Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेट्टींची मस्ती जनताच उतरवेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीइतकेही वय नसलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्याकडे पवार यांच्यावर बोलण्याइतपत ​कुठून मस्ती आली आहे? हे पहावे लागेल. ही मस्ती जनता निश्चित उतरवेल', अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. यापुढील काळात पवार यांच्यावर टीका सहन करणार नाही असा इशाराही दिला आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर इडीने केलेल्या कारवाईनंतर शरद पवार यांनी भुजबळ यांच्या पाठीशी रहात, 'आम्ही तुरुंगात जाण्याची वाट पाहतोय' असे वक्तव्य केले होते. त्यावर शेट्टी यांनी, 'पवार यांनी तुरुंगात जाऊन आत्मचिंतन करावे' अशी टिका केली होती. त्याबाबत मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन शेट्टी यांच्या विचाराचे व 'घालीन लोटांगण' पद्धतीच्या राजकारणाचे वाभाडे काढले.

मुश्रीफ म्हणाले, 'शेट्टी यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोतच. पण ऊसकरी शेतकऱ्याला ऊसाचा दर मिळत नसतानाही त्यांच्या जिवावर राजकारण करणारे शेट्टी मूग गिळून गप्प आहेत. साखर कारखान्यांच्या इतिहासात साखर दराचा १९०० रुपये इतका नीचांक झाला आहे. त्याबाबत काही बोलत नाहीत. लोकसभेतही ते जात नाहीत. नुकत्याच केंद्र सरकारने घेतलेल्या लेखाजोख्यामध्ये शेट्टी यांचे निष्क्रिय खासदार म्हणून नाव आले आहे. केंद्राने साखरेचा ५० लाख टन बफर स्टॉक केल्यास दर वाढतील अशी शक्यता असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ग्राहकांचे साखरेचे दर वाढतील म्हणून त्यांनी बफर स्टॉक करण्यास नकार दिला. शेतकऱ्यांची त्यांना चिंता नाही. याबाबतही शेट्टी काही म्हणत नाहीत. यापाठीमागे शेट्टी यांचे युती सरकारपुढे घालीन लोटांगण हेच धोरण स्पष्ट होत आहे. आम्ही युती सोडणार नाही, हवे तर काढून टाकावे अशी भूमिका घेतली आहे.'

'शेट्टी यांच्या या भूमिकेचा १०० वा प्रयोग पाहून कोल्हापूरकर कंटाळले आहेत' असे सांगत मुश्रीफ म्हणाले, 'आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे की शेट्टी यांची लाल दिव्याची आस, महामंडळाचे दोन चार तुकडे टाकून लाचारी संपवावी. आम्ही शेतकऱ्यांसोबत आयुष्य घालवले आहे. त्यामुळे कसे आंदोलन करावे हे शेट्टी यांनी सांगू नये. शेतकऱ्यांसाठी आम्हाला त्यांच्यासारखे पायाला फडके बांधून फिरण्याचे नाटक जमणार नाही.' याप्रसंगी ए. वाय. पाटील, युवराज पाटील, भैय्या माने, राजू लाटकर, अनिल साळोखे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


याचिका, कॅव्हिएटसाठी धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तृप्ती माळवी यांच्या नगरसेवकपदासह महापौरपद रद्द ठरविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यासाठी माळवी यांच्याकडून तर कॅव्हिएट दाखल करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून धावाधाव सुरू आहे. कॅव्हिएट दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वकिलापर्यंत पोहोचवण्यासाठी खास यंत्रणा राबवण्यात आली आहे. आता सोमवारीच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

सोळा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागा तृप्ती माळवी यांच्यावर राज्य सरकारने कारवाई केली होती. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानंतर गुरुवारी राज्य सरकारने माळवी यांचे नगरसेवकपदही रद्द केले. सरकारच्या त्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यासाठी माळवी यांच्याकडून हालचाली वेगावल्या होत्या. त्याचवेळी या निर्णयाला तत्काळ स्थगिती मिळू नये यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक, तसेच महापालिका प्रशासनाच्यावतीनेही हालचाली गतिमान झाल्या. दरम्यान, शुक्रवारी मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने हायकोर्टाचे काम बंद होते. त्यामुळे ही प्र​क्रिया पूर्ण झाली नाही. मात्र, आघाडी व प्रशासनाचे स्वतंत्र वकील असल्याने त्यांना कॅव्हिएट दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येथून पाठवण्यात येत होती. प्रशासनाने शुक्रवारी रात्रीही खास कर्मचारी पाठवून कॅव्हिएटबाबतची आवश्यक कागदपत्रे शनिवारी वकीलांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली होती.

'कॅव्हिएट दाखल होण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारी ती रीतसर दाखल होईल.'

- राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे गटनेते

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी हायकोर्टात याचिका दाखल केली जाईल.

- तृप्ती माळवी, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कर्जवसुलीसाठी नवे धोरण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून कर्जाची ३५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी लवकरच नवीन धोरण ठरविले जाईल, असे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले.

कारखान्याची जमीन विक्री प्रक्रिया सहकार आयुक्तांनी रद्द केल्याने बँकेच्या वसुलीतील अडचणी वाढल्या आहेत हे खरे आहे. कारखान्याला आतापर्यंत ११० कोटी १६ लाख ८३ हजार रुपयांचा कर्जपुरवठा झाला. कारखान्याची एकूण येणेबाकी ७८ कोटी ६८ लाख रुपये आहे. कारखान्याच्या मालकीची २१ एकर जमीन प्लॉट पाडून विकण्याच्या प्रस्तावाची मान्यता सहकार आयुक्तांनी रद्द केली आहे. त्यामुळे जमीन विक्रीतून जिल्हा सहकारी बँक, इतर सरकारी देणी, शेतकऱ्यांची ऊसबिले भागविण्याचा कारखान्याचा प्रयत्न फसला आहे. सहाजिकच त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेची कर्ज वसुलीही अडचणीत आली आहे. यातून काही मार्ग निघतो का? या दृष्टीने बँकेची चाचपणी सुरू आहे.

या कारखान्याने ही २१ एकर जमीन (१०३ प्लॉट पाडून) विक्रीचा निर्णय घेऊन त्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यातून ८० ते १०० कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा होती. पण, तांत्रिक अडचणीमुळे या लिलावालाही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. सहाजिकच त्यामुळे हा लिलाव तीन वेळा पुढे ढकलण्यात आला. अखेर तत्कालीन जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी लिलावाची ही प्रक्रिया थांबवून राज्य सरकारला अहवाल पाठविला. फेरप्रक्रिया राबविण्यासाठीही परवानगी मागितली. पण, सहकार आयुक्तांनी जागा विक्रीचा हा प्रस्तावच रद्द केला.

दरम्यान, पूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे सरकार या प्रस्तावाला फेरमंजुरी देण्याची शक्यता दिसत नाही. एकेकाळचा आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा साखर कारखाना असा या कारखान्याचा लौकिक होता. पण कारखाना रसातळाला गेला. काही वर्षे तो बंद पडला होता. कारखान्याची विविध देणी २५० कोटी रुपयांच्या आसपास आहेत. मागील गळीत हंगामातील पूर्ण बिले शेतकऱ्यांना अद्याप मिळायची आहेत.

कामगारांचे आंदोलन

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सुमारे १५० हंगामी व कायम कामगारांनी थकित पगार, ग्रॅच्युईटीसाठी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला घेराओ घातला होता. कामगार प्रतिनिधींबरोबर बैठक ठरलेली असताना सहायक आयुक्त नितीन पाटणकर यांनी कार्यालय सोडून बाहेर जाण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे कामगार संतापले. आता ही बैठक २३ जूनला घेण्याचे ठरले आहे. कामगारांना २००२ पासून २०१५ पर्यंतच्या काळातील अनेक महिन्यांचा पगार थकलेला आहे. नियमाप्रमाणे बोनस, राजा, ग्रॅच्युईटीही दिलेली नाही. कामगारांचे कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते पगारातून कापून घेण्यात आले आहेत. पण, ते भरलेले नाहीत असाही कामगारांचा आरोप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर पुन्हा कोल्हापूर नगरपालिका करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अजूनपर्यंत एक इंचही हद्दवाढ न झालेल्या शहराचा विकास होण्यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. हद्दवाढीसाठी सरकार जर बघ्याची भूमिका घेणार असेल व हद्दवाढ करायची नसेल तर किमान महापालिकेची अ वर्ग नगरपालिका करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, असे उपरोधिक निवेदन काही शहरवासियांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

१९७२ साली महापालिका करताना एक इंचही हद्दवाढ केलेली नाही. त्यामुळे उत्पन्नात वाढ झालेली नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जादा कराचा भार शहरवासियांवर पडत आहे. नुकतेच पालकमंत्र्यांनी हद्दवाढीत येणाऱ्या गावांची समजूत काढण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे सांगून जबाबदारी झटकल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यातून शहरी व ग्रामीण हा वाद वाढीस लागला आहे. तो वाढू नये म्हणून पालकमंत्र्यांनी त्या गावच्या नेत्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नेते शहरात राहतात, सर्व सुविधांचा लाभ घेतात. पण मताच्या राजकारणासाठी हद्दवाढीला विरोध करतात हे योग्य नाही. त्यामुळे सरकारही हद्दवाढ करणार नसेल तर महानगरपालिकेची नगरपालिका करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, असे अनिल घाटगे, अजित सासने, अशोक पोवार, बाबा पार्टे, किसन कल्याणकर, संभाजीराव जगदाळे यांनी निवेदन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्कालीन यंत्रणा सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हातकणंगले तालुक्यामध्ये पूरपरिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या गावांना सर्व प्रकारच्या सुविधांसह आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली असून यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार दिपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक गावात आपत्कालीन मदत गट तयार करण्यात आला आहे. तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा आपत्ती व्यवस्थापनात समावेश केल्यामुळे आपत्कालीन यंत्रणा गतिमान झाली आहे.

हातकणंगले हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका गणला जातो. या तालुक्यामध्ये सर्वाधिक १९ गावे पूरपरिस्थितीमुळे बाधित होणारी आहेत. २००५ मध्ये आलेल्या महापुरात सर्वाधिक नुकसान हातकणंगले तालुक्याचे झाले होते. तालुक्यातील पंचगंगा नदीपासून इचलकरंजी शहर, रूई, चंदूर, पट्टणकोडोली, रांगोळी, हालोंडी, शिरोली, हुपरी, रेंदाळ, इंगळी तसेच वारणा नदीपासून निलेवाडी, जुने पारगाव, चावरे, घुणकी, भेंडवडे, लाटेवडे, खोची, वाठार तर्फ वडगाव, भादोले आदी १४ गावे पूरपरिस्थितीमुळे बाधित होणारी आहेत. या सर्व गावातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेवून प्रातांधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार दिपक शिंदे यांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेवून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये सर्व गावातील सरपंचांसह लोकप्रतिनिधींच्यावर आपत्कालीन यंत्रणेची जबाबदारी दिली आहे. या आपत्कालीन मदत गटामध्ये गाव आपत्ती व्यवस्थापन, पूर्व सूचना गट, शोध व सुटका, प्रथमोचार, निवारा, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, अत्यावश्यक व महत्त्वपूर्ण सेवा, वाहनधारक यंत्रणा अशाप्रकारे गट तयार करून यंत्रणा गतिमान झाली आहे. त्याचबरोबर आपत्ती काळामध्ये ६ लाकडी होडया, एक यांत्रिक बोट कार्यरत असून पर्यायी लाईटची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. मागील आठवड्यामध्ये रूई, इचलकरंजी येथे पंचगंगा नदीवर भेट देऊन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी माहिती घेवून समाधान व्यक्त केले होते.

हातकणंगले तालुक्यामध्ये जून महिन्यामध्ये सरासरी ५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याच्या नोंदी तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करून घेण्याचे काम सुरू असते. अशाप्रकारे हातकणंले तालुक्यातील पूरबाधित १९ गावांसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे.

हातकणंगले तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून पूरपरिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी होवू नये यासाठी बाधित १९ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून यासाठी सर्व सरकारी यंत्रणा सक्रिय झाली आहे. सर्व नागरिकांनी या यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

-दीपक शिंदे, तहसीलदार, हातकणंगले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पावसामुळे आजरा तालुक्यात घरांची पडझड झाली तर राधानगरी तालुक्यात अनेक ठिकाणी वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

आजऱ्यात जोरदार वृष्टी

आजरा गेले काही दिवस ढगाळ वातावरणासह नुसतेच भुरभरणा-या पावसाने आजरा परिसराला शनिवारी रात्रीपासून झोडपण्यास प्रारंभ केला आहे. पावसाबरोबरच घोंगावणाऱ्या वाऱ्याचा वेगही मोठा आहे. आजऱ्याच्या पश्चिम भागातील १९३ मिलमीटर पावसासह संपूर्ण तालुक्यात सरासरी १०१.२५ मिलमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावासाच्या जोरदार वृष्टीमुळे तालुक्यात तीन ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावासाचे जोरदार आगमन झाल्यानंतरही आजरा परिसरात त्यामानाने पावसाने उसंत घेतल्याचेच चित्र होते. बहुतांश ठिकाणच्या धूळवाफेच्या भात-पेरण्या आटोपण्यासह रोपलावणीचे तरवे व नाचणीचे लव्हे टाकण्यात शेतकरी गुंतला होता. पण पावसाला जोर नसल्याने अस्वस्थता होती. त्यामुळे रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अखेर प्रतीक्षा संपल्याचे चित्र निर्माण झाले. प्रारंभालाच तालुक्यात पावसाची अतिवृष्टी नोंद झाली आहे. तालुक्यातील आजरा, गवसे, मलिग्रे व उत्तूर अशा विभागात अनुक्रमे ९१, १९३, ६२ व ५९ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी १०१ मिमी पाऊस नोंदविला गेला. आजअखेर तालुक्यात ४०५ मिमी पाऊस नोंदला आहे. पावसाच्या सरींमुळे दिवसादेखील वाहने हेडलाईट लाऊनच धावत होती. दरम्यान जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावासाने तालुक्यात तीन पडझडी झाल्या. भादवणवाडी येथे दशरथ रामचंद्र देवरकर व चांदेवाडी येथे जयसिंग आप्पा कोंडुस्कर यांच्या घरांच्या तर गवसे येथे भिकाजी आप्पा पाडील यांच्या झेरॉक्स सेंटरच्या भिंती कोसळल्या असून अंदाजे ७५ हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

हिरण्यकेशीच्या पातळीत वाढ

गडहिंग्लज शहर व परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली. रविवारचा आठवडी बाजार पावसामुळे धुवून गेला. व्यापारी व ग्राहकांची गैरसोय झाली. मात्र छत्री, रेनकोट, प्लास्टिक कागद, ताडपत्री विक्रेत्यांसह छत्री दुरुस्ती कारागिरांकडे गर्दी होती. कुंभार वसाहतीतील एका घरावर बाभळीचे झाड पडल्याने किरकोळ नुकसान झाले. हिरण्यकेशी नदीपत्रातील पाण्याची पातळी वाढली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दिवसभरात २५ मि.मी. तर आजअखेर ९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

शाहूवाडीत दमदार हजेरी

शाहूवाडी तालुक्याच्या सर्वच भागात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. संततधार पावसामुळे कडवी, शाळी, कासारी, वारणा या नद्यांची पात्रे भरुन वाहू लागली आहेत. शेते तुडुंब भरली आहेत. उतारावरून आलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील मलकापूरनजीकच्या येलूर गावच्या सखल रस्त्यावरुन पाणी वाहत आहे. या पाण्यातूनच वाहनांची ये जा सुरु आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातल्या कडवी मध्यम प्रकल्पासह पालेश्वर, कुंभवडे, केसरकरवाडी, मानोली, कांडवण, चांदोली, भंडारवाडी या लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पश्चिमेकडील आंबा, परळे निनाई, आळतूर, कडवे, चांदोली, येलूर, निळे, पेरीड या भागातील शेतकरी रताळीचे वेल लावण्याच्या कामात मग्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोडाऊन फोडून २६ एलइडी चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील नवीन शिवाजीनगर येथील गोडाऊन फोडून चोरट्यांनी चार लाख ८६ हजार रुपये किंमतीचे २६ एलइडी चोरून नेले. शनिवारी दुपारी तीन वाजता चोरीची घटना उघडकीस आली. प्रशांत एकनाथ मुजुमदार (रा. कागल) यांनी फिर्याद दिली आहे.

मुजुमदार यांनी सचिन खवरे यांच्या मालकीचे शिरोली एमआयडीसीतील गोडाऊन भाड्याने घेतले आहे. या गोडाऊन एलइडी, फ्रीज, वॉशिंग मशिनसह इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्या जातात. शुक्रवारी सायंकाळी गोडाऊन बंद केले होते. शनिवारी दुपारी मुजुमदार यांनी गोडाऊन उघडले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी स्लॅबवरून मोकळ्या जागेत प्रवेश करून लोखंडी जाळीचे दार कापून एलइडी चोरून नेले. शिरोली एमआयडी पोलिस ठाण्यात या चोरीच्या प्रकाराची नोंद झाली आहे. दरम्यान, शिरोली एमआयडीसी पसिरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चोरीचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांसह उद्योजकांतून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ्यांच्या करारासह भाडेवाढीचे भिजत घोंगडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्याचे भाडे आ​णि कराराचे नूतनीकरण प्रश्नी प्रशासन आणि नगरसेवकांत एकमत होत नसल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित पडला आहे. मुदत संपूनही अनेकांनी नवा करार केला नाही. वर्षानुवर्षे गाळेधारक प्रचलित भाडे भरत आहेत. परिणामी महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडले आहेत.

महापालिका प्रशासन नियमावर बोट ठेवून काम करत आहे, तर दुकानदारही भाडेवाढ आणि करारासाठी दोन पावले पुढे यायला तयार नाहीत. परिणामी दुकानगाळ्यांच्या भाडेवाढ आणि कराराचे नूतनीकरणावर तोडगा निघेनासा झाला आहे. करार आणि भाडेवाढीबाबत निर्णय झाला नसल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. शहरातील विविध भागात महापालिकेने स्व मालकीची मार्केट उभारली आहेत. शहरातील मार्केटची संख्या ४६ आहे. या मार्केटमधील दुकानगाळ्यांची संख्या २०८५ इतकी आहे. बहुतांश गाळेधारकांसोबत झालेला करार संपला आहे. काही दुकानदारांशी वीस वर्षे तर काही दुकानदारांशी ३० वर्षाचा करार झाला होता. पूर्वीच्या करारानुसार शहरातील मध्यवस्तीतील मार्केटसह अन्य मार्केटमधील दुकानगाळ्यांना दरमहा ३०० ते ७०० रुपये भाडे आहे. नव्याने करार झाला नसल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्या आहेत.

करार संपूनही महापालिका प्रशासन आ​णि दुकानदारांत यासंदर्भात नव्याने हालचाली झाल्या नाहीत. परिणामी दुकानगाळ्यांच्या भाडे आकारणीचा आणि कराराचा प्रश्न जैसे थे आहे. महापालिकेच्या २७ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सध्याच्या रेडीरेकनरच्या तिप्पट दराने भाडे वाढ करण्याचा ठराव मंजूर झाला. हा नियम लावला तर महापालिका इमारत, शिवाजी मार्केट, गांधी मैदान, कपिलतीर्थ, गंगावेश, राजारामपुरी, शाहू क्लॉथ मार्केट येथील दुकानगाळ्याचे भाडे १५००० च्या आसपास पोहचणार आहे. इतके भाडे गाळेधारकांना मान्य नाही. भाड्याची रक्कम भरेपर्यंत दुकानदार मेटाकुटीला येतील असे त्यांचे म्हणणे आहे. २० मे २०१५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने, तिप्पट भाडे आकारणी करून मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महापालिका प्रशासनाने, महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांना भाडे आकारणी आणि करारासंदर्भात नियमावली आहे. मुंबई महापालिका अधिनियमन ७९ क व ड नुसार सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी भाडे आकारणी करता येत नाही.

- संजय भोसले (इस्टेट विभाग)

गाळेधारकांच्या प्रश्नासंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर हरेल, दिगंबर लोहार, नंदकुमार वळंजू, राजाराम कुंभारासह शिष्टमंडळाने उपायुक्त विजय खोराटे यांच्याशी चर्चा करून ९९ वर्षाच्या कराराने गाळे भाड्याने द्यावेत अशी मागणी केली आहे.

- बबन महाजन (सल्लागार, कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन)

महापालिकेचे दुकानगाळे : २०९५

बहुतांश गाळेधारकांचा करार संपला आहे

जुन्याच दराने भाडे आकारणी सुरू आहे

प्रशासनाचा प्रस्ताव रेडीरेकनरच्या तिप्पट वाढीचा

दुकानदारांना हा प्रस्ताव अमान्य

बाजारभावापेक्षा कमी आकारणी न करण्याची प्रशासनाची भूमिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाडूच्या मूर्तीसाठी राबताहेत हात

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

गणेशोत्सवास आणखी तीन महिने अवधी असला तरी कुंभारवाड्यात मूर्तीकाम गतीने सुरू आहे. कामातील सुलभतेमुळे दिवसाला शेकडो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार होत असताना हस्तकलेवर अधिक भर असलेल्या, पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तीकामाला वेळ लागत आहे. त्यामुळे दररोज अवघ्या दोन ते तीन मूर्ती तयार होतात. या मूर्तीकामात कुंभार गल्लीतील कुटूंबे मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोल्हापुरात पापाची तिकटी, शाहूपुरी व बापट कॅम्प येथे कुंभारवाडे आहेत. बापट कॅम्पमध्ये एक फूट ते अगदी भव्य मूर्तींचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शेकडो मूर्ती रंगवून तयार आहेत. कमी वेळेत जादा मूर्ती तयार होत असल्याने कुंभार व्यावसायिकांनी, कलाकारांनी शाडूंच्या मूर्तींकडे नेहमीप्रमाणे पाठ फिरवली आहे. मात्र, प्लास्टरच्या मूर्तींमुळे प्रदूषणाचा प्रश्न कायम असल्याने पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांचा शाडूच्या मूर्तीचा आग्रह कायम आहे.

सध्या शाडूची उपलब्धता कमी असल्याने, शाडू महाग मिळत असला तरी मोजके कलाकार शाडूची मूर्ती बनवतात. शाडूच्या विटा आणून, फोडून शाडू चाळला जातो. त्याच्या पीठात कापूस, थोडे पाणी घालून तो एकजीव केला जातो. नंतर अगदी मऊ शाडू साच्यात घालून मूर्ती तयार केली जाते. या प्रक्रीयेला वेळ लागत असल्याने कलाकार दिवसाला दोन किंवा तीन मूर्ती तयार करतात. मेणात पितळी पातळी बूडवून मूर्तीला आकार दिला जातो. साच्यातून आलेल्या खडबडीत मूर्तीला आकार दिला जातो. मूर्तीला चार हात, सोंड कुशलेतेन जोडली जाते. जास्त श्रम, कमी मोबदला मिळत असल्याने तरुण मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्तीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या सीनिअर कलाकार, महिला शाडूची मूर्ती बनवतात. शाडूची मूर्ती काहीवेळा हिटरने वाळवली जाते. तडे भरले जातात. उत्सव जवळ आल्यावर रंगाचा हात फिरतो. आजही अनेक नागरिक जादा रक्कम मोजून शाडूची मूर्तीच बनवायला लावतात. सध्या पापाची तिकटी येथील उज्ज्वला ब्रह्मपुरे, सुवर्णा वडगावकर, अनिल वागवेकर, बंटी बावडेकर, शिवाजी कातवरे यांचे हात शाडूची मूर्ती तयार करण्यात गुंतले आहे. अंबाबाई मंदिरातील महालक्ष्मी भक्त मंडळ, संभाजीनगर तरूण मंडळाची पाच ते सहा फूट उंचीची मूर्ती शाडूचीच असते. उत्सवाच्या काळात पर्यावरणावर प्रेम करणारे, शाडूची मूर्तीच पूजेसाठी हवी म्हणून शोधत येणारे नागरिक पाहिले की या कलाकारांना कलेचे चीज झाल्यासारखे वाटते.

विसर्जित मूर्तींतून नवे काम

पर्यावरण रक्षणाचे भान असलेल्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा निग्रह वाखाणण्याजोगा असतो. 'काहीजणांनी गेल्यावर्षी शाडूच्या मूर्तीचे घरातील टबात विसर्जन करून विरघळलेली शाडू पुन्हा कुंभारांच्या आणून दिली आहे. विसर्जित मूर्तीच्या शाडूतूनच नवी मूर्ती हवी असे त्यांनी सांगितले आहे. त्यातूनच नवी मूर्ती तयार केल्या जात आहेत', असे मूर्तीकार उज्ज्वला ब्रह्म्पुरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लायसन्सवेळी हेल्मेट वापराचे प्रतिज्ञापत्र’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हेल्मेट वापराबाबत राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळी स्थिती आहे. मात्र सुरक्षिततेबाबतची बाब लक्षात घेऊन वाहन चालवण्याचा परवाना देताना संबंधितांकडून हेल्मेट वापर केला जाईल असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे,' असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते.

मंत्री रावते म्हणाले, 'सध्या मोठ्या शहरांमध्ये हेल्मेटची सक्ती केली जाते. त्यामुळे हायवे आणि छोट्या शहरांमध्ये त्याबाबत काही कारवाई होताना दिसत नाही. मात्र हेल्मेट वापरासाठी वेगळ्याप्रकारे सक्ती केल्याशिवाय सुरक्षितता बाळगली जाणार नाही. त्यामुळे आता बेकायदेशीर वाहनांबाबतही कारवाई सुरू केली आहे. लवकरच ही कारवाई सर्वत्र दिसू लागेल.'

सिंचन घोटाळ्याच्या पुढील कारवाईबाबत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, 'यातील घोटाळ्यांबाबत बारकाईने अभ्यास केला जात आहे. प्रत्येक प्रकरणाची अतिशय बारकाईने छाननी सुरु आहे. त्यामुळे योग्य वेळी, योग्य त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येईल.' अलमट्टी धरणाच्या वाढविण्यात आलेल्या उंचीमुळे कोणते परिणाम होतात याची माहिती घेतली आहे.' याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर उपस्थित होते.]

सीमाप्र्रश्नी पुढाकार

'कर्नाटकव्याप्त भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी शिवसेनेची प्रथमपासून कणखर भूमिका आहे. येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात ठोस भूमिका मांडण्यात येणार आहेच. शिवाय शिवसेनेला या भागासाठी जे-जे करावे लागेल, ते करण्याची तयारी आहे', असे शिवसेनेचे नेते व मंत्री रावते यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सरकारमध्ये असल्याचा आणि नसल्याचा या प्रश्नाच्या संघर्षात फरक पडणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर विरोधकांच्या दारात आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरात राहायचे. सगळ्या सुविधा घ्यायच्या. मात्र राजकीय स्वार्थापोटी हद्दवाढीला विरोध करायचा. ग्रामीण भागातील लोकांची दिशाभूल करून आंदोलन करायला लावायचे. राजकीय सोयीसाठी अशी खेळी करणाऱ्या लोकप्रतिनिधी-आमदारांच्या दारात आंदोलन करण्याचा, प्रसंगी त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाका अशा संतप्त भावना कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत उमटल्या. हद्दवाढ तत्काळ व्हावी या मागणीसाठी रास्ता रोको, मोर्चा, आंदोलन करण्याची तयारी यावेळी कार्यकर्त्यांनी दर्शवली.

अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, '१८५४ पासून कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नाही. कोल्हापूरसाठी हे लाजिरवाणे आणि नामुष्कीजनक आहे. एका पिढीचे निम्मे आयुष्य हद्दवाढीसाठी संघर्ष करण्यात खर्ची पडले. पण सरकारला जाग आली नाही. ग्रामीण भागातील राजकारणासाठी काही जण जनतेची फसवणूक करत आहेत. हद्दवाढीमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होणार असून या संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे.'

माजी महापौर मारूतराव कातवरे यांनी हद्दवाढीसाठी आंदोलन करायची तयारी असल्याचे सांगितले. कॉम्रेड दिलीप पवार म्हणाले, 'कोल्हापूरची हद्दवाढ करणे ही सरकारची जबाबदारी आहे. ग्रामीण भागतील जनतेने हद्दवाढीला साथ द्यावी. आता हद्दवाढीला विरोध करणारे स्मार्ट सिटीत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर काय करणार ? हद्दवाढीला विरोध करणाऱ्यांना उलटेपुलटे केले पाहिजे.'

माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी हद्दवाढीसाठी ग्रामीण भागातील जनतेत जागृती करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. स्थायी सभापती आदिल फरास यांनी कोल्हापूर शहराचा श्वास घुटमळत आहे. हद्दवाढ झाल्यास हजारो कोटी रुपयांची विकास कामे ग्रामीण भागात होणार आहेत. माजी महापौर नंदकुमार वळंजू, अनिल घाटगे, अशोक भंडारे, सुरेश जरग, राजू जाधव, लक्ष्मीकांत मिरजकर, बजरंग शेलार यांची भाषणे झाली. मेळाव्याला रामभाऊ चव्हाण, उपमहापौर मोहन गोंजारे, चंद्रकांत घाटगे, अॅड. अशोक साळोखे, बाबा पार्टे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते. हिंदू एकता आंदोलनाचा हद्दवाढीला पाठिंबा असल्याचे अण्णा पोतदार, हिंदुराव शेळके यांनी सां​गितले. 'आप'ने ही पाठिंबा दिला.

पालकमंत्र्यांनी हिताची बाजू घ्यावी

ग्रामीण भागाचा विरोध असेल तर हद्दवाढ करणार नाही असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद बैठकीत उमटले. पालकमंत्र्यांनी शहर हिताची स्पष्ट भूमिका मांडावी अशा भावना व्यक्त झाल्या.

विरोधकांचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजू लाटकर यांनी हद्दवाढीला विरोध करणाऱ्या आमदार व लोकप्रतिनिधींचा समाचार घेतला. जे हद्दवाढीच्या विरोधात आहेत, त्यांच्या दारात आंदोलन केले पाहिजे. ग्रामीण भागाचा हद्दवाढीला तीव्र विरोध असेल तर जकात नाक्यापासून आंदोलन करावे लागेल. ग्रामीण भागाला महापालिका केएमटी, शिक्षण, आरोग्य, अग्निशमन अशा सुविधा पुरवते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी हद्दवाढ; मगच निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षीय मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवत सर्व राजकीय पक्ष शहराच्या हद्दवाढीसाठी एकवटल्याचे चित्र रविवारी दिसले. 'हद्दवाढीअभावी शहराच्या विकासाला मर्यादा पडल्या आहेत. कोल्हापूर शिक्षण, औद्योगिक, सहकार, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत अग्रेसर असताना या शहरावर अन्याय का?' असा सवाल करीत राज्य सरकारने तत्काळ हद्दवाढ करावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी इच्छाशक्ती दाखवावी आणि मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीची अधिसूचना काढावी, अशी भूमिका विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. शहर हद्दवाढ कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटलेल्या पक्षांनी 'आधी हद्दवाढ, मगच महापालिका निवडणुका घ्या,' अशी जोरदार मागणी केली.

हद्दवाढीसाठी पाठपुरावा करण्यासाठी शहर हद्दवाढ कृती समितीची स्थापना झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, शेकाप, भाकप, आप अशा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. समितीची रविवारी शाहू स्मारक भवनात बैठक झाली. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव अध्यक्षस्थानी होते.

'गेल्या चाळीस वर्षांपासून हद्दवाढीच्या मागणीला न्याय मिळाला नाही. यासाठी सामुदायिकपणे पाठपुरावा केला तर प्रश्न मार्गी लागेल,' असे समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार यांनी सांगितले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, 'ग्रामीण भागातील लोकांचा हद्दवाढीला होणारा विरोध अनाठायी आहे. ग्रामीण भागातील २५ टक्के लोक शहराशी निगडीत आहेत. त्यांना सोयी सुविधांचा लाभ होतो. हद्दवाढीसाठी ही निर्णायक वेळ आहे.' राज्य सरकार हद्दवाढीबाबत सकारात्मक असल्याचे सांगून महेश जाधव म्हणाले, 'कोल्हापूरकरांना हद्दवाढीसाठी आंदोलन करायची वेळ येणार नाही. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधी, आमदारांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झाडलोट करीत प्रतीक्षाची यशाला गवसणी

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

चार मजली इमारतीची करण्यात येणारी झाडलोट हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग. इमारतीच्या टेरेसवर पत्र्याचे शेड मारून तयार केलेली दहा बाय दहाची खोली म्हणजे घर. वडील मणक्याच्या आजाराने ग्रासलेले. त्यामुळे वडिलांचा त्रास कमी करण्यासाठी शाळा सुटल्यानंतर दररोज सायंकाळी इमारतीची लोटझाड हा तिचा नित्यक्रम. त्यामुळे दिवसभरात वेळ मिळेल त्यावेळी इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर बसून तर दररोज पहाटे चारपासून सहा वाजेपर्यंत इमारतींच्या पायऱ्यांवरील दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करीत प्रतीक्षा हरीश जाधव हिने दहावीत ९२.४० टक्के गुण मिळवून लख्ख यश मिळवले, तेही कोणताही क्लास न लावता.

हरीश जाधव व विजया जाधव हे दाम्पत्य मूळचे औरंगाबादचे. दोघांच्याही मागे कुणीही नातेवाईक नाही. त्यामुळे दोघांचा विवाह तिथे सामूहिक ​विवाह सोहळ्यात झालेला. मजुरी हाच उत्पन्नाचा मार्ग असल्याने काम शोधण्यासाठी १९९७ साली ते कोल्हापुरात आले.

बांधकामावर मजूर म्हणून काम करत वॉचमनचे काम सुरू केले. बांधकामाजवळच बांधलेली पत्र्याची झोपडी हेच घर. अशा घरातून मोठा मुलगा ओंकार व प्रतीक्षाने आईच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाची बाराखडी गिरवायला सुरुवात केली. राजारामपुरीनंतर रेल्वे स्टेशनजवळ बांधण्यात येत असलेल्या रॉयल कोर्ट इमारतीच्या बांधकामाच्या वॉचमनचे काम केले. आता तिथेच जाधव कुटुंबीय सफाई व वॉचमनचे काम करत आहे.

गरिबांची सेवा करायचीय

आरोग्यसेवा सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालली आहे. त्यामुळे मला आता मेडिकल शाखेत प्रवेश घेऊन गोरगरिबांची सेवा करायची आहे, अशी इच्छा प्रतिक्षाने बोलून दाखवली. या शिक्षणाचा खर्च मोठा आहे याची मला जाणीव आहे. त्यासाठी पार्टटाइम काम करीत या शाखेचे शिक्षण घ्यायचीही तयारी आहे, असे ती म्हणाली.

विद्यार्थ्याचे नाव :

प्रतीक्षा जाधव

चेक स्वीकारण्याचा पत्ता :

महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहर रेसिडन्सी, २४९ ए, १, ७७, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर.

संपर्कः गुरुबाळ माळी

८५५१०१४०४०

(विशेष सूचना : चेक विद्यार्थ्यांच्या नावाने द्यावेत. चेक गोळा करण्यासाठी 'मटा'ने कोणाचीही नेमणूक केलेली नाही.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरसमजातून दोन महिलांचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

बहिणीच्या सासरची मंडळी समजून भावाने साथीदारांच्या मदतीने गैरसमजुतीने तीन वेगळ्याच महिलांचे गळे चिरल्याची गंभीर घटना रविवारी घडली. त्यापैकी दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिसऱ्या महिलेला गंभीर आवस्थेत सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना खानापूर तालुक्यातील हिवरे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीनही हल्लेखोरांना तत्काळ अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली.

बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या सासरी गेलेल्या सुधीर सदाशिव घोरपडे या भावाने दोन साथीदारांच्या मदतीने बहिणीच्या सासरची मंडळी समजून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या निरपराध तीन महिलांचे धारदार चाकूने गळे चिरले. या अचानक झालेल्या हल्ल्यात प्रभावती ब्रम्हदेव शिंदे (वय ५६ रा. हिवरे) आणि सुनिता संजय पाटील (वय ३२ रा. वायफळे ता. तासगाव) या माय लेकींचा जागीच मृत्यू झाला. तर सून निशिगंधा बाळासो शिंदे (वय २५ रा. हिवरे) ही अत्यावस्थ आहे. हल्लेखोर सुधीर घोरपडे (२७, रा. धोंडेवाडी), अजय शिंदे (२३, रा. मतकुणकी ) आणि रवींद्र रामचंद्र कदम (२५ रा. भूड) या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडाने संपूर्ण पसिसर हादरून गेला आहे.

खानापूर तालु्क्यातील धोंडेवाडी येथील सुधीर घोरपडे याची बहिणी विद्या हिचा हिवरेमधील बळवंत शिंदे याच्याशी विवाह झाला होता. परंतू २००९मध्ये विद्याने विष पिवून आत्महत्या केली होती. तिचा मृत्यू घातपाताने झाल्याचा संशय घेऊन तिचा पती, सासू, सासरे यांच्यासह पाच जणांवर विटा पोलिसात तक्रात दिली होती. त्यांच्यावरील खटल्याचा नुकताच निकाल लागला होता. त्यात त्यांना निर्दोष सोडल्याने विद्याचा भाऊ सुधीर याच्या मनात चीड निर्माण झाली होती. याच रागातून त्याने विद्याच्या सासरच्या मंडळींना कायमचे संपवून टाकाण्याचा निर्धार केला होता.

पाच वर्षांपूर्वी सुधीरने विद्याचे सासरचे घर पाहिले होते. पण, गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्याच्या सासरची मंडळी वस्तीवरचे घर सोडून गावात रहावायास गेली होती. याची सुधीरला कल्पना नव्हती. ब्रम्हदेव यांच्या घरात पत्नी प्रभावती, मुलगा बाळासाहेब, सून निशीगंधा असे राहतात आणि दोन दिवसांपूर्वी मुलगी सुनिता पाटील ही माहेरी आपला मुलगा सुरजसह तेथे आली होती. रविवारी सकाळी ब्रम्हदेव हे शेजारील हसबे वस्तीवर तर मुलगा बाळासाहेब हा दूध डेअरीत दूध घालण्यासाठी गेला असता साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुधीर व त्याचे दोन साथीदार विद्याचे सासर समजून ब्रम्हदेव यांच्या घरात आले. त्यांनी प्रभावती यांच्या गळ्याला चाकूचा धाक दाखवत जागचे हलाल तर ठार मारीन अशी धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकाराने घरातील तीनही महिला भयभीत झाल्या. घरात असलेला अकरा वर्षांचा सूरज भितीने घाबरून शेजारच्या वस्तीकडे आजोबा ब्रम्हदेव यांच्याकडे पळत सुटला. तीन जणांनी प्रभावती, निशीगंधा आणि सुनिता यांच्या गळयावर एकापाठोपाठ एक असे चाकूने वार केले. प्रभावती आणि त्यांची मुलगी सुनिता यांचा जागीच मृत्यू झाला. तर सून निशीगंधा यांच्यावर स्वयपाक करत असलेल्या ठिकाणीच हल्लेखोरांनी चाकूने वार केले. सुधीर घोरपडे हा संशयीत पळत असल्याचे पाहून नजीकच्या गावातील लोकांनी त्याला पकडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...तर हातभट्टी कायदेशीर करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'वारंवार प्रयत्न करुनही हातभट्टी बंद करता येत नसेल तर ती कायदेशीर करावी म्हणजे, किमान सरकारचे त्यांच्यावर नियंत्रण तरी राहील. शिवाय गरीब लोकांचे मृत्यूही होणार नाहीत. त्याचबरोबर हप्तेबाजी बंद होऊन सरकारला महसूलही मिळेल,' असे मत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आठवले सातारा दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.

मालाड दुर्घटनेतील सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी मुख्यंत्र्यांकडे करणार आहे. त्याचप्रमाणे गोवंश हत्याबंदीमधील वंश हा शब्द काढून टाकावा आणि सत्तेत वाटा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरातील विषारी दारुप्रकरणातील बळींची संख्या रविवारी ९९ वर पोहोचली आहे. तर सुमारे ४५ जण अद्याप शहरातील विविध विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या बाबत बोलताना आठवले म्हणाले, 'आरपीआयच्या वतीने सोमवारी बोरीवली येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून करणार आहे. असे प्रकार होऊ नयेत यासाठी सरकारने अवैध दारू कायमस्वरुपी बंद करावी. परंतु, ते बंद होत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळे हातभट्टीला कायदेशीर परवानगी द्यावी, म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवता येईल. नाहीतर दर दोन वर्षांनी असे प्रकार होत राहतील. प्रत्येक घटनेनंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. ज्याप्रमाणे देशी,विदेशी दारुला परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे हातभट्टीलाही द्यावी म्हणजे पोलिस आणि एक्साईज विभागाचे हप्ते बंद होऊन सरकारला महसूल मिळेल.'

'गोवंशा'विरोधात आंदोलन

गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा यासाठी आरपीआयच्या तीने आंदोलन करण्यात आले आहे. या संदर्भात राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. कायद्यातील 'वंश' हा शब्द वगळावा गोवा सरकारनेही गोवंश कायदा रद्द करुन गोहत्या बंदी कायदा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

भुजबळांना टार्गेट केलं जातय

छगन भुजबळ यांच्या संदर्भात बोलताना आठवले म्हणाले, 'उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असेल तर कारवाई झाली पाहिजे. परंतु, या प्रकरणात कारस्थान असल्याचा संशय आहे. भुजबळ यांना बदनाम करायचे या उद्देशाने कोणीतती हायकोर्टात गेले आहे. भुजबळ यांना टार्गेट केले जात आहे. परंतु चौकशी योग्य दिशेने झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. अन्यायकारक चौकशी होता कामा नये.

सत्तेत वाटा हवा

सरकार येऊन सहा महिने झाले, परंतु भाजपने मित्र पक्षांना सत्तेत वाटा दिलेला नाही. सत्तेत वाटा देणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु त्याची प्रक्रिया अद्याप सुरू नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. आरपीआयला महामंडळामध्ये पाच टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आणीबाणी’ देशाने गांभीर्याने घ्यावी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी यापूर्वीच्या आणीबाणीच्या झळा सोसलेल्या आहेत. त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत त्यांना साम्य वाटत असावे. म्हणूनच त्यांचे विधान देशाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे,' अशी टिप्पणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी अंजनी (तासगाव) येथे बोलताना केली.

तासगाव तालुक्यातील अंजनी येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे आर. आर. पाटील असे नामकरण आणि शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शरद पवार रविवारी अंजनीत आले होते. या वेळी आमदार पतंगराव कदम, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रयतचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी खासदार निवेदिता माने आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आबांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, 'सरकारने साखर कारखानदारांना दिलेले सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज फसवे आहे. ती रक्कम मिळायला आणखी आठ महिन्यांचा कालावधी जाणार आहे. शिवाय चार महिन्यांचे व्याजही कारखानदारांना द्यावे लागणार आहे. कर्जाची मुदत एक वर्षाची आहे. आमचे सरकार असताना साखर कारखानदारांना दीर्घ मुदतीचे कर्ज दहा टक्के व्याज दराने दिले होते. व्याजाची रक्कम सरकारने स्वतः भरली होती.'

दरम्यान, जयंत पाटील, खासदार संजय पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या जिल्हा बँकेच्या युतीबाबत बोलताना पवार म्हणाले, 'स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची स्थिती उत्तम आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने छोट्या छोट्या युत्या होत असतात. त्यामुळे कोण कोणाबरोबर गेला आणि कोण आपल्याबरोबर आला, याला फारसे महत्व देण्याचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यापुढेही राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे.'

बिहारमध्ये राष्ट्रवादी नितीशकुमारांसोबत

बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, 'लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि नितीशकुमार यांचा पक्ष असे आम्ही चार पक्ष एकत्र येवून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची तेथील जनतेची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अगोदर तेथील विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याचे जागावाटप झाले असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला एक जागा आली आहे. सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाही लवकर तयार केला जाणार आहे.

'स्वराज-मोदी'भेटीचे समर्थन

सध्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि ललित मोदी यांच्या भेटीवरुन होत असलेली चर्चा निरर्थक आहे. परदेशात असलेल्या भारताच्या नागरिकाला भेटणे हा काही गुन्हा नाही. नको त्या गोष्टीचे राजकारण केले जात असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला.

भुजबळांवरील माहिती हेतूपुरस्सर

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईबाबत चौकशी यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्याबाबत सवाल करताच पवार म्हणाले, 'मुळात चौकशी करणाऱ्या यंत्रणेने चौकशी पूर्ण झाल्याशिवाय माहिती देणेच चुकीचे आहे. आपणही काही गृहमंत्रिपदाचा कारभार पाहिला आहे. भुजबळांवरील कारवाईबाबत वेगवेगळी माहिती दिली जात आहे, हे संकेताला धरून नाही. काहीतरी हेतू ठेवून सध्या माहिती दिली जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना ४३ कोटींचा फटका

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँकांच्या खातेदारांचे पीककर्ज थकबाकीत जाणार असल्यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेपासून वंचीत राहावे लागणार आहे. सुमारे ४३ कोटी रुपयांचा अतिरीक्त फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे. २०१३-१४ मधील व्याज सवलतीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. २०१४-१५ च्या व्याज सवलत योजनेत शेतकऱ्यांचा समावेश होणार नसल्याने शेतकरी ऐन पेरणीच्या हंगामामध्ये चिंताग्रस्त बनला आहे.

हंगामापूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा केला जातो. कमला मर्यादा पत्रकानुसार (कम) शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजाने तर एक ते तीन लाखापर्यंतचे कर्ज दोन टक्के दराने पुरवठा केले जाते. या कर्जावर जिल्हा बँक चार टक्के व सेवा संस्था दोन टक्के व्याज दर लावतात. तर राष्ट्रीयकृत बँका थेट सहा टक्के दराने पीक कर्जपुरवठा करताता. २०२४-१५ आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने १३०० कोटी रुपयांचे कर्ज पुरवठा केला असून त्यापैकी ९१० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर ३९० कोटी रुपये थकीत जाणार आहेत.

२३ राष्ट्रीयीकृत बँकांनी १७०० कोटी रुपयांचे कर्जपुरवठा केला असून त्यापैकी एक कोटी रुपयांची वसुली झाली आहे. ७०० कोटी रुपये थकीत गेले आहेत. जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँक मिळून एक हजार ९० कोटी रक्कम यामुळे थकीत जाणार आहे. शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करण्यासाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत चार टक्के राज्य सरकार व दोन टक्के केंद्र सरकार देत आहे. मात्र, कर्ज थकीत गेल्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे ४३ कोटी रुपयांची व्याज सवलत मिळणार नाही. तसेच २०१३-१४ वर्षाची ११० कोटी रुपयांची व्याज सवलत अद्याप मिळालेली नसताना पुन्हा हा भुर्दंड बसल्याने शेतकरी पुर्णता: हवालदील झाला आहे.

सोसायट्यांची मनमानी

पीक कर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत असते. त्यानंतर कर्ज थकीत जाते. मात्र सेवा संस्था नफा दाखवण्यासाठी मार्चमध्येच पीक कर्जाची वसुली करतात. यामुळे शेतकऱ्यांना एकवर्षासाठी मिळालेले कर्ज नऊ महिनेच वापरण्यासाठी मिळते. सोसायटींच्या मनमानी कारभारालाही चाप लावण्याची गरज आहे.

आणेवारीचा अडथळा

राज्यातील खरीप हंगामातील पिकांची अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाईसदृश्य जाहीर करुन जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, वीज व परीक्षा शुल्कात सुट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती आदी सवलती दिल्या आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्याची आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त असल्याने सरकारच्या सवलतीपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचीत राहावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांच्या पातळीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे ​एका दिवसात नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होऊ लागली असून, रात्रभरच्या पावसाने रविवारी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दहा फुटांनी वाढ झाली. त्यामुळे पंचगंगेवरील राजाराम, रुई, सुर्वे बंधाऱ्यांसह कासारी, भोगावती नदीवरील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड, पन्हाळा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. गगनबावडा तालुक्यात २४ तासात १८४ मिलीमीटर इतक्या प्रचंड पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. पावसाने जिल्ह्यात ५ घरांचे ९२ हजार १०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर, शाहूवाडी तालुक्यातील धुमाकवाडी येथील सूरज हायस्कूलची पडझड झाली आहे.

पावसाला सुरुवात होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत. पण वाढत्या जोरामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. गगनबावडा तालुक्यात मोठा पाऊस सुरू असला, तरी शनिवारी दिवसभर व रात्रभरात १८० मिलीमीटर इतका पाऊस झाला. नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. भोगावती, कासारी, पंचगंगा नदीचे पाणी वाढत असल्याने सायंकाळपर्यंत या नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेले. पंचगंगेची पातळी राजाराम बंधाऱ्यावर रविवारी सकाळी आठ वाजता १३ फूट सहा इंच होती. सायंकाळी सात वाजता ती १८ फुटांवर गेली.

शनिवारी सायंकाळी ही पातळी ८ फूट ७ इंच होती. यामुळे पंचगंगा नदीतील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर सोमवारी पंचगंगेला पूर येण्याची शक्यता आहे. भोगावती व कासारीचे पाणीही पूररेषेच्यादिशेने वाहत आहे. कोल्हापूर ते गारगोटी रस्त्यावर शेळेवाडीजवळ दुपारी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पन्हाळा तालुक्यात ७ हजार ६ रुपयांचे, शाहूवाडीत थेरगाव येथे २०, राधानगरीत कौलव येथे २५, भुदरगडमधील मठगाव येथे ९ तर आजऱ्यातील भादवणवाडी येथे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील खोबावने-धुमाकवाडी येथील सूरज हायस्कूलचे १ लाख २५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाबार्ड’मुळे बँका अडचणीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

नाबार्डच्या सध्याच्या धोरणामुळे जिल्हा सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत. हे धोरण त्वरित बदलले जावे, अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेहचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. जिल्हा सहकारी बँकांच्या प्रश्नांबाबत एक निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.

या बाबत दिलीप पाटील म्हणाले, 'केंद्र सरकारने ठेवीदारांच्या व्याजावर कर आकरणीचे धोरण अवलंबिले आहे. नाबार्ड देखील पीक कर्जाच्या पुरवठ्याबाबत चुकीचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे जिल्हा सहकारी बँकेला पीक कर्ज वाटपात वर्षाला १२ कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे. यातून काही व्यवहार्य मार्ग काढला पाहिजे.

केंद्र सरकारने सर्वच बँकांतील ठेवीदारांच्या व्याजावर कर आकारण्याचा निर्णय जूनपासून लागू केला आहे. ठेवींवरील वार्षिक व्याज दहा हजारांहून अधिक झाल्यास त्यावर दहा टक्के प्राप्तीकर आकरला जाणार आहे. त्यामुळे ठेवीदारांचा सहकारी बँकाकडील ओढा कमी होण्याची भीती आहे. अन्य सुरक्षित ठिकाणी ते पैसे गुतवतील. वास्तविक बँकांचा डोलारा या ठेवींवर उभा आहे. त्यावर असले निर्बंध आणल्यास बँकाना मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे.'

वसुलीत घट

साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची रक्कम बँक खात्यावर जमा न झाल्याने बँकेच्या वसुलीला ५० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचेही पाटील म्हणाले. ३० जून अखेर वसूलपात्र रक्कम ८२९ कोटी असून, प्रत्यक्षात ५७६ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अद्याप २५३ कोटी वसुलीचे आव्हान आमच्यासमोर आहे. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्जे देते. त्यातील अल्पमुदत कर्जाची वसुली येत्या ३० जूनपर्यंत करायची आहे. त्यातील अधिक वाटा हा ऊस पिकाचाच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुनाचा आरोपी तुरुंगातून पळाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

भावाच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत असलेला इरळी येथील सचिन किसन हाके याने कोठडीतून सोमवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पलायण केले. रविवारी सायंकाळी नातेवाईक त्यास भेटून गेले होते. त्यानंतर सकाळी हा प्रकार घडल्यामुळे शहरात आणि तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हाके याच्या पळून जाण्यात त्यास कोणी मदत केली काय? आणि या प्रकरणी हलगर्जीपणा केलेल्या पोलिासांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुरेश किसन हाके याचा सहा जून रोजी त्याचा सख्खा भाऊ सचिन याने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. भावाला त्याच्या वाटणीची जमीन द्यायला लागू नये आणि ती जमीन केवळ आपणास मिळावी, या हेतूने खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी सचिन यास १६ जून रोजी अटक केली. कोर्टाने सचिन यास २३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सचिन याने आपणास शौचालयासाठी जायचे आहे, असे सांगितले. पावणेसहा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलिस फौजदार ए. जी. कोळी हे कोठडीच्या संरक्षणासाठी सेवेवर होते. त्यांना सहायक म्हणून हावगुंडी हे कार्यरत होते. सकाळी त्यास कोठडीतून बाहेर काढण्यात आले. शौचालयापर्यंत नेण्याआधीच सचिन याने पोलिस कर्मचाऱ्यास हिसडा दिला आणि पोबारा केला. काही दिवसांपूर्वी तासगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीची कौले काढून चार आरोपींनी पोबारा केला होता. ही घटना ताजी असताना कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातून आरोपीने पोबारा केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका निर्माण झाली आहे. त्याची शहरात आणि तालुक्यात दिवसभर जोरदार चर्चा होती. सायंकाळपर्यंत आरोपी सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तासगाव येथून तीन दरोडेखोर फरार झाले होते. त्यानंतर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. अशा प्रकारच्या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images