Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भातशेतीत सहकाराचा प्रयोग

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे, पण दुर्लक्षित राहिलेल्या भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहकाराच्या माध्यमातून विकास होणार आहे. भाताची खरेदी, त्यावर प्रक्रिया करून पोहे तयार करणे आणि या पोह्यांची विक्री व्यवस्था उभारण्यापर्यंतची साखळी सहकारी संस्थांच्या माध्यामातून करण्याचे नियोजन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.

शेती हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा आणि समाजजीवनाचा कणा आहे. पण शेतीमालावर प्रकिया करण्यात मात्र जिल्हा मागेच राहिला आहे. साखर, गूळ, दूध सोडले तर कोल्हापुरात प्रकियाउद्योग उभे राहू शकलेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख हेक्टर क्षे‌त्रावर भात पीक घेतले जाते. उसाच्या खालोखाल भात पिकाचे क्षेत्र आहे. विशेषत: जिल्ह्यातील पश्चिम भागात, सह्याद्रीच्या डोंगरांगात भात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो.

हाळवणकर म्हणाले, 'उसावर प्रकिया करणारे साखर कारखाने उभे राहिल्यामुळेच ऊसकरी शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहता आले. त्याच धरतीवर भातावर प्रकिया करता येऊ शकते. भातपासून बनणारे पोहे घरोघरी लागतात, त्याचा लाभ शेतक ऱ्यांना मिळावा असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. काही साखर कारखान्यांनी ऊस पीक विकास कार्यक्रम राबवले त्यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्याच धरतीवर पोहे बनवण्यासाठी लागणाऱ्या भाताचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, त्यांना पीक घेण्यासाठी सहकार्य करणे असे कार्यक्रमही हाती घेता येतील.'

सहकारी संस्था स्थापून शेतकऱ्यांकडून भात विकत घ्यायचे आणि त्यापासून पोहे बनवयाचे, तसेच या पोह्यांचे मार्केटिंगही करायचे यासाठी संस्था उभारण्यासाठी हाळवणकर यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात प्राथमिक चाचपणी सुरू आहे.

हाळवणकर म्हणाले, 'सर्वसाधारपणे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. प्रक्रिया उद्योगांतून भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देता आला तर नि‌श्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. जिल्ह्याच्या विकासातही याचा नक्कीच हातभार लागेल. सर्वसाधारणपणे हाच विचार मका पिकासाठी करता येईल. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला लागणारा स्टार्च मक्यापासून बनतो. स्टार्चला मागणीही मोठी आहे. स्टार्च निर्मिती सहकारी संस्थांच्या माध्यमातून करता येईल. त्यातून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला दर मिळवून देता येईल.'

कष्टाचे पीक

भात पीक घेणे हे अधिक कष्टाचे असते. कामगारांची कमी उपलब्धता, महाग झालेली खते अशा समस्या भात उत्पादकांसमोर आहेत. पुरेसा दर मिळत नसल्याने बरेच शेतकरी भात पीक फक्त घरगुती वापरासाठी घेतात. कोल्हापुरातील डोंगररांगात भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठस्तरावर सीएचबी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात तसेच विद्यापीठ स्तरावर ३५ ते ३८ टक्के जागा रिक्त आहेत. सध्या याठिकाणी तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. ती थांबवून भविष्यात तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती बंद केली जाणार असून एमपीएससीच्या माध्यमातून जागा भरल्या जातील,' अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.

मंत्री वायकर म्हणाले, 'राज्यातील सरकारी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्याबरोबरच विद्यापीठ, इंजिनीअरिंग महाविद्यालये याठिकाणीही प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. काही ठिकाणी तासिका तत्त्वावर प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. त्यांना ७० ते ३०० रुपये मानधन दिले जाते. हा प्रकार बंद करण्यात येणार असून, सरकारी महाविद्यालयांमध्ये एमपीएससीच्या माध्यमातून जागा भरल्या जातील. तसेच विद्यापीठ स्तरावरील जागाही विद्यापीठाच्या पातळीवर भरण्याचे आदेश देण्यात येतील. त्यामुळे आता तासिका तत्त्वावरील भरती बंद होण्याची शक्यता आहे.

तासिका तत्त्वावरील शिक्षक मध्येच सोडून जाण्याचा प्रकार घडतो. त्यांच्यावर संबंधित संस्थेला बंधन घालता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच इंजिनीअरिंग महाविद्यालयांमध्येही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या प्राध्यापकांची संख्या जास्त असल्याने त्यांना रोखता येणे अवघड झालेले आहे. ते थांबविण्यासाठी त्यांना कायमस्वरुपी नोकरी देण्याची आवश्यकता असल्याचे वायकर यांनी सांगितले.

संघटना मजबूत करणार

शिवसेनेची जिल्हा संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. या परिसराने शिवसेनेला चांगले बळ दिले आहे. शिवसेनेचे सहा आमदार आहेत, त्यामुळे जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. शहरात शिवसेनेत दोन गट आहेत अशी चर्चा आहे. त्याबाबत माहिती घेऊन सर्वांना सोबत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविणार

महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत शिवसेनेला आता कोणत्याही स्थानिक आघाडी किंवा पक्षाशी युती करण्याची गरज नाही. शिवसेना स्वबळावर लढण्यास समर्थ असून, भाजप किंवा कोणाशीही युती न करता एकट्याने निवडणूक लढविण्याची तयारी करत पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचेही वायकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत गटबाजी कायम

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेना करत आहे, कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केले जात आहे, दुसरीकडे मात्र पक्षाचे स्थानिक नेते हातात हात घालण्याऐवजी पायात पाय घालण्यात धन्यता मानत आहेत. यामुळे भगवा फडकेल तेव्हा फडकेल, पण एकजुटीचा भगवा प्रथम फडकवा असा आग्रह कार्यकर्त्यांमधून होत आहे. पक्ष स्थापनेच्या तिसाव्या वर्षीसुद्धा शिवसेनेला गटबाजीलाच सामोरे जावे लागत आहे. यामुळे महापालिकेवर भगवा फडकवण्यास निघालेल्या सेना नेत्यांसमोर आता गटबाजीला मूठमाती देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

शिवसेनेच्या स्थापनेला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. सहा मे १९८६ रोजी ताराबाई रोडवरील मित्र प्रेम मंडळाच्या व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते कोल्हापूर शाखेची स्थापना झाली. सुरेश साळोखे, चंद्रकांत साळोखे हे सेनेचे पहिले शिलेदार. पुढे त्यांच्या साथीत रामभाऊ व शिवाजीराव चव्हाण आले आणि तेथेच गटबा​जीला सुरुवात झाली. पक्षात वर्चस्व कोणाचे यावरून वाद सुरू झाला. साळोखेंना डावलून दिलीप देसाईंना विधानसभेला उमेदवारी दिल्यानंतर आणखी एका गटबाजीला निमंत्रण मिळाले. साळोखे-चव्हाण बरोबरच साळोखे- देसाई वादाला सुरुवात झाली. देसाई काँग्रेसमध्ये गेल्यानंतर अनेक वर्षे साळोखे- चव्हाण वाद धुमसतच राहिला. या वादातून शेवटी चव्हाणांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' केला. याच दरम्यान चव्हाण व विनायक साळोखे यांच्यातील वाद बराच गाजला. कार्यालयाचा ताबा घेण्यावरून या गटात तुंबळ मारामारी झाली.

साळोखे पक्षातून अलिप्त झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात युद्ध सुरू झाले. या युध्दात विजय देवणे उतरले. या दोघांत उघड संघर्ष सुरू झाल्यानंतर नेत्यांना दम द्यावा लागला. तरीही हा वाद शमला नाही. आजही हा वाद जोरातच आहे. कोल्हापुरात सेनेच्या स्थापनेला २९ वर्षे पूर्ण होताना जिल्ह्यात सेनेची ताकद वाढल्याचे नेते छातीवर हात ठेवून सांगतील, पण गटबाजी वाढल्याच्या आरोपावर मात्र कानावर हात ठेवतील. दोन्ही काँग्रेसच्या आशीर्वादामुळे सेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आता याच आशीवार्दावर महापालिकेवर भगवा फडकवण्याची तयारी सेना करत आहे.

प्रत्येक निवडणुकीत सेनेतील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढत आहे. गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा ही गटबाजी समोर आली. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सेना आक्रमक झाली आहे. पण शहरात दोन गट आहेत. ही गटबाजी सेनेला महागात पडण्याची शक्यता आहे. यामुळे गटबाजी संपवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. गटबाजी संपवण्याऐवजी सध्या आपला गट भक्कम करण्याची स्पर्धा सुरू झाल्याने कार्यकर्ते मात्र अस्वस्थ होत आहेत.

गटबाजी संपविण्याचे प्रयत्न निष्फळ

शिवसेनेतील गटबाजी संपवण्यासाठी संपर्क नेते, संपर्क प्रमुखापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले. काही वेळा दम दिला, कारवाईचा बडगा उगारला, एकमेकांच्या तोंडात साखर घालण्याची नाटकबाजी झाली, पण हे सारे क्षणिक होते, नेत्यांनी कोल्हापूर सोडताच पुन्हा गटबाजीला रंग भरला. नेत्यांमधील गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची मोठी अडचण होत आहे.

गटबाजीचे ग्रहण

सुरेश साळोखे ...रामभाऊ चव्हाण

दिलीप देसाई..सुरेश साळोखे

विनायक साळोखे ..रामभाऊ चव्हाण

संजय पवार .. राजेश क्षीरसागर

विजय देवणे..राजेश क्षीरसागर

मुरलीधर जाधव ...पुंडलिक जाधव

डॉ. रणजित मिणचेकर...मुरलीधर जाधव

विलास उगवे...पुंडलिक जाधव

चंद्रदीप नरके..राजेश क्षीरसागर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळी पावसाने उडवली दैना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोसाट्याचा वारा आणि प्रचंड कडाडणाऱ्या विजांसह शहरात संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने दैना उडवून दिली. सुमारे सव्वा तास झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या तुटून पडल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडीत झाला होता. फ्लेक्स बोर्ड, पत्रे हवेत उडून गेले तर सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. कसबा बावडा येथे स्लॅब कोसळून चौघे जखमी झाले. उमा टॉकीजवळील पेट्रोल पंपाचे छत कोसळले. अग्निशमन दलाकडे झाडे व फांदा पडल्याच्या जवळपास ५० वर तक्रारी आल्याने रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरु होते.

मंगळवारी सकाळपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. सायंकाळी पाचनंतर काळ्या ढगांची गर्दी झाल्याने शहर अंधारून निघाले. सहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाच फूट अंतरावरील दिसत नव्हते. रस्त्यांवरील वाहतूक मंदावली. कार्यालयीन कामकाज संपवून जाणाऱ्या मंडळींची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. पावसापासून बचावासाठी रस्त्याकडेला आडोशाला उभारलेल्या नागरिकांना पावसाने भिजवून काढले. महाव्दार रोड, महापालिका, ताराराणी चौकात फ्लेक्स बोर्ड वीजवाहिन्यांवर पडल्याने शॉर्टसर्किटचा धोका वाढला होता. पण वीज मंडळाने पुरवठा खंडीत केल्याने धोका टळला. नाले व गटर तुंबल्याने अनेक ​रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली.

नागाळा पार्क येथील आदित्य कॉर्नर व सिंचन भवनजवळ मोठे झाड व झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. गंगावेश धोत्री परिसरात घरावर झाड पडले. उमा टॉकीज येथील पेट्रोल पंपावरील पत्र्याचे शेड उडून गेले. तसेच पंपाचे छत कोसळल्याने मोटार सायकलचे नुकसान झाले. कावळा नाका येथील पोलिस चौकीजवळ फ्लेक्स बोर्डाचा सांगाडा वाकून गेला. राजारामपुरी, शाहूपुरी, न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क या परिसरात झाडांच्या फांद्या पडल्याचे चित्र दिसत होते. पाऊस थांबल्यावर अग्निशमन दलाच्यावतीने पडलेली झाडे व तुटलेल्या फांदा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले.

भिंत कोसळून चौघे जखमी

कसबा बावडा आंबेडकर नगर येथे घराची भिंत कोसळून चौघे जखमी झाले. विष्णू सुभाना कांबळे, त्यांची पत्नी उषा, सून सुप्रिया व दोन वर्षाचा नातू जखमी झाले. त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बावडा परिसरातील दत्त मंदिर परिसरात एका घरावर झाड पडले तर पॅव्हेलियन मैदानावर पारायण सोहळ्यासाठी उभारलेला मंडप उखडून निघाला. तरीही बुधवारी पारायण सोहळा होणार असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी बिल होणार ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कच्च्या पावतीच्या माध्यमातून घरफाळा विभागात अफरातफरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासन आता पाणी बिल भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीची सुविधा उपलब्ध करणार आहे. त्याचबरोबर बँकेतही पाणी बिल भरणा करता येणार आहे. पाणीपुरवठा विभागाला यासंदर्भात सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसांत नव्या पद्धतीचा अवलंब करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

पाणीपुरवठा विभागातर्फे सध्या कच्च्या पावतीच्या आधारे (मॅन्युअल) पाणी बिल भरून घेतली जाते. कोल्हापूर शहरात पाच ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा आहे. त्याचबरोबर विभागातील मीटर रीडर प्रभागात बिल आकारणी निश्चित करण्यासाठी गेल्यानंतर तेसुद्धा मॅन्युअल पद्धतीने बिलाचे पैसे भरून घेतात. या व्यतिरिक्त शहरातील काही पतसंस्थांत पाणी बिल भरण्याची सुविधा आहे. महापालिका प्रत्येक बिलामागे एक रुपया क​मिशन संबंधित पतसंस्थांना देते.

नजीकच्या काळात कच्ची पावती (मॅन्युअल) पद्धत बंद करण्यात येणार आहे. पाणी बिलाच्या वसुलीसाठी ऑनलाइन व बँकिंगचा वापर केला जाणार आहे. शिवाय अधिकाधिक पाणी बिलाची वसुली होऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर पडावी म्हणून जाग्यावर बिल (स्पॉट बिलिंग) संकल्पना राबवली जाणार आहे. याकरिता मीटर रीडरकडे हँडहेल्ड मशिन्स दिली जाणार आहेत. हे हँन्डहेल्ड मशिन्सची लिंक महापालिकेच्या सर्व्हरशी जोडली जाणार आहे. यामुळे पाणीपट्टी वसुलीत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी ठराविक बँकेत हँडहेल्ड मशिन्सची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात स्टेट बँक आणि आयडीबीआय या बँकेशी चर्चा सुरू आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे.

पाणीपुरवठा विभागाचे चित्र...

नळ कनेक्शनधारकांची संख्या ९८ हजार

रोज उपसा केले जाणारे पाणी १२० एमएलडी

बिलिंग ८० एमएलडीचे

महिन्याला पाणी बिलातून मिळणारे उत्पन्न साडेचार कोटींपर्यंत

बोगस कनेक्शन, गळती व चोरीमुळे ४० टक्के पाणी वाया

परिणामी ४० टक्के पाण्याचे महसुली उत्पन्न शून्य

'पाणीपट्टी वसुलीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन व बँकिंगमध्ये सुविधा केल्या जाणार आहेत. यासंदर्भात नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत. मॅन्युअल पद्धतीमुळेच घरफाळा विभागात थकीत रकमेत नियमबाह्यपणे सवलत देण्याचा प्रकार घडला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे.'

- आयुक्त पी. शिवशंकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायतींतील कॉम्प्युटर हँगच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कॉम्प्यूटराइज्ड दाखले देण्याची पद्धत सुरू केली आहे. तसेच सर्व व्यवहारही आता कम्प्यूटरवर होऊ लागले आहेत. पण कॉम्प्यूटर हाताळण्यासाठी सरकारनेच नेमलेल्या कॉम्प्यूटर परिचालकांच्या एक एप्रिलपासून सुरू झालेल्या संपामुळे गेला महिनाभरात कॉम्प्यूटर परिचालक ग्रामपंचायतीच्या कार्यालयाकडे फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील १५०० ग्रामपंचायतींपैकी ४३५ ग्रामपंचायतींमध्ये कॉम्प्यूटर परिचालक कार्यरत आहेत. संपाचा फटका ग्रामस्थांना बसू लागला आहे. कॉम्प्यूटर परिचालक संघटना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

सरकारी अध्यादेशाप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस कामकाज करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी राबविण्यास प्रारंभ केला. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून देण्यात येणारे २० प्रकारचे दाखले हे कॉम्प्यूटरवर दिले जातात. त्यामध्ये जन्ममृत्यू, ८ अ चा उतारा, रहिवासी दाखला हे दाखले कॉम्प्यूटर यंत्रणेतूनच दिले जातात. या संपामुळे हे कामही खोळंबले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा कारभारच लेखी सुरू झाला आहे.

ग्रामसेवकांनाच आता ग्रामपंचायतीमध्ये जाऊन कारभार पहावा लागत आहे. दरम्यान, विविध मागण्यांवर सरकारकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही,' असा इशारा कॉम्प्यूटर परिचालक संघटनेचे गोल्डन पवार यांनी दिला आहे. या परिचालकांना वेळेत व पूर्ण वेतन मिळाल्यास सर्व ग्रामपंचायतींचे काम पेपरलेस करण्याच्या सरकारच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल. याची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे.

निम्मेच मानधन मिळते

कॉम्प्यूटर परिचालकांची व्यवस्था करणारी कंपनी सरकारने मान्य केलेल्या आठ हजार मानधनापैकी चार हजार रुपयेच त्यांना देते. काही ठिकाणी तर हे मानधनच दिले जात नाही असे कॉम्प्यूटर परिचालकांचे म्हणणे आहे. सरकारने अनेकदा मागणीकडे दुर्लक्ष केल्यानंतर एक एप्रिलपासून काम बंदचे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ५४९ परिचालक सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरला अवकाळीचा फटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर शहराला मंगळवारी रात्री गारपिट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. गांधीनगर, कर्णिकनगर, नई जिंदगी या भागाला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. यामध्ये एक महिला जखमी झाली व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. गांधीनगर, कर्णिक नगर, नई दुनिया या परिसरांत मोठे वृक्ष उन्मळून पडले. काही घरांची छपरे उडून गेली. वीजेचे खांब वाकले असून, तारा लोंबकळत आहेत. महानगरपालिका व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.

गांधीनगर भाग एक, दोन, तीन आणि सहामध्ये वीजेचे खांब वाकले असून, तारा लोंबकळत आहेत त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही घरांचे पत्रे उडून गेल्यामुळे त्या नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. त्यांना रात्र जागून काढावी लागली. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. घरावरील एक फरशी डोक्यात पडल्याने कल्याणी माने या जखमी झाल्या आहेत. संध्याकाळी वादळ सुटले त्यानंतर मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये कर्णिकनगर भागातील जुने आंब्याचे वृक्ष उन्मळून पडले. अग्निशमन दलाने यंत्रांच्या सहाय्याने झाडे कापून रस्ता मोकळा केला.

भाजपचे नेते प्रा. अशोक निंबर्गी, अविनाश पाटील, नगरसेविका इंदिरा कुडक्याल यांनी एमआयडीसी, कर्णिकनगर, गांधीनगर या भागांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. रामवाडी परिसरातील रेल्वेचा जम्बो मालधक्का असलेला परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. खड्डयांमध्ये पाणी साचले होते. अनेक भागांतील वीज पुरवठा रात्रीपासून खंडित करण्यात आला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून वीज पुरवठा सुरळीत केला.

सांगलीत ६३ मिमि पाऊस

सांगली जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणग्रस्तांच्या वसाहती पडून

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

चिकोत्रा प्रकल्पांतर्गत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या वसाहती वापराविना पडून आहेत. प्रकल्पग्रस्तांचा अंतर्गत वाद आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे २००३ सालापासून कब्जेपट्टीच झाली नसल्याने आता या वसाहतींच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड आणि लूट झाली आहे. चिकोत्रा प्रकल्पाखाली काळम्माबेलेवाडी, कासारी-१ व कासारी २- कागल येथे अशा वसाहती असून त्यांच्या वसाहतींची वाताहत झाली आहे.

सन २००२ - २००३ साली काळम्माबेलेवाडी आणि कासारी येथे रस्त्याकडेलाच या वसाहती ७ कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आल्या. कासारीच्या पूर्वेला साडेसहा आणि पश्चिमेला साडेसात एकर जमीन यासाठी देण्यात आली. एकूण १३४ प्रकल्पग्रस्तांपैकी काहींचे पिंपळगाव (भुदरगड), बेगवडे आणि झुलपेवाडी (आजरा) येथे पुनर्वसन झाले आहे. आठजणांना त्यांच्याच गावात झुलपेवडी पुनर्वसानासाठी जागा उपलब्ध झाली. तर राहिलेल्यांना वडगाव, कासारी, कासारी माळवाडी, हसूर खुर्द, काळम्माबेलेवाडी, सेनापती कापशी, आलाबाद याठिकाणी जमिनी मिळाल्या आहेत. सरकारने ज्या ठिकाणी जमिनी दिल्या त्याचठिकाणी गावठाणचे पुनर्वसन केले.

वसाहतीत सुसज्ज गटारी शाळा, ऐसपैस जागा, स्मशानशेड, डांबरीकरण केलेले रस्ते, स्वतंत्र वीज, जवळच्या गावाला जोडून स्वतंत्र ग्रामपंचायत प्रभाग देण्यात आले. परंतु आज शाळा, स्मशानशेड याठिकाणी पडले असून रस्ता व गटारींची तोडफोड करून इमारतींचा गैरवापर केला जात आहे. इमारतींच्या गैरवापरामुळे त्यांची रयाच गेली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने उभारलेल्या या इमारती वापराविनाच पडून असल्यामुळे सरकारचे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व गर्तेत काही प्रकल्पग्रस्तांनी तिहेरी फायदा घेत जमिनी मिळवल्या, वसाहती उभ्या केल्या आणि राहतात त्याठिकाणीही फायदा मिळवला. तर काहींना वसाहतीच्या आठ किलोमीटर परिघात नियमानुसार जमिनी मिळाल्या आहेत.

योग्य निकष लावावेत

चिकोत्रा धरणग्रस्त कमिटीचे अध्यक्ष सदाशिव पाडेकर म्हणाले, 'पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही प्रकल्पग्रस्तांनी पै पाहुण्यांना व आपल्याला रस्त्याकडेला प्लॉट मिळावा म्हणून प्रयत्न केले. ही बाब लक्षात आल्यावर बाकीचे प्रकल्पग्रस्त भांडायला लागले म्हणूनच ऑर्डर मिळूनही अद्याप कब्जेपट्टी कुणी घेतलेली नाही. निष्पक्षपणे योग्य निकष लावावेत. निकृष्ट कामे सुधारून पडझड दुरुस्त करुन द्यावी आणि राहत्या ठिकाणापासून आठ किलोमीटरच्या परिघात पुनर्वसन व्हावे अशी आपली मागणी आहे.'

या वसाहतींसंदर्भात अभियंते पाठवून सर्व्हे केला जाईल. धरणग्रस्तांची समिती नेमून त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेवून सामंजस्याने हा तिढा सोडवला जाईल. यासाठी प्रकल्पग्रस्तांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

- शैलेश सूर्यवंशी, पुनर्वसन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खूनप्रकरणी चुलतमामाला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शेतजमिनीच्या वादातून भाच्याचा खून करणाऱ्या चुलतमामाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. शिरोळ तालुक्यातील जांभळी येथे ही घटना घडली होती. काकासो तुळसगोंडा पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. जांभळी येथील भरचौकात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली होती.

मंगळवारी सायंकाळी जांभळी येथील बसस्थानक चौकात सुनील आण्णासो पाटील (वय ४५, रा.दत्तनगर शिरोळ) आणि त्याचा चुलतमामा काकासो तुळसगोंडा पाटील व आण्णासो तुळसगोंडा पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यावेळी मारहाण सुरू असतानाच आण्णासो याने भाचा सुनीलच्या छातीवर चाकूने हल्ला केला होता. रूग्णालयात नेताना जखमी सुनीलचा वाटेतच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुनीलचा मुलगा शिवराज याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरोळ पोलिसांनी आण्णासो पाटील व काकासो पाटील यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत जखमी झाल्याने आण्णासो यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी पोलिसांनी काकासो पाटील यास अटक केली. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी शुल्क रखडले

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने व्यावसायिक अभ्यासक्रमातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्कासाठी राज्य विद्यापीठाचा समावेश केला नसल्याने राज्यातील तेरा विद्यापीठात शुल्काचे तीन तेरा वाजले आहेत. यात शिवाजी विद्यापीठातील अभियांत्रिकी आणि एम.बी.ए च्या शंभर विद्यार्थ्यांचे शुल्क रखडले आहे. राज्यातील तेरा विद्यापीठात सात अभ्यासक्रमाच्या सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांची सहा कोटींहून अधिक शिक्षण शुल्क प्रतीक्षेत आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे शुल्क मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागातंर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली. मात्र उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या निर्णयात राज्य विद्यापीठ या शब्दाचा समावेश नसल्याने राज्यातील तेरा विद्यापीठातील विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यात पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत.

शिवाजी विद्यापीठात अभियांत्रिकी आणि एमबीएचे शंभर विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकीची ६४ हजार आणि एमबीएची ५२ हजार शैक्षणिक शुल्क आहे. या विद्यार्थ्यांचे सुमारे ७० लाखांची शुल्क रखडले आहे. या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा सुरु झाली. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन, तीन आणि चार वर्षे कालावधीचा आहे. पहिल्या वर्षांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क मिळाले नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (कॅप) व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेला. मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या एका तांत्रिक चुकीमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्यात गोंधळ उडाला आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत आहे, अशा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना पन्नास टक्के शिक्षण शुल्क देण्यात येते. एआयईईई कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांनाही योजनेचा लाभ होत आहे.

बैठक घेण्याची मागणी

विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठ प्रशासनाने बैठक घ्यावी अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे फलकांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शहरातील विनापरवाना फलकांविरोधात बुधवारी धडक मोहीम राबवून बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज, डिजिटल फलक हटविले. शहरात २०० हून अधिक फलकांवर पोलिस संरक्षणात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कारवाईदरम्यान काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. वाहतुकीस अडथळा आणणारे फलक काढून टाकण्यात आले. कारवाईच्या धडाक्याने अनेक ठिकाणी फेरीवाले, विक्रेत्यांनी स्वतःहून साहित्य काढून घेतले. संबंधित मार्गावरील गाड्या हटविल्या. दसरा चौक परिसरात कारवाई करताना मोठा फौजफाटा दाखल झाल्याने भागातील छोटे विक्रेते, फेरीवाले गोंधळून गेले.

शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा, सत्कार समारंभाचे फलक लावताना महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. फलकांच्या अ​तिक्रमणामुळे शहराचे विद्रूपीकरण होत होते. त्यामुळे आयुक्त पी. शिवशंकर यांनी विनापरवाना जाहिरात फलक, शुभेच्छा फलक हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत कारवाई केली. अतिक्रमण, इस्टेट, विद्युत विभाग, यांत्रिकी विभाग, अग्निशमन दलाचे कर्मचारी अशी संयुक्त मोहीम राबवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच कनिष्ठ अभियंता, मुकादम, मेस्त्री व कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील विविध भागांतील डिजिटल फलक कोसळले होते. त्यामुळे फलक काढताना कर्मचाऱ्यांना अडथळे आले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम सोपे झाले.

हटविलेल्या फलकांची संख्या

हटविलेल्या फलकांची संख्या

गांधी मैदान विभागीय कार्यालय - २९ डिजिटल फलक

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय - १२ फलक

राजारामपुरी विभागीय कार्यालय - २२ डिजिटल फलक, ५२ बॅनर

ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय - २४ डिजिटल फलक, ५५ बॅनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घुणकीजवळ अपघातात मुंबईचे दोघे पोलिस ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे-बेंगळुरू महामार्गावर बंद पडलेल्या मोटारीला ट्रकने मागून धडक दिल्याने दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. तिघे पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. कोल्हापूरजवळील घुणकी येथे ही दुर्घटना घडली. राजू बाळू सोनवणे (वय ४२, रा. साई अशिष अपार्टमेंट, न्यू पनवेल, नवी मुंबई) व अब्दुल रशीद महमंद शेख (४२, रा. ओम आदर्श हौसिंग सोसायटी, बीएमसी कॉलनी, देवनार, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

जखमींमध्ये संदीप रावजी घोडे (४०, रा. चेंबूर), बिरदेव बाबासाहेब शिंदे (४२, नवनिवारा हाउसिंग सोसायटी, नेरूळ), रवींद्र विनायक केळकर (४७, रा. पंतनगर, घाटकोपर) यांचा समावेश आहे. मयत व जखमी चेंबूर येथील सीआयडी कर्मचारी होते. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. ट्रकचालक कल्लाप्पा रामाप्पा कुट्टी (२९, रा. बोरगु, ता. खानापूर, जि. बेळगाव) याला पेठ वडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा बुधवारी कोल्हापुरातील तपोवन परिसरात विवाह होता. मंगळवारी रात्री सर्वजण मोटारीने वाशीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ सात्ताप्पा पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोहर रामचंद्र भंडारी यांच्यासह कोल्हापुरात येत होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास इस्लामपूर पेठ नाक्यावर बॅटरी कमी झाल्याने मोटार बंद पडली. एका ट्रकचालकाच्या मदतीने मोटार सुरू करुन ती घुणकीर्पंत आणण्यात आली. तेथे मोटार पुन्हा बंद पडली. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी कोल्हापुरातील नातेवाईकांशी संपर्क साधून कार मेकॅनिकबद्दल चौकशी केली. त्यांनी एका पेट्रोल पंपाचा पत्ता दिला. त्यानंतर रघुनाथ पाटील यांनी मोटारसायकलस्वाराला पेट्रोल पंपावर सोडण्याची विनंती केली. जाण्यापूर्वी त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना चहा घेण्याचा सल्ला दिला. याचदरम्यान ओव्हरलोड ट्रकने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलबाबत निश्चित दिलासा देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही कोल्हापूरच्या जनतेला टोलमुक्ती देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूरकरांना टोलसंदर्भात जास्तीचा दिलासा ‌दिला जाईल,' असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना दिले. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या बैठकीत शिंदे यांनी हे आश्वासन दिले. बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, 'शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी कोल्हापुरातील टोल रद्दचे आश्वासन दिले होते. मी कोल्हापुरात जात आहे, हे समजल्यानंतर ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनतेशी बोला आणि शब्द पूर्ण करा, अशी सूचना केली. टोलसंदर्भात कायमस्वरुपी न्याय देण्यात येईल. सरकार काही दिवसातच अंतिम निर्णय घेईल. आम्ही चांगला निर्णय घेऊ आणि कोल्हापूरला नक्कीच जास्तीचा दिलासा दिला जाईल.'

टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी टोलविरोधी आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले, 'वैयक्तिक स्वार्थासाठी हा प्रकल्प कोल्हापूरवर लादला आहे. खासगीकरणातून प्रकल्प राबविण्याचस सुरुवातीपासूनच विरोध होता. रस्त्यांचे पुनर्मूल्यांकन जनतानिष्ट झाले पाहिजे. तसेच टोलमुक्ती करताना महापालिकेला कर्ज न देता सरकारने ती जबाबदारी उचलावी. कारण कर्ज दिल्यास त्याचा बोजा अगदी सायकल नसलेल्या नागरिकावरही पडेल.'

पुनर्मूल्यांकन समितीचे सदस्य आर्किटेक्ट राजू सावंत म्हणाले, 'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आवश्यक ते नकाशे वेळेवर मिळत नाहीत. कन्सल्टिंग कंपनी म्हणून काम केलेल्या सोविल कंपनीला पुनर्मूल्यांकनाच्या कामात सहभागी करून घेणे आवश्यक आहे. पुनर्मूल्यांकन करताना अपूर्ण कामांचाही विचार करावा लागणार आहे. ' यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, शिवाजीराव जाधव, बाबा पार्टे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळवाने शहरात प्रचंड नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात प्रचंड वादळी वा ऱ्यासह बुधवारी पडलेल्या पावसामुळे प्रचंड पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. फांद्या वीजव‌ाहिन्यांवर पडल्यामुळे अर्धे शहर अंधारात आहे. वाहतुकीच्या मार्गावर कोसळलेले १९ वृक्ष महापालिका अग्निशमन दलाने हटवले. मोठ्या संख्येने तुटून पडलेल्या फांद्या हटवण्याचे काम दिवससभर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व उद्यान विभागाच्यावतीने सुरू होते. गुरूवारीही फांद्या हटवण्याचे काम सुरू राहणार आहे. उमा टॉकीज येथील पेट्रोल पंपाचे छप कोसळून चार लाखांचे नुकसान झाले. ताराबाई पार्क येथे प्रॉव्हिडंट ऑफीसजवळ रिक्षावर झाड पडल्याने ३० हजाराचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाच्या जवानांनी १९ ठिकाणी पडलेले वृक्ष हटवले. सार्वजनिक बांधकाम विभाग व उद्यान खात्याकडील काम संथ गतीने सुरू होते. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर फांद्या पडल्याचे चित्र दिसत होते. शहरातील उंच इमारतीवरील धोकादायक जाहिरात फलकाचीही वाताहत झाली होती. अनेक ठिकाणी फाटलेले फ्लेक्स बोर्ड वीजवाहिन्यांवर लोंबकळत होते. नागाळा पार्क व ताराबाई पार्क परिसरात सर्वाधिक फांद्या तुटून पडल्या आहेत. नागरिकांनी तुटलेल्या फांदा सरपणासाठी नेल्याने महापालिकेला मदत झाली.

अर्धे शहर १६ तास अंधारात

जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्धे शहर १६ तास अंधारात होते. बुधवारी संध्याकाळपर्यंत अनेक भागातील विजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नव्हता. जिल्ह्यात विजेचे सुमारे १०२ खांब पडल्यामुळे अनेक भागातील पुरवठा विस्कळीत झाला. शहर परिसरात सर्वांत जास्त नुकसान झाले असून महावितरणचे ३६ खांब पडले आहेत. १ ट्रान्सफार्मर पडला असून १ निकामी झाला आहे. गडहिंग्लज विभागात १४ खांब पडले असून ३ किलोमीटरची वीजवाहिनी खराब झाली आहे.

जिल्ह्यात ३८ घरांची पडझड

बुधवारच्या वळवाने जिल्ह्यात ३८ घरांची पडझड झाली. त्यात आठ लाख ५२ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त फटका शाहूवाडी तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील ३२ घरांचे नुकसान झाले. शेती व फळझाडांच्या नुकसानीचा यात समावेश नाही. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड या तालुक्यांलाच मोठा फटका बसला. करवीरमध्ये तीन, पन्हाळ्यात दोन, भुदरगडमध्ये एक तर शाहूवाडीत ३२ घरांचे नुकसान झाले. शाहूवाडीत ३२ घरांच्या पडझडीमधून सहा लाख ४० हजाराचे नुकसान झाले. पण भुदरगडमधील एकाच घराच्या पडझडीतून एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळाचा गोडवा घटला

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

नैसर्गिक गोडवा असलेल्या आणि सर्वांत मोठी गुळाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरी गुळाला विविध कारणांचा फटका बसला आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा सव्वा लाख क्विंटल गुळाची आवक कमी झाली आहे. आवक घटल्यामुळे तब्बल ४५ कोटी रुपयांची उलाढाल कमी झाली आहे. दरवर्षी उलाढाल घटत असल्याने कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नातील गोडवाही कमी होत चालला आहे.

प्रशिक्षित गुळवे आणि जमिनीला लाभलेल्या नैसर्गिक गुणवत्तेमुळे येथील गुळाला गोडवा प्राप्त झाला आहे. यामुळे कोल्हापुरी गुळाने देशातील महत्त्वाच्या बाजारपेठा काबीज केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षित गुळव्यांची घटलेली संख्या, उत्पादनावरील वाढलेला खर्च, मजुरांचा तुटवडा यामुळे दिवसेंदिवस गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. याचा फटका गूळ उत्पादनावर झाला आहे. गतवर्षी बाजार समितीमध्ये सात लाख ६५ हजार २६४ क्विंटल गुळाची आवक झाली होती. यातून २२१ कोटी ९८ लाख २६ हजार रुपयांची उलाढाल झाली होती, तर यावर्षी सहा लाख ३२ हजार ८६ क्विंटल गुळाची आवक होऊन तब्बल एक लाख ३३ हजार १७८ क्विंटल गुळाची आवक कमी झाली आहे. यामधून १७६ कोटी ९८ लाख ४३ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. गतवर्षीपेक्षा ४५ कोटी, तर २०१२-१३ मधील ७६ कोटींची उलाढाल कमी झाली आहे. दरवर्षी गुळामधील उलाढाल कमी होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नातही घट होत आहे.

कोल्हापुरातील गुळाला मिळालेल्या नैसर्गिक गोडव्यामुळे राज्याबरोबर गुजरात, राजस्थान येथील बाजारपेठा काबीज केल्या आहेत. मात्र, दरवर्षी गुळाचे उत्पादन घटत गेल्यास हक्काची बाजारपेठ गमावण्याची शक्यता आहे. एकीकडे उत्पादन कमी होत असताना कोल्हापूरच्या नावाने इतर जिल्ह्यांतील व राज्यांतील गुळाची विक्री होऊ लागली आहे. अशा गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी समितीने जीआय प्रमाणपत्रही मिळवले. मात्र, या आधारावर गूळ उत्पादन घेण्यासाठी फारसा प्रयत्न न झाल्याचाही फटका बसला आहे.

गतवर्षी शेती प्रक्रिया केलेल्या उत्पादनावरील बाजार समितींचे नियमन रद्द केल्याने गुळाच्या पट्टीबाबत उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यावर समितीने व्यापारी व उत्पादकांमध्ये समन्वय तोडगा काढला. मात्र, तरीही उत्पादनात फारसी वाढ झाली नाही. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये ४२०० रुपयांचा दर निघाल्यानंतर संपूर्ण हंगामात किती दर मिळेल याचे अडाखे उत्पादकांनी बांधल्यामुळे अनेक उत्पादकांनी गुऱ्हाळ घरांकडे पाठ फिरवल्याचाही परिणाम गूळ उत्पादनावर झाला. त्यातच नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये पडलेल्या पावसामुळे अनेक दिवस गुऱ्हाळ घरे बंद ठेवावी लागली होती. याचाही फटका बसला असला, तरी समितीकडे एक हजार गुऱ्हाळ घरांची नोंद असताना त्यापैकी केवळ ४०० गुऱ्हाळघरे पूर्णक्षमतेने सुरू होती. दिवसेंदिवस घटत जाणारी गुऱ्हाळ घरांची संख्याही गूळ उत्पादनावर परिणाम करत आहे.

असोसिएशनचे प्रयत्न अपुरे

गूळ उत्पादक असो.ने गुजरातमध्ये मार्केटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. काही व्यापाऱ्यांशी संपर्क साधला होता. मात्र त्यानंतर या प्रयत्नाला फारसे यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साडेचारशेवर वटवाघळांना जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुसळधार पावसामुळे टाउन हॉल उद्यानातील मोठ्या वृक्षाची फांदी पडून त्या खाली दबलेल्या साडेचारशे वटवाघळांना जीवदान दिले. मॉर्निंग वॉकला येणारे नागरिक, अग्निशमन दलाचे जवान, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी बुधवारी सकाळी तब्बल दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवले.

टाउन हॉल उद्यानात वटवाघळांची कॉलनी असून मंगळवारी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे एका झाडाची मोठी फांदी पडली होती. जमिनीवर पडलेल्या फांदीला वटवाघळे गच्च धरून होती. बुधवारी सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही घटना आली. वटवाघळांवर हल्ला करणाऱ्या भटक्या कुत्र्यांना नागरिकांनी पिटाळून लावले. वटवाघळे जमिनीवर पडल्याची माहिती परिसरात कळताच वटवाघळे पकडून नेण्यासाठी काही नागरिक पोती घेऊन आली होती. काही जागरूक नागरिकांनी अग्निशमन दलाला ही घटना कळवली. मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मनीष रणभिसे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड व त्यांचे सहकारी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. वटवाघळांना दिवसा दिसत नसल्याने ते फांदीला घट्ट धरून होते. त्यांचा चावा जीवघेणा असल्याने ज्या फांदीवर वटवाघूळ आहे ती छोटी फांदी तोडण्याचा निर्णय घेतला. तोडलेली फांदी झाडाच्या खोडाजवळ नेल्यावर वटवाघळे चढून झाडाच्या शेंड्यावर जाऊ लागली. दोन तास ही मोहीम राबवली. झाडाखाली दबून मेलेली ७५ वटवाघळे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी रितसर पंचनामा करून पुरून टाकण्यात आली.

सहा पिल्ली मातेला चिकटून

बचाव मोहिमेत सहा वटवाघळे मेलेली असली तरी कुशीत त्यांची पिले जिवंत होती. या पिलांनी मातेला घट्ट धरले होते तर आईने पंखाखाली धरून त्यांना जीव वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जैववैविधता मंडळ स्थापनेकडे दुर्लक्ष

महापालिकेला जैववैविधता मंडळ स्थापन करावे, अशी मागणी पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. पण महापालिका दुर्लक्ष करत आहे. टाउन हॉलमधील घटना लक्षात घेता हे मंडळ स्थापन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा घटनेत बचावकार्यासाठी मंडळ उपयुक्त ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलचरांना वाढला धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी, तेथे टाकण्यात येणारा केरकचरा, प्लास्टिक पिशव्या आणि परताळा परिसरातील वाढीव बांधकाम अशा ​विविध घटकांमुळे रंकाळा तलावातील जलचरांना धोका वाढला आहे. बुधवारी तलावातील मासे मोठ्या संख्येने मृत पावल्यानंतर प्रादे​शिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने तलावातील पाण्याचे व तीन नाल्यातील सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. ते चिपळूण येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. इराणी खणीतील कचरा काढल्यानंतर सगळा कचरा अन्यत्र हलविण्यात आला नव्हता. पावसाने तो कचरा तलावात वाहून आल्याने पाणी आणखीनच प्रदूषित झाले. शिवाय संध्यामठ आणि तांबट कमान परिसरात ब्ल्यू ग्रीन अल्गीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या भागात मासे मृत्यूमुखी पडल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नाले आणि तलावाच्या पाण्याचे नमुने

उप प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्र अ​धिकारी वर्षा कदम म्हणाल्या, 'शाम सोसायटीकडील नाला पावसामुळे ओव्हर फ्लो झाल्याच्या खुणा आढळल्या असून त्याची नोंद करण्यात आली आहे. सरनाईक वसाहत, देशमुख हॉल आणि शाम सोसायटीकडून वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. पावसामुळे सर्वच नाले ओव्हर फ्लो होऊन सांडपाणी नदीत मिसळले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय इराणी खणीकडे तलावाच्या बाजूने संरक्षक भिंत नाही. या भागाकडून केर कचरा, घाण तलावात वाहून आले आहे. तीन नाल्यासह, तलावातील पाण्याचे नमुने चिपळूण येथे तपासणीसाठी पाठवले आहेत. लवकर अहवाल द्यायला सांगितले आहे.'

कारण तकलादू

तलावात सध्या बोटी फिरत आहेत. पाण्यातील ऑक्सीजन कमी होणे हे काम ठोस कारण नव्हे, असे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितले. इराणी खणीच्या परिसरात गाळ टाकला होता. पावसामुळे लिचेट तयार होऊन रंकाळ्यात मिसळले आहे. अशा प्रकारची तक्रार यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडे केली आहे. नियंत्रण मंडळाने फक्त पंचनामे केले, अहवाल सादर केले. कारवाई कुठली केली नाही. महापालिकेचे उप अभियंता व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी हे दोघे कारणीभूत आहेत, असे ते म्हणाले.

रिपोर्टची जबाबदारी कुणाची?

माशांचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे समजण्यासाठी विच्छेदन अहवाल महत्वाचा आहे. मात्र विच्छेदन करायची नेमकी जबाबदारी कुणाची हे स्पष्ट होत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मस्त्यबीज कार्यालय हे दोघेही ही जबाबदारी परस्परावर ढकलत आहेत. क्षेत्र अ​धिकारी कदम म्हणाल्या, मृत माशांचा विच्छेदन करण्याची जबाबदारी मत्स्त्य विभागाची आहे. त्यानुसार मस्त्यबीज कार्यालयातील सहायक अधिकारी हेमंत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. मत्स्य बीज कार्यालयाकडे सुविधा नाहीत, असे उत्तर दिले. मासे खराब झाल्यामुळे आणि ​उशीर झाल्याने विच्छेदन करून नेमके कारण समजू शकणार नाही असे त्यांनी सांगितले.

दोनशे लिटरच्या सहा बकेटस भरल्या

तलावात १२ ते १६ सेंटीमीटर लांबीचे हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते. महापालिकेचे कर्मचारी सकाळपासून मासे गोळा करत होते. २०० लिटरच्या सहा बकेटस दुपारपर्यंत भरल्या होत्या. यावरून प्रदूषणाची तीव्रता लक्षात येते. दुपारी बारापर्यंत चाळीस कर्मचारी साफसफाई करत होते. पर्यावरण कक्ष अधिकारी आर. के. पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी दिलीप पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्र अधिकारी वर्षा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माशांची संख्या लक्षात घेऊन दुपारनंतर विविध प्रभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना संध्यामठ येथे बोलावून स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यावर 'प्राण' संकट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दूषित पाण्यामुळे रंकाळ्यावर 'प्राण'संकट ओढवले आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने बुधवारी तलावात मृत माशांचा खच पडला होता. महापालिका कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने हे मासे बाहेर काढले.

तांबट कमान, संध्यामठ परिसरात माशांचा खच पडला होता. बुधवारी सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. सकाळी आठच्या सुमारास महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाट्या, बादल्या घेऊन मासे गोळा करण्यास सुरुवात केली. मात्र, मृत माशांची संख्या मोठी असल्याने निदर्शनास येताच विविध भागांतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संध्यामठ येथे बोलावण्यात आले. तलावाच्या कडेला असेले मासे गोळा करण्यात अडचणी आल्या नाहीत. मात्र, आतील भागातील मासे कडेला आणण्यासाठी भोई समाजातील काही नागरिकांची मदत घेण्यात आली.

दूषित पाण्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे श्याम सोसायटी, सरनाईक वसाहतीकडून येणारे सांडपाणी तलावात मिसळल्यामुळे जलचरांना धोका वाढल्याचेही अधिकारी म्हणाले.

मंगळवारी झालेल्या पावसामुळे भरून वाहिलेल्या नाल्यांद्वारे दूषित पाणी रंकाळ्यात मिसळले. संध्यामठ परिसरात खाडीसारखा भाग तयार झाला आहे. तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले असून, या परिसरातच मासे मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे. तलावातील पाणी पावणेसात फुटांनी कमी झाले आहे. खालावलेली पातळी, अचानक झालेल्या पावसामुळे संध्यामठ परिसरात एकवटलेले दूषित घटक यामुळे मासे मरण पावले असावेत.

- आर. के. पाटील, पर्यावरण कक्ष प्रमुख, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांची कामे असमाधानकारक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकात्मिक रस्ते प्रकल्पांतर्गत शहरात झालेली रस्त्यांची कामे असमाधानकारक आहेत. हा प्रकार गंभीर आहे,' असे निरीक्षण सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना नोंदवले. शिंदे यांनी बुधवारी बैठक घेऊन प्रकल्पासंबंधी चर्चा केली.

बैठकीनंतर शिंदे यांनी दोन ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आमदार क्ष‌ीरसागर आणि महापालिकेचे अधिकारी होते. धैर्यप्रसाद हॉलजवळ असलेल्या एका बंगल्याच्या जोत्यापेक्षा रस्त्याची उंची जास्त असल्याचे क्षीरसागर यांनी दाखवले. फाळके आय हॉस्पिटलच्या वळणावर फुटपाथची आणि गटारीची अपुरी कामे त्यांनी पाहिली.

दरम्यान, शहरातील रस्त्यांवरील टोलसंदर्भात मेअखेरपर्यंत सरकार निर्णय घेणार असून, फेरमूल्यांकन समितीने १५ दिवसांत अहवाल सादर करावा असा आदेशही शिंदे यांनी दिला. अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी सोविललाही सहभागी करून घेण्याचे आदेश त्यांनी दिले. याच अनुषंगाने शुक्रवारी (८ मे) महाराष्ट्र राज्य ‌रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांसोबत पुण्यात बैठक घेण्यात येणार आहे. शिंदे यांनी विश्रामगृहावर आमदार राजेश क्षीरसागर, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, समिती सदस्य राजू सावंत, आर्किटेक्ट आणि इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे, टोलविरोधी समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासमवेत चर्चा केली. सावंत यांनी मूल्यांकन करत असताना एमएसआरडीसीकडून आवश्यक नकाशे उलपब्ध नसल्याचे सांगण्यात आले. महा‌पालिकेच्या पातळीवरही योग्य सहकार्य मिळत नसल्याचे काहींनी निदर्शनास आणून दिले. यावर शिंदे यांनी 'एमएसआरडीसी'चे अध्यक्ष संतोष कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली.

'एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी बैठक घेऊन सर्व नकाशे आणि अानुषंगिक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील,' असे शिंदे यांनी सांगितले. बैठकीनंतर आयुक्तांनी तातडीने सर्व्हेअर उलपब्ध करून देण्याच्या सूचना सरनोबत यांना दिल्या. '१५ मेपर्यंत सर्व्हेअर फेरमूल्यांकनासाठी काम करतील,' असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे झाली आहेत, पण त्यांचा उपयोग होत नाही असे दिसते. युटिलिटी शिफ्टिंग करावे लागू नये म्हणून भर टाकून जमिनीची उंची वाढवून रस्त्यांची कामे केली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पाणी घरांमध्ये जात आहे.

- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हसन मुश्रीफ यांचे निर्विवाद वर्चस्व

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

जिल्हा बँकेत कागल तालुक्यातून आमदार हसन मुश्रीफ यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले.पारंपारिक प्रतिस्पर्धी संजय घाटगे गटाचे केवळ एकच दत्ता वालावलकर हे उमेदवार आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात उभे होते. राजे गट, मंडलिक आणि मुश्रीफ गट मनापासून एकत्र झाल्याने त्यांना केवळ १७ मतांवर समाधान मानावे लागले. मुश्रीफांनी १४४ मतांनी विजय मिळवला.

सत्तेत असल्याशिवाय कुणी विचारीत नाही शिवाय कार्यकर्त्यांशी संपर्काला मोठे माध्यम रहाते या तत्वानुसार विरोधाला विरोध करण्यापेक्षा मिळतेजुळते घेवून सत्तेत जाण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न अशा दृष्टीनेच या निवडणुकीकडे पहावे लागेल. संजय मंडलिक यांनी मुश्रीफांच्या बरोबर महाआघाडीत जाऊन लढताना ४३२ चे मताधिक्क्य घेवून आपल्या गटाकडे सत्ता ठेवण्यात यश मिळवले. तर राजे गट २५, मंडलिक ४० आणि आपल्या ७५ संस्था एकत्र करुन मुश्रीफांनी एकतर्फी विजय प्राप्त केलाच शिवाय आपले सरसेनापती भैय्या माने यांचे दुध उत्पादक आणि इतर संस्थामधून तब्बल ८९८ मताधिक्क्यांनी संचालकपद मिळवले. महाडिक आणि संजय घाटगे गटाच्या मदतीवर कसबा सांगाव येथील अनिल पाटील यांनी पतसंस्था व बँका गटामधून मिळवलेला निसटता चार मतांचा विजय निश्चितच दखल घ्यायला लावणारा आहे.

लोकसभा, विधानसभा आणि 'गोकुळ' च्या निवडणुकीत संजय मंडलिक आणि संजय घाटगे एकत्र होते. तर बँकेच्या निवडणुकीत मंडलिक-मुश्रीफ गट एकत्र आले. त्यांना तेवढ्याच ताकदीने समरजितसिंह घाटगे गटाची साथ मिळाली. संजय घाटगे गट एकाकी पडला. कुणी कितीही गट बदलूदेत नेते सांगतील ते कार्यकर्ते ऐकतात हे यादेखील निवडणूकीतून दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images