Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘एलबीटीविरोधात कोर्टात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

एलबीटी रद्द करण्याच्या सरकारच्या अन्यायी निर्णयाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी राज्यातील सर्वच महानगरपालिकांमार्फत एकत्रित लढा उभारणार जाणार आहे. या संदर्भात सरकारविरुद्ध याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड. मकरंद अडकर यांचा सल्ला घेण्यात येत आहे. सर्व महापौरांची लवकरच या विषयावर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर विवेक कांबळे यांनी दिली.

वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व टिकणे आवश्यक आहे. त्यासाठी एलबीटी हा महापालिकाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तोच रद्द करणे म्हणजे महापालिकांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. यापूर्वी दीड वर्षे व्यापाऱ्यांनी महापालिकांना एलबीटीसाठी अडविले. त्यानंतर निकाल झाला आणि दंड, व्याज माफी दिली गेली. खरे म्हणजे जकातीशी तुलना करता एलबीटीतून ५० टक्केही उत्पन्न मिळाले नाही. गेल्या वर्षी येथे ६५ कोटी तर या वर्षी ७४ कोटी उत्पन्न मिळाले. त्यामुळे महापालिकेला १२० कोटींहून अधिक आर्थिक पटका बसला आहे, असेही कांबळे म्हणाले.

व्यापाऱ्यांनी जनतेकडून एलबीटी गोळा केला, पण तो महापालिकेला दिला नाही, तर आपल्याजवळ ठेवला आहे. आता पुन्हा एलबीटी भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तोवर कारवाई करू नये, असे सांगितले आहे. दुसरीकडे त्या बदल्यात महापालिकेला मात्र, अनुदान दिले नाही. ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याची घोषणा झाली आहे. मग महापालिकेला अनुदान मिळणार तर कधी? महापालिका चालणार कशा? जीएसटीची २०१६ पासून अंमलबजावणी होणार आहे. असे असेल तर तोवर महापालिकेचा कारभार चालवायचा कसा? अशाप्रकारे राज्यातील नागरी सुविधा मोडून पडतील. सरकारने सर्व गोष्टींचा विचार करावा म्हणून आमचा लढा सुरू केला जाणार आहे. कोर्टात आठवडाभरात याचिका दाखल करून दाद मागितली जाईल, असेही कांबळे म्हणाले.

स्वच्छता आयुक्त निलंबित

लाच घेताना रंगेहात पकडले गेलेले महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांना महापालिका आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबित केले आहे. कुपवाड रोडवरील एका हॉटेवर कारवाई न करण्यासाठी आणि ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या संदर्भात पाटणकर यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. आयुक्त कारचे यांनी पाटणकर यांचा पूर्वलक्षी कारभार व घडलेली ही घटना पाहून त्यांना १९ मेपासून सेवेतून निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. बोगस १५१ सपाई कामगार भरतीबद्दलही उपायुक्तांनी आयुक्तांना नुकताच अहवाल दिला आहे. त्यानुसार निरीक्षकांचे पगारही थांबविण्यात आले आहेत. अशा या सर्व प्रकारांमुळे सध्या आरोग्य विभाग मात्र, चर्चेचा विषय झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑनलाइन फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'भारतातील विख्यात उद्योगसमूहात विविध पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ऑनलाइन पाहणीतून तुम्ही शॉर्टलिस्ट झाला आहात. तुमची मुलाखत बेंगळुरू येथे होणार असून, त्यासाठी येण्या-जाण्याचे विमानभाडे कंपनी तुम्हाला देणार आहे. यासाठी अनामत रक्कम म्हणून ८७०० रुपये विशिष्ट खात्यात तातडीने भरा....'

... अशा आशयाचे 'ई मेल' आल्यास हुरळून जाऊ नका. सावधान! तुमची फसवणूक होत आहे.

शेकडो उच्चशिक्षित उमेदवारांची याद्वारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. काही उमेदवारांना कोणत्याही कंपनीत अर्ज न करताच बड्या समूहाच्या नावाने बनावट 'ई मेल' पाठविण्यात येत आहे. यामध्ये या समूहासह त्यातील विविध कंपन्यांच्या माहितीचा; तसेच त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या पदांच्या माहितीचा समावेश असतो. या पदांमध्ये वरिष्ठ कार्यकारी अधिकारी, इंजिनीअर, दंतवैद्यकीय; तसेच वैद्यकीय अधिकारी, पायलट, फॅशन डिझायनर, मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह आदी पदांचा समावेश आहे.

'समूहातर्फे वार्षिक ऑनलाइन पाहणीतून तुमच्या अर्जाची निवड झाली आहे. तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, विशिष्ट प्रकल्पांसाठी तुम्ही केलेले काम या आधारे तुमची थेट मुलाखतीसाठी निवड झाली आहे. कंपनीच्या रिक्रूटमेंट मॅनेजरने कंपनीच्या निवड समितीला तुमच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे तुमची निवड जवळपास नक्की आहे. तुम्हाला सुमारे ३४ हजार रुपयांपासून पुढे वेतन दिले जाईल,' अशा माहितीचा या 'ई-मेल'मध्ये समावेश आहे.

'या सर्व पदांसाठीच्या मुलाखती समूहाच्या नियम आणि निकषांनुसारच होतील. निवड झालेल्या उमेदवारांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. तुमची मुलाखत कंपनीच्या बेंगळुरूमधील ईपीआयपी इंडस्ट्रियल एरियामधील ऑफिसमध्ये घेण्यात येईल. त्यासाठीची तारीख आणि वेळ, मुलाखतीची प्रक्रिया याचाही यात उल्लेख या 'ई-मेल' मध्ये असतो. उमेदवारांना मुलाखतीसाठी विमानाने येण्या-जाण्याचा खर्च कंपनीतर्फे देण्यात येईल,' असाही उल्लेख या 'ई मेल'मध्ये आहे.

मात्र, मुलाखतीसाठी ८७५० रुपये अनामत रक्कम फक्त राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कंपनीच्या अकाउंट्स मॅनेजरच्या खात्यात भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, मुलाखतीसाठी अशा प्रकारे पैसे आकारण्यात येत नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे.

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

कोणतीही कंपनी अर्ज केल्याशिवाय मुलाखतीसाठी स्वतःहून निवड करत नाही.

कोणतीही कंपनी मुलाखतीसाठी अनामत रक्कम मागत नाही.

अशी 'ई-मेल' आल्यास सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधा.

संबंधित कंपनीलाही याबाबत माहिती द्या.

कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीसाठी पैसे भरू नका.

ई-मेलवरील मजकूर गुगलवर टाकून येणारे परिणाम पाहा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’मध्ये हरले, ‘केडीसीसी’त जिंकले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ यांची, तर उपाध्यक्षपदी विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांची निवड झाली. दोन्ही पदाधिकारी गडहिंग्लजशी निगडित असल्याने निवडीचे वृत्त कळताच परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 'गोकुळ'मध्ये गडहिंग्लजशी निगडित एकाही संचालकाला स्थान मिळाले नाही. मात्र, जिल्हा बँकेत दोन्ही पदाधिकारी गडहिंग्लजकर असल्याने परिसरात जल्लोष करण्यात आला.

सलग पंधरा वर्षे सतत सत्तेत राहिलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांची जनमानसात चांगली प्रतिमा असून, त्यांची 'श्रावणबाळ' अशी ख्याती आहे. मुश्रीफ यांनी लोकसंपर्क व जनतेच्या कामाची निर्गत यांच्या जोरावर सुरुवातीला कामगार मंत्रिपद व शेवटच्या टप्प्यात जलसंपदासारखे वजनदार मंत्रिपद भूषविले. बुलडाण्याचे पालकत्वसुद्धा यशस्वीपणे हाताळले. 'मोदी लाटेत' बहुतांश ठिकाणी आघाडी सरकार वाहून गेले; पण स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर मुश्रीफ निवडून आले. मात्र, यावेळी त्यांना सत्तेची ऊब मिळाली नाही. जिल्ह्याच्या राजकारणातील बदलती समीकरणे पाहता विरोधकांच्या भूमिकेसह जिल्ह्यावर पकड ठेवण्याच्या दृष्टीने मुश्रीफांना तत्सम पद आवश्यकच होते. त्यामुळे सहकारातील जिल्ह्याची शिखर संस्था असलेल्या बँकेचे अध्यक्षपद त्यांना फायदेशीर ठरेल यात वाद नाही. तसेच सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीची ढिली होत असलेली पकड मजबूत होण्यास मदत होईल.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अप्पी पाटील यांची जिल्हा परिषद सदस्य ते उपाध्यक्षपदापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद आहे. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या मर्जीतील कार्यकर्ते म्हणून ख्याती असलेल्या अप्पी पाटील यांनी कुपेकरांच्या निधनानंतर केलेली बंडखोरी चर्चेचा विषय ठरली. त्यांनी २०१४ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविली. तसेच निवडणुकीत तिसरे स्थान घेऊन त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अप्पी पाटील यांनी पुन्हा जोर आजमावला. यावेळी विकास संस्था व भटक्या विमुक्त जाती-जमाती या दोन्ही गटांमधून उमेदवारी दाखल केली. छाननीदरम्यान शिवाजी बँकेच्या थकबाकीवरून त्यांच्यावर उमेदवारी रद्दची नामुष्की ओढवली होती. मात्र, पाटील यांनी न्यायालयात धाव घेऊन भटक्या व विमुक्त गटातून निवडणूक लढविली.

राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर राजकीय पटलावर त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. त्यांची राजकीय ताकद व निरुपद्रवी स्वभाव यामुळे उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर रात्री उशिरा गडहिंग्लजमध्ये दाखल झालेल्या पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. त्यानंतर मार्केट यार्डपासून शहरातील मुख्य मार्गावरून पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, शहराध्यक्ष बसवराज आजरी, ज्येष्ठ नेते प्रा. किसनराव कुराडे, पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक आदींसग, समर्थक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगलेवर अन्याय

$
0
0

प्रवीण कांबळे, हुपरी

नुकत्याच झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालकांमधून अध्यक्षपदी आमदार हसन मुश्रीफ व उपाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांची वर्णी लागली. परंतु ऐनवेळी उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राजूबाबा आवळे व विलास गाताडे यांचा पत्ता कट करून जिल्ह्यातील नेत्यांनी तालुक्यातील नेत्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अन्याय केला असून, येथून पुढेही तालुक्यात असेच वातावरण राहिले तर काँग्रेस पक्ष शोधण्याची वेळ येणार असल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

एकेकाळी कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, माजी खासदार बाळासाहेब माने, बाबासाहेब खंजिरे, आदी हातकणंगले तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवले. त्या काळात या नेत्यांना विचारात घेतल्याशिवाय राज्याचे निर्णय होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या शब्दांना किंमत तर होतीच; पण विरोधात बोलण्याचेही धाडस कोणी करत नव्हते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हातकणंगले तालुक्याचा मोठा दबदबा निर्माण झाला होता. पंरतु कालातंराने या नेत्यांच्या नंतर मात्र हातकणंगले तालुक्याला उतरती कळा लागली असून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, जयवंतराव आवळे, आममदार महादेवराव महाडीक, प्रकाश आवाडे या नेत्यांनी एकमेकांना जिरविण्याच्या नादात तालुक्यातील काँग्रेस पक्ष संपविल्याची तक्रार कार्यकर्त्यांमधून होत आहे. तसेच 'गोकुळ'मध्येही हातकणंगले तालुक्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय पॅनेलमधून तालुक्याचे निवेदिता माने, राजू आवळे, विलास गाताडे यांच्यासह आमदार महादेवराव महाडिकही बिनविरोध निवडून आले. अध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ व उपाध्यक्षपदासाठी अप्पी पाटील यांच्या निवडी झाल्या. परंतु उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे राजू आवळे यांच्यासाठी जयवंतराव आवळे व विलास गाताडे यांच्यासाठी प्रकाश आवाडे यांनी फिल्डिंग लावलेली असतानाही अप्पी पाटील यांची निवड प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारी होती. कारण प्रत्येक पक्षात हातकणंगले तालुक्याला वगळण्याची जिल्हा नेत्यांनी घेतल्याची भावना निर्माण झाली आहे. हे चित्र असेच राहिले तर कोणत्याही निवडणूकीमध्ये भाग घेण्यास नेत्यांबरोबर कार्यकर्तेही राहणार काय...? तसेच येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

केडीसीसीत विधान परिषदेचा वास..?

जिल्हा बँकेच्या निवडीमागे हातकणंगले तालुक्यातील जिल्ह्यातील नेत्याने भाग घेऊन आगामी काळात होणाऱ्या विधान परिषदेसाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होत असून, प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळा पक्ष असणाऱ्या या नेत्याने हातकणंगले तालुक्यासाठी काय केले? कोणत्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली? असे अनेक प्रश्न तालुक्यातील कार्यकर्त्यांमधून होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० स्थापत्य अभियंते होणार बेरोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेली राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान ही योजना वर्षभराच्या आतच बंद होत असल्याने राज्यातील ७५७ स्थापत्य अभियंत्यांवर मेनंतर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. जिल्ह्यात या योजनेत २० अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली होती.

ग्रामविकास निधी, १३ वा वित्त आयोग निधी, पर्यावरण संतुलित समृद्धी योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची गावांमध्ये होत असलेल्या कामांची तांत्रिक देखभाल, विकासकामे दर्जेदार होण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली होती. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पातळीवर लेखी व तोंडी परीक्षा घेऊन नेमणुका करण्यात आल्या होत्या. पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला एक पंचायत अभियंता, तर तालुकास्तरावर गट अभियंता यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना अनुक्रमे महिना १६ हजार व १८ हजार मानधन निश्चित केले होते.

राज्यभरात २०७५ पदे भरायची असताना ७५७ पदेच भरली. या योजनेसाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध होणार नाही अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केल्याने कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या या अभियंत्यांची सेवा मेपासून बंद होणार आहे. राज्य सरकारचे उपसचिव गिरीश भालेराव यांनी जिल्हा परिषदांना तसे पत्र पाठवले आहे.

सरकारने एक वर्षातच योजना गुंडाळल्याने अभियंत्यांमध्ये असु​रक्षेची भावना निर्माण झाली आहे. सरकारने आमची परीक्षा घेऊन नेमणूक केली. जिल्ह्यात १६ पंचायत, तर ४ गट अभियंते कार्यरत आहेत. हा सरकारचा आमच्यावर अन्याय असून ही योजना पूर्ववत सुरू ठेवावी अथवा इतर नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने विचार करावा.

- किरण परीट, पंचायत अभियंता, शिरोळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसीचे संचालक मंडळ बरखास्त करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

जिल्हा बँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे. मात्र, येथे यापूर्वीच्या संचालक मंडळाने राजकीय स्वार्थ साधत बगलबच्च्यांना बेहिशेबी कर्ज दिले. जिल्हा बँकेस रसातळाला नेण्यास जबाबदार असणाऱ्या संचालकांपैकी अनेकजण पुन्हा निवडून आले आहेत. यामुळे बँकेत जबाबदारी निश्चित असलेल्या संचालकांना पदावरून हटवावे. संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, जिल्हा बँकेतील यापूर्वीच्या संचालक मंडळाने बँकेचे फर्निचर व इतर खरेदीमध्ये ढपला पाडणे, कागल शाखेतील दोन कोटी रुपये शिलकेचा हिशेब न लागणे, वीस गुंठे जमिनीवर ३२ लाख रुपये कर्ज देणे अशा अनेक प्रकारातून बँक रसातळाला नेली. यामुळे सहकार विभागाने अधिनियम ८८ खाली चौकशी करून तत्कालीन संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित करून बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली होती. प्रशासकांनी बँक पूर्वपदावर आणली. मात्र, नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा काही पूर्वीचे संचालक निवडून आले आहेत. गेल्या दीड महिन्यात बँकेच्या ३८० कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत. जबाबदारी निश्चित असणाऱ्या संचालकांना पदावरून हटवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनप्रश्नी पालकमंत्र्यांसमोर धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील दीड लाख साखर कामगारांच्या वेतन कराराची मुदत वर्षापूर्वी संपली आहे. कामगारांना सुधारीत वेतनवाढ देण्यासाठी त्रिपक्षीय समितीची स्थापना करुन दहा जूनपर्यंत वेतनवाढ करार करावा. अन्यथा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्रमिक हॉल येथे झालेल्या राज्य साखर कामगार संघटनेच्या बैठकीत देण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष तात्यासाहेब काळे होते.

काळे म्हणाले, 'साखर कारखानदारीत राज्यात सुमारे दीड लाख कर्मचारी आहेत. वेतन मंडळाच्या करारानुसार त्यांना वेतन दिले जात होते. मात्र कराराची मुदत १ एप्रिल २०१४ मध्ये संपली. अद्याप नवीन वेतन मंडळाची स्थापना केली नाही. जुन्याच वेतन करारानुसार कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतन कराराची पुनर्रचना करण्यात चालढकल केली जात आहे.'

दहा जूनपर्यंत वेतन मंडळाची स्थापना न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय करण्याची सूचना यावेळी मांडण्यात आली. याला सर्वांनी पाठिंबा देत आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी शंकरराव भोसले, जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, पंडित चव्हाण, अविनाश पाटील, तात्यासाहेब पाटील, शिवाजी आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विठ्ठल परबकर, सर्जेराव हळदकर, बाळासो तिवारी, संजय मोरबाळे, आदी उपस्थित होते. पंडित चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रावसाहेब भोसले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समित्यांमध्ये दुबार कर आकारणीस विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषी उत्पन्न बाजार समित्यांत दुबार कर आकारणी केली जाऊ नये, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानुसार जीआर काढण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

कोल्हापूर जिल्हा व्यापारी आणि उद्योग महासंघाने यासंदर्भातील निवेदन पालकमंत्री पाटील यांना दिले आहे. महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, 'महाराष्ट्रात एका बाजार समितीत मार्केट सेस आकारल्यानंतर हाच माल पुन्हा पुढील बाजार समितीत गेल्यानंतर त्यावर पुन्हा कर आकारला जातो. यातून शेतमालाच्या वस्तूंचे दर तीन ते चार टक्क्यांनी वाढतात. ही पद्धत बंद होण्याची मागणी होती. पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जीआर काढण्याचे आश्वासन दिले आहे.' कोल्हापुरात भातावर सेस आकारल्यानंतर पुन्हा तांदळावर सेस आकरण्याची पद्धत बंद केली जावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. अमोल नष्टे, राजेंद्र कापसे, बलराज निकम, प्रशांत घोडके, विजय कागले, सचिन शहा, संजय रामचंदानी आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण व्हावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या ६ जून रोजी साजरा होत असलेला शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा. त्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने गुरुवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात बैठक झाली.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडतर्फे ३४२ वा शिवराज्याभिषेक दिन रायगड येथे ६ जून रोजी साजरा केला जात आहे. त्याच्या तयारीसाठी ही बैठक झाली. शुक्रवार (ता. २२) पासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी नाममात्र शुल्कात भवानी मंडपातील कार्यालयात नावनोंदणीची सुरुवात होत आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले जगभरातील लोकांपुढे प्रेरणादायी शिवचरित्र जाण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा झाला पाहिजे. यावेळी जिल्ह्यातील शिवभक्त, संस्था, संघटना उपस्थित होते. ६ जूनला रायगडावरील राजसदरेवर सकाळी शिवप्रतिमेस अभिषेक, पूजन आणि पालखी मिरवणूक होत आहे. गडावरील समाधी ते मेघडंबरी पर्यंत आकर्षक सजावट केली जाणार आहे. कागल येथील वनमित्र संघटना गडावरील प्लास्टिक गोळा करणार आहे. श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाने एक हजार किलो तांदूळ देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर यादव यांची एकमताने निवड झाली. बैठकीस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, संजय पवार, हेमंत साळोखे, विनायक फाळके, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प. शाळेचे विद्यार्थी बनणार स्मार्ट

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

महापालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटले की विद्यार्थ्यांना खाकी पँट आणि पांढरा शर्ट किंवा निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट असा गणवेश डोळ्यासमोर येतो. पण, आता हे विद्यार्थी परफेक्ट आणि स्मार्ट दिसावेत यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षापासून प्रत्येक तालुक्यासाठी एक रंग देऊन विद्यार्थ्यांचा गणवेश तयार केला जाणार आहे.

सर्व ‌शिक्षा अ‌भियान विभागाच्या वतीने पहिली ते आठवीतील अनुसूचित जाती व जमातीतील तसेच दारिद्र्य रेषेखालील १ लाख २९ हजार ५९७ विद्यार्थ्यांना नवीन गणवेश दिला जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चारशे रूपये याप्रमाणे खर्च करण्यात येणार आहे. निधी मिळताच शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर प्रत्येक शाळेत खर्च करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी रंग दिला असून यामध्ये आजऱ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना मरून रंगाचा चेक्स शर्ट व प्लेन मरून रंगाची पॅन्ट, भुदरगडमध्ये लालसर रंगाचा चेक्सचा शर्ट व प्लेन पॅन्ट, चंदगडमध्ये चॉकलेटी रंगाचा चौकडा शर्ट व चॉकलेटी प्लेन रंगाची पॅन्ट, गगनबावडामध्ये निळा, करडा व पिवळसर रंगाचा चौकडा शर्ट व पिवळसर प्लेन पॅन्ट, गडहिंग्लजमध्ये निळसर तांबूस रंगाचा चौकडा शर्ट व प्लेन रंगाची पॅन्ट असे असा गणवेश ठरविण्यात आलेला आहे. या गणवेशामध्ये सर्व शर्ट हे चेक्समध्ये असल्यामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येणार आहे.

या अभिनव उपक्रमामुळे एखादा विद्यार्थी कोणत्या तालुक्याचा आहे हेही त्याच्या गणवेशामुळे समजू शकणार आहे. हे गणवेश शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी वाटप करण्यात येणार असून शालेय नव्या वर्षात नवा उत्साह आणि नवा आत्मविश्वास ‌घेऊन विद्यार्थी शाळेत प्रवेश करणार आहेत.

या नव्या लूकमुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी अशा योजना फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे आता खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसारखाच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी टापटीप दिसणार आहे.

-अभिजीत तायशेटे, सभापती, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा महिन्यांत अपेक्षापूर्ती कशी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसला ५६ वर्षांत जे जमले नाही, ते सहा महिन्यात कसे होईल? असा सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनोद तावडे यांनी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका आता जमायला लागली आहे, असा टोला लगावला. तसेच मुंबईतून कोणतेही कार्यालय इतरत्र जाणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना स्पष्ट केले.

राज्य कार्यकारिणीसाठी येथे आलेले तावडे यांनी बैठक सुरु होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सरकारने कोणतेही निर्णय घेतले नसल्याची टीका होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तावडे म्हणाले, 'अशोक चव्हाणांच्या काँग्रेसला ५६ वर्षांच्या कालावधीत जे जमले नाही ते सहा महिन्यात हवे आहे. सर्वच बाबतीत नकारात्मक दृष्टीकोन ठेवायचा असल्यास सकारात्मक काहीच दिसणार नाही. यामुळे मात्र काँग्रेसला आता विरोधी पक्षाची भूमिका जमू लागली आहे. जैतापूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ खडसे यांनी भूमिका मांडली आहे. संबंधित घटकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. येथील टोलबाबतही टोलविरोधी कृती समितीशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. पानसरे यांच्या हत्येबाबतच्या भावना तीव्र आहेत. गाडी अडवण्याच्या प्रकारानंतर मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांशी चर्चा करुन भूमिका मांडणार आहेत.'

सीपीआरबाबत ते म्हणाले, 'राज्यातील १४ मेडिकल कॉलेजसाठी ३५२ कोटींचा निधी द्यायचा आहे. त्यातून सीपीआरला निधी वाढवून दिला जाणार आहे. सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील भाजप सीमावासीयांच्या पाठीशी कायम उभी आहे. शिक्षणातील अनेक मुद्द्यांबाबत ज्याला जी गोष्ट कळते त्याप्रमाणे ती उचलली जाते. त्यामुळे एक शिक्षकी शाळा बंदचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.'

अभिजात दर्जाचा कोणत्याही क्षणी

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या निर्णयासाठी केंद्रीय पातळीवरील विविध प्रकारच्या ना हरकती मिळालेल्या आहेत. त्यामुळे आता कॅबिनेटचा प्रस्ताव तयार करण्याचे अंतिम काम सुरु झाले असेल. यानुसार आता हा निर्णय केव्हाही होऊ शकतो, असे तावडे यांनी सांगितले.

'राष्ट्रवादी'कडून निषेध

'छत्रपतींचा आशिर्वाद घेऊ, मो​दीजींना साथ देऊ,' असे घोषवाक्य करुन राज्यातही सत्ता मिळवली. त्याच कार्यकारिणी बैठकीनिमित्त शहरात लागलेल्या एकाही फलकावर ​छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो नसल्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने निषेध व्यक्त केला आहे. सत्ता मिळाल्यानंतर प्रथमच होत असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसाठी लावलेल्या फलकांवर त्यांचे फोटो नाहीत ही खेदाची व शरमेची बाब असल्याचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार व सरचिटणीस बाबा सरखवास यांनी पत्रकात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचे वाहन रोखणारे १८ जण ताब्यात

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या तपासात विलंब होत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता टेंबलाई नाका मिलिटरी कॅम्प परिसरात घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस हे वाहनांच्या ताफ्यातून विमानतळावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना टेंबलाई नाका परिसरात दिलावर मुजावर, रघुनाथ कांबळे, सतीशचंद्र कांबळे, महादेव आवटे, भगवान यादव, उमेश पानसरे यानी वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना रोखले. दिलावर मुजावर याने पोलिसांचे कडे तोडून वाहनांच्या ताफ्यात घुसला पण उपस्थित पोलिसांनी त्याला बाजूला केले. पोलिसांनी १८ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अलंकार हॉलमध्ये ठेवले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

CPR मध्ये ‘इन आऊट’ ची गरज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भलामोठ्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकच फाटक खुले केल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखा, राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर प्रशासनाने परिसरातील वाहतूक नियोजन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये रोज दोन हजारहून अधिक रूग्ण व त्यांचे नातेवाईक भेट देत असतात. सीपीआर हॉस्पिटलमध्ये पूर्वापार आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी दोन मार्ग होते. तसेच हॉस्पिटलच्या उत्तर बाजूला शाहू स्मारकच्या दिशेने जाण्यासाठी एक फाटक आहे. आपत्कालीन परिस्थितीत तिनही फाटकांची गरज असताना गेली दहा वर्षे आपघात कक्षाकडे जात असलेले एकच फाटक खुले आहे. फिजिओथरपी इमारतीसमोर फाटक बंद करून ठेवले आहे. सीपीआरमध्ये पार्किंगसाठी पट्टे मारले नसल्याने अपघात विभागासमोर, एक्सरे विभागाच्या दोन्ही बाजूने, सीपीआरचा मुख्य दरवाजासमोर पार्किंगमध्ये वाहने लावली जातात. खुल्या असलेल्या फाटकासमोर २४ तास १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका असते. कळंबा कारागृहातून न्यायालयीलन कामकाजासाठी पोलिस व्हॅन दिवसभर उभी असते. संशयित आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेली पोलिस वाहने पार्क करावी लागतात. सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळेत एकच फाटक खुले असल्याने आत जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या असतात.

सीपीआरमध्ये वाहने आत येण्यासाठी व बाहेर येण्यासाठी दोन फाटके असताना एकच फाटक सुरू आहे. दक्षिण बाजूचे फाटक खुले केल्यास वाहने बाहेर जाऊ शकतात. बाहेरची वाहने सीपीआरच्या आवारात पार्क करू नयेत यासाठी फाटक बंद केले होते. आता मात्र बंद असलेल्या फाटकासमोर सीपीआरच्या आवारात बाहेरची चारचाकी व दुचाकी पार्क केल्या जातात. सीपीआरच्या आवारात प्रसुतीगृहासमोर रिक्षा स्टॉप झाला आहे. बंद असलेले फाटक सुरू केल्यास रूग्णाला नेण्यासाठी रिक्षा स्टॉपवरून आत नेण्याची सोय होऊ शकते. बंद असलेल्या फाटकासमोर खाद्य पदार्थाच्या टपऱ्या उघडून काही जणांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे.

पार्किंगला ‌शिस्त हवी

सीपीआरमध्ये पे पार्किंग करण्याची गरज आहे. अनेक नोकरदार व कामानिमित्त आलेली मंडळी सीपीआरमध्ये दुचाकी व चारचाकी पार्क करून बाहेर जातात. सीपीआरमध्ये पार्किंगसाठी पुष्कळ जागा आहे. या ठिकाणी साईट पट्ट्या भरून पार्किंगचे पट्टे मारल्यास हॉस्पिटलला येणाऱ्यांच्या वाहनांचे पार्किंग करता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यापुढे जनताकेंद्री वाटचाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वबळासाठी पक्ष भक्कम करण्यासाठी संपर्क अभियानासह इतर उपाय करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत सरकार, संघटना व जनतेचा एकत्रित विचार करून जनतेच्या अपेक्षेप्रमाणे वाटचाल करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. आज (शनिवारी) सकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदींसह राज्यभरातील मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत शुक्रवारी कार्यकारिणीची बैठक रेसिडन्सी क्लबमध्ये झाली. त्यात भविष्यात संघटनेद्वारे राबवायची विविध अभियाने व योजनांची चर्चा करण्यात आली. जनतेची अपेक्षापूर्ती करण्याच्या दृष्टीने विविध योजनांचा विचार करण्यात आला.

शनिवारी सकाळी पेटाळा मैदानावर अधिवेशन होईल. त्यात शहा यांच्या मार्गदर्शनानंतर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल योजनांची मांडणी करतील. त्यानंतर राज्य सरकारच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाईल. रविवारी प्रदेशाध्यक्ष दानवे अध्यक्षीय भाषणात पक्षाची ध्येयधोरणे स्पष्ट करतील. दुपारी साडेबारा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने परिषदेचा समोराप होईल. तीन सत्रांमध्ये शेतकरी, सामान्यांच्या समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न मंत्र्यांपर्यंत पोहचवले जातील.

स्वागताला महाडिक

रेसिडन्सी क्लबमधील बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते. त्यांना पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. 'मी भाजपमध्ये जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना चहाचे निमंत्रण देण्यासाठी मी येथे आलो आहे,' असा खुलासा त्यांनी केला.

शहर भाजपमय

बैठकीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी तीन दिवसांपासून भाजपची होर्डिंग लागली आहेत. तसेच लहान पोस्टर, विविध चौकांतील स्वागत कमानी, झेंडे तसेच भाजपचे झेंडे असलेली वाहने यामुळे शहर भाजपमय झाल्याचे चित्र आहे. शहराच्या प्रत्येक प्रवेशमार्गावर प्रकर्षाने हे फलक लावण्यात आले आहेत.

गाडी अडवण्याचा प्रयत्न

कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यकर्त्याने केला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. या प्रकारामुळे काही काळ गोंधळ माजला. आणखी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवकरच होणार पोलिस आयुक्तालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्किट बेंचपाठोपाठ कोल्हापुरात आता पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. 'पावसाळी अधिवेशनात याबाबतचा ठराव मांडला जाईल,' अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. 'प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी पोलिस आयुक्तालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,' असेही त्यांनी सांगितले. अकोल्यात आयुक्तालय उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापुरात भविष्यात सर्किट बेंचही सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालय सुरू करता येईल. कोल्हापूर पोलिस प्रशासनाकडून शहराची लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण अशी परिपूर्ण माहिती असलेला अहवाल आल्यावर आगामी पावसाळी अधिवेशानात पोलिस आयुक्तालयाबाबत निर्णय घेतला जाईल.

'प्रत्येक जिल्ह्यात व पोलिस आयुक्तालयांच्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब उभारण्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासंदर्भात सरकारने पावले उचलली आहेत. न्यायाधीश व सरकारी वकिलांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. शिक्षा होण्याच्या प्रमाणावर सरकारी वकिलांची नियुक्ती होणार आहे,' असे शिंदे यांनी सांगितले.

पानसरे हत्येचा तपास गांभीर्याने

'ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार झाल्या आहेत. पानसरे हत्येचा तपास गांभीर्याने केला जात आहे. पानसरे कुटुंबाच्या मागणीनुसार सरकारने विशेष पोलिस तपास पथकाची नियुक्ती केली आहे. अधिकारी बदलले तरी हत्येचा छडा लावला जाईल,' असे गृहराज्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पोलिस कल्याणासाठी

अधिकाऱ्यांविषयी तक्रार असल्यास वरिष्ठांकडे

तक्रार करावी.

सुटीदिवशी काम केल्यास पगार मिळणार

यापुढे उन्हाळ्यात पोलिस भरती प्रक्रिया नाही

ऑक्टोबरनंतर भरती प्रक्रिया राबविणार

पोलिसांच्या घर बांधणी हुडकोकडे ५०० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी

अर्थसंकल्पात २९८ कोटी रुपयांची तरतूद

प्रथम पोलिसांच्या घरासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद

पोलिस हाउसिंग कार्पोरेशनतर्फे घरबांधणी होणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदरातिथ्यासाठी ४० हॉटेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजपच्या प्रदेश पदाधिकारी व कार्यकारिणी बैठकीसाठी एक हजाराहून अधिक संख्येने येणाऱ्या केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांसह राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांसाठी शहरातील सर्किट हाउससह ४० हॉटेल आरक्षित करण्यात आली आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी पाचशे स्वयंसेवकांबरोबर एक हजार कार्यकर्ते तैनात आहेत.

शुक्रवारी दुपारनंतर अनेक महत्वाच्या व्यक्ती तसेच कार्यकर्ते शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली. बहुतांशजण शनिवारी सकाळपर्यंत शहरात येत आहेत. नजीकच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते स्वतःच्या वाहनांनी येण्याची शक्यता आहे. पण विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रा​मविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे वास्तव्य सर्किट हाउसमध्ये असेल. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांच्यासह अन्य मंत्री, राज्यमंत्री इतर हॉटेलमध्ये थांबणार आहेत. शिवाय प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांच्या पदानुसार शहरातील विविध ४० हॉटेल्स आरक्षित केली आहेत. त्यात पदानुसार सूट, रुम, एसी, नॉन एसी असे वर्गीकरण केले आहे.

पार्किंगसाठी गांधी मैदान

विविध जिल्ह्यांमधून येणारे पदाधिकारी व कार्यकर्ते वाहने घेऊन येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय स्थानिक ठिकाणीही ४० ते ४५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था पेटाळाशेजारील गांधी मैदानात करण्यात आली आहे. वळीव पावसाची शक्यता गृहित धरुन तिथे चिखल झाल्यास संभाजीनगर येथील निर्माण चौक व प्रायव्हेट हायस्कूल ही दोन पर्यायी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

भोजन प्रिन्स शिवाजी बोर्डिंगच्या मैदानावर

पेटाळा परिसरातील मंडपाच्या आवारात दिवसभरातील चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली आहे. शनिवारचे दुपारचे व रात्रीचे भोजन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या मैदानावर करण्यात आली आहे. त्यासाठीचे पास वितरण नावनोंदणीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

पाहुण्यांचे स्वागत कोल्हापुरी स्टाइलने

राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत कोल्हापुरी स्टाइलने करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे नाव घेतले की राज्यभरात गूळ व चप्पल हेच प्रामुख्याने डोळ्यासमोर येते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या चपलाचे माप आधीच मागवून घेतले आहे. निवास व्यवस्थेच्या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांच्या नावनोंदणीवेळी सेंद्रीय गूळ व प्रत्येकाला कोल्हापुरी चप्पल भेट देण्यात येणार आहे.

राज्य परिषदेला आज प्रारंभ

पेटाळा मैदानावर शनिवारी सकाळी भव्य मंडपात कार्यकारिणीच्या बैठकीला प्रारंभ होणार आहे. त्यासाठी अमित शहा व देवेंद्र फडणवीस मंत्री व पदाधिकाऱ्यांसह सकाळी नऊ वाजता अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर मिरवणुकीने कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येतील. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पत्रकार परिषद घेऊन कार्यकारिणीतील चर्चेचा गोषवारा प्रसार माध्यमांना सांगणार आहेत. रात्री साडेआठ वाजता कार्यकारिणीच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता तिसरे सत्र सुरु होईल.

रात्रभर ४० जणांचे स्वतंत्र पथक

शुक्रवारी दिवसभर पदाधिकारी यायला सुरुवात झाली असली तरी अनेकजण रात्री व पहाटेपर्यंत शहरात येणार आहेत. त्यांच्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणी जाण्यासाठी पळापळ होऊ नये याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी एक अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांची व्यवस्था कोणत्या हॉटेलमध्ये, किती नंबर रुममध्ये केली आहे हे सांगण्यासाठी ४० कार्यकर्त्यांची टीम रात्रभर कार्यरत राहणार आहे. त्यातील काहींची वाहनांची सोय नसल्यास वाहन उपलब्ध करुन देण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध विक्री दराला उकळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दूध विक्री दरामध्ये कपात करण्याचे निर्देश महसूल व दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने (महानंद) दूध दर विक्रीमध्ये कपात करण्याचे संकेत दिले आहेत, तर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) यांनी लेखी आदेश नसल्याने विक्री दरामध्ये कपात करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, सरकारच्या सुधारित निर्देशामुळे दूध विक्री दरात कपात केल्यास उत्पादकांचाही दर कमी करावा लागणार आहे. यामुळे दूध उत्पादक व संघामध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील ब्रँडेड दुधाच्या विक्रीवरील कमिशनवरून वाद सुरू असतानाच ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दूध विक्रीमध्ये दोन ते पाच रुपयांची कपात करावी, अशा सूचना मंत्री खडसे यांनी दिल्या आहेत. मंत्र्यांच्या भूमिकेमुळे नव्या वादाला उकळी मिळण्याची शक्यता आहे. 'महानंद'कडून सभासद संस्थांचे दूध खरेदी करून विक्री करते. यामुळे प्रोसेस व कर्मचाऱ्यांवर जास्त खर्च होत आहे. तरीही महानंदने दूध विक्री दरात कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र गोकुळ, वारणा, समृद्धी व शाहू ब्रँड यांसारख्या सहकारी दूध संघांना दूध विक्री दरामध्ये कपात करणे जिकिरीचे ठरणार आहे.

सहकारी दूध संघांनी विक्री दरात कपात केल्यास त्याची झळ दूध उत्पादकांना सोसावी लागण्याची शक्यता आहे. पशुखाद्य, वैरण यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना विक्री दरात कपात केली, म्हणून खरेदी दरात कपात केली, तर दूध संघांना संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. कोणत्याही दूध संघांना सरकारचे लेखी निर्देश मिळाले, नसले तरी असे निर्देश मिळ्यानंतर संघार्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या सूचनांचा आदर राखून महानंद दुधाच्या दरामध्ये दोन रुपये कमी करेल. प्रशासकीय खर्च कमी करून महानंदचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच दुधाच्या विक्रीदरात कपात केली जाईल.

- वैशाली नागवडे, अध्यक्षा, महानंद

सरकारच्या निर्देशानुसारच गोकुळ संघ दुधाची खरेदी-विक्री करत आहे. दर कमी करण्यासाठी सरकारची कोणतीही लेखी सूचना नसल्याने विक्री दर कमी करण्याचा प्रश्नच नाही.

- डी. व्ही. घाणेकर, व्यवस्थापक, गोकुळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाबाजार करणाऱ्यांना ‘मोक्का’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्यावतीने केल्या जाणाऱ्या रास्त धान्य वितरणात जवळपास २५०० कोटी रुपयांचे धान्य कोठे जाते याचा पत्ताच नाही, ही गळती रोखण्यासाठी रेशन धान्य दुकानांतून बायोमेट्रिक पद्धती स्वीकारली जाणार आहे. तसेच धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रसंगी 'मोका'ची कारवाई केली जाईल, अशी कारवाईची प्रत्यक्षात तयारी सुरू आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्रक्ष गिरीष बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जनतेला कमी दरात औषधे मिळावीत यासाठी सरकार तीनशेच्यावर जेनेरीक औषधांची दुकाने सुरू करणार आहे, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीच्या निमित्ताने बापट कोल्हापुरात आले आहेत. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण दारीद्र्य रेषेखालील लोकांना आहे, पण हा कायदा दारिद्र्य रेषेवरील लोकांना लागू नाही. आघडी सरकारने दारीद्र्यरेषेवरील लोकांनाही यात समावेश करून घेतले. सर्वसाधारणपणे या खात्याची उलाढाल ११०० कोटी रुपयांची आहे, पण वर्षाला २५०० कोटींचे धान्याची गळती आहे. हा काळाबाजार मोडून काढल्यास धान्याची बचत होवून दारिद्र्य रेषेवरील लोकांना त्याचा लाभ होईल. यासाठी आधार कार्डला लिंक केलेले बायोमेट्रीक पद्धत सुरू केली जाणार आहे. त्यासाठी १०४ कोटींचा निधी सरकारने उपलब्ध केला आहे. दुकानात आलेले धान्य, वितरित केलेले धान्य, धान्य कोणाला दिले ही सर्व माहिती कम्प्युटरवर मिळणार आहे. सांगलीत प्रयोगिक तत्त्वावर ही योजना सुरू असून ‌तेथे महिन्याला एक हजार टन धान्याची बचत होत आहे.'

बायोमेट्रिकच्या योजनेते राज्यातील ५२ हजार रेशन दुकानदार सहकार्य करत असल्याने त्यांना चांगल्या प्रकारे कमिशन वाढवून दिले जाणार आहे, असे ते म्हणाले. नाशिक येथे सात कोटींचा धान्य घोटाळा उघडकीस आला असून त्यात कोणाचीही गय केली जाणार नाही. सरकारी अधिकऱ्यांनी सुद्धा भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालू नये असे आवाहन त्यांनी केले. धान्यातील गळती कमी होण्यासाठी धान्य द्वारपोच योजना राबवली जाणार आहे, असे ते म्हणाले.

धान्य वाया जावू नये म्हणून नाबार्डच्या माध्यमातून २५० गोडावून बांधण्यात येत आहेत त्यातील ६५ गोडावून पूर्ण होणार आहेत, तर ९३ गोडावून जूनपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे अन्न सडून गेले असा प्रकार होणार नाही. तसेच रॉकेल पुरवठा करणाऱ्या टँकरवर जीपीस यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

ते म्हणाले, 'याशिवाय गुटखा बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी आजुबाजुच्या जिल्ह्यातील अधिकारी एकत्र येवून एका जिल्ह्यात छापे टाकतील. औषध दुकानात फार्मसी स्टाफ आवश्यक, फ्रीज असलाच पाहिज, तसेच एक्सपायरी डेट झालेल्या औषधांचा वेळेवर निकाली काढणे हे काटेकोरपणे पाहिले जाईल. याशिवाय जीवनावश्यक वस्तू कायदा प्रभावी केला करून त्यातील दंडात्मक तरतूद आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद केली जाणार आहे. तसेच हानीकारक औेषधांच्या विक्रीवर कारवाईसाठीचे कायदेही कडक करण्यासाठीचे बदल प्रस्तावित आहेत.' यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंबाबाई’साठी चिनी मॉडेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चीनमध्ये ऐतिहासिक वास्तूंचा मूळ ढाचा कायम ठेवून जतनासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतींचा येथील अंबाबाई मंदिराच्या विकासामध्ये अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलयुक्त शिवार अभियान, खरीप हंगाम पूर्वतयारी, जिल्ह्यातील औद्योगिक स्थिती, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, सेफ सिटी, रंकाळा तलाव स्वच्छता या विकासकामांच्या आढावा बैठकीत त्यांनी अनेक उपक्रमांबाबत सूचना केल्या. तसेच विमानतळ विस्तारीकरणामधील अडचणी व सद्यस्थिती जाणून घेतली.

नुकत्याच झालेल्या चीन दौऱ्यात ऐतिहासिक वास्तूंचा मूळ ढाचा कायम ठेवून त्यांच्या जतनासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत माहिती दिली. तीच पद्धती अंबाबाई मंदिराबाबत उपयोगात आणणे आवश्यक आहे, असे सांगताना फडणवीस यांनी रंकाळा तलाव प्रदूषण नियंत्रणासाठी जुन्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत अधिक चांगल्या व कमी खर्चिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा, अशी सूचना केली.

सुरक्षित कोल्हापूर उपक्रमांतर्गत ६५ ठिकाणी १६५ कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. यावेळी वाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करत असताना ज्यांच्याकडे फोर जी यंत्रणा तयार आहे, त्यांच्याकडून यासाठीची मदत घेतल्यास जास्त सोयीचे ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले. तसेच दीर्घकालीन वापरायोग्य व बहुआयामी तंत्रज्ञानाचा वापर करा, असेही स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्ह्यात ठिबक सिंचन पद्धती, नवीन पाझर तलाव, गाळ काढणे आदि कामांना जलयुक्त शिवार अभियानात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मोहन आटोळे यांनी तीन वर्षांत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्याबरोबर कृषि विद्यापीठांमार्फत विकसित केलेल्या वाणांचा पीक प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना लाभ देण्याचा अभिनव उपक्रमही यावर्षीपासून राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्ह्यातील औद्योगिकीकरणाचाही आढावाही घेतला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक शैलेश राजपूत यांनी जिल्ह्यातील विविध क्लस्टर प्रकल्पांची सद्यस्थिती सांगून उद्योग घटकांच्या विकासामध्ये जमिनीची कमतरता हा विषय महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास आणून दिले.

जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी जिल्हा उद्योगमित्र फोरमला कायदेशीर अधिकाराची गरज अधोरेखित केली. यावेळी खासदार संजय पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे उपस्थित होते.

अपंगांनी साधला थेट संवाद

मुख्यमंत्री आढावा बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना काही अपंग व्यक्तींनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी काँग्रेसने आमच्या मागण्यांबाबत काहीही निर्णय न घेतल्याने आम्ही तुम्हाला निवडून आणले आहे. आता तेवढे तुम्ही आमचे काम करा असे आवर्जून सांगितल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जरुर निर्णय घेऊ असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खून झालेला’ लहू जिवंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खून झाला अशी आवई ज्याच्याबद्दल उठली होती, तो पुण्यातील फरारी गुंड लहू रामचंद्र ढेकणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळ पकडले. कंदलगावात १६ मे रोजी खून झालेला मृतदेह ढेकणेचा असल्याचा दावा त्याचा भाऊ अंकुशने केला होता. लहूला पकडल्याने या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले आहे.

कंदलगावजवळ शीर व दोन्ही हाताचे पंजे नसलेला मृतदेह सापडला होता. त्याच्या पँटच्या खिशात ढेकणेच्या मतदान ओळखपत्राची प्रत व त्याच्या नावाची चिठ्ठी सापडली होती. ओळख पटू नये अशा पद्धतीने मृतदेद विद्रूप केल्याने तो ढेकणेचा नसल्याची खात्री पोलिसांना होती. पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी मृतदेहाचे रक्त पाठवले होते. पोलिसांची पथके खुन्याच्या शोधात असताना ढेकणे जिवंत असल्याची कुणकुण लागली होती.

ढेकणेने स्वतःच्याच खुनाचा बनाव केला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 'कंदलगावातील मृतदेह कोणाचा, खून कोणी केला याची माहिती ढेकणेकडून घेण्यात येईल,' असे गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

असा सापडला ढेकणे

सध्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमुळे शहरात नाकेबंदी करण्यात आली आहे. याचदरम्यान ढेकणे रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती देशमुख यांना मिळाली. उपनिरीक्षक विकास जाधव व त्यांचे सहकारी अमित सर्जे, सुनील इंगवले, अमर आडसुळे, जितू भोसले, संजय काशीद, प्रकाश संकपाळ यांनी ढेकणेला पकडले.

खुनाचे दोन आरोप

सातारा जिल्ह्यातील संकेत भांडे आणि पुणे जिल्ह्यातील नीरा येथील अमित सोनवणे यांचा खून केल्याचा आरोप ढेकणेवर आहेत. भांडे खून प्रकरणी ढेकणेला जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने ठोठावली आहे. तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. ऑक्टोबरमध्ये तो पॅरोलवर सुटला. त्यानंतर तो फरारी होता. सात महिन्यांनंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनतेचा विचार… तसाच आचार

$
0
0

भाजप प्रदेश कार्यकारिणीची कोल्हापुरात बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीला शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात प्रारंभ झाला. तीन दिवसीय बैठकीत सरकार, संघटना व जनतेचा एकत्रित विचार करून आगामी काळात जनतेच्या अपेक्षेप्रमाणे वाटचाल करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार आहेत. आज, शनिवारी सकाळी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते राज्य परिषदेचे उद्‍घाटन होईल.

शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मंत्री, राज्यमंत्री राज्यभरातील पदाधिकारी, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत कार्यकारिणी बैठकीला रेसिडन्सी क्लबमध्ये सुरुवात झाली. जनतेने ज्या अपेक्षेने काँग्रेसच्या हातातून सत्ता काढून युतीच्या हातात सत्ता सोपवली आहे त्या अपेक्षेनुसार पुढील कालावधीतील वाटचालीसाठी विविध योजनांवर बैठकीत विचार करण्यात आला.

शनिवारी सकाळी पेटाळा येथील मैदानावर परिषदेला सुरुवात होणार आहे. त्यामध्ये शहा यांच्या मार्गदर्शनाबरोबर केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात आलेल्या विविध योजनांच्या अनुषंगाने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. रविवारी प्रदेशाध्यक्षप दानवे अध्यक्षीय भाषणात पक्षाची आगामी काळातील दिशा, ध्येयधोरणे स्पष्ट करतीली. दुपारी साडेबारा वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण झाल्यानंतर परिषदेचा समोराप होईल.

कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा उजळाईवाडी विमानतळावरून शहरात येत होता. त्यावेळी पानसरेंच्या हल्लेखोरांचा शोध घेण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका कार्यकर्त्याने या ताफ्यामध्ये घुसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. या प्रकारापूर्वी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

रेसिडन्सी क्लब येथे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते. 'काँग्रेस सोडण्याचा प्रश्न नाही. मुख्यमंत्र्यांना चहासाठी निमंत्रण देण्यासाठी मी आलो आहे,' असा खुलासा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images