चांदणे राज्यात प्रथम

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कापशी शाळेतील प्रणाली अजित चांदणे हिने चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिला तीनशे पैकी २९६ गुण मिळाले आहेत. यामध्ये भाषा -इंग्रजी व गणित-समाजशास्त्र या दोन विषयात शंभर पैकी शंभर तर बुद्धिमत्ता-सामान्य विज्ञान या विषयात तिला ९६ गुण मिळाले आहेत. तिचे वडील सागाव येथील समाजविकास शिक्षण विद्यालयात शिक्षक तर आई रतन चौगुले ह्या कापशी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रणाली पहिलीपासून कापशी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असून तिला आई-वडिलांसह वर्गशिक्षक भानुदास सुतार, मुख्याध्यापिका कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी चौथीच्या शिष्यवृत्तीत या शाळेचे सहा विद्यार्थी राज्यात व चार विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले होते. यामध्येही शिक्षिका चौगुले यांचे मोठे योगदान राहिले होते.

केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर पालकांनी आपल्या पाल्यांच्या यशासाठी काही गोष्टी गांभिर्याने घेतल्या पाहिजेत. पाल्यांच्या अभ्यासास पूरक वातावरण निर्माण करीत शिक्षकांच्या संपर्कात राहण्यास प्रवृत्त केले पाहिजे. ग्रामीण भागातील मुले अतिशय मनपूर्वक अभ्यास करतात हे सिद्ध केले आहे.

- बी. एम. कासार, गटशिक्षण अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीर्घ मुदतीच्या कर्जाचा दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील जिल्हा सहकारी कृषी-ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे (भूविकास) अस्तित्व संपुष्टात आणले जात असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचा आरोप जिल्हा भूविकास बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याची आवश्यकता असून अशा स्वरुपाचे कर्जपुरवठा शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्ष पाटील म्हणाले, 'भूविकास बँकांच्या पुनरूज्जीवनासाठी राज्य सरकारने चार समित्या स्थापन करुन अभ्यास केला होता. सरकारने स्थापन केलेल्या समित्यांनी सरकारला अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवालांचा अभ्यास करुन सकारात्मक निर्णय घेण्या ऐवजी १२ मे २०१५ च्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत बँकांचे अस्तित्व संपुष्टात आणले. दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी भूविकास बँका सक्षम असताना बँका बंद करण्याच्या निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना एकप्रकारे उत्तेजनच दिले आहे. दीर्घ मुदतीचे कर्जपुरवठा बंद झाल्यानेच शेतकरी आत्महत्या करत असल्याचा अहवाल 'टाटा इन्स्टिट्यूट ऑस सोशल सायन्स'ने दिला आहे.

अहवालामध्ये भूविकास बँकांना राज्य सरकारने थकहमी न दिल्याने नाबार्ड मार्फत मिळणारा कर्जपुरवठा थांबल्यामुळेच आत्महत्या वाढल्या असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट केले होते.' 'या अहवालाचा आधार घेऊनच तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत पाटील सरकारविरोधात आवज उठवत होते. हेच विरोधक सत्ताधारी बनल्याने त्यांनीच बँका बंद पाडण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. राज्यातील १८ बँका अवसायानात काढण्याचा नोटीस दिल्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. हाय कोर्टाच्या आदेशाच्या आधीन राहून बँका बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हायकोर्टाचा अवमान होईल म्हणून अद्याप राज्यपालांनी बँका बंद करण्याचा अध्यादेश काढलेला नाही. यावरुन सरकारचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असल्याचेही पाटील यांनी सांगितले. कर्जपुरवठा करण्यासाठी सक्षम यंत्रणा असताना, भूविकास बँका बंद करुन पतसंस्था व नागरी बँकांना पीक कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डला हमीपत्र दिले आहे. भूविकास बँकांचे अस्तित्व संपवायचे आणि इतर बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी मदत करायची, राज्य सरकारचा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलाच्या खूनप्रकरणी आईला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दीड वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम. खंबायत यांनी निष्ठुर मातेला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ज्योती शि​रीष सासने (वय २९) असे तिचे नाव आहे. क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे ज्योती सासने पती शिरीष व मुलगा आर्यन यांच्यासमवेत राहत होती. मोठा मुलगा पुण्यात आजीसमवेत रहात होता. १८ ऑगस्ट २०१३ रोजी ज्योतीने आर्यनचा गळा दाबून खून करून मृतदेह संकल्पसिध्दी कार्यालयाच्या मागे टाकला. तसेच आर्यनच्या कानातील सोन्याचे डूल व गळ्यातील बदाम काढून घरातील प्लास्टिकच्या डब्यात लपवून ठेवला. त्यानंतर ज्योतीने आर्यन हरवल्याचे सांगून त्याचा शोध घेण्याचे नाटक केले. मात्र, आर्यनला घेऊन जाताना व त्याचा मृतदेह टाकून आल्यानंतर ती एकटी घरी परत येत असल्याचे काहीजणांनी पाहिले होते. तत्कालीन करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बेन व हवालदार गणेश माने यांच्यासह पोलिसांनी तपास करून ज्योतीला अटक केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआरप्रकरणी गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रीडांगणासाठीची जागा कमी असताना जादा जागा दाखवून टीडीआर घेतल्याप्रकरणी वटमुखत्यार धैर्यशील पांडुरंग यादव (रा. एमएलजीसमोर, भवानी मंडप) याच्याविरोधात शुक्रवारी रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानंतर उप शहर अभियंता अरूणकुमार गवळी यांनी फिर्याद दिली.

सानेगुरूजी वसाहत परिसरात महानगरपालिकेने क्रीडांगणासाठी दोन एकर जागा आरक्षित केली होती. या आरक्षित जागेचा वटमुखतारपत्र धैर्यशील यादवने घेतले होते. यादवने दोन एकर जागा असताना पाच एकर जागा दाखवून टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न करून महानगरपालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. यादवने महानगरपालिकेचे अधिकारी हाताशी धरून दोन जागा एकर जागा असताना पाच एकर जागा असल्याचे दाखवून बोगस सातबारा तयार केला होता. शुक्रवारी आयुक्त शिवशंकर यांच्या आदेशानंतर यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नगरसेवकांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील दुरूस्तीकडे दुर्लक्ष, शहरातील विविध भागात सातत्याने होणारा अपुरा पाणीपुरवठा या कारणावरून नगरसेवकांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने याकामी तत्काळ लक्ष घालून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करत तीन तासाहून अधिक वेळ पुईखडी जलशुद्धीकरण केद्र परिसरातच ठिय्या मारला. नगरसेवक शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, महेश गायकवाड, इंद्रजित सलगर यांनी आंदोलन करत पाणी पुरवठा प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेवकांनी जल अभियंता मनीष पवार यांना धारेवर धरले.

नगरसेवक आंदोलन करत असल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ उडाली. आंदोलनाची दखल घेत उपायुक्त विजयकुमार खोराटे, जल अभियंता पवार व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. महापौर वैशाली डकरे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, महिला व बालकल्याण स​मिती सभापती लीला धुमाळ यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. उपायुक्त खोराटे यांनी, जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॅरिफायर टँकमधील यंत्रणा आठ दिवसात कार्यान्वित करण्याचे, अनुषंगिक कामासाठी निधी व स्ट्रीट लाइट दीड महिन्यात सुरू करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

'स्मार्ट सिटी'मान्यतेसाठी महासभेपुढे

महापालिकेची सोमवारी (ता.२०) सर्वसाधारण सभा आहे. स्मार्ट सिटीत कोल्हापूर शहराचा समावेश व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रशासनाने यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. या संदर्भातील ऑफीस प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेपुढे ठेवला आहे.

तोंडचे पाणी पळवतील

निवडणूक जवळ आल्यामुळे भागाभागात आंदोलक तयार होत आहेत. गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून साऱ्यांनीच नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. आता पाणी पुरवठ्याचे निमित्त करून ​विरोधक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. प्रशासनाने योग्य नियोजन करावे, असे नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. हाच धागा पकडून बोलताना लीला धुमाळ यांनी पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा अन्यथा लोक आमच्या तोंडचे पाणी पळवतील, अशी भीती व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनरागमनाने ‌मिळाला दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिमझिम सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभरात अधूनमधून दमदार हजेरी लावली. शहरातही झालेल्या पावसामुळे बऱ्याच दिवसानंतर पावसाळी वातावरण होते. जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात २९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. गगनबावडा, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड तालुक्यात पावसाची भुरभूर सुरू होती. गुरुवारी त्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. शुक्रवारी हेच वातावरण जिल्ह्याच्या पूर्व भागातही झाले. शहरात सकाळपासून थोडी विश्रांती घेत कधी रिमझिम सरी तर कधी दमदार पाऊस झाला. सायंकाळनंतर काही भागात जोरदार सरी पडल्या. त्यामुळे शहर परिसरात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस गगनबावड्यात (२९ मिलिमीटर) झाला असून गडहिंग्लज तालुक्यात ​पावसाची नोंद झालेली नाही.

शेतकऱ्यांत समाधान

पावसाच्या या जोरदार आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. चांगली उगवण झालेल्या पिकांना सध्या पावसाची नितांत आवश्यकता होती. पावसाने कमी प्रमाणात हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. पिके करपून जाऊ नये यासाठी हा पाऊस उपयुक्त आहे, पण पिकांची वाढ चांगली होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपमहापौरपदी ज्योत्स्ना मेढे-पवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योत्स्ना बाळकृष्ण मेढे-पवार यांची निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगरसेवकांत चुरस होती. राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही उपमहापौरपदाची मागणी केली होती. या पदासाठी शुक्रवारी दुपारी तीन ने पाचदरम्यान अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या कालावधीत मेढे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिकता उरली आहे. २२ जुलैला निवडीची घोषणा होणार आहे.

महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीची सत्ता आहे. आघाडीच्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादीला उपमहापौरपद ​मिळाले आहे. या पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूपाल शेटे, जालंदर पोवार, मधुकर रामाणे आणि मेढे यांच्या नावाची चर्चा होती. मेढे या सध्या प्रभाग समिती चेअरमन, स्थायी समिती सदस्य असल्यामुळे इतर तिघा नगरसेवकांनी उपमहापौरपद आपणालाच मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. यापूर्वी मेढे यांचे नाव महापौर व स्थायी समिती सभापतिपदासाठी चर्चेत होते. मात्र त्यांना ही पदे मिळाली नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images