Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

माहिती अधिकाराने सर्वसामान्यांना बळ

$
0
0
‘१९६० च्या गोपनीय कायद्यानुसार सरकारी कामकाजाबाबत सर्वसामान्य नागरिक अनभिज्ञ होता. मात्र, माहिती अधिकार कायद्यामुळे सरकारी माहिती खुली झाली.

खंडपीठप्रश्नी २३ ला वकिलांचा मेळावा

$
0
0
कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी सहा जिल्ह्यांतील वकील व विविध संस्था एकत्रितपणे आंदोलने करत आहेत. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली.

‘मनसे’ जिल्हाध्यक्षासह १४ अटकेत

$
0
0
बालिकेवरील बलात्काराच्या घटनेनंतर उमटलेल्या पडसादानंतर परप्रांतीय मजुरांना जबर मारहाण केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित रमेश साळोखे (वय ३४, शिवाजी पेठ), शहराध्यक्ष राजू आनंदा दिंडोर्ले (२६, रा. साने गुरुजी वसाहत), सरचिटणीस प्रसाद आनंदराव पाटील (३६, शिवाजी पेठ) आदींसह चौदाजणांना बुधवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.

दोन्ही रेल्वेमार्गांचे प्रस्ताव तयार

$
0
0
कोल्हापूर परिसराच्या विकासात महत्त्वाचा ठरणारा कराड-बेळगाव आणि कोल्हापूर ते राजापूर रेल्वे मार्ग अस्तित्वात आणण्यासाठी रेल्वेला साडेतीन हजार कोटींचा खर्च करावा लागणार आहे.

दोन पोलिसांना राष्ट्रपती शौयपदक

$
0
0
युनिक ऑटोमोबाइल्सच्या हायवेवरील शोरूमवर दरोडा टाकलेल्यांना जिवाची बाजी लावून अटक केल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अबूबकर अब्दुलगणी शेख व पोलिस हवालदार रवींद्र एलगोंडा नुल्ले यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे.

सीपीआरचा ‘कणा’ फ्रॅक्चर

$
0
0
छत्रपती प्रमिलाराजे सिव्हिल हॉस्पिटल (सीपीआर) मध्ये रोज होणाऱ्या सरासरी पाचशे टेस्ट गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णपणे बंद झाल्या आहेत.

कांद्याचा वांदा फक्त २-३ आठवडे!

$
0
0
कांद्याचे भाव शंभरीपर्यंत पोहोचल्याने रोजच्या जेवणातून कांदा बाद होऊ लागला आहे. हॉटेलवाल्यांनी देखील जेवणासोबत कांदा वाढताना हात आवरता घेतला आहे. असे असताना देखील केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मात्र जनतेने याची फार चिंता करू नये, असा सल्ला दिला आहे.

शहरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

$
0
0
ध्वजवंदन, संचलन आणि शहिदांना अभिवादन करून ६६ वा भार‌तीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

$
0
0
देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जोपासून राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीव्दारे एकसंध राष्ट्र उभारणीची प्रतिज्ञा करुया, असे आवाहन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

प्राध्यापकांच्या नेमणुकांची छाननी

$
0
0
प्राध्यापक नेमणुका करताना विद्यापीठ निवड समितीची मान्यता, आवश्यक शैक्षणिक पात्रता आदी बाबींची सध्या खातरजमा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची माहिती पडताळून पाहिली जाणार आहे.

ईबीसी सवलतीची मर्यादा वाढवा

$
0
0
ईबीसी सवलत दाखल्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी, या मागणीसाठी आंदोलनाचा निर्धार ऑल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या (ए.आय. एस. एफ) च्या जिल्हा कौन्सिलच्या त्रैवार्षिक अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.

संघर्षाचा वसा

$
0
0
पुस्तकांवर किंवा लिखित पानांवर पाय पडू दे, अगर केरसुणीवर, एखाद्या पवित्र मानल्या गेलेल्या वस्तूला पाय लागल्यास आपण झटदिशी त्या वस्तूला हाताने स्पर्श करून नमस्कार करतो.

संगोपनगृहात टसर रेशीम

$
0
0
टसर रेशीम कीटकांचे अंडीपुंज तयार करून आणि टसर रेशीम कोषाचा यशस्वी प्रयोग वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण कॉलेजमधील प्राणिशास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. रंगराव पी. कावणे यांनी केला आहे.

श्रावणवेळी... रामलिंगची फेरी!

$
0
0
ऐन श्रावणात सणवारांपाठोपाठ सुट्यांचीही गर्दी होते. सणांना जोडून सुटी आली की मग धमालच करायला मिळते. त्यात एखाद्या रविवारला जोडून येणारी सुटी असेल तर मग आपल्याला मनाजोगती धमाल करता येते.

जीवन प्राधिकरणाचे अधिकारी धारेवर

$
0
0
सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या संथगतीच्या कामामुळे सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार धारेवर धरले आहे.

रणजित भोसलेसह ९ जण न्यायालयीन कोठडीत

$
0
0
चारा छावण्यांना मुदतवाढीच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अप्पर जिल्हाधिकारी बी. एस. प-हाड यांच्या गाडीच्या तोडफोडप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजित भोसलेसह नऊजणांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली.

शेतक-यांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’ची रॅली

$
0
0
जिल्ह्यातील शेतक-यांना ऊसाचा दुसरा हप्ता देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १८ व २५ ऑगस्ट रोजी साखर कारखान्यांवर शेतक-यांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिली.

आजरा ग्रामसभेत के. पी. पाटील यांचा निषेध

$
0
0
प्रांत कार्यालय पुनर्रचनेत आजरा-भुदरगडचे कार्यालय गारगोटीला नेण्याला आमदार के. पी. पाटील जबाबदार आहेत. त्यांच्या मतदारसंघाचा भाग असणा-या आजरा तालुक्यावर अन्याय करताना केवळ भुदरगड तालुक्याचे हितसंबंध पाहिले.

शहीद मानेंच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून धनादेश सुपूर्द

$
0
0
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरूवारी (ता.१५) पिंपळगाव बुद्रुक येथील शहीद जवान कुंडलिक माने यांच्या घरी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले.

द्विस्तरीय रचनेला विरोध

$
0
0
नाबार्डच्या व्दिस्तरीय रचनेला राज्य सरकारने विरोध दर्शवलेला असून लवकरच वरिष्ठ स्तरावर बैठक घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images