Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एसएससी बोर्डाच्या अध्यक्षपदी पायमल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी, एचएससी बोर्ड) अध्यक्षपदी सध्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांची सोमवारी नियुक्ती झाली. बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बोर्डामधील सर्वच प्रणाली संगणकीकृत करून पेपरलेस काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यंनी सांगितले.

पायमल सध्या राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी विभागीय मंडळाच्या सचिवपदासह शिक्षण उपसंचालक म्हणूनही काम पाहिले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची पदोन्नतीवर पुण्याला बदली झाली होती. मंडळाचे अध्यक्ष भीमराव कांबळे निवृत्त झाल्यानंतर पद रिक्त होते. सोमवारी पायमल यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात संपर्क साधला असता पायमल म्हणाले, 'परीक्षा मंडळातील कागदपत्रे ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कार्यालयातील कामकाजही पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आठवड्यात पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजार समितीत राष्ट्रवादीची आघाडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, शेकाप आणि सतेज पाटील गटप्रणीत छत्रपती शाहू पॅनेलने ११ पैकी ११ जागांवर विजय मिळवत पूर्ण बहुमत मिळवले. विरोधी शिवसेना, भाजप, स्वाभिमानीचे शिव-शाहू परिवर्तन पॅनेल व काँग्रेसप्रणीत राजर्षी शाहू पॅनेलचा धुव्वा उडवला. सर्व उमेदवार सुमारे १८०० ते २५०० मताच्या फरकाने निवडून आले. या विजयाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ बाजार समितीवर विजय मिळत जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मांड मजबूत केली आहे. निकाल जाहीर होताच शाहू पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

बाजार समितीच्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, जनसुराज्य शक्ती आणि अन्य मित्रपक्षांची सत्ता होती. मात्र, बाजार समितीतील गैरकारभारामुळे प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक नियुक्तीनंतरही मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतर ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार या संचालकांना निवडणुकीस अपात्र ठरविण्यात आले होते. हा आक्षेप राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांवर असतानाही मतदारांनी पुन्हा एकदा बाजार ‌स‌मितीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात दिल्या आहेत.

रात्री दहा वाजता विकास सेवा संस्था गटातील ११ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्जेराव पाटील (६२१२), उदयसिंग पाटील-कावणेकर (६१७९), दशरथ माने (६१०१), कृष्णात पाटील (६०२९), बाबासो लाड (५६५३), परशुराम खुडे (५६४०), विलास साठे (५३३९), महिला गटात आशालता पाटील (६०९२), शारदा पाटील (६१५६), इतर मागासवर्ग उत्तम धुमाळ (६९९९) आणि भटके-विमुक्त शेखर येडगे (६७७८) यांनी विजय मिळवला.

अडते-व्यापारी गट वगळता इतर तीन गटांत राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच, जनसुराज्यचे चार आणि सतेज पाटील गटाच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.

मतदार आमच्या बाजूने निकाल देतील, अशी अपेक्षा होती. मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याने बाजार समितीला देशात अव्वल नंबरवर आणू. पंधरा वर्षांत लागलेला कलंक यावेळी पुसून काढणार आहोत.

- हसन मुश्रीफ, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० हजार नावे वगळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील मतदार यादीतील ५० हजार नावे दुबार, मृत, स्थलांतरित असल्याने वगळण्यात आली आहेत. मात्र, महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदारसंघातील अशा प्रकारची नावे वगळण्यात आलेली नाहीत. अशा नावांबाबत सात क्रमांकाचा (नाव वगळण्याचा) अर्ज आल्यास ते नाव वगळले जाणार आहे.

जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यावेळी लाखोच्या संख्येने नावे दुबार, स्थलांतरित, मृत प्रकारातील सापडली होती. अशी नावे वगळणार याची माहिती मिळताच त्याला विविध पातळीवरून विरोध होऊ लागला. राज्यभरात त्याचे लोण पसरले जाऊ नये म्हणून ही कारवाई थांबविली होती. आता सार्वत्रिक निवडणुका संपल्या असून, या कालावधीत दुरुस्ती, हरकती करण्यासाठी बराच वेळ तसेच वाद होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे जानेवारी २०१४ ते जानेवारी २०१५ या कालावधीत राबविलेल्या कार्यक्रमांतून ही नावे समोर आली. यासाठी मतदारसंघांतील मतदारांना कल्पना देऊन हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यानंतरच जिल्ह्यातील दुबार, मृत, स्थलांतरित या वर्गामध्ये मोडणारी ५० हजार मतदारांची नावे वगळली आहेत.

जिल्ह्यात सर्व मतदारसंघांत हा कार्यक्रम राबविला असला तरी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर उत्तर व दक्षिणमधील नावे वगळलेली नाहीत. पण ज्या नावांबाबत सात क्रमांकाचा अर्ज भरून येईल, त्यांची नावे वगळली जाणार आहेत. या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये नावे दुरुस्तीचाही कार्यक्रम होता. त्यासाठीही अर्ज मागविले होते. अनेकांच्या नाव, पत्ता, वयामध्ये चुका होत्या. याबाबत ५७९४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुसार दुरुस्त्या केल्या आहेत.

पोस्टल मतदारांचीही नावे कमी

पोस्टल मतदानातील सैनिकांची मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम सुरू आहे. १५ जुलैपासून हरकती मागवल्या असून, २३ तारखेपर्यंत त्यांची छाननी करण्यात येणार आहे. ३१ जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होईल. काही सैनिकांची बदली झाली आहे, काही निवृत्त झाले आहेत. त्यांच्याबाबतची माहिती लष्कराकडील रेकॉर्ड ऑफिसकडून मागवली आहे. एका टपाली मतदानासाठी जवळपास ५० ते ७० रुपये खर्च येतो. तसेच अनेकांच्या नावावर बोगस मतदान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मतदार यादीतील या नावांची खात्री करूनच यादी बनवली जात आहे.

निवडणूक आयोगाकडूनच तसा आदेश असेल तर ठीक आहे; पण केवळ कोल्हापूर उत्तर, दक्षिणमधील नावे वगळली नसतील तर आक्षेप जरूर घेऊ. दुबार, मृत, स्थलांतरित नावे वगळली जावीत यासाठी पाठपुरावा करणार आहे. त्याचवेळी अशा नावांची स्वतंत्र यादी आम्ही तयार करू. त्यांना मतदानास आक्षेप घेऊ.

- महेश जाधव, महानगर अध्यक्ष, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त विद्यार्थ्यांनाही प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीनिअर कॉलेजच्या पदवीचा पहिल्या वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाजी विद्यापीठाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची छाननी मंगळवारी करण्यात आली. मागेल त्याला तुकडी आणि वाढीव चाळीस टक्के विद्यार्थीसंख्या देण्याचा निर्णय छाननी समितीने घेतला. केवळ २०१५-१६ या एक वर्षासाठी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवेशाच्या गंभीर प्रश्नावर समितीने हा निर्णय घेतला.

सीनिअरच्या पहिल्या वर्षाचे दहा हजारांवर प्रवेश लटकल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर छाननी समितीने बैठक घेऊन अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावला. केवळ औपचारिकता म्हणून हा निर्णय २४ जुलै रोजी होत असलेल्या विद्या परिषदेसमोर ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातून सीनिअरच्या पहिल्या वर्षांसाठी वाढीव तुकडीसाठी ६५ आणि वाढीव विद्यार्थिसंख्येसाठी १९ कॉलेजचे प्रस्ताव आले होते. या प्रस्तावाची छाननी करून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत अतिरिक्त विद्यार्थी प्रवेश आणि तुकडीचा प्रश्न शिवाजी विद्यापीठ स्तरावर घेण्याचा निर्णय दिला होता. बैठकीस बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्राचार्य प्रवीण चौगुले, प्राचार्य डी. एन. पोवार, एस. ए. कारंडे, सिनेट सदस्य चित्रलेखा कदम, अमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली जेलवर उलटा तिरंगा

$
0
0

कुपवाड : सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या इमारतीवरील राष्ट्रध्वज मंगळवारी उलटा फडकाविल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. दाखल्याच्या कामासाठी सेतू कार्यालयात आलेले सामाजिक कार्यकर्ते गिरीश लोहाना यांनी हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी त्वरीत शहर पोलिसांत धाव घेऊन संबधित प्रकाराबाबत फिर्यादही दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयालगतच जिल्हा कारागृह क्रमांक २ आहे. कारागृहाच्या बाजूलाच सेतू कार्यालय आहे. मंगळवारी दुपारी गिरीश लोहाना सेतूमध्ये गेले होते. त्या वेळी त्यांचे लक्ष सहजपणे कारागृहाच्या कार्यालयावर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे गेले. ध्वज उलटा फडकात होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमाराची ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर एलबीटीमुक्त?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी माफ करण्याच्या निर्णयाचा फायदा कोल्हापुरातील बहुतांशी व्यापारी, व्यावसायिकांना मिळणार आहे. बहुतांश व्यवसाय, उद्योजकांची उलाढाल या मर्यादेच्या आतच असल्याने कोल्हापूर एलबीटीमुक्त होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे व्यापारी, कारखानदार संघटना एलबीटी माफी देताना वार्षिक उलाढालीच्या रकमेवरून फरक करायला नको होता, अशी भूमिका मांडत आहेत.

कोल्हापुरात लहान-मोठे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची संख्या सतरा हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी १२ हजारांहून अधिक व्यापारी एलबीटी भरतात. बहुतांश व्यापारी, व्यवसायिकांची वार्षिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. सरकारच्या निर्णयासंदर्भात बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, 'एलबीटीच्या विरोधात एक एप्रिल २०११ पासून आंदोलन सुरू होते. सरकारच्या निर्णयामुळे एका टप्प्यात ९० टक्के व्यावसायिकांचा प्रश्न सुटला आहे. मात्र आमची मागणी ही 'एक महाराष्ट्र एक टॅक्स' अशी होती. सरकारकडून व्हॅटमध्ये वाढ करून सरसकट एलबीटी आणि जकात माफीची अपेक्षा होती. आता सरकार मुद्रांक शुल्कात वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने मोठ्या व्यावसायिक, उद्योजकांना सवलत दिलेली नाही.'

महापालिकेला फटका

राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका महापालिकेला बसणार आहे. राज्य सरकारकडून नुकसानभरपाईपोटी किती अनुदान देणार आहे हे अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे महापालिका सरकारच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे अ​धिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

व्यापारी, उद्योजकांची सरसकट टोलमाफीची मागणी होती. सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलियम कंपन्या, वाहनांचे अधिकृत वितरक (ऑटोमोबाइल डीलर), मोठे इंडस्ट्रीज आणि कारखानदारांची सुटका झालेली नाही. यामुळे बडे उद्योग शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. व्हॅटमध्ये वाढ करून सर्वांसाठी निर्णय घेता आला असता.

- रवींद्र तेंडुलकर, कारखानदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैशामागे लागू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ट्रॅफिक पोलिसांमुळे पोलिसांची बदनामी होत आहे. ट्रॅफिक पोलिसांनी पैशाच्या मागे न लागता प्रामाणिकपणे कष्ट करावेत. या पोलिसांनी चांगले काम केल्यास संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा उजळू शकते,' असा सल्ला जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी ट्रॅफिक पोलिसांना दिला. चार दिवसांच्या पोलिस प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

पोलिसप्रमुख शर्मा म्हणाले, 'पोलिसांच्या बदल्या पारदर्शीपणे केल्या आहेत. पोलिसांना कुटुंबासमवेत नोकरीत वेळ मिळावा यासाठी घराजवळील पोलिस ठाण्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. ट्रॅफीक शाखेत नवीन ४० पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत.

या पोलिसांनी पोलिस दलाची प्रतिमा उजळण्यासाठी प्रयत्न करावेत. शहराच्या वाहतूक नियोजनात मनःपूर्वक काम करावे. कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वप्रथम वाहनधारकांचे प्रबोधन करावे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने रस्ते नेहमीच गजबजलेले असतात. साहजिकच ट्रॅफिक पोलिसांच्या कामातही वाढ झाली आहे. वाहनधारकांचे योग्यरित्या प्रबोधन केल्यास वाहतुकीला शिस्त आणणे शक्य होईल.'

चार दिवस चालणाऱ्या या शिबिरात ५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. भायखळा येथील वाहतूक प्रशिक्षण केंद्राचे निवृत्त अप्पर पोलिस उपायुक्त केशव राणे व निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीधर सारंग शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. लायसन्स कसे तपासावे, कायद्याचे ज्ञान याची माहिती देण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात मार्गदर्शन तर दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष सिग्नलजवळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, शहर वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक आर.आर. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमाल पंचायतीचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यात माथाडी कायद्याची अंमलबजावणी मुंबई, पुणे वगळता अन्य जिल्ह्यांत केवळ २० टक्के इतकीच झाली आहे. कायद्याची अंमलबजवणी विस्कळीत करण्याचा प्रयत्न व्यापारी व कारखानदार करत आहेत. माथाडी कायद्याची अंमलबजावणी सावत्रिक व काटेकोरपणे व्हावी होण्यासाठी सरकारने नेमलेल्या डॉ. बाबा आढाव अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारावा अशी मागणी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये हमाल व मापाड्यांना अचानक काम नाकारणे योग्य नाही, याचा विचार करून मापाडी-परवान्यांचे नुतनीकरण करताना वय व शिक्षणाची अट काढून टाकावी अशी मागणी करण्यात आली. सरकारी धान्य गोदामातील कंत्राटी पद्धत बंद करावी. रेल्वे धक्क्यावर कामाचा निपटारा वेगाने होण्यासाठी मालधक्क्याची रचना कामाच्या सोयीने असावी अशा मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात आण्णाप्पा शिंदे, महादेव शेलार, कृष्णात चौगले, गोरख लेंढवे, सुरेश पाटील यांच्यासह पंचायतीचे सदस्य सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५० स्मार्ट सेंटर्सची स्थापना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विद्यार्थ्यांनी अंगभूत कौशल्याचा उपयोग करुन विकास घडवावा', असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रातर्फे आयोजित युवा कौशल्य विकास दिन कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गंत ११ कॉलेजांना अल्टो गाड्यांसह १० लाखांची सामग्री प्रदान करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान कौशल्य विकास आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनांची घोषणा करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शिवाजी विद्यापीठाने कौशल्य विकास साधनसामुग्री वाटप कार्यक्रम राबवून कृतीशीलतेची ओळख करून दिली आहे. कौशल्य विकासाचा कार्यक्रम हा एक दिवसाचा नाही. सरकारी किंवा निमसरकारी नोकरी सर्वांनाच मिळणे शक्य नाही. त्यामुळे नव्या पिढीने रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग स्विकारावा. राज्य सरकारकडे अनेक रोजगार-स्वयंरोजगार विकासाच्या अनेक योजना आहेत. मात्र या योजनेचे लाभार्थी शोधताना धावपळ करावी लागते. त्यासाठी युवकांनी यासारख्या नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ घ्यावा.'

यावेळी युवा जागर अभियानाचे यशवंत शितोळे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह विविध कॉलेजचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक, स्वयंसेवक आदी उपस्थित होते. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी.बी. कोळेकर यांनी आभार मानले.

प्रत्येकी १० लाखांची सामग्री

राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाचे (एन.एस.डी.सी.) विविध कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत ११ कॉलेजला कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांच्या सामग्रीचे वाटप जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यात एका मारुती अल्टो वाहनासह संगणक संच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग संच देण्यात आला.

५० स्मार्ट सेंटर्सची स्थापना

'एनएसडीसीच्या कार्यक्रमांतर्गत येत्या दहा वर्षांत विद्यापीठ परिक्षेत्रात ५० स्मार्ट सेंटर्सची स्थापना करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सुमारे सव्वालाख युवकांना कौशल्य प्रशिक्षित करण्याचा उपक्रमाचे नियोजन आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग, ऑटोमोबाईल, बँकिंग, लोह व धातु उद्योग, विमा तसेच इ-कॉमर्स या क्षेत्रांवर भर देण्यात येईल', अशी माहिती यशवंत शितोळे यांनी दिली.

कॉलेज देणार ड्रायव्हिंग प्रशिक्षण

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, 'महिला व मुली या चारचाकी वाहने कमी चालवितात. त्यांच्यासाठी कॅम्पसवरच प्रशिक्षण व परवाना उपलब्ध करण्याच्या दृष्टीने परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. विद्यार्थ्यांनी आजच्या काळात केवळ पारंपरिक शिक्षण अथवा पदवी घेऊन चालणार नाही. त्यासाठी कौशल्य आत्मसात गरजेचे आहे. आयुष्यातल्या विविध लढाया लढण्यासाठी कौशल्ये हीच खरी साधने आहेत. विद्यापीठातील कॅम्पसवरील विद्यार्थ्यांचे कौशल्यमापनातून विद्यार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल.'

लाभ मिळालेली कॉलेज

शिवाजी महाविद्यालय (सातारा), कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (सातारा), शशिकांत शिंदे महाविद्यालय (मेढा), मुधोजी महाविद्यालय (फलटण), शंकरराव मोहिते महाविद्यालय (रहिमतपूर), बळवंत महाविद्यालय (विटा), पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय (तासगाव), राजे रामराव महाविद्यालय (जत), बाळासाहेब देसाई महाविद्यालय (पाटण), देवचंद महाविद्यालय (अर्जुननगर), डी.आर. माने महाविद्यालय (कागल).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपशावर तहसीलदारांचा छापा

$
0
0

कराड : कोंडवे आणि वर्ये गावांच्या हद्दीतील वेण्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी अचानक छापा टाकला. मात्र, तहसीलदार छापा टाकण्यासाठी आल्याचे पाहून वाळू उपसा करणारे सर्व कामगार पोकलॅन मशीन, बोट आदी साहित्य घटनास्थळी सोडून पळून गेले. त्यामुळे संबंधित ठिकाणी अनधिकृतपणे उपसा कोण करत होते, याची माहिती महसूल विभागाला मिळाली नाही. तहसीलदारांनी पोकलॅन जप्त केले असून, घटनास्थळावरून जवळपास ३५ ब्रास वाळू उपसा झाल्याचे पंचनामा केल्यानंतर स्पष्ट झाले. दरम्यान, उपसा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला जवळपास साडेसात लाखांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर बिबट्या अन् उसात बछडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सायंकाळी साडेसहाची वेळ, नेहमीची वाहनांची वर्दळ आणि रस्त्यावरच अचानक बिबट्याचे दर्शन...त्यानंतर उडालेली लोकांची भंबेरी..., बघ्यांची गर्दी अन् गर्दीला नियंत्रणात ठेवताना पोलिसांची उडालेली तारांबळ, असा एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रकार तळबीड येथील लोकांनी अनुभवला. कराड तालुक्यातील डोंगरी विभागात या पूर्वी अनेकवेळा लोकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. काही लोकांवर बिबट्याने हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत. नेहमी जंगलामध्ये मुक्तपणे वावरणाऱ्या बिबट्यांचे दर्शन आत लोकवस्तीमध्ये तसेच रस्त्यांवर होऊ लागल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तळबीड येथे बिबट्याला अचानक समोर पाहणाऱ्यांचा धरकाप उडाला.

येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजूला सुमारे तीन कि. मी अंतरावर असलेल्या तळबीडकडे (हनुमाननगर, ता. कराड) जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊसाचे शेत आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धनंजय चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण व जयराम चव्हाण तिघेजण मोटारसायकलवरून तळबीडकडे निघाले होते. ते हनुमाननगर येथे आल्यानंतर अचानक रस्त्यावरच त्यांच्या अडवा मादी बिबट्या आला. बिबट्या ज्या बाजूने आला तसाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतात निघून गेला. त्या बिबट्याच्या पाठीमागून येणारे त्याचे दोन बछडे मात्र, त्या तिघांना पाहून पाठीमागे ऊसाच्या शेतात परत गेली. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूच्या शेतात बिबट्या गेला तर बछडे दुसऱ्या बाजूच्या शेतात रस्त्याच्या कडेलाच थांबले होते. तोपर्यंत बिबट्या दुसऱ्या बाजूने तेथून निघून गेला. मात्र, बछड्यांना कोठे जायचे न समजल्यामुळे मादी बिबट्याची वाट पाहत तेथेच ऊसाच्या शेतात थांबून राहिले.

अचानक बिबट्या आडवा आल्याने धनंजय, मच्छिंद्र व जयराम यांची भितीने गाळन उडाली. त्यांनी त्वरीत गावात फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे काही मिनिटांतच तेथे सुमारे दोनशे ते अडीचशे लोक जमा झाले. काहींनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या असल्याचे सांगितले. त्यामुळे वनपाल आनंदराव येळवे यांच्यासह वनरक्षक जगदीश मोहिते, विक्रम निकम व वनमजूर अनिल कांबळे तेथे हजर झाले. लोकांचा मोठा जमाव हनुमाननगर येथील रस्त्यावर जमा झाला. हा प्रकार तळबीड पोलिसांना समजला, तळबीड पोलिसही घटनास्थळी पोहोचले. ऊसाच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती बघता बघता संपूर्ण गावात पसरली. ज्याला कळेल तो हनुमाननगरकडे धाव घेत होता. त्यामुळे रात्र होईल तशी बघ्यांची गर्दी वाढत होती. जो तो बॅटरी घेवून ऊसाच्या शेतात प्रकाश पाडून बछडे दिसतात का ते पाहत होते. काहींना बछडे दिसत होते तर मोठी गर्दी झाल्यामुळे काहींना तेथेपर्यंत जाणेही शक्य झाले नाही. रात्री सुमारे बारापर्यंत हा प्रकार सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’ कारखाना शेतकऱ्यांकडेच हवा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगडची अस्मिता असणारा हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. जिल्हा बँक कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना विकण्याच्या तयारीत आहे. दौलत कारखाना शेतकरी व सभासदांचाच राहिला पाहिजे. यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. दौलतबाबत सभासद व शेतकऱ्यांमध्ये जागृती करुन दौलत वाचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व सभासदांचा शुक्रवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता यशवंतनगर (ता. चंदगड) येथील तालुका संघाच्या गोडावूनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहीती माजी आमदार नरसिंगराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, दौलत कारखाना बंद असल्याने शेतकरी व सभासदांचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. उत्पादक व कामगार देशोधडीला लागले आहेत. कारखान्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांचे दौलत बंद पडल्यामुळे नुकसान झाले आहे. जवळपासचे खासगी कारखाने शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. ऊस वेळेत जावा यासाठी शेतकऱ्यांना खुशालीच्या नावाखाली अधिक पैसे मोजावे लागत आहेत. वाढती महागाई व ऊसावर होणारा खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही रहात नाही. उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरल्याने जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा बँकेच्या कर्जापोटी कारखाना बँकेच्या ताब्यात आहे. बँक कारखाना विकण्याच्या तयारीत आहे. याला माझा नेहमी विरोध आहे. सभासद, शेतकरी, उत्पादक, वाहतूकदार, कामगार व हिंतचितक यांनी एकत्र आल्यास कारखाना वाचविणे अजूनही शक्य आहे. शेतकऱ्यांनी घरातून बाहेर पडून दौलतसाठी एकजूट दाखवावी. नागरिकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मोलाचे मत नोंदवावे. हा मेळावा सर्वपक्षीय असून कृपया यामध्ये राजकारण आणू नये, मेळाव्याला उपस्थित राहून दौलत वाचविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सध्याच्या वातावरणात साहि‌त्यिकांची घुसमट’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

साहित्याचा अंतिम हेतू लोककल्याणाचा आहे. पण सध्याचे राजकीय व सामाजिक वातावरण मुक्त साहित्याला पोषक नाही. लेखकाला गायब करणारी समाजस्थिती बनत चालली आहे. व्यवस्थेवर बोट ठेवून नाहीरे वर्गाची बाजू उचलणाऱ्या साहित्यिकाची कोंडी या स्थितीमुळे होत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी 'समाजस्थिती व साहित्यिकांची मानसिकता' यावर भाष्य केले.

ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी आपटे वाचन मंदिराला दिलेल्या देणगीतू देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी, माणसाचे दु:ख आणि घुसमट साहित्यातून प्रकट झाल्यास परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने काही पाऊले पडतील. साहित्याने जगणे समृद्ध केले आहे. सामाजिक क्रांतीचा मूलाधारही साहित्यच आहे, असे मत व्यक्त केले. वाचनाचे आकलन मातृभाषेतूनच खऱ्या अर्थाने होत असते. जाणिवा निर्माण करण्याचे काम वाचनातून होत असते. तेथेच सृजनशिलतेचा अंकुर फुलत राहतो, असेही ते म्हणाले. आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष अॅड. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक तर स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास शहा यांनी स्वागत, प्रा. अशोक दास यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. जयप्रकाश शाळगांवकर यांनी पाहुण्यांचा तर डॉ. शिंदे यांनी परीक्षक व प्रकाशकांचा सत्कार केला. अशोक केसरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुषमा दातार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाच्या आगमनाकडे डोळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्याभरापासून ओढ दिल्यामुळे अधिक पावसाचे क्षेत्र असलेल्या चंदगड आणि शाहूवाडी तालुक्याती॓ल शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. या दोन्ही तालुक्यांत रोपलावणी सुरू असून त्याासाठी ओढे आणि ओहळांचा आधार घेतला जात आहे.

पिके मोजताहेत अखेरच्या घटका

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यात पाऊस गुल झाल्याने पीकस्थिती फारच गंभीर बनली आहे. भात व ऊसांसह अन्य पिके पूर्णपणे धोक्यात आली आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात रेंगाळलेली रोपलावणीची कामे विद्युत पंप सुरु करून पूर्ण करण्याच्या कामात बळीराजा गुंतला आहे. रोप लावणीच्या भात पिकांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. तुरळक असेना का पण पाऊस पडण्याची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

तालुक्याच्या आंबा, चांदोली, विशाळगड, येळवण जुगाई, परळे निनाई, आळतूर, कडवे, शित्तूर वारुण, कांडवण, माण या पावसाच्या भागात भाताची रोप लावण विद्युत पंप सुरु करून अद्यापही सुरु आहे. इथल्या डोंगर भागात सर्वाधिकपणे असलेल्या रताळीच्या पिकालाही पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. भात, ऊस, भुईमूग व रताळी या पिकांना मिळेल त्या ठिकाणांहून पंपाद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगभग सुरु आहे. पूर्वेकडील भागातली भात पिके वाळून जाऊ लागली आहेत. चैन पडेना म्हणून बरेच शेतकरी भांगलणी व कोळपणी यासारखी मशागतीची कामे पुन्हा पुन्हा करताना दिसत आहेत. ज्या भागात किमान पातळीवर तुरळक पावसाच्या सरी पडतात त्या आंबा, विशाळगड, शित्तूर वारुण, उदगिरी, अनुस्कुरा, येळवण जुगाई या भागातही पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे.

ओढ दिल्याने शेतकरी हवालदील

चंदगड : गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन बिघडले आहे. ऐन पावसाच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्याचा हंगाम रोपलावणीचा असताना पाऊस नसल्याने रोपलावण लांबणीवर पडली आहे. रोपलावण करण्यासाठी शेतकऱ्यांवर 'पाणी देता का पाणी' असे म्हणण्याची वेळ आली आहे. रोपलावण केलेले शेत पाण्याअभावी वाळत असल्याने शेतकरी वर्ग आकाशाकडे डोळे लावून आहे.

गेल्या पंधरा दिवसात तुरळक पाऊस झाला आहे. मात्र गेल्या पाच दिवसापासून पावसाने अजिबात हजेरी लावली नाही. पावसाचा पत्ता नाही व कडाक्याचे ऊन पडत असल्याने पिके कोमेजून जात आहेत. पिकांना जगविण्यासाठी शेतकरी मिळेल तेथून पाणी मिळविण्यासाठी धडपडत आहे. नदीशेजारील पिकांना जगविण्यासाठी एरवी बंद करुन ठेवलेले विद्युत पंपांना चांगलाच भाव आला आहे. पाऊस नसल्याने नद्यांची पाणीपातळी कमालीची घटली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात एकादा पूर येण्याची परिस्थिती असते. यावेळी मात्र याउलट परिस्थिती आहे. तालुक्याच्या पूर्व भागात रोपलावण पद्धतीने भातशेती केली जाते. येथील मृदा तांबडी असल्याने पाणी जास्त लागते. मात्र पाऊस नसल्याने रोपलावणीला आलेले भातपिक जाते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानपमान नाट्यावर पडदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज पंचायत समितीत लोकप्रतिनिधी आणि गटविकास अधिकारी यामध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या वादावर अखेर सोमवारी पडदा पडला. रजेवर गेलेल्या गटविकास अधिकारी चंचल पाटील रूजू झाल्याने आवळ्याचा भोपळा करून गोंधळ घालणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्रकारातून गमावले काहीच नाही, पत मात्र गमावून बसले. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रनिधी किती बेजबाबदार वागू शकतात हेच या प्रकरणावरून दिसून येते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या गडहिंग्लज दौऱ्यावर आले असता, उशिरा आलेल्या कर्मचा ऱ्यांना रोखण्यावरून खडाजंगी झाली. त्यावेळी बीडीओ चंचल पाटील उशिरा आल्या असता त्यांच्या खुर्चीत शशिकांत खोत बसल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मानापमान नाट्य घडले. खोत यांनी हजेरीपत्र तपासणे आणि खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून झालेला वादाची जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते जिल्हा परिषदपर्यंत सर्वत्र चर्चा झाली. या सगळ्यात अवसान आलेले पंचायत समितीचे सदस्य हाताच्या बाह्या मागे सारून अधिकाऱ्यांवर टीका करत सुटले. काहीही झाले तरी बीडीओ पाटील यांना पाय ठेवू द्यायचा नाही असा निर्धारच त्यांनी केला होता. वैयक्तिक पातळीवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या कार्यालयाला कुलूप सुद्धा ठोकण्यात आले. या कालावधीत लोकप्रतिनिधी विरुद्ध कर्मचारी असा सामनाचा रंगला होता.

याबाबत चंचल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, काही संशयास्पद कामे रोखल्याने व काहींवर कारवाई केल्याच्या रागातून आपल्यावर टीका होत असल्याचे यांनी सांगितले. तर पाटील या चुकीच्या पद्धतीने काम करतात, लोकप्रतिनिधीना विचारत नाहीत असा लोकप्रतिनिधींनी आरोप केला. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर टोकाची भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अचानक मवाळ झाले. माध्यमांना माहिती देण्यासाठी दहा-दहावेळा फोन करणारे व तालुक्यात टाचणी जरी पडली तरी मला कळते असे म्हणणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळपर्यंत गटविकास अधिकारी हजर झाल्याचे माहीत नव्हते. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनीही आपली मर्यादा न ओळखल्याने गडहिंग्लजची पुरती अब्रू गेली तरी गेलीच.

गटविकास अधिकारी चंचल पाटील यांच्या कारभाराविषयी आजही आक्षेप आहे. आंदोलनादरम्यान सर्व पदाधिकारी एकत्र होते. त्यानंतर सदर विषयासंदर्भात तोडगा काढण्यासाठी झालेल्या सामोपचाराच्या बैठकीसंदर्भात मला कोणतीच कल्पना नाही.

- बाळेश नाईक, पं. स. सदस्य

गटविकास अधिकारी आणि सदस्यांमधील वाद गैरसमजुतीने झाले होते. मात्र या समस्येवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला आहे. या प्रकरणी पाटील यांनी दोन पावले मागे येत माणुसकीच्या दृष्ट‌िने संपवला आहे.

- अमर चव्हाण, पं. स. सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोलेरो नदीत कोसळून दोघे ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

बोलेरो गाडीवरील चालकाचा ताबा सुटून गाडी कडवी नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर गाडीतील अन्य दोघेजण जखमी झाले. मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

अपघातात प्रीतम गजानन शिरधनकर ( वय ३०) व प्रशांती प्रभाकर हळदणकर ( वय ४५, रा. नांदिवडे, ता. जयगड, जि. रत्नागिरी) हे दोघे ठार झाले तर प्रीमेश प्रभाकर हळदणकर ( वय ३०) आणि अरुणा हळदणकर (वय ४८) हे दोघेजण जखमी झाले. अपघातातील चौघेजण मुळचे नांदिवडे व नेवरे तालुका जयगड येथील असून ते जवळचे नातेवाईक आहेत. ते कामानिमित्त बेळगावला गेले होते. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना वारूळ येथील वळणांवर चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटले व गाडी कठड्यावरून थेट शंभर फूट नदीपात्रात जाऊन कोसळली. ज्या ठिकाणी गाडी उलटली त्या ठिकाणाहून पाणीही वाहत होते. गाडी कठड्याला ठोकरून नदीत कोसळल्याचा आवाज जवळच्या लोकापर्यंत पोहोचल्याने स्थानिक लोकांनी धाव घेतली व बचावकार्य सुरु केले. प्रशांती हळदणकर व प्रीतम शिरधनकर हे दोघे गाडीखाली सापडल्याने ते जागीच मृत झाले होते. अपघातील अरुणा शिरधनकर जखमी झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हते. केवळ गावाचे नाव सांगू शकल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करणे सोपे झाले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी संजय विश्वास केंगार (वय ३०, रा. यादवनगर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. घाटपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी संजयने पत्नी आरतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला होता.

संजय व आरतीचा १४ वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. आरती हॉटेलमध्ये काम करत होती. तिचे अनैतिक संबध आहे असा संशय घेऊन तो त्रास देऊन मारहाण करत होता. आरतीने २०१२ मध्ये राजारामपुरी पोलिस ठाण्यात संजयच्या विरूद्ध तक्रारही नोंदवली होती. तक्रारीनंतर आरती माहेरी साताऱ्याला गेली होती. २०१४ च्या मे च्या शेवटच्या आठवड्यात संजय आरतीला घेऊन गेला. १३ जून २०१४ रोजी आरतीची आई सुमन भेटायला आली असता संजय त्रास देत असून गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरतीने आईला सांगितले. आरतीच्या जिवाला धोका आहे असे लक्षात घेऊन आरतीला घेऊन जाण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. ही गोष्ट समजताच चिडलेल्या संजयने आरतीच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला.

हा खटला न्यायाधीश घाटपांडे यांच्यासमोर चालला. सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी २० साक्षीदार तपासले. आरोपी संजयची आई, मुलगा व बहिण फितूर झाले. आरतीची आई सुमन, मुलगी शितल कांबळे, आरोपीचे शेजारी रेणुका कराडे, पंच, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शरद माळी, बजरंग बड्डीवाले, अविनाश गावडे यांच्या साक्षी ग्राह्य धरल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या समीकरणाची नांदी

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

लोकसभा व विधानसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या गोकुळ, जिल्हा बँक व बाजार स​मिती निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षापेक्षा स्वतःचा राजकीय स्वार्थ पहिल्याने त्यांची चांदी झाली. या सोयीत राष्ट्रवादीने अतिशय नियोजनबद्ध खेळी करत सहकारी संस्थेतील आपली ताकद वाढवली. याचवेळी काँग्रेसला मात्र पुन्हा एकदा गटबाजीचा फटका बसला. दोन्ही काँग्रेसच्या भांडणाचा फायदा शिवसेना व भाजपला झाला. सहकारी संस्थेत या पक्षांना चंचूप्रवेश मिळाला आहे. बाजार समितीच्या निकालाने आमदार हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सतेज पाटील व विनय कोरे यांची युती महापालिका निवडणुकीसाठी नव्या समीकरणाची नांदी आहे.

लोकसभा निवडणूक दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकदिलाने लढवली. याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. काँग्रेसच्या ताकदीमुळेच धनंजय महाडिक खासदार झाले. इचलकरंजीत मात्र हाताला राष्ट्रवादीची म्हणावी तेवढी ताकद मिळाली नाही. त्यामुळे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या पराभवाचे मताधिक्य प्रचंड वाढले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. त्याचा सर्वाधिक फायदा शिवसेनेला झाला. भाजपाला दुसऱ्या जागेच्या रूपाने बोनस मिळाला. राष्ट्रवादीने दोन जागा मिळवत अब्रू वाचवली. यामध्ये अब्रू गेली ती काँग्रेसचीच. नेत्यांमधील गटबाजीमुळे या पक्षाला मोठा दणका बसला. पक्षाचे नुकसान झाले. तरीही अजूनही नेत्यांच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचा पुन्हा दणका आता बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. बाजार समितीत ताकद नसलेल्या सेना भाजपला तीन जागा मिळाल्या. पण एकेकाळी सत्ता भोगलेल्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यावरून पक्षाचे कसे तीन तेरा वाजले हे लक्षात आले.

आतापर्यंत झालेल्या तीन सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झाला. मुश्रीफ यांनी अतिशय मुत्सुद्दगिरीने काँग्रेसच्या ताकदीचा वापर राष्ट्रवादीसाठी करून घेतला. काँग्रेसमधील गटबाजीचा फायदा घेत तीनही संस्थेत पाय रोवले. गोकुळमध्ये निवडून येण्याची ताकद नसताही तेथे या पक्षाला दोन जागा मिळाल्या. जिल्हा बँकेत सत्ता मिळाली. बाजार समिती​ ताब्यात घेतली. यामुळे एकीकडे राष्ट्रवादीची ताकद वाढत असताना काँग्रेसला मात्र दणका बसत आहे. जिल्हा बँकेत जनसुराज्यला सोबत घेत राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. बाजार समितीत सतेज पाटील यांना जवळ करत काँग्रेसला भुईसपाट करण्याची राजकीय खेळी खेळली. पी. एन. पाटील यांना एकाकी पाडत या पक्षाला दणका दिला. पक्षाचे आमदार असलेले आमदार महादेवराव महाडिक देखील फारसे सक्रीय न झाल्याने या पक्षाचे तीन तेरा वाजले. इतरांच्या ताकदीचा वापर करत राष्ट्रवादी मजबूत होत असताना काँग्रेस मात्र दुबळे होत आहे. याला नेत्यांचेच राजकारण कारणीभूत होत आहे.

मुश्रीफ, कोरे , पाटलांची एकी

बाजार समिती​च्या निमित्ताने मुश्रीफ, कोरे व पाटील एकत्र आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणाची ही नांदी आहे. महाडिक यांनी ताराराणी आघाडीला पुढे करत भाजपला मदत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत महाडिक यांना दूर ठेवण्यासाठी ही नवी युती प्रयत्न करण्याची शक्यता आहे. सहा ​महिन्यात विधानपरिषद निवडणूक आहे. यामध्ये महाडिक यांना रोखण्यासाठी ही युती प्रयत्न करेल यात शंका नाही. त्या दृष्टीने पावले पडत आहेत. यापूर्वी महाडिक यांनी सतेज पाटील यांना रोखण्यासाठी काँग्रेसचे नुकसान केले. आता सतेज पाटील महाडिक यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतील. यात होणार आहे ते पुन्हा पक्षाचेच नुकसान. दोन नेत्यांच्या वादात पक्षाचे नुकसान होत असल्याचे दिसत असूनही खेळ्या कायम राहत आहे याचा फायदा मात्र राष्ट्रवादीला होत आहे. शिवसेना भाजप चे पाय सहकारात रोवण्यासाठी दोन्ही काँग्रेसच मदत करत आहेत हे विशेष.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडताळणी युद्धपातळीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीने केलेल्या कामाची पडताळणी सुरू झाली आहे. अंतिम मूल्यांकन ठरविण्याच्या प्रक्रियेतील हा महत्वाचा टप्पा मानला जातो. प्रकल्पातील कामाचे मोजमाप, प्रत्यक्षातील काम, अपुरी कामे या संदर्भात सर्व्हे आणि अहवालचे काम नोबेल कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सादर केले आहे. महामंडळाने फेर मूल्यांकन उपसमितीच्या सदस्यांना अहवालाची प्रत उपलब्ध केली असून त्याची युद्धपातळीवर पडताळणी सुरू आहे. आर्किटेक्ट अँड इंजिनीअर्स असोसिएशनचे ४० पदाधिकारी अहवालाची पडताळणी करत आहेत. दुसरीकडे प्रकल्पाचे मूल्यांकन ठरविण्याअगोदर फेर मूल्यांकन पाच सदस्यीय उपसमितीची कोल्हापुरात बैठक घ्यावी, अशी मागणी समिती सदस्यांनी केली आहे.

नोबेल कंपनीने एमएसआरडीसला सादर केलेल्या अहवालात प्रकल्पांतर्गत एकूण झालेले काम, त्या कामासाठीच्या दराचा समावेश आहे. आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंग असो​सिएशनच्या ससहकार्याने 'नोबेल'च्या अहवालाची पडताळणी होणार आहे. पडताळणीनंतर त्रुटी निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत. अहवालाची पडताळणी, समिती सदस्यांच्या सूचना यानंतरच प्रकल्पाच्या मूल्यांकनाचा अंतिम अहवाल सादर होणार आहे.

रस्ते प्रकल्पाचा महापालिकेचाही स्वतंत्र अहवाल

महापालिका प्रशासनानही रस्ते प्रकल्पाचा स्वतंत्र अहवाल तयार करत आहे. अपुरी कामे, न झालेली कामे आ​​णि उपयोगात नसलेली कामे अशा तीन टप्प्यांत त्याचे वर्गीकरण केले जात आहे. गेले महिनाभर रस्त्याच्या मोजमाप, कामाबद्दलचा सर्व्हे केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अहवाल बनविला जात आहे. युटिलिटी शिफ्टींग, फूटपाथ, गटर्स या कामांचाही यामध्ये समावेश असणार आहे. येत्या दोन दिवसात अहवाल तयार होईल, अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

उपसमितीची कोल्हापुरात बैठक घ्यावी

फेरमूल्यांकनासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय उपसमितीची कोल्हापुरात बैठक व्हावी, अशी मागणी एमएसआरडीकडे करण्यात आली आहे. रस्त्याची कामे निकृष्ट आहेत, रस्त्याला तडे गेले आहेत, फूटपाथ, गटर्सच्या कामाची गुणवत्ता नाही. मूल्यांकन समितीतील सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा ही कामे पाहिली की मूल्यांकन करताना वस्तुस्थिती समोर असणार आहे. यासाठी प्रकल्पाचे अंतिम मूल्यांकनाअगोदर उपसमितीची बैठक कोल्हापुरात घ्यावी अशी मागणी केल्याचे राजेंद्र सावंत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी मशिनचा निर्णय न्यायालयात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चिनी बनावटीच्या सोनोग्राफी मशिन तपासणीचा निर्णय न्यायालयात होणार आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार महानगरपालिकेच्यावतीने आरोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात आरोपपत्र सादर होणार आहे, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

गर्भलिंग चाचणीसाठी चिनी बनावटीचे अनधिकृत सोनाग्राफी मशिन खरेदी करणाऱ्या सोनोग्राफी मशिन विकेता एजंट श्रीपाद मधूसुदन गाड, बोगस डॉक्टर हिंदूराव पोवार, डॉ. हर्षल नाईक, चालक सुशांत दळवी डॉ. विक्रम आडके, एजंट गजेंद्र कुसाळे, गजानन शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांच्या अटकेनंतर चौकशी करताना पोलिसांनी या गुन्ह्यातील अन्य चौघांना अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्यात तीन सोनाग्राफी मशिन ताब्यात घेतली आहेत. सोनाग्राफी मशिन महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीने सील करून ताब्यात घेतली आहेत.

मशिनची तपासणी मुंबईत केली जाईल असे पोलिसांनी सांगितले होते. पण मशिनच्या तपासणीचा निर्णय महानगरपालिका पीसीपीएनडीटी समितीने घेतलेला नव्हता. यापूर्वीच्या गर्भलिंग चाचणीच्या गुन्ह्यात महानगरपालिका न्यायालयात पुराव्याच्या दृष्टीने कमी पडली होती. या गुन्ह्यात महापालिकेने सरकारी वकीलांचा सल्ला घेतला असून त्यानुसार लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. जप्त केलेल्या सोनोग्राफी मशिनच्या तपासणीबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अधिकृत संस्थेत तपासणी केली जाणार आहे. पीसीपीएनडीटी समितीला अधिकृत मशिनबाबत कागदपत्रांची मागणी संबधित डॉक्टरांच्याकडे करता येते. पण या गुन्ह्यात सोनाग्राफी मशिन अनाधिकृत असल्याने व कागदपत्रे नसल्याने मशिनची तपासणी महत्वाची ठरणार आहे. अधिकृत सोनाग्राफी मशिनमध्ये नोंदी ठेवण्याची यंत्रणा अस्तित्वात आहे. पण चिनी बनावटीच्या मशिनमध्ये अशी यंत्रणा आहे का हे न्यायालयाने दिलेल्या तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. पुढील आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल, अशी माहिती महानपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images