Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘नो फेरीवाला झोन’चे आव्हान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात कुठेही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला झाला की, ऐरणीवर येणाऱ्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेतील महत्वाचा टप्पा असलेल्या मंदिर परिसर फेरीवालामुक्तीचा प्रश्नही चर्चेला येतो. आजपर्यंत अनेकदा मंदिराभोवतीच्या परिसरातील फेरीवाल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची घोषणा झाली. दहशतवादाच्या गांभीर्याची धूळ खाली बसली की, त्यासोबत मंदिर सुरक्षेचाही मुद्दा आपोआप मागे पडतो. आता पुन्हा मंदिर 'नाे फेरीवाला झोन' करण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण खरोखरच अंबाबाई मंदिर परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटेल का? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. त्यासाठी निर्णयाला कठोर अंमलबजावणीची जोड गरजेची आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे सुरक्षेतील महत्वाचा असलेल्या 'नाे फेरीवाला झोन' या निकषपूर्तीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मंदिराच्या पूर्वेला सतत वर्दळीचा भाऊसिंगजी रोड जोडला आहे. तर पश्चिमेला महाद्वार रोड आणि ताराबाई रोड ही शहराची मुख्य बाजारपेठ लागून आहे. मंदिराची दक्षिण बाजू सध्या पार्किंगसाठी वापरण्यात येत असल्याने वाहतुकीसाठी बंद असली तरी सरकारी कार्यालय, शाळा, दुकानगाळे आणि हॉटेल्समुळे या परिसरात गर्दीचा ओघ असतो. उत्तरेला फूलबाजार आणि जोतिबा रोड मार्केटचा विळखा आहे. दक्षिण आणि पूर्व दरवाजाबाहेर आल्यानंतर भवानी मंडपात भरणाऱ्या 'बाजारा'तून वाट काढण्याची कसरत पर्यटक भाविकांना करावी लागते.

चारही बाजूने अतिक्रमण आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेला अंबाबाई मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सध्या मंदिर परिसरातील शंभर आणि पन्नास मीटर परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाद्वारात बसणाऱ्या चिंच, आवळे विक्रेत्यांनाही प्रशासन आजपर्यंत कायमस्वरूपी हटवू शकलेले नाही, तिथे वर्षानुवर्षे मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालावी तसे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अंमलात कसा येईल हा प्रश्न आहे.

भवानी मंडपचे काय?

अंबाबाई मंदिराच्या शंभर मीटर आवारात असलेल्या भवानी मंडपचा परिसर सध्या फेरीवाल्या आणि रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांच्या गर्तेत अडकला आहे. भवानी मंडपाची जागा ही छत्रपती ट्रस्टची असल्यामुळे तेथील विक्रेत्यांचा प्रश्न हा ट्रस्टच्या सहकार्याने हाताळावा लागणार आहे. सध्या याठिकाणी ज्या जागेत केएमटी थांबा होता तो हटवून दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर क्रीडास्तंभाच्याभोवती बिडाच्या तवेविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. मंडपाच्या कमानीतही फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. तर मेन राजाराम हायस्कूलच्या भिंतीपासून ते रोजगार हमी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. त्यामुळे मंदिर परिसर 'ना फेरीवाला क्षेत्र' करण्याच्या मोहिमेत भवानी मंडपाचे काय होणार हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

माल बाहेर...गाळा आत

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात हातगाडीवर वस्तू विकणाऱ्या ८० टक्के फेरीवाल्यांचे याच परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत. मात्र तरीही गाळ्यांचा वापर गोडावूनसाठी केला जातो आणि माल मात्र हातगाडीवर ठेवून रस्त्यावर विकला जातो. त्यामुळे अशा गाळेधारक फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीत युतीचा शिरकाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर १९ पैकी १५ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या छत्रपती शाहू आघाडीने वर्चस्व मिळवले. शिवसेना, भाजप व स्वाभिमानी आघाडीच्या शिव-शाहू आघाडीने तीन जागा मिळवत पहिल्यांदाच समितीत प्रवेश केला. अपक्ष उमेदवार विद्यमान संचालक नंदकुमार वळंजू यांनी विजय मिळवत सत्तारूढ आघाडीला धक्का दिला.

समितीची मतमोजणी बुधवारी पहाटेपर्यंत झाली. विकास सेवा संस्था गटातील ११ पैकी ११ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात शिव-शाहू पॅनेलच्या संजय जाधव (२०२०) मते मिळवत विजय खेचून आणला. मात्र त्यांचे सहकारी रंगराव किटे यांना पराभव पत्करावा लागला. शाहू आघाडीच्या संगीता पाटील (१८३६) यांनी विजय मिळवला. सत्तारुढ गटाच्या शहाजीराव वारके यांना पराभवाचा दणका बसला. ग्रामपंचायतीमध्ये सेना-भाजपने दणका दिल्याने पुढील गटाच्या निकालाबाबत उत्सुकता होती. मात्र अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात पुन्हा राष्ट्रवादीच्या अमित कांबळे यांनी (२१२६) विजय मिळवला. आर्थिक दुर्बल गटात शिव-शाहू पॅनेलच्या शशिकांत अडनाईक यांनी (१९४८) विजय अबिटकर यांचा (१९३२) केवळ १६ मतांनी पराभव केला. वारके व अबिटकर यांच्या पराभवामुळे माजी आमदार के. पी. पाटील गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

१५ मतांनी विजय

सर्वा‌धिक लक्षवेधी ठरलेल्या आडते व्यापारी गटात सत्तारूढ गटाला अपयशाला सामोरे जावे लागले. या गटात शिव-शाहूचे सदानंद कोरगावकर व अपक्ष नंदकुमार वळंजू यांनी विजय मिळवला. वळंजू यांनी वैभव सावर्डेकर यांचा केवळ १५ मतांनी पराभव केला. हमाल तोलाईदार व कृषी प्रक्रिया गटात अपक्षेप्रमाणे सत्तारूढ गटाचे बाबुराव खोत व नेताजी पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीमुक्तीपूर्वी कारवाईचा बडगा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक संस्था कर (एलबीटी) थकविणाऱ्या शंभरावर व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने नोटिस बजावल्या आहेत. तसेच, १२ हजार व्यापाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. त्यामुळे एलबीटीमुक्तीची एक ऑगस्टची डेडलाइन जवळ येत असतानाच, महापालिकेकडून व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

महापालिकेकडे एलबीटी भरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या सुमारे १२००० आहे. व्यापारी, व्यवसायिकांच्या विविध संघटनांनी एलबीटीला विरोध केल्यामुळे गेल्या चार वर्षांत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केलेल्या नाहीत. महापालिकेने एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी तयार केली आहे. व्हॅट भरणारे, पण एलबीटी चुकविणाऱ्यांची संख्या सुमारे १२०० आहे.

सन २०११ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीतील कागदपत्रांची छाननी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. सीएंची पाच पॅनेल वेगवेगळ्या पातळ्यांवर कागदपत्रांची तपासणी करत आहेत. यामध्ये एलबीटीचा भरणा केलेले, विवरणपत्रे सादर न केलेले आणि एलबीटी कमी भरलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. व्यापाऱ्यांनी इन्कम टॅक्स व सेल्स टॅक्सला सादर केलेले खरेदीपत्र एकसारखे असणे आवश्यक आहे. मात्र काहींनी महापालिकेकडे कमी रकमेचे खरेदीपत्र सादर केले आहे. या सर्व बाबींची तपासणी सुरू आहे.

कारवाईचे अधिकार

सरकारने अभय योजनेची मुदत ३१ जुलैपर्यंत जाहीर केली आहे. या कालावधीत थकीत एलबीटी भरल्यास दंड आणि व्याज माफ होणार आहे. ३१ जुलैपर्यंत थकबाकी न भरल्यास महापालिकेला कारवाईचे अधिकार आहेत. राज्य सरकारचा तसा आदेश असल्याचे एलबीटी विभाग प्रमुख दिलीप कोळी यांनी सांगितले.

दंडाची टांगती तलवार

एक तारखेपासून महिनाअखेरपर्यंतचा एलबीटी पुढच्या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत भरायचा असतो. वीस तारखेपर्यंत एलबीटीचा भरणा केला नाही तर दोन टक्के दंड आकारणी केली जाते. अनेक व्यापाऱ्यांनी आंदोलन काळात मुदतीत एलबीटी भरलाच नाही. त्यांच्यावर दंड भरण्याची टांगती तलवार आहे.

१२,००० एलबीटी भरणारे व्यापारी

१२०० व्हॅट भरणारे, पण एलबीटी चुकविणारे व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बना ‘मटा’चे कॉलेज क्लब रिपोर्टर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉलेजमधील फेस्टिव्हल, वेगवेगळे डे, हट के प्रयोग, भन्नाट अचिव्हमेंट्स... असं सगळं काही संपूर्ण कोल्हापूरला कळवायची इच्छा आहे? तर मग 'कॉलेज क्लब रिपोर्टर'चं व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. तरुणाईतील सळसळत्या ऊर्जेला 'महाराष्ट्र टाइम्स' नेहमीच चालना देतो, याचाच एक भाग म्हणून 'मटा'तर्फे 'कॉलेज क्लब रिपोर्टर' नेमण्यात येत आहेत.

कॉलेजविश्वात सतत नवनव्या घडामोडी घडत असतात. कॉलेजवयीन तरुण-तरुणींचे प्रश्न, विचार, लाइफस्टाइल, भावभावना या सगळ्याचं एक वेगळंच मिश्रण 'यूथ'मध्ये दिसतं. हे सगळं मांडण्याची संधी 'मटा' तुम्हाला देत आहे. तुमच्यातील लेखकाला हक्काची जागा देण्यासाठी, प्रतिभेला वाव देण्यासाठी 'मटा'नं हा पुढाकार घेतला आहे.

'सीसीआर' बनण्यासाठी तुम्ही एकच करायचं, आपल्याला सीसीआर का बनावसं वाटतं, हे लिहून आम्हाला कळवायचं. तुमचा अर्ज १५ जुलैपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. शिवाय, कॉलेजचं नाव, अॅकॅडमिक इयर, तुमचा फोटो, आणि स्वतःविषयी थोडक्यात माहितीही सोबत आम्हाला लिहून पाठवा. पाकिटावर आणि इ मेलच्या सबजेक्ट बॉक्समध्ये 'कॉलेज क्लब रिपोर्टर'साठी असा उल्लेख करावा.

आमचा पत्ता - महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहर रेसिडन्सी, २४९ ए, १, ७७, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर.

इ मेल - sachin.yadav@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनविकासातून पर्यटन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

त्यामुळे राज्यातील पर्यटन कित्येक पटीने वाढेल आणि वनांवर असलेले अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास आहे. राज्यातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्पाचे अतिसंरक्षित क्षेत्रात अजूनही अनेक गावे आहेत. त्या गावांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम क्रमाक्रमाने हाती घेण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करणे अपेक्षित नाही. तर त्या गावांतील गावकरी जळाऊ लाकूड, घरगुती शेतीसाठी लागणारे लहान लाकूड, जनावरांचा चारा, रोजगार इत्यादींसाठी वनावर अवलंबून असतात. या निर्भरतेमुळे वनांचा दर्जा खालावत आहे. ही गावे जंगलव्याप्त असल्याने मानव व वन्यजीव संघर्षाची तीव्रता वाढत आहे. तसेच या गावांचा विकास साध्य करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

वनांवर अवलंबून असलेल्या गावांत त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून पर्यायी रोजगार संधी मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. गावातील जन-जल-जंगल-जमीन या साधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, गावकऱ्यांची वनावरील निर्भरता कमी करणे, शेतीपूरक जोडधंदे निर्मिती करून पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणे या बाबींतून वन्यप्राणी संघर्ष कमी करणे, वन्यजीवांचे रक्षण आणि व्यवस्थापनाचा दर्जा वाढविण्याचा विचार करून ही योजना सुरू केली आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार आहे.

व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे, अभयारण्याच्या सीमेपासून दोन किमीच्या आत येणारी गावे तसेच मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र असलेल्या गावांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत गावनिहाय १० वर्षांसाठी सूक्ष्म आराखडे तयार केले जातील. या कामांना २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत पूर्ण करण्याचे बंधन असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना नीरेचे स्नान

0
0

माउलींच्या पालखी सोह‍ळ्याने नीरा नदीच्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. स्वागतासाठी साताऱ्यातील भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

म. टा. वृत्तसेवा, सातारा

संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे. माउलींच्या चांदीच्या पादुकांना दुपारी अडीच वाजता नीरा नदीच्या दत्त घाटावर पालखी सोहळा प्रमुखांनी नीरा स्नान घातले. या वेळी वारकरी आणि भाविकांनी माउलीचा जयघोष केला. वारी सोहळा पुढील सात दिवस म्हणजेच २२ जुलैपर्यंत सातारा जिल्ह्यांतून वाटचाल करणार आहे.

नीरा नदीच्या जुन्या पुलावरुन नीरा गावातील दुपारचा विसावा संपवून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. त्या वेळी नीरा नदीच्या पुलावर सातारा जिल्ह्यातील असंख्य भाविक स्वागतासाठी हजर होते. पुण्याचे जिल्हाधिकारी, ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जयकुमार जाधव आदी सरकारी अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यास नीरा येथे निरोप दिला. नीरा नदीत माउलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर माउलींचा चांदीचा रथ पाडेगाव येथील टोलनाक्यावर आला. त्या वेळी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, आ.मकरंद पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणीकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र, पालक मंत्री ना. विजय शिवतारे व खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पालखी स्वागतासाठी

अनुपस्थित होते.

सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर प्रशासनाने भव्य कमानी उभारल्या होत्या. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत वारी मार्गावर २४ आरोग्य पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पाडेगाव फार्म येथे विसावा घेऊन पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता लोणंद येथे अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. त्यानंतर समाज आरती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत वारीतील दिंड्यांमधून भजन, भारूडे आणि कीर्तन रंगले. पालखी सोहळा लोणंद-फलटण मार्गावर जात असल्याने या मार्गाची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती.



शनिवारी पहिले उभे रिंगण

आज (१७ जुलै) पालखीचा मुक्काम लोणंद येथेच आहे. शनिवारी (१८ जुलै) दुपारी दीड वाजता महाआरती आणि नैवेद्य झाल्यावर माउलींची पालखी अडीच दिवसांचा मुक्काम संपवून तरडगावाकडे प्रस्थान ठेवेल. दुपारच्या विसाव्यानंतर चार वाजता चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण संपन्न होणार आहे. त्यानंतर पालखीचा मुक्काम तरडगाव येथे होणार आहे. उभ्या रिंगणाला वेगळे महत्त्व असून भाविक त्यासाठी मोठी उपस्थिती लावतात.





नव्या दिंड्या सामील

लोणंद येथील मुक्कमात पालखीचा अर्धा टप्पा पूर्ण होतो. साताऱ्यात वारी सोहळ्यात सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच बेळगाव येथील अनेक संतांच्या दिंड्या यात सहभागी होतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुकोबांच्या पालखीचे उत्स्फूर्त स्वागत

0
0

बारामतीचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्याकडून स्वागत तुकोबारायांच्या पालखीचे गुरुवारी बारामतीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

म. टा. वृत्तसेवा, बारामती

अखंड हरिनामाचा गजर आणि विठूरायाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात जगद्‍गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत सायंकाळी सात वाजता आगमन झाले. या वेळी तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले.

पालखीच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक झिझाड, सुनेत्रा पवार, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे उपस्थित होते. स्वागतादरम्यान प्रत्येक दिंडीच्या वीणेकऱ्याला नारळ, हार, शाल, फेटा देऊन सत्कार करण्यात आला.

शारदा प्रांगणात पालखी रथ येताच 'पुंडलिक वरदा..हरी विठ्ठल|| श्री ज्ञानदेव तुकाराम||' असा जयघोष करून खांदेकऱ्यांनी पालखी शामियान्यात स्थानापन्न केली. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते समाज आरती झाल्यावर दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या.



विविध पक्ष, संस्था-संघटनांतर्फे स्वागत

विविध संस्था-संघटनांतर्फे पालखी सोहळ्यात अन्नदान, प्रथमोपचार पेट्यांचे वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत उपचार आदी सेवा देण्यात आल्या. डॉक्टर संघटना व मेडिकल दुकानदार संघटनांतर्फे मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेने बिस्कीट व चहाचे वाटप केले. बारामती पत्रकार संघटनकडून भंडगवाटप करण्यात आले.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्याचे मोफत धडे

0
0

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४४ कॉलेजमध्ये प्रशिक्षण

सचिन यादव, कोल्हापूर

राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या (एनएसडीसी) सहकार्याने शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ४४ कॉलेजमध्ये युवकांना विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण धडे देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिलेल्या ११ अल्टो कारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक बॅचमध्ये १०० प्रवेश क्षमता असून प्रशिक्षण पूर्तीनंतर ११०० रुपये प्रशिक्षण शुल्क परत दिले जाणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून कौशल्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाने शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील ११० कॉलेजकडून प्रस्ताव मागविले होते. पैकी स्किल डेव्हलमेंप प्रोग्रॅम राबवित असलेल्या ४२ कॉलेजची निवड केली आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ११ कॉलेजला प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्यासह प्रत्येक कॉलेजला अल्टो कारही प्रदान केली आहे. पहिल्या टप्प्यात सामग्री दिलेल्या ११ कॉलेजमध्ये कॉलेज विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून कॉलेज आणि आरटीओ यांच्या सोबत सांमजस्य करार केला जाणार आहे. चार चाकी वाहनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आरटीओ मान्यताप्राप्त प्रशिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी कॉलेजच्या वेळेतच विशेषतः महिला, मुली यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सोय केली जाणार आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना लायसन्स उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी कॅम्पसवर प्रशिक्षणासह वाहनाचा परवाना उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठाकडून आरटीओ कार्यालयाकडे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु झाले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांना दररोज किमान एक तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी इच्छुकांकडून ११०० रुपयांचे शुल्क घेतले जाणार आहे. परमनंट लायसन्स मिळाल्यानंतर घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे.

कॉलेजला दिलेल्या सामग्रीत एक मारुती अल्टो, संगणक संच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग संच दिले आहे. माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, बँकिंग, लोह व धातु उद्योग,

विमा तसेच इ-कॉमर्स या क्षेत्रावर भर दिला असून त्याचे धडेही दिले जाणार आहेत.

सहभागी कॉलेज

शिवाजी महाविद्यालय (सातारा), कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (सातारा), शशिकांत शिंदे महाविद्यालय (मेढा), मुधोजी महाविद्यालय (फलटण), शंकरराव मोहिते महाविद्यालय (रहिमतपूर), बळवंत महाविद्यालय (विटा), पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय (तासगाव), राजे रामराव महाविद्यालय (जत), बाळासाहेब देसाई महाविद्यालय (पाटण), देवचंद महाविद्यालय (अर्जुननगर), डी.आर. माने महाविद्यालय (कागल).



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ब्रिटिश कौन्सिलचा ‘विबग्योर हाय’ला पुरस्कार

0
0

कोल्हापूर : ब्रिटिश कौन्सिलतर्फे आंतरराष्ट्रीय शालेय पुरस्कार विबग्योर हाय शाळेने पटकावला आहे. पुरस्काराच्या माध्यमातून विबग्योर हायने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवले आहे.

ब्रिटिश कौन्सिलतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार शाळेच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामाचा आढावा घेऊन मानांकित करण्यासाठी दिला गेला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी पूनम जाधव, जुली चाको, प्रिमा सीब्बीन, क्रिस्टिना दास व नेहा माने यांच्या मार्गदर्शाखाली विविध सात विषयांवरील प्रकल्पांमार्फत या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शाळेने पाठविलेल्या प्रस्ताव, प्रकल्पाचा अहवाल स्वीकारून शाळेताल २०१५ ते २०१८ या कालावधीसाठी हा पुरस्कार मिळाला. दिल्लीतील कॉटेल कॅम्पिन्स्की अॅम्बियन्स येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक टी. बालन, प्रकल्प समन्वयक प्रियांका पाटील उपस्थित होते. हा पुरस्कार शाळांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम ठरविण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूवाडीतील वळणे ‘जीवघेणी’

0
0

दीड वर्षात ६५ अपघात; २५ जणांचा बळी

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंड ते आंबा घाटापर्यंत असलेली वळणे निष्पाप जीवांचे बळी घेत आहेत. मंगळवारी रात्री वारूळजवळ कडवी नदीत बोलेरो गाडी कोसळून झालेल्या अपघाताने या रस्त्यावरचा धोकादायक प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या दीड वर्षांत ६५ अपघातांमध्ये २५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर साठहून अधिक जखमी झाले आहेत. प्रवासाच्या दृष्ट‌िने अत्यंत धोकादायक असलेल्या जुळेवाडी खिंड, येलूर व वारूळ येथील वळणांवर सर्वाधिक ३५ हून अपघात घडून तीसहून अधिक जणांचे जीव गेले आहेत.

मंगळवारी ( दि. १४) संध्याकाळी सव्वा दहाच्या सुमारास चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने वारूळच्या धोकादायक वळणावर बोलेरो गाडी पुलावरून नदीत जाऊन कोसळल्याने रत्नागिरी जिल्ह्यातल्या दोघांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातात जे दोघेजण बचावले त्यांचे नशीब बलवत्तर वाचले. नदीला जास्त वाहते पाणी असते तर त्यांनाही जीवाला मुकावे लागले असते. या पुलाच्या काही ठिकाणी कठडेच नाहीत त्यामुळे या पुलाच्या कडेच्या बाजूने चालणारा साधा पादचारीही सहजपणे नदीत कोसळू शकतो अशी या पुलाची दुरवस्था झाली आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील भाडळे खिंड ते आंबा घाट दरम्यानच्या साधारणपणे पस्तीस किलोमीटरच्या रस्त्याचे पूर्ण रुंदीकरण झालेले नाही. या मार्गावर भाडळे खिंड, खुटाळवाडी, डोणोली, गोगवे, बजागेवाडी, जुळेवाडी खिंड, करंजोशी, येळाणे, जाधववाडी, भोसलेवाडी, निळे, वालूर, वारूळ, तळवडे या ठिकाणची वळणे सर्वाधिक धोकादायक असतानाच मलकापूर-अनुस्कुरा, करंजफेण या मार्गावरील वळणावर होणारे अपघात वेगळेच. या मार्गावरून सहा ते सात महिने चालणाऱ्या बॉक्साईटच्या वाहतूकी मुळे दरवर्षी तीन ते चार जणांचे बळी जातात.

भाडळे खिंड ते आंबा दरम्यान असलेली खुटाळवाडी, जुळेवाडी खिंड आणि वारूळ इथली वळणे, अरुंद पूल आणि पुलाखाली असलेली नदी आणि ओढे अपघातानंतर प्रवाशांचे हमखास जीव घेतातच.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती अध्यक्षपदावर जनसुराज्यचा दावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यामुळे अध्यक्षपदासाठी त्यांच्याच उमेदवाराची वर्णी लागणार हे स्पष्ट असले तरी त्यांच्यामध्येही उदयसिंग कावणेकर-पाटील आणि कृष्णात पाटील यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान पहिल्या वर्षी ​जनसुराज्य पक्षाला संधी देण्याचा निर्णय झाल्याचा दावा या पक्षाने केला आहे. हा दावा खरा ठरल्यास परशुराम खुडे व बाबा लाड यांच्यात चुरस होण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता माजी मंत्री सतेज पाटील तसेच विनय कोरे यांच्याक्ष चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ.

बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-जनसुराज्य व सतेज पाटील गटाने १९ पैकी १५ जागा जिंकत पुन्हा वर्चस्व प्रस्तापित केले. मागील संचालक मंडळात १९ पैकी ६, जनसुराज्य २, काँग्रेस १, शेकाप १ विक्रमसिंह घाटगे गट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ संचालक होते. या काळात सुरूवातीची दोन वर्षे जनसुराज्यचे दत्तात्रय साळोखे यांना सभापती म्हणून संधी मिळाली. नवीन संचालक मंडळात जनसुराज्यचे ४, सतेज पाटील गटाचे २, शेकापचे १ विक्रमसिंह घाटगे गट १, शिवसेना भाजप ३, अपक्ष १ आणि राष्ट्रवादीचे ७ सदस्य निवडून आले

आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्त जागा असल्याने अध्यक्ष त्यांच्या पक्षाचा होणार याबाबत हसन मुश्रीफ ठाम असण्याची शक्यता आहे. मात्र पहिल्या वर्षी जनसुराज्य ला संधी देण्याबाबत मुश्रीफ व कोरे यांच्यात तडजोड झाल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत निर्णय होत नाही तोपर्यंत दोन्ही पक्षात अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करा

0
0

इचलकरंजी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मागील आठवड्यात झालेली विशेष सभेतील गोंधळ त्यानंतर नगराध्यक्षांवर अविश्वास ठरावासाठी गत‌िमान झालेल्या हालचाली यामुळे पालिकेतील सत्तासंघर्षातून कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. विशेष सभेत गोंधळ घालून गैरवर्तन केल्याप्रकरणी काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव तसेच सभा सुरु असताना सभागृहात मोर्चा घुसवून कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी नगरसेवक भीमराव अतिग्रे या तिघांचे नगरसेवकपदच रद्द करावे, अशी मागणी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी केली आहे.

नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु असताना आता नगराध्यक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे सदस्यत्व रद्दची मागणी केल्याने पालिकेतील सत्तासंघर्षाला पुन्हा धार येऊ लागली आहे.

या घडोमाडी घडत असतानाच गुरुवारी नगराध्यक्षा सौ. बिरंजे यांनी नगरसेवकपदच रद्द करावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी थेट काँग्रेसच्या तीन नगरसेकांचे सदस्यत्वच रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सौ. बिरंजे यांनी, सभेत घडलेला घटनाक्रम सविस्तरपणे मांडला आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांनी जाणीवपूर्वक सभेत गोंधळ घालून माईकची आदळआपट केली. तसेच मुख्याधिकाऱ्यांना धमकावत त्यांच्या वाहनाच्या आडवे पडून घेराव घातला. तर नगरसेवक भिमराव अतिग्रे यांनी सभागृहात उपस्थित न राहता मोर्चासह सभागृहात घुसून गोंधळ घातला. आरडाओरड करत सभेचे कामकाज बंद पाडून गैरवर्तन केले. या सर्व बाबींचा विचार होऊन महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४२(१) व (२) व ५५ अ प्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद केले आहे.





पालिकेतील गोंधळाचा अहवाल सरकारकडे

९ जुलै रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत घडलेल्या घटनाक्रमांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे पाठवणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुनील पवार यांनी बुधवारी दिली. संबंधितांवर कोणती कारवाई करावयची हे जिल्हाधिकारी व सरकारच्या निर्देशानंतर निश्चित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.‍

प्रशासकीय व नगराध्यक्षांच्या पातळीवरही घडामोडी घडत असल्याने अस्वस्थता पसरली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या पालिकेच्या विशेष सभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीच्या वतीने बुधवारी पक्षप्रतोद अजितमामा जाधव यांच्या नेतृत्त्वाखालील सदस्यांनी मुख्याधिकारी पवार यांची भेट घेतली. यावेळी अजितमामा जाधव यांनी, गुरुवारच्या सभेत नगरसेवक भीमराव अतिग्रे यांनी सभेचे कामकाज सुरु असताना सभागृहात मोर्चा आणला. त्यामुळे उडालेल्या गोंधळातच सभा पार पडली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी पवार यांना सभागृहाबाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत हुज्जत घातली. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या वाहनासमोर काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील व पाणी पुरवठा सभापती रजपुते हे आडवे पडल्याने शासकीय कामात अडथळा आला. या संदर्भात आपण कोणती भूमिका घेतली आहे. संबंधितांवर कोणती कारवाई करणार अशी विचारणा केली.

पवार यांनी, सभा आणि झालेल्या घडामोडींचा सविस्तर अहवाल आणि छायाचित्रणाची सीडी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तिकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे गोंधळ घातलेल्या नगरसेवक कायद्याच्या कचाट्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.













मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी दाखविला रोडरोमिओंना हिसका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्क परिसरात महिला व महाविद्यालयीन युवतींची छेड काढणाऱ्या ३३ रोडरोमिओंना शाहूपुरी पोलिसांनी हिसका दाखवला. या रोडरोमिओंना उठाबशा काढायला लावून त्यांच्याकडून सात हजार रूपयांचा दंड वसूल केला.

महाविद्यालये सुरू झाल्याने ताराबाई पार्क परिसरात रोड रोमिओंचा वावर वाढला आहे. मोटारसायकल वेगाने चालवणे, ​ट्रिपल सीट, हॉर्न वाजवणे, युवतींचा पाठलाग करणे, टोमणे मारणे, रस्त्यांवर मोटारसायकल लावून वाट अडवणे, खुन्नस देणे, दोन गटात वादावादी हे प्रकार वाढल्याने स्थानिक नागरिकांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी दुपारी सात पथकांनी मेरी वेदर मैदान, आरटीओ ऑफीस परिसर, जिल्हा परिषद परिसरात रोड रोमिओंना ताब्यात घेऊन लायसन्स तपासली. तासात तब्बल सात हजार रूपयाचा दंड वसूल करण्यात आला. 'यापुढे देखील ही कारवाई कायम राहणार आहे,' असे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेक्षकांच्या सुविधा विंगेतच

0
0

'केशवराव'च्या नूतनीकरणात तांत्रिक सुविधांचा प्रश्न अधांतरी



अनुराधा कदम, कोल्हापूर

तब्बल सात कोटी रूपये खर्चाचे बजेट असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना नाटक आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा असलेल्या तांत्रिक सुविधा मात्र अद्याप विंगेतच असल्याचे चित्र आहे. यामध्ये ध्वनी, प्रकाश, बैठक व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या स्टेप्स या तांत्रिक सुविधांची चाचणी घेण्यासाठी वेळ न ठेवता थेट उद‍्घाटनाचा घाट घालण्याचा प्रपंच सुरू आहे. एकदा का नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचा पडदा उघडला की, तांत्रिक सुविधांकडे चलता है या अविर्भावात पाहण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे नाट्य व रंगकर्मींकडून तांत्रिक सुविधापूर्तींची मागणी जोर धरत आहे.

एकूण १० कोटी रूपयांच्या बजेटमध्ये केशवराव नाट्यगृहासाठी सात कोटी तर उर्वरित तीन कोटी रूपये खासबाग मैदानाच्या नूतनीकरणावर खर्च करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून नाट्यगृह नूतनीकरणाचे काम सुरू असून येत्या १५ ऑगस्टपूर्वी नाट्यगृह खुले करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यादृष्टिने नाट्यगृहाचे रूप देखणे करत असताना तांत्रिक सुविधांबाबत मात्र उदासीनता आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने नाट्यगृहातील तांत्रिक सुविधा सक्षम असण्याबाबत महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने ध्वनीयंत्रणेवर भर देण्यात आला आहे. यापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहात कायमस्वरूपी ध्वनीयंत्रणा सांभाळण्यासाठी कर्मचारी नसल्याने अनेकवेळा प्रयोगादरम्यान ध्वनीयंत्रणा कोलमडल्याचे दिसून आले आहे. ज्याप्रमाणे सभागृहातील शेवटच्या रांगेतील प्रेक्षकाला संवाद ऐकता आला पाहिजे त्याचप्रमाणे मंचावरचा प्रसंग दिसला पाहिजे, यासाठी सभागृहातील आसनव्यवस्था ही स्टेप्सवर असली पाहिजे. मात्र नूतनीकरणाच्या रचनेत स्टेप्स न ठेवता स्लोप ठेवण्यात आला आहे. अद्याप चीनवरून येणाऱ्या खुर्च्या पोहोचलेल्या नाहीत, त्यापूर्वीच नाट्यगृहातील स्लोपचे काम करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना नव्या खुर्चीवरून रंगमंचावरील नाटक व्यवस्थित दिसेल याची चाचणी घेण्याच्या प्रक्रियेला बगल देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नित्य दाहीदिशा

0
0

मोटार लावून पाणी खेचल्याने टंचाईच्या झळा
जलतरण तलाव ते नियोजित उद्यान हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साईक्स एक्स्टेंशन या शहरातील मध्यवर्ती आणि राजारामपुरीसारख्या गजबजलेल्या प्रभागालगतच्या भागात रात्री तीन वाजल्यापासून पाण्यासाठी धावपळ सुरू होते. तर दुसऱ्या टप्प्यात सात वाजता सोडण्यात आलेल्या पाणी काही जणांकडून लावल्या जात असलेल्या मोटारींमुळे मिळत नाही. त्यामुळे काही कॉलन्यांमध्ये पाण्यावरून वादावादी होत असल्याचे चित्र या प्रभागात आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्ती अपुरी आहेत.

राजारामपुरी १३ वी गल्लीपासून ते टाकाळा पर्यंत काही भागांत रस्त्याची दुरावस्था आहे. मुख्य रस्ते काही ठिकाणी चांगले आहेत. मात्र, अंतर्गत रस्ते अर्धवट आहेत. रस्त्याच्या शेजारी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटर्सची सोय करण्यात आलेली नाही. एस. टी. कॉलनी परिसरात ड्रेनेजची व्यवस्था नाही. दहा वर्षांपूर्वी या प्रभागात घरांची संख्या कमी होती. आता बैठ्या घरांच्या जागेवर वारेमाप अपार्टमेंटस् झाल्या. प्रभागाची उभी वाढ झपाट्याने झाली. त्या तुलनेत मात्र नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न प्रभागात झालेला नाही. पाण्यासाठी काही ठिकाणच्या रहिवाशांना रात्र जागून काढावी लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः राजारामपुरी १४ वी गल्ली, माळी कॉलनी, टाकाळा, एस. टी. कॉलनी आदी परिसरात पाण्यासाठी धावपळ करावी लागते. या भागात रात्री तीन वाजता पाणी सोडले जाते. मात्र, अपुऱ्या दाबाने पाणी असल्याने काही ठिकाणच्या टाक्या भरत नाहीत. सकाळी सात वाजताही या प्रभागात पाणी सोडले जाते. साडेआठ वाजेपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. मात्र, काही रहिवाशी पाणी खेचण्यासाठी मोटर लावतात. त्यामुळे काही भागाला पुरेशा दाबाने पाणी येत नाही असा आरोप आहे. त्यामुळे या प्रभागातील काही रहिवाशांना पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.

राजर्षी शाहू जलतरण तलावाजवळ नियोजित बागेचे काम गेली कित्येक वर्षे सुरु आहे. सध्या या ठिकाणी केवळ लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे उभे केले आहेत. फिरण्यासाठी ट्रॅकचे काम अद्याप सुरू आहे. या उद्यानाचे काम रखडल्याचा आरोप येथील रहिवाशांचा आहे. अनेक ठिकाणी रोडवर सोडियम व्हेपरचे दिवे नसल्याने काही भागात अंधार आहे. महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा येथील रहिवाशांचा आरोप आहे. इंदुमती कॉलेजच्या पाठीमागील रस्ता आणि कोरगावकर हॉल ते खोत बंगल्यापर्यंतचा काही रस्ता अपुरा आहे. विद्यार्थी, तरुणांसाठी स्वतंत्रपणे क्रीडांगणाची व्यवस्था नाही. कचरा उठाव वेळेवर होत असला तरी काही ठिकाणी कचरा कोंडाळाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

प्रभागात ३ कोटी ७५ लाखांची कामे पूर्ण केली आहे. गेली कित्येक वर्षे सायबर ते मंडलिक पार्क पर्यंत रखडलेला रस्ता पूर्ण केला आहे. एस. टी. कॉलनीत रहिवाशांच्यासाठी सभा मंडप केला आहे. जलतरण तलावाजवळ उद्यानाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच संबधित काम पूर्ण केले जाईल. या ठिकाणी सुमारे १० फूटाचा ट्रॅक फिरण्यासाठी केला जाणार आहे. मोटार लावून पाण्याचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आल्या. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

- राजू पसारे, नगरसेवक

प्रभागात अनेक ठिकाणी सोडियम व्हेपरचे दिवे नाहीत. त्यासाठी महापालिकेनेही ठोस कार्यवाही केलेली नाही. काही ठिकाणी दर्जेदार केलेल्या रस्त्याची तपासणी गरजेची आहे. कारण बहुतांशी ठिकाणी एकच थराचा रस्ता केला आहे. या पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाईल. स्मार्ट सिटीचा विचार करताना प्रभागात मुलभूत सुविधा देण्याची गरज आहे.

- राजू रोकडे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समतेच्या तत्त्वांचा आदर हवाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदू-मुस्लिम ऐक्य हा समाजाचा, समतेचा पाया आहे. त्यावरच समाजाची बांधणी झाली आहे. मुस्लिम आणि हिंदू समाजातील लोकांकडून परस्परांच्या धर्माबद्दल आदर आणि समानता आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. भविष्यातही हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता समतेच्या तत्त्वांनुसार काम होणे अपेक्षित आहे. दंगलींमुळे या ऐक्याला लागणारे गालबोटही थांबले पाहिजे असे मत हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा

हिंदू मुस्लिम ऐक्य हे आम्ही वारसा म्हणून पाहतो. महात्मा गांधीजींनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी बलिदान दिले. दोन्ही धर्मातील लोकांनी सौदार्हाने वागावे यासाठी काम केले. त्यांच्या तोडीचे काम कोणीही केले नाही. मात्र, दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी पैगंबरांवर पोवाडा लिहिला. हिंदू एकमय लोक योजना मांडली. याचा आदर्श मानून आम्ही काम करतो. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये सलोखा रहावा यासाठी हिंदी है हम, हिंदोस्ता हमारा संस्थेच्यावतीने प्रत्येक टप्प्यावर काम केले जाते. त्याप्रमाणेच इस्लाम धर्मानेही समतेचे तत्व सांगितले आहे. आगामी काळात भारतामध्ये राहण्यासाठी हिंदू-मुस्लिम ऐक्य हाच सत्तेचा पाया असला पाहिजे. जीवनाचे तत्वज्ञान आणि जीवनपद्धतीत समानता असली पाहिजे. संकुचित धर्मपद्धतीच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. त्यामुळेच समतेने राहणे हे आम्ही कर्तव्य मानतो. अनेकदा धर्म हा राजकीय मुद्दा केला जातो. संस्कृती म्हणून विविधता मान्य आहे. मात्र राजकीयदृष्ट्या वेगळेपण मान्य नाही. बहुसंख्यांकांबरोबर बहुमताचा भाग बनले पाहिजे, तरच राजकारण होऊ शकेल. बहुमत म्हणजे काय यादृष्टीने राजकारण व्हावे. बहुसंख्यांकाबरोबर अल्पसंख्य बहुमत बनवतील असे राजकारण अस्तिवात आले पाहिजे. फुले, गांधी हा आमचा आधार असल्यामुळे तसाच आमचा विचार आहे. असा राजकीय विचार ऐक्याचे तत्वज्ञान आहे. या देशातील दंगली हा शाप आहे, तो संपवायला पाहिजे यासाठी काम केले जाते. 'हिंदी है हम हिंदूस्ता है हमारा' या संघटनेच्या माध्यमातून ऐक्यासाठी प्रयत्न होतात, असे संस्थेचे प्रमुख हुमायून मुरसल यांनी सांगितले.

मुस्लिम बोर्डिंग

मुस्लिम बोर्डिंगच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. हे सर्व उपक्रम राबविताना हिंदू किंवा मुस्लिम असा भेदभाव अजिबात केला जात नाही. त्यामुळे मुस्लिम बोर्डिंग आयोजित करत असलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये सर्व जाती-धर्माच्या खेळाडूंना संधी दिली जाते. या स्पर्धेत कोल्हापुरातील सर्व खेळाडूंचा विमा काढला जातो. त्यामध्ये सर्व समाजाची मुले एकत्र येऊन खेळतात. शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ या तालमींचे आणि मुस्लिम बोर्डिंगचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे मुस्लिम बोर्डिंग इतरांपेक्षा या तालमींना आपलेसे वाटते. तशा प्रकारचे संबंध वृद्धींगत करण्याचे काम मुस्लिम बोर्डिंगकडून होत असते. मुस्लिम बोर्डिंगमध्ये एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी एकत्र येतात. या ग्रंथालयाची क्षमता ४८ आहे. तर १५० विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. या ग्रंथालयात ज्या ४८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्याबाबत ४४ विद्यार्थी बहुजन समाजातील ४ विद्यार्थी मुस्लिम समाजातील आहेत. अशा प्रकारेही हिंदू-मुस्लिम ऐक्य जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात शहरात वेगवेगळ्या वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी बोर्डिंग बांधली गेली. मुस्लिम बोर्डिंगची स्थापनाही समाजातील मुलांच्या निवासासाठी केली गेली. प्रत्यक्षात याठिकाणी ४० टक्के मुले ही बहुजन समाजातील असतात असे गणी आजरेकर यांनी सांगितले.



जातिभेद मानलाच नाही

आम्ही मुस्लिम समाजाचे असलो तरी कधीही जातीभेद मानलाच नाही. पंचायत समितीचे सदस्य असताना केवळ आपल्या समाजाचा विचार न करता, सर्व समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. ग्रामीण भागातील आजारी रुग्णांना आणि अपघातग्रस्तांना तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिका सुरू केली. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वीच एका हिंदू मुलीचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिचा विवाह करून देण्याचे कामही केले आहे. समतेचे तत्व मानून कार्यरत आहे असे बंकट थोडगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षश्राद्धाला फाटा देऊन गरजूंना मदत

0
0

खोलखंडोबा परिसरातील करंबे कुटुंबीयांचा स्तुत्य निर्णय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्षश्राद्धाला सर्व पाहुण्यांना जेवण देण्यासह संबंधितांची आठवण रहावी म्हणून एक भेटवस्तू अशा पारंपरिक खर्चिक गोष्टीला फाटा देऊन खोलखंडोबा परिसरातील करंबे कुटूंबियांनी गरजू विद्यार्थी, खेळाडूंसह व्यक्ती आणि सामाजिक संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. करंबे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

खोलखंडोबा परिसरातील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र ठोंबरे, त्यांचे बंधू सुनील, बाळासाहेब यांच्या आई तारबाई यांचे गेल्यावर्षी निधन झाले. शनिवारी (ता. १८ जुलै) राजेंद्र यांच्या आईचा पहिला स्मृतीदिन आहे. यादिवशी सर्व पाहुण्यांना जेवायला बोलावून भेटवस्तू देण्यासंबधी कुटुंबात चर्चा झाली. मात्र पाहुण्यांना जेवण घालण्याऐवजी समाजातील गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय या कुटुंबियांनी घेतला आहे. वर्षश्राद्धादिवशी सहा बहिणी, तीन भाऊ यांनाच निमंत्रित केले जाणार आहे. वर्षश्राद्धाचे जेवण, पाहुण्यांना वस्तू याचा खर्च ४० ते ५० हजार रुपये येणार होता. या रक्कमेतून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. वालावलकर हायस्कूलमधील अकरा खेळाडूंना स्पोर्टस् कीट देण्याचा आणि शिवाजी मराठा हायस्कूलमधील ५० विद्यार्थ्यांना शूज देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याशिवाय शुक्रवार पेठेतील पंचगंगा रोड परिसरातील ग. गो. जाधव बालवाडीला खेळणी भेट देण्यात येणार आहे. कणेरीत अंगावर झाड पडून विलास पांडव हे जखमी झाले. आर्थिक स्थितीअभावी त्यांचे कुटूंब उघड्यावर पडल्याने त्यांना मदतीचा निर्णय घेतला आहे. कणेरीतील सिद्धगिरी मठातील सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदतही देण्यात येणार आहे. 'लेक वाचवा' या मोहिमेला बळ देण्यासाठी परिसरात ज्या कुटूंबाला एक आणि दोन मुली आहेत, अशा कुटुंबांचा यानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे.

शनिवारी सायंकाळी चार वाजता कणेरीतील सिद्धगिरीचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, नगरसेवक सत्यजित कदम, उदय गायकवाड, अर्बन बँकेच्या संचालिका सुमित्रा शिंदे, अजेय दळवी, गजानन लिंगम, मुरलीधर गावडे, अॅड. प्रशांत चिटणीस, एस. आर. पाटील उपस्थित राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्याला फुटणारे पाय ‘छाटणार’

0
0

गावागावांतील रेशन दुकानांपर्यंत सरकारच पोहोचवणार धान्य



उदयसिंग पाटील, कोल्हापूर

रेशनवरील धान्याला गोदामातून बाहेर पडल्यानंतर काळ्या बाजारापर्यंत फुटणारे पाय 'छाटण्या'चा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आता रेशन दुकानांपर्यंत हे धान्य पोहोचवण्याची जबाबदारी सरकारच उचलणार आहे. भविष्यात एकाऐवजी तीन महिन्यांचे धान्य एकदम पाठवण्याचाही विचार सरकारच्या विचाराधीन आहे.

रेशन दुकानदारांना दरमहा धान्य पोहोचवण्यात येते. जिल्हा मुख्यालयातील गोदामांत येणारे धान्य तालुका पातळीवर पाठवले जाते आणि तेथून त्या तालुक्यांमधील दुकानदारांनी धान्य घेऊन जावे अशी यंत्रणा होती. पण अनेकदा दुकानांपर्यंत धान्य पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. अनेक गावांमधून धान्य पुरेसे मिळत नसल्याच्या तक्रारी असायच्या. त्याचा शोध घेतल्यानंतर रेशनचे धान्य दुसऱ्याच यंत्रणेला परस्पर पोहोचवले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे आता पुरवठा विभागच सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

त्याचाच भाग म्हणून जिल्हा मुख्यालयातून तालुक्यापर्यंत व तालुक्यातून थेट दुकानापर्यंत सरकारी यंत्रणेमार्फतच धान्य पोहचवले जाणार आहे. त्यासाठी जादा वाहनांची सोय केली आहे. प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा मार्ग आखून दिले आहेत. सरकारी कंत्राटदाराची वाहने या मार्गांवरूनच संबंधित दुकानदाराकडे जातील. तसेच तालुका गोदामांमधून ही वाहने दुकानदाराकडे जाण्यास निघाल्यानंतर गावातील नागरिकांच्या मोबाइलवर धान्य पाठवले असल्याचे एसएमएसही पाठवले जातात. त्यामुळे धान्य इतरत्र जाणार नाही याची दक्षता घेतली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅसिड हल्लाप्रकरणी बापाला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आंतरधर्मीय विवाह केला म्हणून स्वतःच्या मुलीवर अॅसिड फेकून गंभीर जखमी करणाऱ्या दिलीप शामराव पाटील (वय ५५, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. आवटे यांनी २१ दिवस सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी पाटील याने जमा केलेले दहा हजार रूपये दंडाची रक्कम मुलीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णयही देण्यात आला.

पाटील याच्या मुलीने वडिलांच्या इच्छेविरूध्द परधर्मीय मुलाशी १४ सप्टेंबर २००७ रोजी नृसिंहवाडी येथे विवाह केला. विवाहानंतर तिचे नाव बदलण्यात आले. वडील दिलीप पाटील याने मुलाचे वडील व आपली मुलगी यांच्याविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर वडगाव पोलिसांनी मुलीला कळंबा येथील तेजस्विनी महिला वसतीगृहात २७ ऑक्टोबर रोजी दाखल केले. पाटील याच्या घरातील लोकांनी तेजस्विनी वसतीगृहात जाऊन मुलीचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने घरी जाण्यास नकार देत त्याच मुलाशी संसार करणार असल्याचे सांगितले. एक नोव्हेंबर २०११ रोजी वसतीगृहात मुलीला भेटायला गेलेल्या दिलीप पाटील याने मुलीच्या डोक्यावर अॅसिड ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबद्दल पाटील व त्याचा मित्र महावीर पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून साकारतेय मशीद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शुक्रवार पेठ कागदी गल्ली येथे १५० मुस्लिम कुटुंबियांच्या वतीने लोकसहभागातून मशिद उभारण्यात येत आहे. मशिदीवरील २१ फूट उंचीचा पहिला मिनार पूर्ण झाला असून रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मिनार विद्युत रोषणाईने झळाळून निघाला आहे.

कागदी गल्ली येथे जुम्मा मशिद असून तिला 'उत्तरेश्वर पेठ मशिद' म्हणून ओळखले जाते. कागदी गल्ली येथे १५० कुटुंबे राहतात. गल्लीतील जुम्मा मशिदीच्या नुतनीकरणाचा संकल्प या कुटुंबांनी केला आणि बाहेर कुठेही वर्गणी न मागता ४० लाख रुपये जमा केले. वर्षापूर्वी मशिदीचे बांधकाम सुरू केले असून आकाशाकडे झेपावणारे चार मिनार असलेले डिझाईन करण्यात आले आहे. पैकी एक मिनार तयार झाला आहे. टेरेसवर २१ फूट उंचीची मिनार बांधण्यात आले आहे. यासाठी खास हैद्राबाद येथून कारागिर बोलावण्यात आले आहेत. बालेचाँद मालदार, जहाँगिर अत्तार, फिरोज पटवेगार, सिकंदर काझी, अन्वर सुभेदार, शब्बीर उस्ताद मशिद उभारण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images