Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिस प्रशासन झाले शहाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस निरीक्षकांवर केलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सरकारी रूग्णालयात ही तपासणी होणार असल्याने पोलिसांची तपासणी सरकारी पध्दतीने होणार की वस्तूनिष्ठपणे होणार याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

मुंबईत वाकोला पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास जोशी यांच्यावर उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी गोळीबार केला. जोशी यांचे शनिवारी उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेने पोलिस दलातील ताणतणावाचे स्वरूप उघड झाले. वाढती लोकसंख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, तपासाचे ओझे आणि बंदोबस्तामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे. त्यांना रजा मिळत नसल्याने व तणावाच्या काळात सुट्याही मिळत नसल्याने पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांत सातत्याने वाद होत असतात. मुंबईतील घटनेतही पोलिसांतील ताण ठळकपणे नजरेस आल्याने कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी घेतला आहे.

तपासणी 'सरकारी' नको

पोलिसांची आरोग्य तपासणी सरकारी रूग्णालयात होणार आहे. सरकारी रूग्णालयातील पायाभूत सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा पाहता पोलिसांची आरोग्य तपासणी 'सरकारी तपासणी' होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चांगल्या हॉस्पिटलशी पोलिस प्रशासनाचा करार झाला आहे. अशा हॉस्पिटलमध्ये तपासणी झाल्यास पोलिसांच्या आरोग्याची तपासणी खऱ्या अर्थाने होईल, अशी चर्चा कर्मचाऱ्यांत सुरू आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. तपासासाठी वेळेचे बंधन नसल्याने पोलिस कर्मचारी दिवसरात्र काम करतात. त्यातून पोलिसांत नैराश्य येते. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तणावग्रस्त पोलिसांची स्वतंत्र यादी केली जाईल. त्यांच्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाईल. अशा पोलिसांचे कौन्सेलिंग करण्यात येईल.

- संजय वर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारूच्या कारखान्यात स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शोभेच्या दारूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कवठे एकंद (ता. तासगाव) येथे सोमवारी सायंकाळी दारूच्या कारखान्यात स्फोट होऊन सहा जण जागीच ठार झाले. या कारखान्यांमध्ये दोनच वर्षांपूर्वी स्फोट होऊन आठ जणांचा बळी गेला होता.

'ईगल फायर वर्क्स' या कारखान्यात सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण कारखाना जळून राख झाला. त्यावेळी कारखान्यात मालकाच्या नातेवाईकांसह नऊ कामगार आणि ग्राहक म्हणून आलेले दोघे असे ११ जण होते. त्यापैकी सहा जण जागीच ठार झाले. तिघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ठार झालेल्यांचे हातपाय शरीरापासून दूरवर फेकले गेले होते. मयत आणि जखमी सर्वच जण होरपळून काळेठिक्कर पडल्याने त्यांची ओळख पटविणेही कठीण झाले होते. एक मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता.

हा कारखाना रामचंद्र गुरव यांच्या मालकीचा असून, तासगाव रस्त्यावर कवठे एकंदपासून काही अंतरावर असलेल्या एका गोदामात तो चालविला जात होता. स्फोटात कारखाना मालकाचा मुलगा आणि आई मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये जुबेदा अकबर नदाफ (वय ५५), इंदाबाई तुकाराम गुरव (वय ७०), सुनंदा रामचंद्र गिरी (वय ४०), राम राजेंद्र गिरी (४६), अनिकेत रामचंद्र गुरव (वय १६), अजित निशिकांत तोडकर (वय ३२, रा. वारणा कोडोली), रामचंद्र राव गिरी (वय २२), तानाजी ईश्वर शिरतोडे (वय ३२), शरद शिवाजी गुरव (वय ३८, सर्व जण कवठे एकंद) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी शिवाजी तुकाराम गुरव (वय ४६) यांना सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. कोळशाच्या ढिगाऱ्यांतून मृतदेह शोधण्यात आले. आगीने लपेटलेल्या अवस्थेतच जखमींना बाहेर काढून खासगी गाड्यांतून हॉस्पिटलकडे नेण्यात आले. आगीच्या झळा लागून त्या गाड्यांनीही पेट घेतला. त्यावेळी त्वरित जखमींना त्या गाड्यांमधून हलवून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांमधून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. स्फोटाचे वृत्त समजताच तासगावच्या आमदार श्रीमती सुमन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सांगलीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली.

प्रसारमाध्यमांना रोखले

स्फोटानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. ग्रामस्थांनी या घटनेच्या वृत्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रोखले. त्यामुळे गोंधळ माजला. जिल्हा पोलिस प्रमुख दिलीप सावंत यांनी त्वरित जादाचा पोलिस बंदोबस्त पाठवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यात काही कॅमेऱ्यांची तोडफोड झाली.

आजवर २७ बळी

या गावाला जसा शोभेची दर्जेदार दारू बनविण्याचा इतिहास आहे, तसाच कारखान्यांमध्ये स्फोट होऊन कामगार बळी जाण्याचाही इतिहास आहे. दोन वर्षांपूर्वी २०१३ मध्ये दसऱ्याला एका कारखान्यात स्फोट होऊन एकाच कुटुंबातील आठ जणांचा बळी गेला होता. गावात आतापर्यंत स्फोटात बळी गेलेल्यांची संख्या २७ आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटानंतर विनापरवाना उत्पादन बंद करावे, परवानाधारक उत्पादकांनी कारखाने गावाबाहेर हलवावेत, असा ठराव करण्यात आला होता.

सुरक्षेचे उपाय कधी?

सोमवारचा स्फोट नेमका कशाने झाला, याची कारणे अद्याप समजलेली नाहीत. मात्र, हा व्यवसाय पुरेशी काळजी घेऊन होत नसल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. त्यामुळे या दारू उत्पादकांवर निर्बंध लादले जाणार का, कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे उत्पादकांना बंधनकारक करणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयमध्ये ध्वजवंदनच नाही

$
0
0

सातारा : वाई येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) महाराष्ट्र दिनी ध्वजवंदनच करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोपर्डी ग्रामपंचायत सदस्य भरत गाढवे यांनी केली आहे. विद्यार्थी, काही कर्मचारी, ग्रामस्थ या वेळी ध्वजवंदनासाठी आले होते; परंतु त्यांना ध्वजवंदनाविनाच माघारी जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

नीरा उजव्या कालव्यात रविवारी वाहून गेलेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत. ते सर्व जण साखरवाडीच्या न्यू फलटण शुगर वर्क्सचे तोडणी वाहतूक कामगार आहेत. नवनाथ सुंदरभाऊ नरुटे (वय ३०, रा. हणमंतगाव, चिखली, ता. आष्टी, जि. बीड) हा कारखान्याकडील तोडणी वाहतूक कामगार आणि शाळेला सुट्टी लागल्याने आपल्या कुटुंबीयाकडे आलेला विद्यार्थी सोनू बाळू कोळेकर (वय २२, रा. चिंचोली काळदात, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हे कारखान्याचा गळीत हंगाम आगामी दोन दिवसात बंद होणार असल्याने घराकडे परतण्यापूर्वी येथे नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी असल्याने आपले बैल व कपडे धुण्यासाठी पाच सर्कल, खामगाव येथे रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेले होते.

कांतिलाल शिवाजी कोळेकर व त्यांचा पुतण्या सोनू बाळू कोळेकर हे दोघे आणि नवनाथ सुंदरभाऊ नरुटे व अन्य काही जण नीरा उजवा कालव्यावर गेल्यानंतर सोनू कोळेकर कालव्यात बैल धूत असताना पाय घसरून पाण्यात पडला आणि वाहून जाऊ लागला. शेजारी असलेल्या नवनाथ नरुटे यांनी त्याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात त्यांचाही पाय घसरून ते पाण्यात पडले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘व्याघ्र प्रकल्पामुळे ४५ गावे उद्ध्वस्त’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे पाटण तालुक्यातील ४५ गावे उद्ध्वस्त होतील, अशी भीती माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केली. प्रकल्पामुळे गावांच्या अधिकारांवर कोणते निर्बंध येतील, ते वन खात्याच्या प्रारूप नियमावलीत स्पष्ट केलेले नाही, असा दावाही पाटणकर यांनी केला.

'गेल्या २४ एप्रिल रोजी वन्यजीव विभागाने सर्व ग्रामपंचायतींना प्रारूप नियमावली पाठवली आहे. यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या पाटण तालुक्यातील ४५ गावांवर कोणती बंधने येणार आहेत, त्याबाबत कोणते कायदे केले जाणार आहेत, याचा अहवाल इंटरनेटवर प्रसिद्ध केला आहे. मात्र, त्यामध्ये ग्रामपंचायतींना सध्या अस्तिवात असणाऱ्या अधिकारांवर गदा येणार का, कोणते अधिकार काढून घेतले जातील, ग्रामस्थांवर कोणती बंधने लादली जातील, याची माहिती नियमावलीत नाही,' असे पाटणकर म्हणाले. या नियमावलीवर हरकती दाखल करण्यासाठी शनिवारपर्यंत (९ मे) मुदत आहे. कोल्हापूर येथील वन्यजीव विभाग कार्यालयाकडे या हरकती लेखी पोहोच करायच्या आहेत.

कोयनानगरला बैठक

दरम्यान, कोयनानगर येथे पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्यावतीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनबाबत आयोजित केलेल्या बैठकीतही पाटणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाटण पंचायत समितीच्या सभापती संगीता गुरव, समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार, मोरणा-गुरेघर धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ जाधव आदी उपस्थित होते. खासगी क्षेत्रावर बंधने लादून या भागाचा विकास रोखण्यास आमचा विरोध आहे, असे पाटणकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलांचा छळ; दोघांविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ करून त्यांची चित्रफीत बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी जाधववाडी (ता. कोरेगाव) येथील दोन तरुणांविरोधात वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एक जण पळून गेला आहे.

जाधववाडीत टेलरिंगचा व्यवसाय करणारा किशोर शंकर तोरस्कर याने त्याच गावातील १७ वर्षांच्या युवकाच्या साथीने हे दुष्कृत्य केले आहे. त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना २६ एप्रिलला एका शाळेत बोलवून घेतले. तेथे एका वर्गाच्या खोलीत त्यांचा छळ करून त्याची क्लिप बनविण्यात आली. ती व्हॉट्स अॅपवर प्रसृत करण्यात आली. मुलांच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी वाठार स्टेशन पोलिसांत दोघांविरोधात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. मात्र, किशोर तोरस्कर पळून गेला.आहे. अल्पवयीन आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळींची संख्या ११ वर

$
0
0

कुपवाड : कवठे एकंद मधील दारू कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ११ झाली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या जखमीचे मंगळवारी निधन झाले. तर बेपत्ता असलेल्या एकाचा मृतदेह घटनास्थळाजवळील केळीच्या बागेत सापडला.

शिवाजी तुकाराम गुरव (४६) असे हॉस्पिटलमध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा रोहित शिवाजी गुरव (१६) बेपत्ता होता. स्फोटाच्या वेळी लघुशंकेसाठी कारखान्याबाहेर पडलेला प्रवीणकुमार मदने (वय ३०) हा मजूर बचावला. स्फोटानंतर उडालेली वीट हातावर लागल्याने तो किरकोळ जखमी झाला झाला आहे. दरम्यान कारखानामालक रामचंद्र तुकाराम गुरव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा आणि स्फोटक विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख दिलीप सावंत यांनी पत्रकारांना दिली.

कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक संजय वर्मा यांनी कवठेएकंदला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पुण्याहून न्यायवैद्यक तज्ज्ञांचे पथक सायंकाळी गावात पोहोचले. केंद्रीय आपत्ती निवारण पथकालाही पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचत तीन हजारांची, खर्च १० लाखांचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

शहरात एलईडी दिवे बसविण्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. 'तीन हजार रुपयांचे वीज बिल वाचविण्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च कशासाठी,' अशी टीका विरोधी पक्षनेते बाळासाहेब बाबर यांनी केली. मात्र, बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्यात आला. या सभेत २० मनिटांत ३३ विषय मंजूर करण्यात आले.

नगराध्यक्ष सचिन सारस सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडून आला होता. त्यावर बाबर यांनी कडाडून टीका केली. 'तीन हजार रुपयांचे वीज बिल वाचविण्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च करणे ही उधळपट्टी असून, पालिकेकडून अशा उधळपट्टीची अपेक्षा नाही. हा विषय पत्रिकेवर आलाच कसा,' अशी विचारणा बाबर यांनी केली.

सत्ताधारी नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी बाबर यांना उत्तर दिले. 'सध्या वीज टंचाईमुळे देशभर एलईडी दिवे बसविण्यात येत आहेत. या दिव्यांना १० वर्षांची वारंटी असल्याने एक लाख रुपयांची बचत होणार आहे,' असे कदम यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही आघाड्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. शनिवार पेठेत मटण मार्केट व कस्तुरबा रुग्णालयाची जुनी इमारत जमीनदोस्त करणे व म्हाडाच्या घरकुल योजनांना मार्च २०१६ पर्यंत मंजुरी देणे या विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परवाना १५ किलोंचा; साठा हजार किलोंवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सोमवारच्या स्फोटानंतर झालेल्या तपासात कारखानाचालक रामचंद्र गुरव याने निष्काळीजपणा तसेच स्फोटकांचा बेकायदा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरव याच्याकडे केवळ १५ किलो स्फोटकांचा साठा करण्याचा परवाना असतानाही त्याने हजार किलोपेक्षाही अधिक स्फोटके साठविल्याचे उघड झाले आहे.

गुरवने चौदा वर्षांपूर्वी कारखान्याचा परवाना घेतला त्यावेळी तो एका छोट्याशा खोलीत हा उद्योग करत होता. त्यानंतर तो प्रत्येक वर्षी परवान्याचे नूतनीकरण करीत होता. मात्र, जिल्हा प्रशासनातील कोणाही जबाबदार अधिकाऱ्याने कारखान्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली नाही. त्याने गेल्या काही वर्षांत आपला कारखाना एका मोठ्या गोदामात हलविला होता. गावात त्याच्याप्रमाणे सहा जणांकडे शोभेच्या दारुच्या साहित्याचा उत्पादनाचा परवाना आहे, परंतु प्रत्येकाला केवळ गावच्या यात्रेच्या निमित्त वर्षातून एकदाच पंधरा किलोचे साहित्य उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रामचंद्र गुरव याच्या ईगल फायर वर्क्स या कारखान्यात एकही कुशल कारागीर नव्हता. घरातीलच भाऊ, पुतणे, मुले, आई हे जोखमीचे काम करत होती. तुळजापूर परिसरातील आई-वडील आणि मुलगा असे गरजू कुटुंबाचाही कामगारांमध्ये समावेश होता. त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. मूळचा कुंडलचा आणि सध्या नागाव कवठे येथे राहणारा प्रवीण मदने हा कामगार सुदैवाने बचावला आहे. वारणा-कोडोली येथील अजित तोडकर हा फटाके खरेदीसाठी आले. तेही स्फोटात बळी पडले. स्फोटाआधी मदने लघुशंकेसाठी कारखान्याबाहेर पडला. तो दोनशे ते अडीचशे फुटांवर गेला असतानाच स्फोटाने कारखाना उद्ध्वस्त झाला. भेदरलेल्या अवस्थेत तो वाट दिसेल तिकडे धावत राहिला. मध्यरात्री तो गावकऱ्यांना दिसला.

आजवर सर्व निर्दोष

सन २००० पासून सोमवारच्या घटनेसह कवठेएकंदमध्ये शोभेच्या दारूच्या कारखान्यांत दहा मोठे स्फोट झाले आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला आहे, २३ जण जखमी झालेत. स्फोटांच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या खटल्यांमध्ये सर्वच संशयित निर्दोष सुटले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे वेतन ऑफलाइनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालार्थ वेतन प्रणालीनुसार राज्यातील शिक्षकांचे एप्रिल २०१४ पासून होणारे ऑनलाइन वेतन अद्याप झालेले नाही. वर्षभर अनेक अडचणींमुळे या योजनेचे घोंडगे भिजत पडले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे तसेच जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन सध्या ऑफलाइन असल्यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीनुसार करण्यासाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर या शिक्षकांचे वेतन ऑनलाइन सुरू झाले. मात्र जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न व जिल्हा परिषदेच्या ८ ते ९ हजार शिक्षकांचे वेतन अजूनही ऑफलाइन निघत आहेत.

जुनी पद्धत

त्या-त्या शाळेतील क्लार्क पगार बिले तयार करून ते बिल गटशिक्षणाधिऱ्याकडे सादर केले जाते. तेथून ते मंजुरीसाठी शिक्षाणाधिकाऱ्यांकडून लेखाधिकाऱ्यांकडे जाते. ते मंजूर झाल्यानंतर पगाराचा धनादेश तालुकानिहाय सादर केला जात होता त्यानंतर शिक्षकांचे पगार होतात. त्यात क्लार्कनी वेळेत बिले न पाठविल्यास पगार होण्यास आणखी दिरंगाई होते.

नवी पद्धत

नव्या शालार्थ योजनेमुळे मुख्याध्यापकांनी माहिती भरल्यानंतर ते बिल बीडीओंनी तपासून लेखाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन सादर केले जाणार आहे. ते मंजूर होताच पगार थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात ही ऑनलाइन पद्धत सध्या ऑफलाइन आहे.

ऑनलाइनचा फायदा

या शालार्थ वेतन प्रणालीमुळे शिक्षकांना फार काळ पगारासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही. नेहमी १० ते १५ तारखेनंतर होणारे वेतन महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात ऑनलाइन जमा होऊ शकतो.

संच मान्यतेनुसार शिक्षकांचे वेतन ऑनलाइन होत असून जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्याचे वेतन अजूनही ऑफलाइनच होते. कारण ऑनलाइनसाठी त्या सर्व्हररमध्ये अतिरिक्त शिक्षकांसाठी तशी सुविधा नसल्याने अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम आहे.

- भरत रसाळे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘म्हाडा’साठी ४४ हेक्टर जागा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यातील प्रत्येकाला हक्काचे आणि परवडणारे घर देण्याचा प्रयत्न म्हाडाच्या वतीने करण्यात येत असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे ४४ हेक्टर सरकारी जागेची मागणी केली आहे. ज्यांनी दहा वर्षांपूर्वी जमीन घेतल्या, मात्र अजूनही बांधकाम केले नाही त्यांच्या जमिनी काढून घ्या,' असे आदेश गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. सर्किट हाउस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

वायकर म्हणाले, 'कोल्हापुरात म्हाडासाठी जागा उपलब्ध नाही. सध्या केवळ दोन हेक्टर जागा उपलब्ध आहे. ती पुरेशी नाही. त्यामुळे सरकारकडे अतिरिक्त ४४ हेक्टर जागेची मागणी केली आहे. करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज याठिकाणी जागांची मागणी केली असून, या जागा मिळाल्यास सर्वांनाच कमी किमतीत घरे देता येतील. त्याबरोबरच ज्यांनी दहा वर्षांपूर्वी जागा घेतल्या आहेत, पण बांधकाम केलेले नाही त्यांच्या जागा काढून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना नोटिशीद्वारे माहिती देण्यात येईल आणि नंतर करावाई केली जाईल. त्याबरोबरच जिल्ह्यातील म्हाडाच्या घरांचा लाभ घेतलेल्या लोकांकडून एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत पैसे वसूल झाले नाहीत तर त्या जागाही ताब्यात घ्या.'

वायकर पुढे म्हणाले, 'सरकारी कर्मचारी, पोलिस, म्हाडाचे कर्मचारी, पत्रकार यांनी आपले प्रस्ताव दिल्यास त्यांच्यासाठी म्हाडाच्या जागेवर 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर बांधण्यात आलेली घरे दिली जातील. सामूहिक पद्धतीने बांधकाम झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या सुविधाही देऊ. सध्या म्हाडाच्या घरांचे बांधकाम होताना त्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. सरकारी पातळीवर खासगी व्यावसायिकांना सूट दिली जाते. म्हाडाला मात्र एसटीपी उभारणे बंधनकारक केले जाते. सर्वांना समान नियम असावा यासाठी आग्रह धरणार आहे. त्याबरोबरच भूकंपरोधक इमारती बांधकामालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.'

म्हाडाचा लोगो बदलणार

सध्या म्हाडाचा लोगो केवळ एक इमारत आणि वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण असा ओबडधोबड आहे. तो बदलण्यात येणार असून, अत्यंत चांगला लोगो तयार केला जाणार आहे. म्हाडाबाबत लोकांना आपलेपणाची भावना तयार होईल असा लोगो तयार करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा छळ : ५ जणांविरूध्द गुन्हा

$
0
0

जयसिंगपूर : माहेरहून सोन्याचे दागिने, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, एलईडी आणावा यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी पतीसह पाचजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संजीवनी उत्तम अडसुळे (वय २६, रा.कवठेसार, ता.शिरोळ) यांनी तक्रार दिली आहे. पती उत्तम काशिनाथ अडसुळे, सासू अनिता अडसुळे, सासरा काशिनाथ अडसुळे, दिर मंगेश अडसुळे, नणंद अश्विनी शिंदे (सर्व रा.कवठेसार) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ मे २०१४ रोजी संजीवनी हिचा विवाह उत्तमशी झाला होता. यानंतर माहेरहून दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, लॅपटॉपसह अन्य वस्तू आणाव्यात यासाठी सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ करण्यात येत होता, असे संजीवनी अडसुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी-केएमटी अपघातात ११ जखमी

$
0
0

कोल्हापूर : एसटी व केएमटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. हा अपघात पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील न्यायालयासमोर मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजता घडला. जखमींना सीपीआर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.अपघातातील जखमींची नावे अशीः द्रौपदी बुरूड, महादेव कटवटे, दयानंद काटे, रमेश शेंडगे, उदय मोकाशी, शालन कांबळे, आयेशा नदाफ, रमेश वाघ, लक्ष्मी माने, शोभा बुरूड अशी आहेत. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्याच्या काही भागात वळीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमार जिल्ह्याच्या काही भागात वळीवाने दणका दिला. विजांचा कडकडडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने आंबा पिकाचे नुकसान झाले. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला.

कागल : मंगळवारी सायंकाळी कागल तालुक्यात जोराचा वारा आणि गारांसह वळीव पाऊस झाला. यामध्ये कागल निढोरी राज्य मार्गावर एक झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तर अनेक ठिकाणी वादळाने ऊस पिकाचे पडून नुकसान झाले. दिवसभरात प्रचंड उकाडा जाणवत होता. सायंकाळी पाचच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वळीव पावसाने सुमारे अर्धा तास हजेरी लावली. तालुक्यात अनेक गावात यामुळे वीज गायब झाली.

अचानक आलेल्या पावसाने लोकांची त्रेधातिरपीट उडाली. खास करुन दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांनी हायवेरील बोगद्याचा आसरा घेतला. आंबा पिकाचे फळे पडून नुकसान झाले.

शाहूवाडी : विजेच्या कडकडाटासह शाहूवाडी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला परंतु वळीव पावसाचा फटका पिके व फळांना बसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या शाहूवाडी, मलकापूर, निळे, आंबा, येळवण जुगाई, बांबवडे, सरुड, शित्तूर वारुण या भागात पाऊस पडला.

जयसिंगपूर शहरात फेरीवाल्यांची धांदल

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे भाजी विक्रेत्यांबरोबरच फेरीवाल्यांची धांदल उडाली. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जयसिंगपूर शहराबरोबरच शिरोळ तालुक्यातील उदगाव, कोथळी, उमळवाड येथे पाऊस झाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिनीच्या वादातून जांभळीत खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे शेतजमिनीच्या वादातून चुलत मामाने केलेल्या चाकूहल्ल्यात भाचा ठार झाला. मंगळवारी सायंकाळी बसस्थानक चौकात ही घटना घडली. सुनील आण्णासो पाटील (वय ४५, रा.दत्तनगर शिरोळ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिवराज सुनील पाटील यांनी फिर्याद दिली असून शिरोळ पोलिसांनी आण्णासो तुळसगोंडा पाटील व काकासो तुळसगोंडा पाटील यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मयत सुनील पाटील याची आई शांताबाई यांना लेक वारसाने जांभळी येथील सात एकर शेतजमीन वाटणीस आली आहे. या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाने या जमिनीची स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता सबंधित अधिकारी, सुनीलची आई आणि वडील त्या ठिकाणी पोहोचले. सुनीलचे चुलत मामा आण्णासो तुळसगोंडा पाटील व काकासो तुळसगोंडा पाटील यांनी स्थळ पाहणी करताना हरकत घेवून वादावादी केली.

आईस शिवीगाळ होत असल्याची माहिती मोबाईलवरून मिळाल्याने सुनील तसेच त्याचा मुलगा शिवराज,भाऊ सुधीर हे तिघेजण पावणेचार वाजता जांभळीत पोहोचले. यावेळी बसस्थानक चौकात चुलत मामा आण्णासो आणि काकासो पाटील व सुनील यांमयात शाब्दिक चकमक झाली. यावेळी शिवीगाळ झाल्याने वाद उफाळला व ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुधीरच्या डोक्यात सोडावॉटरच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. लाथाबु्क्क्यांनी मारहाण सुरू असतानाच आण्णासो याने चाकूने छातीवर वार केल्याने सुनील गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कनिष्ठ अभियंत्याला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा कनिष्ठ अभियंता रत्नाकर दत्तात्रय जोशी याला प्रथम सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच लाचेची तीन हजार रुपये रक्कम फिर्यादीला देण्याचा आदेशही देण्यात आला. जोशीला २००४ मध्ये लाच घेताना अटक केली होती. तब्बल अकरा वर्षांनंतर खटल्याचा निकाल लागला आहे.

आरोपी रत्नाकर जोशी कोगे (ता. करवीर) येथील राज्य विद्युत मंडळात २००४ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होता. या खटल्यातील फिर्यादी रघुनाथ बाबूराव चौगुले (रा. बहिरेश्वर, ता. करवीर) हे माजी सैनिक आहेत. चौगुले यांच्या शेताजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यावेळी शेतातील निलगिरीच्या झाडाची फांदी पडल्याने चौगुले यांच्या बोअरचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे चौगुले यांनी कोगे येथील ​वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केल्यावर जोशी याने तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यावर चौगुले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा लावला असता कोगे येथील कार्यालयात चौगुले यांच्याकडून तीन हजारांची लाच स्वीकारताना जोशीला अटक केली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. डब्ल्यू. निकम यांनी या गुन्ह्याचा तपास केला.

या खटल्याची सुनावणी न्यायाधीश तिडके यांच्यासमोर झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी चौगुले, साक्षीदार, पंच, वायरमन, कंत्राटदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजार पावत्यांच्या छाननीचे काम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा विभागातील घोटाळ्याची आयुक्तस्तरावरून चौकशी सुरू आहे. थकीत घरफाळ्याच्या रकमेत नियमबाह्यरीत्या सवलत दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सध्या करण्यात येत आहे. आतापर्यंत 'झिरो बॅलन्स'च्या १४५४ बिल पावत्यांची तपासणी करण्यात आली आहे. अद्याप १००० पावत्यांची छाननी होणार आहे. आयुक्तांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांनी तपासाच्या सक्त सूचना केल्या आहेत.

आयुक्त शिवशंकर म्हणाले, 'आठवडाभर तपासणीचे काम सुरू राहणार आहे. चौकशीअंती जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच महापालिकेच्या विविध विभागांशी निगडित कम्प्युटरच्या कामकाजाचा त्रयस्थ कंपनीमार्फत तपासणी (ऑडिट) करण्यात येणार आहे.'

आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी उपायुक्त अश्विनी वाघमळे, घरफाळा विभागाचे कर निर्धारक दिवाकर कारंडे, एचसीएल कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेत चौकशीच्या कामाचा आढावा घेतला. कच्च्या पावतीद्वारे (मॅन्युअल) भरलेली रक्कम, कम्प्युटरवर नोंदविलेल्या नोंदी तपासल्या जात आहेत. बागल चौक परिसरातील व्यापारी संकुलाच्या थकीत घरफाळा रकमेच्या वसुलीदरम्यान व्याज व दंडात नियमबाह्यरीत्या सवलत दिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी गेल्या पाच वर्षांतील घरफाळा विभागाचा हिशेब मागितला आहे. कच्च्या पावतीद्वारे रक्कम भरून घेताना अनेक मिळकतधारकांना व्याज व दंडात नियमबाह्य सवलत देऊन परस्पर रक्कम हडपल्याची शक्यता मोठी आहे.

हद्दवाढप्रश्नी पुढील आठवड्यात बैठक

हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. शहरालगतच्या गावांचा हद्दवाढीत समावेश करून नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या अनुषंगाने शहरालगतच्या गावांतील सरपंच, सदस्यांची पुढील आठवड्यात बैठक बोलावणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूहल्ल्यात तरुण गंभीर जखमी

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर-शिंगणापूर रोडवर झालेल्या चाकूहल्ल्यात एकंत ऊर्फ अक्षय सुरेश कांबळे (वय २२, रा. माळवाडी, शिंगणापूर, ता. करवीर) हा युवक गंभीर जखमी झाला. पाच वार झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता घडली. अक्षय हा वडील सुरेश कांबळे यांच्यासमवेत वायरिंगचे काम करतो. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास चंबुखडी परिसरातील शाकंबरी मंदिर परिसरातून मोटारसायकलवरून जात असताना दीपक मुधाळे व सागर मुधाळे यांनी त्याला अडवले. नातलग असलेल्या महिलांशी का बोलतोस, त्यांना एसएमएस का पाठवतोस असा जाब विचारून त्याच्यावर चाकूने पाच वार केले. जीव वाचवण्यासाठी अक्षय उसाच्या शेतात पळून जाऊन जखमी अवस्थेत घरी आला. यावेळी घरच्यांनी त्याला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून प्रकृती चिंताजनक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची उत्सुकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची निवड गुरूवारी होत आहे. गोकुळचे अध्यक्षपद हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जात असल्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. कोणत्या गटाला अध्यक्षपद द्यायचे आणि कोणत्या गटाला नाही याबाबत नेत्यांमध्येही खल सुरु असून आपल्याच गटाकडे अध्यक्षपद ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, सुरेश पाटील आणि विश्वास पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. पण, कोण कोणाच्या गटात आहे यावरून नावनिश्चिती होणार आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता ही निवड होणार आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी इतर संस्थांच्या निवडणुकीवर पाणी सोडण्याचा प्रकार यावेळी पाहायला मिळाला आहे. तर काहींना नेत्यांनी इतर संस्थांमध्ये संधी देण्याचे आश्वासन देत गोकुळसाठी उमेदवारी ठेवू नका असे सांगत गोकुळ सुरक्षित करण्याचाही प्रयत्न केला होता.

गोकुळ दूध संघात आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. या गटाचे १६ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष याच गटाचा होणार असला तरी महाडिक आणि पाटील यांच्यामध्ये फारसे सख्य नाही. महाडिक यांना आपल्या मर्जीतील संचालक अध्यक्ष व्हावा, असे वाटते तर पाटील यांना आता आपल्या मर्जीतील संचालकाची वेळ असल्याचे सांगायचे आहे. त्यामुळे महादेवराव महाडिक हे पी. एन. पाटील यांच्याकडे तर पी. एन. पाटील हे महाडिक यांच्याकडे निर्णयाबाबत बोट दाखविण्याचा प्रयत्न करतात.

ज्येष्ठ संचालक आणि आत्तापर्यंत संधी मिळाली नाही म्हणून सुरेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचवेळी अरुण नरके यांना अनुभव असल्याने अडचणीच्या काळात त्यांच्यासारख्या संचालकांची गरज असल्याचे काही नेत्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत नरके यांनी पी. एन. पाटील यांच्या विरोधात काम केल्याने त्यांच्या नावाला पाटील यांची सहज पसंती मिळेल, अशी शक्यता कमीच आहे. तर महाडिक यांना नरके अध्यक्ष झाले तरी चालण्यासारखे आहे. सुरेश पाटील हे पी. एन. पाटील गटाचे आहेत तर विश्वास पाटील यांचा वावर दोन्हीकडे असल्यामुळे त्यांचे नाणे चालू शकते. त्यामुळे नेत्यांच्या भांडणात ऐनवेळी कुणालाही संधी मिळू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएमटीच्या नव्या बसचे टायमिंग चुकले

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

केएमटीला नव्या बस देण्याची २ मेची मुदत उलटूनही बस न मिळाल्याने करारानुसार निविदाधारक अशोक लेलँड कंपनीला दरदिवशी १४०० रुपये दंड महापालिकेला द्यावा लागणार आहे. केएमटी आणि अशोक लेलँड यांच्यात ऑगस्ट २०१४ मध्ये झालेल्या करारानुसार २५ बसचा पहिला ताफा डिसेंबर २०१४ अखेर दाखल होणार होता. मात्र, ही मुदत वाढत गेली.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिकेला बस खरेदीसाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून १०४ बस खरेदी करण्यात येणार आहेत. केएमटी आणि अशोक लेलँडमध्ये करार होऊन पहिल्या टप्प्यात ७५ बसच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली. त्यानंतर २९ बसच्या खरेदी प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. डिसेंबर २०१४ पासून दरमहा २५ बस मिळणार होत्या, परंतु विलंब झाल्याने बसचे आगमन लांबणीवर पडले.

अशोक लेलँडच्या बेळगावमधील वर्कशॉपमध्ये सध्या ५५ बसची बांधणी सुरू आहे. बसला अत्याधुनिक यंत्रणेची जोड देण्याचे काम सुरू आहे. यामुळे उशीर होत असल्याचे कंपनीच्या सूत्राकडून सांगण्यात येते. याबाबत अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले म्हणाले, 'करारानुसार २ मे रोजी २५ बसेस उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या. आतापर्यंत ११ बसेस आल्या. या महिन्यातील १४ बसेस वेळेत उपलब्ध केल्या नाहीत. त्यामुळे कंपनीला प्रतिबस प्रतिदिन १४०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. बसेसच्या किमतीच्या ०.०५ टक्के रक्कम दंड स्वरूपात आकारली जाणार आहे.'

ऑगस्ट २०१३ मध्ये करार

पहिल्या टप्प्यात ७५ बसेसची निविदा प्रक्रिया आणि मोबिलायझेशन फंडिंगची प्रक्रिया पूर्ण

नोव्हेंबर २०१४ मध्ये कंपनीकडे ९१ लाखाचा मोबिलायझेशन फंड सुपूर्द

दुसऱ्या टप्प्यात २९ बसेसची निविदा प्रक्रियेला मंजुरी

जुलैअखेर एकूण ७५ बसेस दाखल होणार होत्या. मात्र पाच मे उलटून गेला तरी कंपनीकडून बसेस आल्या नाहीत. केएमटीचे व्यवस्थापकही नीट माहिती देत नाहीत. होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण?

- राजू पसारे, परिवहन समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images