Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

छाननीतच सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रांची सोमवारी छाननी करण्यात आली. अत्यंत चुरशीने होत असलेल्या यानिवडणुकांसाठी अनेकांनी विरोधकांना पहिल्याच टप्प्यात रोखण्यासाठी छाननीवेळी आक्षेप घेत रोखण्याचा प्रयत्न केला. नव्याने राबविण्यात आलेल्या पद्धतीमुळे अनेकांचा गोंधळ उडत होता. तर बँक पासबुक, आधार कार्ड, ऑनलाइन पद्धतीतील चुका आदींवरी आक्षेप घेतले. मात्र, संभवित चुका लक्षात घेवून अर्ज ग्राह्य माणण्यात आले.

गडहिंग्लजमध्ये २४ अर्ज अवैध

गडहिंग्लज : तालुक्यात ४८ पंचवार्षिक तर दोन ग्रामपंचायतींची पोटनिवडणुका होत आहे. यासाठी विक्रमी १७२५ अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हणमंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये २४ अर्ज अवैध तर १७०१ अर्ज वैध ठरले आहेत. बुधवारी (दि.१५) माघारीची मुदत असून त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. दरम्यान तालुक्यातील दुगूनवाडी, इदरगुच्ची, शिंदेवाडी, मुंगुरवाडी या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. छाननीत बुगडीकट्टी, कानडेवाडी (प्रत्येकी ३), तेरणी, दुंडगे, हसूरचंपू, मानवाड, चिंचेवाडी (प्रत्येकी २), मुत्नाळ, मासेवाडी, नौकुड, इंचनाळ, बेळगुंदी, हनिमनाळ, हेब्बाळजलद्याळ व चन्नेकुपी येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध घोषित करण्यात आला. अर्जांच्या अपात्रेसाठी दोनपेक्षा जास्त अपत्य, जात वैधता प्रमाणपत्राची अनुपलब्धता, वयाची अट पूर्ण नसणे तसेच आरक्षित जागेवर चुकीचा अर्ज भरणे आदी गोष्टी कारणीभूत ठरल्या. निवडणूक निरीक्षक म्हणून उपजिल्हाधिकारी शंकरराव भोसले उपस्थित होते.

शाहूवाडीत ११ अर्ज अवैध

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायती आणि सात ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी अर्ज छाननी दरम्यान ११ अर्ज अवैध ठरले. अर्ज छाननी दरम्यान काही उमेदवारांनी जातीच्या दाखल्याचे टोकण जोडले नव्हते तर काही उमेदवारांचे आधार कार्ड, बँक खाते, जातपडताळणी दाखला, शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे या बाबींची पूर्तता न केल्याने हे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे निवडणुकीसाठी ७२१ अर्ज शिल्लक राहिले. सात पोटनिवडणुकीसाठी असलेले आठही अर्ज वैध राहिले. तालुक्यातील गजापूर-विशाळगड, सावर्डे बुद्रुक, सोंडोली, कांडवण, मोळावडे, जाम्बुर, पणुद्रे- म्हाळसवडे, बुरंबाळ, पेंडाखळे, थेरगाव-सैदापूर, मानोली, शिंपे, नांदारी, नांदगाव, परळे निनाई-वाकोली, सोनुर्ले, परळी, वारूळ, शित्तूर तर्फ मलकापूर, शित्तूर वारुण, वडगाव, ओकोली, पाटणे, गिरगाव, पेरीड-गाडेवाडी, नेर्ले, शिराळे तर्फ मलकापूर, परळे-मुटकलवाडी, शिरगाव, सवते, गोन्डोली, आंबा-चाळणवाडी-तळवडे, वाडीचरण, थावडे, सोनवडे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

चंदगडमध्ये १०१२ अर्ज शिल्लक

चंदगड : तालुक्यामध्ये ३९ ग्रामपंचायतीसाठी १०३८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीमध्ये आज २६ अर्ज अवैध ठरले. छाननीनंतर १०१२ अर्ज शिल्लक राहिले. पोटनिडणुकीसाठी एकही अर्ज अवैध ठरला नसल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी दिली.

गावनिहाय शिल्लक राहिलेले अर्ज असे, आसगाव ३१ , नागवे २७, पुंद्रा ३२, इब्राहिमपूर ३४, कानडी १९, केरवडे ३०, मुगळी ९, बोजुर्डी २२, बागिलगे १९, दाटे ३५, मांडेदुर्ग ४१, ढोलगवाडी ६, म्हाळेवाडी ८, किणी ३१, घुलेलवाडी १८, तावरेवाडी २४, धुमडेवाडी १५, मलतवाडी ४६, बसर्गे २५, कालकुंद्री ६१, दिंडलकोप १४, राजगोळी बु. ४१, होसूर २०, किटवाड १०, कोवाड ५२, करेकुंडी १७, शिनोळी खुर्द ४७, कौलगे २१, देवरवाडी २५, माडवळे २६, बुक्कीहाळ ६, हजगोळी २९, तुडये ३२, सुरुते १४, सुंडी १४, पाटणे १६, नांदवडे ३३, कळसगादे १३, हलकर्णी ४५. आमरोळी गावासाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून तो वैध ठरला आहे.

राधानगरीत २२ अर्ज अवैध

राधानगरी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुक्यातील विविध गावातून दाखल झालेल्या एकूण ६८७ उमेदवारी अर्जापैकी आजच्या छाननी प्रक्रियेत २२ उमेद्वारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून उर्वरित ६६५ अर्ज वैध ठरले आहेत. अशी माहिती तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी दिली. या टप्प्यात तालुक्यातील संवेदनशील असलेल्या पनोरी,तळाशी,गुडाळ् नरतवडे, आणाजे, चाफोडी, मल्लेवाड़ी, हेळेवादी आदी प्रमुख गावासह २० गावातील निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यासाठी संबधित गावातून एकूण १३६ जागांसाठी तब्बल ६८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी २२ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सबळ पुराव्याअभावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरविले. चाफोडी तर्फ ऐनघोल या गावातील प्रत्येकी एक-एक अर्ज अवैध ठरला आहे. यावेळी स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शिरोळमध्ये २८ अर्ज अवैध

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची सोमवारी छाननी करण्यात आली. या छाननीत १७ गावातील २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर १८४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. जांभळीच्या ललिता अर्जुन कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्याठिकाणी माधुरी नितीन देवकारे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जांभळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गणपतराव पाटील गटाला मोठा हादरा बसला आहे.

शिरोळ पंचायत समिती सभागृह आणि महसूल भवन येथे सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. ही छाननी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. छाननी प्रक्रियेवेळी अनेक उमेदवारांनी आपल्या सोबत वकील आणले होते. काही गावातील उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे या ठिकाणची छाननी उशिरापर्यंत सुरू होती. उमेदवारांच्या वयाचा दाखला, तसेच उमेदवार वापरत असलेले शौचालय, जातीचे प्रमाणपत्र, उमेदवारांचे अपत्य उमेदवारांची शासकीय येणेबाकी, या निकषावर १७ गावातील २८ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले.

आजऱ्यात १० अर्ज अवैध

आजरा तालुक्यातील २० ग्रामपंचायतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी १० जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २० ग्रामपंचायतींसाठी आता एकूण ४९७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. आजरा तहसील कार्यलयामध्ये झालेल्या छाननीमध्ये होनेवाडी १, गवसे १, वाटंगी १, जाधेवाडी १, खोराटवाडी २, हाळोली-मेढेवाडीव दर्डेवाडी ग्रुप ग्रामपंयाचायत १, कासारकांडगाव १ व बेलेवाडीच्या २ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अर्ज सादर करण्याच्या मुदतीत ५०७ अर्ज दाखल झाले होते.

पन्हाळ्यात एक ग्रामपंचायत बिनविरोध

पन्हाळा तालुक्यातील निवडणुक लागलेल्या ४१ ग्रामपंचायतीसाठी एकूण १६१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत ३५ अर्ज अवैध ठरल्याने आता एकूण ३७५ जागांसाठी १५८२ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. बुधवारी होणाऱ्या माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील वारनूळ ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून आणखी तीन ते चार ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. माजनाळ, पुशिरे, उत्रे, सातवे, आपटी येथे प्रत्येकी एक, हारपवडे, निवडे, आवळी, कणेरी, तिरपण येथे प्रत्येकी दोन, नणुंद्रे, कळे येथे तीन तर पोहाळे येथे चार आणि सातार्डे, नावली येथे प्रत्येकी पाच अर्ज अवैध ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चन्नेकुपीत महिलेस डेंगीची लागण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

चन्नेकुप्पी (ता.गडहिंग्लज) येथील मालश्री महादेव आरबोळे (वय ३०) या महिलेला डेंगीची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मालश्री गेल्या दोन-तीन दिवसांपासून आजारी होत्या. संकेश्वर येथील डॉक्टर्सनी त्यांची तपासणी केली असता हा रुग्ण डेंगीचा असावा अशी शंका आली. म्हणून तपासणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात तपासणी केली. येथील तपासणीत डेंगीची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्यांचेवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी चन्नेकुपी गावाला भेट देऊन उपाय योजना सुरु केल्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, गावातील गटर तुंबल्या असून गटरमधूनच पाणी पुरवठ्याची पाइप जातात. याच ठिकाणी केबल खोदाईचे काम सुरु असून काही ठिकाणी पाण्याच्या पाइप क्रॅक झाल्याचे आढळून आले. गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर उघडी असून ती तत्काळ स्वच्छ करून ती बंदिस्त करून घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. गावातील पाणीपुरवठा टाकीमध्ये टीसीएलचा वापर केला जातो. तसाच वापर विहिरीमध्ये होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावातील सर्व नागरिकांची तपासणी सुरु केली असून गाव पिंजून काढण्यात आला आहे. दहा कर्मचाऱ्यांच्या पाच टीम करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता होणार कागदपत्रांबाबत निर्णय

$
0
0

दीपक शिंदे, कोल्हापूर

कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले तर एकावर एक रचून ठेवलेले कागदपत्रांचे ढीग पहायला मिळतात. वर्षानुवर्षे रचून ठेवलेले हे कागदपत्रांचे ढीग कधी पावसात भिजतात तर कधी उंदीर कुरतडून त्याचे तुकडे पडतात. पण, सरकारी कागद टाकायचा कसा? याच चिंतेत कोणताही अधिकारी त्याची व्यवस्था करत नाहीत. आता यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला असून कागदपत्रे जतनही करण्यात येत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कापडात कायम जतन करावयाची आणि अपिलाबाबतची कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत.

सहकार विभागात दाखल झालेल्या वेगवेगळ्या कामांच्या फाइल्सचा निपटारा करण्याबरोबरच काही संस्थांचे रेकॉर्ड कायमस्वरुपी जतन करण्याचे काम सहकार विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. आत्तापर्यंत कुठेतरी पडलेली कागदपत्रे सध्या रॅकमध्ये व्यवस्थित ठेवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या कापडांचाही वापर करण्यात येत आहे.

पांढऱ्या रंगाच्या कापडात ठेवण्यात आलेले रेकॉर्ड हे अपिलात असलेल्या कागदपत्रांचे आहे. त्याबरोबरच हिरव्या रंगातील कापडातील, पिवळ्या रंगातील आणि लाल रंगातील कापडात ठेवलेले कायम स्वरुपी जतन करून ठेवण्याचे रेकॉर्ड असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अस्ताव्यस्त पडलेले कागदही आता नीटनेटके ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या सुनावणीवेळी नेमकेपणाने ही कागदपत्रे काढता येतात.

कोल्हापूर हे विभागीय कार्यालय असल्याने याठिकाणी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील कागदपत्रांची आवक होते. त्यामुळे जिल्ह्यानुसार कागदपत्रांची नोंद ठेवण्यात आली आहे. सध्या मोकळ्या रॅकवर ठेवण्यात आलेली ही कागदपत्रे बंदिस्त कपाटांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयातील अस्ताव्यस्तपणाही झाकला जाणार आहे.

सहकार विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठीही सहकार विभाग सज्ज झाला आहे. तीनही जिल्ह्यांच्या पातळीवर ग्रामीण भागापर्यंत संगणक व्यवस्था करण्यात आली असून सर्व यंत्रणा संगणकाच्या माध्यमातून जोडण्यात आली आहे. त्यामुळे सहकार विभागाचे कामकाज जलद होण्यासही मदत होणार आहे. अनेक दिवस आदेश न मिळणे, फाइल गहाळ होणे असे सर्व प्रकार या प्रक्रियेमुळे थांबणार असून अत्यंत पारदर्शकपणे काम होण्यास मदत होणार आहे. सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यापूर्वीही जमाबंदी विभागात हीच पद्धत लागू केली होती. सहकार विभागाचे आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आता झिरो पेंडन्सी आणि संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठीही ते आग्रही असल्यामुळे या विभागाचा कारभार अधिक स्वच्छ होईल अशी अपेक्षा आहे. जिल्हा आणि विभागीय पातळीवर देखील सहकार विभागाच्यावतीने या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे सर्व संस्था एकत्रित येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ची निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा मोहल्ला अस्सी हा हिंदी चित्रपट बंद करावा, अमरनाथ यात्रेकरूच्या अन्नछत्रावर लावलेला कर रद्द करावा, आदी मागण्यांसाठी कागल बसस्थानक चौकात 'राष्ट्रीय हिंदू आंदोलन' संघटनेच्यावतीने जोरदार निदर्शने केली.

१४ जुलै रोजी सिहंस्थ कुंभ मेळ्याचे ध्वजारोहन नाशिक येथे होत आहे. सात जून रोजी कुंभ मेळ्याच्या ठिकाणी मोठा पाऊस झाल्याने तेथे उभारण्यात आलेले मंडप कोसळले आहे. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट आहे. याचा शासनाने विचार करावा. गोदावरी नदीवरील प्रदूषण रोखावे. कुंभ मेळ्यासाठी युद्ध पातळीवर कामाची पूर्तता करण्यासाठी निधी तातडीने देण्यात यावा. यावेळी शिवप्रतिष्ठाणचे विजय आरेकर, नितीन बागडी, राजन बुगडे, शिवानंद स्वामी, केदार साकेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नगरपालिका बरखास्त करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर जात आहेत. जनतेसाठी काहीतरी करत असल्याचा फार्स करुन शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या सभागृहाचा अपमान करीत आहेत. हे शहरासाठी भूषणावह नसल्याने इचलकरंजी नगरपालिका बरखास्त करावी, अशा मागणीचे निवेदन इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले. यावेळी पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगरपालिका सत्तेत शिवसेनेचे नगरसेवक सहभागी असताना शिवसेनेने काढलेला हा मोर्चा म्हणजे नगरसेवकांना घरचा आहेरच असल्याची चर्चा आहे.

गेल्या आठवड्यात पालिका सभेत झालेल्या गोंधळामुळे सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. पवित्र सभागृहाचा अवमान करीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या विश्वासाला तडा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. निवेदनात, सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून लौकिक असलेल्या पालिकेत खुर्चीसाठी सत्ताधारी-विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. नगराध्यक्ष व प्रशासन अधिकारी यांचा सभागृहात अंकुश नाही. शहरवासियांबद्दल आत्मियताच न उरल्याने कचरा उठाव वेळेत होत नाही त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे. आयजीएम हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होत आहे. शहर विकासासाठी आलेल्या निधीत किती टक्केवारी मिळते यातच नगरसेवक मग्न आहेत. त्यामुळे नागरिकांना फसवणारी बिनकामाची नगरपालिका बरखास्त करावी असे नमूद केले आहे. या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, गोरख पुजारी, संजय पाटील, पवन मेटे आदी सहभागी होते.

शिवसेनेचे नगरसेवक गैरहजर

शिवसेनेच्या वतीने नगरपालिका बरखास्तीची मागणी करताना पक्षाची भूमिका मांडली गेली. यावेळी सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा शविआचे गटनेते महादेव गौड, उपशहरप्रमुख सयाजी चव्हाण, नगरसेविका संगीता आलासे हे मात्र आंदोलनापासून अलिप्त राहिल्याने तो एक चर्चेचा विषय बनला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने बारा कुत्र्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

महागाव (ता.गडहिंग्लज) येथील ओढ्याच्या पात्रात विजेची तार पडल्याने धक्का बसून बारा कुत्री मृत्यूमुखी पडली. गावाच्या वेशीजवळील पेट्रोल पंप व लिंगायत समशानभूमीच्या मध्ये असलेल्या ओढ्याच्या पाण्यात विद्युतवाहक तार पडल्याने ही दुर्घटना घडली. या ओढ्यामध्ये व्यापारी तसेच व्यावसायिक कचरा टाकतात. मटण मार्केट व पोल्ट्रीतील मांससुद्धा टाकले जाते. रात्रीच्या सुमारास मांस खाण्यासाठी मोठ्याप्रमाणत कुत्र्यांची झुंबड उडते. याच ओढ्यावरून विद्युत वाहिनी गेली आहे. रात्री अचानक यातील विद्युत वाहिनी तुटून ओढ्याच्या पाण्यात पडली. त्यावेळी वीजपुरवठा सुरु होता. रात्रीच्या सुमारास मांस खाण्यासाठी आलेल्या कुत्र्याच्या कळपाला विजेचा धक्का बसला. यात सुमारे बारा कुत्री जागीच मृत्युमुखी पडली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ वीजवितरण कंपनीला याबाबत माहिती कळविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवासीकरावरून वादावादी

$
0
0

अमित जगताप, पन्हाळा

पन्हाळगडावर प्रवेश करण्यासाठी पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने आकारण्यात येणारा प्रवासी कर व पार्किगच्या दरांमध्ये १ जुलैपासून वाढ करण्यात आली आहे. पन्हाळा नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा एकमेव मार्ग असल्याने तो वसूल करण्यासाठी कर्मचारी आटापिटा करत आहेत तर तो कसा चुकवावा यासाठी प्रवाशी वाद घालत आहेत.

प्रवासीकर स्थानिक तसेच पन्हाळा तालुक्यातील लोकांना माफ आहे. मात्र, बाहेरील नागरिकांना मोटरसायकलवरून येणाऱ्या प्रतिव्यक्तीस तीन रूपये आणि पार्किंगसाठी चार रूपये आकारले जात होता, १ जुलैपासून प्रतिव्यक्तीस पाच रूपये आणि पार्किंग पाच रूपये आकारले जात आहे. चार चाकी वाहनातील प्रत्येक व्यक्तीस सात रूपये आणि पार्किंग १५ रूपये आकारले जायचे आता प्रतिव्यक्तीस १० रूपये आणि पार्किंगसाठी २० रूपये आकारले जात आहेत. शालेय मुलांच्या सहलीस खास सवलतीच्या दरात प्रवेशकर घेतला जात आहे. २ रूपये ऐवजी २ रूपये ५० पैसे प्रति विद्यार्थी कर गोळा केला जात असून मोठ्या बसेससाठी पार्किंग ५० रूपयांवरून ७५ रूपये कर वसूल केला जात आहे.

महाराष्ट्रातील अन्य हिलस्टेशनचावर घेतला जाणार प्रवासीकर पाहता पन्हाळगडावर घेतला जाणारा कर अत्यंत माफक आहे. मात्र, सध्या असलेल्या सोयीसुविधा आणि अन्य बाबी पाहता पर्यटक या प्रवासीनाक्यावर हुज्जत घालताना दिसत आहेत. प्रवासीकर घेऊन काय करताय? पर्यटकांच्या सोईसाठी तुम्ही काय करता ? पार्किंगचे पैसे घेता पण गाड्यांची सुरक्षा कुठे आहे? गाड्या फोडून मौल्यवान वस्तू चोरीला जातात त्याबद्दल तुम्ही काय करता? असे प्रश्न विचारून नाका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली जात आहे. नाका कर्मचारी नरमाईची भूमिका घेत तुम्हाला जे विचाराचचे आहे ते ऑफिसला जाऊन विचारा म्हणत प्रवासीकर गोळा करत आहेत. काही वेळा या प्रवासीकरावरून पर्यटक आणि नाका कर्मचाऱ्यांत हमरीतुमरीची प्रकारही झाले आहेत.

इकडे आड तिकडे ‌विहीर

वास्तविक पाहता पन्हाळा नगरपालिकेला प्रवासीकर हाच एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे. गडावर पुरातत्व खात्याची बंधने असल्याने बांधकाम होऊ शकत नाही त्यामुळे घरफाळा वाढविणे शक्य नाही. या प्रवासीकरवरच कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांची पेन्शन भागवावी लागत आहे. गेल्या दोन वर्षात स्वच्छतेवर जास्त भर दिला असून पन्हाळा प्लास्टिकमुक्त करण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. प्रवाशांच्या सोईसाठी स्वच्छतागृहे उभारली असून तीन दरवाजा, एस टी स्टँड, तबक उद्यान येथे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तीन दरवाजा, राजदिंडी, हुतात्मा स्मारक येथे पार्किंगसाठी जागा राखीव ठेवली आहे. प्रवाशांना अधिकाधिक सोई देण्यासाठी नगरपालिका प्रयत्न करत आहे.

कोर्टात काम आहे...

काही प्रवासी पन्हाळ्यावर फिरायला येतात मात्र, आमचे पाहुणे आहेत, कोर्टात काम आहे, तहसील ऑफिसला आलो आहे अशी अनेक कारणे सांगून प्रवासी कर चुकवून वर जातात. त्यामुळे यावर काय उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे करचुकवे सोडल्याने जास्त कर गोळा होत नाही. आमचे सेकंड होम पन्हाळ्यात आहे, मित्राकडे आलो आहे, कोर्टात काम आहे, मी इथलाच आहे अशी कारणे देत पर्यटक प्रवासीकर न देताच पुढे जातात. अशा वेळी कर्मचारी त्यांच्याकडे जास्त चौकशी न करता कर न घेताचा प्रवेश देतात.

पन्हाळ्यावर मिळणारा प्रवासी कर अत्यंत अल्प आहे. पन्हाळ्याचा विकास प्रवासीकरातून होत नाही. तर शासनाकडून मिळणाऱ्या विविध निधीवर अवलंबून आहे. हा उत्पन्नाचा एकमेव मार्ग असल्याने तो किरकोळ स्वरूपात वाढविला आहे. त्यामुळे प्रवाशांनी कर भरून सहकार्य करावे.

- असिफ मोकाशी, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा एकर जागा विमानतळासाठी हस्तांतर‌ित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला आठवड्यात साडे दहा एकर जागा हस्तांतरीत केली जाणार आहे. आत्तापर्यंत साडे सहा एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली असून त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाला आपले धावपट्टी विस्तारीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करणे सोपे जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.

सैनी म्हणाले, 'विमानतळ प्राधिकरणाला जागा देण्याचा प्रस्ताव प्राधान्याने हाताळला जात आहे. काही जागा ही वनविभागाकडे आहे ती हस्तांतरीत करण्याची गरज आहे. वनविभागाने ही जागा हस्तांतरीत केल्यास वनविभागाला तेवढीच जागा देण्यात येणार आहे. वनविभाग आणि महसूल विभागामध्ये जमीनीची अदलाबदल करण्याबाबत यापूर्वीच चर्चा झाली आहे. विमानतळाची हवाईपट्टी वाढविण्यासाठी वनविभागाकडील जमिनीची आवश्यकता होती. त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणानकडून जमीन हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सरकार बदलल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी याचा पाठपुरावा केला.

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी भारतील विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानुसार एअर इंडियासह इतर तीन कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. कोल्हापूर ते मुंबई आणि इतर ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याबाबत एअरपोर्ट अथॉरिटीशी चर्चा सुरु असल्याचे सैनी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीस शिक्षक ठरले अतिरिक्त

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

आर्य समाज शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे. घटत चालेलल्या विद्यार्थी संख्येचा फटका शिक्षकांना बसला आहे. विविध शाखांतील ३० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. काही शिक्षकांना सक्तीची सेवानित्ती देण्यात आली. दोन गटातील इर्ष्येने संस्थेची वाटचाल डबघाईकडे सुरू आहे.

आर्य समाज शिक्षण संस्थेतील वादाचा फटका विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मुळावर आहे. विद्यार्थी संख्या सातत्याने घटत असल्याने शाहू दयानंद हायस्कूल, शाहू दयानंद मोफत मराठी शाळा, बाळासाहेब पाटील हायस्कूल, शाहू दयानंद ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक अतिरिक्त ठरले. शिक्षक अतिरिक्त झाल्याने काही विषयांसाठी अध्यापनाचा प्रश्न गंभीर झाला. त्यामुळे काही पालकांनी या शाळेतून दाखले काढले. शाळेत अध्यापनाचे तीन तेरा वाजले. या गोंधळाच्या बाराखडीत संस्थेतील अंतर्गत कलह अधिक वाढले. सेवानिवृत्तीसाठी तीन ते चार वर्षे शिल्लक असतानाही सक्तीची निवृत्ती काही शिक्षकांना देण्यात आली. यातच बालकांचा सक्तीचा आणि मोफत शिक्षणाच्या कायद्यातच्या निकषात विद्यार्थी संख्या आणखीनच घटली. त्यामुळे अजूनही दहा हून अधिक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण होत आहे. गेल्या दहा वर्षापूर्वी ८०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाहू दयानंद हायस्कूलमध्ये आता केवळ २३८ विद्यार्थी संख्या आहे. मोफत मराठी शाळेत ५० विद्यार्थी आहेत. ज्युनिअर कॉलेजमध्ये १२५ विद्यार्थी आहे. सर्व संस्थात मिळून केवळ पाचशे विद्यार्थी संख्येवर ज्ञानदानाचे काम सुरू आहे.

आर्य समाज शिक्षण संस्थेचे लक्ष्मीपुरीत श्रद्धानंद हॉल आहे. या हॉलमधून मिळणारे भाड्यातून पंत वालावलकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निधी देण्याचे नियोजन होते. मात्र श्रद्धानंद हॉलचा हिशोबच दिला जात नसल्याचा आरोप प्रत्यारोप संस्थेत सुरू आहेत. प्रत्यक्षात हॉलचे भाडे अडीच हजार रुपये घेतले जाते. कागदावर दीड हजार दाखविले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. संस्थेच्या कामकाजाचे विशेष लेखापरीक्षण करण्याचे आदेशही झाले. मात्र सुनावणीसाठी पदाधिकारीच उपस्थित राहत नसल्याचा तक्रारीचा सूर आहे.

संस्थेचा माणूस सोबतच

कार्यरत असलेले शिक्षक, लिपिक आणि शिपाई यांच्याकडून सक्तीने पगारातील काही रक्कम घेतली जाते. बँकेतून पगार काढताना आर्य समाज शिक्षण संस्थेतील एका पदाधिकारी सोबत जातो. कागदावर पगाराचा आकडा वेगळा आणि प्रत्यक्षात हातात मिळत असलेले वेतन वेगळेच आहे. त्यामुळे या संस्थेतील कर्मचारीही दहशतीखाली असल्याचे बोलले जाते.

अशी आहे पिळवणूक

कर्मचारी बदली

बिनपगारी रजा

प्रत्येक बाबीसाठी नोटीस

नवीन नेमणूका

पतसंस्थेसाठी वेतनातून कपात

वरिष्ठ वेतनश्रेणीचा खो

सवडीनुसार सेवानिवृत्ती वेतन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा संपादनाचे प्रस्ताव फेटाळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरक्षित जागेवरील खरेदीपत्रावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवक सोमवारी पुन्हा एकदा आमनेसामने आले. प्रस्तावात त्रुटी, जागेच्या मालकी हक्काबाबत साशंकता असताना प्रशासन जागा खरेदीसाठी अट्टाहास का करत आहे ? महापालिकेतील काही अधिकारी आयुक्तांना अंधारात ठेवून मोठ्या आर्थिक उलाढाली करत आहेत असा आरोप सभागृहात झाला. तर नगररचना कायदा आ​णि नियमावलीच्या आधारे ९० दिवसाच्या आत प्रस्ताव मंजूर करणे अत्यावश्यक असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेपुढे नमते घेत प्रशासनाने तिन्ही प्रस्ताव मागे घेतले. सलग दुसऱ्या सभेत आरक्षित जागा ताब्यात घेण्याचा ऑफीस प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली.

महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेत प्रशासनाने प्रस्ताव मागे घ्यावेत असा आदेश त्यांनी दिला. टाकाळा येथील रिसन ३८२/३ अ व रमणमळा येथील ९०५/१ पैकी शाळेसाठी ३४.३३ चौरस मीटर जागा खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना नियमाच्या अ​धिनियम १९६६ नुसार कलम १२७ चा आधार घेतला आहे.सभागृहासमोर ऑफीस प्रस्ताव येऊन या महिन्यात ९० दिवस पूर्ण होणार आहेत. प्रशासनाची प्रस्तावाच्या मंजुरीसाठी घाई सुरू आहे. दुसरीकडे जागा खरेदीसाठी मालकाला दहा कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. प्रशासन जागा मालकाच्या हिताचा विचार करत आहे दुसरीकडे नगरसेवकांच्या विकास कामात त्रुटी दाखवून अडवणूक सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

'नियमाच्या कचाट्यात प्रस्ताव सादर करून प्रशासनाला कुणाचे हित साधायचे आहे, प्रस्तावात त्रुटी असताना आणि मालकी हक्कात वाद असताना प्रस्ताव सादर का केला ? विधी विभागाचे मत का विकत घेतले नाही ? असा सवाल प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, शारंगधर देशमुख यांनी केला. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा फेटाळला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

रमणमळा येथील जागेत सहा कोटींचा ढपला

रमणमळा येथील प्राथमिक शाळेची आरक्षित जागा संपादनप्रकरणी लहान-मोठ्या अधिकाऱ्यांनी मिळून सहा कोटी रुपयांचा ढपला पाडला आहे. महापालिकेतील अधिकारी आयुक्तांना अंधारात ठेवून मोठ्या आर्थिक उलाढाली करत आहेत. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत हे महापालिकेची फसवणूक करत असल्याचा आरोप नगरसेवक शेटे यांनी केला. नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, 'राहुल कारदगे यांना पॉवर ऑफ अॅटर्नी ही कारदगे पार्कची आहे. पर्चेस नोटीस जागा ९०५/१ ची आहे. कारदगे यांनी जादा क्षेत्रावर कब्जा मिळवण्याचा प्रकार केला आहे. कारदगे यांनी जादा जागेसंदर्भात मालकी हक्क्काची कागदपत्रे जोडली नाहीत हे निदर्शनास आले आहे. ही जागा मूळ छत्रपती घराण्यातील प्रमिलाराजे यांच्या वाट्याला आली आहे.'

पर्चेस नोटिसा निकालात काढा

पर्चेस नोटिसा वादग्रस्त असल्याने निकालात काढाव्या अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी पर्चेस नोटीस आल्यानंतर एका वर्षाच्या आत भूसंपादनाची कार्यवाही करावी लागते असे सभागृहाच्या निदर्शनास आणताच सदस्य आक्रमक होत आरक्षित जागेचा वाद कोर्टात असताना जागा मालकीची जबाबदारी कोण घेणार? जागामालक हे अ​धिकाऱ्यांचे जावई आहेत की पाहुणे? अशी विचारणा नगरसेवक देशमुख, मधुकर रामाणे, मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, संभाजी जाधव, इंद्रजित सलगर यांनी केला. आयुक्त पी. शिव शंकर यांनी जागेच्य मालकी हक्काबाबत वाद असल्याने यासंदर्भात सुनावणी घेण्यात येईल. योग्य माहितीच्या आधारे रितसर फेरप्रस्ताव सादर करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला स्वच्छतागृहांबाबत अनास्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी, मार्केट परिसरात महिलांसाठी अद्ययावत, स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणीची घोषणा केली. प्रत्येक वेळी नव्या महिला पदाधिकाऱ्यांनी महिला स्वच्छतागृहाचा डांगोरा पिटला. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका पातळीवर महिला स्वच्छतागृह उभारणीची तसदीच घेतली नाही. कोल्हापूर शहरात पर्यटन आणि देवदर्शनासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने महिला पर्यटक येतात. मात्र मंदिर परिसरासह अन्य ठिकाणी त्यांच्यासाठी कोणत्याच सुविधा नाहीत.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, बिंदू चौक, रंकाळा तलाव परिसर, महाद्वार रोड परिसर, बसस्थानक परिसर, दसरा चौक परिसर, गंगावेश व रंकाळा बसस्थानक परिसर, राजारामपुरी जनता बझार परिसर ही गर्दीची ठिकाणे आहेत. बाजार, भाजीपाला खरेदी, खासगी नोकरी अशा विविध कामांसाठी महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. त्याचबरोबर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन व पर्यटनासाठीही मोठ्या संख्येने महिला कोल्हापुरात येतात. त्यांच्यासाठी ठिक​ठिकाणी स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे.

सात महिला महापौर, पण गांभीर्यच नाही

महापालिकेची ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकीत शहरात महिलांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा केली होती. गेल्या पाच वर्षांत सात महिला महापौर लाभल्या. यापैकी प्रत्येक महापौरांनी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा केली. मात्र त्यांनी स्वच्छतागृहे उभारणीसाठी प्रभावी पावले उचलले नाहीत.

अर्थसंकल्पात तरतूदच नाही

महापालिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी कसलीच तरतूद केली नाही. स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अर्थसंकल्पात महिला स्वच्छतागृह बांधणीचा उल्लेख केला होता, परंतु त्यासाठी निधीची तरतूदच केली नाही. महापालिकेत अनेक महिला अधिकारी पदावर आहेत. नगरसेविका आहेत. काही नगरसेविका पदाधिकारीही झाल्या पण, कुणालाही महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न तडीस न्यावा असे वाटत नाही. सार्वजनिक समारंभात महिला विकासाच्या बाता मारणाऱ्या महिला संघटना, महिला कार्यकर्त्यांही याप्रश्नी मूग गिळून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. देशपांडे यांच्या उपकरणाला पेटंट

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश देशपांडे यांना मल्टी डीओएफ लॅप्रोस्कोपिक ग्रास्पर या नव्या उपकरणासाठी पेटंट मिळाले आहे. डॉ. देशपांडे यांनी हे उपकरण आयआयटीच्या सहकार्यातून तयार केले आहे. ते सात कोनांमध्ये फिरत असल्याने अवघड शस्त्रक्रियेसाठी त्याची मोठी मदत होणार आहे.

डॉ. देशपांडे यांनी तयार केलेल्या उपकरणाची दखल आयआयटीने घेतली. आयआयटीची बायो इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी इनक्युबेशन सेंटर (बीईटीआयसी) ही संस्था शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे तयार करणे आणि त्यात सुधारणांसाठी संशोधन करते. वर्षभरापूर्वी डॉ. देशपांडे यांनी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. बी. रवी यांच्याशी चर्चा करून नवीन उपकरण करण्याबाबतचा निर्णय घेतला.

लेप्रोस्कोपीत प्रचलित उपकरण दोन कोनांमध्ये हालचाल करते. डॉ. देशपांडे यांनी सात कोनांमध्ये फिरणारे मशिन तयार करण्याची कल्पना मांडली. त्याला आयआयटीतील इंजिनीअरिंगच्या टीमने मदत केली. सहा महिन्यांत हे उपकरण तयार झाले. या उपकरणाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, ते विविध कसोट्यांवर यशस्वी झाले आहे. मंगळवारी १४ जुलै रोजी शिवाजी उद्यमनगर येथील इंजिनीअरिंग असोसिएशनच्या सभागृहात हे उपकरण दुपारी चार वाजता सर्वांना पाहण्यासाठी खुले होणार आहे. बीईटीकचे डॉ. बी. रवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

सहा उपकरणांची निर्मिती

डॉ. देशपांडे यांनी आतापर्यंत सहा उपकरणे तयार केली आहेत. लॅप्रोक्टिक, स्वार्म, ऑपरेशन थिएटर ऑटोमेशन, लॅप गुरू, ट्रेनी मॉडेल, अॅम्बेलिकल बटन फॉर सील्स, बाय कोंडायझर, बाय क्रॉम्प्रेशन स्क्रू अशी या उपकरणांची नावे आहेत. लेप्रोस्कोपीतील रोबो म्हणजेच स्वार्म या उपकरणाची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. डॉ. देशपांडे यांनी सहाही उपकरणे कोल्हापुरातील तंत्रज्ञ व डॉक्टरांच्या मदतीने तयार केली आहेत. त्यांना पेटंट मिळाले आहे.

ही मशिन तयार करण्यासाठी मला जास्त दिवस लागत होते. आयआयटीमुळे हे उपकरण सहा महिन्यात तयार करता आले. त्यासाठी डॉ. रवी, डॉ. रूपेर घ्यार, सुमित राऊत या तंत्रज्ञांनी मदत केली. आणखी दोन उपकरणे पेटंटच्या प्रकियेत आहेत.

- डॉ. सुरेश देशपांडे, अस्थिरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळव्यात तरुणाचा खून; चौघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील ताकारी येथील सुशांत अशोक आडके (वय २२) याचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी कृष्णा नदीच्या पात्रात आढळला. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी चौघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

ताकारी येथील सौरभ पाचंगे, शुभंम लोखंडे, सुमेर मगदूम व जिंतेद्र जयवंत गवळी या चार जणांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे, मृत सुशांत रविवारी रात्री त्याचा मित्र सागर तांदळे याला दुचाकीवरून तुपारी गावात सोडायला गेला होता. त्याला सोडून येतानाच तो बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्याचा शोध घेऊन सोमवारी कुंडल पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. मात्र, मंगळवारी सकाळी मृतदेह कृष्णा नदीच्या पात्रात आढळल्याने त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा भाऊ रमेश आडके याने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या बाबत पोलिस निरीक्षक संजय पाटील म्हणाले,

रविवारी रात्री मृत सुशांत व सागर तांदळे हे दोघे दुधारी येथील फ्रेंडशिप धाब्यावर जेवायला गेले होते. तेथे संशयित सौरभ पाचंगे, शुभंम लोखंडे, सुमेर मगदूम, जितेंद्र जयवंत गवळी जेवायला आले होते. धाबा मालकाने या चार जणांना सुशांतच्या आधी जेवण दिल्याने सुशांत आणि धाबा मालकाची बाचाबाची झाली. जेवण आटोपून जाताना सौरभ पाचंगे आणि सुशांत आडके यांच्यात हाणामारी झाली. या पूर्वीही अंदाजे दीड महिन्यांपूर्वी मुलींच्या छेडछाडीवरुन सौरभ व सुशांत याच्यांत मारामारी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी जेवायला असलेल्या चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिकांनी टाकल्या माना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जूनमध्ये सुरु झालेल्या पावसामुळे केलेल्या पेरण्यांवर आता पाऊस लांबल्याने संकट आले आहे. आणखी चार ते पाच दिवस पावसाने ओढ दिली तर या पेरण्या हातातून जाऊ शकतात. उसाचे क्षेत्र सोडल्यास १ लाख ८३ हजार ८६ हेक्टर जमिनीवरील खरीप पिकांना हा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वात जास्त ८० हजार २२ हेक्टरवर भात पीक आहे.

​यंदाच्या हंगामात पावसाने मृग नक्षत्र सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात हजेरी लावली होती. थोड्या प्रमाणात सुरु झालेल्या पावसाच्या साथीवर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पंधरा जूननंतर जोरदार पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी भाताच्या रोप लावणीही झाल्या होत्या. पण शेवटच्या आठवड्यात मोठ्या पावसाने दडी मारली ती आजतागायत आहे. या दरम्यान जमिनीतील पाण्यावर पिके उगवून आली. मोठ्या पावसानंतर शिडकाव्याच्या पावसाने त्या पिकांना जगवले होते. पण गेल्या आठवड्यापासून उन्हामुळे उगवलेली पिके हातात येतील की नाही अशी शंका येत होती. या कालावधीत शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे करुन ठेवली आहेत. पिकांची वाढ चांगली आहे. पण आता गरज पावसाची आहे.

जिल्ह्यात ऊसासह खरीपाचे लावणीचे ३ लाख २८ हजार ३७२ हेक्टर आहे. त्यातील २ लाख ७७ हजार हेक्टर खरीपाचे आहे. त्यापैकी १ लाख ८३ हजार ०८६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. या पिकांची वाढ चांगली आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे. तिथे शेतकऱ्यांकडून प्रयत्न आहेत. पण पावसावर अवलंबून असलेल्या पिकांची अवस्था वाईट होत आहे.

सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यांची वाढही चांगली आहे. पण येत्या पाच दिवसात जर पाऊस झाला नाही तर या उगवलेल्या पिकांची परिस्थिती गंभीर होऊ शकते. जिथे पाण्याची व्यवस्था आहे, तिथे काही दिवस पुढे जाऊ शकतात.

- मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये कचरा व्यवस्थापन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दर रविवारी ते सगळे एकत्र येतात, तपोवन मैदान येथे जमतात. कुणी प्लास्टिक पिशव्या गोळा करतो, कुणी मैदानातील कचरा जमवतो. दीड दोन तासाच्या श्रमदानातून मैदानाची स्वच्छता केली जाते. समाजातील विविध घटकातील व्यक्ती एकत्र येत श्रमदानातून स्वच्छतेचा वसा जपत आहेत. मैदानाच्या स्वच्छतेच्या पुढे जाऊन ही मंडळी आता शहरातील शैक्षणिक संस्था, होस्टेल येथे कचरा व्यवस्थापनचे धडे देणार आहेत.

देवकर पाणंद, तपोवन परिसरातील व्यक्तींचा यामध्ये पुढाकार आहे. संजय पाटील, अरूण राजाज्ञा, डॉ. विक्रम राजाज्ञा, शिवाजी अडूरकर, किरण भोसले, प्रदीप गबाळे, घनश्याम दीक्षित, अण्णासाहेब कलगोंडा, अशोक पाटील आदींचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्यापैकी कुणी निवृत्त अधिकारी आहेत, कुणी बांधकाम व्यावसायिक आहेत. वैद्यकीय व्यवसायातील मंडळीही याकामी पुढे सरसावली आहेत. तपोवन आणि परिसरातील स्वच्छता करतानाच ही मंडळी स्वतःच्या घरीही कचरा व्यवस्थापन करत आहेत. ओला आणि कोरडा कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक कचरा आठवडाभर साठवून कचरा वेचक महिलांकडे ते सुपूर्द करतात. एकटी संस्थेच्या सहकार्याने कचऱ्याचे नियोजन व उठाव केले जाते. बांधकाम व्यावसायिक संजय पाटील म्हणाले, 'कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण, सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. प्लास्टिक कचऱ्याचा पर्यावरणालाही फटका बसत आहे. लोकांमध्ये यासंबंधी जागृती घडावी, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे ही भावना रूजावी ही यामागील भावना आहे.

शाळकरी मुलांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयक जागृती महत्त्वाची आहे. शाळेत दुपारच्या डब्यातील ​शिल्लक अन्न टाकून दिले जाते, हात धुतल्यानंतर शेकडो लिटर पाणी वाया जाते. खरकट्या अन्नाचा खत म्हणून वापर करता येतो. ओला आणि सुका कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन, वैयक्तिक व सार्वजनिकरीत्या ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करता येऊ शकते. हे मुलांपर्यंत पोहचविले जाणार आहे.

- अरुण राजाज्ञा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रक्तदाते एका कॉलवर

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

गरजू रुग्णांना त्वरित रक्त मिळण्यासाठी आणि वेळेत उपचार होण्यासाठी राजर्षी शाहू कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची डिरेक्टरी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीची डिरेक्टरी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी याचबरोबर सीपीआर रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. डिरेक्टरीतील कोणत्याही विद्यार्थ्याला संपर्क साधल्यानंतर गरजू रुग्णांना त्वरीत मोफत रक्त दिले जाणार आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे अत्यावस्थेतील रुग्णांना जीवदान देण्याचा युवकांचा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये ज्युनियर व सिनिअरच्या वर्गात सुमारे २२५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 'कमवा व शिका' योजनेतून शिक्षण देणाच्या वसा आणि वारसा जपणाऱ्या शाहू कॉलेजने विद्यार्थ्यांच्या रक्त गटाची डिरेक्टरी तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रक्त गटाची डिरेक्टरी तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे.

कॅम्पमध्ये रक्ताची तपासणी, एचबी तपासणी करुन लायक अशा रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार केली जाणार आहे. यामुळे दुर्मिळ रक्तगटाचा शोध घेण्यातही मदत होणार आहे. डिरेक्टरीमध्ये कॉलेजमधील १२५ प्राध्यापकांचाही समावेश केला जाणार आहे. ग्रामीण भागात किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादा रुग्ण अत्यावस्थेमध्ये असताना रक्ताची आवश्यकता भासते. त्यावेळी रक्तदाते मिळत नाहीत. रक्त मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. काहीवेळा रिप्लेसमेंट करुनही जादाचा दर आकारला जातो. अशावेळी या डिरेक्टरीमधील ज्या रक्त गटाची आवश्यकता आहे, त्या रक्तगटाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्यास संबंधित विद्यार्थी त्वरीत मोफत रक्त देण्यास उपस्थित राहणार आहे.

गरजूंसाठी उपयुक्त

अनेक शिबिरामधून १०० ते १५० रक्त बाटल्यांचे संकलन होते. संकलित रक्ताचा त्वरीत वापर न झाल्यास खराब होण्याची शक्यता असते. अशा शिबिरांमधून केवळ रक्तदान केल्याचे समाधान मिळते, मात्र त्याचा गरजूंना अधिक फायदा मिळत नाही. गरजूंना तत्काळ रक्त मिळण्यासाठी हा उपक्रम सर्वात उपयोगी ठरणार आहे.

श्रीमंतांना पैसे देऊन दानाचे पुण्य जमा करता येते. मात्र गरिबांना रोजीरोटीच्या प्रयत्नामध्ये दानधर्म करता येत नाही. अशा वेळी रक्तदान हा श्रेष्ठ मार्ग ठरतो. कॉलेजचे विद्यार्थी बहुसंख्येने श्रमिक वर्गातील असल्याने, या उपक्रमामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल.

- प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, प्राचार्य, शाहू कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लैंगिक शोषण प्रकरण फाइलबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महिला पोलिस कर्मचाऱ्यांवरील बलात्काराच्या गुन्ह्यातून पोलिस दलातील ड्रील इन्स्ट्रक्टर युवराज मारूती कांबळे (वय ३४, रा. आजरा) याची सबळ पुराव्याअभावी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके यांनी निर्दोष मुक्तता केली. २०११ मध्ये कोल्हापूर पोलिस दलातील लैंगिक शोषणाच्या या घटनेने गृहखाते हादरून गेले होते. या निकालामुळे खळबळ उडवणा‍ऱ्या वादग्रस्त प्रकरणावर पडदा पडला.

पिडीत महिला पोलिस कर्मचाऱ्याने २३ एप्रिल २०११ रोजी युवराज कांबळे याच्याविरोधात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. पिडीत महिलेबरोबर अन्य महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार झाले होते, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर प्रकरण शेकू नये म्हणून युवराज कांबळेला बळीचा बकरा बनवल्याची चर्चा होती. राज्य सरकारने तत्कालिन पोलिस अधीक्षक यशस्वी यादव यांची तडकाफडकी बदली केली होती. या गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी नाशिकच्या तत्कालिन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मैथिली झा यांची नेमणूक केली होती. २०१२ मध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए.आर. जोशी यांच्यापुढे खटला सुरू झाला. पिडीत महिलेची साक्षही जोशी यांच्यापुढेच झाली. त्यानंतर न्यायाधीश एम.बी. तिडके यांच्यासमोर खटल्याचे काम झाले. या खटल्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये झा, तत्कालीन गृह पोलिस उपअधीक्षक विजय परकाळे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मुंडे, दुर्योधन पवार यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान फोडलेल्या सातजणांना अटक

$
0
0

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील गोल्डन टोबॅको दुकान फोडून दोन लाख ८० हजार रूपये चोरून नेणाऱ्या दोन महिलांसह सात चोरट्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा तपास लागला. १५ लाखाच्या मोटारीतून प्रवासी असल्याचे भासवून पाळत ठेऊन संशयित चोरी करत होते. महम्मद अरिफ अब्दुल हमीद खान (वय २३), विजय शेट्टी (४०), फातिमा खान (२९), दीपक मन्ना डे (२९), किशोर साळवी (३५), रमजानबी शेख (२९), विजय मुन्ना जगदीप (३४, सर्व रा. मुंबई) अशी अटक केलेल्या नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोक्याच्या जागा विकण्याचे प्रयत्न

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

आर्य समाज शिक्षण संस्थेच्या काही मोक्याच्या जागा विक्रीचे प्रयत्न काहीजणांनी चालविले आहेत. या मंडळींची काही उद्योगपतींसोबत चर्चाही झाली आहे. कोट्यावधी रुपये किंमतीची असलेली सार्वजनिक मालमत्ता काहींच्या हट्टासापोटी विक्री करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या जागांवर अनेकांचा डोळा आहे.

मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू हायस्कूलची जागा सुमारे १७ एकर आहे. यापैकी काही जागेवर मंगेशकरनगर आणि काही जागेवर महापालिकेने घेतली आहे. उर्वरित सात एकर जागा सध्या संस्थेच्या मालकीची आहे. यातील काही जागा विक्री करण्याचा घाट संस्थेतील मंडळींनी रचल्याचा आरोप काही सभासदांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केल्याचे संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील एका मंत्र्याला ही जागा दाखविली गेली आहे. तर पुण्यातील काही बिल्डर्सना या जागेची ऑफर दिल्याचे समजते. मंगळवार पेठेतील संस्थेच्या काही जागांवर काहींनी अतिक्रमण केले आहे. संस्थेची लक्ष्मीपुरी येथील श्रद्धानंद हॉलची जागा आहे. या जागेतच खासगी वसतिगृहाची उभारणी केली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न मात्र संस्थेसाठी वापरात नसल्याचा वाद आहे.

भाडे तत्वावर दिलेले दुकानगाळे, श्रद्धानंद हॉलच्या भाड्यातून मिळणारी रक्कम, पतसंस्थेचे भाडे कागदावर एक आणि प्रत्यक्षात वेगळे दाखविले जात असल्याचा काही सभासदांचा आरोप आहे. संस्थेच्या मालमत्तेवर काही मंडळी वारेमाप पैसे कमावित असल्याचा आरोप संस्थेतील कर्मचाऱ्यांकडूनच केला जात आहे. संस्थेच्या वादात हेर्ले (ता. हातकणंगले) येथी सुमारे २७ एकर जागा पडून आहे. दोन गटात सुरू असलेल्या वादाचे पडसाद संस्थेच्या मुळावर उठत आहे.

काही दिवसांपूर्वी संस्थेचा कारभारी असलेला एक शिक्षक सत्ताधारी कार्यकारी मंडळाच्या विरोधात गेला. संस्थेच्या वादात देसाई गट आणि कौलवकर-पाटील गट पडले आहेत. गटातटाच्या राजकारणात राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या संस्थेचा बळी जात आहे. संस्थेतील कर्मचाऱ्यांनी पन्नासहून अधिक तक्रारी शिक्षण उपसंचालक, धर्मादाय आयुक्त, शाळा न्यायाधीकरणाकडे केल्या आहेत. काहींनी उच्च न्यायालयात दावे दाखल केले आहेत. यातून संस्थेत गटबाजीला चालना मिळाली असून संस्थेची वाटचाल मोडकळीकडे सुरू आहे.

मालोजीराजेंनी अध्यक्षपद स्वीकारावे

राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाज शिक्षण संस्थेची उभारणी केली. तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी राजर्षी शाहूंनी प्रयत्न केले. त्यांचे वारसदार म्हणून माजी आमदार मालोजीराजे यांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी देसाई गटाने केली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेली संस्था टिकली पाहिजे, एवढाच आमचा उद्देश आहे. देसाई गट आणि पाटील-कौलवकर गट एकत्र येऊन संस्था सहजपणे टिकू शकेल. विद्यमान संचालक मंडळाने प्रत्येक घटकाला विश्वासात घेतल्यास संस्थेला उर्जितावस्था येऊ शकेल.

- आनंदराव देसाई, देसाई गटप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची सुरक्षितता व परिसरात शिस्त निर्माण करण्यासाठी मंदिर परिसर 'ना फेरीवाला क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या दक्षिण (विद्यापीठ हायस्कूलकडील) आणि पूर्व दरवाज्यापासून १०० मीटर अंतर(सरलष्कर भवनची बाजू) आणि उत्तर (घाटी दरवाजा) आणि पश्चिम (महाद्वार) दरवाजापासून ५० मीटर क्षेत्र 'ना फेरीवाला क्षेत्र' म्हणून निश्चित करण्यात आला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यावरही शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रीय शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त पी. शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शहर फेरीवाला समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फेरीवाला धोरणांतर्गत फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण, पुनर्वसनासाठी तयार केलेले फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र याबाबत चर्चा झाली.

यावेळी झालेल्या चर्चेत माजी महापौर आर. के. पोवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, नंदकुमार वळंजू, अशोक भंडारी, किशोर घाडगे, अशोक रोकडे आदींनी भाग घेतला. शहरातील सर्व्हेक्षण झालेल्या फेरीवाल्यांचा समावेश सरकारच्या नागरी उपजिवीका अभियानमध्ये होणार असून या फेरीवाल्यांना व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसायासाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे, त्यासाठी सर्व फेरीवाल्यांनी ओळखपत्रे स्वीकारावीत असे आवाहन कॉम्रेड दिलीप पोवार यांनी केले.

बेकायदेशीर, पार्किंगमधील व्यवसायांवर कारवाई

अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून विकासाचे नियोजन आहे. याकरिता मंदिराच्या आसपास ५०० मीटर परिक्षेत्रात मंदिर अथवा धार्मिक कार्यक्रमासाठी पूरक असा वापर अपेक्षित आहे. या ठिकाणी आठवडा बाजार अथवा मार्केटसारखी परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही. परिसरातील बेकायदेशीर व्यावसायिक, फेरीवाले आणि मंजूर बांधकामातील पार्किंगमध्ये असणारे व्यवसाय याची तपासणी केली जाणार आहे.

असे होणार पुनर्वसन

रेल्वे फाटक येथील भाजी मंडईच्या जागेमध्ये फेर सर्व्हेक्षण करून या ठिकाणी भाजी विक्रेत्याबरोबरच मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पाहणी करण्याचे ठरले. जे फेरीवाले विचारे कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणार आहेत अशा गाळेधारकांच्या व्यवसाय वाढीसाठी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून या रस्त्याला जोडणारा मार्ग उपलब्ध करण्याचे ठरले. दरम्यान, छत्रपती शिवाजी पुतळा येथील हटविण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांचे शिवाजी मार्केटच्या पार्किंग क्षेत्रात विशिष्ट जागा निश्चित करून पुनर्वसनासंबंधी कार्यवाही करण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images