Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नेटिझन्सची जबाबदारी वाढली

$
0
0

सोशल मीडियावरील कोर्टाच्या निकालाबाबत तज्ज्ञांचे मत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कार्टाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ रद्द केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया मोकाट सुटण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा जबाबदारीने उपयोग करण्याचे भान नेटीझन्समध्ये येण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर काही अक्षेपार्ह पोस्ट टाकली तर संबंधित व्यक्तीच्या अटकेचे अधिकार पोलिसांना देणारे हे कलम आहे. त्यानुसार ती वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही होती. पण सुप्रीम कोर्टाने हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनेतील तत्वांविरोधात असल्याचा निर्वाळा देत रद्द ठरवले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सॉफ्टवेअर प्रोफेशनल संभाजी शिंदे म्हणाले, 'एखादी प्रतिक्रियासुद्धा अक्षेपार्ह ठरवून पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई करू शकत होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा योग्यच म्हणावा लागतो. शेवटी काय अक्षेपार्ह आहे, हे ठरवायचे कसे असा प्रश्न निर्माण व्हायचा.'

भारतीय दंड संहितेनुसार अक्षेपार्ह, अश्लील किंवा अवमानकारक मजकूर असेल तर त्यावर कारवाईची तरतूद आहेच. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले. 'सोशल मीडियावर अनेक विषयांवर चर्चा होत असतात. बरेच नामवंत विचारवंत आपले विचार सोशल मीडीयावर टाकतात. त्यावर कमेंटच्या स्वरुपात चर्चा होते. अर्थात सोशल मीडियाचा गैरवापर होण्याचे प्रकारही मोठे आहे, हे नाकारण्यासारखे नाही, असे ते म्हणाले.

सोशल मीडिया आणि अन्य माध्यमे यांच्यात फरक असल्याचे सांगून ते म्हणाले, 'वृत्तपत्र, टीव्ही अशा माध्यमांत काय दाखवले जावे, काय छापले जावे यावर नियंत्रण असते. सोशल मीडियात तशी स्थिती नसते. एखादी बाब अक्षेपार्ह असल्याची तक्रार केल्यानंतरच ती पोस्ट संबंधित सोशल मीडीया हटवते, पण तशी तक्रार कुणी करायला पुढे येत नाही. तसेच सोशल मीडियाचा एकूण आवाका फारच मोठा असल्याने त्यावरून अफवांचे पीक पसरवण्यात, निवडणुकात विरोधकांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होताना ‌दिसतो. यावर कसे नियंत्रण आणायचे हा प्रश्नच आहे. त्यासंदर्भात काही यंत्रणा उभी करावी लागेल.'

सॉफ्टवेअर प्रोफेशनल गिरीष चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, 'ज्यांना टीव्ही, वृत्तपत्रे अशा पारंपरिक माध्यमांपर्यंत पोहचता येत नाही अशांना सोशल मीडियाचा आधार असतो. याचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करावे लागते. सोशल मीडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सनीच सतर्क असले पाहिजे. एखादी पोस्ट अक्षेपार्ह वाटली तर त्याविरोधात तक्रार केली पाहिजे. आवश्यकतेनुसार पोलिसांतही तक्रार केली पाहिजे. तसेच ऑनलाइन सिक्युरिटीचे पालन आपण स्वत:च केले तर ते योग्य ठरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गडहिंग्लजला यात्रेची लगबग सुरू

$
0
0

यात्रा कमिटी, पालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन; विधायक बाबींकडे लक्ष

दीपक मांगले, गडहिंग्लज

तब्बल चौदा वर्षांनंतर होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेसाठी गडहिंग्लजकरांची लगबग सुरू झाली आहे. यात्रा १ ते ७ मेअखेर होत असून महालक्ष्मी यात्रा कमिटी व नगरपालिका यांच्या संयुक्त पुढाकाराने यात्रेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. श्रद्धेसोबत यात्रा कमिटीने शहराच्या भविष्यकाळातील उपयुक्त अशा विधायक घटकांकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण यात्रा डिजिटल बोर्डविरहित करण्याचा निर्णय यात्रा कमिटीकडून घेण्यात आला आहे. याशिवाय महावितरण कंपनीने यात्राकाळात अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या दशकभरात उपनगरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहराच्या लोकसंख्येत भर पडत आहे. परिणामी नागरिकांना वाहतूक, नागरी सुविधा, गुन्हेगार अशा बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागते. यात्राकाळात संवेदनशील ठिकाणांसह अन्यत्र ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असून भविष्यकाळात ही संपूर्ण यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे देण्यात येणार आहे. अशा विधायक कार्यातून शहरातील अतिमहत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक होणार आहे.

लोकसंख्येप्रमाणेच दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. शहराच्या मध्यातूनच संकेश्वर-गोवा राज्यमार्ग जातो. त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होते. यासाठी शहराच्या सभोवताली रिंग रोड होणे गरजेचे आहे. रिंगरोडचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे सरकारदरबारी पडून आहे. यात्रेच्या निमित्ताने हा विषय पुन्हा जोर धरू लागला. तात्पुरत्या स्वरूपाचे नियोजन करून हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे यात्राकाळात तरी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.

संपूर्ण यात्रा डिजिटल बोर्डविरहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीकडून अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच यात्राकाळात घरावर लायटिंग करून विजेचा दुरुपयोग टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गडहिंग्लज आगारातून वाहतुकीसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. तर नगरपालिकेकडून पाणीपुरवठा व्यवस्थित होईल याकडे प्रशासन लक्ष देत आहे. महालक्ष्मी खेळवण्याच्या काळात चौकाचौकांत डिजिटल स्क्रीन बसविण्यात येणार असून, त्यामुळे लक्ष्मी कुठे आहे याची माहिती नागरिकांना मिळेल. याद्वारे एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळता येईल. यात्रा कमिटीमार्फत रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेचे पावित्र्य जपता यावे यादृष्टीने यात्राकमिटीही युद्धपातळीवर काम करीत आहे. कमिटीने नागरिकांच्या सुरक्षा, पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन अशा महत्त्वपूर्ण बाबींकडे आतापासून कटाक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

यात्रा कमिटीचा विधायक दृष्टिकोन

यात्रा कमिटीने धार्मिक विचारसरणीसह आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून वाटचाल करण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. यात्रेनिमित्ताने होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा केवळ चुरडा होऊ न देता त्याचा भविष्यकाळात कसा वापर होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे. यात्राकाळात घरावर लायटिंग केले जाते, त्यामुळे विजेचा मोठा अपव्यय होतो, त्यामुळे कोणी लायटिंग करू नये तसेच पाण्याचा अपव्यय टाण्याचे आवाहन कमिटीने केले आहे. याशिवाय कचरा संकलनासारख्या किचकट प्रक्रियेवर बारकाईने अभ्यास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वेळ आश्वासने पाळण्याची

$
0
0

गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स बँकेच्या निवडणुकीत बहुमतामुळे वाढल्या अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी कर्मचाऱ्यांच्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस को ऑप बँकेमध्ये काठावरील बहुमतामुळे विरोधकांकडून गेल्या सात वर्षात सत्तारुढ गटाची सतत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण पारदर्शक कारभार, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे सभासदांनी या निवडणुकीत विरोधकांचे सारे आरोप बाजूला ठेवत सत्तारुढ गटाच्या पारड्यात सत्तेचे दान टाकले आहे. १५ पैकी तब्बल १४ जागा देत सभासदांनी सत्तारुढ गटाच्या कारभारावर विश्वास ठेवला आहे. आगामी पाच वर्षात तो विश्वास सार्थ ठरवताना सत्तारुढ गटाला सभासदभिमुख कारभाराचा नवा अध्याय रचावा लागणार आहे.

१९९२-१९९३ सालापासून नुकत्याच संपलेल्या पंचवार्षिकपर्यंतचा राजकारणाचा आढावा घेतला तर बँकेत एका गटातून नवनवीन गट तयार झाले आहेत. त्यासाठी तत्कालीन वेगवेगळी कारणे असली तरी त्याचे मूळ कारभाराबाबतच होते. विश्वासराव माने गटातून छन्नुसिंग चव्हाण गट, त्यातून नंतर पंदारे गट व पाठीमागील दोन निवडणुका पाहता सत्तारुढ पंदारे, विश्वासराव माने यांच्याबरोबर राजन देसाई, राजेंद्र पाटील, बाळासाहेब घुणकीकर असे ​अनेक गट तयार झाले. यामुळे बँकेच्या कारभारात सतत शह-काटशहाचे राजकारण होत राहिले. याचा गंभीर परिणाम २००३ नंतर जाणवत होता. या कालावधीत एनपीएमधील वाढ, १२ कोटीच्या कर्जाचा बोजा अशी संकटे आली.

२००८ नंतर पंदारे गटाकडे सत्ता आल्यानंतर काटकसरीचा कारभार, आवश्यक तितकेच कर्ज असे धोरण स्वीकारल्याने बँकेपुढे वाढणाऱ्या संकटांना रोखता येणे शक्य झाले होते. पण त्याचवेळी वेगवेगळ्या गटातून निवडून आलेल्या विरोधकांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला. सत्तारुढ गटाने एनपीएचा मुद्दा दूर करण्यासाठी तत्कालिन अर्थमंत्री सुनील तटकरेंकडे पाठपुरावा करुन कर्जाची वसुली पगारातून करण्याची परवानगी घेतली. त्यामुळे एनपीए शून्य टक्क्यावर आला. तसेच सात वर्षात १०३ कोटीच्या ठेवी वाढल्या. सभासदांसाठीच काम केले असल्याचे प्रचारातून सांगताना सत्तारुढ गटाने निवडणुकीतही नवीन दहा जणांना संधी दिली. विरोधकांच्या आरोपांना सभासद बळी न पडता सत्तारुढ गटाला काठावर न ठेवता पूर्ण बहुमत दिले. यातून सत्तारुढांना आता बहुमत दिले असून सभासदांचे आणखी हित जोपासण्याची जबाबदारी सभासदांनी सोपवली आहे.

आम्ही ​व्याज कमी करण्याचे आश्वासन दिले होते. तोच मुद्दा पकडून सध्याच्या व्याज दरात सुधारणा करण्याच्यादृष्टीने पाऊले उचलली जातील. बँकेला पाच एटीएम मंजूर झाले आहेत. त्यातील दोन सुरु झालेली असून उर्वरित तीन मोक्याची जागा पाहून सुरु केली जाणार आहेत.

- रवींद्र पंदारे, पॅनेल प्रमुख सत्तारुढ पॅनेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांपुढेच आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी प्राथमिक शिक्षक संघ पॅनेलच्या समोर खरे आव्हान समविचारी पॅनेलचे उभे राहणार आहे. पुरोगामी समितीतून काही मंडळी नाराज होऊन स्वाभिमानी पुरोगामी आघाडीत दाखल झाल्याने राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला धक्का मानला जात आहे. सत्ताधारी आघाडीने विरोधकांच्या काही पॅनेलमधून कमकुवत उमेदवार उभे करण्याची व्यूहरचना केली आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात गटाच्या पाठबळावर समविचारी पॅनेलसोबतच सत्ताधारी पॅनेलची तुल्यबळ लढतीचे स्पष्ट चित्र आहे.

अधिकृत प्राथमिक शिक्षक संघ कोणाचा, या कारणावरुन वर्षभर वाद झाले. प्राथमिक शिक्षक संघाचे पॅनेलप्रमुख राजाराम वरुटे यांचे कट्टर समर्थंक करवीरचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील मानले जात होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, शिवाजीराव पाटील यांच्यातही मतभेद झाले. त्याचा फटका जिल्हा प्राथमिक संघाला बसला. वरुटेंच्या कारभारावर नाराज होऊन एस. व्ही.पाटील यांच्यासह काही पदाधिकारी बाहेर पडले. प्राथमिक शिक्षक संघ आमचाच, असे जाहीर करुन वरुटे आणि पाटील कामाला लागले. प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एस. व्ही.पाटील यांची वर्णी लागली. संभाजीराव थोरात गटाला मानणारे आणि कास्ट्राइब संघटनेचे गौतम वर्धन यांचे समविचारी पॅनेल करण्यात आले. शिक्षक बँकेत राजकीय पाठबळ घेण्यासाठी काही संघटनांनी प्रयत्न केले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याकडेही धाव घेतली. मात्र सोयीनुसारच शिक्षक संघाच्या नेत्यांनी राजकारणाचा धडा बँकेत गिरविला.

वरुटे यांच्याविषयी असलेला रोष या निमित्ताने बाहेर पडत आहे. अशाच आता चार पॅनेल झाल्याने चांगलीच लढत होणार आहे. शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते आणि राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील यांना उमेदवारी नाकारल्याने समविचारी पॅनेलमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पन्हाळ्याचे विद्यमान संचालक रघुनाथ खोत यांनाही सत्तारुढ वरुटे गटाने उमेदवारी नाकारल्याने समविचारी पॅनेलमध्ये प्रवेश केला. सत्तारुढ वरुटे गटाने केवळ तीन विद्यमान संचालकांना नवी संधी दिली आहे. करवीर तालुक्यात सर्वांधिक मतदान असल्याने तिन्ही पॅनेलने प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी नाकारल्याने शिरोळचे संचालक रवी पाटील यांनीही समविचारी पॅनेलला पाठिंबा दिला आहे. पुरोगामी संघटनेतून नाराज झालेल्या उमेदवारांनी स्वाभिमानी पुरोगामी आघाडीची स्थापना माघारीच्या ऐन शेवटच्या दिवशी केली. पुरोगामीचे शिरोळ तालुक्याचे सरचिटणीस मनोज रणदिवे, जिल्हा सरचिटणीस रवी शेंडे, तालुका सरचिटणीस आनंदराव शिंदे यांच्यासह आठ तालुकाध्यक्षांनी उमेदवारी दिली नसल्याची नाराजी व्यक्त करीत स्वाभिमानी पुरोगामी आघाडीत प्रवेश केला आहे.

राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघ पॅनेल, प्राथमिक शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे आणि पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचे राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल, संभाजीराव थोरात गट आणि कास्ट्राइब संघटना एकत्र येऊन जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांनी समविचारी पॅनेलची स्थापना केली. नाराज झालेल्यांनी स्वाभिमानी पुरोगामी आघाडीतून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. सत्ताधारी आघाडीने विरोधकांच्या पॅनेलमधून तालुकानिहाय कमकुवत उमेदवार उभी करण्याची व्यूहरचना केली आहे. या व्यूहरचनेत सत्ताधारी कितपत यशस्वी होईल, यावरच विजय अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिशेब न देणा‍ऱ्या १९४ उमेदवारांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च निवडणूक कार्यालयात जमा करावयाचा आहे. तसेच बँकेत नवीन खातेही काढावयाचे आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने अशा २२० पैकी १९४ जणांना निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस बजावली आहे. तर माघारी घेण्याची मुदत ८ एप्रिलपर्यंत असल्याने गेल्या दोन दिवसात कोणीही माघार घेतलेली नाही.

२५० उमेदवारांनी ३८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३० उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे निवडणुकीसाठी २२० उमेदवार पात्र ठरले आहेत. मंगळवारी (दि. २४) अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर वैध ठरलेल्या अर्जांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी काही जणांनी माघारीचे अर्जही विकत घेतले आहेत. मात्र, आत्तापर्यंत कोणीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे २२० उमेदवार अजूनही रिंगणात आहेत.

उमेदवारी माघारी घेण्याबरोबरच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशीलही निवडणूक कार्यालयात जमा करावयाचा असतो. मात्र, त्याकडे इच्छुक उमेदवारांनी कानाडोळा केल्यामुळे निवडणूक अधिकारी अशोक पाटील यांनी निवडणूक खर्च न देणाऱ्या सुमारे १९४ जणांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक दिवसाचा खर्च देणे अपेक्षित आहे. तो दिला नसल्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस गोकुळचे विद्यमान संचालक असलेल्या उमेदवारांसह १९४ जणांना देण्यात आाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारणा’, ’शिराळा’चे बिगुल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा सहकारी साखर कारखाना आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दोन्ही कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

साखर कारखान्याची मतदार यादी निश्चित करण्यासाठी कारखान्यांच्या कार्यालय स्थळावर गुरूवारी नोटीस लावण्यात आली आहे. मतदारांची प्रारुप यादी तयार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर, सहायक निबंधक सहकारी संस्था पन्हाळा व तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर येथील कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर नोटीस लावण्यात आली आहे. त्यानुसार गुरूवार (दि. २६) पासून मतदार यादीवर हरकती आणि आक्षेप घेण्याची मुदत ४ एप्रिलपर्यंत आहे. हे आक्षेप जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयात या हरकती घेता येणार आहेत. तर हरकतींवर १० एप्रिलपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून अंतिम मतदार यादी १६ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तर विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, सहायक निबंधक सहकारी संस्था, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर येथे सभासदांना पहायला मिळणार असून या कारखान्यासाठीही २६ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत हरकती घेण्यात येणार असून १६ एप्रिलला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ११ दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. त्यानुसार २७ एप्रिलला दोन्ही कारखान्यांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

पन्हाळा तालुक्यासह, हातकणंगले, शाहुवाडी, वाळवा, शिराळा, करवीर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या कारखान्याकडे २०१३ सभासद आहेत, २१ जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की विद्यमानांना पुन्हा संधी देणार याचा निर्णय विनय कोरे स्वत: घेणार आहेत. त्यामुळे विद्यमान संचालकांच्या सह काही नवे चेहरे नियमित त्यांच्या संपर्कात आहेत. यावेळचा विधानसभेतील पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी फार ताणाताण होणार नाही असे सध्या वातावरण आहे. ऊस उत्पादक गटातून १६ संस्था गटातून १ महिला २ मागासवर्गीय १ इतरमागास १ असे एकूण उमेदवार असणार आहेत.

दर न दिल्याने सभासदांत नाराजी

वारणा कारखाना सध्या वादग्रस्त आहे. एफआरपी नुसार दर न दिल्याने जिल्ह्यातील अनेक कारखाने वादग्रस्त ठरले आहेत. त्यामध्ये वारणेचाही समावेश आहे. शेट्टी यांच्या आंदोलनाला भीक न घालता कोरे यांनी गतवर्षी कारखाना सुरू केला. तेव्हा बराच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर लोकसभेत कोरेनी आपली ताकद आवाडेंच्या मागे लावली. यामुळे शेट्टी आता कारखान्याच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार, अमर यशवंत पाटील हे आपली ताकद कोणाच्या मागे उभी करणार याबाबत पंधरा दिवसात हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या तरी ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे अधिक आहेत.

'स्वाभिमानी' यंदा काय करणार?

वारणा साखर कारखान्याच्या गत निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणूक लढवली​ होती​. मात्र कोणतीही ताकद न वापरता ही लढत झाल्याने संघटनेचे चारही उमेदवार मोठ्या मताच्या फरकाने पराभूत झाले. २१ पैकी १७ जागा कोरे गटाने राखल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात प्रचार केल्याने यावेळी स्वाभिमानी काय करणार याची उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच वर्षांनंतरही रिंग रोड अर्धवट

$
0
0

कळंबा-फुलेवाडी परिसरातील नागरिकांचे हाल सुरूच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हाडे खिळखिळी, मणक्याचा आजार, धुळीचा आस्वाद, चिखलातून ड्रक टॅकचा थरारक अनुभव आणि वाहनांचे आयुष्य कमी करायचे असेल तर साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड एकादा फेरी मारायला हवी. गेली पाच वर्षे रिंग रोड परिसरातील रहिवाशी अर्धवट कामाला वैतागले आहेत. कळंबा येथील टोल नाका ते जुना फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचा सुमारे पाच किलोमीटरचा रिंगरोड अर्धवटच आहे. आपटेनगर ते फुलेवाडी रिंगरोडचे काम स्वीकारलेला एक कंत्राटदारही पळून गेला. दुसऱ्या कंत्राटदारांकडून या रोडची कामे रखडली आहेत. गेली पाच वर्षे या परिसरातील रहिवाशी आणि वाहनधारकांना रिंग

रोडचा धुरळा आणि खड्यांचा त्रास सहन

करावा लागत आहेत. कोकणातून कोल्हापुरात प्रवेशव्दार मानल्या जाणाऱ्या या रोडची दुरावस्थाच आहे.

शहरात अवजड वाहतूक न येता परस्पर शहराबाहेर जाण्यासाठी रिंग रोड झाले. मात्र या रिंगरोडच्या डागडुजीकडे लक्ष देण्यासाठी नगरसेवकांना वेळ नसल्याने या रोडची दुरावस्थाच झाली आहे. कळंबा टोल नाक्यापासून ते जुना फुलेवाडी जकात नाक्यापर्यंत दुरावस्थाच आहे. साई मंदिर पासून ते साळोखेनगर पाण्याची टाकीपर्यंत एकाबाजूने कच्चा रस्ता तयार केला आहे. साळोखेनगर पाण्याची टाकी ते आपटेनगरपर्यंतच्या रस्त्याने गेली चार वर्षे डांबरच पाहिलेले नाही. या रोडवर दीड वर्षापूर्वी खडी आणि माती टाकून रोडची उंची वाढविण्यात आली. मात्र, त्यानंतर काहीच डागडुज्जी केली नसल्याने हा रस्त एका बाजूने खचला आहे. या रोडची रुंदी वाढविली आहे. एका बाजूला खडीचा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खरमातीचा रस्ता असे चित्र आहे. या रोडवरून परिसरातील सुमारे शंभर कॉलनीतील रहिवाशी, शाळा आणि व्यवसायासाठी वाहनांची मोठी वर्दळ आहे. आपटेनगरजवळील दुर्वांकर सभागृहाजवळ महापालिकेच्या एअर व्हॉल्वमधून पाण्याची नेहमी गळती असल्याने रोडवर चिखलच होतो.

आपटेनगर पाण्याची टाकी ते क्रांतीसिंह नाना पाटील नगरातील मंडईपर्यंतचा रस्ता करण्यात आला. सायंकाळी चार नंतर या ठिकाणी मंडई भरते. रिंग रोडवरील खड्डे चुकवत रोडवरुन जीव मुठीत धरुनच वाहतूक सुरु आहे. या मंडईपासून ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंत रोडची दुरावस्थाच आहे. रोडवर काही ठिकाणी खडी आणून टाकली आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू नाही. रोडवरील गंधर्वनगरी केएमटी बसस्टॉप येथे रस्त्यातच मोठे खड्डे पडले आहेत.

या ठिकाणी दोन अपघाचात दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. अयोध्या कॉलनीच्या समोर पडलेल्या खड्याचे कामही तीन महिने सुरू होते. या ठिकाणी अजूनही माती ढिगारे आहेत. फुलेवाडी जकात नाक्यावरुन आपटेनगरकडे येतानाही खड्यातूनच प्रवेश करावा लागतो. रात्रीच्या वेळी क्रांतीसिंह नाना पाटील रिंग रोड ते अयोध्या कॉलनीपर्यंत वीजेची व्यवस्था नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळचा या रिंगरोडचा प्रवास जीवघेणाच ठरत आहे.



गेली पाच वर्षे रिंग रोडकडे दुर्लक्षच आहे. भागातील रहिवाशांनी अनेकदा मागणी आणि आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, अद्याप काहीच कार्यवाही केलेली नाही. या परिसरातून ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली आणि अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. मोठे खड्डे या रोडवर पडले आहेत. ऐन पावसाळ्यात तर या रोडची दुरावस्थाच होते. पाण्यातून खड्डा शोधावा लागत असल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

- अक्षय मोरे,

अयोध्या कॉलनी, फुलेवाडी

केवळ रिंग रोडचे क्रांतीसिंह नाना पाटील रिंग रोड असे नामकरण केले आहे. यंग सीनिअर्संना या रोडवरुन चालत जातानाही मोठी अग्निदिव्य पार पाडावे लागत आहेत. डायना कॅसलपर्यंत केवळ रस्ता झाला आहे. तेथून पुढे रस्त्यासाठी मुहुर्त मिळालेला नाही. नगरोत्थान योजनेत पैसे असूनही काम केले जात नाही. येत्या दहा एप्रिल पर्यंत वाट पाहून ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रास्ता रोको केला जाणार आहे.

- सुभाष शेटे,

क्रांतीसिंह नाना पाटील नगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियंत्याला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मेजरमेंट बिलावरून महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण करण्याचा ठेकेदाराकडून घडला. महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयासमोरच गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला. कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केल्याचे समजताच महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजल्यापासून काम बंद आंदोलन पुकारले. दरम्यान, याप्रकरणी​ रविराज भिमराव मोहिते (रा. नागाळा पार्क) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

ठेकेदारावर कारवाईसाठी शहर अभियंता, उप शहर अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठले. ठेकेदारावर कारवाईसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मारला. गांधी मैदान विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता निवास पोवार (फुलेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. रविराज मोहिते हे महापालिकेकडे खासगी ठेकेदार म्हणून काम पाहतात. त्यांनी वडिलांनी काही वर्षापूर्वी केलेल्या कामासंदर्भातील मेजरमेंट बुक आणि रिफंड मिळावे अशी मागणी ​रविराज मोहिते यांनी कनिष्ठ अभियंता पोवार यांच्याकडे केली. पोवार यांनी अकरा वाजता कार्यालयात या बुक देतो असे सांगितले. त्यावरून दोघांत वादावादी वाढत जाऊन मोहिते यांनी पोवार यांच्या कानफटात लगावली. गांधी मैदान विभागीय कार्यालयासमोरच सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी कार्यालयातील कर्मचारी धनाजी ​शिंदे, जनार्दन डफळे, सुरेश डकरे, प्रकाश कोळेकर यांनी मोहिते यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण मोहिते यांनी कुणालाही न जुमानता निवास पोवार यांना मारहाण केली.

अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये

दरम्यान, याबाबत गांधी मैदान विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता निवास पोवार (फुलेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ठेकेदारावर कारवाईच्या मागणीसाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, एस. के. माने. एस. के. पाटील आदी अधिकारी गुन्हा दाखल होईपर्यंत दुपारपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबले होते. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मारहाणीचा निषेध केला आणि काम बंद आंदोलन पुकारले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसातही मानली नाही हार

$
0
0

चांदोली धरणग्रस्तांसह बालवाडी शिक्षिकांच्या आंदोलनाची हेळसांड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहन न होणारा उन्हाचा तडाखा, अपुरे जेवण, रात्रभर डासांची भुणभुण सहन करत गेल्या अकरा दिवसांपासून न्याय मागण्यासाठी म्हाताऱ्या कोताऱ्यांसह बसलेल्या चांदोली धरणग्रस्तांची गुरुवारी पावसानेही परीक्षाच घेतली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काहींनी तेथील दुसऱ्या आंदोलकांच्या स्टेजखाली जाण्याचा मार्ग पत्करला. तर काहींनी मनोमनी पाऊस थांबावी अशी प्रार्थना करत मंडपातून पडणारे पावसाचे पाणी झेलत उभे राहण्याचा पर्याय स्वीकारला. चार दिवसांपासून उपोषण सुरू केलेल्या बालवाडी शिक्षिकांचीही पावसामुळे तारांबळा उडाली. पण सतत संघर्ष पाठीवर टाकून जीवन कंठणाऱ्या या आंदोलकांनी पावसासमोरही हार मानली नाही.

१६ वर्षांपासून चांदोली धरण व अभयारण्यग्रस्तांमधील साडेआठशे कुटुंबियांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. पुनर्वसन करण्याबरोबरच जमीन देण्याची मागणी करत श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ मार्चपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. अकरा दिवस झाले तरी पत्र देतो, बैठक घेतो या आश्वासनांव्यतिरिक्त काहीही हातात पडलेले नाही. १६ वर्षांपासून जे झाले नाही, ते आता आश्वासनांनी होणार नाही हे माहिती असल्याने बहुतांश आंदोलक पन्नाशी उलटलेले असूनही आंदोलन थांबवायचे नाही असा निर्धार केला आहे. त्यांना ना कुणाचा आधार, ना कुणाचा पाठींबा आहे. त्यामुळे गावाकडील शिध्यावर व परिसरातील पाण्यावर दिवस ढकलणाऱ्या या आंदोलकांची गेला आठवडाभर कडाक्याच्या उष्म्याने परीक्षा घेतली. तापलेल्या रस्त्यावरील झळा झेलत, विविध आजारांचा त्रास सहन करत प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते.

सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे या आंदोलकांची धावाधाव झाली. पावसाचा जोर जास्त असल्याने मंडपाच्या कापडातून पाण्याचा धारा वाहत होत्या. त्यामुळे भिजत उभे राहण्यापेक्षा महिलांनी आडोसा शोधण्याचा प्रयत्न केला. पण या साऱ्या आंदोलकांचा पावसापासून बचाव करण्याइतपत जागा नसल्याने शेवटी तिथे आंदोलकांसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजखाली जाऊन काही महिलांनी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. काही तर मंडपातून पडणारे पावसाचे पाणी झेलतच उभे राहिले. बा​लवा​डी शिक्षिकांनाही एका मंडपाखाली थांबता येत नसल्याने त्यातीलही बहुतांशजणी भिजल्या. सरकारच्या धोरणाने पिचलेल्या या आंदोलकांना पावसाच्या या परीक्षेचे काहीही वाटले नाही. त्यांनी काहीही झाले तर येथून हलायचे नाही, असा निर्धार करत प्लास्टिकची पोती, बॅनर टाकून व्यवस्था केली.

बालवाडी शिक्षिकांचे उपोषण सुरूच

बालवाडीच्या वर्गावर काम करणाऱ्या शिक्षिका व सेविकांना सरकारकडून वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून शिक्षिका व सेविकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गुरूवारीही सहा शिक्षिकांची प्रकृती खालाविल्यामुळे त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मळीपासून सेंद्रिय खत

$
0
0

विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर,

साखर कारखान्यांतून कचरा म्हणून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मळीवर प्रक्रिया करून चांगल्या दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. या खताचा वापर करून अॅग्रीकल्चर कॉलेजच्या जमिनीवर प्रायोगिक धान्योत्पादन केले आहे. या उत्पादनाला संख्याशास्त्रीय निकषानुसार उपयुक्तता तपासण्यात येणार आहे.

पर्यावरणशास्त्र अधिविभागात मळीवर गेली दोन वर्षे संशोधन सुरू आहे. साखर कारखान्यांतून कचरा म्हणून बाहेर टाकल्या जाणाऱ्या मळीची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने अनेक पर्यावरणीय प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी या मळीवर सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने प्रक्रिया केल्यास सेंद्रिय खतात रुपांतर करता येत असल्याचे संशोधनातून सिद्ध केले आहे. तयार केलेले खत योग्य, उत्पादनाढीसाठी फायदेशीर असल्याची चाचणी घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांनी दिली.

दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी प्रकल्पाला भेट दिली. विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख प्रा.डॉ. श्रीमती जे.पी. जाधव, कृषी कॉलेजच्या विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. विजय तरडे यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ. जी.जी. खोत, प्रा.डॉ. आर.व्ही. कुलकर्णी, डॉ. आबासाहेब मोहिते, राजेंद्र जांभळे, आसावरी जाधव, डॉ. विकास जाधव, रचना इंगवले, विद्यार्थी पल्लवी भोसले, अमोल चौगुले, शेखर माळी उपस्थित होते.

संशोधनाचा फायदा

'शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व किफायतशीर दरात खतनिर्मिती करता येणे शक्य आहे. मळीतील मेणाच्या प्रमाणामुळे वापरावर मर्यादा येतात. मात्र सूक्ष्मजीव प्रक्रिया केल्याने मेणाचे प्रमाण कमी होऊन मळीचा अधिक कार्यक्षम पद्धतीने वापर शक्य आहे. या खताचा वापर केल्यास तांबड्या मातीतील पाणी धारण करण्याची क्षमता वाढते' असे विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांचा श्वास होणार मोकळा

$
0
0

जोतिबा मंदिराच्या गाभाऱ्यात स्वच्छ हवेसाठी प्रयत्न; यात्रेसाठी सज्जता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठ दिवसावर आलेल्या यात्रेसाठी जोतिबा यात्रेसाठी जिल्हा प्रशासन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे. यात्रा काळात मंदिरात भाविक घामाघूम होतात. त्यांना गाभाऱ्यात स्वच्छ हवा देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर व्हेंटीलेटर अँड कुलिंग सिस्टिम बसवण्याचा लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच जवळपास १२ ठिकाणी पार्किंगसाठी सपाटीकरण करण्यात आले आहे. यात्रेच्या मुख्य दिवशी गायमुखाजवळ सर्व वाहने अडवण्यात येणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने जोतिबा डोंगरावर विविध तयारी चालवली आहे. मंदिरात १६ कॅमेरे बसवण्यात आले असून यमाईच्या मंदिरात ४ कॅमेरे बसवण्यात येत आहेत. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात येण्यापूर्वी दोन मंदिरांचे गाभारे ओलांडून यावे लागतात. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे गाभाऱ्यांमध्ये स्वच्छ हवा मिळत नाही. घामाघूम होऊन भाविक बाहेर पडत असतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी एका कंपनीने देवस्थान समितीकडे प्रस्ताव ठेवला आहे. चोपडाई देवीच्या गाभाऱ्यात प्रायोगिक तत्वावर व्हेंटीलेटर अँड कुलिंग सिस्टिम लावण्यात येणार आहे.

या यंत्रणेतून बाहेरची स्वच्छ हवा फिल्टर करुन गाभाऱ्यामध्ये सोडली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने हा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये ही सिस्टिम बसवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

तसेच दानेवाडी फाटा तसेच गिरोली या दोन ठिकाणी दुचाकी पार्किंग करण्यात येणार आहे. तिथून केएमटीच्या २० बसेसमधून मोफत सेवा देण्यात येणार आहे. त्यातील दानेवाडी फाट्यापासून १० तर गिरोली येथून ५ बसेस सोडण्यात येणार आहेत. दोन तारखेपर्यंत सर्किट हाऊसजवळील जागेवर विविध वाहनांचे पार्किंग केले जाणार आहे. पण तीन तारखेला गायमुखापासून डोंगरावर कोणतीही वाहने सोडली जाणार नाहीत. तसेच क्रेन, अग्निशमन द​लाची गाडी, रुग्णवाहिकाही तैनात केल्या जाणार आहेत.

शिवाजी चौक तरुण मंडळाचे

पंचगंगा नदीघाटावर अन्नछत्र

सलग चोवीस वर्षे शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने जोतिबाच्या भाविकासाठी पंचगंगा नदी घाट परिसरात अन्नछत्राचे आयोजन करण्यात येते. तीन दिवस सुमारे दोन लाख भाविकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत अन्नछत्र सुरू राहणार आहे.

जोतिबा यात्रेसाठी भाविकांचा पहिला मुक्काम पंचगंगा नदीवर असल्याने भाविकांची संख्या मोठी असते. येथे २५० कार्यकर्ते अन्नछत्रासाठी सेवा देणार आहेत, अशी माहिती माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी दिली.

सहजसेवा ट्रस्टचे गायमुखाजवळ अन्नछत्र

सहजसेवा ट्रस्टचे जोतिबा डोंगर परिसरातील गायमुखाजवळ चार दिवस अन्नछत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. अडीच लाख भाविकांना मोफत जेवण, नाष्टा व चहाची सोय केली जाणार आहे. एक एप्रिलला अन्नछत्रास सुरूवात होणार आहे. दोन एप्रिल व तीन एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस असल्याने २४ तास अन्नछत्र सुरू राहणार आहे. यात्रा कालावधीत बंदोबस्तास असणाऱ्या पोलिस कर्मचारी व अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नाष्ट्याची सोय केली जाणार आहे. उपवास असणाऱ्या भाविकांसाठी शाबू खिचडीचे तर चार दिवस दुपारच्या सत्रात मठ्ठा व ताक वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील यांनी दिली.

मंदिरावर आता गुलाल चिकटणार नाही

यात्रेच्या मुख्य दिवशी तसेच सासनकाठ्यांच्या मिरवणुकीदरम्यान भाविकांकडून सतत गुलालाची उधळण होत असते. यात्रेनंतर मंदिराची स्वच्छता केली जाते. पण मंदिराच्या दगडांवर गुलाल चिटकून राहत होता. गेल्या दोन महिन्यांपासून मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच बाहेरील बाजूची स्वच्छता करण्यात येत होती. ती पूर्ण झाली आहे. आता त्यावर क्लेअर पेंट लावण्यात आला आहे. यामुळे मंदिराच्या दगडावर गुलाल चिटकून राहणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेला साठ कोटींचा दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

घनकचरा व्यवस्थापनात चालढकल केल्याबद्दल सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी तब्बल साठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. दंड भरण्यासाठी लवादाने महापालिकेला तीन आठवड्यांची मुदत दिली असून, दंड न भरल्यास महापालिका बरखास्त करण्याचा किंवा संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा आदेशही लवादाने दिला आहे.

या लवादाला सुप्रीम कोर्टाचा दर्जा असल्याने महापालिकेला लवादाच्या निर्णयाविरोधात अपील करायचे झाल्यास थेट सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागेल.

'महापालिकेने तीन आठवड्यांच्या आत दंडाची रक्कम विभागीय आयुक्तांकडे जमा करावी.

मुदतीत रक्कम जमा न झाल्यास विभागीय आयुक्तांनी महापालिका बरखास्त करावी किंवा संबधित सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यास अपात्र असल्याचे कारण देऊन त्यांचे पद रद्द करावे, असे स्पष्ट आदेशही लवादाने दिले आहेत,' अशी माहिती अॅड. अमित शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने प्रा. आर. बी. शिंदे यांनी महापालिकेतील घनकचरा, मोकाट कुत्री, डुकरे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार पुणे येथील हरित लवादाकडे केली होती. न्यायमूर्ती व्ही. आर. चिनगावकर आणि डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने संबधित तक्रारीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. प्रतिज्ञापत्र सादर करताना महापालिका क्षेत्रात घनकचऱ्याची, मोकाट कुत्र्यांची, डुकरांची समस्या नसल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. सुनील अंबोळे यांनी प्रतिज्ञापत्रात केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. तक्रारदारांचे वकील अॅड. असिम सरोदे आणि अॅड. अमित शिंदे यांनी महापालिकेने घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नसल्याचे लवादाच्या निदर्शनास आणून दिले.

याची गंभीर दखल घेऊन खंडपीठाने महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या पंचवीस टक्के म्हणजे साठी कोटी रुपये दंड म्हणून विभागीय आयुक्तांकडे रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. एका महिन्यात विभागीय आयुक्तांनी महापालिकेचा कारभार पाहणारी एक समिती स्थापन करून त्याचा अहवाल लवादाला द्यायचा आहे. या संदर्भातील अंतिम निकाल लवादाने राखून ठेवला असून, पुढील सुनावणी १५ मे रोजी आहे.

दुसऱ्यांदा कारवाई

महापालिका क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणारे नाले थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने १० मार्च रोजी महापालिकेवर फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यानंतर आता हरित लवादाने दंड केला आहे. प्रदूषणासाठी महापालिकेवर दोन वेळा कारवाईचा प्रसंग ओढवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅबिनेट ठराव हायकोर्टाकडे पाठवू

$
0
0

सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा अधिवेशनानंतर दोन आठवड्यात सर्किट बेंचचा ठराव कॅबिनेटमध्ये मांडून तो मुंबई हायकोर्टाकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चवेळी त्यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त केले.

कोल्हापुरात सांगली, सातारा, ​सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी लढा सुरु आहे. कृती समितीने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कॅबिनेटचा सुस्पष्ट व कोल्हापूरचा उल्लेख असलेला ठराव झाल्याखेरीज खंडपीठाची मागणी पूर्ण होणार नाही, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाच्या सर्व अटींची पूर्तता सरकारच्यावतीने केली जाईल. हा प्रश्न कॅबिनेटच्या बैठकीत मांडू. अधिवेशनानंतर कॅबिनेटच्या बैठकीत ठराव मंजूर करून तो हायकोर्टाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्य न्यायमूर्तींचा कार्यकाल संपत आल्याकडे लक्ष वेधले असता सरकारने खंडपीठाचा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवल्याने त्यात कसलीही अडचण येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. शिष्टमंडळात कृती समितीचे अध्यक्ष विवेक घाटगे, सचिव राजेंद्र मंडलिक, उपाध्यक्ष के.व्ही. पाटील, प्रशांत चिटणीस, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, संपतराव पवार आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रंकाळा: प्रतिज्ञापत्र सादर करा’

$
0
0

कोल्हापूर : रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी करायच्या उपाययोजनांसंबंधी महापालिकेने चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद प्राधिकरणने दिला आहे. कदमवाडीच्या सुनील केंबळे यांनी रंकाळा तलाव प्रदूषणप्रश्नी लवादासमोर याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

केंबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत महापालिकेकडून रंकाळ्याच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत. तलावाची तटबंदी कमकुवत बनली आहे. तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठी कायमस्वरुपी योजना गरजेच्या आहेत. 'नीरी'सारख्या संस्थेकडून रंकाळा तलाव संवर्धनासाठी उपाययोजनेसंदर्भात अहवाल तयार करुन घेतले पाहिजे, अशी मागणी केली आहे. हरित लवादने याप्रश्नी महापालिकेला

सक्त सूचना दिल्या आहेत. चार आठवड्याच्या आत महापालिकेने रंकाळा तलावासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिरात बालिकेला सर्पदंश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

बिहारमधील सिवान येथून आलेल्या एका कुटुंबातील नयनसी (वय सहा) या चिमुरडीला बुधवारी येथील विठ्ठल मंदिरात सर्पदंश झाल्याने मंदिर व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. तिला गुरुवारी येथील सरकारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

नयनसीचे वडील रमेशकुमार सिंह हे चाकूर (जा. लातूर) येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रात आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुधवारी दुपारी ते पत्नी आणि नयनसी सोबत मंदिरात आले. दर्शन रांगेतून विठ्ठलाच्या गाभाऱ्याजवळ आल्यावर दर्शन घेताना अचानक मुलगी साप चावला म्हणून ओरडू लागताच रमेशकुमार यांनी साप पहिला आणि तातडीने मुलीला उचलून ते रांगेतून बाहेर पडले. त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मंदिरात प्रथमोपचाराची सोय नसल्याने त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगण्यात आले.

मोबाईल दर्शनापूर्वी काढून ठेवावा लागल्याने तो ताब्यात घेऊन ते रिक्षासाठी दूरवर पळत जावे लागले. सुरक्षेच्या कारणामुळे मंदिराजवळ वाहने आणणे बंद केल्याने त्यांना लवकर रिक्षाही मिळू शकली नाही. पंढरपूरची काहीच माहिती नसल्याने त्यांना दवाखान्यात पोचायला जवळपास पाऊण तास उशीर झाला. उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर ुपचार करण्यात आले.

मंदिर व्यवस्थापनाने नयनसीसाठी नंतर बरीच धावपळ केली. मात्र, मंदिरात प्रथमोपचारांची सोय नसल्याचे या निमित्ताने उघड झाले. या घटनेनंतर मंदिर प्रशासन जागे झाले आहे. मंदिरातील आणि गाभाऱ्यातील अडचणीच्या जागा, बिळे बुजवून घेणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वळीवाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवड्यामध्ये तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचल्याने उष्म्याचा कहर झालेला असताना गुरुवारी सायंकाळी वळीवाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे दिलासा मिळाला. जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र झालेल्या पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला. जोरदार वारे व गडगडाटासह झालेल्या वळवाच्या पावसामुळे रेसिडन्सी क्लबसमोरील रस्त्यावर झाडाची मोठी फांदी पडली. त्यामुळे एका मोटारसायकलचे नुकसान झाले.

रविवारी या उन्हाळ्यातील तापमान पहिल्यांदाच ३७ अंशांवर गेले होते. त्यामुळे उष्म्याचा कहर झाल्याचे जाणवत होते. तशातच अधूनमधून ढगाळ वातावरण होत असल्याने व वाऱ्याचे प्रमाणही कमी असल्याने तगमग वाढली होती. रात्रीचे किमान तापमान २३ अंशादरम्यान होते. गुरुवारी पाचनंतर जोरदार वारे सुटले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरुवातही झाली होती. शहर परिसरात मात्र सहाच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला प्रारंभ झाला. पावसाच्या जोरदार सरी पडल्या. यामुळे वातावरणात थोडा गारवा पसरला. जोरदार वारे व पावसामुळे रेसिडन्सी क्लबसमोरील रस्त्यावरील झाडाची एक मोठी फांदी कोसळली. त्याखाली उभ्या केलेल्या मोटारसायकलीचे नुकसान झाले. पण त्याबाबत अग्निशमन दलाकडे काही नोंद झालेली नाही.

सध्या गहू कापणी सुरू आहे. अनेक भागात कापलेला गहू शेतातच आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. काही शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले गहू भिजल्याचेही प्रकार घडले.

सांगलीत वादळी पाऊस

कुपवाड : गुरुवारी दुपारनंतर सांगलीसह काही भागाला वादळी पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तूटून पडल्या तर धुरळ्याचे लोट गगनाला भिडत होते. पाऊस सांगली शहराच्या अर्ध्या भागातच म्हणजे वसंतदादा साखर कारखाना, माधवनगर या परिसरात जोरदार कोसळला. मिरज परिसरातही पावसाच्या सरी झडल्या. पलूस तालुक्यातील कुंडलमध्येही हलका पाऊस झाला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारीपदी डॉ. अमित सैनी

$
0
0

राजाराम माने यांची क्रीडा आयुक्तीपदी बदली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. अमित सैनी यांची नियुक्ती झाली आहे. एप्रिलमध्ये ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येथील जिल्हाधिकारी राजाराम माने यांची पुणे येथील क्रीडा व युवक संचालनालयाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे.

राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी माने यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी येणारे डॉ. सैनी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ च्या बॅचचे टॉपर आहेत. त्यांनी चंदिगडच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली आहे. वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. जुलै २००८ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत रत्नागिरी येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून काम केले आहे. तर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काही काळ काम केले आहे. जिल्ह्याला प्रविण दराडे यांच्या नंतर आठ वर्षांनी आयएएस अधिकारी मिळणार आहेत.

माने यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. दोन वर्षे सात महिन्याच्या कालावधीत माने यांनी महसूल विभागाच्या कामकाजामध्ये काटेकोरपणा आणला होता. त्यामध्ये कसूर करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना निलंबीत करुन नियमानुसार व वेळेत काम करण्याचा इशाराच साऱ्या कर्मचाऱ्यांना दिला होता. या कालावधीत त्यांनी जोतिबा विकास आराखड्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यासाठी जोतिबा डोंगरावरील जागेचा सर्व्हे करुन त्यानुसार आराखडा तयार केला होता. त्यानुसार १२५ कोटींचा आराखडा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. याशिवाय पुरवठा विभागात डाटा संकलित करण्यासाठी लक्ष घातले होते. त्यांनी प्रथमच महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी नवी पद्धत अवलंबली होती. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्याला त्या ठिकाणी बदली देण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले होते. त्यामुळे दोन वर्षात झालेल्या बदल्यांमध्ये केंव्हाही तक्रारी झाल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. या कालावधीत मंदिराच्या आवारातील अतिक्रमणांचा सर्व्हे करून ते काढण्याचे आदेश दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल मंदिरात बालिकेला सर्पदंश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

बिहारमधील सिवान येथून आलेल्या एका कुटुंबातील नयनसी (वय सहा) या चिमुरडीला बुधवारी येथील विठ्ठल मंदिरात सर्पदंश झाल्याने मंदिर व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. तिला गुरुवारी येथील सरकारी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.

नयनसीचे वडील रमेशकुमार सिंह हे चाकूर (जा. लातूर) येथील सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रात आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुधवारी दुपारी ते पत्नी आणि नयनसी सोबत मंदिरात आले. दर्शन रांगेतून विठ्ठलाच्या गाभाऱ्याजवळ आल्यावर दर्शन घेताना अचानक मुलगी साप चावला म्हणून ओरडू लागताच रमेशकुमार यांनी साप पहिला आणि तातडीने मुलीला उचलून ते रांगेतून बाहेर पडले. त्यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मंदिरात प्रथमोपचाराची सोय नसल्याने त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगण्यात आले.

मोबाईल दर्शनापूर्वी काढून ठेवावा लागल्याने तो ताब्यात घेऊन ते रिक्षासाठी दूरवर पळत जावे लागले. सुरक्षेच्या कारणामुळे मंदिराजवळ वाहने आणणे बंद केल्याने त्यांना लवकर रिक्षाही मिळू शकली नाही. पंढरपूरची काहीच माहिती नसल्याने त्यांना दवाखान्यात पोचायला जवळपास पाऊण तास उशीर झाला. उपजिल्हा रुग्णालयात तिच्यावर ुपचार करण्यात आले.

मंदिर व्यवस्थापनाने नयनसीसाठी नंतर बरीच धावपळ केली. मात्र, मंदिरात प्रथमोपचारांची सोय नसल्याचे या निमित्ताने उघड झाले. या घटनेनंतर मंदिर प्रशासन जागे झाले आहे. मंदिरातील आणि गाभाऱ्यातील अडचणीच्या जागा, बिळे बुजवून घेणार असल्याचे मंदिर व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळीवाची हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठवड्यामध्ये तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचल्याने उष्म्याचा कहर झालेला असताना गुरुवारी सायंकाळी वळीवाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे दिलासा मिळाला. जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र झालेल्या पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाला. जोरदार वारे व गडगडाटासह झालेल्या वळवाच्या पावसामुळे रेसिडन्सी क्लबसमोरील रस्त्यावर झाडाची मोठी फांदी पडली. त्यामुळे एका मोटारसायकलचे नुकसान झाले.

रविवारी या उन्हाळ्यातील तापमान पहिल्यांदाच ३७ अंशांवर गेले होते. त्यामुळे उष्म्याचा कहर झाल्याचे जाणवत होते. तशातच अधूनमधून ढगाळ वातावरण होत असल्याने व वाऱ्याचे प्रमाणही कमी असल्याने तगमग वाढली होती. रात्रीचे किमान तापमान २३ अंशादरम्यान होते. गुरुवारी पाचनंतर जोरदार वारे सुटले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाला सुरुवातही झाली होती. शहर परिसरात मात्र सहाच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला प्रारंभ झाला. पावसाच्या जोरदार सरी पडल्या. यामुळे वातावरणात थोडा गारवा पसरला. जोरदार वारे व पावसामुळे रेसिडन्सी क्लबसमोरील रस्त्यावरील झाडाची एक मोठी फांदी कोसळली. त्याखाली उभ्या केलेल्या मोटारसायकलीचे नुकसान झाले. पण त्याबाबत अग्निशमन दलाकडे काही नोंद झालेली नाही.

सध्या गहू कापणी सुरू आहे. अनेक भागात कापलेला गहू शेतातच आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. काही शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले गहू भिजल्याचेही प्रकार घडले.

सांगलीत वादळी पाऊस

कुपवाड : गुरुवारी दुपारनंतर सांगलीसह काही भागाला वादळी पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तूटून पडल्या तर धुरळ्याचे लोट गगनाला भिडत होते. पाऊस सांगली शहराच्या अर्ध्या भागातच म्हणजे वसंतदादा साखर कारखाना, माधवनगर या परिसरात जोरदार कोसळला. मिरज परिसरातही पावसाच्या सरी झडल्या. पलूस तालुक्यातील कुंडलमध्येही हलका पाऊस झाला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कास धरणाची उंची वाढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला वन विभागाने मान्यता दिली आहे. विभागाने त्यासाठी जागा हस्तांतरण करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामांत आलेले सर्व अडथळे दूर झाले आहेत. प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

धरणाची उंची वाढविण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्याची मान्यता घेण्याची अट घातली होती. त्यादृष्टीने पुरातत्त्व खात्याची मान्यता मिळवण्यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सुमारे १८८५साली बांधलेल्या कास धरणात जीवंत पाण्याचा साठा असून, ७,१२३ चौरस किलोमीटर इतका मोठा कॅचमेंट एरिया असलेल्या कास धरणाची उंची वाढवल्यास ग्रॅव्हिटीने सातारकरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा विचार करुन, कास धरण उंची वाढवण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. उंची वाढवल्यास आज उपलब्ध असणाऱ्या १०७ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार असून, ती सुमारे ५०० दशलक्ष घनफूट इतकी वाढणार आहे. सातारकरांना दरडोई १३५ लिटर पाणी देण्याचे आमचे उदिष्ट आहे. तसेच कासचे पाणी सातारकरांपर्यंत पाहोचण्यासाठी शुद्धिकरण खर्चा व्यक्तिरिक्त अन्य कोणताही खर्च येत नाही, निव्वळ ग्रॅव्हिटीने पाणी कास वरुन डोंगरउताराने येत असल्याने, कासची उंची वाढवण्यास आम्ही प्राधान्य दिले होते. वन विभाग उंची वाढवण्याच्या कामाला जागा हस्तांतरण करण्यास तितकेसे तयार होत नव्हते. परंतु, त्यासाठी काही जाचक अटी त्यांनी लादल्या होत्या, तथापि आम्ही अटींची तसेच भारतीय पुरातत्व खात्याची मंजुरी आणतो. परंतू, वन विभागाने जागा हस्तांतरणास जनहितासाठी परवानगी द्यावी, अशी भूमिका घेतल्याने विभागाने जागा हस्तांतरीत केली. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व खात्याची मंजुरी महत्वाची अट घातली होती. भारतीय पुरातत्व खात्याचे महासंचालक राकेश तिवारी यांची तसेच पुरातत्त्व खाते सलग्न असलेल्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री डॉ. महेश शर्मा यांची नवी दिल्ली भेट घेऊन, परवानगी देण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार विना अट परवानगी मिळाली आहे. आता कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामातील सर्व अडथळे दूर करण्यात आले असून, लवकरच जलसंपदा विभागामार्फत कास धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल, असे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images