Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांडपाणीप्रश्नी नोटीस देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'सांडपाणी थेट हिरण्यकेशी नदीत' अशा मथळ्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिद्ध होताच पक्ष, संघटना आणि प्रशासन जागे झाले आहे. गेली काही वर्ष अव्याहतपणे सुरु असलेल्या या प्रकाराची प्रशासनाने सुद्धा गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात पालिकेला नोटीस देत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमनर यांनी सांगितले.

गडहिंग्लज शहराचे सांडपाणी नदीवेस परिसरात साठप करून शेतीला वापरले जाते. या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. तसेच गेली चार वर्ष गाळसुद्धा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याची साठप क्षमतासुद्धा कमी झाली आहे. सांडपाण्यासंदर्भात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पालिकेमार्फत चार वर्षांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया करणारे सुमारे १५ कोटींचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न झाले. तसेच शहरातील विविध भागातील सांडपाळयासाठी संपूर्ण भुयारी गटर योजनासुद्धा राबविण्यात येणार होती. दोन्ही मिळून सुमारे २५ कोटींचा हा प्रस्ताव मध्येच रखडला. मात्र सांडपाणी आणि त्याचे दुष्परिणाम पाहता या प्रस्तावाबाबत फेरविचार होऊन अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

शरीरावर हिरवट तवंग

याबाबत बोलताना हिरण्यकेशी जलविहार मंडळाचे सदस्य गंगाधर हिरेमठ म्हणाले, 'नदीवेस परिसरासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीघाटावर आंघोळीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी नदीत मिसळत असल्याने अंगाला खाज सुटणे, लाल होणे यासारखे त्वचारोग सुरु झाले आहेत. आंघोळ करून बाहेर पडताना शरीरावर हिरवट तवंग साचलेला असतो. याप्रश्नी त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे.

सांडपाणी हिरण्यकेशी नदीपात्रात थेट मिसळणे ही गंभीर गोष्ट आहे. यासंदर्भात आपण स्वतः पाहणी करून पालिकेला नोटीस पाठवत आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही.

- कुणाल खेमनार, सहाय्यक जिल्हाधिकारी

गडहिंग्लज शहरातील सांडपाण्यामुळे पूर्व भागातील गावांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. याविषयाबाबत शिवसेनेकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. लवकरच प्रदूषण मंडळालासोबत घेऊन योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख

नदीवेस परिसरातील सांडपाणी ठिकाणाची कालच पाहणी केली. तातडीने दोन टप्प्यात यासंबंधी योग्य निर्णय घेणार आहे. येत्या आठवड्याभरात सर्वप्रथम सांडपाणी साठपातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल. तसेच पुढील टप्प्यात सांडपाणी प्रक्रियासंदर्भात प्रकल्प सादर करून पाठपुराव्यासाठी प्रयत्न करू.

- तानाजी नरळे, मुख्याधिकारी नगरपरिषद

गडहिंग्लज हे निसर्गसंपन्न शहर म्हणून ओळखले जाते. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे पाणी प्रदूषित होते. ज्याचा पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जुलाब, त्वचारोगासारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र समस्येचे नेमके मूळ या लोकांना माहित नाही.

- अनंत पाटील, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत विचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कराड ते चिपळूण या नवीन रेल्वेमार्गासाठी बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्याच्या आशा मावळल्या होत्या, पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर ते वैभववाडी हा नवा रेल्वेमार्ग करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितल्याने आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या मार्गाचा सर्व्हे झाला असून, तो प्रत्यक्षात कितपत यशस्वी होईल याची सध्या चाचपणी सुरू आहे.

वैभववाडी व राजापूर असे दोन मार्ग कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठी आहेत. त्यांचे सर्व्हे झाले आहेत. त्यातील राजापूर मार्ग सुरू झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च लवकर भरून निघेल, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. वैभववाडी मार्ग राजापूरप्रमाणेच नजीकचा आहे. या मार्गामध्ये मात्र ​वनविभागाच्या जमिनीचा फार अडथळा येणार नाही अशी ​परिस्थिती आहे. त्यामुळे या मार्गाचा प्राधान्याने विचार रेल्वे मंत्र्यांच्या पातळीवर केला जात आहे.

कराड ते चिपळूण मार्गासाठीही वनविभागाच्या जमिनीचे मोठे अडथळे आहेत. त्याच्याबरोबरच कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्याच्या प्रस्तावालाही अडथळा येऊ नये म्हणून कमीत कमी अडचणीचा मार्ग निवडला जाण्याची शक्यता आहे.

सध्या तरी या मार्गाबाबत केवळ विचार सुरू असला तरी कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा मार्ग झाल्यास कमीत कमी वेळात कोकणात जाणे शक्य होणार आहे. तसेच जयगड बंदरातील मालवाहतूकही या मार्गाने पूर्व किनाऱ्याशी वेगाने होणार आहे. कोकण रेल्वेला हा पर्यायी मार्गही होऊ शकतो. त्यामुळे कोकण तसेच कोल्हापूरचा विकासही मोठया वेगाने होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरार जावीरसह तिघांना नांदेडमध्ये अटक

$
0
0

कोल्हापूरः पोलिसांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्यावर हल्ला करून पळून गेलेला जन्मठेपेतील कैदी विजय ऊर्फ बबलू संजय जावीर याला कोल्हापूर पोलिसांनी नांदेड शहरात अटक केली. तसेच त्याला मदत करणाऱ्या पिंटू ऊर्फ धनाजी जाधव, अंकुश गरड यांनाही अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा व सायबर सेलने ही कारवाई केली. तब्बल चार महिन्यांनंतर बबलूला पकडण्यात यश मिळाले. जावीर सोलापूर व नांदेड येथे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व अनिल देशमुख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथके करून कुर्डूवाडी (सोलापूर) व नांदेड येथे पाठविली. जाधव व गरड रेल्वेतून नांदेडला जात असताना पोलिसांनी त्यांचा नांदेडपर्यंत पाठलाग केला. जाधव व गरड नांदेडमध्ये उतरले. पोलिसांनी त्यांचा विष्णूनगर हनुमान नगरपर्यंत पाठलाग करुन तिघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आखूड धावपट्टीचा विमानसेवेत अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळाच्या आखूड धावपट्टीमुळे येथील विमानसेवा सुरू होण्यास अडथळा येत असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडियाच्या काही अधिकाऱ्यांनी विमानसेवा सुरू करण्याच्यादृष्टीने कोल्हापूर विमानतळास भेट दिली. यावेळी त्यांनी आखूड धावपट्टी वाढवल्याखेरीज कोल्हापूर विमानसेवा सुरू करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धावपट्टी वाढवण्याच्यादृष्टीनेच तातडीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आठ विविध विमानतळांसाठी ९१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच केंद्र सरकारच्या पातळीवरही निधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विमानसेवा कशी सुरू होईल यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. खासगी विमान कंपन्यांकडे याबाबतचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. एअर इंडियाकडेही ७२ व ४८ आसन क्षमतेची विमाने आहेत. त्यांची सेवा सुरू करता येईल का, या पाहणीसाठी त्यांचे काही अधिकारी कोल्हापूर विमानतळावर आले होते. त्यांनी धावपट्टीची पाहणी केली. ती आखूड असल्याचे त्यांचे मत झाले. त्यामुळे धावपट्टीच्या विस्तारीकरणाशिवाय त्यांच्याबरोबर इतर कंपन्यांनाही सेवा सुरू करता येणे अशक्य असल्याचे त्यांच्याकडून सांगितल्याचे समजते.

याबाबत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'या पाहणीमुळे प्रथम धावपट्टीचे विस्तारीकरण हा विषय अग्रक्रमावर ठेवला आहे. त्यासाठी वन विभागाच्या जमिनीचा अडथळा दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जाणार आहेत. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कासची उंची वाढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

कास तलावाची उंची वाढविण्यासाठी सर्व आवश्यक परवानगी मिळाल्या आहेत. त्यामुळे या धरणांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सारस यांनी दिली.

आमदार शिवेंद्रराजे यांनी या परवानग्यांसाठी पाठपुरावा केल्याचेही सारस यांनी सांगितले. शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगर परिषदेने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांमया सुचनेनुसार कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या प्रस्तावाला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली होती. वन विभाग, पर्यावरण विभाग आणि पुरातत्व खात्याकडून आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आता मिळाल्या आहेत.

कास धरणाची उंची वाढवण्यासाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. धरणाची भिंत वाढवण्यासाठी आवश्यक असणारी २.६७ हेक्टर जमीन वन विभागाने देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी वन विभागाला निकषानुसार रक्कमही अदा करण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याच्या मुंबई कार्यालयाकडून कास धरणाची उंची वाढविण्यामया कामाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून हे प्रमाणपत्र बुधवारी नगर परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या निधीला कात्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेत सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद निधी वाटपातही पडले असून, महापौरांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून प्रभागातील कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतही आकड्यांचा खेळ करत आपल्याला 'एप्रिल फूल' बनविल्याची भावना नगरसेवकांमध्ये वाढीस लागली आहे. अंदाजपत्रकाची मांडणी करताना नगरसेवकांच्या निधीत वाढीची घोषणा होती. मात्र, 'वाढ व घट' परिपत्रकात प्रत्यक्षात निधीत घट केल्याचे समोर आले आहे. स्थायी समिती सभापतींनी स्वतःच्या प्रभागातील विकासकामांसाठी तब्बल ८४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. परिणामी नगरसेवक उपाशी अन् स्थायी सभापती तुपाशी अशीच काहीही परिस्थिती निर्माण झाली आहे.

स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अंदाजपत्रकाची मांडणी करताना नगरसेवकांना प्रभागातील ऐच्छिक विविध विकासकामांसाठी प्रशासनाने सुचविलेल्या निधीमध्ये वाढ केल्याचे घोषित केले होते. त्यानुसार उपनगरांतील नगरसेवकांना सात लाख, शहरातील नगरसेवकांना सहा लाख, स्वीकृत नगरसेवकांना चार लाख रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली. मात्र, वाढ व घट परिपत्रकात उपनगरांतील नगरसेवकांसाठी पाच, शहरी भागातील नगरसेवकांना चार तर स्वीकृत सदस्यांना दोन लाख रुपयांची तरतुदीचा उल्लेख आहे. अनुदानाच्या तरतुदीवरून फसवणूक केल्याची ओरड विरोधी शिवसेना, भाजप नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांतून सुरू झाली आहे.

महापौरांच्या निधीला कात्री

महापौरांना ऐच्छिक निधीअंतर्गत ४० लाखांहून अधिक निधीची तरतूद केली जाते. काही महापौरांनी स्वतःच्या अ​धिकारात उपसूचना देऊन हा निधी ८० लाखांपासून एक कोटीपर्यंत नेला होता. महापालिकेत सध्या महापौरांच्या राजीनाम्यावरून राजकारण सुरू आहे. महापौर आणि काँग्रेस आघाडीतील संघर्ष टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद अर्थसंकल्पात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानावरही पडल्याची चर्चा नगरसेवकांत आहे. महापौरांना ऐच्छिक विकासकामांसाठी केवळ १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तितकीच तरतूद स्थायी समिती सभापतींना केली आहे. बजेटदिनी उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेत्यांना प्रत्येकी १५ लाखांच्या निधीच्या तरतुदीची घोषणा केली होती. मात्र, नगरसेवकांना मिळालेल्या परिपत्रकात या तिघांनाही प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याचे म्हटले आहे. स्थायी समिती सदस्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

स्थायी समिती सभापतींनी सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे होता. स्थायी समिती सभापतींनी स्वतःच्या प्रभागातील विकासकामांसाठी तब्बल ८४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याने बाकीचे नगरसेवक उपाशी तर सभापती तुपाशी खाताहेत असा हा प्रकार आहे. निधीच्या अनुदानावरून फसवणूक झाली आहे.

- आर. डी. पाटील, नगरसेवक

नगरसेवकांना ऐच्छिक कामासाठी दोन लाखांची तरतूद केली होती. त्यामध्ये वाढ केली आहे. पदाधिकाऱ्यांच्या अनुदानात कपात करून हा निधी दिला आहे. निधी वाटपावरून सदस्यांची फसवणूक केली नाही. रथोत्सव मार्गासाठी निधीची तरतूद केली आहे. माझ्या प्रभागात जादा निधी घेतला या टीकेत तथ्य नाही.

- आदिल फरास, सभापती, स्थायी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’साठी जुळवाजुळव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दोन पॅनेल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलचे नेते गोकुळसाठी मदत होणाऱ्या गटांना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचवेळी वेगवेगळ्या गटांनी आपल्याला किमान एक जागा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी मंडलिक गटाच्या नेत्याशी चर्चा केली. तर आमदार चंद्रदीप नरके गटाने आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन आपल्याला करवीर मतदारसंघातील एक जागा देण्याची मागणी केली. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिकाही घेतली.

गोकुळ दूध संघासाठी नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार भेटीगाठी सुरू आहेत. गोकुळमध्ये सर्वांनी एकत्र येऊन लढावे, यासाठी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांचा प्रयत्न सुरू असताना वेगवेगळ्या गटांची जुळवाजुळव सुरू आहे. तर या गटांनी आपल्याला एखाद दुसरी जागा मिळावी यासाठी नेत्यांकडे हट्ट करण्यास सुरूवात केली आहे. गटांना आपल्याकडे वळविण्यासाठी माजी मंत्री सतेज पाटील यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी खुद्द माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला असून माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनाच्या निमित्ताने विचारपूस करण्यासाठी मंडलिक गटाचे नेते संजय मंडलिक यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी सतेज पाटील करत असलेल्या पॅनेलला मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटानेही आमदार महादेवराव महाडिक गटाची भेट घेतली. आमदार म्हणून आपल्याला एक जागा मिळावी, अशी मागणी आमदार गटाकडून करण्यात आली आहे. करवीर तालुक्यात आमदार म्हणून चंद्रदीप नरके गटाची जी ताकद आहे. त काही नेत्यांना चार चार जागा दिल्या जातात. त्याप्रमाणे आमदार गटाने केवळ एकच जागा मागितली असल्याचे आमदार गटाचे म्हणणे आहे. आमदार गटाच्यावतीने अनिल पाटील (वाकरे) आणि किशोर पाटील (शिरोली) या दोन इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

'चुयेकरांची जागा आम्हाला द्या'

दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर देण्यात येणारा उमेदवार हा चंद्रदीप नरके गटाला असे म्हटले जात असले तरी चुयेकरनी संघाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे नेत्यांचे काम आहे. त्यासाठी त्यांच्या वारसांना उमेदवारी दिली पाहिजे. ती उमेदवारी आमदार गटाची होत नाही. त्याबरोबरच ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचेही वेगळे योगदान आहे. त्याचा विचार नेत्यांनी करायचा आहे. त्यामुळे आमदार नरके म्हणून असलेल्या ताकदीचा विचार करून एक जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

'गोकुळच्या निवडणुकीत कोणाला मदत करायची याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आलेली आहे. याबाबतचा निर्णयही झालेला आहे. पण, याबाबत चार एप्रिलला निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.'

- प्रा. संजय मंडलिक

'गोकुळमध्ये करवीरमधील एक जागा तत्कालीन आमदार सतेज पाटील यांना देण्यात आली होती. आता ती जागा रिकामी झाल्याने त्यावर आम्ही हक्क सांगितला आहे. आमच्या ताकदीचा विचार करता ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे.'

- आमदार चंद्रदीप नरके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफ-घाटगेंची पुन्हा खडाखडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

विधानसभा निवडणुकीत आमने सामने आलेल्या माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे यांच्यात पुन्हा एकदा खडाखडी सुरु झाली आहे. आमदार मुश्रीफ यांचे आगामी राजकारण आणि संजय घाटगे यांच्यासमोरील पुन्हा प्रस्थापित होण्याबरोबरच गोकुळची सत्ता टिकविण्याचे आव्हान या खडाखडीपाठीमागील राजकारण आहे. अंबरिष घाटगे यांना मुश्रीफ यांचा विरोध याच राजकारणाचा भाग आहे.

सध्या गोकुळमध्ये सत्ताधारी गटात संजय घाटगे यांचे चिरंजीव अंबरिष घाटगे यांना उमेदवारी देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चित होण्याअगोदरच आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध सुरु केला आहे. जर सत्ताधारी पॅनेलमध्ये हसन मुश्रीफ यांचा समावेश निश्चित असेल तर संजय घाटगे यांना अडचणी येऊ शकतात.

गोकुळ संचालकांच्या यादीत दोनच महिलांचा समावेश आहे. आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या मातोश्री आणि संजय घाटगे यांच्या पत्नी अरुंधती घाटगे यांचा समावेश आहे. गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा शशिकांत यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. परंतु शशिकांत यांना तीन अपत्ये असल्याने तो एक मोठा वादाचा विषय होवू शकतो. याशिवाय विधानसभा निवडणूकीत शशिकांत यांनी अमल महाडीक यांचा प्रचार न करता सतेज पाटील यांचा प्रचार केला होता. त्याचा वचपा महादेवराव महाडिक उमेदवारीच्या माध्यमातून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शशिकांत यांच्याऐवजी त्यांच्या आईंना उमेदवारी देण्यावर महाडिक ठाम आहेत. तसे झाल्यास साहजिकच अरुंधती घाटगे यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र अंबरिष घाटगे यांना उमेदवारी सत्ताधारी गटातून मिळू शकते.

मुश्रीफ यांच्या प्रखर विरोधानंतरही पी. एन. पाटील यांच्याशी एकनिष्ठतेचा फायदा म्हणून घाटगे गटाची उमेदवारी निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत अंबरिष घाटगे यांनी हाताळलेली यंत्रणा पाहता मुश्रीफांचा त्यांना विरोध संयुक्त‌ीक वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदीचा संपूर्ण ऊस गाळप करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

'चालू गळीत हंगामात शिरोळ तालुक्यात ऊस शिल्लक राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना टाकळीवाडीच्या गुरूदत्त शुगर्सने नोंदीच्या सर्व उसाचे गाळप करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरवणी नोंदीमधील उसाचे शेवटचे कांडे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही,' अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी दिली आहे.

गुरूदत्त शुगर्सने यंदाच्या गळीत हंगामात ६ लाख ५७ हजार ४४० मेट्रीक टन उसाचे गाळप करून सरसरी १३.२५ साखर उताऱ्याने ८ लाख ६५ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याचबरोबर १५ मार्चअखेर गाळप झालेल्या उसाचे बिलही शेतकऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागात अजूनही ऊस शिल्लक आहे. यामुळे चालू वर्षी गाळपाअभावी ऊस शिल्लक राहतो की काय अशी भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ऊसतोडणी येणार कधी याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत गुरूदत्त शुगर्सने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ऊस तोडणीसंदर्भातील अडचणीसाठी शेती विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच यंदा नोंदीमधील तसेच पुरवणी नोंदीमधील सर्व उसाचे गाळप करू. उसाचे शेवटचे कांडे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.

ऊस गाळपाचा प्रश्न पुढील वर्षीही निर्माण होवू शकतो. पुढील गळीत हंगामात उसाचे क्षेत्र अधिक असणार आहे. त्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या को ०२६५ जातीच्या उसाचे क्षेत्र अधिक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावण व खोडवा उसाच्या नोंदणी लवकर गुरूदत्तकडे कराव्यात, असे आवाहनही घाटगे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे एक्झीक्युटव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, जे.आर.पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूबंदीची आदर्श वाटचाल

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

दारूमुळे अनेकांची कुटुंबे आणि संसार देशोधडीला लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारची व्यसने करणे म्हणजे सुशिक्षित तरुणाईसाठी क्रेझ बनू लागली आहे. व्यसने सोडण्यासाठी जागोजागी व्यसनमुक्ती केंद्रेही चालविली जात आहेत. या सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेय ते अडाणी आणि अशिक्षित समजल्या जात असलेल्या आळतूरपैकी धनगरवाड्यावरील ग्रामस्थांनी. व्यसनामुळे होणाऱ्या तोट्यांचा विचार करून या वाड्यावरील ग्रामस्थांनी एकजुटीतून संपूर्ण दारूबंदीची मोहीम यशस्वीरीत्या चालविली आहे. संपूर्ण दारूबंदीचे त्यांचे हे २२ वे वर्ष आहे. दारूबंदीची ही सलग २२ वर्षे अखंडीत परंपरा चालू ठेवत इथल्या ग्रामस्थांनी समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

शहरीकरणापासून कोसो दूर असलेला हा आळतूरचा धनगरवाडा मलकापूर - कोकरूड मार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यांत वसला आहे. लोकसंख्या अवघी चारशे. त्यामध्ये अडीचशे पुरुष आणि दीडशेहून अधिक महिला. त्यातल्या पन्नास साठजणांनी पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या - मुंबईचा रस्ता धरलाय. या वाडीतली अवघी दोनच मुले अलीकडेच कशीबशी ग्रॅज्युएट झालीत. लाकडाच्या मोळ्या विकणे, म्हशी आणि शेळ्यामेंढ्यापालन एवढाच काय तो इथला पोटासाठीचा व्यवसाय. वीस एक वर्षापूर्वी येथे मोलमजुरी करून मिळविलेला पै अन् पै दारू पिण्यात जायचा. वाडीमध्ये दारूमुळे होत असलेल्या परिणामांचा विचार करून इथले जुने जाणते कार्यकर्ते रामू येडगे यांनी वीस वर्षापूर्वी वाडीतल्या बिरोबा देवाच्या वार्षिक यात्रेत दारूबंदीची मुहूर्तमेढ रोवली.

दारूबंदीची शपथ दिल्यानंतर दारू पिणारा सापडल्यास पहिल्या वर्षी ५ हजार व तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी १० हजार रुपये दंड आकारला जात होता. गेल्या सतरा ते अठरा वर्षापासून येथे दारूबंदीची मोहीम रुजली आहे. वाडीतले संपूर्ण अडीचशे लोक म्हणजे गावच या मोहिमेत मनातून सहभागी होतो.येथे अकरा सदस्य असलेल्या बिरोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष जयवंत मुडे यांच्या नियोजनाखाली वाड्यावर दरवर्षी दारूबंदीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रामनवमीला येथील अडीचशे ग्रामस्थांनी दारूबंदीची शपथ घेवून सुशिक्षित समाजासमोर सलग बाविसाव्या वर्षी अनोखा आदर्श घालून दिला आहे.

वाडीतले जुनेजाणते कार्यकर्ते रामू येडगे यांनी वीसएक वर्षापूर्वी वाड्यावर दारूबंदीबाबत घेतलेला महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामस्थांच्या हिताचा ठरला आहे. संपूर्ण दारूबंदीच्या या मोहिमेतून लोकांना चांगला अनुभव आला आहे. इतर गावांनीही याचा आदर्श जरूर घ्यावा. प्रत्येक कुटुंबाच्या हितासाठी दारूबंदीची ही मोहीम कायम चालू ठेवणार आहे.

- जयवंत मुडे, अध्यक्ष, बिरोबा बहुउद्देशीय मित्रमंडळ आळतूर धनगरवाडा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटबंधारे उपविभाग स्थलांतरित होणार?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

शाहू काळापासून येथे कार्यरत असलेल्या भोगावती पाटबंधारे उपविभाग अधिकाऱ्यांच्या उपविभागीय कार्यालयाचे परिते (ता.करवीर) येथे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सरकारस्तरावर सुरु असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. यामुळे धरणाची सुरक्षा अणि कर्मचारीवर्गाच्या गैरसोयींसह अनेक प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. धरण प्रवेशबंदी आणि अनेक सुविधांच्या अभावामुळे आधीच भकास झालेल्या राधानगरी धरण परिसराला यामुळे पूर्णतः अवकळा येणार आहे. यामुळे या निर्णयास स्थानिक जनतेतून विरोध होत आहे.

धरण निर्मितीपासून धरणाच्या पायथ्याशी भोगावती पाटबंधारे विभागाचे हे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील भोगावती, कुंभी, कोगे, परिते, धामोड,कळे, आदी मुख्य प्रकल्पांसह वलवण,वेशरफ,आन्दुर अशा तीन लघुपाटबंधारे प्रकल्पाचा कारभार येथूनच चालतो. याशिवाय कोल्हापूर पद्धतीच्या बत्तीस बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर दैनंदिन कामकाजासह पाऊस आणि महापूर काळात धरण क्षेत्रांचे निंयत्रण आणि नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी या कार्यालयावर असते. कर्मचाऱ्यांचा सतत वावर येथे असल्याने दिवस-रात्र धरण क्षेत्रातील सुरक्षाही इथल्या कर्मचाऱ्यांना करावी लागते.

सुरक्षेच्या कारणावरुन पाच-सहा वर्षांपासून धरणावर पर्यटकांना प्रवेशबंदी केली असल्याने कर्मचारी वगळता इकडे फारसे कोणी फिरकत नाहीत. रस्ते, वीज, पर्यटक निवारा सुविधाची वानवा असल्याने स्थानिकासह पर्यटकही येथे येणे टाळतात. तर प्रवेशबंदीमुळे स्थानिक व्यापारी वर्गाला मोठा बसला आहे. त्यामुळे हळूहळू हा परिसर भकास होत असताना केवळ मध्यवर्ती अंतराचे कारण पुढे करुन हे कार्यालय परिते (ता.करवीर) येथे स्थलांतरित करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी सरकारच्या जलसंपदा विभागाने दीर्घ चर्चा केल्याचे समजते.

विभाजन करा, पण स्थलांतर नको

धरण, वीजनिर्मितीगृह आणि हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याचे स्थलांतर करू नये. हवे तर विभाजन करा,केवळ काही कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेवू नये,नियोजित ठिकाणही गैरसोयीचे असल्याने हे मुख्यालय हलवूच नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यातच धरण सुरक्षा आणि महापूर नियंत्रणास मर्यादा येणार असून हा परिसर निर्मनुष्य होण्याची शक्यता असल्याने येत्या काळात हा विरोध अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

केवळ मध्यवर्ती ठिकाण याच कारणास्तव संबधित उपविभाग स्थलांतरित होणार असल्याची चर्चा मंत्रालयस्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत संबधित कार्यालयास अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.

- बी. एस. घुणकीकर, उपअभियंता भोगावती पाटबंधारे उपविभाग

धरण, वीजनिर्मिती केंद्र याबरोबरच हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याला ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. स्थलांतराऐवजी या पाटबंधारे उपविभागाचे विभाजन करा पण त्याचे स्थानिक अस्तित्व कायम ठेवा. यामुळे धरणावरील नियोजित शाहू स्मारकाचीही देखभाल होण्यास मदत होईल.

- अभिजीत तायशेटे, अर्थ व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबाला जाताना टेंपो उलटून १४ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टेंपो उलटून होऊन झालेल्या अपघातात १४ भाविक जखमी झाले. जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या कासारी घाटाच्या वळणावर अपघात झाला. अपघातातील जखमी सांगली जिल्ह्यातील तासगांव येथील आहेत. त्यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

तासगांव येथील गणेश श्रीकांत माळी (वय २६, रा. सूर्यवंशी गल्ली, गुरूवार पेठ) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. गणेश माळी यांच्या कुटुंबातील सदस्य टेंपोने गुरूवारी सकाळी अकरा वाजता तासगावाहून जोतिबाकडे निघाले. दुपारी दीडच्या सुमारास संभापूरमार्गे जोतिबाकडे जात असताना कासारी घाटाच्या वळणाराव टेंपो उलटला. टेंपोतील काही लोक बाहेर पडले. त्यांनी जखमी असलेल्या लोकांना बाहेर काढले. दरम्यान, या घटनेची मा​हिती शहर वाहतूक निरीक्षक आर.आर. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन रूग्णवाहिकांतून जखमींना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास पाठवले. जखमींच्या डोक्याला, पायाला व हाताला जखमा झाल्या आहेत.

जखमींमध्ये वर्षा विनायक माळी (वय २८), गणेश श्रीकांत माळी (२८), श्रीकांत दगडू माळी (५०), विमल राजाराम माळी (५०), सोनाबाई दगडू माळी (६५), मंगल दशरथ माळी (४६), काजल दशरथ माळी (१८), दशरथ संभाजी माळी (४६), आनंदा पांडुरंग म्हेत्रे (५६), वनिता श्रीकांत माळी (५०), संस्कार शंकर माळी (१०), शांताबाई आनंदा माळी (५०), श्रीमती मंगल विलास सूर्यवंशी (५५), पूनम गणेश माळी (२८) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल फलकांवर इचलकरंजीत कारवाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पार्किंग जागेचा वापर डिजीटल फलक लावून प्रसिद्धीसाठी होत असल्याने नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने फॉर्च्युन प्लाझासमोरील डिजीटल फलक कारवाई करुन हटविले. गेल्या दोन दिवसांपासून गरपालिकेची कारवाई सुरु असल्याने सर्वसामान्य नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.

घरगुती व व्यापारी संकुलाची उभारणी करताना वाहन पार्किंगसाठी जागा सोडण्याची अट घालत असते. मात्र कायदा धाब्यावर बसवून बिल्डर लॉबी याचा गैरफायदा घेत असल्याचे उघड झाले होते. फॉर्च्युन प्लाझाच्या पार्किंग जागेवर दुकानगाळ्यासह दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करुन वाहनधारकांकडून पैसे उकळले जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दोन दिवसांपूर्वी प्लाझासमोरील पार्किंग वाहनधारकांना मोफत केले होते.

बुधवारी अतिक्रमण विभागाने प्लाझासमोर असलेले डिजीटल फलक, जाहीरातीसाठी लावलेले कमान जप्त करुन ताब्यात घेतले. या कारवाईस सुरुवातीला प्लाझाने विरोध करण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी फौजफाट्यासह गेलेल्या पथकास साहित्य जप्त करुन ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सलग दुसऱ्या दिवशीही प्लाझासमोरील अतिक्रमण हटविल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील पार्किंगची जागा व्यापलेल्या व्यापारी संकुलचालकांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयजीएम खासगीकडे नको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील नगरपालिकेचे आयजीएम रुग्णालय खासगी पद्धतीने चालविण्यास देण्याचा सरकारचा डाव आहे. त्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जोरदार विरोध करेल, अशा आशयाचा ठराव येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत आमदार सुरेश हाळवणकर यांनी आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने सरकारकडे चालविण्यास देऊ, असे आश्वासन दिले होते. आता भाजप शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी आपला शब्द फिरविला असून, भूमिका बदलली आहे. हे रुग्णालय नगरपालिकेनेच चालवावे. खासगीकडे चालविण्यास देण्यास माकपचा विरोध राहील. दरम्यान, दवाखाना सरकारने चालवावा, अशा आशयाची याचिका अॅड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दवाखान्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय पालिकेस घेता येणार नाही, असेही या पत्रकात नमूद केले आहे. यावेळी आनंदराव चव्हाण, शिवगोंड खोत, दत्ता माने, सदा मलाबादे, ए. बी. पाटील, भाऊसाहेब सूर्यवंशी, जयंत बलुगडे उपस्थित होते.

Latest Images