Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोयनेतून होणार ३४०० मेगावॅट वीजनिर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'कोयना जलविद्युत प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज राज्याच्या कृषी-औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने फायद्याची आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पाचव्या व सहाव्या टप्प्याला युती सरकार चालना देणार आहे. त्यामुळे कोयनेतून कोणतीही कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार नाहीत. या कार्यालयांच्या माध्यमातून कोयनेचा पाचवा व सहावा टप्पा साकारण्यात येणार आहे. या दोन्ही टप्प्यांतून राज्याला आणखी १४०० मेगावाॅट वीज उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाला युती सरकार लवकरच मान्यता देणार आहे. अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.

मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या दालनात कोयना प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, सचिव मेढेकरी, कोयना प्रकल्पाचे मुख्यअभियंता राजेंद्र पानसे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता अंकुशी, अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता ए. टी. कसबे, चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख जयवंतराव शेलार आदी उपस्थित होते.

जलविद्युत निमिर्ती ही कमी खर्चाची असून, ती राज्याला परवडणारी आहे. राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाबाबतीत अधिकारी वर्गाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. प्रकल्पाच्या चार टप्प्यांतून दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. लवकरच प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्यातून ४०० मेगावाॅट तर सहाव्या टप्प्यातून एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. कोयना धरणांतर्गत सहाव्या टप्पा उभारला जाणार असून, त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा आराखडा अंतिम स्वरूपात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे याला मान्यता देण्यात येणार असल्याने लवकरच ३४०० मेगावाॅट वीज निर्मिती करणारा कोयना जलविद्युत प्रकल्प देशात नंबर वन ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


म्हैसाळ, ताकारी टेंभू योजना बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ, ताकारी, टेंभू सिंचन योजनांचे वीजबिल थकीत असल्याने या तीनही योजना बंद आहेत. या योजनाचे विजबील कोणी आणि कसे भरायचे? असा प्रश्न येथे उपस्थित झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना तत्कालीन मंत्री पालकमंत्री पतंगराव कदम यांच्या पुढाकराने ही रक्कम राज्य सरकारद्वारे टंचाई निधीतून भरली जायची. तीन वर्षांत अनुक्रमे १४ कोटी, १४ कोटी ५० लाख आणि ३ कोटी २५ लाख, असा निधी यासाठी दिला गेला. पण, सध्याचे भाजप-शिवसेना युतीचे सरकार असा निधी उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील एकही नेता मंत्रिमंडळात नसल्याने असा निधी मिळणे जवळपास अशक्य आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्रात एकही गाव ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीचे नाही. त्यामुळे या भागात टंचाईसदृश्य स्थिती नाही. मग टंचाई निधी मिळणार कसा आणि त्याद्वारे कराची ही रक्कम कशी भरली जाणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरधाव ट्रक दुकानात घुसला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलावरून गुरुवारी रात्री भरधाव येणाऱ्या ट्रकने ऊसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. त्यानंतर ताबा सुटलेला ट्रक उड्डाणपुलावरून सहा फूट अंतरावरील सेवारस्त्याकडेच्या श्रीराम अॅटोमोबाईल्स् या दुकानात घुसला. वर्दळ कमी असल्याने दहा ते पंधरा लोक अपघातातून सुदैवाने बचावले.

फर्निचर घेऊन कोल्हापूरकडे निघालेला ट्रक येथील शास्त्रीनगर हद्दीत आला असता भरधाव ट्रकने येथील कोल्हापूर नाक्यासमोरील उड्डाणपुलावरून निघालेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. ट्रकच्या धडकेत ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर महामार्गावरच आडवा झाला. त्यानंतर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकने आणखी वेग घेतला. ट्रक वेगाने उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यालगतच्या श्रीराम अॅटोमोबाईल्स् या दुकानात घुसला. दुकानासमोर लावलेली कारही ट्रकखाली सापडली. अवघ्या दहा मिनिटांच्या या थराराने कोल्हापूर नाका ते मलकापूरपर्यंतचा परिसर हादरून गेला. वर्दळीच्या या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेततळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

$
0
0

मिरजः मिरज तालुक्यातील आरग जवळील शिंदेवाडी येथे शेततळ्यात बुडून आदित्य आबासाहेब पाटील (७) व अक्षय आबासाहेब पाटील (८) या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. दोघांनाही शेततळ्यातून काढून मिरजेच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. शिंदेवाडी येथे दोनही मुलांच्या राहत्या घराजवळच दुपारी तीन वाजता ही घटना घडली. मुलांचे आई, वडील व आजोबा शेतात काम करीत असताना ही मुले पोहण्यासाठी शेततळ्यात उतरली. पाण्यात बुडून त्यांचा अंत झाला. काही वेळाने ही गोष्ट लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पाण्यातून काढून तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. आदित्य पहिली तर अक्षय दुसरीत शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवनचक्क्यांकडून ८ कोटींचा दंड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामप्रकरणी वन्यजीव विभागाने बजाज फिन्सर्व्ह कंपनीकडून आठ कोटीं रुपयांचा दंड वसूल केला आहे. असून अजूनही सुमारे ५१ पवनचक्क्या कंपन्यांकडून २८ कोटींच्या दंडाची वसुली बाकी आहे. अनाधिकृत १५४ पवनचक्क्या व नऊ रिसॉर्टकडून दंड वसूल करण्यात येत आहे.

व्याघ्र प्रकल्पातील अनधिकृत बांधकामप्रकरणी २०५ पवनचक्क्या व नऊ रिसॉर्टस्च्या विरोधात येथील पर्यावरण तज्ञ व वन्यजीव प्रेमी नाना खामकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणात सेंट्रल एम्पावर्ड समिती आणि सर्वोच्च न्यायालयानेही रिसॉर्टसना दंड केला होता. त्याबाबत वन्य जीव विभागाने संबंधितांना नोटीसा बजावल्या होत्या, त्यात १५एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे, तर दंड न भरल्यास बांधकाम पाडू, असा इशाराही वन्य जीव विभागाने दिला आहे. त्यानुसार बजाज फिन्सर्व्ह कंपनीने ८ कोटी रुपयांचा दंड वन्य जीव विभागाच्या कार्यालयात भरला आहे. सुमारे ५१ पवनचक्क्या कंपन्यांकडून २८ कोटींच्या दंडाची वसुली बाकी आहे. एकूण १५४ पवनचक्क्या व नऊ रिसॉर्टचा या कारवाईत समावेश आहे. दंड वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदयनराजेंसह सहा जण निर्दोष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

शहरानजीकच्या मोळाचा ओढा परिसरात २००७च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी अपक्ष उमेदवाराचा बूथ उधळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहा जणांची प्रथम वर्ग न्यायाधीश एस. डी. गावडे यांनी निर्दोष मुक्तता केली. तत्कालीन निवडणुकीसाठी ११ मार्च २००७ रोजी मतदान होते. या दिवशी अपक्ष उमेदवार विमल बाळासाहेब गोसावी यांचा बूथ मोळाचा ओढा परिसरात लावण्यात आला होता. हा बूथ उधळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेभोसले, नासीर शेख, युनूस झेंडे, शिरीष चिटणीस, सुशील मोझर व नरेंद्र बेलोशे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या खटल्याच्या कामामध्ये बाळासाहेब गोसावी व संजय पाटील या दोनच साक्षीदारांनी साक्षी दिल्या. इतर साक्षीदार साक्षीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेने काळा बिबट्या ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरात आठ महिने वयाच्या काळ्या रंगाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावरील वाहनाची धडक बसल्यामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती उप वन संरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबच्यावर गोडोली येथील रोप वाटीकेत अंत्यसंस्कार केले. गुरुवारी रात्री या बिबट्याचा मृत्यू झाला असून, खिंडवाडी येथील एका रिक्षा चालकाला हा बिबट्या शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत दिसला. रिक्षा चालकाने तत्काळ घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मागील वर्षीही याच ठिकाणी वाहनाची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासगावच्या रिंगणात नऊ जण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एकूण नऊ उमेदवारांनी उडी घेतल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न अन्य राजकीय पक्षांच्या बाबतीत यशस्वी झाले. पण, अपक्षांनी मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. भाजपचे अॅड. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी केल्याने ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध छुपा भाजप अशीच रंगणार असल्याचे दिसते.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कर्तृत्वाची दखल घेत त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. केवळ उमेदवारी देवून न थांबता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. काँग्रेस, मनसे, शेकापने कोणाच्या आवाहनाची वाट न बघता ही निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले. प्रश्न होता तो तुल्यबळ अशा भाजपच्या भूमिकेचा. त्यांच्याही नेत्यांनी वरिष्ठपातळीवरुन राष्ट्रवादीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु, स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मात्र अखेरपर्यंत निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले होते. पाटील भाजपच्या तासगाव तालुका युवा आघाडीचे पदाधिकारी आहेत. पण, अन्य पदाधिकाऱ्यांनी ते आमचे पदाधिकारी नाहीत, असे सांगायला सुरुवात केली आहे. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी संयुक्तपणे २८ रोजी शनिवारी कवठेमहांकाळ येथे बैठक बोलविली आहे. २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता माजी मंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ढवळी येथून जाहीर प्रचाराचा शुभारंभ होत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २४ मार्च रोजी एकूण १९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दहा जणांनी अर्ज माघारी घेतले.

स्वप्नील पाटीलला भाजपचा छुपा पाठिंबा

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सकारात्मक भूमिकेत असलेले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते. परंतु, भाजपचे कोणीही तिकडे फिरकले नव्हते. यावरुन स्वप्नील पाटील यांच्या आडून भाजप ही निवडणुक प्रतिष्ठेची करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वप्नील पाटील यांनी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे.

मुंबई, साताऱ्याचे अपक्षाही रिंगणात

सुमन पाटील या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार वगळता अन्य आठही उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये स्वप्नील दिलीप पाटील (सावर्डे), आनंदराव ज्ञानू पवार (तासगाव), अलंकृता अभिजीत आवाडे (सातारा), सुभाष वसंत अष्टेकर (तासगाव), सतीश भूपाल सनदी (मालगाव, मिरज), प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे (भांडुप, मुंबई), धनंजय शिवाजी देसाई (ढालगाव, कवठेमहांकाळ), विजय शंकर पाटील (मिरज) आदी अपक्षांचा समावेश आहे.

अशी होईल निवडणूक

एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २ लाख ६५ हजार मतदार असून, ११ एप्रिल रोजी मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीची मतमोजणी १५ एप्रिल रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढदिवस करणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व आमचे श्रद्धास्थान माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनाने आमचे मन व्यथित झाले असून, रामनवमीदिवशी होणारा माझा वाढदिवस साजरा करणार नाही. मात्र, इच्छा असणाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबवावेत,' असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित नसणाऱ्या मुश्रीफांचे पत्र वाचून दाखवण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशाकाकी माने होत्या.

भैय्या माने म्हणाले, 'पुरोगामी विचाराचे पाईक आर. आर. पाटील व ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या निधनामुळे आपण सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे मुरगूडमध्ये स्मारक उभारण्याचे पालिकेने जाहीर केले आहे. ते भव्य होण्याकरिता रणजित व प्रवीण पाटील यांच्याशी चर्चा करून भरीव निधी मिळवून देण्याचे मुश्रीफांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय शिवाजी विद्यापीठात आर. आर. पाटील, कॉ. पानसरे आणि मंडलिक यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाटी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.' यावेळी डी. डी. चौगुले, रमेश माळी, नंदू पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, आशा जगदाळे, आदी उपस्थित होते. शिवानंद माळी यांनी स्वागत केले. विकास पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सर्फनाला'चे काम पुन्हा बंद पाडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील बहुचर्चित सर्फनाला प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी पुन्हा बंद पाडले. प्रकल्पग्रस्तांशी झालेल्या चर्चेप्रमाणे पुनर्वसनातून मिळणाऱ्या जमिनी अजिबातच कसण्यायोग्य नाहीत. तसेच पुनर्वसनाबाबत प्रशासनाची हेकेखोरी व चालढकलपणा चालला असल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी हा पवित्रा घेतला. यासाठी प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत मोर्चाने प्रकल्पस्थळी गेले व काम बंद पाडले. या महिन्यात दुसऱ्यांदा प्रकल्पाचे काम बंद पाडल्यामुळे शासन व प्रशासनाचा प्रकल्पग्रस्तांच्या व्यथांबाबतचा असंवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

संकलन यादी दुरुस्त्या झाल्या नसल्याने काम बंद पाडत पंधरवड्यापूर्वीच प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या श्रमिक मुक्ती दलाशी प्रशासनाची चर्चा झाली होती. पुनर्वसनासाठी आवश्यक संकलन यादी दुरुस्त करणे, त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना पात्र ठरविणे, ज्या प्रकल्पबाधितांनी पर्यायी जमिनींबाबतचे पसंती अर्ज भरलेले आहेत त्यांना त्यानुसार जमिनी देण्याची कार्यवाही गतीने करण्याबाबत आदेश काढणे, ज्यांच्याबाबत असे आदेश झालेले आहेत त्यांना प्रत्यक्ष जमिनींचा ताबा देण्यासाठीची कार्यवाही करणे आदींबाबचे मुद्दे ठळकपणे चर्चेत आणले होते. यासाठीच त्यावेळी प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात आल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी दलाचे नेते व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू करू दिले होते. पंधरवड्यापूर्वी प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी दिल्यावरही आज पुन्हा बंद पाडण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक मिलिग्रॅम वजनाच्या काट्याला सराफांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने सराफ व्यावसायिकांसाठी एक मिलिग्रॅम अचूकता असलेली इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरण वापरण्याच्या आदेशाला कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाने विरोध केला आहे. यासंदर्भातील निवेदन आमदार अमल महाडिक यांना दिले आहे. विभागाचे संजय पांडे यांनी एक एप्रिलपासून नवीन यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, 'गेली २० वर्षे सराफ व्यावसायिक १० मिलिग्रॅम अचूकतेचे काटे वापरतात. त्याला संबंधित खात्याची मान्यता आहे. दरवर्षी हे काटे मंजूर करून सील करण्यात येते. एक मिलिग्रॅमचे काटे हे केमिकल लॅबमध्ये वापरले जातात. त्यासाठी संपूर्ण परिसर एअर टाइट असावा लागतो. राज्यात दोन लाख सराफ व्यावसायिक आहेत. त्यातील ९५ टक्के जणांची दुकाने एअर टाइट नाहीत. त्यामुळे एक मिलिग्रॅमचे काटे वापरात आणणे शक्य नाही. प्रत्यक्षात १० मिलिग्रॅमचे काटे तपासण्यासाठीचे तसेच ते कॅलिब्रेट करण्याची यंत्रणा या खात्याकडे नाही, असे असताना ही निर्णय चुकीचा आहे. तसेच १ मिलिग्रॅमच्या एका काट्याची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत आहे, फक्त १५ दिवसांच्या नोटीसवर हे काटे विकत घेता येणार नाहीत.' आदेश त्वरित मागे घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती महाडिक यांच्याकडे करण्यात आली.

'सराफ व्यावसायिकांनी लबाडी केली किंवा फसवणूक केली अशी तक्रार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशात व्यवसाय आणि उद्योग धंदे करणे सोपे व्हावे यासाठी प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात मात्र सराफ व्यावसायिकांवर अन्यायकारक आणि जाचक अटी लादल्या जात आहेत.'

- भरत ओसवाल, सराफ व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एजंटांची वर्दळ वाढली; वॉच कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आरटीओ कार्यालयातील एजंटाच्या कामाबाबतचा आदेश दिल्यानंतर गुरुवारी आरटीओ कार्यालयात एजंटांची वर्दळ सुरु झाली. पण अजूनही प्रशासनाच्यावतीने ओळखपत्र तपासण्यासाठी अधिकारी नेमलेला असल्याने त्यांना चुकवूनच एजंटांनी काम सुरू केले होते. याबाबत नेमका आदेश पाहून कार्यालयाच्यावतीने सोमवारपासून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी अधिकृत एजंट व डिलर्स तसेच विविध संघटनांनी नेमलेले प्रतिनिधी सोडल्यास अन्य एजंटांना आरटीओ कार्यालयात प्रवेश करण्यासही मज्जाव केला होता. अधिकृत एजंटांनाही ओळखपत्र दाखवण्याची सक्ती केली होती. याशिवाय एखादा कर्मचारी, अधिकारी एजंटांचे काम करत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच ही पाहणी अचानक केंव्हाही केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे येथील कार्यालयाने तर प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यासोबत पोलिसही नेमल्याने एजंटांनी कार्यालयात जाणे बंद केले होते. त्यातून पळवाट काढण्यासाठी काहींनी बनावट ओळखपत्रे तयार केली होती. या नियमामुळे नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर बुधवारी कोर्टाने निर्णय दिला. गुरुवारी कार्यालयाचे कामकाज सुरु होताच एजंटांनी जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनानेही पूर्वीप्रमाणेच अधिकारी नेमला. त्यामुळे पहिल्या दोन तासात एजंटांचा प्रवेश बंद झाला. मात्र दुपारी दोनच्या सुमारास कार्यालयात एजंट फिरताना दिसत होते. त्यांच्याकडे ओळखपत्रही दिसत नव्हते.

सध्या कोर्टाचे नेमके आदेश कार्यालयाला मिळालेले नाहीत. त्यामुळे आदेश काय आहेत हे पाहूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच ओळखपत्र असल्याशिवाय किंवा स्वतःचे काम असल्याशिवाय कार्यालयात अन्य व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी अधिकारी ​नियुक्त करण्यात आलेला आहे.

- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचा ‘केडर’ फॉर्म्युला

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

सहकारामधील मोठी बँक, दूध संघ वा साखर कारखान्यांच्या निवडणूक असल्या की महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय ती व्यवस्थित होतच नाही असा समज गेल्या अनेक वर्षांपासून होता. मात्र सहकार प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर महसूल विभागाची यंत्रणा न वापरता सहकार विभागाने कमी खर्चात, बिनचूक व पूर्वीपेक्षाही जास्त वेगात निवडणूक यंत्रणा राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा देखरेख संघाच्या संस्था पातळीवरील सचिवांचा खुबीने वापर करुन घेण्यास सुरुवात केली असून राज्यभरात जिल्ह्यात राबवलेला हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आहे.

सहकार क्षेत्रातील पंचवार्षिक निवडणुकांसाठी अधिकारी महसूल विभागाचे नियुक्त केले जात असल्याने ते हाताखाली अधिकारी व कर्मचारीही महसूलचेच घेत. आताही अ वर्गातील साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये महसूल विभागाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत. मात्र त्याखालील वर्गातील संस्थांसाठी सहकार विभागातील अधिकारी नेमले जात आहेत. तिथे पूर्वी महसूलच्या मतानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जात होती. त्यावेळी सहकारी संस्थांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी होत असे. सहकार प्राधिकरणानंतर मात्र या टप्प्यावरील सर्व संस्थांच्या निवडणुकांचे नेतृत्व सहकार विभागाने करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांची मदत न घेता जिल्हा देखरेख संघाकडील यंत्रणा वापरण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात संघाकडे १२०० च्या आसपास सचिव आहेत. याशिवाय जिल्हा उपनिबंधक प्रशासन व लेखापरीक्षण विभागातील २०० च्या आसपास कर्मचारी आहेत. गर्व्हन्मेंट सर्व्हंटस बँकेच्या निवडणुकीसाठी संघाकडील ८० टक्के कर्मचारी घेतले. वीस हजार मतदार असलेल्या या निवडणुकीच्या मतदानासह मतमोजणीपर्यंतच्या महत्त्वाच्या कालावधीत कोणतीही त्रुटी न राहता अगदी वेळेत प्रक्रिया संपवण्यात आली. याशिवाय अ वर्गातील आठ मोठ्या सूतगिरणींची निवडणूकही सहकार विभागाने घेतली आहे. यामधून यापूर्वी होत असलेल्या निवडणुकींचा व सध्याच्या खर्चाची तुलना पाहता कमी खर्चात निवडणूक होत आहे. हीच यंत्रणा शिक्षक बँक, कोजिमाशि, अर्बन बँकेसाठीही वापरली जाणार आहे. सध्या जरी साखर कारखान्यांची निवडणूक महसूल अधिकाऱ्यांकडे दिली असली तरी भविष्यातील या निवडणुकाही सहकार विभागामार्फत घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे येथील सध्याचा हा फॉर्म्युला राज्यभरासाठी उपयुक्त ठरणार आहे.

देखरेख संघाकडील (केडर) या यंत्रणेला मुळात निवडणुकांचा अनुभव आहे. तरीही त्यांना नवीन कायद्याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आली आहेत. आतापर्यंत घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये या यंत्रणेने बिनचूक व वेगात काम केले आहे. त्यामुळे ही यंत्रणा सर्व निवडणुकींसाठी वापरता येऊ शकते. यातून निवडणुकीचा खर्च पूर्वीपेक्षा कमी होत असल्याने संस्थांनाही ती फायदेशीर आहे.

- पी. एम. मालगावे, सीईओ, जिल्हा देखरेख संघ (केडर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीन ऑस्कर’साठी प्रमोद पाटील यांना नामांकन

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

संकटग्रस्त माळढोक आणि गिधाड या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे काम करणारे कोल्हापुरातील पक्षितज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील यांना 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कारासाठी नामनिर्देशन मिळाले आहे. लंडनस्थित 'व्हाइटली फंड फॉर नेचर' या संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. भारतातून डॉ. पाटील आणि हत्ती-मानव संघर्षाबाबत कार्यरत असलेले म्हैसूर येथील नेचर कॉन्झर्व्हेशन फाउंडेशनचे तज्ज्ञ डॉ. आनंद कुमार यांचेही पुरस्कारासाठी नामनिर्देशन झाले आहे.

पाटील हे सध्या पुण्यात कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय काम करणाऱ्या जगभरातील एकूण १७४ जणांकडून आलेल्या अर्जांतून सात जणांना नामांकित करण्यात आले आहे. लंडन येथील रॉयल जिऑग्राफी सोसायटीमध्ये २९ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. 'व्हाइटली फंड फॉर नेचर' या संस्थेने २५मार्च रोजी ग्रीन ऑस्कर पुरस्कारासाठीची नामांकने जाहीर केली आहेत.

पाटील यांनी माळढोक पक्षाच्या संवंर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन नामांकन करण्यात आले आहे. पाटील व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांचे ‌शिक्षण एमडीपर्यंत झाले आहे. एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू गर्व्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून तर एमडीचे शिक्षण पुण्यातील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहे. ३१ वर्षीय पाटील माळढोक संवर्धनासाठीच्या स्टेट कॉन्झर्व्हेशन प्लॅन, केंद्र सरकारच्या नॅशनल बस्टर्ड रिकव्हरी प्रोग्रॅम या कार्यक्रमात बॉम्बे नेचर हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने काम करत आहेत. 'बर्ड लाइफ इंटरनॅशनल' या जगातील पक्ष्यांसंदर्भात काम करणाऱ्या 'ग्लोबली थ्रेटन्ड बर्ड फोरम'साठी त्यांनी माळढोकची सद्यःस्थिती आणि अचूक आकडेवारी दिली. त्यामुळे माळढोकची नोंद सर्वधिक संकटग्रस्त गटात होऊ शकली आहे. नान्नज येथील अभयारण्यात त्यांनी लोकसहभागातून माळढोक संवर्धनाचे प्रयत्न सुरू केले आहेत.

अन्य नामांकने

अर्नाड डेसबिझ (ब्राझील), रोजमिरा ग्युलियन (कोलंबिया), पॅनट हॅडसीओयो (सुमात्रा), जॅसन इबनेझ (फिलिपाइन्स), इनौयोम इमाँग (नायजेरिया). याशिवाय केनिया येथील मधमाशांच्या संवर्धनावर काम करणारे दिनो मार्टिन यांना सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.

'जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन झाल्याचा नक्कीच आनंद आहे. त्यामुळे जैवविविधता संवर्धनासाठी काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल.'

- डॉ. प्रमोद पाटील पक्षितज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकांच्या रिक्त जागा भरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रभावहीन झाले आहे,' असा शेरा मारत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर शुक्रवारी ताशेरे ओढले. मंडळाच्या सदस्यांच्या रिक्त जागी नियुक्ती करण्याचा आदेशही कोर्टाने दिला. इचलकरंजीतील दत्ता माने व सदा मलाबादे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी हा आदेश देण्यात आला.

'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रभावी काम केल्यास औद्योगिक घटकांकडून होणाऱ्या प्रदूषणास चाप बसेल, पण मंडळच पूर्ण वेळ अस्तित्वात नसल्यास ते प्रभावी काम कसे करू शकेल,' असा सवालही न्या. एन. एच. पाटील व न्या. ए. व्ही. अचलिया यांच्या खंडपीठाने केला. सुनावणीवेळी मंडळ फक्त कागदोपत्री अस्तित्वात असल्याची बाब समोर आल्याने न्यायमूर्ती संतप्त झाले. आवश्यक सदस्यांच्या नियुक्त्या करून मंडळ किती कालवधीत अस्तित्वात आणणार हे स्पष्ट करण्याचे आदेश देत या याचिकेची सुनावणी २३ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. सुतार यांनी सांगितले, 'दहा वर्षांत मंडळाने पंचगंगा खोऱ्यामधील प्रदूषण करणारे साखर कारखाने व इतर औद्योगिक घटक बंद करण्याची कारवाई केली आहे का? मंडळ कायद्यातील तरतुदींनुसार अस्तित्वात आहे का, अशी विचारणा कोर्टाने सरकारला केली. जल प्रदूषण प्रतिबंध कायदा १९७४ प्रमाणे १ पूर्ण वेळ अथवा अर्ध वेळ अध्यक्ष, पाच सरकारी सदस्य, शेती, उद्योग, मासेमारी आदी क्षेत्रांतील पाच तज्ज्ञ, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नियुक्त प्रतिनिधी पाच सदस्य, महामंडळे अथवा कंपन्याचे दोन सदस्य व एक सदस्य सचिव अशी रचना मंडळाची असली पाहिजे. सध्या पर्यावरण खात्याचे सचिव हे प्रभारी अध्यक्ष आहेत. पाच विविध खात्यांच्या प्रधान सचिवांची नियुक्ती आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्रत्येकी १ सदस्य आहे. मात्र इतर कोणत्याही पदांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याचे निदर्शनाला आणले गेले. त्यामुळे हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.'

कोल्हापूर महापालिकेचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाला आहे. स्वच्छ पाणी नदीत सोडणाऱ्या पाइपलाइनपैकी फक्त २०० मीटरचे काम बाकी आहे. येत्या काही दिवसांत ते काम पूर्ण केले जाईल, असे महापालिकेच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले. त्यावर, २३ एप्रिलच्या सुनावणीवेळी नेमकी स्थिती स्पष्ट करण्याचा आदेश हायकोर्टाने महापालिकेला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वेळ द्या, मारेकऱ्यांचा छडा लावू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सव्वा महिने उलटून गेल्यानंतरी मारेकऱ्यांचा शोध लागत नसल्याने ज्येष्ठ नेते गोविंदरावर पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रासह तपासात गती असणारे व यशस्वी तपास करणाऱ्या अन्य परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांना तपासात सहभागी करून घेण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तपासाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी, 'आम्हाला वेळ द्या, मारेकऱ्यांचा आम्ही छडा लावणारच', असा विश्वासही पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पानसरे हत्येच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी रितेशकुमार यांनी कोल्हापूर परिक्षेत्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हल्लेखोरांना शोधण्यात अपयश येत असल्याने सरकारवर व गृहखात्यावर दबाव वाढला आहे. सरकारची कार्यक्षमता व निष्ठेवर विरोधकांकडून शंका उत्पन्न केली जात असताना पानसरे कुटुंबीयांकडून पोलिसांना तपास करण्यासाठी वेळ दिला पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. अतिशय नियोजनबद्धपणे हल्ल्याचा कट आखला आहे यावर पोलिसांचे एकमत आहे. तपास पथकांची संख्या २५ च्या पुढे पोहोचली आहे. पथकातील प्रत्येक अधिकाऱ्यांकाला स्वतंत्र जबाबदारी दिली असल्याने नियोजनबध्द तपास केला जात आहे.

शुक्रवारी बैठकीनंतर पत्रकारांनी रितेशकुमार यांची भेट घेतली असताना तपास योग्य दिशेने चालला आहे असे त्यांनी सांगितले. मारेकऱ्यांचा आम्ही छडा लावणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ३५ अधिकारी व ५०० हून अधिक पोलिस तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, सांगलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, सातारा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमोल तांबे, कोल्हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल, एम. एम. मकानदार उपस्थित होते.

माहिती देण्यासाठी पुढे यावे

पानसरे यांच्यावरील हल्लेखोर पाहणाऱ्या उमा पानसरे या एकमेव साक्षीदार आहे. हल्लेखोरांनी काही जणांनी पाहिले असेल. पण ते माहिती देण्यासाठी पुढे येत नाहीत. हल्लेखोरांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. हल्लेखोरांसंबधी ज्यांना माहिती सांगावयाची असेल त्यांनी ९७६४००२२७४ या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन मनोजकुमार शर्मा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एलबीटी’ तिढा सुटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

थकीत एलबीटीपोटी पंचवीस टक्के रक्कम तत्काळ आणि या पुढील एलबीटी रितसर भरण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दाखविल्याने एलबीटीचा वाद शुक्रवारी निवळला. खासदार संजय पाटील यांनी मध्यस्थी केली आणि त्याला महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांनी होकार दिला. थकीत एलबीटीवरील दंड, व्याजाचे निर्णय सरकारवर सोडण्यात आल्याचे एलबीटी विरोधी कृती समितीचे निमंत्रक समीर शहा यांनी सांगितले.

आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय एलबीटीचा एक पैसा भरणार नाही, असा निर्धार करून सांगलीत व्यापाऱ्यांनी गुरुवारी सांगली बंद ठेवून बेमुदत उपोषणाची बैठक मारली आहे. दरम्यान, शुक्रवारी खासदार पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर महापालिकेत बैठक झाली. त्यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील, खासदार पाटील, महापौर विवेक कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच मदन पाटील यांनी व्यापाऱ्यांना खडे बोल सुनावले. केवळ खासदार पाटील या ठिकाणी आलेत म्हणूनच आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करतोय. समस्त व्यापारी सांगलीचेच आहेत, आपलेच आहेत, म्हणून आमची संयमाची भूमिका आहे, असेही ते म्हणाले. त्यानंतर महापालिकेने यापूर्वीच दिलेला प्रस्ताव व्यापाऱ्यांनी मान्य केला. जेवढी भरायची तेवढी एलबीटी भरा, असे आवाहन वारंवार करण्यात येत होते. पण, व्यापारी आतापर्यंत्त विरोधाच्याच पावित्र्यात वावरत होते.

व्याजाबाबत सरकारचा निर्णय मान्य

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यापाऱ्यांचे एलबीटी विरोधी कृती समितीचे निमंत्रक शहा म्हणाले, 'पाठीमागील थकबाकीपैकी पंचवीस टक्के रक्कम तात्काळ भरायची. त्यानंतर एप्रिलचा एलबीटी मार्चमध्ये असा भरणा सुरू ठेवायचा आहे. थकीत रकमेवरील दंड, व्याजाबाबत सरकार जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे. हा प्रस्ताव आम्ही मान्य केला असून, शनिवारी उपोषणाच्या ठिकाणी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना याची कल्पना देण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतननिश्चिती राहिली दूरच

$
0
0

शांताराम पाटील, गारगोटी

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीचे नगारे आता जोरात वाजू लागले असून, आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. मात्र, ही शिखर संस्था ज्या संस्थांवर अवलंबून आले अशा जिल्ह्यातील गावपातळीवर असणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांमधील सुमारे २० हजार कर्मचारी किमान वेतन व अन्य सुविधांपासून वंचित आहेत. नेत्यांनी केवळ शेतकऱ्यांच्या दुधावर राजकारण करून स्वतःची पोळी न भाजता आता आम्हालाही 'वेतन स्थिरता' द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. मात्र, नैसर्गिक संकटे व बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. तरीही दूध व्यवसायानेच शेतकऱ्याला सावरण्याचे काम केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळेच जिल्ह्यात गोकुळ, वारणा, मोरणा, आदी दूध संघ दररोज सुमारे पंधरा लाखांवर लिटर दूध संकलन करतात. या संघांना दूध संकलन करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर गावागावात प्राथमिक दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. जिल्ह्यातील छोट्या गावांत दोन-तीन, तर मोठ्या गावांमध्ये आठ ते दहा दूध संस्था कार्यरत आहेत. या दूध संस्थांवर गावाचे राजकारण खेळले जात आहे. गावातील नेते म्हणणाऱ्या लोकांच्या ताब्यात या दूध संस्था आहेत. या संस्थांमध्ये सचिव, कारकून, टेस्टर, मापाडी हे कर्मचारी काम करतात. ते दररोज दूध घेणे, त्याची नोंद ठेवणे, दर दहा दिवसाला सभासदांची बिले वाटणे, तेरीज, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक अशी जबाबदारीची व जिकीरीची कामे करतात. याशिवाय येथे काम करत असताना संस्थेच्या संचालकांची मर्जी सांभाळावी लागले. न राखल्यास नोकरी जाण्याची भीती असते. त्यामुळे संस्था अध्यक्षांच्या घरातील कामेसुद्धा या कर्मचाऱ्यांना करावी लागतात. त्यांना संस्थेत दूध संकलनाचे काम सकाळी पाच ते नऊ व सायंकाळी पाच ते नऊ अशा दोन वेळेत करावे लागते. या बदल्यात त्यांना पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयापर्यंत पगार दिला जातो. गावच्या राजकीय संघर्षाचे पडसाद या कर्मचाऱ्यांना सहन करावे लागतात.

दूध संस्थांमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मुले किंवा दूध उत्पादक आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये नसणाऱ्या एकीचा फायदा संस्थाचालक, दूध संघ हे सर्वच घटक घेत आहेत. ठरावाद्वारे मतदान असल्याने नेत्यांना या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. काही वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन गोकुळ दूध संघ व्यवस्थापनाकडे प्रॉव्हिडंड फंड, महागाई भता, सुट्टी, सुट्टीचा पगार, आदी मागण्या केल्या होत्या, पण गोकुळ प्रशासनाने फारशे लक्ष दिले नाही आणि त्यानंतर संघटनेचीसुद्धा फारशी हलचाल दिसली नाही. जिल्ह्यात गटसचिवांच्या केडरला ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वर्गणी देते, त्या प्रमाणे गोकुळनेसुद्धा या कर्मचारी संघटनेकडे वर्गणी वर्ग करावी व कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. जेणेकरून या कर्मचाऱ्याना वेतन स्थिरता मिळेल, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँका बंद राहण्याचा ‘ताप’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजपासून (ता. २८ मार्च) ५ एप्रिलपर्यंत बँकांचे व्यवहार सहा दिवस विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. या कालावधीत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी एटीएमवर पुरेशा प्रमाणात कॅश उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरीही चेक क्लिअरिंगसाठी काही वेळ लागणार असून त्यादृष्टीने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. २८ मार्च रोजी रामनवमी आहे. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुटी आहे.

३० मार्च आणि ३१ मार्च रोजी बँका सुरू असतील. मात्र आर्थिक वर्षाची अखेर ३१ मार्च रोजी होत असल्याने त्यादिवशी ट्रेझरी ब्रँच रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्याचे बँक ऑफ इंडिया लिड बँकेचे मॅनेजर एम. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे करभरणा करताना कोणत्याही अचडणी येणार नाहीत. दोन्ही दिवशी रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर(एनईएफटी) सुविधा जादा तासांतही कार्यरत ठेवण्याच्या सुचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिल्या आहेत. 'दरवर्षी एक एप्रिल रोजी सुटी असते. त्यानंतर ४ एप्रिलला पूर्णवेळ काम करण्याची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देऊ शकते,' असे कुलकर्णी यांनी सांगितले.

अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर बी. डी. खरोशे यांनी ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. 'ऑनलाइन बँकिंगची सुविधा अनेकजण वापरतात. आरटीजीएस आणि एनईएफटीसारख्या सुविधा या 'ऑटो' पद्धतीच्या आहेत. बँक प्रत्यक्षात बंद असली तरी ही सुविधा चालूच राहतात. त्यामुळे ग्राहकांची फार मोठी अडचण होणार नाही' असे खरोशे म्हणाले. दरम्यान, जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीधारकांचे निवृत्तीवेतन ६ एप्रिलपर्यंत खात्यावर जमा करणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे. पत्रकात म्हटले आहे की, '१ एप्रिलला बँकांना वार्षिक लेखे बंद करण्यासाठी सुटी आहे. त्यानंतर २ आणि ३ एप्रिलला सार्वजनिक सुटी तसेच ५ एप्रिलला रविवार आहे. त्यामुळे मासिक निवृत्तीवेतन बँकेत जमा करण्यास विलंब होणार आहे.

सर्वसाधारणपणे एटीएमवर सरासरी कॅश किती लागते याचा अंदाज असतो. त्यानुसार बँका कॅश उपलब्ध करतील. त्यामुळे ग्राहकांची अडचण होणार नाही. एटीएमवर आता फंड ट्रान्सफरची सुविधाही आहे, त्याचाही वापर ग्राहक करू शकतात.

- एम. जी. कुलकर्णी, मॅनेजर, लीड बँक

२८ मार्च : रामनवमी

२९ मार्च : रविवार

२० मार्च : सोमवार, बँका खुल्या

३१ मार्च : आर्थिक वर्षाची अखेर, सुटी नाही.

१ एप्रिल : वा‌र्षिंक बॅँक क्लोजिंग

२ एप्रिल : महावीर जयंती

३ एप्रिल : गुड फ्रायडे

४ एप्रिल : शनिवार असल्याने हाफ डे

५ एप्रिल : ‌रविवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्कर होणार जेरबंद

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

गेली दोन वर्षे आजरा तालुक्यासह भुदरगड व राधानगरी परिसरात धुमाकूळ घातलेल्या एकमेव टस्करला जेरबंद करण्याबाबत वनविभागाचा अंतिम निर्णय झाला आहे. कोकणात गेल्याच महिन्यात झालेल्या कारवाईप्रमाणे प्रशिक्षित हत्तींचा वापर होणार आहे. या कारवाईची माहिती घेण्याबरोबरच आवश्यक स्क्रॉल बांधणीसाठी उद्या (ता.२८) कोकणामध्ये वनविभागाचे एक अभ्यासपथक रवाना होत आहे. त्यानुसार आजरा वनविभागाच्या सुलगाव रोपवाटिकेत (नर्सरी) अथवा मानवी वसाहतीपासून दूर किटवडे परिसरात हे स्क्रॅाल उभे करण्याची दाट शक्यता असल्याची माहिती आजरा वनपरिक्षेत्रपाल राजन देसाई यांनी दिली.

गेल्या सहा वर्षांपासून आजरा परिसरासह चंदगडमधील शेतकरी हत्तींच्या कळपाच्या उच्छादाने त्रस्त आहेत. हत्तींना पळवून लावण्याबाबतच्या योजनांशिवाय अन्य काहीही करता येत नसल्याने हत्तींकडून होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्यापलीकडे शेतकरी काहीही करू शकलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर हत्तींना रोखण्यासाठी त्यांना इजा होईल असे कोणतेही कृत्य करण्याबाबत जेलुगडे (ता. चंदगड) येथील हत्तींच्या मृत्यू प्रकरणामुळे शेतकरी धजावत नाहीत.

वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्यांच्यापरीने गो बॅक एलिफंट, फटाके व सुतळी बॉम्बपुरवठा, चिली स्मोक (मिरचीचा ठसका), आदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, पण नुकसान टाळण्यात नेहमीच अपयश आलेले आहे. दरम्यान, आजरा तालुक्याच्या परिसरातच ठिय्या मारलेला हा टस्कर गेल्या महिनाभरात भुदरगड व राधानगरी तालुक्यातही धुडगूस घालून आला आहे. तेथे या टस्कराने शेतीच्या नुकसानीबरोबरच जीवितहानीही केल्याने आमदार प्रकाश आबिटकर यांनी दरम्यानच्या कालावधीतच कोकणात प्रशिक्षित हत्तींच्या मदतीने तेथील हत्तींच्या कळपास जेरबंद करण्याची मोहीम राबविल्याप्रमाणे एक मोहीम या टस्कराबाबतही राबविण्याबाबत आग्रह धरला. या प्रयत्नांना आलेल्या यशामुळेच आता या टस्करास जेरबंद करण्याबाबतच्या कार्यवाहीस वनविभागाच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यासाठी सरकारने खास निधीची तरतूदही केली आहे. यानुसार ही कारवाई लवकरच सुरू होईल.

भक्कम स्क्रॉलबांधणी आवश्यक

सरकारच्या परवानगीने टस्कर जेरबंदीची कारवाई यशस्वी होण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून कोकणातील कारवाईची प्रत्यक्ष पाहणीतून माहिती घेण्यात येणार आहे. विशेषतः टस्कर जेरबंद झाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भक्कम स्क्रॉल आवश्यक आहेत. त्याची बांधणी करण्याची जबाबदारी स्थानिकांनाच पार पाडावयाची आहे. त्यादृष्टीने हा दौरा आखण्यात आला आहे. येथील कारवाई यशस्वी झाल्यास चंदगड परिसरातील हत्तींच्या कळपाबाबतही असेच नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images