Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अज्ञात रोगाने दगावली २७५ जनावरे

$
0
0
भुदरगड तालुक्यात मागील एक महिन्यात २७५ जनावरे अज्ञात रोगामुळे दगावल्याने तालुक्यात जनावरांच्या आरोग्याबरोबर नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जनतेच्या पाठबळावर लोकसभा लढ‌विणार

$
0
0
‘सामाजिक बांधिलकीतून धनंजय महाडिक युवाशक्ती विविध उपक्रम राबवत आहे. जनतेच्या पाठबळावर अगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहे’ असा निर्धार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

रस्त्यावर ‘नो मंडप’

$
0
0
गणेशोत्सवात रस्त्यावर मांडव घालून वाहतुकीला अडथळा होत असल्याचे जाणून आझाद चौक ते दिलबहार चौक या वर्दळीच्या वनवे मार्गावर गणेशोत्सवात मंडप न घालण्याचा निर्णय रविवार पेठेतील दिलबहार तालिम मंडळाने घेतला आहे.

२९ गावांच्या निर्मल ग्रामसाठी जि. प. चे विशेष प्रयत्न

$
0
0
‘कोल्हापूर जिल्हा राज्यात स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांकावर आहे. आता स्वच्छता अभियानाचे निकष बदलले असले तरी देखील उर्वरित २९ गावे निर्मल ग्राम करून देशात जिल्हा प्रथम क्रमांकावर यावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे’ असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मंडलिक यांनी केले.

आरोपीला फाशीची शिक्षा

$
0
0
पोटच्या मुलासह दोघांची हत्या केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील जिंती येथील सुनील विष्णू ओंभासे याला जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर औटी यांनी शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली.

ट्रॅफिक सिग्नलला रेड सिग्नल !

$
0
0
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या १७ सिग्नलच्या उभारणीच्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव पुढील मिटींगमध्ये ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी स्थायी समितीने घेतला.

महसूल कर्मचा-यांचा राज्यव्यापी बंद सुरू

$
0
0
विविध आंदोलनानंतरही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी पूर्वी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे शुक्रवारपासून (१६ ऑगस्ट) राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनाला प्रारंभ केला.

हिंसा रोखा, शांतता राखा

$
0
0
आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत येस प्लस उपक्रम आणि कोल्हापूर कन्फेशन कॉर्नरच्यावतीने शांतता रॅली काढण्यात आली.

पंचगंगेकाठच्या गावांना इशारा

$
0
0
‘पंचगंगा नदीचे प्रदूषण ज्या प्रमुख ३९ गावांमुळे होते, त्यांनी ते तत्काळ उपाययोजना करून थांबवावे; अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी दिला.

कांद्याचा प्रश्न २ आठवड्यात संपेल

$
0
0
‘सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले असले, तरी दोन आठवड्यांत दर कमी होतील. त्यामुळे जनतेने त्याबाबत अधिक काळजी करण्याची गरज नाही’, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी दिला.

३ जणांना जाळून मारण्याचा प्रयत्न

$
0
0
माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावाला चिटकून असलेल्या १६ एकर जागेवरील कब्जासाठी वेळापूर परिसरातील काही मंडळीनी गेले अनेक वर्षे या जागेत कब्जा असणाऱ्या विठ्ठल पवार, पारूबाई पवार आणि अशोक पवार या तिघांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

साडेअकरा लाखांची घरफोडी

$
0
0
जुना सांगली नाका परिसरातील स्टॅम्प व्हेंडरचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी ५ लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा साडेअकरा लाखांचा मुद्देमाल लांबविला.

सौंदलग्यानजीक अपघातात सासू-सून जागीच ठार

$
0
0
केमिकल घेवून जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक करताना उड्डाण पुलाला तवेरा मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तांबुळवाडीतील सासू-सून जागीच ठार झाल्या.

महावितरणला अडचणीत आणू

$
0
0
‘महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे. त्यांना कामावरून काढून टाकू नये.

लोकसभेसाठी सतेज पाटीलच योग्य

$
0
0
‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील योग्य उमेदवार आहेत. त्यांच्या नावासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे,’ असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केले.

ग्रंथातील विचारच दीर्घकाळ टिकतात

$
0
0
‘वंचितांच्या आयुष्यातील वास्तवाविषयी समाजमनामध्ये संवेदना निर्माण करण्याची ताकद साहित्यात आहे. मुंबई येथील लोकवाङमयगृहच्यावतीने प्रकाशित झालेल्या पाच पुस्तकातील समान धागा हा वंचितांच्या आयुष्यातील जगण्याचे चटके आणि त्यासंदर्भात केलेला आश्वासक विचार हा आहे.

‘मघा’चा पाऊस सुरू

$
0
0
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर मघा नक्षत्रात पावसाने पुन्हा सुरूवात केली आहे. दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. गगनबावडा तालुक्यात ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टिक टिक वाजते ‘धोक्यात’...

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा आमच्याच आहेत अशी घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘टिक टिक वाजते डोक्यात’चा गोपनीय अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवला आहे.

दत्तवाडमध्ये डेंगीचे १६ रुग्ण

$
0
0
शहरासह जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिरोळ तालुक्यातील दत्तवाडमध्ये १६ जणांना डेंगी झाल्याचे तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

समान नागरी कायदा हवा

$
0
0
‘देशात हिंदूंना एक आणि मुस्लिमांना वेगळा कायदा असा प्रकार खपवून घेणार नाही. त्यामुळे समान नागरी कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. त्यासाठी भविष्यात प्रयत्न करावे लागतील’ असे मत श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images