Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अपंग दिलीपने वाचवला तरुणीचा जीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बुधवार, ३१ मार्च... सकाळी साडेआठची वेळ...अचानक रंकाळा टॉवरसमोरील दुतोंडी घाटाजवळ 'वाचवा वाचवा' असा एका तरूणीचा आवाज दिलीप माने यांच्या कानावर पडला. गेल्या २५ वर्षापासून रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या दिलीपच्या कानावर हा आवाज पडला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता रंकाळ्यात उडी टाकली. त्या तरूणीच्या वेणीला धरून आधार दिला आणि काठावर आणले...पोहायला येणारा कुणीही हेच कृत्य करेल. त्यामुळे दिलीपनी काय वेगळे केले असा प्रश्न नक्कीच पडेल...पण स्वत: एका पायाने अपंग असलेल्या दिलीपनी दाखवलेले प्रसंगावधान आणि साहसाने एका नवविवाहित तरूणीला जीवदान मिळाले.

फिरंगाई तालीम परिसरात टेलरकाम करणाऱ्या चाळीस वर्षे वयाच्या माने शिवाजी पुतळा परिसरातील मोठ्या टेलरकडून मजुरीवर काम करतात. या कामावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पोहण्याची हौस असलेले माने रंकाळा परिसरात सायकलवरुन फिरायला येतात. माने यांना ह्रदयविकाराचाही त्रास आहे. बुधवारी सकाळी ते ​नेहमीप्रमाणे दुतोंडी घाट परिसरात बसले होते.

दरम्यान एक नवविवाहिता पाण्यात पडल्याचा आवाज झाला आणि त्यानंतर ती वाचवा वाचवा असे ओरडू लागली. त्यांनी तडक उडी घेतली. वेणी हातात धरून ठेवत त्या तरूणीला आधार देत काठापर्यंत आणले. परिसरातील नागरिकांनी तरूणीला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात पाठवून नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शॉर्टसर्किटमुळे यंत्रमाग खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वीज पुरवठा सुरु करीत असताना शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत यंत्रमागासह संपूर्ण शेड जळून खाक झाले. ही घटना मंगळवार पेठेतील रुग्गे गल्ली येथे बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद गावभाग पोलिसात झाली असून सुर्यकांत शामराव शिंदे यांनी वर्दी दिली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रुग्गे गल्ली परिसरात सुर्यकांत शिंदे यांचा यंत्रमागाचे शेड आहे. याठिकाणी आठ यंत्रमाग आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास शिंदे हे कारखाना सुरु करण्यासाठी गेले होते. त्यांनी वीज पुरवठा सुरु करण्यास मेन स्वीच सुरु केला असताना अचानकपणे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे कारखान्यात आग लागली. या आगीत सर्व यंत्रमाग, ४० तागे, कांडी मशिन यासह कारखान्यात लावलेली दुचाकी आणि दोन सायकली जळून खाक झाल्या. तसेच संपूर्ण शेडही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात १० लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’वर कारवाई का नाही?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पात सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित नसल्याने सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. नदी प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करण्याऐवजी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्यांना पाठीशी घालतात. साखर कारखाने, इंडस्ट्रीजवर कारवाई होत असेल तर अधिकाऱ्यांची 'गोकुळ'वर मेहेरनजर का ? अधिकारी राजकारण्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. नासलेले दूध, रसायनयुक्त पाणी नदीत मिसळत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना आमदार आणि राजकारण्यांशी संबंधित 'गोकुळ'ला सवलत कशासाठी ? अशा प्रश्नांचा भडिमार प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केला.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसंबंधी उपाययोजना आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईसंदर्भात सर्किट हाउस येथे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी प्रशांत पाटील होते. येथील प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे देसाई यांनी 'गोकुळ'मधून थेट नदीत मिसळणाऱ्या दूषित पाण्याचा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, प्रादेशिक उपअधिकारी मनीष होळकर यांनी एसटीपी प्लँट नसल्यामुळे गोकुळ शिरगाव येथील 'गोकुळ' प्रकल्प बंद करण्याबाबतचा कारवाई प्रस्ताव सदस्य सचिव प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबईला पाठविला आहे. आजच्या बैठकीला अनुसरून कारवाई संदर्भातील अहवाल पुन्हा पाठविला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इचलकरंजीतील होणार संयुक्त पाहणी

पंचगंगा नदी प्रदूषणप्रकरणी​ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप केला. केवळ पोकळ चर्चा नको, प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाईची मागणी लावून धरली. गायकवाड यांनी रंकाळा तलावातील गाळ, नदीचे प्रदूषण याप्रश्नी अधिकारी होळकर यांना धारेवर धरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ येथील नदी प्रदूषणप्रकरणी आक्रमक बनले. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचला असताना अधिकारी कारवाईप्रश्नी मूग गिळून गप्प आहेत. अधिकाऱ्यांना दूषित पाणी पा​जा म्हणजे त्यांना नागरिकांच्या व्यथा समजतील असे म्हणत कार्यकर्त्यांनी बाटलीतून आणलेले दूषित पाणी अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवले. स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बंडू पाटील, बाळासाहेब परीट, महावीर नाईक आदींनी चर्चेत सहभाग घेतला. शिरोळचे प्रसाद धर्माधिकारी यांनी नदी प्रदूषणाची तीव्रता मांडली. पंचतारांकित वसाहतीलमधील विविध इंडस्ट्रीजच्या एसटीपी प्लॅँन्ट, दूषित पाण्यावरील प्रक्रिया संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना प्रातां​धिकारी पाटील यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आमची बस फुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळमध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असे कितीही म्हटले तरी जागा केवळ १८ आहेत. तर इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येकाला आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी वाटत आहे. पण आमची बस आता हाऊसफुल्ल झाल्याने कोणलाच सत्ताधारी आघाडीत जागा देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी व भा​जप च्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांची गोकुळमध्ये बैठक झाली. त्यामध्ये इतर कोणत्याही पक्षाला नव्याने जागा देता येणे शक्य नसल्याची चर्चा झाली. दरम्यान, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या असहकाराबाबतही दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे या दोन्ही पक्षाच्या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे कोणाला संधी द्यायची. याबाबत, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी सहकार मंत्र्यांचे निवडणुकीबाबत कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे झालेली अडचणीची स्थिती नेत्यांच्या चर्चेचा मुख्य विषय होती.

गोकुळसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण, जागा अठराच असल्यामुळे सर्वांना संधी देणे शक्य नाही. गोकुळच्या सर्व जागा आता फुल्ल झाल्या असून नव्याने कोणत्याही पक्षाला जागा देता येणार नाहीत, असे गोकुळचे नेते पी. एन. पाटील स्पष्टच केले. त्यामुळे आता अनेक इच्छुकांच्या आणि नेत्यांच्याही आशा आकांक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

पाटील म्हणाले, ' गोकुळमध्ये संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण, सर्वांना सामावून घेता येत नाही. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस यांना जागा मागितल्या आहेत. पण सहकारमंत्र्यांकडून निवडणुकीबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि काँग्रेसची फार मोठी अडचण झाली आहे. सेना आणि भाजप यांना सहकारी संस्थांवर फारसे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे त्यांना कुठेच अडचण नाही. त्यांनी गोकुळमध्ये किंवा इतर सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मागितले असले तरी देखील त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या पातळीवर कोणतीच मदत नसल्याने आमच्यामध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवरच महाड‌िक यांच्याशी चर्चा झाली असून आपले पुत्र आमदार अमल महाडिक हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांना सांगण्यात यावे, असेही पाटील यांनी सांगितले.

'पॅनेलबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. इच्छुकांची संख्या भरपूर आहे. इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी याबाबत आग्रही आहेत. सध्या सर्वांची मते ऐकून घेतली जात असून त्यावर शेवटच्या टप्प्यात निर्णय देण्यात येईल. मात्र, पी. एन. पाटील आणि मी दोघे एकत्रित बसूनच याबाबतचा निर्णय घेऊ. गोकुळला पुढे घेऊन जाण्यासाठी एक चांगली टीम तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- आमदार महादेवराव महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता आमची बस फुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळमध्ये सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे, असे कितीही म्हटले तरी जागा केवळ १८ आहेत. तर इच्छुक उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रत्येकाला आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी वाटत आहे. पण आमची बस आता हाऊसफुल्ल झाल्याने कोणलाच सत्ताधारी आघाडीत जागा देणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी व भा​जप च्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांची गोकुळमध्ये बैठक झाली. त्यामध्ये इतर कोणत्याही पक्षाला नव्याने जागा देता येणे शक्य नसल्याची चर्चा झाली. दरम्यान, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या असहकाराबाबतही दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे या दोन्ही पक्षाच्या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांच्यात चर्चा सुरू आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे कोणाला संधी द्यायची. याबाबत, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी सहकार मंत्र्यांचे निवडणुकीबाबत कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे झालेली अडचणीची स्थिती नेत्यांच्या चर्चेचा मुख्य विषय होती.

गोकुळसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण, जागा अठराच असल्यामुळे सर्वांना संधी देणे शक्य नाही. गोकुळच्या सर्व जागा आता फुल्ल झाल्या असून नव्याने कोणत्याही पक्षाला जागा देता येणार नाहीत, असे गोकुळचे नेते पी. एन. पाटील स्पष्टच केले. त्यामुळे आता अनेक इच्छुकांच्या आणि नेत्यांच्याही आशा आकांक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.

पाटील म्हणाले, ' गोकुळमध्ये संधी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण, सर्वांना सामावून घेता येत नाही. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस यांना जागा मागितल्या आहेत. पण सहकारमंत्र्यांकडून निवडणुकीबाबत कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी लागल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि काँग्रेसची फार मोठी अडचण झाली आहे. सेना आणि भाजप यांना सहकारी संस्थांवर फारसे प्रतिनिधीत्व नसल्यामुळे त्यांना कुठेच अडचण नाही. त्यांनी गोकुळमध्ये किंवा इतर सहकारी संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मागितले असले तरी देखील त्यांच्याकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या पातळीवर कोणतीच मदत नसल्याने आमच्यामध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवरच महाड‌िक यांच्याशी चर्चा झाली असून आपले पुत्र आमदार अमल महाडिक हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून सहकार मंत्र्यांना सांगण्यात यावे, असेही पाटील यांनी सांगितले.

'पॅनेलबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. इच्छुकांची संख्या भरपूर आहे. इच्छुक आपल्यालाच उमेदवारी मिळावी याबाबत आग्रही आहेत. सध्या सर्वांची मते ऐकून घेतली जात असून त्यावर शेवटच्या टप्प्यात निर्णय देण्यात येईल. मात्र, पी. एन. पाटील आणि मी दोघे एकत्रित बसूनच याबाबतचा निर्णय घेऊ. गोकुळला पुढे घेऊन जाण्यासाठी एक चांगली टीम तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- आमदार महादेवराव महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू जन्मस्थळ काम पूर्णत्वाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या विकासकामांप्रमाणे तिथे साकारण्यात येणाऱ्या संग्रहालयाचा अजून आराखडाही दृष्टिपथात नाही. आराखडाच तयार नसल्याने आता चित्र, शिल्प, शाहू महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू यांच्यावर आधारित संग्रहालय एक-दोन वर्षांत नक्कीच साकारणार नाही. त्यामुळे रखडल्याशिवाय जन्मस्थळाच्या विकासाचे कामच होणार नाही हेच स्पष्ट होत आहे.

शाहू प्रेमींच्या आंदोलनामुळे २००६ साली राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभागाने शाहू जन्मस्थळ विकासाच्या हालचाली सुरू केल्या. जन्मस्थळाच्या प्रत्यक्ष कामाला ऑगस्ट २०११ मध्ये सुरुवात झाली. १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानंतर तेथील इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही काही कामे करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाण्याची व्यवस्था, लँडस्केप, अॅम्फी थिएटर, कॅन्टीन, विहीर आदींचे काम सुरू आहे. राधानगरी धरण, साठमारीच्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

इमारत व परिसरातील कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना शाहू संग्रहालय हे त्या प्रकल्पातील मुख्य गाभा आहे. त्यासाठी पाच कोटीचा निधी खर्च होण्याची अपेक्षित आहे. जन्मस्थळाच्या विकासासाठी सरकारने नेमलेल्या संवर्धन समितीने संग्रहालय पूर्णपणे शाहू चरित्रावर आधारित असावे. त्यासाठी ​चित्रे, शिल्प, विविध वस्तूंचा वापर करावा, असे सुचवले आहे. समितीसमोर प्राथमिक आराखडा गेल्यानंतर त्यात बदल करुन तो निश्चित केला जाणार आहे. पण संग्रहालय उभारण्यासाठी आवश्यक प्राथमिक आराखडाही अजून तयार झालेला नाही.

समिती सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दीड वर्षापूर्वी संग्रहालयात नेमके काय असावे याचे पत्र दोनदा दिले आहे. कोणत्या इमारतीत काय असावे, चित्रे कोणती हवीत तेही सुचवले आहे. चित्र, शिल्प बनवायची असल्यास इतिहास संशोधक व चित्रकार यांची एकत्रित चर्चा महत्त्वाची आहे. हा भाग आर्किटेक्टच्या संबंधित नाही. पण या प्र्रकल्पात पूर्वीपासून सुरु असलेली मनमानी अजूनही सुरू आहे. त्यामुळे संग्रहालय उभारणीस वेळ लागू शकतो.

- इंद्रजित सावंत, सदस्य, शाहू जन्मस्थळ संवर्धन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कटफळमध्ये महिलेवर बलात्कार

$
0
0

सोलापूर : सांगोला तालुक्यातील काटफळ येथील एका महिलेवर चार जणांनी गेला वर्षभर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. नवऱ्याला मारण्याची धमकी देऊन या चौघांनी वारंवार बलात्कार केल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार राहुल काळेल, सागर धंगेकर, आबा सरगर, राजू काळेल या चौघांना अटक केली आहे. या चौघांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव कुंभार पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीला पुरून उरेन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'दलित नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मी पुरून उरने,' असे आव्हान माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. वाघोली येथील महात्मा फुले सुत गिरणीवर ढोबळे यांच्या पॅनेलने निर्वावाद वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवले आहे. या विजयानंतर ते बोलत होते. सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचे लक्ष लागून राहिलेल्या सुत गिरणीच्या निवडणुकीत १७ पैकी १५ जागा जिंकून ढोबळे यांनी बाजी मारली आहे, तर त्यांचेच शिष्य मोहोळचे आमदार रमेश कदम यांच्या परिवर्तन पॅनलला दोन जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, सुतगिरणीच्या निवडणुकीवरून ढोबळे आणि आमदार रमेश कदम यांच्यातील शितयुद्धाची मोठी ठिणगी पडली आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या या दोघांनी सुत गिरणीच्या निवडणुकीत एकमेकांवर पुन्हा जोरदार टीका करत निवडणूक रंगतदार केली होती. अखेर ढोबळे यांनीच बाजी मारली.

दरम्यान आमदार कदम यांना गिरणीच्या निवडणुकीत पुढे करणाऱ्या अजित पवार यांच्यावर व राष्ट्रवादीवर लक्ष्मण ढोबळे यांनी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, 'पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश सुतगिरण्यांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या असताना केवळ आपण विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलो म्हणून अजित पवारांनी आमदार कदम यांना पुढे रेटत जाणीवपूर्वक गिरणीची निवडणूक लादली. यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.'

'ज्या पवार घराण्याबरोबर आपण तब्बल ३८ वर्षे एकनिष्ठ राहिलो त्यांच्या घराण्यातील अजित पवारांनी निवडणूक लादून त्यांची प्रवृत्ती दाखवून दिली. मुंबईत बसून पवार यांनी सुत गिरणीच्या निवडणुकीत दलित समाजाच्या नेत्यांना बदनाम करण्याचे पाप केले. यापूर्वी रामदास आठवले, लक्ष्मण माने आणि आता त्याच्यानंतर आपल्या सारख्या दलित नेत्याला संपवाण्याचे राजकारण अजित पवार खेळत आहेत. परंतु, अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादीला मी पुरुन उरेन,' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जमीन विकणाऱ्यांना अटक करण्याची मागणी

$
0
0

सातारा : 'फलटणच्या श्रीराम साखर कारखान्याची २१ एकर जमीन बेकायदा पद्धतीने आणि दहशतीचा वापर करून फक्त ३० कोटी रुपयांना विकण्यात आली,' असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. हा व्यवहार करणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

उदयनराजेंच्या या पत्रकामुळे ते आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. 'कारखान्यावर २६ कोटी रुपयांचे कर्ज होते. ते भागविण्यासाठीची रक्कम कारखान्याकडे असतानाही, राज्य बँकेकडून जप्ती येण्याची भीती दाखवून कारखान्याच्या २१ एकर जमिनीची विक्री करण्यात आली. ही जमीन लिलावात ६० कोटी रुपयांना खरेदी करण्याची तयारी एका व्यक्तीने दाखवली होती. त्याला लिलावातून हुसकावून लावण्यात आले. बँकेकडे असलेली ३० कोटी रुपयांची रक्कम कोठे गेली, याची चौकशी व्हावी,' अशी मागणीही उदयनराजेंनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज शून्य टक्क्यांनी; सेवाशुल्क आठ टक्के

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

पीक कर्जाचा बोजा सात-बारा उताऱ्यावर चढवून तो नोंदणीकृत करणे साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे कर्ज शून्य टक्के व्याजदराने आणि नोंदणीसाठी सेवाशुल्क मात्र आठ टक्के असा भुर्दंड शेतकऱ्यांना पडणार आहे. ही नोंद ई करार पद्धतीने ऑनलाइन करण्याची सवलत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सातारा जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाचा पुरवठा केला जातो. सुमारे चार लाख शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या नव्या आदेशामुळे सुमारे २५० कोटी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांवर पडण्याची शक्यता आहे.

कर्ज मिळाल्यानंतर त्याचा बोजा ई-करार नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे दिला जातो व संबंधित कर्जाचा बोजा त्या शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर नोंद केला जातो. मात्र, यापुढे अशी नोंद ई-करारऐवजी उपनिबंधक कार्यालयात दस्तनोंदणीद्वारे करावी, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

ई-करारसारखी मोफत सुविधा असतानाही सेवाशुल्काचा भुर्दंड आमच्यावर का लादला जात आहे, असा सवाल शेतकरी करीत आहेत. सातारा जिल्ह्यात सुमारे ६० टक्के शेतकरी जिल्हा बँकेकडून कर्जे घेतात. जिल्हा बँक स्वत:च्या नफ्यातून दोन टक्के सवलत देत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे शेतकरी या सवलतीपासून वंचित राहणार आहेत.

कामचुकारांचा रान मोकळे

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वच गावांतील सात-बारा उतारे संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. या उताऱ्यावरील नोंदींची डेटा एंट्री करताना बोजाचा त्रास कामचुकार व आळशी अधिकारी, कर्मचाऱ्यांना होत असल्याची चर्चा आहे. या त्रासातूनच कोणीतरी 'नोंदणीकृत' ची आयडिया घुसडली असावी, असावी असा संशय शेतकरी व्यक्त करीत आहेत.

फटका कसा?

उपनिबंधक कार्यालय एक लाख रुपयांच्या दस्त नोंदणीसाठी चार टक्के सेवा शुल्क आकारते.

पीक कर्जाचा बोजा कर्जाऊ रकमेच्या दुप्पट असतो. म्हणजे एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास सात-बारावर दोन लाख रुपयांचा बोजा चढवला जातो.

उपनिबंधक कार्यालयात एक लाख रुपयांच्या कर्जाची नोंदणी उताऱ्यावर करून घेण्यासाठी आठ हजार रुपये सेवा शुल्क भरावे लागणार.

या पूर्वीच्या नोंदणीकृत नसलेल्या नोंदी सात-बारा उताऱ्यावरून वगळण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बझारच्या बांधकामाची चौकशी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी आणि काँग्रेस आघाडीमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महापौरांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असलेल्या काँग्रेसच्या कारभारी नगरसेवकांशी संबंधित जनता बझारमधील बेकायदेशीर बांधकाम थांबवून मिळकत ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश माळवी यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले आहेत.

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी जनता बझारच्या व्यवस्थापनने केलेले बेकायदेशीर बांधकाम, मुद्रांक शुल्क बुडविणे, नियम डावलून केलेले हस्तांतरण यावरून जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. महापालिका आणि जनता बझार व्यवस्थापन करारपत्रातील अटीचा भंग करण्यात आला आहे. जनता बझारने पोटभाडेकरू ठेवले आहेत. मूळ बांधकामात बदल करून तळघरात बांधकाम सुरू केले आहे. भाडे करारावेळी खुली जागा दाखवून मुद्रांक शुल्क चुकविले आहे. बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून मिळकत ताब्यात घ्यावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

देसाई यांच्या तक्रार अर्जानुसार महापौर माळवी यांनी आयुक्त शिवशंकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार प्रकरण ८ अ ८१ ब प्रमाणे रीतसर कायदेशीर कारवाई करावी आणि कारवाईचा अहवाल सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, असे महापौर माळवी यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्टांपेक्षा जास्त कर्जमंजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (पीएमइजीपी) जिल्ह्याचे काम उत्तमरीत्या सुरू असून, २०१४-१५ मध्ये उद्दिष्टापेक्षा जास्त शिफारशी करण्यात आल्या, तसेच उद्दिष्टापेक्षा जास्त उमेदवारांना बँकेकडून कर्जमुंजरी मिळाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शैलेश राजपूत यांनी दिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने सोमवारी जिल्हा उद्योग केंद्रात पीएमइजीपीच्या शिफारशीसंदर्भात आंदोलन केले होते, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राजपूत म्हणाले, 'खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने केंद्र सरकारच्या पीएमइजीपीच्या योजना देशभर राबविल्या जातात. जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी ग्रामोद्याग आयोग याची अंमलबजावणी करते. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्राला या योजनेसाठी २०१४-१५ मध्ये १३० लाभार्थी आणि एक कोटी ७७ लाख रुपयांचे मार्जिनमनी असे उद्दिष्ट होते, तर खादी ग्रामोद्याग मंडळाला ८० लाभार्थी आणि एक कोटी ७ लाख १७ हजार रुपयांचे मार्जिनमनी, खादी ग्रामोद्याग आयोगाला ८५ लाभार्थी आणि एक कोटी १३ लाख ९० हजार मार्जीनमनी असे उद्दिष्ट होते. या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे ९४१, खादी ग्रामोद्योग मंडळाकडे ५८०, तर खादी ग्रामोद्याग आयोगाकडे ४६० अर्ज आले होते.'

या योजनेचे नियंत्रण जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम कार्यबल समितीकडे असते. अर्जदारांच्या तटस्थ समितीकडून मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांच्या ‌शिफारशी बँकेकडे केल्या जातात. जिल्ह्यात एका लाभार्थीमागे चार उमेदवारांच्या शिफारशी कार्यबल समितीने केल्या होत्या. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राने ५२०, खादी ग्रामोद्योग मंडळाने ३२० तर खादी ग्रामोद्योग आयोगाने ३४० जणांच्या शिफारशी बँकांकडे केल्या होत्या. जिल्हा उद्योग केंद्राने केलेल्या ५२० शिफारशींपैकी २०१ जणांच्या प्रकल्पांना बँकांनी मंजुरी दिल्याचे राजपूत यांनी सांगितले.

जे उमेदवार मुलाखतीत अनुत्तीर्ण झाले, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कार्यबल समितीने अशा उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुलाखती सीसीटीव्ही कॅमेराबद्ध करण्यात आल्या आहेत. साहजिकच यातून जे उमेदवार पात्र ठरले, त्यांना या योजनेत सहभागी करताना जादा उद्दिष्टांसाठी खादी ग्रामोद्योग आयोगाची मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यानुसार प्रस्ताव बनवण्यात आला असून, त्याला ३१ मार्चला मंजुरी मिळाली आहे. ही नवीन मंजुरी २०१४ आणि २०१५ मधील अतिरिक्त उद्दिष्ट म्हणून मिळाल्याचे राजपूत यांनी सांगितले.

कार्यक्रम राबवत असताना जिल्हा उद्योग केंद्र पूर्णपणे पारदर्शीपणे राबवते. पीएमइजीपीसाठीचे मार्जीनमनी ही सबसिडी नसल्याचा खुलासा त्यांनी केला. बँका संपूर्ण रकमेचे कर्ज देतात आणि त्यांच्या अटी-शर्थींचे पालन झाल्यानंतरच ही सबसिडी मिळते असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौदे सोमवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांनी गुळात भेसळ करु नये. मात्र स्वतःच्या ब्रॅण्डखाली गूळ विक्री करताना व्यापाऱ्यांना बंधन राहील. भेसळ रोखण्यासाठी बाजार समिती, व्यापारी आणि अडते यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. येत्या सोमवार (ता. ६) पासून पूर्ववत गूळ सौदे सुरु करण्याचा तोडगा अडते, व्यापारी यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अन्न आणि औषध प्रशासनाने सौद्यात खरेदी केलेल्या गुळाची सॅम्पल घेऊन संपूर्ण गूळ जप्तीची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात व्यापारी आक्रमक होऊन गुळाचे सौदे बंद पाडल्याने वीस हजार रवे पडून राहिले. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित घटकांची गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीवेळी सौदे पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बहुतांशी व्यापाऱ्यांनी उत्पादक शेतकऱ्यांवर टीका केली. गूळ शेतकरी तयार करतात, मात्र कारवाई व्यापाऱ्यांवर केली जाते. त्यामुळे भेसळीला व्यापारी जबाबदार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि भेसळ करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी. आम्ही उत्पादक नाही, विक्रेते असल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी यावेळी मांडली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अन्न आणि औषध विभागाकडून झालेली कारवाई अनावधाने झाली आहे. मात्र स्वतःच्या ब्रॅण्डखाली व्यापारी गूळ विक्री करीत असल्यास आणि भेसळ झाल्याचे स्पष्ट झाल्यास कारवाई होईल. काही शेतकरी भेसळ करीत असल्यास संबंधित घटकांकडून प्रबोधन केले जाईल.'

बैठकीस जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर, बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल शहा, भगवान काटे, अडते, व्यापारी, बाजार समितीचे अधिकारी, उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’प्रश्नी टेंडर काढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

'हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या संचालकांनी राजीनामे दिल्यानंतर कारखाना सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. दौलत कारखाना भाडेतत्वार देण्यास कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे दौलत कारखाना भाडेतत्वार देण्यासाठी केडीसीसी बँकेने टेंडर काढावे, सभासद व शेतकऱ्यांचे सहाकार्य राहील,' अशी मागणीचा ठराव झाल्याचे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले. कॉ. आण्णा शिंदे अध्यक्षस्थानी होते.

डॉ. जाधव म्हणाले, 'दौलत कारखाना सुरु व्हावा ही सभासद व शेतकऱ्यां तीव्र इच्छा आहे. तालुक्यात खासगी कारखानदारीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दौलत कारखाना बंद पडल्यानंतर कारखान्यावर अवलंबून असलेल्या सर्वच लोकांची परवड झाली आहे. त्यामुळे हा कारखाना शक्य तितक्या लवकर सुरु होवून पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे, अशी इच्छा सर्वजण व्यक्त करत आहेत. त्यादृष्टीने संचालकांनी राजीनामे दिल्याने एक अडसर दूर झाला आहे. 'दौलत'वर केडीसीसी बँकेचा ताबा आहे. त्यामुळे केडीसीसीने सक्षम पार्टी आणून कारखाना सुरु करावा. तसेच चंदगडच्या स्वाभीमानी जनतेने शेतकरी, कामगारासह अन्य हितचितकांनी कारखाना सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा. दौलत कारखान्याचे ऑडीट करुन कर्जाची जबाबदारी आजी-माजी संचालकावर निश्चित करावी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे ठराव आजच्या मेळाव्यामध्ये मंजूर करण्यात आले. ' अर्जुन कुंभार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदीचा संपूर्ण ऊस गाळप करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

'चालू गळीत हंगामात शिरोळ तालुक्यात ऊस शिल्लक राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना टाकळीवाडीच्या गुरूदत्त शुगर्सने नोंदीच्या सर्व उसाचे गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवणी नोंदीमधील उसाचे शेवटचे कांडे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही,' अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली आहे.

गुरूदत्त शुगर्सने यंदाच्या गळीत हंगामात ६ लाख ५७ हजार ४४० मेट्रीक टन उसाचे गाळप करून सरसरी १३.२५ साखर उताऱ्याने ८ लाख ६५ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याचबरोबर १५ मार्चअखेर गाळप झालेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागात अजूनही ऊस शिल्लक आहे. यामुळे चालू वर्षी गाळपाअभावी ऊस शिल्लक राहतो की काय अशी भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ऊसतोडणी येणार कधी याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत गुरूदत्त शुगर्सने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ऊस तोडणीसंदर्भातील अडचणीसाठी शेती विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच यंदा नोंदीमधील तसेच पुरवणी नोंदीमधील सर्व उसाचे गाळप करू. उसाचे शेवटचे कांडे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.

ऊस गाळपाचा प्रश्न पुढील वर्षीही निर्माण होवू शकतो. पुढील गळीत हंगामात उसाचे क्षेत्र अधिक असणार आहे. त्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या को ०२६५ जातीच्या उसाचे क्षेत्र अधिक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावण व खोडवा उसाच्या नोंदणी लवकर गुरूदत्तकडे कराव्यात, असे आवाहनही घाटगे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे एक्झीक्युटव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, जे.आर.पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारूबंदीची आदर्श वाटचाल

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

दारूमुळे अनेकांची कुटुंबे आणि संसार देशोधडीला लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करणे म्हणजे सुशिक्षित तरुणाईसाठी क्रेझ बनू लागली आहे. व्यसने सोडण्यासाठी जागोजागी व्यसनमुक्ती केंद्रेही चालविली जात आहेत. या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेय ते अडाणी आणि अशिक्षित समजल्या जात असलेल्या आळतूरपैकी धनगरवाड्यावरील ग्रामस्थांनी. व्यसनामुळे होणाऱ्या तोट्यांचा विचार करून या वाड्यावरील ग्रामस्थांनी एकजुटीतून संपूर्ण दारूबंदीची मोहीम यशस्वीरीत्या चालविली आहे. संपूर्ण दारूबंदीचे त्यांचे हे २२ वे वर्ष आहे. दारूबंदीची ही सलग २२ वर्षे अखंडीत परंपरा चालू ठेवत इथल्या ग्रामस्थांनी समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

शहरीकरणापासून कोसो दूर असलेला हा आळतूरचा धनगरवाडा मलकापूर - कोकरूड मार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यांत वसला आहे. लोकसंख्या अवघी चारशे. त्यामध्ये अडीचशे पुरुष आणि दीडशेहून अधिक महिला. त्यातल्या पन्नास साठजणांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या - मुंबईचा रस्ता धरलाय. या वाडीतली अवघी दोनच मुले अलीकडेच कशीबशी ग्रॅज्युएट झालीत. लाकडाच्या मोळ्या विकणे, म्हशी आणि शेळ्यामेंढ्यापालन एवढाच काय तो इथला पोटासाठीचा व्यवसाय. वीस एक वर्षापूर्वी येथे मोलमजुरी करून मिळविलेला पै अन् पै दारू पिण्यात जायचा. वाडीमध्ये दारूमुळे होत असलेल्या परिणामांचा विचार करून इथले जुने जाणते कार्यकर्ते रामू येडगे यांनी वीस वर्षापूर्वी वाडीतल्या बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेत दारूबंदीची मुहूर्तमेढ रोवली.

दारूबंदीची शपथ दिल्यानंतर दारू पिणारा सापडल्यास पहिल्या वर्षी ५ हजार व तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी १० हजार रुपये दंड आकारला जात होता. गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून येथे दारूबंदीची मोहीम रुजली आहे. वाडीतले संपूर्ण अडीचशे लोक म्हणजे गावच या मोहिमेत मनातून सहभागी होतो.येथे अकरा सदस्य असलेल्या बिरोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष जयवंत मुडे यांच्या नियोजनाखाली वाड्यावर दरवर्षी दारूबंदीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रामनवमीला येथील अडीचशे ग्रामस्थांनी दारूबंदीची शपथ घेवून सुशिक्षित समाजासमोर सलग बाविसाव्या वर्षी अनोखा आदर्श घालून दिला आहे.

वाडीतले जुनेजाणते कार्यकर्ते रामू येडगे यांनी वीसएक वर्षापूर्वी वाड्यावर दारूबंदीबाबत घेतलेला महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामस्थांच्या हिताचा ठरला आहे. संपूर्ण दारूबंदीच्या या मोहिमेतून लोकांना चांगला अनुभव आला आहे. इतर गावांनीही याचा आदर्श जरूर घ्यावा. प्रत्येक कुटुंबाच्या हितासाठी दारूबंदीची ही मोहीम कायम चालू ठेवणार आहे.

- जयवंत मुडे, अध्यक्ष, बिरोबा बहुउद्देशीय मित्रमंडळ आळतूर धनगरवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटबंधारे उपविभाग स्थलांतरित होणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

शाहू काळापासून येथे कार्यरत असलेल्या भोगावती पाटबंधारे उपविभाग अधिकाऱ्यांच्या उपविभागीय कार्यालयाचे परिते (ता.करवीर) येथे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सरकारस्तरावर सुरु असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. यामुळे धरणाची सुरक्षा अणि कर्मचारीवर्गाच्या गैरसोयींसह अनेक प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. धरण प्रवेशबंदी आणि अनेक सुविधांच्या अभावामुळे आधीच भकास झालेल्या राधानगरी धरण परिसराला यामुळे पूर्णतः अवकळा येणार आहे. यामुळे या निर्णयास स्थानिक जनतेतून विरोध होत आहे.

धरण निर्मितीपासून धरणाच्या पायथ्याशी भोगावती पाटबंधारे विभागाचे हे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील भोगावती, कुंभी, कोगे, परिते, धामोड,कळे, आदी मुख्य प्रकल्पांसह वलवण,वेशरफ,आन्दुर अशा तीन लघुपाटबंधारे प्रकल्पाचा कारभार येथूनच चालतो. याशिवाय कोल्हापूर पद्धतीच्या बत्तीस बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर दैनंदिन कामकाजासह पाऊस आणि महापूर काळात धरण क्षेत्रांचे निंयत्रण आणि नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी या कार्यालयावर असते. कर्मचाऱ्यांचा सतत वावर येथे असल्याने दिवस-रात्र धरण क्षेत्रातील सुरक्षाही इथल्या कर्मचाऱ्यांना करावी लागते.

सुरक्षेच्या कारणावरुन पाच-सहा वर्षांपासून धरणावर पर्यटकांना प्रवेशबंदी केली असल्याने कर्मचारी वगळता इकडे फारसे कोणी फिरकत नाहीत. रस्ते, वीज, पर्यटक निवारा सुविधाची वानवा असल्याने स्थानिकासह पर्यटकही येथे येणे टाळतात. तर प्रवेशबंदीमुळे स्थानिक व्यापारी वर्गाला मोठा बसला आहे. त्यामुळे हळूहळू हा परिसर भकास होत असताना केवळ मध्यवर्ती अंतराचे कारण पुढे करुन हे कार्यालय परिते (ता.करवीर) येथे स्थलांतरित करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी सरकारच्या जलसंपदा विभागाने दीर्घ चर्चा केल्याचे समजते.

विभाजन करा, पण स्थलांतर नको

धरण, वीजनिर्मितीगृह आणि हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याचे स्थलांतर करू नये. हवे तर विभाजन करा,केवळ काही कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेवू नये,नियोजित ठिकाणही गैरसोयीचे असल्याने हे मुख्यालय हलवूच नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यातच धरण सुरक्षा आणि महापूर नियंत्रणास मर्यादा येणार असून हा परिसर निर्मनुष्य होण्याची शक्यता असल्याने येत्या काळात हा विरोध अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

केवळ मध्यवर्ती ठिकाण याच कारणास्तव संबधित उपविभाग स्थलांतरित होणार असल्याची चर्चा मंत्रालयस्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत संबधित कार्यालयास अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.

- बी. एस. घुणकीकर, उपअभियंता भोगावती पाटबंधारे उपविभाग

धरण, वीजनिर्मिती केंद्र याबरोबरच हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याला ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. स्थलांतराऐवजी या पाटबंधारे उपविभागाचे विभाजन करा पण त्याचे स्थानिक अस्तित्व कायम ठेवा. यामुळे धरणावरील नियोजित शाहू स्मारकाचीही देखभाल होण्यास मदत होईल.

- अभिजीत तायशेटे, अर्थ व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबाला जाताना टेंपो उलटून १४ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंपो उलटून होऊन झालेल्या अपघातात १४ भाविक जखमी झाले. जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या कासारी घाटाच्या वळणावर अपघात झाला. अपघातातील जखमी सांगली जिल्ह्यातील तासगांव येथील आहेत. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तासगांव येथील गणेश श्रीकांत माळी (वय २६, रा. सूर्यवंशी गल्ली, गुरूवार पेठ) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. गणेश माळी यांच्या कुटुंबातील सदस्य टेंपोने गुरूवारी सकाळी अकरा वाजता तासगावाहून जोतिबाकडे निघाले. दुपारी दीडच्या सुमारास संभापूरमार्गे जोतिबाकडे जात असताना कासारी घाटाच्या वळणाराव टेंपो उलटला. टेंपोतील काही लोक बाहेर पडले. त्यांनी जखमी असलेल्या लोकांना बाहेर काढले. दरम्यान, या घटनेची मा​हिती शहर वाहतूक निरीक्षक आर.आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन रूग्णवाहिकांतून जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास पाठवले. जखमींच्या डोक्याला, पायाला व हाताला जखमा झाल्या आहेत.

जखमींमध्ये वर्षा विनायक माळी (वय २८), गणेश श्रीकांत माळी (२८), श्रीकांत दगडू माळी (५०), विमल राजाराम माळी (५०), सोनाबाई दगडू माळी (६५), मंगल दशरथ माळी (४६), काजल दशरथ माळी (१८), दशरथ संभाजी माळी (४६), आनंदा पांडुरंग म्हेत्रे (५६), वनिता श्रीकांत माळी (५०), संस्कार शंकर माळी (१०), शांताबाई आनंदा माळी (५०), श्रीमती मंगल विलास सूर्यवंशी (५५), पूनम गणेश माळी (२८) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल फलकांवर इचलकरंजीत कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पार्किंग जागेचा वापर डिजीटल फलक लावून प्रसिद्धीसाठी होत असल्याने नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने फॉर्च्युन प्लाझासमोरील डिजीटल फलक कारवाई करुन हटविले. गेल्या दोन दिवसांपासून गरपालिकेची कारवाई सुरु असल्याने सर्वसामान्य नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

घरगुती व व्यापारी संकुलाची उभारणी करताना वाहन पार्किंगसाठी जागा सोडण्याची अट घालत असते. मात्र कायदा धाब्यावर बसवून बिल्डर लॉबी याचा गैरफायदा घेत असल्याचे उघड झाले होते. फॉर्च्युन प्लाझाच्या पार्किंग जागेवर दुकानगाळ्यासह दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करुन वाहनधारकांकडून पैसे उकळले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दोन दिवसांपूर्वी प्लाझासमोरील पार्किंग वाहनधारकांना मोफत केले होते.

बुधवारी अतिक्रमण विभागाने प्लाझासमोर असलेले डिजीटल फलक, जाहीरातीसाठी लावलेले कमान जप्त करुन ताब्यात घेतले. या कारवाईस सुरुवातीला प्लाझाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी फौजफाट्यासह गेलेल्या पथकास साहित्य जप्त करुन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सलग दुसऱ्या दिवशीही प्लाझासमोरील अतिक्रमण हटविल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील पार्किंगची जागा व्यापलेल्या व्यापारी संकुलचालकांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयजीएम खासगीकडे नको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय खासगी पद्धतीने चालविण्यास देण्याचा सरकारचा डाव आहे. त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जोरदार विरोध करेल, अशा आशयाचा ठराव येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश हाळवणकर यांनी आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने सरकारकडे चालविण्यास देऊ, असे आश्वासन दिले होते. आता भाजप शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी आपला शब्द फिरविला असून, भूमिका बदलली आहे. हे रुग्णालय नगरपालिकेनेच चालवावे. खासगीकडे चालविण्यास देण्यास माकपचा विरोध राहील. दरम्यान, दवाखाना सरकारने चालवावा, अशा आशयाची याचिका अॅड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दवाखान्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय पालिकेस घेता येणार नाही, असेही या पत्रकात नमूद केले आहे. यावेळी आनंदराव चव्हाण, शिवगोंड खोत, दत्ता माने, सदा मलाबादे, ए. बी. पाटील, भाऊसाहेब सूर्यवंशी, जयंत बलुगडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images