Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहू समाधीचे काम ‘ग्रीन झोन’बदलानंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू समाधीस्थळ विकसित करण्यासंदर्भात महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत शाहू समाधीस्थळ विकसित करण्यासाठी ग्रीन झोन बदलण्याबाबतचा प्रस्तावाला येत्या महासभेत मान्यता घेऊन सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी सभापती आदिल फरास अध्यक्षस्थानी होते. सरकारकडून झोन बदलण्यासंदर्भातील परवानगी मिळताच तातडीने समाधीस्थळ विकसित करण्याच्या सूचना सभापती फरास यांनी केल्या. आयुक्त पी. शिव शंकर उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांची समाधी ही नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृति मंदिर परिसरात व्हावी असा उल्लेख त्यांच्या मृत्यूपत्रात केला होता. महापालिकेने नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे.

नर्सरी बागेतील जागा ही शाहू चॅरिटेबल ट्रस्टची आहे. या संदर्भात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याशी चर्चा करून समाधीस्थळ विकसित करण्यात येईल, असे सभापती फरास यांनी सां​गितले. सभापती फरास यांनी समाधीस्थळ विकसित करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

बैठकीत कळंबा येथील ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत समाजाकरिता दफनभूमी व हिंदू समाजाच्या स्मशानभूमीकरिता आरक्षित जागेची आयुक्तांसोबत पाहणी करण्याचे ठरले. जागेची पाहणी करून पर्यायी रस्ते करण्याच्या सूचना करण्यात आल्या. उपायुक्त विजय खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूलभूत सुविधा नाहीत, करांचाच बोजा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कारभारामुळे शहरवासियांना असुविधांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करून हद्दवाढीत येण्यास उत्सुक नसलेल्या हद्दीवरील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. या गावांचे वेगाने नागरीकरण होत असल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. कळंबा सोडल्यास पाचगाव, उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी या गावांत पाण्याचा प्रश्न आहे. कचरा व सांडपाणी विल्हेवाटीचा मुद्दा नाही. तरीही केवळ करांची भीती व शेतजमिनींवरील आरक्षणे यामुळे ही असुविधा वागवण्याची मानसिकता येथील ग्रामस्थांत दिसते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सकारात्मक पावले उचलली, तर ही परिस्थिती नक्कीच बदलायला मदत होणार आहे.

शहराच्या हद्दीवरील पाच ते सहा गावांचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या शिष्टमंडळाला केली होती. त्यानुसार उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा या प्रमुख आणि मोठ्या गावांची हद्दवाढीत समावेशाची जास्त शक्यता आहे. या गावांमधून हद्दवाढीला थेट विरोध झाला. महापालिका नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही, तर नवीन येणाऱ्या गावांना काय देणार? असा सवाल ग्रामस्थ करतात. त्या पार्श्वभूमीवर या गावांमधील सुविधांची पाहणी केल्यानंतर कळंब्याचा अपवाद सोडल्यास सर्वत्र पाण्याचाच प्रश्न महत्त्वाचा आहे. उचगावसारख्या मोठ्या गावात दोन दिवसांनी २० मिनिटे पाणी मिळते. सरनोबतवाडीत तर कचऱ्याचा उठाव वर्षभरातून एकदा होतो. उचगावात कचऱ्यावर प्रक्रियेची तयारी सुरू आहे, पण अन्यत्र अजून जागेचाच पत्ता नाही. त्यामुळे गायरान, जे खड्डा वा विहीर बुजवण्यास परवानगी देतील तिथे कचरा टाकून मातीखाली घातला जातो. सांडपाणी निर्गत म्हणजे गटार काढून पुढे ओढ्यात किंवा खणीमध्ये सोडणे ही परिस्थिती आहे.

मूलभूत सुविधांची आबाळ आत्तापासून सुरू आहे. केवळ करांचा बोजा वाढणार व तरीही सुविधा मिळणार नाहीत. महापालिकेतील कारभारी जमिनी लाटतील, ही भीती ग्रामस्थांना महापालिकेच्या हद्दीत जाण्यापासून परावृत्त करीत आहे. यासाठी या ग्रामस्थांना महापालिकेच्यावतीने विश्वास देण्याची आवश्यकता आहे. पाचगावसारख्या गावातील पाणीपुरवठ्याची बिले महापालिका वसूल करते. तिथे पाणीपुरवठा सुरळीत करुन हद्दवाढीच्यादिशेने सकारात्मक पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

बैलगाडी व घोडागाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी यासाठी तालुक्यातील बैलजोडी हौशी संघटनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार शिवाजी गुरव यांच्याकडे देण्यात आले.

मार्केटयार्डपासून सुरु झालेला मोर्चा शहरातील मुख्यमार्गावरून बैल, घोडा व एक्कागाडी घेवून पारंपारिक वाद्यांसह घोषणाबाजी करीत प्रांत कार्यालयावर दाखल झाले. मोर्चात बैलगाडी व घोडागाडींचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी प्रांत कार्यालयावर झालेल्या सभेला पंचायत समितीचे सदस्य अमर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

निवेदनात म्हटले आहे, राज्यातील ८० टक्के शेतकरी बांधवांच्या घरी बैलजोड्या व गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आहेत. राज्यात बेंदूर या सणदिवशी बैलजोडीचे पूजन करून मिरवणूक काढून सार्वजनिक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रम परंपरागतरित्या केला जातो. सध्या औद्योगिकरणामुळे शेती मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. परंतु आजही बहुतांश शेतकरी बैलजोडीचा वापर नांगरटीसाठी तसेच ऊसवाहतुकीसाठी करतात. घरात बैलजोडी असणे ही खरी संपत्ती मानून शेतकरी त्याचा अभिमान बाळगतो. खेडोपाडी लग्नसराईत व यात्रा कालावधीत केवळ करमणूक म्हणून बैलजोडी शर्यत व घोडागाडी शर्यत आदी जनावरांच्या स्पर्धा सातत्याने घेत आलो आहोत.

या स्पर्धेदरम्यान शेतकऱ्यांकडून जनावरांना कोणतीही इजा होत नाही. शेतकरी आपली जनावरे मुलांप्रमाणेच सांभाळतात. त्यामुळे त्यांना इजा करण्याचा प्रश्नच येत नाही. याप्रश्नी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत. या विषयाचा विचार करून बंदी उठवावी व शर्यतीस परवानगी द्यावी. यावेळी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, शिवाजी कुराडे, आप्पासाहेब कडोली, बाबासाहेब मोरे, शैलेश देसाई, तानाजी होडगे आदींसह बैलजोडी हौशी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणीप्रश्नी विरोधक कोर्टात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज शहराच्या सांडपाण्याचा विषय नव्या वळणावर येऊन ठेपला असून संबंधित ठेकेदार लक्ष्मण शिंदे हे विद्यमान नगरसेविकेचे बंधू आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकानेच ठेका घेतला असल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी मागणी करीत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. बुधवारी पालिकेच्या सभागृहात निकडीची सभा आयोजित करण्यात आली. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे अध्यक्षस्थानी होत्या.

शहरातील सांडपाण्यासंदर्भात 'मटा'ने मालिका लावल्याचे पडसाद सभागृहात उमटले. नरेंद्र भद्रापुर यांनी बऱ्याच कालावधीनंतर सांडपाणी उपसा सुरु केल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन केले. मात्र गाळ काढणे ही ठेकेदाराची जबाबदारी असताना पालिकेची वाहने त्यांच्या दिमतीला का देण्यात आली असा सवाल केला. त्यावर अध्यक्षांनी यात्रा डोळ्यासमोर ठेऊन मदत केल्याचे सांगितले. मात्र त्यांची रितसर पावती केली असे निदर्शनास आणून दिले.

त्याबाबत भद्रापूर यांनी सखोल चौकशी केली असता नऊ ट्रीपसाठी फक्त चारशे रुपयांची पावती केल्याचे निदर्शनास आले. ही बनवाबनवी लक्षात येताच स्वाती कोरी यांनी सभागृहाची दिशाभूल करू नका सभागृहासमोर जबाबदारीने व योग्य उत्तरे द्या असे सुनावले.

यानंतर कोरी यांनी मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्याकडे यासंदर्भातील कारवाईच्या लेखीपत्राची मागणी केली. तसेच न्यायालय व जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल करणार असल्याचे सांगितले. सभेच्या सुरवातीलाच भद्रापूर यांनी मुख्याधिकाऱ्यांना निकडीच्या सभेचे प्रयोजन विचारले. यावर नरळे यांनी अत्यावश्यक व तत्काळ विषयांसाठी बोलाविण्यात आलेली सभा म्हणजे निकडीची सभा असे स्पष्टीकरण दिले. लगेच विरोधकांनी अध्यक्षांना टार्गेट करत महिन्यापूर्वी घेतलेल्या टेंडरसह पन्नास विषय निकडीच्या सभेत कसे असा सवाल केला. यावर सभागृह निरुत्तर झाले. त्यामुळे भडकलेल्या भद्रापूर यांनी सत्ताधाऱ्यांनी समाजाची व लोकप्रतिनिधींची चेष्टा सुरु केली आहे असा आरोप केला. शहरात सुरू असलेल्या विकासकामासंदर्भात विषय सुरु असताना सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी झाली. शेवटी विषय टोकापर्यंत गेला. यावर कोरी यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून मी या विषयांच्या मुळापर्यंत गेल्यास सभागृहातून पळून जायची वेळ येईल असे सुनावले. यावर सत्ताधारी गटांत शांतता पसरली.

२८०० रुपयांचा एलईडी १०७०० रुपयांना

एलईडी दिवा खरेदीसंदर्भात विषय सभागृहासमोर येताच बाजारात २८०० रुपयांना मिळणारा सर्वोत्तम कंपनीचा दिवा तुम्ही १०७०० इतक्या मोठ्या रकमेला घेता. वरच्या ७००० मध्ये कुणाकुणाच्या वाटण्या आहेत असा सवाल करीत भद्रापुरे यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. भ्रष्टाचाराने बरबटलेली ही नगरपालिका लाचलुचपतच्या रडारवर पहिल्या क्रमांकवर आहे असे सांगताच हारुण सय्यद यांनी त्याला आक्षेप घेतला व सभागृहात लाचलुचपतचा विषय येणे चुकीचे असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’चे पेटले रण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते 'गोकुळ'च्या लोण्यासाठी मात्र एकत्र आले आहेत. शह काटशह देत 'गोकुळ'च्या नेत्यांनी बुधवारी पॅनेल जाहीर केले. यामध्ये संजय घाटगे आणि दिनकर कांबळे यांचा पत्ता कापण्यात आला. तर, राजेश नरसिंग पाटील, उदय निवासराव पाटील, सदानंद हत्तरगी, बाळासाहेब खाडे, विलास कांबळे आणि जयश्री पाटील चुयेकर या सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राजाराम साखर कारखान्यात ११ नवे चेहरे आले. तर, जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सतेज पाटील यांच्यासह ३९८ जणांनी अर्ज दाखल केले. सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी या नावाने पॅनेल जाहीर केले. यामध्ये अंबरीश घाटगे, भूषण पाटील, संजीवनीदेवी गायकवाड, चंद्रकांत बोंद्रे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या निमित्ताने निवडणुकीचे रण चांगलेच पेटल्याचे बुधवारी दिसून आले.

'गोकुळ'सह राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा महाडिक आणि सतेज पाटील गट आमनेसामने ठाकणार आहेत. बुधवारी 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांच्या बैठका तर वगळेल्यांना आपल्याकडे कसे खेचायचे यासाठी विरोधकांची फिल्डिंग यामुळे दिवसभर चर्चांच्या फैरी झडल्या. 'गोकुळ'च्या सत्ताधारी गटात आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार नरसिंग पाटील, बजरंग देसाई, के. पी. पाटील, गोपाळराव पाटील, विक्रमसिंह घाटगे असे मातब्बर नेते एकत्र आहेत. सतेज पाटील यांच्या गटात माजी मंत्री विनय कोरे, संजय मंडलिक, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. चंद्रदीप नरके यांची एका कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे. सतेज पाटील यांच्याकडून ती पूर्ण झाली तर चंद्रदीप नरके हेही पाटील यांच्या मदतीला येऊ शकतात.

राजारामचे पॅनेल तासाभरातच जाहीर

राजाराम कारखान्यापेक्षा दोन्ही पॅनेल प्रमुखांनी 'गोकुळ'च्या निवडणुकीला जास्त प्राधान्य दिल्याने कारखान्याचे पॅनेल अवघ्या तासाभरातच जाहीर केले. यामुळे माघारीची औपचारिकताच उरली होती. दोन्ही पॅनेलच्या समर्थकांनी नेत्यांचा निरोप येताच माघार घेतल्याने निवडणुकीत महादेवराव महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी दुरंगी लढत होणार आहे. महाडिक यांनी मंगळवारीच पॅनेलची घोषणा केली होती. मात्र, गट क्रमांक पाच मधील विद्यमान संचालक हरीष चौगुले व दिलीप उलपे यांच्या उमेदवारीवरून चांगलीच ताणाताणी झाली. याच गटातून जयवंतराव पाटील व नेजदार कुटुंबातील एकजण इच्छुक होते. मात्र, या गटातील तिढा त्वरीत काढत माघारीचे निरोप पाठवले. पॅनेल जाहीर करताच आमदार महाडिक 'गोकुळ'च्या मोर्चेबांधणीसाठी निघून गेले. माजी मंत्री पाटील यांनी निवासस्थानी समर्थकांची बैठक घेतली. एकास एक तगडा उमेदवार देत केवळ एका तासात पॅनेलची घोषणा केली.

कोल्हापूर जिल्हा (केडीसीसी) बँकेतही चुरशीची शक्यता आहे. २१ जागांसाठी ५ मे रोजी मतदान होत असून, त्यासाठी तब्बल ३९८ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, निवेदिता माने यांचा प्रमुख समावेश आहे.

अंबरीश यांना पळवले

सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी न मिळालेले संजय घाटगे गट आणि दिनकर कांबळे नाराज झाले. तर राजेश नरसिंग पाटील, उदय निवासराव पाटील, सदानंद हत्तरगी आणि बाळासाहेब खाडे या चार नवीन चेहऱ्यांना 'गोकुळ'मध्ये संधी मिळाली आहे. शशिकांत चुयेकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी माघार न घेता आईच्या विरोधातच बंड पुकारले आहे. तर, नेत्यांवर निष्ठा ठेवून माघारीसाठी गेलेल्या अंबरीश घाटगे यांना कार्यकर्त्यांनी उमेदवारी माघार घेऊ न देता त्यांना मोटारीत कोंबून पळवून नेले. यावेळी त्यांची कार्यकर्त्यांशी झटापट झाली.

राजकीय धुळवड

महादेवराव महाडिक-सतेज पाटील पुन्हा एकमेकांविरोधात

आई विरुद्ध मुलाची 'गोकुळ'मध्ये लढत

माघारीसाठी आलेल्या अंबरीश घाटगेंना कार्यकर्त्यांनी गाडीतच रोखले

'गोकुळ'च्या १८ जागांसाठी ५४ उमेदवार २३ एप्रिलला मतदान

राजाराममध्ये ११ माजी संचालकांना डावलले

जिल्हा बँकेसाठी ३९८ अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी पाच मे रोजी मतदान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एका दगडात अनेक पक्षी

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघात उमेदवारी देताना आमदार महादेवराव महाडिक यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले. राष्ट्रवादीला दिलेल्या दोन जागा, संजय घाटगे गटाला डच्चू , पी. एन. पाटील यांना दिलेली जादा जागा आणि राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देत मंडलिक गटात पाडलेली फूट यातून महाडिक यांनी बरेच राजकारण साधले आहे. शिवसेनेची उमेदवारी कायम ठेवताना भाजपला भविष्यात न्याय देण्याचा शब्द दिला. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे पक्ष सोबत ठेवताना विरोधी पॅनेलला सक्षम उमेदवार मिळू नये यासाठी महाडिक यांनी राजकारण केले असले तरी आता सतेज पाटील काय खेळी खेळणार यावरच निवडणुकीची रंगत अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रवादीची ताकद सत्ताधाऱ्यांना

'गोकुळ' मध्ये निवडून येण्याइतकी राष्ट्रवादीची ताकद नाही, पण निर्णायक ताकद मात्र या पक्षात आहे. त्यामुळे महाडिकांची हा पक्ष सोबत घेण्याची धडपड होती. याला पी.एन. पाटील यांचा विरोध होता. तरीही त्यांना नाराज न करता राष्ट्रवादीला सोबत घेण्याची खेळी यशस्वी करताना त्यांनाही एक जादा जागा दिली. संजय घाटगेंना डावलल्याने मुश्रीफही समाधानी झाले. एका दगडात दोन पक्षी मारण्यात महाडिक यशस्वी झाले. राष्ट्रवादीला दोन जागा हव्या होत्या, पण हा पक्ष वरचढ होऊ नये याची काळजी घेताना महाडिक यांनी विलास कांबळे यांना पॅनेलमध्ये घेतले. ए. वाय. पाटील यांच्या पत्नीला डावलून पीएन यांना खूश केले. कार्यकर्त्याला संधी मिळाल्याने आमदार के.पी. पाटील समाधानी आहेत.

राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देऊन मंडलिक गटाला सोबत ठेवण्याचा डाव महाडिक यांनी खेळला. यामुळे प्रा. संजय मंडलिक सतेज पाटील यांच्या गटात जाणार नाहीत असा महाडिकांचा व्होरा होता, पण तो फोल ठरला आहे. मेव्हण्याला उमेदवारी दिल्यानंतरही मंडलिक पाटील गटात सहभागी झाले आहेत. यामुळे मंडलिक गट फोडण्यात महाडिक यांना यश आले आहे. संजय घाटगे गटाला सोबत ठेवण्यात अपयश आले असले तरी विक्रमसिंह घाटगे यांची ताकद मात्र पदरात पाडून घेतली आहे.

दुसरीकडे महाडिक यांच्या विरोधकांना एकत्र आणत सक्षम पॅनेल तयार करण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून संजय घाटगे, विनय कोरे व प्रा. संजय मंडलिक त्यांच्या हाताला लागले आहेत. अजूनही काही नेते त्यांना नक्की ताकद देतील. त्यामुळे त्यांची ताकद वाढणार आहे, पण उमेदवारी देताना महाडिक यांनी ज्या राजकीय खेळी केल्या त्यातून सध्या तरी त्यांचे पॅनेल सक्षम झाल्याचे दिसत आहे.

सत्ताधारीसोबत शिवसेना-भाजप

शिवसेनेला प्रतिनिधीत्व देताना आमदार सत्यजित पाटील यांच्या आई अनुराधा पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली. चुयेकरांच्या घरात उमेदवारी देणे आवश्यकच असल्याने श्रीमती जयश्री पाटील यांना संधी दिली. यातून शिवसेनेला संधी देताना महाडिक यांनी भाजपला मात्र संधी दिली नाही. या पक्षाची ताकद नसल्याने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांना भविष्यासाठी शब्द दिला आहे. अन्य सर्व ताकदीचे उमेदवार असल्याने सर्वच माजी अध्यक्षांना उमेदवारी दिली. यामुळे त्यांचे पॅनेल सक्षम झाले आहे. विनय कोरे यांची दूध संघात ताकद नसल्याने महाडिक यांनी त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीच्या प्रतीक्षेत नगरसेवक

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

राजीनाम्यावरून महापौर आणि दोन्ही काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका नगरसेवकांना बसणार आहे. अंदाजपत्रक मंजूर होऊन दहा दिवस होत आले तरी बजेटवर महापौरांची सही झाली नाही. त्यांच्या सहीनंतर बजेट आयुक्त कार्यालय आणि त्यानंतर विभागीय कार्यालयामार्फत विकासकामांची अंमलबजावणी केली जाते. कामासाठी रक्कम खर्ची टाकण्यापासून वर्कऑर्डर काढण्यापर्यंतच्या फाइलच्या प्रवासात दोन महिने जातात. त्यामुळे वर्कऑर्डरसाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे १५ मे नंतर रस्त्याचे पॅचवर्क, दुरुस्तीची कामे करू नयेत असा नियम आहे. यामुळे अर्थसंकल्पात निधीची अंमलबजावणी राम भरोसे असल्याची नगरसेवकांत भावना आहे.

नगरसेवकांसमोर प्रश्नचिन्ह

ऑक्टोबर २०१५ मध्ये निवडणूक होणार आहे. यासाठी मेच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग आरक्षण निश्चितीची शक्यता आहे. प्रभागरचनेत फेरफारीची शक्यता गृहित धरुन दुसऱ्या प्रभागात विकासकामे सुचवायची म्हटले तर महापालिका कायद्यात तशी तरतूद नाही. नगरसेवकांना आपल्याच प्रभागातील विकासकामासाठी निधी खर्ची टाकावा लागतो. बजेटमधील आर्थिक तरतुदीवर लक्ष ठेवून कामांचे नियोजन केले जाते. आता कामासाठी निधी उपलब्ध करुन, प्रत्यक्षात काम सुरु करण्यापर्यंत नगरसेवकांना तांत्रिक बाबींना सामोरे जावे लागणार आहे. यामुळे अंदाजपत्रकात निधीची तरतूद करुनही निधी खर्ची पडण्याची शक्यता कमी असल्याचे नगरसेवक निशिकांत मेथे यांनी सांगितले. महापौर माळवी यांनी २० एप्रिलपर्यंत बजेटवर सही करून ते प्रशासनाकडे पाठविले तर प्रशासन शॉर्टटेंडर प्रक्रिया राबवून कामे करु शकते. पण त्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती, गतीमान प्रशासन राबवणे अत्यावश्यक आहे.

माळवींचे नगरसेवकपद रद्दच्या निर्णयाकडे लक्ष

महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासंदर्भातील शिफारस करणारा सदस्य ठराव सभागृहाने २० मार्च रोजी मंजूर केला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे कारवाईसाठी सादर करावा लागणार आहे. मात्र ठरावावर महापौरांची सही होणे गरजेचे आहे. सभेत मंजूर ठरावावर एका महिन्यात आत सही करून प्रशासनाकडे पाठविण्यासंदर्भात नियम आहे. महापौर आपल्याच विरोधातील ठरावावर लवकर सही करण्याची शक्यता कमी आहे. वीस एप्रिलपर्यंत सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान महापौर ठरावावर सही करण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांना कायदेशीर चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न केला आहे.

अक्षय जाखोटीयाला पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'वस्त्रोद्योग क्षेत्रात इचलकरंजीचे नाव जागतिक पातळीवर अधिक चमकदार करण्यासाठी रिटर पुरस्कार नक्कीच प्रोत्साहीत करेल. डिकेटीई संस्थेने दिलेले प्रोत्साहन, संशोधनात्मक शिक्षण यामुळेच मी आज या ठिकाणी पोहचलो आहे. वस्त्रोद्योगात अनेक संधी असून या उद्योगाच्या वाढीसाठी काम करताना इचलकरंजी शहराचे नाव जागतिक पातळीवर अधिक चमकदार करण्याचे माझे ध्येय असेल,' असे उद‍्गार अक्षय जाखोटीया याने काढले.

स्वित्झर्लंड येथील 'रिटर' या कंपनीच्यावतीने डीकेटीईचा विद्यार्थी अक्षय जाखोटीया याला रिटर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यावेळी तो बोलत होता. रिटर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पी. डेका यांच्या हस्ते जाखोटीया याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे होते. येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर टेक्स्टाईल मॅनिफॅक्चरिंगमध्ये अग्रेसर असलेल्या रिटर कंपनीच्यावतीने १९८९ पासून रिटर पुरस्काराचे वितरण होते. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती आणि गुणवत्ता याच्या आधारे या पुरस्कारासाठी जगभरातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी जगभरातील विद्यार्थ्यामध्ये डीकेटीईच्या चतुर्थ वर्ष टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये शिकणारा अक्षय याचाही समावेश होता. त्याने 'इफेक्ट ऑफ ओव्हर ऑल ड्राफ्ट इन स्पिनिंग प्रिप्रेश ' या विषयावर संशोधनात्मक प्रबंध सादर केला होता. समितीने अक्षय याची पुरस्कारासाठी निवड करून त्याला अभ्यास दौऱ्यासाठी स्वित्झर्लंड येथे निमंत्रित केले होते.

स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले यांनी केले. पंकज डांगरा यांनी रिटरचे वरिष्ठ अधिकारी पी. डेका आणि रिटर पुरस्कार याबद्दलची माहिती दिली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी डीकेटीईमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेऊन केंद्र शासनाच्या सहकार्यातून सुरू असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स हा प्रकल्प देशात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनस्पतींचा चालता बोलता ज्ञानकोश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

खेळण्याबागडण्याच्या वयात तो शंभरहून अधिक वनस्पती शास्त्रीय नावांसह ओळखतो. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून वनस्पतींची ओळख करुन घेण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. आज तो साडेसहा वर्षांचा असून अर्जुननगर (ता. कागल) येथे पहिलीच्या वर्गात शिकत आहे. निपाणीतील शिंदेनगरजवळील वाळवे मळ्यात राहणाऱ्या बाबासाहेब मगदूम यांच्या मुलाची ही ओळख आहे. वनस्पतींचा चालताबोलता ज्ञानकोश असणाऱ्या या मुलाचे नाव विश्वदीप बाबासाहेब मगदूम असे आहे. येथील श्री यशवंतराव घाटगे हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्याने शाळेतील विद्यार्थ्यांसमोर विविध वनस्पतींची मराठी व शास्त्रीय नावे (इंग्रजी) त्याने फटाफट सांगितली. निमित्त होते शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत अजितसिंहराव घाटगे यांच्या जयंतीचे. अध्यक्षस्थानी सेक्रेटरी पी.बी. घाटगे होते.

श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत अजितसिंहराव घाटगे यांची जयंती नेहमी पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरी करण्यात येते. यापूर्वी वृक्ष लागवड, सामाजिक वनीकरण विभागाला बिया संकलन करून दान करणे, व्याख्यान आदी उपक्रमाद्वारे जयंती साजरी केली आहे. यंदाही शाळा परिसरातील वृक्षांच्या बिया संकलन करुन सामाजिक वनिकरण विभागाला देण्यात आल्या.

ज्या वयात लिहायला वाचायला येत नाही अशा वयात वनस्पतींची नावे ओळखणे अवघड असते. पण विश्वदीप मगदूम हा पहिलीचा विद्यार्थी शंभरहून अधिक वनस्पती शास्त्रीय नावांसह ओळखतो. त्याचे कुतुहल विद्यार्थ्यांना वाटावे व त्यांनी त्याच्यासारखा वनस्पतींचा अभ्यास करावा या हेतूने विश्वदीपचा वनस्पती ओळखण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी विविध झाडांच्या, वनस्पतींच्या फांद्या आणल्या होत्या. मुख्याध्यापिका एम. एम. नाटोलीकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन एकनाथ तोडकर यांनी केले. आभार उपमुख्याध्यापिका ए. एस. कदम यांनी मानले. यावेळी सामाजिक वनिकरण विभागाचे लागवड अधिकारी के. डी. पोवार, संस्थेचे संचालक ए. के. हुच्चे, आप्पासाहेब भोसले, ए. डी. पाटील, जे. ए. पाटील, जयसिंग घाटगे, बी. व्ही. भोसले, प्रकाश उपाध्ये आदीं संचालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

फुले, फळे , वेलींची नावे

विश्वदीपने उंबर, पळस, अशोक, अबोली, गुळवेल, खाजकुईली, दगडीपाला, निरगुंडी, झेंडू, चिक्कू, सदाफूली, कुरडू, सागवन, शतावरी, रानमोडी, चेरी, गुलमोहर, घाणेरी, केवडा, गाजर गवत, शंखपुष्पी, बोगनवेल, आपटा, कांचन, बांबू, करवंद, निलपुष्पी, हळद, आवळा, विलायती चिंच, आंबा, बाभूळ, अघाडा, कोरफड, कन्हेर, चिंच, बदाम, रुई, अडूळसा, चंदन, पेरु, शेवगा, सीताफळ, रामफळ, फणस, बेल, धोतरा,पपई, एरंड, कडूनिंब, केळ, तुळस, जास्वंद यासह अनेक फुलांची, फळांची, वेलींची शास्त्रीय नावे सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होमिओपॅथीचा वापर वाढतोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अॅलर्जी, लहान मुलांमध्ये वाढत जाणारा मानसिक आजार, आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीमुळे निर्माण होणारे डायबिटीस, ब्लडप्रेशर, स्थूलपणा, थायरॉइड, ह्दयरोग, निद्रानाश, डिप्रेशनसारख्या आजारांसाठी आता होमिओपॅथिकचा पर्याय निवडला जात आहे. निसर्गनियमांशी सुसंगत, सुरक्षित तसेच प्रभावी अशा होमिओथीक चिकित्सा पद्धतीला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत आहे. होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगात १० एप्रिल हा दिवस होमिओपॅथ‌िक म्हणून साजरा केला जातो.

बाजारभोगाव येथील ४५ वर्षाच्या सुजाता पाटील (नाव बदलले आहे) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी ‌तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र परिस्थिती नसल्यामुळे त्या दाखल न होता होमिओपॅथिक औषध देण्याची मागणी डॉक्टरांकडे केली. त्यानंतर काही दिवस होमिओपॅथिक औषध सुरू ठेवल्यानंतर त्यांचा त्रास कमी झाला. त्यामुळे होमिओपॅथी औषधावर त्यांचा विश्वास असल्याचे त्या सांगतात. चैतन्यमय आयुष्य जगण्यासाठी होमिओपॅथीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. ह्दयविकार, कॅन्सर अशा विविध आजारांवरही होमिओपॅथी औषधाचा वापर केला जात आहे. अनेक रूग्णांना त्याचा फायदा होत असून काही रूग्ण बरे झाल्याची उदाहरणेही आहेत. गंभीर अशा आजारांवर होमिओपॅथीचा नेमका उपचार लागू होत असल्यामुळे अनेक रुग्णांकडून या पद्धतीचा वापर सुरू झाला आहे. उपचारांना मिळणा‍ऱ्या प्रतिसादामुळे लहान मुलांतीलही अनेक आजारांवर त्याचा वापर होऊ लागला आहे.

होमिओपॅथीक डॉक्टर्स आणि होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या असोसिएशनची गेल्या तीस वर्षांपासूनची मागणी एक वर्षांपूर्वी मान्य करण्यात आली. त्यामुळे होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रँक्टिस करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी न झाल्याने डॉक्टर निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

कोल्हापुरात अडीच हजार डॉक्टर तर राज्यात ४५ हजार बीएचएमएस डॉक्टर आहेत. होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथी प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. राज्यातील ग्रामीण भाग तसेच शहरातील मध्यमवर्गीय व झोपडपट्टी भागात सर्वाधिक होमिओपॅथी डॉक्टरांकडून रुग्णसेवा दिली जाते. परंतु, रुग्णांवर तातडीच्या उपचारांसाठी होमिओपॅथीक डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही. त्यासाठी राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या अॅलोपॅथी प्रॅक्टिसबाबत विधानसभेच्या अधिवेशनात अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथी प्रॅक्टिसची मंजुरी देण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा प्रस्ताव अद्याप धूळखात पडून आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा फार्माकॉलॉजी कोर्स करता येणार आहे. त्यानंतर त्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन बँकिंगकडे वाटचाल

$
0
0

प्रश्न : पुढील पाच वर्षे बँकेची कशी वाटचाल असणार?

कणेरकर : खासगी सावकाराच्या जाचातून मुक्त होण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने नामदार भास्करराव जाधव यांनी अर्बन बँकेची स्थापना केली. गरीब सर्वसामान्य, गरजू लोकांना मदत करण्यासाठी बँक स्थापन केली. स्वर्गीय द. न. कणेरकर व अॅड. शामराव शिंदे यांनी हेच तत्त्व कायम ठेवले. आज २१ शतकातही बँकेचे संचालक मंडळ गरजू, गरीब आणि ज्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून प्रगती करायची आहे अशा सभासदांना कर्ज दिले जाते. कुंभार, जोशी समाज, डवरी समाजासह समाजातील दुर्बल घटकांना बँकेने स्वतःच्या पायावर उभारण्यास मदत केली आहे. यापुढेही राजर्षी शाहू महाराज आणि भास्करराव जाधव यांच्या तत्वानुसार बँकेची वाटचाल राहणार आहे.

प्रश्न : ऑनलाइन बँकिंग प्रणालीसाठी बँकेचे प्रयत्न आहेत का ?

कणेरकर : नव्या तंत्रज्ञानाचा बँक नेहमी स्वीकार करत आहे. सध्या ऑनलाइन डाटा सेंटरचे काम सुरू आहे. टेलिबँकिंगची सोय केली आहे. एटीएम कार्डची सुविधा सुरू केली आहे. भविष्यात ग्राहकाला घरातून बँकिंगचे व्यवहार करता यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. लहान कर्जांबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने मोठी कर्जे दिली जातात. बँकेचा स्वनिधी ९१ कोटी रुपये आहे. लवकरच १०० कोटी रुपये स्वनिधी होईल. बँकेच्या प्रगतीची चाल कासवाची आहे, पण सुरक्षित आहे. बँकेला शेड्यूल दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेली दहा वर्षे एनपीए शून्य टक्के आहे. किमान पाच हजार रुपये ते सात कोटी रुपये अशी कर्जे आम्ही दिली आहेत. त्यांची परतफेडही उत्तम आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरे व गावात बँकेच्या शाखा सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे.

प्रश्न : स्वीकार कर्जाबाबत आपले काय धोरण आहे ?

कणेरकर : जेव्हा एखाद्या व्यक्तीला गरज असते, तेव्हा त्याच्याकडे पैसा नसतो. मग तो सावकाराकडे वळतो. सभासद व ग्राहक सावकारांकडे जाऊ नये यासाठी तत्काळ कर्ज देण्याची योजना बँकेत सुरू केली आहे. शाखाधिकाऱ्यांना पाच हजार रुपये ते चार लाख रुपयांचे कर्ज देण्याचे तर सीईओंना दहा लाख रुपयांपर्यंतची कर्जे देण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे संचालकांची मनधरणी, कर्जासाठी मिटिंग हे प्रकार कमी झाले. त्यातून कर्ज प्रक्रिया सुलभ झाली आहे.

प्रश्न : सभासदांना बँक कोणती मदत करते?

कणेरकर : सभासदांमुळे बँक टिकून असल्याने त्यांच्या हिताचा विचार करतो. सभासद आजारी असतील, तर त्यांना मदत केली जाते. दाताची कवळी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांचे आजार, शस्त्रक्रिया यांसाठी रोख मदत दिली जाते. सभासद मृत झाला तर त्याच्या कुटुंबाला दीड हजारांची तातडीची मदत केली जाते. सहकार चळवळ ही मोठी आहे. द. न. कणेरकर व शामराव शिंदे यांनी नवे युवा नेतृत्व तयार केले. यापुढील पाच वर्षात तरुणांना संधी देण्यासाठी आम्ही पावले उचलणार आहात. सध्याचे संचालक मंडळ परिपक्व आहे. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच बँकेची भरभराट होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'गोकुळ'साठी निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघासाठी सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला कपबशी तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला विमान हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या दोन्ही चिन्हांसह दोन पॅनेल एकमेकांना सामोरे जाणार आहेत. तर अपक्ष उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे देण्यात आली आहेत.

अपक्ष सर्वसाधारण गटातील उमेदरावांना रघूनाथ घाटगे यांना नारळ, सदाशिवराव चरापले यांना रोडरोलर, सुरेशराव चव्हाण पाटील यांना एअरकंडिशनर, सदाशिवराव नवणे यांना फॅन, अशोकराव पवार यांना फळाची टोपली, अविनाश पाटील यांना किटली, कृष्णात पाटील यांना पतंग, बाजीराव पाटील यांना टेलिव्हिजन, बाळासाहेब पाटील - फुगा, राऊसाहेब पाटील - कपाट, सत्यजित पाटील - शिलाईमशीन, सरदार पाटील - अंगठी, संग्राम पाटील - बॅट, शशिकांत पाटील - टेबल, राजेंद्र सूर्यवंशी - ऑटोरिक्षा. महिला राखीव - अर्चना पाटील - पतंग, इतर मागारसवर्गीय मध्ये शरद पाडळकर यांना पंखा तर बुवा पांडूरंग हरी चव्हाण यांना पतंग हे चिन्ह देण्यात आले आहे. गोकुळच्या १८ जागांसाठी २३ एप्रिलला मतदान तर २४ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालये अडचणीत

$
0
0

सचिन यादव, कोल्हापूर

राज्य सरकारकडून सावर्जनिक ग्रंथालयांच्या अनुदानाचा दुसरा हप्ता अजूनही लटकला आहे. राज्याचे सुमारे पंधरा कोटी रुपयांचे अनुदान थकित असून जिल्ह्यातील ७२७ सार्वजनिक ग्रंथालयाचा तीन कोटी रुपयांचा दुसरा हप्ता थकित आहे. ग्रंथालयांसाठी पुरेसा निधी नसल्याने अनुदान लटकले आहे. त्यासह दर्जा वाढ आणि नवीन प्रस्तावांची प्रतीक्षा ग्रंथप्रेमींना आहे.

वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शहर आणि गावांगावांत सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली. राज्यात १२ हजार सार्वजनिक ग्रंथालयाची संख्या असून जिल्ह्यात ७२७ ग्रंथालये आहेत. पहिला हप्ता ग्रंथालयाच्या खात्यात ऑनलाइन जमा झाला. दुसरा हप्ता न मिळाल्याने राज्यातील २२ हजार ग्रंथपाल आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. ग्रंथालय संचालनालयाने २०१४-१५च्या अखर्चित निधीपैकी शिल्लक १२ कोटी रुपये दुसऱ्या हप्ता देण्याची शिफारस केली. सरकारने ही शिफारस मान्य केल्याने २२ ते २५ टक्के रक्कम मार्चपर्यंत मिळाली आहे. राज्यातील चार वर्गांतील ग्रंथालयांना एकूण ४० कोटी रुपयांपैकी सुमारे १२ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. उर्वरित २८ लाखांपैकी काही जिल्ह्यांतील ग्रंथालयांना तुटपुंजे दुसऱ्या हफ्त्याचे वाटप सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रंथालयांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे ग्रंथपाल, शिपाई यांची आर्थिक ससेहोलपट सुरू आहे.

सवलत योजनाही बारगळल्या

विविध पुस्तक विक्रेत्यांच्या कडून ग्रंथालयांना सवलतीच्या दरात पुस्तके देण्यात येतात. कमी किंमतीत पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष सवलत योजना दिल्या जातात. ग्रंथालयातील मराठी, हिंदी आणि इंग्रजीची भाषेतील उपलब्ध पुस्तकांची नोंद केली जाते. त्यानुसार अनुदान आणि दर्जावाढ केली जाते. अनुदानाचा दुसरा हप्ता मिळाला नसल्याने यंदा नवी पुस्तके घेतली जाणार नसल्याने सवलत योजनाही बारगळणार आहेत.

बोगस ग्रंथालये

राज्य सरकारच्या निर्णयानुसार महसूल विभागाने ग्रंथालय पडताळणी करून जिल्ह्यातील ११ सार्वजनिक वाचनालयांची मान्यता काढून घेण्यात आली. राज्यात सुमारे पाचशेहून अधिक ग्रंथालयांची मान्यता काढून घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...आणि टोलनाका बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर. के. नगरातील टोलनाक्यावर दोन दिवसांपूर्वी वाहनधारकाकडून टोल वसूल करताना एका वाहनाचे नुकसान झाले होते. नुकसानभरपाई मिळावी म्हणून वाहनचालक सागर शिंदे यांच्यासह टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी दुपारी टोलनाक्यावर आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी घातलेली हुज्जत, वादावादी आणि कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे टोल वसुली तीन तास बंद राहिली.

वाहन चालक शिंदे हे गुरुवारी नुकसान भरपाई मिळावी यासाठी टोल नाक्यावर आल्यावर त्यांचा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कर्मचारी आणि वाहनधारकात टोलवरून वादावादी सुरू असल्याचे समजताच टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी घटनास्थळी आले. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद केली. व्यवस्थापक कुठे आहेत अशी विचारणा केली.

पदाधिकाऱ्यांना पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी पळून गेले. त्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सु्रू राहील असा इशारा दिला. पोलिसांनी व्यवस्थापकांशी मोबाइलवरून संपर्क साधला असता, त्यांनी नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live

Latest Images